✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मनुष्य गौरव दिन*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.**२०००:पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान**१९९४:रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार’ जाहीर.**१९९३:पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी.व्ही.रामन पदक जाहीर**१९७०:भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द**१९४४:दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.**१९३५:इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.**१८१२:नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:कुंजीराम जनार्दन गोंधळे -- लेखक**१९८७:सुनील शिवाजी खवरे-- कवी* *१९७१:प्रा.रत्नमाला प्रभाकर भोयर- कोरडे -- कवयित्री* *१९६८:शामला पंडित दीक्षित-कवयित्री, लेखिका**१९६७: लतिका चौधरी -- कवयित्री,लेखिका* *१९६१:अजय सिंग देओल ऊर्फ ‘सनी देओल‘ – अभिनेता**१९६०:प्रा.डॉ.पुरुषोत्तम मारोतराव कालभुत-- लेखक**१९५६:जयंत शंकर कुलकर्णी-- लेखक**१९५४:प्रिया तेंडुलकर – रंगभूमी,चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री,लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.’जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.(मृत्यू:१९ सप्टेंबर २००२)**१९५२:गिरीश प्रभुणे-- सामाजिक कार्येकर्ते, लेखक,पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९५१:प्रा.व्यंकटेश वळसंगकर-- गुलबर्ग येथील मराठी कवी,लेखक**१९५०:अशोक अर्धापुरकर-- प्रसिद्ध लेखक**१९४९:आशा कर्दळे-- मराठी चरित्रलेखिका आणि अनुवादक**१९४१:डॉ.सुरेश विश्वनाथराव उपगन्लावार -- कवी* *१९३९:शशिकांत शामराव पवार -- विधिज्ज्ञ, लेखक**१९३६:शांताराम नांदगावकर – प्रसिद्ध गीतकार (मृत्यू:११ जुलै २००९)**१९३४:मधुकर विष्णू कोल्हटकर -- विनोदी कथालेखक,तत्वज्ञानाचे अभ्यासक* *१९२९:निर्मला देशपांडे -- सामाजिक कार्यकर्त्या व गांधीवादी नेत्या(मृत्यू:१मे २००८)**१९२५:डॉ.वामन दत्तात्रय तथा ’वा.द.’वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (मृत्यू:१७ एप्रिल २००१)**१९२०:पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ.त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.(मृत्यू:२५ आक्टोबर २००३)**१९११:असरार-उल-हक -मजाझ लखनवी म्हणून ओळखले जाणारे,भारतीय उर्दू कवी(मृत्यू:५ डिसेंबर १९५५)**१९१०:सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक.(मृत्यू:२१ ऑगस्ट १९९५)**१९०२:दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक,नाट्य लेखक(मृत्यू: ३१ मे १९७३)**१८९३:मोरेश्वर वासुदेव जोशी -- कादंबरीकार,कथाकार (मृत्यू:१६ सप्टेंबर १९८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: मनोहर सदाशिव नाईक-- लेखक, व्याख्याते (जन्म:१० मार्च १९४९)**२००५:मोहन सहगल-- निर्माता,दिग्दर्शक, अभिनेता(जन्म:१ डिसेंबर १९२१)**१९९५:बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग ऊर्फ ’बेबी नाझ’ यांचे निधन.(जन्म:२० ऑगस्ट१९४४)* *१९५०:विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म:९ एप्रिल १८८७)**१९३७:अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ(जन्म:३० ऑगस्ट १८७१)**१९३४:विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक.१८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.(जन्म:२४ डिसेंबर १८६४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नवरात्र विशेष माहिती*.... वणीची सप्तशृंगी देवी ....नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन "आर्धे शक्तीपीठ" झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो. हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुढील शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य, एक गणवेश'; शासन निर्णय जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सहा रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत म्हणजेच MSP मध्ये वाढ करण्याचा मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवरात्री गिफ्ट; DA मध्ये 4 टक्के वाढीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मतदार याद्या अधिक शुद्ध करण्यावर भर द्या : पुणे जिल्ह्यात युवा लोकसंख्या 26 लाख मात्र, प्रत्यक्ष मतदार यादीत 13 लाख - जिल्हाधिकारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात प्रीपेड स्मार्ट मीटरराज्यभर बसविण्याची तयारी सुरू : महावितरणच्या 2 कोटी 41लाख ग्राहकांचे पारंपारिक मीटर बदलणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली दसरा महोत्सव:पोलिस अधीक्षकांसह साध्या वेशातील कर्मचाऱ्यांनी फिरून घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिल्ली .....राजधानी शहर आपल्या चैतन्यशील नवरात्री उत्सवांसाठी देखील ओळखले जाते, विविध ठिकाणी गरबा आणि दांडिया कार्यक्रम आयोजित केले जातात. नवरात्री लोकांसाठी एक विशेष भावना असते आणि ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी विविध पंडाल, दांडिया कार्यक्रम आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल तयार केले जातात. येथे तपासण्यासाठी काही ठिकाणे आहेत.चित्तरंजन पार्क (सीआर पार्क), कालीबारी, मिंटो रोड पूजा समिती, दिल्ली हाट , पाच इंद्रियांची बाग *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) Greater Flamingo चे मराठी नाव काय आहे ?२) जगात रोहित पक्ष्यांच्या एकूण किती प्रजाती आहेत ?३) मोठा रोहित पक्षी कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ?४) फ्लेमिंगो हे नियतकालिक कोणत्या संस्थेकडून प्रकाशित होते ?५) जागतिक फ्लेमिंगो दिन केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) मोठा रोहित २) सहा ३) गुजरात ४) बर्ड काँन्झरवेसन सोसायटी गुजरात ५) २६ एप्रिल संदर्भ:- पक्षिमित्र त्रैमासिक, महाराष्ट्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिरुद्ध कोल्हटकर👤 विशाल शेपाळकर👤 लतिका चौधरी, साहित्यिक👤 योगेश्वर कंदुरके👤 श्रीनिवास बेंकट, करखेली👤 डॉ. साई रामोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।जनीं वादसंवाद सूखे करावा॥जगीं तोचि तो शोकसंतापहारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य बोलणाऱ्याला कोणी साथ देत नाही, सत्य लिहिणाऱ्याला सर्वच सहमत असतीलच असेही नाही, सत्य बघणाऱ्याला आंधळा म्हटल्याशिवाय राहणार नाही. पण इथेच मात्र खोट्याला व फसवणूक करणाऱ्या सोबत अतूट विश्वासाचे नाते जोडले जातात. या पृथ्वीतलावर जन्म घेणारा प्रत्येक मनुष्य निसर्गाला ओळखत असतो. फरक एवढाच की, निसर्ग नियमाचे पालन करण्याचे काम प्रत्येकाला जमत नाही. पण,जो पूर्ण श्रध्देने, निष्ठेने व संघर्ष करून जगत असतो उशिरा का होईना त्याचे जीवन इतरांपेक्षा वेगळे होऊन जाते. म्हणून प्रत्येक मनुष्य प्राण्यानी निसर्गाच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न केले पाहिजे. भलेही गती उशिरा मिळेल पण निसर्ग त्यालाच साथ देत असतो जो त्याच्या नियमाचे पूर्णपणे पालन करत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार*एका गावात एक मूर्तिकार राहत होता. तो देव देवतांच्या सुंदर मूर्ती घडवत असे. एकदा त्याने देवतेची अतिशय सुंदर मूर्ती घडवली. ती मूर्ती त्याला गि हाईकाला पोचती करायची होती. त्यासाठी त्याने एक गाढव भाड्याने घेतले. ती मूर्ती गाढवाच्या पाठीवर लादली. गाढव रस्त्याने निघाले. ती सुंदर मूर्ती पाहून अनेक माणसे वाटेत थांबत होती. मुर्तीची स्तुती करत होती. काही माणसे वाकून त्या मूर्तीला नमस्कारही करत होती.त्या मुर्ख गाढवाला वाटले की, लोक आपलीच स्तुती करत आहेत. आपल्यालाच नमस्कार करत आहेत. म्हणून गाढव मोठ्या ऐटीत रस्त्याच्या मधोमध थांबले आणि मोठयाने ओरडू लागले. त्याच्या मालकाने त्याला चूचकारुन शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर मालकाने त्याला काठीचा जोरदार तडाखा हाणला. त्या तडाख्याने गाढवाचा खोटा गर्व गळून पडला. ते ताळयावर आले आणि निमुटपणे पुढे चालू लागले. ✍ *तात्पर्य*✍*"शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार"*सौजन्य :- http://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment