✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12/04/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९३५ - प्रभातचा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.● १९६१ : सोवियेत संघाचा युरी गागारिनअंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.● १९६७ - कैलाशनाथ वांछू भारताचे १०वे सरन्यायाधीश झाले● १९९७ : भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.● १९९७ पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले.💥जन्म● १८७१ : वासुदेव आपटे, आनंद या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक व संपादक.● १९१० : पु.भा. भावे (पुरुषोत्तम भास्कर भावे) , मराठीतील प्रतिभासंपन्न लेखक.● १९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव● १९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड● १९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार● १९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन● १९८१ : तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.💥मृत्यू● १७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा● १९१२: अमेरिकन रेड क्रॉसच्या स्थापक कारा बार्टन● २००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ● २००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार● २०१२-कवी आणि नाटककार मोहित चट्टोपाध्याय*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचं भाकित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात 4 मे ला सुनावणी, निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रानं सर्व राज्यांशी समन्वय साधून मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू केलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अंगणवाडी सेविकांना मिळणार नवीन मोबाईल; अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण होणार, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पावले उचलण्यास सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिवमध्ये पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा, तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ * 'धनगड' हेच 'धनगर' असल्याच्या मुद्यावर मुद्देसूद पुरावे सादर करा; हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 - मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलवर सहा विकेट राखून मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *साहित्यिक आसाराम लोमटे*आसाराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते परभणी येथील वार्ताहर आहेत.आसाराम लोमटे यांची ‘होरपळ’ ही कथा ‘सत्याग्रही’मध्ये १९९५ साली प्रकाशित झाल्यापासून त्यांनी ग्रामीण कथा लिहिण्याचे ठरविले. ते म्हणतात, पूर्वी ग्रामीण कथांमधील ग्रामीण भागाचे चित्रण म्हणजे त्याचे गौरवीकरण होते. झुळझुळ पाणी वगैरे अशा संकल्पना त्यात रंगविल्या जायच्या. त्यात भडकपणा आणि बटबटीतपणा होता. म्हणून ते टाळून जगण्यातला संघर्ष कसा आहे, हे सांगणारी ग्रामीण कथा लिहिण्याचे लोमट्यांनी ठरविले. लघुकथांमध्ये न अडकता आपल्याला दीर्घकथा लिहिता येऊ शकते, हे १९९५ साली कळल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालीआसाराम लोमटे यांच्या आलोक आणि इडा पिडा टळो या दोन्हीही पुस्तकांमधील कथांचे कानडी, हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या पाच दीर्घ कथांचा कानडी भाषेतील अनुवाद ‘कोटेमने’ या नावाने प्रसिद्ध आहे. ‘इडा पिडा टळो’मधील ‘बेईमान’ या कथेवर ‘सरपंच भगीरथ’ हा चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या साहित्यावर काही अभ्यासकांनी शोधप्रबंध सादर केले आहेत.आसाराम लोमटे यांचे वैचारिक लेख :-‘दुष्काळ झळा : निवडणुकीच्या रंगीबेरंगी सतरंजीखाली दडवलेला कचरा’ हा आसाराम लोमटे यांचा लेख २०१९ सालच्या एप्रिलमध्ये लोकसत्तेत प्रसिद्ध झाला. तेव्हा दुष्काळाच्या आणखीही वेगवेगळ्या पैलूंवर लिहावे असे त्यांच्या डोक्यात आले. हा लेख वाचूनच साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी दुष्काळावर 'साधना'चा एक पूर्ण अंकच काढला. या अंकात आसाराम लोमटे यांनी सर्वच म्हणजे आठ लेख लिहिले. हे लेख लिहिण्यापूर्वी असाराम लोमटे ह्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. जिथून मध्य प्रदेशाची हद्द दिसते, अशा वरूड तालुक्यातल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांपासून ते नेहमीच दुष्काळ सोसणाऱ्या माणदेशातल्या अनेक गावांपर्यंत या निमित्ताने ते फिरले.४५-४६ अंशापर्यंत तडकलेल्या चढत्या भाजणीच्या उन्हात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या,व दुष्काळ सोसणाऱ्या आणि दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या रयतेशी त्यांना संवाद साधता आला. मराठवाड्यातल्या केज, धारूर, परांडा, मंठा, भूम विदर्भातल्या अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, रिसोड, लोणार, वाशीम; माणदेशातल्या आटपाडी, खटाव, जत, माण आणि खानदेशातल्या अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव, पारवा, सांगोला अशा परिसरातल्या अनेक गावांना, तांडे-वाडी-वस्त्यांना भेटी देऊन असाराम लोमट्यांनी दुष्काळाची दाहकता समजून घेतली आणि 'साधना'त हे ८ लेख लिहिले.त्यांच्या आलोक या कथासंग्रहाला 2016 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संकलन :- *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*छत्रपती संभाजी नगर विभाग*छत्रपती संभाजीनगर विभाग पूर्वीचे नाव औरंगाबाद विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. मराठवाडा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.प्राचीन काळी हा मौर्य साम्राज्याचा एक भाग होता. नंतर हा भाग सातवाहन राजांच्या ताब्यात होता. नंतर छत्रपती संभाजीनगर विभाग हा मुख्यत्वेकरून इस्लामिक राजवटीखाली होता. इ.स. सन १७२४ ला निजामाने मराठवाडा, तेलंगण व सध्याच्या कर्नाटक राज्यातील काही भाग मिळून स्वतंत्र हैदराबाद राज्य स्थापन केले. नंतर १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथल्या जनतेला स्वातंत्र्य मिळाले नाही. तर त्यांना मराठवाड्यासाठी वेगळा लढा द्यावा लागला. निजामावर जेंव्हा भारत सरकारने लष्करी कारवाई केली तेंव्हा मराठवाडा स्वतंत्र झाला. १९४८ मध्ये स्वतंत्र हैदराबाद राज्य अस्तित्वात आले. पुढे १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनूसार हे राज्य तीन भागात विभागले गेले. ज्यातील मराठवाडा हा भाग तेंव्हाच्या मुंबई राज्याला जोडण्यात आला आणि पुढे १९६० ला प्रामुख्याने मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या विभागात एकूण आठ जिल्हे आहेत - जिल्हे - छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते, तो भाग्यवान होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'नेस्ट मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?२) २०२२ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील वाघांची संख्या किती आहे ?३) प्रसिद्ध चित्रपट RRR यामध्ये असलेल्या एका नायकाचे पात्र कोणत्या गोंड क्रांतिकारी नेत्याच्या जीवन चरित्रावर प्रभावित आहे ?४) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?५) भारतात सर्वात मोठी बैलगाडी शर्यत कोठे भरते ?*उत्तरे :-* १) राकेश खत्री ( २,५०,००० घरटी बनवली.) २) ३१६७ वाघ ३) कोमाराम भीम ४) सियाल ५) भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आसाराम लोमटे, परभणीसाहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त👤 अरुणा कलेपवार, सहशिक्षिका, नांदेड👤 आसिफ शेख, धर्माबाद👤 गंगाधर पेंडपवार👤 बालाजी चुनुपवार, येवती👤 गजानन कुर्रेवाड, चिकना👤 मनोज दातार👤 आकाश वाघमारे👤 कलीम शेख👤 मिनाज सय्यद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करी काम निष्काम या राघवाचे। करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥ करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां। हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां ॥७७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?**प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही माणसांना स्वतःची काळजी नसते आणि जगाचं आता कसं होईल याची काळजी करत बसतात. अशी माणसे ही दिशाहीन असतात.केवळ काहीच न करता स्वतःचे जीवन सुधारु शकत नाहीत तर मग जगाच्या कल्याणाची काळजी करणे व्यर्थच आहे.अशी माणसे इतरांनाही काही करु देत नाहीत. अशा निरर्थकपणे जीवन जगणा-या माणसापासून अलिप्तच राहिलेले बरे.जगासाठी काहीतरी करणारी माणसे बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर देतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मूल्य*एकदा एका माणसाने भगवान बुद्धांना जीवनाचे मूल्य विचारले. भगवान बुद्धांनी त्याच्या हातात एक चमकदार दगड ठेवला आणि सांगितले की बाजारात जाऊन याची किंमत विचारून ये. पण हा दगड तू विकायचा नाहीस. तो माणूस दगड घेऊन बाजारात गेला. पहिल्यांदा त्याला एक फळविक्रेता दिसला, त्याच्याकडे जाऊन त्याने दगडाची किंमत विचारली. फळविक्रेता म्हणाला, मी या दगडाची किंमत म्हणून तुला 12 संत्री देईन. तो माणूस मग एका भाजीविक्रेत्याकडे गेला. भाजी विक्रेत्याने सांगितले, या दगडाच्या बदल्यात मी एक पोते बटाटे तुला देईन. तो दगड घेऊन तो एका सोनाराकडे गेला. सोनार म्हणाला, मी तुला याचे पन्नास लाख रूपये देईन. नाहीतर असे कर. मी तुला दोन कोटी रूपये देतो, पण हा दगड मला दे. तो माणूस म्हणाला, माझ्या गुरूने हा दगड विकायचा नाही म्हणून सांगितले आहे. नंतर तो एका रत्नपारख्याकडे गेला. त्याने ओळखले की हा दगड साधासुधा नसून माणिक आहे. त्याने ते माणिक व्यवस्थित एका आच्छादनावर ठेवले. आणि म्हटले, तुला हे माणिक कुठे मिळाले. अख्ख्या ब्रह्मांडात याची किंमत कुणी करू शकणार नाही, इतके ते मूल्यवान आहे. तो माणूस हैराण होऊन भगवान बुद्धांकडे आला आणि म्हणाला, तुम्ही मला हा एक दगड दिलात पण त्याची किंमत प्रत्येकाने वेगळी सांगितली. भगवान बुद्ध म्हणाले, या दगडाची किंमत फळवाल्याने 12 संत्री सांगितली, तर रत्नपारख्याने त्याला मूल्यवान म्हटले. तुझ्या जीवनाचेही तसेच आहे. तू भलेही हिरा आहेस, पण समोरचा माणूस त्याच्या योग्यतेनुसार तुझे मूल्य, पात्रता ठरवणार हे लक्षात घे.*तात्पर्य* - प्रत्येकाने स्वत:ला ओळखले पाहिजे. आपण कसे आहोत हे इतरांकडून समजून घेण्यापेक्षा स्वत:च जाणले पाहिजे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment