✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी● १९५४- पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु● १८५७- रत्नागिरीत ’पतित पावन’ मंदिरांची स्थापना झाली.💥जन्म● १७३२ - अमेरिकेचे पाहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन● १९२२ - भारतीय व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग💥मृत्यू● १९४४- कस्तुरबा गांधी यांचे निधन● १९५८ - भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद● २०००- लेखक व पत्रकार वि. स. वाळिंबे● २००९ - डॉ. लक्ष्मण देशपांडे ( वऱ्हाड निघालय लंडनला फेम )*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिक कृषी विभागाने लोकसहभागातून सर्वात जास्त 6 हजार 134 वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 50 पेक्षा जास्त वयाच्या कैद्यांना बेड आणि उशी मिळणार आहे. अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी घेतला याबाबतचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 रोजी बेळगाव दौऱ्यावर, बेळगाव इथे कोट्यवधी रुपये खर्च करुन नुतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे करणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तुर्की आणि सीरीयाच्या सीमेवर 14 दिवसांनंतर आणखी एक भूकंप; तीन जणांचा मृत्यू तर 200 हून अधिक जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच; आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद, मोबाईल टॉर्च लावून आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ग्लेन मॅक्सवेल टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BgjVNBSFkuE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डॉ. लक्ष्मण देशपांडे ( जन्म ५ डिसेंबर १९४३ - मृत्यू २२ फेब्रुवारी २००९) एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे.लक्ष्मण देशपांडे लहानपणी गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. प्रतिकार हे त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. 'मौलाना आझाद-पुर्नमूल्यांकन' या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अक्षरनाद या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.*प्रा. लक्ष्मण देशपांडे यांना मिळालेले काही पुरस्कार*◆ २००३ : महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार.◆ २००४ : विष्णूदास भावे पुरस्कार.◆ याशिवाय छत्रपती शाहू महाराज, बेंडे स्मृती, राम श्रीधर, अल्फा टीव्ही, पुरुषोत्तम करंडक, वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठान, सयाजीराव महाराज यांच्या नावाचे पुरस्कार.◆ अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संघर्ष जेवढा कठीण होईल, विजय तेवढाच तल्लख होईल – थॉमस पेन*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••z१) रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?३) जगातील सर्वाधिक डाळ व विशेषता तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?४) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले ?५) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?*उत्तरे :-* १) २० वे २) रेखा शर्मा ३) भारत ४) शिंदे गट ५) देवमासा ( व्हेल )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शाहरुख शेख, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांपरी हेंचि आतां धरावें। रघूनायका आपुलेसे करावें॥ दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सज्जनत्वाच्या अनेकविध कसोट्यांपैकी एक म्हणजे व्यक्तीचे बोलणे होय. माणसाच्या जिभेवर खडीसाखर असली तर त्याची न होणारी, लांबणारी कामेसुद्धा झटक्यात होतात याचा अनुभव अनेकदा येतो. वाणीतील मवाळपणा माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाणारा ठरला असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. व्यक्तीजवळ इतर कोणतेही धन नसेल तरी एकवेळ चालेल; पण त्याच्या जीवनव्यवहारात गोडवा हवा. त्याच्याशी बोलावे, नाते निर्माण करावे असा मोह जेव्हा इतरांना होतो तेंव्हा तो त्याचा जीवन-विजय असतो.**लोक अनेकदा स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली दुस-याला दुखावतात, त्यांचा अपमान करतात; पण असे करणे चांगले नव्हे. मार्दवाने बोलल्यास कमीपणा येतो, आपली बाजू सत्याची असली तरी लोक साशंकतेने पाहतात, त्यात ठाशीवपणा नसतो, असा काही लोकांचा गैरसमज असतो. मोठ्याने, ओरडून बोलले तरच समोरचा नमतो, त्याच्यावर प्रभाव पडतो असे मानणे वेडेपणा आहे. ज्याला चांगुलपणाची आस असते, त्याच्या मवाळतेच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या असतात. बोलण्यातील मऊपणा म्हणजे दुय्यमत्व नव्हे. ते तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाचे एक लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवर्णनातील वैशिष्ट्ये वाचली की, त्यांनी जे विराट काम केले, त्यांनी डोंगराएवढी माणसे प्राणपणाने जपली त्यात त्यांच्या स्नेहार्द्र वाचेचा वाटा सर्वोच्च होता.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वप्न तर सारेच पाहतात.स्वप्न पाहणेही काही गैर नाही.परंतू स्वप्न सत्यात उतरावयाचे झाल्यास त्यासाठी परिश्रमही करणे तितकेच महत्वाचे आहे.स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शक्य झाल्यास त्याचे नियोजन करावे.अशक्य वाटत असेल तर स्वप्न म्हणूनच त्याला मागे टाकावे.त्याबद्दल त्याचा जास्त विचारही करु नये. कारण जास्त विचार केला तर आपल्या मनावर काही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी.जे आहे त्यात बदल होत असेल तर बदल करून जीवनात आनंद आणि समाधान मानावे.विनाकारण स्वप्नांच्या जास्त मागे धावू नये. नाही तर आहे ते ही सुख गमावून बसल्याचा पश्चाताप होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चोर ते चोर अन वर शिरजोर*एका गावात एक पिठाची गिरणी होती. गिरणीचा मालक थोडासा लुच्चा इसम होता. तो गि-हाईकाच्या दळणातील थोडेसे धान्य अथवा पीठ काढून घेत असे. त्याची ही चोरी अनेकांच्या लक्षात येत असे पण गावात दुसरी गिरणी नसल्याने लोक गप्प बसत असत. एकेदिवशी धान्याच्या टोपलीत गिरणीमालकाला एक उंदीर सापडला. त्या उंदराला पकडून तो माणूस त्याच्या मांजराकडे देणार इतक्यात तो उंदीर विनवणीच्या सुरात त्या दळणक-याला म्हणाला, अहो मालक, मी चोर नाही. तुमच्याकडे येणा-या धान्यातील चारदोन दाणे खाऊन मी माझी भूक भागवितो आहे. तेव्हा मला कृपया तुम्ही सोडून द्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्याचे हे बोलणे ऐकून तो इसम त्याला म्हणाला,''अरे उंदरा धान्याचे चारदोन दाणे का होईना पण ते तू चोरून खातोसच ना. मग ही चोरीच आहे त्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.उंदीर म्हणाला, प्रत्येक दळणातले चारदोन दाणे खाणारा मी जरी चोर असलो तरी मी खूपच छोटी चोरी करतो तुम्ही तर प्रत्येक दळण दळण्याचे पैसेही घेता आणि वरून त्या दळणातील थोडे धान्य आणि थोडे पीठ अशी तिहेरी चोरी करता मग तुम्ही तर खूप मोठे चोर आहात. अशा या चोरीबद्दल तुम्ही स्वत:ला काय शिक्षा करून घेणार आहात. उंदराच्या या बोलण्याने माणूस खूपच संतापला व म्हणाला, चोरी करून ते करून वरून परत मलाच चोर ठरवतोस. काहीही झाले तरी माणूस आहे आणि माणूस हा पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. तो काय करतो, कुठे चुकतो, कुठे बरोबर असतो हे ठरवण्याचा अधिकार प्रत्यक्ष परमेश्वरालाही नाही. तू लहान का होईना चोरी केलीस आणि आता तू शिक्षेला पात्र आहेस असे म्हणून त्याने त्या उंदराला मांजराच्या स्वाधीन केले.*तात्पर्य*- जगात लहान चोरांना शिक्षा मिळते आणि मोठ्या चोरांना प्रतिष्ठा मिळते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment