✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25/02/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी● १९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी● १५६८- सम्राट अकबर बादशहाने राजपुतांचा मोठा पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.💥जन्म● १९८१: भारतीय अभिनेता शहीद कपूर● १९७४: दिव्या भारती● १८९४: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत,💥मृत्यू● भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी● १८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन● हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी● १९६४ : शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद झालं धाराशिव; केंद्राची परवानगी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *G20 परिषदे निमित्त औरंगाबादेत साकारली 456 फूट लांब आणि सात फूट उंचीचं वारली चित्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात स्वस्त इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करुन देण्यासाठी मारुती प्रयत्नशील : शशांक श्रीवास्तव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या; शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे, अजित पवार मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या पतीचं निधन; पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापुरात जुन्या पेन्शनसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचा 14 मार्चपासून बेमुदत संप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*📚गोष्टींचा शनिवार-खट्याळ उंदीर📚**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/S903rBGck6o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारुडकार संत एकनाथ*सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ हे महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यl दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य (एकनाथ षष्ठी हा) दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिति गरीब असली तरी चालेल,पण विचार ‘भिकारी’ नसावेत…*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'हरित मुख्यमंत्री' म्हणून कोण ओळखले जातात ?२) लिव्हिंग हेरिटेजचा मान मिळवणारे जगातील पहिले विद्यापीठ कोणते ?३) नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? ४) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?५) जीवनसत्त्व ब - ३ चे रासायनिक नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश २) विश्वभारती विद्यापीठ ३) बी. व्ही. आर. सुब्रमण्यम ४) होन व शिवराई ५) नायसिन*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई डिब्बेवाड, सहशिक्षक,👤 योगेश राजेश पापनवार, वसमत👤 बालाजी आगोड👤 प्रदीप वल्लेमवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि संगे समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे॥ तये संगतीची जनीं कोण गोडी। जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'पावसाळा आला की कोकिळ मौन होते', कारण पावसाळा हा बेडकांचा असतो.' बेडकांच्या आरडाओरडीपुढे बिचा-या कोकिळेचे मधुर गायन कोण ऐकणार ? एक कवी म्हणतो, 'बाई कोकिळे, येथे समस्त बहिरे बसलेले आहेत. उगीच तू तुझे मधुर बोलणे का सुरू करतेस ? ज्यांना ऐकायला येत नाही, ते तुला तुझ्या काळ्या रंगावरून कावळाच समजतील. तेव्हा गप्प राहणे यातच शहाणपण आहे.**शहाण्याने अनुकूल, प्रतिकूल समय ओळखूनच वागावे. आपली उपेक्षा होत आहे, आपणांस कोणी ओळखत नाही असे समजून कुढत बसू नये. वसंत ऋतु आला म्हणजे कोकिळा कोण नि कावळा कोण हे जसे आपोआप कळते, तसेच जाणकार भेटला म्हणजे परिक्षा होते. गिधाड-गरूड, गाढव-घोडा, बगळा-राजहंस, यातील फरक वरवर कळत नसला तरी योग्य समयी खरे-खोटे, सोंग-ढोंग उघडे पडते.**"हंसाने आपली चाल सोडली नाही, कावळ्याची बढाई उघडी पडली. नुसती बढाई मारून लढाई जिंकता येत नसते. चढाई करतानाच स्वत:ची शक्ती, गुणवत्ता अजमावून पाहायची असते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे एखाद्या गीताला सुमधुर संगीतात संगीतबद्ध करायचे असेल तर त्यासाठी अनेक वाद्यांचे सुर एकत्रित आणावे लागतील आणि त्या वाद्यांना वाजवणारे किंवा चालवणारे अनेक कलाकार एकत्रीत आणून गीताला तालबद्ध आणि स्वरबद्ध करावे लागेल तेव्हा कुठे सुमधुर गीत ऐकण्यासाठी तयार होईल.अर्थात इतरांना त्या गीताचा आस्वाद घेता येईल.त्याचप्रमाणे एखादी चांगली कृती करण्यासाठी किंवा ती कृती सर्वमान्य होण्यासाठी सर्वांच्याच सहभागाची गरज असते आणि त्यात सर्वांचेच सहकार्य असेल तर ते नक्कीच एखाद्या सुमधुर गीतासारखेच सुसंस्कारीत बनेल आणि नक्कीच लोक अनुकरण करायला लागतील.कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी अनेकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित, एकोप्याने राहणे गरजेचे आहे आणि तसे राहिल्यास सा-यांनाच चांगला फायदा होईल.नाहीतर एकटे राहून एकाकी जीवन जगण्याचा अट्टाहास केला तर त्या जगण्याला मीठविरहित जेवन केल्यासारखेच जीवन चवहिन होईल हे लक्षात असू द्यावे.जीवनात चांगल्या गोष्टींसाठी एकी आणि एकोपा असणे गरजेचे आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आजची बोधकथा* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment