✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *१९७५ : आंतरराष्ट्रीय महिला दिन*💥ठळक घडामोडी● १९४८ : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.● १९९८ : भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.💥जन्म● १८६४ : मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे● १९२१ - साहीर लुधियानवी, हिंदी गीतकार.● १९२८ - वसंत अनंत कुंभोजकर, मराठी लेखक.● १९३० - चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू, मराठी साहित्यिक.● १९६३ : गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९८९ - हरमनप्रीत कौर, भारतीय महिला क्रिकेट खेळाडू💥मृत्यू● १९५७ - बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर, स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री● १९८८ : अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यवतमाळमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोदावरी नदीवरील डावा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, पिकांचे नुकसान, कोपरगाव तालुक्यातील घटना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत, एकट्या नाशिक जिल्ह्यात 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, धुळ्यातही गारपिटीने पिकांचं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोनराड संगमा दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान ; दोन उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भविष्यातील संघर्षांसाठी आत्तापासून तयार राहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सूचक इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *PCB ने पुन्हा केली BCCIची कॉपी! आता पाकिस्तानमध्ये वुमन्स लीगचं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने ........*कविता, लेख आणि लघुकथा* वाचा खालील लिंकवर ---http://nasayeotikar.blogspot.com/2023/03/world-women-day.htmlसाहित्य वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎁 *प्रसिद्ध महिला प्रश्नमंजुषा- महिला दिन विशेष माहिती*🎁*व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/FpDuS4HGmyM?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिन विशेष*● क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला.★ याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.★ यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली.★ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम/नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती.★ त्या परिषदेला 17 देशांमधून 100 महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली.★ त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी 2011 साली साजरी झाली.★ भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला.★ महिलांना सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले★ १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. तर प्रत्येक वर्षांची खास थीम स्वीकारायला सुरुवात झाली 1996 साली, पहिलं घोषवाक्य होतं – ‘भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरणं ठरवणं.’◆ 2023 सालच्या महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांची थीम – ‘डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी’ अशी आहे. ★ काही देशात जसे की, बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आवाजाचे महत्त्व समजते – मलाला युसूफजाई*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला ? २) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती ?३) 'पक्ष्यांचा राजा' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?४) जीवनसत्त्व 'के' चे रासायनिक नाव काय आहे ?५) शिवरायांचे बालपण कुठे गेले ?*उत्तरे :-* १) प्रमोद चौगुले ( सलग दोनदा प्रथम क्रमांक ) २) मराठी ३) गरूड ४) फायलोक्विनोन ५) पुणे*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मारोती भोसले, सहशिक्षक, धर्माबाद👤 साहेबराव बोने, देगलूर👤 शरणप्पा नागठाणे👤 शिवाजी पटारे👤 बालाजी पा. कदम चिरलीकर👤 श्रीनिवास भुतावळे👤 साई पेंटर नुतिवाड👤 संभाजी पाटील👤 विकास खानापूरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.**ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रस्ता कोणताही असो तो कधीच कुणाला चुकीच्या दिशेकडे घेऊन जात नाही.चुकतो तो आपण..!आपल्या मनात जे काही विचार असतील त्या विचारानुसार आपण रस्त्यावरुन जातो.मग तुमच्या त्या विचारात चांगले किंवा वाईटही विचार असू शकतील.मग त्यात रस्त्याचा काय दोष ?दोष तर आपलाच आहे ना ? मग केव्हाही चांगले विचार मनात आणून जीवनाला समृद्ध करायचे असेल तर तुमचा कोणताही रस्ता तुमच्या चांगल्याच ध्येयाकडे घेऊन जाऊ शकतो.तो निरंतर तुम्हाला तुमच्या चांगल्या ध्येयाकडेच जा म्हणून सांगतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तृप्तता*प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्याआधीच एक संन्याशीबुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला, '' हे राजन, जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्र्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्र्चर्य वाटले. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्या आता सोन्याच्या मोहोरांनी भरून टाकावे व सन्मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहोरा आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्याच्या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्र्चित काय होते आहे की आपण टाकलेल्या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्याच्या मोहोरा संपल्या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो पण मनुष्य तो मिळविण्याचा कधीच प्रयत्न करत नाही.*तात्पर्य*तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment