✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक शिक्षक दिन _* *_ या वर्षातील २७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर**१९९५:कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर**१९८९:मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.**१९६२:’डॉ.नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.**१९५५:पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.**१९१०:पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.**१८६४:एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:लक्ष्मण मुरलीधर खोब्रागडे-- कवी लेखक* *१९७५:केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री**१९७१:अर्जुमनबानो सु.शेख -- कवयित्री* *१९६९:संजीव अभ्यंकर-- लोकप्रिय हिंदुस्तानी गायक**१९६८:प्रा.डॉ.सुरेश दयाराम खोब्रागडे-- कवी, लेखक,संपादन* *१९६७:सुनील मारोतराव लव्हाळे-- कवी, पत्रलेखक**१९६२:लक्ष्मीकांत रांजणे -- कवी लेखक* *१९६०:डॉ.राजीव उन्हाळे -- लेखक* *१९५८:रामदास घुंगटकर-- कवी/गझलकार**१९५८:डॉ.करुणा गोखले-- अनुवादक**१९५६:सुहास रघुनाथ पंडित-- कवी,लेखक**१९५४:डॉ.अशा सतीश लांजेवार-- लेखिका**१९३५:प्रा.डॉ.श्रीधर कृष्ण शनवारे-- विदर्भातील मराठी कवी(मृत्यू:२७ ऑक्टोबर २०१३)**१९३२:माधव आपटे – क्रिकेटपटू**१९३१:राजाराम शिंदे-- पत्रकार,नाट्यलेखक, नाट्यअभिनेते,नाट्यनिर्माते,दिग्दर्शक, नेपथ्यकार,वक्ते**१९२४:जगत मुरारी-- प्रतिष्ठित भारतीय माहितीपट निर्माते,दिग्दर्शक(मृत्यू:१३ एप्रिल २००७)**१९२३:कैलाशपती मिश्रा – गुजरातचे माजी राज्यपाल (मृत्यू:३ नोव्हेंबर २०१२)**१९२३:विजया साने-- लेखिका, बालसाहित्यिक (मृत्यू:२९ ऑगस्ट २०००)* *१९२२:शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार(मृत्यू:२६ एप्रिल १९८७)**१९२२:यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक,लेखक,चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक (मृत्यू:१० मे १९९८)**१८९०:किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते 'हरिजन’चे संपादक होते.(मृत्यू:९ सप्टेंबर १९५२)* *१८८४:हरी रामचंद्र दिवेकर -- वेदविद्याभ्यासक,संशोधक (मृत्यू:१५ आगस्ट १९७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:यशवंत बाळकृष्ण जोशी--ग्वाल्हेर घराण्याचे गायक (जन्म:१२ सप्टेंबर १९२७)**२०११:स्टीव्ह जॉब्ज – अॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (जन्म:२४ फेब्रुवारी १९५५)**१९९७:चित्त बसू –संसदपटू,'फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस(जन्म:२५ डिसेंबर १९२६)**१९९२:बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त,नॉर्वे,ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत(जन्म:११ सप्टेंबर १९१२)**१९९१:रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक,स्वातंत्र्य चळवळीतील नेते (जन्म:३ एप्रिल १९०४)**१९९०:राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३)(जन्म:१५ सप्टेंबर १९०५)**१९८३:अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (जन्म:२८ जुलै १९०७)**१९८१:भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार,एकांकिकाकार,पटकथाकार व नाटककार,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक(जन्म:३० ऑगस्ट १९०३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ..अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या-वाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.पुढील भागात - मदर तेरेसासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चंद्रकांतदादांऐवजी अजितदादा पुण्याचे पालकमंत्री,*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, 6 ऑक्टोबरऐवजी 9 ऑक्टोबरला सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्था, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महागाईचा भार होणार हलका ! उज्ज्वला योजनेत आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यंदाच्या वर्षीचा रसायनशास्त्रातील माँगी जी. बॉएंडी, लुईस ई. ब्रुस आणि अॅलेक्सी आय. एकिमोव्ह यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा याने कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आजपासून विश्वचषकाला सुरुवात, गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सलामीचा सामना विश्वचषकाला सुरुवात, गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सलामीचा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा... तुमचं आयुष्य बदलू शकते."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते ?२) पुण्यश्लोक अहिल्याबाईचे नाव कोणत्या विद्यापीठास देण्यात आले आहे ?३) जॉन रस्किनच्या कोणत्या पुस्तकाचा महात्मा गांधींवर प्रभाव पडला ?४) मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करते ?५) सर्वाधिक ६ वेळा कोणत्या देशातील तरुणींनी 'मिस वर्ल्ड'चा मुकुट मिळवला आहे ? *उत्तरे :-* १) युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, अमेरिका २) सोलापूर विद्यापीठ ३) अन टू धीस लास्ट ४) राज्यपाल ५) भारत, व्हेनेझुएला*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुभाष लोखंडे, पांगरी👤 श्रद्धानंद यरमलवाड, धर्माबाद👤 बालाजी घोणशेट्टे👤 किशन पचलिंग👤 काशिनाथ साखरे👤 बोडेला योगेश यादव👤 प्रदीप सोमोसे👤 अमोल सिंगनवाड👤 साईनाथ पवार👤 आकाश जाधव👤 दीपक रामराव कुलकर्णी👤 रविकांत डोळे👤 विशाल फाळके👤 पाशा शेख👤 दीपक पाटील बेळकोणीकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥शुकाकारणे कुंटणी राम वाणी।मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🎯 ‼ *विचारवेध*‼✍🏻🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात काही माणसांचा असा एक गोड गैरसमज आहे की,चांगला माणूस रुपाने चांगला असला म्हणजे चांगला आहे,त्याच्या अंगावर भारी वस्त्र घातले आहे म्हणजे चांगला आहे,धनसंपत्तीने श्रीमंत आहे म्हणून चांगला आहे.परंतु हे कधीच शक्य नाही .चांगला माणूस होण्यासाठी त्याच्या अंगी पुढील काही गोष्टी असायला हव्यात.खरा माणूस होण्यासाठी त्याच्याजवळ काही गोष्टी मुळातच असायला हव्यात.जो माणूस इतरांना चांगली वागणूक देतो, इतरांचे सुखदुःख जाणून त्यांच्यासाठी धावून जातो, इतरांना आपले समजून प्रमाणिकपणाची वागणूक देतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतरांच्या विचारांचा आदर करुन चांगल्या विचारांची देवाणघेवाण करुन माणुसकीचे नाते अधिक चांगले दृढ करतो आणि माणसाला माणूस जोडून माणुसकीचे नाते घट्ट करतो तोच माणूस चांगला असतो.अशाच माणसाला समाज चांगला माणूस म्हणून स्वीकारतो हा खरा शुध्द समज आहे .अशीच माणसे इतरांच्या गळ्यातील ताईत बनतात.- व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद :- 9421839590🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••● सुभेदार व त्याचा घोडा ●एका सुभेदाराचा घोडा खुप देखणा व चपळ होता पण त्यापेक्षा कमी प्रतीचा एक घोडा त्याने विकत घेतला व त्याचे लाड करण्यात व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात तो बराच वेळ घालवू लागला. एकदा तो घोडा पहिल्या घोड्याला म्हणाला, 'दादा, तू इतका सुंदर व चपळ असताना तुझ्याकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात इतका आनंद वाटतो, याचे कारण काय ? पहिला घोडा म्हणाला, 'कोणतीही वस्तू नवी असली म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व थोडी जुनी झाली की तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे. आजकाल मालक तुझे लाड करतो पण थोड्याच दिवसांत तूही त्याला आवडणार नाहीस व तुझ्याजागी नवा घोडा येईल याबद्दल खात्री असू दे'!तात्पर्य :- नव्याचे नऊ दिवस !सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment