✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14/01/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भूगोल दिन* *मकरसंक्रांत*💥 ठळक घडामोडी :- १९२३ - विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.१९४८ - लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.१९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.१९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहीर.💥 जन्म :-१८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. १८९२ - क्रिकेटमहर्षी दिनकर बळवंत देवधर शतायुषी क्रिकेट खेळाडू.१८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री. भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर१९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.१९०८ - द्वा.भ. कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत.१९१९ - सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी, गीतकार१९२३ - चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते.१९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका.१९३१ - सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज’, ऊर्दू शायर.१९७७ - नारायण कार्तिकेयन, भारतीय फॉर्म्युला कार रेसिंग चालक.💥 मृत्यू :- १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक.२०१४ - पं. पुरुषोत्तम वालावलकर, भारतीय हार्मोनियमवादक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *31 जानेवारी ते 6 एप्रिल, यंदा 66 दिवस चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकार गव्हावरील निर्यातबंदी हटवणार, शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *फी न भरल्याने विद्यार्थिनीला अपमानित करुन परीक्षेला बसू दिलं नाही, पालकांची तक्रार; दादरच्या शारदाश्रम शाळेने आरोप फेटाळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यातील 'रॅपिडो'ला हायकोर्टाचा दणका; दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, राज्य सरकारकडून 300 कोटींचा निधी वितरीत, लवकरच होणार वेतन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये सिन्नर - शिर्डी मार्गावर भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक; 10 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-अनुला काय काय दिसतं**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/a0v-UeZYldc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकर संक्रांती निमित्त लेख**गोड गोड बोलण्याचा सण*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अभिनेत्री दुर्गा खोटे*दुर्गा खोटे ( जन्म १४ जानेवारी १९०५ - मृत्यू २२ सप्टेंबर १९९१ ) या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.दुर्गाबाई यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसऱ्या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुगाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील वातावरण अतिशय आनंदी होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. दुर्गाबाई यांच्या वडिलांचे पूर्ण नाव पांडुरंग शामराव लाड असे होते. दुर्गाबाई यांच्या आईचे नाव मंजुळाबाई असे होते.दुर्गाबाई यांचे वडील मुंबई येथे येऊन सॉलिसिटर झाले. दुर्गाबाईंचे वडील प्रेमळ होते व त्यांची विचारसरणी उदार होती.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला' असे हिंदू धर्माच्या कोणत्या सणात म्हटले जाते ?२) नैसर्गिक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत कोणता ?३) कृत्रिम बुद्धिमत्ता असणारा जगातील पहिला 'रोबो वकील' कोणत्या देशात पक्षकारांना सल्ला देणार आहे ?४) देशातील पहिले बाल न्यायालय कोठे आहे ?५) महिलांना कामासाठी उत्तम दर्जाचे वातावरण आणि संधी उपलब्ध करून देण्यात भारतातील अव्वल स्थानी कोणते शहर आहे ?*उत्तरे :-* १) मकरसंक्रांत २) सूर्य ३) अमेरिका ४) दिल्ली ५) चेन्नई*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवहार चपळे👤 दीपक उशलवार👤 स्वप्नील अबुज👤 सुधाकर एम. कदम👤 तानाजी कांबळे👤 कैलास तालोड👤 रमेश बंडे👤 पवनकुमार तिकटे👤 सुनील मुंडकर👤 राजू वाघमारे👤 गौतम सोनकांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजची संक्रांत ही काही निराळी नाही. दरवर्षी संक्रांत येते, जाते. पण क्रांती मात्र व्हायची तशीच राहते. ज्यावेळेला तुम्ही काळाची क्रांती मोजता, त्यावेळी फक्त ढोबळ रूपाने क्रांती लक्षात येते. या सापेक्ष जगामध्ये 'क्रांती' काळरूप करून चालणार नाही; तर संज्ञारूप करायला हवी. 'संज्ञा' म्हणजे नुसती व्याख्या नव्हे, तर तुम्हाला चांगलं ज्ञान झालं पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी, 'तिळगुळ घ्या', याचा अर्थ, तिळा तिळाने माणूस जमवा. माझं ह्रदय दुसर्यासाठी तीळ-तीळ तुटलं पाहिजे. दुसरा चुकतो कसा, आणि मी डंख कसा मारतो... विंचवाच्या जिभा करून आम्ही जर वागलो, तर काय उपयोग आहे सगळ्याचा?**एका तिळगुळाच्या वडीवर वर्षभर गोड बोलायला सांगत असाल तर काही अर्थ नाही. ते प्रतीक आहे. - गूळ म्हणजे गोडीचं, एकत्र बांधून ठेवण्याचं; आणि तीळ हे स्नेहाचं. प्रतीकात्मक आहे ते. त्याप्रमाणे वर्तन करा. प्रत्येक दोषी माणसाला त्याचे दोष चांगलेच माहीत असतात. दुसर्याने काही दाखवायचंच असेल, तर गुण दाखवायचे असतात. आपण थोडं एकमेकाला सांभाळून घेऊ शकलो, तर काय होईल? 'संक्रांत' याचा अर्थ,'सम+क्रांत' असा सुद्धा आहे. क्रांती केव्हा होते? समतेने होते.* *एका कवीने सांगून ठेवलंय ते लक्षात ठेवा-* *"दुर्दम्य होतील आशा आकांक्षा* *होतील संग्राम गीते पुरी।* *देशार्थ होतील त्यागी विरागी* *होईल संक्रांत तेव्हा खरी ॥"* *नुसत्या तीळगुळाने, हलव्याने होणार नाही. 'स्वत:च्या मनाला हलवा', असं ज्यावेळी मी स्वत:ला सांगेन, त्या दिवशी खरी संक्रांत साजरी होईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता,प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चतूर न्यायमुर्ती*एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?'जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.' या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?'जुना मालक - होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.न्यायमुर्ती - तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे. जुना मालक - (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !न्यायमुर्ती - ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.'न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment