✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16/03/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९९५ - अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृतरीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली●२००१ - नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार प्रदान२००० - हॉकीपटू धनराज पिल्ले यांना के के बिर्ला पुरस्कार जाहीर💥जन्म● १९०१ - पी. बी. गजेंद्रगडकर, भारताचे सातवे सरन्यायाधीश● १९३६ - चित्रकार प्रभाकर बर्वे● १९३६ - संगीतकार भास्कर चंदावरकर💥मृत्यू● १९४५ - गणेश दामोदर सावरकर, अभिनव भारत संघटनेचे संस्थापक● १९९० - वि स पागे, रोजगार हमी योजनेचे जनक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुनी पेंशन योजना :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज तिसरा दिवस, संपामुळे राज्यतील आरोग्य सेवा झाली विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधीमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवार संतापले, देवेंद्र फडणवीस यांची दिलगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रद्दी विक्रीतून सरकारने कमावले 63 कोटी रुपये, 12 लाख चौरस फूट जागाही झाली रिकामी; सरकारची लोकसभेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं नुकसान, पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने 2341 कोटींच्या परकीय चलनाची बचत ऊर्जामंत्री आर के सिंह यांची राज्यसभेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चंदगड आणि आजऱ्यात काजू फळ विकास योजनेसाठी 1,325 कोटी रुपयांची तरतूद; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहलीची सुधारणा तर गोलंदाजीत आर. अश्विन अव्वल स्थानावर कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भ्रष्टाचार बनलाय शिष्टाचार*‘पाचशे रूपयाची लाच घेताना अमूक कर्मचा-यांस अटक’ अशा आशयाच्या बातम्या आत्ता रोजच वर्तमानपत्रातून प्रकाशित होत आहे. कदाचित अशा बातमी शिवाय त्या दिवशीचे पेपर पूर्णच होत नसेल! राज्यात कुठे ना कुठे अशी घटना घडतेच. कारण आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनत चालला आहे. तसेच भ्रष्टाचार करण्यासाठी ही मंडळी मागे-पुढे अजिबात कसलाही विचार न करता इतरांसोबत वागत असतात. सरकारी कर्मचारी त्यास शासनांकडून त्यांच्या कुटूंबाचे पालन पोषण होईल, एवढा पगार मिळतो. तरी सुद्धा त्यांची पैसा कमाविण्याची लालसा काही केल्या कमी होत नाही. मिळेल त्या पगारात जी व्यक्ती समाधानी असते त्याला कुठेच भ्रष्टाचार करण्याची गरज भासत नाही. असे म्हटल्या जाते की, आडमार्गाने कमावलेला पैसा कसा येतो आणि किती येतो हे जसे कळत नाही तसे गेल्याचे सुद्धा कळत नाही. कारण या पैश्यांसाठी आपल्या शरीरातील घाम गळत नाही. घामाचा पैसा असेल तर त्याचा हिशेब सुद्धा लागतो. आजकाल झटपट पैसा मिळविणे आणि आपले जीवन सुखी समृद्ध बनविण्यासाठी प्रत्येकजण आपली नैतिकता वेशीला टांगून अनैतिक कृत्य करीत आहेत. भ्रष्टाचाराची सुरूवात घराच्या दारांपासून सुरू होते ते थेट मंत्रालयाच्या दारात जाऊन पोहोचते. या दरम्यान अनेकांची दारे लागतात, त्या त्या ठिकाणी भ्रष्टाचार दृष्टीस पडतो. म्हणजेच भ्रष्टाचाराची सुरूवात स्वत:पासून करावी लागते. स्वत:पासून मग तो स्वत: खासदार असेल, आमदार असेल, उच्चपदस्थ अधिकारी असेल, साधा कर्मचारी असेल किंवा खाजगी कंपनीत काम करणारा असेल, त्यांनी भ्रष्टाचार करणार नसल्याचे जर ठरविले तर याचा नायनाट होऊ शकतो. महात्मा गांधीजी म्हणतात की, कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासून करण्यात यावी. आपण मात्र इतरांकडे बोटं दाखवितो. त्यामुळे कामाची सुरूवात होतच नाही. या भ्रष्टाचाराला सुरूवात अगदी सहजपणे होते, तेव्हा आपणाला असे वाटत सुद्धा नाही की, माझ्यामूळे या भ्रष्टाचाराला सुरूवात झाली. एका कार्यालयातील काम संबंधित कर्मचा-याने अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण करून आपल्या हाती दिल्यानंतर आपल्याला आनंद होणारच. मग त्या आनंदाच्या भरात आपण त्या कर्मचा-याला ‘चला एक कप चहा घेऊ या’ असे म्हणणार. कर्मचारी ही मग आपली टेबल व खुर्ची सोडून चहा पिण्यास जाई. येथूनच मग सुरू होतो ‘चहा-पाण्याचा खर्च’. काही ठिकाणी यापेक्षा वेगळा अनुभव असेल ही कदाचित. परंतु व्यक्ती आपल्या कामाला जेव्हा सुरूवात करतो तेव्हा त्याला कामाची जाणिव अधिक प्रमाणात असते. मात्र जसे जसे सेवा वाढत जाते आणि त्या क्षेत्रात रूळले जातात तसे तसे कामाला प्राधान्य देण्याऐवजी ‘चहा-पानाला’ प्राधान्य देत असतो. यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की, भ्रष्टाचाराला सुरूवात कोणी केली, आपण की कर्मचा-याने. प्रत्येक विभागात याचे वेगवेगळे अनुभव येतात जर यदा कदाचित लाच न घेणारा अधिकारी कार्यालयाला भेटला तर त्याचे जीवन हे लोक तंगवून टाकतात. त्याच्यावर वेगवेगळ्या स्तरांवरून दबाव टाकल्या जाते आणि प्रामाणिक असलेल्या कर्मचा-यास सुद्धा या भ्रष्टाचाराच्या खाईत ओढल्या जाते. त्यांची ईच्छा नसतांना सुद्धा जेव्हा भ्रष्टाचार करण्याची पाळी येते तेव्हा त्यांना स्वत:ला पश्चाताप वाटत असेल ही कदाचित परंतु काहीच करता येत नाही. राज्यात असे ही काही विभाग आहेत ज्या ठिकाणी भ्रष्टाचार न करणे एकप्रकारे अप्रामाणिक समजल्या जाते. लाच घेणारा व्यक्ती कामाचा निपटारा तात्काळ करतो, हे सत्य आहे. भ्रष्टाचाराची कीड समाजाला लागली आहे. ती कीड समूळ नष्ट करण्यासाठी आपल्यात बदल करावा लागेल. माझ्या कामांसाठी मी एक ही रूपाया न देता काम पूर्ण करून घेण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे. मग त्यासाठी दहा वेळा चकरा मारले तरी चालेल असा विचार केल्यास यात बदल होऊ शकतो. एखाद्या कर्मचा-यास लाच लुचपत विभागात पकडून दिल्याने समाजातील ही भ्रष्टाचाराची कीड नष्ट होणार नाही. या गुन्ह्यातून सुद्धा अनेक लोक सुटतात त्यामूळे यावर सुद्धा लोकांचा आज विश्वास कमी होत चालला आहे. शेवटी जाता जाता एक बाब सांगावेसे वाटते की, ज्या दिवशी एखाद्या गोष्टीत भ्रष्टाचार करून आपण पैसा कमाविला असेल त्या रात्री आपणांस गाढ झोप लागते का? जर झोप लागत नसेल तर आपण कमाविलेले लाखो रूपये काही कामाचे नाहीत. कारण त्या पैशातून झोप विकत घेता येत नाही. इकडे प्रामाणिक काम करणा-या व्यक्तीला पैसा कमी मिळत असेल परंतु रात्री समाधानाने झोप लागते. त्यासाठी झोपेची गोळी घ्यावी लागत नाही. यावरून प्रत्येकाने विचार करावा आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी स्वत: पहिले पाऊल उचलावे, याशिवाय भ्रष्टाचार संपविणे शक्यच नाही. लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••थोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर*बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. बाबाराव हे महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी, थोर क्रांतिकारक व हिंदुमहासभेचे निष्ठावान कार्यकर्ते. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी दामोदर व राधाबाई या सुशिक्षित दाम्पत्यापोटी भगूर (नाशिक जिल्हा)या गावी सनातन वैदिक कुटुंबात झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते ज्येष्ठ बंधू होते. त्यांचे पूर्ण नाव गणेश दामोदर सावरकर होते. पण ‘बाबाराव’ या नावानेच ते सुपरिचित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले, तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. आईच्या मृत्यूच्या वेळी (१८९२) ते तेरा वर्षांचे होते, तेव्हा दामोदरपंतांनी बाबांचे लग्न करण्याचे ठरविले आणि यशोदा या मुलीबरोबर ते विवाहबद्घ झाले (१८९६). वडिलांच्या मृत्यूनंतर (१८९९) घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणात खंड पडला.विनायकराव व नारायणराव या धाकट्या भावांचा त्यांनी सांभाळ केला आणि त्यांना उच्च शिक्षणही दिले. त्यांच्या देशकार्यातही त्यांनी तेवढाच सहभाग घेतला. नाशिक येथे स्थापन झालेल्या ‘मित्रमेळा’ या क्रांतिकारी व स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे ते कार्यवाह होते (१९००). सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्या ‘अभिनव भारत’ या संस्थेतही त्यांनी हिरिरीने भाग घेतला. क्रांतिकारकांचे संघटन करण्यात ते कुशल होते. बाबारावांनी अबोलपणे अनेक क्रांतिकारकांशी संधान बांधून त्यांना प्रेरणा व उत्तेजन दिले. क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारी कवितांची एक पुस्तिका प्रसिद्घ करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्घ युद्घ पुकारले आहे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ हा प्रश्न विचारणारी सुप्रसिद्घ कविता या पुस्तिकेत होती. त्यांना ८ जून १९०९ रोजी जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. येरवड्याच्या (पुणे) तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. तिथे त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. ते आजारी पडले. पुढे त्यांची रवानगी अंदमानातील तुरुंगात झाली.अंदमानच्या तुरुंगातून या बंधूद्वयांची १९२१ च्या मे महिन्यात सुटका झाली. बाबारावांना प्रथम विजापूरच्या तुरुंगात व नंतर साबरमती येथील तुरुंगात हलविण्यात आले. तिथे त्यांना भयंकर आजाराने पछाडल्यानंतर १९२२ च्या सप्टेंबरमध्ये त्यांची सशर्त सुटका करण्यात आली तथापि त्यांच्या गुप्तबैठका, विनायकरावांच्या कार्यास मदत इ. कार्य चालू होते. औषधोपचारासाठी बाबा बनारसला जात असत. बनारसच्या बाबारावांच्या मुक्कामात तेथील विद्यापीठातील गोळवलकर गुरुजी, भय्याजी दाणी, तात्या तेलंग वगैरे दिग्गज मंडळी भेटत असत. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांची भ्रमंती चालू होती. त्यांनी महात्मा गांधींची १९३० मध्ये भेट घेऊन सुखदेव, भगतसिंग व राजगुरू या क्रांतिकारकांची फाशीची शिक्षा कमी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी विनंती केली होती. मुंबईला एंपायर चित्रपटगृहात बाँबस्फोट झाला. त्याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून बाबारावांना अटक झाली (१० एप्रिल १९३३). या बाँबस्फोटाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता हे सिद्घ होऊनही त्यांना नाशिक येथे स्थानबद्घ करण्यात आले. १८ मे १९३७ रोजी बाबांची बिनशर्त सुटका झाली पण व्याधिग्रस्त शरीरामुळे त्यांना अखेरपर्यंत वेदनांशी सामना करावा लागला. अखेर १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे त्यांचे निधन झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजाच्या हितासाठी ज्या ज्ञानाचा उपयोग होत नाही ते ज्ञान काहीही कामाचे नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बॉर्डर - गावस्कर कसोटी चषक २०२३ भारताने किती फरकाने जिंकला ?२) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ?३) कोणत्या राज्याने अलीकडे ५४ वर्षांनी संतोष ट्रॉफी जिंकली आहे ? ४) तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?५) मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) २ - १ ने २) एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स ३) कर्नाटक ४) दुसरा ५) कोनराड संगमा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. सुरेश तेलंग, नांदेड👤 शिवराज भुसेवार, नांदेड👤 कैलास राखेवार, नांदेड👤 अनिलकुमार जैस्वाल, धर्माबाद👤 शिवम भंडारे, धर्माबाद👤 अनिल कांबळे, नांदेड👤 मुरली ईबीतवार👤 साईनाथ बोधनपोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥ जनी सज्जनी वाद हा वाढवावा। पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.**जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाते असे तयार करा की, ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे. जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम, जिव्हाळा, मैत्री, आपुलकी इ. गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*यशस्वी क्रियाशीलता*ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले. पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला . शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !' प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं. एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता ! उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे! यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment