✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08/04/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्व बंजारा दिवस* *अग्निशमन दिन*💥 ठळक घडामोडी● १९५० - भारत आणि पाकिस्तान यांच्यात लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षऱ्या● १९२१ - वर्धा येथे विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना केली💥जन्म● १९२४ - भारतीय शास्त्रीय गायक कुमार गंधर्व● १९२८ - प्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई● १९३८ - कोफी अन्नान, संयुक्त राष्ट्राचे सातवे प्रधान सचिव● १९७९ - भारतीय गायक अमित त्रिवेदी💥मृत्यू :-● १८५७ - क्रांतिकारक मंगल पांडे● १८९४ - बंकिमचंद्र चटोपाध्याय, बंगाली साहित्यिक● १९७३ - पाबलो पिकासो, स्पॅनिश चित्रकार● १९७४ - नानासाहेब फाटक, नटसम्राट● १९५३ - वालचंद हिराचंद दोशी, उद्योगपती● १९९९ - वसंत खानोलकर, कामगार नेते● २०१५ - जयकानधन, भारतीय पत्रकार व लेखक● २०१३ - मार्गारेट थँचर, ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, राजपात्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सीएनजी-पीएनजीचे दर कमी होणार! किरीट पारीख समितीच्या शिफारसी स्विकारल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अनुदान मिळवण्यासाठीच्या जाचक अटींमुळे कांदा उत्पादक अडचणीत, सरसकट अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छत्रपती संभाजीनगर दंगलीतील नुकसान आरोपींकडून वसूल करणार, एकूण दीड कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जेईई मेननंतर प्रवेशासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष का? मुंबई हायकोर्टाचा सवाल, आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सावध राहा, काळजी घ्या; देशात गेल्या 24 तासांत 6 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा; सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - लखनौचा हैद्राबादवर पाच विकेट राखून विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••मुलांच्या आरोग्यदायी सवयीमुलांनो, आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण काय केले पाहिजे ? याचा कधी आपण विचार केला आहे काय ? सहसा आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत काहीच काळजी घेत नाही. त्यामुळे भविष्यात आपणास अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. जसे की, आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यापासून होते. बरीच मुले सूर्यवंशी घराण्यातील असतात म्हणजे सूर्य उगल्यावर उशिरा उठतात. उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी ही सवय घातक आहे. जी मुले सकाळी लवकर उठून अभ्यास करतात भविष्यात ते उत्तम प्रकारे काम करू शकतात. सकाळी उठल्यानंतर पहिले काम असते स्वच्छ दात घासणे आणि चूळ भरणे. यामुळे आपल्या दातांची योग्य निगा राखल्या जातो. आपल्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी दात हे फार महत्वाचे आहेत. पण आपण त्यास कधी महत्व देत नाही. अनेक मुलाचे दात किडलेले दिसून येतात कारण लहानपणी ते खूप चॉकलेट खाल्लेले असतात. पालकांनी मुलांना शक्यतो चॉकलेट पासून दूर ठेवावे. तसेच रोज नियमित अंग घासून स्वच्छ स्नान करण्याची आपणास सवय असणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा आपण स्नान करताना साबण वापरत नाही आणि मारोतीला पाणी टाकल्यासारखे अंगावरून पाणी ओतून घेतो. यामुळे कालांतराने त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे जेवण. जेवण्याच्या बाबतीत आपल्या असंख्य तक्रारी असतात. जेवणात आवडीचे खाद्य दिसले की पोट भरून खायचे आणि नावडते खाद्य असले की अर्धवट पोटाने उठून जायाचे. यामुळे आपल्या शरीराला संतुलित आहार मिळत नाही आणि मग आपणास काही ना काही त्रास व्हायला सुरुवात होते. फळभाजी आणि पालेभाजी न खाणाऱ्या मुलांची संख्या सर्वाधिक आढळून येते. पण याच फळभाजी आणि पालेभाजी खाणारी मुले निरोगी असतात. ज्याचे पोट साफ असते त्यांना सहसा कोणतेच विकार दिसून येत नाही. पोट साफ होण्यासाठी सर्व प्रकारचे जेवण आवश्यक आहे. शक्यतो सायंकाळच्या वेळी एक तास तरी मैदानावरचे खेळ खेळावे. आजकालची मुले आपला वेळ मोबाईलच्या गेममध्ये किंवा टीव्हीवरील कार्टून पाहण्यात घालवितात. त्यामुळे ही मुले दिवसेंदिवस एकलकोंडी होत आहेत. चला तर मग आपले उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी चांगल्या आरोग्यदायी सवयीचा अंगीकार करू या.लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उस्मानाबाद जिल्हा* हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६ (इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच तुळजाभवानी माता ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे .जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्वाचा आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मोबाईलचा शोध केव्हा लागला ?२) पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ?३) नाटो म्हणजे उत्तर अटलांटिक करार संघटनाची स्थापना केव्हा झाली ?४) आयपीएलचे अध्यक्ष कोण आहेत ?५) आदिवासींच्या विकासासाठी लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?*उत्तरे :-* १) ३ एप्रिल १९७३ २) ३ टक्के ३) ४ एप्रिल १९४९ ४) अरुण धुमल ५) गडचिरोली*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ज्ञानेश्वर झगरे गुरुजी वाकदकर👤 सौ. जयश्री व्यंकटेश पुलकंठवार, नांदेड👤 बालाजी पांचाळ👤 गंगाधर कौडेवार, शिक्षक👤 बद्रीनाथ कुलकर्णी👤 जगन्नाथ लाभशेटवार, शिक्षक👤 निलेश कवडे, साहित्यिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समस्तामधे सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥ जिवा संशयो वाउगा तो त्यजावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मान इच्छी तो अपमान पावे ।* *अमंगळ सवे अभाग्याची ।।* *एकाचिये अंगीं दुजियाचा वास ।* *आशा पुढें नाश सिद्ध करी ।।**मान मागावा लागत नाही, तर तो मिळत असतो. त्यासाठी आवश्यकता असते ती पात्रतेची. आता पात्रता नसेल तर मान मिळण्याची इच्छा करून काय उपयोग? अपात्र माणसाला लोक मान कसा देतील? रिकाम्या माणसाला लोक खुर्ची देणार नाहीत. मला स्टेजवर पाहुणा म्हणून बसवा म्हणल्यानं लोक बसवणार तर नाहीतच; उलट 'काय हलकट माणूस आहे?' असं म्हणून अपमान करतील. पात्रतेवाचून मान मिळवण्याची इच्छा करणे म्हणजे अपमान करून घेणे होय. मुळात 'इच्छा' अपमान ओढवते. मानासाठी हापापलेली अनेक माणसं आपल्या अवती-भोवती पाहायला मिळतात. मान मिळाला नाही म्हणून 'बोहल्यावर' रुसून बसणारे नवरदेव आपण पाहिले असतील.**राजकीयच काय पण सामाजिक, धार्मिक स्टेजवरही मान-पानावरुन लोक हाणामारी करायलाही मागेपुढे पहात नाहीत. मानाची तीव्र इच्छा हे सर्व घडवत असते. तुकोबा म्हणतात, "जो लोकांकडून मान मिळवण्याची इच्छा करतो, तो यामुळं 'हलकट' ठरत असल्याने त्याचा अपमान होतो. असा हा अभागी माणूस जिथं जाईल तिथं त्याच्यासोबत अपयश असते." म्हणून, अपमान करून घ्यायचा नसेल तर मान मिळण्याची इच्छा करू नये. 'निरपेक्ष वृत्तीने' काम करत राहा. लोक स्वतःच तुम्हाला खुर्चीवरच काय डोक्यावर बसवतील.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांची स्वप्ने आणि विचार वाईटच असतात.त्यांना इतरांचे घेणे देणे काहीच नसते.त्यांच्या मनात नेहमी वाईट विचार घोळत असतात.इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.ते सदैव असूरी आनंदात जीवन जगत असतात.अशा असूरी आनंदी असणा-या लोकांपासून समाजाचे फार मोठे नुकसान होते.चांगली माणसे अशापासून चार पावले दूर असतात तर दुष्ट माणसे चांगल्या माणसांच्या सहवासात कधीही येत नाहीत.पण एक खरे आहे अशांचा सहवास कधीही नसावा.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आचार्य विनोबा भावे*भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment