✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक रेडिओ दिन*💥 ठळक घडामोडी⌛१९८४- भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना💥 जन्म :-⌛१८७९ - सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन⌛ १९११ - विख्यात ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म⌛१९२२ - गायक पं भीमसेन जोशी यांचा जन्म💥 मृत्यू :-⌛१९१४- ’लल्फ़ान्सो बर्टिलान’ या मानववंश शास्त्रज्ञाचे निधन⌛१९०१- शरीर शास्त्रज्ञ जयवंतसिंग यांचे निधन⌛१९९४ - उत्साद अमीर खाँ यांचं निधन⌛ १९०१ - भाऊराव कोल्हटकर यांचं निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतात येणार नवीन ईव्हीएम मशीन, देशातील कोणत्याही भागातून करता येणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शत्रूच्या काळजात धडकी भरवणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची 25 वर्ष पूर्ण; DRDO कडून शुभेच्छा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील सर्वात लांब मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, झारखंडचे राज्यपाल रमेश बैस महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22 वा दीक्षांत समारंभ सोहळा आज पार पडणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेगावमध्ये संत गजानान महाराज यांचा 145 वा प्रकटदिन सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत टी 20 विश्वचषकात विजयी सुरुवात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन,नांदेड🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/vU6PsdookuY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~ *👬 मैत्री 👬* ~~~~~~मैत्री ही कापड्यातील धाग्यासारखे आहे. एका मित्राने आपले जीवन परिपूर्ण होतच नाही. अनेक धाग्यासारखे जीवनात अनेक मित्र असतात आणि त्याची आवश्यकता देखील पदोपदी जाणवत राहते. बालपणीच्या मित्रांपासून जी मैत्री चालू होते ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत जाऊन पोहोचते. या सर्व कार्यकाळात असलेले मित्र सुख आणि दुःखाच्या प्रसंगी अधुनमधून जीवनात डोकावत असतात. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा मैत्री होते पण ती काही ठिकाणी तात्पुरते बनते तर काही ठिकाणी ही मैत्री गट्ट दिसून येते. संकट काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. त्यासाठी जीवनात संकट यावे लागते हे ही सत्य आहे. आपल्या जीवनात संकटेच आली नाहीत तर खरी मैत्री देखील कळणार नाही.*मैत्री असावी जीवाभावाची**नसाव्यात कोरड्या शपथा**क्षणोक्षणी आठवावे आपुल्या**मैत्रीच्या आठवूणी कथा*लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इतिहासात प्रथमच अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे तब्बल आठ मिनिटे जुनेच अर्थसंकलपीय बजेट कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांने वाचन केले ?२) 'चला जाणूया नदीला' या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली ?३) भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?४) असहकार चळवळ कोणी सुरू केली ?५) भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत ?*उत्तरे :-* १) राजस्थान २) १५ ऑक्टोबर २०२२ ३) नवी दिल्ली ४) महात्मा गांधी ५) उत्तरप्रदेश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद👤 अशोक पाटील, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उपेक्षी कदा रामरुपी असेना। जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥ शिरी भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिकंदर 'जगज्जेता' ठरला, तरीही त्याची अभिलाषा विराम पावली नव्हती, तो मनाच्या घालमेलीत फे-या मारत होता. सारी पृथ्वी जिंकून मी 'जगज्जेता' आणि महान 'सेनापती' ठरलो. मी जेता आहे; पण आता मी जिंकू काय ? त्याचा अहंकार जागा होता. त्याचं मन दु:खी झालं.**सारी छावणी निद्रेच्या अधीन होती. पण या विषण्ण अवस्थेत त्याचा दु:खावेग अनावर झाला अन् तो ढसढसा रडू लागला व ओरडू लागला आता मी जिंकू काय ? मला जिंकण्यासाठी काहीच उरले नाही.**आवाज ऐकून एक वृद्ध सैनिक जागा झाला व म्हणाला.."शहंशाह जिंकायला अजून एक गोष्ट बाकी आहे. ती अत्यंत अवघड गोष्ट म्हणजे माणसाचं मन ! ते जिंकलत तर आपण ख-या अर्थाने 'जगज्जेता' व्हाल !"**" ज्या दिवशी माणूस स्वत:चं मन जिंकेल त्यादिवशी तो खरा जगज्जेता !"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंद हा आनंदच असतो.आनंदाला कोणीही सहज स्वीकारतो.त्याचा कोणीही तिरस्कार करत नाही.जेथे सुख,समाधान,शांती आहे तेथे आनंद आनंदाने नांदत असतो.पण जेथे वाद,नैराश्य,दुःख,अस्थिर मन आहे तेथे आनंद संचार करत नाही.आनंदाला जवळ करायचे असेल तर मनातून त्याला हसत मुखाने व कोणत्याही कठीन परिस्थितीत स्थीर मनाने स्वीकारावे.इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात आनंद मिळवता येतो.त्यासाठी आपणही आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे.कारण आनंद हा चांगल्या प्रयत्नाने आणि सातत्याने केलेल्या कामात व मनाच्या समाधानात मिळत असतो.तो कुणालाही विकत घेता येत नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ एकाग्रता ❃* *एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्यांना ती मुले आवडली होती. ते म्हणाले,’’ जे काही तुम्ही करत होता त्यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्य होतात.’’ मुले स्वामींजींपुढे नतमस्तक झाली. *_🌀तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment