✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.● १९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.● २००१ - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.● २००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.● २००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.💥 जन्म :-● १९१२ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.● १९३९ - ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार.💥 मृत्यू :- ● १९३९ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज.● १९७६ - ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.● १९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यु पत्करणारा शेवटचा माणूस.● २००१ - बॅ.विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.● २०२२ - भारताची गानकोकिळा लता मंगेशकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आंतरराष्ट्रीय युद्ध सरावात भाग घेणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या अवनी चतुर्वेदी; म्हणाल्या, रोमांचक होता अनुभव...*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Vande Bharat Express ची मुंबई ते इगतपुरी ट्रायल, 10 तारखेला सीएसएमटीवरुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजलं, वर्ध्यातील उत्तम आयोजनाचं कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेतून पुनर्विकास होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'मेक इन इंडिया' आता 'जोक इन इंडिया' झाला; तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथील जाहीर सभेत भाजपावर केली टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर महिनाभरासाठी रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Np63m86Rvu4~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालकांचे मुख्याध्यापकास पत्र*लिंक 👇🏼http://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लता मंगेशकर ( हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.त्यांना चार भावंडे होती, मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.लता मंगेशकर यांना कोविड-१९ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आंधळ्या श्रद्धेपेक्षा डोळस बुद्धीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आदिवासींचे श्रद्धास्थान असलेली कचारगड गुफा कोणत्या जिल्ह्यात आहे ?२) माघ पौर्णिमेला गोंडी भाषेत काय म्हटले जाते ?३) राहण्यासाठी, जगण्यासाठी जगातील सर्वाधिक महागडी शहरे कोणती ?४) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे ?५) डोंगर पोखरून आरपार गेलेल्या रस्त्यास काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) गोंदिया २) कोया पुनेम ३) न्यूयॉर्क, सिंगापूर, तेल अविव ४) कटक, ओडिशा ५) बोगदा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास सदावर्ते, दै. सकाळ, जालना👤 प्रा. पंजाबराव येडे👤 वैभव गायकवाड👤 सादिक मोहंमद👤 माधव गणेशराव नारसनवाड👤 लक्ष्मण एडके👤 चंपती सावळे👤 सचिन गिराम👤 कोंडेवार साईनाथ, भैसा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे। वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥ पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥२९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक बोकड एका डोंगराच्या माथ्यावर चरत असता एकाएकी मोठे वादळ झाले. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो बोकड जवळच्या दाट झाडीत जाऊन बसला. ती जागा शांत व निवार्याची असल्याने त्याला तेथेच झोप लागली. काही वेळाने वादळ शांत झाल्यावर तो जागा झाला व घरी जाण्यास निघाला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, त्याच्या लोकरीत काटेरी झाडाची एक फांदी अडकली आहे. थोडा वेळ हिसकाहिसकी केल्यावर बरीचशी लोकर गेल्यावर ती फांदी बाजूला झाली व तो आपल्या घरी गेला.तात्पर्य - काहीही अपेक्षा न ठेवता आश्रय देणारे किंवा दुसर्याचे रक्षण करणारे लोक थोडेच असतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment