✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.२०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.💥 जन्म :-१८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन💥 मृत्यू :- १९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हज यात्रेकरुंना मिळणार 50 हजारांची सूट, VIP कोटा रद्द, अर्जही विनामूल्य; केंद्र सरकारचे नवे धोरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारताची मदत तुर्कीला पोहोचली, NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत, भूकंपात 4000 हून अधिक जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *म्हाडाची लॉटरी निघाली, मराठवाड्यातील 936 घरांसाठी औरंगाबाद मंडळाची जाहिरात, 22 मार्चला सोडत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अधांतरी, सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा दिला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाकिस्तानचा प्रसिद्ध विकेटकीपर फलंदाज कामरान अकमलचा क्रिकेटला अलविदा, सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून घेतली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fij1JJI9a-I~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला.त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या.स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.संदर्भ : Noorani, A. G. Zakir Husain, Bombay, 1967.लेखक : मु. मा. घाणेकरस्त्रोत : मराठी विश्वकोश*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आदिवासींचा विश्वकोश' तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे ?२) "विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली..." असे कोणी म्हटले होते ?३) 'रडार' या यंत्रात कोणत्या लहरी असतात ?४) 'महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन' कोणास म्हणतात ?५) 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाचे मूळ नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) ओडिशा २) महात्मा ज्योतिबा फुले ३) विद्युतलहरी ४) कर्मवीर भाऊराव पाटील ५) भावार्थदीपिका*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठमके, नांदेड👤 शर्मिष्ठा शिवाजीराव देव्हामुख, वसमत👤 राजेश मनुरे, पत्रकार धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 दिलीप खोब्रागडे👤 मारोती पिकलेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महासंकटी सोडिले देव जेणें। प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥ जयाते स्मरे शैलजा शूलपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'**ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.**याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःचे अस्तित्व जाणणे*एका बागेतील एका काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली. दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरत्या असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment