✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वकर्मा जयंती*💥 ठळक घडामोडी :- १९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.💥 जन्म :-१९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.💥 मृत्यू :- १९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक :- नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे, नागपूर शिक्षक मतदार संघात सुधाकर आडबाले तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार, मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरता सूचना; मंडळाचे सर्व शाळांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी माई सातारकर यांचं निधन, त्या 85 वर्षांच्या होत्या.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *2024 च्या अखेरीस आम्ही अमेरिकेप्रमाणे रस्ते अन् उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करु : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/O5CM0SMK60c~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - गुरुदक्षिणा*वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *रघुराम राजन*राजन यांचा जन्म १९६३ साली भोपाळ, मध्यप्रदेश येथे तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय गुप्तवार्ता केंद्रात वरिष्ठ अधिकारी होते. राजन यांनी ७वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये घेतले. त्यांनी १९८५ साली भारतीय प्रौद्योगीकी संस्थान, दिल्ली (आयआयटी) मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. १९८७ साली राजन यांनी भारतीय प्रबंध संस्थान, अहमदाबाद (आयआयएम) इथून उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका संपादन केली. १९९१ साली राजन यांनी अमेरिकेतील मॅसाचुसेट्सच्या एमआयटीमधून व्यवस्थापनशास्त्रात पी.एच.डी. केलीरघुराम राजन भारतीय रिजर्व बैंकेचे 23 वें गवर्नर होते.4 सप्टेंबर 2013 रोजी डी. सुब्बाराव यांच्या सेवानिवृत्तिनंतर त्यांनी पदभार घेतला होता. त्यापूर्वी ते पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व शिकागो विश्वविद्यालयात बूथ स्कूल ऑफ बिजनेस मध्ये एरिक जे ग्लीचर फाईनेंसचे सर्विस प्रोफेसर होते. 2003 ते 2006 पर्यंत ते अंतर्राष्ट्रीय मुद्रा कोष चे प्रमुख अर्थशास्त्री व अनुसंधान निदेशक होते आणि भारतातील आर्थिक सुधार योजना आयोग द्वारा नियुक्त समितिचे नेतृत्व केले होते.राजन मैसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजी चे अर्थशास्त्र विभाग आणि स्लोन स्कूल ऑफ मैनेजमेण्ट; नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी चे केलौग स्कूल ऑफ मैनेजमेण्ट आणि स्टॉकहोम स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये अतिथि प्रोफेसर म्हणून ही काम पाहिले आहे. त्यांनी भारतीय अर्थ मंत्रालय, विश्व बैंक, फेडरल रिजर्व बोर्ड आणि स्वीडिश संसदीय आयोगाचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.सन 2011 मध्ये अमेरिकन फाइनेंस ऐसोसिएशन चे अध्यक्ष होते तथा सध्या ते अमेरिकन अकैडमी ऑफ आर्ट्स एण्ड साइंसेज़ चे सदस्य आहेत.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छासंकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जेव्हा कमजोरी शक्ती बनते, तेव्हा यश हमखास मिळते. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रपती भवनातील 'मुघल गार्डन' आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ?२) कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) भारतीय टेनिस विश्वाची 'सोने की चिडिया' असे कोणाला संबोधले जाते ?४) जगातील सर्वाधिक श्रीमंत शहर कोणते ?५) महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'ची रक्कम किती करण्यात आली ?*उत्तरे :-* १) अमृत उद्यान २) आशा बगे, ज्येष्ठ साहित्यिक ३) सानिया मिर्झा, टेनिसपटू ४) न्यूयॉर्क, अमेरिका ५) २५ लाख*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हंसिनी उचित, साहित्यिक👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड👤 ऍड. मल्हार मोरे, भोकर👤 अर्शनपल्ली अजय👤 सुशील कुलकर्णी👤 राजेश पिकले👤 शिवकुमार देवकत्ते👤 विश्वास मापारी👤 ओमकार पाटील चोळाखेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते. जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही.अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते. जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते.अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे .या दोघांनाही आपल्याला जपायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य:ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.'*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment