✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/03/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी● १७०२ - पहिले इंग्लिश भाषा दैनिक 'डेली कौरंट' प्रकाशित● २००७ - २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन💥जन्म● १९१५ - विजय हजारे, भारतीय क्रिकेटपटू फलंदाज💥मृत्यू● १६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुनी पेन्शन योजना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नका, असं आवाहन केलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *युद्ध संपवण्यासाठी पुतिन अणुबॉम्बचा वापर करू शकतात; अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा मोठा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपुरात 30 एप्रिलपर्यंत रस्ते, चौकावर भीक मागण्यांवर बंदी; शहरात कलम 144 लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेतकऱ्याला जात विचारु नये, राज्याच्या कृषी विभागाचं केंद्रीय खते आणि रसायने विभागाच्या सचिवांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशातून मका निर्यातीत मोठी वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अश्विनचा विकेटचा षटकार, ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपला, भारताची आश्वासक सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - राजू आणि कुत्र्याचे पिल्लू*http://nasayeotikar.blogspot.com/2021/05/02052021-dogs-story.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विजय हजारे*विजय हजारे यांचा जन्म मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. सांगलीतील शिक्षकाच्या आठ मुलांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव आला होता.प्रथमश्रेणी क्रिकेट मध्ये २३८ सामने ते खेळले. यामध्ये त्यांनी ५८.३८ च्या सरासरीने १८७४० धावांचा पाऊस पाडला. या प्रथमश्रेणी क्रिकेट मधील हा भारतीय धावांचा विक्रम प्रथम सुनील गावसकर आणि नंतर सचिन तेंडुलकर यांनी मोडला.प्रथमश्रेणीत त्रिशतक करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यांनी 'द हिंदूज' विरुद्ध १९४३-१९४४ मध्ये ३०९ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३१६ आहे. अशाप्रकारे त्यांनी प्रथमश्रेणी सामन्यात दोन त्रिशतके झळकावली.प्रथमश्रेणीत ६० शतके आणि सलग तीन कसोटींमध्ये शतक नोंदवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी गुल मोहंमद यांच्यासमवेत १९४७ मध्ये ५७७ धावांची भागीदारी केली होती.ती भागीदारी २००६ मध्ये श्रीलंकेच्या कुमार संघकारा आणि महेला जयवर्धने यांनी साउथ आफ्रिकेविरुद्ध ६२४ धावा करून मोडली.कसोटी क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांनी ३० कसोटींमध्ये ४७.६५ च्या सरासरीने २१९२ धावा केल्या. यामध्ये त्यांची नाबाद १६४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी ६१ च्या सरासरीने २० बळी घेतले. यामध्ये त्यांची ४/२९ ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची विकेट त्यांनी तब्बल तीनदा घेतली. त्यामुळेच कदाचित ब्रॅडमन हे हजारेंच्या मध्यमगती गोलंदाजी समोर खूप सावधानता बाळगायचे.*विजय हजारे यांच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिला कसोटी विजय मिळवला.*हजारे हे मितभाषी असल्यामुळे, भारताने पहिला कसोटी विजय मिळवल्यानंतरही ते आपल्या सहकारी खेळाडूंना फक्त 'शाब्बास' म्हणाले.कसोटी क्रिकेटमधील विजय हजारे यांची कामगिरी पाहता त्यांचा सर्वोत्तम फलंदाजात समावेश होतो. मात्र नेतृत्व केलेल्या १४ पैकी १२ कसोटीत त्यांना धावांसाठी झगडावं लागलं. त्या १२ कसोटी सामन्यात त्यांनी २४.४२ च्या सरासरीने ५५५ धावाच केल्या.तेव्हापासून कर्णधार पदाचे दडपण त्यांच्या कामगिरीवर परिणाम पाडत असल्याचे क्रिकेट पंडित मानू लागले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पूर्वी भारतीय क्रिकेट मध्ये अनेक विक्रम करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यामुळे त्यांना आद्य भारतीय विक्रमादित्य असेच म्हणावे लागेल.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची एक संधी होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन कोठे पार पडत आहे ?२) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडणार आहे ?३) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन कोण करत आहे ?४) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?५) महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत ?*उत्तरे :-* १) चंद्रपूर २) ११ ते १२ मार्च २०२३ ३) इको - प्रो संस्था, चंद्रपूर ४) राजकमल जोब, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक ५) डॉ. जयंत वडतकर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रलोभ माधवराव कुलकर्णी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जि प हा वाघी जि. नांदेड👤 संतोष देवणी कर, देगलूर👤 भाऊसाहेब उमाटे, लातूर👤 विजयकुमार नागलवार, नांदेड👤 संदीप सूत्रावे👤 सूर्यकांत सोनकांबळे👤 रमेश कवडेकर👤 संदीप दुगाडे👤 विशाल इंगळे👤 नरसय्या गैनवार👤 जब्बार मुलानी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं होइजे धन्य या रामनामे। क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥ उदासीनता तत्त्वता सार आहे। सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *'दिव्यांना' भारतीय संस्कृतीत खूप महत्व असल्यामुळे अनेक मंगल कार्याच्यावेळी त्यांची पूजाही केली जाते. आमावस्येला घरातले सर्व दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू वाहिलं जातं. घरभर दिवे लावले जातात. घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशमान होऊन दारिद्ररूपी, अज्ञानरूपी अंधार दूर होऊन घरात सुखसमृद्धी नांदावी, अशी या पाठीमागे भावना असते.* *कोणताही सण-समारंभ असो वा जन्म किंवा मृत्यूचा प्रसंग, दिव्याचं आपल्याशी घट्ट नातं जडलेलं आहे. धर्म, जात कोणतीही असो, दिवा ज्योतीच्या रूपाने असेल किंवा मेणबत्तीच्या रूपाने, तो पुजनीय मानला जातो.* *दिव्यांचे जवळजवळ 250 प्रकार आहेत. दिवे लावताना या दिव्यांचा दैदिप्यमान इतिहास खचितच कोणाला माहित असेल. तो समजून घेऊन जपला तर हा तेजाचा, प्रकाशाचा प्रवास एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाण्यास आपलाही हातभार लागेल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे सुगंधी फुले आपल्या सुगंधाने इतरांच्या मनाला आपल्याकडे आकर्षित करून मोहीत करतात.त्याप्रमाणे सज्जन माणसेदेखील आपल्या सद्विचाराने आपल्याकडे आकर्षित करून आपल्या सानिध्यात असलेल्या इतरांच्या जीवनाचा कायापालट करतात. सज्जनांच्या सहवासात राहिले तर आपलेही जीवन सन्मार्गी लागेल व आपल्या जीवनाला एक चांगली नवी दिशा मिळेल. ज्यामुळे आपली प्रगती होऊ शकेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अपमान आणि उपकार*एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत. *तात्पर्य*"माणसाने अपमान तात्काळ विसरून जावे आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment