✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31/03/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १८६७ - प्रार्थना समाजची स्थापना.● १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.● १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.● २००१ - भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.💥 जन्म :-● १८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी 💥 मृत्यू :- ● २०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग● २००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड, मराठी माणसाला मिळाला हा मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक नवीन संसदेच्या इमारतीत अवतरले, कामाचा घेतला आढावा, संसदेच्या नवीन इमारतीत एकावेळी 1200 हून अधिक खासदार बसण्याची सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशभरात राम नवमीचा उत्साह, शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, मराठवाड्यात रामजन्मोत्सव धुमधडाक्यात, छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यात उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवसात 694 रुग्णांची भर, 14 दिवसात तिप्पट रुग्णवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी व्यवस्था बनली निष्क्रिय आणि शिथिल, वेळेवर काम करत नसल्याचे ताशेरे ; द्वेषयुक्त वक्तव्यांवर सुप्रीम कोर्टाचा संताप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आयपील 2023 : चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये कांटे की टक्कर, आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार लढत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *BCCI चा पाकिस्तानला दणका! आशिया कपचं यजमानपद काढून घेतलं, आशिया कप 2023 संयुक्त अरब अमिराती (UAE) किंवा कतार येथे आयोजित केला जाण्याची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सैनिक : देशाचा संरक्षक*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हापूर*कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य  भाषा  मराठी  आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे.  पंचगंगा  इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास  पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे.कोल्हापूर हे शहर व इथली माणसं ही मन जिंकून घेतात. कोल्हापूर हे तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापुरी चपल ही खूप प्रसिद्ध आहे .आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ प्रसिद्ध आहे.हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि  अश्विन  शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. श्री करवीर निवासिनी चे मंदिर खूप सुंदर आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला ?२) बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतांना व्याजदर द्यावा लागतो, त्यास काय म्हटले जाते ?३) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?४) भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ?५) गीत सेठी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*उत्तरे :-* १) सन १९०१ २) रेपो दर ३) ५९ टक्के ४) सिक्कीम ५) बिलियर्ड्स*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 राम शेवडीकर संपादक, उद्याचा मराठवाडा👤 वंदना गुरुपवार, नांदेड👤 गंगाधर बेलूरवाड👤 एस. जे. पल्लेवाड👤 विश्वनाथ आडेराव, धर्माबाद👤 शंकर गंगुलवार, धर्माबाद👤 सचिन अनमूलवाड👤 उस्मान चाऊस👤 वरद राजेंद्र चिंतलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि नामें महादोष जाती। जयाचेनि नामें गती पाविजेती॥ जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.**ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर  फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........*            *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !**एक कवी लिहून जातो.....*          *......सदियाॅ बित गयी टूटी*                     *हुई डोर को थामे*                   *शायद कोई वजह मिल*                     *जाए जिने की....!*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो.जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा-समोर आले तेव्हा,कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या! दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले की, आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार...तितक्यात,श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. तेव्हा, पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे.जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, "पार्थ, आधी तू रथाच्या खाली उतर."त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला.त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले  घोडे बाजूला काढले व नंतरच स्वतः रथाच्या खाली उतरला. दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला.जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतरल्या रथ आपोआप कसा काय पेटला "अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? "तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, "युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही  करू शकले नाहीत. ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भोवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस."त्याच प्रमाणे मानवी देह आहे. जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण, आनंद ,सुख ,ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment