✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10/04/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १८७५ : स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाचीस्थापना केली.● १९८२ - भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रह इन्सॅट १एचे प्रक्षेपण💥जन्म :-● १८८० - सर सी.वाय. चिंतामणी, पत्रकार आणि उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री● १८९४ - घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.● १८९७ - प्रफुल्लचंद्र सेन, भारतीय राजकारणी.● १९०१ - डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थशास्त्रज्ञ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू● १९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.● १९५२ - नारायण राणे, भारतीय राजकारणी💥मृत्यू :- ● १३१७ - संत गोरा कुंभार.● १६७८ - वेणाबाई, रामदास स्वामींची शिष्या● १८१३ - जोसेफ लाग्रांज, इटालियन गणितज्ञ.● १९३१ - खलील जिब्रान, लेबेनॉनी-अमेरिकन साहित्यिक.● १९३७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार.● १९६५ - डॉ. पंजाबराव देशमुख, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री.● १९९५ - मोरारजी देसाई, भारताचे ४थे पंतप्रधान*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *" अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद करताना अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार अशी घोषणा केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा, वीज पडून चौघांचा मृत्यू ; लहान-मोठी 54 जनावरेही दगावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिक्षणाचाच बाजार मांडला! बंगळूरमध्ये मॅनेजमेंट कोट्यातील काॅम्प्युटर सायन्सच्या एका जागेचा दर तब्बल 64 लाखांच्या घरात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात आज घडीला जगभरातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात आहेत. ही संख्या दरवर्षी 6 टक्क्यांनी वाढत आहे. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पर्यटन, विद्यार्थ्यांसाठी अमेरिका वारी महागली! व्हिसासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार; 30 मे 2023 पासून नवीन दर लागू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईतील सुप्रसिद्ध 'द रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये नाट्य महोत्सवाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिंह याने शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेल्या 5 सिक्समुळे केकेआरने गुजरातला त्यांच्या होम ग्राउंडवरच पराभूत केले असून 3 विकेट्स राखून विजय मिळवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी'*हा विषय आपल्या सगळ्यांच्याच जवळचा.. प्रत्येक वर्षी आपल्या जवळपास एकदा तरी ही चर्चा ऐकू येतेच. मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा या दोघांचेही काही फायदे आणि काही तोटे असू शकतात.. पण मुलांच्या भवितव्याचा विचार करता, आपण नेमकं काय निवडायचं ? मराठी की इंग्रजी ? तुम्हाला काय वाटतं ? आपले मत खालील क्रमांकावर जरूर कळवा. चांगल्या प्रतिक्रियाना प्रसिद्धी देण्यात येईल. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिखांची काशी - नांदेड शहर*नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. इ.स. २००८ साली येथे शीख धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' हा गुरुग्रंथास धर्मगुरूचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत 'शेष'घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत विष्णूपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड सह १६ तालुके आहेत त्यांची नावे पुढीप्रमाणे मुखेड,मुदखेड, लोहा, नायगांव, बिलोली, देगलुर, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, हदगाव, , माहूर, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर, व नांदेड.महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, हिंगोली व यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद तेलंगणातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.नांदेड येथून प्रवासासाठी बस, रेल्वेसह विमानाची व्यवस्था देखील आहे. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्याला या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मूर्ती यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?२) पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो ?३) नाटोचे मुख्यालय कोठे आहे ?४) गुन्हेगारी आरोपांचा सामना करणारे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष कोण ठरले आहेत ?५) राष्ट्रीय सागरी दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?*उत्तरे :-* १) पद्मभूषण २) महसुल विभाग ३) ब्रेसेल्स, बेल्जियमची राजधानी ४) डोनाल्ड ट्रम्प ५) ५ एप्रिल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. शेख mwh, माध्यमिक शिक्षक, नांदेड👤 भाऊसाहेब आबा अहिरे👤 शिवराज सिताराम वडजे, सहशिक्षक, उमरी👤 तुळशीराम सिरमलवार, सहशिक्षक👤 टी. अशोक साईनाथ👤 विलास बोंबले👤 चंद्रकांत पोळ👤 प्रकाश बंडेवार👤 रामदास डुमणे👤 सुभाष बोडके👤 श्यामानंद लिंगमपल्ले👤 भाऊसाहेब अहिरे👤 नागेश तांबोली👤 सचिन पवळे👤 बालाजी मुपडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समस्तामधे सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥ जिवा संशयो वाउगा तो त्यजावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.**ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !**एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात दुर्जन अथवा वाईट प्रवृत्ती असणा-या माणसांचे वर्चस्व राहू नये म्हणून सज्जन माणसे जन्माला आलेली असतात.त्यांच्या सद्विचारामुळे दुर्जनवृत्तीची माणसे वर तोंड काढू शकत नाहीत त्यामुळे अनेक होणारे अनर्थ टळू शकतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ लांडगा आणि सिंह ❃* एकदा एक लांडगा व एकू सिंह रानात हिंडत होते थांबा मी आता जवळच एका मेंढीचा आवाज ऐकला. त्यावरून इथे जवळच मेंढ्या चरत असाव्यात असं वाटतं. तेव्हा मी पटकन जाऊन एखादी मेंढी तुमच्याकरता घेऊन येतो. असे बोलून लांडगा आवाजाच्या दिशेने गेला. परंतु, तेथे मेंढ्यांच्या जवळच धनगर व कुत्रे उभे होते. ते पाहून लांडगा घाबरला व पळतच सिंहापाशी आला. तेव्हा सिंहाने विचारले,हे काय, तू काहीच आणले नाहीस ? तेव्हा लांडग्याने उत्तर दिले, 'महाराज, तिथे मेंढ्या आहेत खया, पण त्या इतक्या अशक्त आहेत की, त्या सगळ्या खाल्ल्यावरसुद्धा आपलं पोट भरणार नाही ! *तात्पर्य*जी वस्तु आपल्याला मिळणे कठीण, तिला नावे ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment