✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/04/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९१९ : जालियानवाला बाग हत्याकांड● १९३९ : भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.● १९४८ : भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली.● २००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर💥जन्म :-● १८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर● १९१३ : दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत.● १९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला● १९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक💥मृत्यू● १९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी● १९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी● १९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर● १९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर● १९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले● २०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार● २००८ : दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील हापूस आंबे समुद्रामार्गे जपान अन् अमेरिकेत रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतात पहिल्यांदाच पाण्याखालून धावणार मेट्रो; कोलकाता मेट्रोकडून लवकरच अंडरवॉटर मेट्रोची चाचणी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार गुण देण्याची नवी पद्धत; नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कचा आराखडा जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सरकारच्या रद्द झालेल्या महाभरतीचं परीक्षा शुल्क परत करण्याचं काम सुरू, परीक्षार्थींना केवळ 65 टक्के फी परत मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवकाळीच्या मुद्द्यावर अजित पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये 50 मिनिटं चर्चा; अजित पवारांकडून हेक्टरी पन्नास हजारांच्या मदतीची मागणी, सरकार विशेष पॅकेजची घोषणा करणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोरोनाचा धोका वाढला.. राज्यातील रुग्णसंख्या हजारपार, एकाच दिवसात 1,115 रुग्णांची नोंद, नऊ जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 :- चिदंबरम स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईवर पाच धावानी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*डॉ. आंबेडकरांसारखे होता येईल काय*खालील लिंक वर लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग वरच लिहाhttp://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_12.htmlडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विदर्भ विभाग*विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे दोन उपविभाग आहेत - (नागपूर आणि अमरावती). विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची आर्थिक उन्नती कमी आहे.विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. ह्या प्रदेशात कापूस, संत्रे आणि सोयाबीन ही उत्पन्न देणारी मुख्य पिके आहेत. तसेच ह्या प्रदेशात ज्वारी, बाजरी आणि तांदुळाची लागवड होते. विदर्भ म्हणजे वीर+तर्फ म्हणजेच वीर आणि त्यांचा प्रदेश विदर्भ ही मराठी सातवाहन,राष्ट्रकूट,वाकाटक,यादव राजवटीतील वीर पुत्रांची भूमी आहे. विदर्भ शब्दाचा अर्थ वीर आणि तर्फच अपभ्रंश होऊन विदर्भ झाले तर्फ म्हणजे प्रदेश या तरफचा दर्भ झाला आणि वीर मधला र गायब झाला आणि बनला वीरांचा प्रदेश विदर्भ जो महाराष्ट्र आहे त्याचे मूळ विदर्भ आहे.विदर्भ म्हणजेच आजचा पूर्ण महाराष्ट्र आहे आणि छत्तीसगड आहे.विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश तो विदर्भ अशी याच्या नावाची व्युत्पत्ती आहे.विदर्भ हा प्रदेश गोंड या राजवटीखाली हाती होता. नागपूर ही गोंडवाना राज्यसंघातील गोंड घराण्याची राजधानी होती. गोंडवाना राज्य हे पूर्ण मध्य-पूर्व भारतात पसरलेले होतं. १८१८ च्या तिसरे इंग्रज-गोंड युद्ध पराभवानंतर गोंड प्रभाव फक्त चंद्रपूर - नागपूर विभागातच मर्यादित झाला. नंतर गोंड राजांचे राज्य इंग्रजी साम्राज्यात विलीन करण्यात आले. (१८६१).महाराष्ट्राला विदर्भातून आजवर चार मुख्यमंत्री व देशाला एक राष्ट्रपती देखील लाभले. हरितक्रांती व पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक , जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक हे लोकप्रिय मुुुख्यमंत्री विदर्भाने दिले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील पहिली वंदेभारत एक्स्प्रेस कोणती ?२) जगातील एकूण वाघांपैकी भारतात किती टक्के वाघ आहेत ?३) होमिपॅथीचे संस्थापक कोणाला मानले जाते ?४) मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?५) बाभूळच्या झाडाला इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) नवी दिल्ली - वाराणसी वंदेभारत एक्सप्रेस ( १५ फेब्रु. २०१९ ) २) ७५ टक्के ३) डॉ. हॉनिमन, जर्मन चिकित्सक ४) तामिळनाडू ५) Acacia*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चि.यश राजेश सब्बनवार, कुंडलवाडी👤 विठ्ठल वाघमारे, उमरी👤 अनिल लोकडे, चिकना👤 अक्षय वाघमारे👤 प्रसाद यादव👤 लक्ष्मण पनेवार👤 दर्शन जोशी👤 व्यंकट पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं। तया पामरा बाधिजे सर्व कांही॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता। वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥७८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गीतेच्या दुस-या अध्यायात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.**गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवनाचे रहस्य*एक माणूस जीवनाला कंटाळला होता. त्याला असे वाटत होते की, इतक्या मोठया जगात आपण एकाकी आहोत. त्याला कोणी जवळ करत नाही, तो कोणाच्या प्रेमास पात्र नाही, असा विचार करून दुखी राहायचा. वसंत ऋतु आला आणि चहूकडे सुगंधी फुले उमलल्याने सुवासाचा दरवळ पसरला होता. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना त्या व्यक्तिने स्वतला घरात कोंडून घेतले होते. अचानक एक छोटी मुलगी दरवाजा उघडून घरात आली व म्हणाली,'' तुम्ही उदास आहात असे दिसते. याचे कारण काय?'' तो म्हणाला,'' माझ्यावर कोणी प्रेम करत नाही.'' ती मुलगी म्हणाली,'' तुम्ही कोणावर प्रेम करता?'' त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणाली,'' बाहेर येऊन पहा! तुमच्या दारासमोरच प्रेमाचा किती दरवळ आहे.'' तिने त्याचा हात धरून बाहेर पसरलेल्या फुलांच्या ताटव्यात उभे केले. तुम्ही ज्या फुलांवर जितके प्रेम कराल तितके करा! ते तितकेच प्रेम तुम्हाला देतील.'' त्या मुलीच्या बोलण्याने त्याचा भ्रम दूर झाला आणि त्याचे जीवन आनंदी झाले.*तात्पर्य*जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला की जीवन आनंदी होण्यास मदत होते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment