✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी :- १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.१९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.१९६७: आजच्या दिवशी भारतामध्ये चौथ्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.१९७६: मध्य प्रदेश येथे केंद्रीय कृषि अनुसंधान संस्थान ची स्थापना करण्यात आली.२०००: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बी.आर चोपड़ा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.२०१०: आजच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली यांना २००९ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.💥 जन्म :-१५६४: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ१९४७: भारतीय चित्रपट अभिनेता रणधीर कपूर१९४९: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ१९४९: प्रसिद्ध संस्कृत भाषेचे साहित्यकार राधावल्लभ त्रिपाठी१९५२: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी१९५४: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अरुण कमल💥 मृत्यू :- १८६९: ऊर्दू शायर मिर्झा गालिब१९४८: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री१९५३: सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक१९८०: मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय२००८: भारतीय चित्रपट अभिनेत्री मनोरमा*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू, 38 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एअर इंडियाला मिळणार नवी उभारी, टाटा सन्स 250 विमाने करणार खरेदी; पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद - G20 च्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी अतिक्रमण जमीनदोस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक मनपाने पाणीपट्टीतून जमा केले 44 कोटी, चारशेहून अधिक घराचं पाणी बंद, नाशिक मनपाची कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन; लगान, चक दे इंडिया चित्रपटात साकारली होती भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे त्यात मोठे बदल होण्याची शक्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆5 वी शिष्यवृत्ती उत्तरसूची 2023 पेपर-1 व 2🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/vnPaED8nF-o?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कमवा आणि शिका*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना.........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वसंत गोवारीकर*वसंत रणछोड गोवारीकर (२५ मार्च, इ.स. १९३३; पुणे, ब्रिटिश भारत - २ जानेवारी, इ.स. २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडीत होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्याशाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारिकरांचे नाव देण्यात आले आहे.वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च, इ.स. १९३३ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी. आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप - २५ मध्ये स्थान मिळविणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ?२) भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी कशाची घोषणा केली ?३) राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?४) डेसिबल या एककाने काय मोजतात ?५) आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?*उत्तरे :-* १) पी. व्ही. सिंधू २) ऑपरेशन दोस्त ३) मरुस्थळ ४) ध्वनीची तीव्रता ५) भोपाळ*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक गायकवाड, सहशिक्षक👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक, बिलोली👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक👤 किरण गौड, धर्माबाद👤 घनश्याम नानम, धर्माबाद👤 रमेश सोनकांबळे👤 गुलाब जाधव👤 रमेश पाटील कदम👤 अविनाश सातपुते👤 गोविंद टेकुलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा.ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान.जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment