✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्टीय एकता दिन_**_ या वर्षातील ३०४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या**१९८४:भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.**१९६६:दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना**१९४१:’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.**१९२०:नारायण मल्हार जोशी,लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली.लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.**१८८०:धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या 'संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१८७६:भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार**१८६४:नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:आनंद घोडके -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७७:प्रा.डॉ.मंदा माणिकराव नांदुरकर -- लेखिका* *१९७५:निलेश नामदेव मालवणकर -- लेखक**१९७४:दीपा परब--मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९७३:मंगेश शिवलाल बरई-- कवी* *१९५१:चंद्रकांत काळे -- रंगभूमीवरील गायक,अभिनेते,निर्माते**१९४६:रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू:११ ऑगस्ट १९९९)**१९३७:डाॅ.मुरलीधर बन्सीधर शहा-- गांधीवादी हिंदी-मराठी साहित्यिक(मृत्यू:९ ऑक्टोबर २०१७)**१९३०:शकुंतला फडणीस-- मराठी लेखिका आणि बालसाहित्यिक(मृत्यू:१६ एप्रिल २०२१)* *१९२६:कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर-- संस्कृतचे,संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक,व संशोधक(मृत्यू:३० जुलै २०१३)**१९२२:नॉरदॉम सिहानोक --कंबोडिया देशाचे पंतप्रधान (मृत्यू:१५ ऑक्टोबर २०१२)**१९१६:माधव प्रल्हाद काळे -- कवी**२९१३:लक्ष्मण रामचंद्र गोडबोले--लेखक**१८९५:सी.के.नायडू – क्रिकेटपटू (मृत्यू:१४ नोव्हेंबर १९६७)**_१८७५:सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी,स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री,भारताचे लोहपुरुष,भारतरत्न (मरणोत्तर - १९९१) (मृत्यू:१५ डिसेंबर १९५०)_**१८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म.(मृत्यू: ५ एप्रिल १९७५)**१३९१:एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (मृत्यू:९ सप्टेंबर १४३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:गिरिजा कीर-- मराठी भाषेतील लेखिका आणि कथाकथनकार(जन्म:५ फेब्रुवारी १९३३)**२००९:सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री.(जन्म: १९१९)**२००५:अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला.(जन्म:३१ ऑगस्ट १९१९)**१९८६:आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (जन्म:३ जून १८९२)**१९८४:शरच्चंद्र माधव मुक्तिबोध-- प्रसिद्ध मराठी कवी,कादंबरीकार आणि समीक्षक(जन्म:२१ जानेवारी १९२१)**_१९८४:भारताच्या ३ र्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली.(जन्म:१९ नोव्हेंबर १९१७)_**१९७५:सचिन देव बर्मन – प्रसिद्ध संगीतकार व गायक (जन्म:१ आक्टोबर १९०६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय एकता दिवस*आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय एकता दिन (National Unity Day)' साजरा केला जातो. अनेक भारतीय संस्थानांचे देशात विलीनीकरण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यामध्ये हैदराबादसह इतर संस्थानांचाही समावेश आहे.भारतासारख्या वैविध्यतेने परिपूर्ण अशा देशात, तेथील लोकांमधील एकता अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यावेळी अनेक संस्थानांचे तुकडे झाले होते, त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताच्या संकल्पनेचे समर्थन केले. त्यामुळे हा दिवस वल्लभभाई पटेल आणि इतर कार्यकर्त्यांनी देशाला जोडण्यासाठी केलेल्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. "विविधतेत एकता" च्या भावनेला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय अखंडता राखण्याला महत्त्व देणारा हा दिवस आहे.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने २०१४ मध्ये अधिकृतपणे 'राष्ट्रीय एकात्मता दिवसा'ची घोषणा केली. अखंड आणि सशक्त भारताचे कट्टर समर्थक असणार्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस त्यांचा वाढदिवसाचे अवचित्य साधून 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून भारत सरकारने जाहिर केला आहे. २०१८ मध्ये, सरदार वल्लभभाई पटेल (वल्लभभाई झावेरभाई पटेल) यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नर्मदा नदीजवळ स्थित भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन केले. "एक भारत, श्रेष्ठ भारत" ही पटेल यांची प्रसिद्ध घोषणा आजही राष्ट्राला प्रेरणा देते.आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीमकडून विनम्र अभिवादनसंकलन :- नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राजकीय पक्षांच्या देणग्यांची माहिती देणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाही; मोदी सरकारचे थेट सुप्रीम कोर्टात उत्तर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा झटका, दुसरं वेळापत्रकही फेटाळलं, आता 31 डिसेंबरची मुदत!*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जालना ते छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्ग आजपासून 02 नोव्हेंबर असे तीन दिवसांसाठी बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना पत्र लिहत त्यांचा पाठिंबा केला जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता पुणे रेल्वे स्थानकावर मिळणार पाच रुपयात लीटरभर पाणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गॅसवर 500 रु. अनुदान व बचत गटाचे कर्ज माफ करू छत्तीसगड निवडणुकीत प्रियंका गांधीचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पुण्यात खेळलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आचार्य नरेंद्र देव* नरेंद्र बलदेव देव यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सितापूर या गावी 30 ऑक्टोबर 1889 साली झाला. त्यांच्या वडिलांनचे नाव बलदेव प्रसाद व आईचे नाव जवाहर देवी होते. वडील वकील होते. नरेन्द्रचे प्राथमिक शिक्षण सितापूर या ठिकाणी झाले. ते बनारस ह्या ठिकाणी एल एल बी झाले. अलाहाबाद येथे शिक्षण घेत असताना देव यांना लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बीपीनचंद्र पाल, पंडित मदन मोहन मालवीय या सारख्या देश भक्तांची भाषणे ऐकावयास मिळाली. त्यामुळे त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली. लोकमान्य टिळकांनी भेट झाल्यावर टिळकांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी फैजाबाद ह्या ठिकाणी होमरुल लीग या पक्षाची शाखा सुरू केली.1921 साली जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून त्यांनी वकिली व्यवसाय सोडून काशी विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी धरली. तेथे ते विना वेतन काम करीत. मात्र पुढे वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे ते आवश्यक तेव्हढाच पगार घेऊ लागले. 1926 साली नरेंद्र देव त्या विद्यापीठाचे प्राचार्य झाले. तेंव्हापासून लोक त्यांना आचार्य म्हणून संबोधू लागले. 1930 व 1942 मध्ये स्वतंत्र चळवळीत भाग घेतल्या मुळे आचार्यांना कारावास भोगावा लागला. 1946 मध्ये ते उत्तर प्रदेश विधिमंडळ वर निवडून आले. पण मंत्रिपद न स्वीकारता ते जनसेवेत राहिले.1947 ते 1951 या काळात आचार्यांनी लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले. कुलगुरू पदावर असतांना त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात आमूलाग्र बदल केले. भारतात समाजवादी पक्षाचे स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. अश्या ह्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यागी पुरुषाचे 19 फेब्रुवारी 1956 मध्ये निधन झाले . आचार्य नरेंद्र देव यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बचत म्हणजे सन्मानाने जगण्याचा सोपा मार्ग*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केव्हा साजरी केली जाते ?२) राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?४) राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?५) जगातला सगळ्यात शांत, निवांत देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ? *उत्तरे :-* १) ३१ ऑक्टोबर २) ३१ ऑक्टोबर ३) हैदराबाद ४) राष्ट्रपती ५) आइसलँड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आप्पासाहेब सुरवसे, शिक्षक तथा स्तंभलेखक, उस्मानाबाद👤 नजमा शेख,क्रियाशील शिक्षक, बीड👤 आनंद घोडके, संयोजक, काव्यप्रेमी शिक्षक मंच👤 जागृती निखारे, जेष्ठ साहित्यिक, मुंबई👤 निलंजन यडपलवार, धर्माबाद👤 शीतल गांधी, बार्शी👤 सुनीता शिंदे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटे वाद संवाद त्याते म्हणावें। विवेके अहंभाव यातें जिणावें॥ अहंतागुणे वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या सोबतीला अवतीभोवती कितीही जण असले तरी प्रवास शेवटी एकट्यालाच करावा लागतो. म्हणून नको त्या, गोष्टींकडे लक्ष देऊ नये व जे, आपल्यासाठी योग्य आहे त्याकडेच काळजीपूर्वक लक्ष देऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. कारण जीवन हे अनमोल आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *गाणारा पोपट*📗*एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाहाने पोपटाकडून पुराणातील काही महत्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई. त्याच्या कडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे.* *एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता काम नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवून टाकेन ...समजलं ! ".* *सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीरभोवती लपेटून घेतले त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता. तरी पण पोपट बरा होत नव्हता बादशाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नव्हते. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पाहिली.* *सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण तरी एकदा पाहावं. बादशहा बिरबला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला पाहतो तर काय पोपट मरून पडलेला तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल तू तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे. नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला. सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून गाढायला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल. बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली पोपट मेला असं सांगायला आलास तर तुझं डोक उडवीन असं सेवकाजवळ बोलल्याच त्याला आठवलं बिरबलान युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment