✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक : 10/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.● १९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना२०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी 💥 जन्म :- १८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू. 💥 मृत्यू :- १२४२ - शिजो जपानी सम्राट.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानास प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Nagpur ZP : सुरक्षा ठेव घोटाळ्यातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी; एकाचे निलंबन, वेतनवाढीवरही टांगती तलवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे जिल्ह्यातील राजगुरू विद्यालयात खिचडीतून 60 विद्यार्थ्यांना विषबाधा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका, कोपरी रेल्वे पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेडमधील जि.प. धामदारी शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत, गिरवत आहेत सेंद्रिय शेतीचे धडे; सांडपाण्याचा वापर करत फुलवली परसबाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कसबा मतदारसंघात दोन्ही पक्षांना बंडखोर आणि नाराजांची मनधरणी करण्यात यश.. कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांचा कसब्यातून उमेदवारी अर्ज घेतला मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5 बळी घेत कसोटी बळीचे शतक केले पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/I-Mt0MNDMu8~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका वोटची किंमत*लिंक 👇🏼http://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.४६ शैक्षणिक विभाग आहेत. ४७४ महाविद्यालये आणि सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे. या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे यः क्रियावान् स पण्डितः आणि संकेतस्थळ www.unipune.ac.in असे आहे. संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणते नाटक बघितल्यानंतर प्रभावित होऊन गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला ?२) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?३) एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकणारा प्राणी कोणता ?४) कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात ?५) ग्रामसभेत कुणाकुणाचा समावेश होतो ?*उत्तरे :-* १) राजा हरिश्चंद्र २) अमेरिका ३) सरडा ४) सोडियम कार्बोनेट ५) गावातील सर्व प्रौढ मतदारांचा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, नांदेड👤 आमिन जी. चौहान, यवतमाळ👤 विजय रच्चावार, संपादक👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, नायगाव👤 राहूल कतूरवार, धर्माबाद👤 सुधाकर अपुलवाड👤 राजू गोडगुलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.* *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....**"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."**तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासघात*करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment