✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.**१९६७:सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.**१९२२:ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना**१९१९:राम गणेश गडकरी लिखित ’संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ’बळवंत संगीत नाटक मंडळी’ने केला.**१९०६:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.**१८७९:थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना**१८६७:सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:अजय ताराचंद पटले-- नाट्यलेखक**१९८०:प्रा.आशिष रमेश बोरकर-- लेखक**१९७६:प्रा.डॉ.विजया जितेंद्र राऊत-- लेखिका,समीक्षक,संपादिका* *१९७४:आमिश त्रिपाठी-- इंग्रजीतून लिहीणारा भारतीय लेखक त्यांची पुस्तके अनेक भाषांमध्ये भाषांतरित* *१९७०:रवींद्र मुकुंदराव मालुंजकर -- कवी**१९६८:मनोज अंबिके-- प्रसिद्ध लेखक**१९६७:प्रा.डॉ.माधुरी सुटे -- लेखिका* *१९६६:प्रा.नंदकुमार दिगंबरराव बालुरे-- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९५८:अंजली कुलकर्णी-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५६:मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू* *१९५०:ओम पुरी – प्रसिद्ध अभिनेता (मृत्यू:६जानेवारी २०१७)**१९४५:अरुंधती अरविंद बापट-- लेखिका**१९४५:मनोहर नामदेवराव पाटेकर-- कवी, लेखक**१९४३:सुनेत्रा पंडित-- लेखिका**१९३९:ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडीचा मारेकरी (मृत्यू:२४ नोव्हेंबर १९६३)**१९३७:मंगला जगन्नाथराव आवलगांवकर -- लेखिका,कवयित्री**१९३३:राम मुखर्जी -- बंगाली-हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक(मृत्यू:२२ ऑक्टोबर २०१७)**१९२५:इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक(मृत्यू:४ ऑगस्ट २०२०)**१८९३:हरी दामोदर वेलणकर--संस्कृत पंडित व ग्रंथकार(मृत्यू:१३ जानेवारी १९६७)**१८६१:’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश,कायदेपंडित,लेखक,आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. (मृत्यू:२० एप्रिल १९३८)**१८०४:मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) - थायलंडचा राजा (मृत्यू:१आक्टोबर १८६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:शांताराम काशिनाथ राऊत-- कल्पक बोधचिन्ह करण्यासाठी प्रसिद्ध* *२००२:गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये --संतकाव्याचे व भाषाशास्त्राचे अभ्यासक(जन्म:११ डिसेंबर १९०९)**१९९९:मंगेश भगवंत पदकी--कवी, कथाकार (जन्म:२७ मार्च १९२३)**१९९४:शंकर पाटील -- मराठी कथाकार.(जन्म:८ऑगस्ट१९२६)**१९९३:मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत.त्यांनी फाळके यांच्या 'कालियामर्दन’ या मूकपटात काम केले होते.* *१९८७:वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते.कार्ल मार्क्सच्या ’दास कापिटाल’ या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता.(जन्म:२०मे १९१३)**१९८३:विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (जन्म:२६ सप्टेंबर १९३१)**१९५१:हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार,गायिका,संगीतकार (जन्म:२२ नोव्हेंबर १८८५)**१९३१:थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (जन्म:११ फेब्रुवारी १८४७)**१९०९:लालमोहन घोष –देशभक्त,काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष,भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला.(जन्म:१७ डिसेंबर १८४९)**१८७१:चार्ल्स बॅबेज –इंग्लिश गणितज्ञ, संशोधक,अभियंता आणि तत्त्वज्ञ,पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (जन्म:२६ डिसेंबर १७९१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*.... कोल्हापूरची अंबाबाई ....महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिक्षक भरतीसाठी 30 हजार रिक्त पदांची जाहिरात लवकरच; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना निर्वाणीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी; 200 कोटींच्या ड्रग्जची युरोप, ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *100 युनिट वीज फ्री, महिलांना दरमहा 1500 रुपये, 500 रुपयांमध्ये सिलेंडर; मध्यप्रदेशात काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी, पर्यटकांमध्ये आनंदांचं वातावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - दक्षिण आफ्रिका व नेदरलँड सामन्यात नेदरलँडचा 38 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोलकाता ....कोलकातामध्ये, नवरात्री दुर्गा पूजा म्हणून पाळली जाते, जो दहा दिवसांचा उत्सव आहे. कोलकातामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, संपूर्ण शहरात, भव्य पँडल, सर्वत्र दुर्गा देवतेची कलात्मक शिल्पे प्रदर्शित केली जातात. बंगाली संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. नवरात्रीच्या काळात कोलकात्याला भेट द्यायलाच हवी आणि सणाची सत्यता पाहण्याची संधी मिळते. सणासुदीसाठी तुम्ही कोलकातामध्ये असताना चुकवू नये असे काही रोमांचक कार्यक्रम:घूमर दांडिया उत्सव , जलसा-अंतिम दांडियाउत्सव, जश्न-ए-दांडिया, टाळ दांडिया*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जुलै २०२३ मध्ये वैदिक संकल्पनेवर आधारित उद्यान कोठे उभारण्यात आले आहे ?२) भारतात दरवर्षी एका बॅचमध्ये किती IAS अधिकाऱ्यांची निवड करण्यात येते ?३) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ च्या पदकतालिकेत भारताने कितवे स्थान पटकावले ?४) लोकायुक्तची नेमणूक कोण करतो ?५) भारतातील सर्वात पहिले भूअंतर्गत ट्रान्सफॉर्मर कुठे निर्माण करण्यात आले ? *उत्तरे :-* १) वाराणसी, उत्तरप्रदेश २) १८० ३) चौथे ४) राज्यपाल ५) बंगळुरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विकास जाकापूरे, शिक्षक, धर्माबाद👤 शुभम पतंगे👤 श्रेणीक रणभीरकर, धर्माबाद👤 शशिकांत संगम, शिक्षक, धर्माबाद👤 गणेश कावळे👤 विक्की टेकाळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥क्रियेवीण वाचाळता ते निवारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः विषयी काहीच न सांगता दुसऱ्यांच्या विषयी वारंवार कोणी आपल्याला नको त्या शब्दात बोलून सांगत असतील तर त्यावर कधीही डोळे झाकून विश्वास करू नये. कारण आज दुसऱ्या विषयी सांगायला ते कशाचाही विचार करत नाही कदाचित आपल्या विषयीही सांगायला ते एकही संधी सोडणार नाही. म्हणून ऐकताना आपल्या कानाला एवढेही गुलाम बनवू नये की, आयुष्यभर त्याचीच सवय लागून जगण्याची वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••... सकारात्मक दृष्टिकोन ... गरीब आदमी बड़ी मेहनत से एक-एक रूपया जोड़ कर मकान बनवाता है। उस मकान को बनवाने के लिए वह पिछले २० वर्षों से एक-एक पैसा बचत करता है, ताकि उसका परिवार छोटे से झोपड़े से निकलकर पक्के मकान में सुखी से रह सके।आखिरकार एक दिन मकान बन कर तैयार हो जाता है। तत्पश्चात पंडित से पूछ कर गृह प्रवेश के लिए शुभ तिथि निश्चित की जाती है लेकिन गृहप्रवेश के २ दिन पहले ही भूकंप आता है, और उसका मकान पूरी तरह ध्वस्त हो जाता है।यह खबर जब उस आदमी को पता चलती है तो वह दौड़ा दौड़ा बाजार जाता है और मिठाई खरीद कर ले आता है। मिठाई लेकर वह घटनास्थल पर पहुंचता है, जहां पर काफी लोग इकट्ठे होकर उसके मकान गिरने पर अफसोस जाहिर कर रहे थे।ओह! बेचारे के साथ बहुत बुरा हुआ, कितनी मुश्किल से एक – एक पैसा जोड़कर मकान बनवाया था। इसी प्रकार लोग आपस में तरह तरह की बातें कर रहे थे।वह आदमी वहाँ पहुंचता है और झोले से मिठाई निकाल कर सबको बाँटने लगता है। यह देखकर सभी लोग हैरान हो जाते हैं। तभी उसका एक मित्र उससे कहता है, कहीं तुम पागल तो नहीं हो गए हो, घर गिर गया, तुम्हारी जीवन भर की कमाई बर्बाद हो गई और तुम खुश होकर मिठाई बांट रहे हो।वह आदमी मुस्कुराते हुए कहता है, _तुम इस घटना का सिर्फ नकारात्मक पक्ष देख रहे हो इसलिए इसका सकारात्मक पक्ष तुम्हें दिखाई नहीं दे रहा है। ये तो बहुत अच्छा हुआ कि मकान आज ही गिर गया वरना तुम्हीं सोचो अगर यह मकान २ दिनों के बाद गिरता तो मैं मेरी पत्नी और बच्चे सभी मारे जा सकते थे, तब कितना बड़ा नुकसान होता।नकारात्मक दृष्टिकोण को त्याग दीजिये,अपने घर मे बच्चों तथा बुजुर्गो को कहिये- _”आप स्वस्थ रहिये, खुश हम आपको रख लेंगे”।•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment