✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/03/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक हवामान दिवस*💥 ठळक घडामोडी● १९९९ लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.💥जन्म● १९१० : डॉ. राम मनोहर लोहिया, भारतीय समाजवादी नेते● १९२६ : रविंद्र पिंगे.● १९७६ - स्मृती इराणी, अभिनेत्री व माजी केंद्रीय मंत्री● १९८७ - कंगना राणावत - अभिनेत्री💥मृत्यू● १९३१ सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचं पुण्यस्मरण.● २००८ - मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील● २०२२ - भारताचे ३५ वे सरन्यायाधीश रमेशचंद्र लाहोटी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या', कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत पंतप्रधानांच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महिलांना एसटी नंतर खाजगी बसमध्येही 50 टक्के सूट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंमलबजावणी, महिला प्रवाश्यानी केले निर्णयाचे स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोणताही संप किंवा निदर्शनांमध्ये सहभागी होऊ नका, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात 4 दिवस पावसाची शक्यता, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापूरसह गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, 28 एप्रिल रोजी होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गुढीपाडव्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रा; मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत, राज्यभरात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएलनं महत्त्वाचा नियम केला लागू, आता नाणेफेकीनंतरही ठरवता येणार प्लेईंग 11*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जलसाक्षरता : काळाची गरज*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1939782872815144&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक हवामान दिन*जगभरात आज २३ मार्च हा दिवस 'जागतिक हवामान दिन' म्हणून साजरा केला जातो. हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. दरवर्षी त्यासाठी एक थीम ठेवली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम केलं जातं. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा सकारात्मक-नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था १९५० मध्ये स्थापन केली गेली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल. जागतिक हवामान संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जागतिक हवामान दिन पाळला जातो. WMO ची निर्मिती १९५० मध्ये झाली आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यात मदत करण्यासाठी बरेच काही उपक्रम केले आहे. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. या आंतरराष्ट्रीय संघटनेचे १९१ सदस्य देश आणि प्रदेश आहेत. ही संघटना पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावण्यास मदत करते जेणेकरून लोकं त्यांच्यासाठी तयार होऊ शकतील आणि कोणतेही नुकसान होणार नाही. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या नियतीचे मालक बनापण परिस्थितीचे गुलाम बनू नका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक हवामान दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक हवामान दिवस - २०२३ ची थीम काय आहे ?३) 'जागतिक हवामान संस्था'चे मुख्यालय कोठे आहे ?४) जागतिक हवामान संस्था केव्हा स्थापन झाली ?५) जागतिक हवामान दिवसाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?*उत्तरे :-* १) २३ मार्च २) जागतिक अन्न प्रणालीला समर्थन देणारी मोजमाप ३) जिनेव्हा, स्वित्झर्लंड ४) २३ मार्च १९५० ५) १९६१*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आचार्य सूर्यकांत, सेवानिवृत्त हिंदी शिक्षक👤 अशोक गड्डमवार👤 संजय मनुरे, हिंदी कवी, धर्माबाद👤 साईनाथ सुत्रावे, माध्यमिक शिक्षक👤 साईनाथ मुलकोड, येवती 👤 विनायक नरवाडे👤 नरसिंग यमेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे। अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥ धरीं रे मना आदरें प्रीति रामी। नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.**कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण स्वतः केलेल्या कृतीतून मिळालेला अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. आपण करत असलेल्या कृतीसाठी लागणारे साहित्य कौशल्य, एकाग्रता, पूर्वानुभव, समयसूचकता या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळतात. हे आपल्याला दुस-याच्या करण-या कृतीतून मिळत नाही.आपल्याला जो आनंद आणि कृती केल्याचे मनाला समाधान मिळते ते इतरांच्या कृतीतून मिळत नाही. यातून अजून एक आपल्याला स्वावलंबन कसे असते हे देखील शिकायला मिळते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लोभाची शिक्षा*एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस*तात्पर्य –* लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment