✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑक्टोबर 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर**१९९२:अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.**१९८९:जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.**१९८७:भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.**१९५१:डॉ.शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.**१९४५:फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.**१९४३:सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना**१९३४:जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.**१८५४:फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:शुभांगी सुनील सरोदे-- कवयित्री* *१९७४:राजेंद्र प्रल्हाद दिघे -- कवी,लेखक**१९६८:प्रतिभा जगदाळे--कवयित्री,लेखिका**१९६०:डॉ.रत्नाकर देवरावजी भेलकर-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५५:बाबू फिलिप डिसोझा ( कुमठेकर)-- प्रसिद्ध कवी* *१९५३:प्रा.डॉ.दाणा सदाशिव गजघाटे -- लेखिका**१९५२:डॉ.विश्वेश्वर भालचंद्र सावदेकर -- ज्येष्ठ लेखक,संपादक* *१९४९:बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान**१९४६:मच्छिंद्रनाथ तुकाराम वाटेकर-- कवी, कादंबरीकार,कथाकार* *१९४४:कुलभूषण खरबंदा--हिंदी आणि पंजाबी चित्रपटांतून भूमिका करणारे अभिनेते**१९४०:एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू**१९३९:माधव वझे-- आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट**१९३१:शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू:१४ ऑगस्ट २०११)**१९२३:श्री वामनराव पै-- महान समाजसुधारक,तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक (मृत्यू:२९मे २०१२)**१९२०:धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म,संस्कृती,तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले.(मृत्यू:२३ एप्रिल २००१)**१९१७:राम फाटक – गायक व संगीतकार (मृत्यू:२६ सप्टेंबर २००२)**१८३३:अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू:१० डिसेंबर १८९६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म:२७ सप्टेंबर १९३२)**१९९५:लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म:९ एप्रिल १९२५)**१९८२:नरेंद्र बेदी-- बॉलीवूड दिग्दर्शक आणि लेखक(जन्म:१९३७)**१९८१:दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म:३१ जानेवारी १८९६ )**१९३९:दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी-- मराठी कवी(जन्म:१६ सप्टेंबर,१८८७)**१८३५:मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म:२४ मार्च १७७५)**१४२२:चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म:१६ सप्टेंबर १३८०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*.... ज्ञानदेवी माता सरस्वती ....बासर हे ठिकाण तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील नांदेड - धर्माबाद रस्त्यावर धर्माबादपासून १५ km नांदेडपासून १०२ km अंतरावर आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले बासर हे गाव सरस्वती देवीचे जन्मस्थान समजले जाते. नवरात्रीच्या दिवसांत येथे तेलंगणा, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक दर्शनासाठी जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी याठिकाणी अक्षराभ्यास करण्यासाठी खूप गर्दी होते. श्री सरस्वतींची मंदिरे भारतात तीनच ठिकाणी आढळून येतात. काश्मिरातील श्री वैष्णोदेवी, दुसरे शृंगेरी येथील शारदादेवी व तिसरे बासर येथील श्री ज्ञान सरस्वतींचे मंदिर आहे . श्री सरस्वतीचे एक रूप शृंगेरी येथील शारदापीठात गुप्तरूपाने वास करते म्हणून त्यालाच अर्धे पीठ म्हटले जाते.महर्षी व्यासांनी याच क्षेत्री गोदावरीच्या काठी पाच हजार वर्षांपूर्वी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना महासरस्वती प्रसन्न झाली, त्यामुळे ते ' महाभारता' सारखा अजोड ग्रंथ लिहू शकले. आचार्य परंपरेत त्यांचं स्थान सर्वोच्च आहे.ज्या परिसरात महर्षी व्यासांना श्री महासरस्वती प्रसन्न झाली त्याच परिसरात त्यांनी वाळूपासून श्री सरस्वतीची मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली. संपूर्ण भरत खंडात हे एकमेव श्री महासरस्वतीचं मंदिर आहे. त्यामुळे देशभरातून लक्षावधी भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात. अनेकजण अनुष्ठानं करतात. श्री महासरस्वतीचं मंदिर हेमाडपंती असून देवीची मूर्ती जवळपास तीन फूट आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा सभामंडप फार मोठा नाही. अर्ध्या भागात देवघर, गाभारा तर अर्ध्या भागावर सभामंडप आहे. देवीच्या पवित्र पादुका देवीपासून थोड्या अंतरावर असून याच पादुकांवर मंदिराचं शिखर आहे. दिवसातून दोन वेळा मंत्रघोषात देवीची महापूजा होते.नवरात्र महोत्सवात हा परिसर माणसांनी फुललेला असतो, देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण नुसतं आनंदानं ओसंडत असतं, धूप-दीप गंधांनी मन प्रसन्न होतं, शेकडो भक्त घरी बसलेले असतात दसर्याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून गावभर मिरवणूक निघते, सारे रस्ते झाडून सडा शिंपडून सुंदर रांगोळ्यांनी रेखाटलेले असतात. तर माय माऊली दारासमोर जरीकाठी नेसून हातात पंचारती घेऊन मोठा प्रसन्न मनानं उभ्या असतात. औक्षण अन् फुलं उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. गावभर नुसता आनंदोत्सव असतो.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आमदार अपात्रतेसंदर्भात पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला, शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यास 25 ऑक्टोबरपर्यंतची वेळ, 34 याचिका 6 गटात विभागल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'अमर रहे' च्या घोषणात सुनील कावळेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार, उपस्थितांना अश्रू अनावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सुषमा अंधारेंना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली, शंभूराज देसाईंचा आक्रमक पवित्रा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई ! मेगा प्लान तयार, ना सिग्नल ना चौक, आधुनिक रस्त्यांसाठी 12 हजार कोटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्व बहालीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने लाखाचा दंड ठोठावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - अहमदाबाद येथे खेळलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 62 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माँ वैष्णोदेवी .......वैष्णोदेवी (उत्तरेकडील प्रचलित नाव म्हणजे मातारानी. हिंदू धर्मामधील दुर्गा ह्या देवीचा एक अवतार समजला जातो. भारताच्या हिमालय पर्वतरांगेमध्ये स्थित असलेले वैष्णोदेवी मंदिर हिंदू धर्मामधील एक लोकप्रिय मंदिर आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकूट पर्वतरांगेमधील ह्या मंदिराला दरवर्षी १ कोटी भाविक भेट देतात.वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी कटरा ह्या गावापासून १२ किमी अंतराचा घाट पायी चढावा लागतो. कटरा गाव जम्मूपासून ४५ किमी अंतरावर असून ते काश्मीर रेल्वेमार्गाद्वारे जम्मू तावीसोबत जोडले गेले आहे.वैष्णोदेवीची यात्रा वर्षभर सुरु असते, परंतु उन्हाळ्यात मे ते जून आणि नवरात्रीच्या काळात येथे जास्तीत जास्त भाविक दर्शनासाठी पोहोचतात.माता वैष्णो देवी मंदिर हे देशातील पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार, वैष्णो मातेचा जन्म दक्षिण भारतातील रत्नाकर येथे झाला. आईच्या जन्मापूर्वी तिचे पालक निपुत्रिक होते. असे म्हणतात की, जन्माच्या एक रात्री आईने मुलगी जे काही मागेल तिच्या इ्छेविरुद्ध तुम्ही जाणार नाही, अशी शपथ घेतली होती. लहानपणी आईचे नाव त्रिकुटा होते. त्यांचा जन्म भगवान विष्णूच्या वंशात झाला, त्यामुळे त्यांचे नाव वैष्णवी पडले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पक्षी अभ्यासक डॉ. राजू कसंबे यांनी कोणत्या पक्ष्यावर संशोधन करून पीएचडी मिळविली ?२) हॉर्नबील पक्ष्याच्या ( धनेश ) जगात एकूण किती प्रजाती आहेत ?३) आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणी केला ?४) कोणत्या वर्षी लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत टी-२० क्रिकेटचा समावेश होणार आहे ?५) भारतातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक व्हावे असा ठराव पुणे महापालिकेने कोणत्या वर्षी मंजूर केला ? *उत्तरे :-* १) ग्रे हॉर्नबील २) ६२ प्रजाती ३) विराट कोहली, भारत ४) सन २०२८ ५) सन २००६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाबू फिलिप डिसूझा, साहित्यिक, निगडी, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हिताकारणे बोलणे सत्य आहे। हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥ हितकारणे बंड पाखांड वारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सांगणारे बरेचजण चांगलेही सांगत असतात आणि वाईटही सांगत असतात. त्या प्रत्येकांचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे व काळजीपूर्वक लक्ष द्यावे. कारण त्यावेळी कानही आपलेच असतात, आपले मन आपल्यापाशी असते आणि मेंदू सुद्धा आपलाच असतो. त्या सांगणाऱ्याकडून काय घ्यायचे, काय नाही, काय पेरायचे काय नाही तेही आपणच ठरवावे. ती कला आपल्याला जमली तर आपल्यासाठी तसेच इतरांसाठी सुद्धा भल्याचेच आहे आणि तेही आपल्यावरतीच अवलंबून आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📗वक्ता आणि श्रोते📗**एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्स इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्याने कशी काय नदी पार केली. त्या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्त्याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात ताकत होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्याचे कारण काय. यावर वक्ता म्हणाला,'' ज्या मूर्खाना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल'' वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.**तात्पर्य :- काहीवेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तीप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment