✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17/03/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक दिव्यांग दिन*💥 ठळक घडामोडी● १९९७ - मुंबईत ए सी टॅक्सीला सुरुवात💥जन्म● १९०९ - भाषातज्ञ रामचंद्र दांडेकर● १९१० - समाजसेविका व शिक्षणतज्ञ अनुताई वाघ● १९६२ - भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला💥मृत्यू● १८८२ - विष्णूशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.● १९३७ - बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे● १९५७ - रॅमन मॅगेसेसे फिलिफाईन्सचे सातवे राष्ट्राध्यक्ष● १९५६ - नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ आयरीन क्युरी● २०१९ - गोव्याचे दहावे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुनी पेंशन योजना बाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज चौथा दिवस, राज्यभरात आज ढोल बजाओ आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे विधानपरिषदेत आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता आधार ऑनलाईन अपडेट करण्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही, सरकारने देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना दिला मोठा दिलासा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात; पंतप्रधानांच्या हस्ते 'जानेवारी 2024च्या तिसऱ्या आठवड्यात स्थापन होणार मूर्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एकीकडे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु असतानाच दुसरीकडे  राज्य सरकारने एक लाख नोकऱ्या खाजगी कंत्राटदारांमार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सीरिजला मुंबईत आजपासून सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कवयित्री इंदिरा संत*इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ?२) बॉर्डर - गावस्कर चषक २०२३ चा मालिकावीर कोणी पटकावला ?३) महात्मा गांधीजींची फोटो कोणत्या वर्षी नोटांवर छापण्यात आली ?४) मगरला किती दात असतात ?५) नागालँड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) मिशेल योह २) रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा, भारत ३) १९९६ ४) ८० दात ५) नेफ्यू रियो *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गंगाराम उर्फ बाबू गुरुपवार, तळणी, बिलोली👤 किशन आसमोड👤 प्रतिक जाधव👤 अमरसिंह चौहान👤 अंगद मारोती कांडले👤 जयानंद मठपती👤 विलास पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निजध्यास तो सर्व तुटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला॥ सुखानंद आनंद भेदें बुडाला। मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥६२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.**शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज  सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात.त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संत राबियासंत राबियाची ईश्‍वरभक्‍ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्‍वराचे स्‍मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्‍वरनिर्मिती मानून त्‍यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्‍त असताना तिच्‍या घरात चोर घुसला. त्‍याला राबियाच्‍या घरी धन तर सापडणार नव्‍हते. त्‍याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्‍याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्‍याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्‍याने डोळे चोळून पाहण्‍याचा प्रयत्‍न केला पण त्‍याचा काहीच फायदा झाला नाही.                 त्‍याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्‍याला थोपटून पाहिले. तेव्‍हा त्‍याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्‍हा पुन्‍हा त्‍याची तीच अवस्‍थ झाली. चादर खाली ठेवली की त्‍याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्‍हा त्‍याला कोणीतरी म्‍हटल्‍याचा भास झाला,’’ तू स्‍वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्‍वत:चे अस्तित्‍व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्‍हा एक मित्र झोपतो तेव्‍हा दुसरा जागा असतो. मग त्‍याची कोणतीही वस्‍तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्‍त असलेल्‍या राबियाचे चरणस्‍पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला.तात्‍पर्य :-ईश्‍वराशी आपण एकरूप झालो की ईश्‍वरही आपली मनापासून काळजी करतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment