✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21/02/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक मातृभाषा दिन💥 ठळक घडामोडी :- १८४२: जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणमशिनचे पेटंट मिळाले.१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.💥 जन्म :-१९४३: ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर💥 मृत्यू :- १८२९: कित्तूरची राणी चन्नम्मा१९६५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बोर्ड बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शहीद तर एक जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच, आंदोलन स्थळी स्ट्रीट लाईट बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * G 20 च्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरणचे काम 22 फेब्रुवारीच्या आत संपवावे; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच बेमुदत कामबंद आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन पराभवानंतर कर्णधार कमिन्स मायदेशी परत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/gncdHXwtvxA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने.... Motivational Article .....*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://m.facebook.com/story.php?story_fbid=1431600076966762&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंक / DIGIT* संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी. मानवजातीच्या बाल्यावस्थेत प्रत्येक मानवाला मी एक व हा दुसरा एवढे साधे ज्ञान असणार यात वाद नाही. म्हणजे दोन अंक मोजण्याइतपत त्याची प्रगती उपजतच असणार. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची मोजदाद करावयास तो हळूहळू शिकला असेल. प्राथमिक अवस्थेमध्ये हाताची बोटे, गारगोट्या, झाडाची पाने, काठ्या यांचा उपयोग मोजण्यासाठी मानव करीत असे. जगातील बहुतेक जमाती प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्यपणे अशाच तऱ्हेने अंकनिर्देश करीत असत. मानवास लेखनकला अवगत झाल्यावर तो एकेक अक्षराचा अंकासाठी उपयोग करू लागला. अशा तऱ्हेची पद्धती अॅरेमाइक, हिब्रू, खरोष्ठी, ब्राह्मी आणि ग्रीक लिपींत दिसून येते.मानवाने अंकाचा शोध लावला त्या वेळेस तो अंकांचे उच्चार कसे करीत असणार याविषयी गूढ वाटणे साहजिक आहे. वेदकालापासून सर्व ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस मौखिक पद्धतीने शतकानुशतके दिले गेल्यामुळे भारतात अंकांचे उच्चार कोणते होते हे स्पष्ट होते; ते म्हणजे एक, द्वि, त्रि, चतुर्, पंचन्, षष्, सप्तन्, अष्टन्, नवन् आणि दशन् हे होत. या संस्कृत उच्चारांवरून पुढे मराठीत एक, दोन, तीन वगैरे संज्ञा अपभ्रष्ट स्वरूपात रूढ झाल्या.ईजिप्त : लेखनकलेचे सर्वांत प्रचीन नमुने ईजिप्तमध्ये सापडतात; तसेच अंकलेखनाचे नमुनेही (इ.स.पू.सु. ३४००) तेथेच सापडतात. तेथे एक ते नऊ ह्या अंकांसाठी उभ्या दंडांची योजना केलेली आढळते. ही रीत ⇨हायरोग्लिफिक लिपि-पद्धतीचा एक भाग आहे. दहा, शंभर, हजार ह्या संख्यांसाठी मात्र तेथे वेगळी चिन्हे वापरलेली आढळतात. लाखाकरिता बेडकाचे व दहा लाखाकरिता आश्चर्याचे बाहू पसरलेल्या मानवाचे चित्र काढले जाई. यानंतरच्या काळात ईजिप्तमध्ये हिअरेटिक अंक (इ.स.पू.सु. १२ वे शतक) आणि त्यापासून पुढे डेमॉटिक अंक (इ.स.पू.सु. ७ वे ते ३ रे शतक) उपयोगात आणले गेले. हिअरेटिक आणि डेमॉटिक अंकांतील फरक काटेकोरपणे दाखविणे कठिण असले, तरी हिअरेटिक अंकांपासून डेमॉटिक अंक विकसित झाले असावेत असे दिसते. जलद लेखनासाठी वरील दोन्ही पद्धती मूळ हायरोग्लिफिक पद्धतीपासून निघाल्या असाव्यात. हायरोग्लिफिक पध्दतीपेक्षा हिअरेटिक पद्धतीत अधिक चिन्हे असल्याने तीत लहानमोठ्या संख्या अधिक संक्षिप्तपणे दर्शविणे सोयीचे होते. हिअरेटिक अंकपद्धतीत आधी मोठ्या मूल्यांची चिन्हे आणि त्यानंतरत्यापुढे(उजवीकडे) कमी मूल्यांची चिन्हे लिहिली जात*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*01) राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* सहा*02) मेढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?* लोकरी*03) भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?* बिहार*04) भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे?श्रीहरिकोटा05) आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात?*डेसिबल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन मानधनी, धर्माबाद👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक, नायगांव👤 संजय कासलोड👤 पियूष मुजळगे, धर्माबाद👤 एकनाथ पांचाळ*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥ विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.**हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लेकीची माया*एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागलेतेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .*आशय* ......मुली आपल्या आईवडिलांनाच आपली खरी दौलत समजतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment