✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७०:फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४६:फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.**१९४४:दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.**१९२३:मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.**१८८४:लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:कादंबरी कदम-देसाई-- भारतीय अभिनेत्री**१९७२:डॉ.योगेश देविदास वानखेडे -- लेखक,कवी* *१९६६:शरद पोंक्षे--- मराठी चित्रपट,नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते**१९६५:मोहन बा.देशपांडे-- कथा लेखक* *१९६४:प्रा.भुजंग दत्तराव वाडीकर -- लेखक, संपादक* *१९५७:ज्ञानेश्वर जानबाजी वांढरे -- कवी, लेखक* *१९५५:प्रा.डॉ मधुकर गणेश मोकाशी -- लेखक,समीक्षक* *१९४८:नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक (मृत्यू:१६ ऑगस्ट १९९७)**१९४५:लक्ष्मण बाळकृष्ण लोंढे-- मराठीतले विज्ञानकथा लेखक(मृत्यू:६ ऑगस्ट,२०१५)**१९४२:अनुपमा अरविंद क्षीरसागर-- लेखिका,संशोधक* *१९४२:विमल वाणी म्हसावद-- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री* *१९४१:जॉन स्नो – इंग्लिश क्रिकेटपटू**१९३८:राम देशपांडे-- यांना चालता बोलता ज्ञानकोश असे म्हटले जाते.त्यांच्याकडे साहित्यिकांची,मान्यवर व्यक्तींची हस्ताक्षरे, हस्तलिखिते;तसेच,मान्यवर व्यक्तींच्या आवाजांचा,विविध विषयांवरील ग्रंथ- तसेच, त्यांवरील कात्रणे,जुनी मासिके-पुस्तके यांचा संग्रह आहे**१९३२:हरी अनंत फडके --संशोधक, अभ्यासक (मृत्यू:३ फेब्रुवारी २००७)**१९२५:मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (मृत्यू:८ एप्रिल २०१३)**१९११:अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी'– चित्रपट अभिनेते,पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९) (मृत्यू:१० डिसेंबर २००१)**१८८२:दत्तात्रेय चिंतामण मुजुमदार-- व्यायामकोशकर्ते(मृत्यू:२२ ऑगस्ट १९६४)**१८७७:भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित,त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते,(मृत्यू:६ मे १९४६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:मनोहर म्हैसाळकर- विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि कुशल संघटक, व्यवस्थापक(जन्म:१ऑगस्ट १९३२)**२०१७:डॉ.लिला गणेश दीक्षित-- बालसाहित्यिक,कवयित्री (जन्म:४ फेब्रुवारी १९३५)* *२००१:डॉ.जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ,नामवंत शल्यचिकित्सक,पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष,पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक,**१९९५:डॉ.रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक (जन्म:१ मे १९१५)**१९८७:आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक,संगीतकार,गीतकार, निर्माता,दिग्दर्शक,आभिनेता व पटकथालेखक(जन्म:४ ऑगस्ट १९२९)**१९६८:वसंत प्रभू-- मराठी चित्रपटातील संगीतकार(जन्म:१९ जानेवारी १९२४)**१९४५:मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक(जन्म:१३ सप्टेंबर १८५७)**१९११:मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या,भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, (जन्म:२८ आक्टोबर १८६७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला* .... झुम्पा लाहिरी ....लेखिका झुम्पा लाहिरी या मूळच्या पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. त्यांचा जन्म ११ जुलै १९६७ मध्ये झाला. `अनअकस्टम्ड` हे त्यांचं गाजलं पुस्तक. त्यांची कांदबरी `नेम सेक` खूप गाजली. या कादंबरीवर त्याच नावाने चित्रपटही साकारण्यात आला होता. अमेरिकी पुलित्झर पुरस्कार विजेत्या झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलं होतं.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *GST प्राधिकरणाकडून LIC वर कारवाई; तब्बल 36,844 रुपयांचा ठोठावला दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यपदार्थांच्या किमतीत घट, किरकोळ महागाई दर घसरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 2100 लोकांनी गमावला जीव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रिझर्व्ह बँकेचा Paytm पेमेंट बँकेला सर्वात मोठा झटका, KYC उल्लंघन केल्याने कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार, गृह खात्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? सह्याद्रीवरील भेटीत राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 134 धावानी हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या आरोग्यासाठी टिप्स*६. आहारामध्ये दही, दूध, दाळ. हिरव्या भाज्या यांचा उपयोग करा. वेगवेगळे पदार्थ ताटात असू द्या. ७. जेवन बनवण्यासाठी सोयाबिन, सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा. रात्रीचं जेवन हलकं आणि ८ वाजेच्या आत झालं तर उत्तम. ८. झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.९. मेडिशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी याला ३० मिनिटं द्या.१०. वयाच्या ४० वर्षानंतर नियमित चेकअप करा. औषध दिली असतील तर नियमित घ्या. त्यामध्ये अडथळा येऊ देणं टाळा. मनोरंजनाच्या गोष्टी करा.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण आहे. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आतापर्यंत झालेल्या १२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दोनदा सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणी केला ?२) महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून सुरू करण्यात आली ?३) स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा कोणी केला होता ?४) जगातील सर्वाधिक हळद उत्पादन करणारा ( २०२२-२३ ) देश कोणता ?५) D. N. A. चे विस्तारित रूप काय ? *उत्तरे :-* १) सचिन तेंडूलकर, भारत ( १९९६ मध्ये ५२३ धावा व २००३ मध्ये ६७३ धावा ) २) सन १९६२ ३) ग. वा. जोशी ४) भारत ( ७५ % उत्पादन भारतात ) ५) Deoxyribose Nucleic Acid*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागोराव कमलाकर, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 नरेश पत्राळे👤 अजय त्रिभुवन, साहित्यिक, औरंगाबाद👤 योगेश चंबोले, धर्माबाद👤 किशोर येमेवार, धर्माबाद👤 शैलेश शाह, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी।देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी॥परद्रव्य आणीक कांता परावी।यदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥१०३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट व संघर्ष करून सुद्धा ज्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात ते दुसऱ्यांदा कोणाच्याही मागे धावण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही. कारण हे सर्व करण्या आधी ते,स्वतः मध्येच सर्व काही शोधून बघितलेले असतात. म्हणून इतर गोष्टींविषयी त्यांना आकर्षन नसते. आपणही आधी स्वतः मध्ये शोधून बघण्याचा प्रयत्न करून बघावे इकडे, तिकडे शोधण्याची किंवा कोणाच्याही मागे धावण्याची आवश्यकता पडणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ●○ .. विजय असो .. ○●एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्न करायचे यावरून त्या दोघांत खूप भांडणे झाली व त्याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले. मारामारीत दोघांचेही अंग रक्तबंबाळ झाले, त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले. भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडीकडे बघून ''मी जिंकलो, मी जिंकलो'' असे ओरडू लागला, स्वत:चाच जयघोष करू लागला. तेवढ्या वरून एक गरूड आला व त्याने त्या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला,''मी जर बाहेर राहिलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.''तात्पर्य - ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्ट आहे.https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment