✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.**२००१:रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर**१९९५:’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर**१९९१:उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.**१९७१:मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.**१९७०:हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर**१९६९:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना**१९६२:चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.**१९५२:केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली.जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.**१९५०:कृ.भा.बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.**१९४७:अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१९०४:चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज**१९७७:प्रा.डॉ.अनमोल तुळशीराम शेंडे -- लेखक,संपादक**१९६३:नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व राजकारणी**१९६२:क्रांति माधव साडेकर उर्फ क्रांति, रूह-- मराठी कवयित्री व लेखिका**१९५८:डॉ.संजय प्रभाकर हर्षे-- कवी* *१९५४:अरुण खोरे-- वरिष्ठ पत्रकार,संपादक व लेखक**१९५३:किरण कुमार -- चित्रपट अभिनेता**१९५२:श्रीकांत नारायण कुलकर्णी-- ज्येष्ठ मुक्तपत्रकार,संपादक तथा प्रसिद्ध लेखक**१९५०:प्रा.विजय दत्तात्रय काचरे-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४७:अशोक नामदेव व्हटकर-- संशोधक, कथाकार,कादंबरीकार**१९४२:उद्धवराव पुंडलिकराव वाझुळकर -- कादंबरीकार,कवी**१९३९:निशिकांत माधव उर्फ नानासाहेब जोशी-- स्तंभलेखक संशोधक**१९३९:वसंत महादेवराव चिंचाळकर-- प्रसिद्ध लेखक(मृत्यू:२१ फेब्रुवारी २०२३)**१९३९:प्राचार्य सूर्यकांत वैद्य- प्रसिद्ध कवी लेखक* *१९२९:बाळकृष्ण केशव बन्नोरे -- मराठी, हिंदी,इंग्रजी,संस्कृत भाषेमध्ये काव्यलेखन (मृत्यू:२५ ऑगस्ट २०११)* *१९१६:मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’–लोकशाहीर (मृत्यू:२९ ऑगस्ट १९६९)**१९१५:सय्यद अमीन ---मराठी लेखक मुस्लिम विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन.. (मृत्यू:१७ डिसेंबर १९७३)**१९०५:स.के.नेऊरगावकर -- वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार,प्रवचनकार,संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक (मृत्यू:३१ मे १९७८ )**१८९३:जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२२ ऑगस्ट १९७८)**१८९१:सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:२४ जुलै १९७४)**१८५५:गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक,'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे.(मृत्यू:४ जानेवारी १९०७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (जन्म:७ जून १९४२)**२०१०:पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (जन्म:५ जानेवारी १९४८)**२००९:वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (जन्म:४ मे १९२९)**१९९९:माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार (जन्म:१९१५)**१९९६:दि.वि.तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार,युद्धशास्त्राचे अभ्यासक* *१९८४:पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:८ ऑगस्ट १९०२)**१९७४:कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’–प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार (जन्म:२० जानेवारी १८९८)**१९६८:जगन्नाथबुवा पुरोहित-- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक(जन्म:१२ मार्च१९०४)* *१९६४:हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१० ऑगस्ट १८७४)**१९६१:व्ही.एस.गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली.* *१८९०:सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी,संशोधक,मुत्सद्दी आणि गुप्तहेर (जन्म:१९ मार्च १८२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नवरात्र विशेष माहिती*कार्ल्याची श्री एकवीरा आईमहाराष्ट्रात देवींची साडेतीन पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी! लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही एक आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे.महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी! या लेण्यांत ऐश्वर्य असले, तरी डामडौल नाही. पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे.ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून, १६० ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहेत. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. १८६६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. या परिसरातील देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत:, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा आणि स्तवनाचा असतो. यात्राकाळात राज्याच्या विविध भागांतून कोळी बांधवांसह इतर भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक स्वतः न लढण्याचा शरद पवारांचा पुनरूच्चार, पक्ष बळकटीसाठी पवार देशाचा दौरा करणार, इंडिया आघाडीत समन्वयाची भूमिका पार पाडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्धाटन, राज्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये योजनेचा शुभारंभ.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत केली आत्महत्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नव्या संसदेनंतर आता नवीन विधानसभा आणि विधानपरिषद बांधण्याचा विचार सुरू; राहुल नार्वेकराचं मोठं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांना पुण्यातील एमआयटी कॉलेजने जाहीर केलेला पुरस्कार राजकीय दबावापोटी रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर - दूध उत्पादकांसाठी खुशखबर: गोकुळकडून १०१ कोटी बोनस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पुण्यात बांगलादेशचा सात विकेटने पराभव करीत टीम इंडियाचा विजयी चौकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाराणसी ....वाराणसीमध्ये नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, लोक गंगेच्या घाटांवर (नदीकडे जाणाऱ्या पायऱ्या) पारंपारिक दांडिया आणि गरबा नृत्य करतात. या वेळी शहरातील मंदिरे देखील सुंदरपणे सजविली जातात, ज्यामुळे उत्सवाच्या अध्यात्मिक पैलूचा अनुभव घेण्यासाठी हे एक परिपूर्ण गंतव्यस्थान बनते. वाराणसीतील नवरात्रीच्या खऱ्या उत्साहाचा आनंद घेण्यासाठी येथे काही पंडाल आहेत:हथुआ मार्केट पंडाल, सनातन धर्म पंडाल, शिवपूर पुर पंडाल, माचोदरी पंडाल, पांडेपूर पंडाल*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सांगली येथे होणाऱ्या ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचा मुख्य विषय काय आहे ?२) राष्ट्रीय एकात्मता दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) भारतातील मुलींची पहिली शाळा कोठे भरली ?४) २०२३ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या भारतीयाला जाहीर झाला आहे ?५) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक कोणी ठोकले ? *उत्तरे :-* १) पक्ष्यांची पिसे आणि पिसारा २) २० ऑक्टोबर ३) भिडेवाडा, पुणे ४) डॉ रवी कन्नन ५) एडियन माक्रम, दक्षिण आफ्रिका ( ४९ चेंडू )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड👤 राजेश्वर वावधाने, पदवीधर शिक्षक, मुखेड👤 लक्ष्मण आगलावे, शिक्षक, धर्माबाद👤 आनंद बलकेवाड, येवती👤 अतुल जाधव👤 इम्तियाज शेख👤 ओम धुळशेट्टे👤 दत्ता सूर्यवंशी👤 गजानन वडजे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।विवेके अहंभाव यातें जिणावें॥अहंतागुणे वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असलेली एखादी कला किंवा एखादा छंद मग ते कोणतेही असोत पूर्ण निष्ठेने, श्रध्देने, नि:स्वार्थपणे समर्पित होऊन सादर केल्याने व ती इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. हीच भावना आपल्यात ठेवून जर त्या कलेची किंवा छंदाची पूजा केल्याने ती अजरामर होऊन जाते. पण त्याच कलेचा किंवा छंदाचा दुरूपयोग केल्याने त्याचा व्यापार होऊन जातो. व्यापार किंवा व्यवसाय हा मालाचा केला जातो. कलेचा किंवा छंदाचा नाही म्हणून निसर्गाने दिलेल्या ह्या अनमोल देणगीला अपेक्षा ठेवून किंवा प्रसिद्धीच्या परड्यात कधीही तोलू नये त्यांना कायमस्वरुपी जपावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *मातेचा उपदेश*📗 *एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.**तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.*http://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment