✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04/03/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *औद्योगिक सुरक्षा दिवस*💥ठळक घडामोडी● १८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले● १९६१ : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.● १९८४ : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.● १९५१ : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.💥 जन्म :- ● १९२२ : दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.💥 मृत्यू :- ● १९७१ : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बारावीचा पेपर फुटला नाही, त्यामुळे गणिताची पुन्हा परीक्षा होणार नाही, पेपरफुटी प्रकरणावर राज्य शिक्षण मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जागतिक बँक भारताला एक अब्ज डॉलर कर्ज देणार, आरोग्यसाठी होणार निधीचा वापर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र सीईटी सेलकडून परीक्षा नोंदणी आणि कॅप राऊंडसाठी मोबाईल अॅप लाँच करण्यात आले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासनाच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यंत दोन वर्ष वाढवून देण्यात आली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आंध्र प्रदेशमध्ये गुंतवणुकीचा ओघ; 340 प्रकल्पातून 13 लाख कोटींची गुंतवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती, समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सलामीचा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-चिनू व गोगो,fun in metro**व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/DjS_bheqK64?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*१) सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?*👉 चादरीसाठी*२) तुळजाभवानी मातेचे मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे ?*👉 उस्मानाबाद*३) रेणुका मातेचे मंदीर कोठे आहे ?*👉 माहूर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी। प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥ सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोणताही माणूस दुस-या माणसाला का फसवतो? विश्वासघात का करतो? कारण आहे त्या सुखात, आहे त्या समाधानात माणूस राहू शकत नाही. माणसाला थोडंफार सुख-समाधान मिळत असतंच. पण त्याची जगण्याची, विचार करण्याची बैठक पक्की नसते, कसं जगायचं, हे एकदा निश्चित ठरवलं की आहे त्या सुखा-समाधानातही माणूस छान राहू शकतो.**आहे त्या आनंदात समाधान न मानणारी माणसे स्वत:ला आणि इतरांनाही छळत असतात. सुख, समाधान कधी कुणाला मिळालेच नाही असे होत नाही. संकटे आली की माणूस म्हणतो, हे माझ्याच वाट्याला काय आले. एक! दु:खाच्या ठोकरीने तो सुखाच्या जागा विसरून जातो. सुखाशी कृतघ्न होतो. पण तो विसरतो, संकटे येण्यापूर्वी तो पावसात भिजला होता. त्याने सुर्योदय पाहिला होता. फुलांनी बहरलेली झाडं पाहिली होती. उन्हाळ्यात जांभळं खाताना एकमेकांना वाकुल्या दाखविल्या होत्या. सुखाच्या जागा आपल्याजवळच असतात.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पायरीच्या दगडावर उभे राहून लोक मंदिरावर असणा-या कळसाची स्तुती करतात.पण लोकांना कुठे माहित आहे की,कळस हा बांधलेल्या मंदिराच्या शिखरावर आहे ,मंदिर हे मजबूत असलेल्या पायावर उभे आहे आणि पाया हा पायरीपासूनच सुरू असतो आणि पायरी ही दगडाचीच बनलेली असते.जर एखाद्या पायरीचाच दगड बाजूला झाला तर मंदिरातही जाणे अवघड जाते आणि कळस पाहणेही त्यापेक्षा अवघड.एवढेच नाही तर पायरीविना कळस कसा बरे उभा राहील.कळसाला लोक दुरुन पाहतात तर पायरीला अगदी जवळून. पायरीवर डोक ठेऊन नमन करतात.पायरीचा दगड जरी असला तरी वरच्या कळसापेक्षा अधिक महत्व पायरीला देतात.त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसावरच मोठ्या माणसांचे जीवन अवलंबून आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. लहान आणि सामान्यपणे जीवन जगणा-या माणसाकडेदेखील इतरांनी त्यांच्याकडे वेगळ्यादृष्टीने पाहू नये. कारण त्यांच्या कष्टावरच मोठ्या लोकांचे जीवन अवलंबून आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ परोपकार ❃* ••◆•◆•◆★◆•◆•◆•• "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात. *_🌀तात्पर्य_ ::~* जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "**प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment