✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28/02/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय विज्ञान दिवस*💥 ठळक घडामोडी :- ● १९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधाला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.💥 जन्म :-● १९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत ● १९५१ : कसोटी क्रिकेटपटू करसन घावरी● १८९७ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे, मराठी ग्रंथकार व संत साहित्याचे अभ्यासक💥 मृत्यू :- ● १९२६ : स्वातंत्र्य शाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद ● १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू● १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद● १९९८ : विनोदवीर राजा गोसावी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशात लवकरच प्रवासी विमानाची ही निर्मिती होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवमोगा विमानतळाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक : आपली मराठी भाषा अभिजातच, भाषेला जपणं महत्वाचं, जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचं मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *येत्या 5 मार्च रोजी होणारी NEET PG 2023 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बारावीचा निकाल रखडणार ? कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बारावी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे विकास रखडला असल्याचा आरोप करत गोंदियातील आठ गावांनी मध्य प्रदेशात विलीन करण्याची केली मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंढरपुरातील चंद्रभागेचं पात्र अजूनही अस्वच्छ, लाखोंचा खर्च करुनही चंद्रभागेची दूरवस्था कायम; विठ्ठलभक्त संतप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रासंगिक लेख*दुर्लक्षित विज्ञान विषय*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://https://m.facebook.com/story.php?story_fbid=3514819611978121&id=100003503492582&mibextid=Nif5oz/2018/02/03.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रीय विज्ञान दिवस*नोबेल पारितोषिक हा जगातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो.सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं.१९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता ही मनुष्याच्या जीवनाची एक अटळ अशी अवस्था असते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) औरंगाबाद आता कोणत्या नविन नावाने ओळखले जाणार आहे ?२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?३) जगातील सर्वात हलका वायू कोणता ?४) जीवनसत्त्व ब - ७ चे रासायनिक नाव काय आहे ?५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणता ?*उत्तरे :-* १) छत्रपती संभाजीनगर २) सईबाई ३) हेलियम ४) बायोटिन ५) बँगलोर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सुरेश येवतीकर विजय नगर, नांदेड👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद👤 आनंद आनेमवाड, सहशिक्षक👤 मारुती पाटील👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर👤 शंकर गर्दसवार👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे। जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥ गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्राचीन काळापासून एखाद्या नैसर्गिक घटनेनंतर अनुभवास आलेल्या चांगल्या अगर वाईट गोष्टींशी त्या घटनेचा संबध जोडला जातो. यातून शकुन आणि अपशकुनाच्या कल्पना जन्म पावतात. भारतातील बहुतांश प्रदेशात 'घुबड' अशुभ मानले जाते. मात्र बंगालमध्ये ते लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजले जाते. वैदिक संस्कृतीने कबुतराला मृत्यूच्या देवतेशी संबधीत ठरवून अशुभ मानले होते-इतके की कबुतर घरात शिरल्यास शांती करावी लागते. मात्र आता अनेक ठिकाणी लोक कबुतरांना मुद्दाम खाऊ घालतात. पाश्चात्य संस्कृतीने तेरा हा आकडा अशुभ मानल्याने मोठमोठ्या पंचतारांकित हाॅटेल्समध्येसुद्धा त्या क्रमांकाचा मजला किंवा खोली नसते.**चमत्कृतींनी भरलेल्या मानवी मनाचा थांग लागणे कठीण असते. लबाड आणि संकुचित मनोवृत्तीचे लोक अनेकदा केवळ आपण असहिष्णु आणि पुढारलेले आहोत हे भासविण्यासाठी आपण रूढी परंपरा वगैरे मानत नाही असे दाखवतात. वास्तविक पाहता पारंपारिक पोशाखातील खेडवळ माणूस विश्वासार्ह, मनमिळाऊ असू शकतो आणि आधुनिक पोशाखातील उच्चशिक्षित व्यक्ति बुरसटलेल्या विचाराची, अहंमन्य आणि लबाड असू शकते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना आपल्या स्वत:च्या रागावर नियंत्रण करता येते त्यांना जग जिंकणे काही अवघड नाही. जर रागावर नियंत्रण करता येत नसेल तर स्वत:चे जीवन स्वत:च्याच हाताने संपवल्यासारखेच आहे. म्हणून माणसाने कधीही राग आला तरी रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment