✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी● १८८७- रिव्हेरा येथे या दिवशी भुकंप💥जन्म● १५६४ - जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअर● १८७६- आधुनिक काळातील एक महान संत गाडगेबाबा💥मृत्यू*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संसदरत्न पुरस्काराची घोषणा; गोपाळ शेट्टी, अमोल कोल्हे, हिना गावित आणि फौजिया खान यांचा सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, 320 कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीला वेतनासाठी देण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार, मात्र याचिका सुनावणीसाठी दाखल, दोन आठवड्यांनी सुनावणी, ठाकरे गटांच्या आमदारासाठी व्हीप बजावणार नसल्याचं शिंदे गटाकडून कोर्टातच जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात कॉपीची 32 प्रकरणं; सर्वाधिक 17 जालन्यातील*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभिनेता-दिग्दर्शक नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार सिनेमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमेरिकेतील सिएटल नगरपरिषदेत ऐतिहासिक निर्णय, नगरपरिषदेत अखेर जातीभेद प्रतिबंध कायदा मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टेनिस कारकिर्दीचा शेवट पराभवाने, दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेत सानिया मिर्झाचा पराभव, पहिल्या फेरीतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Yt3LFHZtX0o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा*संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे मृत्यू झाला. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रसिध्दी ही अशी बाब आहेजी कितीही मिळाली तरीमाणसाची तहान भागत नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडणार आहे ?२) एअरो इंडिया शो - २०२३ चे ब्रीदवाक्य काय होते ?३) 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?४) जीवनसत्त्व ब - १ चे रासायनिक नाव काय आहे ?५) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) ११ ते १२ मार्च २०२३ २) अब्जावधी संधीकडे नेणारी धावपट्टी ३) चंद्रपूर ४) थायमिन ५) सुधीर मुनगंटीवार *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निलेश सितावार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना एक जीवीं धरावें। जनी आपुलें हीत तूवां करावें॥ रघूनायकावीण बोलो नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥४३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाभारतातला सर्वोत्कृष्ट निर्णय म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात घेणे. श्रीकृष्णाला भेटायला अर्जुन आणि दुर्योधन गेले असता, झोपलेल्या भगवंताला पाहून,'मी एवढा मोठा सम्राट , याच्या पायाशी का बसू ? असा अहंकार निर्माण झालेला दुर्योधन उशाशी बसला, आणि उशीरा आलेला अर्जुन पायाशी. श्रीकृष्णासारखा बलाढ्य राजा, धूर्त राजकारणी, विद्वान मित्र आणि अपराजित योद्धा आपल्या बाजूने असावा, असे कोणाला वाटणार नाही?**जागे होताच समोर बसलेल्या अर्जुनाला त्यांनी प्रथम मागणी विचारली. उशाशी बसलेला दुर्योधन 'मी प्रथम आलोय, आधी माझे ऐका' असे म्हणताच,'पण मी अर्जुनाला आधी पाहिलयं म्हणून त्यानेच पहिल्यांदा मागावे.मी आणि माझे सैन्य यातील एक गोष्ट आपणांस मिळेल, शिवाय मी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, मी फक्त सारथ्य करीन. तरीसुद्धा अर्जुनाने भगवंताला मागितले व दुर्योधनाने दहा हजार अक्षौहिनी सैन्य मिळाल्याचा आनंद ऊपभोगला खरा. पण त्यामुळे 'शक्ती' दुर्योधनाकडे आणि 'युक्ती' अर्जुनाकडे गेली. 'शक्ती'पेक्षा 'युक्ती' श्रेष्ठ ठरली. अर्जुनाचा 'भक्ती'पूर्ण निर्णय विजयी ठरला. शांत, धीरगंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुळात निसर्गतः आपल्याला शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment