✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २७६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.**१९३५:जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.**१९३२:इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१७७८:ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६९:सुखचंद वाघमारे-- कवी* *१९६८:डॉ.शीतल शिवराज मालुसरे-- लेखिका, कवयित्री,निवेदिका* *१९६६:सुनील बर्वे -- मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते**१९६४:प्रा.डॉ.गंगाधर विठोबाजी कायंदे-पाटील-- लेखक,विचारवंत* *१९६०:श्रीपाद अनिल गोरे-- लेखक* *१९४९:जे.पी.दत्ता – चित्रपट दिग्दर्शक**१९४३:वामन नथुजी तिरबुडे -- लेखक* *१९४२:प्रा.प्रभाकर दत्तात्रय म्हारोळकर-- कवी,लेखक* *१९२८:प्रा.जनार्दन रा.कस्तुरे-- लेखक(मृत्यू:६ ऑगस्ट २००६)**१९२१:रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू:२३ जून १९९६)**१९१९:जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३)**१९१४:म.वा.धोंड –टीकाकार (मृत्यू: ५ डिसेंबर २००७)**१९०६: गोविंद विनायक देवस्थळी --संस्कृत विषयाचे अभ्यासक,संशोधक(मृत्यू:१४ मार्च १९९४)**१९०३:स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू:२२ जानेवारी १९७२)**१९०२: नारायण माधव सरपटवार-- विदर्भातील जुन्या पिढीतील नामवंत कवी (मृत्यू:२२ मार्च १९८८)**१९०२:केशव रावजी पुरोहित--पत्रकार, कादंबरीकार (मृत्यू:१० फेब्रुवारी १९६१)**१९००:श्रीपाद शंकर नवरे-- लेखक,संपादक(मृत्यू:७ डिसेंबर १९७८)* *१८९८:राधाबाई पांडुरंग आपटे -- कवयित्री, लेखिका* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:प्रा.पुष्पा भावे-- स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या,समीक्षक,रंगभूमीच्या भाष्यकार( जन्म:२६ मार्च, १९३९)**२०१२:केदारनाथ सहानी – सिक्कीमचे माजी राज्यपाल,दिल्लीचे महापौर(जन्म:२४ आक्टोबर १९२६)**१९९९:शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक(जन्म:१० जानेवारी १९०३)**१९९९:अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म:२६ जानेवारी १९२१)**१९७३:साधना बोस--- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना (जन्म:२० एप्रिल १९७३)**१९५९:दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’- विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(जन्म:२२ सप्टेंबर १९०९)**१९४३:विष्णुपंत पागनीस-- ज्येष्ठ अभिनेते, गायक (जन्म:१५ नोव्हेंबर १८९२)**१८९१:एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म:४ एप्रिल १८४२)**१८६७:एलियास होवे– शिवणयंत्राचा संशोधक (जन्म:९ जुलै १८१९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... झाशीची राणी लक्ष्मीबाई ...राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर तर जन्मनाव मनकर्णिका असे होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर, सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली.मेरी झांशी नहीं दूगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्यांच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या आहेत. झांसी या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्याविरुद्ध लढा देण्याचे धाडस केले आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाईं यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात. राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे.पुढील भागात :- राजमाता जिजाऊसंकलन :- नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यंदाचे मानकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडे जाहीर, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय गणना करण्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राष्ट्रपिता महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींचं नमन, 'बापूंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध'; देशभरात गांधी जयंतीचा उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाण्यानंतर आता नांदेड हादरलं! शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा मृतात समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधीमंडळ आयोग दोन दिवसांत निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करणार, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी माहिती घेणार, तर सुनावणीआधीच दोन्ही गट आमने-सामने*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दसऱ्यापूर्वी हक्काचे 400 रूपये प्रतिटन न दिल्यास दिवाळी गोड होणार नाही, 'स्वाभिमानी'चा साखर कारखानदारांना ढोल वाजवत इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने झंझावती कामगिरी करताना बांगलादेशचा 12-0 ने धुव्वा उडवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फळांचे महत्व*फळामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने असतात. तसेच फळांमध्ये ८५ ते ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे फळे खाल्याने आपले शरीर dehydrate राहायला मदत होते.आपल्या दैनंदिन आहारात फळांचा समावेश असणे हे आपल्यासाठीच खूप फायद्याचे आहे वेगवेगळे फळांमधून आपल्याला वेगवेगळे महत्त्वाचे घटक मिळतात. फळांचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे आज आपण या लेखातून पाहणार आहोत. फळांमधील तंतुमय पदार्थफळांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांचे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात फळांमधून आपल्याला मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळत असतात.यांच्या सेवनामुळे आतड्यांचे आकुंचन – प्रसरण चांगले होते तसेच मलावरोध, पोटात दुखणे, बद्घकोष्ठता या आजारापासून आराम मिळतो. अंजीर पेरू, पेर यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. क जीवनसत्त्वक जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ‘ स्कर्व्ही’ हा रोग होते. त्यामुळे क जीवनसत्त्वे आपल्यासाठी गरजेचे आहे.आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी अशा फळांमधुन मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व मिळते. त्याचा आपल्याला फायदा होतो(Fruits Information In Marathi). आजारपणात फळांचे महत्त्वआजारी व्यक्तीला शक्यतो फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने, शरीरासाठी आवश्यक खजिने उपलब्ध असतात. म्हणून आजारी व्यक्ती जर अशक्य झाली असेल तर त्याला फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे त्यांचे पोषण होण्यास मदत होते. फळांचे इतर उपयोगफळांचा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी देखील उपयोग केला जातो. यामध्ये आईस्क्रीम, मिठाई मध्ये फळांचे फ्लेवर वापरले जाते. आमरस, शिकरण यासारखे अन्नपदार्थ हे फळे वापरून तयार केले जातात. सर्व प्रकारची फळे ही आपल्यासाठी उपयोगी आहेत*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःची चूक स्वत:ला कळली की बरेच प्रश्न सुटतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कासवाचे आयुष्य किती वर्षाचे असते ?२) महाराष्ट्रातील नृत्य प्रकार कोणते ?३) जगातील सर्वात वेगवान धावपटू कोण आहे ?४) आंतरराष्ट्रीय टी - २० मधील सर्वात वेगवान अर्धशतक कोणी ठोकले ?५) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विमानतळ कोठे आहे ? *उत्तरे :-* १) १५० वर्षे २) लावणी, कोळी नृत्य ३) उसैन बोल्ट ४) दीपेंद्रसिंग ऐरी, नेपाळ ( ९ चेंडू - ६,६,६,६,६,६,२,६,६ ) ५) इंदूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 चिं. रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर👤 कु. पूर्वा श्यामसुंदर माडेवार, पुणे👤 नागेश क्यातमवार, शिक्षक, नांदेड👤 साईनाथ राचेवाड, शिक्षक, बिलोली👤 संदीप कडलग, आरमुर, तेलंगणा👤 विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद👤 रणजित चांदवाले👤 पांडुरंग यलमलवाड👤 मारोती नरवाडे👤 शंकर पाटील👤 शंकर दरनगे👤 शिवाजी पांडुरंग मुटकुले👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं पाहतां देव हा अन्नदाता। तया लागली तत्त्वता सार चिंता॥ तयाचे मुखी नाम घेता फुकाचे। मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखात असतात कोणाची आठवण येत नाही. आणि दु:खात असताना मात्र आपल्या माणसांची पदोपदी आठवण येत असते. कारण त्यावेळी सुख महत्वाचे वाटत नाही तर आपल्या माणसांच्या साथीची आवश्यकता वाटत असते म्हणून सुखात असो किंवा दु:खात आपल्या माणसांना कधीच विसरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कुंभाराचे प्रेम स्वरूप*आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता, घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला दोन वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला.आज घरी नेण्यासाठी इतर पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालनपोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते, झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हा बंधारा मदनात आला. या पोतलीचे रहस्य असे होते – काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा गठ्ठा दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली.नैतिक – जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो, ही हानी दीर्घकालीन असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment