✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01/04/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एप्रिल फूल दिवस*💥 ठळक घडामोडी● १८८२ : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.● १९३३ : भारतीय विमानदलाची स्थापना.● १९३५ : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.● १९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.● २००४ : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.💥 जन्म :-● १५७८ : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे.● १९२० : पंडित रविशंकर यांचा जन्म● १९४१ : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.● १८८९ : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.💥 मृत्यू :-● एस.एम.जोशी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते, या वर्षात कार खरेदी महागण्याची चिन्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जळगावात जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत कोसळून 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, कुटुंबीयांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ नाही; राज्य शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संपकाळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री, पगारातून 1200 कोटींची कपात, 17 लाख कर्मचाऱ्यांना फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा झटका; नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रस्तावित वीज दरवाढीला महावितरणच्या निवृत्त अभियंत्याकडूनच न्यायालयात आव्हान, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 : पहिल्या सलामीच्या सामन्यात गुजरात टायटनचा चेन्नई वर सुपर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एप्रिल फुल दिवस*एप्रिल फुल म्हणजे काय ? ही प्रथा कोठे आणि कशी सुरू झाली ? ही माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. http://nasayeotikar.blogspot.com/2023/03/april-fool-day.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय रिझर्व बँक ( RBI )*भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती.संसदेत ६ मार्च १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँकेने रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन’ या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण) जाहीर करते. रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्णवेळ गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर, १६ सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक १९३४ च्या आर बी आयच्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरिता केली जाते.रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते. भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रा हा भारतीय रिझर्व बँकच्या विशेष विभागांपैकी एक आहे ज्याद्वारे ते भारतीय बँक नोटा आणि नाणी टाकतात.१२ नोव्हेंबर २०२१ रोजी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणुकीचा विस्तार करणे आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हे दोन नवीन योजना सुरू केल्या. दोन नवीन योजनांमध्ये आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना यांचा समावेश आहे.सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३० जून १९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर होते. डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत.*भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत :*◆ भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.◆ भारताची गंगाजळी राखणे.◆ भारताची आर्थिक स्थिती राखणे.◆ भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आळस हा अशा चोर पावलांनीयेतो कि गरिबी त्याला सहजच गाठते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?२) देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?३) मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करतांना 'जसे गरुडाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे ?४) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?५) मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?*उत्तरे :-* १) वड २) गुजरात ३) अण्णाभाऊ साठे ४) ५० मिनिटे ५) छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री हणमंतराव कंदेवार, सेवानिवृत्त शिक्षक, नांदेड( 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा )👤 प्रकाश नांगरे, सहशिक्षक👤 चिं. शंतनू विजय भगत, वाशिम👤 चिं. अमोल गजानन पाटील, हिंगोली👤 गिरीश पांपटवार, धर्माबाद👤 स. सुरजितसिंघ पुजारी, नांदेड👤 दत्ता वंजे, साहित्यिक नांदेड👤 शीतल सांखे, साहित्यिक👤 पवन सुत्रावे👤 मंचक वाठोरे, वाशिम👤 हरिहर पाठक👤 रवि कोटूरवार, धर्माबाद👤 सतिश गर्दसवार, धर्माबाद👤 अनिल पाटील👤 दिगांबर जगदंबे👤 साईनाथ कंदेवाड, करखेली👤 अजय पेटेकर👤 शुभम मुतकुलवाड👤 कुणाल दिलीपराव सोनकांबळे👤 मनिषा जोशी👤 सदाशिव मोकमवार👤 विनायक भाई राजयोगी👤 सोमेश पाटील सूर्यवंशी👤 शहाजी गोरवे👤 संध्या जिरोणेकर👤 नयनतारा किरण कुलकर्णी, खारघर, मुंबई👤 राम कोयलवाड, नांदेड👤 इंजिनिअर नागेंद्र अलीशेट्टी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही। मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥ महाघोर संसारशत्रु जिणावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन समाजप्रबोधन करीत संतानी इतिहास घडविला. सात-आठशे वर्ष उलटून गेली, तरी त्यांचे स्मरण सर्वदूर होते. भक्तीला ज्ञानाची जोड देऊन जे कर्म त्यांनी उभे केले त्याला 'नमस्कार' म्हणूनच हे स्मरण केले जाते. भक्ती प्रकट करण्यासाठी मनामध्ये आसावा लागणारा भाव संताच्या प्रत्येक रचनेत आपल्याला दिसतो. म्हणूनच फकिरीतून उभे राहिलेले त्यांचे संतत्व शतकानुशके, पिढ्यानपिढ्या अढळ राहिले आहे. भवसिंधू पार करण्यासाठी संतानी घालून दिलेली भक्तीची पायवाट हा एक मानवी जीवनासाठी मार्गदर्शक असणारा भाव आहे.**प्रेम, ज्ञान, सुमार्ग, मनोरंजन, दया, क्षमा, शांती आणि आनंद हे सगळे रस्ते संतानी आखिल मानव जातीसाठी मोकळे करून दिल्यामुळेच माणसात देवत्व शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक नव्या पिढीत काही लोकांनी केला. त्यामुळे अगणित जणांचे आयुष्य सुखकर झाल्याच्या गोष्टी आपण ऐकू वाचू शकतो. जीवन आनंदी असणे आणि कोरडे असणे यातला भाव एकदा कळला की, सुलभता, सोपेपणा वाट्याला येते. दु:ख तर प्रत्येकाच्या आयुष्यात असते. त्यापासून कुणाचीही सुटका नाही. पण त्या दु:खाला योग्य तो उतार मिळावा आणि प्राप्त परिस्थितीत परमानंदाने व्यापून जाणे यासाठी संताचा भक्ती-विचार आपल्याला पावलोपावली मदत करीत राहतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो.जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ स्वार व त्याचा घोडा ❃* *एक स्वार आपल्या घोड्याला खरारा* करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले. *_तात्पर्य_* *जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे*.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment