✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/02/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी⌛१८३० : मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.⌛१९३३ : म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.⌛१९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.⌛१९९९ : मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.💥 जन्म :-⌛१८४७ : थॉमस अल्वा एडिसन, सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक, विद्युतप्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक.⌛१९२३ : प्रसिध्द हॉकीपटू त्रिलोचनसिंग बाबा.⌛१९४२ : गौरी देशपांडे, मराठी लेखिका.💥मृत्यू :-⌛१९७७ : जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.⌛१९६८ : पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.⌛१९७७ : फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.⌛१९९३ : कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय, परीक्षेच्या आधी 10 मिनिटे प्रश्नपत्रिका मिळणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन, सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गेल्या 11 वर्षात 16 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलं, 2022 मध्ये सर्वाधिक नागरिकांनी देश सोडला; केंद्र सरकारची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रातल्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांच्या मागे सामान्य नागरिकांचे पाठबळ, खासदार शरद पवार यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर; आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ३२१ अशी धावसंख्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Z7aIh7kuNQU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुनी पेंशन योजना चालू करावी ( दैनिक जनशक्ती )*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://www.ejanshakti.com/जुनी-पेन्शन-योजना-चालू-कर/लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच़. फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. ते फक्त ३ महिने शाळेत गेले. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ" आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसले. त्याचा उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराचा पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याच़े काम केले. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उच़लून त्याने त्याच़े प्राण वाच़वले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझ़ी यांच़ा होता. एडिसनच़े उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझ़ीने त्याला आगगाडीचा तारायंत्राच़े शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरच़े काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसनला रात्री झ़ोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच़ घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यात नदी संवर्धन आणि सरंक्षणासाठी कोणते अभियान राबविण्यात येत आहे ? २) संगणक ( कॉम्प्युटर ) चा शोध कोणी लावला ?३) पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा काय आहे ?४) पंचायत राज हे कोणत्या भारतीय नेत्याचे स्वप्न होते ?५) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात ?*उत्तरे :-* १) चला जाणूया नदीला २) चार्ल्स बॅबेज ३) H2O ४) महात्मा गांधी ५) कर्नाटक*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव हिमगिरे, सहशिक्षक, कन्या शाळा धर्माबाद👤 रविशंकर बोडके👤 म. जावीद, उर्दू हायस्कुल धर्माबाद👤परमेश्वर कल्याणकर, तंत्रस्नेही शिक्षकचिखली (खु) केंद्र निळा ता जि नांदेड👤 राणी पद्मावार👤 प्रभाकर भेरजे👤 कृष्णकांत लोणे👤 दत्तात्रय दळवी👤 प्रमोद शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥ चिरंजीव केले जनी दास दोन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मन विषयांकडे प्रमाणाबाहेर ओढ घेऊ लागले, तर मनुष्य कुठच्या कुठे आणि कसा वाहावत जातो, ते त्याचे त्यालासुद्धा समजत नाही. त्याउलट मन जर संतुलित आणि संयमित असेल, तर असा माणूस त्याला अंतर्मुख करून आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. मनुष्यदेह दुर्लभ असल्याने तो लाभल्यावर मन ताळ्यावर ठेवून ही आत्मज्ञानाची वाट चोखाळण्याचा उपदेश संतमंडळी करतात. अर्थात, ही वाट चालू लागायचे तेदेखील देह सुस्थितीत असतानाच, गलीतगात्र झाल्यावर नव्हे. पुष्कळ पुण्य गाठीशी असलेल्या व्यक्तिसच मनुष्यदेह लाभत असल्याने जीवनाचे क्षणभंगुरत्व लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच मनुष्याने देहरूपी नौका फुटण्यापूर्वी पैलतीरी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.**जर मनुष्याची बुद्धी म्हणजेच विवेक जागृत असेल, तर आपले हित नेमके कशात आहे? हे ओळखून विषयांकडे धाव घेणा-या मनाला वेळीच आवरता येते. थोडक्यात, इंद्रिये म्हणजे रथाचे घोडे आणि मन म्हणजे लगाम मानला आहे. या मनाचा योग्य तेव्हा उपयोग करून घोड्यांना कधी आणि किती आवरायचे अगर ढिले सोडायचे हे ठरविणारा सारथी म्हणजे 'सदसद्विवेकबुद्धी' होय. निराळ्या शब्दात सांगायचे झाले, तर मन हे ओढाळ गुराप्रमाणे अत्यंत चंचल असते. जसे अवखळ गुराच्या गळ्यात लोढणे बांधल्याने त्याला काबूत ठेवणे शक्य होते, तसेच विवेक आणि वैराग्याची योजना केल्यास ओढाळ मन काबूत राहते.* *मन हे ओढाळ गुरू* *पर धन पर कामिनीकडे धावे ।* *वास्तव विवेकपाशें* *कंठी वैराग्यकाष्ठ बांधावे ॥* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच वाटतं की,माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं,आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की,मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ?याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल.मग मनच सांगायला लागेल की,तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.आपण जर थोडा स्वार्थ जर सोडला आणि इतरांना आपलसं केलं,त्यांच्याशी आपुलकीची नातं जोडलं,त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील.असं जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील.तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल,संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-*जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment