✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संधिवात निवारण दिन_* *_ या वर्षातील २८५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.**२००१:संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर**२०००:भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल ’सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार’ जाहीर**१९९८:तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून 'इंटरनॅशनल वूमन मास्टर’ हा किताब मिळवला.**१९८८:जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.**१९८३:लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.**१९६८:मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१८७१:भारतात ब्रिटिश सरकारने ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.**१८५०:अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१:अक्षरा हासन- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९७८:कल्पना दुधाळ--कवयित्री**१९७२:सुरेश पुंडलिक गेडाम -- कवी* *१९६७:चित्रा सुधीर कहाते -- कवयित्री, लेखिका* *१९६५:लता सुरेश पाटील-- कवयित्री* *१९५५:अंजली माधव देशपांडे-- कवयित्री, लेखिका* *१९५५:सुहास कामत-- ज्येष्ठ रंगकर्मी* *१९५५:श्रीराम रावसाहेब गुंदेकर-- ग्रामीण साहित्यिक,समीक्षक,सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक,संशोधक व भाष्यकार(मृत्यू:१२ जानेवारी २०१८)**१९५४:प्रा.राजाराम बनसकर - बालकांसाठी लेखन करणारे कवी* *१९४६:अशोक मांकड – क्रिकेटपटू (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९४६ डॉ.प्रल्हाद कुलकर्णी -- कादंबरीकार**१९४५: भीमराव सीताराम विठ्ठले--कवी* *१९४५:टिनू आनंद (वीरेंद्र राज आनंद) -- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक,लेखक आणि निर्माता**१९३९:रामदास लिंगुसा दुमाने-- कवी,लेखक* *१९३९:रमेश शामराव मेंदूले-- लेखक**१९३८:मुक्तिदा हसन निदा फाजली --भारतीय हिंदी आणि उर्दू कवी गीतकार आणि संवाद लेखक,साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले(मृत्यू:८ फेब्रुवारी २०१६)**१९३५:शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर--लेखक, पूर्व केंद्रिय गृहमंत्री,पूर्व राज्यपाल पंजाब**१९३४:दीपा गोवारीकर-- बालसाहित्यिक, ज्येष्ठ लेखिका* *१९२२:शांता शेळके – समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका.त्यांनी कथा,कादंबरी,कविता, चित्रपटगीते,भावगीते,नाट्यगीते,बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले.(मृत्यू:६ जून २००२)**१९२१:जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते,गोवा मुक्ती संग्रामातील झुंजार सेनापती,लोकमान्य टिळकांचेनातू,साहित्य,पत्रकारिता,तत्त्वज्ञान,विज्ञान,इ.विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक (मृत्यू:२३ एप्रिल २००१)**१९२१:शरद खंडेराव मंत्री (सुमतीसुत)-कवी, लेखक* *१९१८:मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, (मृत्यू:१९ जानेवारी २०००)**१९११:विजय मर्चंट – क्रिकेटपटू,क्रिकेट समालोचक,उद्योगपती व समाजसेवक (मृत्यू:२७ आक्टोबर १९८७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:मुरलीधर कापडी--चित्रपट दिग्दर्शक (जन्म:६ मार्च १९३४)**१९९६:रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (जन्म:२ जुलै १९०४)**१९६७:डॉ.राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते,विख्यात संसदपटू,लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक(जन्म:२३ मार्च १९१०)**१९६५:पॉल हर्मन म्युलर – डी.डी.टी.या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (जन्म:१२ जानेवारी १८९९ )**१६०५:बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट (जन्म:१५ आक्टोबर १५४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिलांची माहिती*.... बचेंद्री पाल ....बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, इ.स. १९८४ रोजी जगातील सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत.त्यांचा जन्म १९५४ मध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यापैकी काही पुढील प्रमाणे:भारतीय पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे गिर्यारोहणाकरिता सुवर्ण पदक (1984)पद्मश्री(1984) पुरस्काराने सम्मानितउत्तर प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे सुवर्ण पदक (1985)अर्जुन पुरस्कार (1986)कोलकाता लेडीज स्टडी ग्रुप अवार्ड (1986)गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड्स (1990) मध्ये नोंदभारत सरकार तर्फे एडवेंचर अवार्ड (1994)उत्तर प्रदेश सरकार कडून यशभारती सन्मान(1995)हेमवती नन्दन बहुगुणा गढ़वाल विश्वविद्यापीठाकडून मानद पी एच डी उपाधि (1997)संस्कृति मंत्रालय, मध्य प्रदेश सरकार कडून पहिला वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय सन्मान (2013-14)पद्मभूषण पुरस्कार(२०१९)संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदा FRP पेक्षा 400 रुपये ज्यादा द्या, अन्यथा कारखाना सुरू होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नागपुरात खोदकाम करताना सापडली देवीची मुर्ती, बघ्यांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यपाल रमेश बैस हे गुरुवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून, ते दोन्ही विद्यापीठांना भेट देणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिर्डी साई भक्तांसाठी महत्वाची बातमी ! पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात न्यायाधीशांनी पोलिसांना सुनावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोहित शर्माने मोडला सचिनच्या शतकांचा विक्रम, विश्वचषकात नवा रेकॉर्ड हिटमॅनच्या नावावर, अफगाणिस्तान वर 8 विकेटने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरोग्यासाठी महत्वपूर्ण टिप्स*१. बाहेरून घरी आल्यानंतर जेवण बनवण्याच्या आधी किंवा जेवणापूर्वी, बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला घेण्याआधी हाथ धुणे गरजेचे आहे.२. घरात साफ-सफाईवर ध्यान द्या. स्वयंपाक घर खास करून स्वच्छ असू द्या. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा. ३. जेवन बनवण्याआधी भांडी स्वच्छ धुणे आवश्यक आहे. ओली भांडी तशीच ठेवू नका.  ४. आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा. जास्त काळापासून असणारे पदार्थ खाणे टाळा. ५. तेल आणि मसाले यांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो टाळा. जेवणाला योग्य तापमानात शिजवून घेणे गरजेचे आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला ?२) चहाचा सर्वात जास्त उत्पादन जगात कोणत्या देशात होते ?३) जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश कोणता ?४) भारतातील 'चहाची बाग' म्हणून कोणते राज्य ओळखले जाते ?५) भारतातील सर्वात मोठे चहाचे मळे कोणते आहे ?*उत्तरे :-* १) चीन २) चीन ३) भारत ४) आसाम ५) गटुंगा टी इस्टेट, आसाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अमित शिंदे👤 माधव धुप्पे👤 संतोष शातलवार👤 जगन कुलवंत👤 संपन्न कुलकर्णी👤 बालाजी लक्ष्मणराव सातपुते👤 सायारेड्डी जरावाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अती लीनता सर्वभावे स्वभावें।जना सज्जनालागिं संतोषवावे॥देहे कारणीं सर्व लावीत जावें।सगूणीं अती आदरेसी भजावें॥१०२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध............✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात समस्या निर्माण झाल्या की,आपण कंटाळतो आणि जीवन जगण्यात काही अर्थ नाही असं म्हणून जीवन जगायला अनुत्स्तुक होतोत.पण असे हतबल होऊन चालणार नाही.त्यापेक्षा परिस्थितीला दोन हात करायला शिकले पाहिजे.कारण या जगात परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय त्यातून मार्ग सापडत नाही.कारणे आणि पर्याय नक्कीच सापडतात आणि जे सापडतात ते आपल्या जीवनासाठी काहीतरी मिळालेले असते.त्यातून जीवनात कंटाळा येण्याऐवजी जगण्याची नवी दिशा आणि नवी प्रेरणा मिळते.त्यातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळालेले असते.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••●●○ राज ज्‍योतिषी ○●●अवंतीनगरीचे राजा बाहुबली यांना राजज्‍योतिष्‍याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्‍यांनी ही इच्‍छा व्‍यक्त केली. राजज्‍योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्‍यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्‍यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्‍यात पिटवण्‍यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्‍या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्‍वत:च मुलाखती घेण्‍यास सुरुवात केली. अनेक ज्‍योतिष्‍यांनी आपल्‍या ज्ञानाचे सादरीकरण करण्‍यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्‍योतिषी उरले त्‍यातील पहिल्‍या ज्‍योतिष्‍याला राजाने विचारले,''तुम्‍ही भविष्‍य कसे सांगता'' ज्‍योतिषी म्‍हणाला,''नक्षत्र पाहून'' राजाने दुस-या ज्‍योतिष्‍याला हाच प्रश्‍न विचारला तेव्‍हा दुसरा ज्‍योतिषी म्‍हणाला,''हस्‍तरेषा पाहून भविष्‍य सांगतो'' राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्‍हा आपल्‍या राज्‍यातील निर्धन ज्‍योतिषी विष्‍णुशर्माची आठवण झाली. विष्‍णुशर्माला तात्‍काळ बोलावण्‍यात आले. राजाने विष्‍णुशर्माला विचारले,'' तुम्‍ही ज्‍योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्‍हाला राजज्‍योतिषी होणे आवडत नाही काय'' विष्‍णुशर्माने सांगितले,''महाराज मी घरी बसून माझ्या स्‍वत:च्‍या पत्रिकेचा अभ्‍यास केला व माझ्या अभ्‍यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्‍ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्‍याल हे मला माझ्या अभ्‍यासातून आधीच कळाले होते. त्‍यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्‍यास आलो नाही.'' राजाला विष्‍णुशर्माची अभ्‍यासू वृत्ती व त्‍याचा आत्‍मविश्‍वास या दोन्‍हीचा अभिमान वाटून त्‍याने विष्‍णुशर्माला राजज्‍योतिषी म्‍हणून नियुक्त केले.तात्‍पर्य - ज्‍यांचा स्‍वत:वर व स्‍वत:च्‍या अभ्‍यासावर प्रचंड विश्‍वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्‍यांच्‍याकडे संधी आपोआप चालून येतेhttps://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment