✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28/01/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● २००० - इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणाऱ्या 'अनुवादक' या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते प्रकाशन● २००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर💥जन्म● १८६५ - लाला लजपतराय, भारतीय क्रांतिकारक● १९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.● १९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.● १९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.💥मृत्यू● १९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक● १९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *"मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, तसेच लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अधिक कठोर करावी मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील चार शेतकऱ्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या चार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दक्षिण अफ्रिका पुढील दशकभरात 100 आफ्रिकन चित्ते भारतात पाठवणार, पर्यावरण मंत्रालयाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात होणार साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जुन्या पेन्शनचा प्रश्न सुटला नाही तर, राजकारणातून संन्यास घेईन, अपक्ष उमेदवार सुरेश पवारांचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. न्यूझीलंड T-20 सामन्यात भारताचा 21 धावानी झाला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wqweh0BpWEw~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लघुकथा - पाथरवट*https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_22.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत.बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात.जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आयसीसीने २०२२ या वर्षातील सर्वोत्तम टी - २० क्रिकेटपटू म्हणून कोणाला निवडले ?२) जीवनविद्या मिशनचे प्रणेते कोण ?३) कोणत्या फळाला पिकवण्यासाठी ३ वर्षे लागतात ?४) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ( ILO ) मुख्यालय कोठे आहे ?५) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना कोणत्या देशाची आहे ?*उत्तरे :-* १) सूर्यकुमार यादव, भारत २) सद्गुरू वामनराव पै ३) अननस ४) जिनिव्हा ५) भारत ( BCCI )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल सोनकांबळे👤 राजेश अर्गे👤 सलीम शेख👤 मोगलाजी मरकटवाड👤 राम पाटील ढगे👤 सोपानराव डोंगरे👤 श्रीनिवास सितावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?'तात्पर्यः- नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्याच असतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment