✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.**१९९९:दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे.एम.कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्यांदा मिळाले.**१९९४:ए.एम.अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६२:युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५१:स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:प्रणिता सुभाष-- भारतीय अभिनेत्री**१९६०:माधव गरड-- ज्येष्ठ कवी ललित लेखक (मृत्यू:१२ ऑगस्ट२०२२)**१९५४:अजित वसंत राऊळ-- कवी**१९५४:अरुण म्हात्रे-- मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी,गीतकार आणि निवेदक**१९५०:अरुण हरिभाऊ पुराणिक-- ज्येष्ठ सिने पत्रकार**१९४८:अनंत नरहर जोशी -- लेखक* *१९४५:अपर्णा सेन – अभिनेत्री,चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका**१९४२:सूर्यकांत गरुड -- कवी* *१९३८:आदिनाथ कल्लापा कुरुंदवाडे-- ग्रामीण कथाकार* *१९३८:मृदुला गर्ग-- हिंदी लेखिका* *१९३७:डॉ.अशोक रानडे – संगीत समीक्षक (मृत्यू:३० जुलै २०११)**१९२६:डॉ.केशव रंगनाथ शिरवाडकर --साहित्यसमीक्षक,मराठीत वैचारिक लेखन करणारे लेखक(मृत्यू:२५ मार्च २०१८)* *१९२२:पांडुरंग नारायण कुळकर्णी -- प्राचीन मराठी वाड्:मयाचे संशोधक**१८८१:पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू:८ एप्रिल १९७३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:प्रा.डॉ.रुस्तुम अचलखांब-- मराठी लेखक व नाटककार(जन्म:१९४४)* *२०१२:जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म:३ मार्च १९५५)**२००९:कान्होपात्रा किणीकर-- विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री (जन्म:२ ऑक्टोबर१९३४)**२००९:चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म:१४ जानेवारी १९२३)**२००३:पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.(जन्म:१९ऑक्टोबर १९२०)**१९९९:सदाशिव अंबादास डांगे -- संशोधक,कोशकार,लेखक(जन्म:२३ ऑगस्ट १९२२)**१९८०:अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – प्रसिद्ध शायर व गीतकार (जन्म:८ मार्च १९२१)**१९५५:पं.दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, (जन्म:२८ मे १९२१)**१६४७:इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म:१५ आक्टोबर १६०८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संताची माहिती*..... संत ज्ञानेश्वर .....संत ज्ञानेश्वर हे भारतीय संत आणि प्रसिद्ध मराठी कवी होते ज्यांचा जन्म १२७५ मध्ये भाद्रपदाच्या कृष्ण अष्टमीला आपेगाव पैठण येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की "आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे." शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारत-चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन, जवानांसोबत विजयादशमी साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दसरा आणि दिवाळीनिमित्त, रेल्वे बोर्डानं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय, निलेश राणे यांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुमध्ये जमिनीवर कोसळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका व बांगलादेश सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 149 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फिरकीचा जादूगार हरपला* भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सर्वोत्तम डावखुरे फिरकी गोलंदाज अशी ज्यांची ओळख आहे ते भारताचे माजी कर्णधार, फिरकीचे जादूगार बिशनसिंग बेदी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम फिरकी गोलंदाज हरपला आहे. २५ सप्टेंबर १९४६ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेले बिशन सिंग बेदी यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. वयाच्या पंधराव्या वर्षीच बिशन सिंग बेदी यांनी पंजाबच्या रणजी संघात पदार्पण केले. १९६८ पासून ते दिल्ली संघाकडून रणजी स्पर्धेत खेळू लागले. १९७४ - ७५ च्या रणजी हंगामात त्यांनी ६४ विकेट्स घेण्याचा विक्रम केला. हा त्यावेळी एका हंगामात रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळींचा विक्रम होता. आपल्या फिरकीच्या बळावर त्यांनी दिल्लीला रणजी चषकही मिळवून दिला होता. भारतीय संघात निवड झाल्यावर त्यांनी आपल्या फिरकीच्या तालावर अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवले. १९७० च्या दशकात बेदी, प्रसन्ना, चंद्रा आणि वेंकट या भारताच्या सुप्रसिद्ध फिरकी चौकडीने क्रिकेटवर अक्षरशः राज्य केले. हा त्या काळातीलच नव्हे तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकी मारा समजला जातो. बिशनसिंग बेदी यांची डावखुरी गोलंदाजी खेळणे अनेकांना जड जायचे. ते चेंडूला भरपूर उंची द्यायचे. वेगातील बदल, टप्पा बाक ( लूप ) यांचा खुबीने वापर करून बेदी यांनी अनेक सामने गाजवले. त्यांनी ६७ कसोटीत २६६ विकेट्स घेतल्या. त्यांची सरासरीही २८.७१ इतकी चांगली होती. बिशन सिंग बेदी यांनी ६० षटकांच्या विश्वचषक सामन्यात सर्वोत्तम इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करण्याचा विक्रम केला. त्यांनी १२ षटकात ८ धावा देत केवळ ०.५० च्या इकॉनॉमी रेटने १ विकेट घेतली होती. काउंटी स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी केली. नोर्थम्पटनशायर संघाकडून खेळताना त्यांनी ३७० विकेट्स घेतल्या तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल १५६० विकेट्स घेतल्या. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर सुनील गावसकर यांच्या जागी त्यांची कर्णधारपदी निवड करण्यात आली. बिशनसिंग बेदी हे निडर आणि स्पषटवक्ते होते त्यामुळेच काहीवेळा ते वादातही सापडले. १९७५ - ७६ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात जमैका येथील कसोटीत त्यांनी दोन्ही वेळा भारताचा डाव लवकर घोषित केला, वेस्ट इंडिजच्या दहशतवादी गोलंदाजीचा निषेध म्हणून! एकदा न्युझीलंड दौऱ्यावर भारताचे प्रशिक्षक म्हणून गेले असता, आपल्या संघाच्या सुमार कामगिरीने वैतागले नि 'साऱ्या भारतीय संघाला हिंद महासागरात बुडवले पाहिजे ' असे बोलून गेले! त्यांच्या फिरकी गोलंदाजीप्रमाणेच बेदी यांचे रंगीबेरंगी फेटे ( पटके ) ही लक्षवेधी ठरायचे. आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम गोलंदाज ठरलेले बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे. फिरकीचे जादूगार बिशनसिंग बेदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!शब्दांकन :- श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस हे बुद्धविहार कोठे आहे ?२) ड्रॅगन पॅलेसला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?३) ड्रॅगन पॅलेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?४) प्रसिद्ध बुद्धविहार ड्रॅगन पॅलेसची स्थापना कोणी केली ?५) विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसचे बांधकाम कोणत्या शैलीत केले आहे ? *उत्तरे :-* १) कामठी, नागपूर २) लोटस टेम्पल ३) सन १९९९ ४) नोरिको ओगावा, जपान व सुलेखा कुंभारे, नागपूर ५) जपानी स्थापत्य शैली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास नक्का, लातूर👤 नितीन गुजराथी, धर्माबाद 👤 गोविंद येळगे, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 विजय वाठोरे सरसमकर👤 प्रथमेश मच्छरलावार👤 मारोती गुरलोड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटे वाद संवाद तेथें करावा। विविके अहंभाव हा पालटावा॥ जनीं बोलण्यासारिखे आचरावें। क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कसं वागल्याने काय होतं, विचार न करता बोलल्याने त्याचे परिणाम कशा प्रकारे भोगायला मिळतात, कोणाला धोका दिल्याने संकटाचा किती सामना करावा लागतो आणि बरंच काही या सर्वाविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती असताना सुद्धा आपण का म्हणून नको त्या रीतीने जगत असतो...? या विषयी एकदा तरी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. एक वेळचे इतरांचे उत्तर वेगवेगळे असू शकतात पण, आपले अंतर्मन कधीच चुकीचे उत्तर देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र*📗 राजा जनक राजा असूनही त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे. एकदा ते नदी काठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्याआवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंचआवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवात्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’*तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment