✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19/04/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९७५ : भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट याचे प्रक्षेपण.💥 जन्म :-● १८९२ : ताराबाई मोडक, भारतातील सुप्रसिध्द बालशिक्षणतज्ज्ञ.● मुकेश अंबानी, सुप्रसिद्ध उद्योगपती● १९७७ - अंजू बॉबी जॉर्ज, भारतीय खेळाडू.● १९८७ - मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.💥 मृत्यू :-● १९१० : अनंत लक्ष्मण कान्हेरे, भारतीय क्रांतिकारक● १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील● १९९८: उद्योगपत्नी सौ. विमलाबाई गरवारे● २००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर● २००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर● २०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष● २०१३-वृत्तपत्रउद्योजक सिवंती आदीतन*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई लोकलचा प्रवास होणार सुस्साट, एमयूटीपी ३ अ' प्रकल्पसंचासाठी ७ हजार कोटी रुपयांच्या कर्जउभारणीला शिंदे-फडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशात उष्णता वाढली, अनेक शहरात पारा 40 अंशाच्या पुढं, उत्तर प्रदेशातील हमीरपूर आणि प्रयागराज इथं 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *चंद्रकांत पाटलांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या लिंगायत-वोक्कलिंग समाजाच्या हाती; 32 टक्के मतांसाठी सर्वच पक्षात चढाओढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भांडुपच्या जलबोगद्याचं काम 18 दिवसांत पूर्ण, मुंबईतली पाणीकपात रद्द होण्याची अपेक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; गुजरात सरकारलाही सुनावले खडे बोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - हैदराबाद : दमदार अष्टपैलू कामगिरी करत कॅमेरून ग्रीन हा मुंबई इंडियन्ससाठी विजयाचा शिल्पकार ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हुश्य .....! संपली परीक्षा*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1497988893661213&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उष्माघातापासून असे करा स्वत:चे रक्षण*दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताच्या बातम्या येत असतात. उन्हाळ्यात काळजी न घेतल्यास उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी लाखो नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला आलेल्या काही श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यातच ११ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणयासाठी काय उपाय केले पाहिजे किंवा त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया.....*उष्माघात म्हणजे काय?*उष्माघात म्हणजे नक्की काय तर उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे मानवी शरीराच्या तापमानात ४० अंश सेल्सिअसहून अधिक वाढ होऊ लागते. ज्यामुळे संबंधित व्यक्तीच्या महत्त्वाच्या अवयवांवर विपरित परिणाम होऊन त्यांच्या कार्यात बिघाड होतो. यालाच उष्माघात म्हटलं जातं. उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो. प्रचंड उष्णतेमुळे होणाऱ्या अशा उष्माघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक बनलं आहे. उष्माघाताची लक्षणेचक्कर येणे त्वचा लालसर होणेउलट्या, मळमळ होणेसुस्त वाटणेडोकं दुखणेह्रदयाचे ठोके वाढणे*उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय कराल-*भरपूर पाणी आणि शरबत प्यावेउन्हात जाताना छत्री, टोपी किंवा रुमाल आदींचा वापर कराल.उन्हाळ्यात सैल कपडे घालावेआवश्यकता नसल्यास दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.मद्यपान टाळा*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दिशादर्शक आणि मार्गदर्शक योग्य असतील तर मार्ग चुकण्याचा प्रश्नच येत नाही..* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सर्वात कमी वयात नेत्रदान झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?२) जागतिक यकृत दिन केव्हा साजरा केला जातो ?३) सागरी संपत्ती असलेल्या थोरियमचा उपयोग कोठे केला जातो ?४) एकपेशीय सजीवांची दोन उदाहरणे सांगा ?५) 'व्हायब्रंट व्हीलेज' या केंद्र सरकारच्या योजनेतील पहिले गाव कोणते ?*उत्तरे :-* १) अर्जुन संदीप चावला, उत्तराखंड, वय - ७ दिवस २) १९ एप्रिल ३) अणुऊर्जा निर्मिती ४) अमिबा, पँरामेशियम ५) किबिथू, अरुणाचल प्रदेश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष पुरणशेट्टीवार, धर्माबाद👤 अझहर शेख👤 मनोज रामोड👤 संदीप बोलचेटवार, धर्माबाद👤 हर्षवर्धन घाटे, पत्रकार, बिलोली👤 कृष्णा राय👤 संदीप कातमवाड👤 सचिन कनोजवार👤 बालाजी पोरडवार👤 भक्ती जठार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेणे जाळिला काम तो राम ध्यातो। उमेसी अती आदरें गूण गातो॥ बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें। परी अंतरी नामविश्वास तेथें ॥८३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.**शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.**"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच वाटतं की,माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं,आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की,मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ?याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल.मग मनच सांगायला लागेल की,तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.आपण जर थोडा स्वार्थ जर सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीची नातं जोडलं,त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील.असं जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील.तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल,संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ मूर्तीपूजेचे महत्त्व ❃* स्वामी विवेकानंद भ्रमंती करत असेच एकदा उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगलसिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य चैनीत चालले होते. शिवाय त्याच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता. विवेकानंदाना पाहून त्याला वाटले, बोलून चालून हा एक तरुण संन्याशी ! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार ? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, 'स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे ?' राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, 'दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ?' स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले. रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेह-याकडे एकवार चोरट्या नजरेने बघून दिवाणजी म्हणाले, ' स्वामी काय बोलता हे ? ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत !' विवेकानंद म्हणाले, 'दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे'. एवढे बोलून ते राजाला उद्देशून म्हणाले, 'राजेसाहेब, त्या चित्रात अस्थी, मांस आणि जीव असलेले आपले वडील नाहीत; म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचाराचे आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणार्यांची कीव करणे अविचाराचे आहे.' स्वामी पुढे म्हणाले, 'मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे ज्ञानी भक्त जाणतात; परंतु निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्यांना जमणारी गोष्ट नसल्याने, त्यांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्तीपूजा ही प्रारंभीची पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो'.हे ऐकून राजा अंतर्मुख होऊन विचारात पडला.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment