✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/01/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.१९६६ - मुंबई-पुणे शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली२०११ - भारतातील पोलिओचा शेवटचा रुग्ण आढळला💥 जन्म :-१९३८ - पंडित शिवकुमार शर्मा१९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा.१९४९ - राकेश शर्मा💥 मृत्यू :- १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा.२०११ : मराठी अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, पारा 4 अंशापर्यंत जाण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एमपीएससी विद्यार्थ्यांचे आज राज्यव्यापी आंदोलन, त्रंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांना खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस; नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषक सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डिसेंबर महिन्यात सोने आयातीत 79 टक्क्यांची घट, 20 वर्षातील नीचांकी आयात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. श्रीलंका - केएल राहुलची यशस्वी झुंज, अर्धशतकाच्या जोरावर भारताचा 4 गडी राखून विजय, मालिकेतही विजयी आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/FxKHBNMx6ys~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तरुण भारत देश*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राकेश शर्मा*हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते.नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पहिले सोलर शहर कोणते ?२) जगात सर्वात जास्त डेटा कोणत्या देशात स्वस्त मिळतो ?३) पृथ्वीच्या केंद्रस्थानाचे तापमान सुमारे किती अंश सेल्सिअस असेल असे अनुमान आहे ?४) कोणत्या जातीचा डास चावल्याने हत्तीपाय हा आजार होतो ?५) भारतातील कोणत्या राज्यात बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन होते ?*उत्तरे :-* १) मलकापूर, सातारा २) इजरायल ३) सुमारे ५००० अंश सेल्सिअस ४) क्युलेक्स डास ५) उत्तरप्रदेश ( २९ % )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कु. मित दर्शन भोईर, रायगड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 विजयकुमार चिकलोड👤 बालाजी देशमाने*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं सर्वसूखी असा कोण आहे।विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मानवी' नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते.**बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात.शस्त्राची जखम शरीरावर होते नि काही काळ राहून ती मिटूनही जाते. परंतु एखादा शब्द जर आपण विचार पूर्वक न वापरला तर तो थेट काळजाला जाऊन लागतो आणि त्याची एवढी जखम होते की,ती आयुष्यभर तशीच काळजाला चिकटून राहते कधीच कमी होत नाही.म्हणून दैनंदिन जीवनव्यवहारात वावरत असताना मोजक्या आणि योग्य शब्दांचा,कुणालाही न लागणा-या शब्दांचा वापर करून आपण आणि इतरांनाही समाधानी रुपात रहावे.जेणेकरुन दोघांच्याही जीवनात आनंद आणि एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे.केवळ तुम्ही विचार न करता बोललेल्या एकाच शब्दाने वैरत्वाची भावना निर्माण होते तर त्याच एका शब्दाने इतरांची मने जिंकून जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून शस्त्रापेक्षाही शब्दांना आपल्या जीवनात अधिक जास्त जपले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आरसा* एका गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’*तात्पर्य : आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment