✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मध्यवर्ती उत्पादन शुल्क दिन**१९३६- क्षयरोग निवारण दिन*💥घडामोडी● १९५२ - भारतात कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरुवात झाली.● १९६१ - मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला💥जन्म● १६७० - छत्रपती राजाराम राजे भोसले, मराठा साम्राज्यचे तृतीय छत्रपती● १९४८ - जे. जयललिता, तामिळनाडूची माजी मुख्यमंत्री.● १९५५ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक💥मृत्यू● १६७४ - प्रतापराव गुजर मराठा साम्राज्याचे तिसरे सरसेनापती● १९३६ - लक्ष्मीबाई टिळक, मराठी लेखिका● १९९८- मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार● २०१८ - श्रीदेवी, हिंदी चित्रपट अभिनेत्री*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विदर्भात तापमानात वाढ; अकोला, नागपूरमध्ये कमाल तापमान 3 ते 4 अंश जास्त.. फेब्रुवारीमध्येच 40 अंश सेल्सियसचा आकडा गाठण्याची भीती..*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चीन आणि तजाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 6.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईकर प्रवाशांच्या अडचणीत भर, बेस्टच्या ताफ्यातील 400 बसचा वापर तात्पुरता बंद, प्रशासनाने दिले आगीचे कारण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विद्यार्थिनींनी केलल्या आरोपांवर चौकशी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, शहापूर परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अदानींच्या शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी पाण्यात; अदानींची संपत्ती 8.5 लाख कोटींनी घटली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *WT20 Semi-Final : फायनलमध्ये भारताचा 5 धावानी झाला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/r5Mvh_V5F_s~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॉपी म्हणजे एक कलंक*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1435523189907784&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभिनेत्री श्रीदेवी स्मृतिदिन*१९७५ मध्ये फिल्म 'जूली'तून श्रीदेवीने डेब्यू केले. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसली होती. सुरुवातीच्या फिल्म्स मध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीला स्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. श्रीदेवीला दोन मुली असून ते म्हणजे जाह्नवी कपूर व खूशी कपूर. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 54 वर्षाच्या होत्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जो शाळेचे दरवाजे उघडतो तो जेलचे दरवाजे बंद करतो."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) कोणत्या दिवसापासून महाराष्ट्राने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत म्हणून अंगीकारले ?३) भारत जागतिक अर्थव्यवस्थामध्ये कितव्या क्रमांकावर आहे ?४) जीवनसत्त्व ब - २ चे रासायनिक नाव काय आहे ?५) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाराष्ट्राचे शिल्पकार कोण ?*उत्तरे :-* १) राजकमल जोब, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक २) १९ फेब्रुवारी २०२३ ३) पाचव्या ४) रायबोफ्लोविन ५) बाळशास्त्री जांभेकर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरेश जे. वाघ, बालरक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना रे जनीं मौनमुद्रा धरावी। कथा आदरे राघवाची करावी॥ नसें राम ते धाम सोडूनि द्यावे। सुखालागिं आरण्य सेवीत जावे ॥४४॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जिथे काही उगवत नाही, झाडा झुडुपांशिवाय काही असत नाही, तिथे एरंडाचे झाडच वृक्ष मानले जाते. वास्तविक एरंड कधी पिंपळ, वड, औदुंबर अशा वृक्षांची बरोबरी करेल का ? तुकोबांनी म्हटले आहे, 'उंच वाढला एरंड, तरी का होई इक्षुदंड.' कितीही उंच वाढला तरी एरंड कधी उसाची बरोबरी करू शकणार नाही. एरंड हे एक अतिसामान्य झाड, त्याची पाने गाढवही खात नाही म्हणे.**परंतु अशा झाडालाही कधी कधी आपल्या एखाद दुस-या चकचकीत हिरव्या पानांचा गर्व होतो. क्षुद्र व्यक्तीलाही असा गर्व होतो, की आपण जणू महान आहोत.* *एरंडालाही आपण महावृक्ष असल्याचे वाटते. महावृक्ष केव्हाही थोरच. घनदाट शितल छाया, डेरेदार विस्तार, पशुपक्षी यांचे विसाव्याचे ठिकाण. ऋतुमानाप्रमाणे निरंतर येणारा बहर ही त्यांची श्रीमंती आणि वैभव. वृक्ष कुलातील हे ऋषीमुनी कुठे नि एरंड कुठे?**"जिथे काही उगवत नाही तिथे 'एरंड'लाच वृक्ष मानावे लागते हे दुर्दैव."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुळात निसर्गतः आपल्याला शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकतेची शक्ती*एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment