✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10/01/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.१७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.💥 जन्म :-१९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे१९१९: संस्कृत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे१९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन१९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास💥 मृत्यू :- १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दहावी- बारावी परीक्षेत यंदा चेकिंग स्कॉड पूर्णवेळ हजर राहणार; गैरप्रकारांना बसणार आळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोरोनाबाबतची कामं वगळून इतर कामांची कॅग चौकशी; रस्ते दुरुस्ती, जमीन खरेदीच्या कामांची चौकशी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *चंदा आणि दिपक कोचरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, एक लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पोलीस भरतीसाठी आलेल्या तीन उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये, रायगडमधील धक्कादायक घटना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच लिंगायत समाजाचा मुंबईत निघणार महामोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *देशातल्या पाच राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/rW-1XabWegk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गणेश हरी खरे*गणेश हरी खरे (जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू ०५ जून १९८५) हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टी - २० मध्ये नो बॉल हॅट्ट्रिक करणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ?२) १०८ वी 'इंडियन सायन्स काँग्रेस' नुकतीच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती ?३) जगातील कोणत्या देशात सर्वाधिक लष्करी सेवा सक्तीची आहे ?४) पाळीव प्राण्यांमध्ये जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा कोणता ?५) संदेशवहनाची साधने कोणती ?*उत्तरे :-* १) अर्शदीप सिंग २) नागपूर ३) उत्तर कोरिया ( ८ ते १० वर्षे ) ४) गुंथर सहा, जर्मन शेफर्ड ( संपत्ती - ४१३२ कोटी ) ५) वर्तमानपत्रे, रेडिओ, टि. व्ही., मोबाईल, संगणक, पत्र इत्यादी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास रेड्डी, धर्माबाद👤 साईनाथ सोनटक्के👤 राजेश कुंटोलू👤 गणेश वाघमारे👤 शत्रूघन झुरे👤 स्वरूप खांडरे👤 आकाश क्षीरसागर, सालेगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥ मना चंदनाचे परी त्वां झिजावे। परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.**गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी.हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरू ,परीक्षा ,शिष्य*गुरुकुलातून तीन शिष्य उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल..आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल.आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं.दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला..तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी आपल्याला लवकरात लवकर मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर..तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत..ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे.*तात्पर्यः*अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment