✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21/03/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक वनदिन* *पृथ्वी दिन**जागतिक कटपुतली दिन**जागतिक कविता दिवस*💥ठळक घडामोडी● १९७१ - जॉर्जटाऊन येथे भारताच्या सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिले वहिले शतक, ११६ धावा.● १९९२ : भारताची ‘शंकूल’ ही दुसरी पाणबुडी नौदलात सामील झाली● रात्र-दिवस समान असणारा दिवस आहे● २००३ - जळगाव नगरपालिकेची स्थापना💥जन्म● १८४७ - बाळाजी प्रभाकर मोडक● १९१६ : बिस्मिल्ला खाँ, भारतीय सनईवादक.● १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.💥मृत्यू● १८४३ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष● १९७३ - नटवर्य शंकर घाणेकर● १९७३ - यशवंत रामकृष्ण दाते, कोशकार२००५ - दिनकर द. पाटील, दिग्दर्शक● २०१० - अर्थशास्त्रज्ञ बाळ गाडगीळ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईसह राज्यात अवकाळीचा कहर सुरुच, शेती पिकांचं नुकसान ; नांदेड जिल्ह्याला मोठा फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार, अडीच लाख सरकारी पदं भरणार; राहुल गांधींची कर्नाटकात घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागतिक मंदीची चाहूल... मेटा कंपनीनंतर अमेझॉनमध्ये मोठी कर्मचारी कपात, 9,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ, प्रतितोळा दर 62 हजारांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *22 मार्च रोजी होणाऱ्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना टीम इंडिया जिंकून मालिकेवर कब्जा करेल का ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक कविता दिवस त्यानिमित्ताने एक काव्य रचना *।। कविता ।।*शब्द हेच धन शब्द हेच मनशब्दामुळेच जिवंत आहे तनकवितेतील शब्द बोलाविते मलाकवितेतील शब्द जागविते मलाकवितेमध्येच गुंतला माझा प्राणकवितेनेच दिलाय मान सन्मानकविता आहे म्हणून मी आहेकवितेसाठी माझा जन्म आहेकवितेमुळे माझी ओळख झालीयाच कवितेने मला प्रसिद्धी दिलीकवितेने मला नेले सातासमुद्रापारकवितेनेच वाढविला माझा परिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक वन दिवस (International Day of Forests) दरवर्षी २१ मार्चला जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.झाडे ही जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. परंतु दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर (३२ दशलक्ष एकर) पेक्षा जास्त जंगले नष्ट होत आहेत, हे क्षेत्र जवळ-जवळ अंदाजे इंग्लंडच्या आकाराचे आहे. जशी जंगले नष्ट होतात, तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात: जंगलतोडीमुळे जगातील १२-१८ टक्के कार्बन उत्सर्जन होते – जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीचे आहे. तितकीच महत्त्वाची, निरोगी जंगले ही जगातील प्राथमिक 'कार्बन शोषकां'पैकी एक आहेत.जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचीच केवळ हानी होते असे नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली जाते. वन्यजीवांची होरपळ होते. वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्येही अशा बऱ्याच घटना होत आहेत. जंगल वाचविणे भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टरबूजमध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?२) टरबूजचा उगम कोठे झाला ?३) टरबूजला मराठीत काय म्हणतात ?४) टरबूज खाण्याचे फायदे कोणते ?५) टरबूजला इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) जीवनसत्त्व C, A, B6 २) इजिप्त ( आफ्रिकेच्या कलहरी वाळवंटात ) ३) कलिंगड ४) रोगप्रतिकार शक्ती वाढते, मन प्रसन्न, हृदयरोगावर प्रभावी etc. ५) Watermelon*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनय चव्हाण, उमरखेड, यवतमाळ👤 प्रकाश सालपे, यवतमाळ👤 श्रीधर बिरादार, अचवला👤 पेंडेला अनिल, चिंचालम, तेलंगना👤 शिवा गुडेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना। अती काम त्या राम चित्ती वसेना॥ अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा। अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥६४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.**शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अंगी नम्रता असणे, मधुर बोलणे, सत्याचा मार्गावर चालणेआळसाचा त्याग करणे व कठोर परिश्रम करण्याची तयारी असणे या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. जर ह्या गोष्टीपासून दूर झाले तर जीवनात यश मिळणे कठीन होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ कोल्हा,लांडगा व घोडा ❃* *एका कोल्ह्याने शेतात* चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले. घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्याने पाहणार्या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.' ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !' *_तात्पर्य_* *स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्याच्या सहानुभूतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
खूप छान
ReplyDelete