✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04/02/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी⌛१९४४ : ‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.⌛१९८८ : रशियाने नेहरु फुटबॉल चषक जिंकला💥 जन्म :-१९०६ : प्लुटो हा ग्रह शोधणारे क्लाईड विल्यम टॉमबॉ.⌛१९२२ : स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी.💥 मृत्यू :-⌛१६७० : कोंडाणा किल्ला लढविताना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने झाली सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महागाईचा झटका, अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ; नवे दर लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *परळी वैजनाथ-बीड-नगर नवीन रेल्वे मार्ग होणार; रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 13 हजार कोटींची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर पाच वर्षे परीक्षेला मुकाल, फौजदारी गुन्हाही होणार दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wHoX5fEylks~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांनो, लिहिते व्हा......!*http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील 'पिनकोड सिस्टिम' चेजनक...*कोकणातील 'राजापूर' मधील शाळेत शिकलेला एक हुशार माणूस असेल याची आपल्याला पुसटशी कल्पना ही नसेल !त्याचे नाव.. श्रीराम भिकाजी वेलणकरPIN म्हणजे Postal Index Number१९७२ पर्यंत ... जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाची गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा..!! चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच !या सगळ्या अडचणीतून जात असताना, त्यावर उपाय म्हणून पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली ...*पिनकोडची रचना अशी आहे.*पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत,तर एक खास मिलिट्रीसाठी वापरला जातो.यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल११ - दिल्ली१२ व १३ - हरयाणा१४ ते १६ - पंजाब्१७ - हिमाचल प्रदेश्१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर्२० ते २८ - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड३० ते ३४ - राजस्थान्३६ ते ३९ - गुजरात्४० ते ४४ - महाराष्ट्र४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड५० ते ५३ - आंध्र प्रदेश५६ ते ५९ - कर्नाटक६० ते ६४ - तामिळनाडू६७ ते ६९ - केरळ७० ते ७४ - पश्चिम बंगाल्५५ ते ७७ - ओरिसा७८ - आसाम७९ - पूर्वांचल८० ते ८५ बिहार आणि झारखंड९० ते ९९ - आर्मी पोस्टल सर्व्हिस्म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला *पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक - सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो*.उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक - ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा...! 💐••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" माता ही प्रेमाची सरिता आहे, म्हणून ती सदैव वाहत असते. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या आयसीसी १९ वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला ?२) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील वृद्ध व्यक्ती ( ११६ वर्षे ) म्हणून कोणाची नोंद झालेली आहे ? ३) नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या गीताला 'महाराष्ट्राचे राज्यगीत' म्हणून स्विकारण्यात आले ?४) क्रिकेट विश्वातील पहिल्या १२ मोठ्या स्टेडियमपैकी एकट्या भारतात किती स्टेडियम आहेत ?५) ऑस्ट्रेलियन पुरुष ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणी पटकावले ?*उत्तरे :-* १) भारत २) मारिया ब्रायांस मोरेरा, अमेरिका ३) जय जय महाराष्ट्र माझा ४) आठ ५) नोव्हाक जोकोविच, सर्बिया*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार, धर्माबाद👤 राजरेड्डी गडमोड, येताळा👤 संजय गायकवाड, धर्माबाद👤 डी. एन. पाटील बेंबरेकर, देगलुर👤 गोविंद राखेवार👤 शंकर कुऱ्हाडे👤 अहमद शेख👤 राजू माळगे👤 शेख इरफान👤 विलास थोरमोठे👤 सुमेध पावडे👤 मोहन रेड्डी👤 बालाजी थेटे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनानाथ हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी, अनेक उत्सव हे मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा झाल्याशिवाय होऊ शकत नाही. या उत्सवांमध्ये 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र धाब्यावर बसवून आनंदी-आनंद केला जातो. आपल्या नाकासमोर जर कोणी सूत धरले, गुदगुल्या केल्या तर प्रचंड शिंका येतील. परंतु श्रीगणेशाच्या मूर्तीवर नाकातोंडात दूर्वा जाईपर्यंत थर मांडायला आपल्याला काही वाटत नाही. साधी झोपमोड आपल्याला चालत नाही, पण मंडपात कानठळ्या बसवणारा डी जे तो गणनायक आपल्या कानांच्या पाळ्यात आणि हा अपराध विशाल उदरात सामावून घेतो.**आपण सिग्नलला दोन मिनिटेही थांबत नाही, पण श्रीगणेशास मात्र दुपारच्या नैवद्याची संध्याकाळपर्यंत वाट पहावयास लावतो. प्रसंगी त्याला एकभुक्त ठेवतो. खरंतर पाहुण्यांचे 'स्वागत' आणि जाताना भावपूर्ण 'निरोप' ही आपली परंपरा. पण गणेशमूर्ती आणताना 'गोंधळ' आणि विसर्जनात 'कल्लोळ' ही नवपरंपरा आहे. मूर्तीपूजेचे हे भयानक स्वरूप आपणच इतर धर्मियांसमोर आणून ख-या पूजेपासून दूर गेलो आहोत. 'मूर्तीपूजन' हे सगुण रूपातील ईश्वरास अनुभवण्याचे साधन आहे, आणि ते समजावून घेतल्यास त्याचा खरा आनंद मिळेल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण पुस्तके वाचायला शिकलो.त्यातून ज्ञान घेऊन जगायला शिकलो.पण माणसे जोडण्याचे काम मात्र शिकलो नाही.माणसे जोडण्यापेक्षा माणसापासून दूर दूर राहायला शिकलो.नातेसंबंध, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपल्यातला हळुहळू कमी करायला शिकलो .खरे तर ज्ञानाने माणसे जोडली जातात पण माणसे तोडायला शिकलो. आम्ही चार पुस्तके शिकलो की,आमच्यासारखे या जगात कोणीच श्रेष्ठ नाही असे म्हणायला लागलो.अशा माणसांना खरे ज्ञान म्हणजे काय बहुतेक समजले नसावे .उलट अशी माणसे शिकून सवरुनही अज्ञानच आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही.ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनातील अज्ञान घालवणे आणि इतरांमधील असलेला अज्ञानपणा घालवून जीवन जगण्याची नवी दिशा दाखवने हा आहे. हा मुख्य उद्देश ठेऊन जगणे म्हणजे ज्ञान होय. अशा वर वर ज्ञान घेतलेल्या माणसांनी खरे ज्ञान म्हणजे काय हे शिकून माणसे जोडण्याचे काम शिकायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *करावे तसे भरावे*" एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्हा कोल्हा म्हणाला,'' मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली.उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला. कोल्ह्याने आधी जाऊन स्वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोल्हेकुई सुरु केली. कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले. त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली. कोल्हा पाण्यात पाण्यात बुडून मरण पावला.*तात्पर्य :*करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment