✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली. १९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण. १९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.💥 जन्म :- १८८४ - डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ १९५४ - जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य. २००७ - विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आयकर मर्यादा वाढवण्यात आली असून आता ७ लाखापर्यंत उत्पन्न असणा-यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना ही महत्वाची घोषणा केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *फुलेंचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यावर राज्य सरकार ठाम, 24 फेब्रुवारीला होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोणतीही कर वजावट नसलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी प्रयत्न : अर्थमंत्री निर्मला सीतारमण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर पोलिसांत मोठी खांदेपालट; 18 पीआय आणि 5 एपीआयच्या बदल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डिजिलॉकर होणार वन स्टॉप सोल्यूशन; ओळखपत्र, पत्ता आणि इतर गोष्टी अपडेट करता येणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38 हजार शिक्षकांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Ind vs Nz 3rd T20: शुभमन गिलचं दमदार शतक! 15 चेंडूत कुटल्या 70 धावा, T-20 मधील पहिलं शतक पूर्ण, भारताचा 168 धावांनी तगडा विजय, मालिका 2-1 ने खिशात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fLMcdaLuXRM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक वसंता*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_48.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ नदीच्या अगदी पात्रात एक समाधी आहे. ती ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची आहे. त्यांचे नाव आताच्या पिढीला माहीत नसल्यास आश्चर्य नाही. विधी आणि वैद्यक या शास्त्रांचा अभ्यास केलेले अण्णासाहेब समाजकारणातील आणि राजकारणातील धुरिण होते. इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. ते अत्यंत तेजस्वी बुद्धीचे स्वदेश व स्वधर्म याबद्दल प्रखर अभिमान बाळगणारे होते. पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटाने दिपून न जाता भारतीय संस्कृतीच्या व संस्कारांच्या तागडीत ती तोलून पाहण्याची बुद्धी त्यांच्यात होती. इंग्रजी राज्य आणि पाश्चात्य संस्कृती यांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांच्या उठावाला मान देण्यापासून विधवा विवाहापर्यंत आणि परराष्ट्रीय चळवळीपर्यंत सर्व उपक्रम करण्याची त्यांची तयारी होती. यामध्ये संस्था स्थापन करणे, वृत्तपत्रे काढणे कारखाने उभारून स्वदेशी उत्पादन करणे या सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव होता.- जगदीश विष्णू जोशीसंकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हॉकी विश्वकप स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?२) उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना २०२३ च्या कोणत्या पद्म पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले ?३) कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?४) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे ?५) 'महाराष्ट्राची लोकयात्रा' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*उत्तरे :-* १) जर्मनी २) पद्मविभूषण ३) मध्यप्रदेश ४) वर्धा ५) डॉ. सदानंद मोरे *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रुखमाजी भोगावार, धर्माबाद👤 चक्रधर ढगे👤 देविदास तारू, सहशिक्षक, नांदेड👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 बालाजी गोजे👤 विनोद गुंडेवार👤 किरण बासरकर👤 चेतन घाटे👤 राजू जगदंबे, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥२५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय संस्कृतीत सत्तावीस नक्षत्र म्हणजे जीव की प्राण. शेतकरी मृगाचा पाऊस पडला की पेरणीची लगबग करतो. पेरण्या झाल्या की पिकांच्या जोमदार वाढीसाठी त्यांची काळजी घेतो. जमिनीत पेरलेली स्वप्नं सफल झाली की शेतक-यांच्या डोळ्यांतल्या स्वप्नांतही आनंद उत्सव घडतो. पण जर का नक्षत्रांनी साथ दिली नाही तर गणित साफ चुकतं. खेड्यातल्या लोकांना निसर्गातल्या छोट्यामोठ्या घडामोडींचं अचूक ज्ञान असतं. 'अनुभव हीच त्यांची वेधशाळा.'**व्यंकटेश माडगूळकर यांचे लेखन म्हणजे निसर्गातली सूक्ष्म, हळूवार निरीक्षणं. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रणात एक नानांची गोष्ट आहे. नाना म्हणतात.. मुलांनो, तुम्हाला वजाबाकी येते का ? मग सांगा बघू..सत्तावीसमधून नऊ गेले किती राहिले बाकी ? मुलं बोटं मोजून ओरडली, 'आठरा'. नाना म्हणाले, 'चूक'. एकूण नक्षत्र सत्तावीस. त्यातून पावसाची नऊ नक्षत्र कोरडी गेली, पाऊस पडला नाही तर काय उरतं ? काही नाही ! पाणी नाही, पिकं नाही, गुरंढोरं नाहीत म्हणून हिशोबाचं उत्तर शून्य. सत्तावीसमधून नऊ गेले, खाली उरतो भोपळा.* *महाराष्ट्रात असे अनेक नाना आहेत. पण ऐकणारे आहेत का कुणी ?* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना वादच करायचा असतो त्यांना कोणतेही कारण लावून करता येतो.अशा वादांमुळे माणसांचे असलेले चांगले संबंध विनाकारण बिघडून जातात.पण ज्यांना सुसंवाद साधायचा असतो ते मात्र एखादे चांगले कारण शोधून जीवनात काही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे त्या जीवनात इष्ट बदल घडवून नवे करण्याची जीवनाला मिळावी व जीवन समृद्ध व्हावे यासाठी एक सुसंवादातून दिशा मिळते.म्हणून जीवनात वाद करण्यापेक्षा सुसंवाद साधण्याचे अधिक प्रयत्न करायला हवेत.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*॥ कथा 3 मित्रांची॥* ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते. तिघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकत्र रहात असत. पण एक दिवस..... त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. अरेरे..... त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचरले.... "आता आपण परत भेटणार केव्हा? कुठे? ? ? ज्ञान :-मी विद्यालयात भेटेन... धन:-मी तर श्रीमंताकडे भेटेन... विश्वास मात्र शांत होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. "कारे... ? का रडतोस?" विश्वास हुंदके देत-- *"मी एकदा गेलो तर* .... *पुन्हा* *कधी नाही भेटणार**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment