✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~नवीन वर्षानिमित्त फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा ......!Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/12/happy-new-year-2025.html •• ┈┉┅━ ◆❍❀🔘❀❍◆ ━┅┉┈••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷*_💐💐नूतन वर्षाभिनंदन_*💐💐 🌼 *_ या वर्षातील पहिला दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.**१९३२: डॉ.ना.भि.परूळेकर यांनी 'सकाळ'वृत्तपत्र हे सुरू केले.**१९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.**१९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.**१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.**१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.**१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना**१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक,गो.ग.आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.**१८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.**१८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.**१८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले.नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ.ना. भि.परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.**१८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.**१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: गोपाळ ऋषीदास इंगळे -- कवी**१९९१: प्रणव अविनाश कुलकर्णी -- अनुवादक, संपादक**१९९०: नागू वीरकर -- लेखक**१९८९: गणेश प्रल्हादराव आघाव -- कवी, लेखक**१९८२:धीरजकुमार रामदास नंदागवळी-- कवी**१९८१: अशोक गायकवाड --- कवी**१९८१: प्रदीप गुलाबराव ईक्कर -- कवी, लेखक**१९७७: राम वाल्मीक राव सोळंके -- कवी**१९७६: वि. दा. पिंगळे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७६: शेख बिस्मिल्ला शेख कासिम -- कवी**१९७५: सोनाली बेंद्रे -- भारतीय अभिनेत्री**१९७४: आश्रुबा राघोजी कांबळे -- कवी, गायक**१९७४: विजय दिगंबर जाधव -- लेखक**१९७४: डॉ. अरविंद बाबाराव पाटील -- कवी**१९७३: प्रा. युवराज तानाजीराव खरात -- कवी, कथाकार, कादंबरीकार**१९७२: भारत मारोतराव दाढेल -- लेखक**१९७१: सीमा गजानन भसारकर -- कवयित्री**१९७०: हरिश्चंद्र रामचंद्र धीवार -- कवी**१९७०: शेषराव पिराजी धांडे -- प्रसिद्ध कवी**१९७०: प्रा.डॉ.सुनील रामटेके --- कवी, लेखक* *१९६९: हरिबा रानबा अडसुळे -- मराठी व हिंदी मध्ये लेखन करणारे कवी तथा लेखक**१९६९: डॉ.काशीनाथ विनायक ब-हाटे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९६८: प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे -- प्रसिद्ध लेखक* *१९६८: राजेश गोरखशेठ सोनार (अहिरराव) -- कवी* *१९६७: मनोज बोरगावकर -- लेखक**१९६६: प्राचार्य वसंत माणिकराव बिराजदार -- प्रसिद्ध लेखक**१९६३: आत्माराम शंकरराव कुटे -- कवी**१९६२: संजय आर्वीकर - प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक* *१९६०: अनुरत्न वाघमारे -- प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक**१९६०: प्रा. डॉ. तानाजी राऊ पाटील -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६०: डॉ. सुरेश गोविंदराव सावंत -- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९५९: नंदन नांगरे -- लेखक, कवी तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५९: गंगासानी रामा रेड्डी -- तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते (मृत्यू: १४ एप्रिल २०११)**१९५६: काकासाहेब पांडुरंग देशमुख -- कवी**१९५५: शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील -- शाहीर, लेखक**१९५५: दयानंद नारायण पिसोळकर -- लेखक**१९५३: उद्धव हरिभाऊ कोळपे-जाधव -- लेखक**१९५२: डॉ. देवकर्ण तुलशीराम मदन -- प्रसिद्ध लेखक कवी**१९५२: यशवंत राजाराम निकम -- प्रसिद्ध लेखक निवृत्ती शिक्षणाधिकारी* *१९५१: नाना पाटेकर – सुप्रसिद्ध अभिनेता**१९५१: शंकर गोविंदराव पांडे -- लेखक (मृत्यू: ९ डिसेंबर २०२४)**१९५२: शाजी नीलकांतन करुण -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर**१९५०: तुकाराम सीताराम ढिकले -- कवी**१९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका**१९५०: निर्मला उद्धव भयवाळ -- कवयित्री**१९५०: राहत इंदोरी-राहत कुरेशी -- भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी (मृत्यू: ११ऑगस्ट २०२०)**१९४८: नानासाहेब चिमणराव बोरस्ते -- संवेदनशील कवी,वक्ते,माजी आमदार**१९४८: नामदेव चंद्रभान कांबळे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक, पत्रकार, साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९४६:जगन्नाथ सोनू अहिरे -- कवी* *१९४६: डॉ.निवास पांडुरंग पाटील -- गणितज्ज्ञ, खगोल विषयाचे अभ्यासक, लेखक**१९४५: प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ -- सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा पटकथा आणि संवाद लेखक* *१९४५: मारुती हरिभाऊ दाढेल -- लेखक, दलित मित्र पुरस्कार**१९४५: त्रिंबकराव दगडू बरकले -- प्रसिद्ध कवी**१९४३: संजीवनी खेर -- प्रसिद्ध लेखिका, पत्रकार**१९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण**१९४३: प्रा. डॉ. मधुकर रूपराव वाकोडे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक**१९४२: उत्तम बंडू तुपे --- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल २०२० )**१९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार**१९३६: राजा राजवाडे – प्रसिद्ध साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७ )**१९३५: मोहन चोटी -- भारतीय विनोदी अभिनेता (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९२ )**१९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८ )**१९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३ )**१९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२ )**१९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१ )**१९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४ )**१८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४ )**१८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२ )**१८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७० )**१८७८: हसरत मोहानी -- थोर स्वातंत्र्य सेनानी,उर्दू शायर(मृत्यू: १३ मे १९५१ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सुधीर नांदगावकर -- ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक (जन्म: ११ जून १९३९ )**२००९: रामाश्रेय झा – संगीतकार,वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )**१९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार**१९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार.(जन्म: ८ ऑक्टोबर १८९१ )**१९५५: डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४ )**१९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९ )**१८९४: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )**१७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७ )**_ २०२५ नवीन वर्ष आपणांस सुख समृद्धी, आशा आकांक्षा पार करणारे जावो करिता मनापासून नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भिंतीवर कॅलेंडर नाही असे घर शोधून सापडणार नाही. या कॅलेंडरचा वापर आपण कसा करतो ? किंवा करायला हवं ? याविषयी विचार जरूर वाचा 👇🏼*हर कॅलेंडर कुछ कहता है ।*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार - शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार, पंतप्रधान, मुख्यमंत्र्‍यांकडून इस्रोचं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जानेवारी महिन्यात 4 व 5 तारखेला 11 वा स्मिता पाटील आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव पुण्यात; जगभरातील प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांचे लघुपट पहाण्याची संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी, सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी, मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छ. संभाजीनगरमध्ये कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचेही क्रीडा घोटाळ्यात हात बरबटले, हर्षकुमारकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड खंडणीप्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर शरण; पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा अन् विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे दिग्गजांचे सल्ले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. सुरेश सावंत, बालसाहित्यिक, नांदेड👤 अनिकेत भारती, पोलीस अधिक्षक👤 सविता धर्माधिकारी, शिक्षिका व कवयित्री, लातूर👤 अशोक गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, कन्नड👤 मनमोहन कदम, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 छाया बच्चेवार, सेवानिवृत्त शिक्षिका, धर्माबाद👤 धोंडिबा गंगाराम गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, धर्माबाद👤 डॉ. शैलेश उमाटे, मनोविकारतज्ञ, मुंबई👤 संजय पाटील शेळगावकर, धर्माबाद👤 शेख बिस्मिल्ला सोनेशी, साहित्यिक, सिंदखेड👤 दिलीप धामणे, शिक्षक तथा साहित्यिक, हिंगोली👤 मुकुंद जोशी, शिक्षक, नांदेड👤 राजेंद्र जयस्वाल, कुपटी, माहूर👤 सतिश शिंदे, पत्रकर, धर्माबाद👤 सुनेत्रा बेल्लूरकर, सेवानिवृत्त शिक्षिका👤 चंद्रकांत दामेकर, शिक्षक नेते, नांदेड👤 उमेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दासोपंत - दासोपंत दिगंबर देशपांडे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाताची पाचच बोटे हजारो कामे करतात , कारण त्यांच्यात ऐक्य असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या देशाने *बाल्ड ईगल* या पक्ष्याला *राष्ट्रीय पक्षी* म्हणून घोषित केले आहे ?२) भारतात होणाऱ्या पहिल्या खोखो वर्ल्ड कपसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?३) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?४) सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले 'बॉर्डर सोलर व्हीलेज' कोणते ?५) भारतात पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली ? *उत्तरे :-* १) अमेरिका २) सलमान खान ३) दादाजी भुसे ४) मसाली, जि. बनासकांठा, गुजरात ५) वाराणसी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🐜 *मुंग्या* 🐜 ***************एखादा साखरेचा कण पडलेला असो किंवा उघडा अन्नपदार्थ तसाच राहिलेला असो, घर कितीही स्वच्छ असो किंवा कितव्याही मजल्यावर आपण राहात असू दे, पदार्थ स्वयंपाकाच्या ओट्यावर असु देत वा जमिनीच्या कोपर्‍यात असुदे; पुरेसा वेळ गेला की, त्याला मुंग्या लागणारच ! मग त्या लाल असतील, वा काळ्या, या मुंग्या त्या पदार्थांपर्यंत वाट काढत कशा येतात, त्यांना हा पदार्थ शोधायची शक्ती कशी मिळते, याबद्दल आपण बरेचसे अंधारात आहोत. पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे अन्न मिळवण्याचे हे ज्ञान मुंग्यांना उपजतच असावे. मग ते इतक्या विविध पद्धतीचे असू शकते की, आपली विचारशक्ती कुंठीत व्हावी. विविध प्रकारची बुरशी जशी त्यांना चालते, तसेच एखादा मेलेला प्राणीही आवडतो. साखरेप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थही आवडतात, तर काहीच नसल्यास कुजलेला पालापाचोळाही काम भागवू शकतो.साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या रंगछटांच्या, पंखांशिवायच्या व पंखांच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या जवळपास १४००० जाती सापडतात. इंचभर लांबीपासून जेमतेम डोळ्यांना दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या मुंग्या सापडतात. सहसा मुंग्या हा प्राणी जमिनीखाली वारुळे करूनच राहतो. दिवसभर अन्न गोळा करण्याचे काम कामकरी मुंग्या करत राहतात, तर दिवसभर अंडी घालण्याचे काम राणी मुंगी करते. ही जमिनीखालील वारुळात असते. त्या वारुळातील सर्व म्हणजे किमान लाखभर मुंग्या या तिच्याचपासून झालेल्या असतात. कामकरी मुंग्यांना अंडी घालता येत नाहीत. अन्न गोळा करणे, राणी मुंगीला संरक्षण देणे ही त्यांची कामे भल्या पहाटेच सुरू होतात, ती थेट सूर्यास्तानंतरच थांबतात.मुंग्यांच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मुंग्यांची संदेशवहनाची पद्धत, अन्नाच्या साठ्याची दिशा शोधणे व तिकडेच येण्यासाठी निरोप देण्याची व्यवस्था करणे या क्रियांबद्दल आजही फक्त अनुमानेच बांधावी लागतात. वारूळावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वा भक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अडथळा आल्यास मुंग्या चावतात. या चाव्यामुळे त्या जागी लहानशी गांध वा फुगवटा येऊन आग होते. बराच वेळ नंतर खाजही सुटत राहते. काही मुंग्यांचा चावा हा जास्त विषारी असल्याने त्या भागात भाजल्याप्रमाणे फोड येऊ शकतात व भाग तात्पुरता बधिर होतो. एक प्रकारचे प्रथिनद्रव्य नांगीद्वारे चावा घेतल्या जागी सोडले जाते, त्यामुळे हा प्रकार होतो. सामाजिक राहणीच्या दृष्टीने मुंग्यांचे वारूळ हे कायम एक अभ्यासाचा विषय आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या मुंग्या ठराविक पद्धतीने काम करून अन्नसाठा गोळा करण्याचा अविरत उद्योग ज्या पद्धतीने करतात, तिच्यातून मानवाला काही शिकता आले तर उत्तम.जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे, जखमी झालेले सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. जखमांनी हैराण झालेला प्राणी बघता बघता या चाव्यांनी हैराण होऊन जातो. प्रसंगी चक्क मुंग्याच त्याला नष्ट करून टाकतात. मोठ्या प्राण्यांच्या कलेवरावर प्रथम गिधाडे तुटून पडतात, तरी नंतर मुंग्याच ते पूर्ण खाऊन टाकतात. काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. लाल काय किंवा काळ्या काय मुंग्यांना गोड आवडते, अशी आपली समजूत ही थोडीशीच बरोबर आहे. रक्तजन्य व प्राणिज पदार्थ त्यांना जास्त आवडतात. घरात मुंग्या येत असतील व विषारी औषध मारायची नसतील, तर चिमटीभर हळद पसरून टाकावी. त्या भागात मुंग्या हळदीच्या वासाने फिरकतच नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥ केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥ ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनीं । तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥ समूळ घेतला पृथ्वीचा भारा । माझाचि जोजार काय तुला ॥४॥ नको पाहूं अंत पांडुरंगे आई । नामा विठोपायीं मिठी घाली ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेणात आणि सारवणात त्याचा काहीच उपयोग नाही असे आपण अनेकदा म्हणत असतो.पण, अंगण कितीही पाण्याने स्वच्छ करून धुतले तरी शेनाच्या सड्या एवढी योग्यता प्राप्त करू शकत नाही म्हणूनच अंगणात सडा टाकण्यासाठी शेणाची निवड केली जाते.तसंच माणसाचं सुद्धा आहे. कोणाच्या कलेला किंवा त्याच्या विचाराला कधीच कमी लेखू नये.कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेला असतो कारण त्यातून त्याला अनेक अनुभव आलेले असतात त्याच अनुभवातून तो जगत असतो. अशा व्यक्तीकडून चुका होण्याची शक्यता फारसी नसते कारण अनुभव त्यांच्या पाठीशी असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली. तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले," तू स्वतःला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही." दुसरा संत त्यावर म्हणाला," अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे." राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले. *तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~नवीन वर्षानिमित्त फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा ......!Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/12/happy-new-year-2025.html •• ┈┉┅━ ◆❍❀🔘❀❍◆ ━┅┉┈••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷*_💐💐नूतन वर्षाभिनंदन_*💐💐 🌼 *_ या वर्षातील पहिला दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.**१९३२: डॉ.ना.भि.परूळेकर यांनी 'सकाळ'वृत्तपत्र हे सुरू केले.**१९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.**१९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.**१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.**१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.**१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना**१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक,गो.ग.आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.**१८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.**१८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.**१८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले.नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ.ना. भि.परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.**१८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.**१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: गोपाळ ऋषीदास इंगळे -- कवी**१९९१: प्रणव अविनाश कुलकर्णी -- अनुवादक, संपादक**१९९०: नागू वीरकर -- लेखक**१९८९: गणेश प्रल्हादराव आघाव -- कवी, लेखक**१९८२:धीरजकुमार रामदास नंदागवळी-- कवी**१९८१: अशोक गायकवाड --- कवी**१९८१: प्रदीप गुलाबराव ईक्कर -- कवी, लेखक**१९७७: राम वाल्मीक राव सोळंके -- कवी**१९७६: वि. दा. पिंगळे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७६: शेख बिस्मिल्ला शेख कासिम -- कवी**१९७५: सोनाली बेंद्रे -- भारतीय अभिनेत्री**१९७४: आश्रुबा राघोजी कांबळे -- कवी, गायक**१९७४: विजय दिगंबर जाधव -- लेखक**१९७४: डॉ. अरविंद बाबाराव पाटील -- कवी**१९७३: प्रा. युवराज तानाजीराव खरात -- कवी, कथाकार, कादंबरीकार**१९७२: भारत मारोतराव दाढेल -- लेखक**१९७१: सीमा गजानन भसारकर -- कवयित्री**१९७०: हरिश्चंद्र रामचंद्र धीवार -- कवी**१९७०: शेषराव पिराजी धांडे -- प्रसिद्ध कवी**१९७०: प्रा.डॉ.सुनील रामटेके --- कवी, लेखक* *१९६९: हरिबा रानबा अडसुळे -- मराठी व हिंदी मध्ये लेखन करणारे कवी तथा लेखक**१९६९: डॉ.काशीनाथ विनायक ब-हाटे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९६८: प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे -- प्रसिद्ध लेखक* *१९६८: राजेश गोरखशेठ सोनार (अहिरराव) -- कवी* *१९६७: मनोज बोरगावकर -- लेखक**१९६६: प्राचार्य वसंत माणिकराव बिराजदार -- प्रसिद्ध लेखक**१९६३: आत्माराम शंकरराव कुटे -- कवी**१९६२: संजय आर्वीकर - प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक* *१९६०: अनुरत्न वाघमारे -- प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक**१९६०: प्रा. डॉ. तानाजी राऊ पाटील -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६०: डॉ. सुरेश गोविंदराव सावंत -- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९५९: नंदन नांगरे -- लेखक, कवी तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५९: गंगासानी रामा रेड्डी -- तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते (मृत्यू: १४ एप्रिल २०११)**१९५६: काकासाहेब पांडुरंग देशमुख -- कवी**१९५५: शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील -- शाहीर, लेखक**१९५५: दयानंद नारायण पिसोळकर -- लेखक**१९५३: उद्धव हरिभाऊ कोळपे-जाधव -- लेखक**१९५२: डॉ. देवकर्ण तुलशीराम मदन -- प्रसिद्ध लेखक कवी**१९५२: यशवंत राजाराम निकम -- प्रसिद्ध लेखक निवृत्ती शिक्षणाधिकारी* *१९५१: नाना पाटेकर – सुप्रसिद्ध अभिनेता**१९५१: शंकर गोविंदराव पांडे -- लेखक (मृत्यू: ९ डिसेंबर २०२४)**१९५२: शाजी नीलकांतन करुण -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर**१९५०: तुकाराम सीताराम ढिकले -- कवी**१९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका**१९५०: निर्मला उद्धव भयवाळ -- कवयित्री**१९५०: राहत इंदोरी-राहत कुरेशी -- भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी (मृत्यू: ११ऑगस्ट २०२०)**१९४८: नानासाहेब चिमणराव बोरस्ते -- संवेदनशील कवी,वक्ते,माजी आमदार**१९४८: नामदेव चंद्रभान कांबळे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक, पत्रकार, साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९४६:जगन्नाथ सोनू अहिरे -- कवी* *१९४६: डॉ.निवास पांडुरंग पाटील -- गणितज्ज्ञ, खगोल विषयाचे अभ्यासक, लेखक**१९४५: प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ -- सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा पटकथा आणि संवाद लेखक* *१९४५: मारुती हरिभाऊ दाढेल -- लेखक, दलित मित्र पुरस्कार**१९४५: त्रिंबकराव दगडू बरकले -- प्रसिद्ध कवी**१९४३: संजीवनी खेर -- प्रसिद्ध लेखिका, पत्रकार**१९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण**१९४३: प्रा. डॉ. मधुकर रूपराव वाकोडे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक**१९४२: उत्तम बंडू तुपे --- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल २०२० )**१९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार**१९३६: राजा राजवाडे – प्रसिद्ध साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७ )**१९३५: मोहन चोटी -- भारतीय विनोदी अभिनेता (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९२ )**१९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८ )**१९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३ )**१९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२ )**१९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१ )**१९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४ )**१८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४ )**१८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२ )**१८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७० )**१८७८: हसरत मोहानी -- थोर स्वातंत्र्य सेनानी,उर्दू शायर(मृत्यू: १३ मे १९५१ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सुधीर नांदगावकर -- ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक (जन्म: ११ जून १९३९ )**२००९: रामाश्रेय झा – संगीतकार,वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )**१९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार**१९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार.(जन्म: ८ ऑक्टोबर १८९१ )**१९५५: डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४ )**१९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९ )**१८९४: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )**१७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७ )**_ २०२५ नवीन वर्ष आपणांस सुख समृद्धी, आशा आकांक्षा पार करणारे जावो करिता मनापासून नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भिंतीवर कॅलेंडर नाही असे घर शोधून सापडणार नाही. या कॅलेंडरचा वापर आपण कसा करतो ? किंवा करायला हवं ? याविषयी विचार जरूर वाचा 👇🏼*हर कॅलेंडर कुछ कहता है ।*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार - शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार, पंतप्रधान, मुख्यमंत्र्‍यांकडून इस्रोचं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जानेवारी महिन्यात 4 व 5 तारखेला 11 वा स्मिता पाटील आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव पुण्यात; जगभरातील प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांचे लघुपट पहाण्याची संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी, सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी, मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छ. संभाजीनगरमध्ये कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचेही क्रीडा घोटाळ्यात हात बरबटले, हर्षकुमारकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड खंडणीप्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर शरण; पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा अन् विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे दिग्गजांचे सल्ले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. सुरेश सावंत, बालसाहित्यिक, नांदेड👤 अनिकेत भारती, पोलीस अधिक्षक👤 सविता धर्माधिकारी, शिक्षिका व कवयित्री, लातूर👤 अशोक गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, कन्नड👤 मनमोहन कदम, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 छाया बच्चेवार, सेवानिवृत्त शिक्षिका, धर्माबाद👤 धोंडिबा गंगाराम गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, धर्माबाद👤 डॉ. शैलेश उमाटे, मनोविकारतज्ञ, मुंबई👤 संजय पाटील शेळगावकर, धर्माबाद👤 शेख बिस्मिल्ला सोनेशी, साहित्यिक, सिंदखेड👤 दिलीप धामणे, शिक्षक तथा साहित्यिक, हिंगोली👤 मुकुंद जोशी, शिक्षक, नांदेड👤 राजेंद्र जयस्वाल, कुपटी, माहूर👤 सतिश शिंदे, पत्रकर, धर्माबाद👤 सुनेत्रा बेल्लूरकर, सेवानिवृत्त शिक्षिका👤 चंद्रकांत दामेकर, शिक्षक नेते, नांदेड👤 उमेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दासोपंत - दासोपंत दिगंबर देशपांडे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाताची पाचच बोटे हजारो कामे करतात , कारण त्यांच्यात ऐक्य असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या देशाने *बाल्ड ईगल* या पक्ष्याला *राष्ट्रीय पक्षी* म्हणून घोषित केले आहे ?२) भारतात होणाऱ्या पहिल्या खोखो वर्ल्ड कपसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?३) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?४) सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले 'बॉर्डर सोलर व्हीलेज' कोणते ?५) भारतात पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती कोणत्या ठिकाणी झाली ? *उत्तरे :-* १) अमेरिका २) सलमान खान ३) दादाजी भुसे ४) मसाली, जि. बनासकांठा, गुजरात ५) वाराणसी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🐜 *मुंग्या* 🐜 ***************एखादा साखरेचा कण पडलेला असो किंवा उघडा अन्नपदार्थ तसाच राहिलेला असो, घर कितीही स्वच्छ असो किंवा कितव्याही मजल्यावर आपण राहात असू दे, पदार्थ स्वयंपाकाच्या ओट्यावर असु देत वा जमिनीच्या कोपर्‍यात असुदे; पुरेसा वेळ गेला की, त्याला मुंग्या लागणारच ! मग त्या लाल असतील, वा काळ्या, या मुंग्या त्या पदार्थांपर्यंत वाट काढत कशा येतात, त्यांना हा पदार्थ शोधायची शक्ती कशी मिळते, याबद्दल आपण बरेचसे अंधारात आहोत. पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे अन्न मिळवण्याचे हे ज्ञान मुंग्यांना उपजतच असावे. मग ते इतक्या विविध पद्धतीचे असू शकते की, आपली विचारशक्ती कुंठीत व्हावी. विविध प्रकारची बुरशी जशी त्यांना चालते, तसेच एखादा मेलेला प्राणीही आवडतो. साखरेप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थही आवडतात, तर काहीच नसल्यास कुजलेला पालापाचोळाही काम भागवू शकतो.साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या रंगछटांच्या, पंखांशिवायच्या व पंखांच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या जवळपास १४००० जाती सापडतात. इंचभर लांबीपासून जेमतेम डोळ्यांना दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या मुंग्या सापडतात. सहसा मुंग्या हा प्राणी जमिनीखाली वारुळे करूनच राहतो. दिवसभर अन्न गोळा करण्याचे काम कामकरी मुंग्या करत राहतात, तर दिवसभर अंडी घालण्याचे काम राणी मुंगी करते. ही जमिनीखालील वारुळात असते. त्या वारुळातील सर्व म्हणजे किमान लाखभर मुंग्या या तिच्याचपासून झालेल्या असतात. कामकरी मुंग्यांना अंडी घालता येत नाहीत. अन्न गोळा करणे, राणी मुंगीला संरक्षण देणे ही त्यांची कामे भल्या पहाटेच सुरू होतात, ती थेट सूर्यास्तानंतरच थांबतात.मुंग्यांच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मुंग्यांची संदेशवहनाची पद्धत, अन्नाच्या साठ्याची दिशा शोधणे व तिकडेच येण्यासाठी निरोप देण्याची व्यवस्था करणे या क्रियांबद्दल आजही फक्त अनुमानेच बांधावी लागतात. वारूळावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वा भक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अडथळा आल्यास मुंग्या चावतात. या चाव्यामुळे त्या जागी लहानशी गांध वा फुगवटा येऊन आग होते. बराच वेळ नंतर खाजही सुटत राहते. काही मुंग्यांचा चावा हा जास्त विषारी असल्याने त्या भागात भाजल्याप्रमाणे फोड येऊ शकतात व भाग तात्पुरता बधिर होतो. एक प्रकारचे प्रथिनद्रव्य नांगीद्वारे चावा घेतल्या जागी सोडले जाते, त्यामुळे हा प्रकार होतो. सामाजिक राहणीच्या दृष्टीने मुंग्यांचे वारूळ हे कायम एक अभ्यासाचा विषय आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या मुंग्या ठराविक पद्धतीने काम करून अन्नसाठा गोळा करण्याचा अविरत उद्योग ज्या पद्धतीने करतात, तिच्यातून मानवाला काही शिकता आले तर उत्तम.जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे, जखमी झालेले सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. जखमांनी हैराण झालेला प्राणी बघता बघता या चाव्यांनी हैराण होऊन जातो. प्रसंगी चक्क मुंग्याच त्याला नष्ट करून टाकतात. मोठ्या प्राण्यांच्या कलेवरावर प्रथम गिधाडे तुटून पडतात, तरी नंतर मुंग्याच ते पूर्ण खाऊन टाकतात. काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. लाल काय किंवा काळ्या काय मुंग्यांना गोड आवडते, अशी आपली समजूत ही थोडीशीच बरोबर आहे. रक्तजन्य व प्राणिज पदार्थ त्यांना जास्त आवडतात. घरात मुंग्या येत असतील व विषारी औषध मारायची नसतील, तर चिमटीभर हळद पसरून टाकावी. त्या भागात मुंग्या हळदीच्या वासाने फिरकतच नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥ केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥ ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनीं । तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥ समूळ घेतला पृथ्वीचा भारा । माझाचि जोजार काय तुला ॥४॥ नको पाहूं अंत पांडुरंगे आई । नामा विठोपायीं मिठी घाली ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेणात आणि सारवणात त्याचा काहीच उपयोग नाही असे आपण अनेकदा म्हणत असतो.पण, अंगण कितीही पाण्याने स्वच्छ करून धुतले तरी शेनाच्या सड्या एवढी योग्यता प्राप्त करू शकत नाही म्हणूनच अंगणात सडा टाकण्यासाठी शेणाची निवड केली जाते.तसंच माणसाचं सुद्धा आहे. कोणाच्या कलेला किंवा त्याच्या विचाराला कधीच कमी लेखू नये.कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेला असतो कारण त्यातून त्याला अनेक अनुभव आलेले असतात त्याच अनुभवातून तो जगत असतो. अशा व्यक्तीकडून चुका होण्याची शक्यता फारसी नसते कारण अनुभव त्यांच्या पाठीशी असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली. तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले," तू स्वतःला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही." दुसरा संत त्यावर म्हणाला," अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे." राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले. *तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 डिसेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15QRYf8jXE/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔴 *_ या वर्षातील ३६६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.**१९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.**१९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.**१९४४: दुसरे महायुद्ध- हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.**१८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.**१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७३: धनाजी शिवराम माळी -- लेखक**१९६८: डॉ. अनिल शंकरराव पावशेकर -- लेखक**१९६५: लक्ष्मण शिवरामकृष्णन --" शिवा " आणि एलएस म्हणून प्रसिद्ध,माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक**१९६१: सुरेश पाटील -- लेखक* *१९५२: प्राचार्य डॉ. केशव मधुकरराव भांडारकर -- लेखक, शिक्षण तज्ज्ञ* *१९४९: देविदास तुळशीराम खडताळे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४८: डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२ )**१९४३:सर बेन किंग्सले -- महात्मा गांधीजीची भूमिका अजरामर करणारे इंग्लिश अभिनेता**१९४०: मन्साराम वारलुजी दहिवले -- लेखक**१९२३:अरविंद महेश्वर ताटके -- चरित्रलेखक (मृत्यू: २४ जानेवारी २०१० )**१९१६: बालशंकर देवराव देशपांडे -- साहित्यकार, संपादक**१९१६: मनोहर विनायक गोखले -- लेखक* *१९०८: नरहर (बाबूराव) विष्णु जोशी -- महाराष्ट्रातील एक संगीतज्ञ व प्रसिद्ध विधिज्ञ.(मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४ )**१९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पद्‌मविभूषण (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२ )**१९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर -- संगिततज्ञ,लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४ )**१८९०: पुरुषोत्तम रामचंद्र लेले -- रंगभूमीचे व्यासंगी अभ्यासक,लेखक, स्तंभलेखक (मृत्यू: ३१ मे १९६५ )**१८८७: विष्णू केशव पाळेकर -- मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक,त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या टोपणनावाखाली केलेले आहे (मृत्यू: ९ जुलै १९६७ )**१८७१: गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक,बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४ )**१८४५: जनार्दन बाळाजी मोडक --मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक (मृत्यू: १९ मार्च १८९२ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: कादर खान --- हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते (जन्म: १८ डिसेंबर १९३७ )**२०११: वंदना विटणकर -- मराठी कवयित्री, गीतकार,बालसाहित्यकार,नाटककार (जन्म: १९४१ )**२००५: प्रा. दि. य. देशपांडे -- तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, प्रसिद्ध लेखक यांच्या मराठी लेखनापैकी पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानासंबंधी जास्त अचूक माहिती देणारे लेखन (जन्म: २४ जुलै १९१७ )* *१९९७: छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे) -- रंगभूमीवरील नामवंत गायक नट (जन्म: १० मार्च १९१८ )**१९८६: राजनारायण –माजी केंद्रीय आरोग्य मंत्री (जन्म: १९१७ )**१९२६: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••31 डिसेंबर अर्थात वर्षातील शेवटचा दिवस त्यानिमित्ताने सर्वचजण पार्टी करण्याच्या मूड मध्ये असतात. अशीच एक लघुकथा*थर्टी फर्स्ट ची पार्टी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अभिवादन दिनानिमित्त विजयस्तंभ स्थळी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम, विजयस्तंभास फुलांची सजावट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *MHT-CET परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, 15 फेब्रुवारी पर्यंत भरता येणार अर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेतकरी संघटना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार - अंबादास हांडे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *श्याम खामकर यांना भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान, भौगोलिक बंधनात न अडकता कवीने व्यक्त होणे गरजेचे - भारत सासणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाजपकडून अकोला जिल्हा परिषदेतील 11 नेत्यांना थेट घरचा रस्ता, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र पुंडकर यांचेही निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव, रोहितसेना WTC फायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मधमाशी चावल्यावर काय होते ?*📙डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या ओढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BHIM - Bharat Interface for Money*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी माणूस तो म्हणवला जातो जो आपल्यावर इतरांनी फेकलेल्या दगडापासून पायाबांधणी करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते ?३) भारतीय रिझर्व्ह बँकेचे १५ वे गव्हर्नर कोण होते ?४) भारताचे २२ वे केंद्रीय अर्थमंत्री कोण होते ?५) २००४ ते २०१४ या काळात भारताचे १३ वे पंतप्रधान कोण होते ? *उत्तरे :-* १) डॉ. मनमोहन सिंग २) डॉ. मनमोहन सिंग ३) डॉ. मनमोहन सिंग ( १९८२ ते १९८५ ) ४) डॉ. मनमोहन सिंग ( १९९१ ते १९९६ ) ५) डॉ. मनमोहन सिंग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 धनाजी माळी, साहित्यिक👤 शिवाजी बी. खुडे, शिक्षक👤 करण यादव👤 मारोती बोलेवाड👤 रेहान खान👤 निलेश धावडे👤 ताहेर पठाण लतीफ खान👤 किरण अबुलकोड👤 अमोल बुरुंगुळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काया कर पैं फुटों नेदी । टाळ विंडी वाहिन खांदीं ॥१॥ तूं बा माझा तूं बा माझा । तूं बा माझा केशिराजा ॥२॥ आळवणीच तूं बा वाचे । तेणें छंदें पेंधा नाचे ॥३॥ तूं बा माझा मी दास तुझा । विनवितो नामा केशिराजा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी एक सेंकद सुद्धा लागत नाही.मात्र त्याच व्यक्तीचे कार्य, तळमळ, संघर्ष, प्रयत्न आणि आपुलकी जाणून त्याचा सन्मान करण्यासाठी वेळ मात्र कधीच वेळ मिळत नसतो.नको त्याचा सन्मान होतो, जो सन्मानाला पात्रही नसतो अशा व्यक्तीचा मात्र सन्मान होत असते.असे प्रसंग बघायला मिळत असतात. ही आजची वास्तविकता आहे. एखाद्या व्यक्तीचा अपमान करताना भलेही काही वाटत नसेल पण, त्याने जीवनात स्वतः पेक्षा इतरांच्या भल्यासाठी काय केले आहे ते मोलाचे योगदान जाणून घेणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *महापुरुष*आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट अशी की, आपले म्हणणे दुसऱ्याला न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला, महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे. मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसऱ्या दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ? पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय, पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड आहे? आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला, विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ? हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस. दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल. हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा निश्चय केला.*नवीन वर्षात आपण ही खांबाला धरून राहू नका ........*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12CdkdzBiwH/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟡 *_ या वर्षातील ३६५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: नांदेड जिल्ह्यात अर्धापूर व नायगाव या तालुक्याची निर्मिती* *१९९१मध्ये झालेल्या आखाती युद्धाच्या अखेरीस पराभूत इराकच्या सैन्याने माघार घेताना थोडेथोडके नव्हे, तर तब्बल चाळीस लक्ष पिंपे (म्हणजे सुमारे ऐंशी कोटि लिटर) तेल आखाती समुद्रात सोडून दिले. एवढ्या प्रचंड प्रमाणावरील तेलाचा तवंग समुद्रात पसरल्याने समुद्रातील हजारो किलोमीटर क्षेत्रातील संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट झाली!**१९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला**१९३८: मराठवाड्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर मकरणपूर ता. कन्नड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत जनजागरण परिषद**१९२४: एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.**१९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.*🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: वैशाली बाबुराव कोटंबे -- कवयित्री**१९६९: रामप्रभू सोमाजी गरमडे -- कवी**१९६०: मीनाक्षी विठ्ठलराव दरणे-वेरुळकर -- लेखिका* *१९५९: तात्याराव धोंडिराम चव्हाण -- लेखक* *१९५१: श्रीरात झिटूजी केदार -- कवी* *१९४८: सुरिंदर अमरनाथ -- माजी भारतीय क्रिकेटपटू**१९४६: डॉ.श्रीनिवास टोणपे -- प्रसिद्ध मराठी व हिंदी कवी* *१९४१: जयसिंगराव पवार-- प्रसिद्ध इतिहास संशोधक**१९३८: डॉ. स्नेहलता देशमुख -- प्रसिद्ध लेखिका, शल्यविशारद, बालरोगतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु( मृत्यू: २९ जुलै २०२४ )**१९३०: बसंत प्रकाश -- प्रसिद्ध संगीतकार ( मृत्यू: १९ मार्च १९९६ )**१९२६: दीनानाथ लाड -- कामगार रंगभूमीवर लाड मास्तर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक (मृत्यू: १२ ऑगस्ट २०१९ )**१९२२: गोपाळ मोरेश्वर कोलते -- लेखक, कवी (मृत्यू: ४ जानेवारी २००४ )**१९०१: अनंत जनार्दन करंदीकर -- मराठी पत्रकार आणि राजकारण, इतिहास व खगोलशास्त्रावर लिखाण करणारे पंडित लेखक (मृत्यू: १ नोव्हेंबर १९७७ )**१९०२: डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,घटनासमितीचे सदस्य,राज्यसभा खासदार,वैदिक संस्कृत, तिबेटी,चिनी,मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३ )**१८८२: बळीराम जनार्दन आचार्य -- अध्यात्मक पुस्तकाचे कर्ते (मृत्यू: १७ जुलै १९५० )**१८७९: वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू: १४ एप्रिल १९५० )**१८८७: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१ )**१८६५: रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू: १८ जानेवारी १९३६ )*     🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: भवानी शंकर -- भारतीय पखवाज ड्रम वादक (जन्म: १२ सप्टेंबर १९५६ )**२०१५: मंगेश केशव पाडगांवकर -- मराठी कवी लेखक १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १० मार्च१९२९ )**२०१३: लक्ष्मी शंकर शास्त्री -- प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका (जन्म: १६ जून १९२६ )**२००६: इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म: २८ एप्रिल १९३७ )**१९९२: पिराजीराव रामजी सरनाईक -- महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर (जन्म: २८ जुलै १९०९ )**१९८७: दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन. दत्ता – संगीतकार* *१९८२: दत्तात्रय जगन्नाथ धर्माधिकारी उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक(जन्म: २ डिसेंबर १९१३ )**१९८१: डॉ. अप्पासाहेब गणपतराव पवार -- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म: ५ मे १९१७ )**१९७४: आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते* *१९७१: डॉ.विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १९१९ )**१९४४: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म: २९ जानेवारी १८६६ )**१६९१: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २५ जानेवारी १६२७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रविवार माझ्या आवडीचा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला देवस्वारी आणि पालखीने प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तरप्रदेश सरकार कडून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना महाकुंभमेळाचे आमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दक्षिण कोरियात विमान लँडिंग करताना मोठा अपघात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *चंद्रभागा स्वच्छतेसाठी महिन्याकाठी 10 लाखाचा ठेका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पालघरच्या बोईसर-तारापूर MIDC अग्नितांडव ! युके अरोमॅटिकसह इतर दोन कंपनीत भीषण आग, परिसरात धुराचे लांबच लांब लोळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जुन्या ई वाहनांच्या खरेदी विक्रीवर 18 टक्के जीएसटी लागू, विक्रेते, खरेदीदारांमध्ये नाराजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦷 *आपल्याला दोनदा दात का येतात ?*🦷याचं अगदी थोडक्यात उत्तर द्यायचं तर असं म्हणता येईल, की आपली पुरी बत्तिशी बसवण्याइतका लहान मुलाचा जबडा मोठा नसतो. तो मोठा झाल्याशिवाय मग सारे दात त्यात बसवावेच कसे? तसे ते दाटीवाटीनं कसेबसे बसवले तर त्यांना आपलं काम करणंच अशक्य होईल. तोंडात आलेल्या अन्नाच्या घासावर तुटून पडण्याऐवजी ते एकमेकांवरच आपली धार चालवतील. त्यात त्यांचं नुकसान होऊन अन्नाचे व्यवस्थित तुकडे करून त्याच्या पचनाला मदत कशी करू शकतील ते? बरं, जबड्याचा आकार हवा तेवढा मोठा होईपर्यंत वाट पाहायची तर मग सुरुवातीची बारा-तेरा वर्षं तोंडाचं बोळकं घेऊन वावरावं लागेल. घन पदार्थांचा अन्नात समावेशच करता येणार नाही. नुसतं गिळता येईल असं द्रवरूपातलं किंवा लापशीसारखं अन्नच घेता येईल. उलट, वाढ होत असताना जितक्या लवकर घन अन्न म्हणजेच सॉलिड देता येईल तितकं बरं असतं. म्हणूनच मूल साधारण सात-आठ महिन्यांचं झालं की त्याला असं अर्धवट घन अर्धवट द्रव अन्न द्यायला सुरुवात करता येते. सहा-सात महिन्यांतच एक-दोन तरी दात यायला लागतात. पुढच्या वर्षा-दोन वर्षांत मुलाचं तोंड दातांनी भरून जातं; पण त्या वेळी जास्तीत जास्त वीसच दात तोंडात असतात. जबड्याचा आकार ध्यानात घेता तेवढेच बसवता येतात. त्यांच्या अधेमधे आणखी बारा दातांची बसवणूक करण्यासाठी फटीच नसतात. आता जबडा वाढताना जर दातांदातांमधलं अंतर वाढत गेलं तरी अतिरिक्त दात बसवता येतील. मग मधल्या काळात दातांमधल्या फटीच वरचढ होऊन सारं आरोग्यच बिघडून जाईल. म्हणूनच निसर्गानं ही तात्पुरत्या म्हणजेच दुधाच्या दातांची सोय केली आहे. त्यानंतरच्या काळात ज्यांची आयुष्यभराची साथ व्हायची, म्हणजे त्यांच्याशी काही खिलवाड केली नाही तर, त्या कायमस्वरूपी बत्तिशीची वाढ वास्तविक दुधाचे दात बाहेर पडल्याक्षणीच सुरू होते. दुधाच्या दातांच्या वरच्या हिरड्यांमध्ये ते वाढू लागतात. त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत जबड्याचा आकारही कमाल मर्यादा धारण करतो. हे कायमस्वरूपी दात परिपक्व झाले की दुधाच्या दाताच्या मुळावर घाव घालतात. ते मूळ कापून काढतात. आधारच असा तुटला, की ते दुधाचे दात गळून पडतात. कायमस्वरूपी दातांसाठी आपली जागा खाली करून देतात आणि आपला निरोप घेतात. त्यांची रिकामी झालेली जागा मग ते कायमचे दात घेतात. तरीही काही दाढा उशिराच येतात. अक्कलदाढही त्यातलीच एक. काही जणांना तर ती कधीच येत नाही की काय, अशीही शंका येते; पण ती एक वेगळीच गोष्ट आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ICICI - Industrial Credit and Investment Corporation of India*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या दगडाला लागलेली ठेच म्हणजे उद्याच्या यशाची ग्वाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सांचीच्या स्तूपाची प्रतिमा भारतीय चलनाच्या किती रुपयाच्या नोटावर आहे ?२) सांचीचा स्तूप कोणत्या राज्यात आहे ?३) सांचीचा स्तूप कोणी बांधला ?४) सांचीच्या स्तूपात कोणाच्या अस्थि आहेत ?५) युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सांची स्तूपला केव्हा मान्यता दिली ? *उत्तरे :-* १) २०० ₹ २) मध्यप्रदेश ३) मौर्य सम्राट अशोक ४) गौतम बुद्ध ५) सन १९८९*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 किरण रणभीरकर, साधनव्यक्ती, धर्माबाद👤 साहेबराव कांबळे, शिक्षक, नांदेड👤 मारोती राचप्पा छपरे, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 संभाजी दरेबोईनवाड👤 आनंद यडपलवार, शिक्षक व कवी, धर्माबाद👤 राजेश्वर रामपुरे👤 निवृत्ती लोखंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काया मनें वाचा नेणों भक्तिभाव । करिसी उपाव केशिराजा ॥१॥ थोरपणासाठीं मन घे हव्यासु । मी तो कासाविसु होय देवा ॥२॥ सर्वांभूतांमाजीं समत्वें दिससी । नामा म्हणे ऐसी दावी लीला ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनातील आचार विचार किंवा शब्द जेव्हा कागदावर लिहिण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न करत असतो. तसंच कुठेही न बघता तेच शब्द थोडं बोलण्याचा ही प्रयत्न करून बघावा. भलेही ते शब्द बोलताना जरी दर्जेदार निघत नसले तरी शेवटी ते आपलेच शब्द व विचार असतात. आणि ते अंतर्मनातून आलेले असतात. त्यातूनच आपल्याला खरा समाधान मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासाला तडा*एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. शामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा शाम जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्हणाला, "मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का," रामला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्हणाला," अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले." यावर राम शांतपणे शामला म्हणाला," मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे"*तात्पर्य :- गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 डिसेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/184dgNUG5N/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛞 *_ या वर्षातील ३६३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛞 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛞•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: अहिंसेच्या मार्गाने जगात शांतता प्रस्थापित करण्याचे असामान्य कार्य केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना सहस्त्रक शांतता पुरस्कार जाहीर**१९०३: मोटार चालविण्यासाठी चालक परवाना इंग्लंडमध्ये आवश्यक ठरविण्यात आला त्यानंतर इतर देशांनी ही पद्धत अवलंबली* *१८९५: ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.**१८८५: मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना**१८४६: आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.**१८३६: स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६१२: गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.* 🛞 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: संजय ज. गावंडे -- कवी**१९८२: कुंदा बच्छाव -शिंदे -- लेखिका* *१९८२: वैभव दिलीप धनावडे -- कवी, लेखक**१९७९: प्रशांत मंगरु भंडारे -- कवी* *१९७५: राजेश लक्ष्मण व-हाडे -- लेखक* *१९६९: लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स -- ख्यातनाम संगणक अभियंते**१९६२: प्रशांत असनारे -- प्रसिद्ध कवी* *१९६०: दयानंद घोटकर -- पाश्वगायक, संगीतकार, लेखक, कवी दिग्दर्शक अभिनेता* *१९६०: प्राचार्य दीपा क्षीरसागर -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, संपादिका* *१९५२: अरुण जेटली – माजी केंद्रीय मंत्री व वकील (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१९ )**१९४८: वि. ग. सातपुते -- भावकवी, व्याख्याते, लेखक* *१९४८: डॉ. चंद्रशेखर चिंगरे -- कथाकार, कादंबरीकार, नाटककार, अनुवादक**१९४६: गोरख शर्मा -- भारतीय गिटार वादक (मृत्यू: २६ जानेवारी २०१८ )**१९४५: वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू: १ जून २००१ )**१९३७: रतन नवल टाटा -- भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष (मृत्यू: ९ ऑक्टोबर २०२४ )**१९३६: प्रा. वामन सदाशिव पात्रीकर -- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार (मृत्यू: १९ एप्रिल २००३ )**१९३४: बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले -- मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक (मृत्यू: ३० जुलै २०१२ )**१९३२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२ )**१९३१: देवीदास तुकाराम बागूल -- लेखक, छायाचित्रकार, कथाकार**१९२६: हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२ )**१९१८: पंडित निखिल ज्योती घोष -- भारतीय संगीतकार, शिक्षक आणि लेखक (मृत्यू: ३ मार्च १९९५ )**१९११: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक (मृत्यू: १६ मे १९९४ )**१९०३: पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर -- ख्यातनाम मराठी शाहीर व महाराष्ट्रातील शाहिरीकलेचा इतिहास लिहिणारे इतिहासकार.(मृत्यू: मार्च १९८८ )**१८९९: उधम सिंग-- भारतीय क्रांतिकारक (मृत्यू: ३१ जुलै १९४० )**१८९९: गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६ )**१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे -- संत वाड्:मयाचे अभ्यासक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४ )**१८५६: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४ )*🛞 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: फ़ारुक शेख़ -- भारतीय अभिनेता (जन्म: २५ मार्च १९४८ )**२००६: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३ )**२००३: चिंतामण गणेश काशीकर -- वेदशास्त्र अभ्यासक, लेखक (जन्म: १७ ऑगस्ट १९१० )**२०००: मेघश्याम पुंडलिक तथा मे.पुं.रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१९८१: हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: १९०९)**१९७७: सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९०० )**१९३१: आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: १८६० )**१६६३: फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चुलीच्या धुराड्यातून मुक्ती अशी उज्वला योजना*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील 100 दिवसाचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे सर्व मंत्र्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर मध्ये कमांडो फोर्सची बोगस भरती, तरुणांची फसवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपूर स्मार्ट सिटीच्या उपाययोजनानंतर गुन्हेगारी दरात 14 टक्के घट, आयआयएम बंगलोरने सादर केला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सीए परीक्षेत हेरंब माहेश्वरी आणि ऋषभ ओस्तवाल यांनी केले देशात टॉप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानासह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली, आज शासकीय इतमामात होणार अंतीमसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये २०० ते ३०० रुपयांची वाढ होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त भार सहन करावा लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 474 धावा तर भारताचे 5 गडी बाद 164 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मिलिपीड* 📙****************** श्रावणाच्या सुमारास थोडेसे ऊन पडले की, लाल तपकिरी रंगाचे असंख्य पायांचे किडे बागेत, मोकळ्यावर एकगठ्ठा वळवळताना दिसतात. वर्षभर त्यांचा तसा पत्ता नसतो. पण थोडी पावसाची उघडीप, थोडे ऊन असा श्रावण मात्र त्यांना वाढीला पोषक ठरतो व हे हवा खाण्यासाठी मोकळ्यावर येतात. अन्यथा उरलेले दिवस त्यांचा मुक्काम जमिनीखाली असतोच. जमिनीतील नको असलेल्या गोष्टी, नाशवंत गोष्टी म्हणजे सडकी, कुजकी पाने, साली, फुले, फळे नष्ट करणे व जमीन भुसभुशीत ठेवणे हेच त्यांचे काम. गांडुळे हे काम फक्त जमिनीखालीच करतात; पण मिलिपीड्स जमिनीलगतसुद्धा काम करतात.मिलिपीड्सच्या असंख्य जाती जगभर आहेत. महाराष्ट्रात ज्याला आपण पैसाकिडे या नावाने ओळखतो. कारण जरा कोणाचा स्पर्श झाला की हे किडे गोलाकार करून अंग मुडपून स्तब्ध पडून राहतात. या पैशांची लांबी जेमतेम इंचभर असली, तरी पायांच्या जोड्या मात्र मोजता येणार नाहीत, एवढ्या असतात. पुढे दोन लांब नाग्या व मधल्या जबड्यात लहान काटेरी दात असतातच. असंख्य गोलाकार तुकड्यांनी यांचे शरीर बनते व प्रत्येक तुकड्याला पायांच्या दोन जोड्या असतात. सेंटीपीड वेगाने नागमोडी वळणे घेत हालचाल करतात, तर मिलीपीड सावकाश पण सरळ जात राहतात. सेंटीपीडना खायला प्राणिज् व वनस्पतीज दोन्ही पदार्थ चालतात. मिलिपीड शक्यतो वनस्पतीज अन्नावर जगतात. त्यांचा एकूण जीवनकाळही कमी म्हणजे जेमतेम वर्ष दोन वर्षांचाच असतो. पावसाळ्याच्या दिवसांत त्यांचे प्रजनन व पुनरुत्पादन होते. म्हणूनही या काळात त्यांची संख्या वाढल्याने वावर जमिनीवर होत असावा. या काळात अनेकदा हे पैसे जोडीजोडीने एकमेकांना पाठीवर घेऊन हिंडतानाही दिसतात. असंख्य पायांचा उपयोग मुख्यत: जमीन उकरताना, बिले करताना, ती भुसभुशीत करण्यासाठी केला जातो. मिलिपीड हे निरुपद्रवी, पण उपयोगी प्राणी असून संधिपाद या संघात मोडतात. मिलिपीडचा शब्दश: अर्थ हजार पायांचा प्राणी, तर सेंटिपीड म्हणजे शंभर पायांचा. प्रत्यक्षात मात्र या दोहोंना खूपच कमी पाय आढळतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*SP - Superintendent of Police*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःला लपविण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे दुसऱ्यावर टीका करणे हे होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचा खंड कोणता ?२) युरोप खंडातील सर्वात लहान देश कोणता ?३) युरोप खंडातील एकूण देश किती आहेत ?४) युरोप खंडातील सर्वात लांब नदी कोणती ?५) युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत कोणता ? *उत्तरे :-* १) युरोप २) व्हॅटिकन सिटी ३) ५० देश ४) व्होल्गा नदी ( ३,५३१ किमी ) ५) माउंट एल्ब्रस ( ५,६४२ मी. )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 वृषाली वानखडे, साहित्यिक, अमरावती👤 नंदकिशोर सोवनी, साहित्यिक, पुणे👤 साई पाटील, धर्माबाद👤 ओमसाई गंगाधर सितावार👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद👤 योगेश ईबीतवार, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥१॥ वाट पाहतांना भागले लोचन । कठिणच मन केलें तुवां ॥२॥ ऐकिली म्यां कानीं कीर्ति तुझी देवा । उठलासे हेवा त्याचि गुणें ॥३॥ अनाथ अन्यायी काय मी करीन । दयावंत खूण सांगसी तूं ॥४॥ नामा म्हणे आस पूर्ण कीजे देवा । रूपडें दाखवा नेटें पाटें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या माणसाचे जसे विचार असतात त्याच प्रकारचा स्वभाव सुद्धा बरेचदा आढळून येतो. म्हणूनच म्हणतात की, स्वभावाला औषध नसते.त्या स्वभावाला कोणीही बदलवू शकत नाही मात्र ज्या माणसाचे नकारात्मक विचार असतील तर त्या माणसात सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न केल्याने थोडेतरी परिवर्तन येऊ शकते.कारण बरेचदा असे होते की, काही माणसं परिस्थितीमुळे चिंतेत राहून त्या प्रकारे वागत असतात तर काहींच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात म्हणून एकदा तरी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासाला तडा*एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. शामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा शाम जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्हणाला,"मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का," रामला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्हणाला," अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले." यावर राम शांतपणे शामला म्हणाला," मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे"*तात्पर्य :- गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 डिसेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1HDXe7T8Vu/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛑 *_ या वर्षातील ३६२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर* *१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.**१९४९: इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४५: २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.**१९११: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.*🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: खेमचंद गणेश पाटील -- लेखक, संपादक**१९८७: गिरिजा ओक -- मराठी अभिनेत्री**१९७९: देवा गोपिनाथ झिंजाड -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९७९: हबीब भंडारे -- प्रसिद्ध लेखक व कवी**१९६९: आश्लेषा महाजन -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६७: संध्या विजय दानव -- लेखिका**१९६६: किरण अग्रवाल -- अकोला लोकमत आवृत्तीचे कार्यकारी संपादक**१९६५: प्रा. सुभाष भिकाजी मगर -- कवी**१९६५: सलमान खान -- प्रसिद्ध चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता* *१९५४: जगदीश छोटू देवपूरकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४६: रामचंद्र विष्णू खाकुर्डीकर -- लेखक**१९४४: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७ )**१९३८: आशा भालचंद्र पांडे -- मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू भाषेत लेखन करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका, महाराष्ट्रतील पहिली गझलकार, अध्यक्षा साहित्य विहार संस्था , नागपूर**१९३६: सुधीर देव -- कवी, माझा ग्रंथसंग्रह’ योजना (माग्रस) या नावाच्या वाचक चळवळीचे संस्थापक (मृत्यू:२३ ऑक्टोबर २०२० )**१९२८: निर्मला गोपाळ किराणे -- जुन्या पिढीतील लेखिका (मृत्यू: २३ सप्टेंबर २०२२ )**१९२७: सुमती देवस्थळे -- चरित्रकार (मृत्यू: २२ जानेवारी १९८२ )**१९२७: बाळ गंगाधर देव -- लेखक* *१९२३: श्री. पु. भागवत -- संपादक आणि प्रकाशक (मृत्यू: २१ ऑगष्ट २००७ )**१९१७: निर्मला वसंत देशपांडे -- कवयित्री, कादंबरीकार (मृत्यु: १ मे २००८ )**१९०४: वसंत शांताराम देसाई -- नाटककार, समीक्षक, कादंबरीकार,चरित्रकार (मृत्यु: २३ जून १९९४ )**१८९२: रघुनाथशास्त्री मोरेश्वर पटवर्धन -- ज्योतिष्याभ्यासक, ग्रंथकार (मृत्यू: १९ डिसेंबर १९६८ )* *_१८९८: डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षण प्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(मृत्यू: १० एप्रिल १९६५ )_**१८२२: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५ )**१७९७: मिर्झा गालिब – उर्दू शायर (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९ )**१६५४: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५ )**१५७१: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३० )* 🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: विकास सबनीस -- प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार (जन्म: १२ जुलै १९५० )**२००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या (जन्म: २१ जून १९५३ )**१९९७: मालती पद्माकर बर्वे -- सुगम संगीत क्षेत्रात कीर्ती मिळविणाऱ्या ज्येष्ठ गायिका (जन्म:१९ एप्रिल १९३० )**१९७२:लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२३ एप्रिल १८९७)**१९६५: देवदत्त नारायण टिळक -- मराठी लेखक( जन्म: १८९१ )**१९२३: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (जन्म: १५ डिसेंबर १८३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *Email : chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवनात कुटुंबाचे महत्व सांगणारा लेख ..... *आयुष्याची संध्याकाळ* ......... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमरावतीच्या करीना थापा सह देशभरातील 17 बालकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात 'मीट द प्रेस' कार्यक्रमात व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तब्बल एक तास चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेस उत्साहात सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वयंघोषित करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागते, मुख्य प्राप्तिकर आयुक्त सतीश शर्मा यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या, यात चार खेळाडूंचे अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *संमोहन* 📙 जादूगाराचे प्रयोग कधी पाहिले असतील, तर संमोहनाबद्दल प्राथमिक माहिती नक्कीच कायमची डोक्यात असेल. स्टेजवर बोलावलेल्या माणसाला किंवा जादूगाराच्या मदतनिसाला संमोहित केल्यानंतर ज्या काही आश्चर्यकारक गोष्टी घडू लागतात, त्या विसरणे कोणाही सामान्य माणसाला शक्य होत नाही. ठराविक आज्ञांचे बिनचूक पालन करणे, ज्या गोष्टी तो माणूस एरवी करायला धजावणार सुद्धा नाही अशा गोष्टी बेधडकपणे कसलीही भीती न बाळगता करणे, ज्या बाबींबद्दल कधी ऐकलेही नाही त्यांची संगतवार माहिती देणे वगैरे कामे संमोहित माणसाकडून जादुगार करून घेतो. त्या क्षणी खरे म्हणजे जादूगार जादूगार नसून संमोहित केलेल्या माणसाच्या मनावर पूर्ण ताबा मिळवलेला ताबेदारच असतो.जागृतावस्था व निद्रावस्था या दोन अवस्था कोणीही पाहू शकतो किंवा स्वतः अनुभव शकतो. यांमधील मुद्दाम निर्माण केलेली कोणाच्या तरी आदेशातून उद्भवलेली, अर्धवट जागृत व अर्धवट निद्रावस्था म्हणजे हिप्नाॅसिस. एखाद्या अधिकारी व तज्ज्ञ व्यक्तीने समोरच्याला स्वतःच्या कृतीतून, नजरेतून, बोलण्यातून दिलेल्या संदेशांमुळे समोरची व्यक्ती या अर्धवट निद्रिस्तावस्थेत जाते. या अवस्थेत त्यांचा शारीरिक व मानसिक संवेदनांवर जवळपास पूर्ण नियंत्रण या तज्ज्ञ व्यक्तीचे असते. जशा आज्ञा दिल्या जातील, तशी संमोहित व्यक्ती वागत असते. उदारणार्थ, संमोहित व्यक्तीला जर तज्ज्ञाने आज्ञा केली की आता तू एखाद्या गायकाची तंतोतंत नक्कल करणार आहेस, तर गाणे कधीही न म्हटलेली संमोहित व्यक्ती जमेल तसे गाणे म्हणू लागते. आज फार थंडी पडली आहे, असे सांगितल्यावर अक्षरश: कुडकुडू लागते. अशा विविध आज्ञापालनातून जादूगार संमोहित व्यक्तीकडून मजेमजेच्या गोष्टी करवुन घेत असतो. या अर्धवट निद्रावस्थेतुन योग्य आज्ञा दिल्यावर संमोहित व्यक्ती पुन्हा जागी होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे झालेल्या गोष्टींबद्दल म्हणजेच अर्धवट निद्रावस्थेत स्वतः केलेल्या कृतीबद्दल तिला काहीही आठवत नसते.हिप्नाॅटिझमचा वापर इंग्लिश सर्जन जेम्स ब्रेड यांनी एकोणीसाव्या शतकात केला. याआधी १७६० साली फ्रान्स मेस्मेर या ऑस्ट्रियन डॉक्टरने मंत्रमुग्धविद्या किंवा मेस्मेरिझमचा वापर केला होता. यातूनच हिप्नाॅसिसचा उगम झाला असे मानले जाते. जीन मार्टिन चारकॉट व सिग्मंड फ्रॉइड यांनी याचा वापर मुख्यतः हिस्टेरिया या मनोविकारांवर उपचार म्हणून सुरू केला. गुंगी, त्यानंतर शरीरात एक ताठरपणा व त्यानंतर झोपेत चालणे व अन्य हालचाली या तीन टप्प्यांतून हिप्नाॅसिसची अवस्था जाते असे मानले जाते. मात्र काही काळानंतर फ्राॅइडनी हा वापर थांबवला.भारतात पण हिप्नाॅसिस किंवा संमोहनविद्या ही फार पुरातनकाळापासून ज्ञात आहे. हिचा वापर मुख्यत: ज्या व्यक्ती दुसऱ्यावर पूर्ण विश्वास टाकतात, सहजगत्या आज्ञापालनाला तयार होतात, भोळ्याभाबडय़ा समजुतीने एखाद्याचे म्हणणे ज्यांना सहज खरे वाटू लागते, त्यांच्यावर पटकन होतो. हे लक्षात घेतले, तर संमोहन करणाऱ्याच्या अधीन होण्याची किमान मानसिक तयारी नसलेली व्यक्ती संमोहित करणे जवळपास अशक्य होते. अशांची संख्या एकूण समाजात जेमतेम २० टक्के सुद्धा नसते. संमोहन किंवा हिप्नाॅसिस ही एक मानवी मनाची अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, असे म्हणायला हरकत नाही. या प्रक्रियेला शास्त्र म्हणून मान्यता द्यायला अनेक तज्ज्ञांचा ठाम विरोध असतो; तर याउलट हिप्नाॅटिझमचे प्रयोग असतील तर जादूगाराची किमया समाजाने मनोमन मान्य केलेली असते. ही सारी गुंतागुंत काय आहे ? अशा प्रकाराला 'संमोहनावस्था' असेही म्हणतात.संमोहन हे एक मान्यता नसलेले शास्त्र आहे. त्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण देता येणे अजून जमलेले नाही. पण ज्याला संमोहित करून घेण्याची इच्छा आहे, ज्याची तशी मानसिकता आहे तो जरूर सम्मोहित होऊ शकतो. शास्त्र म्हणजे एका पद्धतीचा परिणाम सर्व लोकांवर दिसणे आवश्यक ठरते. तो इथे दिसत नाही. ज्याला स्वतःच्या मनावर दुसऱ्याचा काबू वा अंमल येऊच द्यायचा नसतो, तो संमोहित झाला आहे, असे फारच क्वचित.याचे व्यावहारिक उपयोग काही वेळा केले जातात. गुन्हेगार, मनोरूग्ण, खोटे बोलणारी निर्ढावलेली व्यक्ती यांना मनोविकारतज्ज्ञ काही औषधांच्या सहाय्याने अशीच अर्धवट सुप्त निद्रावस्था आणतात. नार्कोलेप्सी या अवस्थेत त्यांच्याशी संवादही साधला जातो. पण हे सारे औषधाच्या अमलाखाली असते. त्याचे प्रमाणीकरण अनेक चाचण्यांतून सिद्ध झालेले आहे. असे हिप्नाॅसिसबद्दल सांगता येत नसल्याने असेल कदाचित, पण या प्रकाराला वा या उपचारपद्धतीला शास्त्रज्ञांची मान्यता नाही.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BDO - Block Development Officer*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःच्या जिभेपेक्षा सावरून , धरण्यास अवघड अशी गोष्ट नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील चौथ्या क्रमांकाचा खंड कोणता ?२) दक्षिण अमेरिका खंडात एकूण किती देश आहेत ?३) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?४) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच पर्वत कोणता ?५) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती ? *उत्तरे :-* १) दक्षिण अमेरिका २) १४ देश ३) ब्राझील ४) माउंट अकोनकाग्वा ( ६,९६२ मी. ) ५) अमेझॉन नदी ( ६,८०० किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पूजा शिंपी, बागुल, साहित्यिक, नाशिक👤 विठ्ठल भाई श्रीगांधी👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय थोरपणा मिरविसी व्यर्था । खोटेपणा स्वार्थ कळों ॥१॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ । वचन यथार्थ बोल आतां ॥२॥ होसी कालिमाजीं कलिसारिखाची । भोळया भाविकाच्या भक्तिकाजा ॥३॥ नामा म्हणे माळ घातिली स्वहस्तें । करितोसि दंडवत निमित्यासी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारलं कडू ते कडूच. तुपात तळा किंवा साखरेत घोळा शेवटी आपली चव सोडत नाही. असे अनेकदा वाचण्यात किंवा ऐकण्यात येते. त्याच प्रमाणे कितीही त्यांना निरखून बघितले तरी एक ना एक तरी कारली आपली दृष्टी चुकवून जाते. सत्य सुद्धा असेच आहे. आपल्या जवळ किंवा आपल्या समोर असताना सुद्धा त्याला ओळखता येत नाही. याच चुकीमुळे बरेचदा आपल्या जीवनात अडचणी येण्याची शक्यता असते.म्हणून शक्य होईल तेवढ्या लवकर सत्य जाणण्याचा प्रयत्न करावा सोबतच सत्याला समर्पित व्हावे.भलेही सत्य कडू असेल तरीही त्याचा कधीच अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मातृभक्ती*त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले.त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहऱ्याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाहीं. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे. त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 डिसेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18fnQomyQM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ३६१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली.या लाटेने भारत,श्रीलंका,इंडोनेशिया,थायलँड, मलेशिया,मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.**१९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार**१९९२: पहिले कोकण मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे कवी मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले**१९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला**१९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.**१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.*🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शिवम पाटील -- भारतीय अभिनेता, नर्तक* *१९७२: सुनिता संदीप तांबे -- कवयित्री, लेखिका**१९६१: मिलिंद सुधाकर जोशी -- कवी, व्याख्याते* *१९६०: वृषाली विक्रम पाटील -- कवयित्री, लेखिका**१९५४: सुरेश पाचकवडे -- प्रसिद्ध कवी, कथाकार* *१९५१: प्रा. नीला विनायक कोंडोलीकर -- लेखिका**१९४९: सुरेखा भगत -- कवयित्री* *१९४८: डॉ. प्रकाश आमटे-- प्रसिद्ध समाजसेवक, लेखक, विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९४१: लालन सारंग – मराठी नाट्यअभिनेत्री, लेखिका (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०१८ )* *१९३५: डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९ )**१९३८: दत्तात्रय दिनकर पुंडे -- मराठीतील ख्यातनाम समीक्षक, भाषाभ्यासक आणि संपादक* *१९३५: रोहन भोलाल कन्हाई -- वेस्टइंडीज चा क्रिकेटपटू**१९२८: मार्टिन कूपर --- अमेरिकन अभियंता, मोबाईल फोनचे जन्मदाते* *१९२५: पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के.जी’ गिंडे – शास्त्रीय गायक,संगीतकार व शिक्षक (मृत्यू: १३ जुलै १९९४ )**१९१७: डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले.(मृत्यू: १७ जून १९९१ )**१९१४: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक, लेखक (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८ )**१९१४: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर,गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (मृत्यू: ३ जानेवारी २००० )**१९१०: पंडितराव नगरकर (गोविंद परशुराम नगरकर) -- मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट.( मृत्यू: २८ जुलै १९७७)**१८९३: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (मृत्यू: ९ सप्टॆंबर १९७६ )**१७९१: चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक,अभियंता आणि तत्त्वज्ञ,पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (मृत्यू: १८ आक्टोबर १८७१ )*🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६: कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (जन्म: १५ सप्टेंबर १९२१ )**२०००: प्रा. शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक (जन्म: ११ मार्च १९१२ )* *१९९९: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (जन्म: १९ ऑगस्ट १९१८ )**१९८९: केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक,भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक,पद्मविभूषण (१९७६) (जन्म: ३१ जुलै १९०२ )**१९७२: हॅरी एस.ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ मे १८८४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाचा जन्म झाल्यापासून ते अंतिमसंस्कारपर्यंतचा प्रवास*नामकरण ते अंत्यविधी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त ( 25 डिसेंबर ) त्यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीट आणि नाणे केलं जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आम्ही या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून गंभीर आहोत; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यासाठी दोन स्वतंत्र महापालिका करण्याशिवाय पर्याय नाही,  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे; पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर, लवकरच निर्णय होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 67 प्रवाशांसह विमान कोसळलं;  25 जणांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मंत्री सरनाईकानी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुगुणी मेथी*मराठीत मेथी, कानडीत मेंथ्या, तमिळ मध्ये वेंथायम आणि तेलगूत मेंथुलू विविध नावांनी ओळखली जाणारी मेथी आणि ह्या भाजीच्या बीया मेथ्या अगदी इडली पासून ते खाकरयापर्यंत विविध खाद्यपदार्थात वापरले जातात. मेथ्यांचा उपयोग काही पाचक औषधांमध्ये केला जातो तर बाळंतीणीला दुध येण्यासाठीही केला जातो. हिरव्या मेथीचा उपयोग परोठया पासून ते भाजी पर्यंत केला जातो.प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात सहजरित्या उपलब्ध होणारी मेथी किती बहुगुणी आहे, हे आपल्याला माहीत देखील नाही. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे हे अमूल्य आहेत. मेथीमुळे केसात होणारा कोंडा कमी होतो. त्याचबरोबर चेहरा, पोट आणि मूतखडा यासारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. ही मेथी आपण केसांना लावल्यानंतर कोंडा सुद्धा कमी होतो. मेथीचे दाणे केसांच्या मुळाला मजबूत करून डॅमेज केसांना पुनर्जीवित करतात. यात प्रोटीन असून मेथीच्या दाण्यांचा जर डाइटमध्ये यांचा समावेश केला तर केस हेल्दी आणि सुंदर होतात. मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते. मेथीचे सेवन केल्यामुळे किडनी चांगली रहाते. मूतखडासाठी मेथी हा फायदेशीर उपाय मानला जातो. पिंपल्स आणि ब्लॅकहेड ट्रीडमेंटसाठी मेथीचे दाणे फायदेशीर असतात. मेथीच्या दाण्यात फाइबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने एक्सट्रा कॅलरी बर्न होतात. मेथीच्या दाण्याचे सेवन केल्यानंतर पोट दुखणे आणि जळजळ कमी होते. त्याच बरोबर पचन क्रिया देखील मजबूत होते. मेथी या पालेभाजीची पाने, बिया (मेथ्या), तसेच सुकवलेली मेथी म्हणजेच कसुरी मेथी या सर्वांचा स्वयंपाकात उपयोग केला जातो. मेथी व तिच्या बिया या अत्यंत औषधी समजल्या जातात. मधुमेही लोकांना मेथीचा होणारा उपयोग हा सर्वश्रुत आहेच. मधुमेहींनी गव्हाच्या पिठात मेथ्यापूड घातल्यास रोजच्या पोळ्यांमधून मेथीचा फायदा त्यांना मिळू शकतो. साधारणत: गव्हाच्या ५ किलो पिठात १०० ग्रॅम मेथ्यांची पूड घालावी. हे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवताही येते. वरणासाठी डाळ शिजवतानाही १०-१२मेथ्यांचे दाणे त्यात घालावे. मेथ्या या उत्तम प्रथिनयुक्तु व यकृत संरक्षक आहेत. लिव्हरच्या पेशींना सक्षम करण्यासाठी यांचा उपयोग होतो. मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. संशोधन सांगते, की मेथी ही टाइप-1 व टाइप-2 अशा दोन्ही प्रकारच्या मधुमेहात उपयुक्तस ठरते. मेथीमध्ये इन्सुलिनचे कार्य वाढवण्याचे गुणधर्म आहेत. मेथी ही स्तनांचा व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी करते, असे तज्ज्ञ मानतात. जी मंडळी स्थूल आहेत व ज्यांचे मांसाहार खाणे अधिक आहे अशांनी मेथीसारख्या पालेभाज्या रोजच्या खाण्यात ठेवाव्यात. तोंड येणे, घसा बसणे अशा तक्रारींमध्ये मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम लाभतो. मातांना दूध चांगले येण्यासाठी मेथीची भाजी व बाजरीची भाकरी देण्याची बऱ्याच प्रांतांत पद्धत आहे. मेथी ही क्षार व जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असल्याने गर्भवती, तसेच बाळंतिणींना ही भाजी अत्यंत हितावह आहे. मेथी सौंदर्यवर्धक देखील आहे. चेहऱ्यावर तारुण्यपीटिका किंवा ब्लॅकहेड्‌स अधिक प्रमाणात येत असल्यास मेथीच्या पानांची पेस्ट चिमूटभर हळद घालून त्याचा चेहऱ्यास पॅक लावावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी दुधात मेथीच्या पानांची पेस्ट एकत्र करून चेहऱ्यास लावावे. केसांचे गळणे कमी करण्यासाठी घरी काढलेले नारळाचे दूध व मेथीच्या पानांची पेस्ट एकत्र करून आठवड्यातून दोन वेळा केसांना लावल्यास फायदा मिळतो. आहारामध्ये मेथ्यांचे प्रमाण वाढवल्यास केसांच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येतो. 1 वाटी मेथीच्या सुक्याे भाजीत 58 उष्मांक व 2 ग्रॅम चरबी असते. मेथी हि आरोग्यवर्धक वनस्पती आहे. ती पाने व बिया स्वरुपात वापरली जाते. मेथीची पाने व मोड आलेले मेथी दाने भाजी म्हणून वापरत येते. कसुरी मेथी या नावाने ओळखली जाणारी मेथी वाळलेली सुगंधित पाने विविध पदार्थात वापरली जातात. मेथीचे उत्पादन अनेक देशात घेतले जाते. भारतात मुख्यत्वे मेथीचे उत्पादन राजस्थान तेथे सर्वाधिक घेतले जाते. लोणची, रसभाज्यात वापरली जाणारी मसाले यात मुख्यत्वे मेथीचा वापर केला जातो. अनेक भागात मेथीदाणे हे मधुमेहावारचे औषध म्हणून वापरले जाते. प्रसूती नंतरच्या काळात अर्भकाला दुध पाजणार्या स्त्रियांच्या दुधात वाढ व्हावी म्हणून त्यांच्या आहारात मेथी दाण्याचा वापर केला जातो. मेथी औषधी वनस्पती असल्यामुळे ती अक्खी किंवा चूर्ण स्वरुपात वापरली जाते. अनेकदा आजारी व्यक्तीच्या तोंडाला चव आणण्यासाठी विविध पदार्थात वापरली जाते. मेथी वजन कमी करण्याचे उत्तम साधन आहे. रात्री अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास वजन कमी होते. कंबर दुखीवर चांगले औषध आहे. थंडीच्या दिवसात डिंकाच्या लाडूमध्ये मेथीचा वापर करतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*DGP - Director General of Police*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड कोणता ?२) उत्तर अमेरिका खंडात एकूण देश किती आहेत ?३) उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?४) उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती ?५) उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच पर्वत कोणता ? *उत्तरे :-* १) उत्तर अमेरिका २) २३ देश ३) कॅनडा ४) मिसूरी ( ३,७६७ किमी ) ५) माउंट मॅककिन्ले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कपिल जोंधळे👤 नागेश्वर राजेश्वर डोमशेर, धर्माबाद👤 आकाश सरकलवाड👤 नरसिंग जिड्डेवार, शिक्षक, भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय तुज देवा आलें थोरपण । दाविसी कृपण उणें पुरें ॥१॥ पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी । गोकुळाभीतरीम खेळ मांडी ॥२॥ हलाहल शांत करी तत्क्षण । अमृतजीवन नाम तुझें ॥३॥ तुझें नाम सर्व सदा गोपाळासी । नामा म्हणे यासी काय जालें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीची चूक झाली असेल तर पुन्हा, पुन्हा त्याच चुकांविषयी त्याला बोलून हिनावून सोडणे किंवा अपमानीत जीवन जगायला लावणे हे,शहाणपणाचे लक्षणे नव्हेत .माणूस म्हटल्यावर प्रत्येकांच्याच हातून चुका होत असतात हे,कधी काळी मान्य सुध्दा करायला शिकले पाहिजे. आणि त्यावर योग्य रितीने मार्गदर्शन करून त्या व्यक्तीला ती चूक लक्षात आणून देण्यासाठी माणुसकीच्या नात्याने ती जबाबदारी पार पाडावी. असे एक महान कार्य केल्याने मनाला विशेष समाधान मिळेल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अहंकारी राजाला धडा*एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस- याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वान विचारले, "बोला पंडीत महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोने-नाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या" पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला, "राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही." पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले," महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस- याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार." एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला.*तात्पर्यः- जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 डिसेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15L7eadvnp/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔔 *_राष्ट्रीय ग्राहक दिन_* 🔔••••••••••••••••••••••••••••••••• 🔔 *_ या वर्षातील ३५९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔔 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔔•••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.**१९८६: लोकसभेने ग्राहकांच्या संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदा केला**१९७९: सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.**१९५१: लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.**१९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.**१९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.**१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा**१९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.**१७७७: कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.*🔔 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔔 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: पियुश चावला -- भारतीय क्रिकेटपटू**१९८१: शीतल येनस्कर -- लेखिका**१९७७: प्रा. विवेक कडू -- लेखक**१९७७: प्रा. डॉ. आशुतोष रमेश पाटील -- प्रसिद्ध लेखक, संपादक**१९७६: प्रा. डॉ. मोहन राजाराम कापगते -- लेखक* *१९७४: चंदणा सोमनाथ सोमाणी -- कवयित्री, लेखिक* *१९७२: किरण काळे -- कवी**१९६६: असित कुमार मोदी -- भारतीय निर्माता निर्देशक**१९६४: कुसुम अलाम -- प्रसिद्ध कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या* *१९६२: उषा प्रदीप भोपाळे -- कवयित्री**१९५९: अनिल कपूर – प्रसिद्ध हिन्दी चित्रपट कलाकार**१९५७: प्रिती सप्रू -- भारतीय अभिनेत्री**१९५५: अनिल शांताराम पाटील -- प्रसिद्ध लेखक**१९४९: कुलदीप पवार -- मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते (मृत्यू: २४ मार्च २०१४ )**१९४७: प्रतिभा जोशी (मंगला पोहनेरकर) -- कवयित्री, जेष्ठ लेखिका* *१९४६: श्रीनिवास जगन्नाथ भणगे -- प्रसिद्ध कथाकार, नाटककार**१९३३: संत गजानन देशपांडे -- लेखक**१९२९: डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी -- मराठी लेखक, गझलचे अभ्यासक, संगीततज्ज्ञ (मृत्यू: २२ जुलै २०११)**१९२४: दत्ता भट --- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक (मृत्यू: १ एप्रिल १९८४ )**१९२४: मोहम्मद रफी – सुप्रसिद्ध पार्श्वगायक, पद्मश्री (१९६७) (मृत्यू: ३१ जुलै १९८० )**१९२३: सुमतीबाई सुकळीकर -- समाजसेविका,लेखिका (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०११ )* *१९०९: रघुवीर जगन्नाथ सामंत -- कथाकार, कादंबरीकार (मृत्यु: १७ सप्टेंबर १९८५ )**_१८९९: पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक.’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशन क्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले (मृत्यू: ११ जून १९५० )_**१८८८: यशवंत सूर्यराव सरदेसाई -- कादंबरीकार (मृत्यू: ८ सप्टेंबर १९५३ )* *१८८५: मोरेश्वर सखाराम मोने -- मराठी ग्रंथकार(मृत्यू: १५ एप्रिल १९४३ )**१८८०: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९ )**१८६४: विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक.(मृत्यू: १९ आक्टोबर १९३४ )**१८१८: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (मृत्यू: ११ ऑक्टोबर  १८८९ )* 🔔 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔔 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: भास्कर लक्ष्मण भोळे -- महाराष्ट्रातील विवेकवादी विचारवंत,राजकीय विश्लेषक आणि प्रबोधनाचे भाष्यकार (जन्म: ३० सप्टेंबर १९४२ )**२००५: भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री,दिग्दर्शक,निर्माती, गीतकार,संगीतकार,गायिका व लेखिका (जन्म: ७ सप्टेंबर १९२५ )**२०१०: चित्रा जयंत नाईक-- भारतीय शिक्षणतज्ज्ञ,विचारवंत आणि समाजसेविका (जन्म: १५ जुलै १९१८ )**१९८७:एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे माजी मुख्यमंत्री (जन्म: १७ जानेवारी १९१७ )**१९७७: नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (जन्म: २३ मार्च १८९८ )**१९७३: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (जन्म: १७ सप्टेंबर १८७९ )**१५२४: वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला.(जन्म: १४६९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज परमपूज्य साने गुरुजी यांची 125 वी जयंती त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *विद्यार्थीप्रिय : साने गुरुजी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाचवी व आठवी वर्गात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही, केंद्रीय शिक्षण मंडळाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दालनापाठोपाठ मंत्र्यांना बंगल्यांचेही वाटप:विधानसभा अध्यक्षांना शिवगिरी, सभापतींना ज्ञानेश्वरी; चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता श्याम बेनेगल यांचे मुंबईत निधन, ते 91 वर्षाचे होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गरीबांसाठी वर्षभरात 19 लाख 66 हजार घरे देणार; केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्राला दिलेल्या घरांच्या भेटीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती; आंतरराष्ट्रीय प्रवास होणार आणखी सुलभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आर. आश्विन च्या जागी तनिष कोटनियची निवड, मेलबर्न कसोटीत पदार्पण करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *समुद्रपाण्याचा औद्योगिक वापर व लाटांपासून ऊर्जा* 📙 समुद्रातून काय मिळते, या प्रश्नाचे खरे उत्तर द्यायचे झाले तर 'काय मिळत नाही ?' असेच द्यावे लागेल. समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवता येते व मासेमारी करून मासे मिळवता येतात, याच गोष्टी फक्त आपल्या डोळ्यासमोर येतात. या दोन गोष्टी अन्नपदार्थ म्हणून तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मिठाशिवाय सारे अन्नच आर्णी बनते, तर मासे हेच अनेकांचे प्रमुख अन्न आहे. तसेच लाटांपासून ऊर्जा सुद्धा मिळवता येते.पण सध्याच्या औद्योगिक युगात यापुढे जाऊन समुद्राच्या पाण्यापासून काही महत्त्वाच्या गोष्टी निर्माण केल्या आहेत. मिठाच्या द्रावणातून विजेचा प्रभाव सोडला तर तीन उपयुक्त गोष्टींची आपोआप निर्मिती होते : क्लोरीन हा वायू, हायड्रोजन हा वायू व सोडियम हायड्रॉक्साइड ही अल्कधर्मी पावडर. त्यांची निर्मिती झाल्यावर पुढच्या टप्प्यात हायड्रोजन व क्लोरीनच्या संयोगातून हायड्रोक्लोरिक अॅसिड या अतिशय आवश्यक औद्योगिक आम्लाची निर्मिती होते. क्लोरीन व सोडियम हायड्रॉक्साइडचा संयोग करून सोडियम हायपोक्लोराइटचीही निर्मिती करता येते.आयते समुद्राचे पाणी, समुद्रलाटांपासून मिळवलेली वीज व दोन्हींचा वापर करून मुद्दाम बांधलेल्या टाक्यांत या पाच रासायनिक गोष्टींची जगभर टनावर निर्मिती केली जाते. क्लोरीनचा वापर जवळपास प्रत्येक रासायनिक कारखान्यात तर लागतोच; पण याशिवाय सर्व कापड उद्योगाला ब्लीचिंगसाठी क्लोरीनची खूपच गरज भासते. न्यूक्लिअर फ्यूजन साध्य झाल्यावर भविष्यकाळात समुद्रातील पाण्यातून हेवी वॉटर काढून त्यातील ड्युटेरियमपासून फ्यूजन तंत्रावर हिलियम तयार करून ऊर्जानिर्मिती करता येईल.याशिवाय अलीकडेच अरब देशातून, पश्चिम आशियात शुद्ध पाणी तयार करण्यासाठी समुद्रपाण्याचा वापर केला जातो. त्याला खूपच खर्च येतो. पण पाण्याची प्रचंड कमतरता व पैशाची उदंडता यांमुळे त्यांना हे शक्य झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी समुद्रपाणी शुद्ध करून, ऊर्ध्वपातन करून सोडवला आहे. खारट पाणी उपयोगात आणता येते, ते असे!पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्राला उधाण येते. एरवी शांत स्थितप्रज्ञासारखा असलेला समुद्र यावेळी अतिशय भीषण वाटतो. पाच ते सात मीटर उंचीच्या पाण्याच्या लाटा बेभानपणे किनाऱ्यावर आदळतात. किती प्रचंड ताकद असते त्या लाटांत ? झाडे, इमारती, खडक यापैकी मध्ये येणारे काहीही गिळंकृत करू शकणारी ही ताकद जर ऊर्जानिर्मितीला वापरता आली तर ?या प्रश्नावर अनेक वर्षे काम चालू आहे. सध्या दोन प्रकारे समुद्रालाटांपासून ऊर्जा मिळवली जाते. समुद्रावर काही वेगळ्या प्रकारचे तराफे तरंगत ठेवलेले असतात. स्टीफन सॉल्टर या शास्त्रज्ञांनी हे तराफे तयार केले म्हणून त्यांना सॉल्टरडक असे म्हणतात. लाटांच्या जोरामध्ये तराफा लाटेवर उचलला जातो. लाट ओसरली की वजनामुळे तो खाली जातो. या क्रियेमध्ये पाण्याच्या दाबावर तराफामध्ये बसवलेली जनित्रे फिरतात व वीज निर्माण केली जाते.दुसऱ्या प्रकारात भरती ओहोटीच्या पाण्याच्या दोन पातळ्यांतील फरकाचा उपयोग केला जातो. खाडीच्या तोंडाशी छोटे धरण बांधून भरतीच्या वेळी पाणी आत येताना जनित्रे फिरतात, तर ओहोटीच्या वेळी आत घेतलेले पाणी परत सोडतानाही त्याच्या जोरावर जनित्र फिरतात. या प्रकारची वीजनिर्मिती केंद्रे उत्तर फ्रान्समध्ये, कॅनडात व मूरमान्स्कच्या किनाऱ्यावर रशियात गेली काही वर्षे काम करत आहेत. जरी तेथील वीजनिर्मिती फार मोठ्या प्रमाणावर नसली, तरीही कसलीही देखभाल वा पुनरावर्ती खर्च त्यात नसल्याने ती अत्यंत स्वस्त पडते व एकदा केलेला भांडवली खर्च अनेक वर्षे उपयोगी पडत राहतो, हे महत्त्वाचे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*RAW - Research and Analysis Wing*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन म्हणजे एक प्रवास आहे, नेहमी शिकत राहा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात लहान खंड कोणता ?२) जगातील एकमेव खंड असून एक देश कोणता ?३) ऑस्ट्रेलिया खंडात एकूण सार्वभौम देश किती आहेत ?४) ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती ?५) ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात उंच पर्वत कोणता ? *उत्तरे :-* १) ऑस्ट्रेलिया २) ऑस्ट्रेलिया ३) तीन - ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, पापुआ न्यू गिनी ४) मरे नदी ( २,५०८ किमी ) ५) माउंट कोसियुस्को ( २,२२८ मी. )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 निर्मला बोधरे, शिक्षिका, पुणे👤 रणजित बाळासाहेब गुंजाळ, पत्रकार👤 विठ्ठलराव मुजळगे, शिक्षक, धर्माबाद👤 शिवकुमार शिंदे👤 योगेश चोपडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय गुण दोष माझे विचारिसी । आहे मी तों राशी अपराधांची ॥१॥ अंगुष्ठापासोनी मस्तकापर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ॥२॥ स्वप्नीं देवा तुझी नाहीं घडली भक्ति । पुससी विरक्ति कोठुनियां ॥३॥ तूंची माझा गुरु तूंची तारी स्वामी । सकळ अंतर्यामीं गाऊं तुज ॥४॥ नामा म्हणे माझें चुकवीं जन्ममरण । नको करूं शीण पांडुरंगा ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकाराचा जेव्हा वारा लागतो आणि असत्य जेव्हा हवेहवेसे वाटायला लागते तेव्हा मात्र आपल्यात असलेले चांगले गुण हळूहळू कमी व्हायला लागतात. तरीही आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आपल्याला वारंवार संकटातून जावे लागते आणि आपण दु:खी होऊन जगत असतो. ह्या, सर्व काही गोष्टी घडून येण्यासाठी कुठेतरी आपणच जबाबदार असतो मात्र त्याचे खापर दुसऱ्याच्या मस्तकावर फोडून त्यातच वेळ वाया घालवणे योग्य वाटत असते. म्हणून पुन्हा अशी आपल्यावर वेळ येणार नाही याची आपण स्वतः च काळजी घ्यावी. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भगवान*एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚜️ *_राष्ट्रीय किसान दिन_* ⚜️••••••••••••••••••••••••••••••••• ⚜️ *_ या वर्षातील ३५८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚜️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚜️•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.**२०००: कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी**१९७०: दी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.**१९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ.मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.**१९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४७: अमेरिकेतील ’बेल रिसर्च लॅब्ज’ या संशोधन संस्थेने ’ट्रॅन्झिस्टर’ या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधे होणार्‍या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.**१९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.**१९२१: शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.**१९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो (इजिप्त) येथे आगमन.**१८९३: ’हॅन्सेल अ‍ॅंड ग्रेटेल’ या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.* ⚜️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚜️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: कुणाल मदन हजेरी -- लेखक* *१९७५: कल्पना मलये -- बाल साहित्य निर्मिती* *१९६४: श्रीपाद कोठे -- लेखक, कवी* *१९५९: संजय व्यंकटेश संगवई -- मराठी लेखक, पत्रकार, संपादक, माध्यमतज्ज्ञ, माध्यम चिकित्सक (मृत्यू: २९ मे २००७ )**१९५९: प्रतिमा जोशी -- महाराष्ट्र टाइम्सच्या माजी पत्रकार, मराठी कथाकार**१९५७: विवेक आपटे -- लेखक, गीतकार**१९५६: उज्ज्वला जोग -- भारतीय मराठी अभिनेत्री**१९५४: नरेंद्र रघुवीर बोडके -- कवी, लेखक, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: ७ जानेवारी २०१२ )**१९४५: आनंद श्रीधर सांडू -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९४५: प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे -- संत साहित्याचे गाढे अभ्यासक(मृत्यू: ८ ऑगस्ट २०२१ )**१९४१: पंडित माधव गुडी -- एकहिंदुस्थानी शास्त्रीय गायक(मृत्यू: २२ एप्रिल २०११ )**१९२५: सुरिंदर कपूर-- भारतीय चित्रपट निर्माते (मृत्यू: २४ सप्टेंबर २०११ )**१९२३: भास्कर आनंद पांढरीपांडे -- कवी, लेखक* *१९०२: चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १९८७ )**१८९७: कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार (मृत्यू: २४ जुलै १९७८ )**१८७४: डॉ. वामन गणेश देसाई -- भारतीय रसशास्त्र , लेखक (मृत्यू: २६ मे १९२८ )**१८५४: हेन्‍री बी.गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ एप्रिल १९२६ )* ⚜️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚜️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: नाना चुडासामा -- मुंबईचे माजी नगरपाल तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध विषयांवर मर्मभेदी भाष्य करणार व्यतीमत्व (जन्म:१७ जून १९३३)**२०१२: आनंद मोरेश्वर अभ्यंकर -- मराठी चित्रपट, नाटके व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता (जन्म: २ जून १९६३ )**२०१०: के. करुणाकरन – माजी केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक (जन्म: ५ जुलै १९१६ )**२०१०: ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक.(जन्म: २१ मे १९२८ )**२००८: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (जन्म: ३१ जानेवारी १९३१ )**२००४: नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान (जन्म: २८ जून १९२१ )**२०००: ’मलिका-ए-तरन्नुम’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ )**१९९८: रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते,पद्मश्री (१९८५),खासदार (१९५२) भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ )**१९९६: वसंत लाडोबा सावंत -- कवी, समीक्षक(जन्म:११ एप्रिल १९३५)**१९७९: दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार (जन्म: ४ जून १९०८ )**१९६५: गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक,’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (जन्म: २ जुलै १८८० )**१९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक,शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक (जन्म: २ फेब्रुवारी १८५६ )**१८३४: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय किसान दिनानिमित्त**शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .....!*भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र त्याच्याच पदरात धोंडा का पडतो? हे एक न सुटणारे कोडे आहे. ................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवेत मधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना खासगी सचिव आणि स्टाफ नेमता येणार, वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नेमणुका रोखण्यासाठी प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडीताईकडे सरकारचे दुर्लक्ष, तळमळीने काम करूनही मानधन रखडलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह 17 विधेयक मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *Weather Report : पुढील 5 दिवस यलो अलर्ट; थंडी ओसरुन पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा ठोठावला दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, जोस बटलर करणार संघाचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सजीवांची उत्पत्ती* 📙‘सजीवाचा जन्म पृथ्वीवर कसा झाला असेल ?' या प्रश्नाने अनेक वर्षे असंख्य शास्त्रज्ञांची झोप उडवलेली आहे. हे शास्त्रज्ञ विविध क्षेत्रात काम करणारे आहेत, पण या प्रश्नाचे नेमके उत्तर आजही ठामपणे देता येत नाही. मात्र एक गोष्ट आता स्वच्छपणे स्पष्ट होऊ लागली आहे. सजीव म्हणजे काय ? तर स्वतःच प्रतिकृतीप्रमाणे नवीनास जन्म देण्याची शक्ती असलेली ऑर्गेनिक गोष्ट वा सेंद्रिय वस्तू. सर्व सजीव हे मुख्यतः प्राणवायू, हायड्रोजन, नायट्रोजन व कार्बन यांच्या अणूंनी बनलेले असतात, हेही आता कळलेले आहे. जसजसे या सजीवांच्या शरीरातील पेशींबद्दल ज्ञान वाढत जाऊ लागले, तसतसे एका ठाम निष्कर्षाला सर्व शास्त्रज्ञ येऊन पोहोचले. सर्व जगातील डीएनएचा रेणू किंवा डीऑक्सी रायबोन्यूक्लिक अॅसिडचा रेणू हा सजीवांच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे; कारण स्वतःसारखीच तंतोतंत निर्मिती करण्याची क्षमता या डीएनएच्या रेणूतच आहे.डीएनएचा रेणू म्हणजे थायमिन व अॅडेनिन, सायटोसीन व ग्वानिन यांसारख्या रासायनिक जोड्यांनी बनलेली सलग पिळाची मालिकाच असते. एखाद्या शिडीला पीळ दिल्यावर कसे दिसेल, तशी ही मालिका दिसते. यालाच डीएनए हेलिक्स असा शब्द वापरला जातो. रासायनिक प्रथिनांच्या या जोड्या जेव्हा उलगडतात, तेव्हा प्रत्येक जोडीतील एक भाग दुसऱ्या भागाची उपलब्ध द्रव्यातून निर्मिती करतो. यातूनच चक्क दोन प्रतिकृती निर्माण होत जातात. डीएनएच्या उलगड्यातुन नवनिर्मिती होत जाते व ती अगदी तंतोतंत मूळच्या गोष्टीची प्रतिकृतीच असते. जेव्हा हा शोध लागला. तेव्हा सजीवांच्या उत्पत्तीचे कूट सोडवण्याच्या दृष्टीने एक मोठा पल्ला गाठला गेला.पृथ्वीच्या निर्मितीनंतर डीएनए निर्माण होण्यासाठी आवश्यक अशी सर्व सेंद्रिय द्रव्ये उपलब्ध होतीच. जेव्हा अल्ट्रा व्हॉयलेट किरण अशा द्रव्यसमुच्चयातून जातात, तेव्हा किंवा विजेचा प्रवाह या द्रव्यसमुच्चयातून जातो, तेव्हा विविध स्वरूपाची सेंद्रिय वा ऑर्गेनिक संयुगे निर्माण होतात. असेच संयुग म्हणून डीएनए निर्माण झाला असावा, असा सध्याचा कयास आहे. यालाच 'ओपॅरीन व हाल्डेन यांची सजीव उत्पत्तीची थेअरी' म्हणतात. पहिल्या डीएनएची निर्मिती झाल्यानंतरचे काम खूपच सुकर होते. या डीएनएचे पुनरुत्पादनाचे म्हणजेच स्वतःची प्रतिकृती करायचे काम जोराने सुरू झालेले होतेच. यातूनच प्रथम प्राणवायूशिवाय वाढणारे जीवाणू निर्माण झाले असावेत. या ऍनेरोबिक जीवाणूंपासून दोन वेगळ्या प्रकारच्या, प्राणवायू घेऊन वाढणार्‍या एरोबिक जिवाणूंचा जन्म झाला. एका प्रकारचे जीवाणू सूर्यप्रकाश व प्राणवायू यांचा वापर करून वाढू लागले. या प्रकारचेच पुढे वनस्पतीजीवनातील प्रकाशापासून अन्ननिर्मिती करणाऱ्या क्लोरोप्लास्टमध्ये रूपांतर झाले. दुसऱ्या प्रकारच्या जीवाणूंपासून केंद्रक असलेल्या पेशींची निर्मिती झाली.केंद्रात असलेली पेशी (Nucleated Cell) जेव्हा निर्माण झाली, तेव्हा तिच्यातून वनस्पतीय पेशी व प्राणिज पेशी असे प्रकार जन्माला आले. वनस्पती पेशींना घट्ट अशी बाह्य़ आवरणे असतात, तर प्राणिज पेशींना तसे आवरण नसते. तसेच वनस्पतीय पेशीत क्लोरोप्लास्ट हे द्रव्य असते, तर प्राणिज पेशीत ते नसते. यातूनच नंतर विशिष्ट कामे करणाऱ्या पेशींची निर्मिती होत जाऊन सजीवांचे विविध प्रकार तयार होत गेले.सजीवांची उत्पत्ती कधीची असावी ? किमान साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीचे अवशेष सध्या उपलब्ध आहेत. सजीवाच्या शरीरातील कार्बन आयसोटोप व खडकातील कार्बन आयसोटोप यांच्या निरीक्षणावरून हे निष्कर्ष काढले गेले आहेत. फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे काय ? सध्या दुसरीकडे कुठे सजीव सृष्टी असल्याचा आपल्या हाती तरी पुरावा आलेला नाही‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*IMEI - International Mobile Equipment Identity*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सदासर्वदा, यश कुणालाच येत नाही. जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?२) जगातील ( आशिया खंडातील ) सर्वात मोठा देश कोणता ?३) जगातील ( आशिया खंडातील ) सर्वात उंच पर्वत कोणता ?४) जगात सर्वाधिक लोकसंख्येचा खंड कोणता ?५) संयुक्त राष्ट्राच्या मते, आशिया खंडातील एकूण देश किती ? *उत्तरे :-* १) आशिया २) रशिया ३) माउंट एव्हरेस्ट ( ८,८४८ मी. ) ४) आशिया ५) ४९ देश *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मोहन सुदर्शन बारदवार, धर्माबाद👤 सार्थक सुगंधे, धर्माबाद👤 चिं. श्रीपाद हणमंलू शंकरोड, येवती👤 अभि पाटील धुप्पे👤 गंगा देवके👤 ज्ञानेश्वर ताटीकुंडलवार👤 राजू पाटील कुरुंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय केलें मागें कोणाचें तूं बरें । शेवटीं वान्नरें संग करी तें ॥१॥ संगें करूनियां हिंडे रानोरान । दशरथा खूण चुकविसी ॥२॥ काय काय तरी सांगों तुज गुण । भिल्लिणीची आण सत्य मनीं ॥३॥ सत्य मानी वाळी वशिष्ठासहित । नामा म्हणे मात ही पुरातन ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैशाने व्यवहार केला जातो. पण, आचार, विचारांची मात्र देवाणघेवाण केली जाते. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाही तर आपल्याच आपुलकीच्या माणसासोबत आपले सुख,दु:ख मनमोकळेपणाने व्यक्त केले जाते.त्यातून भलेही व्यवहार करण्यासाठी पैसे मिळत नसले तरी आपल्या मनात असलेला ताण,तणाव दूर होत असतो आणि तेच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असते.म्हणून अशाच माणसाची आपण निवड करावे जेणेकरून तो माणूस पैशाला महत्व न देता आपल्या भावनांची कदर करणारा असावा. अशा माणसाला शोधून काढण्यासाठी आपणच प्रयत्न करून बघावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *घुबड आणि टोळ*एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.तात्पर्य - आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसऱ्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 डिसेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2024/12/blog-post_18.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔮 *_गोवा मुक्ती दिन_* 🔮•••••••••••••••••••••••••••••••• 🔮 *_ या वर्षातील ३५४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔮 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔮••••••••••••••••••••••••••••••••• *२००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.**१९६३: झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.**१९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.**१९४१: दुसरे महायुद्ध - अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.**१९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.* 🔮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔮••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: संस्कृती संजय बालगुडे -- भारतीय अभिनेत्री**१९८४: अंकिता लोखंडे जैन -- भारतीय अभिनेत्री**१९७८: मनीषा कुलकर्णी अपशिंगकर -- कवयित्री**१९७६: मानव कौल -- भारतीय थिएटर दिग्दर्शक,नाटककार,लेखक,अभिनेता आणि चित्रपट निर्माता* *१९७४: रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट माजी कर्णधार व फलंदाज**१९६९: नयन रामलाल मोंगिया -- माजी भारतीय क्रिकेटपटू**१९६६:राजेश चौहान -- भारतीय क्रिकेटपटू**१९५५: प्रदीप म्हैसेकर -- प्रसिद्ध साहित्यिक**१९५४: प्रमोद मारुती मांडे -- प्रसिद्धभारतीय इतिहासकार आणि कादंबरीकार (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१७)**१९५२: प्रकाश अकोलकर -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक* *१९४८: कमल शामराव कुरळे -- लेखिका* *१९४७: गजानन भास्कर मेहेंदळे -- मराठी इतिहास अभ्यासक**१९४३: प्रा. डॉ. लीला पाटील -- शिक्षणतज्ञ, प्रसिद्ध लेखिका* *१९४२: प्रा. कुंदबाला खांडेकर -- लेखिका* *१९४०: गोविंद निहलानी -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,सिनेमॅटोग्राफर,पटकथा लेखक आणि निर्माता**१९३५: राज सिंग डुंगरपूर -- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: १२ सप्टेंबर २००९ )**१९३४: यादवराव गोविंदराव कंदकूर्तीकर -- जेष्ठ इतिहास संशोधक* *१९३४: प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती**१९३४: सुदर्शन फकीर -- भारतीय उर्दू कवी आणि गीतकार (मृत्यू: ८ फेब्रुवारी२००८ )**१९३२: विश्वास नरहर सरपोतदार -- निर्माता,वितरक (मृत्यू: १३ एप्रिल २०००)**१९२८: प्रा. चंपा मधू लिमये -- लेखिका**१९२७: प्रा. डॉ. वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे -- प्रसिद्ध कथाकार, कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक, संपादक (मृत्यु: २९ जून १९९२ )**१९२३: शालिनी अनंत जावडेकर -- लेखिका**१९१९: ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९१९ )**१९०६: लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२ )**१८९९: मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४ )**१८९४: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण, अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अशा अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले (मृत्यू: २० जानेवारी १९८० )**१८५२: अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (मृत्यू: ९ मे १९३१ )**१८४९: नारायण हरी भागवत -- निंबधलेखक, पत्रकार, चरीत्रकार (मृत्यू: एप्रिल १९०१ )*🔮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔮••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: चित्रा बेडेकर -- मराठी लेखिका (जन्म: ७ ऑगस्ट १९४६ )**२०१८: यशवंत लक्ष्मण भालकर -- मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक (जन्म: १७ एप्रिल १९५७)**१९९९: हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू,कुशल क्रीडा संघटक (जन्म: २४ मे १९३३ )**१९९७: डॉ. सुरेन्द्र शिवदास बारलिंगे – कथाकार, कादंबरीकार, तत्त्वचिंतक, ललितलेखक, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, (जन्म: २० जुलै १९१९ )**१९५६: पांडुरंग श्रीधर आपटे -- गांधिवादी लेखक (जन्म: ६ एप्रिल १८८७ )**१९२७: राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (जन्म: ११ जून १८९७ )**१९१५: अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (जन्म: १४ जून १८६४ )**१८६०: लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (जन्म: २२ एप्रिल १८१२ )**१८४८: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (जन्म: ३० जुलै १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे, तर अजितदादांकडे अर्थखातं कायम, खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री, राज्यात पुरेशी सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करा, किसान सभेची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तुळजापूर : ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माई सिंधुताई सकपाळांच्या कन्या ममता सकपाळ यांना पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार जाहीर, पुढच्या वर्षी 12 जानेवारीला होणार सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली; तिघांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जेष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, तर्कतीर्थ, मर्ढेकरांना मिळलेला सर्वोच्च सन्मान मिळाला म्हणत रसाळांनी व्यक्त केला आनंद !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताचा फिरकीपटू आर. आश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गाबा स्टेडियममधील भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚦 *ट्राफिकलाईट लाल, हिरवे, पिवळे का असतात ?* 🚦 *************************जगाच्या पाठीवर कुठेही जा, वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या दिव्यांचे रंग बदलत नाहीत. त्या ठिकाणी बोलली जाणारी भाषा कितीही वेगळी असो, त्यातलं ओ की ठो आपल्याला कळत नाही अशी परिस्थिती उद्भवो, वाहतूक दिव्यांची भाषा काही बदलत नाही. चालतं वाहन थांबवण्यासाठीचा सिग्नल लाल रंगाचा, तर थांबलेल्या वाहनाला वाट मोकळी करून देणारा दिवा हिरव्या रंगाचा हे समीकरण सगळीकडे सारखंच असतं. आपण दुसऱ्याशी संवाद साधतो तो नेहमीच शब्दांद्वारे किंवा भाषेच्या माध्यमातून साधतो असं नाही. हातवारेही बरंच काही सांगून जातात. डोळ्यांच्या भाषेबद्दल तर काय बोलावं ! ती भाषा नसती तर असंख्य लैला- मजनूंची शिरी-फरहादची पंचायतच झाली असती. रंग हेही संवादाचं असंच एक माध्यम आहे. या रंगकरवी आपल्याला नेहमीच काही संदेश मिळत असतात. कोणता रंग कोणता संदेश देतो हे थोडंफार आपापल्या सांस्कृतिक शिकवणीवर अवलंबून आहे हे खरं असलं तरी विशिष्ट रंग विशिष्ट भावना मनात उत्पन्न करतात हेही मानसशास्त्रज्ञ आणि मज्जाशास्त्रज्ञांनी पडताळून पाहिलं आहे. वाहतुकीच्या दिव्यांच्या रंगांची निवड आपल्या नजरेला कोणते रंग अधिक स्पष्ट दिसतात यावरून ठरवले गेले असावेत, असा सर्वसाधारण समज आहे. तो अगदीच चुकीचा नाही हे खरं असलं तरी ते या रंगांच्या निवडीपाठचं सगळ्यात महत्त्वाचं कारण नाही. रंगांमुळे उत्पन्न होणाऱ्या मानसिक ऊर्मीचं महत्त्व त्यापेक्षा जास्त आहे.आज जरी रस्त्यावरच्या वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या दिव्यांसाठी हे रंग वापरले जात असले तरी त्यांची पहिली निवड लोहमार्गावरील वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी झाली होती. एकाच रुळावरून असंख्य गाड्या एकाच वेळी जात असतात. त्यामुळे पुढचा मार्ग मोकळा आहे हा संदेश इंजिनचालकाला देण्यासाठी जेव्हा सिग्नल वापरायला सुरुवात झाली तेव्हा या रंगांची निवड करण्यात आली. तीच पुढं रस्त्यावरच्या वाहतुकीसाठीही वापरण्यात येऊ लागली.पुढं जाणं धोक्याचं आहे, गाडी थांबवा, असा संदेश देण्यासाठी लाल रंगांची निवड करण्यात आली ती तो रंग रक्ताचा असल्यामुळं. अनादिकाळापासून या रंगाची आणि धोक्याची सांगड घालण्यात आली आहे. हा रंग पाहिला की रक्ताची आणि त्यामुळं रक्तपाताची, धोक्याची भावना मनात जागृत होते. माणूस उत्तेजित होतो. त्याची नाडी वेगात धावू लागते. रक्तदाब वाढतो. भयापोटी वाहू लागणाऱ्या संप्रेरकांचा पाझर सुरू होतो. हे अजमावलं गेलं आहे. त्यामुळे 'थांबा' या संदेशासाठी या रंगाची निवड आपोआप झाली. 'धोका टळला आहे', 'आता जायला हरकत नाही' या आदेशांसाठी सुरुवातीला पांढऱ्या रंगाची निवड केली गेली होती; पण तो रंग आणि सूर्याप्रकाशाचा किंवा रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशाचा रंग यांच्यात गोंधळ उडू लागल्यामुळे मग त्यापेक्षा वेगळा तसंच, लाल रंगांपेक्षाही वेगळा असलेल्या हिरव्या रंगाची निवड केली गेली. या रंगाचा संबंध शांततेशी असल्यामुळे, तो रंग बघितला की मनातही शांत भाव निर्माण होतात. या दोन्ही रंगांपेक्षा वेगळा आणि त्यांच्यामध्ये असणारा रंग पिवळा म्हणून मग त्याची निवड दक्षतेसाठी करण्यात आली.*डॉक्टर बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*GST - Goods and Service Tax*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचे काटे केवळ सुखाच्या मार्गाने फिरत नाहीत. दुःख भोगली तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा राष्ट्रीय ग्रंथ कोणता ?२) भारताचे स्वतःचे अंतराळस्थानक कोणत्या वर्षी उभारण्यात येणार आहे ?३) सय्यद मुस्ताक ट्रॉफी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?४) 'विलग' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतात अणुऊर्जेवर चालणारी पहिली अणुभट्टी 'अप्सरा' कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ? *उत्तरे :-* १) भारतीय संविधान २) सन २०३५ पर्यंत ३) क्रिकेट ४) सुटे, अलग ५) सन १९५६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुभाष निळकंठराव पा. चिखले👤 मुरलीधर लाचने👤 रवीकुमार राऊत👤 शंकर जाजेवार👤 संजय हरणे👤 सूर्यकांत स्वामी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कागदीचें वित्त वेश्येसी दिधलें । तैसें आम्हां केलें नारायणें ॥१॥ जोडोनियां हस्त केलें मढयापाशीं । तैसें तूं मजशीं केलेंज देवा ॥२॥ कडू भोपळयाचा कोणता उपयोग । तैसें पांडुरंगें केलें जाण ॥३॥ नामा म्हणे ऐसें करूं नको देवा । समागम व्हावा पायांसवें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याला दुसऱ्यावर वारंवार हसायला आवडते त्याला लागलेली ती सवय असते. पण,त्यातच एखाद्याला हसवणे व त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे ही एक प्रकारची उत्तम कला असते ती कला व ते महान कार्य करणे प्रत्येकालाच जमत नाही. म्हणून कोणाला हसवणे जमत नसेल तर रडवू नये. कारण दुसऱ्याला रडवणारा कधीच हसताना दिसत नाही व हसवणारा कधीच रडताना दिसत नाही. माणुसकीच्या नात्याने जी व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने असे महान कार्य करते त्या व्यक्तीसोबत कुठेतरी चांगलेच घडताना दिसत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *...... ज्ञान ......*आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला, "आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल. "त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे ! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 डिसेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2024/12/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧿 *_अल्पसंख्याक हक्‍क दिन_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••🧿 *_आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन_* 🧿••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ३५३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••*२००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.**१९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.**१९९२: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि प्रसिद्ध उद्योगपती नवलमल फिरोदिया आणि बिर्ला उद्योग समूहातील उद्योगपती आदित्य बिर्ला यांना फाय फौंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर**१९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७८: डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३५: श्रीलंकेत ’लंका सम समाज पार्टी’ची स्थापना* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: स्वालिया नजरुद्दीन सिखलगार -- पत्रकार, लेखिका* *१९८६: ऋचा चढ्ढा -- भारतीय अभिनेत्री, निर्माती* *१९७६: राजेश काटोले -- वऱ्हाडी स्तंभलेखक, कवी**१९७६: संदीप देशमुख गणोजेकर -- कवी* *१९७५: दादाराव डोल्हारकर -- कवी, लेखक तथा मुख्याधिकारी**१९७२: श्रेया राजवाडे -- लेखिका**१९७१: बरखा दत्त-- भारतीय दूरचित्रवाणी पत्रकार आणि लेखिका* *१९६९: डॉ. चिदानंद आप्पासाहेब फाळके -- कवी, लेखक* *१९६३: ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता**१९६३: प्रा. डॉ. पुष्पा गावित -- लेखिका**१९६२: हेमंत नारायण जोशी -- कवी* *१९६२: संजय नार्वेकर -- भारतीय अभिनेता**१९६१: लालचंद सीताराम राजपूत -- भारतीय क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू* *१९५९: रमेश पांडुरंग पुंडलिक -- लेखक, कवी**१९५९: वंदना भागवत -- लेखिका, अनुवादक**१९५७: संजीवनी जयंत तोफखाने -- कवयित्री, लेखिका* *१९५५: मंगल प्रभात लोढा -- मंत्री तथा प्रसिद्ध व्यावसायिक**१९५४:विजय वसंत तरवडे -- लेखक, संपादक**१९५४: बाबाराव तुराळे -- कवी**१९५१: दिपाली शिरीष राणे -- कवयित्री**१९५१:विकास मंगेश गायतोंडे -- संकल्पनकार व जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ**१९४८: प्रा.प्रवीण हेमचंद्र वैद्य -- प्रसिद्ध लेखक**१९४०: कृष्णा कल्ले -- मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमधील भारतीय पार्श्वगायिका (मृत्यू: १५ मार्च २०१५ )**१९३५: प्रा. वामन सदाशिव पात्रीकर -- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार (मृत्यू: १९ एप्रिल २००३ )**१९३१: सदाशिव शिवराम भावे -- समीक्षक (मृत्यु: ३ ऑक्टोबर १९८६ )**१९३०: रमेश अच्युत तेंडुलकर -- प्रसिद्ध कवी, लेखक आणि समीक्षक (मृत्यू: १९ मे १९९९ )**१९२७: पंडित किसनराव पाडळकर -- लेखक, संपादक (मृत्यू: १६ जुलै १९९८ )* *१९२६: सुरेश हळदणकर --भारतीय शास्त्रीय गायक, अभिनेता (मृत्यू: १८ जानेवारी २००० )**१९२६: प्रा. डॉ. वसंत अनंत शहाणे -- लेखक**१९२३: भास्करराव आनंदराव पांढरीपांडे -- कवी (मृत्यू: ३ मे १९९३ )**१९२२: सदानंद भटकळ -- लेखक, कवी* *१९२०: माधव कृष्ण पारधी -- ज्येष्ठ पत्रकार, कवी, लेखक, संपादक* *१९१८: वासुदेव यशवंत गाडगीळ -- नाट्य चित्र समीक्षक लेखक (मृत्यू: १७ जुलै २००१ )**१८९०:ई.एच.आर्मस्ट्राँग – एफ.एम.रेडिओचे संशोधक (मृत्यू:३१ जानेवारी १९५४)**१८८७: भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर’ (मृत्यू: १० जुलै १९७१ )**१८७८: जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च १९५३ )**१८५६: सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४० )**१६२०: हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (मृत्यू: २० जून १६६८ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४: विजय हजारे – क्रिकेटपटू (जन्म: ११ मार्च १९१५ )**२०००: मुरलीधर गोपाळ तथा मु.गो.गुळवणी – इतिहास संशोधक,वैदिक संस्कृतीचे अभ्यासक(जन्म: ६ फेब्रुवारी १९२५ )* *१९९५: कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार**१९९३: राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक. सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.* *१९८०: अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (जन्म: २० फेब्रुवारी १९०४ )**१८२९: जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (जन्म: १ ऑगस्ट १७४४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - कुत्र्याचे पिल्लू*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मागील तीन वर्षात भारताचा GDP 8.3 टक्के अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती, बुधवारी अर्ज भरण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, ''माझा कदाचित यात शेवटही होऊ शकतो''*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी नवीन संकेतस्थळाची स्थापना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संकेतस्थळाचे अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गाबा कसोटीत आकाशदीपचा 'तो' चौकार अन् टीम इंडियावरील फॉलोऑनचा धोका टळला, राहुल-जडेजाने वाचवली टीम इंडियाची लाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *पोटात कावळे का ओरडतात ?* 📒 'पोटात कावळे ओरडतात' ही अलंकारिक भाषा झाली. खरोखरच पोटात कोणतेही पक्षी वा प्राणी जाऊन बसत नाहीत. पोटात होणाऱ्या आवाजाला उद्देशून ही भाषा वापरली गेली आहे. भूक लागली म्हणजेच पोटात कावळे ओरडतात किंवा हे आवाज होतात हेही खरं नाही. वास्तविक हे आवाज नेहमीच होत असतात.आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत पसरलेली एक लांबलचक पोकळ नळीच असते. तोंडातल्या घासावर दात आणि लाळ यांचा प्रभाव पडला की त्याचा एक लगदा तयार होतो. हा लगदा मग त्या नळीतून पुढे पुढे सरकू लागतो; पण तसं तो स्वतःच्या जीवावर करू शकत नाही. त्यासाठी त्याला तोंडातून अन्ननलिकेच्या मार्गानं जठरात उतरावं लागतं. तिथं त्याचं पचन होऊन तो आणखी पातळ होतो. तिथून तो मग आतड्यांच्या आणखी अरुंद नळीत उतरतो. या अरुंद नळ्यांमधला त्याचा प्रवास सुकर होतो. कारण त्या नळ्याही त्या प्रवासाला मदत करत असतात. आपल्या पायजम्याच्या नाड्यात एखादी पिन जेव्हा पुढे सरकवायची असते तेव्हा आपण ती पिन जिथे आहे तिथे दाब देऊन तो भाग आकसून घेतो. त्याच्या पुढचा भाग थोडासा पसरत असल्याने ती पुढे सरकते. तशी ती पुढे गेली की आता ती जिथे पोहोचली असेल त्या भागावर दाब देऊन तो आकसून घेतो.पचनसंस्थेच्या नळ्यांमध्येही अशीच हालचाल होत असते. त्यासाठी त्या नळ्यांशी जोडलेले स्नायू आलटून पालटून आकसतात आणि प्रसरण पावतात. स्नायू आकसले की त्या नळीला चिमटा बसतो. तिथे असलेल्या लगद्यावर दाब पडतो. नळीच्या पुढच्या भागाचं त्याचवेळी प्रसरण झालेलं असल्यामुळे सहाजिकच तो लगदा पुढे त्या भागात ढकलला जातो तोवर तो भाग अाकसतो. अशा रीतीने त्या नळीतून एखादी लहर दौडत गेल्यासारखी होते. तो लगदा पुढे पुढे सरकत राहतो.पचनसंस्थेच्या या नळ्यांची ही हालचाल सतत होत असते. हृदयाची जशी सतत होते तशीच. हृदयाच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटी हृदयाची धडधड होते. त्याचा ठोका पडतो. त्या ठोक्याचा आवाज आपण स्टेथोस्कोपमधून ऐकू शकतो. आतड्याच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटीही असाच आवाज होतो. जेव्हा त्या नळ्यांमध्ये अन्नाचा गोळा असतो तेव्हा तो आवाज त्या लगद्यामध्ये जिरतो. तो घुमत नाही; पण जेव्हा त्या नळ्या मोकळ्या असतात तेव्हा तो शोषुन घेणे शक्य होत नाही. उलट तो घुमतो. मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. कदाचित आपल्याला पोषणाची गरज आहे, हे सांगण्यासाठी मेंदू त्या नळ्यांशी जोडलेल्या स्नायूंना अधिकच जोरानं आकुंचन प्रसरण करण्याचा आदेश देत असावा. त्यामुळेही तो आवाज मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरू होते.डॉक्टर बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*EMI - Equated Monthly Installment*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पराभव माणसाला खूप काही शिकवतो. म्हणजे माणूस स्वतःला ओळखू शकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच निधन झालेले झाकीर हुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?२) अणु ऊर्जेवर चालणारी भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय ?३) 'जातीसंस्थेचे उच्चाटन' या ग्रंथाचे लेखक कोण ?४) 'विस्मय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते ? *उत्तरे :-* १) वादन ( तबलावादक ) २) अप्सरा ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ४) आश्चर्य, नवल ५) चंदीगड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रवी येमेवार, धर्माबाद👤 उदय राज कोकरे👤 जनार्दन नेउंगरे👤 महेश जोगदंड👤 नितीन वंजे, लेखक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काखे पान अंगणीं उभें उगें । भोजन मागें रामनाम ॥१॥ आणिक नाहीं मज चाड । रामनाम गोड जेऊं घाला ॥२॥ आनरस सेवितां मंद पडिलों । तुझेंचि नामेंम रुचीस आलों ॥३॥ इच्छा भोजनीं तूं एक दाता । नामा विनवी पंढरीनाथा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाळ लहान असतो तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज सुद्धा वेगळा असतो. तसेच त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या बोलण्यात, विचारात,हसण्यात सुद्धा बदल झालेला बघायला मिळत असतो.कारण दिवसेंदिवस त्याच्यात परिवर्तन होत असते. म्हणून योग्य तो परिवर्तन होत असेल तर त्याचे कौतुक करावे व त्याच्यात वेगळ्या प्रकारचे बदल आढळून आल्यास त्याची मनस्थिती बघून समजावून सांगणे गरजेचे आहे कारण त्या वयापेक्षा आपले अनुभव व मार्गदर्शन महत्वाचे असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रेम ........!*एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, 'अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.' दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं. आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, 'आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?' त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, 'ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?' तो तरुण म्हणाला, 'आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.' यावर आई म्हणाली, 'मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?' वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऐकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.तात्पर्य- स्वतःपालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 डिसेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12CepAvsCch/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⚛️ *_पेन्शनर्स डे_* ⚛️•••••••••••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील ३५२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२: सरकारी पेन्शन ही भीक नव्हे तर निवृत्तांचा हक्क हा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला**१९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन**१९२८: भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.**१९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.**१७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.**१७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.* ⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: रितेश देशमुख – प्रसिद्ध अभिनेता**१९७२: प्रा. गिरीश प्रभाकरराव काळे -- लेखक* *१९७२: दत्तात्रेय रावसाहेब आंधळे -- लेखक**१९७२: जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल**१९७०: अलका अनिल मोकाशी -- लेखिका**१९६६: डॉ. प्रदीप आवटे -- कवी, लेखक**१९६४: डॉ. शुभा शशांक साठे -- कादंबरीकार, चरित्र लेखिका* *१९६३: डॉ. उषा रामवाणी-गायकवाड -- लेखिका**१९५१: प्रा. अनुया अजित दळवी-- अनुवादक, नाटयप्रेमी* *१९४७: दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)**१९४६: हेमा नागपुरकर -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९४६: सुरेश ओबेरॉय -- भारतीय अभिनेता**१९४४: शकुंतला भागवत चौधरी -- कवयित्री, लेखिका**१९४१:विजू खोटे- हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते (मृत्यू:३० सप्टेंबर २०१९)**१९३७: मंन्दाकिनी प्रल्हाद भारद्वाज -- लेखिका, संपादिका( मृत्यू: १९ फेब्रुवारी २०१९ )**१९३७: नारायण ज. शेळके -- लेखक* *१९२९: माणिकराव पद्मण्णा मंगुडकर -- चरित्रलेखक,ग्रंथकार(मृत्यू: ९ एप्रिल २०२३ )**१९२४: सखाराम हरी देशपांडे -- मराठी लेखक (मृत्यू: २९ जुलै २०१० )**१९२४: गोपालन कस्तुरी – पत्रकार,’द हिन्दू’ चे संपादक (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२ )**१९२०: इंदिरा गोविंद कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका**१९१६: विष्णू दत्तात्रय साठे -- नाट्य वाङ्मयाचे अभ्यासक व समीक्षक (मृत्यू: ५ मार्च १९५४ )**१९१२: दत्तात्रय विष्णू तेंडुलकर (प्रफुलदत्त) -- कवी (मृत्यू: २५ एप्रिल १९८७ )* *१९११: दत्तात्रय धोंडो(डी.डी.)रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक,लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.(मृत्यू:२ सप्टेंबर १९९९ )**१९०८: यशवंत नारायण मोघे -- लेखक**१९०५: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२ )**१९०१: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक.’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३ )**१९००: मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (मृत्यू: ३ एप्रिल १९९८ )**१८६९: सखाराम गणेश देउस्कर -- क्रांतिकारी लेखक, इतिहासकार तथा पत्रकार (२३ नोव्हेंबर १९१२ )* *१८४९: लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष (मृत्यू: १८ ऑक्टोब १९०९)**१७७८: सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ मे १८२९ )* ⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: श्रीराम लागू-- भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता(जन्म: १६ नोव्हेंबर १९२७ )**२०१०: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (जन्म: २३ सप्टेंबर १९१९ )**२०१०: सय्यद अमीन -- मराठी लेखक, मुस्लिम विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले.(जन्म: २० ऑक्टोबर १९१५ )**१९८५: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (जन्म: २२ मार्च १९२४ )**१९६५: जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस.थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती,पद्मभूषण,(जन्म: ३० मार्च १९०६ )**१९५९: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक,इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते.काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.(जन्म: २४ डिसेंबर १८८० )**१९५६: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक,पं.विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (जन्म: २३ जानेवारी १८९८ )**१९३८: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार.’प्रवासी’,’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ.पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (जन्म: ११ आक्टोबर १८७६ )**१९३३: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६ )**१९२७: राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (जन्म: २३ जून १९०१ )**१९०७: लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (जन्म: २६ जून १८२४ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फुकट काही नको रे बाबा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपुरात 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत होणार हिवाळी अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तबला सम्राट झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी केलं दुःख व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *EVM चा मुद्दा उपस्थित करत विरोधकांचे विधानभवनाच्या पायरीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बेस्टसाठी नवीन तेराशे नवीन बस घेण्याचा निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काश्मीरमध्ये थंडी पडल्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एस टी ला नोव्हेंबर मध्ये 941 कोटी रुपयांची विक्रमी उत्पन्न, प्रतिदिन सरासरी 60 लाख प्रवाश्याची वाहतूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गाबा कसोटीत भारत पराभवाच्या छायेत, 314 धावाने अजूनही मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मनुष्यप्राण्याचे मूळ* 📙************************** प्रत्येकाला आपल्या पूर्वजांबद्दल एक गूढ आकर्षण असतेच. मग समस्त शास्त्रज्ञांना मानवजातीच्या मुळाबद्दल प्रचंड आकर्षण वाटत राहिले, तर त्यात नवल ते काय ? पृथ्वी कशी निर्माण झाली व माणूस कसा निर्माण झाला, याबद्दलची चर्चा कधीही व कुठेही रंगतच जाते.अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सध्याचे निष्कर्ष सांगतात की, पूर्व आफ्रिकेच्या भागात चाळीस लाख वर्षांपूर्वी आदिम मानवाचे वास्तव्य होते. एकूण चार विविध टप्प्यांतून सध्याच्या होमो सेपियन्स या मानवजातीची उन्नती होत गेली आहे. होमो सेपियन्स म्हणजे 'शहाणा माणूस'. ते चार टप्पे असे,१. *ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस*२. *ऑस्ट्रेलोपिथेकस रोबस्टस*३. *होमो इरेक्ट्स*४. *होमो सेपियन्स* अंदाजे अडीच लाख वर्षांपूर्वी सध्याचा मानवप्राणी सध्याच्या स्वरूपात उत्क्रांत झाला असावा. प्रथम आफ्रिकेत वास्तव्य असलेला मानवप्राणी हळूहळू समशीतोष्ण व थंड हवामानाकडे वाढत जाणाऱ्या संख्येमुळे स्थलांतर करू लागला. जसजसे स्थलांतर पसरत गेले, तसतसे हवामानातील घटकांनुसार रंग, ठेवण, शरीराची जडणघडण यातही बदल होऊ लागले. उत्तरेकडे ज्या जाती पसरल्या, त्यांना 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागवण्यासाठी अधिक सूर्यप्रकाशाची गरज पडू लागली. सूर्यप्रकाश तर कमी होता. मग कातडीखालील रंगद्रव्यांची निर्मिती हळू हळू कमी होत कातडीतील काळेपणा कमी झाला. याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशाला ज्या प्रदेशात तोंड द्यावे लागते, अशा पूर्वेकडच्या लोकांची गालांचे खाडे उंचावून डोळे मिचमिचे व बारीक होत गेले. कायम बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या मंडळींना अधिक उबेची गरज असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चरबी वाढून उघड्या चेहऱ्याच्या संरक्षणाची निसर्गत: सोय झाली. बर्फाळ प्रदेशातील लोक गुबगुबीत चेहर्‍याचेच का, याचे उत्तर यामुळेच मिळते. माणसाचे स्थलांतर पृथ्वीवर कसे झाले, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरेल. पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशातून प्रथम उत्तरेकडील भागात, नंतर पूर्वेकडील भागात मानव हळूहळू पुढे सरकत राहिला. युरोपमधील मोजका भाग व्यापून संपल्यावर आशिया खंडांकडे त्याचा मोर्चा वळला. सैबेरियातील काही भाग त्या काळी बर्फामुळे अलास्काच्या भागास जोडलेला होता. अतिशीत अशा या भागातून उन्हाळ्याच्या काळात बहुधा अमेरिका खंडात माणसाचा चंचुप्रवेश झाला. अलास्कापासून मग खाली उतरत उतरत त्याने सर्व अमेरिका खंड व्यापले. पॅसिफिक समुद्रातील मोजकी बेटे सोडली तर मानवाने सारे जग कित्येक हजार वर्षे व्यापलेलेच आहे. या बेटांवरील वस्ती मात्र जेमतेम सात आठ हजार वर्षांतली असावी. आपण जेव्हा विविध संस्कृतींचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोरची वर्षे असतात हजारांत. मानवी मूळ शोधतानाची वर्षे आहेत लाखांत, हे येथे पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. या लाखो वर्षांबद्दलचा पुरावा कुठल्याही लिखित स्वरूपात तर आपल्या हातात नाहीच. जे निरनिराळ्या अवशेषांतून हाती लागत आहे, त्यातूनच आपण उलगडा करून इतिहासाची पाने उलटत जातो. मानवी वस्ती जगभर पसरत गेली, स्थायिक होत गेली; पण प्रत्यक्ष शेतीची लागवड करण्याची सुरुवात मात्र जेमतेम दहा हजार वर्षांपूर्वीच झाली. या लागवडीला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. या स्थलांतराची दिशा या वेळी भारत, मध्य आशिया ते युरोप व खाली उत्तर आफ्रिका अशी उलटी होती. ती लाट आफ्रिका खंडात जेव्हा पोहोचली, तेव्हा त्याआधीची कित्येक हजार वर्षे अस्तित्वात असलेली मूळ जात पुन्हा दक्षिणेकडे ढकलली गेली. सध्याची बांटू ही जात म्हणजे मूळ आफ्रिकन वास्तव्य केलेली मानवी जात समजली जाते.*"सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CTET - Central Teacher Eligibility Test*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही संकटाच्या सिंहगडाला , द्रोणागिरीची वाट असते. - रा. ग. गडकरी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *कडवे प्रवचन* हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?२) टाईम मासिकाचा 'पर्सन ऑफ द इयर' २०२४ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) कोणत्या देशाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने 'एक देश - एक निवडणूक' या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे ?४) 'विस्तृत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अलीकडे नुकतीच फँकोइस बायरो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे ? *उत्तरे :-* १) तरुणसागर महाराज २) डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष अमेरिका ३) भारत ४) विशाल, विस्तीर्ण ५) फ्रान्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. उषा रामवाणी गायकवाड, मुंबई👤 विक्रम पतंगे, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 प्रताप सिंह मोहिते👤 नारायण मुळे👤 डॉ. सुधीर येलमे, संपादक, धर्माबाद👤 दिगंबर बेतीवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कांसवीची पिलीं राहाती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय ॥१॥ जैसा जावळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥२॥ तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥३॥ नामा म्हणे सत्ता करिती निकत । भक्तांसी वैकुंठ पद देसी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस दिसायला जरी रंग आणि रूपाने वेगळा असेल तरी शेवटी तो, माणूसच असतो. म्हणून कोणत्याही माणसाचा अपमान करताना किंवा त्याची टिंगल, टवाळी करून आनंद घेताना स्वतःला धन्य समजू नये. कारण ज्या माणसासोबत आपण त्या प्रकारची वागणूक ठेवून जगत असतो. त्याच वागणुकीमुळे कुठेतरी आपलाही अपमान होत असतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महिलेचा निर्भीडपणा*एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्नही विचारले. त्यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्स्युक्य असणा-या लोकांच्याही प्रश्नांची उत्तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्न केले. तो म्हणाला," जर मी तुम्हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय" मोठ्या संख्येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्हटले," नाही, आम्ही तुमचा आदेश पाळणार नाही." हे ऐकताच गर्दीतूनही राग व्यक्त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्यास सुचविले. त्या महिलेला याचे कारण विचारले असता, ती म्हणाली, "तुम्ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्यापर्यंतही येत नाही. यावरून असे स्पष्ट होते की, तुमच्या शाही भांडारामध्ये तुम्ही तुमच्या हिश्श्यापेक्षा जास्त कपडा घेतला आहे." महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्हणाला, "मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल." खलिफाचा मुलगा पुढे आला व त्याने सांगितले, "माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्श्याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्यात मी वाढ केली" महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्या महिलेला धन्यवाद देऊ लागले. कारण खलिफाच्या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक आहेत, तोपर्यंत राज्याला किंवा धर्माला धोका नसतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1B9riumzfa/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☣️ *_ विजय दिवस_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील ३५१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.**१९८५: कल्पक्‍कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ राष्ट्राला समर्पित**१९७१: भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती,बांगलादेशची निर्मिती**१९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३२: ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.**१९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.**१७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी* ☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:अंजली अब्रोल -- भारतीय अभिनेत्री**१९९०: शुभांगी सोमनाथ जाधव-काशीकर -- कवयित्री* *१९८६: हर्षदीप कौर -- भारतीय पार्श्वगायिका* *१९८३: हर्षवर्धन राणे -- भारतीय अभिनेता**१९७३: मंजीरी सरदेशमुख -- कवयित्री, लेखिका**१९७२: डॉ. अस्मिता संजय हवालदार -- लेखिका**१९६९: वनिता अरुण गावंडे -- ज्येष्ठ लेखिका**१९६९: सुवर्णा गोरख पवार - जेष्ठ लेखिका* *१९५९: प्रा.डॉ. हेमंत पंढरीनाथ जुन्नरकर-- लेखक* *१९५८: डॉ. लता प्रकाश महाजन -- कवयित्री, लेखिका* *१९५६: पद्माकर आनंदराव पाठक -- प्रसिद्ध लेखक**१९५४: पुरुषोत्तम सदाफुले -- प्रसिद्ध लेखक**१९५२: धनलाल पोतन राहांगडाले -- कवी, लेखक* *१९४९: डॉ. वसंत काळपांडे -- जेष्ठशिक्षण तज्ज्ञ,लेखक,मुख्य संयोजक,शिक्षण विकास मंच,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई.तथा निवृत्त शिक्षण संचालक**१९४४: उल्हास भगवान सुतावणे-- लेखक* *१९४२: सुरेश दत्तात्रय साठे -- लेखक**१९४०: दिगंबर गोविंदराव मुंढे -- कादंबरीकार**१९३८: प्रा. डॉ. योगेंद्र लक्ष्मण मेश्राम -- लेखक(मृत्यू:३१ डिसेंबर २०१२)**१९३७: कल्याण वासुदेव काळे -- मराठी लेखक आणि मराठी भाषा,साहित्य ह्या विषयाचे अभ्यासक(मृत्यू: १७ जानेवारी २०२१ )**१९३३: प्रभाकर भानुदास मांडे -- प्रसिद्ध लोकसाहित्य अभ्यासक, लेखक(मृत्यू: २१ डिसेंबर २०२३)**१९२६: साजाबा विनायक (बबन) प्रभू -- लेखक (मृत्यू: २७ आगस्ट १९८१ )* *१९२१: प्रा. कुसुमताई साठे -- लेखिका, कवयित्री, संपादिका (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९९१ )**१९१७:सर आर्थर सी.क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू:१९ मार्च २००८)**१८८२: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३ )**१७७५: जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १८ जुलै १८१७ )**१७७०: लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन,हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू: २६ मार्च १८२७ )* ☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: डॉ.अंजली कीर्तने-- व्यासंगी लेखिका, संशोधिका, लघुपट निर्माती( जन्म: ४ मे १९५३)**२००४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४ )**२०००: सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती.(जन्म: १८९९ )**१९८०: कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९० )**१९६५: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार(जन्म: २५ जानेवारी १८७४ )**१९६०: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश,शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हेडफोनपासून दूर राहा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात संपन्न, चंद्रशेखर बावनखुळे सह 39 मंत्र्यांनी घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त बीड जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांसाठी 544 कोटी रु. अनुदान मंजूर, लवकरच खात्यावर होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कुंभमेळ्यासाठी पुण्यातून धावणार 12 विशेष रेल्वेगाड्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत 19 किंवा 20 डिसेंबरला सादर होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने 38 उमेदवारांची चौथी व अंतिम यादी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नाही, प्रकृती स्थिर असल्याची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाने उभारला धावाचा डोंगर, 7 बाद 405, बुमराह ने घेतले 5 विकेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सजीव* 📙 सजीवाची व्याख्या फार सोपी आहे. ज्याची वाढ होते, ज्यापासून पुनरुत्पादन होऊ शकते, जो प्रतिक्रिया व्यक्त करतो, तो सजीव. या व्याख्येत प्रत्येक सजीव बसलाच पाहिजे. एखाद्या बाबतीत शंका असली, तरी तिचे निराकरण करणे हे महत्त्वाचे. हे निकष लावताना सुरुवातीला फसगत होऊ शकते. ज्याची वाढ होते, असा एखादा क्रिस्टलही असू शकतो. साधा मिठाचा खडाही आकाराने वाढू शकतो. पण उरलेले दोन निकष तेथे उपयोगी पडत नाहीत.पुनरुत्पादनाबद्दलचा निकषही विषाणूंच्या बाबतीत चुकतो. विषाणू एखाद्या अन्य पेशीमध्येच वाढतात. मग त्यांना जिवंत वा सजीव समजायचे की नाही ? स्वतंत्र अस्तित्व नसेल, तरी त्यांचे अस्तित्व मान्य करून त्यांना सजीव गणले जाते. क्लोरोफिल असलेल्या पेशी या वनस्पतीत असतात. अनेक वर्षांपर्यंत अशी पेशी असलेली वनस्पती प्राणी गिळंकृत करताना पाहून तिला काय म्हणायचे, प्राणी का वनस्पती, हा प्रश्न होता.असाच काहीसा वेगळा प्रश्न कोरल व स्पंज या समुद्री प्राण्यांबाबत होता. त्यांची हालचाल नाही. सजीव आहेत, पण त्यांच्यात क्लोरोफिल नाही. मग हे प्राणी का वनस्पती ? बर्‍याच निरीक्षणानंतर पाणी शोषून त्यातील सूक्ष्म वनस्पती व प्राणी हे खातात, हे लक्षात आले. बॅक्टेरिया, यिस्ट व फंगस या प्रकारचे काय, हा प्रश्न पुन्हा सतावत होताच. पण ते सजीव आहेत वा नाहीत, हा प्रश्न मात्र नव्हता. आता मात्र असंख्य ज्ञात सजीवांची पूर्ण वर्गवारी लावण्यात मानवाला यश मिळाले आहे. एकंदरीत पाच प्रमुख प्रकारात सर्व सजीव विभागता येतात. या प्रत्येक प्रकाराला सृष्टी म्हणतात. त्यानंतर मग त्यांचे अधिक वर्गीकरण केले जाते. जीवाणू (मोनेरा) ही पहिली सृष्टी. एकपेशीय सजीवांची दुसरी. कवक म्हणजे फंगाय ही तिसरी, तर वनस्पती ही चौथी. उरलेले सर्व प्राणी.हा एवढा अट्टाहास कशासाठी ? समप्रकारचे प्राणी, सामानगुणाचे प्राणी, वनस्पतींची नेमकी माहिती, वाढीची पद्धत व उपयुक्तता या सर्वांचा अभ्यास यामुळे सुलभ होत जातो. एखादा प्रकार त्याचे नाव घेताच डोळ्यांनी पाहिला नसला, तरी डोळ्यांसमोर येऊ शकतो म्हणून सजीवांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मांडला तो *'डार्विन'* यांनी. *'जगाच्या उत्पत्तीपासून आजवर फक्त सशक्त असे सजीव पृथ्वीवर वावरू शकले आहेत'* यालाच त्यांनी *'Servival of the Fittest'* असे नाव दिले आहे. त्याचप्रमाणे सजीवांच्या आकारात, अवयवात गरजेनुसार, आवश्यकतेनुसार होत गेलेले बदलही समजून घेता येतात. पाण्यातील सजीव जमिनीवर आल्यावर, झाडांवरील प्राणी जमिनीवर वाढू लागल्यावर होणारे वा झालेले बदल त्यामुळे समजतात. कोण जाणे, पण पृथ्वीवरील सजीवांचे ऐकून संतुलन राखायला हीच प्रक्रिया कदाचित आधारभूत ठरली असावी !'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*NCTC - National Council for Teacher Education*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अन्याय आणि अनीतीने ध्येयसिद्धी होत नाही; परंतु सत्य आणि धर्माची कास धरल्याने ध्येयसिद्धी होत असते. --- रामकृष्ण परमहंस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?२) मध्यप्रदेश राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?३) राजस्थान राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?४) गुजरात राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?५) छत्तीसगड राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते ? *उत्तरे :-* १) कळसूबाई, अहमदनगर (१६४६ मी.) २) धुपगड (१३५० मी.) ३) गुरू शिखर, अबू डोंगर (१७२२ मी.) ४) गिरनार (१११७ मी.) ५) गौरलता (१२२५ मी.)*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 उमेश कोटलवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक👤 नरेश पांचाळ👤 योगेश गुजराथी, धर्माबाद👤 शिवकुमार उपलेंचवार👤 रामकृष्ण पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कां हो मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें चित्त तुझें ॥१॥ करुणाकल्लोळणी अमृत संजीवनी । चिंतल्या निर्वाणीं पावें वेगीं ॥२॥ अपराधी अनाथ जरी जालें अमंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥३॥ नामा म्हणे विठ्ठले आलों मी तुजपाशीं । केधवां भेटसी अनाथनाथा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती चुका शोधून काढण्याची जबाबदारी पार पाडते. ती व्यक्ती, स्वतः एक दिवस खरी असताना सुद्धा इतरांच्या दृष्टीतून उतरून जाते.कारण ज्याची चूक शोधून काढताना खरंच ती व्यक्ती वारंवार चुकीचे वागते का..? हे जाणून घेण्याचा कुठेतरी विसर पडत असतो. म्हणून स्वतः च्या समाधानासाठी किंवा इतरांच्या सांगण्यावरून कोणाला चुकीचे ठरवू नये. कारण माणूस म्हटल्यावर चुका होत असतात पण,प्रत्येक वेळी एखाद्याला चुकीचे ठरवून फायदा होत नाही. म्हणून ज्याच्या कडून चुका होत असतील त्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. या कार्याला माणुसकी धर्म म्हणतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खोटा पैसा*एकदा दिनदयालजी बाजारात भाजी आणण्यासाठी गेले असता एका वृद्ध बाईकडून त्यांनी भाजी विकत घेतली.नंतर हिशोब लिहिताना त्यांच्या लक्षात आले कि आपल्या खिशातील एक खोटा पैसा त्या म्हाताऱ्या बाईला भाजीचे पैसे देताना चुकून दिला गेला. आपण नकळत का होईना त्या बाईला फसविले. याचे त्यांना अपार दुःख झाले. ते पुन्हा बाजारात गेले व त्या बाईसमोर जावून उभे राहिले व म्हणाले," बाई, मी नकळत का होईना तुम्हाला फसविले आहे. मी तुम्हाला खोटा पैसा दिला आहे." त्या बाईला त्यांच्याशी बोलायला वेळ नव्हता, ती त्यांना म्हणाली," अहो, राहू दे एका पैशाचे काय? मला इथे भाजी विकू दे" पण दिनदयालजी म्हणाले," नाही बाई ! मी तुम्हाला फसविले हि गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आहे. माझी चूक मला सुधारू द्या." त्या बाईने पण त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहिले व आपला गल्ला असलेली पेटी त्यांच्या समोर ठेवली. बाह्य जग विसरून दिनदयालजिनी एकाग्रपणे तो गल्ला तपासला व त्यातील खोटा पैसा त्या बाईला सांगून परत घेतला व त्या जागी खरा पैसा त्या गल्ल्यात टाकला. त्या वृद्ध बाईने त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. पुढे याच दिनदयालजिनी 'एकात्म मानवतावाद' मांडला.*तात्पर्य- आदर्श आचरणाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 डिसेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/06/kashtachi-kamai.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀️ *_राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_ या वर्षातील ३४९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• *१९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.**१९२९: ’प्रभात’ चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.**१९२०: अकाली दलाची स्थापना**१९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.**१९००: बर्लिन विद्यापीठातील प्राध्यापक मॅक्स प्लॅब यांनी त्यांच्या क्रांतिकारी विचार पुंजसिध्दांत जगापुढे आणला**१८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.* ☀️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: कुलदीप यादव -- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९९०: विनय पाटील -- कवी**१९८६: संवाद सतीश तराळ -- लेखक, कवी**१९८४: दिव्यांका त्रिपाठी दहिया -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९८४: नंदकिशोर नैताम -- लेखक**१९८०: आनंदराव नागनाथराव पाटील(आनंद पाटील) -- लेखक**१९८०: जुही परमार -- भारतीय अँकर, प्रस्तुतकर्ता, गायिका आणि नृत्यांगना**१९७८: समीरा रेड्डी -- भारतीय अभिनेत्री**१९७२: विजय यशवंत सातपुते -- कवी, लेखक, संपादक* *१९५७: शीतल श्याम दामले -- कवयित्री* *१९५३: विजय अमृतराज –भारतीय लॉन टेनिसपटू**१९५२: सुषमा रमेशचंद्र म्हैसेकर-इर्लेकर -- कवयित्री* *१९५१: विजय श्री.केळकर -- लेखक**१९५०: प्रल्हाद श्रीराम गावत्रे -- कवी* *१९४९: श्रीकांत शंकर बहुलकर -- संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक, बौद्धविद्या व वेदविद्या अभ्यासक**१९४९: डॉ. अनुपमा निरंजन उजगरे -- जेष्ठ लेखिका आणि प्रसिद्ध कवयित्री, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९४६: संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू: २३ जून १९८० )**१९४४: मंदा खापरे -- प्रसिद्ध लेखिका व कवयित्री**१९४४: अभिमन्यू दोधाजी सूर्यवंशी -- जेष्ठ लेखक तथा निवृत्त सहा.पोलिस आयुक्त* *१९४३: विजय शंकर जोशी -- लेखक**१९४०: लक्ष्मण मोतीराम बांदेकर -- मराठीतील नामवंत नाटककार (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५ )**१९३९: सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८० )**१९३८: प्रभाकर वामनराव ढगे -- कवी, लेखक**१९३६: स्वजित चटर्जी (विश्वजित) -- भारतीय अभिनेता, निर्माता, निर्माता, गायक**१९३४: श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक**१९२८: प्रसाद सावकार –भक्ती संगीताचे अभ्यासक , गायक व नट**१९२४: राज कपूर – प्रसिद्ध अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८ )**१९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.(मृत्यू: २० ऑगस्ट, २०१४ )**१९०५: विश्वनाथ पांडुरंग दांडेकर --मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक (जन्म: १ जानेवारी १९७४ )* *१८९५: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२ )**१८९२: विठ्ठल कृष्ण नेरूरकर -- मराठी कथाकार, कवी आणि नाटककार (मृत्यू: १९ मार्च १९४९ )* *१८२२: रेव्ह सॅम्युएल फेअरबॅंक -- धर्मगुरू, दूरदर्शी शिक्षक, लेखक, संपादक (मृत्यू: ३१ मे १९८८ )**१५४६: टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१)* ☀️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: गीता काक -- भारतीय ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ७ ऑगस्ट १९५० )**२०१४: श्रीराम ताम्रकर -- चित्रपट विषयक विपुल लेखन (जन्म: ९ नोव्हेंबर १९३८ )**२००५: सुधीर जोशी -- विनोदी मराठी अभिनेते (जन्म: १९४८)**१९७९: गोविंद घाणेकर -- लेखक (जन्म: १५ जून १९११ )**१९७७: गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९ )**१९६६: शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३ )**१७९९: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - कष्टाची कमाई*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रिमंडळ विस्तार आता रविवारी 15 डिसेंबर रोजी मुंबई ऐवजी नागपुरात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लाडक्या बहिणींचे पैसे येत्या दोन दिवसात खात्यात जमा होण्याची शक्यता, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्याला देशात सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध धोरणे राबवण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई मेट्रोला दिशा देणाऱ्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर : ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज होणार अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 मृगजळ का दिसत ? 📒 मृगजळ म्हणजे एक चमत्कार, अशी सर्वसाधारण समजूत असली तरी तो आहे केवळ एक प्रकाशीय अविष्कार. प्रकाशाच्या एका गुणधर्मापोटी तो साकार होतो. प्रकाशकिरणांचा वेग निरनिराळ्या माध्यमांमध्ये निरनिराळा असतो. घन माध्यमांमध्ये तो कमी असतो. विरळ माध्यमात तो जास्त असतो. निर्वात पोकळीत तो सर्वात जास्त असतो. माळरानावर आपण सुसाट धावू शकतो; पण घनदाट जंगलातून आपल्याला त्याच वेगाने पळता येत नाही. आपला वेग आपोआपच कमी होतो. त्यातलाच हा प्रकार.त्यामुळेच एका माध्यमातुन दुसऱ्या माध्यमात शिरताना प्रकाशकिरणांची दिशा बदलते. ते वागतात. कमी वेग असलेल्या माध्यमाच्या दिशेने ते वळतात. यालाच प्रकाशाचे वक्रीभवन किंवा अपवर्तन असे म्हणतात. माध्यमांच्या घनतेनुसार या वक्रीभवनाची मात्राही वेगवेगळी असते.मृगजळ आपल्याला दिसते ते सहसा अतिशय तापलेल्या रस्त्यावरून जाताना. त्या रस्त्यावर दूरवर एखादे पाण्याने भरलेले तळे असल्यासारखे आपल्याला दिसते. पण त्याच्या जवळ जावे, ते तळे आहे असे वाटते. तिथे पोहोचले तर ते तळे गायब होते. तिथे तसाच तापलेला डांबरी रस्ता असल्याचे आपल्याला दिसते.जेव्हा तो रस्ता अतिशय तापलेला असतो तेव्हा त्या रस्त्याच्या निकट असलेल्या हवेच्या थराचं तापमानही चढतं. हवा तापली की विरळ होते. त्याच्यावर असलेल्या तुलनेने थंड असलेल्या हवेच्या थराची घनता जास्त असते. ती दाट असते. त्यामुळे आकाशातून आलेल्या सूर्याप्रकाशाचा किरण प्रथम त्या हवेच्या दाट थरातून जातो. तिथून जेव्हा तो खालच्या तापलेल्या विरळ थरात जातो तेव्हा त्याचा वेग अर्थातच वाढतो आणि त्याची व त्याची दिशा बदलते. ती वरच्या दाट थराच्या म्हणजे कमी वेग असलेल्या माध्यमांच्या दिशेने वळते. तो किरण आपल्या डोळ्यांना भिडतो तेव्हा त्या रस्त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यात न उमटता वर असलेल्या आकाशाची प्रतिमा तिथे साकार होते. आकाश तर वरच्या बाजूला आहे. मग ते आपल्याला कसे दिसेल, असे वाटल्याने ते त्याचे प्रतिबिंब आहे असा आपला समज होतो. तसे ते प्रतिबिंब जर तिथे पाणी असेल तरच आपल्याला दिसेल, अशा समजुतीने प्रकाशकिरणांचे वक्रीभवन जिथुन झाले त्या ठिकाणी पाण्याचा साठा असल्याचा भास आपल्याला होतो. अशा प्रकारच्या हवेच्या निरनिराळ्या थरात जेव्हा घनता वेगवेगळी असते तेव्हा तेव्हा हा वक्रीभवनाचा खेळ साकार होतो. त्यापायीच समुद्राजवळच्या एखाद्या डोंगराच्या कड्यावर आपण उभे असतो तेव्हाही आपल्याला आकाशात होडी चालल्यासारखी दिसते. वास्तविक ती होडी समुद्राच्या पाण्यात विहरत असते; पण वक्रीभवनापायी तिची ती आभासी प्रतिमा उमटते आकाशाच्या पडद्यावर. तेही मृगजळच.बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*NIT - National Institute of Technology*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमच्याजवळ धैर्य व चिकाटी असेल , तर तुमच्या सर्व इच्छा सफल बनतील. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) युनायटेड नेशन्स एन्व्हायर्मेंट प्रोग्रामतर्फे ( UNEP ) देण्यात येणारा प्रतिष्ठेचा *'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' - २०२४* जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) राजर्षी शाहू महाराजांना 'राजर्षी' ही पदवी कोणी दिली होती ?३) कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली ?४) 'विनय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १९८८ च्या 'खडू फळा' या योजनेला कोणत्या नावाने ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) डॉ. माधव गाडगीळ २) क्षत्रिय कुर्मी समाज, कानपूर ३) महात्मा फुले ४) नम्रता ५) ऑपरेशन ब्लॅक बोर्ड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सारंग भंडारे👤 पवन धावनी👤 राज काकडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळीं । तेणें ते शोभली मूर्ति बरी ॥१॥ बरवा बरवा विठ्ठल गे बाई । वर्णावया साही शिनताती ॥२॥ श्रीवत्सलांच्छन वैजयंती गळां । नेसला पाटोळा तेजःपुंज ॥३॥ पाऊलें समान विटेवरी नीट । नामा म्हणे भेट घ्यावी त्याची ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हावं असं नेहमीच प्रत्येकाला वाटत असते.पण, सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून येत नसतात.अशा वेळी आपल्याला दु:ख होत असते. पण,काही गोष्टी घडायच्या असतात त्याविषयी आपल्याला कळत नाही व ज्या विषयी आपण कधी विचार केला नसतो अचानक काही गोष्टी घडून येतात म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मताप्रमाणेच घडून येईलच असेही नाही त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत आणि राजा*एक दानशूर राजा होता. राजाची ख्याती ऐकून एक संत त्याच्या दरबारात आला. तो राजाला भेटायला राजमहालात गेला आणि याचकांच्या रांगेत बसला. राजाने दान देण्यासाठी दोन सेवक ठेवले होते. जेंव्हा संताची वेळ आली तेंव्हा तो सेवकाला म्हणाला, "मित्रा! मी तुझ्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मला दान नको." राजाचा सक्त आदेश होता कि कोणीही रिक्त हस्ते जाता कामा नये. शेवटी सेवकांनी राजाची व संताची गाठ घालून दिली. राजाने संतांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणाला, "महाराज ! बोला आपली काय इच्छा आहे?" संत म्हणाले," मला इतके धन पाहिजे कि मी त्याद्वारे स्वर्गात जावू शकेन." राजा या उत्तराने हैराण झाला. त्याने विचारले," महाराज, धनाद्वारे आपण कसे काय स्वर्गात जावू शकता?, कृपया स्पष्ट करा!" तेंव्हा संताने सांगितले," राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि, केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल आणि भिक्षा मागणारयांच्या जीवनात परिवर्तन येईल पण आपण असेच जर दान करीत राहिलात तर मात्र एक दिवस राज्याची तिजोरी मात्र खाली होवून जाईल." त्या क्षणी राजाचे डोळे उघडले, त्याने संताना यावरील उपाय विचारला असता ते म्हणाले, " आपण जे धन दान म्हणून देत आहात तेच रोजगाराच्या स्वरुपात द्या. यातून लोकांना काम मिळेल आणि फुकट खायची यांची सवय कमी होईल. आपल्या या सेवा वृत्तीने ते माजखोर आणि आळशी झाले आहेत. त्यांना परिश्रम करायला शिकवा तेच खरे पुण्याचे आणि सत्पात्री दान ठरेल. *तात्पर्य - स्वावलंबन आत्मविश्वासाची अनिवार्य अट आहे. त्यावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 डिसेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19o9cAc1fY/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील ३४८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोपडा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर**२००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.**१९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३०: ’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: प्रा. डॉ. नंदकुमार विष्णू मोरे -- लेखक**१९७३: मेघना गुलजार-- भारतीय लेखिका, दिग्दर्शक आणि निर्माती**१९७०: विजया पाटील -- कवयित्री**१९६६: डॉ. अनिल तानाजी सपकाळ -- मराठी नाटककार, चित्रपटकथा लेखक व समीक्षक**१९६५: माधुरी साकुळकर -- लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या* *१९६४: रजनी निकाळजे-- कवयित्री, लेखिका**१९६०: दग्गुबाती वेंकटेश -- भारतीय चित्रपट अभिनेता**१९५८: हेमंत दत्तात्रेय सावंत -- लेखक* *१९५७: डॉ.विद्यासागर जनार्दन पाटंगणकर -- संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, प्रसिद्ध लेखक* *१९५६: अंजली आमोणकर -- मराठी ,हिंदी, कोकणी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५६: प्रभाकर दुपारे -- आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक, नाटककार, जेष्ठ पत्रकार**१९५६: अजित श्रीकृष्ण अभ्यंकर -- कामगार नेते, प्रसिद्ध लेखक* *१९५५: मनोहर पर्रीकर – गोव्याचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: १७ मार्च २०१९ )**१९४९: सुप्रिया मधुकर अत्रे -- लेखिका**१९४७: विद्युत रवींद्र भागवत -- ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या (मृत्यू: ११ जुलै २०२४)**१९४५: अस्मिता इनामदार -- कवयित्री**१९४२: रमाकांत यशवंत देशपांडे -- खगोल अभ्यासक, लेखक, कवी* *१९४०: शरद केशव साठे -- मराठी ग्रंथसूचिकार म्हणून प्रसिद्ध (मृत्यू: १ ऑक्टोबर २०१५)**१९३२: डॉ.निला जोशीराव -- लेखिका* *१९३०: मधुसूदन कृष्णाची आगाशे -- लेखक* *१९२८: धनश्री हळबे -- मराठी लेखिका आणि अनुवादक**१९२८: सरिता मंगेश पदकी -- प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार, नाटककार आणि अनुवादिका (मृत्यु: ३ जानेवारी २०१५ )**१९२६: प्रमिला मदन भागवत -- कवयित्री, लेखिका (मृत्यू: २९ नोव्हेंबर २०१३ )**१९२४: डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक -- प्रसिद्ध कथाकार, नाटककार, समीक्षक (मृत्यु: ९ ऑक्टोबर १९८९ )**१९२४: मंगला दि.साठे -- लेखिका* *१९२३: रामभाऊ जोशी -- जेष्ठ पत्रकार, लेखक* *१९२०: प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित-- तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, मराठी लेखक (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१३ )* *१९०२: इलचंद्र जोशी-- प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार (मृत्यू: १९८२ )**१८९९: पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ )**१८०४: मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ,मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली,इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७ )**१७८०: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मार्च १८४९ )* ⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: संतोष चोरडिया -- एकपात्री कलाकार( जन्म: २२ ऑगस्ट १९६६)**२०१२: मोरेश्वर दिनकर पराडकर -- प्रकांड पंडित, अभ्यासक, संशोधक(जन्म: १७ नोव्हेंबर १९२५ )**१९९६: श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार**१९९४: विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक(जन्म: १७ ऑक्टोबर १९१७ )**१९८६: स्मिता पाटील – प्रसिद्ध अभिनेत्री. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड (जन्म: १७ ऑक्टोबर  १९५५ )**१९६१: अ‍ॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ’ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत.(जन्म: १८६०)**१९३०: फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म: ३ सप्टेंबर १८६९ )**१७८४: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (जन्म: १८ सप्टेंबर १७०९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*निवडणूक कर्मचारीच मतदानापासून वंचित*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एक देश एक निवडणूक विधेयक मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी लवकरच योजना आणणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *RBI चा मोठा निर्णय, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली, आता हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार कर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *MPSCची जाहिरात वेळेत नाही, वय वाढल्याने विद्यार्थी बाद, शासनाने परीक्षांची वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढविण्याची विद्यार्थ्यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभय योजनेचा 31 तारखेपर्यंत लाभ घेण्याची संधी, 10 लाख 24 हजार वीज ग्राहकांकडे सुमारे 1,871 कोटी 51 लाखाची थकबाकी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे पुस्तक महोत्सव मध्ये दहा हजार पुस्तकांते प्रदर्शन, सरस्वती चित्र निर्माण करत विश्वविक्रम होणारं - राजेश पांडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा', चीनच्या खेळाडूला 'चेक मेट'; विश्वनाथ आनंदनंतर दुसरा विश्वविजेता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙 अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्‍याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे. या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्‍या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BHM - Bachelor of Hotel Management*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक घडविला जात असलेला सोन्याचा दागिना आहे.तो जितका काळजीपूर्वक घडविला जाईल तितका अधिक शोभेल. --- केशव नाईक*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सात आश्चर्यापैकी कोणते एक आश्चर्य भारतात आहे ?२) ईश्वरोपासनेबरोबरच बलोपासनेला महत्त्व देणारा संत कोणता ?३) भारताने दुसरी अणुस्फोट चाचणी कोठे व केव्हा केली ?४) 'विद्रूप' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती व हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले ? *उत्तरे :-* १) ताजमहाल २) स्वामी रामदास ३) पोखरण ( ११ मे १९९८ ) ४) कुरूप ५) अमरावती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अनिल गायकवाड, शिक्षक, बिलोली👤 शरद नवले, शिक्षक, लातूर👤 राजेश पाटील👤 उज्वल म्हस्के, औरंगाबाद👤 राजेश वाघ, माध्यमिक शिक्षक, बुलढाणा👤 शेख समीर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कल्पतरुतळीं बैसलिया । कल्पिलें फळ न पविजे ॥१॥ कामधेनु जरी दुभती । तरी उपावासीं कां मरावें ॥२॥ उगे असा उगे असा । होणार तें होय जाणार तें जाय ॥३॥ नामा म्हणे केशवा काय तुझी भीड । संता महंतां देखतां सांगेन तुझी खोड ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांसोबत संवाद साधणे चांगलेच असते. संवाद साधल्याने मनात असलेला ताणतणाव दूर होत असतो व मोकळेपणा वाटत असतो. पण कधी कधी स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून बघावा. बरेचदा स्वतःशी संवाद साधल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास मिळत असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जे असेल त्यात समाधानी असावे*एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसऱ्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 डिसेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1GmE9pv58V/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☯️ *_ या वर्षातील ३४७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☯️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☯️••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.**१९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.**१७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन*☯️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☯️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: रमेश मच्छिंद्रनाथ वाघ -- लेखक* *१९८१: युवराजसिंग – प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९८०: सिद्धार्थ शुक्ला -- भारतीय अभिनेता, मॉडेल (मृत्यू: २ सप्टेंबर २०२१ )**१९७७: डॉ.योगिता श्याम पिंजरकर -- लेखिका* *१९६९: बंडोपंत राजेश्वरजी बोढेकर -- प्रसिद्ध लेखक* *१९६६: भरत जाधव -- मराठी चित्रपट,थिएटर आणि टीव्ही शोमधील भारतीय अभिनेता आणि निर्माता**१९६४: दीपक तांबोळी -- प्रसिद्ध कथाकार* *१९५९: डॉ. चंद्रकांत लेनगुरे -- कवी, कथाकार* *१९५७: डॉ. मिलिंद वाटवे -- प्रसिद्ध मराठी लेखक, संशोधक**१९५६: प्रभू राजगडकर -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५०: रजनीकांत – प्रसिद्ध चित्रपट अभिनेते**१९५०: संध्या प्रकाश देशपांडे -- कवयित्री* *१९४९: गोपीनाथ पांडुरंग मुंडे -- माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री (मृत्यू: ३ जुन २०१४)**१९४७: शिवाजी धर्माजी साळुंके -- कवी**१९४४: रविराज (रवींद्र अनंत कृष्ण राव) -- चित्रपटांमधील भारतीय अभिनेता (मृत्यू: १८ मार्च २०२० )**१९४२: प्रा. मंदा विजय टेंबे -- लेखिका* *१९४०: शरद पवार – माजी केंद्रीय कृषी मंत्री, आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री**१९३०: भानू गुप्ता -- भारतीय गिटार वादक आणि हार्मोनिस्ट (मृत्यू: २७ जानेवारी २०१८ )**१९२५: दत्तात्रेय गजानन तथा दत्तू फडकर -- भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेट खेळाडू (मृत्यू: १७ मार्च १९८५ )**१९२२: कमल बाळकृष्ण आपटे -- लेखिका**१९२१: यशवंत कानिटकर -- मराठी भाषातज्‍ज्ञ ,पूर्व भाषासंचालक (मृत्यू: २२ जुलै २०१५ )**१९१६: पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर -- स्वतंत्रता सेनानी,गोवा विधानसभेचे अध्यक्ष, लेखक (मृत्यू: ५ सप्टेंबर २००० )* *१९१५: फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू: १४ मे १९९८ )**१९१२: यशवंत भीमराव आंबेडकर (भैय्यासाहेब) -- भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते (मृत्यू: १७ सप्टेंबर १९७७ )**१९०७: खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू: १०ऑगस्ट १९५० )**१९०५: डॉ.मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४ )**१८९२: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (मृत्यू: ११ मार्च १९६५ )**१८९३: गोविंद सदाशिव घुर्ये -- लेखक, अभ्यासक (मृत्यु: २८ डिसेंबर १९८३ )**१८७२: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते,नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू: ३ मार्च १९४८ )* ☯️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☯️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९१७ )**२००५: त्र्यंबक विनायक सरदेशमुख -- कादंबरीकार,समीक्षक (जन्म: २२ नोव्हेंबर १९१९ )**२००४: निरंजन हरिश्चंद्र उजगरे -- कवी, संपादक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४९ )**२००२: विश्वास रघुनाथ पाटील -- मराठी लेखक (जन्म: १३ नोव्हेंबर १९२८ )**२०००: जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (जन्म: १ ऑक्टोबर  १९३० )**१९९२: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म: १२ जानेवारी १९०६ )**१९६४: मैथिलिशरण गुप्त –हिन्दी कवी. ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.(जन्म: ३ ऑगस्ट १८८६ )**१९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: १९०८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक व्यक्ती : एक मतदान*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्षात जानेवारीपासून सलून-ब्युटी पार्लरचे दर वाढणार; खिशाला लागणार कात्री !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रमध्ये वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *साताऱ्यातील हॉटेलमध्ये लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं रंगेहात, सातारा लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महायुतीचा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शनिवारी होण्याची शक्यता, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार, आमदारांना फिरते मंत्रिपदं देण्याची चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *परभणीत पुढील आदेश येईपर्यंत जमावबंदीचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रेल्वे सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बुमराहला ICC पुरस्काराची हुलकावणी, पाकिस्तानचा हारीस रौफ ठरला प्लेअर ऑफ द मंथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *केळी खाल्ल्याने सर्दी होते का ?* 📙 अजूनही केळे खाताना मला विचार पडतो सर्दी तर होणार नाही ? लहानपणापासून आजी, मावशी, आई या सर्वांनी केळे खाऊ नको सर्दी होईल असे वारंवार सांगितल्याने ती भीती आज देखील वाटते. पण शास्त्रीय सत्य काय आहे ?सर्दी होण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे विषाणूंचा संसर्ग व अॅलर्जी किंवा वावडे. वातावरणात बदल झाला की बर्‍याच जणांना ही सर्दी होते. म्हणूनच इंग्रजीत याला 'कॉमन कोल्ड' असे म्हणतात. ही सर्दी ६४ प्रकारच्या विषाणूंमुळे होऊ शकत असल्याने अनेक वेळा सर्दी होते व शरीर या विषाणूंच्या विरुद्ध परिणामकारक अशी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करू शकत नाही. सर्दीवर उपाय नाही कारण विषाणूंना आपण मारू शकत नाही. गमतीने असे म्हणतात की औषध न घेतल्यास सर्दी बरी व्हायला सात दिवस लागतात पण उपचार घेतल्यावर ती एक आठवड्यात बरी होते. वाऱ्यामुळे होणारी सर्दी काही विशिष्ट काळातच होते. काही जणांना धूळ, पराग कण, एखादे विशिष्ट अत्तर इत्यादी संपर्कात आल्यावर सर्दी होते. केळ्यामुळे विषाणूसंसर्ग तर होत नाहीच पण काही जणांना वावडे असू शकेल. ज्यांना केळे खाल्ल्याने सर्दी होत असल्याचा अनुभव वारंवार आला असेल त्यांनी केळे न खाणे चांगले. पण केळी खाल्ल्याने सगळ्यांनाच सर्दी होईल हे मात्र चुकीचे आहे. अशा गैरसमजाने सर्वत्र उपलब्ध असलेले स्वस्त असे हे फळ लोक खाणार नाहीत व कार्बोदके प्राप्त करण्याचा हा सोपा मार्ग सोडून देतील. केळे खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होते वा नाही हे तुम्हीच तपासू शकाल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BDS - Bachelor of Dental Surgery*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमच्याजवळ धैर्य व चिकाटी असेल , तर तुमच्या सर्व इच्छा सफल बनतील. --- महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?२) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त झालेले संजय मल्होत्रा हे कितवे गव्हर्नर असतील ?३) विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयाची अट किती आहे ?४) 'विवंचना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) संगीताचे ज्ञान कोणत्या वेदात आहे ? *उत्तरे :-* १) संजय मल्होत्रा २) २६ वे ३) २५ वर्ष ४) काळजी, चिंता ५) सामवेद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रमेश वाघ, स्तंभलेखक👤 माधव एच. सोनटक्के, सहशिक्षक, धर्माबाद👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, बिलोली👤 पवन खरबाळे👤 विलास पाटील आवरे👤 अशोक पाटील कदम👤 मारोती तोकलोर👤 रुचिरा बेटकर, साहित्यिक, नांदेड👤 समीर मुल्ला👤 मोमीन जलील👤 वतनदार पवनकुमार नारायणराव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कलियुगीं जन मूर्ख शून्यवृत्ति । तारिसी श्रीपति नाम घेतां ॥१॥ परम पावना पवित्रा निर्मळा । भक्ताचा सांभाळ करीं देवा ॥२॥ देवा तूं दयाळा जिवलगा मूर्ति । पुराणें गर्जाती वेदशास्त्रें ॥३॥ नामा म्हणे आतां नको भागाभाग । सखा पांडुरंग स्वामी माझा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, ज्या विषयी आपण विचार करत असतो त्याप्रमाणे कधीच होत नाही. आणि ज्या विषयी आपण कल्पना सुद्धा केली नसते अचानक तेच आपल्यासोबत घडत असते. आणि मग अनेक प्रश्न पडत असतात. म्हणून जे काही आपल्या सोबत चांगले घडून आले असेल तर त्यातून पुन्हा चांगले करण्याचा प्रयत्न करावा. व जे काही वाईट घडले असेल तर त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. कारण काही गोष्टी शिकायला भाग पाडण्यासाठी संधी देत असतात. त्या मिळालेल्या अनमोल संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *देखावा*लबाड बांधतो इमले माड्या, गुणवंताला मात्र झोपडी' या ग. दि. माडगूळकरांच्या गीताचा अनुभव आपणाला पदोपदी येत असतो. गुणवत्ता असणाऱ्यांना किंमत नाही आणि अर्धवट ज्ञानी व्यक्ती मोक्याच्या जागेवर, हा आजचा सार्वत्रिक अनुभव ! एक नकलाकार एका गावात प्रयोगासाठी आला होता. त्याच्या कार्यक्रमाची खूपच जाहिरात झाल्याने गर्दीही बऱ्यापैकी होती. अनेक नेत्यांचे, प्राण्यांचे त्याने हुबेहूब आवाज काढले. प्रेक्षक खूष झाले. त्यांनी त्याला डुकराचा आवाज काढण्यास सांगितले. त्याने तो काढलाही. पण त्या गर्दीतील एक गृहस्थ म्हणाला, "ही नक्कल बरोबर साधली नाही." तेव्हा नकलाकाराने त्याला स्टेजवर येऊन डुकराचा आवाज काढून दाखविण्यास सांगितले. त्या गृहस्थाने ते आव्हान स्वीकारले. तो आपल्या पोत्यासह स्टेजवर गेला. त्याने पोत्यात डोके घातले आणि साऱ्या प्रेक्षकांना डुकराचा आवाज आला. पण लोकांनी त्याची कुचेष्टा सुरू केली. तेव्हा त्याने पोत्यातून डुकराचे पिल्लू बाहेर काढले व तो म्हणाला, "या खऱ्या डुकराचा आवाज तुम्हाला पटला नाही आणि याने खोटा आवाज काढला तर त्याचं तुम्हाला कौतुक !"* तात्पर्य : आपणही आज असेच गुवत्तेपेक्षा, दर्जापेक्षा देखाव्याला भुलतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 डिसेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/14ajGv4mGd/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🪩 *_अंतरराष्ट्रीय पर्वत दिवस (International Mountain Day)_* 🪩 🪩 *_ या वर्षातील ३४६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••• *२००१:चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश**१९९४:अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.**१९९३: नागपूर येथील विधान भवनाच्या नवीन विस्तारित वास्तूचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या शुभहस्ते उद्घाटन**१९७२:अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.**१९६७:कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.**१९४६:युनिसेफ (UNICEF) ची स्थापना**१९४१:दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३०:सी.व्ही.रमण यांना नोबेल पारितोषिक**१८१६:इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.*🪩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: दीपराज दत्ताराम माने -- लेखक**१९८५: उज्ज्वला लहू शिंदे -- कवयित्री**१९७६: अनिल तुकाराम शिनकर -- लेखक**१९६९: संगीता अनंत थोरात -- कवयित्री* *१९६९: विश्वनाथन आनंद – भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर**१९६९: दयानंद चंद्रशेक शेट्टी -- भारतीय चित्रपट अभिनेता**१९६५: किमी काटकर -- अभिनेत्री आणि मॉडेल**१९६३: प्रा. साईनाथ पाचारणे -- लेखक, अनुवादक**१९६३ :प्रा. डॉ. माधव सरकुंडे -- प्रसिद्ध कवी, लेखक, विचारवंत* *१९५७: डॉ.विकास हरिभाऊ महात्मे -- नेत्र शल्यचिकित्सक, राज्यसभेचे खासदार**१९५२: वेणू श्रीनिवासन -- भारतीय उद्योगपती, TVS मोटर कंपनीचे अध्यक्ष**१९५०: अविनाश शंकर डोळस -- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू: ११ नोव्हेंबर २०१८ )**१९४२: आनंद शंकर -- भारतीय संगीतकार, गायक (मृत्यू: २६ मार्च १९९९ )**१९३८: प्रा. डॉ. बा. धो. रामपुरे -- कवी,लेखक* *१९३६: डॉ. उमेश अच्युत तेंडुलकर -- लेखक**१९३५: प्रा. जयश्री दिगंबर खिरे -- लेखिका**१९३५: प्रणव मुखर्जी-- भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०२० )**१९३४: सलीम अझीझ दुरानी -- भारतीय क्रिकेटपटू, अष्टपैलू खेळाडू,(मृत्यू: २ एप्रिल २०२३ )**१९३१: त्र्यंबक लक्ष्मण कुलकर्णी -- लेखक**१९२९: सुभाष गुप्ते – लेगस्पिनर क्रिकेटर (मृत्यू: ३१ मे २००२ )**१९२५: राजा मंगळवेढेकर – प्रसिद्ध बालसाहित्यकार (मृत्यू: १ एप्रिल २००६ )**१९२४: मधुसूदन/मधुकर सदाशिव घोलप -- लेखक* *१९२४: दत्ताराम कृष्ण सुकथनकर -- सुप्रसिद्घ गोमंतकीय कोकणी साहित्यिक.(मृत्यू: २९ ऑगस्ट २००५ )**१९२२: मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता,पद्मभूषण (१९९१),दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४)(मृत्यू: ७ जुलै २०२१ )**१९२१: रा. व्य. जोशी -- लेखक* *१९१५: मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू: १७ जून १९९६ )**१९०९: नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ(मृत्यू: ३ मार्च १९८९ )* *१९०९: गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये -- संतकाव्याचे व भाषाशास्त्राचे अभ्यासक (मृत्यु: १८ ऑक्टोबर २००२ )**१८९९: पुरुषोत्तम यशवंत देशपांडे – कादंबरीकार, तत्त्वचिंतक विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे संपादक (मृत्यू: २६ जुलै १९८५ )* *१८९२: अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते,पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष,पद्मभूषण (१९५४), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ - १९६६),पद्मविभूषण (१९७७)(मृत्यू: १९८४ )**१८८२: सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१ )**१८६७: ’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार,आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू: २५ मार्च १९४० )**१८४३: रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू: २७ मे १९१० )*🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: गोविंदराव कुलकर्णी-- मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक(जन्म: १९२९ )**२०१२: पंडित रविशंकर -- भारतीय संगीतज्ञ व सुप्रसिद्ध सतारवादक (जन्म: ७ एप्रिल १९२० )**२०१२: भाऊसाहेब निंबाळकर -- भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १२ डिसेंबर १९१९)**२००४: एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१६ )**२००२: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९२० )**२००१: रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: १७ मार्च १९०९ )**१९९८: रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५ )**१९९१: रघुनाथ गोविंद सरदेसाई -- पत्रकार, संपादक,नाटय-चित्रपट समीक्षक (जन्म: ७ सप्टेंबर १९०५ )**१९८७: गुरूनाथ आबाजी तथा जी.ए.कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गूढकथालेखक (जन्म: १० जुलै १९२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रदूषण : एक समस्या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कुर्ला बेस्ट अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार जेष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एमबीबीएस पेपर फुटीप्रकरणी विज्ञान विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीसाठी समिती गठित, सायबर पोलिसांकडूनही चौकशी सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पहिले रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलन जानेवारीत, पानिपतकार विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे पुस्तक महोत्सव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन, आयोजक राजेश पांडे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर 14 डिसेंबर पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *केस कुरळे का होतात ?* 📒आपले केस केरटीन या प्रथिनाचे बनलेले असतात. त्यातले काही सरळसोट का राहतात, तर इतर वेडीवाकडी वळणे घेत कुरळे का बनतात, याचं रंगीत प्रथिनांच्या रचनेतच सामवले आहे. प्रथिने ही अमिनो आम्लांची बहुवारिक साखळीच असते. प्रथिनांमध्ये एकूण २० वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्ल असतात. त्यातल्या प्रत्येकाच्या रेणूची अंतर्गत तसंच त्रिमिती रचना वेगवेगळी असली तरी प्रत्येक अमिनो आम्लाच्या एका टोकाला आम्लधर्मीय कार्बोक्सील हा रेणूंचा गट असतो, तर दुसर्या टोकाला अल्कलीधर्मीय अमिनो गट असतो. साखळी गुंफण्यासाठी जेव्हा एका अमिनो आम्लाचा रेणू शेजारच्या दुसऱ्या अमिनो आम्लाशी जोडला जातो तेव्हा हे अमिनो आणि कार्बोक्सील रेणू एकमेकांशी पेप्टाइड बंध तयार करतात. अशा रीतीने प्रथिनांची प्राथमिक रचना असणारी हि सरळसोट साखळी तयार होते. या अमिनो आम्लांवर इतर अणुही असतात. ते टोकाला नसून मधल्या अंगाच्या दोन्ही बाजूंना पसरलेले असतात. ते जराशा दूरवर असलेल्या अमिनो आम्लावरच्या दुसर्या रेणूशी संधान बांधून इतर बंध तयार करतात. त्यामुळे मग या साखळ्या सरळसुत न राहता त्यांच्यामध्ये वेटोळी किंवा मोड तयार होतात. प्रथिनांची द्वितीय स्तरावरची रचना तयार होऊ लागते.या प्रकारच्या बंधामध्ये सल्फरचे अणुही सहभागी होतात. कित्येक अमिनो आम्लांच्या मध्यभागावर सल्फरचे अणु असतात. त्यांचा संपर्क दुसऱ्या कोणत्यातरी साखळीत त्यांच्यापासून दूरवर असणाऱ्या अमिनो आम्लाच्या अंगावरच्या सल्फरच्याच अणुशी आला, कि त्यांच्यामध्ये एक पूल तयार होतो. त्याला डायसल्फाईड ब्रिज असे म्हणतात. या पुलांमुळे मग त्या प्रथिनांच्या सरळ असलेल्या साखळीला बाक येतो. त्याची वेटोळी बनतात. केसांमध्ये अशा सल्फरच्या पुलांची संख्या वाढली तर ते कुरळे होतात. जर त्यांची संख्या कमी झाली तर ते सरळ राहतात. केसांमध्ये किती पाणी आहे, यावरही त्यांच्या या रचनेत काही बदल होतात; पण ते कायमचे नसतात. केस कोरडे झाले कि परत आपले मूळ रूप धारण करतात.काही जण केसांवर काही प्रक्रिया करून त्याचे स्वरूप बदलू पाहतात. सरळ केस असलेली व्यक्ती आपले केस कुरळे करून घेते. तसे करताना ती त्यांच्यातल्या सल्फर पुलांची संख्या वाढवत असते; पण हि स्थिती तात्पुरतीच असते. कारण नव्याने वाढलेले केस परत सरळच राहतात. कालांतराने मग सरळ वळण देण्याच्या प्रयत्नांची होते. काही दिवसांनी ते आपले मुळचे कुरळेपण परत मिरवू लागतात.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*WHO - World Health Organization*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा , खडतर परिश्रम करा म्हणजे तुम्ही निश्चित ध्येयाप्रत पोहोचू शकाल. --- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे ?२) 'पसायदान' कोणत्या ग्रंथातून घेतले आहे ?३) युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील किती ठिकाणांचा समावेश आहे ?४) 'विमल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताने पहिली अणुचाचणी कोठे व केव्हा केली ? *उत्तरे :-* १) राहुल नार्वेकर २) ज्ञानेश्वरी ३) ४० ठिकाणे ४) निर्मळ, निष्कलंक ५) पोखरण ( सन १९७४ )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 इलियास शेख, शिक्षक तथा सर्पमित्र, देगलूर👤 प्रा. नितीन दारमोड, धर्माबाद👤 प्रिया बुडे👤 रमेश मेरलवार, करखेली👤 विजय जाधव👤 विशाल स्वामी👤 आकाश सोनटक्के*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कपटनाटका कल्लोळ करुणा । मजलागीं दीन होसी देवा ॥१॥ रात्रंदिवस मज ठेवुनि जवळ । घालसी कवळ मुखामाजीं ॥२॥ पेंद्या सुदाम्याचे करिसी कैवार । मजसी अंतर केलें आतां ॥३॥ नामा म्हणे आम्हीं करितों बोभाट । देऊं नको भेट पांडुरंगा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथे आपल्याला पोहोचायचे असते.त्या ठरलेल्या जागी पोहोचायला जास्त वेळ लागत नाही. कोणत्याही माध्यमातून आपण पोहोचत असतो. पण, एखाद्याला मागे टाकून पोहोचणे असेल तर मात्र समोर पोहोचून सुद्धा पाहिजे त्या प्रकारचे आपल्याला समाधान मिळत नाही. कारण दुसऱ्यांच्या मनात जागा केलेल्यांना कितीही बाजूला सारण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा काढणे होत नाही. त्यासाठी माणूस म्हणून जगावे लागते व अशा कितीतरी मौल्यवान संपत्तीचा त्याग करावा लागतो. ते, प्रत्येकालाच जमत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बढाईखोर माणूस*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणाऱ्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊ लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.*तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 डिसेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1YqhDdgy5N/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ♦️ *_जागतिक मानवी हक्क दिवस_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ३४५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.**२००८: प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.**१९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९१६: ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.**१९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.**१८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.* ♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४: जितेंद्र परशराम कुवंर -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा तहसीलदार**१९७३: सुनील मंगेश जाधव -- कथाकार, कवी**१९७२: रेणुका पुरुषोत्तम बुधाराम -- कवयित्री, लेखिका* *१९७०: आलियागोहर जाकीर शेख -- कवयित्री, लेखिका* *१९६९: प्रा. डॉ. अशोक पवार -- प्रसिद्ध लेखक, विचारवंत**१९६७:दासू वैद्य -- प्रसिद्ध कवी व लेखक**१९६६: अ‍ॅड. धर्मेंद्र चव्हाण -- लेखक, पत्रकार**१९६२: प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे -- प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक**१९६०: डॉ. मनोहर जगन्नाथ जाधव -- प्रसिद्ध कवी, समीक्षक,संपादक* *१९६०: रती अग्निहोत्री -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९५९: चंद्रकांत ज्ञानेश्वर धस -- प्रसिद्ध कवी, गझलकार तथा निवृत्त भारतीय संरक्षण खात्याचे जेष्ठ अधिकारी**१९५३: अभिमन्यू इंगळे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५२: अशोक महादेव वाडकर -- कवी, लेखक**१९५२: वसंत वाहोकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४०: दत्तात्रेय सैतवडेकर -- प्रसिद्ध कथाकार, कवी**१९३६: पुष्पा वसंत काणे -- कादंबरी,नाटके, कथा, कविता, तसेच साहित्यविषयक अन्य लेख हे सर्व साहित्यप्रकार यशस्वीरीत्या हाताळले (मृत्यू: १३ जानेवारी २०१३ )**१९३८: सखाराम कलाल (सखा कलाल) -- १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते (मृत्यू: १३ डिसेंबर २०१९ )**१९२६: डॉ.शकुंतला खोत -- कादंबरी,कथालेखिका (मृत्यू: ७ मे२००८ )* *१८९४: परशुराम महादेव लिमये -- लेखक (मृत्यू: २३ जानेवारी १९६१ )**१८९२: व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (मृत्यू: १५ मार्च १९३७ )**१८८०: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित.अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.(मृत्यू: ८ जानेवारी १९६७ )**१८७८: चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल,मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२ )**१८७०: सर जदुनाथ सरकार – आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रसिद्ध इतिहासकार व संशोधक (मृत्यू: १९ मे १९५८ )*♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: सुलोचना महादेव कदम -- सुलोचना चव्हाण या नावाने ओळखल्या जातात, भारतीय गायिका होत्या ज्या मराठीतील तिच्या लावणींसाठी प्रसिद्ध होत्या (जन्म: १३ मार्च १९३३ )*.*२००९: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३८ )**२००४: देवीसिंग व्यंकटसिंग चौहान -- ऋग्वेदाचे भाष्यकार,भाषाशास्त्राचे जाणकार, मराठी व दक्खिनी हिंदीचे भाषिक अभ्यासक आणि इराणी सांस्कृतिक संबंधाचे संशोधक, स्वातंत्र्यसेनानी.(जन्म: २ मार्च १९११ )**२००४: होमी वाडिया -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २२ मे १९११ )**२००३: श्रीकांत ठाकरे -- चित्रकार,लेखक, संगीतकार (जन्म: २७ जून १९३० )**२००१: अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते,पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९),५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ ऑक्टोबर १९११ )**१९६४: शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (जन्म: १७ ऑगस्ट १९०५ )**१९६३: सरदार कोवालम माधव तथा के.एम. पणीक्‍कर – भारताचे चीन,इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५ )**१९५५: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (जन्म: २६ सप्टेंबर १८९४ )**१९२०: होरॅस डॉज – 'डॉज मोटर कंपनी’चे एक संस्थापक (जन्म: १७ मे १८६८ )**१८९६: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (जन्म: २१ आक्टॊबर १८३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महायुतीचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्यावर अविश्वास ठराव ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ईव्हीएम विरोधात वंचितचा 12 रोजी मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नांदेडात आज आक्रोश मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा, संजय मल्होत्रा असणार आरबीआयचे नवे गव्हर्नर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दक्षिण आफ्रिकेने केला श्रीलंकेचा पराभव, WTC मध्ये ऑस्ट्रेलियाला मागे टाकून बनले नंबर-11*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, 20 टक्के मॅच फीचा दंड, ट्रेव्हिस हेड मात्र स्वस्तात सुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 तोंडाला पाणी का सुटतं ? 📒आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. त्यांचे काम तोंडात लाळेचा स्राव करण्याचं असतं. लाळेमध्ये असलेले काही पाचक पदार्थ व विकरं अन्नाच्या पचनात मोलाची भुमिका बजावत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा या ग्रंथींमधुन आपोआप लाळेचा पाझर व्हायला सुरुवात होते. त्या घासाचे दातांकडुन तुकडे पडत असताना त्यात लाळ मिसळुन त्यातल्या विकरांमुळे म्हणजेच रासायनिक कातर्‍यांमुळे त्यातील रसायनांच्या रेणुंचे तुकडे व्हायला सुरुवात होते. पचन व्हायला तिथुनच सुरुवात होते. या ग्रंथी काहीवेळा अधिकच उत्साह दाखवतात. त्यामुळे घास प्रत्यक्षात तोंडात पडण्यापुर्वी त्याच्या येण्याची वाट न पाहताच त्या कामाला लागतात. आपण अन्नाची चव जशी जिभेनं घेत असतो तशीच ती नाकानेही घेत असतो. खरं तर अन्नाचा स्वाद आणि सुगंध या दोन्हींचा एकत्र वापर करुन आपण अन्नाची चव चाखत असतो. त्यामुळे आवडत्या किंवा मसालेदार पदार्थांचा सुगंध वातावरणात दरवळु लागला की त्या वासानंच आपली भुक चाळवली जाते. सहाजिकच तो पदार्थ आपल्या तोंडात कधी पडतो, याचीच वाट आपण पाहु लागतो. त्या भावनेपोटी मग आपल्या मेंदुतील विवक्षित मज्जापेशी उत्तेजित होतात. त्या आपलं काम करायला सुरुवात करतात आणि लाळग्रंथींना संदेश पाठवु लागतात. त्यांना प्रतिसाद देत मग त्या ग्रंथी कार्यान्वित होतात. त्यांच्यामधुन लाळेचा पाझर होऊ लागतो. यालाच आपण पाणी सुटणं असं म्हणतो. काही वेळा अन्नाला तसा सुवास नसतो. पण तो पदार्थ पाहुनही मज्जापेशी चाळवल्या जातात आणि लाळग्रंथींना आदेश मिळतो. तोंडाला पाणी सुटतं ते यामुळेच. अशारितीनं ती एक प्रतिक्षिप्त म्हणजेच आपोआप होणारी घटना आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*GMT - Greenwich Mean Time*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो. --- साने गुरुजी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक ध्यान दिवस'* केव्हा साजरा केला जाणार आहे ?२) २१ डिसेंबर हा 'जागतिक ध्यान दिवस' म्हणून साजरा केला जावा हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात कोणत्या देशाने मांडला ?३) सन १८५७ मध्ये मुंबईत मराठी नाटकांसाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले ?४) 'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतीय राज्यघटनेचा मसुदा किती दिवसात लिहून पूर्ण झाला ? *उत्तरे :-* १) २१ डिसेंबर २) लिकटेंस्टिन ३) नाना शंकरशेठ ४) वायू, वात, अनिल, मरुत, पवन, समीर ५) २ वर्ष, ११ महिने व १८ दिवस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. विठ्ठल जम्बले👤 संभाजी धानोरे👤 प्रवीण वाघमारे👤 दत्ताहरी बिमरतवार👤 श्रीकांत मॅकेवार👤 शिवानंद हिंदोळे👤 अनिल यादव👤 दशरथ एम. शिंदे👤 संदीप म्हस्के*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐसें माझें मना येतें पंढरीनाथा । न सोडी सर्बथा चरण तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी गोपाळा । कां स्नेह लावियेला पूर्वींहुनी ॥२॥ ह्रदयीं चित्तवृत्ति मनेंसि मिळोनी । अवघीं तुझ्या चरणीं सुरवाडिलीं ॥३॥ नामा म्हणे केशवा धरिली तूझी सेवा । सुखा अनुभवा अनुभविलें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन अशांत असेल तर आपल्या समोर कितीही आकर्षक वस्तू ठेवल्या असतील तरी त्याकडे आपले लक्ष जात नाही. कारण त्यावेळी, त्या वस्तूंचे महत्व सुद्धा शुन्य वाटत असते.पण, एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावे मन हे हवेपेक्षा वेगवान असते तो कुठेही घेऊन जात असतो.म्हणून कोणत्याही गोष्टीचा जास्त त्रास करून घेऊ नये. कारण तो होणारा त्रास स्वतःला भोगावा लागतो व पुन्हा एकदा अडचणी येण्यासाठी मार्ग मोकळा करून देत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *देखावा !*'लबाड बांधतो इमले माड्या, गुणवंताला मात्र झोपडी' या ग. दि. माडगूळकरांच्या गीताचा अनुभव आपणाला पदोपदी येत असतो. गुणवत्ता असणाऱ्यांना किंमत नाही आणि अर्धवट ज्ञानी व्यक्ती मोक्याच्या जागेवर, हा आजचा सार्वत्रिक अनुभव ! एक नकलाकार एका गावात प्रयोगासाठी आला होता. त्याच्या कार्यक्रमाची खूपच जाहिरात झाल्याने गर्दीही बऱ्यापैकी होती. अनेक नेत्यांचे, प्राण्यांचे त्याने हुबेहूब आवाज काढले. प्रेक्षक खूष झाले. त्यांनी त्याला डुकराचा आवाज काढण्यास सांगितले. त्याने तो काढलाही. पण त्या गर्दीतील एक गृहस्थ म्हणाला, "ही नक्कल बरोबर साधली नाही." तेव्हा नकलाकाराने त्याला स्टेजवर येऊन डुकराचा आवाज काढून दाखविण्यास सांगितले. त्या गृहस्थाने ते आव्हान स्वीकारले. तो आपल्या पोत्यासह स्टेजवर गेला. त्याने पोत्यात डोके घातले आणि साऱ्या प्रेक्षकांना डुकराचा आवाज आला. पण लोकांनी त्याची कुचेष्टा सुरू केली. तेव्हा त्याने पोत्यातून डुकराचे पिल्लू बाहेर काढले व तो म्हणाला, "या खऱ्या डुकराचा आवाज तुम्हाला पटला नाही आणि याने खोटा आवाज काढला तर त्याचं तुम्हाला कौतुक !"* तात्पर्य : आपणही आज असेच गुवत्तेपेक्षा, दर्जापेक्षा देखाव्याला भुलतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BFhRFo73A/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील ३४४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: पोटा कायदा रद्द करण्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता* *१९९५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ**१९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाची निर्मिती**१९००: लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: रागिनी खन्ना -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९८१: दिया मिर्झा-हेंड्रिच -- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री व निर्माती**१९८०: पराग माधव पोतदार -- मुक्त पत्रकार, अनुवादक, संपादक, प्रकाशक**१९७८: किशोर नामदेव कवठे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७५: डॉ. विशाल गोरखनाथ तायडे -- मराठी, हिंदी, इंग्रजी लेखन करणारे लेखक* *१९७४: अंजली अंबेकर -- लेखिका**१९७१: डॉ. जनार्दन पांडुरंग भोसले -- प्रसिद्ध लेखक**१९६८: फराह नाझ हाश्मी -- चित्रपट अभिनेत्री**१९६७: मृणाल घाटे -- कवयित्री**१९६५: अभिजीत टोणगावकर -- लेखक* *१९५७: माधुरी वरुडकर -- कवयित्री, लेखिका**१९५६: मदन मार्तंडराव बोबडे -- कवी, लेखक**१९५२: चंद्रकांत गुंडप्पा गडेकर -- लेखक**१९५०: प्रतीक्षा प्रकाश वखडेकर -- कवयित्री* *१९४८: विद्या वसंत पराडकर -- कवयित्री* *१९४६: सोनिया गांधी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्व अध्यक्षा**१९४५: खुदराम गोविंद पुरामकर -- लेखक (मृत्यू: १९ डिसेंबर २००४ )**१९३९: घन:श्याम धेंडे -- प्रसिद्ध गझलकार (मृत्यू: १४ एप्रिल २०१७ )**१९३८: प्रा.भास्कर कुलकर्णी -- लेखक, कथाकार, समीक्षक* *१९२८: प्रा. विजया प्रभाकरराव कुलकर्णी -- लेखिका* *१९२६: रामचंद्र श्रीपाद गोसावी (राम गोसावी) -- प्रसिद्ध कवी* *१९२५: शकुंतला सातपुते -- लेखिका**१९१३: होमाई व्यारावाला -- भारतातल्या पहिल्या महिला छायाचित्र पत्रकार ( मृत्यू: १५ जानेवारी २०१२ )**१९१२: कानू रॉय -- हिंदी आणि बंगाली चित्रपटांमधील भारतीय अभिनेता आणि संगीतकार(मृत्यू: २० डिसेंबर१९८१ )* *१८७८: अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू: १६ मे १९५० )**१८६८: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: नरेंद्र भिडे -- प्रसिद्ध संगीतकार (जन्म: ३ एप्रिल १९७३ )**२००७: त्रिलोचन शास्त्री -- साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी ( जन्म: २० ऑगस्ट १९१७ )**१९९७: के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरणवादी,चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० ऑक्टोबर  १९०२)**१९९३: स्नेहप्रभा प्रधान -- चित्रपट अभिनेत्री, लेखिका (जन्म: २० ऑक्टोबर१९१५ )**१९८२: विठ्ठल हरी कुलकर्णी -- मराठी लेखक, समीक्षक व चरित्रकार (जन्म: १४ एप्रिल १९०२ )**१९४२: डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म: १० ऑक्टोबर  १९१० )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - शूरवीर सचिन*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *288 पैकी 280 आमदारांचा शपथविधी संपन्न,8 आमदारांचा शपथविधी बाकी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा, छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, मराठवाड्यातील समस्यांवर, कामगारांच्या स्थलांतरावर झाली चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्याला विरोध, महामेळावा दडपण्यासाठी शहरात जमावबंदी, उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवव्यांदा विजेतेपदाचे स्वप्न भंगलं, दुबई येथे झालेल्या U-19 आशिया कप स्पर्धेत बांगलादेशने भारताचा 59 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *भूकंप* 📙 ****************भूकंपाचा अनुभव भारतीयांना नवीन नाही. १९५५ साली आसाममध्ये प्रचंड भूकंप झाला होता. १९६७ साली कोयनेच्या परिसरात झालेल्या भूकंपाने मुंबईपासून कोल्हापूरपर्यंतचा सर्व टापू हादरवून सोडला होता. यानंतरचा १९८८ साली बिहारमध्ये झालेला भूकंप कित्येक खेडोपाडी उद्ध्वस्त करून गेला. १९९२ साली उत्तरकाशी या हिमालयातील भागात झालेल्या भूकंपातून अजून लोक सावरायचे आहेत. भारतातील अत्यंत भीषण भूकंप ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर जिल्ह्यात झाला. किल्लारी व सास्तूर या दोन गावी त्याचा केंद्रबिंदू होता. या भीषण धक्क्यांमुळे मराठवाड्यातील मातीच्या घरांचा पूर्णतः विध्वंस होऊन ढासळलेल्या ढिगार्याखाली अंदाजे अकरा हजार माणसे जिवंत गाडली गेली. रात्रीच्या वेळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा प्रकार घडला. गावेच्या गावे उद्ध्वस्त व निर्मनुष्य करणारा प्रकार महाराष्ट्राच्या आठवणीत कायम राहील. कच्छमधील भूजजवळ त्यानंतरचा मोठा भूकंप होऊन फार मोठी मनुष्यहानी व इमारतींची हानी झाली. अहमदाबादसारख्या शहरातील मोठ्या वास्तूंना त्याची हानी पोहोचली. इतका तो मोठा होता. या भागांत धाब्याची मातीची घरे ही हवामानाला पूरक असल्याने बांधली जात. यानंतर या बांधणीबद्दलच साशंकता निर्माण झाली आहे. भूकंप झाल्यावर संपूर्ण भूपृष्ठाच्या थरथरण्यामुळे विध्वंस होत जातो. ज्या भक्कम समजल्या जाणाऱ्या पायावर आपण इमले उभारतो, तोच पाया डळमळीत होऊन थरथरल्यामुळे वरची इमारत तडे जाऊन कमकुवत बनते, प्रसंगी कोसळते.भूकंपाचा अनुभव अत्यंत चमत्कारिक असतो. सहसा हा अनुभव घेतलेला माणूस असा प्रसंग कधीच विसरणार नाही. अनेकदा घनगंभीर असा आवाज या वेळी आसमंतात भरून राहतो. घरांचे पत्रे, घरांतील फडताळातील वस्तू, मोकळ्या बरण्या, शेल्फवरची पुस्तके थरथरण्याने पडतात वा विस्कळीत होतात. अनेकदा भूकंपानंतर पाऊस पडल्याची नोंद आहे. फार मोठा भूकंप असेल तर झाडे उन्मळून पडणे, रेल्वेचे रूळ वेडेवाकडे पिळवटणे, तलावातील पाणी भूगर्भात नाहीसे होणे. रस्त्याच्या मध्यभागी कित्येक मीटर खोल जाणाऱ्या भेगा पडणे असे दृश्य दिसते.भूकंपाचे क्षेत्र सहसा काहीशे चौरस किलोमीटरचे असते. याची नोंद कित्येक किलोमीटर दूरवर होऊ शकते. भूकंप मोजण्याच्या यंत्राला 'सायास्मोग्राफ' म्हणतात व भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये व्यक्त केली जाते. एक ते दहा रिश्टरमध्ये ती तीव्रता मोजली जाते. शून्य ते पाच या दरम्यान मोजल्या गेलेल्या भूकंपाची जाणीव होते, किरकोळ नुकसान होते. पाच ते सात या दरम्यान इमारतींची हानी, रस्त्याला तडे जाणे, झाडे पडणे हे होऊ शकते. तर सातपेक्षा जास्त रिश्टरचा भूकंप सहसा भयानक हानी करून जातो व त्याचा परिणाम सहज पाच सातशे किलोमीटरपर्यंत जाणवतो. पृथ्वी साडेचार अब्ज वर्षांपूर्वी उत्पन्न झाली पण त्या वेळेपासून आजपर्यंत पृथ्वीच्या बाह्यकवचाच्या खाली २९,००० किलोमीटर खोलीवर असलेल्या तप्त खडकांच्या द्रवस्वरूपामुळे अनेक बदल घडत आले आहेत. बाह्य कवच जेमतेम वीस ते तीस किलोमीटर जाडीचे असून या कवचाच्या सलग अशा टापुंच्या हालचाली सतत चालू असतात. या हालचाली होत असताना एक टापू ज्या वेळी दुसऱ्या टापूशी घासतो, चिकटतो, घासून सरकतो वा आदळतो, तेव्हा भूकंप होतात. या हालचालींमुळे प्रचंड पर्वत, मोठाले खडक, जलाशय यांच्या अस्तित्वावरच सखोल परिणाम घडतात. ज्यावेळी दोन टापू एकमेकांवर घासतात, त्यावेळीच आपल्याला ही भूकंपाची थरथर जाणवते. समुद्राच्या पोटात खोलवर अशा घडामोडी घडतात तेव्हा सुनामी लाटांची निर्मिती होते. विलक्षण विध्वंस करणाऱ्या या लाटा अनेक किनारे उद्ध्वस्त करीत जातात. इंडोनेशियाजवळ झालेल्या भूकंपातील सुनामीचा अनुभव भारतासकट अनेकांनी घेतला आहे. १९८९ साली अमेरिकेत सनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या भयानक भूकंपात प्रचंड असे फ्लायओव्हर पूल एखादा धुण्याचा कपडा पिळावा असे पिळवटून कोलमडले होते. तर १९०६ साली त्याच भागात झालेल्या भूकंपात कित्येक किलोमीटर लांबीचे भूकंपाचे टापू एकमेकांवर आदळल्याची खूण आजही दिसू शकते. भूकंपाची कारणे आजही अज्ञात आहेत. मध्य कवचामध्ये उत्पन्न होणाऱ्या अतिदाबामुळे बाह्य कवचाच्या हालचाली होत असाव्यात व हा दाब कित्येक वर्षे हळूहळू निर्माण होत असावा, असे मानले जाते. जगामधील भूकंप होऊ शकणारे पट्टे मात्र ज्ञात आहेत. भूकंपाला तोंड देऊ शकणारी घरे, कारखाने, यंत्रे आपण उभारू शकतो, पण त्यासाठी अफाट खर्च येतो. जपानमध्ये या स्वरूपाची काळजी घेऊन मोठ्या इमारती उभारल्या गेल्या आहेत. दुसरी सोपी काळजी म्हणजे भक्कम लाकडी व लोखंडी सांगाड्यावर घरे उभारणे. मधल्या भिंती हलक्या, तकलादू अशा वस्तूंनी उभ्या केल्या जातात. जपान हे राष्ट्र भूकंपाला तोंड देण्यासाठी सतत सज्ज असते. ११ मार्च २०११ रोजी झालेल्या तीव्र भूकंपाला व त्यानंतर उत्पन्न झालेल्या सुनामीला तोंड देणे उत्तर जपानला कठीण गेले. ८.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का फुकुशिमा या शहराला बसला. त्याचा केंद्रबिंदू शहरापासून ३०० किलोमीटर दूर समुद्राच्या पोटात होता. त्यामुळे प्रथम भूकंपाचे हादरे व त्यानंतर १० मीटर उंचीच्या सुनामी लाटा यामुळे किनाऱ्यावरची कित्येक गावे नामशेष झाली. या तडाख्यात फुकुशिमा येथील अणुविद्युत निर्मितीकेंद्रेही सापडली. सततचे भूकंप व सुनामीला तोंड देण्याची तयारी असलेल्याने या प्रलयंकारी भूकंपानंतरही मनुष्यहानी लाखोंनी न होता हजारांमध्येच थांबली. तीव्र स्वरूपाच्या भूकंपाला तोंड देताना नेहमीच अनेक प्रश्न समोर उभे राहतात. अनेक घरे कोसळून झालेली मनुष्यहानी, निवारा तुटल्याने उघड्यावर आलेली माणसे, निरुपयोगी झालेली दळणवळणाची सर्व साधने (वीज, टेलिफोन, रस्ते, रेल्वे) पिण्याच्या पाण्याचे पाइप फुटल्याने त्याचा तुटवडा या साऱ्याला तोंड देणे कठीण असते. मोठ्या भूकंपाला एखादे राष्ट्रही सहज तोंड देऊ शकत नाही ते यामुळेच. भूकंपाची पूर्वसूचना देणारी एखादी यंत्रणा वा एखादे संशोधन नजीकच्या भविष्यात होईल असेही कोणतेच चिन्ह नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BCA - Bachelor of Computer Applications*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रयत्नातील सातत्य हेच यशाचे खरे सूत्र होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच कोणत्या अभिनेत्याला 'नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे ?२) झाडाच्या पानांच्या शिरामधून कशाचे वहन होते ?३) दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक मृदा दिवस' म्हणून साजरा केला जातो ?४) 'विलंब' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) देश पातळीवर देण्यात येणाऱ्या 'नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्राम पंचायत पुरस्कार' कोणत्या ग्राम पंचायतला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) अशोक सराफ २) पाणी व अन्न ३) ५ डिसेंबर ४) उशीर ५) मान्याचीवाडी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 खा. श्री रवींद्र वसंतराव चव्हाण, नांदेड👤 शुभदा दीक्षित👤 मिलिंद गड्डमवार, साहित्यिक, चंद्रपूर👤 श्री रंजीत महाराज पाळेकर👤 सुहास रुक्मिणी दाभाडे👤 अक्षय यमलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐसें माझें मना येतें पंढरीनाथा । न सोडी सर्बथा चरण तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी गोपाळा । कां स्नेह लावियेला पूर्वींहुनी ॥२॥ ह्रदयीं चित्तवृत्ति मनेंसि मिळोनी । अवघीं तुझ्या चरणीं सुरवाडिलीं ॥३॥ नामा म्हणे केशवा धरिली तूझी सेवा । सुखा अनुभवा अनुभविलें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण आपले कार्य करत रहावे आणि शांत राहून आपल्या कामाकडे लक्ष द्यावे. आपल्या दृष्टीने किंवा इतरांच्या दृष्टीने हा विचार योग्य वाटत असला तरी कधी, कधी परिस्थिती बघून कार्य करत असताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बरेचदा अशा वागण्याचा दुसरे लोक फायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आजकाल चांगले होताना बघणारे कमी असतात आणि वाईट करणारे पदोपदी टपून बसलेले असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *.... मन ....*आचार्य विनोबांनी 'देव कसा आहे ?' याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'देव हा प्रतिष्ठित पाहुण्यासारखा आहे. एखादा पाहुणा दारात उभा राहतो. दारावर टकटक करतो. पण यजमानाने दार उघडून 'आत या' म्हटल्याशिवाय घरात शिरत नाही. तसेच देव सर्वत्र आहे. केवळ तुमच्याच दारी आहे, असे नव्हे. जशी सूर्याची किरणे सर्वत्र आहेत. केवळ तुमच्याच दारी आहे, असे नव्हे. जशी सूर्याची किरणे सर्वत्र पसरलेली असतात. पण बंद दारातून आत येऊ शकत नाहीत. मात्र दाराला किंचितही का होईना फट असेल, दार थोडे किलकिले केले असेल तरी प्रकाशाचे दूत त्यातून घरात प्रवेश करतात. तसेच निष्ठापूर्वक संकल्प करून प्रार्थना करणे म्हणजे मनाचे दार किलकिले करणेच आहे. त्या सर्वशक्तीला आव्हान करून बोलवण्यासारखेच आहे. देव, गुरु, प्रेरणादायी स्फूर्तीस्थान ह्यांत एवढी शक्ती असतेच आणि इतरांना ती शक्ती देण्याचा संकल्प असतोच. पण देव अनाहूत पाहुण्यासारखा दारी उभा असतोच. असे स्वरूप विशद करून विनोबांनी प्रार्थनेचे महत्व विशद केले आहे.* तात्पर्य : सृष्टीतील दिव्य शक्तीसाठी मनाची कवाडे खुली ठेवल्याखेरीज ईश्वरी शक्तीचा अनुभव घेणे कठीण आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 डिसेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15iq8haMyo/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••♻️ *_भारतीय सेना ध्वज दिन_* ♻️•••••••••••••••••••••••••••••••••♻️ *_आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••• ♻️ *_ या वर्षातील ३४२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♻️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♻️•••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड**१९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण**१९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर**१९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.**१९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.**१९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.**१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.**१८२५: बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.* ♻️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♻️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: धनंजय शंकर पाटील -- लेखक, कवी**१९८७: सोनी प्रभाकर कानडे -- कवयित्री* *१९८२: सविता करंजकर-जमाले -- लेखिका**१९७३: ललित एकनाथ बोरसे -- कवी* *१९७१: अनिसा सिकंदर शेख -- कवयित्री, लेखिका* *१९६२: शेखर सुमन -- भारतीय अभिनेता, अँकर, निर्माता, दिग्दर्शक आणि गायक**१९६१: प्रशांत दळवी -- प्रसिद्ध मराठी नाटककार व चित्रपट-कथालेखक**१९६०: प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे -- सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते (मृत्यू:३१ ऑक्टोबर २०२३)**१९५७: जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५६: डॉ.विठ्ठल ठाकूर -- लेखक* *१९५५: पांडुरंग सुतार -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५५: पांडुरंग सोमाजी भेलावे -- लेखक, कवी* *१९४८: प्रा. डॉ. भीमराव शिवाजी वाघचौरे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९४६: प्रा. माधवी कवी -- जेष्ठ लेखिका, तत्वज्ञान विषयाच्या अभ्यासक* *१९४०: जीवन चंद्रभान पाटील -- लेखक**१९३१: संगमेश्वर गुरव -- किराणा घराणा चळवळीशी संबंधित गायक(मृत्यू:७ मे २०१४)**१९२५: शोभना जयंत चांदूरकर -- कवयित्री**१९२२: जयरामदास धर्माजी सरकाटे -- लेखक (मृत्यू: ११ डिसेंबर १९९९ )**१९२०: बाबुराव सरनाईक-- ज्येष्ठ कवी लेखक (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१७ )**१९१३: डॉ. दत्तात्रेय गंगाधर कोपरकर -- महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक, संपादक* *१९०२: जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी. ‘नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९ )*♻️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म: १६ जुलै १९१३ )**१९८२: बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक (जन्म: १७ जून १९०३ )**१९७६: डॉ. गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ**१९५७: नरहर शंकर रहाळकर -- मराठी कवी (जन्म: १८८२ )**१९४१: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म: २७ ऑक्टोबर १८७४ )**१८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन.(जन्म: १९ नोव्हेंबर १८०५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**पुस्तक - परिचय : ललाटरेषा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी रब्बी पिकांचे नुकसान, थंडीचा जोरही ओसरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती होणार,नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार, नियमानुसार काम करणार अशी कोळंबकरांची भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मोठे बदल दिसणार; पक्ष संघटना वाढीसाठी काम, शिवसेनेच्या वाढीसाठी काम, प्रचारातील कामगिरीचा विचार करणार,एकनाथ शिंदे निकष लावून मंत्रिपद देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेणार,निकषाबाहेर लाभ घेतलेल्यांबाबत विचार करणार, देवेंद्र फडणवीस यांनी मांडली भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कृषी कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली, कोणत्याही हमीशिवाय शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ॲडलेडच्या पिंक बॉल कसोटीत भारत पहिल्या डावात 180 धावांवर बाद, गोलंदाजांच्या माऱ्यापुढं भारताची फलंदाजी ढेपाळली,ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 81 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बेटांची श्रुंखला* 📙 ************************बेट म्हणजे मुख्य जमिनीपासून समुद्रामुळे बाजूला पडलेले भूभाग. मुख्य जमिनी म्हणजे प्रमुख खंडे. भारताची बेटे म्हणजे अंदमान व निकोबार. पण अंदमान किंवा निकोबार बेटे म्हणजे बेटांची एक श्रुंखला आहेत. काही प्रमुख बेटांवर वस्ती आहे, तर काही बेटे तशीच ओसाड आहेत. जगाच्या पाठीवर जवळपास हाच प्रकार आढळतो. बहुतेक ठिकाणी अशा श्रृंखला आढळतात. मग त्या भर समुद्रात असतील किंवा एखाद्या प्रमुख भूखंडाच्या जवळपास असतील. असे का व्हावे ? याकरता थेट पुरातन काळाकडे वळावे लागते. पृथ्वीची मध्यभागापासून पृष्ठभागापर्यंतची विभागणी कोअर, मँटल व क्रस्ट अशा तीन आवरणात होते. सर्वसाधारणपणे क्रस्टची म्हणजे भूकवचाची जाडी बत्तीस ते पन्नास किलोमीटर असते. पण हीच जाडी समुद्रातळाशी जेमतेम तीन ते पाच किलोमीटर इतकी कमी होते. पृथ्वीचे मँटल किंवा मध्यावरण हे अतितप्त असते. येथील आण्विक घटकांचे विभाजन काही वेळा सुरू होते, तेव्हा समुद्रतळाशी असलेले भूकवच फोडून आतील तप्त लाव्हा बाहेर पडतो. पृथ्वीचा गाभा हा त्याहूनही तप्त असला, तरी तो प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या दाबाखाली अाकसलेला आहे. संपूर्ण पृथ्वीच्या भूकवचावर समुद्रातळाशी किमान एकशेवीस ठिकाणी अशी अतितप्त ठिकाणे भूगर्भशास्त्रज्ञांनी माहीत करून शोधून ठेवली आहेत. खोल समुद्राच्या पोटात या अतितप्त ठिकाणी जेव्हा ज्वालामुखीचा लाव्हा उफाळून बाहेर पडू लागतो, तेव्हा तो अर्थातच थंड होऊन त्याची शिला बनू लागते. या प्रचंड शिलाखंडाचेच बेट बनते. असे हे नवनिर्मित बेट जेव्हा पाण्यावर दिसू लागते आणि पसरते, तेव्हा भूकवचाची जाडी वाढत जाते. समुद्रतळाशी असलेल्या अतितप्त ठिकाणाची गडबड मात्र थांबलेली नसते. ज्वालामुखी पूर्ण थंडावलेला नसतो. पण वरच्या तोंडावर मात्र भले मोठे झाकण बसून ते बंद झालेले असते. या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणून समुद्रतळाशी असलेल्या भूकवचाची थोडीशी हालचाल होऊ लागते. ते पुढे सरकते. म्हणजेच नवीन बेटे तयार झालेला भाग पुढे गेल्यावर पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक सुरू होतो. या ठिकाणी पुन्हा एखादे बेट तयार होते, पण जोवर अंतर्भागाचा उद्रेक थंड होत नाही, तोवर ही प्रक्रिया चालूच राहते. आता आपण जी प्रक्रिया पाहिली, ही सर्वसाधारणपणे हजारो वर्षांच्या कालावधीत घडते व बेटांमधील अंतर पंचवीस ते पंचवीसशे किलोमीटर इतके असू शकते. अशा प्रकारच्या बेटमालिका वा बेटांच्या श्रृंखला जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी सापडतात.एक विरोधाभासही यातील काही ठिकाणी सापडतो. समुद्राच्या खोलवर भागांतील बेटांचा पृष्ठभाग कंच हिरवागार असतो. पण क्वचित तेथेच एखादे ज्वालामुखीचे तोंड (क्रेटर) धूर ओकत असते.विविध बेटांचा माणसाने काय उपयोग केला ? एकांडे शिलेदार तेथे वस्तीला गेले. काही ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून पाठवले गेले. मोक्याच्या ठिकाणी बेटांवर लष्करी ठाणी वसवली जाऊन आसपासच्या चार पाचशे किलोमीटरवर देखरेख ठेवायला उपयोग केला गेला. ज्या बेटांवर मुबलक पाणी उपलब्ध झाले तेथील वस्तीच वाढत गेली. छोटे देश म्हणून ही बेटे उदयाला आली आहेत. मालदीव, मॉरिशस ही अशी काही उदाहरणे तर दिएगो गाॅर्सिया हे दक्षिण हिंदी महासागरातील एकमेव बेट लष्करीदृष्ट्या फार मोक्याचे ठरले आहे. साखलीन बेटमालिका ही पॅसिफिकमधील लष्करीदृष्ट्या महत्त्वाची बेटमालिका आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*HDD - Hard Disk Drive*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाग्याची द्वारे सर्वत्र आहेत प्रयत्नाने प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण आहेत ?२) महाराष्ट्रातील कोणत्या गावात शिव्यांना बंदी घालून ५०० रू. दंडाची पावती फाडण्याचा ठराव ग्रामसभेने घेतला आहे ?३) कोणार्क येथील सूर्यमंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे ?४) 'वाली' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) झारखंड राज्याचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ? *उत्तरे :-* १) देवेंद्र फडणवीस २) सौंदाळा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर ३) नागर शैली ४) कैवारी, रक्षणकर्ता ५) चौथ्यांदा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विजयकुमार जोरी👤 सुरेखा खोत👤 संगीता चाके👤 बाळासाहेब तांबे👤 काशिनाथ बाभळीकर👤 मनोज मनूरकर👤 धनंजय शंकर पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐशा विचारें समाधान करीं । गोविंद श्रीहरी नारायन ॥१॥ सर्वकाळ ऐसी वदो ही वैखरी । आणि अंतरीं नाठवावें ॥२॥ आणिकासी गुज न बोले वदन । वदो नारायन सर्वकाळ ॥३॥ रामकृष्ण माझ्या शेषाचें स्तवन । शास्त्रेंहि पुराणें भाट ज्यांचीं ॥४॥ नामा म्हणे आतां ऐसें करी देवा । ह्रदयीं केशवा राहे माझ्या ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती चुका शोधून काढण्याची जबाबदारी पार पाडते. ती व्यक्ती, स्वतः एक दिवस खरी असताना सुद्धा इतरांच्या दृष्टीतून उतरून जाते.कारण ज्याची चूक शोधून काढताना खरंच ती व्यक्ती वारंवार चुकीचे वागते का..? हे जाणून घेण्याचा कुठेतरी विसर पडत असतो. म्हणून स्वतः च्या समाधानासाठी किंवा इतरांच्या सांगण्यावरून कोणाला चुकीचे ठरवू नये. कारण माणूस म्हटल्यावर चुका होत असतात पण,प्रत्येक वेळी एखाद्याला चुकीचे ठरवून फायदा होत नाही. म्हणून ज्याच्या कडून चुका होत असतील त्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. या कार्याला माणुसकी धर्म म्हणतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वृथा अभिमान नको*एक म्हातारीला वाटे आपला कोंबडा आरावतो म्हणून या गावात सूर्य उगवतो. हे सारे ती गावभर सांगत फिरायची. लोक तिला वेडी म्हातारी म्हणायचे. गाव जेव्हा जास्तच त्रास द्यायला लागले तेव्हा ते गाव सोडायचा निश्चय त्या म्हातारीने केला. जाताना तिने आपला कोंबडा बरोबर घेतला आणि ती दुसऱ्या गावी निघून गेली जाताना म्हणाली "आता बसा रडत ! या गावात सूर्याच उगवणार नाही. मग रडाल. पश्चाताप कराल. मला शोधत फिराल. ती दुसऱ्या गावी गेली. दुसरा दिवस उजाडला, तिचा कोंबडा आरवला. त्या गावात सूर्य उगवला होता. तो सूर्य पाहून ती म्हातारी म्हणाली 'हा इथं सूर्य उगवलाय. आता माझ्या पूर्वीच्या गावात कुठला सूर्य उगवणार? सारे बसले असतील रडत. मला छळताय काय? भोगा म्हणावं आता केल्या कर्माची फळं ! आणि ती हसू लागली. आपल्या पूर्वीच्या गावाची आपण कशी जीरवली याचा तिला गर्व वाटू लागला. पण तिला माहीत नव्हते त्याही गावात आज सूर्य उगवला होता.* तात्पर्य : आपल्यामुळेच जग चालते, असा वृथा अभिमान बाळगू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 डिसेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BAUXLqhFE/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_महापरिनिर्वाण दिन_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_ या वर्षातील ३४१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.**१९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला 'ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.* *१९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.**१९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.**१९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.**१९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.**१९१७: फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.**१८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.*🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: श्रेयस संतोष अय्यर -- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९९३: जसप्रीत जसबीरसिंग बुमराह -- प्रसिद्ध क्रिकेट भारतीय जलद गती गोलंदाज**१९८८: रवींद्र जडेजा-- प्रसिद्ध भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू**१९८६: मिलिंद तेजराव जाधव -- लेखक**१९७६: उमेश विनायक कुलकर्णी -- मराठी चित्रपट दिग्दर्शक, लेखक* *१९७४: लवकुमार बलभीम मुळे -- कवी, लेखक**१९७२: सुरेश जिजाबा नरवाडे -- लेखक**१९६५: प्रसाद माधव कुलकर्णी -- प्रसिद्ध कवी, लेखक,संपादक,व्याख्याते* *१९५०: विजया ब्राम्हणकर -- प्रसिद्ध कवयित्री, जेष्ठ लेखिका* *१९५०: प्रदीप भाऊराव विश्वेश्वर -- कवी* *१९४५: सुभाष बब्बर -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता आणि पटकथा लेखक**१९४५: शेखर कुलभूषण कपूर -- भारतीय चित्रपट निर्माता व अभिनेता**१९४४: श्रीकृष्ण बेडेकर -- जेष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक संपादक (मृत्यू: १० मार्च २०२३ )**१९४२: प्रा. किसन धोंडिराम चोपडे -- लेखक संपादक* *१९४२: मेघा माधव किराणे -- लेखिका**१९४२: विनायक हरिभाऊ मुरकुटे -- लेखक* *१९४२: शशिकला शरदचंद्र उपाध्ये -- लेखिका,प्रकाशक* *१९४१: विजय नारायण कापडी -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९४१: मनिषा लिमये -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९३७: प्रा. डॉ. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर -- पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक व लेखक**१९३२: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू: २७ जानेवारी २००७ )**१९२३: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू: १५ आक्टोबर २००२ )**१९१६: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार -- मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते, लेखक (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२ )**१८६१: रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – प्रसिद्ध कवी व लेखक (मृत्यू: ९ मे १९१९ )**१८५३: हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ,इतिहासकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१ )**१८२३: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू: २८ आक्टोबर १९०० )**१७३२: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८ )* 🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔵 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: मोहनदास श्रीपाद सुखटणकर-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते (जन्म: २१ नोव्हेंबर १९३० )**२०१४: पद्मजा शशिकांत फाटक -- कथाकार, चरित्रकार, ललित लेखिका, बालसाहित्यकार (जन्म: १४ नोव्हेंबर १९४३ )**२०१३: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष,नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१८ जुलै १९१८)**१९८४: अनिल सदाशिव बर्वे -- नाटककार, कादंबरीकार (जन्म: १७ जुलै १९४८)**१९७६: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९०० )**१९७१: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (जन्म: १ जानेवारी १९०२ )**_१९५६: डॉ.बाबासाहेब आंबेडकर – विश्वभूषण भारतरत्न,बहुआयामी विद्वान, आधुनिक भारताचे निर्माते,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,पहिले कायदेमंत्री,व मानवी हक्कांचे कैवारी (जन्म: १४ एप्रिल १८९१ )_* *_महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लेख*माणुसकी जागवू : विषमता संपवू*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानासह विविध मान्यवर आणि सेलिब्रिटी व्यक्तींची उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ, शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एकाच दिवसात सुमारे एक काेटींच्या फसवणुकीच्या तक्रारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्लीतील प्रदूषण पातळी कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ISRO ने युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने  Proba-3 Mission लाँच केले आहे. या मोहिमेमुळे सूर्याची अनेक रहस्य उलगडणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्याला होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 समुद्रसिंह : सील 📙सील हे मिनीमीडियाचे प्रकारचे जलचर सस्तन प्राणी आहेत. या प्रकारात बाह्यकर्ण नसलेले सील (True Seals), बाह्यकर्ण असलेले सील व वॉलरस येतात. सस्तन पृष्ठवंशीयांपैकी, पण सारे आयुष्य पाण्यात काढणारी समुद्रसिंहाची जमात अतिथंड प्रदेशात समुद्रात आढळते. क्वचित बैकल सरोवराच्या आसपास काही जाती वास्तव्य करून आहेत. पण तोही आर्क्टिक सर्कलमधलाच एक भाग. सील या नावाने हे समुद्रसिंह जगभर ओळखले जातात. थंड समुद्री प्रदेशात खरे म्हणजे यांचा मोठा वावर आढळतो. अवाढव्य देह, प्रचंड वजन; पण अत्यंत चपळ हालचाल करत असल्याने त्यांना फारसे शत्रू नाहीत; पण काही वेळा शार्क माशांचा त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. माणूस मात्र त्यांचा कायमचाच शत्रू बनलेला आहे. सीलची संख्या कमी जास्त करणे हे सर्वस्वी मानवी गरजेवर अवलंबून राहते. सीलच्या कातड्याला जगभर असलेली मागणी हेच त्याचे एकमेव कारण.दक्षिण समुद्रातील एलिफंट सी-लायन या जातीतील सील पूर्ण वाढ झाल्यास सहज बारा ते पंधरा फूट लांब असतो. वजन सहज अडीच हजार किलोपर्यंत जाते. त्याचे चारही पाय हे पाय न राहता पाणी सहज ढकलतील, अशा वल्ह्यांच्या स्वरूपात रूपांतर झालेले असतात. फताडे, पसरट. . . ना पंख, ना पाय अशा स्वरूपात हे सील जेव्हा जमिनीवर येतात तेव्हा अवाढव्य वजन पेलत त्यावर सावरत चालणे त्यांना त्रासदायकच होते. अर्थात सीलची पुनरुत्पादनाची वेळ आली की, जमीन गाठणे हा नियम कटाक्षाने पाळला जातो. सीलचे वैशिष्ट्य म्हणजे नर व मादीमधील आकारमानातला प्रचंड फरक. सील मादी आकाराने नराच्या जेमतेम दोन तृतियांशसुद्धा असते वा नसते. सस्तन प्राण्यांत आकारमानात एवढा मोठा फरक क्वचितच सापडतो.सीलच्या कातडीखाली चांगलाच जाड चरबीचा थर असतो. त्यामुळे त्याच्या कातडीला रबरी स्वरूप प्राप्त होते. या थराला 'ब्लबर' असे म्हटले जाते. लहानग्या बाळाला मात्र या थराची जोड नसते. त्याची कातडी मऊसूत असते. त्यात जेमतेम तीन चार आठवड्यात बदल होत जातात. सीलच्या दुधामध्ये चरबीचे प्रमाण चक्क पन्नास टक्के असते. त्यामुळे बाळांची वाढ अक्षरश: दिवसागणिक झालेली आढळते. बाळांची वाढ जशी झपाट्याने होते, तशीच त्यांची पुनरूत्पादनक्षमतापण झपाट्याने वाढत जाते. सीलला सहसा एका वेळी एकच पिल्लू होते.कासवे, सील, वॉलरस यांच्या बाबतीत एक गमतीचे निरीक्षण आढळते. त्यांच्या पुनरुत्पादन काळात एखाद्या निर्जन भागात, निर्जन खडकाळ ठिकाणी प्रचंड संख्येने हे प्राणी एकदम जातात. त्यामुळे हजारोंच्या संख्येने सील जमलेले काही ठिकाणी आढळणारच. यावेळी जमिनीवर, खडकावर असल्याने त्यांच्या हालचाली अगदी मंदावलेल्या असतात. पण ज्यावेळी ही मंडळी पाण्यात उतरतात, त्यावेळी त्यांचा चपळपणा बघत राहावा असाच राहतो. खोलवर पाण्यात बुडी मारून थेट पाच सहाशे मीटर खोलवर सील चक्क पंचवीस ते तीस मिनिटे राहू शकतो.पाण्यातील गार तापमान सहन करायची कातडीची क्षमता, श्वसन रोखून धरण्याची क्षमता, हृदयाचे ठोके अगदी मंदावत ते चालू राहणे आणि मुख्य म्हणजे नाक व कान बंद करून ठेवता येण्याची सोय या सर्वांचा फायदा सील उठवतात. पाण्याखाली जास्तीत जास्त काळ काढणार्‍या सस्तन प्राण्यांतला हा एक आहे, असे मानता येते.गंमत कशी आहे पाहा, सील मासे खाऊन जगतो; पण तेही कोणते? तर माणूस खात नाही असे. ज्या माशांची चव माणसाला आवडत नाही, असे सर्व मासे सील अगदी आवडीने खातो. अवाढव्य देहाचे पोषण करण्यासाठी ती गरजही खूपच मोठी असते. पाण्यातील प्रवाहांची दिशा त्यांच्या भल्यामोठ्या लांबलचक मिशारुपी केसांमुळे त्यांना समजते. प्रवाहाविरुद्ध सतत पोहत राहणारे हे मासे मटकावणे या सीलला मग सहज जमते.सीलच्या सध्या ज्ञात तेहतीस जाती आहेत. प्राण्यांच्या दृष्टीने तसे त्यांना दूध दीर्घायुष्य लाभले आहे. सील सर्वसाधारण पस्तीस ते चाळीस वर्षे जगतो. आर्क्टिक प्रदेशामधील बर्फाळ भागात भला मोठा मासा तोंडात धरून मजेत खाणारा सील प्राणी हे एक आगळेच दृश्य असते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*RAM - Random Access Memory*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वादळाशी धैर्याने झुंजण्यात पुरुषार्थ आहे. जिवंतपणा आहे. जगण्याच्या, उमलण्याच्या गतिमानतेचा आनंद आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'औषधी वनस्पतींची राणी'* म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली आदिवासी महिला कोण ?३) त्रिफळा चूर्ण कशापासून बनवितात ?४) 'वासना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता व पुरावा अधिनियम या तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करणारी देशातील पहिली प्रातिनिधिक संस्था कोणती ? *उत्तरे :-* १) यानुंग जामोह लेगो, अरुणाचल प्रदेश २) यानुंग जामोह लेगो ३) हिरडा, आवळा व बेहडा ४) इच्छा ५) चंदीगड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. मंगल सांगळे, सिन्नर, नाशिक👤 मदन मोहनराव जाधव👤 बाबासाहेब घागले👤 लवकुमार मुळे👤 राजेश जाधव पाटील उमरेकर👤 नरेश पांचाळ👤 देवानंद मुरमुरे👤 बालाजी गैनवार👤 अशोक हिंगणे👤 डी. आर. भोसके👤 राजेश आमपलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उदारांचा राणा म्हणविसी आपणां । सांग त्वां कवणां काय दिल्हें ॥१॥ उचिता उचित भजसी पंढरीनाथा । न बोलों सर्वथा वर्में तुझीं ॥२॥ वर्में तुझीं कांहीं बोलेन मी आतां । क्षमा पंढरीनाथा करी बापा ॥३॥ न घेतां न देसी आपुलेंहि कोण । प्रौढी नारायणा न बोलावी ॥४॥ बाळमित्र सुदामा विपत्तीं पिडला । तो भेटावया आला तुजलागीं ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाट दाखवणे आणि वाट लावणे या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वाट दाखविणाऱ्यांमुळेच एखाद्याच्या जीवनाचा उद्धार होतो आणि त्याच्या महान कार्याला सदैव वंदन केले जाते. पण,वाट लावणाऱ्यामुळे सोन्यासारख्या जीवनाची माती होऊन जाते.म्हणून जर कोणाचे चांगले करता येत नसेल तर वाईटही करण्याचा प्रयत्न करू नये. कारण चांगले करणाऱ्यांची महिमा गायली जाते.पण, वाईट करणाऱ्यांचे पुतळे कुठेच उभारलेले बघायला मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मातृभाषा आणि संस्कार *मातृभाषेतूनच शिक्षण द्या. अखेरपर्यंत टिकतील, असे अनेक विचारवंतांनी सांगितले तरी आपल्या अहंकारापायी आपण आपल्या मुलांना प्रभाषेतूनच शिक्षण देतो. नाना फडणवीस यांच्याकडे एक बहुभाषिक गेला. म्हणाला, "मला सोळा भाषा उत्तम येतात. माझी मातृभाषा कोणती हे आपण ओळखून दाखवाल काय ?" नाना फडणवीस म्हणाले, "अवश्य ओळखेन. पण आता दरबाराच्या कामामुळे मला अजिबात वेळ नाही. उद्या सांगतो. मी तुमचं आव्हान स्वीकारलं आहे." रात्री नानांनी त्याला भरपूर जेवायला घातलं. तो मनुष्य गाढ झोपी गेला. मध्यरात्री नाना याच्याजवळ गेले, घडाभर पाणी घेऊन त्याच्या तोंडावर मारले. तेव्हा तो मनुष्य कानडीत ओरडत उठला, "अहो, हे काय करता?" नाना फडणवीस त्याला म्हणाले, "आपली मातृभाषा कानडी." तो प्रवासी अचंबित झाला.* तात्पर्य - मातृभाषा आणि तिचे संस्कार आपणाला अखेरपर्यंत सोबत करतात.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 डिसेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15CwrzLm3m/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟤 *_जागतिक माती दिन_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••🟤 *_ या वर्षातील ३४० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••• *१९६३: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली* *१९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.**१९३२: जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.**१८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.*🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: कु. तनिष्का संजय डांगे -- मराठी व इंग्रजी भाषांमध्ये लेखन करणाऱ्या बाल लेखिका* *१९८१: प्रा. हनुमंत वि. माने -- कवी* *१९८०: रेश्मा राणे-जाधव -- कवयित्री, लेखिका**१९७७: रज्जाक सादिक शेख -- कवी* *१९७४: उमेश शिरगुप्पे -- पत्रकार, कवी**१९६४: अनिल बाबुराव गव्हाणे -- प्रसिद्ध ग्रामीण कवी**१९६२: डॉ. शकुंतला काळे -- लेखिका, कवयित्री तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९६०: सारिका ठाकूर (सारिका ) -- भारतीय अभिनेत्री* *१९५६: प्रा. डॉ. बजरंग सुखदेव कोरडे -- इंग्रजी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक, संपादक* *१९५५: प्रा. डॉ. मनिषा इथापे-जाधव -- कवयित्री, लेखिका**१९५५: शरद तळदे -- प्रसिद्ध चित्रकार व लेखक* *१९५३: सम्राट नाईक -- कवी, व्यंगचित्रकार, गायक, वादक (मृत्यू: १० मे २०२१ )**१९५२: बाबाराव निंबाजी मडावी -- प्रसिद्ध कवी, कथालेखक, कादंबरीकार**१९४८: शंकर वासुदेव अभ्यंकर -- संत वा्ङ्मयाचे अभ्यासक, लेखक व प्रवचनकार**१९४८: मनीषा हिरालाल शहा -- लेखिका* *१९४४: विलास वसंत खोले -- प्रसिद्ध लेखक, समीक्षक (मृत्यू: १७ ऑक्टोबर २०२२)**१९४३: लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९ )**१९४०: उस्ताद गुलाम अली -- पटियाला घराण्याचे पाकिस्तानी गझल गायक**१९३८: मोहन हरी आपटे -- विज्ञानलेखक (मृत्यु: १२ नोव्हेंबर २०१९ )**१९३६: प्रा. सुरेश दत्तात्रेय देशपांडे -- लेखक, संपादक* *१९३३: डॉ. भास्कर जनार्दन कविमंडन -- प्रसिद्ध लेखक, संपादक(मृत्यू: २० मे १९९७)**१९३२: नादिरा (फ्लाॅरेन्स इझिकेल नादिरा) -- भारतीय सिने-अभिनेत्री ( मृत्यू: ९ फेब्रुवारी २००६ )**१९३१: अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख (मृत्यू: २ जुलै २०१८ )**१९०१: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’ मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६ )**१९०१: वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’ चे जनक (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६ )**१८९४: जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२ )**१८६३: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९३३ )*🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: जॉर्ज जोसेफ लॉरर ---प्रसिद्ध अमेरिकी इंजीनियर तथा बारकोड सहसंशोधक (जन्म: २३ सप्टेंबर १९२५ )**२०१६: जयललिता जयरामन -- तमिळनाडू राज्याच्या माजी मुख्यमंत्रीअनेक तमिळ,तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८ )* *२०१३: नेल्सन मंडेला -- दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष (जन्म: १८ जुलै १९१८ )**२००८: जयदेव सुब्बराव हट्टंगडी -- मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक (जन्म: २८ ऑगस्ट १९४८)**२००७: म. वा. धोंड – टीकाकार (जन्म: ३ ऑक्टोबर  १९१४)**१९९९: वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक* *१९९१: डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक* *१९७३: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (जन्म: ८ जानेवारी १९२५ )**१९५९: कुमार श्री दुलीपसिंहजी – क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ )**१९५५: असरार-उल-हक (मजाझ लखनवी) -- भारतीय उर्दू कवी (जन्म: १९ ऑक्टोबर १९११ )**१९५१: अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार (जन्म: ७ ऑगस्ट १८७१ )**१९५०: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ )**१७९१: वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म: २७ जानेवारी १७५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नोकरी श्रेष्ठ की शेती*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज घेणार शपथविधी तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा ही शपथविधी होणार, महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई व मुंबई उपनगरमध्ये सरकारी ऑफिस, शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोरेगाव भीमा शौर्य दिन सोहळा, सुमारे 25 लाख लोक येणार, नियोजित राष्ट्रीय स्मारकाचे काम पुढे गेले नसल्याने नाराजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाडक्या बहिणींची होणार उलटतपासणी ? कागदपत्रांची पुन्हा पडताळणी, पात्र महिलांनाच लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार, सुवर्ण मंदिराच्या गेटवर सेवा करत होते, आरोपीला अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सचिनने मुलगी साराला आपल्या फाउंडेशनची संचालक बनवले, तेंडुलकर फाउंडेशन गरीब मुलांच्या कल्याणासाठी काम करते*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *किंग्स्टन कसोटी- बांगलादेशने वेस्ट इंडिजचा 101 धावांनी केला पराभव, 2 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली; तैजुल इस्लाम सामनावीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो ?* 📙माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते. ही अवस्था तीन ते चार तास राहते. त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येतात. स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो. स्नायूंमध्ये मायोसीन आणि ॲक्टिन नावाचे तंतू असतात. त्यांच्या आकुंचन प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन प्रसरण होत असते. आकुंचन पावल्यानंतर स्नायू कडक होतात तर प्रसरणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात, स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मायोसिन व ॲक्टीन हे तंतू एक दुसऱ्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. साहजिकच या तंतूचे आकुंचन प्रसरण थांबते व स्नायू व पर्यायाने मृतदेह कडक होतो. या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर मॉर्टीस असे म्हणतात.भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर दोन ते तीन तासांनी सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला सुमारे १२ तास लागतात. त्यानंतर १२ तासांत शरीर परत शिथील होते. मायोसिन व ॲक्टीनचे विघटन झाल्यामुळे स्नायूंचा कडकपणा जातो. रायगर मॉर्टीसमुळे मृत्यूच्या वेळेसंबंधी अंदाज बांधता येतो. दुसरे म्हणजे मरणाच्या वेळी व्यक्तीची काय अवस्था होती, हेही कळू शकते. असे हे रायगर मॉर्टीस म्हणजेच मृतदेहांचे कडक होणे. गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी याद्वारे जणू मृतदेहही मदत करतो !डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*NCR - National Capital Region*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाग्याची द्वारे सर्वत्र आहेत प्रयत्नाने प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती कोणी लिहिली ?२) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य पदग्रहण करण्यापूर्वी कोणासमोर शपथ घेतात ?३) अपार ( APAAR ) आयडीचा फुल फार्म काय आहे ?४) 'वत्स या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ? *उत्तरे :-* १) संत रामदास २) राज्यपाल ३) ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री ४) वासरू, बालक ५) अल्लाउद्दीन खिलजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. शिवाजी कऱ्हाळे, केंद्रप्रमुख, मुखेड, नांदेड👤 मनोजकुमार गटलावार👤 अरुणकुमार सूर्यवंशी👤 सुनील पांचाळ👤 अविनाश सुभेदार👤 अशोक चिंचलोड👤 साईनाथ कल्याणकर👤 योगेश पडोळे👤 कृष्णकांत पाटील सावरगावकर👤 शंकर भंडारे👤 राजू अलमोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उदार कृपाळ सांगशील जना । तरी कां रावणा मारियेलें ॥१॥ नित्यानित्य पूजा सिरकमळीं करी । तेणें तुझें हरी काय केलें ॥२॥ किती बडिवार सांगसील वायां । ठावा पंढरिराया आहेसी आम्हां ॥३॥ कर्णा ऐसा वीर झूंझार उदार । त्यासी त्वां जर्जर केलें बाणीं ॥४॥ पाडिलें भूमीसी न येचि करुणा । त्याचे नारायना पाडिले दांत ॥५॥  ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाच्या बाजूने उभे राहून त्याचे समर्थन करणे किंवा त्याची बाजू घेऊन बोलणे कुठेतरी दुसऱ्याला डावलल्यासारखे होते. बरेचदा अशा निर्णयामुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन मातीमोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर निर्णय घेताना निःपक्ष, निर्भिडपणे निर्णय घ्यायला पाहिजे. दोन्ही बाजूने उभे राहून शांतपणे विचार करणे गरजेचे आहे. कारण 'टाळी एका हाताने' कधीच वाजत नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कर्तृत्वाचा गर्व*आपल्या शिवराजने एकदा सहदेव महाराजांना घरी आणले. शेतावरच्या बंगलीत त्यांची व्यवस्था केली. महाराजांची पूजाअर्चा, ध्यान-धारणा सारे कसे ठीक चालत होते. एके दिवशी सकाळी शिवराज सहदेव महाराजांसह शेताच्या बांधावरून फिरत होता. त्यांना आपली स्वकष्टार्जित शेती दाखवत होता. एवढा सारा व्याप मी एकट्यानेच कसा उभा केला, आता किती कौशल्याने हा सारा व्याप मी सांभाळतो, हे काहीशा गर्वाने महाराजांना दाखवत होता. तेव्हा महाराज म्हणाले, "गड्या, तुझा एवढा व्याप माझ्याने पाहणे शक्य नाही. ही सारी मालमत्ता मला नकाशावर दाखव ना." शिवराजने ते मान्य केले. घरी आल्यावर त्याने नकाशा काढून, त्यावर मापे टाकून सारी शेतवाडी दाखविली. सहदेव महाराजांनी हाती एक सुई धरीत म्हटले, "शिवराज, या विश्वाचा जो अफाट पसारा आहे, त्यात आपली पृथ्वी ह्या सुईच्या टोकाएवढी, त्यात आपला देश, त्यात राज्य, मग जिल्हा- तालुका आणि अखेर तुझं हे गाव. आता या गावातील तुझी शेतीवाडी दाखव बरं." ते बोलणे ऐकून शिवराज खजील झाला. क्षणार्धात त्याचा गर्व ओसरला.* तात्पर्य : कर्तृत्वाचा गर्व बाळगला तर विनाश ठरलेलाच. नम्रता बाळगली, तर उन्नती निश्चितच !*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 डिसेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19QgsGzqpv/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_भारतीय नौदल दिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील ३३९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान**१९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर**१९९१: पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.**१९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९७१: भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला.**१९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१९६७: थुंबा येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण**१९२४: मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्‍घाटन झाले.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: दिव्या अग्रवाल --- भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि नृत्यांगना* *१९७७: अजित भालचंद्र आगरकर -- भारतीय क्रिकेटपटू**१९७२: माधवी दीपक जोशी -- लेखिका**१९७१: सुनील संपतराव हुसे -- कवी* *१९६९: प्रा. डॉ. पुरुषोत्तम माळोदे -- लेखक, संपादक* *१९६८: डॉ. वसुधा वैद्य -- लेखिका* *१९६७: उमेश मोघे -- प्रख्यात तबलावादक, लेखक* *१९६७: मनीष लक्ष्मण पाटील -- लेखक* *१९६४: स्मिता प्रवीण खानझोडे -- कवयित्री* *१९६२: सय्यद जावेद अहमद जाफरी -- भारतीय विनोदी अभिनेता**१९६२: डॉ. सुलभा कोरे -- मराठी व हिंदी भाषेच्या कवयित्री व अनुवादक* *१९५७: प्रसाद सावंत -- लेखक, कवी* *१९५४: पंडित हिंदराज दिवेकर -- रुद्र वीणा आणि सतार वादक (मृत्यू: १९ एप्रिल २०१९ )**१९५१: डॉ.अलका देव मारुलकर -- गायिका आणि संगीतकार**१९५०: पार्थ पोकळे -- लेखक* *१९४९: नारायण दत्तात्रेय कुडलीकर -- लेखक* *१९४७: मुकुंद रामजीवन लाहोटी -- प्रसिद्ध कवी**१९४२: निशिकांत धोंडोपंत मिरजकर -- समीक्षक, तौलनिक साहित्याचे अभ्यासक**१९४२: फादर फ्रान्सिस दिब्रिटो -- ज्येष्ठ साहित्यिक,९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष( मृत्यू: २५ जुलै २०२४ )**१९३९: नामदेवराव दामोदर देसाई -- प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक (मृत्यू: १२ जून २०२३)**१९३५: शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (मृत्यू: २० जुलै १९९५ )**१९३२: कमलाकर धारप -- जेष्ठ साहित्यिक, ‘लोकमत’चे समन्वय संपादक* *१९३१: लीला श्रीवास्तव -- लेखिका* *१९१९: इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१२ )**१९१६: बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार (मृत्यू: २२ एप्रिल २००३ )**१९१०: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती,केन्द्रीय मंत्री,कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: २७ जानेवारी २००९ )**१९१०: मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (मृत्यू: १७ जून १९६५ )**१९०९: रंगनाथ नरहर होनप -- कवी**१८९८: काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशिनाथ चांदुरकर -- मराठी कवी, कादंबरीकार आणि लेखक**१८८५: मुकुंदराव दीनमित्रकार पाटील -- सत्यशोधकी पत्रकारिता करणारे ग्रामीण पत्रकार(मृत्यू:२० डिसेंबर १९६७)**१८३५: सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (मृत्यू: १८ जून १९०२ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: विनोद दुआ -- दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये काम करणारे भारतीय पत्रकार(जन्म: ११ मार्च १९५४ )**२०१८: डॉ. लक्ष्मण रामदास नसिराबादकर -- संत साहित्याचे गाढे अभ्यासक (जन्म: ८ ऑगस्ट १९३५ )**२०१७: शशी कपूर -- हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक (जन्म: १८ मार्च १९३८ )* *२००७: पुरुषोत्तम नागेश ओक -- विद्वान इतिहासकार, इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषांत लेखन केले आहे.(जन्म: २ मार्च १९१७ )**१९७४: शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ (जन्म: २८ आक्टोबर १८९३ )**१९०२: डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१ )* *१८५०: विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म: २२ मे १७८३ )* *११३१: ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ,खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (जन्म: १८ मे १०४८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दृष्टी तशी सृष्टी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बँकिंग सुधारणा विधेयक मांडले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तंबाखू व सिगारेटवरील GST 28 वरून 35 टक्यापर्यंत वाढविण्याची मंत्रीगटाची शिफारस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशाच्या बदलासाठी सर्जनशीलतेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकता, इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका सुधा मूर्ती यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सचिनचा महारेकॉर्ड मोडण्यापासून विराट फक्त एक शतक दूर, दुसऱ्या टेस्टमध्ये रचणार इतिहास ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का ?*जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. या आम्लाचा अन्नपचनासाठी खूप उपयोग असतो. जठरातील पेशीमधून हे अाम्ल स्रवत असते. या आम्लाचे प्रमाण कमी झाले तर अजीर्ण होते. अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. या उलट आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास आम्लपित्ताचा त्रास होतो. तोंडात आंबट पाणी येते. छातीत जळ जळ होते. पोटात जळजळ होते. जठराचा व्रणही होऊ शकतो. किंवा लहान आतडय़ांच्या पहिल्या भागात व्रण होतो. आम्ल पित्त असणाऱ्या लोकांनी तिखट, तेलकट, आंबट पदार्थ खाऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण अशा गोष्टींनी आम्ल जास्त प्रमाणात तयार होते. साहजिकच आम्लपित्ताच्या व्यक्तीला अजूनच त्रास होईल. अशा व्यक्तीने खायचा सोडा घेतल्यास त्याची जळजळ कमी होते. कारण आम्लाचा प्रभाव अल्कली मुळे कमी होतो. जेल्युसील सारख्या गोळ्यांनीही रुग्णाला बरे वाटते. लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहा. लिंबात देखील सौम्य असे एक अाम्लच असते. आम्लपित्त कमी होण्याची दोन स्पष्टीकरणे देता येईल. एक म्हणजे हायड्रोजन आयर्न असतील (H+) तर आम्ल निर्मितीची व स्त्रवणाची जठारातील पेशींची क्रिया मंदावते. दुसरे म्हणजे लिंबू आपण पाण्यात टाकूनच पितो. साहजिकच या पाण्यामुळे जठरातील आम्ल सौम्य होते. या दोन गोष्टींमुळे काही लोकांमध्ये लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होत असावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ISKCON - International Society for Krishna Consciousness*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्ही केलेल्या चुकांकडे डोळेझाक केली तर, सत्य तुमच्याकडे पाठ फिरवेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय नौदल / नौसेना दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) २०२५ मध्ये 'खेलो इंडीया युथ गेम्स' चे यजमानपद कोणते राज्य भूषविणार आहे ?३) १९५० नंतर पहिल्यांदाच कोणत्या ठिकाणी २६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिवस' साजरा करण्यात आला ?४) 'वचक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) इ. स. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले ? *उत्तरे :-* १) ४ डिसेंबर २) बिहार ३) जम्मू काश्मीर ४) धाक, दरारा ५) अवंतिका गोखले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आलीम शेख👤 जीवन पाटील👤 उमाकांत शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥ तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥ धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्त वच्छावरी ठेवूनियां ॥४॥ विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें प्रेम श्रीहरी द्यावें मज ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फुकटात सर्वच काही मिळत नसले तरीही .त्यात मात्र अगदी फुकटात व भरभरून निंदा, चुगली, अपमान आणि चेष्टा न मागताच मिळत असतात.ज्या व्यक्तीला हे फुकटात मिळतात ती व्यक्ती, नक्कीच भाग्यवान असते. निदान त्याच्यात काहीतरी करून दाखविण्याची आवड असते हीच आवड त्यासाठी सर्व काही असते. म्हणून त्याच्यासाठी ह्या, फुकटात मिळणाऱ्या नको त्या गुणांचा सुद्धा ती व्यक्ती मोठ्या मनाने आदर करत असते.कारण जीवनात अशाही काही गोष्टीची आवश्यकता असते.त्यांचाही स्वीकार करता आले पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चांगुलपणा*एकदा एका गावात गुरुनानक गेले. त्या गावातील लोकांनी त्यांना धक्के मारून हाकलून दिले. तरीही नानकजी म्हणाले, "आपल्या गावातील एकता कायम टिकून राहो." पुढच्या गावात नानक गेले. त्या गावातील प्रत्येक व्यक्तीने त्यांची प्रेमाने विचारपूस केली. त्यांचा मुक्काम असेतोवर त्यांची प्रेमाने देखभाल केली.आदरसत्कार केला. त्या गावात नाकजींनी एक पर्वचनही केले. प्रवचनाच्या शेवटी गुरुनानक म्हणाले, "तुमच्या गावाचा नाश होवो. तुमचं वाटोळं होवो. तुमच्यात भांडणं होवोत आणि तुमची फुटाफूट होवो." हे ऐकल्यावर त्यांचे शिष्य म्हणाले, "हा काय आशीर्वाद दिलात?" नानक म्हणाले, "पहिले लोक आणि दुसरे लोक यांतला फरक ध्यानी घ्या. या दुसऱ्या गावातला प्रत्येक माणूस सज्जन आहे. या साऱ्यांचं एकाच गावात काय काम? फुटाफूट झाली, तर हे लोक गावोगाव जातील. त्यामुळे ती सारी गावे सुधारतील. पहिल्या गावातील लोक त्याच गावात जेवढा काळ एकत्र राहतील, ते बरंच आहे ! गटारं एकाच ठिकाणी साठली तरी बरी. गंगा मात्र सगळीकडे पसरायला हवी."*तात्पर्य : चांगल्याचा विस्तार हेच जग सुखी करण्याचे रहस्य.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 डिसेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Az8bjjXJZ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_जागतिक दिव्यांग दिन_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••🔵 *_ या वर्षातील ३३८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••• *१९८४: भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.**१९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.**१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.**१८७०: ’बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी’ या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.**१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.**१८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.**१७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.*🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४: प्रा.डॉ. सुनिता राठोड (पवार) -- लेखिका तथा दुसऱ्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९७१: प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर-- कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९७०: जसजीत सिंग गिल उर्फ जिमी शेरगिल -- भारतीय अभिनेता**१९६६: प्रा. प्रतिभा सराफ -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६४: पंडित मिलिंद रायकर -- व्हायोलिन वादक* *१९५८: मेघना पेठे -- प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार व कथाकार**१९५८: ममता चंद्राकर -- छत्तीसगडच्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त लोकगायिका**१९५४: सुलभा धामापूरकर -- लेखिका* *१९५२: डॉ.मालती विनायक निमदेव -- लेखिका* *१९५०: गिरीश कासारवल्ली -- कन्नड चित्रपट दिग्दर्शक* *१९४८: प्रा. एकनाथ राजाराम आबूज -- लेखक, संपादक* *१९४८: प्रा. डॉ. नलिनी महाडिक-- प्रसिद्ध मराठी ग्रामीण कवयित्री, लेखिका* *१९४७: बबन पोतदार -- प्रसिद्ध ग्रामीण कथाकार**१९४१: सुधाकर नामदेवराव मारगोनवार -- कवी, लेखक* *१९३९: रवी दाते -- ज्येष्ठ संगीतकार आणि तबलावादक (मृत्यू: ७ जुलै २०२० )**१९३८: पद्मावती भास्करराव जावळे -- कवयित्री, लेखिका* *१९३४: प्रमिला मनोहर राजे -- कवयित्री**१९३१: मुकुंद श्रीनिवास कानडे -- मराठी लेखक, समीक्षक, कोशकार व संत साहित्याचे अभ्यासक (मृत्यू: २५ जून,२०१२ )**१९२४: श्रीधर वासुदेव उर्फ भाऊ काळवीट -- कवी* *१८९२: माधव केशव काटदरे – निसर्गकवी (मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८ )**१८८९: खुदिराम बोस – क्रांतिकारक (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८ )**१८८४: डॉ.राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३ )**१८८२: विष्णूपंत हरी औंधकर -- मराठी नट आणि नाटककार (मृत्यू: १७ डिसेंबर १९४२ )**१८८२: जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री.बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले.(मृत्यू: १६ एप्रिल १९६६ )**१८७६: यशवंत नारायण (अप्पासाहेब) टिपणीस -- कवी, विविध विषयांवरील ग्रंथकार (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९२५ )**१७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (मृत्यू: २८ आक्टोबर १८११ )* 🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: श्याम पोंक्षे -- मराठी नाट्य‍अभिनेते (जन्म: २१ जुलै १९५३ )**२०११: देव आनंद – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २६ सप्टेंबर १९२३ )**२०१०: प्रा. वामन सुदाम निंबाळकर -- मराठी लेखक, विचारवंत आणि कवी (जन्म: १३ मार्च १९४३ )**१९७९: मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू (जन्म: २९ ऑगस्ट १९०५ )**१९५१: बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्यांचे शिक्षण झालेले नसतानाही, त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती.शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत.(जन्म: २४ ऑगस्ट १८८० )**१८९४: आर.एल.स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी (जन्म: १३ नोव्हेंबर १८५० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंब्याच्या पानांचे महत्व*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी साठी मुंबईत जय्यत तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार, पुढील वर्षी दिल्लीत पार पडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दक्षिण नागपूर मतदारसंघात फेरमतमोजणी होणार, काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांनी EVM तपासणीसाठी भरले शुल्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील चार दिवस राज्यातील हवामानात होणार मोठा बदल, भारतीय हवामान विभागाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधी मंडळ नेता निवडीसाठी बुधवारी भाजप आमदारांची बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संविधानावर 13-14 डिसेंबर ला होणार चर्चा, गदारोळ थांबण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा आशिया चषक स्पर्धेतील पहिला विजय, पाकिस्तानकडून पराभूत झाल्यावर केले जोरदार कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रस्त्यांवर फेकलेल्या लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होते ?* 📙शाळेत जाताना सकाळच्या वेळी रस्त्यांवर अनेक दुकानांच्या समोर लिंबू मिरच्यांच्या माळा फेकलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आई व वडिलांनी या लिंबू मिरच्यांवर पाय देऊ नकोस त्यांना ओलांडून जाऊ नकोस असही तुम्हाला बजावून सांगितले असेल. त्यामुळे तुम्ही त्यापासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत असाल. पण जर लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. कोणाची वाईट नजर लागू नये आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण व्हावे या समजापायी दुकानदार दुकानांवर लिंबू मिरच्या, काळ्या बाहुल्या टांगून ठेवत असतात. दुसऱ्या दिवशी ते लिंबू मिरची रस्त्यावर फेकून देतात. दिवसभरात त्या लिंबू मिरच्यांमध्ये अनेक दुष्ट शक्तींचा प्रभाव जमा झाल्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांना खात्री वाटत असते ! खरे तर जगात भूते खेते नसतात. दुकानदारांना खरी भीती चोरांची, आगीची वैगरे असते. नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक वा आग प्रतिबंधक यंत्रणा या कामाला येतील का टांगलेल्या लिंबू मिरच्यांच्या माळा ? याचे उत्तर अगदी शेंबडा मुलगाही सांगू शकेल. पण तरीही चांगले शिकले सवरलेले लोक अशा अंधश्रद्धांना बळी पडून लिंबू मिरच्यांवर नाहक खर्च करत असतात. देशातील लाखो दुकानांवर दररोज लाखो लिंबे व करोडो मिरच्या टांगल्या जातात व दुसऱ्या दिवशी त्या फेकून दिल्या जातात. यात केवढे मोठे राष्ट्रीय नुकसान आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा.लिंबू मिरच्यांचे वास्तव तुम्हाला कळले. आता निदान तुमच्या व तुमच्या नातेवाईकांच्या दुकानांवर लिंबू मिरच्यांच्या माळा दिसणार नाहीत आणि त्यावर पाय पडला तरी तुम्ही घाबरणार नाही याची मला खात्री वाटते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*AI - Artificial Intelligence*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानसंपादनेचा प्रारंभ साक्षरतेपासून होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'Wings of Fire' हे पुस्तक कोणी लिहिले ?२) सध्या राज्यघटनेत कलमे, परिशिष्टे व भाग किती आहेत ?३) एखादी व्यक्ती भू - तलावर कोठे आहे, हे शोधण्यासाठी कोणत्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होतो ?४) 'वर्षा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जागतिक शेअर बाजारात भारताचा वाटा किती टक्के आहे ? *उत्तरे :-* १) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम २) ४७० कलमे, १२ परिशिष्टे व २५ भाग ३) जी. पी. एस. सिस्टिम ४) पाऊस, पावसाळा ५) २ टक्के*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रेयस दिलीप धामणे, हिंगोली👤 साईप्रसाद पुलकंठवार👤 शिवाजी कल्याणकर👤 विरेश रोंटे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इलुसाचि प्रपंच परि हा लटिकाअ । तेणें तुज व्यापका झांकियलें ॥१॥ ऐसियाचा मज घालोनियां खेवा । स्वामिद्रोहि देवा करिसी मज ॥२॥ मेरुचिया गळा बांधोनि मशक । पाहसि कौतुक अनाथनाथा ॥३॥ नामा म्हणे देवा कळली तुझी माव । माझा मी उपाव करीन आतां ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सौंदर्याचा घमंड, संपत्तीचा मोह आणि इतर गोष्टीचा ज्याला जास्त प्रमाणात अहंकार असते ती, व्यक्ती एक दिवस मनात दु:खी असते. मात्र त्यावेळी आपले दु:ख कोणासमोर व्यक्त करू शकत नाही. त्याचे कारण असे की,जेव्हा सर्व काही त्याच्याजवळ असते त्यावेळी इतरांना तुच्छ लेखत असल्यामुळे कोणीच त्यावेळी जवळचे आपुलकीचे माणसे नसतात. म्हणून जी वस्तू शेवटपर्यंत आपली कायम राहू शकत नाही अशा गोष्टीच्या जास्त लोभात, मोहात पडू नये. कारण ते, एक दिवस दु:खाचे कारण बनत असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *असत्य !*एका प्रख्यात वकिलाकडे एक गरीब शेतकरी गेला. त्याची केस साधीच होती. त्यातून सुटायचे होते. पण साक्षी-पुरावे, उलट-तपासणीत त्याला बोलता आले नसते. गरीब, अशिक्षित शेतकरी होता तो. वकिलाने यावर तोडगा काढला. तो शेतकऱ्याला म्हणाला, "दादा ! घाबरू नका. मी सांगेन तसं करा. मी सोडवतो तुम्हाला यातून." शेतकरी खुश झाला. त्याला वकिलाने सांगितले की, 'कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ नका. त्याऐवजी फक्त बें _S_ बे__S_ असं ओरडा.' साक्षीच्या वेळी शेतकऱ्याने तसे केले. तेव्हा वकील म्हणाला, "हा शेतकरी अशिक्षित आहे आणि थोडा वेडाही आहे." अशा प्रकारे युक्तिवाद करून त्याने ती केस जिंकली. शेतकरी खुश होऊन घरी घरी जाऊ लागला. तेव्हा वकील म्हणाला, "दादा ! तुमची केस जिंकली. नुकसान भारपाईसुद्धा मिळाली. आता माझी फी द्या." शेतकऱ्याने वकिलांकडे रोखून पाहत उत्तर दिले. "बें_S_बें" वकिलाच्या खोटेपणाचा उपाय त्याच्यावरच उलटला.* तात्पर्य : असत्य असे माणसावर या ना त्या रूपाने उलटले. म्हणून सत्याने वागावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_35.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.**१९९९:काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर**१९८९:भारताचे ७ वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सूत्रे हाती घेतली.**१९७६:फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.**१९७१:अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.**१९४२ : योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.**१९४२:एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:अपूर्व अग्निहोत्री-- चित्रपट दूरदर्शन अभिनेता**१९७२:एकनाथ पाटील-- कवी,लेखक* *१९७०:जितेंद्र अभ्यंकर--- गायक**१९६०:प्राचार्या डॉ.दीपा भारतभूषण क्षीरसागर -- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री, संपादिका**१९५९:बोम्मन ईराणी – अभिनेता**१९५५:शोभा सतीश राऊत-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५१:प्रा.डॉ.निळकंठ लक्ष्मणराव बोरोडे-- लेखक,कवी* *१९४५:मुक्ता मधुकर केचे-- लेखिका* *१९३९:अचला नगर-- साहित्यिक,कथाकार, हिंदी चित्रपट पटकथा लेखक आणि संवाद लेखक**१९३७ : मनोहर जोशी – लोकसभेचे माजी सभापती, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री**१९३०:सुमति पुरुषोत्तम इनामदार-- लेखिका**१९२७:अरविंद गोविंद पटवर्धन-- लेखक**१९१३:दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी–चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक(मृत्यू:३० डिसेंबर १९८२)**१९११:अनंत वामन वर्टी--संपादक,लेखक (मृत्यु:२ फेबु्रवारी १९८७)**१९०५:अनंत काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार,’पद्मश्री’ व ’सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते (मृत्यू:४ मे १९८०)**१८९८:इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (मृत्यू:२२ जुलै १९१८)**१८५५:सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित,समाजसुधारक,मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश (मृत्यू:१४ मे १९२३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले-- माजी केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री (जन्म:९ फेब्रुवारी १९२९)**२००४:श्रीमती सुगंधा शेंडे-- विदर्भातील महिला लेखिका (जन्म:२५ जून १९१९)**१९९६:एम.चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री,माजी राज्यपाल (जन्म:१३ जानेवारी १९१९)**१९८०:चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (जन्म:१५ जुलै १९०५)**१९७३:मोरेश्वर प्रभाकर जोशी(आर्वीकर,बाबा महाराज)-- संत,ग्रंथकार,थोर चिंतक,(जन्म:१९२५)**१९०६:बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार,विज्ञानप्रसारक,लेखक (जन्म:२१ मार्च १८४७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्मार्ट बॉय : काळाची गरज*यापूर्वी देखील बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत मग त्यात निर्भया प्रकरण असेल किंवा असिफा प्रकरण. यात माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य घडलेले आहे. अश्या लोकांना एकदम कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे पण त्यापूर्वी हे असे का घडत आहे, यावर ही चिंतन होणे अपेक्षित आहे. नवतरुण युवक असे मार्ग का अंगिकारत आहे ? यावर ही संशोधन व्हायलाच हवे. अश्या घटनांचा विरोध करण्यासाठी मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महायुतीत 'गृह' कलह ! सत्ता वाटप बाबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची आज बैठक होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *16 डिसेंबर पासून राज्याची हिवाळी अधिवेशन ? विरोधी पक्ष नेत्या शिवाय पार पडणार अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसंख्या शास्त्रनुसार किमान तीन अपत्ये असावीत, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी भाडेवाढीचा प्रस्ताव सादर, नवीन सरकार घेणार निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात किमान तापमानात वाढ, पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कार्तिक अमावस्या निमित्ताने जेजुरी गडावर भाविकांची गर्दी,आजपासून षडरात्रोत्सवला प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलिया गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात भारताचे वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - Kunal Paware 📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *काही मुलांना जन्मानंतर इन्क्युबेटरमध्ये (पेटी) का ठेवतात ?* 📙 काही महिलांना सातव्या महिन्यातच मूल होते. अशी मुले साहजिकच वजनाने कमी असतात. त्यांच्या शरीराची वाढही सामान्य नवजात बालकांपेक्षा कमीच असते. श्वसन व रक्ताभिसरण ही दोन महत्त्वाची कार्ये मात्र ते बालक करू शकते. बालकाला शरीराचे तापमान ठराविक पातळीवर राखण्याचे कार्यही करावे लागते. तसेच जंतूंपासून स्वतःचा बचावही करावा लागतो. ही शेवटची दोन कार्य करणे मात्र सातव्या महिन्यात जन्मलेल्या वजन अत्यंत कमी असलेल्या बाळासाठी खूप अवघड असते. त्यामुळे अशा मुलांना इनक्युबेटरमध्ये विशेष कक्षात ठेवले जाते. इनक्युबेटर ही काचेचे झाकण असलेली एक चौकोनी पेटी असते. यात तापमान शरीराच्या तापमानाशी मिळते जुळते (सुमारे ३७' सेंटिग्रेड) असे ठेवलेले असते. हवेतील रोगजंतूंचाही नायनाट करण्यात आलेला असतो. त्यामुळे असे बाळ, जे इन्क्युबेटर नसल्यास जंतूसंसर्गाने व तापमानाचे नियंत्रण न करता आल्याने मरण पावले असते, ते वाचू शकते. असे हे इनक्युबेटर जणू बालकांसाठी वरदानच होय.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम ठाणेदार , पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही "**संकलन :- Pramila Senkude **ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातील ४१ मजुरांना काढण्यासाठी भारत सरकारने सल्लागार म्हणून बचाव कार्यात कोणाला आमंत्रित केले होते ?२) सिंधू नदी कोणत्या दोन देशांतून वाहते ?३) उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात एकूण किती मजूर अडकले होते ?४) कोकणातील मुख्य अन्न कोणते आहे ?५) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ? *उत्तरे :-* १) अरनॉल्ड डिक्स, मायक्रोटनलिंग, ऑस्ट्रेलिया २) भारत व पाकिस्तान ३) ४१ मजूर ४) भात व मासे ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल ठाकूर *जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय डाड, नांदेड👤 सुरज पाटिल रोषनगांवकर👤 अभि मामीडवार👤 Vaishali Garjepalve , सहशिक्षिका👤 Shrinivas Avduthwar, धर्माबाद👤 जयानंद मठपती 👤 Suryakant Tokalwad 👤 Sharad Pawar, सहशिक्षक, नाशिक👤 DhanRaj Rakhewar, नांदेड👤 Santoshkumar Rathod 👤 दत्ता मुपडे👤 Komal Sandeep Patil👤 Aditya Dhatrak 👤 शिवराज दासरवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपा भाकिता जाहला वज्रपाणी। तया कारणें वामनू चक्रपाणी॥ द्विजांकारणे भार्गवू चापपाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात. असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत. भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो. जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो. विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते. ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात. आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात. केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते.© Vyankatesh Katkar , नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मिनूला मोरानी दिलेली भेट* मिनू चे घर शेतात होते. ती खेळता-खेळता घराच्या खूप दूर आली. तिला दोन पिसे दिसली. तीनी ते पिसे निरखून पाहिले. ती लहान होती म्हणून तिला ते पिसे कोणाची आहे हे कळाले नाही. पण तिला असे वाटले हे पिसे ज्याची असन ते त्या पिसाला शोधत असन . म्हणून तिने ठरवले की ही पिसे ज्याची असन मी त्याला शोधून त्याची पिसे वापस देऊन टाकीन. तिला रस्त्यात कोंबडी दिसली. तिने त्या कोंबडीला प्रेमाने विचारले, कोंबडीताई कोंबडीताई ही पिसे तुझी आहेत का? कोंबडी म्हणाली, नाही ही पिसे माझी नाहीत पण मला माहित आहेस की, ही पिसे कोणाची आहे? मिनू म्हणाली, सांगा सांगा ही पिसे कोणाची आहे? कोंबडी म्हणाली ही पिसे मोराची आहे. मिनू धन्यवाद म्हणून समोर निघाली. तिला रस्त्यात कबूतर दिसले. तिने मोराचा पत्ता कबुतराला विचारले . मिनू पळतच त्या पत्त्यावर गेली. तिने मोराला हाक मारली . मोर त्याच्या घरातून बाहेर आला. मिनू ने त्याची पिसे त्याला वापस दिली. पण मोरानी ती पिसे घेतली नाही तिला समजावले एकदा माझी पिसे पडली तर ती डबल मला जोडू शकत नाही व त्यांनी तिला ते पिसे भेट म्हणून दिली. मिनू ने आनंदाने पिसे आपल्याजवळ धन्यवाद म्हणून ठेवली. व ती पळतच घरी गेली मिनूने आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ती पिसे पुस्तकात जपून ठेवली. बोधः कधी पण कोणी दिलेली भेट जपून ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎤 मुख्य संकलक - स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 नोव्हेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/144Rm71GuJ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌐 *_ या वर्षातील ३३४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना ’उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’ जाहीर**२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ’गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर**१९९६: नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ जाहीर**१९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी 'वॉरन समिती' नेमली.**१९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.* 🌐 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🌐 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: प्रथमेश परब -- मराठी चित्रपट अभिनेता* *१९८७: प्राजक्ता शुक्रे -- भारतीय गायिका**१९८४: नेहा पेंडसे -- मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री**१९७८: सुरेखा पुणेकर -- भारतीय लावणी नृत्यांगना**१९७७: युनिस खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६३: प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी -- लेखक**१९५२: सुनिती मंगल धारवाडकर -- कवयित्री, लेखिका* *१९५०: रामकृष्ण विनायक अभ्यंकर-- लेखक**१९५०: प्रकाश ज्ञानेश्वर जडे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४५: खुशाल डवरे -- प्रसिद्ध लेखक**१९४३: अरविंद वैद्य -- लेखक, पत्रकार**१९४२: नीला भागवत -- ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्थानी संगीतकार**१९३८: माला केकतपुरे -- कवयित्री, लेखिका**१९३३: श्रीराम आत्माराम खुणे -- लेखक**१९३१: रामचंद्र बापूजी मुंजवाडकर -- लेखक* *१९१७: भगवंत रंगनाथ अक्कलकोटकर -- कादंबरीकार,बालसाहित्यिक* *१९०७: गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक,'आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’ (मृत्यू: ७ जून २००० )**१८९६: विनायक लक्ष्मण बर्वे -- कथाकार, कादंबरीकार,कवी,नाटककार (मृत्यू: २६ जानेवारी १९४८ )**१८६९: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (मृत्यू: २० जानेवारी १९५१ )**१८६२: विष्णू गणेश नेने -- लेखक (मृत्यू: २३ जानेवारी १९२४ )**१८३५: महादेव मोरेश्वर कुंटे -- मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान (मृत्यू: ८ ऑक्टोबर १८८८ )*🌐 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: आचार्य पार्वती कुमार किंवा पार्वतीकुमार -- भारतीय शास्त्रीय नृत्यांगना,शास्त्रीय नृत्य कोरिओग्राफर आणि विद्वान(जन्म: २७ फेब्रुवारी १९३१ )**२०११: इंदिरा गोस्वामी -- आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका (जन्म: १४ नोव्हेंबर १९४३ )**२००७: केशव तानाजी मेश्राम-- मराठी भाषेतील लेखक,कवी,नाटककार, समीक्षक(जन्म: २४ नोव्हेंबर १९३७ )**२००१: जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३ )**१९९३: जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे.आर.डी.टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक,भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (जन्म: २९ जुलै १९०४ )**१९९४: मृणालिनी प्रभाकर देसाई-- कादंबरीकार (जन्म: ७ ऑक्टोबर १९२७ )**१९५९: वाजू कोटक -- गुजराती लेखक, प्रकाशक,पत्रकार,भारतीय चित्रपट पटकथा लेखक(जन्म: ३० जानेवारी १९१५ )**१९५९: ’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई –महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार (जन्म:१७ मे १८६५)**१९५०: आनंदीबाई धोंडो कर्वे-- सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या(जन्म: २५ जानेवारी १८६३ )**१९३९: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी,कोशकार,छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (जन्म: २१ जानेवारी १८९४ )**१९२६: कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, ’केरळ कोकिळ’ या मासिकाचे संस्थापक व संपादक (जन्म: ३ जानेवारी १८५२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुण्यातील बाकरवडीचे जनक भाऊसाहेब चितळे यांची यशोगाथा..... वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लाडकी बहीणसाठी 58 हजार कोटी लागणार, सध्या राज्यावर नऊ लाख कोटींचं कर्ज; लोकसत्ताचे संपादक आणि जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी सांगितल्या सरकारच्या आर्थिक अडचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात थंडीची लाट! पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान! IMD कडून अलर्ट, आणखी थंडी वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवी मुंबईची अंकिता दहिया ठरली ' यू एम बी मिस इंडिया - 2024'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वे मालामाल, तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूचा कसोटी सामना 6 डिसेंबर पासून होणार सुरू, रोहित आणि गिल संघात परतणार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *ट्युबलाईटला कमी ऊर्जा का लागते ?* 📒भारनियमन सुरु झाल्यापासुन आणि त्याच सुमारास विजेचे दर वाढल्यावर विजेची बचत करण्याची निकड भासू लागली. सर्वच जण आपल्या नेहमीच्या बल्ब ऐवजी सीएफएलचे दिवे म्हणजे 'काॅम्पॅक्ट फ्लोरेसन्ट लॅम्प' वापरण्याचा सल्ला देऊ लागले. किमानपक्षी साध्या दिव्यांऐवजी ट्युबलाईट वापरावेत असंही सांगु लागले. ट्युबलाईटचा प्रकाशही जास्त मिळतो. सूर्यप्रकाशासारखाच असतो. तितक्याच वॅटच्या दिव्यापेक्षा तो कितीतरी अधिक दिप्तीमान असतो, हा अनुभव तर आपणही घेतो. पण कमी विजेचा वापर करून तो आपल्याला अधिक प्रकाश कसा देऊ शकतो, हा सवाल उरतोच.ट्युबलाईट उपलब्ध होण्यापुर्वी पिवळट प्रकाश देणारे काचेचे बल्बच सगळीकडे वापरले जात असत. त्यांचा शोध एडिसनने लावला होता. त्याला त्यानं 'इनकॅन्डिसन्ट बल्ब' असं दिलं होतं. कारण त्याचा प्रकाश हा त्याच्या आत असलेली तार तापल्यामुळं तिच्यातून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या रुपात आपल्याला मिळतो. तार तर तापावी, प्रकाशमान होण्याइतकी तापावी; पण त्या उच्च तापमानालाही ती तुटु नये यासाठी टंगस्टन या धातुचा वापर केला जात असे. या धातूची तार कितीही तापली तरी ती तुटत नाही. तिच्यामधुन विजेचा प्रवाह वाहू लागला, की तिचं तापमान वेगानं चढत जातं आणि तिच्यामधुन प्रकाश बाहेर पडू लागतो. अशी तापलेली तार असणार्‍या त्या काचेच्या बल्बचं तापमानही वाढलेलं असतं. म्हणून तर तो आपल्याला हातात धरवत नाही.ट्युबलाईटपासुन मिळणारा प्रकाश वेगळ्या प्रक्रियेतुन आपल्याला मिळतो. त्या काचेच्या नळीच्या दोन टोकाला दोन विद्युताग्रे - इलेक्ट्रोड्स असतात. त्या दोन टोकांमधुन विजेचे स्फुल्लिंग उडत असतात. वेल्डिंग करताना जशा ठिणग्या उडतात तसे; पण त्या नळीच्या आतल्या पृष्ठभागावर स्फुरदिप्तीमान म्हणजेच फ्लोरोसेंट पदार्थाचा गिलावा दिलेला असतो. त्याशिवाय त्यार पार्‍याची वाफही असते. दोन टोकांना असलेल्या विद्युताग्रांना चेतवून त्यांच्यामधून स्फुल्लिंग बाहेर पडतील अशी व्यवस्था केली जाते. त्याच्या ठिणग्या पार्‍याच्या वाफेतून वाहु लागल्या की त्यातून जंबुपार किंवा अतिनील किरणे बाहेर पडू लागतात. ती आपल्याला दिसत नाहीत; पण ती त्या फ्लोरोसेंट पदार्थावर पडली की त्यातून आपल्याला दिसणारा दृश्य प्रकाश निर्माण होतो. विद्युताग्रांमधून विजेचे स्फुल्लिंग बाहेर पडण्यासाठी त्यांना जास्त तापवावं लागत नाही. त्यासाठी फारच कमी विजेची गरज भासते. प्रकाशाची निर्मिती त्यानंतरच्या इतर प्रक्रियांमधून होत असल्याने फारच कमी विजेची गरज भासते. तेवढीच दिप्ती निर्माण करण्यासाठी नेहमीच्या बल्बला लागणाऱ्या विजेपेक्षा कितीतरी कमी वीज लागते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CRPF - Central Reserve Police Force*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य, समता, स्वातंत्र्य यांचा मिलाफ आणि आचार, उच्चार, विचार यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाणीटंचाईमुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली ?२) संयुक्त राष्ट्र महासभेने २०२५ हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले ?३) राज्यघटना देशाला अर्पण झाली त्यावेळी राज्यघटनेत किती कलमे, परिशिष्टे व भाग होते ?४) 'लढा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे ? *उत्तरे :-* १) इक्वाडोर २) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष ३) ३९५ कलमे, ८ परिशिष्टे, १२ भाग ४) लढाई, संघर्ष ५) वॉशिंग्टन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 किशोरी चौगुले, राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षिका, कोल्हापूर👤 योगेश खवसे👤 साईनाथ बोईनवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्‍हवीं अनंता कोण जाणे ॥१॥ वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥ चतुरा शिरोमणी अहो केशिराजा । अंगीकार तुझा केला आम्हीं ॥३॥ सहस्त्र नामें जरी जालासि संपन्न । तरी हेंहि भूषन आमुचेंचि ॥४॥ येर्‍हवीं त्या नामाची कवण जाणे सीमा । पाहें मेघश्यामा विचारोनि ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाकी वैरता कोणासोबत होत नाही आणि स्वतःहून ते, कोणी करत नाही. नेहमीच सत्याच्या बाजूने राहिल्याने, परखड शब्दात बोलल्याने किंवा तसेच विचार व्यक्त केल्याने न कळताच आपोआप वैरता निर्माण झालेली बघायला मिळत असते. त्यात आपला काहीही दोष नसतो. म्हणून स्वतः ला दोष देऊ नये. जेथून मनाला विशेष समाधान मिळतो त्याच मार्गांवर चालण्याचा आपण प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकोपा*एक तळ्यात एक दोन तोंडाचा पक्षी राहत होता. एकदा त्याच्या तोंडाला रामफळासारखे गोड फळ मिळाले. तेव्हा दुसऱ्या तोंडाला त्याचा हेवा वाटला. त्याने पहिल्या तोंडाकडे अर्धे फळ मागितले. तेव्हा पाहिले तोंड त्याला म्हणाले, "तू खाल्लेस काय आणि मी खाल्ले काय... शेवटी पोट तर एकच ! तेव्हा अर्ध फळ मी आपल्या बायकोला देतो." हे ऐकून दुसऱ्या तोंडाला वाईट वाटले. त्या दिवसापासून ते निराश दिसे.एके दिवशी एक विषारी फळ दुसऱ्या तोंडाला मिळाले. ते पाहून पहिल्या तोंडाने ते न खाण्याचा सल्ला दिला. पण, मागच्या वेळच्या रागामुळे दुसऱ्या तोंडाने त्याचा सल्ला ऐकला नाही. त्याने ते फळ खाल्ले आणि अखेर व्हायचे तेच झाले. तो दोन तोंडी पक्षी मरण पावला. *तात्पर्य : एकोप्याने राहण्यातच गोडी असते. त्यात बेबनाव होऊ देऊ नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 नोव्हेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18McZArTT8/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील ३३३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: संपूर्ण स्वदेशी बनावटीचे बहुउपयोगी " सुखोई ३० " लढाऊ विमान हवाई दलात दाखल* *२०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर**१९७५: पूर्व तिमोरला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी 'पल्सार’ तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.**१९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.**१९६०: मॉरिटानियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२१: पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: यामी गौतम -- हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांची अभिनेत्री**१९८६: प्रतीक बब्बर -- भारतीय अभिनेता* *१९७८: मिलिंद कपाळे -- लेखक* *१९६७: प्रा. डॉ. प्रेमा लेकुरवाळे -- लेखिका, कवयित्री* *१९६७: डॉ. धनंजय राजाराम गभणे -- लेखक* *१९६५: प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख -- लेखक* *१९५९: विश्वास महिपती पाटील -- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९५८: चंद्रलेखा प्रमोदकुमार जगताप - बेलसरे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५५: प्रा. अशोक राणा -- प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक**१९५१: डॉ.शुभदा दीपक शेळके -- लेखिका* *१९५०: गोपाळ दत्तात्रय पहिनकर -- कवी, लेखक तथा निवृत्त उपशिक्षणाधिकारी* *१९४६: सीमंतिनी जोशी -- कवयित्री**१९४४: मधु पोतदार -- मराठी लेखक. त्यांनी अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांची चरित्रे लिहिली (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०२० )**१९४०: रमेश महिपतराम दवे -- तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व व्याख्याते**१९३८: मल्लेशप्पा मदिवलप्पा कलबुर्गी -- कन्नड भाषेतील वचन साहित्याचे भारतीय अभ्यासक आणि कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३० ऑगस्ट २०१५ )**१९३७: प्रतिभा कुलकर्णी -- प्रसिद्ध लेखिका (मृत्यू: ११ जून २०२४ )**१९३६: संभाजीराव सखाराम पाटणे -- प्रसिद्ध लेखक* *१९२७: प्रमोद करण सेठी -- भारतीय ऑर्थोपेडिकसर्जन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ( मृत्यू: ६ जानेवारी २००८ )**१८७२: रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. (मृत्यू: ५ मे १९४३ )**१८५७: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५ )*💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६ )**२००५: गजानन बाळकृष्ण पळसुले-- आधुनिक संस्कृत महाकवी (जन्म: १ नोव्हेंबर १९२१ )**२००३: शंकर पांडुरंग रामाणी -- आधुनिक मराठी कवी (जन्म: २६ जून १९२२ )**२००१: अनंत काणे -- निर्माता दिग्दर्शक ( जन्म: २८ जून १९३५ )**१९९९: हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक (जन्म: १९१३ )**१९८०: बिरेंद्रनाथज्ञ(बी. एन. सरकार ) सिरकार -- भारतीय चित्रपट निर्माता आणि न्यू थिएटर्स कलकत्ता चे संस्थापक (जन्म: ५ जुलै १९०१ )**१९७८: लक्ष्मीबाई केळकर (मावशी केळकर) -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका (जन्म: ६ जुलै १९०५ )**१९६८: एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (जन्म: ११ ऑगस्ट १८९७ )**१९६७: पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक (जन्म: १२ नोव्हेंबर १८८० )**१९६३: त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक (जन्म: २५ मे १८९५ )**१९६२: कृष्ण चंद्र तथा ’के. सी. ’डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते (जन्म: ऑगस्ट १८९३ )**१९५४: एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २९ सप्टेंबर १९०१ )**१८९३: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म: २३ जानेवारी १८१४ )**_१८९०: जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विचारवंत, लेखक, क्रांतिकारक (जन्म: ११ एप्रिल १८२७ )_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोर गरिबांचे कैवारी : महात्मा फुले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य - मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्याची मोहीम - नाना पटोले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विरोधकांच्या गदरोळामुळे दुसऱ्या दिवशी ही संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एमपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला, जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उत्तर मध्य महाराष्ट्रात भरणार हुडहुडी:तापमानात होणार तीव्र घट, हवामान विभागाकडून थंडीच्या लाटेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य बँकेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC क्रमवारीत जसप्रीत बुमराह नंबर वन तर यशस्वीची देखील क्रमवारीत गरुडझेप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••#चिखलदराचिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेतहे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BPL - Below Poverty Line *••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अखंड यशाने आपल्याला जीवनाची केवळ एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारताच्या राज्यघटना निर्मितीला किती वर्ष पूर्ण होत आहेत ?२) अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य कोणते ?३) विदेशात एका देशात सर्वाधिक १२ आंतरराष्ट्रीय शतके झळकवण्याचा विश्वविक्रम कोणी केला ?४) 'रंक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ? *उत्तरे :-* १) ७५ वर्षे २) कॅलिफोर्निया ३) विराट कोहली, भारत ( १२ शतके ऑस्ट्रेलियात ) ४) गरीब ५) २ फेब्रुवारी २००६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीराम चव्हाण, माजी शिक्षणाधिकारी, नागपूरर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकीं तुझें ध्यान करितां त्यजिले प्राण । सांग ऐसें निर्वाण कवणें केलें ॥११॥ ऐसे मागें पुढें जाले असंख्यात । भक्तभागवत सखे माझे ॥१२॥ त्यांचिनि सरता झालासी त्रिभुवनीं । विचारी आपुल्या मनीं पांडुरंगे ॥१३॥ केलें उच्चारणें बोलतां लाजिरवाणें । हांसती पिसुणें संसारींची ॥१४॥ नामा म्हणे केशवा अहो विरोमणी । निकुरा जाला झणीं मायबापा ॥१५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या दैनंदिन जीवनात लहान, मोठ्या अडचणी असतात. पण,काहींच्या अडचणी दिसत नाही. व त्यातच कोणी आपल्या अडचणी कोणासमोर व्यक्त करत नाही. कारण समोरची व्यक्ती, त्या सांगितलेल्या अडचणी समजून घेईलच असेही नाही. म्हणून कोणाविषयी पूर्ण जाणून न घेता उगाचच बोलून वाईट होऊ नये. किंवा उगाचच कोणाला वाईट ठरवू नये. शेवटी ज्याचे त्यालाच माहीत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वभाव आणि छंद *' समानशीले व्यसनेषु सख्यम् ' हे सुभाषित आपण वारंवार ऐकतो आणि त्याचे प्रत्यंतर समाजात वावरताना आपणाला येते. याच सुभाषिताचा दाखला देणारी ही कथा. एका साध्या संवादातून हा बोध आपणाला मिळेल. एकदा प्रचंड महापुरात नदीच्या पात्रातून दोन भांडी वाहत होती. त्यापैकी एक होते पितळेचे, तर दुसरे होते मातीचे. त्या पुरातुन वाहत जातानाच त्यांच्यात संवाद चालला होता. पितळीचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणत होते, "अरे, इतका दुरून का चालला आहेस? ये ना माझ्याजवळ. दोघेजण हातात हात घालून जाऊ. कशी मजा येईल बघ तरी. मला डोळे भरून पाहता येईल आणि या प्रचंड वेग असलेल्या पाण्यापासून तुझं संरक्षणही करता येईल." मातीच्या भांड्याने पितळेच्या भांड्याचे आभार मानून म्हटले, "कृपा करून कोणत्याही स्थितीत तू माझ्याजवळ येऊ नकोस. तुझीच मला सर्वात जास्त भीती आहे. तुझा थोडासा जरी धक्का मला लागला, तरी माझ्या ठिकऱ्या उडतील. तुझा माझा देहभाव भिन्न आहे."*तात्पर्य : भिन्न स्वभावाचे, छंदाचे लोक एकत्र कसे येणार ?*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 नोव्हेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12Gu8nv8i5e/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ३३२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.**१९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर**१९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.**१८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे ’अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन’ची स्थापना*🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: गिरीजा प्रभू -- मराठी अभिनेत्री**१९८६: सुरेश रैना – क्रिकेटपटू**१९७७: दीपक नागरगोजे -- लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते**१९७५: सुचित्रा कृष्णमूर्ती -- भारतीय चित्रपट अभिनेत्री**१९७३: अर्जुन रामकिसन देशमुख -- कवी**१९६७: नितीन हिरवे -- प्रकाशक**१९५३: डॉ. पावालाल उत्तम पवार -- कवी, लेखक**१९५३: बप्पी लहिरी उर्फ़ अलोकेश लहिरी-- हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू: १५ फेब्रुवारी २०२२ )**१९४७: जयप्रकाश झेंडे -- लेखक**१९५०: अनिल धवन -- भारतीय अभिनेता**१९४२: मृदुला सिन्हा -- गोवा राज्याच्या माजी राज्यपाल, प्रसिद्ध लेखिका (मृत्यू: १८ नोव्हेंबर २०२० )**१९४०: ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (मृत्यू: २० जुलै १९७३ )**१९४०: प्रा. डॉ. रमाकांत कोलते -- ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत* *१९४०: प्रा. विजय कृष्णाजी कारेकर -- मराठी लेखक, नाटककार,कवी आणि चित्रकार (मृत्यू: ८ एप्रिल २०२२ )**१९२७: बाबुरावजी मडावी- आदिवासी नेते (मृत्यू: १६ जून २००३ )**१९२१: प्रा. हरिहर मातेकर - लोक साहित्याचे गाढे अभ्यासक**१९१५: दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू: २९ जून १९८१ )**१९०७: हरिवंशराय बच्‍चन – प्रसिद्ध हिन्दी कवी (मृत्यू: १८ जानेवारी २००३ )**१८८८: गणेश वासुदेव मावळणकर --- पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९५६ )**१८८१: डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७ )**१८७४: चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२ )**१८७०: दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक (मृत्यू: ३१ मार्च १९२६ )**१८५७: सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९५२ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: मुहम्मद अज़ीज़ -- भारतीय सिने पार्श्व गायक (जन्म: २ जुलै १९५४ )**२०१७: नारायणराव बोडस -- भारतीय शास्त्रीय गायक (जन्म: ३१ जानेवारी १९३३ )**२०१६: आनंद यादव -- प्रसिद्ध मराठी लेखक काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. (जन्म: ३० नोव्हेंबर १९३५ )**२००८: विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे माजी पंतप्रधान,केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २५ जून १९३१ )**२०००: बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक,संशोधक,’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (जन्म: २६ मार्च १९०९ )**१९९५: संजय जोग -- लोकप्रिय टीव्ही अभिनेते,चित्रपट अभिनेते (जन्म: २४ सप्टेंबर १९५५ )**१९९४: दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी,समाजवादी विचारवंत,आमदार आणि 'रायगड मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (जन्म: २८ मे १९०७ )**१९८४: असित बारन -- भारतीय अभिनेता, गायक (जन्म: १९ नोव्हेंबर १९१३)**१९७८: लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका (जन्म: ६ जुलै १९०५ )**१९७६: गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (जन्म: २८ डिसेंबर १८९९ )**१९५२: शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते,पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक,मीमांसक व भाष्यकार (जन्म: २३ आक्टोबर १८७९ )**१७५४: अब्राहम डी. मुआव्हर – फ्रेन्च गणिती (जन्म: २६ मे १६६७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वावलंबी जीवन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संविधानाचे 75 वे वर्ष सर्वांसाठी गौरवास्पद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा राजीनामा, शपथविधीकडे सर्वांच्या नजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकार स्थापन झाल्यावर उपोषणाची तारीख जाहीर करणार, मनोज जरांगे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रपतीच्या अभिभाषणवर सभागृहात चर्चा करण्याची विरोधकांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात देशातील पहिली स्वदेशी 'अनामया' एमआरआय मशीनचे अनावरण, मेक इन इंडिया अंतर्गत एआय तंत्रज्ञान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एस्सार उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भेंडी खा निरोगी रहा* विशेष चव तसेच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेडी या फळभाजीत अनेक पोषक तत्वे असून, नियमित भेंजीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खुप लाभदायी आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. आपल्या शरीरातील विषारी तत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करतेभेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, यातील व्हिटामीन ए हे जीवसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते. *मधुमेहींसाठी औषध* दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते पहा !.*भेंडीचे फायदे-* १. कँसर -भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कँसरला दुर ठेवु शकता. कोलन कँसरला दुर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करता.२. हृदयभेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा घुलनशील फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.३. डायबिटीजयामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीजसाठी खुप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासुन थांबवते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.४. अनीमियाभेंडी अनिमियासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयर्न हीमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.५. पचनतंत्रभेंडी ही भरपुर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाहीत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BBC - British Broadcasting Corporation*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर, प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवला पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ग्रामसभा कशाची मिळून बनते ?२) भारताचे राष्ट्रगीत 'जन - गण - मन' हे कोणत्या साली लिहिले गेले ?३) IPL इतिहासात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?४) जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले ?५) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ? *उत्तरे :-* १) सर्व प्रौढ नागरिक ( गावकरी ) २) सन १९११ ३) ऋषभ पंत ( २७ कोटी, लखनौ संघ ) ४) लंडन, ब्रिटन ५) अनंत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मृदुला लगडे, कवयित्री👤 दीपक जाधव👤 गायत्री जिंतेंद्र सोनजे👤 अनिता जावळे, उपक्रमशील शिक्षिका, लातूर👤 पंकज सेठिया👤 नागेश्वर कुऱ्हाडे👤 ओंकार बच्चूवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रावणा ऐसा बंधु सांडूनि सधर । ओळंगति परिवारा ब्रह्मादिकां ॥६॥ तें सांडोनि एकसरा आलासे धांवत । जाला शरणागत बिभीषण ॥७॥ हिरण्यकश्यपें तुझ्या वैर संबंधें । पाहे त्या प्रल्हादा गांजियेलें ॥८॥ अजगर कुंजर करितां विषपाना । परि तुझें स्मारण न संडीच ॥९॥ पति पुत्रस्नेह सांडोनि गोपिका । रासक्रीडे देखा भाळलिया ॥१०॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन अशांत असेल तर आपल्या समोर कितीही आकर्षक वस्तू ठेवल्या असतील तरी त्याकडे आपले लक्ष जात नाही. कारण त्यावेळी, त्या वस्तूंचे महत्व सुद्धा शुन्य वाटत असते.पण, एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावे मन हे हवेपेक्षा वेगवान असते तो कुठेही घेऊन जात असतो.म्हणून कोणत्याही गोष्टीचा जास्त त्रास करून घेऊ नये.कारण तो होणारा त्रास स्वतःला भोगावा लागतो व पुन्हा एकदा अडचणी येण्यासाठी मार्ग मोकळा करून देत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोठेपण*मॅक्समुल्लर हा जगप्रसिद्ध विद्वान, तत्त्ववेत्ता म्हणून ओळखला जातो. त्यांच्या आयुष्यातील ही कथा. मॅक्समुल्लर ज्या महाविद्यालयात शिकले, त्याच महाविद्यालयात पुढे त्यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. आपण ज्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेतले तेथेच अध्यापनाचे पवित्र कार्य करायला मिळणार याचा साहजिकच त्यांना खूप आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरातच त्या दिवशी ते आपले पद स्वीकारायला गेले. ते महाविद्यालयात आले आणि ज्या खुर्चीसमोर येऊन उभे राहिले. क्षणभर त्या खुर्चीकडे पाहिले आणि शिपायांकडून दुसरी खुर्ची मागवून त्या खुर्चीशेजारी ठेवली व त्या दुसऱ्या खर्चीवर ते विराजमान झाले. त्यांनी विचार केला की, 'या खुर्चीवर आपले प्राचार्य बसत होते. अद्याप आपण तितके मोठे झालो नाही. अजून आपणाला खूप शिकायचे आहे.* तात्पर्य : कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवर असू द्या. त्यामुळे तुमची विद्वत्ता, यश अधिक खुलते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 नोव्हेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1DeSC3eTgy/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📋 *_“ भारतीय संविधान दिन ”_* 📋••••••••••••••••••••••••••••••••• 📋 *_ या वर्षातील ३३१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📋 *_महत्त्वाच्या घटना:_* 📋••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *उद्देशिका* 🔵 *_आम्ही भारताचे लोक, भारतास एक संपूर्ण प्रभुत्व-संपन्नसमाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना:सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,विचार, अभिव्यक्ति,विश्वास,धर्मआणि उपासनाची स्वतंत्रता,प्रतिष्ठा आणि संधिची समताप्राप्त करण्यासाठीतसेच त्यासर्वांमध्येव्यक्ति ची गरिमा आणि राष्ट्राची एकताव अखंडता सुनिश्चित करणारी बंधुतावाढविण्यासाठीदृढसंकल्प होऊन आपल्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर २६,१९४९ ला एतद्द्वारे या संविधान ला अंगीकृत,अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत._* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना 'लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.**१९९९: विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ.रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.**१९९७: अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर**१९६५: अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.**_१९४९ :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली._* 📋 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📋••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: प्रियांका पाटील -- लेखिका* *१९८४: दीपक जगन्नाथ गायकवाड -- लेखक**१९८१: डॉ. नितिन कळमकर -- लेखक* *१९७९: प्रा. डॉ. भालचंद्र माधव हरदास -- लेखक, वक्ते**१९७२: अर्जुन रामपाल – अभिनेता**१९७१: डॉ. स्मिता निशिकांत मेहत्रे -- कवयित्री, लेखिका* *१९७०: प्रभाकर ढगे -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक**१९६६: प्रा. डॉ. प्रदीप रामकृष्ण राऊत -- कवी, लेखक* *१९६५: अनंत भोयर -- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार शेती व साहित्य क्षेत्रात विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९६२: उषाताई प्रल्हाद आढागळे -- लेखिका**१९६०: सुभदा दिवाकर मुंजे -- कवयित्री* *१९५४: वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चे संस्थापक (मृत्यू: १८ मे २००९ )**१९५२: मुनव्वर राणा -- भारतीय उर्दू कवी आणि साहित्यात अकादमी पुरस्काराने सन्मानित (मृत्यू: १४ जानेवारी २०२४ )**१९५२: मधु नेने -- सज्जनगड मासिकाचे कार्यकारी संपादक व ज्येष्ठ पत्रकार* *१९४८: डॉ. यशवंत त्र्यंबक पाठक -- ललित लेखक ( मृत्यू: २३ मार्च २०१९ )**१९४८: वीणा विजय देव -- मराठी लेखिका व समीक्षक ( मृत्यू: २९ ऑक्टोबर २०२४)**१९३८: डॉ. भालचंद्र श्रीराम फडनाईक -- पूर्व अधिष्ठाता (पी.के.व्ही) प्रसिद्ध कवी, लेखक**१९३६: डॉ. रा. ह. उपाख्य रामभाऊ तुपकरी -- धातुशास्त्राचे अभियंता,लोखंड व पोलाद उत्पादनाचे विशेषतज्ञ, पूर्व तरुण भारतचे प्रबंध संचालक, लेखक, विचारवंत* *१९३३: गोविंद पानसरे -- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते (मृत्यू : २० फेब्रुवारी २०१५ )**१९३३: चंद्रकांत कामत -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीमधले तबलावादक (मृत्यू: २८ जून २०१० )**१९२६: प्रा. यशपाल -- भारतीय शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: २४ जुलै २०१७ )**१९२३: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २८ जुलै १९७५ )**१९२१: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील -'धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री,पद्मभूषण,पद्मविभूषण,रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ )**१८९०: सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (मृत्यू: २९ मे १९७७ )**१८८५: देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २ जून १९७५ )**१८८०: सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर -- मराठी लेखक, बालसाहित्यिक, जर्मन साहित्याचे अनुवादक आणि शिक्षणतज्ज्ञ* 📋 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📋••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: विक्रम गोखले --- भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंच अभिनेते (जन्म: ३० ऑक्टोबर, १९४७ )**२०१९: सुधीर धर -- भारतीय सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार (जन्म: १४ मे १९३२ )**२०१०: विठ्ठल उमप -- मराठी शाहीर व लोककलाकार उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली(जन्म: १५ जुलै १९३१ )**२००८: हेमंत करकरे,अशोक कामठे,विजय सालसकर,तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी**२००१: चंद्रकांत कृष्णाजी जगताप – शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेते. याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत.* *१९९४: भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी (जन्म: २ मे १८९९ )**१९८५: ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत – रविकिरण मंडळातील एक कवी,संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ’महाराष्ट्र कवी' म्हणून गौरविण्यात आले.(जन्म: ९ मार्च १८९९ )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय संविधान आणि आपण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ, संसद बुधवार पर्यंत स्थगित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ईडीची राजधानी दिल्लीत मोठी कारवाई; ५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मारले छापे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हे शतक देशातील महिलांचे, राजकीय भाष्यकार नीरजा चौधरी यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छायाचित्र क्षेत्रात पुण्याच्या शिरपेचात मनाचा तुरा, राहुल सचदेव आणि एम. एस रंगनाथन या छायाचित्रकारांचे जागतिक स्तरावर सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धर्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच विश्व शांती नांदेल, आध्यात्मिक गुरू पं. विजयशंकर मेहता यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा सन्मान, 75 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉपलर रडर विषयाच्या अभ्यासक्रमात यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पर्थ कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर 295 धावानी विजय, 5 कसोटी मालिकेत 1 - 0 ने पुढे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुधी भोपळा........दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. लांबट बाटलीच्या आकाराची फिक्या हिरवट रंगाची, आतून पांढऱ्या स्पंजासारखी आणि लांब चौकोनी बियांनी युक्त ही फळभाजी सर्वानाच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. संस्कृतमध्ये कर्कटी, इंग्रजीमध्ये बॉटल गार्ड, तर शास्त्रीय भाषेत कुकर बीटा मॅक्झिमा या नावाने ओळखला जाणारा दुधी भोपळा कुकर बिटेसी या कुळातील आहे. दुधी भोपळा ही वेल प्रकारातील वनस्पती असून या वनस्पतीची फुले पांढरी असतात.औषधी गुणधर्म० लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे.उपयोग० दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे. हृदयविकारामध्ये रक्त वाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची ७-८ पाने, पुदिन्याची ७-८ पाने, संधव, जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा. यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.० दुधी भोपळा हा धातुपुष्टीकर असल्याकारणाने गर्भवती स्त्रीने आहारामध्ये दुधीचे सेवन नियमित करावे. यामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषणही व्यवस्थित होते. तसेच गर्भावस्थेमध्ये वारंवार होणारा मलावष्टांभाचा त्रासही दूर होतो.० उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत असेल तर दुधीचा रस खडीसाखर घालून प्यावा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.० स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे. या सूपाला संधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटकही मिळतात.० अति उष्णता, जुलाब, आम्लपित्त, मधुमेह, अति तेलकट खाणे यामुळे जर वारंवार तहान लागत असेल, तर अशा वेळी ग्लासभर दुधीचा रस चिमूटभर मीठ घालून घ्यावा. यामुळे घामातून शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात. तहान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही.० शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे. हे तेल बनविताना दुधी भोपळ्यासोबत त्याची पाने व फुलेही घ्यावीत. या तेलामुळे थंडावा निर्माण होऊन शांत झोप लागते.० लघवीला जळजळ होत असेल तर अशा वेळी ग्लासभर दुधीरस त्यामध्ये अध्रे िलबू पिळून घ्यावे. यामुळे मूत्रातील अतिरिक्त आम्लाचे प्रमाण कमी होते व साहजिकच शरीराची उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.० खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणे हे एक उत्तम औषध ठरते. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते. तसेच ताप चढत असल्यास दुधी किसून कपाळावर लेप लावावा. असे केल्याने ताप उतरण्यास मदत होते.० पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताचा तसेच उष्णतेचा त्रास होत असेल तर नियमितपणे आहारातून दुधीचे सेवन करावे. यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते.० दुधीचे बी औषध म्हणून उपयुक्त आहे. या बिया दुधात वाटून घेतल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढून विस्मरण कमी होते. तसेच मस्तकातील उष्णता कमी होऊन मेंदूचा उत्साह वाढतो.० अति काळजीने मेंदूचा ताणतणाव वाढला असेल व त्यातून असहय़ तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर अशा वेळी १ कप दुधीचा रसामध्ये १ चमचा मध घालून घ्यावा. यामुळे डोकेदुखी थांबते.० अति उष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असेल तसेच डोळ्यांची लाली वाढली असेल, तर अशा वेळी दुधीचा कीस कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यांवर ठेवावा व शांतपणे पडून राहावे. यामुळे डोळ्यांची उष्णता कमी होते.० आजारपणामुळे अशक्तपणा जाणवत असेल व शरीर कृश झाले असेल, तर अशा वेळी दुधी भोपळ्याचा हलवा हा खडीसाखर, वेलदोडे, दूध, बदाम, मनुके घालून जेवणानंतर खावा. यामुळे काही दिवसांतच शरीराचा अशक्तपणा दूर होतो.० तळपायांना भेगा पडल्या असतील, तर अशा वेळी दुधीने सिद्ध केलेले तेल तळपायांना लावून पायात मोजे घालावे. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होऊन भेगा भरून येतात.० आहारामध्ये नियमितपणे दुधीचा वापर करावा. अनेक जणांना तसेच लहान मुलांना दुधीची भाजी खाण्यास आवडत नाही. अशा वेळी कोिशबीर, थालीपीठ, पराठा, हलवा, सूप अशा अनेक स्वरूपांत दुधी भोपळ्यापासून पदार्थ बनवून त्याचा वापर करावा.सावधानतादुधी भोपळा हा नेहमी आहारात कोवळा व ताजा वापरावा. कोवळ्या भोपळ्यामध्ये औषधी पोषक गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्याचबरोबर तो नेहमी उकडून किंवा शिजवून खावा. जुनाट दुधी भोपळा जास्त प्रमाणात किंवा कच्च्या स्वरूपात खाल्ल्यास पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*AIR - All India Radio*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःच्या अंतरात्म्याच्या संकेतानुसार चालल्याने कीर्ती सहजतेने प्राप्त होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 'ग्रामगीता' या ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे नाव काय ?२) नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेला आमदार कोण ?३) 'संरक्षण' हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ?४) 'रोष' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) प्राणी जीवनाचा अभ्यास करणाऱ्या उपशाखेचे शास्त्रीय नाव काय ? *उत्तरे :-* १) देवदर्शन २) काशिराम पावरा, भाजप ( १,५९,०४४ मतांनी ) ३) संघसूची ४) राग ५) झूलॉजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संजय माचेवार, वसमत👤 संतोष लक्ष्मण सज्जन, धर्माबाद👤 अर्जुन यनगंटीवार👤 संजय बोनटावार👤 मुरलीधर हंबर्डे पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्ही शरणागत परि सर्वस्वें उदार । भक्तीचे सागर सत्वशील ॥१॥ काय वाचा मनें अर्थ संपत्ति धन । दिधलें तुजलागुन पांडुरंगा ॥२॥ आम्हां ऐसें चित्त तुम्हां कैचें देव । हा बडिवा केशवा न बोलावा ॥३॥ सत्वाचा सुभट बळि चक्रवर्तित । पहा केवढी ख्याति केली तेणें ॥४॥ त्रिभुवनीचें बैभव जोडिलें ज्या लागुनि । तें शरीर तुझ्या चरणीं समर्पियेलें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथे आपल्याला पोहोचायचे असते.त्या ठरलेल्या जागी पोहोचायला जास्त वेळ लागत नाही. कोणत्याही माध्यमातून आपण पोहोचत असतो. पण, एखाद्याला मागे टाकून पोहोचणे असेल तर मात्र समोर पोहोचून सुद्धा पाहिजे त्या प्रकारचे आपल्याला समाधान मिळत नाही. कारण दुसऱ्यांच्या मनात जागा केलेल्यांना कितीही बाजूला सारण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा काढणे होत नाही. त्यासाठी माणूस म्हणून जगावे लागते व अशा कितीतरी मौल्यवान संपत्तीचा त्याग करावा लागतो. ते, प्रत्येकालाच जमत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*व्यंग*चेष्टा कसलीही करावी. पण, ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच. एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चारचौघांत त्याचा अपमान करणे हे गैरच. ते सभ्यतेचे लक्षण नव्हे, पण एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते, याचे भान ठेवावे. आपला पांडुरंग एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता, तेवढ्यात समोरून किरण येताना दिसली. ती थोडीशी तिरळी होती. पांडुरंगचा स्वभाव मुळातच खवचट, त्यात तिरळे बघणारी किरण समोरून आलेली. पांडुरंग म्हणाला, "काय किरण ! कसं काय ठीक आहे ना? कुठं चाललीस? आणि तुला म्हणे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. खरं का?" किरणच्या लक्षात आले की, हा आपली चेष्टा करतोय, आपणाला हिणवतोय. म्हणून ती म्हणाली, "खरं आहे हे ! आता हेच बघ ना, तुला दोन पाय आहेत ना? पण मला तुला चार पाय असल्याचं दिसत आहे !"*तात्पर्य :* दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. त्याचा उपहास करू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 नोव्हेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BCxuVmV4N/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील ३३० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️ •••••••••••••••••••••••••••••••••*२०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर**१९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर**१९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ’इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा 'राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर**१९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७५: सुरीनामला (नेदरलँड्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.*⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: रोशेल राव -- माॅडेल व अभिनेत्री**१९८३: संध्या ललितकुमार भोळे -- कवयित्री**१९८३: झुलन गोस्वामी -- भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू* *१९८१: संदीप विकास गुजराती -- कवी* *१९७८: राखी सावंत -- भारतीय अभिनेत्री**१९७७: गिरीश पांडुरंग कुलकर्णी -- भारतीय अभिनेता, लेखक आणि निर्माता**१९६९: जोस्ना दिलीप पाटील -- लेखिका**१९६६: रूपा गांगुली -- भारतीय अभिनेत्री, पार्श्वगायिका* *१९६६: सीताराम जगन्नाथ सावंत -- प्रसिद्ध लेखक**१९६३: विजया ज्ञानेश्वर भांगे -- लेखिका, कवयित्री**१९५९: प्रवीण श्रीराम देशमुख -- कवी, लेखक**१९५४: नीता सतीश शाह -- कवयित्री* *१९५०: सुधीर गाडगीळ -- प्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार* *१९५०: नत्थू सीताराम खंडाईत -- लेखक* *१९५०: प्रा. ज्योती बाबुराव लांजेवार -- मराठी लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि विचारवंत (मृत्यू: ८ नोव्हेंबर २०१३ )**१९३९: दिनकर गांगल -- लेखक, संपादक, पत्रकार* *१९३८: फकरुद्दीन हजरत बेन्नूर -- मुस्लिम समाजातील अभ्यासू आणि बुद्धिवंत समाजसुधारक (मृत्यू: १७ ऑगस्ट २०१८ )**१९३७: डॉ.अशोक दामोदर रानडे -- भारतीय शास्त्रीय संगीतविशारद, गायक, समीक्षक आणि लेखक (मृत्यू: ३० जुलै २०११ )**१९२९: सुरिंदर कौर -- भारतीय गायिका आणि गीतकार (मृत्यू: १४ जून २००६ )**१९२९: डॉ.गणेश मुकुंद नाशिककर -- कवी, लेखक* *१९२६: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२ )**१९२१: भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर -- मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार ( मृत्यू: ११ ऑगस्ट, २०१५ )**१९०५: खंडेराव सावळाराम दौंडकर -- लेखक, संपादक (मृत्यू: १० जानेवारी १९६० )**१८९८: देबकीकुमार बोस -- भारतीय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९७१ )**१८८२: सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार (मृत्यू: ३० मे १९६८ )**१८७९: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १६ जानेवारी १९६६ )*⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: दिएगो अरमांडो मॅराडोना -- अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू (जन्म: ३० ऑक्टोबर१९६० )**२०१४: सितारा देवी -- शास्त्रीय कथ्थक शैलीतील नृत्यांगना,गायिका आणि अभिनेत्री(जन्म: ८ नोव्हेंबर १९२० )**२०१३: लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये (जन्म: ५ सप्टेंबर १९२० )**१९९८: परमेश्वर नारायण तथा पी.एन.हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी,पंतप्रधानांचे मुख्य सचिव,योजना आयोगाचे उपाध्यक्ष (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ )**१९९७: जवाहरलाल अमोलकचंद दर्डा -- भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (जन्म: २ जुलै १९२३ )**१९८८: माधव वासुदेव पटवर्धन -- प्राध्यापक, समीक्षक,अभ्यासक, अनुवादक(जन्म: १ जानेवारी १९०६ )**१९८४: यशवंतराव चव्हाण – भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १२ मार्च १९१३ )**१९७४: यू.थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (जन्म: २२ जानेवारी १९०९ )**१९६२: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(जन्म: ६ जानेवारी १८६८ )**१९६०: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (जन्म: २४ सप्टेंबर १८९८ )**१९२२: पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक,भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (जन्म: २० मे १८८४ )**१८८५: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अन्नाची नासाडी टाळू या ......!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *15व्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणीवर, स्पष्ट बहुमत असल्याने घाई न करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे, निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही, ईव्हीएमबाबत माहिती घेऊन बोलेन, निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार, सांगोलाच्या शेकापच्या युवा आमदाराचा स्तुत्य उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *27 कोटी विषय क्लोज ! अवघ्या 10 मिनटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम, आयपीएलच्या लिलावात इतिहासामधील ठरला सर्वात महागडा खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह-सिराजचा धुमाकूळ, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज ! 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *सर्दी झाल्यावर अन्न बेचव का लागते ?* 📒अन्नाची चव आपण जिभेनं चाखतो असं म्हणतो; पण ते संपुर्ण खरे नाही. जिभेवर केवळ चार प्रकारच्या स्वादांना प्रतिसाद देणारे स्वादांकुर असतात. गोड, खारट, आंबट आणि तुरट. बाकी सगळ्या चवी या चार आणि वासाबी या नावानं ओळखल्या जाणार्‍या पाचव्या प्रकारच्या स्वादांकुरांच्या वेगवेगळ्या प्रकारे साथ देण्याच्या प्रक्रियांमधुन आपल्याला समजतात. या स्वादांकुराशी पदार्थांमधील स्वादरेणुंचा संबंध आला की त्यातुन उठणारे विद्युत रासायनिक तरंग मज्जातंतुकडुन मेंदुतील स्वादकेंद्राकडे पाठवले जातात. त्या तरंगांबरोबरच आपल्या घ्राणेंद्रियांकडुन येणारे अन्नाच्या गंधांचे आणि डोळ्यांकडुन येणार्‍या अन्नाच्या रंगांचे, आकारांचे तरंग मेंदुला येऊन भिडतात. या सर्वांचं तिथं. विश्लेषण होऊन त्यातुन मग त्या पदार्थाच्या खर्‍याखुर्‍या चवीची ओळख आपल्याला पटते. अर्थात या सार्‍या प्रक्रिया इतक्या वेगानं होतात की हे सारं सव्यापसव्य होत असल्याची जाणीवही आपल्याला होत नाही.तरीही यावरुन हे मात्र ध्यानात येईल की केवळ जीभ जे चाखते त्यावरुनच आपल्याला अन्नाची चव कळत नाही. त्यात डोळ्यांना दिसणार्‍या त्या अन्नाच्या स्वरुपाचा आणि नाकानं जोखलेल्या त्याच्या गंधाचाही तितकाच महत्वाचा सहभाग असतो.आंब्याचा रंग काळाकुट्ट आणि त्याचा आकार दगडासारखा ओबडधोबड असता, त्याचा गंध आपल्याला नाक मुठीत धरायला प्रवृत्त करणार्‍यांच्या जातकुळीतला असता तर आंबा आपल्याला तितकाच चविष्ट लागला असता की काय या प्रश्नाचं उत्तर स्वत:लाच देण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या चवीतल्या जिभेखेरीज इतर इंद्रियांच्या सहभागाचं आकलन होईल.तेव्हा कोणत्याही अन्नाची चव घेण्यासाठी जिभेबरोबरच आपली नजर आणि घ्राणेंद्रिये तितकीच जागृत असायला हवीत. जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा आपलं नाक चोंदतं. म्हणजेच नाकाद्वारे हवा आत शिरायला त्रास होतो. त्याचमुळे आपण अशावेळी तोंड उघडुन श्वासोच्छवास करत असतो. नाकावाटे हवा आत शिरत नसल्यामुळे त्या अन्नाचा सुटलेला दरवळ हवेतुन आपण आत घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या गंधांच्या रेणुशी ज्यांचं संघटन जुळायचं त्या नाकातल्या ग्रहणकेंद्रांशी आवश्यक ती प्रक्रिया होतच नाही. त्यामुळे चव जोखण्यात असलेली आपली भुमिका नाक बजावु शकत नाही. साहजिकच चवीची ओळख पटवुन देण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे मग ते अन्न बेचव असल्याची भावना होते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CPU: Central Processing Unit*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील ५६ वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जाणार आहे ?२) महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या ?३) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी - २० शतके झळकवणारा संघ कोणता ?४) नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर'ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले ?५) VVPAT या यंत्राचा वापर कोणत्या साली प्रथम करण्यात आला ? *उत्तरे :-* १) छत्तीसगड २) महायुती, २३६ जागा ( भाजप - १३२ जागा ) ३) भारत ( २३ शतके ) ४) मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५) सन २०१३*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी, जि. प. नांदेड👤 महेश मुधोळकर👤 नरसिंग एनद्गलवार, शिक्षक नेते, किनवट👤 शिवाजी पाटील कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित ॥१॥ विठ्ठलचि घ्यावा विठ्ठचि गावा । विठ्ठचि पहावा सर्वाभूतीं ॥२॥ या परतें सुख न दिसे सर्वथा । कल्पकोटि येतां गर्भवास ॥३॥ नामा म्हणे चित्तीं विठठलांचें रूप । संकल्प विकल्प मावळले ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते.त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान,आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अतिथी धर्म*शिवराज एका चोराचा पाठलाग करत होता. गावाच्या बोलबोळांतून पळणारा चोर अखेर शिवराजच्या नजरे आड झाला. तो चोर एका घरात घुसला होता. त्या घरातील माणसाने त्या गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला. त्या घरात घुसलेल्या चोराला आतल्या खोलीत लपविले. इतक्यात पाठलाग करणारा शिवराज तिथे आला. त्याने पळणाऱ्या व्यक्तीचे म्हणजे चोराचे वर्णन करून 'असा मनुष्य इथे आला होता का? त्याला आपण पाहिलेत का' असे विचारले. गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरिता तो कुटुंबप्रमुख खोटे बोलला व असा माणूस पाहिला नसल्याचे सांगितले. पण, त्या गृहस्थाच्या मुलाने मात्र शिवराजकडे पाहून आतल्या खोलीकडे खून केली. शिवराज काय ते समजला आणि त्याने आतल्या खोलीत घुसून त्या चोराला पकडले व तो त्या चोराला घेऊन गेला. त्या गृहस्थाला मुलाचा राग आला. कारण, त्याच्या मुलाने गावच्या रिवाजाप्रमाणे अतिथी धर्म पाळला नव्हता. त्या कथेपुरते त्या मुलाचे म्हणणे बरोबर होते.*तात्पर्य :* सत्याचा अर्थ, महत्व परिस्थितीनुसार बदलत असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 नोव्हेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15D4LkUCGK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ३२७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_ 🧿••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.**२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.**१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू**१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन**१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा**१९४३: लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.**१८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: वैशाली किशोर भोयर -- कवयित्री**१९८०: पांडुरंग निवृत्तीराव पुठ्ठेवाड -- कवी, लेखक**१९७४: गीतांजली गणपतराव कमळकर -- बाल साहित्यावर लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७३: अर्चना मोहनकर -- लेखिका, कवयित्री**१९७०: मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट माजी कर्णधार**१९६८: संदिप वसंत देशपांडे -- कवी, लेखक**१९६७: बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉन टेनिसपटू**१९५५: देवदत्त दामोदर साने -- कवी, लेखक, समीक्षक**१९५२: अजित बलवंत मुगदूम -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक**१९४८: सरोज खान -- हिंदी चित्रपटसृष्टीतली नृत्य दिग्दर्शिका (मृत्यू: ३ जुलै २०२० )**१९४७: सुलभा अमृत चौधरी -- कवयित्री, लेखिका* *१९३९: मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय संरक्षण मंत्री (मृत्यू: १० ऑक्टोबर २०२२ )**१९१९: त्र्यंबक विनायक सरदेशमुख -- मराठी कादंबरीकार,समीक्षक आणि कवी (मृत्यू: १२ डिसेंबर २००५ )**१९१७: वामन महादेव कुलकर्णी -- सौंदर्यशास्त्र अभ्यासक, समीक्षक (मृत्यू: २६ डिसेंबर २००९ )**१९१५: किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८० )**१९१३: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (मृत्यू: १६ जानेवारी१९८८ )**१९०९: द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत,समाजसेवक आणि पत्रकार (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८ )**१९०३: दामोदर नरहर शिखरे --पत्रकार, चरित्रकार, कादंबरीकार(मृत्यू: ९ सप्टेंबर १९८० )**१८८५: हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (मृत्यू: १८ आक्टोबर १९५१ )**१८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ,संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाड:मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९५६ )**१८७१: लक्ष्मण विनायक परळकर -- संत वाड्:मयाचे अभ्यासक, अनुवादक, चरित्रकार (मृत्यू: ७ मे १९५१ )**१८०८: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (मृत्यू: १८ जुलै १८९२ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: नीळकंठ ऊर्फ निळूभाऊ खाडिलकर -- अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे,दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक (जन्म: ६ एप्रिल १९३४ )**२०१२: पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६ )**२००८: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९ )**२०००: डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ,प्राध्यापक (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२ )**१९९०: ह. ह. अग्निहोत्री -- कोशकार, भाषाशास्त्राचे अभ्यासक,समीक्षक(जन्म: ३ जुलै १९०२ )**१९८०: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका,संवादलेखिका व सौंदर्यवती (जन्म: १७ ऑगस्ट १८९३ )**१९७९: शीलवती श्रीधर केतकर -- अनुवादक (जन्म: १८८७ )**१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या (जन्म: २९ मे १९१७ )**१९६३: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४ )**१९५७: पार्श्वनाथ आळतेकर – नट,दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७ )**१९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक (जन्म: १ जुलै १८८७ )**१९०२: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाल्यांचा विकास साधताना .....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी, बारावी 11 फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेड परिक्षेत्रात एक महिन्यात तब्बल 16 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 9 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, मतमोजणीसाठीही मोठा पोलिस बंदोबस्त राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आप ची पहिली यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनी मुख्यमंत्री यांनी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकास दिली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रसारभरती OTT मंचाचा गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खासदार नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दीक पांड्या वर पहिल्या मॅचसाठी लागला बॅन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 शिलाखंड 📙 दगड गोट्यांकडे सहसा लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो. पण ज्यावेळी एखादा माणूस रमतगमत एखाद्या डोंगरावर फिरायला जातो, त्यावेळी त्याचे लक्ष आसपासच्या विस्तीर्ण शिलाखंडांकडे नक्कीच जाते. दगडांकडे एरवी दुर्लक्ष करणारा जेव्हा घरातील बांधणी व सजावटीचा विचार करू लागतो, तेव्हा तर प्रत्येक दगडाचा प्रकार त्याच्या हातातून व नजरेतून चौकसपणे जाऊ लागतो. पण तरीही हे शिलाखंड आहेत, याची पुरेशी जाणीव मनाला झालेली नसते.शनिवारवाडा व त्याची दगडी भिंत, राजस्थानातील किल्ले व त्यांच्या लाल दगडी भिंती, कोकणातील जांभ्या दगडाची देवळे, ताजमहालचा संगमरवरी दगड, शहाबादची फरशी ही सारी शिलाखंडांचीच विविध रूपे आहेत. इतकेच काय, 'गमभन' ज्यावर लिहिले जाते, ती पाटीसुद्धा एक प्रकारचा दगडच असतो.निसर्गामध्ये दगड मुख्यतः तीन प्रकारांत तयार होतात. ज्वालामुखीचा रस, तप्त लाव्हा, पृथ्वीअंतर्गत उष्णता यांतून निर्माण होणारे शिलाखंड हे अत्यंत कठीण शिळांचे स्वरूप असते. आपल्याला ठिकठिकाणी आढळणारे साधे तपकिरी, काळे, भुरकट दगड हे बेसाल्टचे असतात. शोभिवंत दगडांचे प्रकार म्हणजे ग्रॅनाइटचे. लाव्हा पृष्ठभागावर येऊन थंडा होतो, त्यातून बेसाल्टचा दगड निर्माण होतो. ग्रॅनाइट मात्र जमिनीतच घट्ट झालेला असतो. त्यामुळे क्वार्ट्झचे कणकण त्यात घट्ट होऊन त्याची नैसर्गिक शोभा वाढते. त्यांच्या रंगात अनेक प्रकार आढळतात.दुसऱ्या प्रकारात नदीच्या मुखाशी जमलेली गाळाची माती, वाळू, चुनखडी तिथेच किंवा समुद्राच्या तळाशी साचत जाते. वर्षानुवर्षे त्यावरचे वजन वाढत जाते व पाण्याचा अंश कमी होत जातो. क्वचित त्यावरील पाणीच दूरवर सरकते म्हणजे नदीचा प्रवाह बदलतो. कित्येक वर्षांनी हे कण एकत्रित घट्ट होतात व त्यांचेच दगड बनत जातात. बांधकामात खनिज दगड वापरतात, तो या प्रकारचा असतो. त्याला छिन्नीने तास पाडले जातात. या प्रकारच्या दगडाच्या खाणी ठिकठिकाणी आढळतात.तिसऱ्या प्रकारचे दगड हे साधारणपणे पृथ्वीअंतर्गत उष्णतेने रूपांतरित झालेले दगड असतात. पृथ्वीच्या पोटातील असंख्य खनिजे उष्णतेने विरघळतात. त्यातील जड भाग खाली राहतो. नको असलेला हलका भाग पोकळ बुडबुडय़ांच्या स्वरूपात वर राहतो. काही वेळा खनिजे एकमेकात मिसळली जातात. त्यातून विविध रंगांची मिश्रणेही तयार होत जातात. पण या निर्मितीतील मूळ महत्त्वाचा भाग असतो तो वाळू, चुनखडीचाच. संगमरवर, फरशी, कडप्पा या प्रकारांतील दगड थरांच्या स्वरूपात एखाद्या विवक्षित ठिकाणीच सापडतात. मूळ थर हळूहळू गाडले जाऊन त्यावर पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेचा परिणाम होऊन ते एकजीव होऊन ही निर्मिती होत गेलेली असते.दगड कोणताही असो, त्याला आकार द्या वा तसाच ठेवा, त्याला पॉलिश करून चकाकी आणा किंवा उन्हापावसाने अधिकच रापू द्या, पाषाणाचे एक वेगळेच सौंदर्य असते. अखंड शिलाखंडात कोरीव काम करून शिल्पाकृती उभा करण्याचा अट्टाहास व ध्यास घेऊन त्यासाठी आयुष्य वेचणारेही कलाकार आहेत.वेरुळची शिल्पे, श्रावणबेळगोळचा गोमटेश्वरांचा पुतळा ही साध्या काळ्या कुळकुळीत अखंड शिलाखंडांतूनच बनली आहेत; पण त्यांचे देखणेपण साऱ्या जगाला आकर्षून घेते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*DP – Display Picture*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डोमिनिका या देशाच्या कोणत्या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले जाणार आहे ?२) डोमिनिका हा देश कोणत्या खंडात आहे ?३) डोमिनिका देशाची राजधानी कोणती ?४) डोमिनिका हा देश केव्हा स्वतंत्र झाला ?५) डोमिनिका या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर २) उत्तर अमेरिका ३) Roseau ( रोसेयू ) ४) ३ नोव्हेंबर १९७८ ५) डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पांडुरंग पुठेवाड, संपादक, देगलूर👤 अरुण पवार, उपक्रमशील शिक्षक, उस्मानाबाद👤 विकास चव्हाण👤 श्रीकृष्ण निहाळ👤 साईप्रसाद यनगंदलवार, सेवानिवृत्त शिक्षक👤 मधू कांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥ भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥ घेसी सोडुनियां पोहे मुठीभरा । हिडसावल्या करा नामा म्हणे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस दिसायला जरी रंग आणि रूपाने वेगळा असेल तरी शेवटी तो, माणूसच असतो. म्हणून कोणत्याही माणसाचा अपमान करताना किंवा त्याची टिंगल, टवाळी करून आनंद घेताना स्वतःला धन्य समजू नये. कारण ज्या माणसासोबत आपण त्या प्रकारची वागणूक ठेवून जगत असतो. त्याच वागणुकीमुळे कुठेतरी आपलाही अपमान होत असतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*निर्णय क्षमता*अर्थशास्त्रात एक कथा सांगितली जाते. बुर्बेन्स नावाच्या गृहस्थांचे एक गाढव होते. त्यांचे एक भले मोठे शेत होते. दोन्ही बाजुंना भरपूर गवत असणारी एक पायवाट त्या शेतातून बाहेर पडत होती. सारे कसे सुखात चालले होते. एकदा हा बुर्बेन्स काही कामानिमित्त महिनाभर परगावी जाणार होता. त्याने विचार केला की, गाढवाच्या खाण्याची व्यवस्था करण्याची गरज काय ? गड्याने जरी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी ते गाढव रस्त्याच्या दुतर्फा असणारे हिरवेगार गवत खाऊन सहज जगेल. बुर्बेन्स गावी गेला. महिनाभरानंतर परतला. पाहतो तर काय ? गाढव मरून पडलेले होते. असे कसे झाले ? याचा विचार त्याच्या मनात सुरू झाला. एवढे गवत असताना ते गाढव उपाशीपोटी का राहिला असावे ? त्याला कळेना. झाले होते असे, की गाढवाचा निश्चय होत नव्हता, की कोणत्या बाजूचे गवत प्रथम खावे ? या बाजूचे की त्या बाजूचे ? असे करता करता गाढवाने कुठलेच गवत खाल्ले नाही आणि त्याचा भूकबळी पडला! *तात्पर्य : निर्णय क्षमतेअभावी नुकसान ठरलेले असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 नोव्हेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*शिक्षणाचा काय फायदा ?*Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_67.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_जागतिक मच्छिमार दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••• 💢 *_भाषिक सुसंवाद दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••💢 *_जागतिक दूरदर्शन दिन_* 💢••••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_ या वर्षातील ३२६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_ 💢 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.**१९७१: बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.**१९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.**१९४२: राजा नेने दिग्दर्शित ’दहा वाजता’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.*💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू**१९८२: संतोष ग्यानिराम मेश्राम -- कवी**१९८२: आरती छाब्रिया -- भारतीय अभिनेत्री आणि माजी मॉडेल**१९८०: कार्तिक गुलाब हजारे -- लेखक**१९८०: चंदन विश्वासराव पवार-- कवी, लेखक**१९८०: प्रा. डॉ. राहुल अशोक पाटील -- लेखक (मृत्यू: २७ एप्रिल २०२१ )**१९६६: डॉ.राजेंद्र रंगराव राऊत -- महानुभाव साहित्याचे अभ्यासक, कथाकार**१९६६: विलास मंगलजी भोंगाडे -- लेखक* *१९५९: डॉ.राजन गवस -- कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललितगद्य लेखन**१९५८: छाया कोरेगांवकर -- कवयित्री, लेखिका**१९५७: मंजुश्री गोखले -- मराठी लेखिका**१९५२: राजेंद्र जवाहरलाल दर्डा -- पत्रकार,माजी मंत्री म. रा.**१९५२: प्रा. शफाअत खान -- मराठी नाटककार**१९४७: गंगाधर गाडे -- आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक कार्यकर्ते, माजी मंत्री (मृत्यू: ४ मे २०२४)**१९३८: हेलन अॅन रिचर्डसन खान (हेलन) -- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना**१९३५: प्रभाकर गणपतराव तल्लावार -- कवी, लेखक (मृत्यू: २४ ऑगस्ट २०२२ )**१९३४: आशा माथुर -- प्रसिद्ध अभिनेत्री**१९३२: दत्ता सामंत -- कामगार नेते (मृत्यू: १६ जानेवारी १९९७ )**१९३०: दिवाकर दत्तात्रेय भोसले -- ' चारुता सागर ' या नावाने कथालेखन तर धोंडू बुवा कीर्तनकार या नावाने कीर्तने केली (मृत्यू: २९ मे २०११ )**१९३०: मोहनदास श्रीपाद सुखटणकर -- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०२२ )**१९२९: दिगंबर विष्णू जोशी -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९२९: डॉ. महादेव विनायक गोखले -- लेखक (मृत्यू: २८ ऑगस्ट २०१३ )**१९२७: शं. ना. नवरे – लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३ )**१९२६: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (मृत्यू:ह३ नोव्हेंबर १९९२ )**१८९८: पांडुरंग विठ्ठलपंत वाळामे (रंगावधूत महाराज) -- दत्त संप्रदाय, स्वातंत्र्यसैनिक, संस्कृतज्ञ (मृत्यू: १९ नोव्हेंबर १९६८ )**१६९४: व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (मृत्यू: ३० मे १७७८ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२: गोविंददास मन्नुलाल श्रॉफ -- भारताचे स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २४ जुलै १९११ )**१९९६: डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ,नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) (जन्म: २९ जानेवारी १९२६ )**१९९२: स्वरूप किशन -- भारतीय कसोटी क्रिकेट पंच ( जन्म: १३ जुलै १९३० )**१९७०: सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८ )**१९६३: चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (जन्म: १९ जानेवारी १८९२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षणाने माणसाच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत मिळते. एखाद्या घटनेमागची कारणमीमांसा शिक्षणामुळे शोधू शकतो. मात्र आज समाजात पसरलेली अंधश्रद्धा पाहिली की या शिकलेल्या लोकांची कीव यायला होते. मनात प्रश्न पडतो की, या शिक्षणाचा काय फायदा ?..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बीडमध्ये मतदान केंद्रावर बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेले बाळासाहेब शिंदे यांचा मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, नोव्हेंबर अखेर रेल्वेकडून 370 ट्रेनमध्ये 1000 नवीन जनरल डबे जोडले जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गयाना आणि बार्बाडोस या दोन्ही देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सातारा येथे मतदान केंद्रावर मतदान करताना एका मतदारांचा हृदयविकार झटक्याने मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्लीत वायू प्रदूषणामुळे 50 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम करणार, पर्यावरण मंत्री गोपाल रॉय यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 नखं कापताना वेदना का होत नाहीत? 📒सुई-दोरा घेऊन आपण सदऱ्याचं किंवा ब्लाऊजचं तुटलेलं बटण शिवत असतो. साधी सरळ सरावातली प्रक्रिया. त्यामुळे काही वेळा आपण आपली नजर त्या बटणावरून हलवत दुसरीकडे कुठंतरी पाहतो. हात मात्र शिवण्याची ती प्रक्रिया इमानेइतबारे पार पाडत असतात; पण आपलं लक्ष आता दुसरीकडे वेधलं गेल्यानं सुई कापडात शिरण्याऐवजी आपल्या बोटात शिरू पाहते. ती टोचताक्षणीच आपण ऊऽई करत किंचाळतो. कारण तेवढ्याशा त्या टोचण्यानंही आपल्याला वेदना होतात. कळ येते. मग अख्खं नख कापताना किंवा डोक्यावरचे केस कापून घेताना आपल्याला वेदना का होत नाहीत? एवढंच काय, पण डोक्याचं साफ मुंडण करून चमनगोटा करून घेतानाही आपल्याला वेदना होत नाहीत. दाढी करतानाही ती गुळगुळीत व्हावी म्हणून आपण गालावरचे केस जवळजवळ मुळापासून छाटून टाकत असतो आणि तरीही वेदना होत नाहीत. असं का, हा प्रश्न त्या टोचणाऱ्या सुईसारखा टोचत राहतो ना त्याचं उत्तर मिळवण्याआधी आपल्याला वेदना का होतात हे पाहिलं पाहिजे. शरीरातल्या जिवंत पेशींशी मज्जातंतू जोडलेले असतात. त्या पेशींची मोडतोड झाली, त्यांना इजा झाली की या मज्जातंतूंची टोकं चाळवली जातात. त्यांच्यामधून विद्युत्रासायनिक संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो आणि वेदनेची जाणीव आपल्याला होते. जर हे मज्जातंतू चाळवलेच गेले नाहीत तर वेदना होणारच नाही. नखं आणि केस या मृतपेशी असतात. त्यामुळे त्यांच्याशी मज्जातंतू जोडलेले नसतात. साहजिकच नखं कापताना किंवा केस कापून घेताना वेदना जाणवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; परंतु केसांची वाढ ज्या फॉलिकलमधून होते त्या जिवंत पेशी असतात. केस कापण्याऐवजी ते उपटले तर या पेशींना धक्का पोहोचतो. त्यांच्याशी जोडलेल्या मज्जातंतूंना त्याचा प्रभाव जाणवतो व आपल्याला वेदना होतात. नखांच्या बाबतीतही हीच परिस्थिती असते. नखं जर मृत पेशींची बनलेली असतात तर मग त्यांची वाढ कशी होते? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. प्रत्यक्षात नखांच्या मुळाशी असलेल्या पेशींची वाढ होते व नखांच्या मुळाशी एक नवी प्रत तयार होते. ती वरच्या मृत पेशींना वरच्या दिशेनं ढकलते. नखं वाढतात. कालांतरानं या नव्या प्रतीतल्या पेशीही मृत होतात आणि त्यांच्या मुळाशी एक नवी प्रत तयार होते. त्यामुळे नखांची वाढ होत असली किंवा केसांचीही, तरी त्या मृत पेशी असल्यानं त्यांची कापाकाप होताना अजिबात वेदना होत नाहीत. दाढीच्या बाबतीतही ही स्थिती असते. कितीही गुळगुळीत दाढी केली तरी ती करताना त्या केसांच्या फॉलिकलना धक्का पोहोचत नाही; पण इलेक्ट्रीक शेव्हरनं दाढी करताना काही वेळा त्यात अडकलेला दाढीचा केस ओढला जातो, उपटला जातो आणि वेदना होतात. गुळगुळीत दाढी करणारी ब्लेड जरा जोरानं ओढली जाऊन खालच्या कातडीला कापते. वाहणाऱ्या रक्ताबरोबर वेदनांचा प्रवाहही सुरू होतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*FYI – For Your Information*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या फळाची बी फळाच्या बाहेर असते ?२) प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो ?३) शिर्डी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?४) 'रात्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला ? *उत्तरे :-* १) काजू २) तलाठी ३) राहाता, अहमदनगर ४) रजनी, यामिनी, निशा, रात ५) थॉमस जेफरसन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रशांत शास्त्री, सेवानिवृत्त बँक अधिकारी, नांदेड👤 इलियास बावाणी, पत्रकार, माहूर👤 आबासाहेब विश्वनाथ पाटील, धर्माबाद👤 माधव हर्ष👤 विठ्ठल शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हां सांपड्लें वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥ अवतार हा भेटला । बोलूं चालूं हा विसरला ॥२॥ अरे हा भावाचाअ लंपट । सांडुनि आलासे बैकुंठ ॥३॥ संतसंगतीं साधावा । धरूनि ह्रदयीं बांधावा ॥४॥ नामा म्हणे केउता जाय । आमुचा गळा त्याचे पाय ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं वाईट नसतात. तर कधी, कधी परिस्थिती त्यांना तसं वागायला भाग पाडत असते.उदा.सत्य बोलत असेल तेव्हा तो इतरांच्या दृष्टीने वाईट होत असतो.स्वतः पेक्षा दुसऱ्यांचे विचार करून त्यासाठी काम करत असतो तेव्हा सुद्धा तो वाईट दिसत असतो. तर कधीकाळी परिस्थितीमुळे वाईट दिसत असतो. पण, खऱ्या अर्थाने त्याचे मन कसे असते व परिस्थिती कशी असते फक्त त्याच माणसाला माहीत असते.म्हणून एखाद्या माणसाला न वाचता कोणाच्या सांगण्यावरून त्याला वाईट ठरवू नये. तेथेच वरवर सज्जन दिसणारे माणसं तेवढे चांगले असतीलच असेही नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *गाणारा पोपट*📗*एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाहाने पोपटाकडून पुराणातील काही महत्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही  सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई. त्याच्या कडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे.*     *एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता काम नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवून टाकेन ...समजलं  !   *सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीरभोवती लपेटून घेतले त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता. तरी पण पोपट बरा होत नव्हता बादशाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नव्हते. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पाहिली.*     *सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण तरी एकदा पाहावं. बादशहा बिरबला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला पाहतो तर काय पोपट मरून पडलेला तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल तू तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे. नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला. सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून गाढायला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल. बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली पोपट मेला असं सांगायला आलास तर तुझं डोक उडवीन असं सेवकाजवळ बोलल्याच त्याला आठवलं बिरबलान युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 नोव्हेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/11/election-voting.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_ या वर्षातील ३२३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.**१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६२: डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.**१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.**१९३३: ’प्रभात’चा पहिलाच रंगीत चित्रपट ’सैरंध्री’ प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ’प्रभात’ने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.**१९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म**१९१८: लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.**१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे ’संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले.**१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.* 🪩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: रोहित राऊत -- मराठी गायक**१९८४: डायना मरिअम कुरियन (नयनतारा) -- भारतीय अभिनेत्री**१९८२: समाधान रावसाहेब दहिवाळ -- कवी, लेखक**१९८२: नेहा भसीन -- भारतीय गायिका आणि गीतकार**१९६४: स्मिता धनराज बांगडे -- कवयित्री**१९६०: प्रतिमा प्रदीप दुरुगकर -- लेखिका* *१९५४: रंजन गोगोई -- माजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश* *१९५३: रवींद्र गजानन आवटी -- प्रसिद्ध लेखक तथा गीतकार**१९५३: विनोद दिनकर देशमुख -- प्रसिद्ध लेखक, पत्रकार* *१९५३: वर्षा विजय देशपांडे -- कवयित्री, लेखिका**१९४५: महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख**१९४१: आनंद अंतरकर -- मराठी लेखक आणि आणि संपादक (मृत्यू: २८ ऑगस्ट २०२१ )**१९४०: कृष्णाजी लक्ष्मण देशपांडे -- बालकथाकार* *१९३८: कुमुदिनी मोतिराम पावडे -- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: ३१ मे २०२३ )**१९३७: अरविंद मुळगांवकर -- महाराष्ट्रातील ख्यातनाम तबलावादक व तबला क्षेत्रातील चिकित्सक व अभ्यासक (मृत्यू: १७ फेब्रुवारी २०१८ )**१९३४: तुळशीदास बोरकर -- भारतीय संगीतकार आणि हार्मोनियम वादक ( मृत्यू: २९ सप्टेंबर २०१८ )**१९३१: रामचंद्र महादेव बापट तथा राम बापट -- लोकाभिमुख विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू:२ जुलै २०१२ )**१९३१: श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी,पत्रकार व समीक्षक,राज्यसभा सदस्य (मृत्यू: २५ मे १९८६ )**१९२५: मधुकर गोपाळ पाठक -- संवादलेखक (मृत्यु: २० मे २०११ )**१९२०: विमला आत्माराम जोशी -- लेखिका**१९१९: दत्तात्रेय सखाराम हर्षे -- लेखक**१९१६: मोरेश्वर राघव उपाख्य मोरुभाऊ मुंजे -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य प्रचारक (मृत्यू: ८ डिसेंबर २००७ )* *१९१०: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (मृत्यू: २० जुलै १९६५ )**१९०१: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९० )**१८९९: विठ्ठल वामन हडप -- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार (मृत्यु: १२ मार्च १९६० )**१८८४: शंकर पुरुषोत्तम आघारकर -- भारतीय रूपशास्त्रज्ञ (मृत्यू: १ सप्टेंबर १९६० )* 🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: मृदुला सिन्हा -- भारतीय लेखिका आणि गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल (जन्म: २७ नोव्हेंबर १९४२ )**२०१६: डॉ. डेंटन कुली -- हृदयरोपन शस्त्रक्रियाचे पाया घालणारे (जन्म: २२ ऑगस्ट १९२० )**२००६: ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७ )**२००१: नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका‘ – गांधीवादी विचारवंत व ’नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक.(जन्म: १९१९ )**१९९९: डॉ. सुमन वैद्य -- इतिहास विषयाचे संशोधक व लेखिका (जन्म: ६ ऑगस्ट १९२४ )**१९९८: रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले – सातार्‍याच्या सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय,धार्मिक,आर्थिक, शैक्षणिक,वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक* *१९९६: कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते (जन्म: १९०७ )* *१९९३: पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद – लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक (जन्म: १९१८)* *१९७१: चांगदेव भवानराव खैरमोडे -- मराठी चरित्रकार, लेखक,अनुवादक आणि कवी (जन्म: १५ जुलै १९०४ )**१९६२: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: ७ आक्टोबर १८८५ )**१७७२: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सार्वत्रिक निवडणूक आणि मतदान*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपाचे नेते अनिल झा आप मध्ये सामील*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवाळी सुट्यानंतर आजपासून द्वितीय सत्रातील शाळांना प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बदलापूरहुन 25 पर्यटकांना घेऊन तोरणा किल्याकडे निघालेली बस 100 फुट खोल दरीत कोसळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरात प्रियंका गांधी यांच्या रोड शो मध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने-सामने*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, 20 नोव्हेंबरला होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पर्थच्या कसोटीत दुखापतीमुळे शुभमन गिल बाहेर तर के एल राहुल ला संधी मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फुप्फुसे* 📙 ****************डावे व उजवे अशी दोन फुप्फुसे छातीच्या पोकळीत असतात. हृदयापूरती जागा सोडून अन्य सारी छातीची पोकळी त्यांनीच व्यापलेली असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी पातळ पिशवीसारखे आवरण असते. त्यालाच 'प्लुरा' असे म्हटले जाते. या आवरणाच्या आत दोन पदरांमध्ये बुळबुळीत पदार्थ असतो. त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही. मात्र या दोन पदरांमध्ये निर्वात पोकळी अस्तित्वात असते. वातावरणातील हवा आपण फुप्फुसांत ओढून घेतो, त्याला त्याची मदत होते.नाकाने आत घेतलेली हवा प्रथम श्वसननलिकेद्वारे व त्यानंतर तिच्या झालेल्या असंख्य शाखांतून फुप्फुसांत पोहोचते. फुप्फुसांचा रंग भुरा करडा असतो. असंख्य वायूकोशांनी फुप्फुस बनते. प्रत्येक वायूकोशाला वेढणारी एक रक्तवाहिनी असते. प्रत्येक वायूकोशापर्यंत श्वासनलिकेची एक अत्यंत सूक्ष्म शाखा पोहोचलेली असते. वायूकोशाभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. त्यातील रक्तातील लाल पेशी प्राणवायू शोषून घेतात. कार्बन डायॉक्साइड किंवा कर्बद्विप्राणिल वायू व पाण्याची वाफ वायुकोशात सोडले जातात व उच्छवासाद्वारे ते बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासातून वाफ बाहेर पडताना जाणवते, त्याचे हेच मूळ होय.वायूकोशांमधील स्थितीस्थापक तंतूंमुळे ते श्वास आत घेताना सहज फुगतात व पूर्वस्थितीला येताना उच्छ्वास बाहेर टाकतात. यामध्ये होणाऱ्या क्रियेलाच आपण प्राणवायू प्रदान असे म्हणतो. श्वास घेतला, तर सुमारे ५०० घन सेंटीमीटर हवा आपण आत ओढतो. त्यातील फक्त ३५० घन सेंटीमीटर हवाच वायूकोशात पोहोचते. अन्य हवा घसा, श्वासनलिका येथेच राहते. श्वास सोडल्यावरसुद्धा ३०० घनसेंटीमीटर हवा फुप्फुसांतच शिल्लक असते. दीर्घ श्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांच्या अभ्यासात या साचून असलेल्या हवेला आपण मुद्दाम बाहेर फेकतो. तसेच फुप्फुसांची स्थितीस्थापक क्षमताही या क्रियेत वाढते. म्हणून श्वसनाच्या आजारात त्यांचा उपयोग होऊ शकतो. निरोगी माणसाची श्वसनाची क्षमता वाढते. पाणबुडे, ऍथलेट, खेळाडू यांनी ही क्षमता कमावलेली असते.फुप्फुसांमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यास रुग्ण गंभीररित्या आजारी होतो. कारण फुप्फुस व फुप्फुसावरण दाहामध्ये शरीराचा प्राणवायू पुरवठा खंडित होऊ लागतो. अशा वेळी कृत्रिमरीत्या प्राणवायू देऊन किंवा तीव्र आजारात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्राचा (व्हेंटिलेटर) वापर करून रुग्णाला मदत करणे आवश्यक ठरते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CID – Crime Investigation Department*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा 'बुकर पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?२) ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांच्या कोणत्या कादंबरीला २०२४ चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे ?३) VVPAT चा फुल फार्म काय आहे ?४) 'यान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) थादाऊ जमात कोणत्या राज्यातील आहे ? *उत्तरे :-* १) सामंथा हार्वे, ब्रिटिश लेखिका २) ऑर्बिटल ( अंतराळातील आयुष्य सांगणारी ) ३) व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल ४) अंतराळवाहन ५) मणिपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 अरविंद काळे, सहशिक्षक, पीपल्स हायस्कुल, नांदेड👤 अभिषेक बोधने👤 अनुराधा टल्लू👤 पिराजी भूमन्ना*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥ आम्हीं तुझी देवा धरियेली कांस । न करी उदास पांडुरंगा ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी कोणी एकाकी खोटे सांगत नाही. कारण त्या विषयी त्याला चांगल्याप्रकारे अनुभव आलेला असतो. म्हणून ते, दुसऱ्यांदा चुकीचे घडू नये यासाठी सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीला कोणाच्या सांगण्यावरून नको त्या शब्दात बोलून त्याचा अवमान करू नये.बरेचदा सत्य न ऐकून घेतल्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जाणीव*बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे." *तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑक्टोबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*विशेष सूचना - दिनांक 27 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या काळात दिवाळी सुट्टी असल्याने फ्रेश मॉर्निंग बुलेटिन पोस्ट होणार नाही, याची विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि वाचकांनी नोंद घ्यावी. दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा*~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/CuPuQUNoEz1BPqWc/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟥 *_ या वर्षातील ३०० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर**१९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.**१९६२: वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.**१९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.**१८७३: गंगाधर शास्त्री दातार यांचा अनुवादित 'दत्तलहरी' ग्रंथ वासुदेव बळवंत फडके यांनी स्वखर्चाने प्रकाशित केला.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟥 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: शुभंकर तावडे -- भारतीय अभिनेता* *१९८०: आतिश सुरेश सोसे -- कवी, लेखक, संपादक विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९७४: रवीना टंडन – अभिनेत्री**१९७४: डॉ. स्नेहल विनय कुलकर्णी -- कवयित्री तथा वैद्यकीय अधिकारी**१९६८: प्रफुल्ल माटेगांवकर -- लेखक, कलाकार**१९६७: हरिश्चंद्र लाडे -- कवी, लेखक विचारवंत* *१९६६: डॉ. रमेश रामजी राठोड -- लेखक* *१९६६: मंजुषा अभिजित आमडेकर -- लेखिका* *१९५५: मनिषा चिंतामणी आवेकर -- लेखिका, कवयित्री* *१९५४: शब्बीर कुमार -- भारतीय पार्श्वगायक**१९५४: लक्ष्मीकांत बेर्डे -- मराठी व हिंदी चित्रपट प्रसिद्ध विनोदी अभिनेता (मृत्यू: १६ डिसेंबर २००४ )**१९४९: पंडित सुहास व्यास -- शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान* *१९४६: शोभा बोंद्रे --- लेखिका**१९४४: प्रा. विद्या गंगाधर सप्रे-चौधरी -- लेखिका**१९३७: हृदयनाथ मंगेशकर – प्रसिद्ध संगीतकार व गायक**१९३६: आशा शर्मा -- प्रसिद्ध दूरदर्शन अभिनेत्री (मृत्यू: २५ ऑगस्ट २०२४)**१९३०: दत्तात्रेय भास्कर धामणस्कर -- प्रसिद्ध मराठी कवी**१९२५: शंकर भाऊ साठे -- कादंबरीकार आणि शाहीर (मृत्यू: १५ मार्च १९९६ )* *१९२४: शोभना रानडे -- प्रसिद्ध भारतीय समाजसेविका आणि गांधीवादी( मृत्यू: ४ ऑगस्ट २०२४)**१९१९: मोहम्मद रझा पेहलवी - शाह ऑफ इराण (मृत्यू: २७ जुलै १९८० )**१९००: कौतिक नारखेडे -- कवी, कथाकार (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८० )**१९००: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू: ७ मार्च १९९३ )**१८९१: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६४)**१८८८: हरी कृष्ण मोहनी -- लेखक, राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९६१ )**१८३८: केशव सदाशिव रिसवूड -- लेखक (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९०० )*🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर --- महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार (जन्म: ५ फेब्रुवारी १९३६)**१९९१: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक,लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक,हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९ )**१९८१: दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे --- कर्नाटकामधील प्रसिद्ध साहित्यिक (जन्म: ३१ जानेवारी १८९६ )**१९७९: चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ (जन्म: २२ ऑगस्ट १८९५ )* *१९३०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: १५ मार्च १८६० )**१९०९: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ आक्टोबर १८४१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी भाषेचा विकास सर्वांच्या हाती*नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. नुसता अभिजात भाषेचा दर्जा मिळून काही फायदा होणार आहे का ? आपल्या मराठी भाषेचा विकास आपल्याच हातात आहे. ते कसे वाचा या लेखात..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंगोलीत दोन वाहनांतून 1.40 कोटी रुपये जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिवाळीआधीच PM मोदींनी भारतीयांना दिली भेट; पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत मिळणार आता 20 लाखापर्यंतचे कर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे 3 रुग्णांना जीवदान, जिंतूर येथील सार्थक नवले याच्या कुटुंबियांचा प्रेरणादायी निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींचा झटका, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला, निफ्टीमध्येही घसरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, नागपूर दक्षिण पश्चिममधून दाखल केला उमेदवारी अर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर, 90-90-90 जागा तीन पक्ष लढवणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी दिली मोठी अपडेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंडने भारताला अवघ्या 156 धावांत गुंडाळले, मिचेल सँटनरच्या 7 विकेट्स, न्यूझीलंडची दुसऱ्या डावात 5 बाद 198 मजल, 301 धावांची भक्कम आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणसाचा मेंदु* *प्रश्न*तुम्ही माणसाचा मेंदु हे कारण म्हणुन वारंवार पुढे करत आहात, पण तो मेंदु तरी देवाने माणसाला दिला ना? तुम्ही म्हणता मेंदुची उत्क्रांती झाली. परंतु ती उत्क्रांती तरी देवाच्या इशा-याने घडुन आली ना? इतर कुणा प्राण्यांचा मेंदु उत्क्रांत न होता फक्त मानवाचा मेंदु उत्क्रांत झाला. असे का बरे झाले? ती तरी देवाजीचीच इच्छा ना? *उत्तर*कोणत्याही प्राण्याच्या शरीररचनेत एका अवयवात उत्क्रांतीने बदल झाला तर परस्परसंबंधित इतर अवयवांतही बदल होउ लागतात. माणसाच्या बातीत अशी सर्वात महत्वाची घटना म्हणजे त्याच्या हातापायांतील बदलामुळे त्याच्या मेंदुच्या विकासाला मिळालेली चालना. हातापायांमुळे माणसाचा आहार विविध झाल्यावर आणि हाताने खाद्याचे तुकडे करता येउ लागल्यावर माणसाला वानरासारख्या मोठया जबडयाची व साक्षसी दातांची गरज उरली नाही. म्हणुन जबडा व दात लहान होउ लागले आणि त्यामुळे डोक्यात मेंदुला जास्त जागा मिळाली. शिवाय हातपाययुक्त नव्या जीवनपध्दतीत मेंदुत अनुभव साठवुन ते वापरण्याचे मेंदुचे कामही वाढले. अशा प्रकारे एकीकडे डोक्यात मेंदु वाढायला जागा झाली व दुसरीकडे मेंदुच्या वाढीची गरजही निर्माण झाली. असे हे सर्व घडुन आले.भुस्तर अवशेषांवरून मेंदुच्या आकारांची साधारण तुलना अशी होते: पुच्छहीन वानरांचे मेंदु साडेचारशे ते सहाशे घन सेंटिमीटर असतात. त्यांच्यानंतरच्या आॅस्ट्रेलोपिथेकस हया मर्कट मानवाचा मेंदु साधारण तेवढाच, पण साडेसहाशे घन सेंटिमीटरपर्यंत होता. त्यापुढील होमो हाॅबिलिस म्हणजे हातमानवाचा मेंदु साडेसहाशे ते आठशे घन सेंटिमीटर इतका होता. पुढील टप्प्यावरील होमो इरेक्टसचा मेंदु आठशे ते बाराशे घनसेंटिमिटरपर्यंत होता. उदा. हया वर्गातील जावा मानवाचा साडेआठशे ते साडेनउशे घन सेंटिमिटर तर पेकिंग मानवाचा नउशे ते बाराशे घन सेंटिमिटर होता. पेकिंगचा हा आदिमानव मांस भाजुन खात असे. ते भाजुन पचायला हलके झाल्याने जबडा व दात यांचा आकार कमी व मेंदुचा आकार मोठा होण्यास मदत झाली असावी. त्यापुढील टप्पा होमो सॅपियन व त्यांच्यानंतरचा आधुनिक मानव यांचे मेंदु साधारण सारखेच म्हणजे तेराशे ते पंधराशे घन सेंटिमिटरपर्यंत आहेत. उदा. दीड लाख वर्षापुर्वीचा निअॅंडरथाॅल या होमो सॅपियनचा मेंदु तेराशे पन्नास घन सेंटिमिटर म्हणजे आधुनिक माणसाच्या टप्प्यात आलेला होता. साधारणपणे, पुच्छहीन वानराचा आधुनिक मानव बनेपर्यंत त्याचा मेंदु तिपटीने वाढला असे म्हणता येईल.उत्क्रांतीत मेंदुचा केवळ आकार नव्हे तर त्याची घडण आणि अंतःरचना यातही प्रगतीपर बदल होत गेलेले आहेत. आधुनिक मानवाचा मेंदु पुच्छहीन वानराच्या मेंदुपेक्षा तिप्पट मोठा असतो, पण त्यातील न्युट्राॅन्स चौदापट असतात. शिवाय, त्यात नवे भागही विकसित झालेले असतात. अशा प्रकारे मानवाचा अजब मेंदु त्याच्याबरोबर विकसित झालेला आहे. (किंबहुना, मेंदु विकसित झाला म्हणुन माणुस बनला). सारांश मानवाचा मेंदु ही कुणा देवाची देणगी नव्हे. *लेखक - शरद बेडेकर**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*OTT - Over The Top*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बिश्नोई समाज कोणत्या प्राण्याला पवित्र मानतात ?२) केंद्र सरकार किती वाणाचेच हमीभाव जाहीर करते ?३) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक रचना कशाप्रकारे करण्यात आली आहे ?४) 'मयूर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) PKL चा फुल फार्म काय आहे ? *उत्तरे :-* १) काळवीट २) २३ वाण ३) ५+३+३+४ ४) मोर ५) Pro Kabaddi League*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 माधव गव्हाणे, क्रियाशील शिक्षक👤 अविनाश थोरात👤 नवनाथ शिंदे👤 सौ. संगीता नामेवार-कंदेवार👤 गणेश पालदेवाड, येताळा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥ भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥ घेसी सोडुनियां पोहे मुठीभरा । हिडसावल्या करा नामा म्हणे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण,तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात.जी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात.त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *कष्टाची कमाई श्रेष्ठ*📗 *एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्‍येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्‍से करून वाटत असत. एक हिस्‍सा स्‍वत:साठी व दुसरा हिस्‍सा ईश्‍वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्‍यांना चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्‍या ओट्यावर बसले. तेथे त्‍यांना एक संत भेटले. संताने त्‍यांना परिचय विचारला तर त्‍यांनी स्‍वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्‍हणाला, तुम्‍ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्‍ही विचार केला आहे? चोर म्‍हणाले,'' आम्‍ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्‍ही जे धन किंवा वस्‍तू प्राप्‍त करतो ते आम्‍ही दोन भागांमध्‍ये वाटतो. एक भाग आम्‍ही स्‍वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. तेव्‍हा त्‍या संताने आपल्‍या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्‍यांना देत म्‍हणाला,'' आज तुम्‍ही चोरी करू श्‍कला नाहीत त्‍यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्‍से करा एक स्‍वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्‍वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले संतांच्‍या बोलण्‍याचा आशय समजून म्‍हणाले,''महाराज इथून पुढे आम्‍ही चोरी न करता कष्‍टाची कमाई करून खाऊ आणि त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्‍कार करून निघून गेले.**तात्‍पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 ऑक्टोबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/4QCLKQUzvZWkSn4Y/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_ या वर्षातील २९९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.**१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.**१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.*💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: प्रणिता सुभाष-- भारतीय अभिनेत्री**१९८८: कृतिका कामरा -- भारतीय अभिनेत्री**१९८७: उमेश यादव -- भारतीय क्रिकेटपटू**१९६०: माधव गरड -- ज्येष्ठ कवी, ललित लेखक (मृत्यू: १२ ऑगस्ट २०२२ )**१९५७: ध्रुबा घोष -- भारतीय शास्त्रीय संगीतकार और सारंगी वादक (मृत्यू: १० जुलै २०१७ )**१९५६: सोनी राजदान (भट ) -- अभिनेत्री* *१९५६: किरण विठ्ठलराव बडवे -- लेखक, कवी**१९५६: सलमा आगा -- गायिका आणि अभिनेत्री* *१९५४: अजित वसंत राऊळ -- कवी**१९५४: अरुण म्हात्रे -- मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, गीतकार आणि निवेदक**१९५०: अरुण हरिभाऊ पुराणिक -- ज्येष्ठ सिने पत्रकार**१९४९: योगानंद बालारामजी टेंभुर्णे -- कवी, नाटककार, पत्रकार**१९४८: अनंत नरहर जोशी -- लेखक* *१९४५: अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका**१९४२: सूर्यकांत गरुड -- कवी* *१९४०: मोहन विष्णुपंत जोशी -- लेखक**१९३८: आदिनाथ कल्लापा कुरुंदवाडे-- ग्रामीण कथाकार* *१९३८: मृदुला गर्ग-- हिंदी लेखिका* *१९२६: डॉ. केशव रंगनाथ शिरवाडकर -- साहित्यसमीक्षक, मराठीत वैचारिक लेखन करणारे लेखक (मृत्यू: २५ मार्च २०१८ )* *१९२२: पांडुरंग नारायण कुळकर्णी -- प्राचीन मराठी वाड्:मयाचे संशोधक (मृत्यू: ३० जून २००३ )**१८८१: पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू: ८ एप्रिल १९७३ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: प्रा. डॉ.रुस्तुम अचलखांब -- मराठी लेखक व नाटककार (जन्म: १९४४ )* *२०१२: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म: ३ मार्च १९५५ )**२००९: कान्होपात्रा किणीकर -- विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री (जन्म: २ ऑक्टोबर१९३४ )**२००९: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म: १४ जानेवारी १९२३ )**२००३: कर्नल हेमू रामचंद्र अधिकारी -- भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ३१ जुलै १९१९ )**२००३: पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.(जन्म: १९ऑक्टोबर १९२० )**१९९९: सदाशिव अंबादास डांगे -- संशोधक, कोशकार, लेखक (जन्म: २३ ऑगस्ट १९२२ )**१९८०: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – प्रसिद्ध शायर व गीतकार (जन्म: ८ मार्च १९२१ )**१९५५: पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, (जन्म: २८ मे १९२१ )**१६४७: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म: १५ आक्टोबर १६०८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई म्हणजे काय असते ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *न्यायमूर्ती संजीव खन्ना असतील देशाचे 51 वे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात काँग्रेसने पप्पू उर्फ तिरुपती कदम कोंडेकर यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी पहिली यादी केली जाहीर, नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवडीमध्ये अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी, मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गुरू पुष्यामृत च्या शुभ संध्येवर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करत विविध पक्षांच्या उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज भरले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुणे - दुसरा कसोटी सामना - वॉशिंग्टन सुंदरने सात विकेट घेत मोठा विक्रम केला नावावर, न्यूझीलंडला 259 धावावर रोखलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *चव कशी समजते?* 📙 एखादा पदार्थ जिभेवर ठेवला रे ठेवला की तात्काळ त्याची चव आपल्याला समजते. पण आपण ज्याला चव म्हणतो त्या चवीची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचवणाऱ्या स्वादांकुरात उष्णता, स्पर्श व वासाचे ज्ञान या सर्वांचा समावेश होतो. क्लोरोफॉर्मचा गोडसर वास हा प्रामुख्याने स्वादांकुर उत्तेजित झाल्यामुळेच येतो. सर्दी झाल्यावर अन्न बेचव लागते. वासाचे ज्ञान होत नसल्यामुळेच नाक दाबल्यास उकडलेला कांदा व सफरचंद यांची चव जवळपास सारखीच लागते. चवीमध्ये आपल्याला जाणवणारे सूक्ष्म फरक हे बर्‍याचदा या गोष्टींच्या वेगळ्या अशा वासामुळे असतात. अशी ही चव आपल्याला मुख्यत: जीभेवरील स्वादांकुरामुळे कळते. माणसाच्या जिभेवर सुमारे १०,००० स्वादांकुर असतात. गोड, आंबट, खारट व कडू या चार मुळ चवी आहेत. जीभेच्या टोकाला गोड व पाठीमागे कडू तर दोन्ही कडांना आंबट चव जास्त प्रमाणात जाणवते. खारट चव सर्व ठिकाणी समप्रमाणात, पण जिभेच्या टोकाला सर्वाधिक जाणवते. चव कळण्यासाठी पदार्थ लाळेत विरघळावा लागतो. विरघळलेले रेणू स्वादांकुरात शिरल्यावरच चव समजते. काच, स्टेनलेस स्टील, चांदी, सोने यांची चव ते विरघळत नसल्याने आपणास कळत नाही ते त्यामुळेच ! तसेच 'तिखट' ही चव नाही ! तर तिखट वस्तूंमधील आम्लामुळे होणारा तो एक 'दाह' म्हणता येईल. चवीच्या संदेशाचे वहन स्वादांकुरातून चेतातंतूमार्फत मेंदूतील चवीच्या केंद्रांपर्यंत होते तेव्हा चव समजते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*IFSC - Indian Financial System Code*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखाला वैराग्याचे विरजण घालणारे आणि दुःखरोगाला बरे करणारे औषध ग्रंथवाचन होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?२) सर्वोच्च न्यायालयाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमानुसार झाली ?३) सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा कोणती ?४) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?५) भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे ? *उत्तरे :-* १) २६ जानेवारी १९५० २) कलम १२४ ३) इंग्रजी ४) नवी दिल्ली ५) न्यायमूर्ती संजीव खन्ना*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीनिवास नक्का, लातूर👤 गोविंद येळगे, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 विजय वाठोरे सरसमकर👤 प्रथमेश मच्छरलावार👤 मारोती गुरलोड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हां सांपड्लें वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥ अवतार हा भेटला । बोलूं चालूं हा विसरला ॥२॥ अरे हा भावाचाअ लंपट । सांडुनि आलासे बैकुंठ ॥३॥ संतसंगतीं साधावा । धरूनि ह्रदयीं बांधावा ॥४॥ नामा म्हणे केउता जाय । आमुचा गळा त्याचे पाय ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भलेही शुन्याची किंमत जास्त नसेल पण, एक जरी शुन्य त्यात नसल्यावर मात्र आकडेवारी पूर्ण होत नाही. तसेच एखादी व्यक्ती परिस्थितीने मागे असेल म्हणून त्याच्याकडील सर्वच काही संपलेच असेल असेही नाही. कारण त्या व्यक्तीकडे काहीच नसेल तरी ती, व्यक्ती परिस्थितीमुळे अधीक मजबूत बनलेली असते म्हणून एखाद्याची परिस्थिती बघून त्याला हिनवू नये.कारण जी व्यक्ती परिस्थितीतून घडली असते ती व्यक्ती धनसंपतीपेक्षा अनुभवाने सर्वात मोठी असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *राजा जनक आणि ऋषि अष्‍टावक्र*📗                    राजा जनक राजा असूनही त्‍यांना राज वैभवात आसक्ती नव्‍हती. लोभ मोहापासून ते  सदैव दूर राहत. विनम्रता त्‍यांच्‍या स्‍वभावात होती. त्‍यामुळे ते आपले दोष दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत असत. आत्‍मशोध घेण्‍याचा त्‍यांचा सदैव प्रयत्‍न सुरुच असे. एकदा ते नदी काठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्‍यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्‍टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्‍याने त्‍यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्याआवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्‍या कानात ऋषींच्‍या बोलण्‍याचा आवाज गेला पण त्‍याने आपला जप सुरुच ठेवला. अष्‍टावक्रही ही गोष्‍ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्‍ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्‍टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्‍हणाले,’’माझ्या हातात पाण्‍याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्‍चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्‍याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्‍ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्‍हा अष्‍टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंचआवाजात म्‍हणणे आहे. मंत्राला घोकण्‍याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्‍मसात करणे किंवात्‍याला आतल्‍या चेतनेशी जोडल्‍यावरच त्‍याचे फळ मिळते.’’*तात्‍पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्‍यापेक्षा ते आत्‍मसात करण्‍याचा प्रयत्‍न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑक्टोबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/WoXWLyhTF9v2LYR8/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_ या वर्षातील २९८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान**१९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.**१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.**१९४३: आझाद हिंद सरकारने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले**१८९०: हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.**१७०१: इंग्लंडच्या पार्लमेंटचे सर्वात पहिले अधिवेशन*🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: आशिष आत्माराम वरघणे -- लेखक* *१९८९: जोनिता गांधी -- भारतीय वंशाची कॅनेडियन गायिका**१९८३: जोगिंदर शर्मा -- माजी क्रिकेटपटू**१९८१: सिद्धार्थ रामचंद्र जाधव- प्रसिद्ध मराठी चित्रपटांतील अभिनेता* *१९७९: उप्पलापती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू -- भारतीय अभिनेता**१९७६: अभयकुमार कुलकर्णी-- लेखक**१९७३: मलायका अरोरा -- भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, मॉडेल**१९७२: एकनाथ नरहरी आव्हाड -- प्रसिद्ध बालसाहित्यिक**१९७१: पद्माकर मधुकर जोंधळे --- कवी**१९७०: शिखा स्वरूप -- भारतीय अभिनेत्री**१९६९: देवेंद्र धोंडीराम उबाळे -- कवी, लेखक**१९६७: प्रा. डॉ. उल्हास सुधाकर मोगलेवार -- लेखक, संपादक**१९६३: गणेश विसपुते -- कवी, लेखक* *१९६२: अपर्णा कल्लावार -- कवयित्री, लेखिका**१९६०: नीरजा -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९५५: विलास माणिकराव रणभुसे -- लेखक, संपादक* *१९५४: मगणलाल माणकचंद बागमार -- लेखक**१९४५: शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू: १३ मार्च १९९६ )**१९४०: डॉ. श्रीकांत व्यंकटेश मुंदरगी -- लेखक* *१९४०: एड्सन अरांतेस दो नासिमेंतो तथा पेले -- ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू( मृत्यू:२९ डिसेंबर २०२२)**१९३९: रमेश भिकाजी तांबे -- लेखक (मृत्यू: १० जून १९९७ )**१९३७: देवेन वर्मा -- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता(मृत्यू: २ डिसेंबर २०१४ )**१९२९: मनोहर महादेव देशपांडे -- वैदर्भीय कवी (मृत्यू: २५ डिसेंबर २००५ )**१९२९: डॉ. नरेंद्रनाथ बळीरामजी पाटील-- लेखक**१९२४: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार,गायक व नट (मृत्यू: ४ आक्टोबर १९८९ )**१९२३: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००० )**१९२३: भैरोसिंग शेखावत -- भारताचे अकरावे उपराष्ट्रपती( मृत्यू: १५ मे २०१०)**१८९८: राधाबाई पांडुरंग आपटे -- लेखिका**१८७९: शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:मंगला अच्युत बर्वे -- मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका ( जन्म: १९२७)* *२०१२: सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४ )**२००१: आत्माराम पांडुरंग नारायणगावकर -- गायक व लेखक (जन्म: ३० ऑगस्ट १९१७ )**१९२१: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)**१९१५: डब्ल्यू.जी.ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८ )**१९१०: चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नासा येवतीकर लिखित " ललाटरेषा " या पुस्तकाचे पुण्यातील जेष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी करून दिलेला परिचय ..... वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंगोलीत विधानसभा निवडणुकीची तयारी:पहिल्याच दिवशी 153 उमेदवारी अर्जांची विक्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्वीप कार्यक्रम अंतर्गत राज्यभरात मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डबल महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेच्या पुण्यातील घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *युएईला हरवून भारत आशिया चषकाच्या सेमी फायनलमध्ये दाखल, अभिषेक शर्माचे २० चेंडूंत तुफानी अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*LOC - Line of Control*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर , प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवला पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोबीचे वाळवंट हे कोणत्या देशात आढळतात ?२) रक्ताचे चार गट कोणी शोधून काढले ?३) CAT चा फुल फार्म काय आहे ?४) 'मलूल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) सुनील दत्त यांचे खरे नाव काय होते ? *उत्तरे :-* १) चीन २) डॉ. कार्ल लँडस्टायनर ( इ. स. १९०० ) ३) Common Admission Test ४) निस्तेज ५) बलराज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 एकनाथ आव्हाड, कवी व साहित्यिक, मुंबई👤 प्रविण राखेवार, नांदेड👤 साई पा. नरवाडे, बाभळीकर👤 अभिषेक नागुल, नांदेड👤 ईश्वर डहाळे, नांदेड👤 व्यंकटेश येमेवार, धर्माबाद👤 स्वरदा खेडेकर गावडे👤 पंकज बदाने, शिक्षक, नंदुरबार👤 नरेंद्र रेड्डी चाकरोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया । ऐसें हें कासया पाहसी देवा ॥१॥ जाणतां नेणतां नाम तुझें देवा । गाईन केशवा आवडीनें ॥२॥ विषयीं आसक्त भ्रांत माझें मन । कैसें तुझें भजन घडेल मज ॥३॥ नामा म्हणे आतां जाणसी तें करीं । पतितपावन हरि नाम तुझें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जोपर्यंत भाजीला परतवून घेतले जात नाही तोपर्यंत भाजी चांगल्याप्रकारे शिजत नाही. तसेच आपल्या चालू असलेल्या कामात अडथळे किंवा अडचण निर्माण होणार नाही तोपर्यंत आपले काम सुद्धा आपल्याला फारसं कळणार नाही. म्हणून जेवढे अडथळे, अडचणी येतील तेवढे बिनधास्तपणे येऊ द्या. अडचणीतूनच माणूस शिकत असतो. त्यांचे डावलण्याचे काम आहे. कारण त्यांच्यामुळेच आपली जगावेगळी ओळख होत असते. फुलांवर चाललेल्यांना काट्यांची जखम कशी असते ? ती माहीत नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❒ ❒ कृतघ्नता ❒ ❒*       *_एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे._*       *_अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला._*       *_रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले._*        *_हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्या पडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला...,_*     *_‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’_**तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑक्टोबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/TNkhMx7DoyJkG68F/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन_* ☣️ •••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील २९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️•••••••••••••••••••••••••••••••••*२००८: भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.**१९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी.दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर**१९६४: फ्रेन्च लेखक,कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.**१९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.**१९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.**१७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.*☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: परिणीती चोप्रा -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९७४: डॉ. मोनाली पोफरे -- कवयित्री, लेखिका* *१९६७: किटू गिडवानी -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल* *१९६५: सतीश तारे --- विनोदी अभिनेते व रंगकर्मी ( मृत्यू: ३ जुलै २०१३ )**१९६४: विजयराज बोधनकर -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६४: अमित शाह -- केंद्रिय गृहमंत्री**१९६३: पंडित कैवल्य कुमार गुरव-- भारतीय शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे (गायन शैली) तिसऱ्या पिढीतील गायक**१९६३: भीमराव ईश्वरा धुळुबुळू -- कवी, लेखक* *१९६२: सुभाष उसेवार विश्वकर्मा -- कवी, लेखक**१९५९: सूर्यकांत मारुती जुगदर -- लेखक**१९५८: उर्मिला सुधीर सावंत --- लेखिका**१९५७: डॉ. अमृत राघवेंद्र यार्दी-- प्रसिद्ध लेखक, अनुवादक* *१९५२: किशोर त्र्यंबक पाठक -- प्रसिद्ध कवी (मृत्यू: २१ मार्च२०२० )**१९४७: दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक**१९४६: शारदा अशोक शिंत्रे -- लेखिका**१९४५: अशोक वासुदेव परांजपे -- लेखक**१९४२: हिमांशू वामन कुलकर्णी -- कवी**१९४२: रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ )**१९४०: वंदना विनायक पोंक्षे -- लेखिका* *१९३७: कादर खान -- भारतीय अभिनेता, पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माता (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१८ )**१९३५: डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डी. वाय. पाटील) -- बिहार राज्याचे माजी राज्यपाल, प्रसिद्ध शिक्षणसंस्थानिक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९३२: सरयू विनोद दोशी -- भारतीय कला अभ्यासक, कला इतिहासकार, शैक्षणिक आणि क्युरेटर**१९२२: गोविंद सी.शनवारे -- लेखक* *१९२०: विजया अनंत नरवणे -- लेखिका* *१९२०: ब्रिज मोहन व्यास -- भारतीय अभिनेता (मृत्यू: ११ मार्च २०१३ )**१९०२: दीना नाथ मधोक -- १९४० ते १९६० च्या दशकातील बॉलीवूडमधील प्रमुख गीतकार (मृत्यू: ९ जुलै १९८२ )**१८७९: वामन दामोदर गाडगीळ -- कादंबरीकार, कथाकार (मृत्यू: ९ डिसेंबर १९७३ )**१८७३: तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत (मृत्यू: १७ आक्टोबर १९०६ )*☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: राम मुखर्जी -- बंगाली-हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक(जन्म: १८ ऑक्टोबर१९३३ )**२०००: अशोक मोतीलाल फिरोदिया – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह,सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती**१९९१: ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक* *१९७८: नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते (जन्म: ४ ऑगस्ट १८९४ )**१९३३: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जाहिरात : एक चिंतन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परतीचा पावसाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चक्रीवादळ 120 किमी प्रतितास वेगाने धडकणार, ओरिसा-बंगालमध्ये मुसळधार पावसाचाही इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ऊसतोड कामगार संघटनेचं महायुतीला थेट आव्हान, बीडसह राज्यातील 5 जागा लढविणार, संघटनेच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोन्याला पुन्हा झळाळी! 450 रुपयांनी महागलं, सणासुदीच्या काळात थेट 80 हजारांचा आकडा पार करणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सीरम इंस्टिट्युटचे CEO अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये गुंतवणूक, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स विकत घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीतील शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी; महाविकास आघाडीच्या उमेदवार यादीसाठी आजचा मुहूर्त ठरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *निवडणुकीच्या काळात विध्वंस घडवण्याचा कट; पोलिसांच्या चकमकीत गडचिरोलीत 5 माओवादी ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अष्टपैलू खेळाडू  वॉशिंग्टन सुंदर रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची शक्यता; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात मोठा बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ?* 📒साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*OTP - One Time Password*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख हे मानवतेच्या सौजन्यशील स्पर्शात आहे. अहंकारातून उद्भवलेल्या हर्षात नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती कोण ठरल्या ?३) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?४) 'मकरंद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ज्युडो हा कुस्तीसारखा खेळला जाणारा खेळ कोणत्या देशातील आहे ? *उत्तरे :-* १) विजया रहाटकर २) विजया रहाटकर ३) डॉ. सदानंद मोरे ४) मध ५) जपान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कविराज अमोल शिंदे👤 रमेश संदकर👤 पांडुरंग कुलकर्णी👤 बाबुराव कुंभरगावे👤 राम गुडे👤 मिलिंद इंगळे, वाशीम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥ आम्हीं तुझी देवा धरियेली कांस । न करी उदास पांडुरंगा ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजातील सर्वच माणसं वाईट असतात असेही नाही .त्यातील काही माणसं सुद्धा चांगले असतात. जी माणसं माणुसकीच्या नात्याने कोणतीही अपेक्षा न बाळगता गरजू व्यक्तींना ओळखून त्यांच्या कार्याची दखल घेतात व त्यांना मदत करतात.अशा व्यक्तींमुळे गरजूंना जगण्याला पुन्हा एकदा बळ मिळत असतो.अशा माणसांचा सदैव आदर करावा तसेच त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *मातेचा उपदेश*📗          *एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.**तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्‌गुणांची जोड द्यावी लागते.*सौजन्य - http://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑक्टोबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/8jbiBQMXDeEGkZbR/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_पोलीस हुतात्मा स्मृती दिन_* 🟨••••••••••••••••••••••••••••••••🟨 *_ या वर्षातील २९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर**१९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.**१९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.**१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.**१९५१: डॉ.शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.**१९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.**१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना**१९३४: जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.**१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.* 🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟨 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५: भावना बलसावर -- भारतीय चित्रपट, रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९७४: शुभांगी सुनील सरोदे -- कवयित्री* *१९७४: राजेंद्र प्रल्हाद दिघे -- कवी, लेखक**१९७०:कमल सदाना -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि निर्देशक* *१९६८: प्रतिभा जगदाळे -- कवयित्री, लेखिका**१९६०: डॉ.रत्नाकर देवरावजी भेलकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५५: बाबू फिलिप डिसोझा ( कुमठेकर) -- प्रसिद्ध कवी* *१९५३: प्रा. डॉ. दाणा सदाशिव गजघाटे -- लेखिका**१९५२: डॉ. विश्वेश्वर भालचंद्र सावदेकर -- ज्येष्ठ लेखक,संपादक* *१९४९: बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान**१९४६: मच्छिंद्रनाथ तुकाराम वाटेकर -- कवी, कादंबरीकार, कथाकार* *१९४४: मुझफ्फर अली -- भारतीय चित्रपट निर्माता, फॅशन डिझायनर, कवी व कलाकार**१९४४: कुलभूषण खरबंदा -- हिंदी आणि पंजाबी चित्रपटांतून भूमिका करणारे अभिनेते**१९४१: उषा धर्माधिकारी-- लेखिका**१९४०: एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू**१९३९:माधव वझे -- आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट**१९३१: शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११ )**१९२३: श्री वामनराव पै -- महान समाजसुधारक, तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक (मृत्यू: २९मे २०१२ )**१९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले.(मृत्यू: २३ एप्रिल २००१ )**१९१७: राम फाटक – गायक व संगीतकार, लेखक (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२ )**१८३३: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू: १० डिसेंबर १८९६ )* 🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म: २७ सप्टेंबर १९३२ )**१९९८: हामिद अली खान(अजित ) -- रंगभूमीवरील व चित्रपटातील "अजीत" या नावाने ओळखले जाणारे एक हिंदी अभिनेता (जन्म: २७ जानेवारी १९२२ )**१९९५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म: ९ एप्रिल १९२५ )**१९८२: नरेंद्र बेदी -- बॉलीवूड दिग्दर्शक आणि लेखक(जन्म: १९३७ )**१९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म: ३१ जानेवारी १८९६ )**१९३९: दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी -- मराठी कवी (जन्म: १६ सप्टेंबर,१८८७ )**१८३५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म: २४ मार्च १७७५ )**१४२२: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाणी जीवन आहे*कोणतेही काम म्हटले की पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पाण्याशिवाय कोणताही सजीव जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. एवढं पाणी महत्वाचे आहे. तरी देखील बहुतांश ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसून येते ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्जाची होणार स्वीकृती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे चिन्ह मशालमध्ये बदल, निवडणूक आयोगाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद - लोकसहभागातून शाळांमध्ये बसवले 200 सीसीटीव्ही, शाळांतील लाखो विद्यार्थी झाले सुरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपूर - प्रसिद्ध व्हायोलिन वादक म्हैसुर मंजुनाथ राष्ट्रीय अध्यक्षपदी, संस्कार भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यादरम्यान सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 8 गडी राखून विजय, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी; न्यूझीलंडने 1988 नंतर प्रथमच भारतात मिळवला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *घड्याळाचे काटे डावीकडून उजवीकडेच का फिरतात ? ⏰*अलीकडे आलेली केवळ आकड्यांनी वेळ दाखवणारी डिजिटल घड्याळं सोडली तर इतर घड्याळांमध्ये तास काटा, मिनिट काटा असे दोन काटे असतातच. काहींमध्ये तर तिसरा सेकंद काटाही असतो. हे सगळे काटे डावीकडून उजवीकडे फिरत असतात. आता ते सतत गोलाकारच फिरत असल्यामुळे या प्रकारच्या प्रदक्षिणेला घटीवत आणि त्याच्या उलट उजवीकडून डावीकडे फिरण्याला अवघटीवत असं म्हटलं जातं.म्हणा काहीही, पण प्रश्न उरतोच. हे काटे डावीकडून उजवीकडेच का फिरतात ते उलट्या दिशेनं फिरले तर वेळ दाखवू शकणार नाहीत, असं थोडंच आहे. तासांचे व मिनिटांचे आकडे तबकडीवर उलट्या दिशेनं दाखवले म्हणजे काम झालं पण तसं होताना दिसत नाही. मग याचं कारण काय असेल खरं तर ती एक प्रथा आहे. काळ मोजायला सुरुवात केली गेली तेव्हा असणाऱ्या व्यवस्थेची ती एक राहिलेलीखूण आहे.आपण दिवसाची सुरुवात सूर्योदयाबरोबर झाली असं मानतो. त्यानंतर किती काळ उलटून गेला आहे, हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा वाळूचं घड्याळ तयार करण्यात आलं पण त्याच्या मदतीनं संपूर्ण दिवसाचं कालमापन करायचं तर अगडबंब घड्याळ तयार करावं लागलं असतं. तेव्हा मग गावाच्या मध्यभागी एक उंचच उंच खांब उभा करून त्याची सावली मोजण्याची कल्पना लढवली गेली. हे खांब वरवर जाताना निमुळते होत गेलेले असत. इजिप्तमध्ये पहिल्यांदा त्यांचा वापर करण्यात आला. त्यांना ओबेलिस्क असं म्हणत. आपण त्याला ‘कालमनोरा' म्हणू शकू.सूर्योदयाच्या वेळी त्याची सावली लांबलचक पसरलेली असे पण जसजसा सूर्य वर येऊ लागे तसतशी त्या सावलीची लांबी कमी कमी होत माध्यान्हीच्या वेळी तर ती त्या खांबाच्या पायथ्याशीच घुटमळत राही. सूर्य कलू लागला, की परत त्या सावलीची लांबी वाढत वाढत सूर्यास्ताच्या वेळी ती लांबलचक होई. सावलीच्या लांबीवरून मग किती काळ उलटला आहे, हे मोजता येई.या ओबेलिस्कच्या कल्पनेचाच वापर करून मग छोट्या तबकड्यांची, सहज आपल्याबरोबर नेता येतील अशा धातूच्या तबकड्यांची घड्याळं तयार करण्यात आली. त्यात गोलाकार तबकडीच्या मध्ये एक त्रिकोणी पट्टी बसवलेली असे. तिच्या सावलीच्या लांबीवरून वेळ मोजण्यात येई. हिला ‘सूर्यतबकडी असं म्हणत. सूर्य पूर्वेला उगवत असल्यानं खांबाची सावली पहिल्यांदा पश्चिमेच्या बाजूला पडे. मग दिवसभरात तिचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे असा होत असे. आता नकाशात आपण पश्चिम दिशा डावीकडे दाखवतो. म्हणजेच त्या सावलीचा प्रवास हा डावीकडून उजवीकडे असा होत असे. दिवसातली वेळ टळण्याचा आणि सावलीचा प्रवास डावीकडून उजवीकडे होण्याचा संबंध डोक्यात इतका पक्का भिनला होता, की मग काट्यांची घड्याळं तयार केली गेली तेव्हा त्या काट्यांचा प्रवासही असाच डावीकडून उजवीकडे होईल, अशी व्यवस्था केली गेली. कालगणनेच्या इतिहासाची ती अशी एक पाठी राहिलेली निशाणीच आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*LED - Light Emitting Diode*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिस्त, कार्यक्षमता आणि तत्परता या तीन गोष्टी वाढल्यानंतरच कर्तबगारी वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) शांघाय सहकार्य परिषदेची स्थापना केव्हा झाली ?४) 'मनसुबा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ? *उत्तरे :-* १) पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ २) उमर अब्दुल्ला ३) १५ जून २००१ ( शांघाय, चीन ) ४) बेत, विचार ५) नायब सिंह सैनी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बाबू फिलिप डिसूझा, साहित्यिक, निगडी, पुणे👤 विष्णुदास शिंदे👤 कोमल सिंग👤 नरेश बलकेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आतां माझी चिंता तुज नारायणा । रुक्मिणीरमणा वासुदेवा ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांव त्वां घेतली गजेंद्रासी ॥२॥ उपमन्या आळी तुवां पुरविली । अढळपदीं दिल्ही वस्ति धरुवा ॥३॥ नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडूरंगा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्ती सोबत चांगले बोलून सुद्धा तसेच त्याचे कितीही चांगले करून, सावरूनही त्याचे समाधान होत नसेल तर ती व्यक्ती, कुठेही जाऊन समाधानी राहू शकत नाही. त्यात आपला काहीही दोष नसतो. कारण एखाद्या व्यक्तीची मनस्थिती जर त्याप्रकारची बनली असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. म्हणून कोणाचे बोलणे जास्त मनावर घेऊ नये व उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नये. आपले कर्तव्य आहे ते, करत रहायचे. चांगले काय असते आणि वाईट काय असते सर्व काही ती शेवटी वेळच ठरवत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📗वक्ता आणि श्रोते📗**एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही त्‍याच्‍यात ताकत होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.**तात्‍पर्य :- काहीवेळेस आपल्‍या चांगल्या व देशहिताच्‍या योजना लोकांच्‍या गळी उतरविण्‍यासाठी युक्तीप्रयु‍क्तीचा वापर करावाच लागतो.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑक्टोबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/B1rAZfXUF2jqxM8q/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔶🔶 *_मनुष्य गौरव दिन_* 🔶🔶 ••••••••••••••••••••••••••••••☯️ *_ या वर्षातील २९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ☯️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☯️••••••••••••••••••••••••••••••••• *२००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.**२०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान**१९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार’ जाहीर.**१९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी.व्ही.रामन पदक जाहीर**१९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द**१९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.**१९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.**१८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.* ☯️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☯️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: कुंजीराम जनार्दन गोंधळे -- लेखक**१९८७: सुनील शिवाजी खवरे -- कवी* *१९८६: विशाल चिपडे -- कायदे अभ्यासक**१९७५: गजानन हनुमंत पाटील -- कवी**१९७१: प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर-कोरडे -- कवयित्री* *१९६८: शामला पंडित दीक्षित -- कवयित्री, लेखिका**१९६७: लतिका चौधरी -- कवयित्री, लेखिका* *१९६१: अजय सिंग देओल ऊर्फ ‘सनी देओल‘ – अभिनेता**१९६०: प्रा. डॉ. पुरुषोत्तम मारोतराव कालभुत -- लेखक**१९५६: जयंत शंकर कुलकर्णी -- लेखक**१९५४: प्रिया तेंडुलकर – रंगभूमी,चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.’जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.(मृत्यू: १९ सप्टेंबर २००२ )**१९५२: गिरीश प्रभुणे -- सामाजिक कार्येकर्ते, लेखक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९५१: प्रा. व्यंकटेश वळसंगकर -- गुलबर्ग येथील मराठी कवी, लेखक**१९५०: अशोक अर्धापुरकर -- प्रसिद्ध लेखक**१९४९: आशा कर्दळे -- मराठी चरित्रलेखिका आणि अनुवादक**१९४१: डॉ. सुरेश विश्वनाथराव उपगन्लावार -- कवी* *१९३९: शशिकांत शामराव पवार -- विधिज्ज्ञ, लेखक**१९३६: शांताराम नांदगावकर – प्रसिद्ध गीतकार (मृत्यू: ११ जुलै २००९ )**१९३४: मधुकर विष्णू कोल्हटकर -- विनोदी कथालेखक, तत्वज्ञानाचे अभ्यासक* *१९२९: निर्मला देशपांडे -- सामाजिक कार्यकर्त्या व गांधीवादी नेत्या (मृत्यू: १ मे २००८ )**१९२७: अरविंद पारीख -- भारतीय शास्त्रीय सितारवादक व लेखक**१९२५: डॉ.वामन दत्तात्रय तथा ’वा.द.’वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (मृत्यू: १७ एप्रिल २००१ )**१९२०: पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ.त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.(मृत्यू: २५ आक्टोबर २००३ )**१९११: असरार-उल-हक -मजाझ लखनवी म्हणून ओळखले जाणारे,भारतीय उर्दू कवी (मृत्यू: ५ डिसेंबर १९५५ )**१९१०: सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक.(मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५ )**१९०३: रायचंद बोराल -- भारतीय संगीतकार, ज्यांना संगीत जाणकारांनी भारतातील चित्रपट संगीताचे जनक किवा भीष्म पितामह मानले होते ( मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८१)**१९०२: दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक, नाट्य लेखक(मृत्यू: ३१ मे १९७३ )**१८९३: मोरेश्वर वासुदेव जोशी -- कादंबरीकार, कथाकार (मृत्यू: १६ सप्टेंबर १९८८ )* ☯️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☯️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: मनोहर सदाशिव नाईक -- लेखक, व्याख्याते (जन्म: १० मार्च १९४९ )**२००५: मोहन सहगल -- निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता (जन्म: १ डिसेंबर १९२१ )**१९९५: बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग ऊर्फ ’बेबी नाझ’ यांचे निधन.(जन्म: २० ऑगस्ट१९४४ )* *१९५०: विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८८७ )**१९३७: अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ(जन्म: ३० ऑगस्ट १८७१ )**१९३४: विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक.१८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.(जन्म: २४ डिसेंबर १८६४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणसाची ओळख देणारा स्वाध्याय परिवार*आज स्वाध्याय चळवळीचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादाजी यांची जयंती त्या निमित्ताने हा प्रासंगिक लेख..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सातारा - राज्यात कुठेही बंडखोरी होणार नाही. महायुती समन्वयाने लढेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात दूध डेअरीला आग, डेअरी मालकाचा होरपळून मृत्यू, सुखसागर परिसरातील घटना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेडमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण रिंगणात, भाजपकडून नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या नावाची चाचपणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचे 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रेल्वे प्रवाश्याचे आगाऊ आरक्षण करण्याची मुदत 60 दिवस करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने केला जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *किंग कोहलीने बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आणि यासोबतच त्याने कसोटीत 9000 धावाही केल्या पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *तोंडाला पाणी का सुटतं ?* 📒आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. यांचं काम तोंडात लाळेचा स्राव करण्याचं असतं. लाळेमध्ये असलेले काही पाचक पदार्थ व विकरं अन्नाच्या पचनात मोलाची भुमिका बजावत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा या ग्रंथींमधुन आपोआप लाळेचा पाझर व्हायला सुरुवात होते. त्या घासाचे दातांकडुन तुकडे पडत असताना त्यात लाळ मिसळुन त्यातल्या विकरांमुळे म्हणजेच रासायनिक कातर्‍यांमुळे त्यातील रसायनांच्या रेणुंचे तुकडे व्हायला सुरुवात होते. पचन व्हायला तिथुनच सुरुवात होते. या ग्रंथी काहीवेळा अधिकच उत्साह दाखवतात. त्यामुळे घास प्रत्यक्षात तोंडात पडण्यापुर्वी त्याच्या येण्याची वाट न पाहताच त्या कामाला लागतात. आपण अन्नाची चव जशी जिभेनं घेत असतो तशीच ती नाकानेही घेत असतो. खरं तर अन्नाचा स्वाद आणि सुगंध या दोन्हींचा एकसमयावच्छेदेकरुन वापर करुन आपण अन्नाची चव चाखत असतो. त्यामुळे आवडत्या किंवा मसालेदार पदार्थांचा सुगंध वातावरणात दरवळु लागला की त्या वासानंच आपली भुक चाळवली जाते. सहाजिकच तो पदार्थ आपल्या तोंडात कधी पडतो, याचीच वाट आपण पाहु लागतो. त्या भावनेपोटी मग आपल्या मेंदुतील विवक्षित मज्जापेशी उत्तेजित होतात. त्या आपलं काम करायला सुरुवात करतात आणि लाळग्रंथींना संदेश पाठवु लागतात. त्यांना प्रतिसाद देत मग त्या ग्रंथी कार्यान्वित होतात. त्यांच्यामधुन लाळेचा पाझर होऊ लागतो. यालच आपण पाणी सुटणं असं म्हणतो. काही वेळा अन्नाला तसा सुवास नसतो. पण तो पदार्थ पाहुनही मज्जापेशी चाळवल्या जातात आणि लाळग्रंथींना आदेश मिळतो. तोंडाला पाणी सुटतं ते यामुळेच. अशारितीनं ती एक प्रतिक्षिप्त म्हणजेच आपोआप होणारी घटना आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*PDF - Portable Document Format*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्याजवळ धैर्य आहे व जो मेहनत करायला घाबरत नाही, अशा हिम्मतवानाची सफलता दासी असते.- दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड👤 राजेश्वर वावधाने, पदवीधर शिक्षक, मुखेड👤 लक्ष्मण आगलावे, शिक्षक, धर्माबाद👤 आनंदकुमार बलकेवाड, येवती👤 अतुल जाधव👤 इम्तियाज शेख👤 ओम धुळशेट्टे👤 दत्ता सूर्यवंशी👤 गजानन वडजे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं । ऐसा तूं अंतरीं लपवीं मज ॥१॥ परि तुझे पायीं माझें अनुसंधान । वरी प्रेमाजीवन देई देवा ॥२॥ मनाचिया वृत्ति आड तूं राहोनि । झेंपावती झणीं कामक्रोध ॥३॥ नामा म्हणे ऐसें पाळिसी तूं मातें । मी जीवें तूतें न विसंवें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"सुखात असताना खायला दोघे बरे अन् हातपाय झाल्यावर चौघे बरे" या प्रकारची समाजात एक म्हण प्रचलित आहे. म्हणजेच दु:खाच्या वेळी पंचपक्वान खाण्याला महत्व दिले जात नाही तर आपल्या माणसाची आठवण केली जाते. म्हणून सुखात असो किंवा दु:खात आपल्या माणसाची कदर करावी. जे, माणसं खरे आपुलकीचे असतात त्यांचे प्रेमाचे दोन शब्द दु:खाच्या वेळी एक प्रकारची औषध बनून जाते अशा या आपुलकीच्या माणसांपासून दूर जाऊ नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *मातेचा उपदेश*📗          एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.**तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्‌गुणांची जोड द्यावी लागते.सौजन्य - http://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 ऑक्टोबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/ViveFC766d8dtKps/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟩 *_ या वर्षातील २९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟩•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.**१९६७: सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.**१९२२: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना**१९१९: राम गणेश गडकरी लिखित ’संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ’बळवंत संगीत नाटक मंडळी’ने केला.**१९०६:ज्ञमहर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.**१८७९: थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना**१८६७: सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.* 🟩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟩 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९: निशा अग्रवाल -- अभिनेत्री,माॅडेल**१९८२: अजय ताराचंद पटले -- नाट्यलेखक**१९८०: प्रा.आशिष रमेश बोरकर -- लेखक**१९७६: प्रा. डॉ. विजया जितेंद्र राऊत -- लेखिका, समीक्षक, संपादिका* *१९७४: आमिश त्रिपाठी-- इंग्रजीतून लिहीणारा भारतीय लेखक त्यांची पुस्तके अनेक भाषांमध्ये भाषांतरित* *१९७१: डॉ. स्वप्ना सिंधू मुरार -- लेखिका**१९७०: रवींद्र मुकुंदराव मालुंजकर -- कवी**१९६८: नरेंद्र दीपचंद हिरवाणी -- भारतीय फिरकी गोलंदाज पदार्पणातच कसोटी क्रिकेटमध्ये १६ गडी बाद केले**१९६८:मनोज अंबिके -- प्रसिद्ध लेखक**१९६७: प्रा. डॉ. माधुरी सुटे -- लेखिका* *१९६६: प्रा.नंदकुमार दिगंबरराव बालुरे -- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९५८: अंजली कुलकर्णी -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५६: मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू* *१९५०: ओम पुरी – प्रसिद्ध अभिनेता (मृत्यू: ६ जानेवारी २०१७ )**१९४८: काजल किरण --- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९४५: अरुंधती अरविंद बापट -- लेखिका**१९४५: मनोहर नामदेवराव पाटेकर -- कवी, लेखक**१९४३: सुनेत्रा पंडित -- लेखिका**१९३९: ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडीचा मारेकरी (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३ )**१९३७: मंगला जगन्नाथराव आवलगांवकर -- लेखिका, कवयित्री**१९३४: शीला वाझ -- नृत्यांगना अभिनेत्री (मृत्यू: २९ जून २०२२ )**१९३३: राम मुखर्जी -- बंगाली-हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक(मृत्यू: २२ ऑक्टोबर २०१७ )**१९२६: चार्ल्स एडवर्डरसन बेरी -- अमेरिकन गायक, गिटारवादक आणि गीतकार (मृत्यू:१८ मार्च २०१७)**१९२५: नारायण दत्त तिवारी -- माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल (मृत्यू: १८ ऑक्टोबर २०१८ )**१९२५: इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक (मृत्यू: ४ ऑगस्ट २०२० )**१८९३: हरी दामोदर वेलणकर -- संस्कृत पंडित व ग्रंथकार (मृत्यू: १३ जानेवारी १९६७ )**१८६१: ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश,कायदेपंडित,लेखक,आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. (मृत्यू: २० एप्रिल १९३८ )**१८०४: मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) - थायलंडचा राजा (मृत्यू: १आक्टोबर १८६८ )* 🟩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: शांताराम काशिनाथ राऊत -- कल्पक बोधचिन्ह करण्यासाठी प्रसिद्ध* *२००२: गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये -- संतकाव्याचे व भाषाशास्त्राचे अभ्यासक(जन्म: ११ डिसेंबर १९०९ )**१९९९: मंगेश भगवंत पदकी -- कवी, कथाकार (जन्म: २७ मार्च १९२३ )**१९९४: शंकर पाटील -- मराठी कथाकार.(जन्म: ८ऑगस्ट१९२६ )**१९९३: मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत.त्यांनी फाळके यांच्या 'कालियामर्दन’ या मूकपटात काम केले होते.* *१९८७: वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते.कार्ल मार्क्सच्या ’दास कापिटाल’ या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता.(जन्म: २० मे १९१३ )**१९८३: विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (जन्म: २६ सप्टेंबर १९३१ )**१९५१: हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (जन्म: २२ नोव्हेंबर १८८५ )**१९३१: थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (जन्म: ११ फेब्रुवारी १८४७ )**१९०९: लालमोहन घोष –देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष,भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला.(जन्म: १७ डिसेंबर १८४९ )**१८७१: चार्ल्स बॅबेज –इंग्लिश गणितज्ञ, संशोधक,अभियंता आणि तत्त्वज्ञ,पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (जन्म: २६ डिसेंबर १७९१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संस्कारी संतती हीच खरी संपत्ती*.......... आपण कमावलेल्या संपत्तीमुळे आपलीच मुले भांडण करून घेत असतील, वादविवाद करून घेत असतील आणि कोर्टाच्या पायऱ्या चढत असतील तर खरोखरच आपण कमावून ठेवलेल्या संपत्तीला काय महत्व उरेल ? म्हणून पालकांनी संपत्ती कमाविण्याच्या फंद्यात न पडता चांगली व संस्कारी संतती निर्माण करण्याकडे लक्ष द्यावे, असे वाटते. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांचे सूपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता, 100 पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करण्याचा अंदाज, कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींचं घबाड हाती लागलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अगरतला - लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेनला अपघात, ८ डब्बे रेल्वे रुळावरुन घसरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - अधिकाऱ्यांनी समाजसेवेचे व्रत घेऊन काम करावे, माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर, धार्मिक संस्थेच्या विश्वस्तांसोबत आणि ट्रस्ट सोबत साधणार संवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बंगळुरुतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांत गुंडाळला, 5 फलंदाज शून्यावर माघारी, दिवसअखेर न्यूझीलंडच्या 1 बाद 180 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *स्त्रियांना दाढी का नसते ?* 📙 प्राचीन इजिप्तमध्ये हातशेपसुत नावाची एक राणी होती. ती हनुवटीवर एक खोटी दाढी लावून वावरत असे. आपलं स्त्रीत्व लपवण्यासाठी तिनं हा खटाटोप केला होता. कारण राजगादीवर पुरुष वारसांनीच बसावं, असा प्रघात होता. त्यामुळे तिच्या गादिवरच्या हक्काला सहजासहजी मान्यता मिळणार नव्हती. तेव्हा आपणही पुरुष आहोत असं दाखवण्यासाठी तीनं या खोट्या दाढीचा आधार घेतला होता. तसा तिनं करावं याचं राजकीय कारण जरी स्पष्ट झालं असलं तरी तिला किंवा एकंदरीतच स्त्रियांना दाढी का नसते, हा प्रश्न उरतोच. पुरुषांनाही दाढी वयात आल्यानंतरच येते. त्यामुळे या नैसर्गिक आविष्कारात वयात येताना सर्वांच्याच शरीरात जो संप्रेरकांच्या पाझराचा खेळ सुरू होतो त्याचा सहभाग असावा, हे निश्चित. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या अंगावर लव असते. काहींच्या अंगावर तशी ती जास्तच असते. अशा केसाळ मुलाच्या अंगावरची लव घालवण्यासाठी आई आणि दाई त्याला अंघोळ घालताना हळदीचा लेप चोळत असतात. वास्तविक त्याची काहीच गरज नसते. कारण मूल मोठं होत जातं तशी ही लव हळूहळू नाहीशी होत जाते.तिच्यात मोठा फरक होतो तो ते मूल वयात येताना. त्या वेळी त्या मुलाच्या लिंगानुसार वेगवेगळ्या लैंगिक संप्रेरकांचा पाझर मोठ्या प्रमाणावर सुरू होतो. मुलींच्या शरीरात स्त्रैण संप्रेरकांचा स्त्राव सुरू होतो. त्यांच्या प्रभावाखाली शारीरिक तसंच शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये मोठे बदल घडून येतात. स्त्रियांच्या शरीराला गोलाई येते. स्तनांची वाढ होऊ लागते. जननेंद्रियांचीही वाढ होते. मासिक पाळी सुरू होते. या सर्वांबरोबरच अंगावरची लव कमी कमी होऊ लागते आणि डोक्यावरच्या केसांची वाढ सुरू होते. चेहऱ्यावरच्या केसांच्या वाढीलाही विरोध होतो. त्यांची वाढ दाबली जाते. अर्थात काहीजणींच्या बाबतीत ही प्रक्रिया संपूर्णपणे सुरळीत पार पडत नाही. त्यामुळे काही मुलींच्या हनुवटीवर थोडेफार केस दिसू लागतात; पण त्यांचा बंदोबस्त करणं सहज शक्य असतं. मुलांच्या शरीरात याच वेळी पुरुषी संप्रेरकांच्या स्त्रावाला सुरुवात होते. त्यांच्या प्रभावापोटी त्यांच्याही शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये बदल होतात. जननेंद्रियांची वाढ होते. छाती रुंदावते, भरदार होऊ लागते. उंचीतही वाढ होते. आवाज फुटतो. त्याचबरोबर मिसरूडं आणि दाढीही फुटते. कारण त्या संप्रेरकांच्या स्त्रावापोटी अंगावरची लव केसांमध्ये बदलते. चेहऱ्यावरच्या केसांचीही वाढ होऊ लागते. डोक्यावरच्या केसांची वाढ मात्र मंदावते. ती अति मंदावली तर मग टक्कलही पडतं. त्या मंदावण्याच्या वेगावर टक्कल केव्हा पडेल हे ठरतं. काही जणांना लहान वयातच ते पडतं, तर काही जण सत्तरीतही केसांचा फुगा पाडू शकतात.स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये निसर्गानं जे काही फरक केले आहेत त्यांच्या परिपाकापोटी स्त्रियांना दाढी येत नाही, तर पुरुषांनाच टक्कल पडतं.बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*OMR - Optical Mark Recognition*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा, तो स्वर्गाचे फुल बनवतो.- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला *'द फ्लाईंग फिश 🐠 आणि बाल्टीमोर बुलेट'* या नावाने ओळखले जाते ?२) २०२५ मध्ये पहिलावहिला खोखो world cup कोणत्या देशात होणार आहे ?३) प्रसिद्ध रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) 'महिमा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ECG चा फुल फार्म काय आहे ? *उत्तरे :-* १) माइकल फेल्प्स २) भारत ३) कोल्हापूर ४) थोरवी, मोठेपणा, माहात्म्य ५) Electro Cardio Gram*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 विकास जाकापूरे, शिक्षक, धर्माबाद👤 शुभम पतंगे👤 श्रेणीक रणभीरकर, धर्माबाद👤 शशिकांत संगम, शिक्षक, धर्माबाद👤 गणेश कावळे, मुदखेड👤 विक्की टेकाळे, माहूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अवघाचि संसार करीन सुखाचा । जरी जाला दुःखाचा दुर्धर हा ॥१॥ विठोबाचें नाम गाईन मनोभावें । चित्त तेणें नांवें सुख पावे ॥२॥ इंद्रियांचें कोड सर्वस्वें पुरती । मनाचे मावळती मनोधर्म ॥३॥ श्रवणीं श्रवणा नामाचा प्रवंधा । नाइकें स्तुतिनिंदा दुर्जनाची ॥४॥ कुंडलें मंडित श्रीमुख निर्मळ । पाहतां हे डोळे निवती माझे ॥५॥ विटेसहित चरण धरीन मस्तकीं । तेणें तनु सुखी होईल माझी ॥६॥ संतसमागमें नाचेन रंगणीं । तेणें होईल धुणी त्रिविध तापा ॥७॥ नामा म्हणे सर्व सुखाचा सोईरा । न विसंवे दातारा क्षणभरी ॥८॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीची व त्याच्या मागे निंदा करण्याची आपल्यात आवड असेल तर एखाद्या गुणवान व्यक्तीची त्याच्यासमोरच स्तुती करण्याची आवड ठेवावी. जर अशी स्तुती करण्याची वारंवार आपल्यात आवड निर्माण झाली तर आपले मान ही वाढेल व एक चांगली व्यक्ती म्हणून आपल्याकडे बघितले जाईल. या प्रकारचे मान कमविण्यासाठी आपल्यातही तसे गुण असावे लागते. तेव्हाच असे विचार आपल्या मनात येतात.कारण निंदा ही कधीही मागे केली जाते. अन् स्तुती समोरच केली जाते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सकारात्मक दृष्टिकोन ... गरीब आदमी बड़ी मेहनत से एक-एक रूपया जोड़ कर मकान बनवाता है। उस मकान को बनवाने के लिए वह पिछले २० वर्षों से एक-एक पैसा बचत करता है, ताकि उसका परिवार छोटे से झोपड़े से निकलकर पक्के मकान में सुखी से रह सके। आखिरकार एक दिन मकान बन कर तैयार हो जाता है। तत्पश्चात पंडित से पूछ कर गृह प्रवेश के लिए शुभ तिथि निश्चित की जाती है लेकिन गृहप्रवेश के २ दिन पहले ही भूकंप आता है, और उसका मकान पूरी तरह ध्वस्त हो जाता है। यह खबर जब उस आदमी को पता चलती है तो वह दौड़ा दौड़ा बाजार जाता है और मिठाई खरीद कर ले आता है। मिठाई लेकर वह घटनास्थल पर पहुंचता है, जहां पर काफी लोग इकट्ठे होकर उसके मकान गिरने पर अफसोस जाहिर कर रहे थे।ओह ! बेचारे के साथ बहुत बुरा हुआ, कितनी मुश्किल से एक-एक पैसा जोड़कर मकान बनवाया था। इसी प्रकार लोग आपस में तरह तरह की बातें कर रहे थे। वह आदमी वहाँ पहुंचता है और झोले से मिठाई निकाल कर सबको बाँटने लगता है। यह देखकर सभी लोग हैरान हो जाते हैं। तभी उसका एक मित्र उससे कहता है, कहीं तुम पागल तो नहीं हो गए हो, घर गिर गया, तुम्हारी जीवन भर की कमाई बर्बाद हो गई और तुम खुश होकर मिठाई बांट रहे हो। वह आदमी मुस्कुराते हुए कहता है, तुम इस घटना का सिर्फ नकारात्मक पक्ष देख रहे हो इसलिए इसका सकारात्मक पक्ष तुम्हें दिखाई नहीं दे रहा है। ये तो बहुत अच्छा हुआ कि मकान आज ही गिर गया वरना तुम्हीं सोचो अगर यह मकान २ दिनों के बाद गिरता तो मैं मेरी पत्नी और बच्चे सभी मारे जा सकते थे, तब कितना बड़ा नुकसान होता। नकारात्मक दृष्टिकोण को त्याग दीजिये, अपने घर मे बच्चों तथा बुजुर्गो को कहिये- _”आप स्वस्थ रहिये, खुश हम आपको रख लेंगे”।•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 ऑक्टोबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/NXcPubR2MDZcLpzU/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_जागतिक गरिबी निर्मूलन दिन_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••🟫 *_ या वर्षातील २९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान**१९९६: अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर**१९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ.टी.जेकब जॉन यांना 'डॉ.शारदादेवी पॉल पारितोषिक’ जाहीर**१९७९: मदर तेरेसा नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित**१९६६: बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४३: बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.**१९३४: ’प्रभात’चा ’अमृतमंथन’ हा चित्रपट पुण्याच्या ’प्रभात’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी या चित्रपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाली. हिन्दीत हा चित्रपट २९ आठवडे चालला. हिन्दी चित्रपटाचा रौप्यमहोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ होती.**१९३३: अल्बर्ट आइनस्टाइन नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आला.**१९३१: माफिया डॉन अल कपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.**१९१७: पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.**१८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: कीर्ती सुरेश -- भारतीय अभिनेत्री**१९८०: धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर -- लेखक संपादक* *१९७७: संदीप बोडके -- पत्रकार (उपसंपादक), कवी, गझलकार, लेखक**१९७४: धारा भांड-मालुंजकर -- लेखिका* *१९७३: सुनील वामन कुमरे -- कवी, लेखक**१९७०: अनिल कुंबळे – भारतीय माजी क्रिकेटर, लेग स्पिनर गोलंदाज* *१९६८: देवदत्त बोरसे -- कवी**१९६७: संजय श्रीपाद देशपांडे -- लेखक**१९६६: दशरथ यशवंत झनकर -- कवी, लेखक**१९६५: संजय सुरिंदर कपूर -- भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता**१९६५: अरविंद डिसिल्व्हा – श्रीलंकेचा क्रिकेटसंघाचा माजी कप्तान**१९६१: डॉ. राजेश रामचंद्र देशपांडे -- कवी, लेखक, व्याख्याते**१९५७: अशोक श्रीपाद भांबुरे --- कवी**१९५५: प्रा. डॉ. व्यंकटेश रा .जंबगी -- कवी, लेखक* *१९५५: स्मिता पाटील – सुप्रसिद्ध अभिनेत्री. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड (मृत्यू: १३ डिसेंबर १९८६ )**१९५३: शैला दिगंबर गिरनारकर -- कवयित्री* *१९५२: पुरुषोत्तम रोहणकर -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार* *१९५१: प्र. द. जोशी -- कवी, बालसाहित्यिक* *१९४७: डॉ. बा. ह. कल्याणकर -- कवी, लेखक, संपादक, विचारवंत* *१९४७: जयश्री रवींद्र देशपांडे -- पाकक्रिया या विषयांवर लिखाण करणाऱ्या मराठी लेखिका**१९४७: सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका**१९४६: अरुणा राजे पाटील -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि संपादक**१९३२: प्राचार्य प. सी. काणे -- लेखक, विचारवंत* *१९३२: जयराम कुलकर्णी -- भारतीय मराठी -भाषेतील चित्रपट अभिनेते (मृत्यू: १७ मार्च २०२० )**१९३१: डॉ.शरद कोलारकर -- विदर्भातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष (मृत्यू: ७ फेब्रुवारी २०१४ )* *१९१७: विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (मृत्यू: १३ डिसेंबर १९९४ )**१८९२: नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार,(मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६८ )**१८९०: अनंत हरी गद्रे -- नाटककार, संपादन (मृत्यू: ४ सप्टेंबर १९६७ )* *१८६९: ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक,बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू,’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (मृत्यू: ८ एप्रिल १९२२ )**१८१७: सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ,समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (मृत्यू: २७ मार्च १८९८ )* 🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: प्रा. डॉ. विलास वसंत खोले -- ज्येष्ठ लेखक-समीक्षक व संपादक (जन्म: ५ डिसेंबर १९४४ )**२०१७: केशव जगन्नाथ पुरोहित (शांताराम)-- सुप्रसिद्ध साहित्यिक,सन १९८९मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले (जन्म: १५ जून १९२३ )* *२००८: रविन्द्र पिंगे – ललित लेखक (जन्म: १३ मार्च १९२६ )**१९९३: विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते,दिग्दर्शक व पटकथालेखक (जन्म: १२ मे १९०७ )**२००८: शामराव कांबळे -- प्रख्यात आणि उत्कृष्ट संगीत संयोजक, संगीतकार (जन्म: १६ एप्रिल १९२६ )**१९०६: जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली (जन्म: २२ आक्टोबर १८७३ )**१८८७: गुस्ताव्ह किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ मार्च १८२४ )**१८८२: दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार,ग्रंथकार व धर्मसुधारक,संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करुन व मराठी भाषेच्या रुपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहिले. (जन्म: ९ मे १८१४ )**१७७२: अफगणिस्तानचा राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) याचे निधन. अहमदशाहने ’दुर्र-इ-ईरान’ असा आपला किताब जाहीर केल्यापासून अब्दाली टोळ्या ’दुर्रानी’ नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक गरिबी निर्मूलन दिन त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*मी गरीब नाही*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही शासनाकडून अनेक निर्णय जाहीर, निवडणूक आयोगाचा कारवाईचा बडगा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीतून बाहेर, विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी, लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *6 पिकांच्या हमीभावात वाढ, केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, देशातील  कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, तलवारीच्या जागी हातात संविधान, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा महत्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नायब सिंग सैनी होणार हरियाणाचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या बंगळुरू कसोटीत पावसाचाच खेळ, पहिला दिवस पाण्यात, बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आंधळे लोक कसे परीक्षा देतात ?* 📙अंध व्यक्ती आजकाल उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. पूर्वी मात्र ते शक्य नव्हते. कारण बघता येत नसल्याने अंध लोकांना ज्ञानाची सर्वा दालने बंद होती. सहाजिकच त्यांच्या जीवनात खर्या अर्थाने अंधार होता. अंध व्यक्ती दुसऱयांच्या उपकारावर, सहानुभूतीवर अवलंबून होत्या. त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखवायला, स्वतःच्या पायावर उभे राहायला संधी मिळत नव्हती. ब्रेलच्या संशोधनामुळे मात्र अंधांच्या जीवनात आशेच्या किरणांनी शिरकाव केला. अंध व्यक्तीचे स्पर्शज्ञान खूपच चांगले असते. या स्पर्श ज्ञानाच्या कौशल्याचा वापरच ब्रेल लिपीत केला जातो. यात प्रत्येक अक्षर हे कागदावर उंचवट्याच्या (सुई टोचून केलेल्या) स्वरूपात लिहिले जाते. या उंचवट्यांची संख्या, रचना स्पर्शाने लक्षात घेऊन अंधांना अक्षर ओळख करून घेता येते. याला ब्रेल लिपी असे म्हणतात. ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तकांच्या साहाय्याने अंधांना ज्ञानाच्या विविध दालनात प्रवेश करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आता आपल्याला पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अंध व्यक्ती दिसतात.अंध व्यक्तींना सहानुभूती वा दयेपेक्षा संधी मिळण्याची गरज आहे. त्यांची गुणवत्ता व कौशल्य वाढवण्याचे काम ब्रेल लिपीने केलेले आहे. साहजिकच अंध लोक इतरांच्या बरोबरीने विकास साधू शकत आहेत. ब्रेल लिपीच्या आधारेच अंध व्यक्ती परीक्षा देतात. अशी ही ब्रेल लिपी जणू अंधांसाठी वरदानच ठरली आहे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*MMS - Multimedia Messaging Service*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहण यात जीवनाची सार्थकता आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अंबेची आराधना करण्यासाठी गरबा दांडियाला सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरूवात झाली ?२) टेनिस विश्वात कोणत्या तीन दिग्गजांना *बिग थ्री* म्हटले जाते ?३) पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा काढूनही एका डावाने पराभव पत्करणारा क्रिकेट विश्वातील पहिला संघ कोणता ?४) 'भेकड' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्या साली झाली ? *उत्तरे :-* १) गुजरात २) सर्बियाचा नोवाक जोकोविच, स्पेनचा राफेल नदाल, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर ३) पाकिस्तान ४) भित्रा, भ्याड, भीरू ५) २७ सप्टेंबर १९२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 चेतन भैराम, भंडारा जिल्हा प्रतिनिधी, दैनिक देशोन्नती 👤 निंबा पाटील👤 गजानन बापूराव भोसकर👤 धनराज भुमरे👤 अनिकेत कदम👤 विकास गायकवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥ सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥ कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान सर्वांना हवे असते. पण,सत्य बोलणाऱ्याच्या जीवनात मात्र पदोपदी काट्यांनी भरलेली वाट समोर असते.त्याच वाटेवरून ती व्यक्ती जेव्हा मनात हिंमत ठेवून प्रवास करते त्यातच त्याला खरे समाधान आणि सुख मिळत असते.कारण, आयते मिळालेल्या सुख, समृद्धी पेक्षा संघर्ष करून जे,काही मिळालेले असते ते, खऱ्या अर्थाने अनमोल असते. म्हणून सत्याच्या वाटेवर चालूनच मिळवावे भलेही त्रास झाले तरी चालेल जे, काही मिळालेले असते ती संपत्ती कधीच मिटत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••◇◇ मूर्ख डोमकावळा ◇◇एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली. तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,'' या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''तात्‍पर्य - काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्‍याची प्रचंड सवय असते. यामध्‍ये त्‍यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्‍यांची पात्रता जाणून असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑक्टोबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/09/blog-post_24.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_जागतिक अन्न दिन_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••🛟 *_जागतिक बधिरीकरण दिन किंवा जागतिक भूल दिन_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••🛟 *_ या वर्षातील २९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.**१९८४: आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९७५: बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.**१९७३: हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९६८: हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान**१९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.**१९२३: वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी ’द वॉल्ट डिस्‍ने कंपनी’ची स्थापना केली.**१९०५: भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.**१८६८: डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.**१८४६: डॉ.जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.**१७९३: फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा ’गिलोटीन’वर वध करण्यात आला.**१७७५: ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.*🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: शार्दुल ठाकूर -- आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू**१९७१: कुंडलिक कनिराम पवार -- कवी, लेखक* *१९६८: किसन दत्तात्रय उगले -- लेखक, कवी**१९६५:भवानी शंकर -- भारतीय पखवाज ढोल वादक* *१९६१: जयश्री सुधीर देसाई -- लेखिका, अनुवादक**१९६०: डॉ. रमा मराठे -- लेखिका, कवयित्री* *१९६०: मकरंद विनायक सापटणेकर -- लेखक**१९५९: अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: ३ जून २०१०)**१९५४: दिलीप गंगाधर कल्याणी -- कवी, लेखक**१९५४: मंजुषा मनोहर शिनखेडे -- कवयित्री, लेखिका**१९५०: अशोक श्रीधर थोरे -- कादंबरीकार* *१९४८: हेमा मालिनी – प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक**१९४०: नरेंद्र चंचल -- भारतीय गायक होते ज्यांना धार्मिक गाणी आणि भजन यात विशेष प्राविण्य प्राप्त (मृत्यू: २२ जानेवारी २०२१ )**१९३८: डॉ. शामला वनारसे -- मानसोपचारतज्ज्ञ, लेखिका**१९३६: वसंत दामोदर भट -- लेखक, व्याख्याते**१९१७: इंदुमती रामकृष्ण शेवडे -- कथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार, संशोधक, समीक्षक(मृत्यू: १४ मार्च १९९२ )**१९१६: शकुंतला ना. दिवाणजी -- लेखिका* *१९१५: भानुदास बळीराम शिरधनकर -- लेखक (मृत्यू: १२ एप्रिल १९७७ )**१९०७: सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(मृत्यू: ४ आक्टोबर १९८२ )**१८९६: सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती,साहित्यिक (मृत्यू: १८ जून १९७४ )**१८९०: अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक,(मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७ )**१८८६: गिरिजाबाई महादेव केळकर -- कादंबरीकार, नाटककार (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९८०)**१८५४: ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार,(मृत्यू: ३० नोव्हेंबर १९०० )**१८४१: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: २६ आक्टोबर १९०९ )**१६७०: बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (मृत्यू: ९ जून १७१६ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७: लेख टंडन -- भारतीय निर्माता आणि अभिनेता ( जन्म: १३ फेब्रुवारी १९२९ )**२०१६: केर्सी लॉर्ड -- भारतीय संगीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९३५ )**२०१३: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे (गो. पु.) -- मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक (जन्म: २ ऑगस्ट, १९३८ )**२००२: नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९२३ )**१९९७:दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक* *१९८१: मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (जन्म: २० मे १९१५ )**१९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या (जन्म: १ आक्टोबर १८९५ )**१९५०: वि. गं. तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक* *१९४८:माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. (जन्म: १८८५ )**१९४४: गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, 'प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक (जन्म: १८८७ )**१७९३: मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी (जन्म: २ नोव्हेंबर १७५५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संतुलित आहार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वायनाड आणि नांदेड लोकसभा मतदारसंघांसह विधानसभा निवडणुकांसाठी वेळापत्रक जाहीर, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबर रोजी निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजप नेत्या चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत बाबुसिंह महाराज राठोड, हेमंत पाटील यांच्यासह सात आमदारांनी घेतली शपथ, राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावा, विधानसभेला फडणवीसांची जिरवा; निवडणुकीची घोषणा होताच मनोज जरांगेंचा आदेश सुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका, तातडीने नाशिकच्या रुग्णालयात दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई - बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी 29 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारत आणि यूएसमध्ये 31 प्रीडेटर MQ-9B ड्रोनसाठी 32,000 कोटी रुपयांचा करार; संरक्षण क्षमता वाढीस चालना*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asia World Cup 2024 Women - वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करत गाठले सेमी फायनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••😵 *जांभई केव्हा येते ?* 😵झोप आली की जांभई येते अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण ती खरी नाही. कारण दिवसाढवळ्याही एखादं व्याख्यान ऐकत असताना किंवा चक्क एखादा सिनेमा पाहत असतानाही जांभई येते. त्यामुळेच जेव्हा थकवा येतो किंवा कंटाळा येतो तेव्हा जांभई येते असं म्हटलं तर ते अधिक संयुक्तिक होईल. जांभई येते तेव्हा आपला जबडा सताड उघडा पडतो. त्याच्याशी जोडलेले स्नायू ताणले जातात आणि हवा जोराने आत खेचली जाते. या सर्वांशी जांभई येण्याचा संबंध आहे.जांभई सर्वांनाच येते. लहान मुलांना येते, मोठ्या माणसांना येते, जनावरांना येते आणि पक्षांनाही येते. एवढंच काय पण अजून न जन्मलेल्या आईच्या पोटात वाढणाऱ्या मुलालाही जांभई येते. ती का येते हे जरी अजून कोडंच असलं तरी तिच्यासंबंधी पुष्कळ माहिती मिळालेली आहे. जांभई साधारणपणे ६ सेकंद टिकते. मनुष्यप्राण्यामध्ये बीजफलन होऊन नव्या जीवाची नांदी म्हटली गेल्यानंतर जेमतेम ११ आठवडे होतात न होतात तो जांभई येते. आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमसमध्ये जांभईचं नियंत्रण केंद्र आहे.थकवा किंवा कंटाळा आल्यानंतर जांभई येते याचा शोध एका अनोख्या प्रयोगातून लागला. वैज्ञानिकांनी १७ ते १९ वर्षे वयाच्या मुलामुलींची दोन गटांमध्ये विभागणी केली. एका गटाला त्यांनी एमटीव्हीवर दाखवतात तसे गाण्यांचे व्हिडीओ दाखवले. तर दुसऱ्या गटाला निरनिराळ्या रंगांचे बारकोड्स दाखवले. एकूण तीस मिनिटं हा कार्यक्रम चालला होता. त्या दरम्यान त्या दोन्ही गटातल्या मुलांनी किती जांभया दिल्या याची मोजदात केली गेली. त्यावरून असं दिसून आलं की पहिल्या म्हणजे गाण्याचे व्हिडिओ पाहणाऱ्या गटातल्या मुलांनी सरासरी ३.४ जांभया दिल्या तर दुसऱ्या म्हणजे कंटाळवाणे बारकोड्स पाहणाऱ्या गटातल्या मुलांना त्याच वेळात ५.८ जांभया आल्या.असा कंटाळा आला की हायपोथॅलॅमसमध्ये मेंदूतल्या संदेशवाहक रसायनांचा तसंच काही संप्रेरकांचा पाझर सुरू होतो. त्याचा प्रभाव पडून जांभयांचं नियंत्रण करणारं केंद्र कार्यान्वित होतं. येणारी जांभई दाबुन टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यातून समाधान मिळत नाही. उलट आणखी जांभया येतात. कारण जांभई येताना जबड्याचे स्नायू जोवर पूर्णपणे ताणले जात नाहीत तोवर जांभईच्या कारणाचं समाधान होत नाही.थकवा येतो तेव्हा आपला श्वासोच्छवास मंद गतीने होत असतो. त्यामुळे शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्याची नोंद घेऊन हायपोथॅलॅमस कार्यान्वित होतो असाही दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. या उलट शरीरात कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढलं म्हणजेही जांभई येते असंही मत प्रदर्शित केलं गेलं आहे. पण यालाही वैज्ञानिक प्रमाण मिळालेले नाही. त्यामुळे थकवा किंवा कंटाळा आला की जांभई येते हे मान्य असलं तरी त्यामुळे नेमकं काय साधलं जातं हे अजूनही कोडंच आहे.बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*NSS - National Service Scheme*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो.- फ्रँकलीन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *टाटा ट्रस्ट* च्या चेअरमनपदी कोणाची निवड करण्यात आली ?२) आतापर्यंत एकूण किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे ?३) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्ष किती व कोणत्या ?४) 'भेद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील 'फूड मदर' म्हणून कोणाला ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) नोएल टाटा २) अकरा ३) सहा - कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे, डॉ. तारा भवाळकर ४) फरक, भिन्नता ५) ममता भांगरे, अहिल्यानगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 सुबोध काकाणी, प्रसिद्ध युवा उद्योजक, धर्माबाद👤 दत्तप्रसाद यंगुलदास, विजय स्टेशनरी सप्लायर्स, नांदेड👤 विशाल धनगर👤 राम भांगे मुगटकर👤 साईकुमार शिंदे पाटील👤 संदीप अकोलकर👤 दिगंबर शिंदे पाटील👤 साईनाथ कळसे पाटील 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥ माझिया निदैवें ऐसेंचि घडलें । तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥ सहस्त्र अपराध घालीं माझें पोटीं । तारीं जगजेठी नामा म्हणे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्याला तेल, तिखट मीठ लावून गोड शब्दात कोणाच्या विषयी सांगत असतील तर त्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. कारण सांगितलेले प्रत्येक शब्द खरे असतीलच असे नाही. कारण त्या सांगण्यामध्ये स्वतःचा स्वार्थ सुद्धा कुटून भरलेला असतो. म्हणून स्वतः त्या व्यक्तीला ही वाचावे व ज्या व्यक्तीविषयी ऐकायला मिळाले असेल त्या व्यक्तीला सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करून बघावा. बरेचदा सांगण्यावर विश्वास ठेवल्याने शेवटी पश्चातापात पडण्याची वेळ आपल्यावर येत असते आणि त्यावेळी कायमची वेळ निघून गेलेली असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य:ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 ऑक्टोबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18v6B67pNbf5QsB6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚥 *१५ ऑक्टोबर २०२४* 🚥 🔶🔶 *_दिनविशेष_* 🔶🔶 ••••••••••••••••••••••••••••••••📚 *_जागतिक विद्यार्थी दिवस_* 📚•••••••••••••••••••••••••••••••••📚 *_ वाचन प्रेरणा दिन_* 📚 📚 *जागतिक हात धुवा दिवस* 📚•••••••••••••••••••••••••••••••••📚 *_ या वर्षातील २८९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 📚 *_महत्त्वाच्या घटना:_* 📚•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या ’द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ’बुकर पुरस्कार’ मिळाला.**१९९३: वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करुन,दक्षिण अफ्रिकेत लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्‍नांबद्दल अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू.डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर**१९३५: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले.जे.आर.डी.टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन ’एअर इंडिया’ ही कंपनी अस्तित्त्वात आली.**१९१७: पहिले महायुद्ध - जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.**१८८८: गोपाळ गणेश आगरकराच्या ’सुधारक’ पत्राची सुरूवात* 📚 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📚••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: दिगंगना सूर्यवंशी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री, गायिका आणि लेखिका**१९७३: सूर्यकांत संभाजी ससाने-- कवी, लेखक* *१९६४: डॉ. वैजयंती पेशवे -- लेखिका* *१९६३: प्रा. डॉ. मनोज तायडे -- लेखक**१९६१: गौतम विश्वनाथ दारुंडे -- कवी, लेखक* *१९५७: मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका**१९५३: शशिकांत राजाराम मोरे -- नाट्य लेखक**१९५३: विवेक शंकर लागू-- मराठी नाटककार आणि नाट्यअभिनेते, लेखक**१९५१: अरविंद पांडुरंग उत्तखेडे -- कवी, लेखक* *१९५०: मधुकर धाकराव -- कवी, लेखक* *१९४९: प्रणोय रॉय – पत्रकार,एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक**१९४७: के. व्ही. सरवदे -- लेखक, कवी* *१९४७: श्याम फरांदे -- लेखक, अनुवादक**१९४७: छगन चंद्रकांत भुजबळ -- अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन**१९४५: डॉ. किसन गोपाळराव राऊत -- कवी, लेखक**१९४३: डॉ. भिमा शिवय्या स्वामी -- वीरशैव संत साहित्याचे अभ्यासक व कादंबरीकार**१९४२: इम्तियाज खान -- भारतीय अभिनेता ( मृत्यू: १५ मार्च २०२० )**१९३९: डॉ. गोविंद नारायण देशपांडे -- लेखक, समीक्षक, संपादक (मृत्यू: १० नोव्हेंबर २०१६ )**१९३६: मदनलाल खुराणा -- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी राज्यपाल (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१८ )**१९३६: डॉ.चंद्रकांत अंबादास धांडे -- ज्येष्ठ नाट्य समीक्षक,दलित मित्र पुरस्कार प्राप्त प्रख्यात लेखक(मृत्यू: २ डिसेंबर २०१५ )* *१९३४:एन.रामाणी – कर्नाटिक शैलीचे बासरीवादक(मृत्यू:९ ऑक्टोबर २०१५)**१९३३: रागिणी विद्याधर पुंडलिक -- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: ६ मे २०१९ )**_१९३१: अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम – वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती,एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक,पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार,पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०),भारतरत्‍न(१९९७) (मृत्यू: २७ जुलै २०१५ )_**१९२६: नारायण गंगाराम सुर्वे – सुप्रसिद्ध कवी (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१० )**१९२४: गोपाळ रामचंद्र जोशी -- मराठी नाट्यसमीक्षक (मृत्यू: २१ ऑक्टोबर २००५ )**१९२१: प्रा. दिनेश दत्तात्रेय माहुलकर -- लेखक* *१९२०: मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (मृत्यू: २ जुलै १९९९ )**१९१७: गजाननशास्त्री सदाशिवशास्त्री मुसळगावकर -- संस्कृत पंडित, लेखक (मृत्यू: २००९ )**१९०८: जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन- अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ एप्रिल २००६ )**१९०६: प्रा. शंकर गणेश दवणे -- लेखक* *१८८१: पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५ )**१६०८: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (मृत्यू: २५ आक्टोबर १६४७ )* 📚 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📚••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: फारुख जाफर -- भारतीय अभिनेत्री (जन्म: १९३३ )**२००२: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (जन्म: ६ डिसेंबर १९२३ )**२००७: मीरा देव बर्मन -- भारतीय बंगाली गीतकार आणि संगीतकार (जन्म: मार्च १९२३ )**१९६१: सूर्यकांत त्रिपाठी ’निराला’ – हिन्दी साहित्यिक.त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले.(जन्म: २१ फेब्रुवारी १८९६ )**१९४६: हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी (जन्म: १२ जानेवारी १८९३ )**१९३०: हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती (जन्म: २६ फेब्रुवारी १८६६ )**१९१७: माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका,सौंदर्यवती व गुप्तहेर (जन्म: ७ ऑगस्ट १८७६ )**१७८९: रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे – उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती,निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश (जन्म: १७२० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचन प्रेरणा दिवस त्यानिमित्ताने लेख *वाचाल तर वाचाल*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलून पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ केले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यपाल नियुक्त आमदारांची सात नावाची यादी सादर, पंकज भुजबळ यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यतील 23 अधिकाऱ्यांना मिळाली पदोन्नती, शिंदे सरकारच्या शिफारशी नंतर केंद्रातून आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पाच वर्षात महाराष्ट्राचा विकास दर 10 टक्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निवडणुकीपूर्वी सरकारची दिवाळी भेट, एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ **मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लखनौमध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात अभिमन्यू ईश्वरनने यूपीविरुद्ध शानदार चौथे शतक झळकावले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌥 उंचावरची हवा थंड का असते ? 🌥आपण सहसा पाहतो, की थंड हवेच्या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून जास्त असते. जसजशी ही उंची वाढते तसतसं तिथलं हवामानही त्याच्याजवळच, पण कमी उंचीवर असलेल्या ठिकाणाहून अधिक थंड होतं. आपल्या ओळखीच्या महाबळेश्वरचंच उदाहरण घ्या ना. सहय़ाद्रीच्या माथ्यावर ते वसलेलं आहे. त्याच डोंगरकड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाईपासून त्याचं अंतर केवळ काही किलोमीटरचंच असेल; पण वाईचं तापमान उष्ण, तर महाबळेश्वरचं थंड असतं. सगळीकडेच आपल्याला असा अनुभव येतो. साहजिकच उंचावरची हवा थंड का असते, असा सवाल मनात उभा राहतो.त्याचं उत्तर दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणधर्मात दडलेलं आहे. कोणत्याही वायूवर असणारा दाब आणि त्याचं तापमान त्याचं सरळ नातं असतं. वायूवरचा दाब जास्त असेल तर त्याचं तापमानही वाढीव असतं. उलटपक्षी जर तो दाब कमी असेल तर तापमानही घटलेलं असतं. सायकलच्या चाकात जेव्हा हवा भरण्यासाठी आपण पंपातला दाब वाढवतो तेव्हा त्या हवेचं तापमान वाढत जातं. ती तापलेली असते. परिणामी, तो पंपही तापतो; पण त्याच टायरमधून आपण हवा सोडून तिला दाब कमी केला की त्याचं तापमान उतरतं.रेफ्रिजरेटरमध्ये वायूच्या याच गुणधर्माचा वापर केलेला असतो. त्या यंत्रांमध्ये फ्रिऑन नावाचा वायू भरलेला असतो. जेव्हा तो रेफ्रिजरेटरच्या बाहेर असतो तेव्हा त्याच्यावर दाब देऊन त्याच्यातील उष्णता का काढून टाकली जाते. तो जेव्हा रेफ्रिजरेटरच्या आत असतो तेव्हा त्याच्यावरचा दाब कमी करत तो थंड केला जातो. त्यामुळे आतली उष्णता त्याच्याकरवी शोषली जाते व ती बाहेर का टाकली जाते. हवा ही अशीच निरनिराळ्या वायूंची बनलेली असते, त्यामुळे तिच्या ठायीही वायूंचा हाच गुणधर्म प्रस्थापित होतो. उंचावरची हवा विरळ असते, त्यामुळे तिथला हवेचा दाबही कमी असतो. लडाखसारख्या अतिशय उंचीवरच्या ठिकाणी गेल्यावर लवकर थकवा येतो, याचं कारणही हेच आहे. तिथली हवा इतकी विरळ आणि त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण इतकं कमी असतं की आपल्या नेहमीच्या श्वासोच्छवासातून हवा तितका ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही. इतक्या विरळ हवेचा दाबही साहजिकच कमी असतो. त्यापायी त्या हवेचं तापमानही घसरतं. अशा ठिकाणच्या जवळच, पण समुद्रसपाटीपासून फारश्या उंचीवर नसलेल्या ठिकाणची हवा विरळ नसते. ती तुलनेने दाट असते. त्यामुळे तिचा दाबही जास्त असतो. साहजिकच त्या हवेचं तापमानही जास्त असतं. उंचावरच्या ठिकाणाइतकं थंड नसतं. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*RTE - Right To Education*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा, तो स्वर्गाचे फुल बनवतो. - रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) २०२४ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) २०२४ चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?४) २०२४ चा साहित्याचे नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?५) २०२४ चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) व्हिक्टर अम्ब्रोस व गरी, अमेरिका २) जॉन जे. हॉपफिल्ड व जेफ्री ई. हिंटन ३) डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस व जॉन एम. जम्पर ४) हान कांग, दक्षिण कोरिया ५) निहोन हिदानक्यो, अध्यक्ष ( जपानची संस्था )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मोहन भुसेवार, शिक्षक, नांदेड👤 फारुख शेख, शिक्षक, लोहा👤 संजय कदम, चिकना👤 पृथ्वीराज राहेरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी । पावनत्व प्रौढी नाम तुझें ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांवा त्वां घेतली गजेद्रासी ॥२॥ उपमन्यालागीं आळी पुराविली । अढळपदीं दिधली वस्ती ध्रुवा ॥३॥ नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडुरंगा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःला कधीच कमी लेखू नये असे अनेकजण म्हणतात हे चांगल्यासाठी आहे. पण,दुसऱ्याला सुद्धा एवढेही कमी लेखू नये की, तीच वृती आपल्यात निर्माण होईल एकदा या प्रकारची वृती निर्माण झाली की, त्यातून अनेक बिमाऱ्या जन्माला येतात आणि त्यांचा प्रसार होतो.अशा बिचाऱ्या घातक ठरत असतात.म्हणून स्वतःला ही कमी लेखू नये व दुसऱ्याला सुद्धा कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये. कारण एक, एक सेंकदाला वेळ बदलत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••◇◇● धनाचा विनियोग ●◇◇एकदा एक कोल्‍हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्‍यावर त्‍याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्‍यावर एक वृद्ध नाग त्‍या धनाचे रक्षण करत होता. कोल्‍ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्‍ही इथे काय करता आहात.'' नाग म्‍हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्‍या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्‍हा पुन्‍हा म्‍हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्‍ही कधी त्‍याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्‍हणाला,'' कसं शक्‍य आहे, हे धन कमी होऊ नये म्‍हणून तर मी स्‍वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्‍याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्‍यातच मला जास्‍त आनंद आहे.'' हे ऐकून कोल्‍हा नागाला म्‍हणाला,'' मग नागदेवा, तुमच्‍या असल्‍या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्‍या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्‍यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''तात्‍पर्य - ज्‍या धनाचा योग्‍य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्‍या धनाचा मनुष्‍यमात्राला काहीच फायदा नाही.सौजन्य - https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑक्टोबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/bJPyDYG15tMf56rk/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✨ *_धम्मचक्र प्रवर्तन दिन_* ✨••••••••••••••••••••••••••••••••••• ✨ *_आंतरराष्ट्रीय मानक दिवस_* ✨•••••••••••••••••••••••••••••••••✨ *_ या वर्षातील २८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ✨ *_महत्त्वाच्या घटना:_* ✨••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर**१९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.**१९८१: अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्‍नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.**_१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला._**१९४७: चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत (ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले. याआधी मानवरहित उड्डाणे झाली होती.**१९३३: राष्ट्रसंघातुन (League of Nations) नाझी जर्मनीने अंग काढुन घेतले.**१९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली.**१९१२: मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे निवडणूक प्रचाराचे भाषण करत असताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर इसमाने खूनी हल्ला केला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्ट यांनी आपले भाषण पूर्ण केले.*✨ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ✨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९: पूनम राऊत -- आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी भारतीय खेळाडू**१९८१: गौतम गंभीर-- प्रसिद्ध क्रिकेटपटू, मुख्य प्रशिक्षक**१९७६: प्रा. डॉ. रणधीर शिंदे -- प्रसिद्ध लेखक**१९७६: विजयालक्ष्मी मनेकर -- कवयित्री* *१९७५: प्रशांत नामदेव ढोले -- कवी, लेखक**१९७०: विनिता श्रीकांत देशपांडे -- कवयित्री, लेखिका,अनुवादक**१९६१: प्रा. डॉ. नरेंद्र पाठक -- प्रसिद्ध लेखक**१९५८:व्यंकटेश बळवंत वाकडे -- कवी* *१९५६: विजया व्यंकटेश देशपांडे -- कवयित्री**१९५६: डॉ . दीपक बोरगावे -- कवी, लेखक**१९५५: उस्ताद शाहिद परवेझ – इटावा घराण्याचे सतारवादक**१९५२: डॉ. नीलिमा माधव गुंडी -- प्रसिद्ध भाषाभ्यासक, कवयित्री आणि लेखिका**१९४४: अरुण विनायक मांडे -- बालसाहित्यिक, कथा लेखक* *१९४३: डॉ.आण्णासाहेब हरी साळुंखे -- प्रसिद्ध लेखक, महाराष्ट्रातील विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक* *१९४०: डॉ. महादेव सदाशिव वाघ -- कवी, लेखक**१९३९: सुलभा निशिकांत ठकार -- गायिका व लेखिका**१९३६: सुभाष भेंडे – सुप्रसिद्ध मराठी लेखक (मृत्यू: २० डिसेंबर २०१० )**१९३२: पंडित दामोदर केशव दातार -- डीके दातार म्हणून लोकप्रिय, भारतीय व्हायोलिन वादक (मृत्यू: १०ऑक्टोबर२०१८ )**१९३२: मनोहर मारोतीराव तल्हार -- प्रसिद्ध मराठी लेखक (मृत्यू: १५ फेब्रुवारी २०१८ )**१९३२: द. पं. जोशी -- मराठी भाषेतील लेखक, पत्रकार (मृत्यू: ३० डिसेंबर २०११ )**१९३१: निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (मृत्यू: २७ जानेवारी १९८६ )**१९३०: डॉ.मधुसूदन अनंत चान्सरकर-- नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, अर्थतज्ञ, लेखक (मृत्यू: १९ मे २०२० )**१९२७: रॉजर मूर – जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता (मृत्यू: २३ मे २०१७ )**१९२४: वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९७ )**१८९२: विष्णू गोविंद दामले -- कलादिग्दर्शक, ध्वनिमुद्रक, निर्माता, दिग्दर्शक(मृत्यू: ५ जुलै १९४५)**१८९०: ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ मार्च १९६९ )**१८८२: इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष  (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७५ )**१७८४: फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा (मृत्यू: २९ सप्टेंबर १८३३ )**१६४३: बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट (मृत्यू: २७ फेब्रुवारी १७१२ )* ✨ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ✨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: मनोहर म्हैसाळकर- विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि कुशल संघटक, व्यवस्थापक (जन्म: १ ऑगस्ट १९३२ )**२०१३: मोहन धारिया –माजी केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: १४ फेब्रुवारी१९२५ )**२००५: द्वा.भ. कर्णिक -- महाराष्ट्र टाइम्सचे पहिले संपादक (जन्म: १४ जानेवारी १९०८ )**२००४: दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच,भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक(जन्म: १० नोव्हेंबर१९२० )**१९९९: ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १३ एप्रिल १९२२ )**१९९८: डॉ.भालचंद्र पंढरीनाथ बहिरट – वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व संशोधक(जन्म: ५ सप्टेंबर १९०४ )* *१९९७: हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: २१ मे १९१६ )**१९९४: सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार,(जन्म: २७ ऑगस्ट १९१० )**१९९३: लालचंद हिराचंद दोशी – वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष, पद्मश्री (१९९२) (जन्म: १९०४ )**१९९०: डॉ. अ. ना. देशपांडे -- विदर्भातील सुप्रसिद्ध लेखक, मराठी वाड्:मय इतिहासकार (जन्म: १२ मार्च १९१५ )**१९५३: रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन यांसाठी प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत,महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (जन्म: १४ जानेवारी १८८२ )**१९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – दहा नाटके, आठ कादंबर्‍या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ. त्यांची साहित्यसंपदा आहे.(जन्म: २४ ऑगस्ट १८७२ )**१९४४: एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (जन्म: १५ नोव्हेंबर १८९१ )**१९१९: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती (जन्म: ३० जुलै १८५५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••*आपली कामे आणि आपण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या तीन आफ्रिकी देशाच्या दौऱ्यावर रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियोजित मराठी भाषा भवन इमारतीचे भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मंत्री बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली, सोशल मीडियावर केली पोस्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार, पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशभरात RTI च्या ४ लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित, तर राज्यातील १ लाख केसेस रखडलेल्या स्थितीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे सामान्यांना दिलासा मिळाला - आयुष्यमान भारत मिशनचे राज्य प्रमुख ओमप्रकाश शेटे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला हरवून ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या आरोग्यासाठी टिप्स*- आहारामध्ये दही, दूध, दाळ. हिरव्या भाज्या यांचा उपयोग करा. वेगवेगळे पदार्थ ताटात असू द्या. - जेवन बनवण्यासाठी सोयाबिन, सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. - जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा. - रात्रीचं जेवन हलकं आणि ८ वाजेच्या आत झालं तर उत्तम. - झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.- मेडिशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी याला ३० मिनिटं द्या.- वयाच्या ४० वर्षानंतर नियमित चेकअप करा. औषध दिली असतील तर नियमित घ्या. त्यामध्ये अडथळा येऊ देणं टाळा. मनोरंजनाच्या गोष्टी करा.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ISRO - Indian Space Research Organisation*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहण यात जीवनाची सार्थकता आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक कोण होते ?२) २०२४ साली कोणत्या पाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला ?३) साहित्यासाठी नोबेल जाहीर झालेल्या पहिल्या आशियाई महिला कोण ?४) 'भू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) दीक्षाभूमी नागपूर येथे नुकताच कितवा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला ? *उत्तरे :-* १) डॉ. केशव बळीराम हेडगेवार २) मराठी, बंगाली, पाली, प्राकृत, आसामी ३) हान कांग, दक्षिण कोरिया ४) जमीन, धरा, भूमी, धरणी, धरित्री ५) ६८ वा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मिलिंद जाधव, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, नांदेड👤 डॉ. भास्कर पेरके, नांदेड👤 गणेश सिरमेवार, शिक्षक, धर्माबाद👤 शिवशंकर संगमवार👤 सतिश उशलवार👤 मुरलीधर थोटे👤 रत्नाकर सोनवणे👤 अमोल मोरे👤 स्वप्नील वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपत्याचें हित किजे त्या जनकें । जरी वेडें मुकें जालें देख ॥१॥ तैसें मी पोसणें तुझें जिवलग । अंतरींची सांग खूण कांहीं ॥२॥ राखीन मी नांव तुझें सर्वभावें । चित्त वित्त बळी देईन पायीं ॥३॥ जरी दैवहीन म्हणसी मजला । तरी लाज कवणाला म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट व संघर्ष करून सुद्धा ज्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात ते दुसऱ्यांदा कोणाच्याही मागे धावण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही. कारण हे सर्व करण्या आधी ते,स्वतः मध्येच सर्व काही शोधून बघितलेले असतात. म्हणून इतर गोष्टींविषयी त्यांना आकर्षन नसते. आपणही आधी स्वतः मध्ये शोधून बघण्याचा प्रयत्न करून बघावे इकडे, तिकडे शोधण्याची किंवा कोणाच्याही मागे धावण्याची आवश्यकता पडणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••○ .. विजय असो .. ○एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्‍न करायचे यावरून त्‍या दोघांत खूप भांडणे झाली व त्‍याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्‍या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले. मारामारीत दोघांचेही अंग रक्‍तबंबाळ झाले, त्‍यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्‍याने सरळ पळून जाऊन आपल्‍या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले. भांडणात खुराड्याच्‍या बाहेर असलेल्‍या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्‍याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्‍या कोंबडीकडे बघून ''मी जिंकलो, मी जिंकलो'' असे ओरडू लागला, स्‍वत:चाच जयघोष करू लागला. तेवढ्या वरून एक गरूड आला व त्‍याने त्‍या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्‍याने त्‍याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्‍यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्‍हा तो कोंबडा कोंबडीला म्‍हणाला, ''मी जर बाहेर राहिलो असतो तर त्‍या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.''तात्‍पर्य - ज्‍याच्‍या डोक्‍यात यशाची हवा चढते तेव्‍हाच त्‍याच्‍या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्‍ट आहे.सौजन्य - https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 ऑक्टोबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*लेख - जीवन सुंदर आहे*Link - https://www.facebook.com/share/p/hLSJmD7ntDSDg63T/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_ या वर्षातील २८५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: प्रासंगिक लेखन करणाऱ्या बुजुर्ग ब्रिटिश लेखिका डोरीस लेसिंग यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर* *२००१: ’पोलरॉईड कार्पोरेशन’ने दिवाळखोरी जाहीर केली.**२००१: सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस आहे.**१९६४: टोकियो येथील १८व्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला हॉकीचे सुवर्णपदक**१८५२: ’युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ ची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: हार्दिक पांड्या -- आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रिकेट खेळाडू**१९७३: प्रा. डॉ. सुनंदा मारोतराव चरडे -- लेखिका* *१९७२: संजय बापूसाहेब बांगर -- भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेट खेळाडू**१९७०: डॉ.संजय बोरुडे -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक**१९६८: अलका गोविंद पितृभक्त -- लेखिका**१९६८: चंद्रचूड सिंग -- भारतीय अभिनेता**१९६८: प्रा. डॉ. जगदीश सदाशिव आवटे -- प्रसिद्ध लेखक**१९६२: माधव अभ्यंकर -- मराठी चित्रपटांमधील व मालिकांमधील अभिनेता**१९५७: डॉ.अरुण गद्रे -- प्रसिद्ध पुरस्कार प्राप्त कादंबरीकार तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर**१९५७: डॉ.केशव श्रीपाद साठये -- इंग्रजी व मराठी मध्ये लेखन करणारे प्रसिद्ध लेखक**१९५३: अनिल कांबळे -- नामवंत मराठी गझलकार, कवी (मृत्यू: १ ऑगस्ट २०१९ )**१९५१: मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक**१९४६: विजय भटकर – सुप्रसिद्ध भारतीय संगणक शास्त्रज्ञ, संगणकतज्ञ, संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे**१९४४: डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर --- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, झाडीबोलीचे अभ्यासक, संशोधक विविध पुरस्काराने सन्मानित, निवृत्त शिक्षणाधिकारी**१९४३: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ११ आक्टोबर १९९६ )**_१९४२: अमिताभ बच्‍चन -- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त_**१९३९: शरद गोविंद साटम -- कवी* *१९३८: लिलाधर महादेवराव सोनोने (ललित सोनोने)-- सुप्रसिद्ध गझलकार (मृत्यू: १ फेब्रुवारी २०२१ )**१९३२: सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२ )**१९३१: सुहास भालेकर -- मराठी अभिनेते, दिग्दर्शक (मृत्यू: २ मार्च २०१३ )**१९३०: बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक(मृत्यू: ९ एप्रिल २००१ )**१९३०: कमलिनी रघुनाथ देशपांडे -- कवयित्री**१९१६: चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक लोकसभा व राज्यसभा सदस्य,पद्मविभूषण.(मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१० )**१९१६: रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री (मृत्यू: ३ जून १९९७ )**१९१३: प्र. के. तारे -- निवृत्त मुख्य न्यायाधीश तथा लेखक**१९०२: ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ )**१९८९: नारायण गंगाधर लिमये-- बालसाहित्यिक (मृत्यू: १ डिसेंबर १९७३ )**१८७६: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार.(मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२: दीना पाठक – अभिनेत्री (जन्म: ४ मार्च १९२२ )**१९९९: रमाकांत कवठेकर – ’नागीण’, ’आघात’, ’पंढरीची वारी’ यांसारख्या पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक**१९९७: विपुल कांति साहा – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य**१९९६: कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ आक्टोबर १९४३ )**१९९४: दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर – उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९८४: खंडेराव मोरेश्वर रांगणेकर -- भारतीय क्रिकेट खेळाडू ( जन्म: २७ जून १९१७ )**१९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर, ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध (जन्म: ३० एप्रिल १९०९ )**१८८९: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (जन्म: २४ डिसेंबर १८१८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.... अवनी चतुर्वेदी ......स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी ही मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यातील एक भारतीय वैमानिक आहे. *तिला भारतातील पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणून घोषित करण्यात आले*, त्यांच्या दोन सहकारी मोहना सिंग जितरवाल आणि भावना कांथ यांच्यासोबत २०१६ मध्ये या तिघांना भारतीय वायुसेनेच्या लढाऊ तुकडीमध्ये सामील करण्यात आले होते. त्यांना राष्ट्रसेवेसाठी १८ जून २०१६ रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी औपचारिकपणे नियुक्त केले होते.ऑक्टोबर २०१५ मध्येच भारत सरकारने महिलांसाठी लढाऊ प्रवाह उघडण्याचा निर्णय घेतला. चतुर्वेदी यांच्या यशामुळे भारताला ब्रिटन, अमेरिका, इस्रायल आणि पाकिस्तान या देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे, जेथे महिलांना लढाऊ विमाने उडविण्याची परवानगी आहे. अवनीचा जन्म २७ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला. तिचे वडील दिनकर चतुर्वेदी हे मध्य प्रदेश सरकारच्या जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता आहेत आणि तिची आई घर बनवणारी आहे. तिने शालेय शिक्षण मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील देओलंड या छोट्याशा गावातून पूर्ण केले. २०१४ मध्ये बनस्थली युनिव्हर्सिटी,  राजस्थानमधून तिची बॅचलर इन टेक्नॉलॉजी पूर्ण करून ती कॉलेजच्या फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाली ज्याने तिला उड्डाण करण्यास आकर्षित केले. तिने AFCAT उत्तीर्ण केले आणि पुढे AFSB ने शिफारस केली.चतुर्वेदी यांना बुद्धिबळ, टेबल टेनिस खेळायला आणि स्केचिंग आणि पेंटिंग करायला आवडते.अवनीचा मोठा भाऊ, जो भारतीय लष्करात अधिकारी आहे, त्याने तिला भारतीय वायुसेनेत जाण्यासाठी प्रेरित केले. तिला तिच्या कॉलेज बनस्थली विद्यापीठाच्या फ्लाइंग क्लबमध्ये काही तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे . तिची वायुसेना अकादमीत  प्रशिक्षणासाठी निवड झाली आणि वयाच्या २५ व्या वर्षी तिने प्रशिक्षण पूर्ण केले. पुढील प्रशिक्षणानंतर चतुर्वेदी जून २०१६ मध्ये फायटर पायलट बनले. २०१८ मध्ये चतुर्वेदी मिग-21 मध्ये एकट्याने उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला वैमानिक ठरली . २०१८ मध्ये अवनीला फ्लाइट लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. २०२३ मध्ये, तिने जपानमध्ये केलेल्या हवाई युद्ध गेममध्ये भाग घेणारी ती भारतीय हवाई दलाची पहिली महिला लढाऊ वैमानिक बनली. चतुर्वेदी हे भारतीय वायुसेना क्रमांक २३ स्क्वॉड्रन पँथर्समध्ये सुरतगड , राजस्थान येथे तैनात आहेत.२०१८ मध्ये, तिला बनस्थली विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले .९ मार्च २०२० रोजी, चतुर्वेदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अवनी चतुर्वेदीने नोव्हेंबर २०१९ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट विनीत चिकारासोबत लग्न केले.संकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार द. कोरियाच्या लेखिका हान कांग यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र उद्योग भवनास दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन, वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात झाले अंतिम संस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा:याचिकेवरील सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली, राज्य सरकारलाही दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने केली निवृत्तीची घोषणा, यंदाचा डेव्हिस कप खेळून टेनिसमधून निवृत्त होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुलतानच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाची धुलाई, इंग्लंडच्या पहिल्या डावात 823 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रागावर नियंत्रण ठेवण्याचे काही टिप्स*जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल, तर त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात 10 पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना सुरू ठेवा. आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. यामुळे तुमचा राग तर शांत होईलच. पण, त्या बरोबर विचार करण्यास वेळ मिळेल. जर तुम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल, तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जा आणि शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसून येईल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा तसे वाटत नसेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा.प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो. प्राणायाममुळे मन केंद्रीत करण्याचा सराव होतो. तसेच श्वास केंद्रित करण्याचा सराव होतो. त्यामुळे राग कमी होण्यास मदत होते. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चांमुळे तुमचा कमी होऊ शकतो.कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते. त्यामुळे राग लवकर फार लवकर येऊ शकतो. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदू शांत असणे फार जरूरी आहे. त्याकरता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामुळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार सक्षम होतो. किमान 7 ते 8 तासांची झोप मानवी शरीरासाठी आवश्यक असते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*GPRS - General Packet Radio Service*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिस्त, कार्यक्षमता आणि तत्परता या तीन गोष्टी वाढल्यानंतरच कर्तबगारी वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दीपा कर्माकर यांनी नुकतेच कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे ?२) मराठीला अभिजात भाषेचा दर्जासाठी राज्य सरकारने कोणत्या साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली ?३) केंद्र सरकारने नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचे कोणत्या नवीन नावाला मंजुरी दिली आहे ?४) 'भान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'भारत भवन' हे कला दालन कोणत्या राज्यात आहे ? *उत्तरे :-* १) जिमनॅस्टिक २) १० जानेवारी २०१२ ३) अहिल्यानगर ४) शुद्ध, जागृती ५) मध्यप्रदेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 रवीकुमार सितावार, धर्माबाद👤 संदीप बोंबले👤 विजय केंद्रे👤 अजय वाघमारे👤 प्रवीण वाघमारे, धर्माबाद👤 सुमीत बोधने*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी । पुराणीं हे थोरी ऐकियली ॥१॥ ऐकोनियां कीर्ति आलों तुजपाशीं । निवारी दुःखासी केशिराजा ॥२॥ त्रितापें तापलें दुःखें आहाळलों । कासाविस जालों दायासिंधू ॥३॥ तुजवीण आतां कोणातें मी सांगूं । तोडि हा उद्वेगु नारारणा ॥४॥ नामा म्हणे आतां नको पाहूं अंत । उद्धरीं त्वरित पांडुरंगा ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणतेही कार्य करताना मनात नि:स्वार्थ भावना असेल तर त्यातून विशेष समाधान मिळत असते. सोबतच ते, कार्य समृद्ध होत असतात असे कार्य करणाऱ्या व्यक्तीला जरी सन्मान दिला नाही तरी त्याचे कार्य व त्याच्यात असलेली माणुसकी हीच खरी त्याची ओळख असते. अशा व्यक्तिमत्वाची ओळख त्याच्या कार्यातून होत असते.टिका टिप्पणी केल्याने किंवा डावलल्याने त्याचे अस्तित्व मिटत नाही🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••●●● सेवा हाच धर्म ●●●एका पत्रकारांनी स्‍वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्‍वामी विवेकानंदांना भेटून त्‍यांच्‍याकडून चार ज्ञानाच्‍या गोष्‍टी शिकाव्‍यात अशी त्‍यांची तीव्र इच्‍छा होती. त्‍या पत्रकारांचे दोन मित्र त्‍यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्‍वामी विवेकानंदांचा उल्‍लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्‍याचे ठरविले. तिघेही मिळून स्‍वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्‍थेने विचारपूस केली. यादरम्‍यान स्‍वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्‍या काळात पंजाबात दुष्‍काळ पडलेला होता. त्‍यांनी त्‍यासंदर्भात चर्चा केली. दुष्‍काळग्रस्‍तांसाठी चाललेल्‍या मदतकार्याची माहिती घेतली. त्‍यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्‍यानंतर तिघेही निघाले. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्‍हणाले,''स्‍वामीजी, आम्‍ही तुमच्‍याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्‍ही मात्र सामान्‍य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्‍हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.'' या स्‍वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,'' मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्‍यापेक्षा त्‍याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्‍त महत्‍वाचे आहे. ज्‍याचे पोट भरलेले नाही त्‍याला धर्मोपदेश देण्‍यापेक्षा भाकरी देणे हे महत्‍वाचे आहे. रिकाम्‍या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.सौजन्य - ''https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 ऑक्टोबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*मतदार जागृती आवश्यक*Link - https://www.facebook.com/share/p/qa4uuc35yRyx1QLW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🍥 *_जागतिक मानसिक आरोग्य दिन_* 🍥•••••••••••••••••••••••••••••🍥 *_ जागतिक मृत्यू दंड विरोधी दिन_*🍥••••••••••••••••••••••••••••🍥 *_ या वर्षातील २८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🍥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🍥••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७५:पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९६४: जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९६०: विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९५४: आचार्य अत्रे निर्मित 'श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.**१९४४: दुसरे महायुद्ध – ज्यूंचे शिरकाण - ८०० जिप्सी बालकांना ऑस्विच छळछावणीत ठार करण्यात आले.**१९४२: सोविएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.**१९१३: पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.* 🍥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🍥•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: अतिरेक मेश्राम -- कवी**१९८९: मनस्वी ममगाई -- भारतीय अभिनेत्री, मॉडेल**१९८३: अजय भगवान भामरे -- कवी**१९७९: राहुल देशपांडे -- लोकप्रिय हिंदुस्तानी संगीतातील गायक**१९७९: दीपक शांताराम पवार -- कवी**१९७८: ज्योती मनोज मुळ्ये -- लेखिका* *१९७७: श्रीराम सारंगधर वाघ -- कवी, लेखक**१९७६: डॉ. केशव खटींग -- कवी* *१९७३: शिवराज किसनराव पारधे -- कवी* *१९७३: कोडुरी श्रीशैला श्री राजामौली उर्फ एस. एस. राजामौली -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७१: कमाल अहमद खान -- कवी, लेखक, संपादक**१९६७: प्रा. डॉ. विजय मारोतराव सोरते -- कवी, लेखक* *१९६६: दशरथ यशवंत झनकर -- कवी**१९६१: महेश नामदेव कराडकर -- कवी, लेखक**१९६१: किरण राजाराम जोशी -- कवी* *१९५६: बाजीराव सखाराम पठाडे -- कवी, लेखक**१९५४: डॉ.सुहास बहुकार -- प्रसिद्ध चित्रकार आणि कलेचे इतिहासकार व लेखक* *१९५४: रेखा – प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री**१९५४: प्रतिमा इंगोले -- प्रसिद्ध मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका**१९५३: सुरेश माणिकराव कुलकर्णी -- लेखक, विचारवंत**१९४८: मोहन मदवाणणा -- प्रसिद्ध लेखक**१९४४: वैशाली चंद्रकांत पांढरीपांडे -- लेखिका* *१९४४: निशिकांत देशपांडे -- प्रसिद्ध कवी लेखक, गझलकार (मृत्यू: २९ सप्टेंबर २०२२ )* *१९४२: भास्कर आर्वीकर- - ग्रंथप्रेमी, लेखक**१९३७: अनंत दत्तात्रय भावे -- जेष्ठ बालसाहित्यिक* *१९३५: डॉ. कृष्ण माधव घटाटे-- चरित्रकार, संपादक, लेखक* *१९३३: हरी गणपत देशमुख -- लेखक तथा निवृत्त गटशिक्षणाधिकारी**१९२९: उ. रा. गिरी --- प्रसिद्ध गझलकार,कवी (मृत्यू: ५ सप्टेंबर १९८६ )**१९१६: डॉ.लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या,मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक (मृत्यू: २० मे १९९२ )**१९१०: डॉ.द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (मृत्यू: ९ डिसेंबर १९४२ )**१९०९: क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ )**१९०६: रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू: १३ मे २००१ )**१९०२: के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (मृत्यू: ९ डिसेंबर १९९७ )**१८९९: कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते. (मृत्यू: २२ मे १९९१ )**१८७१: शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त,समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक(मृत्यू: २३ एप्रिल १९५८ )**१८४४: बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष (मृत्यू: १९०६ )**१७३१: हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१० )* 🍥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🍥•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०: निर्मला उतरेश्वर मठपती-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका(जन्म: ३०ऑक्टोबर १९४८ )**२०१८: पंडित दामोदर केशव(डी.के.) दातार -- भारतीय व्हायोलिन वादक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३२ )**२०११: जगजीतसिंग – गझलगायक (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१ )**२००८: रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४ )**२००६: सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (जन्म: ४ आक्टोबर १९१३ )**२०००: सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. (जन्म: १७ एप्रिल १९१६ )**१९८३: रुबी मायर्स ऊर्फ ’सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री,दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या (१९७३) (जन्म: १९०७ )**१९६४: वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक,निर्माते आणि अभिनेते.(जन्म: ९ जुलै १९२५ )**१८९८: मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक (जन्म: २६ सप्टेंबर १८५८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.... दुर्गाबाई कामत ....१९०० च्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना चित्रपट किंवा रंगभूमीवर काम करण्यास मनाई होती. त्या काळात नाटकात काम करणाऱ्या महिलांना हीन दृष्टीने पाहिले जात असे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना आपल्या पहिल्या चित्रपटात म्हणजे 'राजा हरिश्चंद्र' मध्ये महिला कलाकाराच्या भूमिकेसाठी पुरुष कलाकारांचा वापर करावा लागला. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची पत्नी राणी तारामतीची भूमिका अण्णा हरी साळुंखे या पुरुष अभिनेत्याने साकारली होती. साळुंखे यांनी धार्मिक भावनेपोटी आपली मिशी काढण्यास नकार दिला होता. चित्रपटात त्यांची मिशी दिसून येऊ नये म्हणून दादासाहेब फाळके यांना खूप काळजी घ्यावी लागली होती.इ.स. १९०३ मध्ये दुर्गाबाई कामत या आपल्या पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. त्यावेळेस त्यांची मुलगी कमला, ज्या लग्नानंतर कमलाबाई रघुनाथराव गोखले या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या, त्यासुद्धा त्यांच्या बरोबर राहात असत. आपला चरितार्थ भागवण्यासाठी दुर्गाबाई आणि कमला या दोघी मेळा आणि जत्रेत गाणी गाणे व विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या नाटकात काम करत असत. त्यानंतर दुर्गाबाई रंगमंचाशी जोडल्या गेल्या आणि त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीस योग्य ती सुरुवात झाली.दादासाहेब फाळके यांनी इ.स. १०१३ मध्ये 'मोहिनी भस्मासूर' या आपल्या दुसऱ्या मूकपटाची निर्मिती केली. या दुसऱ्या चित्रपटात त्यांनी महिला कलाकारांना घेण्याचे ठरवले. दुर्गाबाई कामत यांनी या चित्रपटात देवी पार्वतीची छोटी भूमिका केली. अशा प्रकारे दुर्गाबाई भारतीय चित्रपटात काम करणारी पहिली महिला अभिनेत्री बनल्या. त्यांची मुलगी कमलाबाई गोखले यांनी त्याच चित्रपटात बाल कलाकार म्हणून मोहिनीची भूमिका साकारली होती. या दोघी माय-लेकी यांच्या या कामामुळे चित्रपटात आणि नाटकात काम करण्याकरिता भारतीय महिलांना मोठे प्रोत्साहन मिळाले. दुर्गाबाई कामत यांचे नातू (आणि कमलाबाईंचा मुलगा) ज्येष्ठ मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले हे होते. चंद्रकांत गोखले तसेच त्यांचा मुलगा विक्रम गोखले यांनीसुद्धा त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.संकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मोदी सरकारचे देशातील जनतेला दसरा भेट, तब्बल चार वर्षे मिळणार मोफत धान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उद्योगपती रतन टाटांची प्रकृती गंभीर, मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अती दक्षता विभागात उपचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राष्ट्रीय पोषण महिन्यात उत्कृष्ठ कामगिरी, हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्याहून मोठ्या विमानांचे उड्डाण शक्य, पुणे विमानतळाचा ओएलएसचा अहवाल सकारात्मक, केंद्रीय ⁠राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बौध्द लेणींच्या संवर्धनासाठी 15 तारखेला आंदोलन:समाजाच्या विविध मागण्यांसाठी शेकडो बौध्द बांधव आंदोलनात होणार सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T20 सामन्यात भारताने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव करत मालिका 2-0 ने जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर आणि निरोगी केसांसाठी काही टिप्स*● केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात, म्हणून दररोज आहारात किमान 45 ग्रॅम प्रथिने घ्या. ● प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ होतात. तसेच ते निस्तेज होतात व गळतात. ● झिंकच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यासाठी आहारात नट्स, अक्रोड, पेकान, काजू आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.● तसेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, सॅलड्स घ्या. व भरपूर प्रमाणात पाणी प्या.● ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे सेवन वाढवल्याने केसांची मुळे आणि सेबेशियस ग्रंथी उत्तेजित होऊ शकतात.● तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला जास्त वेळेला केस धुण्याची गरज असते. आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा व शक्यतोवर ऑरगॅनिक उत्पादनांचा वापर करा.● केसांसाठी योग्य शॅम्पू निवडा. चुकीचे शॅम्पू आणि स्टाइलिंग एजंट वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. ● दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. केस धुताना खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरणे टाळा.● केस ओले असताना हळूवारपणे हाताळा कारण ते ओले असताना तुटण्याची शक्यता जास्त आहे.● केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आपल्या टाळूला नियमितपणे मालिश करा.● केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी – प्रत्येक 10 ते 12 आठवड्यांनी नियमितपणे केसांना खालून कट द्या.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*PMO - Prime Minister's Office*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनरुपी समुद्रात पुस्तके दीपगृहाचे काम करतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?२) सन २००८ साली कोणत्या दोन भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला ?३) नाग भूषण अवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने २०२४ च्या नाग भूषण अवॉर्डसाठी कोणाची निवड करण्यात आली आहे ?४) 'भार' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगातील सर्वात मोठी रामलीला कोठे रंगवण्यात येते ? *उत्तरे :-* १) डॉ. तारा भवाळकर २) कन्नड, तेलुगु ३) मनोज पांडे, माजी सेनाध्यक्ष जनरल ४) ओझे ५) अयोध्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 संतोष खेडकर, शिक्षक, धर्माबाद👤 राजेश्वर भुरे, टीचर, आर्ट ऑफ लिव्हिंग👤 राजेंद्र वाघमारे👤 श्याम देसाई👤 विशाल अन्नमवार, देगलूर👤 पोतन्ना चंदेवाड👤 सतिश बोधनकर, धर्माबाद👤 विठ्ठल धुळेकर, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 कैलास सांगवीकर👤 प्रभू पाटील कदम👤 शरद घुबे👤 प्रमोद यादव👤 श्रीकांत पाटील शिंदे👤 तानाजी पाटील👤 शंकर बत्तीनवार👤 तुकाराम डोळे👤 राम गायकवाड👤 वसंत पाटील कदम👤 विनोद लोणे👤 अरुण शंखपाळे👤 रोहित हिवरेकर👤 गंगाधर पापुलवार👤 राज वजीरे👤 सतीश बड्डेवाड👤 रेखा अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें ॥१॥ आपुलें ब्रीद साच करी । येक वेळा भेटी दे गा मुरारी ॥२॥ पतित पतित म्हणती मातें । पतितपावन म्हणती तूतें ॥३॥ नामा म्हणे ऐकें सुजान । नाइकसि तरि लाज कवणा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चळवळ उभारणे चांगले आहे. त्या चळवळीतून इतरांना नवी दिशा मिळत असेल तर त्या चळवळीचे महत्व कायम राहत असते. पण, याच चळवळी जेव्हा विघातक बनतात व दुसऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात.तेव्हा मात्र चवळीच्या उद्देशाला हरताळ फासला जातो.होऊन गेलेल्या महाविभूतींनी उभारलेल्या चळवळीच्या माध्यमातून समाजाला नेहमीच प्रेरित केले. त्यांच्याकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••○● मूर्खांचे निष्‍कर्ष ●○एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्‍याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्‍या शोधाची माहिती सांगू लागला की '' सूर्य प्रचंड उष्‍ण तारा असूनही त्‍यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्‍ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्‍वीवर आला तर पृथ्‍वीचे काय होईल हे पहा.'' खगोलशास्‍त्रज्ञाच्‍या या बोलण्‍यावर काही लोकांचा खरेच विश्‍वास बसला व त्‍यांच्‍यापैकी काही लोकांनी त्‍याचा सत्‍कार करण्‍याचे ठरविले. पण जमलेल्‍या काही लोकांपैकी एक जण चिकित्‍सक होता त्‍याने त्‍या ज्‍योतिष्‍याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्‍याने ती दुर्बिण तपासली असता त्‍याच्‍या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्‍या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्‍हणजे महाकाय प्राणी असल्‍याचा भास होत होता. चिकित्‍सक माणसाने ही गोष्‍ट लोकांना सांगताच त्‍यांना शास्‍त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.तात्‍पर्य :- जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्‍यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑक्टोबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*पर्यटकांनी जबाबदारीने वागावे*Link - https://www.facebook.com/share/p/9CFfyw9S5aHDyzQi/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔵 *_जागतिक टपाल दिन_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••🔵 *_ या वर्षातील २८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.**१९६२: युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०: विद्याधर गोखले यांच्या ’पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१८०६: प्रशियाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: श्रीरंजन आवटे -- लेखक* *१९९०: लखन माणिक जाधव -- कवी, लेखक**१९८८: डॉ. शिवप्रसाद मीननाथ घोडके -- कवी**१९८१: शशिकला गणपती गुंजाळ -- कवयित्री**१९७८: दुर्गेश सोनार -- कवी**१९६९: हिंमत ढाळे - व-हाडी कवी**१९६५: मोनिका अभिजित गजेंद्रगडकर -- प्रसिद्ध कथाकार**१९६४: प्रा. डॉ. ईश्वर केशवराव सोमनाथे -- लेखक* *१९५८: गोकुळ धनाजी वाडेकर -- कवी, लेखक* *१९५८: भुजंग मेश्राम -- प्रसिद्ध कवी, लेखक ( मृत्यू:२७ ऑगस्ट २००७)**१९५६: प्रदीप दाते -- अध्यक्ष, विदर्भ साहित्‍य संघ, नागपूर* *१९५२: रेखा खराबे -- कवयित्री, लेखिका**१९५२: डॉ. नितीन राऊत -- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा लेखक**१९५०: प्रा. सुबोध वसंतराव बल्लाळ -- लेखक**१९४९: डॉ. सुधाकर शंकर बेंद्रे --- प्रसिद्ध लेखक**१९४५: अमजद अली खान -- प्रसिद्ध सरोद वादक, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९४५: पंडित माधवराव हिंगे -- कवी* *१९४५: सुमिता सन्याल -- भारतीय अभिनेत्री (मृत्यू: ९ जुलै २०१७ )**१९४४: झाहिदा हुसेन -- अभिनेत्री**१९४३: प्रा. प्रकाश कामतीकर -- पत्रकार, संपादक, चित्रकार, लेखक* *१९४२: उज्ज्वला अनंत केळकर --प्रसिद्ध कवयित्री लेखिका अनुवादक**१९४२: देविदास सखाराम चव्हाण -- लेखक**१९३९: मधुकर भावे -- महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते**१९३९: महेश एलकुंचवार -- सुप्रसिद्ध नामवंत नाटककार व प्रतिभावंत लेखक**१९३५: रवी परांजपे -- चित्रकार,बोधचित्रकार, लेखक (मृत्यू: ११ जून २०२२ )* *१९३०: डॉ. वसंत सखाराम जोशी -- प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक (मृत्यू: १६ नोव्हेंबर २०१७ )* *१९११: दत्तात्रय विनायक गुप्ते -- लेखक**१८९३: शिवराम श्रीपाद वाशीकर --- कथा-पटकथा-संवादलेखक (मृत्यू: २३ जून १९६१ )**१८७७: पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते,स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक (मृत्यू: १७ जून १९२८ )**१८७६: पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक (मृत्यू: ४ जून १९४७ )**१८५२: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १५ जुलै १९१९ )**१७५७: चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६ )* 🔵 *_ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९: अरुण काकडे -- ज्येष्ठ रंगकर्मी, ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: १९ जानेवारी १९३२ )**२०१५: रवींद्र जैन -- हिंदी चित्रपटांचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार(जन्म: २८ फेब्रुवारी १९४४ )* *१९१५: एन. रामाणी -- भारतीय कर्नाटक बासरीवादक (जन्म: १५ ऑक्टोबर १९३४ )**२००८: प्राचार्य डॉ. सदाशिव रामचंद्र ऊर्फ स. रा. गाडगीळ -- मराठीतील समीक्षक तसेच भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक (जन्म: ८ ऑगस्ट १९१६ )**१९९९: अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी.(जन्म: १८ सप्टेंबर १९१५ )**१९९८: जयवंत पाठारे –गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक (Cinematographer)(जन्म: ८ नोव्हेंबर १९२१ )**१९८९: विद्याधर गंगाधर पुंडलिक -- मराठीतील एक प्रतिभावान लेखक (जन्म: १३ डिसेंबर १९२४ )* *१९८७: गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (जन्म: २४ जून १९०८ )**१९५५: गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार,नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार (जन्म: ५ जून १८८१ )**१९१४: विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्‌मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्‌मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्‍नास पुस्तके प्रसिद्ध झाली.(जन्म: २५ फेब्रुवारी १८४० )**१८९२: रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार.(जन्म: १८ फेब्रुवारी १८२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*पहिली भारतीय महिला अंतराळवीर - कल्पना चावला17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. 1984मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली. 22 मिनिटांत कोलंबिया यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं तो दिवस होता 1 फेब्रुवारी 2003.तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं त्यात कल्पना चावला यांचा ही समावेश होता.संकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवत हॅट्ट्रिक साधली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात 10 ऑक्टोबरला जन आक्रोश मोर्चा:महिला व दलित अत्याचाराच्या निषेधार्थ निघणार मोर्चा, अविनाश बागवे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर - जिल्ह्यातील हरोली येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वातील आघाडीचा विजय, ओमर अब्दुल्ला हेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे : गरबा किंग म्हणून पुण्यात प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी यांचा चाकण भागात एका कार्यक्रमात गरबा खेळतानाच हृदयविकाराने मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कुस्तीपटू विनेश फोगट बनली आमदार, भाजपाच्या योगेश कुमारचा केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजचा रंग - निळा*- निळा रंग - हा शांतीचा निदर्शक आहे. शीतलता आणि स्निग्धता हे या रंगाचं वैशिष्ट्य आहे. हा रंग सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली यांची अनुभूती मिळते. - हा रंग ज्यांना प्रिय असतो, ती माणसं स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्धाळू, सौंदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात. आपण बरं की आणि आपले घरदार बरे असा यांचा स्वभाव असतो. - वातविकारांच्या लोकांसाठी हा रंग लाभदायक ठरु शकतो. हा रंग स्वयंपाक घर, किचनमध्ये वापरणे टाळा.- हा रंग शनी, राहू, केतूचे प्रतिनिधित्व करतो. यामध्ये क्रौर्य सामावलेले असते. हा रंग न्यायाचे प्रतीक आहे. हा रंग रात्री शांत आणि दिवसा उग्र असून तमोगुणी असतो. शनीची साडेसाती किंवा अडीच वर्षांच्या काळात या रंगाचे कपडे वापरू नयेत. - निळा रंग मेंदूविकार, ताप आदी आजारांवर गुणकारी. कोणत्याही प्रकारच्या वेदनांवर गुणकारी. - मकर आणि कुंभ राशींना निळा, आकाशी रंग फायदेशीर ठरतो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*PEN - Permanent Education Number*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'पाणी पंचायत'* ही संकल्पना कोणी विकसित केली ?२) अभिजात भाषेचा दर्जा भारतातील सर्वात प्रथम कोणत्या भाषेला देण्यात आला ?३) भारतीय प्रबोधनाचे जनक कोणाला मानले जाते ?४) 'भरवसा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) OPD चा फुल फार्म काय आहे ? *उत्तरे :-* १) विलासराव साळुंखे ( पुण्याचे पाणी बाबा ) २) तामिळ ( २००४ ) ३) राजा राममोहन रॉय ४) विश्वास, खात्री ५) Out Patient Department*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 नागनाथ बळीराम शिंदे, शिक्षक, धर्माबाद👤 नागेश अशोक धावडे👤 हणमंत सावंत👤 पिंटू कटलम👤 कु. स्नेहल श्यामसुंदर ढगे, चिरली👤 कु. पल्लवी मदन ढगे, चिरली👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनंता जन्मीचें चुकवीं सांकडें । काय मी बापुडें वानुं कैसें ॥१॥ सगुन गुणाची वोललिसे मूर्ति । राहो माझे चित्तीं निरंतर ॥२॥ माझा मीच जालों सकळ व्यापारी । संसारा बाहेरी काढी कोण ॥३॥ नामा म्हणे मज नको गोवूं आशा । पावन परेशा केशिराजा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले विचार परखड असतील आणि त्याच विचारा प्रमाणे आपले जगणे असेल तर वाटेत काटे नक्कीच सापडतील. पण,त्या क्षणी दु:खी होऊन चालणे सोडू नये. कारण सत्याच्या वाटेवर चालणाऱ्यांचेच विरोधक बहुसंख्येने जागोजागी तयार होतात पण, ते, आपल्यातील गुण मात्र हिरावून नेवू शकत नाही म्हणून आपल्यात असलेल्या गुणांची कदर करून त्याच वाटेवर चालण्याचा प्रयत्न करावा शेवटी तीच वाट किणारा गाठण्यासाठी आपल्याला मदत करत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*○○ समुद्रातील मासा ○○*एका नदीतील मासा पुराच्या पाण्याच्या ओढीमुळे समुद्रात वाहुन गेला. समुद्रातील माशांना तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला. त्यांना म्हणू लागला,'देश, जात, कुळ  या तिन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.              तेव्हा हे लक्षात  घेऊन तुम्ही सर्वांनी मला उच्चासनावर बसवून माझा सन्मान करावा'. त्यावर समुद्रातील एक मासा  त्याला म्हणाला,  'अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नकोस.  जर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात दोघेही जण सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण  ते कळेल.कोळी सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक  खाण्यासाठी मला विकत घेतील, पण तुला तो कोळी एखाद्या गरीब माणसाला फुकटही देऊन टाकेल.तात्पर्य : नुसत्या जात कुळ ह्यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणावगुणांबरोबर अवलंबून असते.सौजन्य - https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑक्टोबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*सरकारी शाळा आणि आम्ही*Link - https://www.facebook.com/share/p/a1SUnXTgrQ3Ltar5/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔴 *_भारतीय वायूसेना दिवस_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••🔴 *_ या वर्षातील २८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.**१९८२: पोलंडने ’सॉलिडॅरिटी’ व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.**१९६२: अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित ’तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.**१९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय ‘डी-लिट’ पदवी दिली.**१९३९: दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.**१९३२: ’इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट’ द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🔴 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: अनुजा साठे-गोखले -- भारतीय अभिनेत्री**१९८२: इरावती हर्षे -- मराठी अभिनेत्री**१९८१: मोना सिंग -- भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, मॉडेल* *१९८१: मधुरा वेलणकर --- मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तथा लेखिका**१९७४: कैलास गांधी -- कवी**१९७३: ज्योती सोनवणे-पवार -- कवयित्री, लेखिका**१९७३: ज्ञानेश्वर किसन म्हात्रे -- लेखक* *१९७२: हिंमत पाटील -- कवी, लेखक* *१९७०: दशरथ राजाराम यादव -- पत्रकार, कवी, कांदबरीकार, गीतकार, इतिहास संशोधक* *१९६८: मनीषा अतुल (मनीषा साधू) -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६८: प्रा. डॉ. बळीराम किसन राऊत -- लेखक* *१९६३: प्रा. डॉ. सुलभा वासुदेव खर्चे-- लेखिका* *१९५५: डॉ. पी. टी. गायकवाड -- लेखक**१९५४: जगदीश खांदेवाले -- लेखक**१९५३: चंद्रकांत अच्युतराव कुलकर्णी-- लेखक* *१९५१: मंगला आठलेकर -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९४९: प्रदीप कुलकर्णी -- प्रसिद्ध लेखक**१९४२: विनिता जयंत एनापूरे -- कादंबरी, कथा चरित्र लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका* *१९४०: शरद काळे -- कोकणातील ज्येष्ठ कथालेखक (मृत्यू: २६ मे २०२२)**१९३०: उद्धव ज. शेळके -- मराठी भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार (मृत्यू: ३ एप्रिल १९९२ )**१९२८: नील हार्वे – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू**१९२६: कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: ३ जुलै १९९६ )**१९२२: गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist). वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले.(मृत्यू: ७ एप्रिल २००१ )**१९२०: कमल पाध्ये -- वैचारिक लेखन करणाऱ्या मराठी लेखिका (मृत्यू: १९ जून १९९६ )* *१९१२: हरी विनायक वाडेकर -- विनोदकार, नाटककार ( मृत्यू: ३० जानेवारी १९७९ )**१९०८: चंडीदास गुंडो (चं. गुं.)जोशी -- जुन्या पिढीतील लेखक* *१९०७: सदाशिव जगन्नाथ (भाऊ)धर्माधिकारी -- स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती आणि महात्मा गांधींचे एकनिष्ठ अनुयायी,लेखक* *१८९१: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार.(मृत्यू: १ जानेवारी १९७५ )**१८५०: हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: मधु पोतदार -- मराठी लेखक, चित्रपट अभ्यासक (जन्म: २८ नोव्हेंबर १९४४ )* *२०२०: अविनाश खर्शीकर -- ज्येष्ठ अभिनेते (जन्म: ३० नोव्हेंबर १९५२ )**२०१२: नवल किशोर शर्मा – माजी केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (जन्म: ५ जुलै १९२५ )**२०१२: वर्षा भोसले – पत्रकार व पार्श्वगायिका (जन्म: १९५६)**१९९८: इंदिराबाई हळबे ऊर्फ ’मावशी' – देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका,कोकणच्या मदर तेरेसा* *१९९६: गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका.'जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.(जन्म: १४ ऑगस्ट १९०७ )**१९७९: ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (जन्म: ११ आक्टोबर १९०२ )**१९६७: क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: ३ जानेवारी १८८३ )**१९३६: धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी मधील प्रसिद्ध साहित्यिक.(जन्म: ३१ जुलै १८८० )**१८८८: महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले. (जन्म: १ऑगस्ट १८३५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... डॉ. आनंदीबाई जोशी ...आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या. गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करीत होते, कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः लोकहितवादींची  शतपत्रे वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी कळल्यावर  लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस इंग्रजी  शिकविण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ठरल्या.पुढील भागात :- अंतराळवीर कल्पना चावलासंकलन :- नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांची वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलवर मोहोर, microRNA च्या शोधाचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडून मालवनच्या राजकोटवर शिवरायांचा पुतळा उभारणार, 100 कोटी रुपयांची तरतूद करणार, दीपक केसरकरांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अभिनेत्री सुहास जोशी यांचा नाट्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्काराने होणार गौरव, यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्यात आहे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठी चित्रपट सृष्टीतील पहिली बाल अभिनेत्री वासंती घोरपडे पटेल यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जिम्नॅस्टिक स्टार दिपा करमाकरनं अचानक घेतली निवृत्ती; 0.15 गुणांनी हुकले होते ऑलिम्पिक मेडल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजचा रंग लाल*1.  हिंदू धर्मानुसार, लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे.2. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे.3. हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालते.4. निसर्गात लाल रंगाची फुले किंवा त्याच्या रंगसमूहाचे अधिक प्रकार आढळतात.5. देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो. मां लक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते.6. रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे. याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदुर अर्पित करतात.7. मां दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येईल.7. लाल रंगासह केशरी देखील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे.9. हा रंग चिरंतन, सनातनी, पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो.10. लग्नात देखील लाल रंगाच वापर अधिक दिसून येतो. कारण हा रंग मांगळकि कार्यांत शुभ मानला जातो आणि आयुष्यातील प्रगतीशी संबंधित आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*PAT - Primary Assessment Test*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वृक्ष म्हणजे , पृथ्वीने आकाशाच्या विशाल भुर्ज पत्रावर लिहिलेली काव्ये होतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?२) भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात सलग किती कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे ?३) एम. एस. स्वामीनाथन यांचे पूर्ण नाव काय आहे ?४) 'भगिनी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'महाज्योती'चा फुल फार्म काय आहे ? *उत्तरे :-* १) ज्ञानेश्वर मुळे, सेवानिवृत्त अधिकारी २) १८ मालिका ३) मनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन ४) बहीण ५) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जगदीश पाटील कळसकर👤 शांतीलाल कुमावत👤 सारिका गांधी👤 कैलास बगाळे👤 साईनाथ पोतलोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अठ्ठाविस युगें उभा विटेवरी । मुद्रा अगोचरीं लावूनियां ॥१॥ ध्यान विसर्जन केधवां करिसी । नेणवे कोणासी ब्रह्मादिकां ॥२॥ पहातां तुजकडे माझें मीपण उडे । भेदाचें सांकडें हारपलें ॥३॥ तुजपाशीं असतां मुकिजे जीवित्वा । ठकले तत्त्वतां नेणों किती ॥४॥ नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहें । मन पायीं राहे ऐसें कीजे ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जशी संगत तशीच पंगत, जशी संगत त्यातून मिळते ओळख, जशी ओळख तेथूनच मिळते पद, प्रतिष्ठा आणि मानसन्मान ,जसे मार्गदर्शन तेथूनच ज्ञान मिळत असतो.पण,ह्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ होण्यासाठी व भवसागर पार करण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. तो, त्याग करण्यासाठी खूप मोठे काळीज असावे लागते त्यासाठी सत्याच्या मार्गाने चालावे लागते तीच खरी माणसाची ओळख असते ती मिळालेली ओळख कोणीच मिटवू शकत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••○लहान झाड○नदीच्या काठी मोठे झाड होते ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान  झाडाला विचारले, 'अरे, या वा-याने माझ्यासारखं मोठ झाड पाडलं, त्या  वा-याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?             त्यावर लहान झाडाने उत्तर दिले , 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वा-यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.तात्पर्य : समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे. तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते ब-याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑक्टोबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*नवरात्र विशेष माहिती - वणीची सप्तशृंगी देवी*Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/saptashgungi.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⚪ *_विश्व वास्तुकला दिवस_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••••⚪ *_ या वर्षातील २८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ⚪ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.**१९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना**१९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ’एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.**१९१९: महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.**१९१९: के.एल.एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.**१९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.**१९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.* ⚪ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚪ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: अभिजीत सावंत -- भारतीय पार्श्वगायक**१९७९: युक्ता मुखी -- भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री* *१९७८: जहीर खान – भारतीय जलदगती गोलंदाज**१९७८: प्रिती तडस-वाडीभस्मे -- कवयित्री, लेखिका**१९७८: नवनाथ एकनाथ ठाकूर -- कवी**१९७७: संदीप दशरथ बोडके -- लेखक, कवी**१९७६: शरद केळकर -- भारतीय अभिनेता**१९७५: गजानन जानभोर -- माजी निवासी संपादक (लोकमत) राजकीय–सामाजिक विश्लेषक, लेखक**१९६७: अमृता संखे -- कवयित्री* *१९६६: रेणुका शहाणे -- मराठी तसेच हिंदी भाषेतल्या चित्रपटांत व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून अभिनय करणाऱ्या मराठी अभिनेत्री* *१९६५: डॉ.बळवंत हिरामणजी भोयर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६०: आश्विनी भिडे-देशपांडे – लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका**१९५५: विश्राम गुप्ते -- मराठीतले आघाडीचे कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध**१९५५: डॉ. लीना सुधाकर जोशी -- लेखिका**१९५५: घनश्याम डोंगरे -- कवी, कथाकार, संपादक (मृत्यू:११ नोव्हेंबर २००५)**१९५४: दीपक करंदीकर -- गझलकार**१९५३: डॉ. अनिल नारायणराव कुलकर्णी -- लेखक* *१९५२: व्लादिमीर पुतिन - रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष**१९४९: रवींद्र महाजनी-- मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक (मृत्यू: ११ जुलै २०२३ )**१९४८: डॉ. ललिता मोहन कुंभोजकर -- लेखिका* *१९४३: हरीश शाह --- भारतीय वित्त निर्माता, देश आणि लेखक (मृत्यू: ७ जुलै २०२० )**१९४२: हेमलता पागनीस -- प्रसिद्ध लेखिका**१९४१: उषा खन्ना -- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय संगीत दिग्दर्शिका**१९३९: प्रा. प्रल्हाद विठ्ठलराव पांढरकर -- लेखक**१९३३: नामदेवराव दिवटे-- माजी खासदार तथा लेखक (मृत्यू: १८ जुलै २०१५ )**१९३१: प्रा. त्र्यंबक महाजन -- लेखक, समीक्षक* *१९३१: दिनेशचंद्र विश्वनाथ आठल्ये -- लेखक**१९२७: मृणालिनी प्रभाकर देसाई -- कादंबरीकार (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९४ )**१९२१: जयवंत दत्तात्रेय जोगळेकर -- समीक्षक, भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक, युद्धशास्त्र अभ्यासक (मृत्यू: १६ जुलै २०१६ )**१९१७: विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक (मृत्यू: १३ मे २०१० )**१९१४: बेगम अख्तर – गझल,दादरा आणि ठुमरी गायिका.गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.(मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४ )**१९०७: प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७ )**१९००: हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (मृत्यू: २९ एप्रिल १९४५ )**१८८५: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२ )**१८६६: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ –मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५कविता आज उपलब्ध त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह.ना.आपटे यांनी प्रकाशित केला.(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५ )* ⚪ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚪ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: प्रभाकर पेंढारकर -- मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक (जन्म: ७ सप्टेंबर १९३३ )**१९९९: उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ )**१९९८: भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री (जन्म: ९ फेब्रुवारी १९१४ )**१९७५: देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी. – कन्नड कवी व विचारवंत (जन्म: १८ जानेवारी १८८९ )**१८४९: एडगर अ‍ॅलन पो –अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (जन्म: १९ जानेवारी १८०९ )**१७०८: गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (जन्म: २२ डिसेंबर १६६६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.... मदर तेरेसा ......मदर तेरेसा या  भारतरत्न  आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.मदर तेरेसा ह्यांनी संतपदाची कसोटी असलेली दुस‍ऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना संतपद देण्याचा सोहळा डिसेंबर २०१५ मध्ये झाला. संत की उपाधी ९ सप्टेंबर २०१६ला लालवेटिकन सिटी मध्ये पोप फ्रांसिस ने मदर तेरेसा यांना संतची उपाधि ने विभूषित केले.पुढील भागात - डॉ. आनंदी गोपाळ जोशीसंकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे घात झाला, मुंबईतील चेंबूरमध्ये चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रहारच्या बच्चू कडूंना मोठा धक्का, मेळघाटचे आमदार राज कुमार पटेल यांनी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते गरवारे महाविद्यालयातील अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *घर चलो अभियान भाजपच्या उपक्रमाला नागपुरात सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मालदीवचे अध्यख मोहम्मद मेईज्जू भारताच्या पाच दिवसाच्या दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Women T20 World Cup - भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, टी २० वर्ल्ड कपमध्ये उघडले विजयाचे खाते*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजचा रंग - पांढरा*पांढरा रंग स्पष्टपण, शुद्धता, पावित्र्य आणि तारुण्य याचा संकेत देत असतो. व्यक्तिनिष्ठ धारणेत हा रंग उत्साहित करतो आणि संतुलित आरोग्य आणि मनःस्वास्थ्याचे निःशब्द प्रतीक असतो. पृथ्वीचा उपग्रह चंद्र, आठवड्यातील सोमवार आणि राशीचक्रातील कर्क राशी, या सर्वांचे हा प्रतीक-चिह्न आहे. एखादे उत्पादन वापरासाठी किती सुलभ आणि सुरक्षित आहे, हे सांगण्यासाठी जाहिरातीत पांढरा रंग प्रामुख्याने वापरला जातो. वजन कमी करण्यासाठी घ्यायचे एखादे औषध, कमी उष्मांक असलेले उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ याच्या जाहिराती आणि वेष्टनावर अनेकदा पांढरा रंग प्रभावीपणे वापरलेला असतो. पांढरा रंग वापरणारी व्यक्ती साधारणपणे सकारात्मक असते आणि दिसतेसुद्धा. त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वास आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाची जाणीवसुद्धा आपल्या नकळत आपल्याला होते. काळी रात्र संपून नव्या दिवसाची सुरुवात म्हणजे पांढरा रंग. काळ्या पाटीवरची जुनी अक्षरे पुसून पांढऱ्या खडूने नवी अक्षरे लिहिणारा प्रसन्न-सकारात्मक म्हणजे पांढरा रंग. वेगवेगळे रंग, दर्शकाच्या मनात विविध भावना निर्माण करतात. पांढरा रंग अशा काही भावना निर्माण करत नाही. मात्र, पांढऱ्या रंगाच्या ‘विषमता’ या एका गुणधर्मामुळे, अन्य रंगांच्या रिकाम्या पार्श्वभूमीवर आपले विचार व्यक्त करण्याचे, तो एक नैसर्गिक साधन आहे. विद्येची देवता सरस्वतीदेवीचे शुभ्र पांढरे वस्त्र, तिचे शुभ्र कमलासन आणि तिच्या बाजूचा पांढरा हंस ही पांढऱ्या रंगाची पहिली प्रतीके. पांढरा रंग ज्या रंगांचे संतुलन ठेवतो, त्या रंगांनी नटलेला बहुरंगी मोर हे याचे दुसरे प्रतीक. स्थैर्य आणि शांतता, दिलासा आणि आश्वासन, दुःख कमी करणारा आणि सांत्वनशील असा पांढरा रंग या विशेषणांनी संपन्न आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*CAT - Common Admission Test*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास, हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती ?२) समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे ?३) महाराष्ट्रातील कोणते गाव 'सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन गाव' म्हणून पात्र ठरले आहे ?४) 'ब्रीद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) सारथीचा फुल फार्म काय आहे ? *उत्तरे :-* १) प्रा. रंगनाथ पठारे २) तैवान ( २०१९ ) ३) कर्दे, रत्नागिरी ४) बाणा, प्रतिज्ञा ५) छत्रपती शाहु महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 दिपाली सावंत, क्रियाशील शिक्षिका, वर्धा👤 जादू पतंगे, वसमत👤 साईनाथ औरोड👤 दत्तात्रय देवकत्ते👤 योगेश गाडे👤 साईनाथ सावंत👤 सायारेड्डी चाकरोड, धर्माबाद👤 सुदर्शन कदम👤 रवींद्र शेळके👤 अभिषेक निगम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अग्निमाजिं पडे बाळू । माता धांवे कनवाळू ॥१॥ तैसा धांवे माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ॥२॥ सवेंचि झेपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥ भुकेलें वत्स रावें । धेनु हुंबरत धांवे ॥४॥ वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतित हरिणी ॥५॥ नामा म्हणे मेघा जैसा । विनवितो चातक तैसा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाजार कोणताही असो तेथे कोणतीच वस्तू फुकट मिळत नाही. व कोणी फुकटात देत नाही. कारण देणे आणि घेणे हा व्यवहार असतो. पण,जे खऱ्या अर्थाने घरीच फुकटात मिळते ती मिळणारी आशीर्वाद नावाची संपत्ती कधीच संपत नाही अशी महान संपत्ती मिळविण्यासाठी पैसे देऊन व्यवहार करावा लागत नाही तर आपुलकीने काळजी घ्यावी लागते व नि:स्वार्थ भावनेने सेवा करावा लागतो. असे पुण्य कार्य करण्याचा योग ज्याच्या जीवनात येते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने महान असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*○ यशप्राप्ती ○**● एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.  स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो आणी म्हणतो. अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास. तू कसा पास होशील. तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे. मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.*तात्पर्य :- कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे. एका दिवसात यश प्राप्त होत नाही.*सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑक्टोबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*नवरात्र विशेष माहिती - माहूरची रेणुकामाता*Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/renuka-mata.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔘 *_जागतिक शिक्षक दिन _* 🔘🔘 *_ या वर्षातील २७९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔘 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔘•••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर**१९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर**१९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.**१९६२: ’डॉ.नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.**१९५५: पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.**१९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.**१८६४: एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार* 🔘 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔘•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: डॉ. संदीप भगवान वाकडे -- लेखक**१९८२: लक्ष्मण मुरलीधर खोब्रागडे -- कवी, लेखक* *१९८०: सूर्यभान गुणाजी खंदारे -- कवी**१९७५: केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री**१९७३: विश्वास नांगरे पाटील -- भारतीय पोलीस सेवेतील एक अधिकारी तथा लेखक**१९७१: अर्जुमनबानो सु.शेख -- कवयित्री* *१९६९: संजीव अभ्यंकर -- लोकप्रिय हिंदुस्तानी गायक**१९६८: प्रा. डॉ. सुरेश दयाराम खोब्रागडे -- कवी, लेखक, संपादन* *१९६७: सुनील मारोतराव लव्हाळे -- कवी, पत्रलेखक**१९६२: लक्ष्मीकांत रांजणे -- कवी, लेखक* *१९६०: डॉ. राजीव उन्हाळे -- लेखक* *१९५८: रामदास घुंगटकर -- कवी/गझलकार**१९५८: डॉ.करुणा गोखले -- अनुवादक**१९५६: सुहास रघुनाथ पंडित -- कवी, लेखक**१९५४: डॉ. अशा सतीश लांजेवार -- लेखिका**१९५३: सुधीर नारायण इनामदार -- कवी, लेखक**१९३५: प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे -- विदर्भातील मराठी कवी (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१३ )**१९३२: माधव आपटे – क्रिकेटपटू तथा लेखक**१९३१: राजाराम शिंदे -- पत्रकार, नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते, नाट्यनिर्माते,दिग्दर्शक, नेपथ्यकार, वक्ते**१९२४: जगत मुरारी -- प्रतिष्ठित भारतीय माहितीपट निर्माते,दिग्दर्शक (मृत्यू: १३ एप्रिल २००७ )**१९२३: कैलाशपती मिश्रा – गुजरातचे माजी राज्यपाल (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२ )**१९२३: विजया साने -- लेखिका, बालसाहित्यिक (मृत्यू: २९ ऑगस्ट २००० )* *१९२२: शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (मृत्यू: २६ एप्रिल १९८७ )**१९२२: यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक (मृत्यू: १० मे १९९८ )**१८९०: किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या निधनानंतर साडेचार वर्षे ते 'हरिजन’चे संपादक होते.(मृत्यू: ९ सप्टेंबर १९५२ )* *१८८४: हरी रामचंद्र दिवेकर -- वेदविद्याभ्यासक,संशोधक (मृत्यू: १५ आगस्ट १९७५ )*🔘 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔘•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२: यशवंत बाळकृष्ण जोशी -- ग्वाल्हेर घराण्याचे गायक (जन्म: १२ सप्टेंबर १९२७ )**२०११: स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५ )**१९९७: चित्त बसू –संसदपटू,'फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस (जन्म: २५ डिसेंबर १९२६ )**१९९२: बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत (जन्म: ११ सप्टेंबर १९१२ )**१९९१: रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (जन्म: ३ एप्रिल १९०४ )**१९९०: राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३)(जन्म: १५ सप्टेंबर १९०५ )**१९८३: अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (जन्म: २८ जुलै १९०७ )**१९८१: भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार,एकांकिकाकार,पटकथाकार व नाटककार,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक(जन्म: ३० ऑगस्ट १९०३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ..अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या-वाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी  अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे  गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.पुढील भागात - मदर तेरेसासंकलन :- नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानसभेपूर्वी केंद्रानं एक मोठा निर्णय घेत राज्यातील अहमदनगर जिल्‍ह्यास 'अहिल्‍यानगर' नामांतरास मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रेल्वेचे कधीही खाजगीकरण केल्या जाणार नाही - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत  जाऊ द्या, आम्ही पाठिंबा देऊ, शरद पवारांचे मोठे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा, मुंबई व ठाण्यात 56 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे करणार उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आयुष्यमान हेल्थ कार्ड आता गुगलवर मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्य सरकारच्या आजच्या निर्णयानुसार, वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी सुवर्ण पदक विजेत्यांना तीन कोटी रुपये, रौप्य पदकासाठी दोन कोटी, कांस्य पदकासाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजचा रंग - राखाडी*आज शनिवार, शनीला राखाडी-कृष्ण वर्णाचे वस्त्र जास्त पसंत असल्यामुळे आज राखाडी रंगाचे महत्व आहे. या राखाडी रंगाला जास्त पसंती देणाऱ्या व्यक्ती तटस्थ वृत्तीच्या असतात. त्यांना अलिप्त राहणे पसंत असते. आपले संरक्षण आपणच करू अशी त्यांना श्रध्दा असते. बऱ्याच वेळा स्वत:ची मते उघड न करण्याचा कल असतो. उद्योग व्यवसायात किंवा उच्च अधिकाराच्या जागेवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये या गोष्टी आढळतात. योग्य ठिकाणी योग्य परंतु एकंदरीत मोजके बोलणे यांना प्रिय असते. व्यक्तिमत्वात शिस्त असते.राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ASER - Annul Status of Education Report*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना जिद्दीने तोंड देणे याचेच नाव बुद्धिमत्ता. - कार्लाइल*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसेडर* म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण चेरापुंजी येथे आजवरच्या सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे ?३) सन १९४८ च्या ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन समारोहात स्वतंत्र भारताचे पहिले ध्वजवाहक कोण होते ?४) 'बंधन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ? *उत्तरे :-* १) पी. व्ही. सिंधू २) ३३.१° से. ३) तालीमेरेन एओ ४) निर्बंध, मर्यादा ५) डॉ. सदानंद मोरे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 सुभाष लोखंडे, पांगरी👤 श्रद्धानंद यरमलवाड, धर्माबाद👤 बालाजी घोणशेट्टे👤 किशन पचलिंग👤 काशिनाथ साखरे👤 बोडेला योगेश यादव👤 प्रदीप सोमोसे👤 अमोल सिंगनवाड👤 साईनाथ पवार👤 आकाश जाधव👤 दीपक रामराव कुलकर्णी👤 रविकांत डोळे👤 विशाल फाळके👤 पाशा शेख👤 दीपक पाटील बेळकोणीकर 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अगे तूं माउली संतांची साउली । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥ प्रेमपान्हा पाजी अगे माझे आई । विठाई गे मायी वोरसोनी ॥२॥ येतों काकुळती प्रेम पान्ह्यासाठीं । उभा तो धुर्जटी मागें पुढें ॥३॥ नामा म्हणे जीवें करीन लिंबलोण । ओवाळिन चरण विटेसहित ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••झोपेत दिसणाऱ्या भयानक स्वप्नांवर तसेच निरनिराळ्या स्वप्नांवर जर आपण विश्वास करत राहिलो तर ते, स्वप्न आपल्याला सुखाने जगू देणार नाही. त्यासाठी त्या स्वप्नांना विसरून आपण बघितले असणारे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. झोपेत दिसणारे स्वप्न हे, कधीच नवी दिशा देत नाही तर उलट ते आपल्याला भ्रमात पाडत असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुभेदार व त्याचा घोडा एका सुभेदाराचा घोडा खुप देखणा व चपळ होता पण त्यापेक्षा कमी प्रतीचा एक घोडा त्याने विकत घेतला व त्याचे लाड करण्यात व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात तो बराच वेळ घालवू लागला. एकदा तो घोडा पहिल्या घोड्याला म्हणाला, 'दादा, तू इतका सुंदर व चपळ असताना तुझ्याकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात इतका आनंद वाटतो, याचे कारण काय ? पहिला घोडा म्हणाला, 'कोणतीही वस्तू नवी असली म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व थोडी जुनी झाली की तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे. आजकाल मालक तुझे लाड करतो पण थोड्याच दिवसांत तूही त्याला आवडणार नाहीस व तुझ्याजागी नवा घोडा येईल याबद्दल खात्री असू दे'!तात्पर्य :- नव्याचे नऊ दिवस !सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑक्टोबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~*नवरात्र विशेष माहिती - कोल्हापूरची महालक्ष्मी*Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/mahalaksami.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_जागतिक अंतराळ सप्ताह_* 🟢 🟢 *_जागतिक प्राणी दिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.**१९५७: सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.**१९५९: सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.**१९४३: दुसष,रे महायुद्ध - अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.**१९४०: ’ब्रेनर पास’ येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.**१९२७: गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.**१८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: रिषभ पंत -- प्रसिद्ध भारतीय क्रिकेट खेळाडू* *१९९४: गौतम राजू ढोके -- कवी* *१९८४: कस्तुरी देवरुखकर -- लेखिका, कवयित्री**१९८२: डॉ.ज्ञानेश चत्रभुज पाटील -- कवी**१९७८: कृष्णा किंबहुणे -- लेखक, अनुवादक**१९७५: संगीता उत्तमराव भांडवले -- कवयित्री लेखिका**१९७४: डॉ. नरेंद्र बापुजी खैरनार -- कवी, लेखक**१९७२: डॉ. तृप्ती बोरूळकर -- कवयित्री, लेखिका**१९७२: किरण घनश्याम पिंपळशेंडे -- कवयित्री**१९६७: शशिकांत शिंदे -- कवी* *१९६७: प्रा. डॉ. भूषण रामटेके -- कवी, लेखक**१९६०: मंगला रूपसिंग राजपूत-- कवयित्री**१९५६: अशोक भिंगार्डे -- कवी**१९५२: शैलेंद्र सिंग-- भारतीय पार्श्वगायक आणि अभिनेता**१९५१: मुकुंद मोरेश्वर टाकसाळे -- विनोदी लेखन करणारे लेखक**१९५१: माधवी मुद्गल -- भारतीय शास्त्रीय नृत्यांगना**१९५०: प्रा. डॉ. कल्पना सुरेश व्यवहारे -- लेखिका (मृत्यू: २०१४)**१९४९: छगनलाल फौजी पंचे -- कवी* *१९४८: विजय वसंतराव पाडळकर- समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार**१९४४: गुफी पेंटल वालिया -- भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक (मृत्यू: ५ जून २०२३ )**१९४२: पुष्पा चंद्रकांत देशमुख -- कवयित्री, लेखिका* *१९४१: सरदार अंजुम-- भारतीय कवी, शायर आणि तत्त्वज्ञ, लेखक (मृत्यू: १० जुलै २०१५ )**१९४०: माधुरी वासुदेव चौकीदार -- लेखिका, कथाकार* *१९३७: सुधाकर विनायक जोशी -- लेखक* *१९३७: जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री**१९३५: अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक (मृत्यू: २१ जून १९८४ )**१९२८: ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक (मृत्यू: २७ जून २०१६ )**१९२२: सदानंद महादेव पेठे -- लेखक**१९१६: धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक**१९१४: मधुकर वासुदेव धोंड -- मराठी समीक्षक (मृत्यू: ५ डिसेंबर २००७ )**१९१३: सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० आक्टोबर २००६ )**१९११: नारायण गजानन जोशी -- कवी, छंदःशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८६ )**१८२२: रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ जानेवारी १८९३ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: विजय नाफडे -- दुर्मीळ हिंदी चित्रपट गीतांचे संग्राहक आणि अभ्यासक**१९८९: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (जन्म: २३ आक्टोबर १९२४ )**१९८२: सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(जन्म: १६ आक्टोबर १९०७ )**१९७६: वासुदेव वामन भोळे -- कथाकार, नाटककार,नाट्यसमीक्षक (जन्म: ३० सप्टेंबर १८९३ )**१९६६: अनंत अंतरकर – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (जन्म: १ डिसेंबर १९११ )**१९४७: मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (जन्म: २३ एप्रिल १८५८ )**१९२१: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(जन्म: ९ ऑगस्ट १८९० )**१६६९: रेंब्राँ – डच चित्रकार (जन्म: १५ जुलै १६०६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला**राजमाता जिजाऊ भोसले*भारताच्या वीर माता जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याजवळील निजामशाहच्या सिंदखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधवराव तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाबाईंना लहानपणी जिजाऊ म्हणून संबोधले जायचे. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती, त्यामुळे जिजाबाईंचा विवाहही अगदी लहान वयातच झाला होता. त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. शहाजी राजे भोसले हे विजापूरच्या सुलतान आदिलशहाच्या दरबारातील सेनापती आणि शूर योद्धा होते. जिजाऊ यांनी आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण व महाभारतातील धाडसी व शौर्याच्या गोष्टी सांगून मोठे केले आणि त्यांच्यामध्ये असे गुण निर्माण केले, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शूर आणि निर्भय योद्धा ठरले. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना तलवारबाजी, भाला चालवण्याची कला, घोडेस्वारी, स्वसंरक्षण, युद्धकौशल्य यात पारंगत केले.जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच पुढे शिवाजी महाराज समाजाचे रक्षक आणि अभिमान बनले. आणि त्यांनी हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि एका स्वतंत्र व महान राज्यकर्त्याप्रमाणे त्यांचे नाव तयार झाले आणि ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले.पुढील भागात - अहिल्याबाई होळकरसंकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय ! १०० व २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर येणार बंदी, या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांना बसणार मोठा फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल गांधी आज व उद्या 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर, छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे करणार अनावरण, संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जातीच्या आधारावर कैद्यांना कामाचं वाटप करणे असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा विमुक्त जमातींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *CBSE 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2025 साठी फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून ही अद्यापपर्यंत आम्हांला न्याय मिळाला नाही - उद्धव ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा धावपटू अविनाश साबळे याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, तर रोहित शर्माचे मार्गदर्शक दिनेश लाड यांना जिजामाता पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजचा रंग - हिरवा*हिरवा रंग - एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू, अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी असतात. - प्रदर्शनप्रियताही त्यांच्यापाशी असते, हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्व आहे, तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतिक देखील मानला जातो. जसे हिरवी साडी, बांगळ्यांचा हिरवा चुडा.- यासाठी सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. - हिरवा रंग डोळ्यासाठी उत्तम आहे. हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*NASA - National Aeronautics Space Administration*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य निसर्गाचा अनुचर आणि नियतीचा दास आहे. - जयशंकर प्रसाद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे ?२) मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव काय आहे ?३) सन १९७६ साली मृणाल सेन यांच्या कोणत्या चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली ?४) भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान कोणता ?५) दादासाहेब फाळके पुरस्काराचे स्वरूप काय आहे ? *उत्तरे :-* १) मिथुन चक्रवर्ती २) गौरांग चक्रवर्ती ३) मृगया ४) दादासाहेब फाळके पुरस्कार ५) कमळ पदक, शाल व १० लाख रुपये*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 लक्ष्मण मोहन पंडोरे, पदवीधर शिक्षक, अहमदनगर👤 विजय पळशीकर👤 ओमप्रकाश येवतीवाड👤 साईनाथ पोरडवार👤 सौ संगिता भांडवले, शिक्षिका, उस्मानाबाद👤 सुरेंद्र माणिकराव गाडेकर👤 धनराज शेट्टीगर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहगृहाची कामिनी । ते तंव राहिली भवनीं । मी जळतसें स्मशानीं । अग्निसवें एकला ॥६॥ मित्र आले गोत्रज आले । तेहि स्मशानीं परतले । शेवटीं टाकोनियां गेले । मज परता येमजाल ॥७॥ ऐसा जाणोनि निर्धार । मन मज आला गहिंवर । तंव दाहीं दिशा अंधःकार । मग मज कांहीं न सुचे ॥८॥ ऐसें जाणोनियां पाही । मनुष्य जन्म मागुता नाहीं । नामा म्हणे तुझे पायीं । ठाव देई विठोबा ॥९॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांनी आपल्या जीवनात स्वतः साठी एकही दिवस जगले नाही त्यांना कधीही विसरू नये. कारण त्यांनी फक्त द्यायलाच शिकले घेण्यासाठी त्यांच्याकडे एक सेंकद सुध्दा वेळ नव्हता म्हणून त्यांना दाता म्हणतात. देणारेच अजरामर असतात अन् घेणाऱे मात्र त्यातच आनंद शोधत असतात. या प्रकारचा आनंद फक्त क्षणापुरतेच मर्यादित असतो. कारण दुसऱ्यांसाठी जगणारे खऱ्या अर्थाने महान असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोठ्या भावाचा रुमाल*राजू तिसरीच्या वर्गात शिकतो, त्याचा मोठा भाऊ कार्तिकही त्याच शाळेत पाचवीत शिकतो. दोन्ही भाऊ एकत्र शाळेत जायचे. दोघेही वाटेत खूप मस्ती करायचे. कार्तिककडे रुमाल होता, तो नेहमी डेटॉलने धुवून स्वच्छ ठेवायचा. राजू नेहमी भावाकडे पाहतो, त्याला वाटतं भाऊ रुमाल सोबत ठेवतो का ? थोडी घाण असेल तर साफ करायची आणि मग दुमडून खिशात ठेवायची. रुमालाचा गोंधळ त्याला आवडला नाही. राजूला या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या, मोठा भाऊ असं का करतो, असं त्याला वाटायचं, पण त्याला कधीच कळलं नाही. एकदा राजू झुल्यावर डोलत होता, तेव्हा झुल्याचा हात सुटला आणि तो जमिनीवर पडला. जमिनीवर पडताच राजूच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याच्या गुडघ्यातून रक्त वाहू लागले. कार्तिकने आपल्या भावाला पाहताच तो पटकन धावत आला आणि खिशातून रुमाल काढून जखमेवर बांधला. त्यामुळे रक्तस्त्राव थांबला. कार्तिक ताबडतोब त्याच्या भावाला दवाखान्यात घेऊन गेला तिथे डॉक्टरांनी मलम लावून राजूला बरे केले. राजूने तो रुमाल पाहिला जो भाऊ स्वच्छ करून नेहमी सोबत ठेवत असे. ज्याच्यावर तो खूप प्रेम करत होता, तो आता गलिच्छ झाला होता. मोठ्या भावाच्या प्रेमापुढे तो रुमाल फारसा गोंडस नव्हता.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑक्टोबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~🟡 *आजचा रंग - पिवळा* 🟡नवरात्र विशेष - तुळजापूरची तुळजाभवानीLink - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/tulajabhavani.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *घटस्थापना दिवस* ••••••••••••••••••••••••••••••••🟡 *_ या वर्षातील २७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••• *१९८४: भारतातील सर्वात लांबवर धावणारी हिमसागर एक्सप्रेस कन्याकुमारी ते जम्मूतावी दरम्यान सुरू* *१९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.**१९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.**१९३२: इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८८०: पहिली मराठी संगीत नाटक "शाकुंतल" चा प्रयोग**१७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.* 🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: प्रा. संतोष गोनबरे -- लेखक**१९७५: शुभानन चिंचकर -- लेखक**१९७२: शिल्पा जितेंद्र खेर-- लेखिका**१९६९: सुखचंद वाघमारे -- कवी* *१९६८: डॉ. शीतल शिवराज मालुसरे -- लेखिका, कवयित्री,निवेदिका* *१९६७: पुलिंद चंद्रकांत सावंत -- लेखक, अनुवादक**१९६६: सुनील बर्वे -- मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते**१९६४: प्रा. डॉ. गंगाधर विठोबाजी कायंदे-पाटील -- लेखक, विचारवंत* *१९६०: श्रीपाद अनिल गोरे -- लेखक* *१९४९: जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक**१९४५: मंजिरी ताम्हणकर -- लेखिका**१९४३: वामन नथुजी तिरबुडे -- लेखक* *१९४२: प्रा. प्रभाकर दत्तात्रय म्हारोळकर -- कवी, लेखक* *१९२८: प्रा.जनार्दन रा. कस्तुरे -- लेखक (मृत्यू: ६ ऑगस्ट २००६ )**१९२१: रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू: २३ जून १९९६ )**१९१९: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३ )**१९०६: गोविंद विनायक देवस्थळी -- संस्कृत विषयाचे अभ्यासक,संशोधक(मृत्यू: १४ मार्च १९९४ )**१९०३: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू: २२ जानेवारी १९७२ )**१९०२: नारायण माधव सरपटवार-- विदर्भातील जुन्या पिढीतील नामवंत कवी (मृत्यू: २२ मार्च १९८८ )**१९०२: केशव रावजी पुरोहित -- पत्रकार, कादंबरीकार (मृत्यू: १० फेब्रुवारी १९६१ )**१९००: श्रीपाद शंकर नवरे -- लेखक,संपादक(मृत्यू: ७ डिसेंबर १९७८ )* *१८९८: राधाबाई पांडुरंग आपटे -- कवयित्री, लेखिका* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: घनश्याम नायक -- भारतीय नाटक,आणि दूरदर्शन अभिनेता (जन्म: १२ मे १९४४ )**२०२०: प्रा. पुष्पा भावे -- स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार (जन्म: २६ मार्च, १९३९ )**२०१२: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे माजी राज्यपाल,दिल्लीचे महापौर (जन्म: २४ आक्टोबर १९२६ )**१९९९: शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक (जन्म: १० जानेवारी १९०३ )**१९९९: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म:२६ जानेवारी १९२१)**१९७३: साधना बोस --- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना (जन्म: २० एप्रिल १९७३ )**१९६६: अनंत बाळकृष्ण अंतरकर -- हंस, मोहिनी, नवल या नियतकालिकांचे संस्थापक संपादक ( जन्म: १ डिसेंबर १९११ )**१९५९: दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’- विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(जन्म: २२ सप्टेंबर १९०९ )**१९४३: विष्णुपंत पागनीस -- ज्येष्ठ अभिनेते, गायक (जन्म: १५ नोव्हेंबर १८९२ )**१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२ )**१८६७: एलियास होवे– शिवणयंत्राचा संशोधक (जन्म: ९ जुलै १८१९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... झाशीची राणी लक्ष्मीबाई ...राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर तर जन्मनाव मनकर्णिका असे होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर, सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली.मेरी झांशी नहीं दूगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्यांच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या आहेत. झांसी या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्याविरुद्ध लढा देण्याचे धाडस केले आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाईं यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात. राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे.पुढील भागात :- राजमाता जिजाऊसंकलन by नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरती सरीन बनल्या AFMS ( भारतीय सशस्त्र दल वैद्यकीय सेवा ) च्या पहिल्या महिला महानिर्देशक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *La Nina च्या प्रभावामुळे यंदा पडणार कडाक्याची थंडी, IMD ने दिला भारतीयांना हवामानाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पश्चिम आशियात युद्धाचा भडका...इराणचा इस्त्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा, स्वसंरक्षणासाठी कारवाई असल्याचा इराणचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागावाटपात अधिकच्या 10 जागा मिळण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रयत्न, थेट गृहमंत्री अमित शाहांसोबत खलबतं; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शाहांची दोनदा घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना बोनस, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, 10 तारखेपर्यंत खात्यात पुन्हा 3 हजार जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, दोन वैमानिक आणि एका इंजिनिअरचा मृत्यू, दाट धुक्यामुळे अपघात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इराणी चषक स्पर्धेत सरफराज खानचा विक्रम, मुंबईचा पहिला द्विशतकवीर तर चौथा तरुण खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्रीच्या दिवसात आजचा रंग पिवळापिवळ्या रंगाबद्दल माहिती : - पिवळा हा मानवी इतिहासातला सर्वात जुन्या रंगांपैकी एक आहे. - पिवळा हा रंग सूर्यप्रकाशाचा असल्याने ऊर्जेशी संबंधित आहे. - पिवळा रंग लाल रंगाशी एकत्रितपणे उष्णता आणि उर्जेचे प्रतीक आहे. - पिवळा रंग आनंद आणि उर्जेचे प्रतीक आहे. - पिवळा रंग ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित आहे. - पिवळा रंग एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी चांगला असतो. - पिवळा रंग तेजस्वी आणि शुद्ध असल्याने लक्ष वेधण्यासाठी प्रभावी आहे. - पिवळा रंग डिझाइनमधील महत्त्वाच्या घटकांना ठळक करण्यासाठी वापरला जातो. - पिवळा रंग अंधारात लवकर ओळखू येतो. - स्कुल बस पिवळ्या रंगाचीच असतात. - घरात आणि परिसरात आपणास अनेक पिवळे वस्तू दिसतात त्याची यादी करू या. उदा. हळद*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Cef - Capital Expenditure Fund (in finance)*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना जिद्दीने तोंड देणे याचेच नाव बुद्धिमत्ता. -- कार्लाइल*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशी गाईला *'राज्यमाते'* चा दर्जा देणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ?२) देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?३) नामिबिया हा देश कोणत्या खंडात आहे ?४) 'बैल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'झोत' या पुस्तकाचे लेखक कोण ? *उत्तरे :-* १) महाराष्ट्र ( २०२४ ) २) उत्तराखंड ( २०१८ ) ३) आफ्रिका ४) वृषभ, पोळ, खोंड ५) डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 चिं. रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर👤 कु. पूर्वा श्यामसुंदर माडेवार, पुणे👤 नागेश क्यातमवार, शिक्षक, नांदेड👤 साईनाथ राचेवाड, शिक्षक, बिलोली👤 संदीप कडलग, आरमुर, तेलंगणा👤 विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद👤 रणजित चांदवाले👤 पांडुरंग यलमलवाड👤 मारोती नरवाडे👤 शंकर पाटील👤 शंकर दरनगे👤 शिवाजी पांडुरंग मुटकुले👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अंतकाळीं मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं । म्हणोनियां ह्रषिकेशी । शरण मी तुज आलों ॥१॥ नवमास गर्भवासीं । कष्ट जाले त्या मातेसी । ते निष्ठुर जाली कैसी । अंतीं दूर राहिली ॥२॥ जीवीं बाळाची आवड । मुखीं घालूऊनि करी कोड । जेव्हां लागली येमवोढ । तेव्हां दुरी राहिली ॥३॥ बहिणी बंधूचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशृंखळा । तेव्हां दुरी राहिली ॥४॥ कन्या पुत्रादिक बाळें । हे तंव स्नेहाचीं स्नेहाळें । तुझ्या दर्शनाहुन व्याकुळ । अंतीं दूर राहिलीं ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाला अति सुख प्राप्त होते तर कोणी धन संपत्तीने मालामाल असतात. कोणाच्या पायाशी प्रसिध्दी लोळत असते तर कोणाच्या वाट्याला फक्त आणि फक्त माणसांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. यातील आपापल्या परीने योग्य असतात पण, शेवटपर्यत कोणतेही काहीच टिकून राहत नाही. कारण पाहिजे त्या प्रकारचे त्यातून समाधान मिळत नाही . म्हणून जेथून खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान मिळतो तेच श्रेष्ठ असते. शेवटी मानव सेवा हीच खरी सेवा म्हटले जाते. ज्याला या प्रकारची सेवा करण्याची संधी मिळत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो ती ,श्रीमंती कधीच संपत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कुंभाराचे प्रेम स्वरूप*आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता, घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला दोन वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला.आज घरी नेण्यासाठी इतर कशाची व्यवस्था होऊ शकली नाही याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालनपोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते, झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हे बंडल मदनाच्या जवळ आला. या बंडलचे रहस्य असे होते – काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा कपड्याचे बंडल दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली.नैतिक – जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो, ही हानी दीर्घकालीन असते.••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑक्टोबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~🟡 *आजचा रंग - पिवळा* 🟡नवरात्र विशेष - तुळजापूरची तुळजाभवानीLink - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/tulajabhavani.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *घटस्थापना दिवस* ••••••••••••••••••••••••••••••••🟡 *_ या वर्षातील २७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••• *१९८४: भारतातील सर्वात लांबवर धावणारी हिमसागर एक्सप्रेस कन्याकुमारी ते जम्मूतावी दरम्यान सुरू* *१९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.**१९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.**१९३२: इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८८०: पहिली मराठी संगीत नाटक "शाकुंतल" चा प्रयोग**१७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.* 🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: प्रा. संतोष गोनबरे -- लेखक**१९७५: शुभानन चिंचकर -- लेखक**१९७२: शिल्पा जितेंद्र खेर-- लेखिका**१९६९: सुखचंद वाघमारे -- कवी* *१९६८: डॉ. शीतल शिवराज मालुसरे -- लेखिका, कवयित्री,निवेदिका* *१९६७: पुलिंद चंद्रकांत सावंत -- लेखक, अनुवादक**१९६६: सुनील बर्वे -- मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते**१९६४: प्रा. डॉ. गंगाधर विठोबाजी कायंदे-पाटील -- लेखक, विचारवंत* *१९६०: श्रीपाद अनिल गोरे -- लेखक* *१९४९: जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक**१९४५: मंजिरी ताम्हणकर -- लेखिका**१९४३: वामन नथुजी तिरबुडे -- लेखक* *१९४२: प्रा. प्रभाकर दत्तात्रय म्हारोळकर -- कवी, लेखक* *१९२८: प्रा.जनार्दन रा. कस्तुरे -- लेखक (मृत्यू: ६ ऑगस्ट २००६ )**१९२१: रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू: २३ जून १९९६ )**१९१९: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३ )**१९०६: गोविंद विनायक देवस्थळी -- संस्कृत विषयाचे अभ्यासक,संशोधक(मृत्यू: १४ मार्च १९९४ )**१९०३: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू: २२ जानेवारी १९७२ )**१९०२: नारायण माधव सरपटवार-- विदर्भातील जुन्या पिढीतील नामवंत कवी (मृत्यू: २२ मार्च १९८८ )**१९०२: केशव रावजी पुरोहित -- पत्रकार, कादंबरीकार (मृत्यू: १० फेब्रुवारी १९६१ )**१९००: श्रीपाद शंकर नवरे -- लेखक,संपादक(मृत्यू: ७ डिसेंबर १९७८ )* *१८९८: राधाबाई पांडुरंग आपटे -- कवयित्री, लेखिका* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: घनश्याम नायक -- भारतीय नाटक,आणि दूरदर्शन अभिनेता (जन्म: १२ मे १९४४ )**२०२०: प्रा. पुष्पा भावे -- स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार (जन्म: २६ मार्च, १९३९ )**२०१२: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे माजी राज्यपाल,दिल्लीचे महापौर (जन्म: २४ आक्टोबर १९२६ )**१९९९: शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक (जन्म: १० जानेवारी १९०३ )**१९९९: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म:२६ जानेवारी १९२१)**१९७३: साधना बोस --- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना (जन्म: २० एप्रिल १९७३ )**१९६६: अनंत बाळकृष्ण अंतरकर -- हंस, मोहिनी, नवल या नियतकालिकांचे संस्थापक संपादक ( जन्म: १ डिसेंबर १९११ )**१९५९: दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’- विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(जन्म: २२ सप्टेंबर १९०९ )**१९४३: विष्णुपंत पागनीस -- ज्येष्ठ अभिनेते, गायक (जन्म: १५ नोव्हेंबर १८९२ )**१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२ )**१८६७: एलियास होवे– शिवणयंत्राचा संशोधक (जन्म: ९ जुलै १८१९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... झाशीची राणी लक्ष्मीबाई ...राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर तर जन्मनाव मनकर्णिका असे होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर, सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली.मेरी झांशी नहीं दूगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्यांच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या आहेत. झांसी या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्याविरुद्ध लढा देण्याचे धाडस केले आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाईं यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात. राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे.पुढील भागात :- राजमाता जिजाऊसंकलन by नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरती सरीन बनल्या AFMS ( भारतीय सशस्त्र दल वैद्यकीय सेवा ) च्या पहिल्या महिला महानिर्देशक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *La Nina च्या प्रभावामुळे यंदा पडणार कडाक्याची थंडी, IMD ने दिला भारतीयांना हवामानाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पश्चिम आशियात युद्धाचा भडका...इराणचा इस्त्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा, स्वसंरक्षणासाठी कारवाई असल्याचा इराणचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागावाटपात अधिकच्या 10 जागा मिळण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रयत्न, थेट गृहमंत्री अमित शाहांसोबत खलबतं; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शाहांची दोनदा घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना बोनस, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, 10 तारखेपर्यंत खात्यात पुन्हा 3 हजार जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, दोन वैमानिक आणि एका इंजिनिअरचा मृत्यू, दाट धुक्यामुळे अपघात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इराणी चषक स्पर्धेत सरफराज खानचा विक्रम, मुंबईचा पहिला द्विशतकवीर तर चौथा तरुण खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्रीच्या दिवसात आजचा रंग पिवळापिवळ्या रंगाबद्दल माहिती : - पिवळा हा मानवी इतिहासातला सर्वात जुन्या रंगांपैकी एक आहे. - पिवळा हा रंग सूर्यप्रकाशाचा असल्याने ऊर्जेशी संबंधित आहे. - पिवळा रंग लाल रंगाशी एकत्रितपणे उष्णता आणि उर्जेचे प्रतीक आहे. - पिवळा रंग आनंद आणि उर्जेचे प्रतीक आहे. - पिवळा रंग ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित आहे. - पिवळा रंग एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी चांगला असतो. - पिवळा रंग तेजस्वी आणि शुद्ध असल्याने लक्ष वेधण्यासाठी प्रभावी आहे. - पिवळा रंग डिझाइनमधील महत्त्वाच्या घटकांना ठळक करण्यासाठी वापरला जातो. - पिवळा रंग अंधारात लवकर ओळखू येतो. - स्कुल बस पिवळ्या रंगाचीच असतात. - घरात आणि परिसरात आपणास अनेक पिवळे वस्तू दिसतात त्याची यादी करू या. उदा. हळद*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Cef - Capital Expenditure Fund (in finance)*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना जिद्दीने तोंड देणे याचेच नाव बुद्धिमत्ता. -- कार्लाइल*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशी गाईला *'राज्यमाते'* चा दर्जा देणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ?२) देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?३) नामिबिया हा देश कोणत्या खंडात आहे ?४) 'बैल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'झोत' या पुस्तकाचे लेखक कोण ? *उत्तरे :-* १) महाराष्ट्र ( २०२४ ) २) उत्तराखंड ( २०१८ ) ३) आफ्रिका ४) वृषभ, पोळ, खोंड ५) डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 चिं. रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर👤 कु. पूर्वा श्यामसुंदर माडेवार, पुणे👤 नागेश क्यातमवार, शिक्षक, नांदेड👤 साईनाथ राचेवाड, शिक्षक, बिलोली👤 संदीप कडलग, आरमुर, तेलंगणा👤 विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद👤 रणजित चांदवाले👤 पांडुरंग यलमलवाड👤 मारोती नरवाडे👤 शंकर पाटील👤 शंकर दरनगे👤 शिवाजी पांडुरंग मुटकुले👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अंतकाळीं मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं । म्हणोनियां ह्रषिकेशी । शरण मी तुज आलों ॥१॥ नवमास गर्भवासीं । कष्ट जाले त्या मातेसी । ते निष्ठुर जाली कैसी । अंतीं दूर राहिली ॥२॥ जीवीं बाळाची आवड । मुखीं घालूऊनि करी कोड । जेव्हां लागली येमवोढ । तेव्हां दुरी राहिली ॥३॥ बहिणी बंधूचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशृंखळा । तेव्हां दुरी राहिली ॥४॥ कन्या पुत्रादिक बाळें । हे तंव स्नेहाचीं स्नेहाळें । तुझ्या दर्शनाहुन व्याकुळ । अंतीं दूर राहिलीं ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाला अति सुख प्राप्त होते तर कोणी धन संपत्तीने मालामाल असतात. कोणाच्या पायाशी प्रसिध्दी लोळत असते तर कोणाच्या वाट्याला फक्त आणि फक्त माणसांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. यातील आपापल्या परीने योग्य असतात पण, शेवटपर्यत कोणतेही काहीच टिकून राहत नाही. कारण पाहिजे त्या प्रकारचे त्यातून समाधान मिळत नाही . म्हणून जेथून खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान मिळतो तेच श्रेष्ठ असते. शेवटी मानव सेवा हीच खरी सेवा म्हटले जाते. ज्याला या प्रकारची सेवा करण्याची संधी मिळत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो ती ,श्रीमंती कधीच संपत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कुंभाराचे प्रेम स्वरूप*आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता, घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला दोन वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला.आज घरी नेण्यासाठी इतर कशाची व्यवस्था होऊ शकली नाही याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालनपोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते, झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हे बंडल मदनाच्या जवळ आला. या बंडलचे रहस्य असे होते – काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा कपड्याचे बंडल दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली.नैतिक – जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो, ही हानी दीर्घकालीन असते.••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 ऑक्टोबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KQfhe9bx9YkQGdvq/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••🛑 *_ या वर्षातील २७५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••*२००५: इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.**१९८३: पहिले मराठी विनोदी साहित्य संमेलन रमेश मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली भरले**१९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.**१९४६: युनायटेड किंग्डममधे ’मेन्सा इंटरनॅशनल’ या संस्थेची ची स्थापना झाली.**१९४३: दुसरे महायुद्ध– दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.**१८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना**१८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.**१८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.**१७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: पवन शामराव पाथोडे -- कवी, पत्रकार**१९८५: रमेश अरुण बुरबुरे -- कवी, गझलकार**१९८३: डॉ. महेश्वर मोतीराम मंगनाळे -- लेखक**१९८०: मनिषा पिंटू वराळे -- कवयित्री**१९७९: श्रद्धा निगम -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९७६: संतोष रामचंद्र जाधव -- लेखक**१९७४: डॉ. देवानंद गोविंदराव सोनटक्के -- मराठीतील साहित्य समीक्षक* *१९६९: विजय जोशी (विजो) -- प्रसिद्ध कवी, गझलकार, समीक्षक**१९६८: अपर्णा वेलणकर -- लेखिका, मराठी अनुवादक**१९६८: गजानन शिले -- कवी, लेखक**१९६५: प्रफुल्ल कुलकर्णी -- कवी, गझलकार**१९६४: भाऊसाहेब देशमुख -- कवी**१९६२: व्यंकटेश रामचंद्र काटकर -- प्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार* *१९६०: राज पुंडलिक अहेरराव -- कवी, कथाकार* *१९६०: प्रा. अरुण मानकर -- कवी, लेखक**१९५१: जगदीश काबरे -- वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे प्रसिद्ध मराठी लेखक**१९५१: डॉ. हेमा लक्ष्मण जावडेकर -- लेखिका तथा अनुवादक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ( मृत्यू: २६ मे २०२१)**१९५०: उमा विरूपाक्ष कुलकर्णी -- प्रसिद्ध लेखिका, मराठी अनुवादक**१९४९: सुलभा तेरणीकर -- स्तंभ लेखिका व सिने लेखिका**१९४६: बशीर साहेबजी मुजावर -- ज्येष्ठ लेखक**१९४५: रामनाथ कोविंद - भारताचे माजी राष्ट्रपती**१९४४: धीरज कुमार -- भारतीय अभिनेता, दूरदर्शन निर्माता आणि दिग्दर्शक**१९४३: योगीराज देवराव वाघमारे -- ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार, नाटककार, बालसाहित्यकार तथा पूर्व शिक्षणाधिकारी* *१९४३: प्रा. बापूराव निवृत्ती जगताप -- कवी लेखक* *१९३९: हिरा बनसोडे -- मराठी कवयित्री व समाजसेविका**१९३८:भीष्मराज बाम -- महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ (मृत्यू: १२ मे २०१७ )**१९३४:प्रा. विमल रघुनाथ लेले -- ज्येष्ठ लेखिका**१९३०: सूर्यकांत माधव कुलकर्णी -- अ.भा. ग्रंथालय चळवळीचे मुख्य संघटक, जेष्ठ लेखक कवी, संपादन**१९३०: जयदेवप्पा हलप्पा तथा जे.एच.पटेल – कर्नाटकचे १५ वे माजी मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ ऑक्टोबर १९९९) (मृत्यू: १२ डिसेंबर २००० )**१९२८: विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (मृत्यू: २१ जुलै २००१ )**१९२४: जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते**१९१९: गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७ )**१९१९: मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (मृत्यू: २४ मे २००० )**१९१७: महादेव विष्णू वाकडे (स्वामी माधवनाथ) -- नाथ संप्रदाय, प्रवचनकार (मृत्यू: ३० जुलै १९९६ )**१९१५: रतनलाल डोंगरचंद शहा -- लेखक**१९०६: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९७५ )**१९०५: मालती विश्राम बेडेकर -- कादंबरीकार, कथाकार (मृत्यू: ६ मे २००१ )**१८९५: लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १६ आक्टोबर १९५१ )**१८८१: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६ )**१८४७: अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या,’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३ )*🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१") (जन्म: १९६१ )**१९८२: हरी विष्णु मोटे -- खातनाम प्रकाशन (जन्म: २ ऑक्टोबर १९०७ )**१९३४: श्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे -- 'कळो न कळो' हे अजरामर काव्य लिहिणारे नागपूरातील जेष्ठ कवी (जन्म: ५ नोव्हेंबर १८८९ )**१९३१: शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (जन्म: १८ जानेवारी १८८९ )**१८६८: मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा(जन्म: १८ आक्टोबर १८०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दैवं चैवात्र पंचमम्*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा-कुणबीचे 54 लाख पुरावे समोर, शिंदे समितीचा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात 5 हजारांची वाढ, आता मिळणार 15 हजारांचं मानधन, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मन की बात च्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले श्रोत्यांचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावती व अकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर, सरकारच्या  निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इलेक्ट्रोल बॉण्ड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कानपूर टेस्टमध्ये बांगलादेशचा डाव 233 धावांवर गुंडाळला; रवींद्र जडेजाचे कसोटीमध्ये 300 बळींचा विक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *भूकंप* 📙 ****************भूकंपाचा अनुभव भारतीयांना नवीन नाही. १९५५ साली आसाममध्ये प्रचंड भूकंप झाला होता. १९६७ साली कोयनेच्या परिसरात झालेल्या भूकंपाने मुंबईपासून कोल्हापूरपर्यंतचा सर्व टापू हादरवून सोडला होता. यानंतरचा १९८८ साली बिहारमध्ये झालेला भूकंप कित्येक खेडोपाडी उद्ध्वस्त करून गेला. १९९२ साली उत्तरकाशी या हिमालयातील भागात झालेल्या भूकंपातून अजून लोक सावरायचे आहेत. भारतातील अत्यंत भीषण भूकंप ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर जिल्ह्यात झाला. किल्लारी व सास्तूर या दोन गावी त्याचा केंद्रबिंदू होता. या भीषण धक्क्यांमुळे मराठवाड्यातील मातीच्या घरांचा पूर्णतः विध्वंस होऊन ढासळलेल्या ढिगार्याखाली अंदाजे अकरा हजार माणसे जिवंत गाडली गेली. रात्रीच्या वेळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा प्रकार घडला. गावेच्या गावे उद्ध्वस्त व निर्मनुष्य करणारा प्रकार महाराष्ट्राच्या आठवणीत कायम राहील. कच्छमधील भूजजवळ त्यानंतरचा मोठा भूकंप होऊन फार मोठी मनुष्यहानी व इमारतींची हानी झाली. अहमदाबादसारख्या शहरातील मोठ्या वास्तूंना त्याची हानी पोहोचली. इतका तो मोठा होता. या भागांत धाब्याची मातीची घरे ही हवामानाला पूरक असल्याने बांधली जात. यानंतर या बांधणीबद्दलच साशंकता निर्माण झाली आहे. भूकंप झाल्यावर संपूर्ण भूपृष्ठाच्या थरथरण्यामुळे विध्वंस होत जातो. ज्या भक्कम समजल्या जाणाऱ्या पायावर आपण इमले उभारतो, तोच पाया डळमळीत होऊन थरथरल्यामुळे वरची इमारत तडे जाऊन कमकुवत बनते, प्रसंगी कोसळते.भूकंपाचा अनुभव अत्यंत चमत्कारिक असतो. सहसा हा अनुभव घेतलेला माणूस असा प्रसंग कधीच विसरणार नाही. अनेकदा घनगंभीर असा आवाज या वेळी आसमंतात भरून राहतो. घरांचे पत्रे, घरांतील फडताळातील वस्तू, मोकळ्या बरण्या, शेल्फवरची पुस्तके थरथरण्याने पडतात वा विस्कळीत होतात. अनेकदा भूकंपानंतर पाऊस पडल्याची नोंद आहे. फार मोठा भूकंप असेल तर झाडे उन्मळून पडणे, रेल्वेचे रूळ वेडेवाकडे पिळवटणे, तलावातील पाणी भूगर्भात नाहीसे होणे. रस्त्याच्या मध्यभागी कित्येक मीटर खोल जाणाऱ्या भेगा पडणे असे दृश्य दिसते.भूकंपाचे क्षेत्र सहसा काहीशे चौरस किलोमीटरचे असते. याची नोंद कित्येक किलोमीटर दूरवर होऊ शकते. भूकंप मोजण्याच्या यंत्राला 'सायास्मोग्राफ' म्हणतात व भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये व्यक्त केली जाते. एक ते दहा रिश्टरमध्ये ती तीव्रता मोजली जाते. शून्य ते पाच या दरम्यान मोजल्या गेलेल्या भूकंपाची जाणीव होते, किरकोळ नुकसान होते. पाच ते सात या दरम्यान इमारतींची हानी, रस्त्याला तडे जाणे, झाडे पडणे हे होऊ शकते. तर सातपेक्षा जास्त रिश्टरचा भूकंप सहसा भयानक हानी करून जातो व त्याचा परिणाम सहज पाच सातशे किलोमीटरपर्यंत जाणवतो. पृथ्वी साडेचार अब्ज वर्षांपूर्वी उत्पन्न झाली पण त्या वेळेपासून आजपर्यंत पृथ्वीच्या बाह्यकवचाच्या खाली २९,००० किलोमीटर खोलीवर असलेल्या तप्त खडकांच्या द्रवस्वरूपामुळे अनेक बदल घडत आले आहेत. बाह्य कवच जेमतेम वीस ते तीस किलोमीटर जाडीचे असून या कवचाच्या सलग अशा टापुंच्या हालचाली सतत चालू असतात. या हालचाली होत असताना एक टापू ज्या वेळी दुसऱ्या टापूशी घासतो, चिकटतो, घासून सरकतो वा आदळतो, तेव्हा भूकंप होतात. या हालचालींमुळे प्रचंड पर्वत, मोठाले खडक, जलाशय यांच्या अस्तित्वावरच सखोल परिणाम घडतात. ज्यावेळी दोन टापू एकमेकांवर घासतात, त्यावेळीच आपल्याला ही भूकंपाची थरथर जाणवते. समुद्राच्या पोटात खोलवर अशा घडामोडी घडतात तेव्हा सुनामी लाटांची निर्मिती होते. विलक्षण विध्वंस करणाऱ्या या लाटा अनेक किनारे उद्ध्वस्त करीत जातात. इंडोनेशियाजवळ झालेल्या भूकंपातील सुनामीचा अनुभव भारतासकट अनेकांनी घेतला आहे. १९८९ साली अमेरिकेत सनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या भयानक भूकंपात प्रचंड असे फ्लायओव्हर पूल एखादा धुण्याचा कपडा पिळावा असे पिळवटून कोलमडले होते. तर १९०६ साली त्याच भागात झालेल्या भूकंपात कित्येक किलोमीटर लांबीचे भूकंपाचे टापू एकमेकांवर आदळल्याची खूण आजही दिसू शकते. भूकंपाची कारणे आजही अज्ञात आहेत. मध्य कवचामध्ये उत्पन्न होणाऱ्या अतिदाबामुळे बाह्य कवचाच्या हालचाली होत असाव्यात व हा दाब कित्येक वर्षे हळूहळू निर्माण होत असावा, असे मानले जाते. जगामधील भूकंप होऊ शकणारे पट्टे मात्र ज्ञात आहेत. भूकंपाला तोंड देऊ शकणारी घरे, कारखाने, यंत्रे आपण उभारू शकतो, पण त्यासाठी अफाट खर्च येतो. जपानमध्ये या स्वरूपाची काळजी घेऊन मोठ्या इमारती उभारल्या गेल्या आहेत. दुसरी सोपी काळजी म्हणजे भक्कम लाकडी व लोखंडी सांगाड्यावर घरे उभारणे. मधल्या भिंती हलक्या, तकलादू अशा वस्तूंनी उभ्या केल्या जातात. जपान हे राष्ट्र भूकंपाला तोंड देण्यासाठी सतत सज्ज असते. ११ मार्च २०११ रोजी झालेल्या तीव्र भूकंपाला व त्यानंतर उत्पन्न झालेल्या सुनामीला तोंड देणे उत्तर जपानला कठीण गेले. ८.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का फुकुशिमा या शहराला बसला. त्याचा केंद्रबिंदू शहरापासून ३०० किलोमीटर दूर समुद्राच्या पोटात होता. त्यामुळे प्रथम भूकंपाचे हादरे व त्यानंतर १० मीटर उंचीच्या सुनामी लाटा यामुळे किनाऱ्यावरची कित्येक गावे नामशेष झाली. या तडाख्यात फुकुशिमा येथील अणुविद्युत निर्मितीकेंद्रेही सापडली. सततचे भूकंप व सुनामीला तोंड देण्याची तयारी असलेल्याने या प्रलयंकारी भूकंपानंतरही मनुष्यहानी लाखोंनी न होता हजारांमध्येच थांबली. तीव्र स्वरूपाच्या भूकंपाला तोंड देताना नेहमीच अनेक प्रश्न समोर उभे राहतात. अनेक घरे कोसळून झालेली मनुष्यहानी, निवारा तुटल्याने उघड्यावर आलेली माणसे, निरुपयोगी झालेली दळणवळणाची सर्व साधने (वीज, टेलिफोन, रस्ते, रेल्वे) पिण्याच्या पाण्याचे पाइप फुटल्याने त्याचा तुटवडा या साऱ्याला तोंड देणे कठीण असते. मोठ्या भूकंपाला एखादे राष्ट्रही सहज तोंड देऊ शकत नाही ते यामुळेच. भूकंपाची पूर्वसूचना देणारी एखादी यंत्रणा वा एखादे संशोधन नजीकच्या भविष्यात होईल असेही कोणतेच चिन्ह नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*R. B. I. - Reserve Bank of India*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचार न करता पुस्तकं वाचणे म्हणजे न पचविता खात सुटणं*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्यावरणपूरक ऑक्सीजन बर्ड पार्कचे नागपूर येथे नुकतेच कोणाच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले ?२) दुबईत होणाऱ्या चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) कोणत्या चित्रपटाची २०२४ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे ?४) 'बेढप' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष व महिला विभागात भारताने कोणते पदक पटकावले ? *उत्तरे :-* १) नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री २) डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत ३) लापता लेडीज ४) बेडौल ५) सुवर्णपदक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 व्यंकटेश काटकर, सेवानिवृत्त शिक्षक तथा साहित्यिक, नांदेड👤 माधव शिंदे👤 श्रीकांत भोसके👤 नारायण अवधूतवार, बिलोली👤 विशाल मस्के👤 व्यंकट रेड्डी मुडेले👤 निलेश पंतमवार, नांदेड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाचे हे घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे।। मी तू हा विचार विवेके शोधावा । गोविंदा माधवा याची देही।। देही ध्याता ध्यान त्रिकुटीवेगळा । सहस्त्रदळी उगवला सुर्य जैसा।। ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योती । या नावेरूपे ती तुम्हीं जाणा।। ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गरजेपेक्षा जास्त मिळूनही समाधान होत नसेल तर त्याला हाव म्हणतात. एकदा ती हाव निर्माण झाली की, माणूस कोणत्याही थराला जाऊन पोहोचतो. आणि शेवटी त्याच जगात जगत असतो. या प्रकारचे जगणे फक्त स्वतः पुरते मर्यादित असतात. त्या जगण्याला काही अर्थ लागत नाही शेवटी हातात सुद्धा काहीही राहत नाही म्हणून या प्रकारचेही जगणे नसायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालहट्ट*एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला. सहसा असे होत नसे. दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलाच्या सल्ला घेत असे. त्यामुळे बिरबल वेळेवर हजर नसल्याने अकबर नाराज होता. बिरबलाने आत येताच अकबराला मुजरा केला. अकबर त्याला म्हणाला, “काय हे बिरबल? आमचा वजीरच दरबारात उशिरा येतोय हे आम्हाला आवडलं नाही.”“माफ करा खाविंद. मी वेळेत तयार होतो, पण जरा अडकलो होतो.”“अडकलो होतो म्हणजे, राज्याच्या कारभारापेक्षा काय महत्वाचं काम आलं होतं?”“तसं नाही खाविंद. मला तसं नव्हतं म्हणायचं. खरं तर माझा मुलगा मी घरीच थांबावे, त्याच्याशी खेळावे म्हणुन हट्ट करत होता. मी दाराकडे वळलो कि रडत होता. त्याची समजुत काढता काढता जरा वेळ लागला. माफी असावी.”“काहीतरीच काय बिरबल, एवढ्या मोठ्या राज्याचा वजीर तु आणि एका लहान मुलाला तुला पटकन समजावता येत नाही?”“हुजूर, बालहट्ट काही सोपी गोष्ट नसते. लहान मुलांना उठसूट रागावलेलं चांगलं नसतं. आणि त्यांना फार समजही नसते. त्यांना त्याक्षणी एखादी गोष्ट हवी वाटली तर तीच पकडून बसतात. त्यांना जरा प्रेमाने, गोडीगुलाबीने समजावणं कठीण काम असतं. त्याला वेळ लागतोच.”“मला त्यात काही अवघड वाटत नाही बिरबल. तू पराचा कावळा करतो आहेस.”“तुम्ही काही वेळ मुलांसोबत घालवल्यावर तुम्हाला नक्की पटेल, खाविंद.” “आण लहान मुलांना. मी दाखवतोच तुला, सहज सांभाळीन मी.”“हुजूर, लहान मुलांना आणायची गरज नाही. मला आता लहान मुलांचा चांगलाच अनुभव आहे, काही वेळ मीच लहान मुलांसारखा वागतो आणि तुम्ही माझ्या वडिलांसारखे वागा.”“चालेल.”“पण हुजूर, एक अट आहे. तुम्ही न चिडता, न रागावता, न ओरडता मला सांभाळून दाखवायचं.”“मंजुर आहे बिरबल, आज दरबार संपल्यावर तु मुलासारखा वाग आणि मी वडिलांसारखा वागतो.” दरबार संपला आणि निवाडे, तक्रारी अशा विविध कामांसाठी आलेली माणसे घरी गेली. अकबराने बिरबलाला सांगितले चल आता ठरले तसे करूया. बिरबल लगेच खाली बसला. आणि मला खेळणे हवेत म्हणुन हट्ट सुरु केला. अकबराने त्याची समजूत काढली, “अरे बेटा, इथे दरबारात कुठे खेळणे असणार? आपण पकडा पकडी खेळूया का?”“नाही नाही, मला खेळणे हवेत.” असे म्हणुन बिरबलाने मोठ्याने रडायला सुरु केले. “अकबराने आपल्या सेवकाला खेळणे आणायला पाठवले. आणि मग बिरबलाला म्हणाला “बेटा, बघ मी तुझ्यासाठी खेळणे आणायला सेवकाला पाठवले आहे. आता जरा शांत हो. खेळणे येईपर्यंत आपण दुसरे काहीतरी खेळू.”बिरबल शांत झाला. आणि म्हणाला “ठीक आहे बाबा, आपण घोडा घोडा खेळू. तुम्ही घोडा व्हा, मी तुमच्यावर रपेट मारणार.” अकबर चमकला. “हे काय बिरबल? तू माझ्या पाठीवर बसणार? तुझी एवढी हिम्मत?”“हुजूर आपण भूमिकेत आहोत हे विसरू नका. मुले आपल्या बाबांशी घोडा घोडा खेळतच असतात. तुम्हाला नसेल खेळायचे तर तुम्ही हरलात म्हणुन कबुल करा.”“नाही, अजुन मी हरलो नाही. मला कोणी घोडा बनवलं नाही अजुन. पण हरकत नाही. मी बनतो घोडा.”अकबर खाली बसला आणि वाकुन घोडा झाला. बिरबल त्याच्या पाठीवर बसुन फिरून आला. अकबराचं अंग अवघडलं.सेवक खेळणे घेऊन आला. बिरबल त्या खेळण्यांशी काहीवेळ खेळला. अकबराला वाटले आता झाले. तेवढ्यात बिरबलाने मला भूक लागली म्हणुन भोकाड पसरले. अकबराने त्याच्यासाठी खायला मागवले पण तो खायला ऊस हवा म्हणुन रडायला लागला. अकबराने सेवकाला पाठवुन उसाच्या कांड्या मागवल्या. त्या येईपर्यंत बिरबल रडतच होता. सेवक उसाच्या कांड्या घेऊन हजर झाला. बिरबल म्हणाला मी इतका मोठा ऊस कसा खाऊ? मला याचे तुकडे करून द्या.सेवकाने त्याचे छोटे तुकडे केले. परत बिरबल रडायला लागला. “फार छोटे तुकडे केले, मला थोडे मोठे तुकडे हवे होते.”अकबराने बिरबलाला सांगितले “काही होत नाही बेटा, आपण दुसरी कांडी घेऊन तिचे थोडे मोठे तुकडे करू. मग झालं ना?” बिरबल म्हणाला “नाही नाही, मला दुसरी कांडी नाही ह्याच कांडीचे थोडे मोठे तुकडे हवे होते.” अकबराने समजावुन सुद्धा बिरबल ऐकेना. आता अकबराची सहनशक्ती संपली. तो ओरडला. “बिरबल, बस झाला हा वाह्यातपणा, आता शांत हो नाही तर चाबकाचे फटके देईन.”बिरबल रडायचं थांबला आणि लगेच नेहमीच्या आवाजात अकबराला म्हणाला “पाहिलंत खाविंद, मुलांना सांभाळणं एवढं सोपं नसतं. तुम्ही तर एका लहान मुलाला, खोटा का असेना, चाबकाचे फटके मारायला निघालात.” अकबर शांत झाला. “बरोबर आहे बिरबल, मला वाटलं तेवढं हे सोपं नाही. आता हे खेळणे आणि ऊस घरी घेऊन जा तुझ्या मुलासाठी. त्याच्या बाबाला आम्ही दरबाराच्या कामात अडकवुन ठेवतो म्हणुन. आम्हाला तुझी आजची अडचण समजली. पण तरीही दरबारात पुन्हा उशीर करू नकोस. आपल्या खाजगी कारणासाठी प्रजेला खोळंबुन ठेवणं बरोबर नाही. आपल्या मुलाशी जरा लवकर खेळ आणि दरबाराच्या वेळेच्या आधीच त्याची समजूत काढुन लवकर निघत जा.” बिरबलानेही ते मान्य केले आणि अकबराचा निरोप घेऊन घरी गेला.लेखक: आकाश खोत यांच्या ब्लॉग वरून साभार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/oHndJ4zrP5JF9C7A/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••🟣 *_ या वर्षातील २७४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊंडेशनतर्फे ’हॉल ऑफ फेम’ हा विशेष पुरस्कार जाहीर**१९९८: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना 'शांतिस्वरुप भटनागर' पुरस्कार जाहीर**१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’दादासाहेबफाळके पुरस्कार’ प्रदान**१९९३: लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.**१९६१: दुलीप करंडकाचा पहिला सामना मद्रास (चेन्‍नई) येथे खेळला गेला.**१९३२: महात्मा गांधीच्या प्रेरणेने हरिजन सेवा संघाची स्थापना**१८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: ह. भ. प. शिवाजी महाराज दाते -- लेखक**१९८०: मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू**१९७२: शंतनु मुकर्जी ऊर्फ ’शान’ – पार्श्वगायक**१९७०: प्रमोद कोयंडे -- लेखक, पत्रकार* *१९६७: दीप्ती भटनागर -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९६५: डॉ. ज्योती जनार्दन नागपुरकर -- कवयित्री* *१९६४: सायमन मार्टिन -- प्रसिद्ध मराठी कवी**१९६१: चंद्रकांत पंडित – क्रिकेटपटू**१९६०: प्रा. डॉ. श्रीकांत तारे -- प्रसिद्ध स्तंभलेखक, कवी, व्याख्याते, कथाकार**१९५९: प्रमोद कर्नाड -- प्रसिद्ध मराठी लेखक कवी**१९५६: अंजली दीपक कोनकर -- कवयित्री, लेखिका**१९५५: अनंत वसंत पळशीकर -- नाट्य निर्माते**१९५१: नारायण कुलकर्णी-कवठेकर -- विदर्भातील आघाडीचे कवी व संपादक* *१९४३: निळू दामले -- मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक**१९४२: भास्कर लक्ष्मण भोळे -- लेखक तत्त्वचिंतक व विचारवंत (मृत्यू: २४ डिसेंबर २००९ )**१९४०: राजाराम पिराजी ढाले -- आंबेडकरी चळवळीतील नेते, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी (मृत्यू: १६ जुलै २०१९ )**१९३३: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (मृत्यू: २८ डिसेंबर २००६ )**१९२२: ऋषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६ )**१९१९: फिरोज दस्तूर -- भारतीय अभिनेता आणि किराणा घराण्याचे (गायन शैली) भारतीय शास्त्रीय गायक (मृत्यू: ९ मे २००८ )**१९१५: मदन पुरी -- चित्रपट अभिनेते (मृत्यू: १३ जानेवारी १९८५ )**१९१३: शशिकांत पुनर्वसू तथा मोरेश्वर शंकर भडभडे -- कथाकार, प्रवासवर्णनकार (मृत्यू: २३ जुलै १९५५ )**१९००: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१ )**१८९३: वासुदेव वामन भोळे -- कथाकार, नाटककार,नाट्यसमीक्षक (मृत्यू:४ आक्टोबर १९७६)* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९: विजू खोटे -- हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली (जन्म: १७ डिसेंबर १९४१ )**२०१३: राजीव पाटील -- मराठी चित्रपट दिग्दर्शक (जन्म: २७ मार्च, १९७३ )* *२००७: मच्छिंद्र कांबळी -- ज्येष्ठ मराठी थिएटर अभिनेता,दिग्दर्शक आणि निर्माता(जन्म: ४ एप्रिल १९४७ )**२००४: कुलवंत जानी -- चित्रपट गीतकार (जन्म: १४ जुलै १९४०)**२००१: माधवराव शिवाजीराव शिंदे-- माजीकेन्द्रीय रेल्वे मंत्री,काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज,उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन (जन्म: १० मार्च १९४५ )**१९९८: चंद्राताई किर्लोस्कर – ’भूदान’ चळवळीतील कार्यकर्त्या**१९९२: गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार,‘अर्वाचीन मराठी वाड़्‍मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३ )**१९८५: चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक (जन्म: २६ एप्रिल १९०० )**१६९४: मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर (जन्म: १० मार्च १६२८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आधारकार्डचा इतिहास*महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंबली या गावातून दिनांक 29 सप्टेंबर 2010 रोजी आधारकार्ड योजनेला सुरुवात करण्यात आली. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; पीएम मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, बैठकीत झाली घोषणा; नारायण गडावरुन रणशिंग फुंकणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी; योग्य उमेदवार ठरवण्यासाठी शरद पवारांची व्यूहरचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *चंद्रपूरमधील शाळा अदानी समूहाकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आली,  महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव; संजय राऊतांचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नेपाळमध्ये महापुरात 60 जणांचा मृत्यू, दुसरीकडे, अमेरिकेत हेलन चक्रीवादळामुळे 52 मृत्यूमुखी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कानपुर - पावसामुळे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ ही रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 फुलं रंगीबेरंगी का असतात ? 🌺अनेक झाडांची फुलं तर्‍हेतर्‍हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्‍या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात. त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*R. T. O. - Regional Transport Office*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे ?२) भारत देशाची जमीन हद्द किती देशाच्या हद्दीस लागून आहे ?३) चौथे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन ७ व ८ नोव्हेंबर २०२४ ला कोठे होत आहे ?४) 'बाप' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली ? *उत्तरे :-* १) जगतगुरू संत तुकाराम महाराज २) ७ देश ३) दुबई ४) वडील, पिता, जनक, जन्मदाता, तात ५) हरिणी अमरसूर्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रमोद रत्नाळीकर, उच्च श्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, किनवट👤 सतिश दमकोंडवार, विष्णू नगर, नांदेड👤 अमोल रवीकुमार वानरे👤 विशाल गणेशराव जारे पाटील👤 संतोष भालके👤 महेश घुगरे👤 पोतन्ना डेबेकर👤 देवन भोयर👤 आकाश आंबोरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची।। न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण।। ठायीचं बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा।। रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ।। याविण आणिक असता साधन । वाहतसे आन विठोबाची।। तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी । शहाणा तो धनी घेतो येथे।। ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••झोपेत दिसणाऱ्या भयानक स्वप्नांवर तसेच निरनिराळ्या स्वप्नांवर जर आपण विश्वास करत राहिलो तर ते, स्वप्न आपल्याला सुखाने जगू देणार नाही. त्यासाठी त्या स्वप्नांना विसरून आपण बघितले असणारे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. झोपेत दिसणारे स्वप्न हे, कधीच नवी दिशा देत नाही तर उलट ते आपल्याला भ्रमात पाडत असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तुलना*एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले. तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती. अचानक तिला वेदना व्हायला लागल्या. तिला बाळाचा जन्म व्हायची वेळ झाली आहे हे लक्षात आले. ती एका झाडाच्या आडोशाला गेली. तिला मदतीला कोणी नव्हते. तिने एकटीने स्वतःच बाळाला जन्म दिला. तलावातले पाणी घेऊन बाळाला स्वच्छ केले. झोळीतले सामान रिकामे केले, झोळी थोडी झटकून त्याच कपड्यात बाळाला गुंडाळले. बाळाला एका कडेवर घेतले, हातात येईल तितके सामान घेतले आणि आपल्या घरी निघाली. अकबर बिरबल दोघेही हे पाहुन थक्क झाले. अकबर बिरबलाला म्हणाला. “कमाल आहे या बाईची. गर्भवती असताना इतके काम करत होती. आणि इतक्या कठीण वेळी कोणीही सोबत नसताना, वैद्य नसताना तिने स्वतःच सर्व काही निभावले. नाही तर आमची बेगम. हजार नखरे असतात तिचे. आणि साधं सर्दी पडसं झालं तरी सगळं सोडून आराम करत बसते.” दोघे शिकार करून परत आल्यावरही अकबराच्या डोक्यातुन हा विषय गेला नव्हता. ते दोघे परत आल्यावर त्याने आपल्या बेगमशी थोडे तुसडेपणाने वागायला सुरु केले. गोडीगुलाबीने वागणे, तिच्या इच्छा पुरवणे बंद केले. बेगम दुःखी झाली. तिने बिरबलाला भेटून आपले दुःख सांगितले. ह्याचे कारण बिरबलाच्या लक्षात आले. त्याने बेगमला निश्चित राहायला सांगितले आणि तो अकबराला समजावण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. बिरबलाने अकबराच्या माळ्याला बोलावुन घेतले. त्याला सांगितले कि काही दिवस बागेतल्या फुलझाडांची काळजी घेऊ नकोस. बागेत फेरफटका मारणे हा अकबराचा आवडता छंद होता. छान बहरलेली फुलझाडे बघुन तो खुश व्हायचा. त्या बागेची काळजी नाही घ्यायला सांगितल्याने माळी घाबरला, पण बिरबलाने त्याला अभय दिले. त्याला कोणी जाब विचारल्यावर बिरबलाच्या आदेशाने असे केल्याचे सांग म्हणुन सांगितले. काही दिवसातच बागेतली फुलझाडे थोडी कोमेजली. त्यांना चांगली फुले येत नव्हती. अकबर बागेत फिरायला गेल्यावर बागेची ही दशा पाहुन संतापला आणि माळ्याला बोलावून फैलावर घेतले. माळ्याने घाबरत घाबरत असे बिरबलाने करायला सांगितल्याचे अकबराला सांगितले. अकबराने त्याला जायला सांगितले आणि फुलझाडे नीट राहिली पाहिजेत असा दम दिला. तो गेल्यावर अकबराने बिरबलाला बोलावुन त्याला जाब विचारला. बिरबल म्हणाला “हुजूर, ही फुलझाडे फारच नाजुक असतात. त्यांचे किती नखरे असतात. एका माळ्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला ठेवावे लागते. जंगलातली झाडे पहा. कोणी त्यांच्याकडे बघत नाही तरी किती छान वाढतात, सावली देतात, फळे देतात. ह्या झाडांनी त्यांच्यासारखे व्हावे म्हणुन मी माळ्याला सांगितले कि ह्यांचे लाड पुरवू नकोस.” “बिरबल अरे ती जंगलात वाढणारी मजबूत झाडे कुठे, ही नाजूक फुलझाडे कुठे ? ह्यांची काळजी घ्यावीच लागते. नाही तर त्यांची वाढ कशी होणार ? दोन्ही झाडांचे प्रकारच वेगळे आहेत, त्यांना एकसारखे कसे वाढवता येईल?”“अगदी बरोबर बोललात खाविंद. जंगलात स्वतःच वाढणाऱ्या मजबूत झाडे आणि महालात वाढणारी सुंदर आणि नाजूक झाडे यांची तुलना करण्यात काही अर्थ नाही.” अकबराला बिरबलाच्या इशाऱ्याचा अर्थ समजला. त्याने बिरबलाला सांगितले कि “मी तुला काय म्हणायचे ते समजलो. महालात लाडाकोडात वाढणाऱ्या, सर्व सुविधांची सवय असणाऱ्या बेगमेची, जंगलात लहानपणापासून अवघड परिस्थितीत राहण्याची सवय असणाऱ्या भिल्ल स्त्रीची तुलना होऊ शकत नाही. माझ्या हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.”अकबर आपल्या बेगमेशी पुन्हा नेहमीसारखे वागायला लागला. बेगम परत प्रसन्न झाली आणि तिनेही बिरबलचे आभार मानले. लेखक : आकाश खोत यांच्या ब्लॉग वरून साभार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 सप्टेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/BhUohM8LGxtsEshf/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_जागतिक रेबीज दिन_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••🟤 *_माहिती अधिकार दिन_* 🟤••••••••••••••••••••••••••••••🟤 *_ या वर्षातील २७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर**१९९९: महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर**१९६०: माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९५०: इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९३९:दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.**१९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟤 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: मुनमुन दत्ता -- हिंदी चित्रपट व दूरदर्शन अभिनेत्री**१९८२: अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा भारतीय**१९८२: रणबीर कपूर – प्रसिद्ध अभिनेता**१९८१: प्रा. डॉ. राजाराम अंकुशराव झोडगे -- लेखक* *१९६१: दीपक सुधाकर (डी.एस.) कुलकर्णी-- लेखक, कवी ,वक्ते**१९६०: विनिता पिंपळखरे -- लेखिका, कवयित्री, नाटककार**१९६०: ऑगस्टीन लोगी -- वेस्टइंडीज चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९५९: हरिहर जनार्दन कुलकर्णी (आनंदहरी) -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५७: नितीन रमेश तेंडुलकर -- कवी, लेखक* *१९५७: महेश कोठारे --- मराठी चित्रपट-अभिनेते, मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता**१९५२: सुरेशकुमार वैराळकर -- जेष्ठ गझलकार व शाहीर**१९५१: शैलेजा तुषार झाडे -- कवयित्री, लेखिका**१९५१: माया सुरेश महाजन -- प्रसिद्ध लेखिका, अनुवादक**१९४९: प्रा. वैजनाथ महाजन -- जेष्ठ लेखक* *१९४९: अजंना उदय कर्णिक -- कवयित्री, लेखिका* *१९४६: माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट माजी कप्तान**१९४०: प्रा. प्रसन्नकुमार पाटील -- कवी, समीक्षक* *१९३६: आशा मुंडले -- लेखिका* *१९३३: डॉ.गजानन रामचंद्र देशमुख -- लेखक* *_१९२९: लता मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्‍न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण (मृत्यू: ६ फेब्रुवारी २०२२ )_* *१९२४: प्रभाकर दिगंबर देशपांडे -- लेखक तथा माजी शिक्षणाधिकारी**१९०९: पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (मृत्यू: ११ ऑगस्ट २००० )**१९०७: भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१ )**१८९८: शंकर रामचंद्र दाते (मामाराव दाते) -- आधुनिक पद्धतीने मुद्रण करण्यासाठी यांत्रिक प्रणाली विकसित करणारे मुद्रणतज्ज्ञ (मृत्यू: १८ जानेवारी १९९२ )**१८६५: श्रीनिवास नारायण कर्नाटकी -- चरित्रकार, निबंधकार ( मृत्यू: १७ जुलै १९४८ )* *१८०३: प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७० )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: मनकोम्बू सांबशिवन (एम.एस.) स्वामीनाथन -- भारतीय कृषीशास्त्रज्ञ , कृषी शास्त्रज्ञ ( जन्म: ७ ऑगस्ट १९२५ )* *२०१२: ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (जन्म: २९ सप्टेंबर १९२८ )**२०१२: माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)(जन्म: १९२९ )* *२००४: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (जन्म: १२ डिसेंबर १९०५ )**१९९३: चंद्रशेखर दुबे ( सी.एस. ) -- भारतीय अभिनेता (जन्म: ४ सप्टेंबर १९२४ )**१९८९: फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ११ सप्टेंबर १९१७ )**१९५६: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (जन्म: १ आक्टोबर १८८१ )**१९५३: एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २० नोव्हेंबर १८८९ )**१८९५: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १८२२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रांगाच रांगा ......*आज कोठे ही जा त्याठिकाणी माणसांच्या रांगाच दिसून येत आहेत. ज्याप्रमाणे मुंग्यांची रांग लागते तशी माणसांची रांग बघायला मिळत आहे. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानसभा निवडणूक - तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही कोणतीही कारवाई का केली नाही असं सांगत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरक्षण द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार:धनगर समाजाचा इशारा, आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करुन देऊ, राज्य सरकारची हायकोर्टात हमी, तीन शहरांमध्ये झालाय अंत्यसंस्काराला विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे मेट्रो सुरू करण्यासाठी मविआ नेत्यांचे ठिय्या आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी होणार उद्घाटन आणि शिंदे-फडणवीस करणार मेट्रोनं प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह 100 कोटी खर्चून  167 गुंठ्यात  साकारणार शिवसृष्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे प्रेंझेटेशन सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेकडून ABVP चा धुरळा; आदित्य ठाकरेंचा करिश्मा कायम, सात जागा जिंकल्या; उर्वरीत तीन उमेदवारांची विजयकडे वाटचाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस : पावसाने पहिल्या दिवसाचा खेळ संपवला, बांगलादेशच्या 35 षटकांमध्ये 3 बाद 107 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विषाणू* 📙मानवी आजारातील अनेक आजारांवर आजही औषधे सापडलेली नाहीत. हे आजार वाढून त्यातून अन्य उद्भव वाढू नयेत व रुग्णाला तात्पुरता आराम पडावा, एवढेच उपचार या वेळी शक्य होतात. अशा आजारांतील खूप आजार हे विषाणूंमुळे होतात.ज्यावेळी सूक्ष्मदर्शक यंत्रांचे स्वरूप प्रगत होत जाऊन अतिप्रगत असे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरात आले, तेव्हा विषाणु हा प्रकार प्रथम ज्ञात होऊन डोळ्यांनी बघता आला. एखाद्या मिलिमीटरच्या लक्ष ते दशलक्षांश भागाएवढा हा विषाणु सहसा दंडगोलाकार वा गोलाकार आकारात असतो. आज घटकेस अगणित विषाणू आपल्या आसपास वावरत असतात, पण त्यातील मोजकेच आजारनिर्मितीला कारणीभूत होतात.विषाणू हा सजीव प्राणी आहे की नाही ? नेमके उत्तर आता माहीत नाही. परोपजीवी वाढीमुळे व परोपजीवी अस्तित्वामुळे शास्त्रज्ञ हे मत व्यक्त करतात. विषाणू जेव्हा एखाद्या पेशीमध्ये प्रवेश करतात, तेव्हाच त्यांची झपाट्याने वाढ सुरू होते व प्रताप सुरू होतात. साधी नेहमी होणारी सर्दी, काही प्रकारचा खोकला, अनेक प्रकारचे जुलाब, पूर्वीची भयानक अशी देवीची साथ, गोवर, कांजण्या हे सारे विषाणूंमुळे होणारे रोग आहेत. या साऱ्यांच्या जोडीला अलीकडे अनेक वेळा ज्या रोगात नक्की कारण सापडत नाही, त्या वेळी डॉक्टर लोक विषाणूंकडे बोट दाखवतात. कॅन्सरकडे या दृष्टीने अलीकडे बघितले जाते.साऱ्या जगभर सध्या चर्चेचा विषय बनलेला आजार एड्स हा विषाणूंमुळेच होतो. विषाणू जंतुनाशके वा प्रतिजैविके यांना अजिबात दाद देत नाहीत. त्यामुळेच प्रतिजैविकांची (अँटिबायोटिक्सची) प्रचंड फौज मानवी हातात असूनही विषाणूंमुळे झालेल्या आजारांवर ते झाल्यानंतर काडीचाही परिणाम होत नाही. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी शरीरामध्ये प्रतिगोलके (अँटीबॉडीज) तयार करणारी लस टोचणे एवढाच उपाय आपल्या हातात राहतो. या दृष्टीने अनेक आजारांवर प्रतिबंध करणाऱ्या लशी आपण तयारी केलेल्या आहेतच. पण विषाणू मोठे तरबेज असल्याने अनेक लसींना दाद न देणारे नवीन विषाणू पुन्हा तयार होतात.सर्दी पडसे, इन्फ्ल्यूएन्झा यांविरूद्ध लस तयार करण्यात यश मिळूनही नवीन प्रकारचे विषाणू तयार होत गेल्याने या लसींचा वापर निरुपयोगी ठरत गेला आहे. एड्ससारख्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यात अद्यापही यश आलेले नाही.विषाणूंमुळे काही वेगवेगळी लक्षणे जरूर दिसतात, पण मुख्य लक्षण राहते, ते म्हणजे ताप. विषाणूंच्या आजाराबाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे दहापैकी नऊ रुग्ण आपोआप ठराविक काळाने बरे होऊ शकतात. गोवर, कांजण्या, कावीळ, गालगुंडे ही त्याचीच उदाहरणे आहेत. सर्दी हे सुद्धा एक चांगले उदाहरण आहे. आठवडाभरात आपोआप नाहीशी होणारी ही दुखणी आहेत, केवळ म्हणूनच प्राणिजगत त्यांना तोंड देऊ शकत आहे.विषाणूंची कृत्रिम पैदास करण्याची पद्धत मोठी कुतूहलजन्य असते. कोंबडीच्या अंड्यातील एम्ब्रिओ वा सूक्ष्म जीवात हे विषाणु टोचून त्यांची पैदास तेथे घडवली जाते. त्यातून लस निर्माण करायला पुरेसे विषाणू मिळवतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*C. I. D. - Criminal Investigation Department*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३ मे १९३९ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचार सरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली ?२) महाराष्ट्रातील एकमेव 'श्री शिवछत्रपती मंदिर' सिंधुदुर्ग किल्ल्यातील हे मंदिर कोणी बांधले ?३) राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे ?४) 'बक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'लोक आयुक्त' हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ? *उत्तरे :-* १) फॉरवर्ड ब्लॉक २) छत्रपती राजाराम ३) ३० वर्षे ४) बगळा ५) सन १९७२*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 रामप्रसाद वाघ👤 साईनाथ कानगुलवार, येवती👤 सचिन बावणे👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥ नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं । उल्हासेंकरूनी स्मरण जीवी ॥३॥अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं । हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥ संतसज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥ श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या सोबत कोणी हसून बोलले तर आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो आणि कोणी कठोर शब्दात बोलले तर त्याचा राग येतो किंवा दुसऱ्यांदा त्या व्यक्तीसोबत बोलण्याची इच्छा होत नाही. पण त्यावेळी त्या व्यक्तीपासून दूर जाण्याआधी एकदा त्याने बोललेल्या शब्दाविषयी विचार करून बघावा. कारण बरेचदा कठोरपणे बोललेल्या शब्दात सत्यता दडलेली असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पोपटाचे ध्यान*अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष, हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता. एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा म्हणुन दिला. ह्या पोपटाला माणसासारखे बोलण्यासाठी खास तयार केले होते. तो कुराणातल्या काही सोप्या आयतासुद्धा म्हणुन दाखवायचा. बादशहा भेटायला आला कि त्याला आपल्या घोगऱ्या आवाजात सलामी द्यायचा. अकबराचा त्या पोपटावर जीव जडला होता. त्याने एक सेवक खास ह्या पोपटाची काळजी घ्यायला ठेवला होता. त्याच्या पिंजऱ्यात अजिबात घाण राहिलेली किंवा खाण्या पिण्यात काही कसुर झालेली अकबराला चालत नसे. इतक्या छान पद्धतीने बडदास्त ठेवल्यामुळे तो पोपट छान जगला. इतर पोपटांच्या मानाने जरा जास्तच. पण शेवटी त्याचं वय होत आलं. तो थोडा आजारी पडायला लागला. सेवकाने जरी सर्व पदार्थ हजर केले तरी त्याचं खाणं पिणं नीट होत नव्हतं. अकबर त्याची हि अवस्था बघुन संतापत असे. त्याने सेवकाला सज्जड दम भरला. “पोपटाने खाल्लं नाही तर तुलाही खायला मिळणार नाही. पोपटाला काही झालेलं मला चालणार नाही. कोणी येऊन मला सांगावंच कि पोपट अल्लाला प्यारा झाला, मी त्याचं मुंडकंच उडवीन.”सेवक अतिशय भयभीत झाला. पोपट आता जास्त दिवस जगणार नाही हे त्याला कळुन चुकलं होतं. आता आपली काही खैर नाही या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याने बिरबलाला जाऊन सगळी हकीकत सांगितली. बिरबलाने त्याला शांत केले. त्याला सांगितले कि जर पोपट मेला तर अकबराच्या आधी त्याने बिरबलाला कळवायचे. मग बिरबल सगळं सांभाळुन घेईल. बिरबलाच्या आश्वासनाने तो निर्धास्त झाला. काही दिवसांनी पोपट देवाघरी गेलाच. आपल्या पिंजऱ्यात तो निपचित पडला. सेवकाने ठरल्याप्रमाणे त्वरेने अकबरापर्यंत खबर पोचण्याआधी बिरबलाला कळवले. बिरबल महालात गेला आणि अकबराला म्हणाला “खाविंद, चमत्कार झाला. आपला लाडका पोपट आता योगी अवस्थेत गेला आहे. अत्यंत एकाग्रतेने त्याने ध्यान लावले आहे. असा पोपट कोणीच आजवर पाहिला नव्हता. चला तुम्ही स्वतः पहा.” अकबर आश्चर्यचकित झाला आणि बिरबलसोबत पोपटाकडे गेला. त्याला पाहताक्षणी तो मेला असल्याचे त्याच्या लक्षात आले. “काहीही काय बडबडतोस बिरबल ? मेलाय तो पोपट. ध्यान करतोय म्हणे.”“काय म्हणताय खाविंद? अरे देवा… “ बिरबलाने मोठमोठ्याने आरडाओरडा सुरु केला. “हुजुरांचा आवडता पोपट गेला. आता हुजूर स्वतः जीव देतील, स्वतःचं मुंडकं उडवतील. अरे देवा आता आम्हा सर्वांचं कसं व्हावं… “ “मनाला येईल ते बोलु नकोस, बिरबल. मी का जीव देईन एका पोपटासाठी ? माझा आवडता होता तो पोपट हे खरंय, माझा खुप जीव होता त्याच्यात. पण काही दिवस आजारी होता तो. एक दिवस जाणारच होता. त्याच्यासाठी मी का जीव देईन.” “खाविंद तुम्ही जो कोणी पोपट मेला म्हणुन सांगेल त्याचं डोकं उडवाल म्हणुन सांगुन ठेवलं होतं. आम्हाला तर वाटलं होतं पोपट ध्यान करतोय, पण तुम्ही स्वतः म्हणालात तो मेलाय म्हणुन. आता तुम्हाला तुमचाच शिरच्छेद करावा लागेल.”आता अकबराच्या लक्षात सगळा प्रकार आला. पोपट मेल्याचं अकबराच्याच तोंडातुन वदवून बिरबलाने त्या सेवकाचे प्राण वाचवले होते. “असं काही नाही बिरबल. मी रागात म्हणालो असेन. एका पोपटासाठी कोणाचा शिरच्छेद खरंच थोडी ना करणार होतो मी. शेवटी प्रत्येकाला एक दिवस मरायचंच आहे. त्यासाठी एवढं टोकाला जाऊ नये कोणी.” असं म्हणुन अकबराने वेळ मारून नेली. त्या सेवकाने बिरबलाचे आभार मानले. अकबराने खरंच त्याला शिक्षा दिली असती तर पोपटासाठी माणसाचा जीव घेणारा दुष्ट म्हणुन त्याचीसुद्धा बदनामी झाली असती. ते रोखल्याबद्दल त्याने पण मनातल्या मनात बिरबलाचे आभार मानले.लेखक - आकाश खोत यांच्या ब्लॉगवरून साभार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 सप्टेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/BhUohM8LGxtsEshf/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_जागतिक रेबीज दिन_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••🟤 *_माहिती अधिकार दिन_* 🟤••••••••••••••••••••••••••••••🟤 *_ या वर्षातील २७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर**१९९९: महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर**१९६०: माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९५०: इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९३९:दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.**१९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟤 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: मुनमुन दत्ता -- हिंदी चित्रपट व दूरदर्शन अभिनेत्री**१९८२: अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा भारतीय**१९८२: रणबीर कपूर – प्रसिद्ध अभिनेता**१९८१: प्रा. डॉ. राजाराम अंकुशराव झोडगे -- लेखक* *१९६१: दीपक सुधाकर (डी.एस.) कुलकर्णी-- लेखक, कवी ,वक्ते**१९६०: विनिता पिंपळखरे -- लेखिका, कवयित्री, नाटककार**१९६०: ऑगस्टीन लोगी -- वेस्टइंडीज चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९५९: हरिहर जनार्दन कुलकर्णी (आनंदहरी) -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५७: नितीन रमेश तेंडुलकर -- कवी, लेखक* *१९५७: महेश कोठारे --- मराठी चित्रपट-अभिनेते, मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता**१९५२: सुरेशकुमार वैराळकर -- जेष्ठ गझलकार व शाहीर**१९५१: शैलेजा तुषार झाडे -- कवयित्री, लेखिका**१९५१: माया सुरेश महाजन -- प्रसिद्ध लेखिका, अनुवादक**१९४९: प्रा. वैजनाथ महाजन -- जेष्ठ लेखक* *१९४९: अजंना उदय कर्णिक -- कवयित्री, लेखिका* *१९४६: माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट माजी कप्तान**१९४०: प्रा. प्रसन्नकुमार पाटील -- कवी, समीक्षक* *१९३६: आशा मुंडले -- लेखिका* *१९३३: डॉ.गजानन रामचंद्र देशमुख -- लेखक* *_१९२९: लता मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्‍न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण (मृत्यू: ६ फेब्रुवारी २०२२ )_* *१९२४: प्रभाकर दिगंबर देशपांडे -- लेखक तथा माजी शिक्षणाधिकारी**१९०९: पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (मृत्यू: ११ ऑगस्ट २००० )**१९०७: भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१ )**१८९८: शंकर रामचंद्र दाते (मामाराव दाते) -- आधुनिक पद्धतीने मुद्रण करण्यासाठी यांत्रिक प्रणाली विकसित करणारे मुद्रणतज्ज्ञ (मृत्यू: १८ जानेवारी १९९२ )**१८६५: श्रीनिवास नारायण कर्नाटकी -- चरित्रकार, निबंधकार ( मृत्यू: १७ जुलै १९४८ )* *१८०३: प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७० )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: मनकोम्बू सांबशिवन (एम.एस.) स्वामीनाथन -- भारतीय कृषीशास्त्रज्ञ , कृषी शास्त्रज्ञ ( जन्म: ७ ऑगस्ट १९२५ )* *२०१२: ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (जन्म: २९ सप्टेंबर १९२८ )**२०१२: माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)(जन्म: १९२९ )* *२००४: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (जन्म: १२ डिसेंबर १९०५ )**१९९३: चंद्रशेखर दुबे ( सी.एस. ) -- भारतीय अभिनेता (जन्म: ४ सप्टेंबर १९२४ )**१९८९: फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ११ सप्टेंबर १९१७ )**१९५६: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (जन्म: १ आक्टोबर १८८१ )**१९५३: एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २० नोव्हेंबर १८८९ )**१८९५: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १८२२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रांगाच रांगा ......*आज कोठे ही जा त्याठिकाणी माणसांच्या रांगाच दिसून येत आहेत. ज्याप्रमाणे मुंग्यांची रांग लागते तशी माणसांची रांग बघायला मिळत आहे. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानसभा निवडणूक - तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही कोणतीही कारवाई का केली नाही असं सांगत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरक्षण द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार:धनगर समाजाचा इशारा, आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करुन देऊ, राज्य सरकारची हायकोर्टात हमी, तीन शहरांमध्ये झालाय अंत्यसंस्काराला विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे मेट्रो सुरू करण्यासाठी मविआ नेत्यांचे ठिय्या आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी होणार उद्घाटन आणि शिंदे-फडणवीस करणार मेट्रोनं प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह 100 कोटी खर्चून  167 गुंठ्यात  साकारणार शिवसृष्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे प्रेंझेटेशन सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेकडून ABVP चा धुरळा; आदित्य ठाकरेंचा करिश्मा कायम, सात जागा जिंकल्या; उर्वरीत तीन उमेदवारांची विजयकडे वाटचाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस : पावसाने पहिल्या दिवसाचा खेळ संपवला, बांगलादेशच्या 35 षटकांमध्ये 3 बाद 107 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विषाणू* 📙मानवी आजारातील अनेक आजारांवर आजही औषधे सापडलेली नाहीत. हे आजार वाढून त्यातून अन्य उद्भव वाढू नयेत व रुग्णाला तात्पुरता आराम पडावा, एवढेच उपचार या वेळी शक्य होतात. अशा आजारांतील खूप आजार हे विषाणूंमुळे होतात.ज्यावेळी सूक्ष्मदर्शक यंत्रांचे स्वरूप प्रगत होत जाऊन अतिप्रगत असे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरात आले, तेव्हा विषाणु हा प्रकार प्रथम ज्ञात होऊन डोळ्यांनी बघता आला. एखाद्या मिलिमीटरच्या लक्ष ते दशलक्षांश भागाएवढा हा विषाणु सहसा दंडगोलाकार वा गोलाकार आकारात असतो. आज घटकेस अगणित विषाणू आपल्या आसपास वावरत असतात, पण त्यातील मोजकेच आजारनिर्मितीला कारणीभूत होतात.विषाणू हा सजीव प्राणी आहे की नाही ? नेमके उत्तर आता माहीत नाही. परोपजीवी वाढीमुळे व परोपजीवी अस्तित्वामुळे शास्त्रज्ञ हे मत व्यक्त करतात. विषाणू जेव्हा एखाद्या पेशीमध्ये प्रवेश करतात, तेव्हाच त्यांची झपाट्याने वाढ सुरू होते व प्रताप सुरू होतात. साधी नेहमी होणारी सर्दी, काही प्रकारचा खोकला, अनेक प्रकारचे जुलाब, पूर्वीची भयानक अशी देवीची साथ, गोवर, कांजण्या हे सारे विषाणूंमुळे होणारे रोग आहेत. या साऱ्यांच्या जोडीला अलीकडे अनेक वेळा ज्या रोगात नक्की कारण सापडत नाही, त्या वेळी डॉक्टर लोक विषाणूंकडे बोट दाखवतात. कॅन्सरकडे या दृष्टीने अलीकडे बघितले जाते.साऱ्या जगभर सध्या चर्चेचा विषय बनलेला आजार एड्स हा विषाणूंमुळेच होतो. विषाणू जंतुनाशके वा प्रतिजैविके यांना अजिबात दाद देत नाहीत. त्यामुळेच प्रतिजैविकांची (अँटिबायोटिक्सची) प्रचंड फौज मानवी हातात असूनही विषाणूंमुळे झालेल्या आजारांवर ते झाल्यानंतर काडीचाही परिणाम होत नाही. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी शरीरामध्ये प्रतिगोलके (अँटीबॉडीज) तयार करणारी लस टोचणे एवढाच उपाय आपल्या हातात राहतो. या दृष्टीने अनेक आजारांवर प्रतिबंध करणाऱ्या लशी आपण तयारी केलेल्या आहेतच. पण विषाणू मोठे तरबेज असल्याने अनेक लसींना दाद न देणारे नवीन विषाणू पुन्हा तयार होतात.सर्दी पडसे, इन्फ्ल्यूएन्झा यांविरूद्ध लस तयार करण्यात यश मिळूनही नवीन प्रकारचे विषाणू तयार होत गेल्याने या लसींचा वापर निरुपयोगी ठरत गेला आहे. एड्ससारख्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यात अद्यापही यश आलेले नाही.विषाणूंमुळे काही वेगवेगळी लक्षणे जरूर दिसतात, पण मुख्य लक्षण राहते, ते म्हणजे ताप. विषाणूंच्या आजाराबाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे दहापैकी नऊ रुग्ण आपोआप ठराविक काळाने बरे होऊ शकतात. गोवर, कांजण्या, कावीळ, गालगुंडे ही त्याचीच उदाहरणे आहेत. सर्दी हे सुद्धा एक चांगले उदाहरण आहे. आठवडाभरात आपोआप नाहीशी होणारी ही दुखणी आहेत, केवळ म्हणूनच प्राणिजगत त्यांना तोंड देऊ शकत आहे.विषाणूंची कृत्रिम पैदास करण्याची पद्धत मोठी कुतूहलजन्य असते. कोंबडीच्या अंड्यातील एम्ब्रिओ वा सूक्ष्म जीवात हे विषाणु टोचून त्यांची पैदास तेथे घडवली जाते. त्यातून लस निर्माण करायला पुरेसे विषाणू मिळवतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*C. I. D. - Criminal Investigation Department*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३ मे १९३९ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचार सरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली ?२) महाराष्ट्रातील एकमेव 'श्री शिवछत्रपती मंदिर' सिंधुदुर्ग किल्ल्यातील हे मंदिर कोणी बांधले ?३) राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे ?४) 'बक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'लोक आयुक्त' हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ? *उत्तरे :-* १) फॉरवर्ड ब्लॉक २) छत्रपती राजाराम ३) ३० वर्षे ४) बगळा ५) सन १९७२*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 रामप्रसाद वाघ👤 साईनाथ कानगुलवार, येवती👤 सचिन बावणे👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥ नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं । उल्हासेंकरूनी स्मरण जीवी ॥३॥अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं । हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥ संतसज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥ श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या सोबत कोणी हसून बोलले तर आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो आणि कोणी कठोर शब्दात बोलले तर त्याचा राग येतो किंवा दुसऱ्यांदा त्या व्यक्तीसोबत बोलण्याची इच्छा होत नाही. पण त्यावेळी त्या व्यक्तीपासून दूर जाण्याआधी एकदा त्याने बोललेल्या शब्दाविषयी विचार करून बघावा. कारण बरेचदा कठोरपणे बोललेल्या शब्दात सत्यता दडलेली असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पोपटाचे ध्यान*अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष, हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता. एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा म्हणुन दिला. ह्या पोपटाला माणसासारखे बोलण्यासाठी खास तयार केले होते. तो कुराणातल्या काही सोप्या आयतासुद्धा म्हणुन दाखवायचा. बादशहा भेटायला आला कि त्याला आपल्या घोगऱ्या आवाजात सलामी द्यायचा. अकबराचा त्या पोपटावर जीव जडला होता. त्याने एक सेवक खास ह्या पोपटाची काळजी घ्यायला ठेवला होता. त्याच्या पिंजऱ्यात अजिबात घाण राहिलेली किंवा खाण्या पिण्यात काही कसुर झालेली अकबराला चालत नसे. इतक्या छान पद्धतीने बडदास्त ठेवल्यामुळे तो पोपट छान जगला. इतर पोपटांच्या मानाने जरा जास्तच. पण शेवटी त्याचं वय होत आलं. तो थोडा आजारी पडायला लागला. सेवकाने जरी सर्व पदार्थ हजर केले तरी त्याचं खाणं पिणं नीट होत नव्हतं. अकबर त्याची हि अवस्था बघुन संतापत असे. त्याने सेवकाला सज्जड दम भरला. “पोपटाने खाल्लं नाही तर तुलाही खायला मिळणार नाही. पोपटाला काही झालेलं मला चालणार नाही. कोणी येऊन मला सांगावंच कि पोपट अल्लाला प्यारा झाला, मी त्याचं मुंडकंच उडवीन.”सेवक अतिशय भयभीत झाला. पोपट आता जास्त दिवस जगणार नाही हे त्याला कळुन चुकलं होतं. आता आपली काही खैर नाही या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याने बिरबलाला जाऊन सगळी हकीकत सांगितली. बिरबलाने त्याला शांत केले. त्याला सांगितले कि जर पोपट मेला तर अकबराच्या आधी त्याने बिरबलाला कळवायचे. मग बिरबल सगळं सांभाळुन घेईल. बिरबलाच्या आश्वासनाने तो निर्धास्त झाला. काही दिवसांनी पोपट देवाघरी गेलाच. आपल्या पिंजऱ्यात तो निपचित पडला. सेवकाने ठरल्याप्रमाणे त्वरेने अकबरापर्यंत खबर पोचण्याआधी बिरबलाला कळवले. बिरबल महालात गेला आणि अकबराला म्हणाला “खाविंद, चमत्कार झाला. आपला लाडका पोपट आता योगी अवस्थेत गेला आहे. अत्यंत एकाग्रतेने त्याने ध्यान लावले आहे. असा पोपट कोणीच आजवर पाहिला नव्हता. चला तुम्ही स्वतः पहा.” अकबर आश्चर्यचकित झाला आणि बिरबलसोबत पोपटाकडे गेला. त्याला पाहताक्षणी तो मेला असल्याचे त्याच्या लक्षात आले. “काहीही काय बडबडतोस बिरबल ? मेलाय तो पोपट. ध्यान करतोय म्हणे.”“काय म्हणताय खाविंद? अरे देवा… “ बिरबलाने मोठमोठ्याने आरडाओरडा सुरु केला. “हुजुरांचा आवडता पोपट गेला. आता हुजूर स्वतः जीव देतील, स्वतःचं मुंडकं उडवतील. अरे देवा आता आम्हा सर्वांचं कसं व्हावं… “ “मनाला येईल ते बोलु नकोस, बिरबल. मी का जीव देईन एका पोपटासाठी ? माझा आवडता होता तो पोपट हे खरंय, माझा खुप जीव होता त्याच्यात. पण काही दिवस आजारी होता तो. एक दिवस जाणारच होता. त्याच्यासाठी मी का जीव देईन.” “खाविंद तुम्ही जो कोणी पोपट मेला म्हणुन सांगेल त्याचं डोकं उडवाल म्हणुन सांगुन ठेवलं होतं. आम्हाला तर वाटलं होतं पोपट ध्यान करतोय, पण तुम्ही स्वतः म्हणालात तो मेलाय म्हणुन. आता तुम्हाला तुमचाच शिरच्छेद करावा लागेल.”आता अकबराच्या लक्षात सगळा प्रकार आला. पोपट मेल्याचं अकबराच्याच तोंडातुन वदवून बिरबलाने त्या सेवकाचे प्राण वाचवले होते. “असं काही नाही बिरबल. मी रागात म्हणालो असेन. एका पोपटासाठी कोणाचा शिरच्छेद खरंच थोडी ना करणार होतो मी. शेवटी प्रत्येकाला एक दिवस मरायचंच आहे. त्यासाठी एवढं टोकाला जाऊ नये कोणी.” असं म्हणुन अकबराने वेळ मारून नेली. त्या सेवकाने बिरबलाचे आभार मानले. अकबराने खरंच त्याला शिक्षा दिली असती तर पोपटासाठी माणसाचा जीव घेणारा दुष्ट म्हणुन त्याचीसुद्धा बदनामी झाली असती. ते रोखल्याबद्दल त्याने पण मनातल्या मनात बिरबलाचे आभार मानले.लेखक - आकाश खोत यांच्या ब्लॉगवरून साभार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/BG9vDvhov8vcFpHp/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_जागतिक पर्यटन दिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: पद्म पुरस्कारांची संख्या ६० वरून १०० पर्यंत वाढविण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय* *१९९६: तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्‍हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.**१९६१: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५८: मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.**१९४०: दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.**१९२५: डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.**१८२१: मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: प्राजक्ता लालासाहेब शिंदे -- कवयित्री* *१९९४: विशाल विकासराव कुलट- कवी, लेखक**१९८१: लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू**१९८१: ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू**१९८०: रेश्मा कुलकर्णी - पठारे -- लेखिका, अनुवादक**१९७९: सचित पाटील -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि नाट्य दिग्दर्शक**१९७६: विभा नरेंद्र विंचूरकर -- कवयित्री* *१९६८: राहुल देव -- भारतीय अभिनेता**१९६३: धनंजय सरदेशपांडे -- लेखक* *१९६२: मनोहर शार्दुल विभांडिक -- लेखक, कवी* *१९६०: प्रा. अरुण सांगोळे -- कवी, गीतकार* *१९५९: मुकुल बाळकृष्ण वासनिक -- माजी केंद्रीय मंत्री**१९५९: उज्ज्वला सहाणे -- लेखिका**१९५७: प्रा.जोतीराम कृष्णराव पवार -- लेखक* *१९५५: उषा परब -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९४७: प्रा. हेमंत जयवंत घोरपडे -- प्रसिद्ध लेखक* *१९४६: रवी चोप्रा -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक (मृत्यू: १२ नोव्हेंबर २०१४ )**१९४५: अनिल विष्णुपंत कुलकर्णी -- लेखक* *१९४४: निता प्रभाकरराव पुल्लीवार -- लेखिका* *१९३९: विजय हरी वाडेकर -- कादंबरीकार (मृत्यू: ३ मार्च २०१४ )**१९३५: डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर -- लेखक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू**१९३२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (मृत्यू: २१ आक्टोबर २०१२ )**१९०६: सुंदरराव भुजंगराव मानकर -- नाटककार, वृत्तपत्रकार(मृत्यू: १८ एप्रिल १९४६ )*🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: कविता महाजन -- भारतीय लेखिका आणि अनुवादक (जन्म: ५ सप्टेंबर १९६७ )**२००८: महेन्द्र कपूर – प्रसिद्ध पार्श्वगायक (जन्म: ९ जानेवारी १९३४ )**२००४: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५ )**१९९९: डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (जन्म: २६ डिसेंबर १९३५ )**१९९२: अनुताई वाघ – समाजसेविका, शिक्षणतज्ज्ञ (जन्म: १७ मार्च १९१० )**१९८७: भीमराव बळवंत कुलकर्णी -- मराठीतील संस्थात्मक कार्याचा ध्यास असलेले साहित्यिक, वक्ते, समीक्षक (जन्म: ४ नोव्हेंबर १९३२ )**१९७५: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३ फेब्रुवारी १९०० )**१९७२: एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८९२ )**१९४४: गंगाधर मेघश्याम लोंढे -- गायक, नट ( जन्म: १८ जुलै १९०२ )**१९२९: शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, व पत्रकार (जन्म: २७ जून १८६४ )**१८३३: राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक,धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक(जन्म: २२ मे १७७२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सत्यं वद: खरे बोला*एक खोटे लपविण्यासाठी हजारदा खोटे बोलावे लागते तर सत्य बोलल्यावर काही बोलायची गरज भासत नाही. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेड - अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यावर युवक कॉंग्रेसचा मोर्चा, ऊसाला प्रतिटन 3200 रुपये दर देण्याची मागणी; शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा केला आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंढरपूर - विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा अहवाल सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर - ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण शनिवारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडली, पुण्याहून विशेष विमानाने मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अनुसूचित जाती-जमातीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत राहणार - धर्मपाल मेश्राम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत-बांगलादेशबरोबर मालिकेतील दुसरी कसोटी क्रिकेट लढत आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👁 *आपल्या डोळ्याचे कार्य नेमके कसे चालते ?* 👁************************** डोळ्यांनी आपण जग बघतो तर जग आपल्या डोळ्यांतून आपल्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करीत असते. डोळे मनातील भाव कवचितच लपवू शकतात. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोळ्यांची रचना बरीचशी सारखी असते. याउलट कीटक जाती, काही जलचर यांचे डोळे त्यांच्या देहाच्या मानाने खूपच मोठे व वेगळ्या प्रकारचे असतात. वेगळेपणाचा मुख्य भाग म्हणजे त्यांचा डोळा हा 'डोळा' नसून अनेक संवेदनाक्षम मज्जातंतूंची ती एक सलग जाळीच असते. त्यामुळे कीटकांच्या डोळ्यांना 'कंपाऊंड आइज' असेही म्हटले जाते. माणसाला रंगदृष्टी असून रंगज्ञान उत्तम असते. अन्य प्राण्यांच्या बाबतीत याची नक्की कल्पना आपल्याला नाही. रंगांच्या असंख्य छटा तात्काळ ओळखता येणे व जेमतेम एक दशांश मिलिमीटर एवढ्या लहान बिंदूला वेगळे वा सुटे पाहता येणे ही मानवी डोळ्यांची वैशिष्टय़े म्हणता येईल. मानवी डोळ्याच्या शास्त्रीय वर्णनापेक्षा त्याची प्रमुख वैशिष्टे जर बघितली तर डोळ्याला मेंदूखालोखाल संरक्षण दिले आहे, असे लक्षात येते. जोराचा पाऊस, तीव्र ऊन, धुळीचे वादळ या सर्वांपासून अंगभूत संरक्षण डोळा मिळवतो. सतत नकळत होणारी पापण्यांची उघडझाप, डोळ्यांच्या बाहुल्या प्रकाशाच्या तिरपीनुसार आपसूक कमी जास्त होणे व डोळ्यांत जाणारी धूळ सतत अश्रूंच्या मदतीने धुतली जाऊन ते स्वच्छ राहणे या क्रिया इतक्या नकळत सहज घडत असतात की, त्या सांगितल्यावरच लक्षात येतात. यावरूनच आपण नेहमी उद्गारतो, 'डोळ्याची पापणी लवण्याच्या आत अमुक एक गोष्ट घडली'. काॅर्नियातुन म्हणजे बुबुळावरील पारदर्शक आवरणातून प्रकाशकिरण यातून डोळ्यात प्रवेश करतात. त्यांच्या तीव्रतेनुसार डोळ्याची बाहुली लहान मोठी होऊन मग ते डोळ्याच्या भिंगातून आतील भागात जातात. डोळ्याच्या आतील पोकळीत रंगहीन पारदर्शक तैलद्रव भरलेला असतो. मागील बाजूला असलेला पडदा व दृष्टीपटल यावर भिंगातून आलेल्या किरणांची प्रतिमा पडते. हा पडदा दोन प्रकारच्या पेशींनी बनलेला असतो. सुमारे बारा कोटी रॉड्स व साठ लाख कोन्स यांनी एका डोळ्याचा रेटिना बनतो. डोळ्याच्या आतील किमान ७२ टक्के भाग पडद्याने व्यापलेला असतो व मेंदूशी या भागाचा ऑप्टिक नर्व्हतर्फे संबंध जोडला जातो. राॅड्सवर कमी प्रकाशात करड्या, काळ्या, पांढऱ्या रंगाचा परिणाम होतो; तर कोन्सवर हिरव्या, लाल व निळा रंगछटांचा परिणाम होतो. रॉडसना दंडगोल व कोन्सना शंक्वाकृती पेशी असेही संबोधले जाते. पण डोळ्यांच्या संदर्भात व्यवहारात कॉर्निया, रेटिना, रॉड, कोन व लेन्स हे शब्दच जास्त परिचित आहेत. उदा. कॉर्नियाचे रोपण, रेटिनाची डिटॅचमेंट, डोळ्यांत लेन्स बसवणे इत्यादी. रेटिनाकडून मेंदूकडे पाठवले जाणारे संदेश हे 'कोडेड' स्वरूपात जातात. या कोडबद्दल अद्याप पुरेसे स्पष्टीकरण उपलब्ध नाही. ते झाल्यास अंध माणसास डोळ्यांशिवाय सुद्धा पाहता येईल, अशी एक शक्यतस शास्त्रज्ञ वर्तवतात. डोळ्याकडून येणाऱ्या संदेशांचे वाचन मेंदूतील मागील बाजूच्या भागात होते. डोक्यावर मागील बाजूला जोरात टप्पल मारल्यास प्रथम डोळ्यांसमोर काजवे चमकतात ते यामुळेच. दोन डोळय़ांमुळे लांबचे व जवळचे अंतर वा खोली याचा नेमका अंदाज आपल्याला येतो. ज्यावेळी डोळ्यांच्या भिंगातून रेटिनावर पडणारी प्रतिमा अलीकडे वा पलीकडे पडते, त्यावेळी चष्म्याची जोड देऊन दुरुस्ती करावी लागते. डोळ्याची लेन्स अपारदर्शक झाली, तर त्यालाच 'मोतीबिंदू' असे म्हणतात. यावेळी ही लेन्स काढुन कृत्रिम लेन्स बसवली जाते. बुबुळाच्या पुढचा पारदर्शक पडदा म्हणजे कार्निया 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वा अन्य काही कारणांनी अपारदर्शक बनला, तर नवीन कॉर्नियाचे रोपण करता येते. दृष्टीदान म्हणजे मृत माणसाचा कॉर्निया मृत्यूनंतर लगेच काढून हे रोपण केले जाते. जगाच्या पाठीवरील माणसांचे डोळे वेगवेगळे भासण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यांच्या बाहुल्यांचे रंग. या रंगछटांचे खेळच डोळ्यांकडचे आपले लक्ष खिळवून ठेवतात. घारे, निळे, करडे, तांबूस, काळे, पिंगट असे रंग माणसाच्या नजरेची आठवण देत राहतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*V. I. P. - Very Important Person*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील एकमेव *'श्री शिवछत्रपती मंदिर'* कोठे आहे ?२) रेल्वे ट्रॅकवर अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणाली कवच ४.० स्थापित केलेला देशातील पहिलाच ट्रॅक कोणता ?३) 'प्रिन्स ऑफ कोलकाता' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?४) 'बहर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे ?*उत्तरे :-* १) सिंधुदुर्ग किल्ला २) सवाई माधोपूर ते कोटा ३) सौरभ गांगुली ४) हंगाम, सुगी ५) बॅरन बेट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 डॉ. प्रतिभा जाधव, साहित्यिक, नाशिक👤 सद्दाम दावनगीरकर, देगलूर👤 नरेश केशववार, धर्माबाद👤 अनिल आर्य माकने, धर्माबाद👤 अजित कड, साहित्यिक, पुणे 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥ नाम मंत्र जप कोटी जा‌ईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥ निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियां सवडी लपू नको ॥४॥ तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• कधीच न दिसणारी शुद्ध हवा आपल्याला प्राणवायू देऊन जाते. न दिसणारा फुलांचा सुंगध मन अगदी प्रसन्न करून जाते. कारण त्यांच्यात स्वार्थ नसतो. तसंच जो कोणी नकळत आपल्याला मदत करते व परोपकाराची जाणीव देखील ठेवत नाही पण, माणुसकीच्या नात्याने आपला माणुसकी धर्म निभावून दाखवते त्याला कधीही विसरू नये. जे, मदत तर करत नाही पण, वाटेत काटे पेरण्यासाठी सज्ज असतात त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नये. कारण ते इतरांचे कधीच चांगले बघू शकत नाही तर उलट बिघडविण्याच्या तयारीत असतात🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दूधभाई*एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला. तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता. अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.”एखाद्या बाळाच्या लहानपणी त्याची आई नसेल किंवा आजारी असेल तर त्या बाळाला दुध कमी पडू नये म्हणुन दुसऱ्या स्त्रीचे दुध पाजु शकतात. ती स्त्री आपले दुध पाजुन आईसमान बनल्यामुळे तिच्या मुलांना भावंडासारखे समजतात. नातं दुधाचं असल्यामुळे अशा व्यक्तीला दुध भाई म्हणतात. तो दूधभाई गेल्यावर अकबराने बिरबलाला विचारले, “काय बिरबल, तुला नाही का कोणी दुधभाई?”“आहे ना खाविंद. उद्याच त्याची ओळख करून देतो.” दुसऱ्या दिवशी बिरबल एका गाईच्या वासराला अकबराकडे घेऊन आला आणि म्हणाला “हे बघा खाविंद, माझा दुध भाई.” अकबराने विचारले “हा वासरू आणि तुझा भाऊ?”“होय खाविंद, मी ज्या गायीचे दूध पितो ती मला मातेसमान आहे. मग तिचा हा लेकरू मला भावसमानच झाला ना. म्हणुन हाच माझा दुध भाई.” बिरबलाच्या विनोदबुद्धीमुळे अकबर हसायला लागला. *लेखक - आकाश खोत यांच्या ब्लॉग वरून साभार*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 सप्टेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/Hwea4hNGbVk5JryZ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_ या वर्षातील २६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.**१९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.**१९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु.एस.एस.आर.ला पाठिंबा जाहीर केला.**१९५०: इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: सेरेना विल्यम्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९७८: समीर धर्माधिकारी -- मराठी चित्रपट अभिनेते**१९७४: प्रा. डॉ. गजानन अरुण वाघ -- लेखक**१९७३: सरिता सातारडे -- कवयित्री, लेखिका**१९७३: फरहीन -- अभिनेत्री**१९७१: प्रा. डॉ. केशव तुपे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२: अर्चना पुरण सिंग -- भारतीय अभिनेत्री आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व* *१९६२: एकनाथ बडवाईक -- कवी**१९६२: चंकी पांडे -- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९६१: चंद्रकांत महादेव चितळे -- कथाकार, कवी**१९६०: विद्यालंकार विनायक घारपुरे -- लेखक* *१९४९: दिलीप नारायण अपशंकर -- लेखक, अनुवादक तथा निवृत्त अधीक्षक अभियंता**१९४८: डॉ. माधवी वैद्य -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४३: इयान चॅपेल –ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कप्तान**१९४०: योहाना शाहू गायकवाड -- लेखक* *१९३९: दिवाकर दत्तात्रय गंधे -- मराठी नाट्यसमीक्षक व चित्रपटविषयक लिखाण करणारे लेखक (मृत्यू: १मार्च २०१९ )**१९३६: वैजयंती वामन काळे -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९३२: डॉ.मनमोहन सिंग – भारताचे १३ वे माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ**१९३१: श्याम त्रिंबक फडके -- प्रसिद्ध नाटककार**१९३१: विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ आक्टोबर १९८३ )**१९२३: देव आनंद – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ३ डिसेंबर २०११ )**१९२०: अनंत दामोदर आठवले (स्वामी वरदानंद भारती) -- आयुर्वेदतज्ज्ञ, लेखक, ग्रंथकार, कीर्तनकार (मृत्यू: ५ सप्टेंबर २००२ )**१८९४: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (मृत्यू: १० डिसेंबर १९५५ )**१८८८: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ जानेवारी १९६५ )**१८५८: मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (मृत्यू: १० आक्टोबर १८९८ )**१८४९: इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६ )**१८२०: ईश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (मृत्यू: २९ जुलै १८९१ )*🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: डॉ. रामचंद्र देखणे -- लोककला, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ भारुडकार (जन्म: १२ एप्रिल १९५६ )**२००८: पॉल न्यूमन –अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म: २६ जानेवारी १९२५ )**२००२: राम फाटक – गायक व संगीतकार (जन्म: २१ आक्टोबर १९१७ )**१९९६: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (जन्म: ४ जानेवारी १९२४ )**१९८९: हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता (जन्म: १६ जून १९२० )**१९८५: हनुमंत गुणवंत देशपांडे -- विदर्भातील कवी (जन्म: १८९७ )**१९७७: उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२)(जन्म: ८ डिसेंबर १९०० )**१९५६: लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक(जन्म: २० जून १८६९ )**१९०२: लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्त्री भ्रूण हत्या : एक काळजी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात आज अनेक विकास कामासोबत तीन परम रुद्र महासंगणकाचे होणार लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असून उर्वरित भागात येलो अलर्ट, IMD चा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशाच्या अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ झाल्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगे नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय; विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही, सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अजित दादा महायुतीतून बाहेर पडतील अन् ते आमच्या महाशक्तीत येतील; आमदार बच्चू कडूंचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कसोटी क्रमवारीतही ऋषभ पंतचा डंका! सहाव्या क्रमांकावर घेतली झेप; विराट कोहली टॉप-१० बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंजीर फळांचे औषधी उपयोग*उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणी प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**O. P. D. - Out Patient Department**••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रोज सकाळी एकच गोष्ट तुम्हालाप्रेरणा देऊ शकते…. ती म्हणजे तुमचे ध्येय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मिस युनिव्हर्स इंडिया - २०२४'* या स्पर्धेची विजेती कोण ठरली ?२) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८ - १९ अंतर्गत राज्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीचे नाव काय ?३) कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ?४) 'फूल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'गॉड ऑफ क्रिकेट' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) रिया सिंघा, गुजरात २) सिरेगावबांध, ता. अर्जूनी मोरगाव, जि. गोंदिया ३) जॉर्डन ४) पुष्प, सुमन, कुसुम, सुम ५) सचिन तेंडुलकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 सुनील आलूरकर, तंत्रस्नेही शिक्षक, नांदेड👤 अजय मिसाळे👤 श्री दासरवार👤 सोनाजी बनकर👤 विश्वनाथ होले, साहित्यिक, पुणे👤 विक्की खटके 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥ तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपा आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशील झणीं ॥३॥ ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाप आणि पुण्य कशाने होते या विषयी आपल्याला पूर्णपणे माहीती असताना सुद्धा आपण नको त्या मार्गाने जाऊन जीवनाची माती करत असतो.निदान या मानवी जीवनाचे खरे महत्व जाणून सुंदर अशा मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण, इतरांचे चांगले केल्याने जरी त्यांना विसर पडत असेल तरी निसर्ग कुठेतरी बघत असतो व नको ते कार्य केल्याने लपवून ठेवल्यानेही ते कधीच लपत नाही असे अनेकदा ऐकण्यात आले आहे. म्हणून व्यर्थ विचार करणे सोडून द्यावे व सत्य काय आहे याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करा*गोपाळच्या घरात पाच म्हशी आणि एक गाय होती. तो दिवसभर सर्व म्हशींची काळजी घेत असे. तो दुरून हिरवे गवत कापून त्यांच्यासाठी आणून खायला घालत असे. गोपाळांच्या सेवेने गाई, म्हशी आनंदी होत्या. सकाळ संध्याकाळ इतके दूध आले असते, गोपालच्या कुटुंबाला ते दूध विकायला भाग पाडले असते. संपूर्ण गावात गोपाळच्या घरातून दूध विकायला सुरुवात झाली. आता गोपालला कामात जास्तच मजा येत होती, कारण त्यामुळे त्याची आर्थिक स्थितीही मजबूत होत होती. काही दिवसांपासून गोपाळला काळजी वाटू लागली होती, कारण त्याच्या स्वयंपाकघरातील एका मोठ्या मांजरीने त्याचे डोळे गोठवले होते. गोपाळ जेव्हा केव्हा किचनमध्ये दूध ठेवायचा तेव्हा तो निवांत होता. मांजर दूध प्यायचे आणि त्यांना खोटेही ठरवायचे. गोपालने मांजराचा अनेकवेळा पाठलाग करून तिला मारण्यासाठी धाव घेतली, पण मांजर पटकन भिंतीवर चढून पळून गेले. एके दिवशी गोपाल अस्वस्थ झाला आणि त्याने मांजरीला धडा शिकवण्याचा विचार केला. तागाच्या पोत्याचे जाळे टाकले होते, ज्यात मांजर सहज अडकले. आता काय, गोपाळला आधी काठीने मारहाण करण्याचा विचार आला. मांजर इतक्या जोरात म्याव करत होती की गोपाल तिच्या जवळ जाऊ शकत नव्हता. पण आज धडा शिकवण्यासाठी गोपाळने माचीसची काठी पेटवली आणि गोणीवर फेकली. गोणी पेटू लागताच मांजर सर्व शक्तीनिशी पळू लागली. मांजर जिकडे तिकडे पळत असे, जळणारी पोती पाठीमागून गेली. काही वेळातच मांजर संपूर्ण गावात पळाली. संपूर्ण गावात आगीचा भडका उडाला…………….. आग लागली, विझवा…….या प्रकाराचा आवाज उठू लागला. मांजराने संपूर्ण गाव जाळले. गोपाळचे घरही वाचले नाही.निष्कर्ष - आवेग आणि स्वतःच्या चुकीचे परिणाम एखाद्याला भोगावे लागतात आणि त्याची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते.••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 सप्टेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/kYzKMrBoAtZgBUeS/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_ या वर्षातील २६९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *१९९५: कोकण रेल्वेच्या मीर-खेडया ५२ किलोमीटर मार्गाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते उद्घाटन**१९४१: ’प्रभात’चा ’संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.**१९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण,प्रवास व लँडींग केले.**१९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.**१९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू* 🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟠 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९०: सपना चौधरी -- प्रसिद्ध गायिका व नर्तक**१९८०: देवदत्त गोखले-- लेखक**१९७८: सिद्धार्थ शेषराव ढवळे -- लेखक**१९७२: राहुल शर्मा -- भारतीय संगीत दिग्दर्शक आणि भारतीय शास्त्रीय संतूर वादक**१९६९: हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान (मृत्यू: १ जून २००२ )**१९६९: प्रा. डॉ. संजय पांडुरंग नगरकर -- मराठी लेखक**१९६८: मंगला शिरीष रामपुरे -- कवयित्री* *१९६६: केदार कृष्णाजी गाडगीळ -- लेखक* *१९६१: सरोज संजय अंदनकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६०: अमिता खोपकर -- मराठी भाषेतील रंगमंच, चित्रपट आणि टेलिव्हिजनशी संबंधित असलेली एक भारतीय अभिनेत्री**१९५७: उज्ज्वला सदानंद अंधारे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९५५: चंद्रकांत शामराव पाटील -- कथाकार**१९५३: सुरेंद्रपाल सिंग -- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन पात्र अभिनेता**१९४६: प्रा.सुभाष सुठणकर -- प्रसिद्ध विनोदी कथालेखक**१९४६: बिशन सिंग बेदी – प्रसिद्ध भारतीय फिरकी गोलंदाज ( मृत्यू: २३ मार्च २०२३ )**१९३९: फिरोज खान -- भारतीय अभिनेता, चित्रपट संपादक, निर्माता आणि दिग्दर्शक (मृत्यू: २७ एप्रिल २००९ )* *१९३८: प्रा. डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड ('राजवंश') -- मराठी व हिंदी, इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखक**१९३१: बिंदुमाधव जोशी -- अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे संस्थापक (मृत्यू: १० मे २०१५ )**१९२८: माधव गडकरी – पत्रकार (मृत्यू: १ जून २००६ )**१९२६: बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते,निर्माते, लेखक व दिग्दर्शक (मृत्यू: ३० जून १९९४ )**१९२५: रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार (मृत्यू: २० जुलै १९९४ )* *१९२२: बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (मृत्यू: १७ जानेवारी १९७१ )**१९२०: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (मृत्यू: ३ जानेवारी २००२ )**१९१६: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८ )**१९१४: चौधरी देवी लाल -- माजी उपपंतप्रधान (मृत्यू: ६ एप्रिल २००१ )**१९०८: नरहर शेषराव पोहनेरकर -- कवी, कथाकार, कादंबरीकार, संशोधक (मृत्यू: २ सप्टेंबर १९९० )* *१८९९: नरहर गंगाधर आपटे -- ग्रामकोशकार, ग्रामोदार चळवळीचे पुरस्कर्ते, लेखक**१८८१: गोपाळ गंगाधर लिमये -- मराठी कथाकार आणि विनोदकार. ‘ कॅ. गो. गं. लिमये’ ह्या नावाने लेखन.(मृत्यू: १८ नोव्हेंबर १९७१ )**१८६४: गोपाळ नारायण अक्षीकर -- सामाजिक कार्यकर्ते, संस्थापक (मृत्यू: १६ मार्च १९१७ )**१८५१:राव बहादूर काशिनाथ नारायण साने उर्फ का.ना. साने -- काव्येतिहास-संग्रह मासिकाचे संपादक (मृत्यू: १७ मार्च १९२७ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०: एस. पी. बालसुब्रमण्यम तमिळ, तेलुगु, कानडी, मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक कोविड मुळे निधन (जन्म: ४ जून १९४६ )**२०१८: जसदेव सिंग -- प्रसिद्ध भारतीय समलोचक (जन्म: १८ मे १९३० )**२०१७: अरुण साधू -- प्रसिद्ध लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक, ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: १७ जून १९४१ )**२०१३: शं. ना. नवरे – लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७ )**२००४: अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (जन्म: १ नोव्हेंबर १९३२ )**१९९८: कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक (जन्म: २९ जून १९३४ )**१९२७: कृष्णाजी केशव गोखले -- कथाकार, कादंबरीकार (जन्म: १८८६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुपरस्टार अमिताभ बच्चन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शासनाच्या दोन अध्यादेश रद्द करण्यासाठी आज महाराष्ट्रभर शिक्षकांचा सामूहिक रजा आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी दिग्दर्शकाची अभिमानास्पद कामगिरी, आशुतोष गोवारीकर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार, पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर, 1 डिसेंबरला होणार परीक्षा, कृषी सेवेच्या 258 पदांचा पदांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारणार, 60 फूट उंच पुतळ्यासाठी 20 कोटीची निविदा जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाजप महाराष्ट्रात सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे नेतृत्व करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​अंतर्गत भारत 71.67 टक्केवारीसह अव्वल स्थानावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालेभाज्यांचे औषधी उपयोग**११.] *मायाळू* :- अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. १२.] *तांदुळजा* :- बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते. १३.] *मेथी* :- सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूध वाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. १४.] *शेपू* ;- वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. १५.] *शेवगा* ;- ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. १६.] *सॅलड* :- या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*O. T. T. - Over The Top*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आदर ही एक अशी गोष्ट आहे की जो दुसऱ्याला दिला तरच आपल्याला मिळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहेत ?२) आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकामध्ये भारताने एकूण किती गोल केले ?३) प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे ?४) 'प्रेम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजावर कशाचे चिन्ह आहे ? *उत्तरे :-* १) अनुरा कुमार दिसानायके २) २६ गोल ३) आंध्रप्रदेश ४) माया, लोभ, स्नेह ५) अशोकचक्र, सर्वोच्च न्यायालय इमारत, राज्यघटना व संस्कृत श्लोक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 नरसिंग बासरवाड👤 रामकिशन अंगरोड👤 संघरत्न लोखंडे👤 महेंद्रकुमार कुदाळे👤 सय्यद जाफर👤 कमलकिशोर कांबळे👤 शिवशंकर नर्तावार👤 तसनीम पटेल, साहित्यिक, नांदेड👤 योगेश धनेवार👤 सुयश पेटेकर धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरि‌उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥ नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काजळ आणि काळीज जरी वेगवेगळे असले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. काजळ जरी काळा रंगाचा दिसत असेल तरी आपले सौदर्य खुलून दिसण्यासाठी मदत करत असते. कारण त्याची आपण मोठ्या काळजाने निवड करत असतो. तसंच एखाद्या व्यक्तीला सुद्धा मदत करण्यासाठी आपले काळीज मोठे असावे लागते. म्हणून त्यांच्या रूपाकडे बघून त्यांना तुच्छ न लेखता त्यांच्यात असलेल्या खऱ्या गुणाची कदर करता आली पाहिजे. त्यासाठीही आपले काळीज मोठे असणे आवश्यक आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••.... आणि क्रिकेट संघ तयार होतो*राजू उद्यानात उदास बसला होता, आज त्याचे मित्र खेळायला आले नाहीत. राजूकडे बॉल होता, पण ना बॅट ना मित्र. तो एकटाच बॉलशी निराश होऊन खेळत होता. इतर मुलंही उद्यानात क्रिकेट खेळत होती, पण राजू त्यांना ओळखत नव्हता. म्हणूनच तो कधी एकटाच चेंडूशी खेळायचा तर कधी बसून पोरांना खेळताना पाहायचा. काही वेळाने समोर खेळणाऱ्या मुलांचा चेंडू शेजारच्या एका बंद घरात पडला. तेथून चेंडू परत येणे अशक्य होते आणि एकही मूल तो गोळा करायला आत जाऊ शकत नव्हते. आता त्या मुलांनीही खेळणे बंद केले. आता त्यांनाही क्रिकेट खेळता येत नसल्याने ते सर्व दुःखी झाले. त्या मुलांची नजर बॉल असलेल्या राजूवर गेली. मग काय, त्यानी राजूला खेळायला बोलावलं. राजू खेळण्यात चांगला होता. म्हणूनच तो खूप चांगला शॉर्ट टाकू शकला असता. चेंडू पकडण्यासाठी आणखी मुलांची गरज होती. त्यावर उद्यानात खेळणारी मुलंही त्यांच्यात सामील झाली. आणि काही वेळातच दोन पक्ष तयार झाले. अशा प्रकारे राजूची नवी क्रिकेट टीम तयार झाली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 सप्टेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/afErT9Yde4yi6EUH/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📀 *_राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस _*📀•••••••••••••••••••••••••••••••••••••••📀 *_ या वर्षातील २६८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 📀 *_महत्त्वाच्या घटना:_* 📀••••••••••••••••••••••••••••••••• *२००७: भारताने महेन्द्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली 'टी २० विश्वकरंडक' जिंकला.**१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पातील २२० मेगावॉट क्षमतेचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.**१९९५: गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ’मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ’भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे ’मूर्तिदेवी पुरस्कार’ जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी लेखक आहेत.**१९९४: ’सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.**१९६९: भारत सरकारने विद्यापीठ पातळीवर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली**१९६०: अणूशक्तीवर चालणार्‍या ’यू. एस. एस. एंटरप्राइझ’ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण**१९४८: होन्डा मोटर कंपनीची (Honda Motor Company) स्थापना.**१९४६: हाँगकाँग येथे ’कॅथे पॅसिफिक एअरवेज’ ची स्थापना झाली.**१९३२: दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमधे सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ’पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.* 📀 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📀••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: विकास वर्मा -- भारतीय अभिनेता आणि मॉडेल**१९७४: प्रा. अलका ज्ञानोबा सपकाळ -- कवयित्री**१९६९: वृषाली वसंत आठल्ये -- लेखिका* *१९६६: डॉ.उर्मिला संजय व्यवहारे -- लेखिका**१९६२: सुजाता लोखंडे -- कादंबरीकार, लेखिका* *१९५८: राम किसनराव पवार -- शिक्षणतज्ञ, विचारवंत, निवृत्त शिक्षण उपसंचालक**१९५५: संजय जोग -- दूरदर्शन व चित्रपट मधील अभिनेता (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९५ )**१९५०: मोहिंदर अमरनाथ – क्रिकेटपटू आणि समालोचक**१९४६: प्रियंवदा करंडे --- बाल, किशोर व कुमारवयीन. मुलांसाठी लेखन करणाऱ्या लेखिका**१९४०: आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४ )**१९३८: पिलू दारा रिपोर्टर -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच (मृत्यू: ३ सप्टेंबर २०२३ )* *१९३७: बाबुराव वरघटे -- कवी, लेखक* *१९२४: गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष (मृत्यू: ३१ मार्च २००४ )**१९२२: गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक,संपादक व साहित्यिक (मृत्यू: ३० मार्च १९८९ )**१९२१: डॉ.सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक(मृत्यू: ७ जून १९९२ )**१९१५: प्रभाकर शंकर मुजूमदार – चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत**१९११: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (मृत्यू: १० मार्च १९८५ )**१९११: हमीद अली मुराद -- फक्त मुराद या नावाने ओळखले जाते चरित्र अभिनेते (मृत्यू: २४ एप्रिल १९९७ )**१९१०: गोविंद राऊत -- लेखक**१८९८: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्या पंडित (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६० )**१८८९: केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक.व लेखक (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ )**१८८७: भास्कर कृष्ण उजगरे -- लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर १९३५ )* *१८६१: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६ )**१५५१: दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत – कवी (मृत्यू: २८ जानेवारी १६१६ )**१५३४: गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१ )* 📀 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📀 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: मोहन भंडारी -- दूरचित्रवाणीवरचे अभिनेते (जन्म: ३१ जुलै १९३७ )**२०११: सुरिंदर कपूर --भारतीय चित्रपट निर्माता (जन्म: २३ डिसेंबर १९२५ )**२००६: पद्मिनी रामचंद्रन -- भारतीय सिने अभिनेत्री व भरतनाट्यम नर्तकी (जन्म: १२ जून १९३२ )**२००२: श्रीपाद रघुनाथ जोशी [कोल्हापूर] – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक (जन्म: २३ जानेवारी १९२० )**१९९८: वासूदेव पाळंदे – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते,दिग्दर्शक व कुशल संघटक. पुण्यातील 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’, ’महाराष्ट्रीय कलोपासक’, ’जागर’ इ. नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.* *१९९२: सर्व मित्र सिकरी – भारताचे १३ वे सरन्यायाधीश (जन्म: २६ एप्रिल १९०८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सहज सुचलेली बाल कविता..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गुजरातची रिया सिंघा बनली मिस युनिव्हर्स इंडिया, उर्वशी रौतेलाने घातला मुकुट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लापता लेडीज चित्रपटाची ऑस्करच्या शर्यतीसाठी निवड, 29  चित्रपटांमधून निवडला किरण रावचा चित्रपट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 तारखेला मिळणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती, छाननीमुळं विलंब लागलेल्यांनाही मिळणार तिन्ही हप्त्यांची रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे असेल पुण्याच्या नव्या विमानतळाचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, ग्रामसेवकांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं संबोधणार; मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 24 निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडलळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्याने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा मृत्यू, स्वतःवर झाडली गोळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग*१.] *कोथिंबीर* :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.२.] *कढीलिंब* ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३.] *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४.] *माठ* :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. ५.] *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. ६.] *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. ७.] *अळू* :- याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते. ८.] *अंबाडी* :- मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. ९.] *घोळ* :- मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. १०.] *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*D. T. D. C. - Desk to Desk Courier*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठी स्वप्ने पाहणारेच,मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजावर कोणता संस्कृत श्लोक कोरलेला आहे ?२) दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांनी शपथ घेतली ?३) जगात ऑनलाईन शॉपिंग सर्वाधिक कोणत्या देशात होते ?४) 'प्रात:काळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिले कॉलेज कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे ? *उत्तरे :-* १) यतो धर्मस्ततो ज: ( जेथे धर्म आहे, तेथे विजय होईल.) २) तिसऱ्या ३) चीन ४) सकाळ, उषा, पहाट ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. तौफिक खान पठाण, धर्माबाद👤 ओमप्रकाश सुरेश गंजेवार, धर्माबाद👤 राजू यादव👤 विरेश भंडारे👤 सतीश आरेवार👤 अंकुश मापारी👤 सारंग दलाल, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥ जाति वित्त गोत कुलशील मात । भजकां त्वरीत भावयुक्त ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वारंवार कोणाच्या विषयी नको त्या शब्दात बोलून आपला अनमोल वेळ वाया घालविण्यापेक्षा जरा स्वतःकडे बघण्यासाठी थोडा वेळ काढावा. कारण आपण जेव्हा दुसरी कडे बघत असतो किंवा बोलत असतो त्यावेळी आपल्याकडेही बघणाऱ्यांच्या अनेक नजरा असतात. म्हणून दुसऱ्या विषयी बोलताना ताळतंत्र ठेवूनच बोलावे.जर अशीच वेळ निघून गेली तर आपल्या जवळ पाहिजे तेवढा वेळ उरणार नाही म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेऊन चांगले कार्य करून दाखवावे जेणेकरून इतरही त्यातून शिकू शकतील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दयेचा स्ट्राईक*अब्दुलकडे एक शेळी होती, त्या शेळीला एक लहान पिल्लू होते. अब्दुलने त्या दोघांवर प्रेम केले आणि त्यांच्यासाठी शेतातून मऊ मऊ गवत आणले. दोन्ही शेळ्या गवत खाऊन आनंदी झाल्या. अब्दुलला दुरून पाहून ती लगेच त्याच्याकडे धावत असे. अब्दुल चौथीत शिकत असे. एके दिवशी तो शाळेत गेला होता. त्याच्या आई आणि वडिलांनी बकरीचे पिल्लू सलीमला विकले. सलीम जेव्हा त्या पिल्लूला घेऊन जाऊ लागला तेव्हा शेळी जोरात रडू लागली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती खूप प्रयत्न करत होती, पण तिला दोरीने बांधले होते. सलीम पिल्लूला घेऊन खूप दूर गेला. पिल्लूही जोरात रडत होतं. तो आईला हाक मारत होता. आईची ममता अश्रूंनी वाहत होती, पण ती असहाय होती. शेळीने शेवटचा विचार केला, जर तिने आता प्रयत्न केले नाहीत तर ती आपल्या पिल्लूला कधीही भेटू शकणार नाही. असा विचार करून एकदा प्रयत्न केला. शेळीच्या गळ्यातून दोरीचा फास तुटला. ती शेळी जीव तोडून सलीमकडे धावली. तिचे पिल्लू पाहून शेळीने सलीमवर जोरदार हल्ला केला. सलीमने बराच वेळ धडपड केली, पण शेळीचा हल्ला थांबवता आला नाही. अचानक शेळी अनेक आघात करत राहिली. शेवटी सलीमने हार मानली आणि शेळीचे पिल्लू तिथेच सोडले. अम्मी-अब्बूकडून पैसे घेऊन सलीम परतला. अब्दुल घरी आल्यावर शेजाऱ्यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तो आई-वडिलांवर रागावला. आई-वडिलांनी खूप समजावले पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. कारण त्याच्यासाठी त्या शेळ्या अनमोल होत्या.नैतिक - आईच्या करुणेच्या हल्ल्याने मोठ्या शक्तींचा पराभव होतो. आई आपल्या मुलासाठी आपला जीव पणाला लावते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/UukUSPnwJHZsek1z/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस_*🌼•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••🌼 *_ या वर्षातील २६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: ’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.**१९८४: जळगाव येथे जगू शकतील दूरदर्शन केंद्र स्थापन**१९८३: ’सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९८२: जयंत श्रीधर टिळक महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती बनले**१९०८: कॅनडातील ’युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना**१९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी 'कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.**१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.**१८४६: अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्‍यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: डॉ. अमित अच्युत बन -- वैद्यकीय तज्ञ तथा लेखक* *१९७९: रवींद्र सीताराम कानडजे -- लेखक**१९७८: प्रवीण शेषराव वानखेडे -- कवी* *१९७१: अर्जुन तुकाराम ताकाटे -- लेखक* *१९६८: रवींद्र जवादे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९६७:;प्रशांत वैद्य -- पूर्व भारतीय क्रिकेटर**१९६७: डॉ. सुजाता शेणई -- लेखिका, संपादिका* *१९६५: अलका कुबल (आठल्ये) -- मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री**१९६४: रघुनाथ तुळशीराम पाटील -- कवी, गझलकार**१९६४: विठ्ठल रामभाऊ कुलट -- प्रसिद्ध कवी, लेखक, संस्थापक अध्यक्ष,प्रतिभा साहित्य संघ* *१९६३: सुरेश यशवंत कुलकर्णी --- कवी**१९५७:कूमार सानू– पार्श्वगायक**१९५६: प्रा. डॉ. ईसादास भडके -- कवी, लेखक* *१९५३: मुकुंद वामन कांत -- कवी* *१९५३: विवेक कृष्णाजी घळसासी -- सुप्रसिद्ध विचारवंत, वक्ते, कवी, लेखक, ज्येष्ठ निरुपणकार**१९५२: प्रा. डॉ. रोहिणी केतकर -- लेखिका संस्कृत विषयाच्या तज्ज्ञ* *१९५२: अंशुमान गायकवाड – क्रिकेटपटू (मृत्यू: ३१ जुलै २०२४ )**१९५०: डॉ. अभय बंग-- महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, सर्च सेवाभावी संस्थेचे संस्थापक,लेखक**१९४३: तनुजा मुखर्जी -- पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ,तनुजा --- चित्रपट अभिनेत्री**१९४३: रा. सू. बच्चेवार निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक महा.रा. (मृत्यू: १७ एप्रिल २०२० )**१९४१: प्राचार्य योगानंद वासुदेव काळे -- प्रसिद्ध लेखक* *१९३५: प्रेम चोप्रा -- हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९३५: चित्रा हरी वझे -- लेखिका* *१९३४: चिंतामण शंकर जोशी -- कादंबरीकार कथाकार* *१९३३: रघुनाथ माधव पाटील (कवी आरेम) -- कवी, लेखक* *१९२१: पंडित बलवंत राय भट्ट -- हिंदुस्थानी गायन संगीताचे प्रसिद्ध भारतीय संगीतकार (मृत्यू: २ मे २०१६ )**१९२०: प्रा.भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७ )**१९१९: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (मृत्यू: १७ डिसेंबर २०१० )**१९१८: पंढरीनाथ बलवंत रेगे – साहित्यिक, बाल / कुमार कथा लेखक (मृत्यू: १९९९ )**१९१५: राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी,लेखक आणि चित्रपट गीतकार(मृत्यू: २९ जुलै १९६६ )**१९०८: रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (मृत्यू: २४ एप्रिल १९७४ )**१९०३: युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (मृत्यू: २ जुलै १९५० )**१९०३: शंकर धोंडो क्षीरसागर (मामा क्षीरसागर) -- संस्थापक, विचारवंत (मृत्यू: ६ एप्रिल १९८१ )**१८६१: रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (मृत्यू: १२ मार्च १९४२ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: कल्पना लाजमी -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (जन्म: ३१ मे १९५४ )**२०१४: शंकर वैद्य -- प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक(जन्म: १५ जून १९२८ )**२०१२: मुलराज राजदा -- ( भारतीय लेखक, अभिनेता ( जन्म: १३ नोव्हेंबर २०३१ )**२०१२: कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के.लाल – जादूगार (जन्म: १९२४ )**२०११: वसंत पुरुषोत्तम साठे -- माजी केंद्रीय मंत्री तथा लेखक ( जन्म: ५ मार्च १९२५ )**२००४: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म: २८ जानेवारी १९२५ )**१९८७: राजेंद्र कृष्ण दुग्गल -- राजेंद्र कृष्णन म्हणून ओळखले जाणारे भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक(जन्म: ६ जून १९१९ )**१९६४: भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर – नाटककार (जन्म: २७ एप्रिल १८८३ )**१९३९: सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ,आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म: ६ मे १८५६ )**१८८२: फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १८०० )**१८७०: प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३ )**१८५८: ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशाच्या सेवेसाठी माझे योगदान काय ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आदिवासींची बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रीय पोषण महा अभियान अंतर्गत मेळघाटातील जैतापूर गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यपालांच्या उपस्थितीत जैन संघ रथ यात्रेला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदी शैलेश बापट यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करा - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी केला पराभव, लोकल बॉय आर. आश्विन ठरला सामनावीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गाईच्या दुधाचे महत्व..*दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजही कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीनं समावेश करतात. कारण मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पद्धतीनं वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. साधारणतः शहरी भागामध्ये लोक डेअरीतील दुधाचे सेवन करतात. तर काही जण आपल्या घराशेजारी असणाऱ्या गायीचा गोठ्यातील दूध किंवा दूध विक्रेत्याकडून दुधाची पिशवी विकत घेतात. हे दूध गाय किंवा म्हशीचे असते. बहुतांश लोकांना गाईचे दूध पिणं अधिक पसंत असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो.गायीच्या दुधाचे फायदे१) गायीच्या दुधामुळे हृदय, मधुमेह, कर्करोग, टीबी, कॉलरासारखे आजार दूर राहतात.२) गायीचे दूध मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर मानले जाते.३) गाईच्या दुधात आढळणारा पिवळा पदार्थ कॅरोटीन आहे, यामुळे डोळ्यांचा प्रकाश वाढतो.४) गायीच्या दुधाला गोडपणा आल्याने पित्त आणि वायूचा त्रासही दूर होतो आणि गायीचं दूध सहज पचते.५) टीबीच्या रूग्णांना दररोज गायीचे दूध पिऊन फायदा होतो.६) मूत्राशयाशी संबंधित आजार असल्यास गायीच्या दुधात गूळ टाकून पिणे फायद्याचे आहे.७) कच्च्या गायीच्या दुधाने चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा गोरे आणि चमकदार बनते.८) ​रोगप्रतिकारक शक्ती वाढते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*N. T. S. E. - National Talent Search Examination*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती ?२) छत्रपती शिवरायांच्या कोणत्या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होणार आहे ?३) लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?४) 'प्राचीन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत कोणती ? *उत्तरे :-* १) शांघाय मॅग्लेव्ह, चीन ( नियमित वेग तासी - ४६० किमी ) २) सुवर्णदुर्ग ३) के. सी. वेणुगोपाल ४) पूर्वीचा, पुरातन, जुनाट ५) मर्देका 118, क्वालालंपूर, मलेशिया ( २२२७ फूट )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 सुरेश येवतीकर, सेवानिवृत्त बँक अधिकारी, नांदेड👤 रवींद्र जवादे, साहित्यिक, अकोला👤 कल्पना बोधने, शिक्षिका, बिलोली👤 संगीता क्षीरसागर, शिक्षिका, नाशिक👤 विशाल मनवर, यवतमाळ👤 विना खानविलकर, पुणे👤 प्रदीप माळगे, धर्माबाद 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अडचण कशाप्रकारची असते. ज्याची अडचण, त्यालाच माहीत असते. ज्याचे जळते त्यालाच कळते. म्हणून उगाचच कोणाच्या विषयी पूर्ण माहिती किंवा अडचण जाणून न, घेता त्याला नाव ठेवून आपल्या शब्दांना खर्च करून त्यात आनंद घेण्यात समाधान मानू नये.कारण अडचणी ह्या, कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेसाठी मुकेशचे चित्र*मुकेश साधारण सहा-सात वर्षांचा असेल. त्याला चित्रकला आणि क्रिकेट खेळण्याची आवड आहे. मोकळ्या वेळात तो क्रिकेट खेळायचा आणि रंगरंगोटी करत असे. शाळेत कुठलीही चित्रकला स्पर्धा असली की त्यात तो प्रथम क्रमांक मिळवायचा. मुकेशच्या चित्रकलेचे शाळेतही कौतुक झाले. मुकेश जेव्हा कधी शाळेत जायचे तेव्हा त्याला वाटेत डस्टबिनमधून जावे लागत असे. लोक रुळांवर कचरा टाकायचे आणि भिंतीसमोर लघवीही करायचे, त्यामुळे प्रचंड दुर्गंधी येत होती. मुकेशला हे सर्व आवडले नाही. एकेकाळी पंतप्रधान सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता कार्यक्रमासाठी सहकार्य करण्यास सांगत होते. मुकेशला कल्पना आली, त्याने डस्टबीनजवळ जाऊन भिंतीवर बरीच पेंटिंग्ज काढली. ते पेंटिंग इतके सुंदर होते की तिथून जाणारा माणूस. त्या चित्रकलेचे कौतुक करायचे. हळू हळू लोकांनी तिथून कचरा फेकणे बंद केले आणि भिंतीवर इतके सुंदर पेंटिंग होते की आता तिथे उभे राहून कोणीही लघवी करत नव्हते. काही वेळातच मार्ग मोकळा झाला. मुकेशला आता शाळा आणि घर यांच्यामध्ये कोणतीही घाण दिसली नाही. हे पाहून त्याला खूप आनंद झाला.नैतिक – काहीतरी मोठं करून पार करण्याचं वय नसतं. तुमच्या प्रतिभेने समाजही बदलता येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 सप्टेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/xMRaYdepVHFKtLx8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟥 *_आंतरराष्ट्रीय शांतता दिन_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_जागतिक अल्झायमर जागृता दिन_*🟥•••••••••••••••••••••••••••••••••🟥 *_जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस_*🟥•••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_ या वर्षातील २६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.**१९८४: ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९८१: ’बेलिझे’ या देशाला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९७६: सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९७१: बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६८: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.**१९६५: गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६४: माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९३४: ’प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून 'प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ’प्रभात’चाच ’अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता.**१७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य लोकांनी बरखास्त केलं आणि फ्रेन्च प्रजासत्ताकाचा जन्म झाला.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिव:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: अक्षय तेली -- लेखक**१९९३: नम्रता प्रधान -- अभिनेत्री व मॉडेल**१९८१: रिमी सेन -- भारतीय अभिनेत्री व मॉडेल**१९८०: करीना कपूर – अभिनेत्री**१९७९: ख्रिस गेल – जमैकाचा क्रिकेटपटू**१९६८: डॉ. सुनिता सुनील चव्हाण -- कवयित्री, लेखिका* *१९६६: किरण काशिनाथ -- अनुवादक, लेखक, कवी, अभिनेता**१९५८: डॉ. श्यामा घोणसे -- लेखिका**१९५५: गुलशन ग्रोव्हर -- भारतीय अभिनेता* *१९५४: डॉ. मंगला रमेश वरखेडे -- लेखिका, संपादिका* *१९५१: अन्थनी लुईस परेरा -- बालकथाकार, लेखक* *१९४४:स्नेहल वासुदेव जोशी-- लेखिका**१९४३: डॉ. शरद पांडुरंग हेबाळकर -- इतिहास संशोधक, लेखक* *१९३९: लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार**१९३९: सुलभा श्रीराम सरदेसाई -- लेखिका**१९३४: अनंत मिराशी -- मराठी नाट्य‍अभिनेते (मृत्यू: १३ जून २०२० )**१९३१: सिंगीतम श्रीनिवास राव -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, संगीतकार आणि अभिनेता**१९२९: पं.जितेंद्र अभिषेकी – प्रसिद्ध शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८ )**१९२६: डॉ. सुरेश डोळके -- धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक ( मृत्यू: २७ जानेवारी २००८ )* *१९२६: ’मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २००० )**१९२५: गोविंदराव पटवर्धन -- सुप्रसिद्ध हार्मोनियम आणि ऑर्गन वादक(मृत्यू: ३१ जानेवारी १९९६ )**१९२१: बाळकृष्ण मोरेश्वर लोणकर -- लेखक**१९१२: केशव हरी बोरगावकर -- लेखक संपादक**१९०८: दादासाहेब पोहनेरकर -- महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक आणि साहित्यिक(मृत्यू: २ सप्टेंबर १९९० )**१८६६: एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: सत्य प्रकाश राजू श्रीवास्तव -- भारतातील विनोदी कलाकार (जन्म: २५ डिसेंबर १९६३ )**२०१२: गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (जन्म: १७ डिसेंबर १९२४ )**२०११: मकबूल अहमद साबरी -- पाकिस्तानी कव्वाली गायक (जन्म: १२ ऑक्टोबर १९४५ )**२००३: मोरेश्वर नीळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत-- भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ नेते (जन्म: ३० डिसेंबर १९१९ )**१९९९: पुरुषोत्तम दारव्हेकर -- सुप्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, दिग्दर्शक, कवी (जन्म: १ जून १९२६ )**१९९८: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (जन्म: २१ डिसेंबर १९५९ )**१९९२: ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स] (जन्म: १० मे १९१४ )**१९८२: सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (जन्म: २१ जून १९२३ )**१७४३: सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नोकरी श्रेष्ठ की शेती*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अशोक चव्हाण यांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काश्मीर मध्ये BSF जवानांची बस दरीत कोसळून तिघांचा मृत्यू तर 32 जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात एकेकाळी समाजवादी आणि साम्यवादी यांचा बोलबाला होता, पण औद्योगिक प्रगती नंतर ते बाजूला पडले - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निर्भय व मुक्त वातावरण हवे, त्याकरिता संस्थांनी पुढाकार घ्यावा - उच्च व तंत्र शिक्षण विभागाचेप्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 30 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येणार अर्ज, 4500 खात्यात जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ठाण्यातील 58 महाविद्यालयात सुरू होणार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नई कसोटीतील दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला, बांगलादेशचा डाव 149 धावांवर आटोपला, दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 308 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो ?* खोकून दाखवा म्हटले तर तुम्ही खोकून दाखवू शकाल. म्हणजेच कोणताही आजार नसतानाही आपण खोकू शकतो. खोकणे म्हणजे काय हे आता समजून घेऊ. खोकताना प्रथम आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर श्वासनलिकेवर एपिग्लॉटीस हा पडदा टाकला जातो. मग दाबाखाली हवा बाहेर टाकली जाते. त्याबरोबर बेडका बाहेर पडतो.खोकला ही शरीराची एक संरक्षक प्रतिक्रिया आहे. श्वसनमार्गात जीवजंतू गेले, घाण गेली की ती घाण व अनावश्यक स्राव शरीराबाहेर टाकण्यासाठी खोकला येतो. खोकला हे श्वसनसंस्थेच्या विविध रोगांमध्ये आढळून येणारे मुख्य लक्षण आहे. याखेरीज जंतांची लागण, काही मानसिक रोग, काही हृदयविकार यातही खोकला येतो.खोकल्यावर समूळ उपचार करायचा, तर आजारासाठी प्रभावी उपचार करावे लागतील.खोकल्याच्या औषधांचे एक्स्पेक्टोरंट अर्थात बेडके बाहेर टाकण्यास साह्य करणारे व अँटीटसीव्ह अर्थात खोकला थांबवणारे असे दोन प्रकार असतात. कोरड्या खोकल्यासाठी नोस्कॅपीन सारखे अँटीटमीव्ह औषध उपयोगी पडू शकते; पण जेव्हा बेडके पडायला हवेत, तेव्हा ते दिल्यास उलटाच परिणाम हाईल. गंमत म्हणजे ८५% खोकल्याच्या औषधात ही दोन्ही प्रकारची औषधे एकत्र असल्याने ती निरुपयोगी असतात असे शास्त्रीय पाहण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. म्हणून खोकल्याचे औषध घेताना ते डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यावे. खोकला बरा करण्यापेक्षा आजार बरा करणे महत्त्वाचे आहे हे आपण कधीही विसरता कामा नये.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*C. B. S. E. - Central Board of Secondary Education*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फ्रान्स व श्रीलंका या देशांचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?२) आशियाई हॉकी चषक स्पर्धा - २०२४ चा कप कोणत्या संघाने जिंकला ?३) आयसीसीच्या पहिल्या पाकिस्तानी महिला पंच म्हणून कोणाची निवड झाली ?४) 'प्रपंच' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १ मण म्हणजे किती किलो ? *उत्तरे :-* १) जंगल कोंबडा २) भारत ३) सलीमा इम्तियाज ४) संसार ५) ४० किलो *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 निशांत जिंदमवार, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 विष्णू गंभीरे, गणित शिक्षक, आय जी पी धर्माबाद👤 सचिन तोटावाड, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 सौ. स्मिता मिरजकर-वडजे, शिक्षिका, नांदेड👤 आकाश कोलापकर👤 प्रकाश जाधव👤 चिं. जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व काही समजून न समजल्या सारखे वागणे,किंवा टाळाटाळ करणे हे, सुद्धा एकप्रकारचे दुर्लक्षितपणाचे लक्षण आहेत. म्हणून कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.बरेचदा अशा वागण्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणे एके काळी एका लहानशा गावात अंकुर नावाचे एक छोटेसे बीज होते. अंकुरने एका सुंदर फुलात वाढण्याचे स्वप्न पाहिले. एके दिवशी एक हुशार वृद्ध शेतकऱ्याने जमिनीत कोंब लावले. अंकुराने विचारले, "मी कशी वाढू?" शेतकऱ्याने उत्तर दिले, "तुम्हाला तीन गोष्टींची गरज आहे: पाणी, सूर्यप्रकाश आणि संयम." अंकुराने कठोर परिश्रम केले, पाणी प्याला, सूर्यप्रकाश मिळवला आणि धीराने वाट पाहिली. दिवस गेले, आणि अंकुर एक लहान रोप बनला. जसजसे अंकुर वाढत गेले, तसतसे तिला आव्हानांचा सामना करावा लागला. कडक वारा, भुकेले पोट आणि तीव्र उष्णता. पण तिने धीर धरला, तिच्या मुळांचा वापर करून स्वतःला आणि सूर्यप्रकाश गोळा करण्यासाठी तिच्या पानांचा वापर केला. लवकरच अंकुर एक आश्चर्यकारक फुलात बहरला, हवा गोड सुगंधाने भरली. नैतिक : अंकुराप्रमाणेच आपल्याला चांगल्या सवयींनी स्वतःचे पालनपोषण करणे आवश्यक आहे, आव्हानांना धैर्याने सामोरे जाणे आणि आपली स्वप्ने साध्य करण्यासाठी धीर धरणे आवश्यक आहे.From - AI•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/kGjGcjZbtq3CHgNm/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_ या वर्षातील २६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*२०११: प्रसिद्ध हिंदी साहित्य अमरकांत आणि श्रीलाल शुक्ला यांना २००९ सालाचा तर कन्नड नाटककार चंद्रशेखर कंबार यांना २०१० चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर* *२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले (War on Terror).**१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.**१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव - ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.*🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟨 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: राशिद खान अरमान -- अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू**१९८०: जनार्दन केशव म्हात्रे -- कवी, गजलकार**१९७७: सुचिता त्रिवेदी -- अभिनेत्री**१९७७: अरविंद जगताप -- चित्रपट लेखक**१९७२: डॉ. कांतीलाल चव्हाण -- लेखक**१९७०: विमल दादासाहेब मोरे -- भटक्या-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका**१९५७: अनुपम श्याम ओझा -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता (मृत्यू: ८ ऑगस्ट २०२१)**१९४९: रमण रणदिवे -- कवी, संगीतकार, गायक* *१९४९: महेश भट्ट – चित्रपट दिग्दर्शक**१९४७: डॉ.वासंती गंगाधर इनामदार -- कादंबरीकार* *१९४६: इंदुमती हस्ते -- प्रसिद्ध लेखिका**१९४५: लक्ष्मणराव काशीराम खेतले (जाधव) -- लेखक* *१९३९: जयश्री मधुकर रुईकर -- कथाकार, कादंबरीकार, कवयित्री* *१९३४: सोफिया लॉरेन – हॉलीवूडमधील इटालियन अभिनेत्री**१९३३: डॉ. शिवाजीराव अप्पाराव गऊळकर- लेखक, समीक्षक* *१९२२: द. न. गोखले – चरित्र वाङ्‌मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन गौरविले होते.(मृत्यू: २७ जून २००० )**१९१३: प्रभाकर बलवंत वैद्य -- पत्रकार आमदार, कवी, लेखक**१९०९: गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१) (मृत्यू: १० जून २००६ )**१८९८: नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर --’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ८ जानेवारी १९७३ )**१८८०: प्रा. चिंतामणी निळकंठ जोशी -- लेखक (मृत्यू: १६ जून १९४८ )* 🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७: शकिला -- भारतीय अभिनेत्री (जन्म: १ जानेवारी १९३५ )**२०१५: जगमोहन दालमिया -- कोलकाता शहरातील भारतीय क्रिकेट प्रशासक आणि व्यापारी (जन्म: ३० मे १९४० )**२०१४: डॉ. अशोक रामचंद्र केळकर -- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक (जन्म: २२ एप्रिल १९२९ )**१९९७: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार -- चित्रपट अभिनेते (जन्म: ९ जानेवारी १९२६ )**१९९६: दया पवार( दगडू मारोती पवार)-- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक(जन्म: १५ सप्टेंबर १९३५ )**१९३३: अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (जन्म: १ आक्टोबर १८४७ )**१९१५: संत गुलाबराव महाराज -- संत व लेखक, काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन (जन्म: ६ जुलै १८८१ )**१८१०: मीर तकी मीर – ऊर्दू शायर (जन्म: १७२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन सुंदर आहे भाग - 1*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कितीही विरोध झाला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मनोज जरांगेंचे उपोषण सुरु असताना मोठे बंधू  भाऊसाहेब जरांगे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रक्ताचे पाट वाहतील, पण भूसंपादन होऊ देणार नाही; 'शक्तीपीठ'साठी शक्ती लावणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण अद्याप गुलदस्त्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात मान्सून पुन्हा अॅक्टिव्ह; शनिवारपासून मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इस्राईलनं पुकारलं नवं युद्ध, लेबनॉनमध्ये पेजर- वॉकीटॉकीच्या साखळी स्फोटात 20 ठार, 3 हजारहून अधिक जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे 6 बाद 339 धावा, आर. अश्विनचे दमदार शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📕 कावीळ - ब विरोधी लस कोणी घ्यावी?📕*मध्यंतरी कावीळ व प्रतिबंधक लसीकरणाच्या शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी त्या लसी घेतल्या. पण खरेच सर्वांनी त्या लसी घेण्याची गरज होती का?कावीळीत डोळे, त्वचा, लघवी पिवळी होतात. भारतात विषाणूंमुळे होणारी कावीळ अर्थात शास्त्रीय भाषेत यकृतदाह मुख्यत्वे आढळून येतो. 'अ' प्रकारची कावीळ दूषित पाणी अन्नातून पसरते. 'ब' प्रकारची कावीळ दूषित रक्त, तसेच शरीरातील वीर्य, योनीस्राव आदी स्रावांपासून पसरते. साहजिकच 'अ' प्रकारची कावीळ कोणालाही होऊ शकते; पण 'व' प्रकारची कावीळ मात्र रक्त व शरीरातील इतर स्रावांशी संपर्क येऊ शकणाऱ्या व्यक्तींनाच होऊ शकते.यात वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, प्रयोगशाळेत काम करणारे तंत्रज्ञ, समलिंगी. संबंध ठेवणारे पुरुष, शिरेवाटे मादक पदार्थ घेणारी व्यक्ती, वारंवार रक्त घ्याव्या लागणाऱ्या व्यक्ती तसेच वेश्या आदींचा समावेश होतो. साहजिकच या व्यक्तींनी कावीळ 'ब' विरोधी लस घ्यायलाच हवी. या लसीचा डोस प्रौढ व्यक्तींसाठी १ मिली, तर मुलांसाठी ०.५ मिली इतका आहे. महिन्याच्या अंतराने पहिले दोन डोस व नंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा लागतो. यामुळे ५ वर्षे संरक्षण मिळते. सर्वसामान्यपणे सगळ्यांना पाणी वा अन्नाद्वारे पसरणारी कावीळ 'अ' होण्याचा धोका जास्त असतो. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठीही लस उपलब्ध आहे. मात्र एका लसीने एकाच प्रकारच्या कावीळीचा प्रतिबंध होतो. त्यामुळे ज्याला कावीळ 'ब' होण्याचा धोका आहे, त्यानेच त्या लसीवर पैसे खर्च करावे हेच योग्य होईल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*G. P. F. - General Provident Fund*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते, त्या व्यक्तीस अपेक्षेपेक्षा जास्त मोठं फळ प्राप्त होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?२) कुणाच्या नावावरून अंदमान निकोबारची राजधानी 'पोर्ट ब्लेअर' हे नाव देण्यात आले होते ?३) केंद्र सरकारने अंदमान निकोबारची राजधानी 'पोर्ट ब्लेअर'च्या नावाऐवजी कोणत्या नावाची घोषणा केली ?४) 'प्रजा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताने आशियाई हॉकी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कितव्यांदा धडक मारली ? *उत्तरे :-* १) आतिशी मार्लेना सिंह २) कॅप्टन आर्चिबाल्ड ब्लेअर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा नौदल अधिकारी ३) श्री विजयपुरम ४) लोक, रयत, जनता ५) सहाव्यांदा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सौ. संगीता देशमुख, शिक्षिका तथा लेखिका, वसमत👤 पांडुरंग कोकरे, शिक्षक सोलापूर👤 संतोष पटने, धर्माबाद👤 शितला प्रभू👤 उमेश पाटील वडजे👤 प्रकाश कांबळे, नांदेड होमगार्ड समादेशक अधिकारी👤 चिं. जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरिविण धर्म । वा‌उगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४|| ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि त्या व्यक्तीला न कळताच नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते तो, समाधान जगावेगळा असतो. आणि याच विषयी जेव्हा त्या व्यक्तीकडून सकारात्मक विचार इतरांकडून ऐकायला मिळत असतात त्यावेळी मात्र‌ आपल्याला सर्वच काही मिळाल्यासारखे वाटते. या प्रकारची भूमिका पार पाडताना तेवढे काळीज मोठे असावे लागते. असे काळीज प्रत्येकांकडे असणे आवश्यक आहे. कारण या जीवनात सर्वच काही कमावता येतो पण, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावून जाणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📜 सत्य 📜*एक राजा होता. राजाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नसे. एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक पण त्याने दरबारात आज्ञा दिली कि मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायला पाहिजे आहे. दरबारातील सारे विचारात पडले कि असा हार कसा मिळवायचा?. एका विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर मुनी राजाकडे आले व म्हणाले,"राजन! मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे पण हाराबद्दल एक अडचण आहे." राजा म्हणाला,"काय आहे ती अडचण?" विद्वान मुनी म्हणाले,"तो स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोंकानाच दिसेल. पापी लोंकाना हा हार दिसणार नाही." या नंतर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचे नाटक केले व एक दोरी त्याच्या गळ्यात घातली. राजाला कळेना कि आपल्या गळ्यात अशी दोरी का घातली आहे. राजा विचारात पडला कि आता याला दोरी म्हणावे कि हार? कारण दोरी म्हणाले तर पापी ठरतो आणि हार म्हणावे तर दोरी गळ्यात घालून फिरावे लागते. तो काहीच बोलला नाही त्याने ते स्वीकार केले व गप्प राहिला. दरबारातील लोकांनीही हाच विचार केला कि राजाला जर दोरी घालणे पसंत असेल तर आपण कशाला काही बोलायचे आणि हार नाही म्हंटले तर आपण पापी ठरतो. म्हणून दरबारीही गप्प राहिले. दोन-तीन दिवसांनी दरबारातील एक जुना सरदार गावावरून परत आला. त्याला या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्याने येताक्षणी राजाला विचारले,"राजेमहाराज!आज पर्यंत मी तुम्हाला हिरे माणिक, मोत्यांचे हार घातलेले पहिले आहे पण आज हि दोरी का गळ्यात अडकवून तुम्ही फिरत झाले आहे, जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचे म्हणणे हे दाबून ठेवले जाते व सत्य जगासमोर येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 सप्टेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/MPc1haJbvyR7ELVi/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟩 *_ या वर्षातील २६३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟩•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.**२००१: महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना 'जमनालाल बजाज पुरस्कार’ जाहीर**२०००: भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.**१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.**१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील ’डिस्‍नेलँड’ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.**१९४६: फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला.**१८९३: न्यूझीलंडमधे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.* 🟩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: कविता रामभाऊ जवंजाळ --कवयित्री* *१९७७: आकाश चोप्रा -- भारतीय क्रिकेटर , समालोचक**१९७१: प्रसेनजीत गजानन गायकवाड -- कवी, कथाकार, लेखक* *१९६८: प्रा. डॉ. राजेंद्र रामभाऊ वाटाणे-- प्रसिद्ध लेखक, समीक्षक, संपादक* *१९६६: वर्षा गजेन्द्रगडकर -- अनुवाद, पर्यावरण, लोककथा आणि स्त्री-संस्कृती या सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका* *१९६५: सुनीता विल्यम -मुळ भारतीय असलेली अंतराळवीर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९६४: गणेश उत्तमराव साखरे-पाटील -- कवी, लेखक**१९६१: आनंद पेंढारकर -- प्रसिद्ध कवी**१९६० संध्या सूर्यकांत धर्माधिकारी -- लेखिका**१९५९: चिरंजीव पुणाजी बिसेन -- कवी* *१९५९: प्रा.देवबा शिवाजी पाटील -- प्रसिद्ध बालसाहित्यिक, लेखक* *१९५८: लकी अली – गायक,अभिनेता व गीतलेखक**१९५५: इंदुमती महावीर जोंधळे -- प्रसिद्ध मराठी लेखिका* *१९५१: अनिल दिगंबर पाटील -- लेखक**१९५०: विश्वास सदाशिव कुलकर्णी-- आंतरराष्ट्रीय वास्तू विशारद व्हीं. के. ग्रूप्सचे संचालक**१९३८: मोहम्मद ताहिर हुसेन खान -- (१९ सप्टेंबर १९३८ - २ फेब्रुवारी २०१०), ता हुसेन या नावाने ओळखले भारतीय , एकचित्रपट निर्माता,पटकथा लेखक,अभिनेताआणि चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २ फेब्रुवारी २०१०)**१९३८: विनायक विष्णू खेडेकर -- राष्ट्रीय पातळीवर सर्वपरिचित असणारे गोवा राज्यातील लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक* *१९२२: गणपती वासुदेव बेहेरे -- लेखक, झुंझार पत्रकार,आणि संपादक (मृत्यू: ३० मार्च १९८९ )**१९१७: अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक,’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक(मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८ )**१९११: विल्यम गोल्डिंग – नोबेल पारितोषिकविजेते इंग्लिश लेखक (मृत्यू: १९ जून १९९३ )**१९०३: अनंतराव सदाशिव फडके -- लेखक (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५९ )**१८६७: शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. (मृत्यू: ३१ जुलै १९६८ )* 🟩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: वीणा चिटको -- लेखिका, कवयित्री,गीतकार आणि संगीत दिग्‍दर्शक (जन्म: १४ ऑगस्ट १९३५ )**२००७: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ’डी.डी’ – संगीतकार (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७ )**२००४: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (जन्म: ५ सप्टेंबर १९२८ )**२००२: प्रिया तेंडुलकर – रंगभूमी,चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री,लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.(जन्म: १९ आक्टोबर १९५४ )**१९९२: ना. रा. तथा अण्णासाहेब शेंडे – साहित्यिक,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष (जन्म: ७ नोव्हेंबर १९१४ )**१९६३: सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (जन्म: ७ एप्रिल १८९१ )**१९६२: विठ्ठल सीताराम गुर्जर उर्फ वि.सी. गुर्जर-- मराठी लघुकथा लेखक (जन्म: १८ मे १८८५ )**१९३६: पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक,संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: १० ऑगस्ट १८६० )**१८८१: जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भीक मागणे एक दुष्कृत्य*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सणासुदीच्या काळात गहू व तेलाचे भाव राहणार स्थिर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, लोकसभा आणि देशातल्या सर्व विधानसभांची निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव, तर धोरण व्यावहारिक नाही म्हणत काँग्रेसचा विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गणपती विसर्जनानंतर महायुती आणि मविआकडून जागावाटपाच्या चर्चेचा श्रीगणेशा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात 10 दिवसांपासून आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सुप्रिया सुळे यांचं प्राधान्य संसदेला, राज्यातील सत्तास्थानाबद्दल त्यांना आस्था नाही, महिला मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिक्षकांचे ऑनलाईन माहिती देणे बंद, प्रशासनाविरुद्ध असहकार, 25 ला काढणार मोर्चा, जीआर मागे घेण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवरील पहिला विजय ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा बुद्धांचे एका गावात आगमन झाले. तेथील राजाने त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर गावातील सर्व जण बुद्धांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. बुद्धांना सगळेजण वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ लागले. त्यामध्ये मौल्यवान दागिने, कपडे आदींचा समावेश होता. राजानेही अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिली. बुद्ध सगळ्या भेटवस्तूंना केवळ उजव्या हाताने स्पर्श करून त्या स्वीकारत होते. काही वेळाने एक अतिशय साधारण वस्त्रे परिधान केलेली वृद्ध महिला बुद्धांना भेटायला आली. तिने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाली, "माझी परिस्थिती काही चांगली नाही. मी अत्यंत गरीब आहे. रानातील फळे वगैरे गोळा करून, ती विकून मी माझा उदरनिर्वाह करते. आज हे डाळिंब खात असताना तुम्ही गावात आल्याचे समजले आणि मी तशीच तुम्हाला भेटायला आले. आता माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही. फक्त हे उष्टे (अर्धवट खाल्लेले) डाळिंब माझ्याकडे आहे. खरं तर हे डाळिंब तुम्हाला दान करण्यात मला संकोच वाटत आहे. तुम्हाला ते स्वीकारण्याचा आग्रहही मी करणार नाही. मात्र तुम्ही ते स्वीकारलेत तर मी कृतार्थ होईल.' वृद्ध महिलेची ही सारी अवस्था पाहून बुद्धांनी दोन्ही हात पुढे केले आणि तिच्या हातातील डाळिंब आनंदाने स्वीकारले. एवढेच नव्हे तर डाळिंब खाण्यासही सुरूवात केली. हे दृश्‍य पाहून राजा पुढे आला आणि तो बुद्धांना म्हणाला, "माझ्यासह सर्वांनी तुम्हाला अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्या तुम्ही स्वीकारल्यात. पण फक्त उजव्या हाताचा स्पर्श करून. मात्र या वृद्धेने दिलेले उष्ट्या फळाचे दान तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारलेत आणि खाल्लेतही. आमचे दान एका हाताने आणि वृद्धेचे दोन्ही हातांनी? हे असे का?' राजाचे हे म्हणणे ऐकून बुद्धांनी अगदी शांतपणे उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, "हे राजा, तुम्ही साऱ्यांनी जे दान केलेत तो तुमच्या संपत्तीतील दहावा हिस्सादेखील नव्हता. तुम्ही मला गरज नसतानाही हे दान दिलेत. तुम्ही हे सारे दान गोरगरिबांच्या कल्याणासाठीही वापरू शकला असता. मात्र तुम्ही तसे न करता ते मलाच दिलेत. उलट या वृद्धेने जे दान केले आहे तो तिच्याकडे आज असलेल्या संपत्तीचा संपूर्ण भाग होता. हे डाळिंब दिल्यानंतर तिच्याकडे आजसाठी काहीही उरणार नाही, हे ठाऊक असूनही तिने अत्यंत श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे दान दिले. तिला संपत्तीचा कोणतीही मोह नाही. तिचे हे दान मोहविरहित असल्याने तुमच्यापेक्षा अधिक सात्विक दान ठरले.' बुद्धांनी या प्रसंगातून दिलेला संदेश ऐकून सगळीकडे शांतता पसरली.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*G. P. F. - General Provident Fund*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसांना महान बनविते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) युएस ओपन २०२४ महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?२) रशिया व युक्रेन या दोन देशांमधील युद्ध केव्हा सुरू झाले ?३) भारतातील 'अधिकाऱ्यांचे गाव' म्हणून कोणते गाव ओळखले जाते ?४) 'पान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ? *उत्तरे :-* १) आरीना सबालेंका २) २४ फेब्रुवारी २०२२ ३) पडीयाल, जि. धार, मध्यप्रदेश ४) पर्ण, पत्र, पल्लव ५) त्र्यंबकेश्वर, नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. देवबा पाटील, साहित्यिक, खामगाव👤 मनीष बिरादार👤 प्रवीण साधू👤 आनंद पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचे तप एक नाम । सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• प्रत्येकांनी बोलताना तारतम्य ठेवायलाच पाहिजे. विशेषतः इतरांविषयी बोलताना जरा विचार करूनच बोलावे. कधी कधी अनवधानाने एखाद्या विषयी बोलताना आपला तोल देखील जावू शकतो.कोण कोणाचा मित्र,नातेवाईक असेल हे सांगता येत नाही.म्हणून इतरांविषयी बोलताना जरा संयम ठेवलेलं केव्हाही बरे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उपकार स्मरावेअज्ञात वासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे ?  चर्चा सुरू होती. संकट मोठे होते – पण कुंतीन ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप! पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली अखेरीस भीमानही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरीबाच्या उपकार्याचीही फेड केली.तात्पर्यः उपकाराची जाण ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 सप्टेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JZnHrQxtrJvasnTQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_ या वर्षातील २६२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२००९: टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.**२००२: चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्‍च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.**१९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर**१९९७: महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.**१९६२: बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.**१९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय. ए.(CIA) ची स्थापना.**१९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना**१९२४: गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.**१९१९: हॉलंडमधे स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.**१८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या**१८१०: चिलीला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟫 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: सचिन रामचंद्र मस्कर -- कवी**१९८५: मयुर मधुकर जोशी -- कवी, लेखक**१९८०: किरण केन्द्रे -- किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक ( बालभारती )तथा प्रसिद्ध लेखक**१९७९: मनीषा रायजादे पाटील -- कवयित्री**१९७३: सोनाली लोहार -- लेखिका**१९६५: शुचिता नांदापूरकर-फडके -- लेखिका, अनुवादक**१९५६: छगन चौगुले -- मराठी लोकगीत गायक(मृत्यू: २१ मे २०२० )* *१९५३: डॉ.जयश्री रत्नाकर पाटणकर -- कवयित्री, लेखिका* *१९५०: शबाना आझमी -- प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री* *१९५०: रामचंद्र सडेकर -- मराठी कथालेखक, कादंबरीकार,पटकथा लेखक आणि प्रकाशक**१९४८: अनुराधा महादेव फाटक -- बाल साहित्यावर लेखन करणाऱ्या लेखिका**१९४७: सुधाकर गायधनी -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध महाकवी, लेखक**१९४५: अशोक मनोहर भोले -- लेखक, कवी* *१९२०: भीमराव लक्ष्मीकांत परतूरकर -- जेष्ठ इतिहास संशोधक (मृत्यू: ५ जानेवारी १९६८ )* *१९१६: वसंतराव बलवंत अरगडे-- शैक्षणिक आणि धार्मिक पुस्तके लिहिणारे लेखक तथा पूर्व उपशिक्षणाधिकारी**१९१२: गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५ )**१९०६: प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबन काव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली.(मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ )**१९०५: ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (मृत्यू: १५ एप्रिल १९९० )**१९०२: सदाशिव विनायक देशपांडे -- चरित्रकार प्रवचनकार (मृत्यू: ५ मे१९६९ )**१९०२: दत्त रघुनाथ कवठेकर -- कथाकार कादंबरीकार (मृत्यू: १६ ऑगस्ट १९७९ )**१९००: शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५ )**१८८३:मदनलाल धिंग्रा-- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक(मृत्यू:१७ ऑगस्ट १९०९)**१८५१: डाॅ. विष्णू गोपाळ आपटे -- वैद्यकीय विषयावर लिखाण करणारे मराठी लेखक (मृत्यू: २९ जुलै, १८९९ )**१७०९: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४ )*    🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: विद्याधर विष्णू चिपळूणकर-- महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक,जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत(जन्म :१३ एप्रिल १९२९ )* *२००४: डॉ.भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक (जन्म: १३ मे १९२५ )**२००२: शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची 'मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार (जन्म: ३१ ऑगस्ट १९४० )**१९९९: अरुण वासुदेव कर्नाटकी – मराठी चित्रपट दिग्दर्शक(जन्म: ४ ऑक्टोबर, १९३३ )**१९९५: प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६ )**१९९३: असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या**१९९२: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि ११ वे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७० ) (जन्म: १७ डिसेंबर १९०५ )**१७८३: लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (जन्म: १५ एप्रिल १७०७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*यंदा कर्तव्य आहे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्ली सरकारमधील अनेक विभाग सांभाळणारे आतिशी मार्लेना सिंग आता केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे नव्या मुख्यमंत्री होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग दुसऱ्यांदा विदर्भ दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमित शहा यांच्याकडून मोदी सरकारचे 100 दिवसाचे रिपोर्ट कार्ड सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; भाजपची साथ सोडणाऱ्या मेहुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज पाटील जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला केली सुरुवात; आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू, सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ई-पीक नोंदणीसाठी दोन दिवस विशेष मोहीम, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचना, गावस्तरावर युवकांची मदत घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन्स ट्रॉपीच्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦙 शेळ्या 🦙 सर्वत्र दिसणारा, अत्यंत गरीब, एकटा तसेच कळपाने राहू शकणारा, पाळीव तसेच जंगली, घरगुती किंवा मोकाट, भटक्या अशा अवस्थेत राहणारा प्राणी आठवतोय ? हा प्राणी म्हटले, तर उपयुक्त आहे; म्हटले तर त्रासदायक. गरम हवेत किंवा गार प्रदेशात सारख्याच सहजतेने टिकणारा, कुरणात वा डोंगरात कुठेही पोट भरू शकणारा तो प्राणी म्हणजे शेळी.शेळी इतकी सहजपणे अनेक वेळा दिसते, पण तिच्याबद्दल माहिती मात्र फारशी नसते. एखाद्या अगम्य डोंगरकपारींमध्ये सहजपणे शेळी चरु शकते. तेथील उतारावरचे कोवळे खुरटे गवत खाण्याचे धाडस अगदी सहजपणे फक्त तीच करू जाणे. साऱ्या माळरानावरचे गावात संपले, तर बाभळीच्या झाडांवर, खुरट्या काटेरी झुडपांवर ती सहज चढेल. फांदीफांदीवरचा पाला अलगद खाऊन वेळप्रसंगी धडपडत उडी मारून खाली उतरेल, अंग झटकून दुसरीकडे चालू लागेल. खाण्यासाठी गवत शेळीला आवडतेच. पण कोवळा असा जवळपास कोणताही पाला तिला आवडतो. शेळी खात नाही, असा पाला अक्षरश: शोधावा लागतो. याच तिच्या सवयीने शेळी त्रासदायक ठरते. एखादा कळप जेव्हा एखाद्या भागात चरतो, तेव्हा वाढीला लागलेली सर्व प्रकारची झुडपे बघता बघता नष्ट होत जातात. शेळी पाळीव प्राणी आहे. शहरात वा गावात निर्माण होणारा सर्व प्रकारचा घरगुती ओला टाकाऊ कचरा शेळी आवडीने खाते. याचा मोठा फायदा म्हणजे अनेक गोरगरीब शेळ्या पाळतात. खायला फार घालावे लागत नाही, खायला नाही घातले, तरी ती तक्रार करत नाही. कुठेही हिंडली, तरी संध्याकाळी पुन्हा दारात शेळी उगवतेच. त्या वेळेला मिळणारे भांडे, दोन भांडे दूध लहान मुलांना प्यायलाही देता येते. शेळीच्या जमणाऱ्या लेंड्या साठवून ठेवून त्या खत म्हणूनही विकल्या जातात. शहरी झोपडपट्टी असो वा खेड्यातले एखादे खोपटे, अगदी लहान जागेतही एखादी शेळी अनेक ठिकाणी दिसते, ती यामुळेच.शेळीला वर्षात दोन वेळा करडी म्हणजे पिल्ले होतात. ही पिल्लेसुद्धा बघता बघता आईपासून सुटी होतात, मोठी होतात. एका शेळीपासून पाच वर्षात सहज तीस ते पस्तीस शेळय़ांचा कळप तयार होऊ शकतो. सांगितले तर विश्वास बसणार नाही, अशी ही सहज वाढ असल्याने शेळी पाळणार्‍याला नवीन करडे विकूनही पैसे मिळत असतात. शेळ्यांचे मांस मुख्यतः आशिया खंडात आवडीने खाल्ले जाते.शेळ्या जशा सरसकट आढळतात, तसा बोकड मात्र सरसकट दिसत नाही. आपल्याच मस्तीत ढुशा देत हिंडणारा बोकड तसा वजनदार, ताकदवान असतो. बोकडाच्या शिंगांची लांबीही वयानुसार वाढत जाते. त्याची एखादी धडक माणसाला सहज पाडू शकेल, एवढी जोरात असते. कळप जेव्हा मोकळा चरत असतो, तेव्हा एखादा बोकड त्यात असतोच. पाळीव शेळ्यांच्या जोडीला बोकडांची संख्या मात्र फारच अल्प आढळते. एखाद्या खास प्रसंगी बोकड मारला जातो व त्याचे मांस खातात. त्याच्या अंगाला एक उग्र दुर्गंधी येत असते. त्यामुळे बांधलेला बोकडही वस्तीपासून बराच लांब ठेवला जातो.पंधरा वीस वर्षांचे आयुष्य असलेली शेळी कुठल्याही अडचणीच्या जागी जाऊ शकते वा झाडावर चढू शकते, याचे कारण म्हणजे तिच्या खुरांची रचना. खुरांचा पुढचा अर्धा गोल कडक, पण एखाद्या खोबणीची पकड घेईल, असा असतो, तर मागचा भाग मऊ रुतणारा असतो. त्याचाच उपयोग शेळीला पकड मिळवण्यास करता येतो.शेळी ज्या भागात वावरत असेल, तेथील हवामानाप्रमाणे तिचे केस कमी जास्त होतात. थंडीत लव वाढते. शेळीचे रंगही तपकिरी, करडे, काळे, मातकट असे मिश्र असतात. डोळ्यांचे पण अनेक रंग आढळतात. गावठी खुरटी शेळी पस्तीस चाळीस किलो वजनाची भरते, तर पोसलेला उत्तम बोकड अनेकदा दोनशे किलोपर्यंतही असू शकतो. कुरणात चरणारी तगडी शेळी ऐंशी किलो वजनाची असू शकते. शेळीची कातडी वापरून आपल्या वापरातील पाकिटे, पर्सेस, पाऊच इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. मऊ कातडे टिकाऊ व वापरायलाही सोयीचे असते. दुकानात गेल्यावर शमाय लेदरचे पाकीट मागितले जाते ना ते हेच.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*B. H. M. S. - Bachelor of Homeopathic Medicine and Surgery*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सेवा ही हृदय व आत्मा पवित्र करते, सेवेने ज्ञान प्राप्त होते आणि सेवा हेच जीवनाचे लक्ष्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या ठिकाणावरून मतदान करणार आहे ?२) 'सायन्स डायरेक्ट'च्या अहवालानुसार जगातील किती टक्के लोक आजारी आहेत ?३) टायटॅनिक जहाज समुद्रात कोणत्या साली बुडाली ?४) 'प्रकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बॉडीगार्डला सर्वात जास्त मानधन ( २.७ कोटी ) देणारा बॉलीवूडचा पहिला अभिनेता कोण बनला आहे ? *उत्तरे :-* १) अंतराळ २) ९५ टक्के ३) सन १९१२ ४) उजेड, तेज ५) शाहरूख खान *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 किरण इंदू केंद्रे, संपादक, किशोर मासिक, पुणे👤 देवेंद्र रेड्डी गडमोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 सुदर्शन वाघमारे, पत्रकार, धर्माबाद👤 सचिन महाजन, ग्राव्हिटी कोचिंग क्लासेस, नांदेड 👤 योगेश सुधाकर मुक्कावार👤 साईनाथ वाघमारे👤 सुनील पाटील बोमले👤 योगेश शंकरोड👤 रामकृष्ण काकानी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥ त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात जे काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे ते कधीच विसरता येत नाही. उलट त्या प्रसंगाची आठवण काढून आपण सांगत असतो. पण आपल्याच आयुष्यात पुढे काय होणार आहे या विषयी मात्र आपण सांगू शकत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. म्हणून जे, काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण समोर काय होणार आहे या विषयी पूर्णपणे कोणीच सागू शकत नाही म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरी मैत्री*अजनारच्या जंगलात सूर सिंह आणि सिंह राज हे दोन पराक्रमी सिंह राहत होते . सूर सिंग आता म्हातारा होत होता. आता तो जास्त शिकार करू शकत नव्हता. सिंहराज त्याची शिकार करून अन्न आणत असे. सिंहराज जेव्हा शिकारीला जायचे तेव्हा सूर सिंग एकाकी व्हायचे. भीतीपोटी एकही प्राणी त्याच्या जवळ जात नव्हता. आज सुरसिंगला एकटा पाहून कोळ्यांचा कळप फुटला. आज कोल्हाला मोठी शिकार मिळाली होती. कोल्हाळांनी सुरसिंगला चारी बाजूंनी ओरबाडून जखमी केले होते. तो बेशुद्ध झाला. तेवढ्यात सिंहराज गर्जना करत तिथे आला. सिंहराजाला तिथे येताना पाहून कोल्हाळांचा जीव गेला. सिंह राजने काही वेळातच सर्व कोल्ह्यांचा पाठलाग केला. त्यामुळे त्याचा मित्र सुरसिंग याचा जीव वाचला.नैतिक – खरी मैत्री नेहमीच उपयोगी असते, जीवनात खरा मित्र असणे आवश्यक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 सप्टेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/7FKkQVMripWWJTGL/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟪 *_मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••🟪 *_ या वर्षातील २६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.**१९८८: कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९८३: वनीसा विल्यम्स ’मिस अमेरिका’ बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली.**१९५७:मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९४८: हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.**१६३०: बॉस्टन शहराची स्थापना झाली*🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: डॉ. प्रितीराणी जुवेकर -- कवयित्री**१९८६: प्रिया आनंद -- भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल**१९६९: प्रकाश भास्करराव कापसे -- लेखक**१९६५: सुरेंद्र उदेभान मेश्राम -- कवी* *१९५१: डॉ. राणी बंग – सर्च सामाजिक संस्थेच्या संस्थापिका, समाजसेविका, लेखिका**१९५१: सुभाषचंद्र वैष्णव -- बाल साहित्यिक**१९५०: मा. नरेन्द्र दामोदरदास मोदी – स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान,गुजरातचे माजी मुख्यमंत्री**१९४६: विलास वि. फडके -- प्रसिद्ध लेखक**१९३९: राजाभाऊ (कृष्णा बालाजीपंत) भुगावकर -- संत साहित्याचे अभ्यासक, लेखक**१९३९: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८ )**१९३८: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (मृत्यू: १० डिसेंबर २००९ )**१९३७: सीताकांत महापात्र – १९९३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात ओडिया कवी**१९३६: प्रल्हाद नरहर देशपांडे -- इतिहास विषयाचे अध्यापक, संशोधक व संपादक (मृत्यू: २७ मे २००७ )**१९३२: रमेश अणावळकर -- मराठी संगीतातील महान गीतकार (मृत्यू: ३० जानेवारी २००४ )**१९३०: लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (मृत्यू: २२ एप्रिल २०१३ )**१९२९: अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११ )**१९२८: मधुकर दत्तात्रय वैद्य -- लेखक* *१९२५: शरद तानाजी पाटील -- प्राच्यविद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कृषी संस्कृती, ज्येष्ठ विचारवंत.(मृत्यू: १२ एप्रिल २०१४ )**१९१५: मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक (मृत्यू: ९ जून २०११ )**१९१४: थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १ सप्टेंबर २००८ )**१९१२: लक्ष्मण श्रीधर वाकणकर -- लिपिकार, संशोधक (मृत्यू: १५ जानेवारी १९९९ )**१९०९: गणेश विनायक अकोलकर -- शिक्षण तज्ञ ललितलेखक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९८३ )**१९०६: ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६ )**१८८५: केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते (मृत्यू:२० नोव्हेंबर १९७३)**१८८२: अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व ’हिंद महिला समाज’च्या संस्थापिका (मृत्यू: १९४९ )**१८७९: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३ )*🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: नीलकांत ढोले -- विदर्भातील ज्येष्ठ गझलकार (जन्म: १५ जानेवारी १९३९ )**२०१८: अन्ना राजम जॉर्ज-मल्होत्रा - भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या महिला अधिकारी (जन्म: १७ जुलै १९२७ )**२००२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९२२ )**२०१५: बाल जगन्नाथ पंडित --- भारतीय क्रिकेटपटू , लेखक आणि प्रसारक (जन्म: २४ जुलै १९२९ )* *१९९९: हसरत जयपुरी – गीतकार (जन्म: १५ एप्रिल १९२२ )**१९९४: व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (जन्म: २६ जुलै १९५४ )**१९८१: त्र्यंबक गोविंद माईणकर -- प्राध्यापक, भाषातज्ज्ञ, लेखक (जन्म: १५ मार्च १९१५ )**१९३६: हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ आक्टोबर १९५० )**१८७७:हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (जन्म: ११फेब्रुवारी १८०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रासंगिक लेख*मराठवाड्याचा रोमांचक इतिहास*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज वाजत गाजत श्री गणरायाला मिळणार निरोप, रत्नागिरीत 37 हजाराहुन अधिक घरगुती गणरायाचे विसर्जन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विकसित भारताच्या दिशेने देशाचं दमदार पॉल पडलं आहे - पंतप्रधान नरेंद मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिक्षक संघटनेकडून 25 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याची हाक, दोन शासकीय निर्णय मागे घेण्याबाबत पुकारले आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री शिंदेंकडून राजकीय पुनर्वसन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजीनगर - दोन दिवसीय भारतीय कापूस परिषदेचे आयोजन, 10 राज्यातील 1 हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार; बदलत्या जागतिक परिस्थितीवर तज्ञांचे मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज राजीनामा देण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन ट्रॉपी - भारतीय हॉकी संघाचा विजयी षटकार, द. कोरियाला हरवत फायनल मध्ये दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते ?* 📕धुरात माणूस गुदमरतो. याचे कारण काय ते आता पाहू. आपण हवा श्वासावाटे आत घेतो. त्यात ऑक्सिजन (२०.९३ टक्के), कार्बन डायऑक्साइड (०.०३ टक्के), नायट्रोजन (७८.१ टक्के) तसेच अत्यल्प प्रमाणात निऑन, ॲगन, क्रिप्टॉन, झेनॉन व हेलीयम हे वायू असतात. या खेरीज पाण्याची वाफ, अमोनिया तसेच धूळ. जिवाणू, वनस्पतीजन्य कचरा असे तरंगणारे पदार्थही असतात.धुरामध्ये कार्बन डाय ऑक्साइड असतो. हवेतील त्याचे प्रमाण वाढल्याने व ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने गुदमरल्यासारखे वाटत असेल असा पूर्वी समज होता. प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजनचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले.वा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत वाढले, तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही, असे शास्त्रीयनिरीक्षणाद्वारे सिद्ध झाले आहे.धुरामध्ये माणसाला गुदमरल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते. याचे कारण म्हणजे तापमानात होणारी वाढ.तापमानातील वाढीमुळेच माणसाचा मृत्यूही ओढवू शकतो. कलकत्त्यामध्ये एका तुरुंगात १८ × १४ X १० फुटाच्याखोलीत १४६ कैदी होते. खोलीला वायूवीजनासाठी पुरेशा अशा दोन लहान खिडक्या होत्या. ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साइड यांचे प्रमाण सामान्य राहूनही त्यातील फक्त २३ जण जिवंत राहिले. कारण त्या खोलीतील तापमानव आर्द्रतेत खूपच वाढ झाली होती. अर्थात धुरामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांच्या वर गेले, तर त्यामुळेही गुदमरल्यासारखे होते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*B. A. M. S. - Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या प्रमाणे पक्ष्यांचे आश्रयस्थान घरटे असते, त्याप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रयस्थान मौन असते. --- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधानांच्या निवासस्थानी गायीने जन्म दिलेल्या वासराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते नाव ठेवले आहे ?२) कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे ?३) भारताची पहिली वंदे मेट्रो ट्रेन कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावणार आहे ?४) 'पंडित' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जम्मू काश्मीरमधील डोडाला ५० वर्षात भेट देणारे पहिले पंतप्रधान कोण ? *उत्तरे :-* १) दिपज्योती २) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३) अहमदाबाद ते भूज ( ३३४ किमी ) ४) शास्त्री, विद्वान, बुद्धिमान ५) नरेंद्र मोदी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 दयाकर रेड्डी, येताळा👤 महेश राखेवार, कलाशिक्षक, नांदेड👤 जितेंद्र टेकाळे, माहूर👤 बालाजी गाडेवाड👤 किसन कोनापुरे👤 अक्षय वानोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्पकोटि वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधले माझे हातीं ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चौकशी हे नाव खूप सुंदर आहे. जेव्हा याच नावाच्या आधाराने एखाद्या दु:खी, पिडीत, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या भल्यासाठी तसेच चांगल्या गोष्टीसाठी चौकशी केली जाते. त्याक्षणी या नावाचा मान वाढत जातो. पण, नको त्या गोष्टीसाठी चौकशी केली जाते त्यावेळी मात्र याच नावाचे चौकशी ऐवजी चौकशा या प्रकारचे नाव पडले जाते. त्या सुंदर अशा नावाचा अपमान होतो. म्हणून एखाद्याच्या भल्यासाठी चौकशी करणे अजिबात वाईट नाही उलट आवश्यकता आहे. पण,विनाकारण कोणाला त्रास देण्यासाठी चौकशी करणे हे, सुद्धा माणसाला शोभण्यासारखे कार्य नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कालियाला शिक्षा झाली*संपूर्ण गल्ली कालियावर नाराज होती. कधी कधी तो भुंकून रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना घाबरवायचा . कधी चावायला धावत असे. भीतीपोटी मुलांनी त्या गल्लीत एकटे जाणे बंद केले होते. त्या रस्त्यावर चुकून एखादं मुल गेलं तर त्याच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून पळून जायचे. कालियाने तिच्या मित्रांनाही त्रास दिला होता. सगळ्यांना घाबरवून तो स्वत:ला गल्लीचा सेट समजू लागला. त्याच्या कळपात शेरू नावाचा एक छोटा कुत्राही होता. तो कोणालाही त्रास देत नाही, अगदी लहान मुले देखील त्याच्यावर खूप प्रेम करतात. एके दिवशी राहुलने शेरूसाठी रोटी आणली. शेरू खूप खुश झाला आणि तो भाकरी घेऊन गाडीखाली धावला. तिथे बसून जेवायला सुरुवात केली. शेरूला भाकरी खाताना पाहून कालियाने जोरात धक्का दिला आणि भाकरी घेऊन पळून गेला. शेरू जोरजोरात रडू लागला. राहुलने वडिलांना सांगितले. कालियाची कृती त्याच्या वडिलांना माहीत होती. त्याने यापूर्वीही पाहिले होते. त्याला खूप राग आला. एक काठी काढून कालिया दुरुस्त केला. कालियाला आता आजीची आठवण झाली. तो इतका सुधारला होता की रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही तो त्रास देत नाही. लहान मुलाला पाहून तो लपून बसायचा.नैतिक – वाईट कर्मांचे वाईट परिणाम होतात, वाईट कर्म टाळावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/w6G4wmZZ1Gu7dCfP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_ या वर्षातील २५७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.**२००७: दारिद्र्य रेषेखालील ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले वृद्ध नागरिकांना निवृत्ती वेतन देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय**१९९६: महिला आणि बालकल्याणासाठी लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या महिलेला देण्यात येणारा ’श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या श्रीमती इंदुमती पारिख यांना देण्यात आला.**१९८९: आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.**१९४८: ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.**१९२२: लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.* 🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: माधव श्रीकांत किल्लेदार -- नट, लेखक, दिग्दर्शक* *१९८१: प्रा. डॉ. अविनाश शरदराव धोबे -- लेखक**१९७८: डॉ.भारती पवार - माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री**१९७५: भगवान चिले -- इतिहास अभ्यासक व लेखक**१९७३: महिमा चौधरी-- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री**१९६९: शेन वॉर्न – प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर (मृत्यू: ४ मार्च २०२२ )**१९६९: प्रा. डॉ. स्वानंद गजानन पुंड -- प्रसिद्ध लेखक, प्रवचनकार, विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९६८: मीनल अविनाश कुडाळकर -- कवयित्री, लेखिका**१९६७: मायकेल जॉन्सन – अमेरिकन धावपटू**१९६५: प्राचार्या डॉ. साधना निकम -- कवयित्री, लेखिका**१९६२: प्रा. डॉ. सुजाता महाजन -- कवयित्री, लेखिका* *१९५९: श्रीकृष्ण अडसूळ -- प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक,संशोधक,आणि सामाजिक कार्यकर्ते**१९५६: डॉ. रमेश आवलगांवकर -- प्रसिद्ध लेखक,महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक* *१९५५: प्रा. चंद्रशेखर डाऊ -- विज्ञान विषयावर लेखन करणारे लेखक**१९५४: महेश सखाराम भावे -- लेखक* *१९५२:सुतेजा सुभाष दांडेकर -- कवयित्री* *१९४६: उषा नाडकर्णी -- मराठी नाटके व चित्रपटांमधील अभिनेत्री**१९४५: शरदचंद्र लक्ष्मण जोशी -- लेखक**१९४३: डाॅ. वासुदेव मुलाटे -- मराठवाड्यातील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक**१९३९: प्रभा अत्रे -- किराणा घराण्याच्या गायिका व लेखिका(मृत्यू: १३ जानेवारी २०२४)**१९३४: अच्युत दत्तात्रेय ओक --- लेखक**१९३०: प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे -- मराठी लेखक (मृत्यू: ३१ जानेवारी १९९० )* *१९२६: वसंत श्रीपाद निगवेकर -- लेखक**१९०७: लक्ष्मण नीळकंठ छापेकर (आण्णासाहेब) -- कवी लेखक संपादक (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९८६ )**१९०१: जमशेद बोमन होमी वाडिया -- प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता (मृत्यू: ४ जानेवारी १९८६ )**१८९२: वालचंद रामचंद कोठारी -- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार.(मृत्यू: १० फेब्रुवारी १९७४ )**१८८६: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:८ फेब्रुवारी १९७५ )**१८५७: मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (मृत्यू: १३ आक्टोबर १९४५ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: माणिक गोविंद भिडे -- भारतीय हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायिका (जन्म: १५ मे १९३५ )**२०१२: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६ )**२०११: गौतम राजाध्यक्ष -- मराठी फॅशन प्रकाशचित्रकार . व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत(जन्म: १६ सप्टेंबर १९५० )**१९९७: लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (जन्म: २८ आक्टोबर १९३० )**१९९५: डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ )**१९७१: केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ )**१९२९: जतिन दास -- लाहोर कटातील क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला.(जन्म: २७ आक्टोबर १९०४ )**१९२६: श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: ११ जानेवारी १८५८ )**१८९३: मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (जन्म: ३ जुलै १८३८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सायकलच्या आठवणी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार असून या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोलापूर : अक्कलकोट न्यायालय इमारत बांधकामासाठी ६० कोटी मान्यता, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस १५ सप्टेंबर पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एकदिवसीय विश्वचषकातून भारताची छप्परफाड कमाई; आजवरचे विक्रम मोडले, 1.39 अब्ज डॉलर म्हणजेच 11,637 कोटी कमावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंत्री धर्मरावबाबा आत्रामांच्या मुलीने अखेर तुतारी फुंकली, भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ माकप नेते सिताराम येचुरी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय हॉकी संघाचा विजयी चौकार, द. कोरियावर ३-१ ने केली मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*N. I. I. T. - National Institute of Information Technology*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना जिद्दीने तोंड देणे याचेच नाव बुद्धिमत्ता. -- कार्लाइल*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती कोण ठरणार आहे ?२) पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली आहेत ?३) जगातली सर्वात बलशाली कंपनी कोणती ?४) 'पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गोदावरी नदीची लांबी किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) जेरेड इसाकमॅन २) २९ पदके ३) ॲपल ४) राघू, रावा, शुक, कीर ५) १४५० किमी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कबीरदास गंगासागरे, मुख्याध्यापक, जि. प. हा. करखेली👤 अनिता देशमुख, गझलकार, कल्याण👤 दीपश्री वाणी, शिक्षिका, पुणे👤 योगेश रघुनाथ वाघ👤 नवीन रेड्डी👤 जी. राज शेखर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥ सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४"|| ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याच्या राहणीमानाकडे बघून त्याची लायकी ठरवणे हे सुद्धा चुकीचे आहे. एखादी व्यक्ती सत्य बोलत असेल आणि त्याचे बोलणे ऐकून न घेता किंवा समजून न घेता त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. गोड बोलून विश्वासात घेणाऱ्यांना जवळ करणे ही, सुद्धा सर्वात मोठी चूक आहे. चांगल्यात,चांगले बघणे अजिबात वाईट नाही पण, सर्व काही समजून सुद्धा न समजल्यासारखे वागणे हे, माणसाला शोभत नाही. म्हणून बघायचे असेल तर सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करावा. पण,कोणाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल या प्रकारचे वागणे आपल्यात नसले पाहिजे. शेवटी नियतीच्या खेळाची वेळ कधीही सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कृती महत्त्वाची*एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केले होते. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठ्या प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाण खान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दीनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिले. भजन सुरूच होते. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटोर्‍यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे दृश्य सर्वच लोक बघत होते. भजन संपले. सूत्रसंचालक म्हणाला, आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. पण स्वामीजी काही बोलेनात. श्रोत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना? मी उपदेश दिला आहे. स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. आपण काहीच बोलला नाहीत. सूत्रसंचालक म्हणाला. अस्सं! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे, कृती नको. त्या थंडीत कुडकुडणार्‍या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! *तात्पर्य - केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 सप्टेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/BQKF62HFQ3cDY4be/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✨ *_ या वर्षातील २५६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ✨ *_महत्त्वाच्या घटना:_* ✨••••••••••••••••••••••••••••••••• *२००५: हाँगकाँगमधील डिस्‍नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.**१९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान**१९८०: तुर्कस्तानमधे लष्करी उठाव**१९५९: ’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.**१९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन ’पोलिस अ‍ॅक्शन’ असे केले जाते.**१६६६: आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.*✨ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ✨ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: प्राची देसाई -- भारतीय अभिनेत्री**१९८८: प्रशांत दत्तात्रय केंदळे -- कवी**१९७९: प्रा. डॉ. श्रीकृष्ण काकडे -- लेखक, आदिवासी लोक साहित्याचे अभ्यासक* *१९७२: रसिका जोशी -- मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री* *१९६५: आदित्य पांचोली -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि पार्श्वगायक* *१९६४: महेंद्र लक्ष्मण तुपे -- कवी**१९६३: डॉ. नंदकिशोर दामोधरे -- कवी* *१९६२: विनोद राठोड -- भारतीय पार्श्वगायक* *१९६२: प्रा. लक्ष्मण मोहनराव महाडिक -- प्रसिद्ध कवी व लेखक* *१९५७: डॉ. हेमंत मोरेश्वर वाघ -- कवी, भाषांतरकार* *१९५६: डॉ. राजीव नाईक -- नाटककार आणि कथाकार**१९५६: भवानी शंकर -- भारतीय पखवाज ड्रम वादक (मृत्यू: ३० डिसेंबर २०२३ )**१९५५: सुधीर रामकृष्ण सेवेकर --लेखक, तसेच विविध वृत्तपत्रांतून विपुल लेखन* *१९५४: मारुती सिद्राम कटकधोंड -- प्रसिद्ध कवी**१९५३: चांगदेव काळे -- कादंबरीकार व कथाकार* *१९४८: मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू* *१९४५: रेखा निरंजन राव -- प्रसिद्ध लेखिका**१९४५: प्रा. डॉ. संजीवनी अरविंद देशमुख -- कादंबरीकार, तथा कथा लेखिका**१९३२: विजया श्रीनिवास जहागीरदार-- बालसाहित्यिक, लेखिका व कवयित्री (मृत्यू: १ एप्रिल २०२० )**१९१२: फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६० )**१९०३: चंद्रकला आनंदराव हाटे--लेखिका (मृत्यू:१९९०)**१८९७: आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ मार्च १९५६ )**१८९४: विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक.(मृत्यू: १ नोव्हेंबर १९५० )**१८८२: बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकर शास्त्री -- राष्ट्रीय पंडित, तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ(मृत्यू: १० फेब्रुवारी १९७८ )*✨ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ✨••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर –मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ ’गंधर्व नाटक मंडळी’मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले.* *१९९६: पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (जन्म: ७ जुलै १९४८ )**१९९२: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (जन्म: ३१ डिसेंबर १९१० )**१९८०: सतीश दुभाषी --चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.(जन्म: १४ डिसेंबर १९३९ )**१९८०: शांता जोग-चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.(जन्म: २ मार्च १९२५ )**१९७१: जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९ )**१९५२: रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली. (जन्म: १९ जानेवारी १८८६ )**१९२६: विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार (जन्म: १८७१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - कष्टाची कमाई*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *10वी 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विजय माल्या आणि नीरव मोदी या दोघांकडून १६ हजार कोटींची वसुली करून मोदी सरकारने दिला दणका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपने २१ उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भाजपकडून किरीट सोमय्यांना निवडणूक कॅम्पेन कमिटीच्या सदस्यपदाची जबाबदारी, पण सोमय्यांनी जबाबदारी नाकारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठा आरक्षणासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत उद्यापासून बेमुदत आंदोलन करणार, विशेष अधिवेशन बोलावण्याची सरकारकडे केली मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ आणि पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC कसोटी क्रमवारीत रोहित, कोहली आणि जैस्वाल यांचा टॉप-10 फलंदाजांमध्ये समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात ?* 📕गोंगाटामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. कारण वैयक्तिक वा सार्वजनिक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर गाणी लावून गोंधळ घालायचा प्रकार आपल्याकडे आहे. भले मग कोणाचे कान बहिरे का होईनात!चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीचा आवाज म्हणजेच गोंगाट होय. आवाजाची तीव्रता डेसीबल या एककात मोजतात. माणूस ८५ डेसीबल इतक्या तीव्रतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. तसेच २० ते २०,००० हर्दश एवढ्या वारंवारतेचा (Frequency चा) आवाजच तो ऐकू शकतो.गोंगाटाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात कानात आवाज होणे, दडे बसणे, थकवा येणे तसेच बहिरेपणा यांचा समावेश होतो. गोंगाटामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो. चिडचिडेपणा येतो. काम करण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते, याखेरीज गोंगाटात रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, श्वसनाचा दर वाढतो तसेच घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. अशा प्रकारे गोंगाटामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवाज जेथे निर्माण होतो तेथेच त्यावर नियंत्रण ठेवणे, ध्वनिरोधक साधनांचा वापर, व्यक्तीचे कानातील सारख्या साधनांनी आवाजापासून रक्षण करणे इत्यादी उपाय करता येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*M. P. S. C. - Maharashtra Public Service Commission.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाने खचून जाऊ नका, आणखी जिद्दी व्हा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) युएस ओपन २०२४ महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?२) रशिया व युक्रेन या दोन देशांमधील युद्ध केव्हा सुरू झाले ?३) भारतातील 'अधिकाऱ्यांचे गाव' म्हणून कोणते गाव ओळखले जाते ?४) 'पान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ? *उत्तरे :-* १) आरीना सबालेंका २) २४ फेब्रुवारी २०२२ ३) पडीयाल, जि. धार, मध्यप्रदेश ४) पर्ण, पत्र, पल्लव ५) त्र्यंबकेश्वर, नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पुंडलिक बिरगले, भोकर👤 श्याम कांबळे, संपादक, नांदेड👤 स्वप्नील पुलकंठवार, देगलूर👤 शिवा शिवशेट्टे, नांदेड👤 श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी, पुणे👤 व्यंकटेश व्ही पाटील, येवती👤 साहिल सुगुरवाड👤 ज्ञानेश्वर वाढवणकर👤 पोषट्टी सायन्ना👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वजण सुखात राहताना दिसले असते तर कोणी दु:खात दिवस काढताना दिसले नसते. कोणी टाहो फोडताना दिसले नसते. कारण हे दोन्ही प्रत्येकांच्या जीवनात मागे-पुढे राहत असतात आणि जगायला सुद्धा शिकवत असतात. म्हणूनच म्हणतात ना की, जीवन हे सुखा, दुःखाचे संगम आहे याचा विसर पडता कामा नये. सुख आहे म्हणून आनंद आहे आणि दु:ख आहे म्हणून त्यात संघर्ष आहे. कदाचित हे दोघे नसते तर माणसाला,माणसाचे जीवन कळले नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राणी पॉवर*राणी हे एका मुंगीचे नाव आहे जी आपल्या दलापासून भरकटली आहे. घरचा रस्ता न सापडल्याने ती बराच वेळ अस्वस्थ होत होती. राणीच्या घरचे लोक सरळ रेषेत जात होते. मग जोरदार वारा सुटला, सर्वजण बिथरले. राणीही तिच्या कुटुंबापासून दूर गेली. तिला घरचा रस्ता शोधताना त्रास झाला. बराच वेळ भटकल्यावर त्याला खूप भूक आणि तहान लागली. राणी जोरजोरात रडत होती. वाटेत गोलूच्या खिशातून पडलेली टॉफी सापडली. राणीचे नशीब उघडले. त्याला भूक लागली होती आणि त्याला खायला टॉफी मिळाली होती. राणीने मनसोक्त खाल्ले, आता तिचे पोट भरले आहे. राणीने विचार केला की घरी का नेऊ नये, घरातील लोकही खातील. टॉफी मोठी होती, राणी उचलायचा प्रयत्न करायची आणि पडायची. राणीने धीर सोडला नाही. ती टॉफी दोन्ही हातांनी आणि तोंडाने घट्ट पकडते. ओढत ओढत ती तिच्या घरी पोहोचली. त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण त्याला पाहताच तेही धावत आले. टॉफी उचलली आणि घरात घेतली. मग काय, सर्वांची पार्टी सुरू झाली.नैतिक – ध्येय कितीही मोठे असले तरी सतत संघर्षाने ते निश्चितच साध्य होते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 सप्टेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/bPyz9XZudVeRbD7J/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟦 *_ या वर्षातील २५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.**१९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.**१९६५: भारत पाक युद्ध - भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.**१९६१:’विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.**१९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.**१८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.* 🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: डॉ. वैभवकुमार भगवानराव शिंदे -- लेखक, गीतकार**१९८०: प्रणाली देशमुख -- कवयित्री, लेखिका**१९७६: मुरली कार्तिक -- भारतीय क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू**१९७५: गोपाल शिरपूरकर -- कवी, लेखक**१९७२: अपर्णा केळकर -- गायिका**१९६३: निलिमा क्षत्रिय -- लेखिका**१९६२:प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक-- लेखिका**१९६१: राजेंद्र शहा -- गझलकार* *१९५९: प्रा. उत्तम हरिभाऊ बलखंडे -- कवी, लेखक**१९५७: राजू खेर -- भारतीय अभिनेता* *१९५३:श्यामलता काकडे-- अनुवादक**१९५०: डॉ. मोहन मधुकर भागवत -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक**१९३५: रघुनाथ जगन्नाथ तावरे -- कवी* *१९३१: माधव नारायण आचार्य --मराठी लेखक(मृत्यू: २७ जून २०१४ )* *१९१७: फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९ )**१९१५: पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (मृत्यू: २९ मार्च १९९७ )**१९१४: प्रा. मधुकर विठ्ठल फाटक -- लेखक* *१९१३: वामन गणेश तळवलकर-- लेखक, संपादक* *१९१२: अप्पासाहेब बाळासाहेब पंत -- लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ५ऑक्टोबर१९९२ )**१९११: गोपाळ दामोदर देऊसकर -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४ )**१९११: अपर्णा सदाशिव देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९११: नानिक अमरनाथ भारद्वाज ( लाला अमरनाथ) -- भारतीय क्रिकेट खेळाडू भारतीय क्रिकेट संघाकडून शतक ठोकणारे ते पहिले फलंदाज (मृत्यू: ५ ऑगस्ट २००० )**१९०१: बाळकृष्ण रघुनाथ देवधर-- भारतीय शास्त्रीय गायक,संगीततज्ज्ञ, संपादक, चरित्रकार (मृत्यू: १० मार्च १९९० )**१९०१: आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल’ – सुप्रसिद्ध कवी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष,(मृत्यू: ८ मे १९८२ )**१८९५: आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न -१९८३ मरणोत्तर,१९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली.भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली.(मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२ )**१८८५: डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (मृत्यू: २ मार्च १९३० )**१८७९: नरहर शंकर रहाळकर -- मराठी कवी( मृत्यू: ७ डिसेंबर १९५७ )**१८६७: श्रीपाद दामोदर सातवळेकर-- भाष्यकार,संपादक(मृत्यू: ३१ जुलै १९६८ )* 🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०: माधव कोंडविलकर-- जेष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार (जन्म: १५ जुलै १९४१ )* *२०१३: मधुबाला जव्हेरी-चावला -- मराठी गायिका(जन्म: १९ मे १९३५ )**१९९८: क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म: १० आक्टोबर १९०९ )**१९८७: महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.(जन्म: २६ मार्च १९०७ )**१९७१: निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १८९४ )**१९६४: गजानन माधव मुक्तिबोध – हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७ )**१९४८: बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल(जन्म: २५ डिसेंबर १८७६ )**१९२१: सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (जन्म: ११ डिसेंबर १८८२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोरोना काळात पालक बनले शिक्षक*कोरोना काळातच नाहीतर पालकांनी नेहमीच शिक्षक बनून आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. जयशंकर बर्लिन इथं होणाऱ्या वार्षिक राजदूत परिषदेत सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इंजिनिअर रशीद यांना जामीन मंजूर ! जम्मू काश्मीर निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खासगीसह सर्व क्षेत्रातील नोकरदार महिलांना मातृत्व रजेचा अधिकार - उच्च न्यायालय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसकडून पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला ! नांदेड लोकसभेच्या जागेवर दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मोटार वाहन विभागातील कर्मचारी जाणार संपावर, सुधारित आकृतीबंध लागू करण्याची मागणी, 24 सप्टेंबरपासून करणार बेमुदत संप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार ! मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूला मिळणार सर्वाधिक 75 लाखांचे बक्षीस; क्रीडामंत्री मनसुख मालविया यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो ?* 📕थंडीचे दिवस, सकाळची शाळा, अशावेळेस उठणे जीवावर येते. नाईलाजाने उठून कुडकुडत आपण शाळेत जातो. थंडी असल्यावरच का कुडकुडतो ? उन्हाळ्यात का नाही ?कुडकुडणे ही आपल्या शरीराची थंडीपासून संरक्षण करण्यासाठीची क्रिया आहे. आपण कुडकुडतो म्हणजे आपले स्नायू थरथरत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखणे आवश्यक असते. फार उष्णता वा फार थंडी यामुळे शरीरातील अवयवांना हानी पोहोचू शकते. यामुळेच बेडकासारखे थंड रक्ताचे प्राणी अशा काळात हायवरनेशनमध्ये जातात व स्वतःला खोल पुरून घेतात. या थंड रक्ताच्या प्राण्यांना शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करता येत नाही, म्हणून ते असे करतात; परंतु मानव हा गरम रक्ताचा प्राणी आहे. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण वातावरणातील बदलाप्रमाणे तो करू शकतो. त्यामुळेच उष्णता वाढली की धाम येऊन व थंडी वाढली की कुडकुडण्याच्या क्रियेने शरीराचे संरक्षण केले जाते.कुडकुडणे म्हणजे स्नायुंच्या थरथरण्याच्या हालचालीने स्नायूंतून ऊर्जा निर्माण केली जाते व तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तापातही व्यक्तीचे हातपाय थडथड उडतात. हिवतापामध्ये रोगजंतूमुळे मेंदूच्या तापमान नियंत्रण केंद्राचे कार्य बिघडते. याचा परिणाम म्हणून ताप असतानाही कुडकुडण्याच्या क्रियेतून शरीरातील उष्णता वाढवायचा प्रयत्न केला जातो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*U. P. S. C. - Union Public Service Commission.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर, यश मिळवता येईल. जर विचार दुर्बल असतील तर अपयश पदरी पडेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *फुटबॉल इतिहासात ९०० गोल पूर्ण करणारा पहिला खेळाडू* कोण बनला आहे ?२) जगात सर्वाधिक प्लॅस्टिकचा कचरा निर्माण करणारे पहिले तीन देश कोणते ?३) गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला कोणत्या ठिकाणी मिळते ?४) 'पारंगत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ ची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोठे होणार आहे ? *उत्तरे :-* १) ख्रिस्तियानो रोनाल्डो, पोर्तुगाल २) भारत, नायजेरिया, इंडोनेशिया ३) राजमहेंद्री, आंध्रप्रदेश ४) निपुण, तरबेज ५) मेक्सिको*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कांचन जोशी, शिक्षिका, नांदेड👤 प्रशांत करखेलीकर, धर्माबाद👤 ऋषिकेश बच्छाव👤 प्रशांत कोकाटे👤 सुनील महामुनी👤 भगवान वाघमारे👤 गणेश यादव👤 अमोल वसंतराव पाटील👤 दिगंबर वंगरवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमानाचे मानकरी तीच व्यक्ती बनते. जी व्यक्ती नेहमीच सत्याच्या वाटेवर चालत राहते. किंवा एखाद्या व्यक्तीमधील योग्यता बघून माणुसकीच्या नात्याने तिला साथ देते. मानाचे मानकरी होण्यासाठी माणूस कोणताही मार्ग निवडत असतो. पण, सत्याच्या वाटेवर चालून अपमानाचा किंवा टिकेचा मानकरी होण्यासाठी पदोपदी काट्यातून प्रवास करावा लागतो. खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला मिळालेला तो खरा सन्मान असतो. प्रत्येक व्यक्तीला तो सन्मान पात्र होत नाही त्याचे नाव संघर्षमय जीवन आहे .म्हणून जीवनात काहीही झाले तरी चालेल पण,चुकूनही असत्याला साथ देऊ नये कारण, असत्य, सत्यासमोर जास्त काळ पर्यत टिकून राहत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• .आईचे प्रेम*सुरिली नावाचा पक्षी आंब्याच्या झाडावर राहत होती. तिने खूप सुंदर घरटे बनवले होते. ज्यात त्याची लहान मुले एकत्र राहत होती. त्या मुलांना अजून कसे उडायचे ते माहित नव्हते, म्हणूनच सुरिली त्यांना खायला आणून खायला घालायची. एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे सुरिलीच्या मुलांना खूप भूक लागली होती. मुलं जोरजोरात रडू लागली, सगळी मुलं एवढ्या मोठ्याने रडत होती. मुलं रडणारी तिला आवडत नव्हती. ती त्यांना शांत करत होती, पण मुलांना भूक लागली होती त्यामुळे ते गप्प बसत नव्हते. सुरिली विचारात पडली, एवढ्या मुसळधार पावसात जेवण कुठून आणणार. पण जेवण आणले नाही तर मुलांची भूक कशी भागणार ? बराच वेळ विचार केल्यावर सुरिलीने लांब उड्डाण केले आणि पंडितजींच्या घरी पोहोचले. पंडितजींनी प्रसादात सापडलेला तांदूळ, डाळ आणि फळे अंगणात ठेवली होती. पक्ष्याने पाहिले आणि मुलांसाठी तोंडात भरपूर तांदूळ ठेवले. आणि लगेच तिथून उडून गेला. घरट्यात पोहोचल्यानंतर पक्ष्याने सर्व मुलांना तांदळाचे दाणे दिले. मुलांची पोटे भरली होती, सगळे गप्प झाले आणि आपापसात खेळू लागले.नैतिक – आईच्या प्रेमाची जगात बरोबरी नाही, जीव धोक्यात घालूनही ती आपल्या मुलांच्या हितासाठी काम करते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 सप्टेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/10/blog-post_6.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••💢 *_ या वर्षातील २५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला* *१९९६: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला ’कृष्णदास शामा पुरस्कार’ गोमंतकीय मराठी साहित्यिक बा.द.सातोस्कर यांना तर ’पंडित महादेवशास्त्री जोशी मराठी साहित्य पुरस्कार’ कवी नारायण सुर्वे यांना जाहीर**१९६७: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमधेच राहण्याचा निर्णय घेतला.**१९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली**१९४३: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरूवात केली.**१९३९: दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८४६: एलियास होवे याला अमेरिकेत शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.* 💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: अमोल आसाराम घाटविसावे - कवी, लेखक* *१९७१: राजेंद्र कृष्णराव घोरपडे -- लेखक, संपादक* *१९६९: किरण काशिनाथ लोखंडे -- लेखक, संपादक* *१९६८: संजय अनंत पाटील- मायखोपकर -- कादंबरीकार, कथाकार**१९६५: अतुल कुलकर्णी -- मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते* *१९६४: सुभाष नारायण वाणी -- कवी, लेखक**१९६३: डॉ. उर्मिला राघवेंद्र चाकूरकर -- कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९६२: पंकज कुरुळकर -- मराठी व इंग्रजी भाषेमध्ये लेखन करणारे लेखक**१९५७: विद्याधर रावसाहेब पांडे -- कवी, लेखक**१९५६: प्रा. डॉ. मंदाकिनी कुलकर्णी-- कवयित्री**१९५५: प्रा.पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी -- प्रसिद्ध लेखक**१९५४: श्रीपाद श्रीरंग पसारकर -- कवी तथा निवृत्त कार्यकारी अभियंता**१९५४: अमर हबीब -- पत्रकार, समाजिक कार्यकर्ते आणि लेखक**१९५३: बबन सराडकर -- सुप्रसिद्ध कवी* *१९४८: भक्ती बर्वे – अभिनेत्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१ )**१९३८: शमीम अहमद खान -- सितारवादक आणि संगीतकार (मृत्यू: १४ फेब्रुवारी २०१२ )**१९३७: पंढरीनाथ रावजी पाटील -- लेखक* *१९३३: नीलमणी फुकन -- आसामी भाषेतील भारतीय कवी, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते (मृत्यू: १९ जानेवारी २०२३ )**१९३३: व्ही. के. नाईक - मराठी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१४ )**१९३२: मधुकर नारायण ऊर्फ म. ना. गोगटे -- स्थापत्य अभियंता,मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक (मृत्यू: १० मे २०२२ )**१९३०: डॉ.मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी -- संस्कृतचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक व समीक्षक (मृत्यू: २९ जानेवारी २०१४ )* *१९२८: सुशीला मधुकर महाजन -- लेखिका* *१९१८: वसंत श्यामराव वरखेडकर-- कादंबरीकार,नाटककार (मृत्यू: १६ मार्च १९८५ )**१९१२: बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती (मृत्यू: ७ जून २००२ )**१९००: गजानन यशवंत चिटणीस -- वृत्तपत्रकार, कादंबरीकार (मृत्यू: २२ऑगस्ट१९४९ )**१८८८: मोरेश्वर नारायण आगाशे -- अध्यापक, यशस्वी चिकित्सक (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६० )**१८८७: गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारतरत्‍न (१९५७), (मृत्यू: ७ मार्च १९६१ )**१८८०: चिंतामण निलकंठ जोशी -- निबंधकार,प्राचीन मराठी कवितेचे संशोधक (मृत्यू: १६ जून १९४८ )* *१८७२: के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून 'रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(मृत्यू: २ एप्रिल १९३३ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००९: भिका शिवा शिंदे -- प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक (जन्म: ९ मार्च १९३३ )**१९६४: श्रीधर पार्सेकर – व्हायोलिनवादक (जन्म: १९२० )**१९२३: सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि 'संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (जन्म: ३० आक्टोबर १८८७ )**१९००: रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक(जन्म: १८३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त प्रासंगिक लेख*आत्महत्या हा पर्याय नाही*शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या समाजात असलेली एक मोठी समस्या बनून पुढे येऊ पाहत आहे. सरसरी दररोज तीन शेतकरी विविध कारणामुळे मृत्यूला जवळ करीत आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाची ही साथ मिळत नाही ना सरकारची साथ यामुळे तो समस्याग्रस्त बनत चालला आहे आणि त्याच विवंचणेत आत्महत्या शिवाय दूसरा पर्याय त्याला सुचेना झाले. यावर्षी शेतात भरघोस पीक येईल आणि डोक्यावर असलेले कर्ज संपून जाईल या विचारात दरवर्षी नव्या उमेदीने तो शेतात राबतो पण त्यांच्या कपाळी सुख लिहिलेले नाही तर कसे सुख मिळणार ?............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आता चंद्रावर वीज निर्मिती, भारत चीन आणि रशिया सोबत साकारणार आण्विक करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तुम्ही बोलवाल तिथं सभेला येईन, राहुल गांधींचं महाराष्ट्रतील नेत्यांना आश्वासन, राहुल गांधींच्या 15, प्रियंका गांधींच्या 10 सभा घेण्याचा राज्य काँग्रेसचा विचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून साडे तीन हजारांचा भाव जाहीर, निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटलांचा मास्टरस्ट्रोक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समृद्धी महामार्ग संभाजीनगर मार्गे पुण्याला जोडणार, प्रकल्पाला जवळपास साडेनऊ हजार कोटी खर्च अपेक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जागावाटपादरम्यान सर्व घटकपक्षांचा मान राखला जाईल, अमित शाहांकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हमी, मुंबई विमानतळावर बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य सरकारच्या तिन्ही वीज कंपन्यांमधल्या कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन ट्रॉपी 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने जपानवर 5-1 ने मिळविला धमाकेदार विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उपयुक्त ड्रॅगन फळ*ड्रॅगन फळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळते. हे द्राक्षवेलीवरचे एक फळ आहे. ड्रॅगन फळाचे स्टेम्स मांसल आणि रसाळ असतात. हे फळ दोन प्रकारचे असते. एका प्रकारच्या फळात पांढरा आणि दुसऱ्या प्रकारच्या फळामध्ये लाल रंगाचा रसाळ भाग असतो. ड्रॅगन फळ औषध म्हणून देखील वापरले जाते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ड्रॅगन फळामध्ये बरीच पोषक तत्त्वे असतात. त्यात फायबर, अँटीऑक्सिडेंट्स, खनिज आणि जीवनसत्त्वे यासारखे पोषक असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ड्रॅगन फळामध्ये कॅलरी, प्रथिने, कर्बोदको आणि फायबर असतात. आपण नियमितपणे ड्रॅगन फळ खाल्लात तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.वजन कमी करण्यास मदत करतेहृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतेत्वचेचे आरोग्य सुधारतेस्नायूंच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी कार्य करते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*A.S.E.R. - Annual Status of Education Report.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते, त्या व्यक्तीस अपेक्षेपेक्षा जास्त मोठं फळ प्राप्त होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या झाडाच्या लाकडाला *'गोल्डन वूड'* असे म्हटले जाते ?२) आजच्या घडीला जगातला सर्वात मोठा प्लॅस्टिकचे प्रदूषण करणारा देश कोणता ?३) अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही कोणत्या देशाच्या वंशाची अंतराळवीर आहे ?४) 'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी कोण ठरला आहे ? *उत्तरे :-* १) सागवान २) भारत ३) भारतीय वंश ४) जल, पय, उदक, वारी, नीर, सलील, जीवन ५) शाहरुख खान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 ईश्वर येमुल, सामाजिक कार्यकर्ता, नांदेड👤 संतोष पांडागळे, सामाजिक कार्यकर्ता, नांदेड👤 नागनाथ शिंदे, शिक्षक, धर्माबाद👤 साईनाथ लोसरे👤 आकाश गाडे👤 प्रवीण भिसे पाटील👤 रोहित मुडेवार👤 विश्वांभर पापुलवाड, धर्माबाद👤 राजेश भाऊराव चिटकुलवार👤 प्रसाद पुडेवाड👤 संभाजी साळुंके👤 ज्ञानेश्वर इरलोड👤 राजू सूर्यवंशी👤 विजय गड्डम, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात एखाद्याचे चांगले करण्याचे भाग्य लाभले नसेल तर वेळ बघून शेवटच्या क्षणी तरी त्याच्यासोबत आपुलकीच्या नात्याने प्रेमाचे दोन शब्द बोलून माणुसकी धर्म निभावून दाखविण्याचा प्रयत्न करून बघावा. कारण हे दोन शब्द एखाद्या साठी सर्वच काही असू शकतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*थ्री रॅबिट किंग्स*रितेश तिसरीच्या वर्गात शिकत होता. त्याच्याकडे तीन लहान गोंडस बनी होते . रितेशला त्याचा ससा खूप आवडायचा. शाळेत जाण्यापूर्वी पाकमधून मऊ हिरवे गवत आणून तो आपल्या सशाला खाऊ घालत असे . आणि मग शाळेत गेले. शाळेतून आल्यावरही त्याच्यासाठी गवत आणायचा.एके काळी रितेशला शाळेला उशीर होत होता. तो गवत आणू शकला नाही, आणि शाळेत गेला. शाळेतून आल्यावर ससा घरात नव्हता. रितेशने खूप शोधले पण कुठेच सापडला नाही. सगळ्यांना विचारलं पण ससा कुठेच सापडला नाही.रितेश दुःखी झाला आणि रडून त्याचे डोळे लाल झाले. रितेश आता पार्कात बसून रडायला लागला. काही वेळाने त्याला दिसले की त्याचे तिन्ही ससे गवत खात खेळत होते. रितेश खूश होता आणि त्याला समजले की त्याला भूक लागली आहे म्हणूनच तो उद्यानात आला आहे. जेव्हा मला भूक लागते तेव्हा मी माझ्या आईला अन्न मागते. पण तरीही मी त्यांचा नाही. ससाला भेटून तो दु:खी आणि आनंदीही झाला.नैतिक शिक्षण – ज्याला दुसऱ्याचे दुःख कळते त्याला दु:खाला स्पर्श कसा करावा हे देखील कळत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KR2ze6ghdEdEATcb/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_ या वर्षातील २५३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*२००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी ’दुबई मेट्रो’चे उद्‍घाटन झाले.**२००१: व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर दिग्दर्शित ’मॉन्सून वेडींग’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ’गोल्डन लायन’ पुरस्कार मिळाला.**१९९७: सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्‍च असा ’ग्रँडमास्टर’ किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली.**१९९१: ताजिकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.**१९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसर्‍यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करुन विक्रम केला.**१९४५: दुसरे चीन जपान युद्ध – जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.**१९३९: मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमामधे ’प्रभात’चा ’माणूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. फिल्म जर्नॅलिस्टस असोसिएशनने १९३९ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बहुमान त्याला दिला.**१८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१ वे राज्य बनले.**१८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र काचेच्या पट्टीवर घेतले.* 🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: ऋतुजा बागवे -- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना**१९७९: प्रा.डॉ. प्रभाकर गणपतराव जाधव -- लेखक**१९७८: जान्हवी प्रभू-अरोरा -- मराठी या गायिका**१९७४: मंदार आपटे-- भारतीय मराठी गायक आणि संगीतकार**१९७४: कॅप्टन विक्रम बत्रा -- भारतीय सेनादलातील एक अधिकारी, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला (मृत्यू:६ जुलै १९९९)**१९७२: प्रा. डॉ. अजय खडसे -- कवी, लेखक* *१९७२: विशाखा पाटील -- लेखिका**१९७२: डॉ.महेंद्र सुदाम कदम -- प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक**१९७१: संजय रामदास महल्ले -- प्रसिद्ध वऱ्हाडी लेखक**१९६७: अक्षयकुमार (जन्म नाव:राजीव हरीओम भाटिया) --- भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता**१९६१: प्रा. डॉ. सतीश शिरसाठ --- कवी, लेखक* *१९५४: जीवन महादेव खोब्रागडे -- कवी**१९५३: दादाकांत धनविजय -- लेखक, नाटककार, दिग्दर्शक, कलावंत**१९५१: प्रा. श्याम मानव -- अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे संस्थापक-राष्ट्रीय संयोजक, तर्कवादी, तत्वज्ञानी, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक* *१९५०: श्रीधर फडके – प्रसिद्ध संगीतकार व गायक**१९४८: शालिनीताई देवराव मांडवधरे- कवयित्री* *१९४८: दि. मा. देशमुख -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४१: अबीद अली – अष्टपैलू क्रिकेटपटू**१९३९: डॉ.मल्हार गंगाधर कावळे -- कादंबरीकार, कथाकार**१९३८: डॉ. संभाजीराव सावळाराम भोसले -- सुप्रसिद्ध साहित्यिक* *१९३५: विद्या हनुमंतराव नाडगौडा -- लेखिका**१९३१: मदनलाल द. शिंगवी -- कवी* *१९२९: डॉ. केशव वामन आपटे -- चरित्रकार, लेखक* *१९२५: पुरुषोत्तम दास जलोटा -- भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायक (मृत्यू: १८ जानेवारी २०१८ )**१९१९: प्रा. डॉ. अनंत गणेश जावडेकर -- तत्वज्ञान विषयांचे अभ्यासक, लेखक* *१९१८: मुरलीधर गजानन पानसे -- लेखक, संशोधक, संपादक (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७० )**१९०९: लीला चिटणीस – अभिनेत्री (मृत्यू: १४ जुलै २००३ )**१९०९: मेहबूब खान -- भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अग्रणी निर्माता-दिग्दर्शक (मृत्यू: २८ मे १९६४ )**१९१०: नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (मृत्यू: २६ मार्च १९९७ )**१८९६: श्यामलाल गुप्त -- हिंदी भाषेतील कवी होते. यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे हिंदी भाषेतील गीत रचले (मृत्यू: १० ऑगस्ट १९७७ )**१८५०: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक (मृत्यू: ६ जानेवारी १८८५ )**१८२८: लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१० )* 🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२: पंडित मनोहर वासुदेव चिमोटे- विख्यात हार्मोनियमवादक (जन्म: २७ मार्च १९२९ )**२०१२: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील 'धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण,रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ )**२०१०: वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (जन्म: ९ मे १९२८ )**२००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या (जन्म: २ सप्टेंबर १९५३ )**१९९७: आर. एस. भट – ’युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’चे पहिले अध्यक्ष* *१९७६: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार,मुत्सद्दी,मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (जन्म: २६ डिसेंबर १८९३ )**१९६०: अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर (जन्म: ६ एप्रिल १८९० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई म्हणजे संस्काराची खाण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 सप्टेंबर रोजी करणार जम्मू काश्मीरचा दौरा, निवडणूक रॅलीना संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची भाजपा ला सोडचिठ्ठी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधनाची व सन्मार्गाची दिशा देणारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता, सोयाबीनला 4 हजार 892 रुपयांचा हमी भाव मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावतीच्या अर्थ व सांख्यिकी विभागाचे सहसंचालक पद पहिल्यांदाच महिलेकडे, संध्या गवई यांनी स्वीकारला पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडणार, संध्याकाळी वादळी वाऱ्यांची शक्यता, हवामान विभागाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरालिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, 7 सुवर्णपदकांसह केली 29 पदकांची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रिकाम्या पोटी हे फळं खाऊ शकताकिवी- किवीमध्ये भरपूर पोषक असतात जे तुम्ही रिकाम्या पोटी खाऊ शकता. डेंग्यूच्या आजारात किवी खूप चांगली आहे. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते.सफरचंद - रिकाम्या पोटी तुम्ही सफरचंद आरामात खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. बद्धकोष्ठता आणि गॅसपासून मुक्ती मिळेल. पचनसंस्था चांगली राहील.डाळिंब - डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असतात. तुम्ही रिकाम्या पोटी आरामात डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता होत नाही. आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते.पपई - पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर पपई सर्वोत्तम आहे. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता आणि पोटफुगीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*F. L. N. - Foundational Literacy and Numeracy*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसांना महान बनविते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या उंचउडी T64 स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले ?२) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पोलीस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण जाहीर केले ?३) सामाजिक परिवर्तनासाठी यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाने कोणासोबत करार केला ?४) 'परिमल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) टाईम मॅगझिनच्या AI मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे ? *उत्तरे :-* १) प्रवीण कुमार २) राजस्थान ३) युनिसेफ इंडिया ४) सुवास, सुगंध ५) अश्विनी वैष्णव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आरती डिंगोरे, साहित्यिक, नाशिक👤 गोविंदराव इप्पकलवार, वसमत👤 किशन मतकर👤 रमेश पेंडकर👤 अरशद खान👤 श्रीकांत पाटील👤 महेश ठाकरे👤 उमाकांत कोटूरवार👤 यश सीतावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे काही चांगले करायचे असेल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करून बघावा. कारण येणारी प्रत्येक वेळ एकसारखी नसते किंवा सांगूनही येत नाही. म्हणूनच म्हणतात की, गेलेली वेळ परत येत नाही. या सुंदर विचारांना आत्मसात करावा. जरी जोराने येणारी हवा अंगाला स्पर्श करुन जात असेल तरी ती आपल्याला कधीच दिसत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मांजर पळून जाते*ढोलू-मोलू हे दोन भाऊ होते. दोघे खूप खेळायचे, अभ्यास करायचे आणि कधी कधी खूप भांडायचे. एके दिवशी दोघेही त्यांच्या घराच्या मागे खेळत होते. एका खोलीत दोन लहान मांजरीचे पिल्लू होते. मांजराची आई कुठेतरी गेली होती, दोन्ही मुलं एकटीच होती. त्याला भूक लागली होती म्हणून तो खूप रडत होता. ढोलू-मोलूने दोन्ही मांजरीच्या पिल्लांचा आवाज ऐकला आणि आजोबांना हाक मारली. दोन्ही मांजरीचे पिल्लू भुकेले असल्याचे आजोबांनी पाहिले. आजोबांनी त्या दोन्ही मांजरीच्या पिल्लांना एक वाटी दूध दिले. आता मांजराची भूक शमली आहे. दोघेही एकमेकांशी खेळू लागले. ते पाहून ढोलू-मोलूने मांजर वाचल्याचे सांगितले.आजोबांनी ढोलू-मोलूचे अभिनंदन केले.नैतिक शिक्षण –  इतरांचे भले केल्याने आनंद मिळतो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2015/10/blog-post_83.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_ या वर्षातील २५० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: अमेरिकेतील ’नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक अमजद अली खाँ यांची ’नॅशनल हेरिटेजफेलोशिप’साठी निवड**१९९३: ज्येष्ठ कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड**१९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.**१९६६: दक्षिण अफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हरवोअर्ड यांची संसदीय बैठक चालू असतानाच हत्या.**१९६५: पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ’ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली.या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.**१९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केन्द्र माँट्रिअल येथे सुरू झाले.**१९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: सरगुन मेहता -- भारतीय अभिनेत्री**१९८६: पुष्कराज चिरपुटकर -- मराठी अभिनेता* *१९६८: प्रा. डॉ. सुनंदा शेळके -- प्रसिद्ध कवयित्री, गझलकार* *१९६८: पद्माकर दत्तात्रय वाघरुळकर -- लेखक* *१९६८: सईद अन्वर – पाकिस्तानी फलंदाज**१९६५: प्रदीप त्र्यंबकराव चौधरी -- कवी, लेखक* *१९५९: सय्यद जबाब स.रहेमान पटेल -- कवी* *१९५८: श्रीकृष्ण उर्फ आबासाहेब कडू -- प्रसिद्ध कथाकार**१९५४:आतांबर शिरढोणकर (आतांबर बापू सौदंडे) -- प्रसिद्ध लोकशाहीर तथा लेखक**१९५२: दिवाकर केशव म्हात्रे -- प्रसिद्ध लेखक**१९४९: राकेश रोशन -- चित्रपट निर्माता, निर्देशक व अभिनेता**१९४६: डॉ.स्नेहसुधा कुलकर्णी -- ज्येष्ठ लेखिका**१९३७: डॉ. पी. व्ही. काटे -- इतिहास संशोधक**१९३७: वसंत गोविंद पोतदार -- लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार (मृत्यू: ३० एप्रिल २००३ )**१९३६: डॉ. सुहास बाळ देव -- कवयित्री, लेखिका* *१९३६: प्रा. रामकृष्ण रघुनाथ डिघोळकर-- कवी**१९३२: शकुंतला बाळकृष्ण फाटक -- लेखिका* *१९३१: शांताराम काशिनाथ राऊत -- बोधचिन्ह संकल्पनकार (मृत्यू: १८ ऑक्टोबर २०१५ )**१९२९: यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (मृत्यू: २६ जून २००४ )**१९१८: जगमोहन सुरसागर -- भारतीय गायक आणि संगीतकार(मृत्यू: ४ सप्टेंबर२००३ )**१९०१: कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. ’राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. (मृत्यू: १८ मे १९९७ )**१८८९: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५० )**१७६६: जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ जुलै १८४४ )* 🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: मालिनी राजूरकर -- हिदुस्तानी संगीतातील मराठी गायिका (जन्म: ८ जानेवारी १९४१ )**२०२०: बक्षी मोहिंदर सिंग सरना -- व्यावसायिकरित्या एस.मोहिंदर म्हणून ओळखले जाणारे ,भारतीय संगीतकार(जन्म: २४ फेब्रुवारी १९२५ )**२००५: मेजर धनसिंग थापा -- भारतीय लष्करी अधिकारी, परमवीर चक्र सन्मानाने सन्मानित (जन्म: २८ एप्रिल १९२८ )**१९९०: सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ जून १९१६ )**१९७२: अल्लाउद्दीन खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातील महर्षितुल्य कलाकार व संगीतकार,सरोदवादक(जन्म: १८६२ )**१९६३: मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक,त्यांना कन्‍नड,कोंकणी,इंग्लिश,संस्कृत,तेलुगू, तामिळ,मराठी,कन्‍नड,बंगाली,पर्शियन,पाली, ऊर्दू,ग्रीक,जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले. (जन्म: २३ मार्च १८८३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्री गणेश चतुर्थी निमित्ताने लेख*आधी वंदू तुज मोरया ....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देवस्थानांच्या विकासासाठी 275 कोटी मंजूर; बीड, जालना, नागपूर अन् कोल्हापूरमध्ये सुशोभीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी-गणपती उत्सवासाठी ( 7 ते 14 सप्टेंबर ) आठ दिवसाची सुट्टी जाहीर, मुंबई पालिकेचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिंगोली : नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडून पाहणी, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात 1 लाख 17 कोटींच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; 29 हजार रोजगार निर्मिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत ८ ते १५ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार ‘माउंट मेरी फेस्टिव्हल’*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एस. टी. महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये दिव्यांगांना कायमस्वरूपी आरक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सर्वाधिक टॅक्सपेयरच्या यादीत अभिनेता शाहरुख खान आघाडीवर, 92 कोटी रुपये आयकर भरला, तमिळ अभिनेता विजय 80 कोटी, तर विराट कोहलीकडून 66 कोटीचा कर अदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, आयर्न, फॉस्फोरस, कॅल्शिअम आणि बरेचसे व्हिटॅमिन्स यात असतात. अनेकदा जेवण केल्यानंतर एक तुकडा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतातपचन तंत्र होतं मजबूत -गूळ पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी फार फायदेशीर मानला जातो. रोज जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत होतं. याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या दूर होतात. इम्यूनिटी वाढते -जेवण केल्यावर एक तुकडा गूळ खाल्ल्याने एनर्जी मिळते. तसेच याच्या सेवनाने इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.हाडं होतात मजबूत -जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गुळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, कॅल्शिअम, फॉस्फोरस जे हाडं मजबूत करण्यास मदत करतात. ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं -ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी गूळ रामबाण उपाय मानला जातो. गुळाच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत मिळते.वजन होईल कमी -गुळाच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यास मदत मिळते. जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.एनीमियामध्ये फायदेशीर -गुळाच्या नियमित सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. गुळाचं सेवन एनीमियाच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर आहे. गुळामध्ये आयर्न आणि फॉस्फोरस असतं ज्यामुळे शरीरात रक्त वाढतं. ज्या लोकांमध्ये रक्त कमी आहेत त्यांनी गुळाचं सेवन करावं.*गुगल वरून संकलन केलेली माहिती आहे.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*K. Y. C. - Know Your Customer*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सलग दोन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा *सुमित अंतिल* कितवा भारतीय भालाफेकपटू ठरला आहे ?२) CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनले आहे ?३) 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ?४) 'पशू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'गंभीरा' हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे ? *उत्तरे :-* १) पहिला २) ख्रिश्चन जोसेफ परेरा ३) महात्मा गांधी ४) प्राणी, जनावर, श्र्वापद ५) पश्चिम बंगाल *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 👤 सुनील ठाणेकर, शिक्षक, देगलूर👤 जयेश वाणी👤 सचिन पाटील👤 आनंद गायकवाड👤 विठ्ठल तुकडेकर👤 अनिल सोनकांबळे👤 विकास डुमणे👤 रितेश पोकलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी व्यसन करत असतील किंवा आळसाला जवळ करत असतील किंवा कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांच्या ह्या वाईट सवयी सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागावे. हे माणूसकीचे लक्षणे आहेत. पण, एखाद्याचे जीवन उद्धस्त करण्यासाठी किंवा त्याला मुद्दाम मागे खिचण्यासाठी किंवा त्याचा अपमान करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागू नये. कारण, अशा व्यक्तीच्या पाठीमागे हात धुवून लागण्याचा प्रयत्न केल्यावर क्षणभरासाठी समाधान मिळेल पण, शेवटी आपल्यात असलेल्या काही अनमोल संपत्ती मात्र हळूहळू लोप पावायला सुरूवात होतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*साधू आणि यक्ष*एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले. *तात्‍पर्य – एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.*वर्तमानपत्रातून संग्रहीत•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2024💠 वार - गुरूवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/QC3AMHJEUY5wRe13/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟪 *_भारतीय शिक्षक दिन_*🟪•••••••••••••••••••••••••••••••••🟪 *_ या वर्षातील २४९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.**२०००: ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर**१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.**१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.**१९३२: फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.* 🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: अजय भिल्लारे-- कवी* *१९८७: संतोष सुभाष जपे -- लेखक**१९८६: प्रज्ञान ओझा -- भारतीय क्रिकेटपटू**१९८४: भक्ती प्रशांत जोशी -- लेखिका**१९७८: लक्ष्मण एकनाथ जगताप --- लेखक**१९७७: डॉ.रामकिशन दहिफळे -- लेखक, संपादक* *१९७७: रोहिणी मुकुंद पांडे -- कवयित्री, लेखिका**१९७६: चंद्रकांत घाटाळ -- लेखक**१९७६: बाळासाहेब गर्कळ -- लेखक, कवी**१९७३: प्रमोद बाबुराव चोबीतकर -- लेखक**१९६९: धोंडोपंत शंकरराव मानवतकर -- कवी लेखक**१९६७: कविता महाजन -- मराठी लेखिका, कवयित्री (मृत्यू: २७ सप्टेंबर २०१८ )**१९६४: ग्यानचंद ताराचंद जांभुळकर- लेखक**१९६३: सुनंदन लेले -- क्रिकेटर ते पत्रकार अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक**१९६३: योगेन्द्र सिंह यादव -- ज्येष्ठ राजकीय विश्लेषक* *१९५९: दत्तात्रेय मारुतीराव माने (द.मा.माने) -- लेखक, कवी**१९५९: डॉ. संध्या टिकेकर -- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९५५: स्मिता तळवलकर -- मराठी चित्रपट,नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक(मृत्यू: ६ ऑगस्ट २०१४ )**१९५५: पुष्पा देवीदास कांबळे -- कवयित्री* *१९५४: लक्ष्मीकांत देशमुख -- भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, सुप्रसिद्ध साहित्यिक व बडोदा येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५२: विधू विनोद चोप्रा-- लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संपादक, गीतकार, अभिनेता**१९५०: अनवर कुरेशी -- गझल गायक**१९४७: महादेव श्रीराम इलामे -- लेखक व कवी* *१९४४: देविदास श्रीगिरीवार -- निवृत्त शिक्षण सहसंचालक तथा लेखक* *१९४२: डॉ. पं. केशव गिंडे --भारतीय शास्त्रीय बासरीवादक**१९३०: अण्णा शिरगावकर -- लेखक व नामवंत इतिहास संशोधक (मृत्यू: ११ ऑक्टोबर २०२२ )**१९२८: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४ )**१९२०: लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये...(मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३ )**१९०७: जयंत पांडुरंग तथा ’जे.पी.’नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक,(मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१ )**१९०४: भालचंद्र पंढरीनाथ बहिरट -- संत साहित्याचे अभ्यासक, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: १४ आक्टोबर १९९८ )**१८९५: अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक (मृत्यू: १३ एप्रिल १९७३ )**_१८८८: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.(मृत्यू: १७ एप्रिल १९७५ )_**१८७७: कृष्णाजी पांडुरंग लिमये -- जुन्या पंडिती वळणाचे कवी (मृत्यू: १ नोव्हेंबर १९२२ )**१८७२: त्रिंबक नारायण आत्रे -- महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक(मृत्यू: फेब्रुवारी १९३३ )*🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९: किरण नगरकर -- मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक(जन्म: २ एप्रिल १९४२ )* *२०१५: आदेश श्रीवास्तव -- भारतीय गायक व संगीत दिग्दर्शक ( जन्म: ४ सप्टेंबर १९६६ )**२०००: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२ )**१९९७: मदर तेरेसा – भारतरत्‍न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (जन्म: २६ ऑगस्ट १९१० )**१९९५: सलील चौधरी -- हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध संगीतकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९२३ )**१९९२: अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति* *१९९१: शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार (जन्म: २१ मे १९३१ )**१९७८: रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार. (जन्म: १ जानेवारी १९०८ )**१९१८: सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म: २० जानेवारी १८७१ )**१९०६: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० फेब्रुवारी १८४४ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खास शिक्षक दिनानिमित्त you tube वर प्रसारित कथा*हाताची जादू ओळखणारा शिक्षक*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय; नागपुरात उभारणार मिनी बॉलिवूड; 100 हेक्टरमध्ये भव्य चित्रनगरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारची एसटीला 300 कोटींची मदत, सवलतमुल्याच्या प्रतिपूर्तीसाठी महामंडळाला दिली रक्कम, ST कर्मचाऱ्यांचा संप मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व पास-नापास विद्यार्थ्यांना सरळसरळ वरच्या वर्गात प्रवेश (फुल कॅरी ऑन) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'पुणे फेस्टिव्हल'चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, क्रीडा स्पर्धां आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता पेन्शन धारकांना मिळणार कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन, सुविधा 1 जानेवारी 2025 पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *CBI कडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल ; महाविकास आघाडीचे सरकार असतानाचे प्रकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सांगलीतील आटपाडीच्या पठ्ठ्याने इतिहास रचला,सचिन खिलारीला पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नारळ खाण्याचे फायदे*नारळात असलेले ट्रायग्लिसराइड शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते. कच्च्या नारळाच्या सेवनाने भूक कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. थंडीच्या काळात सर्वाधिक लोकांना बद्धकोष्ठताची समस्या असते. जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर कच्च्या नारळाचे सेवन करू शकता.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*A. I. R. - All India Radio*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काळ जरी तुम्हाला बदलता येणे शक्य नसेल तरी आपण बदलण्याचा हा काळ आहे हे ओळखा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकन सैन्याच्या कोणत्या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन यांची पाकिस्तानातील अँबोटाबाद येथे हत्या केली ?२) जोतिबांना 'महात्मा' ही पदवी कोणत्या साली बहाल झाली ?३) शहीद खुदीराम बोस यांना कोणत्या कारागृहात फाशी देण्यात आली ?४) संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ कोणत्या ग्रंथाला मानतात ?५) सम्राट हर्षवर्धनच्या काळात चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात काय म्हणायचे ? *उत्तरे :-* १) Navy Seals 6 २) सन १८८८ ३) मुज्फरपूर कारागृह ४) अष्टाध्यायी ५) चीनांशुक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजकुमार काळे, सहशिक्षक, बिलोली👤 रत्नाकर चिखले, मुंबई👤 धोंडोपंत मानवतकर, औरंगाबाद👤 लक्ष्मीनारायण येरकलवार, सहशिक्षक, चंद्रपूर👤 नितीन शिंदे, सहशिक्षक, पुणे👤 नरेश रेड्डी, धर्माबाद👤 सौरभ सावंत, नांदेड👤 बालाजी आरेवार, येवती👤 गंगाधर मरकंटवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कधी कधी आपल्याला वाटत असते की, सर्वांशी दोन शब्द प्रेमाने बोलावे आणि माणुसकी धर्म निभावून दाखवावे पण त्याच शब्दांविषयी न कळताच जेव्हा आपल्या पाठीमागे जमून फायदा घेतला जात असेल तर मात्र त्यावेळी आपले मन दुखावत असते व आपुलकी वरचा विश्वास कायमचा उडून जातो. म्हणून समोरच्या व्यक्तीसोबत बोलताना आधी स्वतःला वाचावे व त्या व्यक्तीला सुद्धा वाचावे दु:खी होण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरा वेडा कोण*एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''वर्तमानपत्रातून संग्रहित•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - पोळा https://www.facebook.com/share/p/qX6erzgJNaPjGUua/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*💧जागतिक नारळ दिवस 💧**💧बैल पोळा निमित्ताने शुभेच्छा 💧*•••••••••••••••••••••••••••💧 *_ या वर्षातील २४६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💧 *_महत्त्वाच्या घटना:_* 💧••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.**१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.**१९४५: व्हिएतनामने (जपान व फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य घोषित केले.**१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर ताब्यात घेतले.**१९२०: कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.**१९१६: पाटणा उच्‍च न्यायालयाची स्थापना* 💧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 💧•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: इशांत शर्मा -- भारतीय क्रिकेटपटू**१९८२: प्रा. लता बिरु एवळे-- कवयित्री, लेखिका**१९७६: उत्तम शंकर सावंत -- कवी**१९७३: रवींद्र तुकाराम पाटील -- लेखक**१९७१: सरोज प्रभाकर आल्हाट -- कवयित्री लेखिका* *१९७०: प्राचार्य डॉ.पवन भाऊ मांडवकर-- कवी, कथाकार, कादंबरीकार* *१९६९: अलका बडोला कौशल -- भारतीय अभिनेत्री आणि निर्माती* *१९६६: नितीन आरेकर -- लेखक**१९६२: पुष्पा कृष्णाजी कोल्हे -- लेखिका**१९६०: नितीन विनायक देशमुख -- कवी* *१९५२: जिमी कॉनर्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९५२: एकनाथ खडसे -- माजी महसूल मंत्री**१९५२: डॉ. अनिल कुमार मेहंदळे -- लेखक, गीतकार, समीक्षक* *१९४९: वामन हरी पांडे -- लेखक* *१९४७: प्रा. मोतीराम राठोड -- विचारवंत, लेखक,सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: १९ आगस्ट २०१९ )**१९४३: शुभदा शरद गोगटे -- मराठी साहित्यातील एक प्रथितयश लेखिका**१९४३: मुकुंद रघुनाथ दातार -- समीक्षक, संपादक, कवी,संतसाहित्याचे अभ्यासक**१९४१: साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री**१९२८: कुसुम देशमुख -- कवयित्री, लेखिका* *१८८६: प्रा.श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक.(मृत्यू: २५ डिसेंबर १९५७ )**१८७७: फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६ )**१८४५: डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे -- लेखक, वैद्यकशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू: १५ जुलै१८९६ )* 💧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 💧•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: सिद्धार्थ शुक्ला -- भारतीय अभिनेता, मॉडेल ( जन्म: १२ डिसेंबर १९८० )**२०१७: शिरीष व्यंकटेश पै -- मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार (जन्म: १५ नोव्हेंबर १९१९ )* *२०११: श्रीनिवास खळे – जेष्ठ प्रसिद्ध संगीतकार (जन्म: ३० एप्रिल १९२६ )**२००९: आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन (जन्म: ८ जुलै १९४९ )**१९९९: डी. डी. रेगे – चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (जन्म: १७ डिसेंबर १९११ )**१९९०: नरहर शेषराव पोहनेरकर – कवी, कथाकार,कादंबरीकार,संशोधक आणि 'मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास' (जन्म: ३ आक्टोबर १९०७ )**१९७६: विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – सुप्रसिद्ध मराठी लेखक,कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) (जन्म: १९ जानेवारी १८९८ )**१९६९: हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती (जन्म: १९ मे १८९० )**१९६०: डॉ.शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ (MACS) या संस्थेचे संचालक**१९३७: वासुदेवशास्त्री लक्ष्मणशास्त्री पणशीकर -- संपादक, प्रकांड पंडित(जन्म: ३० मे १८६० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बैलांचा सण : पोळा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि चिन्हाचे केले अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी ठरले राज्यातील पहिले सौरग्राम गाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नांदेड : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यंत्रांची तपासणी करून ते मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे :- डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने देवकी पंडित सन्मानित:विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबर कलांचे शिक्षण देणारी संयुक्त प्रणाली असावी - डॉ. विजय भटकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे :- स्त्री आधार केंद्रातर्फे महिला स्वयंसेवकांसाठी महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण, महिला सुरक्षितता कार्यक्रम राबवण्यासाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोलीत पावसाचा कहर, पुरात 9 जण अडकले, बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाचारण, उपजिल्हाधिकाऱ्यांचं मंत्रालयाला पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरालिम्पिक : बॅडमिंटनमध्ये मनीषा रामदासची जपानच्या मामिको टोयोडाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नारळाची उपयुक्तता*ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही ऑग्रेनिक तत्त्व असतात, त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो. निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा, त्वचा ग्लो करेल. नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लिझगसाठीही उपयुक्त ठरतात . कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने चेह-याला मसाज केल्यास त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत दिसायला लागते.गर्भधारणेनंतर - नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवडयातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे.*निरोगी हृदयसाठी -* हृदय हा शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी असणे फार महत्त्वाचे असते. नारळ खूप पौष्टिक घटक आहेत जाणे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात कि नारळाचेसेवन केले पाहिजे म्हणून.*केसांसाठी उपयुक्त* -पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते.*वजन घटण्यास उपयुक्त -* नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे हे फॅट्स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत. त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.*मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते*नारळामध्ये ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात . जे पौष्टिक तत्त्व तुमच्या मेंदूच्या सेल्य्सला सक्रिय करतात. त्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो. आणि स्मृती व बुद्धी तल्लख होते. आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*I. T. I. - Industrial Training Institute*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतीही काम केलेले अधिक बरे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातून *राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार* कोणाला जाहीर झाला आहे ?२) समुद्र तळाचा वेध घेण्यासाठी कोणती मोहीम राबवण्यात येणार आहे ?३) बहुजन समाज पक्षाच्या ( बसप ) राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची एकमताने फेरनिवड झाली ?४) 'नीच या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) WHO च्या माहितीनुसार नेपाळचे कोणते शहर हे पहिले 'निरोगी शहर' आणि आशियातील दुसरे 'आरोग्यदायी शहर' बनले आहे ? *उत्तरे :-* १) मंतैया बेडके, गडचिरोली व सागर बागडे, कोल्हापूर २) समुद्रयान ३) मायावती ४) तुच्छ, अधम, चांडाळ ५) धुलिखेल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजाराम राठोड, उपक्रमशील शिक्षक, नांदेड👤 किशोर तळोकार, साहित्यिक तथा शिक्षक, यवतमाळ👤 अनुजा देशमुख, साहित्यिक, नाशिक👤 प्रवीण इंगळे👤 शरद शेळकांडे👤 रवी भलगे👤 हणमंत भोसके👤 विठ्ठल पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥ एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ ही अनमोल असते. म्हणून वेळेचे महत्व जाणण्याचा प्रयत्न करावा. आपली माणसं सुखा, दुःखात साथ देत असतील तर कोणत्याही परिस्थितीत त्यांना विसरू नये. कारण परिस्थिती येते अन् निघून जाते पण, जी माणसं आपुलकीने साथ देऊन माणुसकी धर्म निभावून दाखवतात. पण, जेव्हा आपल्या विषयी सर्व काही कळल्यावर मात्र ते, स्वतः दु:खी होतात. जीवनात सर्व काही कमावता येते पण,आपुलकीचे माणसं एकदा दूर निघून गेले की, त्यांना परत आणता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पश्‍चाताप*मेहमूद नावाचा एक इराणी व्‍यापारी होता. एकदा त्‍याने मोठी पार्टी दिली. मध्‍यरात्रीपर्यंत खानपान चालू होते. या गर्दीत एक चोर हवेलीत येऊन लपला. मेहमूदने त्‍याला पाहिले होते. परंतु तो त्‍याला काहीच बोलला नाही. जेव्‍हा सगळे पाहुणे गेले तेव्‍हा त्‍याने नोकरास दोन व्‍यक्तिंचे जेवण लावण्‍याचे आदेश दिले. त्‍यानंतर लपून बसलेल्‍या चोराजवळ तो गेला. चोर घाबरला, मेहमूदने त्‍याला प्रेमाने जेवू घातले. त्‍यानंतर चोरी करण्‍याचा उद्देश विचारला. तेव्‍हा चोर म्‍हणाला, माझे नाव रमीझ आहे, मी श्रीमंत होतो पण दारूमुळे मी या अवस्‍थेत आलो आहे. मेहमूदने त्‍याला काही धन दिले आणि काही व्‍यवसाय चालू करण्‍याविषयी सुचविले. चोराने त्‍याचे म्‍हणणे ऐकले. दरम्‍यान काही वर्षे या गोष्‍टीला लोटली. एकदा तो मेहमूदकडे आला, मेहमूदने त्‍याला ओळखले नाही. चोर स्‍वत:च म्‍हणाला,तुम्‍ही चोरी सोडण्‍याविषयी सांगितल्‍यानंतर मी तुम्‍ही दिलेल्‍या पैशातून व्‍यापार सुरु केला. आज माझ्याकडे लाखोंची संपत्ती आहे. फक्त एक मेहरबानी करा. मी ज्‍यांच्‍याकडे चोरी त्‍यांचे पैसे परत करण्‍याची मला इच्‍छा आहे. त्‍यांचे पैसे परत केल्‍याने माझ्या मनावरील ओझे कमी होईल. मेहमूदने त्‍याला कोतवालाकडे नेले. कोतवाल त्‍याचे बोलणे ऐकून प्रभावित झाला. ज्‍यांच्‍याकडे त्‍याने चोरी केली होते त्‍यांची नुकसानभरपाई म्‍हणून दुपटीने पैसे दिले. लोकांनीही त्‍याला मोठ्या मनाने माफी दिली.*तात्‍पर्य :- केलेल्‍या वाईट कृत्‍यांचा पश्‍चाताप होणे ही मनुष्‍य असण्‍याची खूण होय.*वर्तमानपत्रातून संग्रहित•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - *तुझी जात कंची ?* https://www.facebook.com/share/p/zpmUgRkrUgcrGFGj/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_ या वर्षातील २४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांएवढी ऊर्जा निर्माण करुन ’हॉवर्ड-कुमेन-मायकेल्स’ हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठबागावर आदळला. सूर्याच्या पृष्ठभागावर धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.**१९७५: पहिले बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे भा.रा.भागवत यांच्या अध्यक्षतेखाली भरले**१९४५: दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातुन सुटका केली.**१८३५: अमेरिकेतील ह्युस्टन शहराची स्थापना झाली.**१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: गुररंजोत सिंग रंधावा-- भारतीय गायक, गीतकार आणि संगीतकार**१९७७: अनंत ढवळे -- गझलकार**१९७३: डॉ.कल्पना मनोहर नरांजे-- लेखिका**१९७०: प्रा.डॉ.मधुकर विठोबाजी नंदनवार- लेखक**१९६९: दिलीप सीताराम पाटील-- कवी* *१९६७: प्रा. डॉ. म .सु. पगारे -- विचारवंत, साहित्यिक, संशोधक**१९६५: विजयकुमार दळवी -- लेखक , पत्रकार**१९५८: दिलिप भाऊराव पाटील-- कवी, लेखक,अनुवादक* *१९५६: विजय सीताराम सोनारघरे -- लेखक* *१९५३:गौरी माहुलीकर -- संस्कृततज्ज्ञ, संशोधक, लेखिका**१९५३: अरविंद रामचंद्र बुधकर -- लेखक* *१९३७: शुभा खोटे-- मराठी अभिनेत्री* *१९३६: जमुना -- भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक आणि राजकारणी( मृत्यू: २७ जानेवारी २०२३ )* *१९३४: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (मृत्यू: ५ जुलै २००५ )**१९३०: दशरथ पुजारी – संगीतकार (मृत्यू: १३ एप्रिल २००८ )**१९३०: वॉरन बफे – अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर**१९२३: शंकरदास केसरीलाल ऊर्फ ’शैलेन्द्र’ – गीतकार (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६ )**१९१८: म. म. बाळशास्त्री हरदास -- लेखक, ज्ञानक्षेत्रातील भाष्यकार (मृत्यू: ११ऑगस्ट१९६७ )**१९१७: आत्माराम पांडुरंग नारायणगावकर --गायक व लेखक (मृत्यू: २३ ऑक्टोबर २००१ )**१९०४: नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण [१९६९](मृत्यू: ५ मे, १९८९ )**१९०३: भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार,कवी,एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार (मृत्यू: ५ आक्टॊबर १९८१ )**१८९८: अनंत सदाशिव आळतेकर -- प्राचीन भारतीय इतिहासाचे जागतिक कीर्तीचे संशोधक (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९५९ )**१८८३: जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ (मृत्यू: १८ एप्रिल १९६६ )**१८७१: अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ आक्टोबर १९३७ )**१८५०: काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक,न्यायमूर्ती, ्समाजसुधारक,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२),भगवद्‌गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला.(मृत्यू:१ सप्टेंबर १८९३ )**१५६९: जहांगीर – ४ था मुघल सम्राट (मृत्यू: २८ आक्टोबर १६२७ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव -- माजी सो सोव्हिएत संघाचा राष्ट्रप्रमुख(जन्म: २ मार्च १९३१ )**२०२१: सदाशिव साठे (भाऊ साठे)-- भारतीय शिल्पकार(जन्म: १७ मे १९२६ )**२०२१: वासुदेव जगन्नाथ परांजपे -- भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २१ नोव्हेंबर १९३८ )**२०१६: विनायक गजानन कानिटकर (ग्यानबा.रा.म.शास्त्री)-- मराठी विचारवंतलेखक (जन्म: २६ जानेवारी १९२६ )* *२००३: चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१ )**१९९८: नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९ )**१९९४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी,संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४ )**१९८५: न्या. राम केशव रानडे -- अध्यात्माचे अभ्यासक, होते,न्यायमूर्ती (जन्म: २२ फेब्रुवारी १९०८ )**१९८१: जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक (जन्म: ५ सप्टेंबर १९०७ )**१९४७: नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना ...‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे.(जन्म: १ जून १८७२ )**१९४०: सर जे. जे. थॉमसन –इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १८ डिसेंबर १८५६ )**१८७७: तरुलता दत्ता (जोतोरू दत्त) -- भारतीय बंगाली कवी आणि अनुवाद (जन्म: ४ मार्च१८५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुझी जात कंची ?*जात अशी आहे की, काही केल्या जात नाही. तिचेच नाव जात आहे............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात 5 दिवस पासपोर्ट सेवा पोर्टल राहणार बंद, 2 सप्टेंबरपर्यंत सुविधा बंद, तांत्रिक देखभालीमुळं निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, शिवरायांचा मजबूत, भक्कम आणि भव्य पुतळा पुन्हा उभारणार मुख्यमंत्र्यांचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण, फडणवीसांचे 113 आमदार पाडण्याचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सर्वांसाठी परवडणारी घरं बनवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द, म्हाडाची घरं 10 ते 15 लाखांनी स्वस्त !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिक-नगरकरांनी सोडला नि:श्वास ! जायकवाडी धरणानं ओलांडली 65 टक्क्यांची पातळी, समन्यायी पाणीवाटपाचा तेढ सुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई क्रिकेटच्या पंढरीत रमाकांत आचरेकरांचे स्मृतीशिल्प उभारण्यास मान्यता; सचिन तेंडुलकर भावूक, राज्य सरकारचे मानले आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••'झाले बहू... होतील बहू...' छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश असलेली मराठमोळी नावेछत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराजांच्या जीवनाचा प्रभाव हा प्रत्येकाच्या जीवनावर आहे. असं असताना ही परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, महाराज पुढच्या पिढीला कळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अशावेळी अनेकजण महाराजांच्या नावावरुन आपल्या मुलांची नावे ठेवू इच्छितात. अशा व्यक्तींसाठी महाराजांच्या नावातून निर्माण झालेली नवीन युनिक अशी नावे. यामध्ये महाराजांच्या नावावरुन मुलींची नावे आणि मुलांची नावे असे युनिक नावे सांगितले आहेत. शिवांश- 'शिव' आणि 'अंश' या नावातून शिवांश हे नाव तयार झालं आहे. या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा झळकते. राजशिव - राज म्हणजे राजा. शिव म्हणजे शिव शंकर. या दोघांच्या नावातून हे 'राजशिव' हे नाव तयार झालं आहे.वीरशिव - वीर असा या नावात उल्लेख आहे. वीर म्हणजे शूर आणि शिव म्हणजे शिव शंभो. छत्रपती शिवाजी महाराज हे शिव शंकराचे भक्त होते. त्यांच्याप्रमाणे विरता आणि शूरता तुमच्या बाळामध्ये असावी असा या नावाचा अर्थ आहे. शिवराज - शिवराज हे अतिशय मराठमोळ पारंपरिक नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाब या नावामध्ये पाहायला मिळतो. शिवांग - शिवाचा अंग असा तो शिवांग. शिवाजी महाराजांसोबत असलेले डिवाइन कनेक्शनयामध्ये पाहायला मिळतं. राजमुद्रा - राजमुद्रा हे नाव महाराजांच्या जीवनाशी जोडलेले असे आहे. मुद्रा, शिवाजी महाराजांच्या काळातील एक शिक्कामोर्तब. शिवेंद्र - शिव आणि इंद्र असा याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत हे नाव मुलासाठी निवडा. राजयश - राज्य हे छत्रपतींच्या काळातील म्हणजे खऱ्या अर्थाने गोकुळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नियम असा या नावाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणखी काही नावे मुलांसाठीशिवाजी, स्वराज, शिवांश, शिवबा, शिवांक, शिवेंद्र, शिवम, शिवतेज, शिवशंकर, शिवानंद, शिवजित, शिवराज, शिवाक्ष, शिवशंभू, शिवार्थ, शिवंकरछत्रपती शिवाजी महाराजांची मुलींसाठी नावे हिंदवी, शिवश्री, शिवानी, शिवांजली, शिवांगी, शिवजा, शिवन्या, शिविका*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शाळेची बस ही पिवळ्या रंगाचीच का असते ?२) जगातील सर्वात वयोवृद्ध महिला कोण ?३) कोणत्या देशाने 'राईट टू डिस्कनेक्ट कायदा' पास केला आहे ?४) 'निर्जन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ICC चे अध्यक्ष म्हणून बिनविरोध कोणाची निवड झाली आहे ? *उत्तरे :-* १) सावधानतेचा इशारा, मोटार वाहन नियम १९७८ च्या नियम १७८ नुसार, आनंद व उत्साहाचा प्रतीक २) तोमिको इतुका ( जपान, ११६ वर्ष ९९ दिवस ) ३) ऑस्ट्रेलिया ४) ओसाड ५) जय शाह, भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नागभूषण मॅकावाड, येवती👤 दिलीप झरेकर, शिरूर👤 माधुरी हतनुरे, धर्माबाद👤 नीरज नागभूषण दुर्गम, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना एकटे पडल्यावर जास्त दु:खी होऊ नये. कारण शेवटपर्यंत कोणीच, कोणाचे आधार नसतात. भलेही आपल्यापाशी सर्व काही असेल तरी वेळ प्रसंगी कामी पडत नाही म्हणून आपले काहीच नसते. मनुष्य प्राण्याचे जीवन मिळाले यातच सर्व काही बघण्याचा प्रयत्न करावा. कधी काळी सांगता येत नाही त्या केलेल्या प्रयत्नामुळे कधी नं संपणारी संपत्ती सुद्धा मिळू शकते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी*नैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती.तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/gyK8N8cAfV5fgtUp/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_राष्ट्रीय क्रीडा दिन_* 🟤••••••••••••••••••••••••••••••🟤 *_ या वर्षातील २४२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९७४: चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.**१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.**१९१८: लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.**१८३३: युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.**१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.**१८२५: पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१४९८: वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: प्रा.ऋषिकेश ऊर्फ गणेश नंदकुमार खारगे -- कवी**१९८२: डॉ. मिलिंद भिवाजी कांबळे -- कथा, कादंबरी व समीक्षण करणारे मराठी लेखक**१९७४: नेताजी रामदास सोयाम -- कवी* *१९७४: रिचा शर्मा-- भारतीय पार्श्वगायिका तसेच भक्ती गायिका**१९७०: डॉ. श्रीराम यशवंत गडेकर -- प्रसिद्ध लेखक, समीक्षक* *१९६९: कल्याणी विजय मादेशवार-- कवयित्री, लेखिका* *१९६६: अनंत वासुदेव माळवे -- लेखक, कवी* *१९६०: संजय वासुदेव कठाळे -- लेखक* *१९५९: अक्किनेनी नागार्जुन उर्फ नागार्जुन -- भारतीय दक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता* *१९५८: मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (मृत्यू: २५ जून २००९ )**१९५७: मकरंद साठे-- मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक**१९५४: शिरीष पुरुषोत्तम मोराणकर -- कवी, लेखक**१९५३: वासुदेव वामन बापट -- धार्मिक विषयांवर लेखन करणारे मराठी लेखक (मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१५)**१९५०: लीना चन्दावरकर - हिन्दी चित्रपटातील अभिनेत्री**१९४७: शोभा अनिल भागवत -- बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका संचालिका, गरवारे बालभवन**१९४४: डॉ. मृणालिनी भालचंद्र फडनाईक -- कथाकार, कवयित्री, लेखिका**१९२९: गो. मा. पुरंदरे -- कादंबरीकार* *१९२३:रिचर्ड अ‍ॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते**१९१५: इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२ )**१९०५: मेजर ध्यानचंद – प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९ )**१९०१: पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)**१८८०: लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे-विदर्भातील सामाजिक, राजकीय, संस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व (मृत्यू: २६ जानेवारी १९६८ )* *१८६३: गिदुगु वेंकट रामामूर्ती -- तेलुगू लेखक आणि ब्रिटिश राजवटीत सर्वात प्राचीन प्राचीन तेलुगू भाषा आणि सामाजिक द्रष्टे होते. रामा मूर्ती यांचा जन्मदिवस "तेलगू दिवस" म्हणून साजरा केला जातो ( मृत्यू: २२ जानेवारी १९४० )*🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: जयंत पवार-- पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (जन्म: २२ फेब्रुवारी १९६० )* *२००८: जयश्री गडकर – अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२ )**२००७: बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७ )**२०००: विजया साने -- बालसाहित्यिक, लेखिका (जन्म: ५ ऑक्टोबर १९२३ )* *१९८६: गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १५ जून १८९८ )**१९७६: काझी नझरुल इस्लाम –  स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी.  (जन्म: २५ मे १८९९ )**१९७५: इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष  (जन्म: १४ आक्टोबर १८८२ )**१९६९: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (जन्म: २० ऑक्टोबर  १९१६ )**१९०६: बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक, ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: मे १८३१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सोशल मीडिया आणि आधार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रधानमंत्री जनधन योजना यशस्वी अंमलबजावणीला एक दशक पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वाहनांच्या गर्दीने सीईओंवर पायी चालण्याची वेळ, हिंगोली जिल्हा परिषदेत वाहने उभी करण्यापासून शिस्तीला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारताच्या आर्थिक विकासात स्टार्टअप्सचे भरीव योगदान, आनंद गानू पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि गर्जे मराठी ग्लोबल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, महाराष्ट्रातील दिघीसह देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा, ऑल इंडिया सोनार फेडरेशनची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य सरकारच्या विरोधात मविआचं 01 सप्टेंबर पासून आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, 14 सप्टेंबर ला पाकिस्तानशी होणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आहार कसा असावा ?*शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे. आहाराचे प्रमाण, प्रकार, वेळा इत्यादींवर आरोग्य ब-याच अंशी अवलंबून असते. तिखट मसालेदार पदार्थ जेवणात कमी प्रमाणात असावेत. हॉटेलमध्ये खाणे शक्यतो टाळावे. पचायला साधा हलका ताजा आहार, भूक असेल तेव्हाच जेवणे, थोडी भूक ठेवून खाणे हे साधे नियम आहेत.आयुर्वेदाप्रमाणे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा सहा चवींचे पदार्थ असतात. या प्रत्येक चवीचा आपल्या खाण्यात समावेश असावा. एकाच चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचाही त्रास होण्याची शक्यता असते.आहार पचण्याची एक चांगली खूण म्हणजे शौचास घाण वास न येणे. तसेच जेवणानंतर सात-आठ तासानंतरही खाल्लेल्या पदार्थाचा वास ढेकरांतून येणे ही अपचनाची खूण आहे.ऋतुमानाप्रमाणे आहारात बदल व्हावेत. पावसाळयात, उन्हाळयात भूक मंद असते म्हणून पचायला हलका, कमी आहार घेणे आवश्यक ठरते. याउलट हिवाळयात जड पदार्थही चांगले पचतात. चातुर्मासाची कल्पना यादृष्टीने योग्य आहे. आहारात त्या त्या ऋतूतले पदार्थ (ताजे) घेणे पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.आहाराचा विचार करताना जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ हे कनिष्ठ असतात हे लक्षात ठेवावे. उदा. त-हेत-हेच्या मिठाईपेक्षा साधे ताजे दूध आहारशास्त्राच्या दृष्टीने चांगले असते.स्निग्ध पदार्थांमध्ये वनस्पती तूप (सर्व प्रकारचे) हे तर अपायकारक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने मात्र गावठी तूप (गाईचे साजूक) आहारात असणे आवश्यक आहे. ‘पुफा’ गटातली तेले चांगली.प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट पदार्थ कमी अधिक सोसतो. या अनुभवावरून प्रत्येकाने आपल्या आहाराचे नियोजन केले पाहिजे. आयुर्वेदातला आहार विचार यासाठी मार्गदर्शक आहे.आहारासंबंधी आणखी एक नियम म्हणजे उपवास. निदान तिशीनंतर आठवडयातून एक दिवस पूर्णवेळ किंवा एकवेळ उपास करणे आवश्यक आहे. पचनसंस्थेच्या आणि इतर एकंदर आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. जैन धर्मियांकडून उपासांचे शास्त्र शिकण्यासारखे आहे. निरनिराळया खिचडया व पदार्थ खाऊन केलेला उपास म्हणजे केवळ रूचिपालट असतो, उपवास नाही. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *एग्नेस गोक्झा बोजाक्झिऊ* हे नाव असणाऱ्या व्यक्तीस आपण कोणत्या नावाने ओळखतो ?२) युक्रेनला कोणत्या देशाद्वारे मानवतावादी मदत म्हणून 04BHIMA CUBE देण्यात आले ?३) केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?४) 'नारळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ मध्ये कोणता ग्लोबल फूड ब्रँड रँकिंगमध्ये जगातील सर्वात मजबूत अन्न आणि दुग्धजन्य ब्रँड ठरला ? *उत्तरे :-* १) मदर तेरेसा २) भारत ३) महाराष्ट्र ४) श्रीफळ, नारिकेल ५) AMUL*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सौ. योगिता रामानंद रामदिनवार, नांदेड👤 रवी शिंदे, इंग्रजी विषय तज्ञ, कुंडलवाडी👤 रवींद्र केंचे, क्रियाशील शिक्षक, अहमदनगर👤 गणेश येडमे👤 शिवराज पाटील चोळाखेकर, अ. भा. छावा तालुकाध्यक्ष, धर्माबाद👤 सचिन बावणे👤 ईश्वर शेटीये, ब्रह्मपुरी, चंद्रपूर👤 गणेश राऊत👤 विनायक कुंटेवाड👤 अनिरुद्ध खांडरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं |4| ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असे बरेचजण म्हणत असतात. हा एक समाजसंकेत आहे. पण त्याच वेळेला आपण आपल्याच घरातील माणूस आजारी असताना त्याची का बरं काळजी घेत नाही. ..? हा एक प्रश्नच आहे. एकदा तो माणूस बरा झाल्यावर मात्र वेळात, वेळ काढून दिखावूपणा करुन काळजी घेण्यात काय अर्थ...? म्हणून काळजी करायची असेल किंवा सेवा करायची असेल तर आपल्या मनात आपुलकी व त्या माणसासाठी वेळ असणे आवश्यक आहे आणि आज ती अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धर्मएकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्‍ठ धर्माचे महत्‍व समजावून सांगेल त्‍याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्‍वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्‍या धर्माचे महत्‍व समजावून सांगण्‍यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्‍ट आठवणीने करत होते की स्‍वत:च्‍या धर्माचे महत्‍व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्‍या धर्माची निंदानालस्‍ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्‍ठ आहे व त्‍यामुळे तो दु:खी होत होता. पण त्‍याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्‍या दर्शनास गेला. तेथे गेल्‍यावर त्‍याने साधूला नमस्‍कार केला व म्‍हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्‍ठ धर्माच्‍या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्‍ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,''सर्वश्रेष्‍ठ धर्म तर जगात अस्तित्‍वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्‍या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्‍यक्ती निष्‍पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्‍हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्‍यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्‍या. साधू राजाला म्‍हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्‍ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्‍येक नावेपाशी जाताच साधू त्‍या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्‍हटले,''महाराज आपल्‍याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्‍याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्‍हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्‍याला स्‍वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्‍याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्‍यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 ऑगस्ट 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/t5Uhv2YGSPqxqKn9/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟡 *_ या वर्षातील २४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡•••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.**१९३७: ’टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली.**१९३१: फ्रान्स आणि सोविएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.**१९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१८४५: ’सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.* 🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟡•••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: सौमेन नंदी -- प्रसिद्ध तबला वादक**१९८४: मिलिंद परसराम कंधारे-- कवी, लेखक**१९८३: सेपरमाडू लसिथ मलिंगा -- श्रीलंकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू**१९८१: प्रा. डॉ. गणपतराव रामदास ढेंबरे -- लेखक**१९७७: शिल्पा शिंदे -- हिंदी अभिनय क्षेत्रात काम करणारी मराठी अभिनेत्री* *१९७५: लता सभरवाल -- भारतीय फ़िल्म तथा टेलीविज़न अभिनेत्री* *१९७५: अभय अरुण इनामदार-- लेखक**१९७३: संतोष शामराव देसाई लेखक -- व्याख्याते**१९७०: आनंदराव रामचंद्र पवार -- लेखक**१९६८: सुधाकर वासुदेव इनामदार -- कवी, गदिमा व गाडगेबाबा यांचे वरील पोवाडे लेखन व सादरीकरण* *१९६५: संजय नारायण चौधरी -- प्रसिद्ध कवी* *१९६३: प्रा.पी.जी. भामोदे -- प्रसिद्ध लेखक, कवी, प्रतिज्ञाकार, नाटककार,वक्ते**१९६१: दीपक तिजोरी -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता* *१९५७: अनंत जोग --भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता* *१९५५: जीवन केशवराव राजकारणे -- कवी**१९५२: गौरी सुभाष गाडेकर -- प्रसिद्ध लेखिका* *१९५२: प्रमोद मनोहर कोपर्डे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५१: स्वाती शशिकांत सुरंगळीकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९४८: बाळकृष्ण कुडे -- कवी, लेखक**१९४८: जयदेव सुब्बराव हट्टंगडी -- मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक (मृत्यू: ५ डिसेंबर २००८ )**१९४१: डॉ.श्रावण किसनजी उके -- लेखक**१९३४: सुजाता मनोहर – सर्वोच्‍च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा**१९२८: उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (मृत्यू: १३ मार्च २००४ )**१९१८: राम कदम – संगीतकार (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७ )**१९१०: गोगिया पाशा --- महान जादूगर व अभिनेते (मृत्यू: १९७६ )**१९०८: विनायक माधव तथा ’विमादी’ पटवर्धन दीक्षित – विनोदकार**१९०६: नटवर्य चिंतामणी गोविंद तथा ’मामा’ पेंडसे (मृत्यू: १९९१ )**१९०३: उमाकांत केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व लेखक (मृत्यू: २६ जुलै १९७२ )**१८९६: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी– ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: ३ मार्च १९८२ )**१८९३: रघुनाथ दामोदर करमरकर -- लेखक, व्याख्याते, संशोधक (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६५ )**१८७१: श्रीधर विष्णू परांजपे -- टीकाकार, चरित्रकार व समीक्षक (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९५४ )**१७४९: योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी (मृत्यू: २२ मार्च १८३२ )* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: राॅबी डिसिल्वा -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार ( जन्म: १२ फेब्रुवारी १९३०)**२०२०: कविता विश्वनाथ नरवणे -- जेष्ठ लेखिका (जन्म: १२ मार्च १९३३ )* *२०१०: डॉ.सुहासिनी यशवंत इर्लेकर -- कवयित्री,लेखिका,संत साहित्याच्या अभ्यासक(जन्म: १७ फेब्रुवारी १९३२ )* *२००१: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – सुप्रसिद्ध लेखक,चित्रकार,पटकथाकार,शिकारी (जन्म: ६ जुलै १९२७ )**१९६९: रावसाहेब पटवर्धन -- स्वातंत्र्य लढ्यातील झुंजार नेते थोर विचारवंत (जन्म: १५ जुलै १९०३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी सिनेमा काल आज आणि उद्या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला असून मुंबईमध्ये १५ केंद्रांवर असे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काय योग्य व काय अयोग्य याची शिकवण मुलांना देण्याची गरज असल्याचे उच्च न्यायालयाने केले मत व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रवनीत सिंह बिट्टू व जॉर्ज कुरियन यांची राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नायगाव - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, 'राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला राज्याचे गृहमंत्री जबाबदार'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे पुण्यात निधन, सिंघम त्यांचा शेवटचा चित्रपट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा, जय शाह यांची ICC चे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात ?*शाळेत विद्यार्थ्यांना नेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी आलेल्या या बसचा रंग पिवळाच असतो, हे तुम्ही पाहिलं असेलच. मात्र, शाळेची बस पिवळीच का असते, असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? आज ते जाणून घेऊ.रस्त्यावरुन पिवळ्या रंगाचे वाहन जात असल्यास ते दुरूनही तुमच्या डोळ्यांना दिसते, कमी सूर्यप्रकाशातही आणि उजेडातही हा रंग लवकर डोळ्यांना दिसतो. त्यातून ही बस स्कूल बस असल्याचे सहजच लक्षात येते.पिवळा रंग हा एक इशाराही देतो, रस्त्यावरुन धावणाऱ्या इतर वाहनधारकांना हा रंग सावधानतेचा इशारा देतो. एक शाळेची बस समोरुन किंवा पाठिमागून येत आहे, असा संकेत इतर वाहनांना मिळतो. त्यामुळे, काळजी घेतली पाहिजे हे त्यांच्या लक्षात येते.तसेच, पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचा प्रतिक मानला जातो. लहान शाळकरी मुलांसाठी त्यांची बस ही आनंदाची सफारी असते, त्यांच्या मित्रांसह ही बस त्यांना शाळेत घेऊन जाते. म्हणून हा रंग पिवळा असतो.मोटार वाहन नियम, 1978 च्या नियम 178 नुसार शैक्षणिक संस्थेच्या नावाने नोंदणी केलेली सर्व वाहने हायवे पिवळ्या रंगात रंगविली जावीत आणि “स्कूल बस” किंवा “कॉलेज बस” हे शब्द गडद रंगात लिहिलेले असावेत.शाळेच्या बसमधून जाणाऱ्यां विद्यार्थ्यांसाठी आपली बस खास असते. या बसमधून शाळेची सफर करताना त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच आनंद दिसतो.ही माहिती तुम्हाला कशी वाटली संयोजकांना नक्की कळवा*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आळसाला आजचा दिवस दिला की तो उद्याचा दिवस चोरतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अंतराळात जाणारे एकमेव भारतीय अंतराळवीर कोण ?२) भारताने आतापर्यंत किती जणांना अंतराळात पाठविले ?३) जगात अंतराळवीरांना सर्वाधिक अंतराळात पाठविणारा देश कोणता ?४) अमेरिकेने आतापर्यंत किती जणांना अंतराळात पाठविले ?५) 'भारताचे ७५ महान क्रांतिकारक' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? *उत्तरे :-* १) राकेश शर्मा २) एक ३) अमेरिका ४) ३७९ अंतराळवीर ५) भीम सिंह*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संजय बंटी पाटील, अध्यक्ष, शिवा संघटना, धर्माबाद👤 अशोक मामीडवार, उमरी👤 रवी राजमाने, साहित्यिक, सांगली👤 चिं. अव्युक्त अभिजित लखमावाड, धर्माबाद👤 तिरुपती अंगरोड, धर्माबाद👤 आनंद आवरे👤 साईनाथ गोणारकर👤 गणेश घुले👤 सुनिता महाडिक, मुंबई👤 विजय दिंडे👤 D. S. P. पाटील👤 खेमशेट्टी लक्ष्मण*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं ।।४।। ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांचा अपमान करून आपल्याला आनंद मिळत असेल तर येणाऱ्या प्रत्येक वेळ,प्रसंगाशी जुळून रहावे व आलेल्या त्या वेळ, प्रसंगाचे त्याचप्रमाणे आनंदीत होऊन स्वागत करण्याची तयारी ठेवावी. कारण वेळ, प्रसंग प्रत्येकांवरच एक ना एक दिवस येत असतो. वेळ, प्रसंगाला कोणतेही आमत्रंण देण्यासाठी मुहूर्त बघावे लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎀 *कोल्हा व लांडगा* 🎀*एक कोल्हा एकदा एका लांडग्याला* म्हणाला, 'मित्रा माझी स्थिती किती वाईट आहे याची तुला कल्पना नाही. एखादा म्हातारा कोंबडा किंवा मरायला टेकलेली अशक्त कोंबडी यांच्या मांसावर मला उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळे मी अगदी कंटाळल्यासारखा झालो आहे. शिवाय भक्ष्य मिळवताना आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग तुला क्वचित येत असेल. मला भक्ष्याच्या शोधासाठी गावठाणात लपतछपत फिरावं लागतं. तुझं तसं नाही. तू आपलं भक्ष्य रानात; कुरणात मिळवू शकतोस. ही तुझी विद्या मला शिकवशील तर बरं होईल. तुझ्या हाताखाली शिक्षणासाठी राहिल्याने कोल्ह्याच्या वंशात जन्म घेऊन पहिल्याने मेंढी मारून खाण्याचा मान मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. तू मला शिकवलंस तर आपले श्रम फुकट गेले असं म्हणायची वेळ तुझ्यावर नक्कीच येणार नाही.'           लांडगा म्हणाला, 'ठीक आहे, मी प्रयत्‍न करून पाहतो. प्रथम तू पलिकडच्या शेतात माझा भाऊ मरून पडला आहे त्याच कातडं पांघरून ये.' तसं करताच लांडग्याने त्याला निरनिराळे धडे शिकवले. गुरगुरणे, चावणे, लढाई करणे, मेंढ्याच्या कळपावर तुटून पडणे, एखादी मेंढी उचलून नेणे या गोष्टीचे शिक्षण कोल्ह्याला दिले.          सुरुवातीला हे सगळे कोल्ह्याला लवकर जमेना. पण तो मुळातच हुषार असल्याने ते सगले तो लवकरच व्यवस्थित करू लागला. त्याची हुशारी पाहून लांडग्याला आश्चर्य वाटले, शेवटी एक मोठा मेंढ्यांचा कळप कोल्ह्याला दिसताच त्याच्यावर तुटून पडून एका क्षणात त्याने मेंढ्या, धनगर व त्याचे कुत्रे यांची अगदी दाणादाण उडवून दिली. त्याने एक मोठी मेंढी आपल्या तोंडात धरली व तिला मारणार तोच शेजारच्या शेतातून कोंबड्याचा आवाज ऐकू आला. तो ओळखीचा आवाज ऐकताच आपल्या नव्या वेषाचे त्याला भान राहिले नाही व त्याने ते लांडग्याचे कातडे फेकून दिले व गुरूचा निरोपही न घेता तो तडक त्या कोंबड्याकडे धावला.〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰🎀 *तात्पर्य : - मूळचा स्वभाव कितीही शिक्षण झाले तरी जात नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wK9wi8xQmNRHAZUH/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 *_ या वर्षातील २४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: युरोपिअन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया व लिथुआनियाच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.**१९९१: मोल्डोव्हाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९६६: नाट्यसंपदा निर्मित,वसंत कानेटकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा पहिला प्रयोग गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे झाला.**१९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.**१९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन यांनी शोध लावलेल्या Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: नेहा धुपिया -- भारतीय अभिनेत्री**१९७६: अभिजीत आप्पासाहेब पाटील-- प्रसिद्ध कवी**१९७५: अनंत हनुमंत धनसरे -- कवी लेखक**१९७२: दिलीप सिंह राणा( 'द ग्रेट खली' ) -- भारतीय व्यवसायिक कुस्ती लढणारे, २००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ईत ते वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन बनले* *१९६८: नितीन वैद्य -- लेखक संपादक**१९६७: सुजाता गुंडूराव शिंदे -- कवयित्री* *१९६६: भोजराज रतीराम लांजेवार - कवी* *१९५६: सुनिता अरळीकर -- प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका* *१९४४: नीलकंठ चिरकुटराव चव्हाण -- कवी, लेखक**१९३९: मीना प्रभू -- कवयित्री, ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार**१९३५: श्रीरंग विष्णू जोशी -- मराठी लघु कथालेखक व कवी* *१९३०: डॉ. बद्रीनारायण रामुलाल बारवाले-- भारतीय संशोधक, उद्योजक (मृत्यू: २४ जुलै २०१७ )* *१९२५: नारायण धारप – लेखक, नाटककार रहस्यकथाकार (मृत्यू: १८ ऑगस्ट २००८ )**१९२५: वसंत केशव दावतर -- लेखक समीक्षक (मृत्यू,:१८ मार्च २००४ )**१९१९: विनायक रा. करंदीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: १५ एप्रिल २०१३ )**१९१०: सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, कार्यक्षम मुलकी अधिकारी, ’गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. 'जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू: १४ आक्टोबर १९९४ )**१९०९: नानासाहेब(ना.तु.) ठाकूर - कवी* *१९०८: सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना 'सर’ हा किताब देण्यात आला. (मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१ )**१९०८: लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ जानेवारी १९७३ )**१८९९: रमाकांत पंढरीनाथ कंगले -- अनुवादक, विश्लेेषक, लेखक(मृत्यू: २७ जून १९८९ )**१८५९: सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी (मृत्यू: ३ जून १९३२ )**१८५४: गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी,'वर्‍हाडचे नबाब’ (मृत्यू: १ जुलै १९३८ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९: कुसुम गोपीनाथ शेंडे -- किराणा घराण्याच्या गायिका व नाट्यअभिनेत्री ( जन्म: १२ डिसेंबर १९२९ )* *२००६: हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: ३० सप्टेंबर १९२२ )**२०००: मनोरमा वागळे – रंगभूमी, चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका केलेक्या अभिनेत्री (जन्म: १९२८ )**१९९८: दादासाहेब पोतनीस( दतात्रेय शंकर पोतनीस) -- स्वतंत्र सेनानी 'गावकरी' या मराठी भाषिक वृत्तपत्राचे संपादक ,पत्रकार (जन्म: २२ नोव्हेंबर १९०९ )**१९७९: लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (जन्म: २५ जून १९०० )**१९७६: मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. (जन्म: २२ जुलै १९२३ )**१९५५: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार,१९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या 'महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित (जन्म: १६ ऑगस्ट १८७९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फेसबुक आणि व्हाट्सअप्प ची स्थिती म्हणजे*एक ना धड भाराभर चिंध्या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लडाख या केंद्रशासित प्रदेशात 5 नव्या जिल्ह्याची स्थापन करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जम्मू काश्मीरमध्ये भाजपकडून आधी 44 उमेदवार जाहीर, मग तासाभरात उमेदवार यादी रद्द, नव्याने 15 उमेदवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधानसभेला महायुतीचा प्रमुख चेहरा एकनाथ शिंदे, पण मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरणार, अशोक चव्हाणांचं महत्त्वाचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गणपतीपूर्वी गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, खड्डे बुजवण्यासाठी हार्डनरच्या वापराचं प्रात्याक्षिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सिंधुदुर्ग किल्ल्यावर वर्षभरापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, ते 71 वर्षाचे होते. आज नायगाव येथे शासकीय पद्धतीने होणार अंतीम संस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यातील सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक पॅनिक बटण बसवणार - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोपाळकाला*दहीहंडीचे महत्त्व*दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते. मुंबईत गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात. अनेक मंडळे अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात. या उत्सवात सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात आणि अनेक मोठी मंडळी या उपक्रमात सहभागी होत तरूणांना प्रोत्साहन देत उत्साह वाढवतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत म्हणून ते मनात येताच कृती करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेसाठी कोणती संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे ?२) भारतात किती ठिकाणी नोटांची छपाई केली जाते ?३) "गब्बर" या टोपण नावाने कोणता भारतीय क्रिकेटपटू परिचित आहे ?४) 'चौफेर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भगवान श्री कृष्ण यांचे आई - वडिलांचे नांव सांगा ?*उत्तरे :-* १) एक पेड मेरी माँ के नाम २) चार - महाराष्ट्रात नाशिक, मध्यप्रदेशात देवास, कर्नाटकात म्हैसूर, पश्चिम बंगालमध्ये सालबोनी ३) शिखर धवन ४) चहूकडे, सर्वत्र, भोवताली ५) देवकी - वसुदेव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नागभूषण दुर्गम, शिक्षक नेते, नांदेड👤 दत्तप्रसाद सुरुकुटवार, नांदेड👤 ज्योती आळंदकर, लातूर👤 अतुल वैद्य, पेण, रायगड👤 प्रशांत रुईकर, लातूर👤 दिगंबर सोळंके👤 विकास गायकवाड, नांदेड👤 विश्वनाथ आडेराव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असे बरेचजण म्हणत असतात. हा एक समाजसंकेत आहे. पण त्याच वेळेला आपण आपल्याच घरातील माणूस आजारी असताना त्याची का बरं काळजी घेत नाही. ..? हा एक प्रश्नच आहे. एकदा तो माणूस बरा झाल्यावर मात्र वेळात, वेळ काढून दिखावूपणा करुन काळजी घेण्यात काय अर्थ...? म्हणून काळजी करायची असेल किंवा सेवा करायची असेल तर आपल्या मनात आपुलकी व त्या माणसासाठी वेळ असणे आवश्यक आहे आणि आज ती अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वडिलांना मदत*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/p3EbER57WmGFfmD9/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔶🔶 *_श्रीकृष्ण जन्माष्टमी_* 🔶🔶 •••••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_आंतरराष्ट्रीय श्वान दिन_*🌸•••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_महिला समानता दिवस_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_ या वर्षातील २३९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.**१९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर**१९७२: पश्चिम जर्मनीतील म्युनिच येथे २० व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४४: दुसरे महायुद्ध - चार्ल्स द गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.**१८८३: डच इंडीज (सध्याचे इंडोनेशिया) बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३५ गावे भस्मसात होऊन सुमारे ३६,००० लोकांचा बळी गेला.**१७६८: कॅप्टन जेम्स कूक एच.एम.एस. एन्डेव्हर या जहाजातुन आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.**१४९८: मायकेल अँजेलो याने ’पिएटा’ या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.* 🌸 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: इशिता दत्ता शेठ -- अभिनेत्री**१९८२: नचिकेत सतीश क्षीरे -- लेखक**१९७९: सोनाली नवांगुळ -- प्रसिद्ध लेखिका,मूळ तामिळ लेखिका सलमा यांची कादंबरी ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावांनी मराठीत अनुवादित केली.अनुवादित कादंबरीला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार**१९७७: दिनेश कृष्णाजी चव्हाण -- कवी**१९७६: प्रा. निर्मला रणजित शेवाळे -- कवयित्री, लेखिका**१९७५: अंजली धानोरकर -- उपजिल्हाधिकारी तथा प्रसिद्ध लेखिका**१९७३: इंदर कुमार. -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २८ जुलै २०१७ )**१९७१: अनिता पिरन खैरनार - कवयित्री**१९७१: राजेश मनोहरराव चौधरी -- कवी**१९६८: मधुर भांडारकर -- भारतीय चित्रपटदिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक**१९६६: संगिता सुहास अरबुने -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका**१९६५: प्रा. भगवंत केशव शोभणे -- कवी, लेखक* *१९६२: विलास कृष्णाजी नाईक -- मराठी साहित्यिक**१९५६: प्रकाश गव्हाणे -- प्रसिद्ध कवी तथा लेखक**१९५६: मनेका गांधी -- माजी केंद्रीय मंत्री**१९५५: पुरुषोत्तम बोरकर -- कादंबरीकार* *१९५५: प्रा. लक्ष्मण काशिनाथराव मोहरीर -- लेखक, व्याख्याते* *१९५५: डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर -- नेत्रतज्ज्ञ तथा लेखिका**१९५२: छाया विजय नाईक -- लेखिका, संपादिका* *१९४८: अरुण यशवंत ताम्हणकर -- कादंबरीकार* *१९४८: डॉ.आशा अरविंद सावदेकर -- ज्येष्ठ समीक्षक, कादंबरीकार (मृत्यू: २२ एप्रिल २०२१ )* *१९४४: अनिल अवचट – लेखक,सामाजिक कार्यकर्ते, चित्रकार आणि पत्रकार (मृत्यू: २७ जानेवारी २०२२ )**१९३९: ताराचंद खांडेकर -- प्रसिद्ध विचारवंत,समीक्षक**१९२८: नारायण हरी पालकर -- चरित्रकार (मृत्यू: १ मार्च १९७६ )**१९२७: बालकृष्ण विठ्ठलदास दोशी -- भारतीय वास्तुविशारद (मृत्यू: २४ जानेवारी २०२३ )**१९२६: प्राचार्य दिनकर विष्णू जोशी -- कादंबरीकार, कथाकार* *१९२२: ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. (मृत्यू: २९ मे २०१० )**_१९१०: मदर तेरेसा – भारतरत्‍न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७ )_**१७४३: अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक (मृत्यू: ८ मे १७९४ )* 🌸 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌸 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: देव कोहली -- भारतीय हिंदुस्थानीकवी आणि गीतकार (जन्म: २ नोव्हेंबर १९४२)* *२०१२: ए. के. हंगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १ फेब्रुवारी १९१७ )**२००१: आनंद चिंतामणी दिघे -- शिवसेना पक्षाचे नेते (जन्म: २७ जानेवारी १९५१ )**२०००: मनोरमा वागळे - मराठी चित्रपटांतील अभिनेत्री (जन्म: ३०ऑगस्ट१९२८ )**१९७४: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२ )**१९४८:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, 'नवाकाळ’चे संस्थापक (जन्म:२५ नोव्हेंबर १८७२)**१७२३: अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २४ आक्टोबर १६३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये ; मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जळगाव येथील  लखपती दीदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परखड भाष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नेपाळमधील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना  5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग सुरू; भिडे पूल पाण्याखाली, पुलाची वाडी परिसरात घरांमध्ये शिरलं पाणी, सतर्कतेच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : यंदाही गणेशोत्सवासाठी धावणार ‘मोदी एक्सप्रेस’ ; चाकरमान्यांचा होणार मोफत प्रवास !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची दिली हमी, यासाठी मोदी सरकारने एकीकृत निवृत्ती वेतन योजना केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आदीपुरुष चित्रपटातील शबरीची भूमिका केलेल्या आशा शर्मा यांचे वयाच्या 88 व्या वर्षी झाले निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रावळपिंडीच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानची हार, बांगलादेशचा मोठा विजय, दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कृष्ण जन्माष्टमी*श्रीकृष्ण जयंती आणि गोकुळाष्टमी यासह विविध नावांनी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. गुजरातमध्ये याला सतम अठम (Satam Atham) असं संबोधले जाते, तर दक्षिण भारतात, विशेषत: केरळमध्ये या सणाला अष्टमी रोहिणी असं म्हणतात. भारतात आणि जगभरातील हिंदूंद्वारे जन्माष्टमी उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते.मथुरा, उत्तर प्रदेशातील वृंदावनभगवान कृष्णाचे जन्मस्थान मथुरेला जन्माष्टमीच्या वेळी विशेष महत्त्व आहे, कारण यादिवशी कृष्णभक्त दिवसभर उपवास करतात, मध्यरात्रीपर्यंत जागरण करतात, जे कृष्णाच्या जन्माचे प्रतीक असल्याचे मानलं जातं. मध्यरात्रीची पूजा ही एक खास गोष्ट आहे, ज्या दरम्यान कृष्णाच्या मूर्तीला विधीपूर्वक स्नान करून नवीन कपडे घातले जातात. मथुरेतील लोकं कृष्णाच्या जन्माची कथा दर्शविणारी पालखी तयार करतात, ज्याला झांकी असेही म्हणतात. कृष्णाच्या जीवनामधील आणखी एक महत्त्वाचे स्थान वृंदावन, कृष्णाच्या बालपणाचं आणि किशोरवयीन वर्षांशी आणि त्यांच्या प्रसिद्ध रास लीलांशी संबंधित आहे. जवळपास १० दिवस अगोदर वृंदावनात जन्माष्टमीचा उत्सव सुरू होतो. ज्या दिवशी कृष्णाचे जीवन रास लीलांद्वारे, झांकीस अभिषेकसह पुन्हा निर्माण केले जाते, त्या दिवशी कृष्णाचे भव्य विधीवत स्नान केले जाते.तसेच पुणे, मुंबई आणि उत्तरप्रदेश च्या गोकुळ मध्ये ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या देशाने *सोफिया* या पहिल्या यंत्रमानवास नागरिकत्व बहाल केले ?२) भारतातील पहिले डिजिटल गाव कोणते ?३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक कोणी दिले ?४) 'नृप' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते ? *उत्तरे :-* १) सौदी अरेबिया २) अकोदरा, गुजरात ३) कृष्णाजी अर्जून केळुस्कर ४) राजा, भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महीपती ५) चिमणाबाई फुले *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 नारायण शिंदे, उपक्रमशील शिक्षक, रत्नागिरी👤 संदीप आवरे, धर्माबाद👤 दिगंबर खपाटे बन्नाळीकर👤 प्रशांत ईबीतवार👤 प्रशांत कोकने👤 मधुकर बोईनवाड, साधनव्यक्ती, धर्माबाद👤 दत्ता बोडलवाड👤 सुमेध भंडारे👤 संदीप सोनकांबळे👤 मारोती ताकलोर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलु नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बुध्दीवान व्यक्ती खऱ्या अर्थाने बुध्दीवान असतो. समोरचा माणूस कोणत्या शब्दात बोलत आहे आणि का म्हणून बोलत आहे याचं एक प्रकारे परीक्षण करत असतो. अशी व्यक्ती वाचाळ नसते. आपल्या मुखातून कोणतेही शब्द न काढता शांत राहण्यातच स्वतःला धन्य समजते. अशी व्यक्ती शांतपणे आपले संस्कार, मानसन्मान, पद, प्रतिष्ठा जपत असते. कारण एवढे सारे मिळविण्यासाठी किती संघर्ष करावा लागला हे, फक्त त्याच व्यक्तीला माहीत असते. अशी व्यक्ती कळत न कळत लोकांसाठी श्रध्देचे स्थान बनत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   " खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक लांडगा राहत होता. तो लांडगा मस्त मजेत शिकार करून खात असे. शिकार खात असताना अचानक एक हाड त्याच्या घशामध्ये अडकते. घशामध्ये अडकलेल्या हाडामुळे लांडग्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला खाता येत नव्हते .त्याला कोणीही मित्र नव्हता की, जो त्याला ते हाड काढण्यासाठी मदत करू शकेल. तो शेजारून जाणाऱ्यांना विनंती करू लागला की, माझ्या घशातील हाड काढून द्या. मग तो सगळ्यांना म्हणतो की, जो कोणी माझ्या घशातील हाड काढून देईन त्याला तो म्हणेल ते बक्षीस देईन पण लांडग्याच्या भीतीने कोणीच आले नाही.शेवटी एक सारस पक्ष्याला लांडग्याने न मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर हाड काढण्यास त्या पक्षानं होकार दिला. सारसने लांब चोचीने लांडग्याच्या घशातले हाड बाहेर काढले. लांडग्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हा सारस त्याला म्हणाला , " तू मला या मदतीच्या मोबदल्यात काय देणार ? "लांडग्याने दुष्टपणे हसत म्हटले, " मी तुझा जीव वाचविला नाही का ? जेव्हा तू तुझी चोच माझ्या तोंडात घातली तेव्हाच मी तुला मारून टाकू शकत होतो." सारस पक्षी लांडग्याचे असे बोलणे ऐकून नाराज झाला आणि जाता जाता विचार करू लागला की, हा लांडगा पण किती पटकन उपकार विसरणारा निघाला. मी त्याची मदत करायला नको होती.*तात्पर्य - उपकाराची फेड आपकाराने करू नये ."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/RVC9ihzERVQ3Ywfr/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_ या वर्षातील २३७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: युक्रेनने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.**१९६६: रशियन बनावटीचे लूना-११ हे मानवविरहित यान चांद्रमोहिमेवर निघाले**१९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.**१८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.**१६०८: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟣 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: दीप्ती भगवान शर्मा -- भारतीय महिला क्रिकेटपटू**१९७७: नागराज पोपटराव मंजुळे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, आणि मराठी कवी**१९७६: हंसराज मधुकर देसाई -- बालकवी* *१९७४: बिपिन सिध्देश्वरराव देशपांडे -- लेखक, पत्रकार* *१९६९: मुकेश तिवारी -- भारतीय अभिनेता**१९६६: बापू सोपानराव दासरी -- कवी, लेखक**१९६२: सुरेश मारोतराव चोपणे- लेखक, कवी* *१९५७: अनिल गोविंद मुनघाटे -- लेखक, कवी**१९५४: सतीश कुलकर्णी -- मराठी चित्रपट निर्माते**१९५१: अनुराधा अरुण नेरुरकर -- कवयित्री, लेखिका* *१९४७: प्रा. डॉ. लक्ष्मण माधवराव शिवणेकर -- प्रसिद्ध कवी, लेखक, शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक, संपादक* *१९४७: पॉलो कोहेलो – ब्राझिलियन लेखक**१९४७: प्रा. डॉ. अनिल नागेश सहस्रबुद्धे -- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९४४: संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका (मृत्यू: २४ जून १९९७ )**१९३२: रावसाहेब गणपराव जाधव – मराठी वाङ्मयातील सर्व प्रवाहांचे खुल्या मनाने स्वागत करणारे ज्येष्ठ समीक्षक-कवी, माजी संमेलनाध्यक्ष (मृत्यू: २७ मे २०१६ )**१९२९: यासर अराफत – नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४ )**१९२४: जनार्दन अमृत जोशी -- कवी, लेखक**१९२३: होमी नुसेरवानजी सेठना -- भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि रासायनिक अभियंता (मृत्यू: ५ सप्टेंबर २०१० )**१९२१: नामदेव लक्ष्मण व्हटकर - प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार**१९१८: सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (मृत्यू:ज्ञ२३ फेब्रुवारी २००४ )**१९१७: पं. बसवराज राजगुरू -- कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक (मृत्यू: २१ जुलै १९९१ )**१९०८: शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१ )**१८९३: कृष्णचंद्र डे -- भारतीय संगीतकार, संगीतकार, गायक, अभिनेता (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६२ )**१८८८: बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (मृत्यू: ८ मार्च १९५७ )**१८८०: बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या शिकलेल्या नसतानाही त्यांच्यापाशी जीवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१ )**१८७२: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर – श्रेष्ठ मराठी साहित्यिक, संपादक लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘केसरी‘ व ‘मराठा‘चे संपादन केले.(मृत्यू: १४ आक्टोबर १९४७ )**१८३३: नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६ )*🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सीमा देव-- मराठी अभिनेत्री (जन्म: २७ मार्च १९४२)**२०२२: प्रभाकर गणपतराव तल्लारवार -- कवी,लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर१९३५ )**२०१९: अरुण जेटली -- अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री (जन्म: २८ डिसेंबर १९५२ )**२०१८: विजय चव्हाण -- मराठी रंगभूमीवरचे कलाकार (जन्म: २ मे१९५५ )**२०१६: अनुराधा शशिकांत वैद्य -- कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, ललित लेख, सदर असे लेखनाचे वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळले (जन्म: ९ जुलै १९४४ )**२००६: यज्ञेश्वर माधव कस्तुरे (यज्ञेश्वरशास्त्री) -- वेदान्ततीर्थ, संपादक, संस्कृत आचार्य, लेखक(जन्म: ३ मार्च १९०८ )* *२०००: कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (जन्म: ३० जून १९२८ )**१९९३: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (जन्म: १४ जानेवारी १८९२ )**१९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (जन्म: ६ जुलै १८३७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बुवाबाजीला वेळेवर ओळखा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं केलं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नागपूर येथे 31 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या टप्पा-2 चे आयोजन:50 लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार थेट रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण:प्रत्येक जिल्ह्यात होणार एक ‘मधाचे गाव’*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागेवर निवडणूक लढणार - राज ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रधानमंत्री जनजाती आदिवासीन्याय महा अभियान 10 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात कुणाचाही रस नाही - शरद पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरोग्यदायी सवयी*निरोगी राहण्यासाठी नेमके काय करावे यावर खूप चर्चा होते पण काही तज्ज्ञांनी आरोग्याच्या अशा दहा सवयी सांगितल्या आहेत की, ज्या अंगी बाणवायला सोप्या आहेत आणि परिणामकारक आहेत. या सवयी म्हणजे जीवन पद्धतीतला बदल आहे. उदा. अन्न नीट चावून खा. असे खाण्याने ते पचनास सुलभ होते. आपली पचनाची क्रिया पोटातच होते असे नाही. ती दातांपासून सुरू होत असते. या आहार तज्ञांनी साखर आणि मीठ यांना पांढरी विषे म्हटले आहे. ती विषे असली तरीही त्यांना खाण्यातून बाद करता येत नाही. साखर बरीच बाद करता येते पण मीठ बाद न करता त्याचा मर्यादित वापर केला पाहिजे. कारण साखरेने मधुमेह बळावतो आणि मिठाने रक्तदाब वाढतो. हे दोन विकार अनेक विकारांच्या मुळाशी असतात आणि ते कायमचे कधीच दुरुस्त होत नाहीत.चहाच्या बाबतीतही हे तज्ज्ञ असाच इशारा देतात पण चहा बाद करता येत नाही. आपला नेहमीचा चहा नाकारून आपण ग्रीन टी प्राशन करू शकतो. त्यात अनेक रोगप्रतिबंधक गुण आहेत. दूध हे आपण निरोगी समजतो पण त्याच्या बाबतही हे लोक इशारा देत आहेत. पाणी हे तर आपण पीतच असतो पण ते किती आणि कधी प्राशन करतो याला फार महत्त्व आहे. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यावे. जेवताना किंवा काहीही खाताना पाणी पिऊ नये. खाणे संपल्यावर ४५ मिनिटे किंवा जमल्यास एक तास पाणी पिणे टाळावे. विशेषत: पोट सुटलेल्या लोकांना ही सवय फार उपयोगी पडते. नेहमी प्रवास करणारांनी रोजचा व्यायाम चुकवू नये. प्रवासात खाण्याच्या वेळा चुकवू नयेत. घरून निघताना जेवून निघावे.बैठी कामे करणारांनी आपल्या कामातला वेळ काढून जमेल तसा व्यायाम करावा. हात पाय हलवावेत. पायांना ताण द्यावा. संगणकावर नजर लावावी लागत असेल तर अधुन मधून झाडांकडे पहावे. एकदाच जास्त न खाता चार पाच वेळा थोडे थोडे खावे आणि प्रत्येक खाण्यानंतर निदान दहा मिनिटे तरी चालावे. इतर व्यायामाला वेळ मिळत नसला तरी हे चालणेच निदान पाऊण तासाचे होते आणि फिटनेस टिकतो. शेवटची सूचना म्हणजे झोप. लवकर झोपावे आणि लवकर उठावे पण झोपेची वेळ नीट निवडावी. रात्रीचे जेवण आणि झोपेची वेळ यात किमान दोन तासांचे अंतर असावे. असे केल्याने झोप चांगली लागते. अन्यथा पोटात अन्न पचलेले नसते आणि ते आपल्याला शांत झोपू देत नाही.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पालकांनी दिलेले संस्कार हे मुलांचे जीवन सुंदर बनवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा भारतीय व्यक्ती कोण आहे ?२) युक्रेन या देशाची राजधानी कोणती ?३) महात्मा फुले यांनी पहिली शाळा केव्हा व कोठे काढली ?४) 'नवनीत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताचा राष्ट्रीय ग्रंथ कोणता ? *उत्तरे :-* १) विराट कोहली ( २७१ मिलियन ) २) कीव ३) १८४८ ( भिडेवाडा, पुणे ) ४) लोणी ५) भारतीय संविधान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्याम ठाणेदार, स्तंभलेखक, पुणे👤 सावित्री कांबळे, शिक्षिका तथा साहित्यिका, पुणे👤 श्रीकांत भुजबळ, नायब तहसिलदार,👤 हणमंत बोलचेटवार, धर्माबाद👤 गोपाळ ऐनवाले, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 भाऊराव शिंदे, धर्माबाद👤 संजय पाटील, पुणे👤 रमेश भोसले, नांदेड👤 सुनील बावसकर👤 मारोती बोंबले, बिलोली👤 ऋषिकेश शिंदे, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या घरात असलेल्या प्रत्येक निर्जीव वस्तूंसोबत आपली माया जुळलेली असते. व त्या वस्तू विषयी आपुलकी निर्माण होत असते.पण, एखाद्या वेळी चालताना चुकून पाय दुसरीकडे पडल्यावर मात्र जीव लावलेल्या त्याच वस्तूंपासून इजा होण्याची शक्यता असते. आणि मग त्या वस्तूंचा राग यायला लागतो. म्हणून कोणतेही काम करताना आपले लक्ष पूर्णपणे त्याच कामाकडे असले पाहिजे. तेव्हाच ठरवलेल्या लक्षापर्यत जाण्याचा मार्ग मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मन माणसाचे अन डोके...*    एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडसाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाचीघ सर्व कामे ते करू लागले.         *_तात्पर्य_ ::~*माकड हे मानवी मेंदूचे प्रतिक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचांरानी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहिल. परंतू त्याला काही काम नसेल तर ,ते नकारात्मक विचार करू लागेल,हिंसक होईल, भरकटेल.  त्यामूळेच म्हटले जाते की,रिकामा मेंदू हा सैतानाचे घर असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/eVXfbHvfhWeP3jk2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_जागतिक वडा पाव दिवस_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २३६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार!**२०११: लीबीयातील हुकुमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता उलथण्यात आली.**२००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान**१९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.**१९९०: आर्मेनियाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.**१९६६: ‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.**१९४२: दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू**१९४२: मो. ग. रांगणेकर यांच्या ’कुलवधु’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१४: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८३९: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟢 ••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: अभिषेक रामकृष्ण भंडारे -- कवी**१९८९: आशा नेगी -- भारतीय अभिनेत्री* *१९८८: वाणी कपूर -- भारतीय अभिनेत्री* *१९८४: संदीप परसराम जगताप -- कवी, लेखक* *१९७३: मलाईका अरोरा-खान – मॉडेल व अभिनेत्री**१९६६: संजय बच्छाव -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक, निवेदक**१९६३: डॉ. राजेंद्र झुंजारराव -- कवी* *१९६२: प्रा. डॉ. वेंकटलक्ष्मी नारायण पुरणशेट्टीवार -- सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका**१९६२: अनंत देविदास बोरसे -- लेखक**१९५९: नंदू परदेशी-- कवी, लेखक**१९५८: राजीव गजानन पुजारी -- लेखक* *१९५१: प्रा.लीला शिंदे -- प्रसिद्ध लेखिका* *१९४४: सायरा बानू – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९३८: मधुराणी श्रीराम भागवत -- कादंबरीकार व कथालेखिका (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०२२ )**१९३१: दत्ता तन्नीरवार-- इतिहास लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी २०२४ )**१९२६: दादा देशकर -- लेखक* *१९२५: नारायण बाळकृष्ण मराठे -- लेखक, संपादक* *१९२३: महादेव रामचंद्र बडवे -- लेखक* *१९२३: बलराम जाखर -- माजी लोकसभेचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल (मृत्यू: ३ फेब्रुवारी २०१६ )**१९२३: वसंत दिगंबर कुलकर्णी -- समीक्षक (मृत्यू: २५ ऑगस्ट २००१ )**१९२२: सदाशिव अंबादास डांगे -- संशोधक, कोशकार, लेखक(मृत्यू: २५ ऑक्टोबर १९९९ )**१९१८: अण्णा मणी -- भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट २००१ )**१९१८: गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्‍च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.(मृत्यू: १४ मार्च २०१० )**१९१५: बळवंत चिंतामण सहस्रबुद्धे-- विनोदी कवितांच्या व वात्रटिकांच्या संग्रहामुळे ‘वात्रटिकाकार’ म्हणूनही प्रसिद्ध (मृत्यू: ३१ मे १९९१ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• *१९९४: आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर १९४० )**१९७५: पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते. १९३२ मध्ये त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.(जन्म: २२ जुलै १८९८ )**१९७४: डॉ.शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते.(जन्म: २८ फेब्रुवारी १८९७ )**१९७१: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१८०६: चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १७३६ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - कुलदीपक*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान यांच्यात वॉर्सा येथे प्रतिनिधीस्तरीय द्विपक्षीय चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *IAS अधिकारी इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, MPSC ने संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलली; तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम म्हणाले, आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने पुरस्कारांचे वितरण, अर्णवाझ दमानिया यांना सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन दंड बंद करा, ऑटोरिक्षा चालक - मालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, पंतप्रधानांना पाठवले निवेदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमूलच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड म्हणून मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा, कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू जाडेजाही प्रथम क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुर्वेद म्हणजे काय?आयुर्वेद ही औषधाची एक नैसर्गिक पद्धत आहे जी भारतात 5000 वर्षांपूर्वी उगम पावली. हा निरोगीपणाचा एक समग्र दृष्टीकोन आहे जो आपल्या अस्तित्वाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक पैलूंचा समतोल राखतो. आयुर्वेदाला "जीवनाचे विज्ञान" देखील म्हटले जाते, तुमचे शरीर आणि आरोग्य सुधारू शकते. आयुर्वेदात 'आयुर' म्हणजे जीवन, आणि 'वेद' म्हणजे विज्ञान किंवा ज्ञान. हे मानते की मानवी शरीरात विश्वातील पाच घटक असतात: अवकाश, वायू, अग्नि, पाणी आणि पृथ्वी, जे तीन महत्त्वपूर्ण ऊर्जा किंवा दोष तयार करतात: वात, पित्त आणि कफ. या दोषांचे संतुलन उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा ते सुसंवाद साधतात तेव्हा ते चैतन्य आणि आरोग्याकडे नेत असतात आणि त्यांच्यातील असंतुलनामुळे आजार किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात.आदर्श आरोग्य संतुलन राखण्यासाठी आयुर्वेदिक आरोग्य टिप्सध्यान : तणाव आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. आपल्या मानसिक तंदुरुस्तीवर परिणाम करण्याव्यतिरिक्त, आपल्या शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, आणि तणाव कमी करण्याचा आणि मन शांत करण्याचा ध्यानाचा सराव करण्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही. योगासारख्या सरावांमुळे लवचिकता आणि सामर्थ्य सुधारू शकते. हे तणाव कमी करते, मानसिक स्पष्टता वाढवते आणि संपूर्ण आरोग्यासाठी एक महत्त्वाची आयुर्वेद पद्धत आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वत:ला कधीही कमी लेखू नका ; तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे ?२) महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणत्या साली लिहिला ?३) प्राण्यांचे वर्गीकरण प्रथम कोणी केले ?४) 'नजराणा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) NDA चा full form काय आहे ? *उत्तरे :-* १) पंचकोनी तारा २) १ एप्रिल १८८९ ३) Aristotle ४) भेट, उपहार ५) National Defence Academy*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 लक्ष्मी पुरणशेट्टीवार, साहित्यिक, नांदेड👤 सुनील भेंडे, वसमत👤 सचिन बोरसे, जर्मनी ( नांदेड )👤 यादव ढोणे👤 रामदास पेंडपवार, निझामाबाद, तेलंगणा👤 आनंद यादव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केलेल्या चांगल्या, वाईट कर्माची फळ ज्यांनी, ज्यांनी कशाप्रकारे भोगले आहेत त्यांच्याकडे बघून सुद्धा आजचा माणूस पूर्णपणे जागा होत नाही व आपल्यातील वाईट विकार सोडत नाही आणि चांगल्या विचारांना आत्मसात करत नाही. ही सत्यता नाकारता येत नाही. या भूमीवर माणूस म्हणून जन्म मिळाला आहे निदान त्या मिळालेल्या मानवी जीवनाचे कशाप्रकारे सार्थक करता येईल यासाठी थोडा प्रयत्न करून बघावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि मंत्री*एका सम्राटाला झोप येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, "महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही" सम्राट म्हणाले,"अहो! हिशोबात काही चूक असेल." मंत्री म्हणाले,"हिशोब अचूक आहे. मी स्वततपासला आहे." सम्राट म्हणाले," रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा." परंतु मंत्री म्हणाला," उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे." आता सम्राटही गंभीर झाला आणि मंत्राच्या समोर बसला. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाला ,"महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले." यावर राजा म्हणाला,"जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा." सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.*तात्पर्य :- सर्वांचे हित जाणणारा, प्रेम, आत्मीयता व कठीण प्रसंगात योग्य साथ देणारी व्यक्तीच योग्य प्रकारे सत्ता चालवू शकते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/oUSHev1wvsCQ5Ev4/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_ या वर्षातील २३५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••*१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्‍होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.**१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.**१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.**१९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.**१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना**१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: अविनाश सचदेव -- भारतीय अभिनेता* *१९८५: देवोलिना भट्टाचार्जी -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९८४: मंगेश पुंडलिक जनबंधू -- लेखक**१९८४: प्रज्ञा सदाशिव वझे -- लेखिका**१९६६: विजयकुमार मेश्राम -- लेखक, कवी* *१९६६: प्रा. डॉ. प्रल्हाद वावरे -- लेखक, समीक्षक, संपादक* *१९६५: महेंद्र सीतारामजी गायकवाड-- लेखक, कवी* *१९६४: मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू**१९६२: सुनील महादेव सावंत -- कवी, लेखक**१९५८: मानसी मागीकर -- मराठी अभिनेत्री* *१९५५: सुरेश मारोतराव आकोटकर -- प्रसिद्ध कथाकार* *१९५५: चिरंजीवी – सुप्रसिद्ध अभिनेते* *१९५४: खुशालदास तुकारामजी कामडी -- कवी, गीतकार* *१९५४: माणिकराव गोविंदराव ठाकरे -- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री* *१९५१: अशोक कोठावळे -- मॅजेस्टिक' प्रकाशनाचे प्रमुख**१९४८: कंवरजीत पेंटल -- भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार* *१९४७: उज्ज्वल वामनराव कुलकर्णी -- कथाकार**१९४६: सुधीर शंकर सुखठणकर -- प्रसिद्ध विनोदी लेखक**१९४६: प्रल्हाद सोनवणे -- लेखक**१९४६: मा. विकास शिरपूरकर -- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती**१९४२: डॉ. भवान महाजन -- लेखक**१९३५: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४ )**१९३४: अच्युत पोतदार -- भारतीय अभिनेते, ज्यांनी १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे**१९२६: एन. सी. सिप्पी -- भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक (मृत्यू: २५ नोव्हेंबर २००१ )**१९२५: गणपत दत्तोबा बारवाडे -- कथा कादंबरी व नाट्य लेखक**१९२२: इंदुमती श्रीपाद केळकर -- कादंबरी व चरित्र लेखिका**१९२०: नारायण यशवंत देऊळगावकर (अण्णासाहेब) -- पटकथालेखक (मृत्यू: ३ जून २००८ )**१९२०: डॉ. डेंटन कूली – ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद**१९१९: गिरीजाकुमार माथूर – हिन्दी कवी (मृत्यू: १० जानेवारी १९९४ )**१९१८: डॉ.बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (मृत्यू: १५ जुलै २००४ )**१९१६: मधुकर रामराव यार्दी-- पूर्व केंद्रिय वित्त सचिव,संस्कृत अभ्यासक (मृत्यू: २० ऑगस्ट २००१ )**१९१५: शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (मृत्यू: १९ मे १९९७ )* 🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती -- कन्नड भाषेतील भारतीय समकालीन लेखक आणि समीक्षक( जन्म: २१ डिसेंबर १९३२ )**२००१: शरद तळवलकर -- चित्रपटांतील अभिनेते (जन्म: १ नोव्हेंबर १९१८ )* *१९९९: सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३).(जन्म: २ जून १९२६ )**१९९५: पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत.* *१९८९: पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(जन्म: २६ जुलै १८९३ )**१९८२: एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४ )**१९८०: किशोर साहू -- चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५ )**१९७८: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० आक्टोबर १८९३ )**१९७०: डॉ. मुरलीधर गजानन पानसे -- लेखक, संशोधक, संपादक (जन्म: ९ सप्टेंबर १९१८ )**१९७०: विठ्ठल गोपाळ खोबरेकर -- लेखक, पुराभिलेख संशोधक, संपादक(जन्म: २० जुलै१९२३ )**१८१८: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (जन्म: ६ डिसेंबर १७३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोठं मन*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विमानतळावर पोलंड सरकारचे प्रतिनिधी लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिले जातील हेक्टरी पाच हजार रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्याच्या विकासात सहकार आणि शिक्षण क्षेत्राचं मोठं योगदान - उपमुख्यमंत्री अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड मध्ये सलग दुसऱ्या वर्षी A+ ग्रेड मिळाल्याबद्दल RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हमीभाव कायदा करा अन्यथा देशव्यापी संप पुकारू 250 पेक्षा जास्त शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाकिस्तान व बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान 4 गडी बाद 158 धावा केल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावण महिन्यातील आहारश्रावण महिन्यात फळांचे सेवन जरूर करा. दररोज कमीत कमी एक वाटी फळं खाल्ल्याने तुमचा अशक्तपणा तर दूरच राहतो, पण तुमचे शरीर दिवसभर ऊर्जावान राहते. अशा परिस्थितीत सफरचंद, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि पपई हे चांगले पर्याय आहेत. भरपूर फायबर असल्याने या गोष्टी खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही तुमच्या आहारात मूठभर सुक्या मेव्याचाही समावेश करू शकता. त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक असतात, जे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणापासून वाचवण्यात मोठी भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत तुम्ही काजू, बदाम, अक्रोड आणि अंजीर यासारख्या गोष्टींचे सेवन करू शकता.उपवासात साबुदाणा खूप आवडतो. त्याच्या मदतीने, तुम्ही चविष्ट पदार्थ तयार करू शकत नाही. या साबुदाण्यात फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्वांचे भांडार देखील आहे. संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही त्याची खिचडी किंवा कमी तेलात केलेली टिक्कीही खाऊ शकता.उपवास दरम्यान सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे शिंगाड्याचे पदार्थ. याचे सेवन केल्याने केवळ चयापचय वाढतो असे नाही, तर ऑक्सिडेटिव्ह तणावापासूनही तुमचे संरक्षण होते. हे खाल्ल्याने शरीराला अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.श्रावण मासात उपवासाच्या वेळी तुम्ही तुमच्या आहारात नारळाचाही अनेक प्रकारे समावेश करू शकता. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच जेवणाची चवही वाढवते आणि याच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.या गोष्टी टाळा -श्रावण महिन्यात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यामुळे केवळ पोटात जळजळ आणि ॲसिडिटी होत नाही तर रक्तदाबही वाढू शकतो. याशिवाय तुम्ही जास्त कार्ब असलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" वाचनाने मनुष्याला आकार येतो, सभेमुळे तो प्रसंगावधानी, तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगिण होतो."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) कोणता देश प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा पहिला देश ठरला आहे ?३) राज्यघटनेतील कितव्या अनुच्छेद नुसार केवळ एकाच जागेवर खासदार म्हणून राहता येते ?४) 'नगर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? *उत्तरे :-* १) हरीश पर्वतनेनी २) न्युझीलंड ३) अनुच्छेद १०१ ४) शहर, पूर, पुरी ५) किली मांजरो, उंची - ५८९५ मी.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शंकरराव हामद, केंद्रप्रमुख, बिलोली👤 शंकर गंगूलवार, धर्माबाद👤 आशिष देशपांडे, पत्रकार, कुंडलवाडी👤 नागराज येम्बरवार, किनवट👤 शिवा गैनवार, धर्माबाद👤 कु. पूजा गुरुपवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन हे, हवे पेक्षा वेगवान तसेच चंचल असते,असे अनेकजण म्हणतात. कदाचित हे खरे असू शकते म्हणूनच आपण एका जागी असताना सुद्धा मन आपल्याला एका क्षणात कोसोदूर घेऊन जात असते फिरवून आणत असते. पण,एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी प्रत्येक वेळी आपले मन चांगल्याच मार्गाने नेईलच असेही नाही म्हणून जरा त्यापासून थोडे सावधगिरी बाळगावी. ते आपल्यासाठी व इतरांसाठी सुद्धा भल्याचे राहील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*करढोक व मासे*-करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्‍या संकटाची सूचना देणार्‍या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्‍या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.*तात्पर्य*-शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/VHe5kDQz9RVFcAy1/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀️ *_सदभावना दिन_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_अक्षय ऊर्जा दिवस_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••☀️ *_ या वर्षातील २३३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••*२००८: भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बिंजिंग ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.**१९८८: इराण इराक युद्ध – सुमारे ८ वर्षांच्या युद्धानंतर युद्धबंदी करार झाला.**१९६०: सेनेगलने आपण (मालीपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.**१९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली**१९२०: डेट्रॉइट, मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र सुरू झाले.**१९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.**१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी (भारतात) हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. आल्मोडा येथे मलेरियावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.**१८२८: राजा राम मोहन रॉय यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या साहाय्याने कोलकाता यथे ब्राम्हो सभेची स्थापना केली. या सभेलाच पुढे 'ब्राम्हो समाज’ म्हणू लागले.*☀️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☀️ •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: दत्तात्रय भानुदास जाधव (दत्ता जाधव) -- लेखक**१९७६: रणदीप हुडा -- भारतीय अभिनेता**१९६६: शुभंकर बॅनर्जी -- फारुखाबाद परंपरेतील भारतीय संगीतकार आणि तबला वादक(मृत्यू:२५ऑगस्ट २०२१)**१९६४: दीपक गणपतराव ढोले -- कवी, लेखक**१९६३: डॉ. आनंद देशपांडे -- प्रसिद्ध लेखक**१९५९: सरोज शरद भरभडे -- प्रसिद्ध लेखिका**१९५२: प्रा. विश्वास प्रभाकरराव वसेकर -- लेखक, कवी, संपादक, बालकुमार साहित्य चळवळीतील कार्यकर्ते* *१९४६: एन. आर. नारायण मूर्ती – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक**१९४५: चंद्रकांत संतराम मस्के -- प्रसिद्ध कवी (मृत्यू: २० मे २०२१)**१९४४: सलमा बेग (बेबी नाझ) -- भारतीय अभिनेत्री (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९९५ )**१९४४: राजीव गांधी – भारताचे ६ वे पंतप्रधान,भारतरत्‍न (१९९१) मरणोत्तर (मृत्यू: २१ मे १९९१ )**१९४२: जगदीश अभ्यंकर -- प्रसिद्ध लेखक (मृत्यू: ५ एप्रिल २००१ )**१९३७: प्रतिभा पंढरीनाथ रानडे -- प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार**१९२३: शांता विनायक परांजपे -- चरित्र लेखिका**१९२२: प्रभाकर गोविंद अत्रे -- कथा, कादंबरीकार**१९१९: विष्णू श्रीधर जोशी -- मराठी लेखक आणि इतिहाससंशोधक (मृत्यू: २५ एप्रिल २००१ )**१९१५: पांडुरंग (पांडबा) गोपाळ जाधव -- नाट्यलेखक* *१८३३: बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १३ मार्च १९०१ )**१७७९: जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८ )* ☀️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: डॉ. नरेन्द्र दाभोळकर -- विज्ञानवादी, समाजसुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत व साधना साप्ताहिकाचे संपादक ( जन्म: १ नोव्हेंबर १९४५ )**२०१३: जयंत साळगावकर –मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक (जन्म: १ फेब्रुवारी १९२९ )**२००१: मधुकर रामराव तथा एम. आर. यार्दी – प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष (जन्म: २२ऑगस्ट१९१६ )**२०००: प्राणलाल मेहता – चित्रपट निर्माते (किनारा, किताब, बेजुबान, मरते दम तक, पुलिस पब्लिक )* *१९९७: प्रा.चंद्रहास जोशी -- लेखक (जन्म: १९२७ )**१९९७: प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (जन्म: ७ आक्टोबर १९०७ )**१९८८: माधवराव शिंदे – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. ’कन्यादान’, ’धर्मकन्या’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर ’शिकलेली बायको’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.(जन्म: ३ आक्टोबर १९१७ )**१९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांची शेरपूर येथे एका गुरूद्वारात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. (जन्म: २ जानेवारी १९३२ )**१९८४: अविनाश व्यास -- गुजराती चित्रपटांचे भारतीय संगीतकार, गीतकार आणि गायक(जन्म: २१ जुलै १९१२ )**१९८४: रघुवीर भोपळे ऊर्फ ’जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार (जन्म: २४ मे १९२४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*श्रद्धा आणि अंधश्रद्धा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑगस्टला युक्रेनला जाणार, ३० वर्षानंतर भारतीय पंतप्रधान करणार दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षण कायद्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आमदार भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ असल्याची प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काश्मीरच्या उधमपूर येथे अतिरेक्यांना घेरुन मारताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचा अर्थात सीआरपीएफचा निरीक्षक हुतात्मा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पॅरिस येथे आयोजित पॅराऑलिम्पिक स्पर्धेतल्या सहभागी खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून दिल्या शुभेच्छा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तीन दिवसात 40 विकेट्स, द. आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, द. आफ्रिकेचा सलग 10 कसोटी मालिकामध्ये वेस्ट इंडिजवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेणू* 📙 मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. अणूची रचना काहीशी सूर्यमालेसारखी असते. अणूचे बहुतेक सर्व वस्तुमान अणूकेंद्रात असते. धनविद्युतभारित प्रोटॉन आणि तेवढ्याच वस्तुमानाचे पण विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन यांनी अणुकेंद्र बनते. त्याच्याभोवती विविध कक्षांत इलेक्ट्रॉन घिरट्या घालीत असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान म्हणून अणू मात्र विद्युतभाराच्या दृष्टीने किंवा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.चांदी, सोने इत्यादी अशा प्रकारची धातूरूप मुलद्रव्ये वगळता सृष्टीतील बाकी सर्व पदार्थ हे रेणूंनी बनलेले असतात. रेणू म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र गुंफून झालेली रचना. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन ही मुलद्रव्ये त्यांच्या रेणूंची बनलेली असतात. त्यांच्या प्रत्येक रेणूत दोन अणू असतात. पाणी हे संयुग. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आले की, पाण्याचा एक रेणू बनतो. नित्याच्या आढळतील बहुसंख्य पदार्थ संयुग स्वरूपातच असतात. शिवाय अनेक मुलद्रव्येही त्यांच्या रेणूंचीच बनलेली असल्यामुळे आपल्या पर्यावरणातील सारे विश्व रेणूंचे बनले आहे असे म्हणता येईल.रेणूंचे काही गुणधर्म विलक्षण आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन बनणाऱ्या पाण्याचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्माहून किती वेगळे ! साखर तर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांनी बनते. परीक्षानळीत साखर तापवली की खाली काळा साका आणि नळीच्या तोंडाशी पाण्याचे बारीक थेंब मिळतात. कितीतरी प्रकारचे अणू एकत्र येऊन प्रचंड रेणू बनू शकतात. अमिनो आम्ले, प्रथिने, डीएनए हे सर्व गुंतागुंतीच्या रचनांचे रेणूच आहेत. मात्र तरीही रेणू खूप लहान असतो, हे विसरायचे नाही. घोटभर पाण्यात सहावर तेवीस शून्य इतके रेणू असतात !असे असंख्य रेणू एकत्र येऊन पदार्थ बनतो. हे रेणू एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत, यावर पदार्थाचे भौतिक गुणधर्म ठरतात. गुंफण घट्ट असेल, तर पदार्थ घन असतो. अगदी शिथिल असेल, तर द्रवरूप आणि प्रत्येक रेणू सुटा असेल तर पदार्थ वायुरूप असतो. रेणूची हालचाल तापमानावर अवलंबून असल्याने उष्णता देऊन पदार्थ वितळता येतो आणि द्रवाचे वायूत रूपांतर करता येते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना अन्यायाकडे डोळे झाक करायची सवय असते. त्यांना प्रकाशाची कुस कधीच कुरवाळता येत नाही. - बाबा आमटे*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी* कोणता ?२) 'हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे' ह्या गीताचे रचनाकार कोण ?३) प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?४) 'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भालाफेकपटू नीरज चोप्रा हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहे ? *उत्तरे :-* १) हरियाल २) सेनापती बापट ३) हिमाचल प्रदेश ४) चाप, कोदंड, धनू, तीरकमठा ५) हरियाणा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हरीश बुटले, संस्थापक व अध्यक्ष, डीपर, पुणे👤 इरेश्याम झंपलकर, शिक्षक, बिलोली👤 महेश कुडलीकर, साहित्यिक, देगलूर👤 विजय दिंडे, शिक्षक, धर्माबाद👤 गणेश येवतीकर, येवती, धर्माबाद👤 साई मोहन👤 विवेक सारडे👤 दीपक पाटील👤 सतीश दिंडे👤 कांतीलाल घोडके👤 प्रमोद मुधोळकर👤 जयपाल दावणगीरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन यौवन राजमद अविचल रहा न कोई।जा दिन जाये सत्संग में जीवन का फल सोए॥ 50॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो. पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मासा आणि हंस*एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.*तात्पर्य*मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.📚📚📚📚📚📚📚📚📚•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/LnKSErtU13Su99ME/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_जागतिक छायाचित्रण दिन_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••🔵 *_ या वर्षातील २३२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.**१९४५: हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.**१९१९: अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९०९: इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.**१८५६: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: आकाश हरिभाऊ भोरडे -- कवी, लेखक**१९८९: शेल्डन कॉट्रेल -- वेस्ट इंडीजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट**१९८३: जगदीशचंद्र शरदचंद्र पाटील-- लेखक, निर्माता, व्याख्याते**१९८०: सुनील प्रभाकर पांडे -- प्रसिद्ध मराठी लेखक* *१९७२: पंडित कल्याणजी गायकवाड -- गायक व संगीतकार**१९७२: मोहन कुंभार -- लेखक कवी* *१९७१: उत्तम निवृत्ती सदाकाळ -- लेखक कवी**१९७०: विठ्ठल बापूराव भोसले -- लेखक**१९६५: किसन एकनाथ पिसे -- लेखक, कवी**१९६५: हेमंत बिर्जे -- भारतीय अभिनेता**१९५९: प्रा. रेखा अशोक कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका संपादिका* *१९५६: प्रा. डॉ. राजकुमार पुरुषोत्तम खर्चे -- कवी, लेखक**१९५५: डॉ. अशोक नरहरराव देव -- लेखक, संपादक* *१९५०: पंडित चंद्रकांत लिमये -- भारतातील हिंदूस्थानीशास्त्रीय गायक**१९५०: सुधा कुळकर्णी-मूर्ती -- प्रसिद्ध भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका* *१९४६: बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष**१९४६: प्रा. मधुकर गोपाळ देशपांडे -- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक**१९४३: शरद सांभराव देऊळगावकर -- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध लेखक* *१९२२: बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) -- मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार (मृत्यू: २८ मार्च २००६ )**१९१८: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९ )**१९०८: उस्ताद अब्दुल रशीद खान -- हिंदुस्थानी संगीताचे भारतीय गायक (मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१६)**१९०७: हजारी प्रसाद द्विवेदी -- हिंदी कादंबरीकार, साहित्यिक इतिहासकार, निबंधकार, समीक्षक आणि अभ्यासक (मृत्यू: १९ मे १९७९ )**१९०७: सरदार स्वर्ण सिंग – माजी केन्द्रीय मंत्री (मृत्यू: ३० आक्टोबर१९९४ )**१९०६: प्राचार्य गणेश हरि पाटील -- प्रसिद्ध मराठी कवी, शिक्षणतज्ज्ञ आणि बालसाहित्यिक (मृत्यू: १ जुलै १९८९ )**१९०५: वामन भार्गव पाठक -- कवी, कादंबरीकार, समीक्षक (मृत्यू: २७ जानेवारी १९८९ )**१९०३: गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्‍मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२ )**१८८६: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे नेते,वकील (मृत्यू: २ जानेवारी १९३५ )* 🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे -- पारशी धर्मग्रंथाचे अभ्यासक, प्रकांड पंडित (जन्म : १४ फेब्रुवारी १९१८ )**२०१९: खय्याम (मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी) -- भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक (जन्म: १८ फेब्रुवारी १९२७ )**२०१९: प्रा. मोतीराज राठोड -- विमुक्त भटक्या चळवळीचे लढवय्ये नेतृत्व, अभ्यासक, साहित्यिक, संशोधक( जन्म: २ सप्टेंबर १९४७ )* *१९९४: लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता] (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१ )**१९९३: उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९ )**१९९०: रा. के. लेले – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक**१९८५: श्रीकृष्ण दामोदर पानवलकर -- प्रभावी कथाकार (जन्म: १३ फेब्रुवारी १९२८)**१९७५: डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६ )**१९४७: विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.(जन्म: १९ जानेवारी१९०६ )**१६६२: ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (जन्म: १९ जून १६२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वडील ही वात्सल्यसिंधू*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा, 25 ऑगस्ट रोजी जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महिलांचा आत्मसन्मान वाढविला तर राज्याचा विकास होतो, देश पुढे जातो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडीमार्गेच जाईल, दिल्लीत प्रयत्न ; खासदार विशाल पाटलांचा भरसभेत शब्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी बंदची हाक; संभाजी भिडेंकडून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भाविकांना आषाढीतही मिळणार केवळ 2 तासात दर्शन, 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं निधन, संरक्षणमंत्र्यांकडून श्रद्धांजली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सची मोठी घोषणा, क्रिकेटमधून अचनाक घेतला ब्रेक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वावटळ* 📙 *****************फार मोठ्या प्रदेशावर पसरलेल्या, अनेक दिवस हिंडत धुमाकूळ घालणाऱ्या चक्रीवादळापेक्षा वावटळ कधीकधी अधिक विध्वंस घडवून आणते. हरिकेन वा टायफून याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वादळी प्रकाराला आपण 'वावटळ' म्हणतो. वावटळीचेसुद्धा एक केंद्र असतेच. या केंद्राभोवती प्रचंड वेगाने फिरणारे वारे घोंगावतात, त्यावेळी मध्ये सापडणाऱ्या कशाचीच धडगत नसते. चक्रीवादळाचा वेग बहुधा मोजता येतो, सांगता येतो; पण वावटळीत अनेकदा वेग मोजायची यंत्रे पार मोडून जातात. ब्युफोर्ट स्केल या प्रकारात बारा हा आकडा सर्वात धोकादायक समजला जातो. या पद्धतीने वाऱ्याचा वेग हे स्केल दाखवते. वावटळ येणार आहे वा येऊन गेली म्हणजे हा बाराचाच आकडा व्यक्त करायची पद्धत पडली आहे. अंदाजे अडीचशे ते चारशे किलोमीटर वेगाने वावटळ येऊन धडकते. वावटळ निर्माण होण्याचे कारण म्हणजे समुद्रावर कमी दाबाचा पट्टा गरम हवेमुळे निर्माण होतो, हेच. या पट्टय़ाकडे धाव घेणारी हवा बाष्पही ओढून आणते. बघता बघता हे वायूचे प्रवाह वेग घेत स्वतःभोवती फिरू लागतात. सुमारे तीनशे चारशे किलोमीटर एवढ्याच प्रदेशात या घडामोडी झपाटय़ाने घडतात. वावटळीचे केंद्र पाच ते पंचवीस किलोमीटर एवढे असू शकते. वावटळ बघता बघता किनाऱ्याकडे सरकू लागते. जमीन तापल्यामुळे भर दुपारी या भागात कमी दाब असतो. सुरुवातीला ज्या किनाऱ्याकडे वावटळ जाते तेथे एकदम हवेचा दाब कमी झाल्याचे जाणवू लागते. हवेमध्ये एक प्रकारचा सन्नाटा जाणवतो आणी काही वेळातच भीषण स्वरूपात द्वारे धिंगाणा घालू घालतात. सोसाटय़ाचा, पावसाचा वारा या दरम्यान चालू असतोच. पॅसिफिकमध्ये नेहमीच वावटळी उद्धवतात. उत्तर अमेरिकेचा संपूर्ण पश्चिम किनारा वर्षाकाठी आठ दहा वेळा या वावटळींना सामोरा जातो. नांगरलेली बोट नांगर उखडून कलंडणे किंवा महाकाय लाटेबरोबर किनाऱयावर फेकली जाणे यासारखे अविश्वासार्ह गोष्ट वावटळीत सहज घडते. अमेरिकेत एका वावटळीत रस्त्यावरील मोटार उचलून गरगरत एका घराच्या छपरावर विसावली होती. रस्त्यात उघड्यावर माणसे कधी थांबतच नाहीत; पण चुकून कोणी सापडला, तर रस्त्यातल्या पाचोळ्याबरोबर तोही इकडेतिकडे भिरकावला जातो. झाडे उन्मळून पडणे, घरे पिळवटून वेडीवाकडी होणे, हेही खास वावटळीचेच तांडव. अनेकदा हे भीषण वारे स्वतःबरोबर महाकाय लाटा आणतात. कित्येक फूट उंचीच्या लाटा सारा किनारा उद्ध्वस्त करतात. हा सारा काही तासांचा खेळ आटोपला की पुन्हा आभाळ पूर्ण निरभ्र होते; जसे काही घडलेच नव्हते, असा सूर्यप्रकाश पुन्हा पडतो. अटलांटिकवरील 'हरिकेन', हिंदी महासागरातील चक्रीवादळ हेही वावटळीचेच प्रकार.आजकाल या वावटळी उपग्रहाद्वारे आधी समजू शकतात. त्यांची दिशा कळते. त्या भागातील लोकांना तातडीचे इशारे देऊन जागे करता येते. जे मच्छीमार समुद्रावर निघाले असतील, त्यांना थांबवणे व समुद्रावरील लोकांना परतायची सूचना देणे या स्थानिक रेडिओवरून तातडीने केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या कोणी वावटळी पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत, त्यांना त्या विसरणे आयुष्यात कधीच शक्य होत नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून कोणत्या देशाने घोषित केले आहे ?२) कोळी बांधव मासेमारी करायला समुद्रात कोणत्या सनापासून सुरूवात करतात ?३) UPI पेमेंट स्वीकारणारा पहिला परकीय देश कोणता ?४) ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?५) प्रादेशिक भाषेत निकाल देणारे भारतातील पहिले न्यायालय कोणते ? *उत्तरे :-* १) किर्झिस्थान २) नारळी पौर्णिमा ३) भूतान ४) वाळवी ५) केरळ *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शिवकुमार टाले, मुख्याध्यापक, नांदेड👤 उत्तम सदाकाळ, बाल साहित्यिक, जुन्नर👤 मोहन शिंदे👤 प्रीती माडेकर दरेकर, यवतमाळ👤 संदीप राजे गायकवाड, मुख्याध्यापक, बिलोली👤 संतोष कडवाईकर👤 योगेश मठपती👤 मन्मथ चपळे👤 विशाल वाघमारे👤 महेश हातझडे👤 संभाजी वैराले पाटील👤 कवयित्री अंतरा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मूल ध्यान गुरु रूप है मूल पूजा गुरु पाव।मृलनाम गुरु बचनहै सत्य मूल सत भाव॥ 49॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणामुळे कोणाचेच अडत नाही असे, अनेकदा ऐकण्यात येते. म्हणजेच कोणाचे अडत नसावे. पण जेव्हा वेळ आल्यावर कोणीच जवळ नसतात त्यावेळी मात्र ती आलेली वेळच सर्व काही सांगत असते. म्हणून गर्वाच्या भोवऱ्यात अडकून चुकीचे पाऊल उचलू नये कारण चिखलातून बाहेर काढणारे कमी दिसतात आणि त्याच खोलवर चिखलात गाडणारे जास्त मिळत असतात हे सदैव लक्षात असू द्यावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत कायअसते हो ? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये, विकू नकोस. " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला, " या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली, " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो." पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला, " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल  त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता. त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला, " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला ? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ."आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला. त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले, "  मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार." त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका. कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे .*आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू....*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.tarunbharat.com/article/value-education-through-geography-2/1411567••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_ या वर्षातील २३० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा ’नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर**१९८२: पहिली सी.डी. (Compact Disk) जर्मनीमधे विकण्यात आली.**१९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नॉल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.**१९५३: नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.**१८३६: जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा 'रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅंक्ट' ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने अमलात आला. पुढे हा सर्व ब्रिटिश वसाहतींना लागू करण्यात आला आणि १८३७ पासुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: स्वप्निल कोकाटे --- कवी**१९८४: अंकिता भार्गव पटेल (अंकिता करण पटेल)-- टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९७८: दिशा वकानी-- भारतीय थिएटर, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री* *१९७५: बालाजी मदन इंगळे. -- मराठी कवी, कादंबरीकार* *१९७०: जिम कुरिअर – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९६८: रेखा शिरीष चवरे -- लेखिका**१९६७: सुप्रिया पिळगांवकर -- भारतीय अभिनेत्री**१९६३: शंकर षणमुगम (एस. शंकर) -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक**१९६१: राधा भावे -- कवयित्री, लेखिका* *१९६०: गिरीश ओक -- चित्रपट अभिनेते, संपादक, कवी**१९५८: स्मिता ठाकरे -- भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्मात्या**१९५७: सचिन पिळगांवकर -- प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते**१९५०: मीना खोंड-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५०: भरत सक्सेना-- चित्रपट अभिनेते**१९४९: निनादराव बेडेकर – प्रसिद्ध इतिहास संशोधक (मृत्यू: १७ मे २०१५ )**१९४८: डॉ. शेषराव मोरे -- प्रसिद्ध मराठी लेखक आणि वक्ते* *१९४७: सुखदेव ढाकणे -- प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक* *१९४४: प्रा.पुरुषोत्तम दत्तात्रय देशमुख-- लेखक, अनुवादक* *१९३८: प्रा.रमेशचंद्र गोकुळप्रसाद दीक्षित-- कवी, लेखक* *१९३६: शांताराम पवार -- प्रसिद्ध चित्रकार,हकवी (मृत्यू: ९ऑगस्ट २०१८ )**१९३२: व्ही. एस. नायपॉल – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक (मृत्यू: ११ ऑगस्ट २०१८ )**१९३२: रेखा कामत -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री (मृत्यू: ११ जानेवारी २०२२ )**१९२५: लक्ष्मीदास कृष्ण बोरकर -- कथाकार कादंबरीकार पत्रकार**१९२३: बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट -- मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार**१९१६: डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५ )**१९१६: अमृतलाल नगर -- प्रमुख हिंदी लेखक (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९० )**१९१०: चिंतामण गणेश काशीकर -- वेदशास्त्र अभ्यासक, लेखक (मृत्यू: २८ डिसेंबर २००३ )**१९०८: दत्तप्रसन्न नारायण कारखानीस -- कवी (मृत्यू: १९८६ )**१८९३: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८० )**१८९०: सीताराम शिवराम लोटलीकर-- कादंबरीकार,चरित्रकार (मृत्यू: ११ऑक्टोबर१९३६ )**१८८८: गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप – बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे संस्थापक,पुण्याचे महापौर (१९६२)(मृत्यू: १ऑक्टोबर १९७८ )**१८७३: नरहर गोपाळ सरदेसाई --प्राच्यविद्या अभ्यासक (मृत्यू: २२ जून १९४३ )**१७६१: पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (मृत्यू: ९ जून १८३४ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: पंडित जसराज -- भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक (जन्म: २८ जानेवारी १९३० )* *२०२०: निशिकांत कामत -- भारतीय चित्रपट निर्माता आणि अभिनेता(जन्म:१७ जून १९७०)**२०१९: नीलम शर्मा -- भारतीय अँकर दूरदर्शनच्या संस्थापक अँकर म्हणून प्रसिद्ध (जन्म: ७ मार्च १९६९ )* *१९८८: मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १२ ऑगस्ट १९२४ )**१९०९: भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली.(जन्म: १८ फेब्रुवारी १८८३ )**१८५०: जोस डे सान मार्टिन--पेरू देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तरुण भारत मधील दिलीप व. बेतकेकर यांचा लेख *भूगोलातून मूल्यशिक्षण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील निवडणुका पार पडल्यावर होतील असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक केले जाहीर, काश्मीरमध्ये तीन टप्यात होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली, राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केली भावना.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती, भारत आदिवासी पार्टी पक्षांना निवडणूक चिन्ह वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प ( VMDDP ) च्या दुसऱ्या टप्प्यास १४९ कोटींचा निधी मंजूर:दूध खरेदीपोटी २००० कोटी रुपयांचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कांतारा फेम ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेता तर परेश मोकाशींचा 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनची बुची बाबू स्पर्धेत दमदार शतकी खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऑक्टोपस म्हणजे काय ?* 📙 ************************ऑक्टोपस या अष्टपाद जलचराबद्दल त्याने घातलेल्या वेढ्याबद्दल अनेक दंतकथा जगभर प्रचलित आहेत. एखाद्या सिनेमाचा हिरो पाण्यात गेल्यावर त्याला याने घातलेला विळखा व त्यातून त्याने करून घेतलेली सुटका हाही अनेक वेळा सुरस व चमत्कारिकपणे दाखवला गेलेला प्रकार आहे. जमिनीवरचा साप हा प्राणी व पाण्यातला ऑक्टोपस या दोन्हींबद्दल असा टोकाचा दृष्टिकोन मानवाने भीतीपोटी घेतलेला आढळतो. खरे म्हणजे दोन्ही प्राणी विषारी जरूर आहेत; पण मानवाला त्यांच्यापासून मुद्दाम होऊन क्वचितच इजा होते. ऑक्टोपस हा मृदूकाय (Molluse) प्रकारचा प्राणी आहे. त्याला कसलेही कवच नसते. याचे शरीर जेमतेम वीतभर असते पण भुजा मात्र फूटभर लांब असतात. याचे तोंड डोक्याच्या आतील बाजूस बंद केले जाते. डोक्यावर टपोरे डोळे असतात. त्याची दृष्टी तीक्ष्ण असते. त्यामुळे भक्ष्य शोधणे व हल्लेखोरापासून पळ काढणे या दोन्ही गोष्टी त्याला छान जमतात. यासाठी त्याला त्याच्या शरीराच्या ठेवणीची खूपच मदत होते. एखाद्या चेंडूसारखी शरीराची वळकटी करून एखाद्या कपारीत शरीर लोटून दिले की त्याच्यावर हल्ला होऊच शकत नाही. याउलट एखाद्या भक्ष्यावर हल्ला करताना हा तोंडातून पाणी ओढून घेऊन ते शरीरातील एका विशिष्ट नळीवाटे वेगाने बाहेर फेकतो. एखाद्या जेटप्रमाणे बघता बघता हा भक्ष्याजवळ जाऊन पोहोचतो व त्याला आपल्या भुजांनी वेढून टाकतो. याच वेळी त्याच्या तीक्ष्ण दातांनी लहानसा चावा घेऊन थोडेसे विष त्या भक्ष्याला टोचले जाते. भुजांची ताकद व विषामुळे येणारी गुंगी यांमुळे एखादे बळकट भक्ष्यही हा सहज पकडतो व गट्टम करतो. याचे आवडते भक्ष्य म्हणजे समुद्री खेकडे. अर्थातच खेकडे समुद्राच्या किनाऱ्याजवळील ज्या भागात उथळ पाण्यात, कपारीत राहतात तेथेच याचेही वास्तव्य असते.ऑक्टोपस जगभर उथळ पाण्यात आढळतात. याच्या दीडशे जाती आहेत. वीतभर आकारापासून खरोखर अजस्त्र म्हणावा असा पॅसिफिक महासागरात आढळणारा ऑक्टोपस चक्क वीस ते बावीस फूट लांबीच्या भुजा असलेला आढळतो. पण याचेही धड व डोके जेमतेम दीडदोन फुटांचेच असते. अस्ताव्यस्त पसरलेल्या भुजांमुळे हा मोठा वाटतो. ऑक्टोपस हा निशाचर जलचर आहे. खास करून अंधारात हा उदरभरणाला बाहेर पडतो. दिवसा कुठेतरी कपारीत झोपा काढणे याला आवडते. या त्याच्या सवयीमुळेच माणसाशी त्याचा फारसा संबंध खरे म्हणजे येतच नाही. फक्त खास करून ऑस्ट्रेलिया किनाऱ्यावर आढळणारे ऑक्टोपस विषारी डंखाने मानवी मृत्यूला कारणीभूत ठरतात. हा डंखही झाल्याचे कळत नाही, इतका नाजूक असतो. डंख पोहोचणारा माणूस काठावर आला की काही काळाने हृदयक्रिया बंद पडून त्याचा मृत्यू ओढवतो. वांब जातीचा सापासारखा मासा मात्र ऑक्टोपस खाण्यात पटाईत आहे. हा मासाही खूप मोठा म्हणजे सहज आठ दहा फूट लांब व लहान मुलाच्या मांडीएवढा जाड असतो. तीक्ष्ण दातांनी तो बघताबघता याचा फडशा पाडतो. अगदी उथळ पाण्यात, पण डोंगरकपारी असलेल्या भागात मासेमारी करणाऱ्यांना सटीसमासी जाळ्यात अाॅक्टोपस सापडतात. अर्थात एखाद्या जलसंग्रहालयात त्यांची पाठवणी करण्याचा मासेमार प्रयत्न करतात; पण फारच क्वचित हे प्रयत्न यशस्वी होतात. जमिनीवरील काही प्राणी रंग बदलतात. तीच कला ऑक्टोपसच्या काही जातींनाही साध्य आहे. त्याच्या कातडीत असलेल्या काही रंगद्रव्याचा पाण्यातील प्रकाशाप्रमाणे रंग बदलत जातो. त्यामुळे अनेकदा याचे अस्तित्व ओळखणे अन्य प्राण्यांना कठीण होत जाते. ऑक्टोपसची मादी माशांप्रमाणेच कपारीमध्ये अंडी घालते. एका वेळी घातलेल्या अंड्यांची संख्या किती असावी ? एक ते दीड लाख अंडी अगदी सूक्ष्म स्वरूपात एकत्रित करून घातली जातात. पण यातून होणाऱ्या नवनिर्मितीचे प्रमाण मात्र खूपच कमी असते, कारण ही अंडी अनेक जलचरांकडुन नष्ट होतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य विचारी असेल तर तत्त्वज्ञानी बनतो व विकारवश असेल तर तो बेताल बनतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाकिस्तानचा पहिला सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू कोण ?२) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने राज्यांतील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी अडीच वर्षावरून किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे ?३) देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे ?४) 'देव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा २०२४ चा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर' पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) अर्शद नदीम ( पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ) २) ५ वर्ष ३) IIT चेन्नई ४) सुर, ईश्वर, ईश, परमेश ५) अनुराधा पौडवाल *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मीना खोंड, लेखिका, हैद्राबाद👤 बालाजी मदन इंगळे, शिक्षक तथा साहित्यिक, उमरगा👤 मा. राजेश कुंटुरकर, संचालक, NDCC बँक, नांदेड👤 रवींद्र धुप्पे, नांदेड👤 अरुणा राजीव भोसले, शिक्षिका, कोल्हापूर👤 सचिन एडके, धर्माबाद👤 बालाजी बरडे, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पंडित पढि गुनि पचि मुये गुरु बिन मिलै न ज्ञान ।ज्ञान बिना नहि मुक्ति है सत्य शब्द प्रमान ॥ 48 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्पष्ट व खरे बोलताना आपल्याला साथ देणारे खूप कमी मिळतील. आणि खोटे बोलून गोड शब्दात बोलणारे कोसो दूरचे असंख्य भेटतील पण,जेव्हा आपल्यावर वेळ, प्रसंग येईल त्यावेळी मात्र गोड बोलणारे सुद्धा अनोळखी होऊन जातील. हजार विरोधक निर्माण झाले तरी चालेल पण,खरे व स्पष्ट शब्दात बोलणे सोडू नये. भलेही त्यावेळी कोणी साथ नाही दिली तरी चालेल पण,स्वतः कडूनच मिळालेली साथ खूप मोठी असते म्हणून स्वतः वर पूर्ण विश्वास असू द्यावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकीचे बळ*  एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.loksatta.com/sampadkiya/features/india-s-educational-evolution-from-post-independence-commissions-to-modern-reforms-psg-98-4538127/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_ या वर्षातील २२९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.**१९९४: बांगलादेशातील लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे ’कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार’ जाहीर**१९६०: सायप्रसला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४६: कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.**१९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५: प्रा.सुरेश आडके -- कथा व कादंबरीकार लेखक**१९७८: संजय नाना गोरडे -- कवी,लेखक* *१९७४: शिवनारायण चंद्रपॉल-- प्रशिक्षक आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार* *१९७२: संदीप बाळासाहेब वाकचौरे -- लेखक* *१९७०: मनीषा कोईराला – नेपाळी-भारतीय अभिनेत्री**१९७०: सैफ अली खान – अभिनेता**१९६७: नरेंद्र भगवंतराव नाईक -- प्रसिद्ध कादंबरीकार, कवी* *१९५९: मंगेश विश्वासराव -- जेष्ठ पत्रकार, मराठी साहित्यिक* *१९५८: महेश मांजरेकर-- आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते**१९५८: मॅडोना – अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका**१९५७: रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर.आर.पाटील- माजी उपमुख्यमंत्री म.रा ( मृत्यू: १६ फेबुवारी २०१५ )**१९५४: हेमलता – पार्श्वगायिका**१९५२: कीर्ती शिलेदार – गायिका व अभिनेत्री**१९५१: डेव्हिड धवन -- हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक**१९५०: जेफ थॉमसन – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज**१९४९: अच्युत वझे -- रंगकर्मी, लेखक* *१९४४: प्रा.तुकाराम पाटील -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४३: गिरीश घाणेकर -- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, तसेच मराठी चित्रपट व जाहिरातपट निर्माते (मृत्यू: २३ सप्टेंबर १९९९ )**१९३७: प्रा. आर. व्ही. मुदलियार -- लेखक**१९३४: विष्णुपंत गोपाळराव ब्रह्मनाथकर -- लेखक**१९३४: वसंत पेंढारकर -- जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या कविता करणारे कवी (मृत्यू: ३१ जुलै २००८ )* *१९३२: नारायण आठवले -- मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदार (मृत्यू: २८ एप्रिल २०११ )**१९२६: वसंत रामराव रत्नपारखी -- लेखक**१९२६: मनोरमा -- जुन्या काळातील अभिनेत्री (मृत्यू: १५ फेब्रुवारी २००८ )**१९१३: मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिकविजेते (मृत्यू: ९ मार्च १९९२ )**१९०४: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८ )**१९०१: श्रीपाद रामचंद्र टिकेकर-- लेखक, संशोधक (मृत्यू: १९७९ )**१८७९: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या 'महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते.(मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: चेतन चौहान -- माजी क्रिकेटर(जन्म: २१ जुलै १९४७ )* *२०१८: अटलबिहारी वाजपेयी- माजी भारतीय पंतप्रधान आणि प्रसिद्ध हिंदी कवी, भारतरत्न (२०१४) (जन्म: २५ डिसेंबर १९२४ )**२०१०: नारायण गंगाराम सुर्वे – प्रसिद्ध कवी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: १५ आक्टोबर १९२६ )**२०००: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (जन्म: ५ जुलै १९५२ )**१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन**१९९७: नुसरत फतेह अली खान – कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी गायक (जन्म: १३ आक्टोबर १९४८ )**१९७७: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ (जन्म: ८ जानेवारी १९३५ )**१७०५: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १६५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेखिका संगीता पाखले यांचा लोकसत्ता मधील लेख*स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक टप्प्यांचा…*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'लाडकी बहीण योजना' अंतर्गत ८० लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाले पैसे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पद्मशाली पंच कमिटी पुणे शहर (भवानी पेठ) यांच्यावतीने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे नुतन पद्मशाली समाज धर्मशाळेचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर उर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची महावितरणची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रतिभावान लेखक, कवी, रंगकर्मी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बांगलादेश विरुद्ध च्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विजेचे उत्पादन व वाटप* 📙 आपण अलीकडे क्वचित वर्तमानपत्रात वाचतो, 'काल साऱ्या महाराष्ट्रात वीज गेली होती.' आता मनात येते की, महाराष्ट्र तर एवढा मोठा, तिथे कितीतरी वीजकेंद्रे आहेत. औष्णिक आहेत, जलविद्युत आहेत, आण्विक आहेत. मग सगळीच्या सगळी बंद पडून अख्खा महाराष्ट्र अंधारात कसा जातो ? फार पूर्वी असे नव्हते. कोयनेची वीज मुंबईला जाई. भुसावळ कोराडीचे उत्तर महाराष्ट्राला जाई. तर पुण्याला स्वतःचेच वीजकेंद्र काम करत होते. या पद्धतीत त्या त्या गावापुरते वीजनिर्मिती पुरवठा करण्याचे काम सोपवलेले असे.पण ही पद्धत महागडी होती, अनिश्चित होती. गाव वाढेल, तसतशी ही पद्धत अपुरी पडत असे. मग तेथील पुरवठा नेहमीसाठीच कमी पडे.यावर उपाय म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व मोठी केंद्रे एकमेकांना प्रथम थेट जोडली गेली. याला 'इलेक्ट्रिक ग्रिड' किंवा 'विद्युतकेंद्रांची साखळी' असे म्हणतात. मग या साखळीतून पुढे प्रत्येक गावांकडे फाटे काढून पुरवठा केला गेला.आता समजा, तुम्ही एकमेकांचे हात धरून साखळीची शिवाशिवी खेळत आहात आणि एकाचा पाय दुसऱ्याच्या पायात अडकला. सर्वच मुले बदाबद पडतात की नाही ? अगदी हाच प्रकार या ग्रीडमुळे वीजकेंद्राच्या बाबतीत होतो.एखाद्या केंद्रात काही बिघाड झाला की, ते बंद पडते. पण दुसऱ्याच्या पायात पाय घालून ते दुसऱ्यालाही ओढते. पण हा प्रकार येथेच थांबावा, यासाठी तात्काळ त्या केंद्राशी असलेला जोड आपोआप काम करण्याचे थांबवतो. याच पद्धतीत सर्व जोड काम करेनासे होतात. सर्व महाराष्ट्रात अंधार पडतो, तो असा.पण मूळ केंद्रातील बिघाड थोड्या वेळात दुरुस्त केला जातो. ते सुरू झाले की, ओळीने सर्व जोड पुन्हा काम करू लागतात. अंधारात विझत गेलेले जाळे पुन्हा उजेडात प्रकाशू लागते. संपूर्ण भारतात आता नॅशनल ग्रिडचे जाळे जोडले गेले आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगुलपणाचा मार्ग काटेरी असला, तरी त्याची फळे गोड असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विदर्भातील एकमेव गिरिस्थान कोणते ?२) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते ठरले आहे ?३) २०२८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहेत ?४) 'दैन्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) चिखलदरा, अमरावती २) ISI बंगळुरू ३) अमेरिका ४) दारिद्र्य ५) डॉ. रघुनाथ माशेलकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 निखिल देवेंद्र खराबे, कुही, नागपूर👤 प्रसाद कामुलवार, परभणी👤 रमेश बारसमवार👤 सुभाष पालदेवार, धर्माबाद👤 अशपाक सय्यद👤 मिथुन बिजलीकर👤 प्रवीण खुमसे, MIT, अंबाजोगाई👤 सदानंद वतपलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कह कवीर दरगाह सो जेहि उतरी है भार ।सोइ करै गुरुआइया झकि २ मरे गँवार ॥ 47 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या मनात काय चालू आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असते. दुसऱ्यांच्या मनात काय चालले आहे या विषयी आपल्याला कल्पना सुद्धा नसते. कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते.प्रत्येकांचे मन, स्वभाव, बोलीभाषा, आपुलकी ही वेगवेगळी असते. म्हणून कोणाविषयी उगाचच बोलून स्वतःचे समाधान करू घेवू नये. कारण असे केल्याने आपल्याही वाटेत काटे पेरणारे टपून बसलेले असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *गाढवाचा गैरसमज*    एकदा एका पाथरवटाने दगडांच्या चांगल्या सुंदर मूर्त्या बनवल्या व त्या बाजारात विकायला न्यायला सुरवात केली.नेण्यासाठी एक गाढव आणले ,दगडाचे ते देव पोत्यात भरले .व रस्त्याने चालू लागले लोकांना ते देव पाहून लोक हात जोडु लागले .हे सर्व गाढवाच्या   लक्षात आले कि ,माणसे आपल्याला हात जोडत आहे .मग गाढव एका जागेवर उभे राहले .गाढव का बर चालत नाही याचे कारण काही पाथरवटाला समजले नव्हते ,पण जेव्हा त्याला माहिती झाले की गाढव लोकांचा मान स्वीकार करण्यासाठी उभे आहे .तेंव्हा त्यावर दोन काडी चे फटके दिले व म्हणाला ,आता चालतो नीट की परत देऊ मुर्खा हा जो नमस्कार आहे तुला नव्हे तर त्या देवांना आहे .*तात्पर्य :- खोट्या अहंकाराचे फजितीची वेळ येते*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/38MvdaxSoBALiuHu/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🇮🇳 *_भारताचा स्वातंत्र्य दिन_* 🇮🇳•••••••••••••••••••••••••••••••••🇮🇳 *_ या वर्षातील २२८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••• 🇮🇳 *_महत्त्वाच्या घटना:_* 🇮🇳•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा‘ हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.**१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरूवात झाली.**१९७५: बांगला देशात लष्करी उठाव होऊन बांगला देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली.**१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.**१९४७: ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध,बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्त्त्त्वात आला.**१९४७: भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.**१९४७: पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला.**१९४५: दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.**१९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक ’झेपेलिन’ बलूनमधून जगप्रवासासाठी रवाना**१९१४: पनामा कालव्यातुन एस. एस. अ‍ॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.**१८६२: मद्रास उच्‍च न्यायालयाची स्थापना**१५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.* 🇮🇳 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🇮🇳 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: संदीप काळे -- न्यूझ चॅनलचे अँकर, लेखक आणि कवी**१९७७: वर्षा मारुती भिसे -- कवयित्री, लेखिका**१९७१: प्रमोद श्रीपाद पंत -- कवी, कथाकार**१९६९: भारत गणेशपुरे -- मराठी चित्रपट अभिनेता**१९६९: डॉ.संतोष खेडलेकर -- लेखक, पत्रकार* *१९६८: लोकराम केशव शेंडे -- कवी**१९६६: डॉ. मथू सुरेश सावंत -- प्रसिद्ध लेखिका* *१९५९: प्रा. विजया मारोतकर-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९५८: सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९ )**१९५७: मृणालिनी चितळे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५५: नीना कुलकर्णी -- भारतीय अभिनेत्री**१९५४: जीवन साळोखे -- लेखक**१९५३: प्राचार्य डॉ. अमरसिंग राठोड -- प्रसिद्ध लेखक* *१९५१: प्रा. डॉ. रावसाहेब चोले -- कवी लेखक* *१९५०: अच्युत गोडबोले -- तंत्रज्ञ,समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते* *१९४९: अनुराधा गोरे -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९४९: ललित बहल -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक(मृत्यू: २३ एप्रिल २०२१)**१९४७: राखी गुलजार – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९४७: अरुणा खनगोरकर -- कवयित्री* *१९४४: पुरुषोत्तम पंडित क-हाडे-- लेखक**१९४४: अनिल किणीकर -- लेखक, अनुवादक, संपादक* *१९४२: डॉ. श. भा. चांदेकर -- लेखक,संस्कृत साहित्याचे व संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९३८: उषा टाकळकर -- प्रसिद्ध लेखिका, संपादिका* *१९३८: प्राण कुमार शर्मा -- चाचा चौधरीचे निर्माता व भारतीय चित्रकार (मृत्यू: ५ ऑगस्ट २०१४ )**१९३६: डॉ. माधव गोडबोले -- माजी केंद्रीय गृहसचिव तथा लेखक**१९३३: सीमाताई साखरे-- समाजसेविका, लेखिका* *१९२९: उमाकांत निमराज ठोमरे – संपादक, बालसाहित्यकार (मृत्यू: ७ आक्टोबर १९९९ )**१९२६: शिवराम दत्तात्रेय जोशी -- अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्रीय संस्कृत पंडित (मृत्यू: २९ जुलै २०१३ )**१९२२: वामन(वामनदादा) तबाजी कर्डक -- मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते (मृत्यू: १५ मे २००४ )**१९१७: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी –ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका.(मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१ )**१९१५: इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका (मृत्यू: २४ आक्टोबर १९९१ )**१९१३: भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ 'फुलारी' ऊर्फ 'बी. रघुनाथ' – लेखक व कवी (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३ )**१९१२: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४ )**१९०७: भगवंत दिनकर गांगल -- कथालेखक कादंबरीकार (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९७ )**१९०६:पद्मश्री रामसिंग भानावत-- बंजारा समाजाचे समाजसेवक (मृत्यू: १० जून २००२)**१९०५: शंकर गणेश दाते -- मराठी लेखक, सूचिकार (मृत्यू: १० डिसेंबर १९६४ )**१८९४: विनायक गोविंद साठे -- कवी, लेखक**१८८५: विठ्ठल सिताराम गुर्जर- प्रसिद्ध लेखक (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६२ )**१८७२: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक,योगी व कवी(मृत्यू: ५ डिसेंबर १९५० )**१८६७: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (मृत्यू: ७ मार्च १९२२ )**१७६९: नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट,असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक (मृत्यू: ५ मे १८२१ )* 🇮🇳 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🇮🇳•••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: विद्या सिन्हा - भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: १५ नोव्हेंबर १९४७ )* *२०१८: अजित लक्ष्मण वाडेकर -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (जन्म: १ एप्रिल १९४१)**२००४: अमरसिंग चौधरी – गुजरातचे माजी मुख्यमंत्री (जन्म: ३१ जुलै १९४१ )**१९७५: शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली. (जन्म: १७ मार्च १९२० )**१९४२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (जन्म: १ जानेवारी १८९२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दहाव्या वर्षात पदार्पण*15 ऑगस्ट 2015 रोजी सुरू झालेल्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिन या सेवेला आज नऊ वर्ष पूर्ण होत असून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने या सेवेचा घेतलेला आढावा ........... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन, पीएम मोदी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवून प्रयत्न करा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्याच्या हरित महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी १४ हजार कोटींची गुंतवणूक योजना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इतिहासातून पोवाड्याचे महत्व कळते, एअर मार्शल भूषण गोखले यांचे मत; सृजनसभा प्रस्तुत कलासाधक सन्मान व संवाद कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठा आरक्षणाकडे तातडीने लक्ष द्या, मराठा मावळा संघटनेच्या लोटांगण आंदोलनाने वेधले सर्वांचेच लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *क्रीडा लवादाने आता विनेश फोगटची याचिका फेटाळली असून तिला कोणतेही पदक मिळणार नसल्याचे आता समोर आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताला १५ ऑगस्ट १९४७ याच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने का घेतला?आज स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. मात्र, भारताला १५ ऑगस्ट १९४७ याच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने का घेतला, याची माहिती इतिहासाच्या पोटात दडलेली आहे. प्रत्यक्षात, भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या आग्रहामुळे देशाची या ऐतिहासिक दिवशी पारतंत्र्यातून सुटका झाली आहे. गुजरातमधील दिवंगत व निवृत्त सनदी अधिकारी तसेच इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. के. सी. सगर यांनी केलेल्या नोंदीतून या बाबीवर प्रकाश पाडला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वर्षी डॉ. सगर गुजरात प्रांताचे महसूल सचिव होते. सनदी कामकाज करताना इतिहासात रुची असल्याने ते रोज घडणाऱ्या परंतु, महत्त्वाच्या घटनांची नोंद करून ठेवत असत. त्यांच्या या अनोख्या सवयीमुळेच देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या तारखेमागील गूढ उकलले गेले आहे. डॉ. सगर यांनी केलेल्या नोंदीनुसार, लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारतात येण्यापूर्वी १९४५ मध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन आणि मित्रराष्ट्रांकडून जपानवर करण्यात आलेल्या लढाईचे नेतृत्व केले होते. जपानला १५ ऑगस्ट याच दिवशी चारीमुंड्या चीत करण्यात त्यांना यश आले होते. या विजयानंतर त्यांच्या आयुष्याला नवीन दिशाच मिळाली. त्यामुळे ते १५ ऑगस्ट या तारखेला "लकी' दिवस मानत. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतातील नेत्यांनी स्वातंत्र्यासाठीचा लढा अधिक तीव्र केला. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य देण्याबाबत ब्रिटिश सरकार तयार झाले. मात्र, तारीख निश्चिचत होत नव्हती. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी १५ तारीख ठरवली आणि ती भारतातील ज्येष्ठ नेत्यांना कळविली. या तारखेची कहाणी इथेच संपत नाही. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या या निर्णयाला देशातील नेत्यांनी विरोध केला नाही. मात्र, पश्चि म बंगालच्या कोलकत्यातील त्या वेळचे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ स्वामी मदनानंद यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, १५ ऑगस्ट १९४७ हा "अशुभ' दिवस आहे. या दिवशी देशाला स्वातंत्र्य देण्यात येऊ नये. ब्रिटिशांनी १६ ऑगस्टला स्वातंत्र्य द्यावे, असेही त्यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांना सुचविले होते. तसे पत्रही त्यांनी पाठविले होते. १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यास अनेक संकटे निर्माण होऊ शकतील, असे भाकीत स्वामी मदनानंद यांनी वर्तविले होते. स्वातंत्र्यानंतर देशात उसळलेला जातीय हिंसाचार, दुष्काळ, पाकिस्तान आणि चीनशी झालेले युद्ध अशी अनेक संकटे देशावर कोसळली. या सर्व संकटांचे मूळ त्या तारखेत असल्याचे मत स्वामी मदनानंद यांनी मानल्याचे डॉ. सगर यांनी नोंदविले आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वातंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी सुभाषचंद्र बोस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) १५ ऑगस्ट २०२४ ला आपण कितवा *स्वातंत्र्य दिन* साजरा करत आहोत ?२) ऑलिम्पिकमधील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?३) ऑलिम्पिकमधील विशेष योगदानासाठी भारताच्या कोणत्या खेळाडूला प्रतिष्ठेच्या 'ऑलिम्पिक ऑर्डर' ने सन्मानित करण्यात आले ?४) 'धवल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) डेंग्यू हा आजार कशामुळे होते ? *उत्तरे :-* १) ७८ वा २) ऑलिम्पिक ऑर्डर ३) अभिनव बिंद्रा, नेमबाज ( २००८ बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ) ४) पांढरे, शुभ्र ५) इडिस नावाची मादा डास चावल्याने*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 मा. खासदार वसंतराव चव्हाण साहेब, नांदेड लोकसभा मतदार संघ👤 डॉ. आदर्श बाबुराव जाधव👤 अरविंद कुलकर्णी, साहित्यिक, पुणे👤 युसूफ शेख, शिक्षक, कंधार👤 शिवानंद सुरुकुटवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 बळवंत भुतावले👤 अशोक ढवळे👤 राजाराम मोरे👤 डॉ. आदर्श बाबुराव जाधव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अवर्ण वरण अमूर्ति जो कहौं ताहि किन पेख ।गुरू दयाते पावई सुरति निरति करि देख ॥ 45 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या मनात काय चालू आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असते. दुसऱ्यांच्या मनात काय चालले आहे या विषयी आपल्याला कल्पना सुद्धा नसते. कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते.प्रत्येकांचे मन, स्वभाव, बोलीभाषा, आपुलकी ही वेगवेगळी असते. म्हणून कोणाविषयी उगाचच बोलून स्वतःचे समाधान करू घेवू नये. कारण असे केल्याने आपल्याही वाटेत काटे पेरणारे टपून बसलेले असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्ञानार्जनासाठी*   *एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले.    ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली.    राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला.    पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही.    *_🌀तात्पर्य_ ::~ * ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑगस्ट 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2019/05/blog-post_67.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💮 *_ या वर्षातील २२७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.**२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.**१९७१: बहारीनला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५८: ’एअर इंडिया’ ची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.**१९४७: भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.**१९४७: पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश बनला.**१८६२: मुंबई उच्‍च न्यायालयाची स्थापना**१८६२: कलकत्ता उच्‍च न्यायालयाची स्थापना**१६६०: मुघल फौजांनी संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *१९८३: सुनिधी चौहान -- भारतीय गायिका* *१९८०: ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी (ज्ञानेश) -- कवी* *१९७७: हंसराज पूर्णानंदन बनसोड -- लेखक**१९७३: प्रा.डॉ.गिरीश नारायणराव सपाटे -- कवी, समीक्षक* *१९६८: प्रवीण आम्रे – क्रिकेटपटू**१९६४: संजय सोनवणी -- मराठी साहित्यिक, कथा, कादंबरी, कविता, तत्वज्ञान, इतिहास संशोधन असे चौफेर लेखन**१९६१: मोहनीश बहल -- भारतीय चित्रपट उद्योग आणि भारतीय दूरदर्शनवर काम करणारा भारतीय अभिनेते**१९५७: डॉ.श्याम हिराचंद मोहरकर -- लेखक* *१९५७: जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर’– विनोदी अभिनेता**१९५३: डॉ.सर्जु काटकर -- अनुवादक* *१९४८: यशवंत बाबुराव कदम -- लेखक, कवी**१९४५: जयश्री रंगनाथ नायडू -- लेखिका**१९३९: शांता गोखले -- लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक,साहित्य अकादमी पुरस्कारांनी सन्मानित**१९३५: वीणा चिटको--- लेखिका,कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्‍दर्शक (मृत्यू: १९ सप्टेंबर २०१५ )**१९२५: जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार.कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४ )**१९१५: सिंधू गाडगीळ -- कादंबरीकार कथाकार* *१९१०: डॉ.गणेश त्र्यंबक देशपांडे -- मराठी व संस्कृत लेखक (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९८९ )* *१९०७: गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका.'जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.(मृत्यू: ८ आक्टोबर १९९६ )**१८९८: सदाशिव कानोजी पाटील (स.का. पाटील ) -- महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, अभ्यासक आणि वक्ते(मृत्यू: २४ मे १९८१)**१७७७: हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ मार्च १८५१ )* 💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: विनायक तुकाराम मेटे-- पूर्व विधान परिषद सदस्य शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख (जन्म: ३० जून १९६३ )**२०२०: पंडित सुधीर माईणकर -- ज्येष्ठ तबलावादक, संशोधक, लेखक, संगीततज्ज्ञ (जन्म: १६ मे १९३७ )**२०१२: विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (जन्म: २६ मे १९४५ )**२०११: शम्मी कपूर – सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २१ आक्टोबर १९३१ )**२०१०: बाबूराव गोविंदराव शिर्के -- मराठी बांधकाम व्यावसायिक (जन्म: १ ऑगस्ट१९१८ )**१९८८: एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८ )**१९८४: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (जन्म: १५ जानेवारी १९२६ )**१९५८: जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (जन्म: १९ मार्च १९०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एक देशभक्ती पर लघुकथा*व्यर्थ न हो बलिदान*सकाळी सकाळी रेडिओ ऑन केल्या बरोबर ती बातमी कानावर पडली आणि सविताच्या काळजाचे ठोके वाढले होते. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय सैनिक मारल्या गेल्याची ती बातमी होती. सविताने लगेच फोन हातात घेतला आणि एक नंबर डायल करायला लागली. आपने डायल किया हुआ नंबर अबी बंद है, थोडी देर बाद प्रयास करे वारंवार हेच वाक्य तिच्या कानी पडत होता. जशी जशी वेळ जात होता तशी तशी तिची बैचेनी................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकणार पीएम नरेंद्र मोदी, लाल किल्ल्यावर 11 व्या वेळी तिरंगा फडकावून रचणार विक्रम, पं नेहरू यांनी 17 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नगराध्यक्षांचा कालावधी ५ वर्ष करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय; नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांची घोर निराशा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची सरकारकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन, महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे प्रवीण गायकवाड यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर, सन  २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे पाच सामने होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सांधे का दुखतात ?* 📙************************ सांधेदुखीचे अनेक कारणे आहेत. 'सांधे आहेत म्हणून ते दुखतात !' असे उत्तर माझ्या आजोबांनी त्यांच्या मित्राला दिल्याचे मला अजून आठवते.दोन हाडे एकमेकांना जोडण्यासाठी सांधे असतात. सांधे असल्यामुळेच शरीराची हालचाल होऊ शकते. सांध्यांमध्ये असलेल्या हाडांच्या टोकांभोवती एक कुर्चा असते. तसेच सांध्यांच्या पोकळीत एक द्रवपदार्थ असतो, जो वंगणासारखे काम करतो. म्हातारपणात हा द्रव कमी होतो. हाडे एकमेकांवर घासली जाऊ नयेत यासाठी ही रचना असते. वृद्धापकाळात या कुर्चेची झीज होते व हाडांची टोके एकमेकांवर घासून सांधे दुखायला लागतात. काही वेळा सांध्याच्या पोकळीत जंतूसंसर्गामुळे किंवा दुखापतीमुळे द्रव गोळा होतात व सूज येते. यामुळेही सांधे दुखायला लागतात. गाऊटसारख्या रोगात काही रासायनिक पदार्थांचे स्फटिक सांध्याच्या पोकळीत जमा होतात. साहजिकच सांधे दुखतात. लहान मुलांमध्ये हृदयाच्या आजारातही सांधे दुखतात. रोगप्रतिकारक संस्थेच्या काही रोगांमध्येही सांधेदुखी होते. सांधेदुखीच्या कारणानुरूप त्यावर उपचार करायला हवेत. काही सर्वसाधारण उपचार लक्षात घेऊ. विश्रांती घेतल्याने सांधेदुखी कमी होते. दुखणाऱ्या सांध्यांना विश्रांती दिल्याने दुखणे कमी होते. सांध्यांना शेकून काढण्यानेही वेदना कमी होतात. ॲस्पिरिनसारख्या वेदनाशामक गोळ्यांनी वेदना कमी होते, तसेच सूजही कमी होते. वृद्धापकाळातील सांधेदुखीसाठी प्रत्येक सांध्यासाठीचे साधेसाधे व्यायाम नियमितपणे करायला हवेत, म्हणजे सांध्यांच्या हालचालींवर पडलेल्या मर्यादा दूर होतील. अशी सांधेदुखी पुर्णपणे बरी होत नसल्याने निदान दैनंदिन व्यवहार करणे तरी रुग्णाला शक्य होईल व आयुष्य सुखकर होईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माता, पिता, गुरु आणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंध्रप्रदेश राज्याचा राज्यपक्षी कोणता ?२) डोमिनिका या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?३) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ?४) 'दुर्धर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदकतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे ? *उत्तरे :-* १) पोपट २) पोपट ३) सहा ( सुवर्ण - ०, रजत - १, कांस्य - ५ ) ४) कठीण, गहन ५) ७१ व्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शंकर कळसकर, शिक्षक, देगलूर👤 गजानन गंगाधरराव रामोड, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 पवन लिंगायत वाळंकी👤 प्रवीण संगमकर काळे👤 किरण मुधोळकर, फोटोग्राफर, देगलूर👤 गजानन पाटील👤 राम दिगंबर होले👤 सुनील गुडेवार👤 राजू टोम्पे👤 गणेश ईबीतवार, येवती, धर्माबाद👤 मुनेश्वर सुतार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु बतावै साधुको साधु कहै गुरु पूज ।अरस परसके खेलमें भई अगमकी सूज ॥ 43 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• पाण्याची असो किंवा चांगल्या माणसाची योग्य त्याच वेळेत किंमत करावे. तहान लागल्यावर जशी पाण्याची आठवण येते तशीच आठवण आपण अडचणीत किंवा दु:खात असताना आपल्या जवळच्या चांगल्या माणसाची आठवण होते म्हणून त्यांचे महत्व जाणून आपल्यात माणुसकी कायम ठेवावे. या जगात सर्वच काही पैशाने विकत घेता येते पण, आपले दु:ख समजून मदतीला धावून येणारा व आपुलकीच्या नात्याने साथ देणारा माणूस एकदा दूर निघून गेल्यावर मनाने तर काय पण, त्याला पैशाने सुद्धा विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोड बोलणाऱ्यापासून सावधान*  "एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला.त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस ? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.'यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.'*तात्पर्य* : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/Q771Lzsni1kyuKUB/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💢 *_आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••••💢 *_ या वर्षातील २२६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.**१९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन ’कौमी तराना’ हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.**१८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.**१६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.* 💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: नेहा खान -- भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री**१९९५: प्रभाकर देविदास दुर्गे -- लेखक**१९९०: अमृता कदम नारायणकर -- लेखिका, कवयित्री* *१९८८: माधव श्रीकांत किल्लेदार -- लेखक**१९७६: मनोहर विश्वनाथ इनामदार --- कवी, लेखक**१९६३: अनिता राज खुराना-- भारतीय अभिनेत्री**१९६३: श्रीदेवी -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०१८ )**१९६१: डॉ.अलका संजय इंदापवार -- लेखिका* *१९६१: प्रा. नंदकुमार कुलथे -- प्रसिद्ध लेखक**१९६१: महेश आनंद -- भारतीय अभिनेता, नर्तक आणि मार्शल आर्टिस्ट खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध (मृत्यू: ९ फेब्रुवारी २०१९ )**१९५६: रामदास गायधने -- कवी, लेखक**१९५३: डॉ. विजया शशिकांत फडणीस -- मानसतज्ञ/समुपदेशक, लेखिका* *१९५२: फादर वेन्सी डिमेलो एस. जे. - कवी, लेखक* *१९५२: प्रज्ञा रत्नाकर मराठे -- कवयित्री**१९३९: डॉ. अनिल गुलाबचंद गांधी -- कुशल सर्जन, प्रसिद्ध लेखक* *१९३८: प्रा. डॉ. राम घोडे -- लेखक* *१९३६: वैजयंतीमाला बाली ऊर्फ ’वैजयंतीमाला ’ – चित्रपट अभिनेत्री**१९३२: उषा सदाशिव दातार -- प्रसिद्ध लेखिका**१९२६: फिडेल कॅस्ट्रो – क्यूबाचे १५ वे राष्ट्राध्यक्ष**१९१५: माधव श्रीपाद सातवळेकर -- सुप्रसिद्घ महाराष्ट्रीय चित्रकार व महाराष्ट्र शासनाचे भूतपूर्व कलासंचालक(मृत्यू: १६ जानेवारी २००६ )**१९१३: चंद्रकांत मांडरे -- प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते व लेखक (मृत्यू: १७ फेब्रुवारी २००१ )**१९०६: विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (मृत्यू: ३० आक्टोबर १९९८ )**१८९९: सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २९ एप्रिल १९८० )**१८९८: प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,पटकथालेखक आणि वक्ते (मृत्यू: १३ जून १९६९ )**१८९६:कृष्णराव व्यंकटेश गजेंद्रगडकर-- अनुवादक (मृत्यू:१९८१)**१८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ – १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी केलेल्या कवितावाचनाने प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ’बालकवी’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. (मृत्यू: ५ मे १९१८ )**१८८८: जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक (मृत्यू: १४ जून १९४६ )**१८५४: वासुदेव गणेश टेंबे ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी -- दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक (मृत्यू: २४ जून १९१४ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: जयवंत नाडकर्णी -- ज्येष्ठ नाट्यकर्मी* *२०१८: सोमनाथ चटर्जी -- भारतीय राजकारणी, माजी लोकसभा अध्यक्ष (जन्म: २५ जुलै १९२९ )**२०००: नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (जन्म: ३ एप्रिल १९६५ )**१९८८: गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक (जन्म: २ एप्रिल १९०७ )**१९८०: पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (जन्म:१२ एप्रिल १९१० )**१९७७: पारुल घोष -- भारतीय पार्श्वगायिका (जन्म: १९१५)**१९६३: शांताराम विष्णू आवळसकर -- मराठी लेखक (जन्म: ९ नोव्हेंबर १९०७ )* *१९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. १९०७ मधे त्यांना ’ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. ’नोटस ऑफ नर्सिंग’ हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे.(जन्म: १२ मे १८२० )**१९४६: एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १८६६ )**१९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१ )**१९१७: एडवर्ड बकनर – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० मे १८६० )**१७९५: महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. (जन्म: ३१ मे १७२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विचार बदला ; देश बदलेल*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार, शिक्षण विभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोखले इन्स्टिट्यूटची लीड नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून नेमणूक, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - शरद पवारांची ग्वाही ; विश्वास पाटलांच्या 'अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर' पुस्तकाचे प्रकाशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छगन भुजबळांचं आव्हान स्वीकारण्याची चिन्हं,मनोज जरांगे निवडणूक लढवण्याचा निर्णय 29 ऑगस्ट रोजी जाहीर करणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचा पुन्हा ठिय्या; आझाद मैदानात उतरला लाखोंचा समुदाय!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कापशी रोड गावच्या सरपंच वेणूताई उमाळे यांना निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सप्टेंबरमध्ये बांगलादेशच्या क्रिकेट संघाचा भारत दौरा, दोन कसोटी व तीन T20 सामने होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 काही जण रंगाने गोरे, तर काही जण काळे का असतात ? 📕माणसाच्या रंगावर काही अवलंबून नसते. हे खरे असले, तरी काळ्या रंगाच्या लोकांना गोन्या व्यक्ती सुंदर वाटत असतात; तर गोऱ्या व्यक्तींना काळे लोक तरतरीत. स्मार्ट वाटत असतात. एकूण काय स्वत जवळ जे आहे. त्यापेक्षा दुसऱ्याकडचे जास्त आवडणे हा माणसाचा स्वभाव आहे. पण काहीजण गोरे का असतात आणि काही जण काळे का असतात, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. विशेषतः एकाच आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या दोन मुलांचे रंगही वेगळे असतात, हे तुम्ही पाहिलेच असेल. असे का ते आता समजून घेऊ.त्वचेची रचना दोन घरांमध्ये असते. यातला वरचा किंवा बाहेरचा घर (बाह्यत्वचा) पेशींच्या पाच थरांनी बनलेला असतो. यापैकी सर्वात खालच्या पेशीथरातून पेशी सतत निर्माण होत असतात व त्या हळूहळू वर सरकतात. या बाह्यत्वचेमध्ये रक्तपुरवठा किंवा मज्जातंतू नसतात. पोषण आणि संवेदना या दोन्हींसाठी त्याला खालच्या बराबर अवलंबून राहावे लागते. बाह्यत्वचेच्या पेशीथरांमध्ये मेलॅनीन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनोसाईट नावाच्या पेशीपासून संप्रेरकाच्या नियंत्रणाखाली या द्रव्याची निर्मिती होत असते. मेलॅनिनचे प्रमाण हे आनुवंशिकता, वातावरण, स्त्री पुरुष भेद, वय इ. विविध गोष्टींवर अवलंबून असते. आणि या रंगद्रव्याच्या प्रमाणावरूनच त्वचेचा काळे-गोरेपणा ठरतो. त्यामुळे निग्रोची मुले सामान्यत: काळ्या रंगाची असतात. ऊन्हात काम करणारे लोक काळवंडतात, तर शरीराच्या ज्या भागाला ऊन लागत नाही तो भाग इतर भागांपेक्षा उजळ दिसतो. लहान मुले वयस्कर लोकांपेक्षा जास्त गोरी दिसतात. “आमचा राहूल लहानपणी फारच गोरापान होता हो, आताच काळवंडलाय...'' असं तुमची आई म्हणते ते खरेच असते! अर्थात त्वचेचा रंग मुख्यत्वे मेलॅनीनमुळे ठरत असला, तरीही इतर दोन रंगद्रव्येही महत्त्वाची असतात. एक म्हणजे त्वचेखालच्या चरबीतले पिवळे द्रव्य कॅरोटीन आणि दुसरे म्हणजे त्वचेच्या रक्तप्रवाहातील हिमोग्लोबीन हे रक्तद्रव्य. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, आपला रंग मेलॅनीन, कॅरोटीन व हिमोग्लोबीन या तीन द्रव्यांवरून ठरतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानसंग्रह करण्याचे प्रबळ साधन म्हणजे वाचन होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पी. आर. श्रीजेश यांनी नुकतेच हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत ?२) डॉ. मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे ?३) पालघर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यात येणार आहे ?४) 'दुर्दशा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव कोणते ? *उत्तरे :-* १) केरळ २) बांगलादेश ३) वाढवण ४) दुरवस्था, दुःस्थिती ५) हिवरे बाजार, अहमदनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुयोग पेनकर, CFO विद्यालांकर क्लासेस, मुंबई👤 डॉ. प्रशांत सब्बनवार, कुंडलवाडी, बिलोली👤 चंद्रकांत पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, धर्माबाद👤 योगेश येवतीकर, धर्माबाद👤 नरेंद्र रेड्डी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 गणेश धाकतोडे👤 नागेश गुर्जलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जब मै था तब हरी नहीं अब हरी है मै नाहीं।सब अधियारा मिट गया जब दीपक देखा माहि ॥ 42 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांची लायकी काढणारी व्यक्ती, स्वतः मधील लायकी संधी मिळेल तेव्हा, तेव्हा आपली योग्यता दाखविण्याचा प्रयत्न करत असते. कदाचित त्याकडे भरपूर वेळ असू शकते. पण,जी व्यक्ती कोणाचीही लायकी काढत नाही किंवा कोणतेही भेदभाव करत नाही ती व्यक्ती किती लायक असते हे अनेकांना तर काय निसर्गाला सुद्धा माहीत असते. म्हणून कोणाचीही लायकी काढण्यात वेळ वाया घालवू नये. आपण माणूस प्राणी आहोत निदान एवढे तरी विसरु नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *❃  एकाग्रता  ❃*         *एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्‍या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्‍या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्‍यांना ती मुले आवडली होती. ते म्‍हणाले,’’ जे काही तुम्‍ही करत होता त्‍यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्‍य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्‍यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्‍य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्‍य होतात.’’ मुले स्‍वामींजींपुढे नतमस्‍तक झाली.         *_🌀तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://surveyheart.com/form/66ad9d9e311b89197db7723b••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔅 *_आंतरराष्ट्रीय युवा दिन_* 🔅••••••••••••••••••••••••••••••🔅 *_आंतरराष्ट्रीय हत्ती दिन_* 🔅••••••••••••••••••••••••••••••🔅 *_भारतीय ग्रंथपाल दिवस_* 🔅•••••••••••••••••••••••••••••••••🔅 *_ या वर्षातील २२५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔅 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔅•••••••••••••••••••••••••••••••••*२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.**२००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.**२०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड**१९९८: सचिन तेंडुलकर यांना ‘राजीव गांधी खेल रत्‍न‘ पुरस्कार जाहीर**१९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.**१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली 'जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.**१९८२: परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्‍या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.**१९८१: आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.**१९७७: श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.**१९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.**१९५०: अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.**१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.**१९४२: चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी**१९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या ’राजसंन्यास’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी ’स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.**१८५१: आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🔅•••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: सारा अली खान -- चित्रपट अभिनेत्री**१९६२: सुरेश वांदिले -- एक बहुआयामी, पथदर्शी,भविष्यवेधी लेखक तथा पूर्व संचालक माहिती व जनसंपर्क विभाग* *१९५९: गुरुनाथ तेंडुलकर -- कथाकार* *१९५९: प्रवीण महादेव ठिपसे -- 'ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळ खेळाडू**१९५६: चित्रा जगदीश शर्मा-- लेखिका, कथाकार* *१९५३: कांताराम गंगाराम सोनवणे -- कवी, लेखक,पत्रकार* *१९५२: अनंत सामंत -- प्रसिद्ध मराठी लेखक**१९४८: फकिरा मुंजाजी तथा ’फ. मुं.’ शिंदे – प्रसिद्ध कवी, समीक्षक व अनुवादक**१९४४: मिलिंद श्रीपती येरमाळकर -- कवी लेखक**१९३४: वसंतराव आजगावकर -- मराठी भावगीत गायक आणि संगीतकार* *१९२६: बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६ )**१९२४: मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८ )**१९१९: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१ )**१९१४: तेजी हरिवंशराय बच्चन -- भारतीय सामाजिक कार्यकर्ता (मृत्यू: २१ डिसेंबर २००७ )**१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात -- संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२ )**१८९२: एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२ )**१८८७: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ जानेवारी १९६१ )**१८८१: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक (मृत्यू: २१ जानेवारी १९५९ )**१८८०: बाळकृष्ण गणेश खापर्डे – चरित्रकार, वाड्मयविवेचक ( मृत्यू: १९६८ )**१८०१: जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ’कॅडबरी’ चे संस्थापक (मृत्यू: १२ मे १८८९ )* *_ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन _*🔅••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: माधव गरड --ज् येष्ठ कवी, ललित लेखक (जन्म: २५ ऑक्टोबर १९६० )* *२००५: लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (जन्म: १२ एप्रिल १९३२ )**१९९७: गुलशन कुमार दुआ -- संगीत निर्माता व कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड (टी-सीरीज) चे संस्थापक (जन्म: ५ मे १९५१ )**१९८२: हेन्‍री फोंडा – अमेरिकन अभिनेते (जन्म: १६ मे १९०५ )**१९७३: दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर (जन्म: १२ मार्च १९११ )**१९६४: इयान फ्लेमिंग – दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ’जेम्स बाँड’चा जनक (जन्म: २८ मे १९०८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी प्रारंभ झालेल्या *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* ला पाहता पाहता नऊ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एक प्रयत्न म्हणून google फॉर्म तयार केला आहे. तरी ते भरून भरून आपले अमूल्य प्रतिक्रिया कळवावे. ही नम्र विनंती..... प्रतिक्रिया नोंद करण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक संपन्न, काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी गाजविली सभा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोलापुरातील कुर्डूवाडीत शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कितीही पैसा लागू दे, जसं होतं तसंच केशवराव भोसले नाट्यगृह उभं करा; अजितदादांकडून स्पष्ट निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत आज मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती राहणार; 50 हजार भाविकांची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जुनी पेन्शन योजना संदर्भांत राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समिती 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन, पैलवान विजय डोईफोडेच्या उपचारांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 5 लाखांची मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्ण पदकांसाठी खेळतो, नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग हरियाणा सरकारची नोकरीची ऑफर नाकारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्‍या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरवू शकेल.अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत.अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील.एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे त्याला कशाचेही भय वाटत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ या वर्षाचा रसायनशास्त्राचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ( राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार ) कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारतातील कोणता पुरस्कार हा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो ?३) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजी या देशाच्या कोणत्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?४) 'दुनिया' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) विवेक पोलशेट्टीवार, वैज्ञानिक २) शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ३) कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी ४) जग ५) कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जेष्ठ कवी फ. मुं. शिंदे, छत्रपती संभाजीनगर👤 वसंत हंकारे, व्याख्याते व प्रबोधनकार, सांगली👤 रवीकुमार येळवीकर, नांदेड👤 पोतन्ना लखमावाड, पत्रकार, धर्माबाद👤 चंद्रकांत गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 मंगेश पापनवार, वसमत👤 दीपक कोकरे👤 आशिष अग्रवाल👤 श्रीनिवास बिचकेवार, धर्माबाद👤 पांडुरंग गायकवाड👤 बालाजी घायाळ*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु सो भेद जो लीजिये शीश दीजिये दान।बहुतक भोंदू बहि गये गखि जीव अभिमान ॥ 41 ॥ ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले जर विचार सकारात्मक असतील आणि त्याच प्रकारचे जगणे असेल तर कोणाच्या समोर खोटे बोलून स्वतः चा समाधान करण्याची आवश्यकता पडत नाही. कारण ज्या प्रकारचे विचार असतील त्या प्रकारच्या वागण्यातून आपोआप दिसत असते.फरक एवढेच की, सकारात्मक विचार करुन जगणारे खोट्याला कधी साथ देत नाही व खोटे बोलणारे सत्य स्वीकार करायला तयार नसतात म्हणून शेवटी ते, नको त्या वाटेने जाऊन पश्चातापात पडत असतात. म्हणून अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी नेहमीच सकारात्मक विचारांना आत्मसात करुन जगण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिंह आणि उंदीर*" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-*जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/rw6VVBFxftZ9eYgx/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟥 *_ आंतरराष्ट्रीय बायोडीज़ल दिवस_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••••🟥 *_जागतिक सिंह दिवस_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••🟥 *_ या वर्षातील २२३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.* *१९९९: ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ’डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर**१९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.**१९८८: दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंषशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.**१८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.**१८१०: ’स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन’ ची स्थापना झाली.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟥 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: प्रदीप दत्ताराम बडदे -- कवी* *१९६६: आशा वेलणकर -- मराठी अभिनेत्री**१९६५: ज्योत्स्ना प्रदीप राजपूत - कवयित्री* *१९६२: निर्मल पांडे -- चित्रपट अभिनेते (मृत्यू::१८ फेब्रुवारी २०१० )**१९६०: देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष (मृत्यू: १२ जुलै २००१ )**१९५८: प्रा. डॉ. तरुजा भोसले वळसंगकर -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५७: डॉ. सत्यपाल श्रीवास्तव -- हिंदी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक**१९५५: प्रा. डॉ. कुमार शास्त्री -- प्रसिद्ध लेखक, वक्ते* *१९५१: अजित वाच्छानी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन वरील चरित्र अभिनेते (मृत्यू: २५ ऑगस्ट २००३ )**१९३९: हरिहर बाबाराव खंडारे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९३४: डॉ. सुधीर नरहर रसाळ -- सुप्रसिद्ध समीक्षक,संपादक* *१९३२: सुरमणी' पंडित रघुनाथ पाणिग्रही -- संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१३ )**१९३१: कृष्णचंद्र पंत -- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१२)**१९३०: मनोहर दत्तात्रेय आपटे -संस्थापक (मृत्यू: ६ मे २००२ )**१९२४: राम कृष्ण जोशी -- कथा,कादंबरीकार व बालसाहित्यिक* *१९२०: मधुसूदन बालकृष्ण वर्धे -- कथा, कादंबरी लेखन व संपादक* *१९१७: प्रेम आदिब -- भारतीय अभिनेते (मृत्यू: २५ डिसेंबर १९५९)**१९१६: वसंत साठे --पटकथाकार व 'बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस'चे पार्टनर (मृत्यू: १२ जुलै १९९४ )**१९१५: नारायण धबाडू पाटील -- कवी लेखक**१९१३: डॉ.अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान (मृत्यू: ८ मे २००३ )**१९०२: नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू: १२ जून १९८३ )**१८९४: व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती,लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: २३ जून १९८० )**१८७४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २० आक्टोबर १९६४ )**१८६०: पं.विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६ )**१८५५: ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (मृत्यू: १६ मार्च १९४६ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: डॉ.बालाजी तांबे-- आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ (जन्म: २८ जून १९४० )* *२०१२: सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (जन्म: ११ आक्टोबर १९३२ )**२०११: पदिंजरेथलाकल चेरियन अलेक्झांडर -- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (जन्म: २० मार्च १९२१ )* *२००३: पं.गंगाधर वामन पिंपळखरे -- पुण्यातील जेष्ठ संगीत गुरू (जन्म: १२ जून १९११ )**१९९७: नारायण पेडणेकर – कवी व नाट्यसमीक्षक* *१९९२: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील (SPP) थोरात -- संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (जन्म: १२ ऑगस्ट १९०६ )**१९८६: जनरल अरुणकुमार वैद्य -- १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ’महावीरचक्र’ मिळाले होते. त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या काळातच ’ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ची कारवाई झाली होती. (जन्म: २७ जानेवारी १९२६ )**१९८२: मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (जन्म: १० एप्रिल १९२७ )**१९७७: श्यामलाल गुप्ता -- भारतीय कवी आणि गीतकार (जन्म: ९ सप्टेंबर १८९६ )**१९५०: खेमचंद प्रकाश – संगीतकार (जन्म:१२ डिसेंबर १९०७ )**१९४२: हुतात्मा शिरीषकुमार (जन्म: २८ डिसेंबर १९२६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हिंदूंचा पवित्र महिना - श्रावण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *घरोघरी तिरंगा अभियानाचे रूपांतर आता लोकचळवळीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आज अधिवेशन, सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *12 ऑगस्ट पर्यंत चालणारे अधिवेशन गुंडाळले, दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"जय सेवा, जय बिरसा मुंडा'च्या जयघोषाने दुमदुमले गोंदिया, आदिवासी नृत्य ठरले आकर्षणाचे केंद्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार, परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रामपंचायतीकडून जप्तीची नोटीस, कर थकवल्याने कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं; पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पदकांचा दुष्काळ संपवला, सुवर्ण जिंकत रचला इतिहास*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अमीबा म्हणजे काय ?* 📙 **************************साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे. पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" जेव्हा आम्ही नम्रतेने लहान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ या वर्षाचा *पहिला विज्ञानरत्न पुरस्कार* कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारतीय विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?३) गोंदियाचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?४) 'दीन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अणुबॉम्बचे जनक कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) गोविंदराजन पद्मनाभन, प्रख्यात बायोकेमिस्ट २) विज्ञानरत्न पुरस्कार ३) गोरख भामरे ४) गरीब ५) ज्युलियस रॉबर्ट, अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अशोक मगरे, साहित्यिक, नांदेड👤 राहुल मगरे, नांदेड👤 गणेश मोहिते👤 शुभांगी पवार, साहित्यिक👤 व्यंकटेश पुलकंठवार, आरोग्य विभाग, नांदेड👤 तुकाराम यनगंदलवाड, पुणे👤 हेमंत पापळे, शिक्षक तथा साहित्यिक, कारंजा, वाशिम👤 संतोष येवतीकर, येवती, धर्माबाद👤 यशवर्धन पवार👤 माधव परसुरे👤 नागराज आहिरे👤 दिगंबरराव भीमराव सावंत👤 गोविंदराव शिवशेट्टे👤 सचिन सुरबुलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु पारस गुरु परस है चन्दन बास सुबास |सतगुरु पारस जीवको दीना मुक्ति निवास ॥ 40 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आठवण त्यांची काढावी ज्यांनी जग दाखवले, आठवण त्यांची काढावी ज्यांनी चिखलातून वर काढले, आठवण त्यांची काढावी ज्यांनी माणूस बनून माणसाची जाणीव करुन दिली, आठवण त्यांची काढावी जे, फुकटात प्राणवायू देतात आणि आठवण त्यांची काढावी जे, वेळात, वेळ काढून कोणतेही बहाणे न करता मदत केली हे सर्वच त्यागी व नि:स्वार्थी होते आणि आजही आहेत म्हणूनच स्वतः पेक्षा दुसऱ्यांसाठी जगून दाखवले. या सर्वांना क्षणभरासाठी सुद्धा विसरु नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रयत्न* " एकदा एक व्यापारी त्याच्या काही नोकरांबरोबर दुसऱ्या देशात व्यापार🏇🏇🏇 करण्यासाठी जात असतो जाताना त्यांना रस्त्यात वाळवंट लागते. वाळवंटात चालून चालून त्याच्या काही नोकरांना पाण्याविना चक्कर यायला लागते. उन्हामुळे आणि जवळ कोठेही पाणी नसल्यामुळे🚱🚱 नोकर कासावीस होऊ लागतात . 🏖🏖त्यांची अवस्था पाहून व्यापारी मनात विचार करतो जर मीच माघार घेतली तर माझे नोकर पण माघार घेतील. मला माघार घेऊन चालणार नाही. मला आशावादी राहायला हवे. व्यापारी इकडे तिकडे पाहू लागतो त्याला जवळच एक हिरवे झुडूप दिसते. ☘☘☘व्यापारी विचार करतो 🤔🤔कि जर पाणी नाही तर हिरवे झुडूप कसे आले? म्हणजे नक्कीच येथे पाणी असावे . व्यापाऱ्याला हायसे वाटते. 🙂🙂व्यापार्याने नोकरांना तेथे खोदायला सांगितले त्याचे नोकर खोदतात पण खाली दगडच दिसतात. पाणी लागतच नाही व्यापारी म्हणतो आणखी खोल खोदा व्यापारी दगडांना आपले कान लावतो त्याला जमिनी खालील पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. व्यापारी त्या दगडांवर एक हातोडा मारतो. आणि काय आश्चर्य जमिनीतून पाण्याचे कारंजे उडू लागते. ते पाणी पिउन सर्वाना खूप आनंद होतो. त्यांच्या कष्टाचे सार्थक होते.*तात्पर्य – प्रयत्न केला तर यश मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/u5i7VDgSY7y6EN5t/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟩 *_ऑगस्ट क्रांतिदिन_* 🟩🟩 *_जागतिक आदिवासी दिन_* 🟩•••••••••••••••••••••••••••••••••🟩 *_ या वर्षातील २२२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर**१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगता समारंभा निमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन**१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.**१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.**१९४५: अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’'फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.**१९४२: ’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.**१९२५: भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा* 🟩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: हंसिका मोटवानी – अभिनेत्री व मॉडेल**१९९०: ओंकार राऊत -- भारतीय अभिनेता* *१९८३: व्यंकटेश उत्तमराव कल्याणकर -- कवी, लेखक* *१९८०: सुहास खामकर -- जागतिक कीर्तीचे शरीरसौष्ठवपटू* *१९७८: आबिद मन्सूर शेख--- गझलकार**१९७५: महेश बाबू -- दक्षिणात्य चित्रपटातील आघाडीचा अभिनेता**१९७०: अजय बाळकृष्ण कांडर -- प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९७०: अपर्णा संत -- गायिका**१९६९: विवेक मुशरन -- भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६८: गौरव कुमार आठवले-- जेष्ठ गझलकार (मृत्यू: १३ जानेवारी २०२४ )**१९६७: डॉ. वंदना रवीन्द्र घांगुर्डे -- संगीत नाटकांत काम करणाऱ्या मराठी गायिका व लेखिका* *१९६६: गोविंद पाटील -- कवी**१९६६: अर्जुन धोंडबाजी मेश्राम -- कवी* *१९६२: उस्ताद तौफिक कुरेशी -- भारतीय शास्त्रीय संगीतकार, तालवादक**१९५९: मेधा आलकरी -- लेखिका, अनुवादक**१९५४: गौतम सखारामपंत सूर्यवंशी -- कवी, लेखक* *१९५४: प्रा. बाबुराव दत्तात्रय गायकवाड -- कादंबरी, कथा लेखन करणारे धारवाड येथील लेखक* *१९५२: समीर खक्कर-- चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते (मृत्यू: १५ मार्च २०२३ )**१९४९: प्रा. रवीचंद्र माधवराव हडसनकर -- कवी, गीतकार, लेखक**१९४७: रमेश पतंगे -- ज्येष्ठ विचारवंत,प्रसिद्ध लेखक पद्मश्री पुरस्कार(२०२२)**१९३६: सावनकुमार टाक -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि गीतकार (मृत्यू: २५ऑगस्ट२०२२ )**१९३३: मनोहर श्याम जोशी -- हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक (मृत्यू: ३० मार्च २००६ )**१९२०: कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ३० जून १९९९ )**१९०९: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२ )**१८९०: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(मृत्यू: ४ आक्टोबर १९२१ )**१८१९: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: ९ऑगस्ट१९०१ )**१७७६: अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ जुलै १८५६ )**१७५४: पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (मृत्यू: १४ जून १८२५ )* 🟩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: हरी रामचंद्र नरके -- मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते (जन्म: १ जून १९६३ )**२०२२: प्रदीप पटवर्धन --लोकप्रिय मराठी अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९५८ )**२०१९: प्रा. राम कोलारकर -- साहित्यिक आणि संपादक (जन्म:२३ जून १९३७ )**२०१७: प्रा. शांताराम पवार -- चित्रकार, कवी (जन्म: १७ ऑगस्ट १९३६ )**२००२: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (जन्म: १ जानेवारी १९१८ )**१८९२: वामन शिवराम आपटे -- कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक (जन्म: १ जानेवारी १८५८ )**१९७६: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४ )**१९०१: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: ९ऑगस्ट १८१९ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नागपंचमी सणानिमित्त एक रचनाआपल्या डोळ्याला दिसला कुठे सापदचकून सारेच म्हणतात बाप रे बाप !.................. पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मोदी सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ केले सादर, विधेयक सभागृहाच्या सहमतीने संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर,  रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, गृहकर्ज, वाहन कर्जाचे हप्ते जैसे थे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *घरकुल ​​​​​​​योजनेतून लाभार्थ्यांना चार लाख रुपयांची रक्कम द्या, खासदार नीलेश लंके यांची मागणी; घर बांधण्याचा खर्च महागल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात झिकाचा विळखा! एकाच दिवशी आढळले 7 रुग्ण; सहा गर्भवती महिलांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली विधानसभा मतदारसंघातून मनसेचा उमेदवार जाहीर, भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस : भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकताना स्पेनवर २-१ असा दमदार विजय साकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* *************************'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे; प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील सापडलेल्या नवीन वनस्पतीला कोणते नाव देण्यात आले आहे ?२) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?३) अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर कोणत्या दिवशी अणुबॉम्ब टाकला ?४) 'दिन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शेख हसीना यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे ? *उत्तरे :-* १) सेरोपेजिया शिवरायीना २) उपराष्ट्रपती ३) ९ ऑगस्ट १९४५ ४) दिवस, वासर, अह ५) बांगलादेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 शिवा अंबुलगेकर, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 विलास कोळनुरकर, शिक्षाक तथा साहित्यिक, उमरी👤 समाधान बोरुडे, शिक्षक, जालना👤 विलास पाटील करखेलीकर👤 बुधभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर👤 नवाब पाशा शेख, गटसाधन केंद्र, बिलोली👤 गणेश पांचाळ👤 बालाजी तेलंग👤 विलास पानसरे👤 सुशीलकुमार भालके👤 विनायक कुंटेवाड👤 ऋषिकेश जाधव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहम अग्नि निशि दिन जरे गुरु सोचा है मान ।ताको यम नेवता दियो होहु हमार मेहमान ॥ 39 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणामुळे कोणाचे भले होते तर कोणामुळे कोणाचे जीवन उद्धस्त होते. त्यात असणारे सुद्धा माणसेच असतात. फरक एवढेच की, प्रत्येकांची विचारसरणी ही वेगवेगळी प्रकारची असते.म्हणून आपल्यामुळे एखाद्याचे जीवन उद्धस्त होणार नाही या प्रकारची विचारसरणी तसेच वागणूक ठेवण्याचा प्रयत्न करावा. भलेही त्यातून काहीच मिळत नसेल तरी जे काही मिळत असते ते, कधीच मिटत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💐 *अच्छा सोचें अच्छा ही होगा*💐 एक राजा की केवल एक टाँग और एक आँख थी। इसके बावज़ूद राजा बहुत बहादुर और बुद्धिमान होने के कारण न केवल अपने राज्य वरन दूसरे राज्यों में भी लोकप्रिय था। एक दिन राजा ने अपनी तस्वीर बनवाने का विचार किया।फिर क्या था, देश विदेश से सुविख्यात चित्रकारों को बुलवाया गया। राजा ने उन सभी से अपनी सुन्दर तस्वीर बनाने के लिए आग्रह किया। सभी चित्रकार सोचने लगे, कि राजा तो एक टाँग और एक आँख से विकलांग है फिर उसकी तस्वीर को बहुत सुन्दर कैसे बनाया जा सकता है? *"असम्भव!"*और यदि तस्वीर सुन्दर नहीं बनी तो राजा गुस्सा होकर दंड देगा।यही सोचकर सभी चित्रकारों ने तस्वीर बनाने से कोई न कोई बहाना बनाते हुए इन्कार कर दिया।तभी पीछे से एक चित्रकार ने अपना हाथ खड़ा किया और बोला,"मैं आपकी बहुत सुन्दर तस्वीर बनाऊँगा जो आपको निश्चय ही पसंद आएगी।" राजा ने भी उसे तुरन्त स्वीकृति दे दी।अब चित्रकार जल्दी से राजा की आज्ञा लेकर तस्वीर बनाने में जुट गया।काफी देर बाद उसने एक तस्वीर बना दी जिसे देखकर राजा बहुत प्रसन्न हुआ और सभी चित्रकारों ने अपने दातों तले उंगली दबा ली। चित्रकार ने एक ऐसी तस्वीर बनायी जिसमें राजा एक टाँग मोड़कर जमीन पर बैठा एक आँख बंद करअपने शिकार पर निशाना लगा रहा है।राजा यह देखकर बहुत प्रसन्न हुआ कि उस चित्रकार ने राजा की कमजोरियों को छिपा कर कितनी चतुराई से सुन्दर तस्वीर बनाई है। राजा ने उसे ढेर सारा इनाम देकर सम्मान से विदा किया।~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/u5i7VDgSY7y6EN5t/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟩 *_ऑगस्ट क्रांतिदिन_* 🟩🟩 *_जागतिक आदिवासी दिन_* 🟩•••••••••••••••••••••••••••••••••🟩 *_ या वर्षातील २२२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील ’इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर**१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगता समारंभा निमित्ताने ’सरहद गांधी’ खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन**१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.**१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.**१९४५: अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर ’'फॅटबॉय’ हा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.**१९४२: ’चले जाव’ चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.**१९२५: भारतीय स्वातंत्र्यलढा – लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा* 🟩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: हंसिका मोटवानी – अभिनेत्री व मॉडेल**१९९०: ओंकार राऊत -- भारतीय अभिनेता* *१९८३: व्यंकटेश उत्तमराव कल्याणकर -- कवी, लेखक* *१९८०: सुहास खामकर -- जागतिक कीर्तीचे शरीरसौष्ठवपटू* *१९७८: आबिद मन्सूर शेख--- गझलकार**१९७५: महेश बाबू -- दक्षिणात्य चित्रपटातील आघाडीचा अभिनेता**१९७०: अजय बाळकृष्ण कांडर -- प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९७०: अपर्णा संत -- गायिका**१९६९: विवेक मुशरन -- भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६८: गौरव कुमार आठवले-- जेष्ठ गझलकार (मृत्यू: १३ जानेवारी २०२४ )**१९६७: डॉ. वंदना रवीन्द्र घांगुर्डे -- संगीत नाटकांत काम करणाऱ्या मराठी गायिका व लेखिका* *१९६६: गोविंद पाटील -- कवी**१९६६: अर्जुन धोंडबाजी मेश्राम -- कवी* *१९६२: उस्ताद तौफिक कुरेशी -- भारतीय शास्त्रीय संगीतकार, तालवादक**१९५९: मेधा आलकरी -- लेखिका, अनुवादक**१९५४: गौतम सखारामपंत सूर्यवंशी -- कवी, लेखक* *१९५४: प्रा. बाबुराव दत्तात्रय गायकवाड -- कादंबरी, कथा लेखन करणारे धारवाड येथील लेखक* *१९५२: समीर खक्कर-- चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते (मृत्यू: १५ मार्च २०२३ )**१९४९: प्रा. रवीचंद्र माधवराव हडसनकर -- कवी, गीतकार, लेखक**१९४७: रमेश पतंगे -- ज्येष्ठ विचारवंत,प्रसिद्ध लेखक पद्मश्री पुरस्कार(२०२२)**१९३६: सावनकुमार टाक -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि गीतकार (मृत्यू: २५ऑगस्ट२०२२ )**१९३३: मनोहर श्याम जोशी -- हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक (मृत्यू: ३० मार्च २००६ )**१९२०: कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात‘ या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे अनेक कवितासंग्रह व ‘सायसाखर‘ हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ३० जून १९९९ )**१९०९: डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२ )**१८९०: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(मृत्यू: ४ आक्टोबर १९२१ )**१८१९: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: ९ऑगस्ट१९०१ )**१७७६: अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ जुलै १८५६ )**१७५४: पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (मृत्यू: १४ जून १८२५ )* 🟩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: हरी रामचंद्र नरके -- मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते (जन्म: १ जून १९६३ )**२०२२: प्रदीप पटवर्धन --लोकप्रिय मराठी अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९५८ )**२०१९: प्रा. राम कोलारकर -- साहित्यिक आणि संपादक (जन्म:२३ जून १९३७ )**२०१७: प्रा. शांताराम पवार -- चित्रकार, कवी (जन्म: १७ ऑगस्ट १९३६ )**२००२: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (जन्म: १ जानेवारी १९१८ )**१८९२: वामन शिवराम आपटे -- कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक (जन्म: १ जानेवारी १८५८ )**१९७६: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४ )**१९०१: विष्णूदास अमृत भावे – मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्य्कवितासंग्रह‘ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: ९ऑगस्ट १८१९ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नागपंचमी सणानिमित्त एक रचनाआपल्या डोळ्याला दिसला कुठे सापदचकून सारेच म्हणतात बाप रे बाप !.................. पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मोदी सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ केले सादर, विधेयक सभागृहाच्या सहमतीने संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर,  रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, गृहकर्ज, वाहन कर्जाचे हप्ते जैसे थे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *घरकुल ​​​​​​​योजनेतून लाभार्थ्यांना चार लाख रुपयांची रक्कम द्या, खासदार नीलेश लंके यांची मागणी; घर बांधण्याचा खर्च महागल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात झिकाचा विळखा! एकाच दिवशी आढळले 7 रुग्ण; सहा गर्भवती महिलांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली विधानसभा मतदारसंघातून मनसेचा उमेदवार जाहीर, भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस : भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकताना स्पेनवर २-१ असा दमदार विजय साकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* *************************'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे; प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील सापडलेल्या नवीन वनस्पतीला कोणते नाव देण्यात आले आहे ?२) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?३) अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर कोणत्या दिवशी अणुबॉम्ब टाकला ?४) 'दिन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शेख हसीना यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे ? *उत्तरे :-* १) सेरोपेजिया शिवरायीना २) उपराष्ट्रपती ३) ९ ऑगस्ट १९४५ ४) दिवस, वासर, अह ५) बांगलादेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 शिवा अंबुलगेकर, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 विलास कोळनुरकर, शिक्षाक तथा साहित्यिक, उमरी👤 समाधान बोरुडे, शिक्षक, जालना👤 विलास पाटील करखेलीकर👤 बुधभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर👤 नवाब पाशा शेख, गटसाधन केंद्र, बिलोली👤 गणेश पांचाळ👤 बालाजी तेलंग👤 विलास पानसरे👤 सुशीलकुमार भालके👤 विनायक कुंटेवाड👤 ऋषिकेश जाधव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहम अग्नि निशि दिन जरे गुरु सोचा है मान ।ताको यम नेवता दियो होहु हमार मेहमान ॥ 39 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणामुळे कोणाचे भले होते तर कोणामुळे कोणाचे जीवन उद्धस्त होते. त्यात असणारे सुद्धा माणसेच असतात. फरक एवढेच की, प्रत्येकांची विचारसरणी ही वेगवेगळी प्रकारची असते.म्हणून आपल्यामुळे एखाद्याचे जीवन उद्धस्त होणार नाही या प्रकारची विचारसरणी तसेच वागणूक ठेवण्याचा प्रयत्न करावा. भलेही त्यातून काहीच मिळत नसेल तरी जे काही मिळत असते ते, कधीच मिटत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💐 *अच्छा सोचें अच्छा ही होगा*💐 एक राजा की केवल एक टाँग और एक आँख थी। इसके बावज़ूद राजा बहुत बहादुर और बुद्धिमान होने के कारण न केवल अपने राज्य वरन दूसरे राज्यों में भी लोकप्रिय था। एक दिन राजा ने अपनी तस्वीर बनवाने का विचार किया।फिर क्या था, देश विदेश से सुविख्यात चित्रकारों को बुलवाया गया। राजा ने उन सभी से अपनी सुन्दर तस्वीर बनाने के लिए आग्रह किया। सभी चित्रकार सोचने लगे, कि राजा तो एक टाँग और एक आँख से विकलांग है फिर उसकी तस्वीर को बहुत सुन्दर कैसे बनाया जा सकता है? *"असम्भव!"*और यदि तस्वीर सुन्दर नहीं बनी तो राजा गुस्सा होकर दंड देगा।यही सोचकर सभी चित्रकारों ने तस्वीर बनाने से कोई न कोई बहाना बनाते हुए इन्कार कर दिया।तभी पीछे से एक चित्रकार ने अपना हाथ खड़ा किया और बोला,"मैं आपकी बहुत सुन्दर तस्वीर बनाऊँगा जो आपको निश्चय ही पसंद आएगी।" राजा ने भी उसे तुरन्त स्वीकृति दे दी।अब चित्रकार जल्दी से राजा की आज्ञा लेकर तस्वीर बनाने में जुट गया।काफी देर बाद उसने एक तस्वीर बना दी जिसे देखकर राजा बहुत प्रसन्न हुआ और सभी चित्रकारों ने अपने दातों तले उंगली दबा ली। चित्रकार ने एक ऐसी तस्वीर बनायी जिसमें राजा एक टाँग मोड़कर जमीन पर बैठा एक आँख बंद करअपने शिकार पर निशाना लगा रहा है।राजा यह देखकर बहुत प्रसन्न हुआ कि उस चित्रकार ने राजा की कमजोरियों को छिपा कर कितनी चतुराई से सुन्दर तस्वीर बनाई है। राजा ने उसे ढेर सारा इनाम देकर सम्मान से विदा किया।~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/cYUnUt5Nq9XMW2jG/?mibextid=xfxF2i••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_भारत छोडो दिन_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••🟫 *_ या वर्षातील २२१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२००८: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ’महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर**१९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.**१९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.**१९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.**१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.**१९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.**१९६३: इंग्लंडमधे १५ जणांचा टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.**१९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१: रॉजर फेडरर – स्विस लॉन टेनिस खेळाडू**१९७९: जास्मिन रमजान शेख -- कवयित्री, लेखिका, समुपदेशक* *१९७२: छाया बेले --- कवयित्री लेखिका**१९७०: शिवाजी निवृत्ती राव घुगे -- कवी लेखक* *१९६९: डॉ. आशुतोष राराविकर -- अर्थशास्त्रज्ञ व प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९६७: डॉ. मोना मिलिंद चिमोटे -- समीक्षक, संशोधक आणि लेखिका* *१९६४: विवेक दत्तात्रय जोशी -- प्रसिद्ध कवी* *१९५८: अशालता अशोक गायकवाड -- कवयित्री, लेखिका**१९५५: श्याम खांबेकर -- गीतकार व कवी* *१९५१: अरुण वि. देशपांडे --लेखक, कवी, बाल साहित्यिक, समीक्षक**१९४८: प्रा. डॉ. रमेश जाधव -- इतिहास संशोधक**१९४८: कपिल सिब्बल -- प्रसिद्ध भारतीय वकील आणि राजकारणी**१९४७: सुरेशचंद्र वारघडे -- लेखक* *१९४०: दिलीप सरदेसाई –क्रिकेटपटू (मृत्यू: २ जुलै २००७ )**१९३९: डॉ. रंगनाथ नाथराव जोशी-- गीतकार, लेखक* *१९३५: डॉ.लक्ष्मण रामदास नसिराबादकर -- संत साहित्याचे गाढे अभ्यासक (मृत्यू: ४ डिसेंबर २०१८ )**१९३४: डाॅ. माधव आत्माराम चितळे -- जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ**१९३२: दादा कोंडके – सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते,दिग्दर्शक,संवादलेखक (मृत्यू: १४ मार्च १९९८ )**१९३१: सुमन माटे -- ज्येष्ठ गायिका**१९२६: शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक.(मृत्यू: ३० जुलै १९९४ )**१९२५: डॉ. वि .ग. भिडे – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार,पद्मश्री (मृत्यू: जून २००६ )**१९२४: यूजीन मेरिल डीच -- अमेरिकन चित्रकार, ॲनिमेटर , कॉमिक्स कलाकार, आणि चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: १६ एप्रिल २०२०)**१९२०: उषा श्रीपाद पंडित -- कथालेखिका* *१९१६: सदाशिव रामचंद्र गाडगीळ -- संशोधक, समीक्षक (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००८ )* *१९१२: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (मृत्यू: २० डिसेंबर १९९८ )**१९१२: तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (मृत्यू: ३१ मार्च २००४ )**१९०८: सिद्धेश्वरी देवी -- हिंदुस्तानी संगीत शैलीत गाणाऱ्या,वाराणसी येथील गायिका(मृत्यू: १८ मार्च १९७७ )**१९०६: परशुराम महादेव बर्वे -- विज्ञान विषय लेखन करणारे लेखक* *१९०२: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २० आक्टोबर १९८४ )**१८९८: गजानन विश्वनाथ केतकर --निबंधकार, विचारवंत,गीतेचे अभ्यासक ( मृत्यू:१५ जुलै १९८० )* 🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: अनुपम श्याम ओझा -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता(जन्म: २० सप्टेंबर १९५७ )**२०२१: मखराम पवार -- बहुजन महासंघाचे संस्थापक,सह आयुक्त तथा माजी मंत्री म.रा.(जन्म: १ मार्च१९३९ )**२०१७: डॉ.भीमराव गस्ती -- देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक (जन्म: १०मे १९५० )* *२०१३: जयमाला शिलेदार -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि नाट्य अभिनेत्री (जन्म : २१ऑगस्ट १९२६ )**१९९९: गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: २३ एप्रिल १९४०)**१९९८: डॉ.सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार.(जन्म: ७ मार्च १९१३ )**१८९७: व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ सप्टेंबर १८४८ )**१८२७: जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १७७० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशाची 'युवा भारत' म्हणून ओळख निर्माण करू या ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रिमंडळ निर्णय ! महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार ; 5 वर्षात 30 हजार कोटींचे उत्पन्न, 5 लाख नोकऱ्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *100 पटाच्या विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद ग्राह्य धरणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यसभेच्या बारा जागांसाठी पोटनिवडणूक, ३ सप्टेंबर रोजी होईल मतदान. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. यात महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रक्षाबंधनपूर्वीच बहि‍णींना मिळणार ओवाळणी ! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विना परवानगी झाड तोडल्यास आता भरावा लागणार पन्नास हजाराचा दंड, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या फायनलला पोहोचलेली भारताची पैलवान विनेश फोगाट अपात्र; 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने कारवाई, भारताला मोठा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेने भारताचा 110 धावानी केला पराभव, 2-0 ने सिरीज जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *कोमा म्हणजे काय ?* 📙 ************************रॉबीन कूकच्या 'कोमा' या कादंबरीवर 'कोमा' हा चित्रपट निघाला. तो अनेकांनी पाहिला असेल. त्यानंतर निघालेल्या बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही आपला आवडता नायक, नायिका व त्यांचे मायबाप कोमात गेल्याचे (बिचारे!) तुम्ही बघितले असेल. अधूनमधून 'अमुक तमुक राजकीय पक्षाचे वयोवृद्ध नेते कोमात' अशी बातमीही तुम्ही वाचली असेल. कोमा म्हणजे नेमके काय ? - हा प्रश्न तेव्हापासून तुम्हाला सतावत असेल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर काही अशी गाढ झोप आहे ज्यातून माणसाला कितीही वेदना होणारे उद्दीपन दिले तरी तो जागा होऊ शकत नाही. झोप वा कोमा यांतील याखेरीच महत्त्वाचा फरक म्हणजे झोपेतला माणूस ठरावीक काळात झोपत असल्याने त्याच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होत नाही; पण कोमातील माणसाला जर शिरवाटे पोषण पुरवले नाही तर तो जिवंत राहणार नाही.मेंदूचे कार्य काही प्रमाणात बंद पडणे म्हणजे माणूस कोमात जाणे, असे म्हणता येईल. यात मेंदूतील सर्व अत्यंत महत्त्वाच्या केंद्रांचे काम बंद पडते. मेंदूच्या वा त्यावरील आवरणांच्या आजारांमुळे, मेंदुला होणाऱ्या दुखापतींमुळे, अफू व दारू यांच्या विषबाधेमुळे तसेच मधुमेहात व मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. व्यक्तीचा मृत्यू हा मेंदूतील श्वसन, रक्ताभिसरण इत्यादी गोष्टींचे नियंत्रण करणारी केंद्रे निकामी झाल्याने होतो. कोमा हा आजार नसून आजारांमुळे होणारा परिणाम आहे. आजकाल कृत्रिम उपायांनी लंबमज्जा, मज्जारज्जू तसेच सर्व शरीराचा रक्तपुरवठा सुरळीत चालू ठेवता येतो. त्यामुळे कोमात गेलेल्या अशा व्यक्ती बराच काळ जिवंत राहू शकतात. अर्थात त्या शुद्धीवर येणे जवळपास अशक्य असते.भारतीय कायद्याने आता 'मेंदूचा मृत्यू म्हणजे मृत्यू' ही कल्पना मान्य केली आहे. ज्या व्यक्तींच्या मेंदूच्या कार्याचा विद्युत प्रवाहांचा आलेख हा ५ मिनिटे घेतला तरी सरळ रेषेत दाखवतो अशी व्यक्ती मृत झाल्याचे घोषित करून तिच्या शरीरातील मृत्रपिंड, हृदय असे अवयव इतर रुग्णांसाठी वापरता येतात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन फुलासारखे असू द्या, पण ध्येय मात्र मधमाशीसारखे ठेवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे ?२) पश्चिम घाटाचा विस्तार किती राज्यात आहे ?३) भारताची युपीआय सेवा स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता ?४) 'दागिना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? *उत्तरे :-* १) मनू भाकर, शूटर २) सहा ( केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात ) ३) फ्रान्स ४) अलंकार, भूषण ५) राज्यसभा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अरुण वि. देशपांडे, साहित्यिक, परभणी👤 अवधूत पाटील सालेगावकर👤 चंदू नागुल, नांदेड👤 योगेश ढगे पाटील👤 ऋषिकेश सोनकांबळे👤 लक्ष्मण खमशेट्टी👤 नागेश कानगुलवार👤 रावजी मारोती बोडके👤 संतोष वाढवे👤 रवी वाघमारे👤 गजानन सावंत👤 सौ. रेखा बालाजी सुंकेवार, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु सीढ़ी ते ऊतरै शब्द बिहूना होय।ताको काल घसीटि हैं राखि सकै नहिं कोय || 38 || ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खेळ कोणताही असो त्यात हार आणि जीत हे दोन्ही कायम असते त्या दोन्ही शिवाय खेळाला महत्व येत नाही. पण, त्यात कोणाची हार झाली असेल त्यावर विचारमंथन केले जाते व जीत झाली असेल त्यात आनंद उत्सव साजरे होताना बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत असते. पण एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी जेथे हार झाली बघून स्वतःचा समाधान करण्यासाठी कोणावर मोठ्याने हसू नये. तसेच जीत झाली बघून आपला स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीत तेथे विकू नये कारण, असे केल्याने आपलीच कधी हार होईल हे, आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *❃ देवाचा मित्र ❃*       ••◆•◆•◆★◆•◆•◆••   एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्‍नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्‍य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्‍ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्‍य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? म्हणून "शीवभावे जीवसेवा "करा व देवाचा मित्र व्हा*"जे का रंजले गांजले -त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधु ओळखावा -देव तेथेची जाणावा" ||  •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑगस्ट 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/NET7WcxhCvELexv6/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟪 *_राष्ट्रीय हॅंडल्युम दिवस_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••••••••🟪 *_राष्ट्रीय भाला फेक दिवस_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••🟪 *_ या वर्षातील २२० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.**१९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.**१९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा 'व्हिट्टोरिओ डी सिका’ हा सन्मान जाहीर**१९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी**१९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर ’द वॉशिंग्टन स्टार’ हे वृत्तपत्र बंद पडले.**१९८५: भारताचा गीत शेठी याने नवी दिल्ली येथे झालेली बिलियर्ड्स चॅम्पियन स्पर्धा जिंकली**१९४७: मुंबई महानगरपालिकेने ’बेस्ट’ (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.**१९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या ’कॉन टिकी’ या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.**१९४२: दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ’ग्वाडेल कॅनाल’ येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसर्‍या महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.*🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: शेखर खंडेराव फराटे -- लेखक* *१९७८: महावीर चिंतामणी भोमाज -- लेखक* *१९७४: श्रीनिवास दादाराव मस्के -- कवी**१९७२: प्रा. डॉ. शैलेंद्र धर्मदास लेंडे -- लेखक* *१९६४: मनीषा निवास कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका* *१९६४: माधवी गोगटे -- ज्येष्ठ अभिनेत्री (मृत्यू: २१ नोव्हेंबर २०२१ )**१९६२: मिलिंद मधुकर दिवाकर -- लेखक तथा संचालक पालवी फाउंडेशन* *१९५९: प्रा. डॉ. दत्ता नागोराव डांगे -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक* *१९५५: चेतन दळवी -- मराठी चित्रपटांमधील आणि रंगभूमीवरील अभिनेता**१९५५: सुरेश ईश्वर वाडकर -- मराठी गायक**१९५४: कलीम खान - कवी, गझलकार, लेखक (मृत्यू: १ मे २०२१ )**१९५३: डॉ. प्रतिभा गुरुदत्त देशपांडे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५१: सरोज चंद्रकांत देशपांडे -- प्रसिद्ध कथालेखिका* *१९५०: प्रा. डॉ. प्रकाश गजानन जोशी -- इतिहास संशोधक व लेखक* *१९४८: ग्रेग चॅपेल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९४७: डॉ. यशवंतराव शंकरराव पाटील -- वैचारिक लेखन करणारे लेखक* *१९४६: चित्रा बेडेकर -- मराठी लेखिका होत्या. वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय विषयांवर लेखन (मृत्यू: १९ डिसेंबर २०१८ )**१९४३: रवींद्र घवी -- लेखक,संपादक (मृत्यू: ५ ऑगस्ट२०१६ )**१९४२: सूर्यनारायण माणिकराव रणसूभे -- हिंदी आणि मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक* *१९४०: शामसुंदर दत्तात्रय मुळे -- प्रसिद्ध लेखक* *१९३९: प्रभाकर मुरलीधर बागले -- समीक्षक, संपादक* *१९३५: श्रीकांत लागू -- विविध विषयांवर लेखन करणारे मराठी लेखक आणि लागू बंधू मोतीवाले पेढीचे संचालक(मृत्यू :७ मे २०१३)**१९३४: दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर -- कवी, समीक्षक, संपादक (मृत्यू: ९ जून २०१२ )* *१९२५: डॉ.मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन –भारतातील कृषी शास्त्रज्ञ, भारतीय शेतीतज्ञ, आणि केन्द्रीय कृषी मंत्री**१९२५: केश्तो मुखर्जी -- भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार (मृत्यू:३ मार्च १९८२)**१९१२: केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ (मृत्यू: २२ एप्रिल, १९८३ )**१९११: प्राचार्य नारायण वासुदेव कोगेकर -- प्रसिद्ध विज्ञानलेखक**१८९०: काशिनाथशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर -- संस्कृत व्याकरणशास्त्राचे गाढे पंडित (मृत्यू: १ डिसेंबर १९७६ )**१८७१: अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका, जलरंगातील त्यांचे वेगळे निर्मितीतंत्र हा आधुनिक भारतीय कलेच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१ )* 🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: जे. ओमप्रकाश -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक (जन्म: २४ जानेवारी १९२६ )**२००९: गुलशन कुमार मेहता उर्फ गुलशन बावरा -- प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि हिंदी चित्रपट अभिनेते (जन्म: १२ एप्रिल १९३७ )**२००८: मधुसूदन नरहर देशपांडे --- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे माजी महानिदेशक, कलेतिहासतज्ज्ञ आणि पुरावास्तूंचे जतनकार(जन्म: ११ नोव्हेंबर १९२० )**१९७४: अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: २२ एप्रिल १८८३ )**१९४१: रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (जन्म: ७ मे १८६१ )**१८४८: जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रीय हातमाग उद्योग दिनानिमित्त प्रासंगिक लेख*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शेख हसीना यांचा भारतातील मुक्काम वाढण्याची शक्यता, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या हाती बांगलादेशची धुरा जाण्याची चिन्हं*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेसचा उलटा गेम, विधानसभेसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्याऐवजी तिकीट कापणाऱ्या उमेदवारांची नावं जाहीर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मावळमधील आंध्र धरणाचा पाणीसाठा 100 टक्के, धरणातून 1572 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे शहरात झिकाचा वाढला धोका, शहरात झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण सापडले आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा सोलापुरात निघाला मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या लक्षात घेता वाढवण्यात येणार 2 हजार पोलिंग बूथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस ऑलिम्पमकमध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तुत्वाची भरारी माणसाला अमरत्व मिळवून देते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कोणत्या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे ?२) 'मोसाद' ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे ?३) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?४) 'दानव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) देशातील पहिली कौशल्य जनगणना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे ?*उत्तरे :-* १) नवी दिल्ली २) इस्त्राईल ३) थॉमस बाख ४) राक्षस, दैत्य, असुर ५) आंध्रप्रदेश *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 श्री दत्ता डांगे, संपादक, इसाप प्रकाशन, नांदेड👤 श्रीनिवास मस्के, साहित्यिक, नांदेड👤 मोहन हडोळे👤 मनोज रापतवार, धर्माबाद👤 रवींद्र चातरमल, फोटोग्राफर, धर्माबाद👤 तुकडेदास दुमलवाड👤 मंगेश पेटेकर👤 शिवाज्ञा कृष्णा साकोरे, देहू गाव, पुणे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु हैं बडे गोविन्द ते मनमें देख विचार |हरि सुमरै सो वार है गुरु सुमरे सो पार ॥ 37 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाच्या समाधानासाठी आपण कितीही चांगले काम केले किंवा त्याच प्रकारची वागणूक ठेवून जरी जगून दाखवले तरी समोरच्या व्यक्तीला समाधान होईलच असे नाही. कारण प्रत्येकांकडेच समाधान या नावाची संपत्ती नसते. म्हणून आपल्याला काय वाटते आपणच ठरवावे. दुसऱ्यांचे समाधान करताना थोडे स्वतः च्या विषयी विचार करावे शेवटी स्वतःलाच जगावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंह आणि उंदीर*" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-*जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/hKSJgmomTG47KavR/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟧 *_अणूबॉम्ब निषेध दिन : हिरोशिमा दिन_*🟧 •••••••••••••••••••••••••••••••••••🟧 *_ या वर्षातील २१९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟧•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.**१९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ प्रदान**१९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.**१९६२: जमैकाला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.**१९४५: अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणूबॉम्ब टाकला. यात ७०,००० जण तात्काळ मृत्यूमुखी पडले तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला.**१९४०: सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.**१९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.**१९१४: पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.* 🟧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟧 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: आदित्य नारायण झा -- भारतीय गायक, होस्ट आणि अभिनेता**१९८३: प्रा. डॉ. विजय हरीराम रैवतकर-- लेखक* *१९७४: प्रा. डॉ. ललित अधाने -- कवी**१९७२: डॉ.अनुजा दत्तात्रेय जोशी -- कवयित्री, संपादिका* *१९७२: गजानन इंदूशंकर देशमुख -- कवी, लेखक**१९७०: एम. नाईट श्यामलन – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक**१९६७: तुषार दळवी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता* *१९६५: नितीन चंद्रकांत देसाई --- भारतीय कला दिग्दर्शक , प्रॉडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता (मृत्यू: २ ऑगस्ट २०२३)**१९५९: राजेंद्र सिंग -- भारतीय जलसंधारणवादी आणि पर्यावरणतज्ज्ञ , "वॉटरमॅन ऑफ इंडिया" म्हणूनही ओळखले जाते**१९५८: अनंत बागाईतकर. --ज्येष्ठ पत्रकार**१९५४: नदीम अख्तर सैफी -- नदीम-श्रवण भारतीय संगीत दिग्दर्शक जोडीतील संगीतकार* *१९५०: बाहरु सोनावणे -- लेखक* *१९४९: श्रद्धा मधुकर पराते -- कवयित्री**२९४८: प्रा.बाळासाहेब हणमंतराव कल्याणकर -- कवी, लेखक, संपादक* *१९४७: अजित सोमण -- प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक (मृत्यू:२ फेब्रुवारी २००९ )**१९४२: अपर्णा मोहिले -- केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) माजी अध्यक्षा व ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: २७ जुलै २०२२ )**१९३९: मधुकर रामचंद्र गोसावी -- संत साहित्याचे ज्येष्ठ लेखक आणि कवी(मृत्यू: १६ एप्रिल २०१९ )* *१९२६: वसंत राजाराम जोशी -- कथालेखक**१९२६: प्रा. डॉ. सुमन गोविंद वैद्य -- इतिहास विषयक लेखन करणाऱ्या लेखिका**१९२५: योगिनी जोगळेकर – प्रसिद्ध कवयित्री, लेखिका (मृत्यू: १ नोव्हेंबर २००५ )**१९२०: गोपाळकृष्ण अनंत भोबे -- संगीत विषयक ललितलेखन करणारे लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९६८ )**१९०९: बाळकृष्ण मार्तंड दाभाडे -- कवी, निबंधकार कला समीक्षक (मृत्यू: २२ मे १९७९ )**१८८१: अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (मृत्यू: ११ मार्च १९५५ )**१८०९: लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (मृत्यू: ६ आक्टोबर १८९२ )* 🟧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟧 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०: बाबा शिंगोटे-- 'दैनिक पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (जन्म: ७ मार्च १९३८ )**२०१९: सुषमा स्वराज -- माजी परराष्ट्रमंत्री (जन्म: १४ फेब्रुवारी, १९५२ )**२०१५: लक्ष्मण बाळकृष्ण लोंढे -- विज्ञानकथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार (जन्म: १३ आक्टोबर १९४४ )**२०१४: स्मिता तळवलकर -- मराठी चित्रपट,नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक (जन्म: ५ सप्टेंबर १९५५ )**२०१३: महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे -- मराठी इतिहास संशोधक, प्रसिद्ध वक्ते आणि महानुभाव पंथाचे अभ्यासक (जन्म : १३ जून १९४० )**१९९९: कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते (जन्म: ४ जानेवारी १९४१ )**१९९७: वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक (जन्म: १४ आक्टोबर १९२४ )**१९६५: वसंत पवार – प्रसिद्ध संगीतकार (जन्म:१९२७ )* *१९२५: सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’ (जन्म: १० नोव्हेंबर १८४८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षण : जीवन विकासाचे साधन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिक : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार वेतन द्यावे, यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी पोषणआहार कर्मचारी आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुजा खेडकरची युपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आज सुप्रीम कोर्टात शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गणेश मंडळांना सरसकट पाच वर्षांची मंडप परवानगी द्या, पालिका आयुक्तांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष, बीएसएफकडून पत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज 10 व्या दिवशी भारताच्या पदरी निराशा, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं कांस्य पदक हुकलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *उजनीत पाणी वाढलं, पंढरपूरला पुराचा धोका, आमदाराने घेतली तातडीची बैठक; 18 वर्षांपूर्वीच्या पुराची आठवण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *पोलिओने पाय लुळा का होतो ?* 📕 पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात.पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बऱ्याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत रतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते.रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेक्शन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषत: पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेक्शन देऊ नये.पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वय असताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते.पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत ?२) राज्यातील पहिले *सौरग्राम* कोणते ?३) भूतकाळातील घटनांचा शास्त्रशुद्धपणे केलेला अभ्यास म्हणजे काय ?४) 'दारा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने'चा प्रारंभ कोठून झाला ? *उत्तरे :-* १) अश्विनी वैष्णव २) मान्याचीवाडी, ता. पाटण, जि. सातारा ३) इतिहास ४) बायको, पत्नी ५) सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हर्ष पाटील👤 इरेश वंचेवाड👤 गणेश धुप्पे👤 गंगाधर दगडे, बिलोली👤 सुदर्शन पाटील जोगदंड, शिक्षक, धर्माबाद👤 दीपक पाटील हिवराळे👤 नरसिंह पावडे देशमुख👤 राजेंद्र पोकलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखिया सब संसार है खाये और सोए।दुखिया दास कबीर है जागे और रोए  ॥36॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन हे मनोव्यापाराचे केंद्र आहे.आपल्या मनात अनेक विचार येत असतात. असेच विचार इतरांच्या मनात देखील येत असतातच.आपल्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच माहित असते. इतरांच्या मनात काय चालले आहे त्या विषयी मात्र माहीत नसते. पण, काही का असेना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र आपोआप दिसून येतात. त्यावेळी कोणी दु:खात असेल तर कोणी आनंदी असेल पण, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून माणुसकीच्या नात्याने आपण मदत करावा किंवा सांत्वना देण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्याला सुखद समाधान मिळाल्याचा विशेष आनंद होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य-* फक्त सौंदर्यच सर्व काही नसते. कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत ."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://surveyheart.com/form/66ad9d9e311b89197db7723b••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟦 *_ या वर्षातील २१८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: ब्राझिलमधे रिओ-डी-जानिरो येथे ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे.**१९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन ’सोयूझ-यू’ हे अंतराळयान ’मीर’ अंतराळस्थानकाकडे रवाना**१९९७: फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर**१९९४: इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा ’होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान**१९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.**१९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.**१८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.*🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: जेनीलिया डिसूझा -- भारतीय चित्रपट अभिनेत्री**१९८०: वत्सल शेठ -- भारतीय अभिनेता, आणि उद्योजक**१९७५: काजोल – प्रसिद्ध अभिनेत्री**१९७३: डॉ. सोनिया कस्तुरे -- कवयित्री**१९६९: डी. के. शेख (दिलावर कादर शेख)-- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६९: वेंकटेश प्रसाद – जलदगती गोलंदाज**१९६८: सुचिता गोपालराव कुनघटकर -- कवयित्री**१९६५: रेखा कुलकर्णी-देशपांडे -- कवयित्री**१९६४: राजू रामचंद्रन डहाके -- कवी**१९६३: विठ्ठल तात्या संधान -- कवी**१९५८: भारती दिलीप सावंत -- कवयित्री ,लेखिका**१९५८: राजाराम गो.जाधव -- मंत्रालयातील निवृत्त सहसचिव तथा प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६: प्रा. डॉ. श्रृतिश्री बडगबाळकर-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९४९: प्रा. ज. रा. गवळीकर -- कवी* *१९४४: पद्माकर दराडे -- प्रसिद्ध कादंबरीकार**१९४४: उत्तरा बावकर -- भारतीय रंगमंच, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री (मृत्यू : १२ एप्रिल २०२३)**१९३३: विजया राजाध्यक्ष – लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९३०: नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१३ )**१९२८: राघोबाजी वामनराव गाणार -- कथाकार* *१९२२: प्रा.भगवंत गोविंदराव देशमुख -- लेखक, संपादक* *१९२२: नरेश भिकाजी कवडी -- भाषातज्ञ, कथाकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक (मृत्यू: ४ एप्रिल २००० )**१९१०: डॉ. रामचंद्र ज. जोशी -- लेखक* *१८९०: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी अभ्यासक (मृत्यू: ६ आक्टोबर १९७९ )**१८६९: नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर -- ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक व कोशकार (मृत्यू: ५ मार्च १९६८ )**१८५८: वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (मृत्यू: ११ जून १९२४ )*🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:शांता दत्तात्रेय गणोरकर-- कवयित्री, लेखिका (जन्म:२४ मे १९२५)**२०२०: शिवाजीराव पाटील निलंगेकर- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (जन्म :९ फेब्रुवारी १९३१ )* *२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४ )**२००१: ज्योत्स्‍ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.(जन्म: ११ मे १९१४ )**२०००: लाला अमरनाथ भारद्वाज – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर (मृत्यू: ११ सप्टेंबर १९११ )**१९९२: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (जन्म:५ फेब्रुवारी १९०५ )**१९९१: सोइचिरो होंडा -- होंडा कंपनीचे संस्थापक जपानी अभियंता आणि उद्योगपती ( जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)**१९८४: रिचर्ड बर्टन – अभिनेता (जन्म: १० नोव्हेंबर १९२५ )**१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्‍रो यांनी गोळी झाडुन घेऊन आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी प्रारंभ झालेल्या *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* ला पाहता पाहता नऊ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एक प्रयत्नवरील google फॉर्म भरून आपले अमूल्य प्रतिक्रिया कळवावे. ही नम्र विनंतीसंयोजक :- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरुन एनडीएच्या मित्रपक्षात बिघाडी? नितीश कुमारांच्या जेडीयूचा केंद्राला सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विद्यार्थ्यांनो, जीवनात दूरदृष्टी ठेवून कष्ट करा, प्रसिद्ध अंध उद्योजक डॉ. भावेश भाटीया यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर!:मराठवाड्यातील आमदारांची फडणवीसांच्या बंगल्यावर बैठक; राजकीय वर्तुळातील मोठी घडामोड*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सात दशकांनंतर आगामी साहित्य संमेलन होणार राजधानी दिल्लीत !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात भीषण अपघातात 2 ठार; नाशिकमध्येही बस-कारची धडक, 2 महिलांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, शुटआऊटमध्ये 4-2 ने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा पराभव ; 32 रन्सने श्रीलंकेने दिली मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 रेनवॉटर हार्वेस्टिंग : पाण्याची साठवण व पुनर्भरण 📙 सर्व मोठ्या गावांचे शहरीकरण झाले. शहरांचे काँक्रिटीकरण झाले. काँक्रिटच्या जंगलाला डांबराच्या रस्त्यांची जोड मिळाली. मग या साऱ्या शहरावर पडणारे पाणी जमिनीत मुरणार कसे ? ते झपाट्याने वाहून जाणार. गटारांतून नालीमध्ये, नालीतून नदीकडे वाहणार. पुन्हा या शहरी वस्तीला पाणी पुरवायचे कुठून ? नळाद्वारे पुरवायला पाणी आणायचे कुठून ? यासारख्या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधताना जगातील अनेक ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कल्पना प्राधान्याने मांडली गेली. जेथे पाऊस जास्त पडतो, तो कालावधी अल्प असतो. पडलेला पाऊस स्वतःबरोबर बहुमोल मातीचा थर घेऊन जातो. ती माती गाळा रूपाने नदीतून वाहत धरणांच्या भिंतीजवळ साचते व धरणे हळूहळू निकामी होतात. तसेच डोंगरावरची माती वाहून गेल्याने डोंगर बोडके, खडकाळ होतात व पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. हा झाला उघड्या जमिनीसंदर्भातला प्रश्न. दुसरा प्रश्न काँक्रिटच्या जंगलातला वर उल्लेखलेला. दोन्ही प्रश्नांना उत्तर एकच. ते म्हणजे जमेल तसे, जमेल तितके पाणी आडवा, जमवा व जिरवा. पाणी अडवायचे उपाय शहरात सोपे. छपरावरचे, गच्चीवरचे, पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे एकत्रित करून इमारतीच्या शेजारी वा पोटात बांधलेल्या टाकीत साठवायचे. पावसाळा संपल्यावर त्याचाच वापर पिण्याखेरीज लागणाऱ्या अन्य वापरासाठी करायचा. आसाम, मेघालय, नागालँड या उतारावरच्या टेकड्यांच्या प्रदेशात ही पद्धत गेली अनेक वर्षे घराघरांतून वापरली गेली आहे. टाकी पाण्याने भरली, तर जास्तीचे पाणी जवळच खणलेल्या एका खड्डावजा कुपनलिकेत सोडायचे. आठ ते दहा सेंटीमीटर व्यासाचा दोन तीन मीटर खोलीचा खड्डाही या कामी उपयोगी पडतो. भूजलपातळी वाढण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होतो. शहरात, गावात कूपनलिका खणल्या जातात, पण अनेकदा पाणी लागत नाही. अशा कूपनलिकांमध्येही असे जवळपासचे पाणी भू उदरात भरण्यासाठी सोडता येते. दहा हजार चौरस मीटरच्या सर्वसामान्य इमारतीच्या गच्चीवरचे पाणी साठवल्यास किमान तीन महिने त्या इमारतीत राहणाऱ्या सर्वांना पावसाळ्यात व त्यानंतरचे दोन महिने साठवलेल्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो. महानगरांमधून इमारतीचे नकाशे मंजूर करून तिला परवानगी देताना अशी रचना करणे आता गरजेचे वाटू लागले आहे. पुणे महानगरपालिकेने स्वतःच्या विस्तीर्ण इमारतीत तशी रचना करायला सुरुवातही केली आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या एका वाक्यात अन्य ठिकाणच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा सारा अर्थ सामावतो. उतारावर, डोंगरावर समतल बांधांची रचना यासाठी केली जाते. कंटूरबंडिंग या नावाने ती ओळखली जाते. पावसाचे पाणी या विविध बांधांना अडते, जिरते, माती वाहून नेणे थांबते. याशिवाय मोठ्या पावसात वाहणारे पाणी पाझर तलाव बांधून अडवले जाते. पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपला की, त्यानंतर शेती, जनावरे, पक्षी यांना या पाण्याचा अगदी मार्चपर्यंतही उपयोग होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाझर तलावाचे पाणी जमिनीत मुरल्याने त्या परिसरातल्या व खालच्या भागातल्या विहिरींची भूजलपातळी उंचावते. महाराष्ट्रातील भूजलपातळी १९५० साली होती, त्याच्या दुपटीने खोलवर गेली आहे. याचाच अर्थ ६ मीटरवर विहिरीला बारा महिने पाणी असायचे, तिथे आता २० मीटरपर्यंत खोल जावे लागते. कुपनलिकांची अवस्था याहूनही वाईट आहे. अनेक ठिकाणी दोनशे फुटांपेक्षा जास्त खोल गेल्याशिवाय पाणी लागत नाही. गावाच्या शिवारात पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी किमान पन्नास टक्के पाणी या पद्धतीने अडवणे, जिरवणे शक्य असते, असे प्रयोगाअंती अनेकांनी सिद्ध केले आहे. अण्णासाहेब हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे, तरुण भारत संघाच्या राजेंद्रसिंह यांनी राजस्थानमध्ये, विलासराव साळुंके यांनी पुरंदर जिल्ह्यातील केलेल्या प्रयोगांतून या गावांची पाण्याची गरज भागू लागली आहे. गावात हिरवाई निर्माण झाली आहे, गरज आहे अशा प्रयोगांतून अन्य गावातील गावकऱयांनी प्रेरणा घेण्याची. शेताच्या खोलगट भागात चर खणून शेततळी घेण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. पण सार्वत्रिक प्रयोगातून सारा परिसर हिरवागार करण्याचे प्रयत्न मात्र कमी पडत आहेत.छोट्या नदीमध्ये, ओढ्यांमध्ये ठराविक अंतरावर बंधारे घालण्याच्या सरकारी पातळीवरच्या प्रयत्नांनासुद्धा यश येत आहे. ओढ्याच्या पात्रातली दगड, वाळू सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भरून व्यवस्थित बंधारा बांधता येतो. असे बंधारे आठ ते दहा वर्षे चांगले टिकतात.इस्रायलसारख्या देशात जेमतेम सहा ते दहा इंच वार्षिक पाऊस पडतो. याउलट भारताच्या अनेक भागांत सरासरी चाळीस ते पन्नास इंच पाऊस पडतो. महाराष्ट्रातील अगदी दुष्काळी भागातसुद्धा पावसाचे वार्षिक प्रमाण वीस इंच एवढे आहे. इस्रायलने पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्याचा गेली पन्नास वर्षे प्रयत्न केला आहे. याउलट भारतातील पावसाचे पाणी आजही बहुतांश वाहून जाते. पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अक्षरश: भेडसावू लागतो.यावरचा एकमेव उपाय म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाण्याचे पुनर्भरण, पुनर्वापर करण्याचा आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार माणसाला फुलवतो; परंतु त्याला कधीही आधार देत नाही.- रस्किन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणता देश श्रीरामाचे टपाल तिकिट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?२) महाराष्ट्रातील पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव कोणते ?३) वर्ल्ड अग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार २०२४ कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे ?४) 'दास' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगातील पहिला थोरियम आधारित न्युक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे ?*उत्तरे :-* १) लाओस २) राळेगण सिद्धी, अहमदनगर ३) महाराष्ट्र ४) चाकर, नोकर ५) चीन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीराम पाटील जगदंबे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 भारती सावंत, साहित्यिक, मुंबई👤 अभिनंदन प्रचंड, विषय शिक्षक, धर्माबाद👤 मनोज मानधनी, धर्माबाद👤 विकास कांबळे👤 शेख वाजीद👤 दत्तात्रय सीतावार, कराटे प्रशिक्षक, धर्माबाद👤 किरण सोनकांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु मानुष करि जानते ते नर कहिये अन्ध ।यहां दुखी संसारमें आगे यमके बन्ध ॥ 34 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तेल आणि तूप जरी भिन्न असतील तरी त्यांना बनण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो फक्त त्यांनाच माहीत असते. म्हणूनच ते दीर्घकाळ टिकून राहताना दिसत असतात. सोबतच त्यांची जागा सुद्धा योग्य ठिकाणी बघायला मिळत असते. या दोघांमधून आजच्या माणसाला खूप काही शिकण्यासारखे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इमानदारीचेे फळ*------------$$$$-------------एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते.गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात ! त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते, "मी पण जाणार त्यादिवशी दरबारात"आई समजावते कि, "तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार, तुझी निवड कशी होईल ? तू दिसायलाही फार सुंदर नाहीस"मुलगी म्हणते, "ते मलाही माहित आहे, पण या निमित्ताने मला राजकुमारजवळ थोडा वेळ तरी जाता येईल. जवळून पाहता येईल. इतकेही मला पुरेसे आहे"ठरलेल्या दिवशी शंभरेक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात. त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते. दरबार भरतो. राजकुमार येतो. राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक "बी" काढून देतो. सर्वाना बिया देऊन झाल्यावर, राजकुमार सांगतो, "हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा. त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या. जिच्या कुंडीतल्या झाडाचे फुल सर्वात जास्त सुंदर असेल, तिच्याशी मी लग्न करेन "सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात. नोकराची मुलगीही घरी येते. एका कुंडीत ते बी पेरते. रोज काळजीने त्याला खत, पाणी वगैरे देते. पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही. मुलगी हार मानत नाही. एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते. त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते. पण कुंडीतून काहीच उगवत नाही. यातच तीन महिन्याची मुदत संपत येते. शेवटी ती निराश होते. तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात. प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते. ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते, ज्यात काहीच उगवलेले नसते. सगळ्याजणी तिला हसतात. इतक्यात राजकुमार हजर होतो. तो सर्व कुंड्याचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि, "ती मुलगी मी निवडली आहे, "सगळा दरबार चकित होतो. काही सुंदर मुली चिडतात. त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते, "जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही, तिची निवड का ? उलट माझ्या कुंडीत पहा, किती सुंदर गुलाब फुलला आहे. मग माझी निवड का नाही ?"राजकुमार हसून उत्तर देतो, "फक्त ती (नोकराची मुलगी) या पदासाठी योग्य आहे. कारण तिनेच एकटीने "इमानदारीचे" फुल फुलवले आहे. मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या. त्यातून फुल तर सोडाच पण काहीही उगवणार नव्हतेच."सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो ! आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाझरू लागतात. *तात्पर्य* : इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे ! तो ज्याच्याकडे आहे, तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो !! मग भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी !! म्हणून महत्वाची *इमानदारी, सलाम करेल दुनियादारी !!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/uKjwW3NMPZfuD7Vy/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⚪ *_ या वर्षातील २१६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ⚪ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.**२०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.**१९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.**१९६०: नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.**१९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.**१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.**१९००: ’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.**१७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.* ⚪ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚪••••••••••••••••••••••••••••••••• *१९९२: रसिका सुनील ( धबडगांवकर) -- अभिनेत्री**१९८४: सुनील छेत्री -- भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू* *१९८१: मनीष पॉल -- भारतीय अभिनेता, टीव्ही होस्ट, अँकर, मॉडेल आणि गायक**१९७७: सुनील ग्रोव्हर. --- भारतीय विनोदी अभिनेता* *१९६७: बिपिन मयेकर -- लेखक**१९६५: प्रा. डॉ. शुभांगी रामचंद्र परांजपे (डोरले)-- कवयित्री, लेखिका* *१९६०: ईश्वर विठ्ठलराव मगर -- कवी,लेखक समाज प्रबोधन**१९५९: अजय बिरारी -- अहिराणी व मराठी कवी,गझलकार व अभिनेता* *१९५६: विजया सुकाळे. -- लेखिका* *१९५६: बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू**१९५६: प्रकाश शंकरराव जंजाळ-- लेखक* *१९४९: रमेश भाटकर -- मराठी चित्रपट, रंगमंच आणि टीव्ही अभिनेता(मृत्यू: ४ फेब्रुवारी २०१९ )**१९४२: अनु आगा -- भारतीय उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या**१९३६: पंडित छन्नूलाल मिश्रा -- बनारसमधील प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक**१९३४: डॉ. गो. बं. देगलूरकर -- मूर्तिशास्त्राचे अभ्यासक**१९३३: माणिक कामिनी कदम -- कामिनी कदम या नावाने प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री (मृत्यू: १८ जून २००० )**१९३२: भा.ल.महाबळ -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध विनोदी लेखक**१९२४: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३ )**१९१८: जयदेव (जयदेव वर्मा )-- हिंदी चित्रपटांतील संगीतकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८७ )**१९१७: मनहर देसाई -- अभिनेते (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९२ )**१९१६: शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर (मृत्यू: २० एप्रिल१९७० )**१९००: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६ )**१८९८: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.(मृत्यू:२८ फेब्रुवारी १९६६ )**१८८७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर-- कवी, जुन्या पिढीतील महत्वाचे समीक्षक (मृत्यू: १७ डिसेंबर १९४२ )* *१८८६: मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४ )**१८६३: सालोमन शालोम आपटेकर -- नाटककार व किर्तनसंहिता- लेखक (मृत्यू: २१ हे १९५७ )* ⚪ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚪ ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: नामदेव धोंडो (ना .धो.) महानोर -- प्रसिद्ध मराठी कवी आणि गीतकार (जन्म : १६ सप्टेंबर १९४२)**२०२२: मिथिलेश चतुर्वेदी --भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता (जन्म : १५ऑक्टोबर१९५४)**२०२०: जॉन ह्यूम - आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी (जन्म: १८ जानेवारी १९३७ )* *२००७: सरोजिनी वैद्य – प्रसिद्ध लेखिका (जन्म: १५ जून १९३३ )**१९९३: स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६ )**१९५७: देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव (जन्म: २२ मे १९०० )**१९३०: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नजर हटी ; दुर्घटना घटी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महिला सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ तर मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली, नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक नुकसान भरपाईसाठी ५९६ कोटींचा निधी मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी कर्मचाऱ्यांचा पगार होणार वेळेवर, कर्मचाऱ्यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्याच्या प्रशासकीय कामकाजात ‘महिला राज’; शोमिता बिश्वास ठरल्या पहिल्या महिला वनबल प्रमुख*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेविरुद्धच्या पहिला एकदिवसीय सामना अनिर्णित, दोघांच्या धावा झाल्या समान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जंतूचा शोध कोणी लावला ?* 📙 १८६० च्या आधी कोणालाच जंतू म्हणजे काय याची माहिती नव्हती. रोग कशामुळे होतात, याबद्दलचे अनेक समज प्रचलित होते. देवाचा कोप, भूत-प्रेत यांची बाधा, जादूटोणा अशा अनेक कारणांचा यात समावेश होता. त्यामुळे रोगांवरचे उपाय हे देवाची आराधना करणे, बळी देणे, मांत्रिकाकडून भूत उतरवणे, गळ्यात ताईत गंडे बांधणे आणि गावातच कुणाला औषधी वनस्पतींबद्दल माहिती असेल तर त्यांच्याकडून उपचार करून घेणे, या प्रकारचे असत. आपल्या देशातील आयुर्वेद उपचार पद्धतीतील त्रिदोष संकल्पनेनुसार खूप पूर्वीपासून उपचार केले जात. सर्वप्रथम १८६० मध्ये लुई पाश्चर या फ्रेंच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञाने हवेत जीवाणू असतात हे दाखवून दिले. त्यामुळे रोग का होत असावेत याचा नवीन विचार सुरू झाला. पाश्चरने रोगजंतूंमुळे रोग होतात या संकल्पनेचा विकास व पाठपुरावा केला. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने १८७७ मध्ये अँथ्रॅक्स हा रोग जीवाणूपासून होतो हे दाखवून दिले. यानंतर सुक्ष्म जीवशास्त्राचे सुवर्णयुग सुरू झाले. व एकामागे एक अनेक जीवजंतूंचा शोध लागला. या जंतुंचे जिवाणू (Bacteria) व विषाणू (Virus) हे दोन प्रकार पडतात. यापैकी विषाणू केवळ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक खालीच दिसू शकतात. जीवाणू मात्र साध्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली सुद्धा दिसतात. आकारातील बदला खेरीच त्यांच्यात पुष्कळ फरक असतात. कॉलरा, टायफॉइड, क्षयरोग हे जिवाणूंमुळे होणारे रोग आहेत; तर पोलिओ, कावीळ, गोवर, गालफुगी हे रोग विषाणूंमुळे होतात. जिवाणूंना मारणारी प्रभावी औषधे आजकाल उपलब्ध आहेत, पण विषाणूंना मारतील अशी प्रभावी औषध आजही उपलब्ध नाहीत.*महत्त्वाच्या जंतुंचा शोध* -जंतू -- साल -- शास्त्रज्ञ गोनोकोक्कस -- १८७९ -- निसरक्षयरोग -- १८८२ -- रॉबर्ट कॉककुष्ठरोग -- १८७४ -- हॅन्सनन्युमोकोक्कस -- १८८६ -- फ्रेंकेलघटसर्प -- १८८४ -- लोफ्लरकॉलरा -- १८८३ -- रॉबर्ट कॉकगोवर -- १९५४ -- एंडर्स, पीबलसइन्फ्यूएंझा -- १९३३ -- स्मिथ, ॲन्ड्र्यूज र्‍हायनो व्हायरस (सर्दीपडशाचा विषाणू) -- १९६० -- टूरेल व इतर*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभव हा महान शिक्षक आहे , पण तो मोबदला मात्र फार घेतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे ?२) भारताचे प्रथम नागरिक कोण असतात ?३) अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ( आर्टी ) च्या कार्यालयाचे उद्घाटन कोठे होणार आहे ?४) 'दंडवत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'टायगर प्रोजेक्ट' हा उपक्रम कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले होते ? *उत्तरे :-* १) उत्तरप्रदेश २) राष्ट्रपती ३) मुंबई ४) नमस्कार ५) इंदिरा गांधी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 अजय बिरारी, साहित्यिक, नाशिक👤 रमेश करपे, शिक्षक, कुंडलवाडी👤 प्रदिप कारले👤 पोतन्ना चिंचलोड, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु मानुष करि जानते ते नर कहिये अन्ध ।यहां दुखी संसारमें आगे यमके बन्ध ॥ 34 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण किती खरे बोलतो आणि किती खोटे बोलतो हे,फक्त आपल्यालाच सर्वांत जास्त माहित असते. कारण, दुसऱ्याला कितीही खोटे सांगून स्वतः चा समाधान करण्यासाठी भलेही प्रयत्न असेल तरीही अंतर्मनाला सर्व काही माहित असते त्यामुळे प्रयत्न करून सुद्धा स्वतःला पाहिजे तो समाधान मिळत नाही. म्हणून असेही वागू नये की, तीच सवय लागून जगण्याची वेळ आपल्यावर येईल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतःची किंमत* "एकदा एक श्रीमंत माणूस नदी काठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर, एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने, तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली.हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्‍याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्यांने स्वत:चा किंमतीएवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.'*तात्पर्य :- माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KagHN9Fs8UmWSC66/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_ या वर्षातील २१५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कारासाठी निवड.**१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.**१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले.**१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्‍नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर**१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.**१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.**१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 •••••••••••••••••••••••••••••••••*२००१: चिन्मय मोघे -- कवी, नाटककार**१९७९: प्रशांत देशमुख-- लेखक, प्रसिद्ध व्याख्याते**१९७४: सिद्धार्थ रॉय कपूर -- भारतीय चित्रपट निर्माता आणि रॉय कपूर फिल्म्सचा संस्थापक**१९६७: गजानन यशवंत देसाई -- कादंबरीकार* *१९६७: प्रा.डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे -- कवी, लेखक, संपादक* *१९६६: सुनील ओवाळ -- कवी, लेखक**१९६१: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले -- लेखक, कवी, वक्ते* *१९५८: अविनाश धर्माधिकारी-- भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, विचारवंत, लेखक**१९५८: अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक**१९४७: मा. रमेश बैस -- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल**१९४१: ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ**१९३८: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे -- नाटककार, कवी आणि निबंधलेखक ( मृत्यू:२६ आक्टोबर २०१३)**१९३५: डॉ. रमेश शास्त्री-- कवि आणि गीतकार (मृत्यू: ३० एप्रिल २०१० )**१९२८: दत्तात्रय गंगाधर कुलकर्णी (दत्ताजी कुलकर्णी) -- लेखक* *१९२३: विष्णुपंत श्रीनिवासराव सुभेदार-- लेखक, संपादक* *१९१८: दादा जे.पी.वासवानी –आध्यात्मिक गुरू,सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व,(मृत्यू: १२ जुलै, २०१८ )**१९१०: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८ )**१८७७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर -- कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ डिसेंबर १९४२ )**१८७६: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (मृत्यू: ४ जुलै १९६३ज्ञ)**१८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, (मृत्यू: १६ जून १९४४ )**१८३५: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (मृत्यू: २१ जानेवारी १९०१ )**१८२०: जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: नितीन चंद्रकांत देसाई -- भारतीय कला दिग्दर्शक , प्रॉडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता (जन्म: ६ ऑगस्ट १९६५ )**२०२१: प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत (जन्म: २० जून १९२४ )**२०२०: पंडित गोविंद भिलारे -- अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक (जन्म: ८ जून १९७४)**२०१३: बाबासाहेब केदार--विदर्भातील ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री (जन्म: १५ मे १९२८ )**२०१०: कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता (जन्म: २२ फेब्रुवारी १९२० )**२००८: चेतन दातार -- मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी (जन्म: १९६४)**१९७९: करण दिवाण -- हिंदी चित्रपटांमधील चित्रपट अभिनेता (जन्म: ६ नोव्हेंबर १९१७ )**१९३४: पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २ आक्टोबर १८४७ )**१९२२: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (जन्म: ३ मार्च १८४७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मैत्री दिन - 04 ऑगस्ट त्यानिमित्ताने *जिंदगी का नाम दोस्ती ....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; SC,ST मध्ये उपवर्ग तयार करण्यास मंजुरी, आरक्षणाचा लाभ फक्त पहिल्या पिढीला मिळावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीकडे अपवादात्मक दृष्टीनं पाहणं गरजेच; राज्य मागास प्रवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भिवंडी महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान मोहीम, आठशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *PSI परीक्षेत अमोल घुटुकडे राज्यात पहिला, सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट; MPSCचा निकाल जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश:सातारा जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटनस्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळे यांना राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी20 मालिका विजयानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, प्रेमदासा स्टेडियम मध्ये आज होणार पहिला एकदिवसीय सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सागरगड*अलिबागपासून ७ किमी.अंतरावर डोंगरावर हा शिवकालीन किल्ला आहे. हा समुद्रसपाटीपासून सुमारे १३५७ फूट उंचावर आहे. येथे जाण्याकरीता अलिबाग - पेण मार्गावरील खंडाळा गावातून रस्ता आहे. गावाच्या पूर्वेला डोंगर दिसतो. त्याच्या पाठीमागे सागरगड लपलेला आहे. खंडाळा गावातून फलवाटेने गडावर जावे लागते. गडाच्या निम्म्या उंचीवर सिध्देश्वर मंदिर आहे. या मंदिराजवळच आश्रम तसेच विहीर आहे. येथे विश्रांतीची सोय होऊ शकते. पावसाळयाच्या दिवसात मंदिराजवळच एक धबधबा वहात असतो. श्रारावणी सोमवारी येथे बरेच भाविक हजेरी लावतात. या आश्ररमाच्या थोडं अलिकडेच एक वाट डावीकडे वर सागरगडाकडे जाते. सिध्देश्वरपासून साधारणत फन ते एक तासात आपण सागरगडावर येवून पोहचतो. सागरगडाच्या मुख्य दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. परंतू त्याच्या बाजूचे दोन बूरूज पडक्या अवस्थेत अस्तत्त्वात आहेत. या प्रवेशारातून गडावर प्रवेश करायचा. माची व बालकिल्ला अशा स्वरूपात गडाची रचना आहे. बालेकिल्लेवर एक लहानसं तळं मंदिर तसेच एका पडक्या इमारतीचे अवशेष आहेत. गडावर एक बारमाही पाण्याचे कुंड (पांडवकुंड) आहे.माचीवर सतीची माळ नावाची जागा आहे. तिथं नऊ थडगी आहेत. या बाजूच्या टोकाला एक सुळका आहे त्यास वानरटोक असे म्हटले जाते. गडावर इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके व मित्र हे थोडकेच असावेत पण ते चांगले असावेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मेरी झाशी नही दुंगी'* ही घोषणा कोणाची आहे ?२) २०२४ चा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?३) लोकसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी किती रुपये निधी दिला जातो ?४) 'दंत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वतंत्र भारताकडून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी पहिली खेळाडू कोण ठरली ?*उत्तरे :-* १) राणी लक्ष्मीबाई २) डॉ. सुधा मूर्ती ३) ५ कोटी रुपये ४) दात ५) मनू भाकर, शूटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जी. पी. मिसाळे, सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 काशिनाथ उशलवार, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 कैलास चंदोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 दुर्गा डांगे👤 प्रतिक गाडे👤 आनंद पाटील धानोरकर👤 शिवानंद गायकवाड👤 रवींद्र वाघमारे, शिक्षक, नांदेड👤 दयानंद भुत्ते👤 दिगंबर वाघमारे, संपादक, कंधार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान समागम प्रेम सुख दया भक्ति विश्वास।गुरु सेवा ते पाइये सतगुरु चरण निवास ॥ 33 ॥ ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथे पिकते तेथे विकत नाही असे, अनेकदा ऐकण्यात आले आहे. तरीही पिंकाची असो किंवा आपल्या विचारांची पेरणी करायचे थांबवू नये. समाजात आजही बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या पिंकाची आवश्यकता आहे तीच आवश्यकता विचारांची सुद्धा आहे. कारण समाजात राहणारे सर्वच लोक एक सारखे नसतात. काही लोक दु:खी असतात तर काहींच्या बाबतीत विचार करणे सुद्धा अवघड जाते. म्हणून ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे पिकांची असो किंवा आपल्या विचारांची आवर्जून पेरणी करावी. ती पेरणी करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे तो, अधिकार आपण कोणत्याही परिस्थितीत गमावू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अति शहाणा त्याचा बैल रिकामा* " एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते. गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.*तात्पर्य - अति शहाणा त्याचा बैल रिकामा "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KagHN9Fs8UmWSC66/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_ या वर्षातील २१५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कारासाठी निवड.**१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.**१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले.**१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्‍नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर**१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.**१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.**१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 •••••••••••••••••••••••••••••••••*२००१: चिन्मय मोघे -- कवी, नाटककार**१९७९: प्रशांत देशमुख-- लेखक, प्रसिद्ध व्याख्याते**१९७४: सिद्धार्थ रॉय कपूर -- भारतीय चित्रपट निर्माता आणि रॉय कपूर फिल्म्सचा संस्थापक**१९६७: गजानन यशवंत देसाई -- कादंबरीकार* *१९६७: प्रा.डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे -- कवी, लेखक, संपादक* *१९६६: सुनील ओवाळ -- कवी, लेखक**१९६१: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले -- लेखक, कवी, वक्ते* *१९५८: अविनाश धर्माधिकारी-- भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, विचारवंत, लेखक**१९५८: अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक**१९४७: मा. रमेश बैस -- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल**१९४१: ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ**१९३८: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे -- नाटककार, कवी आणि निबंधलेखक ( मृत्यू:२६ आक्टोबर २०१३)**१९३५: डॉ. रमेश शास्त्री-- कवि आणि गीतकार (मृत्यू: ३० एप्रिल २०१० )**१९२८: दत्तात्रय गंगाधर कुलकर्णी (दत्ताजी कुलकर्णी) -- लेखक* *१९२३: विष्णुपंत श्रीनिवासराव सुभेदार-- लेखक, संपादक* *१९१८: दादा जे.पी.वासवानी –आध्यात्मिक गुरू,सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व,(मृत्यू: १२ जुलै, २०१८ )**१९१०: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८ )**१८७७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर -- कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ डिसेंबर १९४२ )**१८७६: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (मृत्यू: ४ जुलै १९६३ज्ञ)**१८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, (मृत्यू: १६ जून १९४४ )**१८३५: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (मृत्यू: २१ जानेवारी १९०१ )**१८२०: जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: नितीन चंद्रकांत देसाई -- भारतीय कला दिग्दर्शक , प्रॉडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता (जन्म: ६ ऑगस्ट १९६५ )**२०२१: प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत (जन्म: २० जून १९२४ )**२०२०: पंडित गोविंद भिलारे -- अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक (जन्म: ८ जून १९७४)**२०१३: बाबासाहेब केदार--विदर्भातील ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री (जन्म: १५ मे १९२८ )**२०१०: कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता (जन्म: २२ फेब्रुवारी १९२० )**२००८: चेतन दातार -- मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी (जन्म: १९६४)**१९७९: करण दिवाण -- हिंदी चित्रपटांमधील चित्रपट अभिनेता (जन्म: ६ नोव्हेंबर १९१७ )**१९३४: पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २ आक्टोबर १८४७ )**१९२२: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (जन्म: ३ मार्च १८४७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मैत्री दिन - 04 ऑगस्ट त्यानिमित्ताने *जिंदगी का नाम दोस्ती ....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; SC,ST मध्ये उपवर्ग तयार करण्यास मंजुरी, आरक्षणाचा लाभ फक्त पहिल्या पिढीला मिळावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीकडे अपवादात्मक दृष्टीनं पाहणं गरजेच; राज्य मागास प्रवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भिवंडी महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान मोहीम, आठशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *PSI परीक्षेत अमोल घुटुकडे राज्यात पहिला, सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट; MPSCचा निकाल जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश:सातारा जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटनस्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळे यांना राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी20 मालिका विजयानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, प्रेमदासा स्टेडियम मध्ये आज होणार पहिला एकदिवसीय सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सागरगड*अलिबागपासून ७ किमी.अंतरावर डोंगरावर हा शिवकालीन किल्ला आहे. हा समुद्रसपाटीपासून सुमारे १३५७ फूट उंचावर आहे. येथे जाण्याकरीता अलिबाग - पेण मार्गावरील खंडाळा गावातून रस्ता आहे. गावाच्या पूर्वेला डोंगर दिसतो. त्याच्या पाठीमागे सागरगड लपलेला आहे. खंडाळा गावातून फलवाटेने गडावर जावे लागते. गडाच्या निम्म्या उंचीवर सिध्देश्वर मंदिर आहे. या मंदिराजवळच आश्रम तसेच विहीर आहे. येथे विश्रांतीची सोय होऊ शकते. पावसाळयाच्या दिवसात मंदिराजवळच एक धबधबा वहात असतो. श्रारावणी सोमवारी येथे बरेच भाविक हजेरी लावतात. या आश्ररमाच्या थोडं अलिकडेच एक वाट डावीकडे वर सागरगडाकडे जाते. सिध्देश्वरपासून साधारणत फन ते एक तासात आपण सागरगडावर येवून पोहचतो. सागरगडाच्या मुख्य दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. परंतू त्याच्या बाजूचे दोन बूरूज पडक्या अवस्थेत अस्तत्त्वात आहेत. या प्रवेशारातून गडावर प्रवेश करायचा. माची व बालकिल्ला अशा स्वरूपात गडाची रचना आहे. बालेकिल्लेवर एक लहानसं तळं मंदिर तसेच एका पडक्या इमारतीचे अवशेष आहेत. गडावर एक बारमाही पाण्याचे कुंड (पांडवकुंड) आहे.माचीवर सतीची माळ नावाची जागा आहे. तिथं नऊ थडगी आहेत. या बाजूच्या टोकाला एक सुळका आहे त्यास वानरटोक असे म्हटले जाते. गडावर इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके व मित्र हे थोडकेच असावेत पण ते चांगले असावेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मेरी झाशी नही दुंगी'* ही घोषणा कोणाची आहे ?२) २०२४ चा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?३) लोकसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी किती रुपये निधी दिला जातो ?४) 'दंत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वतंत्र भारताकडून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी पहिली खेळाडू कोण ठरली ?*उत्तरे :-* १) राणी लक्ष्मीबाई २) डॉ. सुधा मूर्ती ३) ५ कोटी रुपये ४) दात ५) मनू भाकर, शूटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जी. पी. मिसाळे, सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 काशिनाथ उशलवार, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 कैलास चंदोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 दुर्गा डांगे👤 प्रतिक गाडे👤 आनंद पाटील धानोरकर👤 शिवानंद गायकवाड👤 रवींद्र वाघमारे, शिक्षक, नांदेड👤 दयानंद भुत्ते👤 दिगंबर वाघमारे, संपादक, कंधार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान समागम प्रेम सुख दया भक्ति विश्वास।गुरु सेवा ते पाइये सतगुरु चरण निवास ॥ 33 ॥ ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथे पिकते तेथे विकत नाही असे, अनेकदा ऐकण्यात आले आहे. तरीही पिंकाची असो किंवा आपल्या विचारांची पेरणी करायचे थांबवू नये. समाजात आजही बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या पिंकाची आवश्यकता आहे तीच आवश्यकता विचारांची सुद्धा आहे. कारण समाजात राहणारे सर्वच लोक एक सारखे नसतात. काही लोक दु:खी असतात तर काहींच्या बाबतीत विचार करणे सुद्धा अवघड जाते. म्हणून ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे पिकांची असो किंवा आपल्या विचारांची आवर्जून पेरणी करावी. ती पेरणी करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे तो, अधिकार आपण कोणत्याही परिस्थितीत गमावू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अति शहाणा त्याचा बैल रिकामा* " एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते. गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.*तात्पर्य - अति शहाणा त्याचा बैल रिकामा "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - *जागर श्यामच्या कथांचा*भाग - पहिला https://drive.google.com/file/d/1zwGOKGITCyWah7P0rStBTFogYXSmqQma/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_ या वर्षातील २१४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.**१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर**१९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली जगातील अशा तर्‍हेची ही पहिलीच योजना आहे.**१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.**१९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.**१९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१८७६: कोलोरॅडॊ अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.**१७७४: जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: प्रवीण शिवाजी अक्कानवरू-- कवी, लेखक**१९७३: एकनाथ माधवराव डुमणे -- कवी**१९६७: डॉ.विक्रांत चंद्रकांत जाधव -- आयुर्वेद तज्ञ, लेखक**१९६६: अरुण नाईक -- कवी**१९६५: पौलस सुगंध वाघमारे -- कवी, लेखक* *१९६५: किशोरी शंकर पाटील-- लेखिका**१९६५: प्रा. डॉ. अनंत दादाराव राऊत -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९६२: दगडू लोमटे -- साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक* *१९६१: डॉ. अच्युत बन -- प्रसिद्ध डॉक्टर तथा लेखक* *१९५७: रामदास धोंडू गमरे -- कवी* *१९५७: डॉ.विनायक तुमराम -- कवी, लेखक, समीक्षक**१९५६: शेषराव माधवराव मोहिते -- ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते**१९५२: सदाशिव गोविंदराव पुंडपाळ -- मराठी साहित्यिक**१९५१: वृक्ष मित्र प्रकाश काळे -- लेखक* *१९५०: डॉ.गणेश नारायणदास देवी --भाषाशास्त्र तज्ज्ञ/भाषाशास्त्र अभ्यासक, लेखक**१९४४: नागोराव सोनकुसरे -- कवी* *१९४४: दामोदर मावजो -- गोव्यातील एक लघुकथा लेखक, कादंबरीकार, समीक्षक त्यांना २०२१ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित* *१९४४: प्रा.भगवान भाऊदेव काळे -- कादंबरीकार* *१९४१: शंकर विठोबा विटणकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९३९: सीमा रमेश ओवळेकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९३६: जयश्री गोपाळराव घारपुरे -- लेखिका* *१९३२: मनोहर म्हैसाळकर -- विदर्भ साहित्य संघाचे पूर्वअध्यक्ष आणि कुशल संघटक, साहित्य नाटकाचे जाणकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर २०२२ )**१९३२: महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (मृत्यू: ३१ मार्च १९७२ )**१९२९: डॉ.विश्वास रघुनाथ कानडे -- लेखक* *१९२९: श्री. ग. माजगांवकर -- पत्रकार, लेखक, प्रकाशक (मृत्यू :२० फेब्रुवारी १९९७ )**१९२४: सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (मृत्यू: १३ मार्च १९६७ )**१९२०: राजारामबापू पाटील-- भारतीय राजकारणी (मृत्यू: १७ जानेवारी १९८४ )**१९२०: ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – प्रसिद्ध लेखक, कवी व समाजसुधारक (मृत्यू: १८ जुलै १९६९ )**१९१९: मोती बीए -- भोजपुरी आणि हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक (मृत्यू: १८जानेवारी २००९ )**१९१८: बाबूराव गोविंदराव शिर्के -- बांधकाम व्यावसायिक (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१० )**१९१५: श्रीकृष्ण जनार्दन जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: १३जानेवारी १९८९ )**१९१३: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२ )**१८९९: कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६ )**१८८२: पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१),(मृत्यू: १ जुलै १९६२ )**१८३५: महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक.(मृत्यू: ८ आक्टोबर १८८८ )**१७४४: जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९ )*🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९१९: अनिल कांबळे -- नामवंत मराठी गझलकार कवी (जन्म :१९५३ )**२००८: हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (जन्म: २३ मार्च १९१६ )**२००८: अशोक मांकड – क्रिकेटपटू (जन्म: १२ आक्टोबर १९४६ )**२००५: फहाद – सौदी अरेबियाचा राजा (जन्म: १६ मार्च १९२१ )**१९९९: निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक.(जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ )**१९२०: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी,भगव्‌दगीतेचे भाष्यकार (जन्म: २३ जुलै १८५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागर श्यामच्या कथांचा भाग पहिला - सावित्रीचे व्रत" श्यामची आई " या पुस्तकातील 42 कथा शाळेतील मुलासाठी..... Audio Clip ऐकण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *फास्टॅगच्या नव्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून फास्टॅगचे केवायसी अनिवार्य होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा, 15 दिवसांत संयुक्त गट ब, क ची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दूध उत्पादक शेतकरी करणार महामार्ग मेगाब्लॉक आंदोलन, दूध दराबाबतचा सरकारचा तोडगा शेतकऱ्यांना अमान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तलाठ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार, महसूल मंत्र्यांची ग्वाही; बैठकीत विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील तीन ते चार दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर बडतर्फ, UPSC ने टाकले काळ्या यादीत, आता कोणत्याही परीक्षेला बसू शकणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत फायनलमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वावटळ* 📙 *****************फार मोठ्या प्रदेशावर पसरलेल्या, अनेक दिवस हिंडत धुमाकूळ घालणाऱ्या चक्रीवादळापेक्षा वावटळ कधीकधी अधिक विध्वंस घडवून आणते. हरिकेन वा टायफून याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वादळी प्रकाराला आपण 'वावटळ' म्हणतो. वावटळीचेसुद्धा एक केंद्र असतेच. या केंद्राभोवती प्रचंड वेगाने फिरणारे वारे घोंगावतात, त्यावेळी मध्ये सापडणाऱ्या कशाचीच धडगत नसते. चक्रीवादळाचा वेग बहुधा मोजता येतो, सांगता येतो; पण वावटळीत अनेकदा वेग मोजायची यंत्रे पार मोडून जातात. ब्युफोर्ट स्केल या प्रकारात बारा हा आकडा सर्वात धोकादायक समजला जातो. या पद्धतीने वाऱ्याचा वेग हे स्केल दाखवते. वावटळ येणार आहे वा येऊन गेली म्हणजे हा बाराचाच आकडा व्यक्त करायची पद्धत पडली आहे. अंदाजे अडीचशे ते चारशे किलोमीटर वेगाने वावटळ येऊन धडकते. वावटळ निर्माण होण्याचे कारण म्हणजे समुद्रावर कमी दाबाचा पट्टा गरम हवेमुळे निर्माण होतो, हेच. या पट्टय़ाकडे धाव घेणारी हवा बाष्पही ओढून आणते. बघता बघता हे वायूचे प्रवाह वेग घेत स्वतःभोवती फिरू लागतात. सुमारे तीनशे चारशे किलोमीटर एवढ्याच प्रदेशात या घडामोडी झपाटय़ाने घडतात. वावटळीचे केंद्र पाच ते पंचवीस किलोमीटर एवढे असू शकते. वावटळ बघता बघता किनाऱ्याकडे सरकू लागते. जमीन तापल्यामुळे भर दुपारी या भागात कमी दाब असतो. सुरुवातीला ज्या किनाऱ्याकडे वावटळ जाते तेथे एकदम हवेचा दाब कमी झाल्याचे जाणवू लागते. हवेमध्ये एक प्रकारचा सन्नाटा जाणवतो आणी काही वेळातच भीषण स्वरूपात द्वारे धिंगाणा घालू घालतात. सोसाटय़ाचा, पावसाचा वारा या दरम्यान चालू असतोच. पॅसिफिकमध्ये नेहमीच वावटळी उद्धवतात. उत्तर अमेरिकेचा संपूर्ण पश्चिम किनारा वर्षाकाठी आठ दहा वेळा या वावटळींना सामोरा जातो. नांगरलेली बोट नांगर उखडून कलंडणे किंवा महाकाय लाटेबरोबर किनाऱयावर फेकली जाणे यासारखे अविश्वासार्ह गोष्ट वावटळीत सहज घडते. अमेरिकेत एका वावटळीत रस्त्यावरील मोटार उचलून गरगरत एका घराच्या छपरावर विसावली होती. रस्त्यात उघड्यावर माणसे कधी थांबतच नाहीत; पण चुकून कोणी सापडला, तर रस्त्यातल्या पाचोळ्याबरोबर तोही इकडेतिकडे भिरकावला जातो. झाडे उन्मळून पडणे, घरे पिळवटून वेडीवाकडी होणे, हेही खास वावटळीचेच तांडव. अनेकदा हे भीषण वारे स्वतःबरोबर महाकाय लाटा आणतात. कित्येक फूट उंचीच्या लाटा सारा किनारा उद्ध्वस्त करतात. हा सारा काही तासांचा खेळ आटोपला की पुन्हा आभाळ पूर्ण निरभ्र होते; जसे काही घडलेच नव्हते, असा सूर्यप्रकाश पुन्हा पडतो. अटलांटिकवरील 'हरिकेन', हिंदी महासागरातील चक्रीवादळ हेही वावटळीचेच प्रकार.आजकाल या वावटळी उपग्रहाद्वारे आधी समजू शकतात. त्यांची दिशा कळते. त्या भागातील लोकांना तातडीचे इशारे देऊन जागे करता येते. जे मच्छीमार समुद्रावर निघाले असतील, त्यांना थांबवणे व समुद्रावरील लोकांना परतायची सूचना देणे या स्थानिक रेडिओवरून तातडीने केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या कोणी वावटळी पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत, त्यांना त्या विसरणे आयुष्यात कधीच शक्य होत नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटे पाहून जो घाबरत नाही, तोच खरा माणूस.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *भारतीय हॉकी टीमचा कर्णधार* कोण आहे ?२) महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी निवड झाली ?३) 'श्वेत खंड' म्हणून कोणत्या खंडास म्हटले जाते ?४) 'थवा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शब्दांचा वापर जेव्हा वाक्यात होतो तेव्हा त्यांना काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) हरमनप्रीत सिंग २) राजस्थान ३) अंटार्क्टिका खंड ४) समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव ५) पद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 एकनाथ डुमणे, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 गोविंद जाधव रोषणगावकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 संजीवकुमार हामंद, शिक्षक, करखेली👤 पवन कुमार भाले, धर्माबाद👤 मंगेश हानवते, गटसमन्वयक, नायगाव👤 आनंदराव पेंडकर, ग्रामसेवक, येवती👤 बंडू पाटील मोरे👤 सतिश दरबस्तेवार, कुंडलवाडी👤 विश्वनाथ चन्ने, कळमनुरी, हिंगोली👤 नागेश टिपरे👤 दिलीप साळुंके👤 साईनाथ पाटील मोकलीकर👤 शिनू दर्शनवाड👤 साईनाथ जायेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु कुलाल शिष्य कुम्भ हैं, गढ गढ काढै खोट ।अन्तर हाथ सहार दै बाहर बाहे चोट ॥ 32 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाजी बनवताना इतर साहित्या सोबत तिखट असलेली हिरवी मिरची आवर्जून टाकली जाते सोबतच मिरचीची चव सुद्धा इतर साहित्यापेक्षा वेगळी असते. भलेही जेवण करताना ताटातून तिला बाजूला सारले जात असले तरी तिच्याशिवाय बरेच पदार्थ बनत नाही. तसेच एखाद्या ज्वलंत, परखडपणे व सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच प्रकारे बाजूला सारले जात असते. म्हणून ती, व्यक्ती आपला सत्य मार्ग सोडते का...? म्हणून एकवेळ तर काय दहा वेळा बाजूला सारले तरी चालेल कधीही सत्याची साथ सोडू नये. शेवटी जशी तिखट मिरचीची आठवण होते तीच आठवण एक दिवस सत्य बोलणाऱ्या व्यक्तीची सुद्धा होत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्‍याच्‍याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्‍याला विचारले,’’तुमच्‍याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्‍ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्‍ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्‍हणाला,’’ राजा, आपण आपल्‍या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्‍यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्‍हणाला,’’ माझ्याकडे असलेल्‍या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्‍ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्‍याला आपण अमूल्‍य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्‍याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्‍यामुळे मी स्‍वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्‍वराने दिल्‍याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्‍पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्‍हणून मी रात्री स्‍वतलाच सांगत असतो नव्‍हे माझ्या आत्‍म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्‍याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्‍थान दिले.*तात्पर्य :- मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1kXf3HFBiV2FihBF/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••🟣 *_ या वर्षातील २१२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे.**२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल**२०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.**१९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार’ जाहीर**१९६२: ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.**१९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.**१८९८: विल्यम केलॉग याने ’कॉर्नफ्लेक्स’ विकसित केले.**१६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.* * ७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: डॉ. प्रकाश कोयाडे -- लेखक**१९८४: मिमोह चक्रवर्ती -- भारतीय अभिनेता**१९८२: जेम्स मायकेल जिमी अँडरसन -- इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू**१९८१: किशोर विजय बळी -- कवी, स्तंभलेखक* *१९७८: सुनील जगन्नाथ जाधव -- कवी**१९७७: उमेश उत्तमराव बोरकुले -- लेखक* *१९७७: विद्या रमेश जाधव -- कवयित्री* *१९७३: सोनू सूद -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, मॉडेल, मानवतावादी आणि परोपकारी* *१९७३: सोनू निगम – भारतीय पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता**१९६३:यास्मीन जोसेफ (मंदाकिनी) -- भारतीय अभिनेत्री**१९६२: सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार -- महाराष्ट्र राज्याचे मंत्री**१९५९: डॉ.सदानंद नामदेव देशमुख-- सुप्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार,२००४चा साहित्य अकादमी पुरस्कार**१९४७: अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते**१९३५: सुधाकर बलवंत लोखंडे. -- कवी**१९३५: डॉ. अनुराधा अरविंद गोडबोले -- लेखिका(मृत्यू: २९ ऑक्टोबर २०२२ )**१९३३: प्रा. गोविंद माधव काळे. -- कवी**१९३२: मधुकर दत्तात्रय जोशी -- कवी, लेखक, संपादक* *१९३१: लक्ष्मणराव बाळकृष्ण सराफ_ शिक्षणतज्ज्ञ,निवृत्त प्राचार्य शा.अ.महा,* *१९२८: सुलोचना (लाटकर) -- हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री (मृत्यू: ४ जून २०२३)**१८६३: हेन्‍री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (मृत्यू: ७ एप्रिल १९४७ )**१८५५: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती (मृत्यू: १४ आक्टोबर १९१९ )**१८१८: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: प्राचार्य मदन धनकर -- ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, संपादक (जन्म:२५ ऑगस्ट १९३५)**२०२१: गणपतराव देशमुख -- महाराष्ट्र विधानसभेवर ५४ वर्षे ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले.(जन्म: १० ऑगस्ट १९२६ )**२०१७: उस्ताद हुसेन सईदुद्दीन डागर -- सईद भाई म्हणून प्रसिद्ध, धृपद परंपरेशी संबंधित असलेले भारतीय शास्त्रीय गायक (जन्म: २० एप्रिल १९३९ )**२०१३: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर-- संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६ )* *२०१२: बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले -- मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक(जन्म: २८ डिसेंबर१९३४ )* *२०११: डॉ.अशोक रानडे – संगीत समीक्षक (जन्म: २५ आक्टोबर १९३७ )**१९९४: शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक.(जन्म: ८ ऑगस्ट १९२६ )**१९८३: वसंतराव देशपांडे – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक (जन्म: २ मे १९२० )**१९६०: ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे –स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३१ मार्च १८७१ )**१८९८: ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (जन्म: १ एप्रिल १८१५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांचे व्यासपीठ ; शिक्षण परिषद*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिव्यांग नागरिकांसाठी ची कर्ज मर्यादा 50 हजारावरून अडीच लाख करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संसदेत पत्रकारांना बंदी, ग्लास रूममधून कव्हरेज करावं लागणार, प्रेस क्लब ऑफ इंडियाकडून निषेध*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर, 9 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय, तहसीलदार, गटविकास ते उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमदारकी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं भगवानगडावर भव्य स्वागत, या प्रेमाला कोणत्याही जातीधर्माची किनार नाही - पंकजा मुंडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिक - कॅप्टन हरमनप्रीतचा निर्णायक गोल, भारत - अर्जेंटिना सामना 1-1ने बरोबरीत समाप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो - दुसऱ्या T20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा सात विकेटनी पराभव करत, मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वजनकाटे तराजू* 📙कोणत्याही मालाची विक्री करायची झाली कि, ताबडतोब तराजू समोर येतो. रेल्वे स्टेशनवर गेलो, तर आपले वजन करण्यासाठी वजन करण्याचे मशीन खुणावतच असते. मिठाईच्या दुकानात गेलो, तर तिथे आणखीनच वेगळा प्रकार मिठाई तोलायला वापरतात. किती किलो वजन झाले आहे, ते आपल्यालाही दिसते, तसे तोलणार्‍यालाही उलट्या बाजूने दिसत असते. सोनाराकडे हल्ली इलेक्ट्रॉनिक आकडे दिसणारे काटे आले आहेत. लहानशी झुळूक आली वा कोणी फुंकर मारली, तरी हे आकडे झटकन हलतात. याउलट जकातनाक्यावर कधी गेलो, तर अख्खा ट्रक उभा राहील, असा वजनकाटा जमिनीतच लोखंडी चौकटींवर आधारलेला असतो.वजनाचा काटा वजनाचा आकडा दाखवतो किंवा तराजू असेल, तर एका तागडीत टाकलेले वजन मोजले जाते. पण हे वजन करण्यामागे मूळतत्त्व कोणते, हे सहसा कोणालाच आठवत नसते. गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक गोष्टीला वजन प्राप्त होते. याच गोष्टीचा कळत नकळत वापर करून तराजूवर वजन करण्याची पद्धत सुरू झाली. तराजूचे तत्त्व अगदी सोपे आहे. आडव्या दांडीला दोन तागड्या दोन बाजूंना बांधल्या व बरोबर मध्यभागी आधार दिला की, तराजू बनतो. अर्थातच तागडीचे वजन अगदी सारखे असणे आवश्यक. आता तागडीत ठराविक माहितीचे वजन एका बाजूला टाकल्यास गुरुत्वाकर्षणाची जितकी ओढ त्या बाजूला असेल, तितकीच ओढ दुसऱ्या बाजूला असलेल्या मालाच्यासाठी आवश्यक ठरते. हा झाला तराजूचा सगळ्यात सोपा आकार व वापर.वर उल्लेख केलेल्या अनेक प्रकारात हे ठराविक नेमके माहितीचे वजन टाकल्यावर आतील स्प्रिंगला बसणारा ताण हा दर्शनी काट्यावर आखला जातो (Calibration). त्यानुसार आपल्याला केलेले वजन कळू शकते. इलेक्ट्रॉनिक वजनकाटय़ामध्येही स्प्रिंग असतेच; पण आखणीऐवजी आतील कंट्रोल पॅनलला मिळणाऱ्या 'सेन्सर'करवी आपल्याला डिस्प्ले युनिटवर आकडे दिसतात. अगदी नाजूक सोन्यासारखे वजन तोलणारे काटे काचेच्या बंद पेटीत ठेवून मग वजन केले जाते. हीच पद्धत रासायनिक वस्तूंच्या वजनासाठीसुद्धा वापरतात. त्यांना 'फिजिकल अँड केमिकल बॅलेन्स' असे म्हटले जाते. अगदी छोटी एक मिलीग्रॅमची वजनेही त्यासाठी वापरली जातात. वजनकाट्यावर वजन केले जाते. पण अनेक वजनकाट्यांवर किती मर्यादेपर्यंत व्यवस्थित वजन मिळेल, याचाही उल्लेख असतो; हे आपण कधी लक्षात घेतले आहे काय ? त्याचप्रमाणे जितका काटा जास्त वजन करता येण्याजोगा, तितकी त्याची लहान चूक कळेनाशी होत जाते, हेही ध्यानात ठेवायला हवे. उदाहरणार्थ, शंभर किलोचे वजन करताना शंभर ग्रॅम वजनाचा फरक सहसा दाखवला चालणार नाही, तर अर्ध्या किलोपर्यंतचाच फरक आढळून येईल. याउलट एक किलोपर्यंतचेच वजन दाखवणारा काटा वजनातील दहा ग्रॅमचाही फरक जाणवून देऊ शकतो.अनेक व्यवहारांत वजनाचा संबंध येतोच. योग्य काट्यावर योग्य पद्धतीचे वजन करण्याचा आग्रह धरला, तर कोणाचेच नुकसान नसते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभव हा मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील एकूण वाघांपैकी भारतात किती टक्के वाघ आहेत ?२) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा - २०२४ चा उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियम ऐवजी कोणत्या नदीच्या पात्रावर झाला ?३) ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतून पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?४) 'तुरुंग' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) ७० टक्के २) सीन नदी ३) मनू भाकर, शूटर ४) कारागृह, कैदखाना, बंदिखाना ५) अशोक मंडप*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विजय कुऱ्हाडे, शिक्षक, बिलोली👤 नागनाथ इळेगावे, पदोन्नत मुख्याध्यापक, हदगाव👤 प्रियंका घुमडे👤 संगीता ठलाल, चंद्रपूर👤 निलेश कोरडे👤 साईनाथ वाघमारे👤 शेख नवाज👤 प्रवीण चातरवाड👤 सचिन गादेवार, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु धोबी शिष कापडा साबुन सिरजनहार ।सुरति शिला पर धोइये निकसै ज्योति अपार ॥ 30 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या स्वभावासोबत आपुलकी, माणुसकी, स्नेह, आदर तसेच प्रेमाचे बोल तेवढेच आवश्यक आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे, महान गुण असतात त्याच्यात कोणत्याही विकार वासना घर करत नाही, सोबतच त्याच्या जवळ येत नाही. म्हणून याच महान गुणांची साथ धरून मानवी जीवनाचे सार्थक करावे. भलेही ते, दिसत नसतील तरी अनेकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्थान ठरत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌺पुण्यायी कर्माची*🌺एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले. अचानक त्यांना म्हातारीची झोपडी दिसली आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्रीसाठी आश्रय दिला.म्हातारीने जेवण बनवले सर्वजण जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हातारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे ज्याच्या अंगावर वीज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान. प्रथम पहिला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारीची आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत वीज आपल्याच अंगावर पडणार. असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन वीज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.*तात्पर्यः एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात  पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/pAxJ9oSvMLcqxkQP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन_* 🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २११ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.**१९८७: भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.**१९८५: मल्याळम लेखक टी.एस.पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार**१९५७: ’इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.**१९४८: दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४६: टाटा एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.**१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.**१८७६: फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेची स्थापना केली.**१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्राम बागवाड्यात स्त्री शिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९: बाळासाहेब गोपाळ कांबळे -- लेखक* *१९७९: प्रतिमा अरुण काळे-- कवयित्री**१९७९: विनोद भगवान राठोड -- कवी**१९७९: प्राची परचुरे-वैद्य -- लेखिका* *१९६९: वेणुताई नागोराव हुलसुरे -- लेखिका**१९६८: सलील वाघमारे -- लेखक**१९६७: अनिल श्रीनिवास ठाकरे -- लेखक, मूर्तिकार**१९६३: संगीता सुनील वाईकर -- लेखिका* *१९६२: हेमंत पटले -- लेखक* *१९५९: संजय दत्त – प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९५३: अनुप जलोटा – प्रसिद्ध भजन व गझलगायक**१९४८: श्याम पेंढारी -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक* *१९४६: डॉ. अनिल गजभिये -- लेखक* *१९४४: तुलसी रामसे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक ( मृत्यू: १३ डिसेंबर २०१८ )**१९४०: डॉ. रंगनाथ नारायण जोशी -- कवी, लेखक* *१९३९: डॉ. लीना प्र. रस्तोगी -- लेखिका व कवयित्री* *१९३८: प्रा. प्रभाकर नारायण परांजपे -- अनुवाद, कथालेखक आणि संपादक* *१९२७: माधवसिंह सोळंकी -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री,केन्दिय मंत्री ( मृत्यू: ९ जानेवारी १९२१)**_१९२५: शिवराम दत्तात्रेय फडणीस -- SD फडणीस म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार आणि चित्रकार_* *१९२२: ब.मो.पुरंदरे(बाबासाहेब )– इतिहासकार आणि लेखक,शिवशाहीर (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०२१ )**१९२१: श्रीकृष्ण नारायण चाफेकर -- कवी लेखक**१९२१: रा.ना.पवार -- जुन्या पिढीतील कवी, गीतकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९९२ )**१९०८: रघुनाथ रामचंद्र भांबे -- कवी लेखक**१९०४: जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर.डी.टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३ )**१८८३: बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा (मृत्यू: २८ एप्रिल१९४५ )**१८७८: नारायण कृष्णबुवा सुपेकर -- कीर्तनकार कवी (मृत्यू: २७ मे १९६९ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: शिवराम दत्तात्रेय जोशी -- अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्रीय संस्कृत पंडित (जन्म: १५ ऑगस्ट १९२६ )* *२०१२: बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट -- मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार ( जन्म: १७ ऑगस्ट १९२३ )* *२००९: महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता (जन्म: २३ मे १९१९ )**२००३: बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६ )**२००२: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९१९ )**१९९६: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (जन्म: १६ जुलै १९०९ )**१९६६: राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी, लेखक आणि चित्रपट गीतकार (जन्म:.२३ सप्टेंबर १९१५ )**१८९१: इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक.(जन्म: २६ सप्टेंबर १८२० )**१८९०: व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार (जन्म: ३० मार्च १८५३ )**१७८१: योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: १४ सप्टेंबर १७१३ )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला, कवितेच्या जगात*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुरतच्या धर्तीवर ट्राफिक व्यवस्था 'एनजीओ' कडे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शरद पवारांचं शिष्टमंडळाला मोठं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलिंद नार्वेकर ते प्रज्ञा सातव, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनू भाकरने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी, पदक पटकावणारी पहिली महिला नेमबाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो : भारताला धक्का देत श्रीलंकेच्या महिला संघाने अखेर आशिया चषकावर आपले नाव कोरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *रातांधळेपणा म्हणजे काय ?* 📕रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व ‘अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.*डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जीवंतपणी इंग्रज सरकारच्या हाती लागणार नाही'* ही प्रतिज्ञा कोणी घेतली होती ?२) कोणत्या भारतीय खेळाडूंना 'टेनिस हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ?३) पहिले फॉर्म्युला वन विजेतेपद कोणी जिंकले ?४) 'तृषा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिले तंटामुक्त गाव कोणते ? *उत्तरे :-* १) क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद २) विजय अमृतराज व लिएंडर पेस ३) ऑस्कर पियास्त्री ४) तहान, लालसा ५) मळेगांव, ता. बारामती, जि. पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुनील कोल्हे, वाशिम👤 संजय पंचलिंग, शिक्षक, नायगाव👤 सुदीप दहिफळे, वसमत👤 दलित सोनकांबळे, बिलोली👤 सौ. गीता शिवा वसमतकर👤 लक्ष्मण आगलावे, शिक्षक, धर्माबाद👤 गिरीश श्रीपतराव पाटील, नांदेड👤 सौ. दीपाली अशोक मामीडवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निज मन तो नीचा किया चरण कमलकी ठौर |कहैं कबीर गुरुदेव बिन नजर न आवै और ॥ 26 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादे चांगले काम करण्याची जेव्हा आपल्या मनात इच्छा निर्माण होत असते. ती इच्छा योग्य असते. म्हणून त्यावेळी उगाचच वेळ वाया घालवू नये. भलेही कितीही अडथळे, अडचणी आल्या तरी त्यांचेही हसत, हसत आनंदाने स्वागत करावा. कारण अडचणी आणि अडथळे हे सुद्धा एक प्रकारचे मार्गदर्शकाच्या भूमिकेतच असतात. सोबतच नवी वाट दाखवून पाठीमागे सदैव आधारस्तंभ बनून उभे राहतात. पण, ते आपल्याला दिसत नाही म्हणून त्यांचाही मोठ्या मनाने स्वीकार करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *भेट*एक जुनी सूफी कथा आहे. एकदा एक मोळीविक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, अरे इथेच का थांबलास आणखी पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे. मोळीविक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, महाराज मला आता कुठे पळवता. मी कुठेही जाऊ शकणार नाही. साधू म्हणाला, बघ तुझाच फायदा आहे. पुढे जा. पुढे जा.. असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोळीविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चरितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीची खाण सापडली. तो आणखी खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखी पुढे जावे. त्याने असे केले असता, त्याला सोन्याची खाण मिळाली. तो खुश झाला.वर्षभर कमावल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हि याची खाण मिळाली. तो आणखी आनंदी झाला. आता त्याच्या सात पिढ्या बसून खातील इतके धन त्याच्याकडे जमा झाले होते. पुन्हा त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, अरे का थांबलास? पुढे जा आणखी. तो मोळीविक्या त्या साधूला म्हणाला, आता मला हि याची खाण मिळाली आहे. मला काही नको. परंतु, त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळीविक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. या गुहेत एक साधू तपश्चर्या करत होता. आपल्याला नेहमी भेटणारा तो हा साधू नाही हे मोळीविक्याच्या ध्यानात आले. मोळीविक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा. त्या साधूने मोळीविक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला. तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखी पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे. तू चालत राहा, निघ इथून. त्या मोळीविक्याला स्वतची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु, आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याचे मोळीविक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व तो पुढच्या प्रवासाला निघाला.               *तात्पर्य*आपले ध्येय निश्चित केले असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/pAxJ9oSvMLcqxkQP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन_* 🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २११ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.**१९८७: भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.**१९८५: मल्याळम लेखक टी.एस.पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार**१९५७: ’इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.**१९४८: दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४६: टाटा एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.**१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.**१८७६: फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेची स्थापना केली.**१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्राम बागवाड्यात स्त्री शिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९: बाळासाहेब गोपाळ कांबळे -- लेखक* *१९७९: प्रतिमा अरुण काळे-- कवयित्री**१९७९: विनोद भगवान राठोड -- कवी**१९७९: प्राची परचुरे-वैद्य -- लेखिका* *१९६९: वेणुताई नागोराव हुलसुरे -- लेखिका**१९६८: सलील वाघमारे -- लेखक**१९६७: अनिल श्रीनिवास ठाकरे -- लेखक, मूर्तिकार**१९६३: संगीता सुनील वाईकर -- लेखिका* *१९६२: हेमंत पटले -- लेखक* *१९५९: संजय दत्त – प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९५३: अनुप जलोटा – प्रसिद्ध भजन व गझलगायक**१९४८: श्याम पेंढारी -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक* *१९४६: डॉ. अनिल गजभिये -- लेखक* *१९४४: तुलसी रामसे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक ( मृत्यू: १३ डिसेंबर २०१८ )**१९४०: डॉ. रंगनाथ नारायण जोशी -- कवी, लेखक* *१९३९: डॉ. लीना प्र. रस्तोगी -- लेखिका व कवयित्री* *१९३८: प्रा. प्रभाकर नारायण परांजपे -- अनुवाद, कथालेखक आणि संपादक* *१९२७: माधवसिंह सोळंकी -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री,केन्दिय मंत्री ( मृत्यू: ९ जानेवारी १९२१)**_१९२५: शिवराम दत्तात्रेय फडणीस -- SD फडणीस म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार आणि चित्रकार_* *१९२२: ब.मो.पुरंदरे(बाबासाहेब )– इतिहासकार आणि लेखक,शिवशाहीर (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०२१ )**१९२१: श्रीकृष्ण नारायण चाफेकर -- कवी लेखक**१९२१: रा.ना.पवार -- जुन्या पिढीतील कवी, गीतकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९९२ )**१९०८: रघुनाथ रामचंद्र भांबे -- कवी लेखक**१९०४: जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर.डी.टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३ )**१८८३: बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा (मृत्यू: २८ एप्रिल१९४५ )**१८७८: नारायण कृष्णबुवा सुपेकर -- कीर्तनकार कवी (मृत्यू: २७ मे १९६९ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: शिवराम दत्तात्रेय जोशी -- अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्रीय संस्कृत पंडित (जन्म: १५ ऑगस्ट १९२६ )* *२०१२: बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट -- मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार ( जन्म: १७ ऑगस्ट १९२३ )* *२००९: महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता (जन्म: २३ मे १९१९ )**२००३: बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६ )**२००२: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९१९ )**१९९६: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (जन्म: १६ जुलै १९०९ )**१९६६: राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी, लेखक आणि चित्रपट गीतकार (जन्म:.२३ सप्टेंबर १९१५ )**१८९१: इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक.(जन्म: २६ सप्टेंबर १८२० )**१८९०: व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार (जन्म: ३० मार्च १८५३ )**१७८१: योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: १४ सप्टेंबर १७१३ )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला, कवितेच्या जगात*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुरतच्या धर्तीवर ट्राफिक व्यवस्था 'एनजीओ' कडे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शरद पवारांचं शिष्टमंडळाला मोठं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलिंद नार्वेकर ते प्रज्ञा सातव, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनू भाकरने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी, पदक पटकावणारी पहिली महिला नेमबाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो : भारताला धक्का देत श्रीलंकेच्या महिला संघाने अखेर आशिया चषकावर आपले नाव कोरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *रातांधळेपणा म्हणजे काय ?* 📕रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व ‘अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.*डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जीवंतपणी इंग्रज सरकारच्या हाती लागणार नाही'* ही प्रतिज्ञा कोणी घेतली होती ?२) कोणत्या भारतीय खेळाडूंना 'टेनिस हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ?३) पहिले फॉर्म्युला वन विजेतेपद कोणी जिंकले ?४) 'तृषा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिले तंटामुक्त गाव कोणते ? *उत्तरे :-* १) क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद २) विजय अमृतराज व लिएंडर पेस ३) ऑस्कर पियास्त्री ४) तहान, लालसा ५) मळेगांव, ता. बारामती, जि. पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुनील कोल्हे, वाशिम👤 संजय पंचलिंग, शिक्षक, नायगाव👤 सुदीप दहिफळे, वसमत👤 दलित सोनकांबळे, बिलोली👤 सौ. गीता शिवा वसमतकर👤 लक्ष्मण आगलावे, शिक्षक, धर्माबाद👤 गिरीश श्रीपतराव पाटील, नांदेड👤 सौ. दीपाली अशोक मामीडवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निज मन तो नीचा किया चरण कमलकी ठौर |कहैं कबीर गुरुदेव बिन नजर न आवै और ॥ 26 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादे चांगले काम करण्याची जेव्हा आपल्या मनात इच्छा निर्माण होत असते. ती इच्छा योग्य असते. म्हणून त्यावेळी उगाचच वेळ वाया घालवू नये. भलेही कितीही अडथळे, अडचणी आल्या तरी त्यांचेही हसत, हसत आनंदाने स्वागत करावा. कारण अडचणी आणि अडथळे हे सुद्धा एक प्रकारचे मार्गदर्शकाच्या भूमिकेतच असतात. सोबतच नवी वाट दाखवून पाठीमागे सदैव आधारस्तंभ बनून उभे राहतात. पण, ते आपल्याला दिसत नाही म्हणून त्यांचाही मोठ्या मनाने स्वीकार करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *भेट*एक जुनी सूफी कथा आहे. एकदा एक मोळीविक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, अरे इथेच का थांबलास आणखी पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे. मोळीविक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, महाराज मला आता कुठे पळवता. मी कुठेही जाऊ शकणार नाही. साधू म्हणाला, बघ तुझाच फायदा आहे. पुढे जा. पुढे जा.. असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोळीविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चरितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीची खाण सापडली. तो आणखी खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखी पुढे जावे. त्याने असे केले असता, त्याला सोन्याची खाण मिळाली. तो खुश झाला.वर्षभर कमावल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हि याची खाण मिळाली. तो आणखी आनंदी झाला. आता त्याच्या सात पिढ्या बसून खातील इतके धन त्याच्याकडे जमा झाले होते. पुन्हा त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, अरे का थांबलास? पुढे जा आणखी. तो मोळीविक्या त्या साधूला म्हणाला, आता मला हि याची खाण मिळाली आहे. मला काही नको. परंतु, त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळीविक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. या गुहेत एक साधू तपश्चर्या करत होता. आपल्याला नेहमी भेटणारा तो हा साधू नाही हे मोळीविक्याच्या ध्यानात आले. मोळीविक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा. त्या साधूने मोळीविक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला. तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखी पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे. तू चालत राहा, निघ इथून. त्या मोळीविक्याला स्वतची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु, आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याचे मोळीविक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व तो पुढच्या प्रवासाला निघाला.               *तात्पर्य*आपले ध्येय निश्चित केले असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/Q7mrqJ6psfCkSAGS/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_ या वर्षातील २०९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला.**१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.**१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.**१९२१: रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.**१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.**१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे बनले.*🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••• *१९९०: प्रा. डॉ. गंगाधर चेपूरवार -- कवी, लेखक**१९९०: सत्यनारायण मनोहर भांडेकर -- कवी**१९७९: प्रसाद पुरुषोत्तम कुमठेकर -- लेखक, निर्माता, दिग्दर्शक**१९७३: गौरी एकनाथ शिरसाठ -- कवयित्री* *१९७२: संतोष श्रीधर महाडेश्वर -- कवी, लेखक* *१९७२: संदेश श्रीकांत बांदेकर -- कोंकणी लेखक तथा अनुवादक**१९७२: छाया अजबराव वाढेकर -- लेखिका**१९७०: सुभाष उमरकर -- कवी**१९६९: जॉनाथन नील "जॉंटी" ऱ्होड्स- निवृत्त दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू , सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक व कोच* *१९६९:हणमंत पडवळ -- कवी* *१९६७:राहुल बोस -- भारतीय अभिनेता**१९६२: सुनीलकुमार वसंतराव सरनाईक -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९६०: श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री**१९६०: मनमोहन रोगे -- कवी, लेखक, पत्रकार**१९५६: प्रा. राज यावलीकर -- प्रसिद्ध साहित्यिक, 'खडू शिल्प' कलेकरिता राष्ट्रीय पुरस्कार* *१९५५: अ‍ॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५३: डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे -- सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०१७ मध्ये डोंबिवली येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५०: विश्व मोहन भट्ट -- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वादक* *१९३९: आशा अरविंद बगे. -- मराठीतील ज्येष्ठ प्रसिद्ध लेखिका* *१९३५: कृष्ण भास्कर परांजपे -- प्रसिद्ध लेखक**१९३०: चंद्रकांत रामचंद्र वर्तक -- कथाकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार (मृत्यू: ११ जुलै २०१० )**१९२८: कृष्ण राघव घरोटे -- कवी, कथाकार**१९२८: उत्तमराव बळीराम राठोड -- माजी खासदार,संस्थापक (मृत्यू: ७ मार्च १९९७ )**१९११: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (मृत्यू: २८ जानेवारी १९९७ )**१९०७: वामनराव हरी देशपांडे -- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९० )**१८९२: नारायण विनायक कुलकर्णी-- मराठी नाटककार(मृत्यू: १८जानेवारी १९४८ )* *१६६७: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १७४८ )* 🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••• *_२०१५: डॉ. अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम --  भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७)'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रियता.(जन्म: १५ऑक्टोबर १९३१ )_**२०१०: मारुती माने -- भारतीय माजी कुस्तीपटू (जन्म: १०ऑगस्ट१९३८ )**२०१०: रवी बसवानी. -- भारतीय चित्रपट अभिनेता (जन्म: २९ सप्टेंबर १९४६ )**२००७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (जन्म: ३० जानेवारी १९१७ )**२००२: कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७ )**१९९२: अमजद खान. –हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० )**१९८०: मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (जन्म: २६ आक्टोबर १९१९ )**१९७५: त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.* *१८४४: जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ सप्टेंबर १७६६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागरूक पालक घडवतात चांगले नागरिक*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीत आज निती आयोगाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 1 कोटी 70 लाख शिधापत्रिका धारकांना या गौरी गणपतीत ‘आनंदाचा शिधा’ संच मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसच्या 10 नेत्यांच्या नावांची घोषणा:महाराष्ट्रासाठी 7 आणि मुंबईसाठी 3 नावे निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एस.टी. महामंडळालाही पावला विठूराया:आषाढी यात्रेत 9 लाख 53 हजार विठ्ठलभक्तांचा प्रवास; 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *फ्रान्समध्ये बॉम्बचा अलर्ट, संपूर्ण विमानतळ रिकामे केले; ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी गोंधळावर गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रेणुका-राधानं पाया रचला, स्मृती अन् शफालीनं विजयाचा कळस चढवला, भारताचा बांगलादेशवर विजय, आशिया कपच्या फायनलमध्ये दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इंटरनेटची मालकी कोणाकडे आहे ?*************************अमेरिकेच्या संरक्षण खात्यासाठी संशोधन करणाऱ्या काही वैज्ञानिकांना सतत संपर्कात राहणं आणि एकमेकांना आपण वाचलेल्या किंवा लिहिलेल्या लेखांची, अहवालांची साद्यंत माहिती सतत देणं आवश्यक वाटलं. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांनी त्यांना समाधान मिळत नव्हतं, म्हणून त्यांनी आपापले संगणक एकमेकांना बिनतारी पद्धतीनं जोडून एक जाळं निर्माण केलं. याला त्यांनी 'अर्पानेट' असं नाव दिलं. त्याचा वापर त्यावेळी तरी मर्यादित होता; पण ती संकल्पना एका क्रांतीची उद्गाती ठरली. ही संकल्पनाच आजच्या इंटरनेटचा आत्मा आहे.त्यावेळी फक्त त्या संशोधकांचेच संगणक एकमेकांशी जोडले गेले होते. ते संशोधकही एकमेकांपासून फार दूर नव्हते; पण एकदा अशा प्रकारे बिनतारी पद्धतीने संगणक एकमेकांशी जोडता येतात हे समजल्यावर त्याचं एक जगड्व्याळ जाळं तयार व्हायला फार वेळ लागला नाही. ते जाळ बांधण्यासाठीच्या पायाभूत सुविधा प्रस्थापित करायला काय वेळ लागला असेल तेवढाच.त्या पायाभूत सुविधांमध्ये अनेक प्रणालींचा समावेश आहे. संगणक एकमेकांशी जोडता येण्यासाठी संगणकांमध्ये काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक घटकांचा अंतर्भाव करावा लागला. यांना इथरनेट कार्ड म्हणतात. पूर्वी ते स्वतंत्रपणे घेऊन संगणकाशी जोडावं लागत असे. आता ते संगणकातच अंतर्भुत केलेलं असतं. टेलिफोनद्वारे संगणकांची जोडणी करण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. आता तर राऊटर वापरून संपूर्ण घरात किंवा मोठ्या परिसरात इंटरनेट प्रमाण उपलब्ध होण्यात होईल अशी 'वायफाय' प्रणाली विकसित केली गेली आहे. संगणकातले संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी उपग्रहांचा वापर होतो. आणि या सर्व प्रणाली व्यवस्थित आपापलं काम करतील यासाठी काही खास मंत्रावळी म्हणजेच सॉफ्टवेअरचीही निर्मिती केली गेली आहे. ही मंत्रावली वापराच्या दृष्टीने अधिकाधिक सुलभ व्हावी सर्व गरजांसाठी ती उपयोगी पडावी आणि संदेशवहन वेगवान व्हावं यासाठी नवनव्या सुधारित मंत्रावलीही सतत तयार होत असतात. त्याशिवाय जगभरची विविध प्रकारची माहिती साठवून ठेवण्यासाठीची व्यवस्थाही करावी लागते. पूर्वी अशा प्रकारची माहिती कागदावर लिहिली जाऊन त्याचं दप्तर कपाटांमध्ये साठवून ठेवलं जात असे. आता ते संगणकाद्वारे दृकश्राव्य फितींवर साठवून ठेवलं जातं. 'क्लाऊड कॉम्प्युटिंग' या नव्या संकल्पनाद्वारे तर ते आभासी साठवणुकीद्वारे सुरक्षित ठेवलं जातं. यापैकी प्रत्येक सुविधा महत्त्वाची असली तरी ती संपूर्ण जाळ्याचा एक छोटासा भागच आहे. त्या त्या भागांपुरती मालकी निरनिराळ्या व्यक्ती, उद्योग, संस्था, सेवाभावी संस्था, सरकारी यंत्रणा यांच्याकडे असली तरी संपूर्ण इंटरनेटवर कोणाचीही मालकी नाही. कोणी एक संस्था वा उद्योग इंटरनेटचा मालक नाही. त्यामुळे बलवान राष्ट्रांनाही इंटरनेट संपूर्णपणे बंद करण्यात यश मिळत नाही. इंटरनेट सुविधा आपल्याला पुरवणाऱ्या संस्थांवर बंदी घालून आपापल्या राज्यापुरती ती यंत्रणा बंद केली जाऊ शकते. इंटरनेटच्या वापरात सुसूत्रता आणणाऱ्या काही नियंत्रक संस्था आहेत. त्या आपल्याला निरनिराळे पत्ते किंवा ओळखपत्र मिळवून देण्याची व्यवस्था करतात; पण त्यांच्याकडेही संपूर्ण इंटरनेटची मालकी नाही. कोणीही मालक नसलेली आणि तरीही सुरळीत चाललेली 'इंटरनेट' ही एकमेव बहुपयोगी यंत्रणा आज अस्तित्वात आहे.*बाळ फोंडके यांचा 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील सुर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?२) २०२४ या वर्षाचा कारगिल विजय दिवस कितवा आहे ?३) जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे ?४) भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्यालय कोठे आहे ?५) देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे ? *उत्तरे :-* १) कर्नाटक २) २५ वा ३) ८२ व्या ४) मुंबई ५) हिंगोली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हणमंत पडवळ, साहित्यिक, लातूर👤 शशिकला बनकर, साहित्यिक, पुणे👤 स्वाती राधाकिशन बोदगमवार, सहशिक्षिका, नांदेड👤 उत्कर्ष मादसवार, प्रेस फोटोग्राफर, नांदेड👤 श्रीकांत क्यादरवाड, धर्माबाद👤 👤 लक्ष्य घनश्याम पटले, गोंदिया *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु सिकलीगर कीजिये मनहिं मस्कला देइ ।मनका मैल छुडाइके चित दर्पण करि लेइ ॥ 29॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी म्हणतात की, आपण सत्य बोलूनही वाईट होत असतो. त्यापेक्षा एकदाचे न बोललेले केव्हाही बरे. म्हणून कधी, कधी दैनदिन जीवनात असेही काही अनुभव येतात की, आपण कितीही गोड बोलून सुद्धा त्याचा उलट फायदा घेतला जातो त्यावेळी मात्र आपले मन दुखावले जाते. म्हणून कोणासोबत बोलावं वाटत नसेल तर बोलू नये पण, कोणी आपुलकीच्या नात्याने दोन शब्द बोलत असतील तर त्यांचे मन दुखावेल असेही वागू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *मूर्खपणा*       "एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे.खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते.एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला.‘हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले.मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते.‘आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले.कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे.’ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे.शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल.’हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, ‘आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो.’‘मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो.हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे.’कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता.शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ‘ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला.’ हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते.’ आणि नंतर ते उडून जातात.*तात्पर्य - मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/mnZHhjFKkAL1RDPs/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 *_कारगिल विजय दिवस_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_ या वर्षातील २०८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्ब स्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.**२००५: मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.**१९९९: भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्‍या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड**१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.**१९९८: १९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान**१९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ’राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर**१९६५: मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.**१८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.**१८४७: लायबेरिया स्वतंत्र झाला.**१७४५: इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.**१७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले.*🌸 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌸 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९४: माहिका शर्मा -- भारतीय अभिनेत्री**१९८५: मुग्धा गोडसे – अभिनेत्री व मॉडेल**१९७२: जुगल हंसराज. -- भारतीय अभिनेता, लेखक आणि चित्रपट निर्माता**१९७२: प्रा. मिलिंद गोविंदराव जोशी -- प्रसिद्ध लेखक, संपादक, वक्ते* *१९६७: संजय अप्पाराव घाटगे -- कवी, लेखक* *१९६७: शेषराव नथ्थुजी मडावी -- लेखक कवी* *१९५६: कल्पना अय्यर -- भारतीय कलाकार, गायिका**१९५५: असिफ अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष**१९५४: व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४ )**१९४८: सुमन शा. लाघवे -- लेखिका* *१९४३: डॉ.शंतनू चिंधडे -- नेत्रतज्ज्ञ, प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४३: डॉ. नीला चंदकांत पांढरे -- प्रसिद्ध लेखिका (मृत्यू: २६सप्टेंबर २०२१ )**१९४०: प्रा. डॉ. प्रकाश केजकर देशपांडे -- कादंबरीकार, कवी, समीक्षक, प्रभावी वक्ते* *१९३४: दत्तात्रय पंढरीनाथ जोशी -- संपादक* *१९१६: मधुसुदन शंकर कानेटकर -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील नामवंत गायक (मृत्यू: ३ फेब्रुवारी २००७ )**१९११: यशवंत दत्तात्रय भावे -- कवी (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८७ )**१९०२: यशवंत बाळकृष्ण मोकाशी-- कादंबरीकार (मृत्यू: १९८८ )**१८९४: वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (मृत्यू: ३० मार्च १९६९ )**१८९४: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३ )**१८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक.राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९ )**१८८९: बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता -- सर्वोदय विचाराचे प्रचारक, लेखक (मृत्यू: २१ जानेवारी १९८२ )**१८७५: कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (मृत्यू: ६ जून १९६१ )**१८७०: गोविंद सदाशिव आपटे -- ज्योतिर्गणितज्ज्ञ (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३६ )**१८६५: रजनीकांत सेन -- भारतीय कवी आणि संगीतकार (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१० )**१८५६: जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५० )* 🌸 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५: बिजॉय कृष्णा हांडिक -- भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: १ डिसेंबर १९३४ )**२००९: भास्कर चंदावरकर – संगीतकार (जन्म: १६ मार्च १९३६ )**१९८४: डॉ. गणेश सखाराम महाजनी-- गणिततज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु (जन्म: २७ नोव्हेंबर १८९८ )**१९७२: उमाकान्त केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे. -- प्राचीन भारताच्या इतिहासावरील संशोधक (जन्म: २८ आगस्ट १९०३ )**१९४४: प्रभाकर वासुदेव बापट -- वाड:मय इतिहासकार ( जन्म: १७ फेब्रुवारी १९०२ )**१८९१: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक,भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वयं शिस्त हाच सर्वोत्तम उपाय*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सातारा जिल्ह्यात आज रेड अलर्ट, जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत आता दिव्यांगानाही अर्थसहाय मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख 98 हजार 552 शेतकऱ्यांना आता मिळणार पीक विम्याचा लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पालकमंत्री आणि प्रशासनाने सतर्क राहून मदत करावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबँक ; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वसईत नंदाखाल येथे राहत्या घरी निधन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अभिनव बिंद्राला ऑलिम्पिकमध्ये मिळाला ‘ऑलिम्पिक ऑर्डर' बहुमान, पीएम मोदींनी केले कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧠 *वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ?* 🧠 वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके व मित्र हे थोडकेच असावेत पण ते चांगले असावेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *मनिका बत्रा* ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?२) पर्यावरण सरंक्षणासाठी GEP index सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?३) केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार कोण आहेत ?४) 'तिमिर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) MMS चा full form काय आहे ?*उत्तरे :-* १) टेबल टेनिस २) उत्तराखंड ३) वेंकट रामन अनंत नागेश्वरन ४) अंधार, काळोख ५) Multimedia Messaging Service*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संतोष वाघमारे, तंत्रस्नेही शिक्षक, धर्माबाद👤 वैभव भोसले, नांदेड👤 रमेश मस्के, पत्रकार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राम नामके पटतरे देवे को कछु नाहिं।क्या ले गुरु संतोषिये हवस रही मनमाहिं ॥ 25 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या जीवनात चांगली असो किंवा वाईट परिस्थिती नेहमीच येत असते. त्या आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा मोठ्या हिंमतीने सामना करायला शिकले पाहिजे. पण,जी परिस्थिती स्वतः चालून न येता मुद्दामहून आणलेली असते ती, जरा वेगळी असते. सोबतच ज्या मार्गाने ती पाठवली असते तिला तोच मार्ग चांगल्याने माहित असते म्हणून तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नये व मनावर घेऊ नये. दोन्ही परिस्थितीच्या वेळी, आपल्यात हिंमत ठेवून स्वतः वर विश्वास कायम असू द्यावा. कारण आपली हिंमत आणि विश्वास हेच खऱ्या अर्थाने आपले आधार असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी  किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले  ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल  त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य - तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/vxnkYRr1YzXLzVdt/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_ या वर्षातील २०७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी**१९९९: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.**१९९७: के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.**१९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड**१९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त**१९९२: स्पेनि, मधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.**१९७८: जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.**१९१७: कॅनडात आयकर लागू झाला.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••• *२००६: समृद्धी विजय बनकर -- कवयित्री**१९९२: सचिन जगन नांगरे -- लेखक,कवी**१९८६: प्रफुल्ल उदयन सावरकर -- पर्यावरणावर लेखन करणारे लेखक* *१९८३: संतोष ग्यानिदास गेडाम -- कथाकार, कवी* *१९७७: राम संपत -- भारतीय संगीतकार**१९७७: रागेश्वरी लूंबा-- भारतीय गायिका, अभिनेत्री**१९७१: कविता टिकाराम कठाणे -- मराठी, हिंदी कविता**१९६९: राजेश कुबडे उर्फ शेषराव अमृतराव कुबडे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६४: जावेद पाशा कुरैशी -- प्रसिद्ध मराठी लेखक, फुले-शाहू-आम्बेडकरी विचारधारेचे कार्यकर्ते* *१९५८: महेन्द्र शामकांत देशपांडे -- पत्रकार, संपादक, लेखक आणि प्रकाशक* *१९५७: कविता चौधरी -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माता आणि लेखिका (मृत्यू: १५ फेब्रुवारी २०२४ )**१९५४: दिनेश केसकर -- बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे एशिया-पॅसिफिक आणि भारतातील विक्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष* *१९५३: रत्नाकर तारदाळकर -- प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट व लघुपट निर्माते**१९४९: बकुळ पंडित -- मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री**१९४१: र. स. गि-हेपुंजे -- कवी (मृत्यू: २७ जानेवारी २०११ )**१९३७: विजय किरपेकर -- ज्येष्ठ तबलावादक, लेखक (मृत्यू: २१ एप्रिल २०२१ )**१९३४: दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी-- मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक आणि ललित निबंधकार (मृत्यू: २७ जानेवारी २०१६ )* *१९२९:सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे माजी सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: १३ आगस्ट२०१८ )**१९२२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – सुप्रसिद्ध कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२ )**१९१९: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – सुप्रसिद्ध गायक व संगीतकार तथा लेखक (मृत्यू: २९ जुलै २००२ )**१९१७: सदाशिव शंकर देसाई -- विख्यात साहित्यिक, पत्रकार आणि इतिहास संशोधक.(मृत्यू: ३१ मे १९९६ )**१८८७: नागेशशास्त्री गणेशशास्त्री नवरे -- कवी**१८७५: जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५ )**१८३२: करसनदास मुळजी -- भारतीय पत्रकार (मृत्यू: २८ ऑगस्ट १८७५ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: शिरीष कणेकर -- मराठी लेखक आणि रंगमंच कलाकार (जन्म: ६ जून १९४३ )**२०१५: रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई -- दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९ )* *२०१२: बी. आर. इशारा –चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक(जन्म: ७सप्टेंबर१९३४ )**१९७७: कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक (जन्म: २५ एप्रिल १९०० )**१८८०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*छडी लागे ( ना ) छम छम ...*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी होणार शपथविधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा, जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव; अंनिसचे समन्वयक श्याम मानव यांचा गंभीर आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग जिवंत होणार, राज्य सरकार शिवरायांच्या पराक्रमाची महती सांगणारा पुतळा उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूरची पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; कळंबा तलाव भरला, राधानगरी धरण 93 टक्के भरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, मठाधिपतींकडून 5 व्या दिवशी ज्यूस प्यायले; आता निवडणुकांची रणनीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'माझी लाडकी बहीण योजना' - 3 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांत आजपासून तीन दिवस नोंदणी शिबिरांचे आयोजन; 5 लाख 13 हजार 130 महिलांची नोंदणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *युवराज सिंह 6 वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणार; मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका बजावण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *तंबाखू / पान खाल्ल्याने दात खराब होतात का ?* 📙तंबाखू वा पान खाऊन रस्त्यावर व कोठेही थुंकणाऱ्या लोकांची कोणाला किळस येणार नाही ? दुसरे म्हणजे कार्यालयात वा शाळेत कोणी पानाचा तोबरा भरून तुम्हाला शिकवले व तुमच्याशी बोलू लागले तर बरे वाटणार नाही. तंबाखूची गोळी लोक तोंडात ठेवतात. तंबाखूतील निकोटीन हे द्रव्य लाळेत मिसळते व दाताभोवती जमा होते. तोंडात कायम तंबाखू असल्याने तोंडाची स्वच्छता नीट राखली जात नाही. या दोन्ही कारणांमुळे दात पिवळट होतात. कालांतराने किडतात. पान खाल्ल्याने जीभ रंगते, हे तुम्हाला माहीत आहेच. सुपारीमुळे दातांवरील आवरणाला चिरा पडतात, त्यातून दात किडण्याला सुरुवात होते. कधी कधी तर सुपारी खाताना दाताचा टवकाही उडतो ! अर्थात क्वचित पान खाल्ले व नंतर खळखळून गुळण्या भरल्या तर काही नुकसान होत नाही; पण वारंवार पान खाण्याने आणि त्याची सवय लागण्याने (विशेषत: तंबाखूयुक्त) दातांना पिवळट लालसर रंग येतो व दात कालांतराने किडतात.बसमध्ये सीटच्या बाजूला, जिन्याच्या भिंतीवर, ऑफिसच्या कोपऱ्यात अशा अनेक ठिकाणी हे तंबाखू वा पान खाणारे लोक इतस्तत: थुंकून ठेवतात. त्यामुळे तो सर्व भाग अस्वच्छ दिसतो. "थुंकू नये" अशा सूचनेच्या भोवतीही थुंकून ठेवलेले दिसते. या व्यसनांनी दात तर खराब होतातच, पण परिसरही अस्वच्छ होतो. त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहिलेलेच बरे !डॉ. जगन्नाथ दीक्षित डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख आहेत. यामुळे सुखरूपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *रोजगार हमी योजनेचे जनक* कोणाला म्हटले जाते ?२) पॅरिस येथे कितव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ?३) महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहिणी योजना कोणत्या राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे ?४) 'तारू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बांग्लादेशच्या पंतप्रधान कोण आहेत ? *उत्तरे :-* १) वि. स. पागे २) तिसऱ्यांदा ( १९००, १९२४, २०२४ ) ३) मध्यप्रदेश ४) जहाज, गलबत ५) शेख हसीना*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साईनाथ कामीनवार, शिक्षक नेते, धर्माबाद👤 रामकुमार चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 श्यामकुमार चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 श्रीधर चिंचोलकर, मुख्याध्यापक, केशव प्रा. शाळा, धर्माबाद👤 लक्ष्मण सुरकार, शिक्षक, भोकर👤 ज्ञानेश्वर पाटील, अंमळनेर👤 प्रा. संगीता भालसिंग, अहमदनगर👤 संगीता चाके-मोहनकर, रामटेक, नागपूर👤 गोविंद मानेमोड👤 साईनाथ भोरे👤 नरेंद्र राठोड👤 गजानन महाजन👤 ऋचाली चंदेल-बायस👤 लिंगन्ना पोतन्ना, येताळा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पहिले दाता शिष्य भये तन मन अरप्यो शीश ।पाछे दाता गुरु भये नाम दियो बखशीश ॥ 24 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः हसत राहणारे अनेकजण भेटतील पण, दु:खात पाठीमागे राहून साथ देणारे बोटावर मोजण्याएवढेच भेटतील. हसवणारे फार कमी प्रमाणात भेटतील पण, रडवणारे मात्र जागोजागी भेटतील. म्हणून याची पूर्णपणे जाणीव ठेवून कोणाकडून ही कशाचीही अपेक्षा ठेवू नये. ते आपले काम करत असतात आपण आपले काम करत रहावे. फरक एवढेच की, प्रत्येकांची काम करण्याची पद्धत जरा वेगवेगळी असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मदत*शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्‍याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्‍या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले*तात्पर्य -आपण दुसर्‍याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जुलै 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.yourquote.in/naa-saa-dlgh/quotes/paauus-aalaa-paauus-aalaa-duhkhii-cehrryaavr-hsuu-aannilaa-b71snn••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••❇️ *_ भारतीय आयकर दिवस _* ❇️•••••••••••••••••••••••••••••••••❇️ *_ या वर्षातील २०६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••❇️ *_महत्त्वाच्या घटना:_* ❇️•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.**२०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखल्यामुळे तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्‍कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.**१९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्‍च नागरी सन्मान भारतरत्‍न प्रदान**१९९७: ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केला.**१९६९: सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.**१९४३: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा - दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले. हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.**१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.**१८२३: चिलीमधे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.*❇️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ❇️••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५: पंकज अडवाणी-- भारतीय बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू* *१९८१: प्रा. राजकुमार रघुनाथ मुसने -- लेखक**१९८०: सुधाकर रामधन राठोड-- कवी, लेखक**१९७६: सप्तर्षी अ. माळी-- लेखक* *१९७४: सुभाष खुटवड -- पत्रकार ,लेखक, वक्ते**१९७१: चंद्रशेखर भुयार -- गझलकार**१९६९: जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका**१९६८: किरण सूर्यकांत शिंदे -- कवी**१९६४: विष्णू सूर्या वाघ -- कवी लेखक तथा गोवा विधानसभेचे माजी सभापती* *१९५३: सुचित्रा मधुकर कातरकर-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९४९: माधव अनंत विद्वांस -- प्रसिद्ध लेखक* *१९४७:जहीर अब्बास – पाकिस्तानी फलंदाज**१९४५: अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ’विप्रो’ (WIPRO) चे चेअरमन**१९३७: मनोज कुमार( हरिकृष्ण गोस्वामी )-- भारतीय अभिनेता,चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक,गीतकार आणि संपादक**१९३२: प्रा.मधुकर तोरडमल -- मराठी अभिनेते, लेखक (मृत्यू: २ जुलै २०१७ )**१९२९: बाळ जगन्नाथ पंडित-- क्रिकेट समालोचक, लेखक (मृत्यू: १७ सप्टेंबर २०१५ )**१९२८: केशुभाई पटेल – गुजरातचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: २९ ऑक्टोबर, २०२० )**१९१७: दि. य. देशपांडे -- महाराष्‍ट्रातील एक ज्‍येष्‍ठ तत्‍त्‍वज्ञ व प्राध्यापक (मृत्यू: ३१ डिसेंबर २००५ )**१९११: अमल ज्योती तथा ’पन्‍नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार (मृत्यू: २० एप्रिल १९६०)**१९११: गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्ति संग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी (मृत्यू: २१ नोव्हेंबर २००२ )**१९०६: चंद्र मोहन -- भारतीय अभिनेते (मृत्यू: २ एप्रिल १९४९ )**१८९९: राजाराम नारायण पराडकर -- ज्येष्ठ गायक (मृत्यू: ४ जून १९७५ )*❇️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ❇️••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: सतीश काळसेकर-- लोकप्रिय कवी, संपादक, अनुवादक (जन्म: १२ फेब्रुवारी १९४३ )* *२०२०: अ‍ॅड भास्करराव एकनाथराव आव्हाड -- प्रसिद्ध कवी लेखक तथा ज्येष्ठ विधिज्ञ**२०२०: अमला शंकर -- भारतीय नृत्यांगना (जन्म: २७ जून १९१९ )**२०१७: डॉ. बद्रीनारायण रामुलाल बारवाले -- भारतीय संशोधक, उद्योजक (जन्म: २७ ऑगस्ट १९३०)**२०१४: सुशीला राणी पटेल -- भारतीय शास्त्रीय गायिका, अभिनेत्री, डॉक्टर आणि पत्रकार (जन्म: २० ऑक्टोबर १९१८)**२००७: हरिश्चंद्र भगवंत लचके -- प्रसिद्ध व्यंगचित्रकार (जन्म: १८ फेब्रुवारी १९२१)**१९८०: अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (जन्म:३ सप्टेंबर १९२७ )**१९८०: पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२५ )**१९७४: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० आक्टोबर १८९१ )**११२९: शिराकावा – जपानी सम्राट (जन्म: ७ जुलै १०५३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कविता - पाऊस आला*पाऊस आला पाऊस आलादुःखी चेहऱ्यावर हसू आणिला..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रोजगार देणाऱ्या संस्थांना सरकारी मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Income Tax च्या स्लॅबमध्ये मोठा बदल; मोदी सरकाकडून दोन मोठ्या घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंचगंगा धोक्याच्या पातळीवर, ३५ रस्ते बंद, अनेक गावातून स्थलांतर सुरू; प्रशासनाकडून निवारा केंद्रांची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नीट-यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र निकाल पुन्हा जाहीर होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'लाडकी बहीण योजने'साठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे 6 बदल; विवाहित महिलांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'वन्समोअरला मराठीत पर्यायी शब्द नाही, एखादा इंग्रजीत यमक जुळवावा लागतो'; मराठीचे वाभाडे काढणाऱ्या कवितेवर शिक्षणमंत्र्यांचं अजब स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाला हरवण्यासाठी श्रीलंकेने आर्मी मेजरला दिली टीममध्ये जागा, चारिथ असालंका या खेळाडूला बनवले कर्णधार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लेखणी (पेन)* 📙लेखणीचा वापर नेमका कधी सुरू झाला, हे सांगता येणार नाही; कारण लेखणीचे स्वरूप सतत बदलत गेले आहे. भूर्जपत्रे, धातू यांवर जशी अक्षरे कोरलेली आढळतात, तशीच दगडातही कोरलेली आढळतात. पण त्या काळातील लेखणीचे स्वरूप सध्या ज्ञात नाही. ज्या अर्थी या अन्य स्वरूपात अक्षरे व्यक्त केली जातात होती, त्या अर्थी लेखणीचाही वापर असणारच.ज्ञात इतिहासात दौतीची शाई व बोरू हेच लेखणीचे सुरुवातीचे स्वरूप असावे. त्यानंतरचा वापर सुरू झाला तो ग्राफाइटच्या शिसपेन्सिलीचा. याच वेळी फळ्यावरचा खडू व पाटीवरची पेन्सिल यांचाही वापर सुरू होत गेला. रसायनशास्त्राच्या प्रगतीबरोबर शाईचे प्रकार बदलत गेले. त्यामध्ये अधिक सुटसुटीतपणा येत गेला. एकोणिसाव्या शतकात दौत-टाकांची जागा ऐटदार फाऊंटनपेनने घेतली. त्यातून निफावाटे गरजेप्रमाणे शाई बाहेर येत असल्याने त्याला फाऊंटनपेन असे नामाभिधानही प्राप्त झाले. प्लास्टिकच्या निर्मितीनंतर त्याचे वजन, आकार, सुबकपणा यात खूपच बदल होत गेले. आजचे अत्याधुनिक फाऊंटनपेन अत्यंत हलके, निमुळते असते. शाई भरण्यासाठी ते उघडावेसुद्धा लागत नाही, तर एखाद्या निर्वात पंपाचा उपयोग करावा, त्या पद्धतीने त्याच्या पोटातील रबरी नळीत शाई खेचून भरण्याची व्यवस्था असते.पेनच्या आकारात बदल होत होते, तसे त्याच्या निफातही बदल होत गेले. नीफ झिजू नये व त्याच्या टोकाचा आकार कायम राहावा, यासाठी विविध धातू आजवर वापरले गेले आहेत. पोलाद, टंगस्टन, प्लॅटिनम या धातूंचा मुख्य वापर व शोभेसाठी सोने वा चांदीची त्याला दिलेली झिलई हे त्यांचे स्वरूप राहिले आहे.गुरुत्वाकर्षणाने खाली उतरणारी शाई व हवेचा पेनमधील व बाह्य वातावरणातील समप्रमाणात दिला जाणारा दाब या तत्त्वावरच पेन काम करते. यामुळेच पेनने लिहिताना नेहमीच कागद खाली व पेन वर या अवस्थेतच लिहावे लागते. फार कशाला भिंतीवर कागद ठेवून त्यावर लिहू लागल्यास काही वेळातच शाई येणे बंद होते.१९५० सालच्या दशकात छापण्याच्या घट्ट शाईचा वापर करून बॉलपेन या प्रकाराची निर्मिती सुरू झाली.खोबणीत बसवलेल्या गोलाकार अत्यंत छोट्या बाॅलच्या कडेने शाई झिरपते, हेच याचे निफ म्हणा ना. पण यामुळे अक्षराचे वळण व त्यातील वैशिष्ट्ये मात्र कमी होतात. आज घटकेला बॉलपेन ही एक अत्यंत लोकप्रिय गोष्ट आहे.बॉलपेनचा शोध लागल्यापासून त्याच्या रिफिलमध्ये वापरली जाणारी शाई, तिचे रासायनिक घटक व टोकाशी वापरले जाणारे गोलाकार बाॅल यांतही खूप बदल होत गेले आहेत. जितक्या लहान आकाराचा बाॅल, तेवढी अक्षराची रुंदी कमीत कमी होत जाते. रेषेची रुंदी कमी झाल्याने पूर्वीचे बॉलपेन व सध्याचे बॉलपेन यांच्या ढोबळ स्वरूपात खूपच बदल झाला आहे.लेखणीचा वापर करणे हे नीट जमण्यासाठी सहा ते सात वर्षांचे वय आवश्यक असते, असे बालतज्ज्ञ म्हणतात. लेखणीचा वापर करता येणे हे मानवी मेंदूच्या उत्क्रांतीचे एक अत्यंत प्रगत लक्षण आहे, असेही मानले जाते. लेखणी ही तलवारीपेक्षाही श्रेष्ठ आहे, असे तलवार वापरणारेही मान्य करतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिश्रमातून आनंद निर्माण होत असतो ; क्रोधातून किंवा आळसातून नव्हे. सतत कामात राहिल्याने मनुष्याचे जीवन सुखी बनते. ----- रस्किन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात पहिले वन सर्वेक्षण केव्हा झाले ?२) विनायक नरहर भावे यांना 'विनोबा' हे नाव कोणी दिले ?३) सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे त्याला काय म्हणतात ?४) 'झाड' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो ? *उत्तरे :-* १) सन १९८७ २) महात्मा गांधी ३) पेशी ४) वृक्ष, तरू, पादप, द्रुम ५) सरडा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गोविंद तुळशीराम कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 विष्णू रामोड, धर्माबाद👤 राजेश पाटील मनुरकर, शिवव्याख्याते👤 संतोष मुलकोड, येवती, धर्माबाद👤 संतोष लवांडे👤 सचिन टेकाळे, कुपटी, माहूर👤 चिं. मनीत माधवराव हिमगिरे, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बूडा था पर ऊबरा गुरुकी लहरि चमक ।वेरा देखा झांझरा उतरि भया फरक॥ 23॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे गोड पदार्थ बनविण्यासाठी कितीही साखर, गुळ घातले तरी त्यात थोडेतरी मीठ घालावे लागते. कारण त्या मीठाशिवाय गोड पदार्थाला चव येत नाही. तसंच आपले कितीही गोड बोलणे असले तरी त्यात थोडेतरी परखडपणे बोलण्याची सवय असली पाहिजे. हे दोन्ही गुण आपल्यात असल्याने कोणालाही घाबरण्याची वेळ आपल्यावर येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोठेपणाचा गर्व*एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.*तात्पर्य - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/t7SH2Cenvt1nYvnb/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_वनसंवर्धन दिन_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील २०५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: विस्डेनतर्फे कपिल देव यांची विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवडून* *१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.**१९८६ :जैव‍अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.**१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ - २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.**१९८२: 'इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.**१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारने परकीय शब्दांच्या वापरावर बंदी घातली.**१९२७: मुंबईत ’रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या. याचेच पुढे ’आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••• *१९९३: कृष्णा तात्याराव ठाकरे -- लेखक दिग्दर्शक**१९९०: युझवेंद्र चहल -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१०९०: अविनाश अरुणा जगदेव -- लेखक* *१९८३: भरत शेषराव कांबळे -- कवी**१९८०: रमजान मुल्ला -- कवी ,लेखक* *१९७६: ज्यूडीथ पोल्गार – हंगेरीची बुद्धीबळपटू**१९७३: हिमेश रेशमिया -- भारतीय संगीतकार, गायक व चित्रपट अभिनेता**१९७०: अलका संजय कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका* *१९६३: प्रा. डॉ. शोभा इंद्रभान रोकडे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९६१: मिलिंद गुणाजी --भारतीय अभिनेता, मॉडेल, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता,लेखक**१९५६: लक्ष्मण मारुती गायकवाड -- प्रसिद्ध मराठी कादंबरीकार* *१९५५: मो. ज. मुठाळ --सुप्रसिद्ध कवी, लेखक**१९५५: रंजना देशमुख -- मराठी अभिनेत्री (मृत्यू: ३ मार्च २००० )**१९५३: ग्रॅहम गूच -- माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू**१९४८: डॉ. जया द्वादशीवार -- स्त्रीवादी साहित्याच्या अभ्यासक, संवेदनशील लेखिका, वक्त्या ( मृत्यू: २० मार्च २०१७ )**१९४७: डॉ. गिरीश गांधी -- ज्येष्ठ विचारवंत आणि वनराई प्रतिष्ठानचे अध्यक्ष,पूर्व विधायक**१९४७: डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ**१९४२: प्रा. डॉ. विवेक गोखले -- जेष्ठ विचारवंत,लेखक* *१९३८: हरिहर शाहुदेव ठोसर -- विख्यात भारतीय पुराभिलेखविद व इतिहासकार (मृत्यू: २२ मे २००५ )**१९३७: विजया चिटणीस- मराठी भाषातज्ज्ञ, अध्यापनतज्ज्ञ,लेखिका (मृत्यू: २४ जुलै १९८४ )**१९३३: सुमा चिटणीस -- एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या माजी कुलगुरू तथा लेखिका**१९३२: यशवंत कृष्णाजी रांजणकर-- मराठीतील पत्रकार,कादंबरीकार,नाटककार, मराठी चित्रपट कथा-पटकथा-लेखक, अनुवादक (मृत्यू: १५ जून २०२० )**१९२७: धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका(मृत्यू: १ जून, २०१४ )**१९०६: चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१ )**१९०३: चिंतामण यशवंत मराठे -- कथालेखक नाटककार (मृत्यू: ४ जुलै १९७९ )**१८८८: पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी -- ज्ञानेश्वर वाड:मयाचे भाष्यकार, लेखक, अनुवादक (मृत्यू: १३ जानेवारी १९५७ )**१८८६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९७६ )**१८८५: युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २७ एप्रिल १८२२ )**१८५६: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी,भगव्‌दगीतेचे भाष्यकार (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० )*🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१६: सईद हैदर "एस. एच." रझा -- भारतीय चित्रकार (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२ )**२०१२: लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (जन्म: २४ आक्टोबर १९१४ )**२००४: महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २९ सप्टेंबर १९३२ )**१९९९: दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त एक रचना*... लोकमान्य टिळक ...*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, खा. वर्षा गायकवाड यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात शिक्षण विभागाची मोठी कारवाई, 29 बोगस शाळा केल्या बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना पोलिसांनी केली अटक; दुबई विमानतळावरच घेतले ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा धुमधडाका:​जनजीवन विस्कळीत, कोयना धरणाच्या पाणी पातळीत 7 टीएमसीने वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचे 7 खेळाडू करणार श्रीलंकेत पदार्पण, भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका 27 जुलैपासून सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?* 📙विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••द्वेष व कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका. ---- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) झाडाची वय हे झाडाच्या तनावर असलेल्या रिंगाच्या संख्येच्या आधारावर काढले जाते या पद्धतीला काय म्हणतात ?२) केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत ?३) QR CODE चा full form काय आहे ?४) 'तरुण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'सेमिनरी हिल्स' हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) डेंड्रोक्रोनोलॉजी २) धर्मेंद्र प्रधान ३) Quick response Code ४) जवान, युवक ५) नागपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 उदयकुमार शिल्लारे, तंत्रस्नेही शिक्षाक, धर्माबाद👤 अलका कुलकर्णी, साहित्यिक👤 जितेंद्र पाटील मनूरकर, धर्माबाद👤 आनंदराव पाटील, तेलंगणा ओबीसी व्हॉईस प्रेसिडेंट, म्हैसा👤 विकास पाटील👤 शंकर बोईनवाड, येवती👤 लक्ष्मण मलगिरे👤 वैभव पाटील👤 प्रदीप दळवी👤 संतोष सुवर्णकार, धानोरा खु. धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कहना था सो कह चला अब कछु कहा न जाय।एक आया दूजा गया दरिया लहर समाय ॥ 22 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हत्तीसारखा बलाढ्य प्राणी जेव्हा, रस्त्यानी शांतपणे जात असतो तरी त्याच्यावर कुत्रे भुंकत असतात. तरीही हत्ती चालणे बंद करत नाही आणि कोणाकडे लक्षही देत नाही. भलेही तो शरीराने बलाढ्य असेल तरी त्यापेक्षा त्याच्यात खूप मोठे गुण आहे म्हणून तो, त्या गुणांची कदर करुन आपल्या मार्गाने जात असतो. आपण सुद्धा त्या बलाढ्य असलेल्या हत्ती प्राण्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*तात्पर्य :- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dFSYQQS3fSZDnWJR/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_ या वर्षातील २०४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.**१९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.**१९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.**१९४२: वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.**१९३३: विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.**१९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे 'हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.**१९०८: ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा*💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: निपुण अविनाश धर्माधिकारी-- मराठी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक* *१९८४: नामदेव कोळी -- प्रसिद्ध कवी, लेखक, अनुवादक**१९७५: गंगाधर गायकवाड-- लेखक**१९७३: मकरंद मधुकर अनासपुरे -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता**१९७०: देवेंद्र गंगाधर फडणवीस -- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री* *१९६९: संजय सुक्रीतदास बर्वे -- प्रसिद्ध लेखक* *१९६६: डॉ.नानासाहेब सूयवंशी -- लेखक, संपादक* *१९६६: विद्या शशिशेखर शिंदे -- लेखिका* *१९६६: सिमंतिनी खेर -- लेखिका**१९६५: सारंग शंतनू दर्शने -- वरिष्ठ सहसंपादक म.टा.मुंबई,लेखक,अनुवादक**१९६२: नानाभाऊ नत्थु माळी -- कवी, लेखक* *१९५९: अजित अनंतराव पवार -- महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री**१९५५: मजहर खान-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक (मृत्यू : १६ सप्टेंबर १९९८)**१९५५: प्रवीण कुलकर्णी (पी.डी)-- रंगकर्मी, नाटय दिग्दर्शक, कवी, लेखक**१९५०: प्रल्हाद आवळसकर -- प्रसिद्ध लेखक* *१९३७: वसंत रांजणे– मध्यमगती गोलंदाज (मृत्यू: २२ डिसेंबर २०११ )**१९३१: शकुंतला विष्णू गोगटे -- कथा व कादंबरी लेखिका (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९९१ )**१९३०: डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर -- बीजगणितीय भूमितीतील योगदानासाठी ओळखले जाणारे भारतीय अमेरिकन गणितज्ञ (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२ )**१९२५: गोविंद श्रीपाद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक ( मृत्यू: २१ मार्च २०१७ )**१९२३: मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – सुप्रसिद्ध पार्श्वगायक.(मृत्यू:२७ ऑगस्ट १९७६ )**१९१८: गोपाळराव बळवंतराव कांबळे (जी. कांबळे) -- नावाजलेले मराठी चित्रकार (मृत्यू : २१ जुलै २००२ )**१९०८: भालचंद्र मोरेश्वर गोरे-- लेखक, अनुवादक* *१८९८: पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५ )*💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: अनंत यशवंत खरे उर्फ नंदा खरे-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (जन्म: २आक्टोबर१९४६ )* *२०१८: सुधा नरवणे-- आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसिद्ध निवेदिका आणि मराठी लेखिका(जन्म: १४ सप्टेंबर १९३० )**२०१५: यशवंत कानिटकर -- मराठी भाषातज्‍ज्ञ, मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक(जन्म:१२ डिसेंबर १९२१ )* *२०११: डॉ. सुरेशचंद्र गंगाराम नाडकर्णी-- मराठी लेखक, गझलचे अभ्यासक, संगीततज्ज्ञ (जन्म: १९२९)**१९९५: हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर१९०४ )**१९८४: गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक (जन्म: १९०९ )**१९१८: इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमा निमित्ताने प्रासंगिक लेख*माझे गुरू : एक आठवण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी बालसाहित्यात विशेष प्रयोग झाले नाहीत, माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे परखड मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे थैमान ! नद्यांना पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बांगलादेशातील सुप्रीम कोर्टाने बहुतांश नोकऱ्यातील आरक्षण रद्द करण्याचे दिले आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधानसभा एकत्र, पण महापालिका स्वतंत्र लढणार; अजित पवारांची पुण्यातून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज आज बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI देणार 8.5 कोटींची मदत - जय शहा यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 तोंडाला दुर्गंधी का येते ? 📒ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्‍याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मृत्यू म्हणजे चेतनेचा अंत आणि शिक्षण म्हणजे मानवाच्या चैतन्याचा अविष्कार. ----दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यभरात वाचन चळवळीसाठी 'महावाचन उत्सवा'चे ब्रँड ॲम्बेसेडर कोणाला बनवणार आहेत ?२) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?३) छत्रपती संभाजी महाराजांनी धार्मिक धोरणात कोणत्या संताच्या मुलाला वर्षासन दिले होते ?४) 'तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) PIN चा full form काय आहे ? *उत्तरे :-* १) अमिताभ बच्चन २) शिवराज सिंह चौहान ३) संत तुकाराम ( महादोबा या मुलाला ) ४) कासार, सारस, तटाक, तळे ५) Personal Identification Number *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुमंत भांगे, IAS ऑफिसर, मुंबई👤 संजय कदम, पत्रकार, देशोन्नती धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 प्रल्हाद तुमेदवार, शिक्षक, नांदेड👤 महेश व्ही. जाधव, बिजापूर, तेलंगणा👤 अनुराधा हवेलीकर-पदमे👤 श्रीनिवास वाघमारे👤 संतोषकुमार दुरगुडे👤 संतोष जाधव👤 अमोल बबनराव गायकवाड👤 धनराज वाघ👤 विश्वनाथ चित्रलवार👤 दामोदर साळुंके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चकवी बिछुड़ी रैन की आन मिली प्रभात।जो जन बिछुड़े नाम से दिवस मिले न रात ॥ 21 ॥अर्थ – जिस प्रकार चकवी रात में बिछड़ जाने के पश्चात , सुबह आ कर मिल जाती है , लेकिन जो लोग नाम से बिछड़ जाते है ( उस सार नाम ) से उन्हें फिर कोई नहीं बचा सकता और उसे काल खा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणासोबत ही का असेना बोलते वेळी जेव्हा आपण आदराने बोलत असतो. त्यावेळी समोरच्या व्यक्तीला सुद्धा आनंद होत असतो. सोबतच तो आनंद बघून आपल्याला विशेष समाधान मिळत असते. तो मिळालेला आनंद व समाधान त्यावेळी जगावेगळा असतो. पण एखाद्या वेळी नको त्या शब्दात बोलून कोणाचा अनादर केल्याने आपल्यात असलेले एखादे चांगले गुण मात्र नष्ट होण्याच्या मार्गांवर असते. म्हणून कोणासोबतही बोलताना समोरच्या व्यक्तीला दु:ख होणार नाही याची काळजी घ्यावी.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!                   *तात्पर्य*शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/YeExVwGXbfmXQdyb/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔶 *_आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन_* 🔶 ••••••••••••••••••••••••••••••••••• 🔶 *_ या वर्षातील २०२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔶 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔶•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर**१९७६: मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग -१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.**१९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.**१९६९: अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.**१९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.**१९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.**१९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.**१९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.**१९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.**१९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.**१९०३: फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.**१८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.**१८२८: 'मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.*🔶 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔶••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: दिनेश राठोड ( जिजाईसुत) -- कवी, लेखक**१९८१: प्रा.इंद्रकला प्रीतमलाल बोपचे -- कवयित्री,लेखिका**१९८०: ग्रेसी सिंग -- भारतीय अभिनेत्री* *१९७९: रत्नकुमार निंबाजी गोरे -- कवी* *१९७७: मनोज सिंधुताई सदाशिव बोबडे -- कवी**१९७६: साधना योगेश जोशी -- लेखिका**१९६८: रंगराव बन्ने -- कवी, लेखक**१९६७: मानसी किरण देशमुख-- कवयित्री, लेखिका* *१९५३: प्रा.श्रीरंग चोखोबा तलवारे -- लेखक**१९५२: कपूर लहूदास वासनिक --- कवी**१९५२: प्रा.गणेश निवृत्ती आवटे -- कादंबरी, कथा लेखन करणारे लेखक* *१९५०: नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक**१९५०: रंगनाथ गबाजी पठारे -- प्रसिद्ध कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक**१९४८: पंडित सुरेश तळवलकर --- हिंदुस्तानी संगीतातील मराठी तबलावादक**१९४७: प्रा.मुरलीधर महादेव सायनेकर-- लेखक* *१९२९: राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै १९९९ )**१९२३: विठ्ठल गोपाळ खोबरेकर -- भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार (मृत्यू: २००७ )**१९२१: पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.(मृत्यू: ३१ मे १९९४ )**१९१९: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (मृत्यू: ११ जानेवारी २००८ )**१९१९: सुरेंद्र शिवदास बारलिंगे --कथाकार, कादंबरीकार, तत्त्वचिंतक, ललितलेखक (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७ )**१८३६: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ )**१८२५: विष्णू भिकाजी गोखले( विष्णूबुवा ) -- महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत लेखक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १८७१)**१८२२: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १८८४ )*🔶 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔶 •••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: निर्मला बळवंत पुरंदरे -- भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ज्ञ (जन्म: ५ जानेवारी १९३३)**१९९५: शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५ )**१९७३: ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४० )**१९७२: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३० )**१९६५: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर १९१० )**१९५१: अब्दूल्ला (पहिला) – जॉर्डनचा राजा (जन्म: फेब्रुवारी १८८२ )**१९४३: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी १८८२ )**१९३७: गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (जन्म: २५ एप्रिल १८७४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमा निमित्ताने प्रासंगिक लेख*" ... आई माझा गुरू ..."*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरटीईतून खाजगी शाळा वगळण्याबाबतचा राज्य सरकारचा अध्यादेश हायकोर्टाने केला रद्द !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाडामुळे जगभरातल्या अनेक सेवा विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार- नाना पटोले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विविध योजनांचा प्रचार प्रसार स्थानिक उद्योजकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं - आतिश कुमार सिंग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *१२ न्यायाधीशांची देशातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये नियुक्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पूजा खेडकरची उलटी गिनती सुरु, UPSC गुन्हा दाखल करणार, पद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही धाडली !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *केस का गळतात ?* 📕केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिओस्कार या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचनाने मनुष्य सुशिक्षित होतो ; पण शिक्षणाने मनुष्य पक्का होतो. ---- हर्बर्ट स्पेन्सर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'द वॉल' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?२) OTP चा full form काय आहे ?३) छत्रपती संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण किती युद्धे लढली होती ?४) 'ढग' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) फिफा क्रमवारीत कोणता देश पहिल्या स्थानावर कायम आहे ?*उत्तरे :-* १) राहूल द्रविड २) One Time Password ३) १२० युद्धे ४) मेघ, जलद, पयोद ५) अर्जेंटिना ( भारत १२४ व्या स्थानावर )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 व्यंकट चिलवरवार, शिक्षक नेते, नांदेड👤 श्रीराम भंडारे👤 दत्तात्रय तोटावाड, सामाजिक कार्यकर्ते, धानोरा खु.👤 लक्ष्मण दावणकर, केंद्रप्रमुख, लातूर👤 साईनाथ नारायण माळगे, मा. गटसमन्वयक, धर्माबाद👤 गंगाधर पालकृतवार, शिक्षक, धर्माबाद👤 दिनेश राठोड👤 करुणा खंडेलोटे, सामाजिक कार्यकर्ती, नांदेड👤 साईनाथ ईबीतवार, येवती👤 बजरंग आर्गेलू, पांगरी👤 राहुल लोखंडे, पांगरी👤 सचिन राजेंद्र पिसाळ, शिक्षक, बीड👤 मोहन कुलकर्णी, शिक्षक, हदगाव👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगत जनायो जिन्ही सकल सो गुरु प्रगटे आय ।जिन गुरु आँखिन देखियाँ सो गुरु दिया लखाय ॥ 15॥अर्थ – संसार ने जिस परमात्मा का बात करता है ,  वो मेरे गुरु स्वरुप में प्रगट होकर उस सत्यपुरुष का दर्शन करा दिये।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच दरवाजे बंद नसतात. असले तरी समोर एखादा तरी दरवाजा खुला असतो. ज्या दरवाजातून ये,जा करणारे असतात त्यांना तो दरवाजा चांगल्याने ओळखत असतो. म्हणूनच दरवाजाला महत्व आहे. म्हणून आपण सुद्धा त्या निर्जीव असलेल्या दरवाजाकडून शिकण्याचा प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!*तात्पर्य :- शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/qBfvPj2V9rSFjXVw/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_ या वर्षातील २०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९९३: ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९२: ऊर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर**१९८०: सोविएत युनियनमधील मॉस्को येथे २२ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.**१९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.**१९५२: फिनलंडमधील हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई**१९३५: जगात ’पार्किंग मीटर’चा वापर प्रथमच अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील वाहनतळावर सुरू झाला.* 🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: कॉन्जेनिगे दिलहारा फर्नडो -- श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९७२: अजय आर्थर देसाई -- कवी* *१९६३: विजया भालचंद्र गोरे -- कवयित्री तथा निवृत्त न्यायाधीश**१९६३: सुशांत रे -- हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील अभिनेता (मृत्यू: ८ मार्च २००४ )**१९६१: हर्षा भोगले -- भारतीय क्रिकेट समालोचक आणि पत्रकार* *१९६१: स्मिता सतीश दोशी -- कवयित्री, लेखिका**१९६०: देविदास भावराव फुलारी -- प्रसिद्ध कवी , लेखक* *१९५९: शुभांगी कुलकर्णी -- भारतीय माजी क्रिकेटपटू* *१९५५: रॉजर बिन्नी – क्रिकेटपटू**१९५४: विष्णू श्रावण भेंडारकर -- कवी, लेखक* *१९५४: स्नेहलता विलास जोशी -- लेखिका**१९४६: इलि नास्तासे – रोमानियन टेनिसपटू**१९३८: डॉ. जयंत विष्णू नारळीकर – खगोलशास्त्रज्ञ, १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणा संदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.**१९३५: प्रा. सु. ग. शेवडे --भारताचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते,प्रवचनकार**१९३५: रमेश मुधोळकर -- बालसाहित्यकार व चित्रकार (मृत्यू: १३ मार्च २०१६ )* *१९३१: प्रेमानंद वासुदेव मडकईकर -- लेखक* *१९३१: मधुकर सुदामा पाटील. -- समीक्षक**१९३०: प्रा.रुपराव पांडुरंग पाजणकर-- समीक्षक, संपादक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९९१ )* *१९२८: अन्वर फर्रुखाबादी -- कव्वालीचे गीतकार(मृत्यू: २९ जून २०११)**१९०८: गोपाळ कृष्ण विनायक चिरमुले-- लेखक* *१९०२: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४ )**१८९६: ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक (मृत्यू: ६ जानेवारी १९८१ )**१८२७: मंगल पांडे – क्रांतिकारक (मृत्यू: ८ एप्रिल १८५७ )*🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: रजत मुखर्जी--भारतीयचित्रपट दिग्दर्शक**२०१८: गोपालदास नीरज -- गीतकार, कवी व हिंदी लेखक (जन्म : ४ जानेवारी १९२५ )**२०१७: उमा भेंडे -- भारतीय अभिनेत्री (जन्म: १९४५)**१९९३: गिरीलाल जैन -- भारतीय पत्रकार(जन्म : १९२४ )**१९६८: प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (जन्म: २९ जून १९०८ )**१९६५: सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ मार्च १८७५ )**१८८२: फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (जन्म: १० नोव्हेंबर १८५१ )**१३०९: संत विसोबा खेचर (संत नामदेव यांचे गुरू) समाधिस्थ झाले*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सेमी इंग्रजीची समस्या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कलाकाराचे सांगितीक क्षेत्रातील योगदान हे चिरकाल टिकते - संगीतकार डॉ. भरत बलवल्ली यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी 1958 अर्ज, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती, तरुणांना रोजगार सक्षम बनवण्याचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात शेतकरी संघटनाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक, राज्यातील शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्याच्या पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा - पर्यटनमंत्री गिरीश महाजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने दिला रेड अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिवसेना ठाकरे गटाला आता देणगी घेता येणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड, सुर्यकुमार यादव T20 संघाचा कर्णधार, संघामध्ये मराठमोळ्या श्रेयस अय्यरचं कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *घोळाणा फुटल्यास काय करावे ?* 📕उन्हातून खेळून आल्यावर काही वेळा लहान मुलांच्या नाकातून रक्त येते. हा प्रकार तुम्हीही केव्हातरी अनुभवला असेल वा पाहिला असेल. यालाच घोळाणा फुटणे असे म्हणतात. नाकाच्या पुढच्या भागात नाजूक केशवाहिन्या असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या अशा रक्तवाहिन्यांतून रक्त येऊन या भागात अधिक रक्तपुरवठा होतो. या केशवाहिन्या उष्णतेने प्रसरण पावतात, प्रसरण पावून फुटतात व रक्त येते. या भागातच श्वसनावाटे घेतली जाणारी उष्ण हवा प्रथम संपर्कात येते. त्यामुळे या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवर उपरोक्त परिणाम होतो.नाकाला इजा, दुखापत होणे, सतत नाक कोरण्याची सवय, खूप जोरात नाक शिंकरणे अशा साध्या कारणांबरोबर बन्याच गंभीर कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील वाढ, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयाच्या झडपेचे आजार, रक्ताचा कर्करोग, अॅस्पीरीन, क्वीनीन यांसारखी औषधे व रक्तश्राव होण्याची प्रवृत्ती यांचा समावेश होतो. अचानक कोणाचा घोळाणा फुटल्यास काय करावे? ते आता आपण पाहू. मानेखाली उशी द्यावी आणि झोपवून ठेवावे, श्वासावर नियंत्रण करत नाकानेच श्वास घ्यायला सांगावा. तरीही रक्त थांबत नसेल तर रक्तस्राव होत असताना नाकाचा पुढचा भाग दोन बोटात घट्ट धरून ठेवावा. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन रक्तस्राव थांबवता येतो. तसेच ज्या नाकपुडीतून रक्त येत असेल, त्यामध्ये कापसाचा किंवा गॉझचा कपडा असल्यास तो नाकपुडीत पुढच्या भागात घालून थोडा वेळ दाबून धरावा व तरीही रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे न्यावे. वारंवार असा त्रास होत असेल, तर योग्य निदान करून घेणे व त्यानुसार उपचार करणे हेच योग्य ठरेल. उच्च रक्तस्त्रावामुळे असे होत असल्यास रक्तदाब कमी करणारी औषधे व्यावीत. नाकात काही वाढ असेल, लहान मुलांनी नाकात काही घालून घेतले असेल, तर ते काढून टाकावे इत्यादी.नाकातून रक्त येणे वा घोळाणा फुटणे १९ टक्के वेळा एक सौम्य स्वरूपाचे लक्षण असले, तरी क्वचित प्रसंगी (वयोमानानुसार) गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे रक्तस्राव होताना घाबरून न जाता प्रथमोपचार करणे व नंतर तपासण्या करून जर काही आजार असेल, तर त्यावर उपचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल. काही गंभीर आजार नसल्यास व बारंबार घोळाणा फुटण्याची सवय असल्यास आयुर्वेदातील अडुळसा व गुड़ या वनस्पतींचा चांगला उपयोग होतो. ताजी अडुळशाची पाने मिळाल्यास त्यांचा वाफवून रस काढून त्यात साखर घालून सकाळ-संध्याकाळ एक छोटा कप भरून प्यावा.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या सोबती असलेला अंतराळवीर कोण ?२) उडीसातील १२ व्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे, भांडाराचे दरवाजे किती वर्षानंतर उघडण्यात आले ?३) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' जाहीर केली आहे ?४) 'डोळे' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) केंद्र सरकारने कोणता दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे ? *उत्तरे :-* १) बझ ऑल्ड्रिन २) ४६ वर्षे ३) महाराष्ट्र ४) चक्षू, अक्ष, नयन, नेत्र, लोचन ५) २५ जून*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गजानन शिराळे👤 श्रीनिवास मुरके, नांदेड👤 माधव रेड्डी👤 मनोज बडे, स्वयं उद्योगी, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु को कीजे बंदगी कोटि-कोटि प्रणाम ।किट ना जाने भृंग को वह ( गुरु ) कर लीजिए आप सामान ॥ 14॥अर्थ – गुरु को बंदगी कीजिये करोड़ो बार प्रणाम कीजिये , क्यूंकि गुरू ही ऐसे दानी दाता  है जो शब्द रूपी ज्ञान से अपने शिष्य को अपने जैसे बना लेते है , उसी प्रकार जैसे एक कीट को भृंगी अपने शब्द से अपने जैसा बना देता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणुसकी मध्ये खरी श्रेष्ठता असेल म्हणूनच होऊन गेलेल्या थोर महाविभूंतीनी. माणुसकीचे महत्व जाणून तिला जास्त महत्व दिले आहे. म्हणून आपणही त्यांच्या विचारांना आत्मसात करुन जगण्याचा प्रयत्न करावा. व माणुसकी धर्माची जाणीव ठेवून तिचे महत्व इतरांना ही सांगावे आजच्या घडिला अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाघा प्रमाणे स्वतःला ओळखा*स्वामी विवेकानंद आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगत असलेली ही गोष्ट. एकदा एका जंगला मध्ये एक वाघच पिल्लू वाघिणी पासून हरवले आणि मेंढ्यांच्या कळपात जावून मिसळले. हळू हळू ते पिल्लू त्या कळपातच वाढू लागले आणि तिथेच मोठे झाले. ते पिलू मेंढ्या प्रमाणेच गवत खायचे, बे बे करायचे, आणि भीती वाटली कि पळून जायचे. त्याच्या सुदैवाने एक दिवस त्याची दुसऱ्या वाघाशी भेट झाली तेव्हा त्याला कळले की तो एक शक्तिशाली वाघ आहे. आणि सर्व त्याला भितात मग मीच का असा आहे, तेव्हा पासून त्याचे बे बे करणे, गवत खाणे, भीतीने पळून जाणे बंद झाले.*तात्पर्य* - स्वतःला ओळखा, प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रचंड शक्ती आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://shopizen.app.link/rALIpo8ljLb••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟥 *_ या वर्षातील २०० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ’ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६: ’तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.**१९८०: भारताने ’एस. एल. व्ही. - ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.**१९७६: मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.**१९६८: सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे ’इंटेल’ (Intel) कंपनीची स्थापना**१९२५: अ‍ॅडॉल्फ हिटलरने ’माइन काम्फ’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.**१८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना**१८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.*  🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟥 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: स्मृती श्रीनिवास मानधना-- भारतातील प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू**१९८९: भूमी पेडणेकर -- भारतीय अभिनेत्री**१९८२: प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ’मिस वर्ल्ड २०००’ विजेती**१९७९: माला राजेश पारधी -- कवयित्री**१९७९: राकेश काळू वानखेडे -- लेखक, कवी* *१९७५: डाॅ.कमलाकर कोंडिबा राऊत -- लेखक* *१९७२:सौंदर्या – कन्‍नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: १७ एप्रिल २००४ )**१९७१: सुखविंदर सिंग -- प्रसिद्ध भारतीय गायक**१९७०: संजय जाधव -- भारतीय सिनेमॅटोग्राफर आणि हिंदी आणि मराठी चित्रपट दिग्दर्शक**१९६९: अर्चना मिरजकर -- कथा,कादंबरी मराठी व इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित, अनेक ग्रंथांचे भाषांतर* *१९६६: प्रा.शिवाजी वरुडे --- वात्रटिकाकार, लेखक**१९६०: विश्वास नेरुरकर -- संगीत संशोधक व अभ्यासक* *१९६०: अनिल जाधव --- गझलकार**१९५८: रेणू राजाराम दांडेकर -- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका**१९५०: विद्याधर शुक्ल -- लेखक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९४९: डेनिस कीथ लिली -- निवृत्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९४८: सुजाता देशपांडे -- मराठी व हिंदी भाषेतील कवयित्री,लेखिका**१९४८: गजेंद्र अनंतरामजी गजभिये -- कवी**१९४८: बाबुलाल माळी -- शैक्षणिक व चरित्रात्मक लेखन करणारे लेखक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९४७: सुभदा मुळे -- लेखिका* *१९४१: निक्षुभा नंदकुमार जोशी -- कवयित्री**१९४०: डॉ.भागवत शिवराम भोयर -- लेखक, कवी* *१९२७: ’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक (मृत्यू: १३ जून २०१२ )**१९२७: डॉ.चंद्रशेखर शिवलिंग कपाळे -- कवी, लेखक, संपादक**१९२४: श्रीधर उर्फ बापूराव दत्तात्रेय आगाशे -- चरित्रकार, प्रवचनकार (मृत्यू: २५ एप्रिल १९९६ )**१९१८: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३ )**१८६१: कादंबिनी बोस गांगुली -- संपूर्ण दक्षिण आशियातील पहिल्या महिला डॉक्टर ( मृत्यू: ३ ऑक्टोबर १९२३ )**१८४८: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २३ आक्टोबर १९१५ )**१६३५: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (मृत्यू: ३ मार्च १७०३ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥 •••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: राजेश खन्ना – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते, निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९४२ )**२०१२: सुरेश सरैया -- क्रिकेट जगतात रेडिओ क्रिकेट समालोचक (जन्म: २० जून १९३६ )**२००१: रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (जन्म: २८ जून १९३४ )**१९९४: डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक* *१९८९: डॉ.गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक (जन्म: २ मे १९१४ )**१९६९: ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (जन्म: १ ऑगस्ट १९२० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नासा येवतीकर लिखित आणि फेसबुकवर अनेक वाचकांच्या पसंतीस उतरलेली *" कादंबरी ललाटरेषा "*..... कादंबरी वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लाडकी बहीणनंतर भाऊरायांसाठी मुख्यमंत्र्यांची योजना, दरमहा १० हजार मिळणार, पंढरपुरातून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *साताऱ्यातील कोयना नगर परिसरात काल दुपारी ३.२६ वाजेच्या सुमारास बसले भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिवाजी महाराजांची वाघनखं मुंबईत दाखल, 19 जुलै रोजी साताऱ्यात होणार भव्य दिव्य सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा भवन’ चे भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *19 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसच्या 2 महत्वाच्या बैठका होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कल्याण वरून शिर्डीला पायी निघालेल्या यात्रेकरूंना भरधाव वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *“चांगला पाऊस येऊ दे, पीकपाणी चांगलं होऊ दे”, मुख्यमंत्र्‍यांकडून विठुरायाला साकडं, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 ************************आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे.ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••द्वेष व कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका. ---- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्वाधिक फॉलोवर असलेला १०० मिलियनचा टप्पा पार करणारा जगातील पहिला नेता कोण बनले आहेत ?२) टाइम्स हायर एज्युकेशन २०२४ च्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे ?३) प्रजासत्ताक दिनी सैन्यादलाची मानवंदना कोण स्वीकारतो ?४) 'डोंगर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात 'सलूनो' म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) नरेंद्र मोदी २) ऑक्सफर्ड विद्यापीठ ३) राष्ट्रपती ४) पर्वत, नग, शैल, अचल ५) रक्षाबंधन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीनिवास पुसा, बिलोली👤 राज राठोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कथनी अति गुण सी करनी विष की लोए।कथनी तजि करनी करो तो विष से अमृत होए॥13॥अर्थ – सिर्फ कहना गुण  से भी मीठा होता है , और उसे करना जहर से भी ज्यादा कड़वा होता है लेकिन जब कहना छोड़ कर उस काम को करने लगते है तब , वो जहर से अमृत में बदल जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या लोकांशी आपला परिचय नसते ते लोक कितीही व कोणत्याही शब्दात बोलले तरी काहीच वाटत नाही. पण,जे लोक विश्वासात घेऊन दिखावूपणाचे वागणे ठेवतात अन् आपले काम झाले की, मग कोणत्याही शब्दात बोलून मोकळे होऊन जातात तेव्हा मात्र क्षणभरासाठी सुद्धा का होईना पण, मन अगदी अशांत होते. म्हणून असेही वागणे नसायला पाहिजे जेणेकरून माणसावरचा पूर्ण विश्वास कायमचा उडून जाईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ कोल्हा,लांडगा व घोडा ❃*            *एका कोल्ह्याने शेतात* चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले.          घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्‍याने पाहणार्‍या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्‌गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्‍याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.'            ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !'         *_तात्पर्य_*   *स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्‍याच्या सहानुभूतीची अपेक्षा •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/gq2WyREovPs6TK9Q/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟪 *_ जागतिक सर्पदिन_* 🟪 🟪 *_ या वर्षातील १९८ वा दिवस आहे_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: गुजराथमधे शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे; असा निर्णय घेतल्याची माहिती गुजराथच्या शिक्षण राज्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.**१९९२: भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.**१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणार्‍या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण**१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.**१९४५: अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी* 🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: कतरिना कैफ – चित्रपट कलाकार**१९७५: अनंत कराड-- कवी, लेखक* *१९७३: शॉन पोलॉक – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू**१९६८: धनराज पिल्ले – हॉकीपटू**१९६७: स्मिता विनोद गालफाडे -- लेखिका**१९६५: डॉ. शशिकांत रामचंद्र गंगावणे -- कवी**१९६२: नंदकिशोर प्रभाकर ठोंबरे -- कवी* *१९५२: वंदना गुप्ते -- भारतीय अभिनेत्री**१९५०: डॉ. विकास कशाळकर -- हिंदुस्तानी शास्त्रीय गायक,संगीत दिग्दर्शक**१९४६: प्रा.डॉ उत्तम रुद्रवार-- सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि वक्ते* *१९४५: लक्ष्मण सिद्राम जाधव -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक (मृत्यू: ५ जून २०१९ )**१९४३: प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे-- प्राध्यापक,मराठी साहित्यिक (मृत्यू: ६ जानेवारी २०१० )**१९२३: सदानंद जोशी -- जेष्ठ एकपात्री कलाकार (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००८ )**१९२३: के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल**१९१७: जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक (मृत्यू: १४ मे १९७८ )**१९१४: वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – मराठी साहित्यिक (लघुकथा,लोककथा, बालवाड़्मय,चरित्र,अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५ )**१९१३: स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ )**१९०९: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (मृत्यू: २९ जुलै १९९६ )**१८९१: देवदत्त नारायण टिळक -- कवी, कथाकार कादंबरीकार, संपादक (मृत्यू: २७ डिसेंबर १९६५ )* 🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: सुरेखा सिक्री-- भारतीय अभिनेत्री (जन्म: १९ एप्रिल १९४५ )**२०२०: निला सत्यनारायण - महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला निवडणूक आयुक्त (जन्म: ५ फेब्रुवारी १९४९ )**२०१९: राजाराम पिराजी ढाले ( राजा ढाले) -- भारतीय लेखक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ३० सप्टेंबर १९४० )**२०१९: पुरुषोत्तम बोरकर -- सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार (जन्म: १९५६ )**२०१३: बरुन डी -- भारतीय इतिहासकार आणि लेखक (जन्म: ३० आक्टोबर १९३२ )**१९९३: उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू (जन्म: १९०९ )**१९८६: वासुदेव सीताराम तथा वा.सी.बेन्द्रे – प्रसिद्ध इतिहासकार (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आषाढी एकादशी निमित्ताने लेख*माझे माहेर पंढरी .......*पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील माझे माहेर पंढरी ...... हे गाणं ऐकलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि पायी दिंडी वारी करणारे वारकरी ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.*आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा ......!*~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *21 रोजी पुण्यात 5 हजार भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी करणार मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत राज्य सरकार जनतेला देवदर्शन घडवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात नवव्या स्वरमल्हार महोत्सवाची सांगता, पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सुपर कॉम्प्युटर ते कृत्रिम बुद्धीमत्तेपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षीदार, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकरांचे मत ; 20 रोजी पुण्यभूषण पुरस्काराचे होणार वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत पीकविमा भरण्याची दिली मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून के. पी. शर्मा ओली यांनी घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *नखं कापतांना दुखत का नाही ? पण उपटल्यास दुखतात; असे का ?* 📙 दर आठवड्याला तुम्ही नेलकटरने नखं कापत असाल. चांगलीच सवय आहे ही. पण केव्हा तरी नख कापतांना नख कापण्याऐवजी उपटले गेल्याने वा ओढले गेल्याने तुम्हाला नक्कीच दुखले असेल. अगदी ब्लेडने नख कापले तरी रक्त येत नाही दुखत नाही. मग उपटल्यावर वा ओढल्यावर ते का दुखते ? याचे उत्तर कळण्यासाठी नखाची रचना समजून घ्यायला हवी!नखे, केस, घामाच्या ग्रंथी, तैलग्रंथी हे त्वचेचेच भाग आहेत त्वचेतील पेशींपासून निर्माण होणाऱ्या केरॅटिनच्या जाडसर थराने नख तयार होते. वरची बाजू सोडल्यास उर्वरित तिन्ही बाजूंनी नखाभोवती त्वचेच्या घड्या असतात. केरॅटिनच्या थराला वेदनेची जाणीव नसते, कारण तो मृत भाग असतो. त्यात सजीव पेशी नसतात. नखात पोषणासाठी रक्तवाहिनी नसते किंवा संवेदना जाणवण्यासाठी मज्जातंतूही नसतात. त्यामुळे नख कापले तरी दुखत नाही. नखाच्या बोटाकडच्या भागाला नखाचे मूळ म्हणतात. येथूनच पेशींच्या थरापासून नखाची निर्मिती होत असते. या भागातील पेशी मात्र जिवंत असतात व त्यांना रक्तपुरवठा आणि मज्जातंतूचाही पुरवठा असतो. नखाचा आपल्याला न दिसणारा आतला भाग त्याखालील नाजूक त्वचेत गुंतलेला असतो. साहजिकच नख उपटल्यास वा ओढले गेल्यास वेदनेची जाणीव होते. नखे कापतांना मात्र आपण नखाचा निर्जीव भागच कापत असतो, त्यामुळे दुखत नाही.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पुरूष एकेरीतील विम्बल्डन चॅम्पियनचा किताब कोणी जिंकला ?२) ट्रॅव्हल्स प्लस लीझरच्या यादीनुसार कोणत्या राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे ?३) युरो चषक फुटबॉल स्पर्धा - २०२४ चा किताब कोणत्या संघाने जिंकला ?४) 'ठेकेदार' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गावाचा कारभार पाहणारी संस्था कोणती ? *उत्तरे :-* १) कार्लोस अल्काराज २) राजस्थान ३) स्पेन ( २- १ ने ) ४) कंत्राटदार, मक्तेदार ५) ग्राम पंचायत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जयवंत हंगरगेकर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, धर्माबाद👤 सुरेश भाग्यवंत 👤 हरीप्रसाद प्रभाकर आरेवार, हडको, नांदेड👤 मारोती गाडेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मात पितु गुरु करहिं ना सेवा चारो ओर फिरत पूजत है देवा।ते नर के काल नचावे आशा दे दे मुआवे॥12॥कबीर साहेब कहते है – जो इंसान माता पिता और गुरु की सेवा नहीं करता वो चाहे सारे तीर्थ-ब्रत पूजा पाठ करले फिर भी काल कुछ न कुछ आशा दे कर फिर से जन्म मरण में डाल  देगा।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही निसर्गाने दिलेली विशेष देण आहे. त्याच कलेचा योग्य वापर करून प्रचार केल्याने तिचा सन्मान होतोच सोबतच तिच्यामुळे अनेकांना दिशा सुद्धा मिळत असते. पण,त्याच कलेचा स्वार्थापोटी दुरुपयोग केल्याने तिचा अपमान तर होतेच सोबत व्यापार, आणि व्यवसायात तिची गणना केली जाते असे ऐकण्यात आले आहे. म्हणून आपल्या अंगी असलेल्या कलेची पूजा करावी व समाजासाठी तिच्यातून जेवढे योगदान द्यावा वाटते तेवढे द्यावे. पण,तिची गणना व्यापारात किंवा व्यवसायात करु नये.असं केल्याने कलेवर किंवा त्या कलावंतावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लोभाची शिक्षाएक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस*तात्‍पर्य – लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/07/hari-om-vitthala.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟫 *_ या वर्षातील १९७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड**१९९६: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर**१९६२: शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्‍या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ**१९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर**१९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.**१९२७: समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९२६: मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.**१६६२: इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना*🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: सुभाष आ. मंडले -- लेखक* *१९८१: प्रा.नंदकुमार शिवाजी शेडगे -- लेखक, कवी* *१९८०: राहुल धर्मसिंग चव्हाण (पालत्या)-- कवी, लेखक* *१९७५: आबा गोविंदा महाजन -- महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यातील अधिकारी, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखक* *१९६८: सुरज थापर -- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते* *१९६६: डाॅ. श्रीनिवास मेघ:श्याम आठल्ये -- लेखक, कवी**१९६०: प्रा.दिलीप नामदेवराव तितरमारे -- कवी* *१९५७: बळीराम रुपचंद जाधव -- लेखक**१९५६: डॉ. प्रभा दत्तात्रय वासाडे -- लेखिका* *१९५१: अनुराधा मराठे -- शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका**१९५०: धनराज लहानुजी डाहाट -- कवी, लेखक, विचारवंत* *१९४९: प्रा.डॉ.अरुण चिंतामणराव प्रभुणे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४९: विजय कोंडके -- चित्रपट दिग्दर्शक**१९४७: आशा वसंतकुमार वडनेरे -- लेखिका, अनुवादक**१९४७: विजय विठ्ठल देवधर -- मराठी लेखक(मृत्यू : ३० नोव्हेंबर २०१२)**१९४३: दत्तात्रय सदाशिव (द.स.) काकडे-- सुप्रसिद्ध कादंबरीकार* *१९४१: माधव गुणाजी कोंडविलकर -- ज्येष्ठ साहित्यिक,कवी, कादंबरीकार (मृत्यू:१२ सप्टेंबर २०२० )* *१९३७: विश्वनाथ शंकर मोरे-- संगीतकार(मृत्यू: ३१ जानेवारी १९८६ )**१९३७: प्रल्हाद नामदेव चेंदवणकर-- कवी (मृत्यू:१६ जुलै २००३ )**१९३२: प्राचार्य नरहर कुरुंदकर – प्रसिद्ध साहित्यिक,विद्वान,टीकाकार,संपादक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२ )**१९३१: विठ्ठल उमप -- मराठी शाहीर व लोककलाकार( मृत्यू: २६ नोव्हेंबर, २०१० )**१९२७: प्रा.शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१० )**१९१९: बापू चंद्रसेन कांबळे-- भारतीय राजकारणी,लेखक,संपादक,न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू: ६ नोव्हेंबर २००६ )**१९१८: चित्रा जयंत नाईक--भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका(मृत्यू: १४डिसेंबर २०१० )**१९०५: चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८० )**१९०४: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१ )**१९०३: के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५ )**१८९९: दत्तात्रय लक्ष्मण गोखले-- मराठी कवी**१६११: मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७ )*🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: माधवी रणजित देसाई-- मराठीतील लेखिका (जन्म: २१ जुलै १९३३ )**२००४: डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८ )**१९९१: जगन्नाथराव जोशी – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म: १९२० )**१९८०: गजानन विश्वनाथ केतकर -- निबंधकार, विचारवंत, गीतेचे अभ्यासक,(जन्म: ८ ऑगस्ट १८९७ )**१९६७: नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ –गायक व नट(जन्म: २६ जून १८८८ )**१९१९: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२ )**१९०४: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.(जन्म: २९ जानेवारी १८६० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आषाढी एकादशी निमित्ताने काही रचनाहरी ओम विठ्ठला । नाम तुझे मुखी ।।एकच प्रार्थना देवा । ठेव सर्वाना सुखी ।।..... रचना वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचे माझे ध्येय आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई भेटीदरम्यान ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतांना म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *BRS पुन्हा महाराष्ट्रात कमबॅक करणार, विधानसभेला रंगत येणार, दोन पक्षांशी बोलणी सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सव्वालाख विद्यार्थी शाळाबाह्य ? यू-डायस प्रणालीमधील धक्कादायक नोंद, शिक्षण विभाग म्हणतो...विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीतील तफावतीमुळे हा गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहित आर्य यांचा भाजपमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *8 आमदारांची कॉंग्रेसमधून होणार हकालपट्टी ? विधानपरिषद निवडणुकीत पक्षादेश पाळला नाही, 19 जुलैला होणार मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून हरविलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 **************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचे तीन भाग आहेतः प्रथम जिज्ञासा - जी सत्याची आराधना असते , दुसरे ज्ञान - जी सत्याची उपस्थिती असते. व तिसरा विश्वास - जो सत्याचा उपभोग आहे. ------ बेकन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विम्बल्डन टेनिस स्पर्धेची महिला एकेरीची चॅम्पियन कोण ठरली आहे ?२) 'विदर्भाचे नंदनवन' असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते ?३) युरो चषक फुटबॉल स्पर्धा - २०२४ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघादरम्यान झाला ?४) 'ठक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) झिका विषाणू कोणत्या नावाच्या डासापासून पसरतो ? *उत्तरे :-* १) बार्बरा क्रिचिकोवा, झेक प्रजासत्ताक २) चिखलदरा, अमरावती ३) स्पेन व इंग्लंड ४) लबाड ५) एडिस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी हिवराळे, शिक्षक तथा पत्रकार👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 राजेश्वर डोमशेर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, नायगाव👤 श्रीकांत जोशी, शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल नागोबा हिमगिरे, शिक्षक, धर्माबाद👤 वसंत बोनगिरे👤 शंकर हंड्रे, शिक्षक, देगलूर👤 सचिन खंडगावे👤 गंगाधर वि. बिज्जेवार, सेवानिवृत्त शिक्षक, सिडको, नांदेड👤 राजू कदम👤 विजयकुमार पाटील घुलेकर👤 संतोष ईबीतवार, येवती, धर्माबाद👤 विष्णुराज कदम, पांगरी, धर्माबाद👤 नवाज शेख👤 पांडुरंग चंदवाड👤 आनंद गाजेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दस द्वारे का पिंजरा तामे पंछी पौन।रहने को अचरज नहीं जात अचम्भा कौन॥11॥अर्थ – इस शरीर को ही कबीर साहेब पिंजरा कहते है इसमें दस द्वार है , २  आँख , २ कान , २ नाक , १ मुँह , १ मल द्वार , १ मूत्र द्वार , कुल हुए ९ , और एक दसवा जो है जो की गुप्त है , उसी द्वार से इस शरीर में प्राण डाला जाता है और उसे बंद कर दिया जाता है , उसी द्वार को खोलने की चाभी सच्चे सद्गुरु के पास होता , जो भक्त सच्ची लगन से अभ्यास करता है , तो सद्गुरु की कृपा से वो  १० वा द्वार खुलता है और वो स्वयं को जान पाता है और उस सत्यपुरुष को देख और जान पता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ सर्वांवर येते आणि एक दिवस निघून जाते. फक्त, त्या आलेल्या वेळेत हिंमत हारू नये. तर त्या बहुमूल्य वेळेचे आनंदाने स्वागत करावे. त्या वेळेत नेमकं काहीतरी विशेष असेल म्हणूनच वेळेचे येणे, जाणे आवश्यक असते असे म्हटल्या जाते. म्हणून त्या प्रसंगी स्वतः खंबीर रहावे व जगण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात सांगता येत नाही त्याच वेळेपायी आपल्याला सर्वस्व काही मिळूही शकते. कारण राजाचा रंक आणि रंकाचा राव होण्यासाठी ती वेळच ठरवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक डोळा असलेले हरीण*        एका  हरीणाचा एक डोळा फुटलेला होता , म्हणून ते, समुद्राच्या बाजूला आपल्याला मारायला कोणी येणार नाही ,'   या विश्वासाने चरत असे ,  पण त्याची शिकार करण्यासाठी एक टपलेला शिकारी ,  होडीत बसून समुद्राच्या मार्गाने आला आणि त्याने 🔫 बंदुकीच्या गोळी ने त्याचा प्राण घेतला.   मरतांना हरीण मनात म्हणाले ,  " अरेरे !  ज्या बाजूने धोका नाही असे वाटले त्या समुद्राकडून माझा घात झाला."         *_🌀तात्पर्य_ ::~*    *ज्याच्याबद्दल अतिशय विश्वास वाटतो, त्याच्याकडूनच बर्याच वेळा विश्वासघात होतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_21.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟦 *_ या वर्षातील १९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०११: मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.**१९७७: रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे. न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.**१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले.या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.**१९०८: लोकमान्य टिळकांवर दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.**१८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.*🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: उर्वशी शर्मा -- भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री**१९८४: लता अनिल बहाकर-तळोकार -- लेखिका* *१९८२: सुनील कालिदास जवंजाळ -- कवी, लेखक* *१९७२: डॉ. शुभांगी लुंगे -- कवयित्री**१९६५: विलास गोपाळ अंभोरे -- कवी, लेखक**१९६२: जयराम हरी पुरंदरे -- लेखक**१९६१: गणेश निळकंठराव पांडे -- प्रसिद्ध कवी* *१९५८: प्रा.डॉ.नमिता अशोक शेंदरे-- लेखिका* *१९५२: प्रा.माधुरी शानभाग -- प्रसिद्ध मराठी लेखिका,अनुवादक* *१९५२: डॉ निर्मल सिन्नरकर -- कवयित्री, गीत लेखन**१९४७: अस्ताद डेबू -- भारतीय समकालीन नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक (मृत्यू: १० डिसेंबर २०२० )**१९४७: डॉ.वासुदेव नारायण विष्णुपुरीकर -- प्रसिद्ध नाटयलेखक* *१९४२: हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता**१९३९: प्रकाश मेहरा -- दिग्गज भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: १७ मे२००९ )**१९३६: सत्यदेव दुबे -- भारतीय पटकथाकार, संवादलेखक, नाट्य-अभिनेते, चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: २५ डिसेंबर २०११ )**१९३१: बीना राय -- भारतीय अभिनेत्री(६ डिसेंबर २००९)**१९३०: स्वरूप किशन -- भारतीय कसोटी क्रिकेट पंच (मृत्यू : २१ नोव्हेंबर १९९२)**१९२७: सावळाराम धागोजी म्हात्रे (सावळाराम महाराज) -- कीर्तनकार, समाजप्रबोधक (मृत्यू:१८ फेब्रुवारी १९९२ )**१९१६: रामकृष्ण धोंडो बाक्रे-- ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २२ डिसेंबर १९९६ )**१९०३: विमलाबाई देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१८९२: केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७ )*🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:यशपाल शर्मा -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू (जन्म: ११ ऑगस्ट १९५४ )**२०१०: मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१ )**२००९: निळू फुले – प्रसिद्ध अभिनेते (जन्म: ४ एप्रिल १९३० )**२०००: इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४ )**१९९४: पं.कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५ )**१९९०:अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक (जन्म: १८९७ )**१९६९: महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.(जन्म: १२ जानेवारी १९०२ )**१९१९: गणेश जनार्दन आगाशे -- अर्थशास्त्राचे अभ्यासक, लेखक, कवी, निबंधकार (जन्म: १ जानेवारी १८५२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुलांचे गुण शाळेतून दिसतात*प्रत्येक गोष्ट शाळेतूनच का शिकावी लागते ? मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी शाळेत पाठवा, मुलांना लिहिण्या-वाचण्यासाठी शाळेत पाठवा, मुले संस्कारी होण्यासाठी शाळेत पाठवा. एखादे मूल काही वाईट केलं किंवा खराब केले की लगेच बोलल्या जाते, गुरुजींनी, तुला शाळेत हेच शिकवलं का ? तसं तर तुला घरी हेच शिकवलं का ? असे फार कमी बोलल्या जाते. वास्तविक पाहता यात गुरुजींचा काहीही दोष नसतो मात्र अगदी सहजपणे असे बोलले जाते............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अखेर पंकजा मुंडे बनल्या आमदार, 10 वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शैक्षणिक प्रवेशासाठी असणारी आठ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव विधानसभेमध्ये सादर करण्याच्या हालचाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ड्रग्जनंतर एनर्जी ड्रिंकचाही मुद्दा विधिमंडळात; किराणा दुकानातून पेरलं जातंय घातक द्रव्य; सभापतींनी दिले महत्त्वाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एक रुपयात पीक विमा, योजनेसाठी उरले शेवटचे 4 दिवस; 15 जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, शेतकर्‍यांना प्रशासनाचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून घोषित, केंद्राचा निर्णय, अधिसूचना जारी!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एक सदस्यीय समितीच्या तपासात दोषी आढळल्यास वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ, केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडने जेम्स अँडरसनला दिला विजयी निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेनवॉटर हार्वेस्टिंग : पाण्याची साठवण व पुनर्भरण* 📙 सर्व मोठ्या गावांचे शहरीकरण झाले. शहरांचे काँक्रिटीकरण झाले. काँक्रिटच्या जंगलाला डांबराच्या रस्त्यांची जोड मिळाली. मग या साऱ्या शहरावर पडणारे पाणी जमिनीत मुरणार कसे ? ते झपाट्याने वाहून जाणार. गटारांतून नालीमध्ये, नालीतून नदीकडे वाहणार. पुन्हा या शहरी वस्तीला पाणी पुरवायचे कुठून ? नळाद्वारे पुरवायला पाणी आणायचे कुठून ? यासारख्या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधताना जगातील अनेक ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कल्पना प्राधान्याने मांडली गेली. जेथे पाऊस जास्त पडतो, तो कालावधी अल्प असतो. पडलेला पाऊस स्वतःबरोबर बहुमोल मातीचा थर घेऊन जातो. ती माती गाळा रूपाने नदीतून वाहत धरणांच्या भिंतीजवळ साचते व धरणे हळूहळू निकामी होतात. तसेच डोंगरावरची माती वाहून गेल्याने डोंगर बोडके, खडकाळ होतात व पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. हा झाला उघड्या जमिनीसंदर्भातला प्रश्न. दुसरा प्रश्न काँक्रिटच्या जंगलातला वर उल्लेखलेला. दोन्ही प्रश्नांना उत्तर एकच. ते म्हणजे जमेल तसे, जमेल तितके पाणी आडवा, जमवा व जिरवा. पाणी अडवायचे उपाय शहरात सोपे. छपरावरचे, गच्चीवरचे, पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे एकत्रित करून इमारतीच्या शेजारी वा पोटात बांधलेल्या टाकीत साठवायचे. पावसाळा संपल्यावर त्याचाच वापर पिण्याखेरीज लागणाऱ्या अन्य वापरासाठी करायचा. आसाम, मेघालय, नागालँड या उतारावरच्या टेकड्यांच्या प्रदेशात ही पद्धत गेली अनेक वर्षे घराघरांतून वापरली गेली आहे. टाकी पाण्याने भरली, तर जास्तीचे पाणी जवळच खणलेल्या एका खड्डावजा कुपनलिकेत सोडायचे. आठ ते दहा सेंटीमीटर व्यासाचा दोन तीन मीटर खोलीचा खड्डाही या कामी उपयोगी पडतो. भूजलपातळी वाढण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होतो. शहरात, गावात कूपनलिका खणल्या जातात, पण अनेकदा पाणी लागत नाही. अशा कूपनलिकांमध्येही असे जवळपासचे पाणी भू उदरात भरण्यासाठी सोडता येते. दहा हजार चौरस मीटरच्या सर्वसामान्य इमारतीच्या गच्चीवरचे पाणी साठवल्यास किमान तीन महिने त्या इमारतीत राहणाऱ्या सर्वांना पावसाळ्यात व त्यानंतरचे दोन महिने साठवलेल्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो. महानगरांमधून इमारतीचे नकाशे मंजूर करून तिला परवानगी देताना अशी रचना करणे आता गरजेचे वाटू लागले आहे. पुणे महानगरपालिकेने स्वतःच्या विस्तीर्ण इमारतीत तशी रचना करायला सुरुवातही केली आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या एका वाक्यात अन्य ठिकाणच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा सारा अर्थ सामावतो. उतारावर, डोंगरावर समतल बांधांची रचना यासाठी केली जाते. कंटूरबंडिंग या नावाने ती ओळखली जाते. पावसाचे पाणी या विविध बांधांना अडते, जिरते, माती वाहून नेणे थांबते. याशिवाय मोठ्या पावसात वाहणारे पाणी पाझर तलाव बांधून अडवले जाते. पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपला की, त्यानंतर शेती, जनावरे, पक्षी यांना या पाण्याचा अगदी मार्चपर्यंतही उपयोग होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाझर तलावाचे पाणी जमिनीत मुरल्याने त्या परिसरातल्या व खालच्या भागातल्या विहिरींची भूजलपातळी उंचावते. महाराष्ट्रातील भूजलपातळी १९५० साली होती, त्याच्या दुपटीने खोलवर गेली आहे. याचाच अर्थ ६ मीटरवर विहिरीला बारा महिने पाणी असायचे, तिथे आता २० मीटरपर्यंत खोल जावे लागते. कुपनलिकांची अवस्था याहूनही वाईट आहे. अनेक ठिकाणी दोनशे फुटांपेक्षा जास्त खोल गेल्याशिवाय पाणी लागत नाही. गावाच्या शिवारात पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी किमान पन्नास टक्के पाणी या पद्धतीने अडवणे, जिरवणे शक्य असते, असे प्रयोगाअंती अनेकांनी सिद्ध केले आहे. अण्णासाहेब हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे, तरुण भारत संघाच्या राजेंद्रसिंह यांनी राजस्थानमध्ये, विलासराव साळुंके यांनी पुरंदर जिल्ह्यातील केलेल्या प्रयोगांतून या गावांची पाण्याची गरज भागू लागली आहे. गावात हिरवाई निर्माण झाली आहे, गरज आहे अशा प्रयोगांतून अन्य गावातील गावकऱयांनी प्रेरणा घेण्याची. शेताच्या खोलगट भागात चर खणून शेततळी घेण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. पण सार्वत्रिक प्रयोगातून सारा परिसर हिरवागार करण्याचे प्रयत्न मात्र कमी पडत आहेत.छोट्या नदीमध्ये, ओढ्यांमध्ये ठराविक अंतरावर बंधारे घालण्याच्या सरकारी पातळीवरच्या प्रयत्नांनासुद्धा यश येत आहे. ओढ्याच्या पात्रातली दगड, वाळू सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भरून व्यवस्थित बंधारा बांधता येतो. असे बंधारे आठ ते दहा वर्षे चांगले टिकतात.इस्रायलसारख्या देशात जेमतेम सहा ते दहा इंच वार्षिक पाऊस पडतो. याउलट भारताच्या अनेक भागांत सरासरी चाळीस ते पन्नास इंच पाऊस पडतो. महाराष्ट्रातील अगदी दुष्काळी भागातसुद्धा पावसाचे वार्षिक प्रमाण वीस इंच एवढे आहे. इस्रायलने पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्याचा गेली पन्नास वर्षे प्रयत्न केला आहे. याउलट भारतातील पावसाचे पाणी आजही बहुतांश वाहून जाते. पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अक्षरश: भेडसावू लागतो.यावरचा एकमेव उपाय म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाण्याचे पुनर्भरण, पुनर्वापर करण्याचा आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरे शिक्षण फक्त सत्याचे दर्शनच घडवत नाही, तर ते अमलात आणते आणि तेच त्याचे पूर्ण ध्येय असते. ---- मेरी-बेकर-एडी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे पथक प्रमुख* म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?२) रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत ?३) 'कारगिल वॉर द टर्निंग पॉईंट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) 'ठसा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) देशाची पहिली ट्रांसजेंडर सब इन्स्पेक्टर कोण बनले आहे ? *उत्तरे :-* १) गगन नारंग २) नरेंद्र मोदी ३) कर्नल एम. बी. रवींद्रनाथ ४) खूण ५) मानवी कश्यप, बिहार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अनुराधा पहाडे राजूरकर, माहूर👤 सुनील जवंजाळ, सांगोला👤 अहमद शेख👤 रवी यलमोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्वास-श्वास में नाम ले बृथा श्वास मत खोए।न जाने इस श्वास को आवन होए ना होए॥10॥कबीर साहेब कहते है – हर स्वास में नाम लेने के लिए कहते है , एक भी स्वास खली नहीं जाना चाहिए बिना नाम का , क्यूंकि इस स्वास का कोई भरोसा नहीं है अभी गया तो वापस लौटे या नहीं।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना मान, अपमान यांचे येणे,जाणे सुरूच राहते. त्या दोन्ही प्रसंगी संयम तसेच शांतपणे रहाण्याचा प्रयत्न करावा. कारण शांत हा एक सर्वोत्तम गुणच नसून संपत्ती सुद्धा आहे म्हणून त्याची महानता कित्येक वर्षापासून जाणली गेली आहे. त्याचा आदर केला जातो. आपणही त्या गुणाचा आदर करावा. कधीकाळी सांगता येत नाही. आपला अपमान करणारे सुद्धा ती शांतता बघून पुन्हा एकदा नव्याने जगायला लागतील तोच आपल्यासाठी मिळालेला सर्वांत मोठा सन्मान असेल.म्हणून शांत राहण्याचा अवश्य प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या या एका प्रयत्नाने एखाद्या भटकलेल्या माणसाला नवी दिशा मिळेल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ फसवे बाह्यरूप ❃*        एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.     आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला.    त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'         *_🌀तात्पर्य_ ::~*  *बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/my-students-my-valentine.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭕ *जागतिक 'पेपर बॅग' दिवस (Paper Bag Day)* ⭕ *_ या वर्षातील १९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना 'टिळक पुरस्कार’ जाहीर**१९९९: ’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.**१९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.**१९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर**१९८५: पी. एन. भगवती यांनी भारताचे १७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना**१९७९: किरिबातीला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२: लंडनमधील मार्क्वी क्लबमधे ’द रोलिंग स्टोन्स’ चा पहिला कार्यक्रम झाला.**१९६१: मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.**१९३५: ’प्रभात’ चा ’चन्द्रसेना’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या ’मिनर्व्हा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.**१९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले. पण याआधीच ६ वर्षे तो वाहतुकीस खुला झाला होता.**१७९९: रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:मलाला युसूफझाई-- पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती* *१९९५: अक्षया नाईक -- मराठी मालिकेतील अभिनेत्री**१९८९: निलेश दिगंबर तुरके -- लेखक**१९७४: परविन दाबास -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक* *१९७२: जयश्री संजय सातोकर -- कवयित्री, लेखिका* *१९६७: मीना घोडके -- लेखिका**१९६५: संजय मांजरेकर – क्रिकेटपटू**१९६२: शत्रुघ्न कुसंबे -- कवी* *१९५९: प्रा. डॉ. शेषराव नत्थुजी जुडे -- लेखक**१९५८: प्रा. आशालता कांबळे-- कवयित्री, लेखिका* *१९५४: सुलक्षणा पंडित--- भारतीय पार्श्वगायिका, अभिनेत्री* *१९५२: शंकर किसन तांबे -- लेखक* *१९५०: विकास सबनीस -- ज्येष्ठ व्यंगचित्रकार (मृत्यू: २८ डिसेंबर २०१९)**१९४८: उपेंद्र दाते -- मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणारे गायक, नट* *१९४७: सुहासिनी सुभाष जोशी, ऊर्फ सुहास जोशी -- मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री**१९४५: डॉ. अंजली दामोदरराव टाकळीकर -- कवयित्री* *१९३९: धुंडिराज कहाळेकर -- लेखक कवी**१९३०: वसंत राशिनकर -- प्रसिद्ध कवी, लेखक (मृत्यू: ७ जानेवारी २०१५ )**१९२२: मनोहर कल्लावार-- लेखक* *१९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १४ जुलै २००८ )**१९२०: वसंत गोविंद देशमुख -- लेखक (मृत्यू:१ एप्रिल १९८४ )**१९१३: मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (मृत्यू: १४ जून २०१०)**१९१०: गोविंद रामचंद्र दोडके -- लघु निबंधकार (मृत्यू: १३ जानेवारी १९६३ )**१९०९: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (मृत्यू: ८ जानेवारी १९६६ )**१८९६: देविदास लक्ष्मण महाजन-- भाषातज्ज्ञ, लेखक, अनुवादक (मृत्यू:३ एप्रिल १९६७ )**१८८९: केशव गणेश आठल्ये (केशवबुवा)-- लेखक व प्रवचनकार**१८६४: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६ )**१८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३ )**१८५४: जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १४ मार्च १९३२ )**१८१७: हेन्‍री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (मृत्यू: ६ मे १८६२ )*⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕ •••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: सुशीलकुमार चढ्ढा तथा हुल्लड मुरादाबादी -- हिंदी हास्यकवी(जन्म:२९ मे १९४२)**२०१३: प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (जन्म: १२ फेब्रुवारी १९२० )**२०१२: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८ )**१९९९: राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म:२०जुलै १९२९ )**१९९४: वसंत साठे -- हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार (जन्म: १० ऑगस्ट १९१६)**१६६०: बाजी प्रभू देशपांडे (जन्म: १६१५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्यार्थी हेच माझे दैवत*शाळा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे शिक्षक, फळा, शाळेची इमारत, मैदान आणि किलबिल आवाजात नाचणारी विद्यार्थी. विद्यार्थ्याशिवाय कोणतीच शाळा शोभून दिसत नाही. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थी यांचे अतूट असे नाते असते. शाळेत सर्वात पहिल्यांदा कोण येत असेल तर तो म्हणजे विद्यार्थी. काही विद्यार्थी तर शाळेला च आपले घर केलेलं असते त्यामुळे ............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईत येणार, गडकरीही उपस्थित राहणार; लोकसभा निकालानंतर पहिलाच दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र हा कृषी क्रांतीचा जनक, सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'रिपाइं'ला विधानसभेच्या 12 जागा द्या, क्रिमिलेयर मर्यादा 8 लाखांहून 12 लाख करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांविना भारताचा इतिहास अधुरा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन; विधानसभेत आमदारांना केले मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रिकेटपटू सुरेश देवभक्त यांचे निधन, वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; वसईचा पहिला रणजीपटू काळाच्या पडद्याआड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० फॉरमॅटसाठी टीम इंडियाची धुरा हार्दिकच्या खांद्यावर; ODI साठी के एल राहुल नवा कर्णधार - बीसीसीआयचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लेसर* 📙 लेसर या प्रकाशकिरणांभोवती एक गूढ वलय सामान्य माणसाच्या मनात असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लेसरचा वापर अगदी मर्यादित होता; पण आज मात्र तो अगदी सामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एखाद्या वस्तूच्या वेष्टनावरची किंमत, पुस्तकाचा क्रमांक किंवा क्रेडिट कार्डवरची माहिती वाचण्यासाठी लेसर किरणांचा वापर केला जातो. एवढेच काय, पण बाजारात नवीन आलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क स्टिरिओमध्येही लेसरच वापरलेला असतो. डोळे व लेसर यांचे तर अतूट असे समीकरण होण्याइतका डोळ्यांच्या आजारात लेसरचा वापर वाढत आहे. त्यामानाने मेंदूतील कर्करोगात लेसर वापरणे अजून तितकेसे सुलभ झालेले नाही. हा वापर करताना लेसरचा एक महत्त्वाचा गुण वापरला जातो, तो म्हणजे लेसरच्या लहरी ठराविक वेगाने, ठरावीक काळाने एका मागोमाग अत्यंत सुसंघटितपणे वाहत असतात. नेमक्या जागी पाहिजे त्या आकाराचे, पाहिजे तितक्या लहान व्यासाचे लेसरचे किरण सोडता येतात व हे किरण अन्य प्रकाशाप्रमाणे पसरत नाहीत. एकाच तरंगलांबीच्या विद्युतचुंबकीय लहरी लेसरमध्ये असतात. त्यामुळे लेसरचा रंगही ज्या उद्गमातून लेसर निर्माण केला जाईल, त्यावर अवलंबून असतो. पण एका वेळी एकच रंग असतो. लेसर हे नाव नसून तो एक शोर्टफॉर्म आहे. लेझर (LASER) म्हणजे 'लाइट अॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन'.लेसरच्या निर्मितीचे सध्या विविध प्रकार वापरले जातात. काहींमध्ये क्र्वार्ट्झचा वापर केला जातो, तर काहींमध्ये हवाबंद नळीतील इलेक्ट्रोड काही विशिष्ट वायूंमध्ये काम करतात. हेलियम, निऑन, कार्बन डायॉक्साइड यांचा वापर या ट्यूबमध्ये केला जातो. दोन इलेक्ट्रोड्समध्ये उच्चदाबाचा विजेचा प्रवाह खेळवल्यावर लेसर निर्माण करण्यासाठी वापरलेल्या द्रव्यातील अणुंना जी ऊर्जा मिळते, त्यामुळे त्यातून प्रकाशकिरण बाहेर टाकले जातात. दिलेली विद्युतऊर्जा बाहेर टाकल्या जाणाऱ्या प्रकाशकिरणांची एक साखळी प्रक्रियाच या द्रव्यात सुरू होते. या नळीच्या दोन्ही बाजूंना समोरासमोरच्या दोन आरशांतुन हे प्रकाशकिरण पुन्हापुन्हा पर परावर्तित होत असल्याने ही साखळीप्रक्रिया वाढतच जाते. या अारशांपैकी एका आरशाला ठेवलेल्या पाहिजे त्या व्यासाच्या छिद्रातुन लेसर बीम वा झोत नळीच्या बाहेर टाकला जातो. प्रत्येक अणूतून बाहेर पडणारे किरण हे एकाच तरंग लांबीचे असल्याने बाहेर पडणारा झोतही तसाच असतो. प्रकाशाचा झोत सलग जोडायचा की पुंजक्या पुंजक्यात, हे लेसरच्या निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून ठेवता येते. बाहेर पडणाऱ्या सर्व किरणांचा संघटितपणा (coherence) हा लेसरला नेहमीच्या प्रकाशापेक्षा वेगळा ठरवतो. लेसरची वैशिष्टय़े या गुणधर्मातूनच संभवतात.लेसर किरणांचा विनाशक व उपयोगी असा दोन्ही प्रकारे भरपूर वापर केला गेला आहे. अनेक प्रकारची लष्करी अस्त्रे, आयुधे, विमाने लेसरचा वापर करतात, तर अनेक अत्याधुनिक कारखाने अत्यंत काटेकोरपणे कापाकापी वा जोडाजोडीसाठीही लेसरच वापरतात. डोळ्यांच्या आतील दृष्टीपटल निखळले असता ते पुन्हा चिकटवण्यासाठी लेसरचा वापर केला जातो. विविध कथा, सिनेमा व विज्ञान गोष्टींत मात्र लेसर काल्पनिक बंदुकीचा मुक्त वापर आढळतो. कसलाही आवाज न करणारी, पण पाहिजे त्याचा बळी घेणारी ही बंदूकच लेसरबद्दलचे गूढवलय सर्वांच्या मनात वाढत जाते.लेसरबद्दल एक विशेष बाब म्हणजे १९१७ साली आइन्स्टाइन यांनी या स्वरूपाचे किरण निर्माण होऊन त्यांचा वापर करता येईल, असे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात मात्र त्यासाठी १९६० साल उजाडले. थियोडोर मेमन यांनी पहिला लेसर त्या वर्षी वापरात आणला. त्यानंतरही अनेक वर्षांनंतर म्हणजे १९७५ सालच्या आसपास वैद्यकीय क्षेत्रात प्रगत देशात त्याचा वापर सुरू झाला. भारतात प्रमुख शहरात १९९० सालापासून लेसरचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जातात. प्रामुख्याने ते डोळ्यांच्या बाबतीत असतात.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मृत्यू म्हणजे चेतनेचा अंत आणि शिक्षण म्हणजे मानवाच्या चैतन्याचा अविष्कार. --- दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या २८ सदस्यीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे ?२) जागतिक लिंगभाव विषमता निर्देशांक अहवालानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे ?३) कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकतेच फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?४) 'टंचाई' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?*उत्तरे :-* १) नीरज चोप्रा २) १२९ वा ३) रोशनी नादर मल्होत्रा ४) कमतरता ५) महाराष्ट्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हरिहर धुतमल, पत्रकार, लोहा👤 शिल्पा जोशी, साहित्यिक, मुंबई👤 प्रवीण दाभाडे पाटील, साहित्यिक, कन्नड👤 अविनाश पांडे👤 नंदकुमार कौठेकर, शिक्षक, बिलोली👤 नागेश पडकुटलावार👤 अभिजित राजपूत👤 दादाराव जाधव👤 साईनाथ पाटील गादगे नागणीकर👤 दिनेश वाढवणकर👤 माधव उमरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सात समंदर की मसी करूँ लेखनी सब बनराई।धरती सब कागद करूँ तापर गुरु गुण लिखा न जाय॥9॥अर्थ – सातो  समुन्द्र को स्याही बनाऊ , सारे पेड़ पौधों को कलम बनाऊ , और पूरी पृथ्वी को कागज बनाऊ फिर भी गुरु का गुण गान नहीं लिखा जा सकता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कान भरणे तसेच घास भरवणे या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. घास भरविल्याने एखाद्याची भूक मिटत असते सोबतच पुण्य सुद्धा प्राप्त होत असतो. आणि कान भरल्याने एखाद्याचे जीवन उद्धस्त तर होतोच सोबतच त्या केलेल्या कृत्याने विविध विकारचे आजार वाढत असतात. असे ऐकण्यात आले आहे. त्यांच्या विचाराचा मान ठेवून एखाद्याचे भले होईल असेच कार्य करावे जेणेकरून त्याचा फायदा होईल. व केलेल्या कार्यातून आपल्याला समाधान मिळेल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *❃ सचोटी ❃*       *एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’    *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.wordpress.com/2018/07/09/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚪ *_ या वर्षातील १९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. अशा प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस’जागतिक लोकसंख्या दिन’ (World Population Day) म्हणून साजरा केला जातो._*⚪ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚪••••••••••••••••••••••••••••••••• *२००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.**२००१: आगरताळा ते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.**१९९४: दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९७९: अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.**१९७१: चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला.**१९३०: ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.**१९०८:लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.**१८०१: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने ’पॉन’ धूमकेतूचा शोध लावला.*⚪ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: प्रा. डॉ. ललित रमेश कोलते-- कवी, लेखक**१९८३: विकास वसंतराव गुजर -- लेखक* *१९६९: प्रणव हळबे -- कवी, लेखक* *१९६५: अनुपमा अजय मुंजे -- कवयित्री* *१९६०: जाफर पनाही -- इराणमधील चित्रपट निर्माते**१९५९: डॉ. अचला दि. तांबोळी -- कवयित्री, लेखिका* *१९५६: कुमार गौरव ( मनोज तुली) -- भारतीय उद्योगपती आणि हिंदी चित्रपटसृष्टीतकाम करणारा माझा अभिनेता**१९५५: प्रा. सुहास बारटक्के -- लेखक, पत्रकार* *१९५४: मोहन दाते -- दाते पंचांग**१९५३: प्रा. डॉ. सुधा लक्ष्मणराव पेशकर -- लेखिका* *१९५३: सुरेश प्रभू – माजी केंद्रीय मंत्री.**१९५०: सुप्रिया अनंत अय्यर -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९४७: शरद उर्फ गोविंद गणेश अत्रे -- कवी**१९४५: जलाल आगा -- हिंदी चित्रपटांतील अभिनेता (मृत्यू: ५ मार्च १९९५ )**१९२१: शंकरराव रामचंद्र खरात – प्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ९ एप्रिल २००१ )**१८९१: परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. (मृत्यू: २८ मे १९६१ )**१८८९: नारायण हरी आपटे – प्रसिद्ध कादंबरीकार, चित्रपट कथालेखक.(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ )**१८८७: शंकरराव रामचंद्र कानिटकर-- लेखक, प्राध्यापक आणि समाजसेवक (२५ जानेवारी १९६४ )* ⚪ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: मधुसूदन नानिवडेकर -- प्रसिद्ध गझलकार व पत्रकार(जन्म: १८ मे १९६० )**२००९: शांताराम नांदगावकर – मराठी गीतकार, कवी त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६ )**२००३: भीष्म साहनी -- भारतीय लेखक, हिंदी नाटककार आणि अभिनेता (जन्म: ८ ऑगस्ट १९१५)**२००३: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक(जन्म: १५ नोव्हेंबर १९४८ )**१९९४: रामा राघोबा राणे --- भारतीय लष्करातील एक परमवीर चक्र प्राप्त अधिकारी(जन्म: २६ जून, १९१८ )* *१९८९: सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता (जन्म: २२ मे १९०७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसंख्येचा भस्मासूर आणि त्याची कारणे*भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाल्यानंतर देशात पहिली जनगणना सन 1951 या वर्षी घेण्यात आली. त्यावेळची लोकसंख्या 36 कोटी 10 लाख होती. आजची लोकसंख्या 144 कोटी 20 लक्ष 39 हजार 740 आहे...... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दप्तराविना भरणार शाळा, केंद्र सरकार शिक्षण धोरणात बदल करणार, वार्षिक शैक्षणिक वर्षातील दहा दिवस विना दप्तराचे असतील, त्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेच्या भितींबाहेरील जगात फिल्ड विजीटसाठी नेले जाईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानसभा निवडणुकीआधी शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, जानेवारीपासून मिळणार थकबाकी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब;आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कॉलिंगचे दर वाढवून सर्वसामान्यांची मोबाईल कंपन्यांकडून पिळवणूक, आम आदमी पक्षाच्या वतीने पुण्यात तीव्र आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने विजयासह मालिकेत घेतली आघाडी, तिसऱ्या सामन्यात T-20 झिम्बाब्वेवर सहज मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *युरीस्टीकने लघवीची तपासणी कशी करतात ?* 📕तुमच्या घरी आजी-आजोबांना मधुमेह अर्थात डायबेटीस असेल, तर तुम्हाला युरीस्टीक माहिती असतील. डायबेटीसच्या रुग्णांच्या रक्तामध्ये साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण जास्त असते. जसे गाठ भरता की वाहून जातो, त्याप्रमाणे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण ठरावीक मर्यादबाहेर गेले तर लघवीवाटे ती बाहेर टाकली जाते. याचाच अर्थ असा की, सामान्यपणे निरोगी माणसाच्या लघवीत ग्लुकोज नसते. लघवीत जर ग्लुकोज ०.५ टक्के वा त्याहून जास्त प्रमाणात असेल, तर व्यक्तीला मधुमेह झालेला असू शकतो. खात्रीच्या निदानासाठी रक्तातील ग्लुकोज तपासावी लागते, युरीस्टीकमध्ये एका पट्टीवर एक विशिष्ट असा रासायनिक पदार्थ लावलेला असतो. ही युरीस्टीक लघवीमध्ये३० सेकंद बुडवतात. लघवीतील ग्लुकोजच्या प्रमाणानुसार मुळचा निळसर हिरवा रंग असलेला हा पदार्थ पिवळा, नारंगी, तपकिरी होऊ शकतो. त्या रंगाचा काय अर्थ हेही युरीस्टीकच्या बाटलीवर लिहिलेले असते. मधुमेहाच्या रुग्णाला नियमित उपचार घ्यावे लागतात. या उपचारांचा मुख्य उद्देश हा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर राखणे हाच असतो. म्हणजेच मधुमेह नियंत्रणाखाली असला, तर त्या व्यक्तीच्या लघवीत ग्लुकोज नसेल या असलीच तर ०.५ टक्क्यांपेक्षा कमी असेल. यापेक्षा ग्लुकोजचे लघवीतील प्रमाण जास्त असल्यास आहारावर नियंत्रण, औषधे नियमितपणे घेणे किंवा डॉक्टरचा सल्ला घेणे, हे उपाय करावे लागतात. म्हणजेच युरीस्टीकच्या साहाय्याने स्वतःचा मधुमेह नियंत्रणाखाली आहे वा नाही, हे कळू शकते. आजी-आजोबांना या कामात तुम्हीही मदत करू शकाल, कारण काही वेळा त्यांची नजर अधू असल्याने त्यांना युरीस्टीकवरचे रंग नीट दिसत नाहीत. मग काय करणार ना मदत ?डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचनाने मनुष्य सुशिक्षित होतो ; पण शिक्षणाने मनुष्य पक्का होतो. ---- हर्बर्ट स्पेन्सर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने* गौरविण्यात आले ?२) रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?३) भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ( कोच ) म्हणून कोणाची निवड झाली आहे ?४) 'झोका' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) रशिया या देशाची राजधानी कोणती ?*उत्तरे :-* १) रशिया ( रूस ) २) ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉसल ३) गौतम गंभीर ४) हिंदोळा ५) मॉस्को*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 अनुपमा अजय मुंजे, साहित्यिक, नागपूर👤 प्रभू देशमुख, शिक्षक, बिलोली👤 संतोष चव्हाण, शिक्षक, नांदेड👤 शिवाजी सूर्यवंशी, शिक्षक, हदगाव👤 प्रकाश नाईक👤 प्रमोद मंगनाळे👤 नरेश गोट्टम👤 स्वप्नील शिंदे👤 शेख सलमान👤 साईकिरण अवधूतवार, तेलंगणा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सात समंदर की मसी करूँ लेखनी सब बनराई।धरती सब कागद करूँ तापर गुरु गुण लिखा न जाय॥9॥अर्थ – सातो  समुन्द्र को स्याही बनाऊ , सारे पेड़ पौधों को कलम बनाऊ , और पूरी पृथ्वी को कागज बनाऊ फिर भी गुरु का गुण गान नहीं लिखा जा सकता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तान्हा बाळ जेव्हा जन्माला येतो त्यावेळी त्याच्या रडण्याने सर्वाच्या डोळ्यात आनंदश्रू वाहताना दिसतात. तोच बाळ मोठा होऊन एक दिवस जग सोडून जातो.या प्रसंगी सुद्धा प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू असतात. पण,जेव्हा तोच बाळ वयाने मोठा होऊन अनेक संकटाचा सामना करून जगत असतो त्यावेळी मात्र त्याचे दुःख बघून कोणाच्याही डोळ्यात आपुलकीचे अश्रू येताना दिसत नाही. जी वेळ खऱ्या अर्थाने मोलाची असते त्यावेळी मात्र सर्वांना विसर पडत असतो.म्हणून दिखावूपणाचे अश्रू दाखविण्यापेक्षा आलेल्या प्रत्येक चांगल्या, वाईट प्रसंगी साथ देणे हाच माणुसकी धर्म आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *❃ युक्ती ❃*      सूर्य  आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकटधरू लागला . शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली .         *_तात्पर्य_*    नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जुलै 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.wordpress.com/2019/11/17/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔴 *_मातृसुरक्षा दिन_* 🔴 *_ या वर्षातील १९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: विज्ञानप्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा ’मनुभाई मेहता पुरस्कार’ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर**२०००: नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.**१९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता**१९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण**१९९२: मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ही शिक्षा कमी करुन ३० वर्षांची करण्यात आली.**१९७८: मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.**१९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.**१९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.**१९७३: बहामाजला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२: ’टेलस्टार-१’ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित**१९४७: ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांच्या शिफारशीवरून मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.**१९४०: 'बॅटल् ऑफ ब्रिटन' या नावाने ओळखले जाणारे हवाईयुध्द सुरू. नाझी जर्मन विमानदलाने इंग्लंडवर प्रचंड मोठया संख्येने विमाने पाठवून बॉबफेक सुरू केली. इंग्लिश हवाईदलाने जर्मनांचा यशस्वी प्रतिकार केला.**१९२५:’तास’ या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना**१९२३: मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.**१८९०: वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: अंतरा मित्रा-- भारतीय पार्श्वगायिका**१९८२: एकनाथ विश्वनाथ पवार -- कवी, लेखक व चित्रपट गीतकार**१९८२: शंकर अभिमान कसबे -- नवोदित कवी,नियतकालिकांतून लेखन**१९८०: युवराज भुजंगराव माने -- लेखक* *१९८०: प्रा. डॉ. सखाराम डाखोरे -- कवी* *१९७८: सचिन वसंत पाटील -- प्रसिद्ध कथाकार* *१९७३: प्रा. डॉ. मारोती दशरथ कसाब -- कवी , लेखक**१९६८: अंबादास केदार -- कथाकार* *१९६२: सुभाष प्रभाकर सबनीस -- लेखक, कवी**१९५९: तुकाराम पुंडलिक खिल्लारे -- कवी**१९५४: रविराज गंधे -- माध्यमतज्ज्ञ, लेखक-पत्रकार**१९५१: राजनाथ सिंह -- केंद्रिय संरक्षणमंत्री उतर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५०: ’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका**१९४९:सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर – प्रसिद्ध क्रिकेटपटू व समालोचक तथा लेखक**१९४७: ल. म. कडू -- चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक* *१९४५: स्मिता भागवत -- लेखिका**१९४४: डॉ.भास्कर व्यंकटराव गिरिधारी -- लेखक,वक्ते, प्रवचनकार* *१९४३: आर्थर अ‍ॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३ )**१९४१: अनिल दहिवाडकर -- प्रसिद्ध लेखक व प्रकाशक* *१९४०: लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद**१९३९: डॉ.विश्वास मेहेंदळे -- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते (मृत्यू: ९ जानेवारी २०२३ )**१९२३: गुरूनाथ आबाजी तथा जी.ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७ )**१९२१: असद भोपाली -- भारतीय हिंदुस्थानी कवी आणि गीतकार (मृत्यू: ९ जून १९९० )**१९१३: पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८ )**१९०३: रामचंद्र भिकाजी जोशी -- प्रवासवर्णनकार, समीक्षक (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९१ )**१८८३: दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन -- पहिले भारतीय वैमानिक (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९४३ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: मंगेश तेंडुलकर -- जेष्ठ व्यंगचित्रकार (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६ )**२००५: जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१ )**१९९५: डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष* *१९८९: प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक (जन्म: ९ जानेवारी १९१८ )* *१९८६: शंकरराव श्रीपाद बोडस -- शास्त्रीय गायक (जन्म: २० एप्रिल १९०० )**१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (जन्म: १८ डिसेंबर १८८७ )**१९६९: डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार (जन्म: ३० मे १८९४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नोकरीची आशा ; पदरी निराशा*राज्यात नोकर भरती नसल्यामुळे सरकारी नोकरी मिळविणे खूपच कठीण बाब बनली आहे. प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळावी म्हणून जीवतोड मेहनत करत असतो. प्रत्येक दिवशी जाहिरातीची प्रतीक्षा करत असतो, एखादी जाहिरात दिसली की तेथे अर्ज करतो आणि परिक्षेसह मुलाखतीची ही तयारी करतो. ............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 'या' शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे  प्रयत्न - वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतून तहसिलदारांना मुक्त करण्याची राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेची सरकारकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जगासमोरच्या सर्व आव्हानाचा नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य भारतात असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पावसाळी अधिवेशनात सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसंत मोरे यांचा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक, मदत करणारे 12 जण ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेट संघाचे स्टार जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना आयसीसीने जून महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार केला जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?*🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचे ध्येय सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे, हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टी - २० क्रिकेटमधील सर्वात *कंजूष गोलंदाज* ( धावा कमी देणारा ) म्हणून कोणाचे नाव घेतले जाते ?२) भारताचे ३५ वे परराष्ट्र सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?३) सर्वाधिक दहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?४) 'झुंज' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?*उत्तरे :-* १) जसप्रीत बुमराह, भारत २) विक्रम मिसरी ३) मोरारजी देसाई ४) लढा, संग्राम, संघर्ष ५) नागपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 दत्तात्रय धुळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, मुखेड👤 युवराज माने, शिक्षक तथा साहित्यिक, अंबाजोगाई👤 दगडू गारकर, साधनव्यक्ती, लातूर👤 नागनाथ वाढवणे, शिक्षक, बिलोली👤 लक्ष्मण मुंडकर, शिक्षक, बिलोली👤 प्रा. संतोषकुमार यशवंतकर, भीर👤 महेश पांडुरंग लबडे, शिक्षक नेते, संभाजीनगर👤 ज्ञानेश्वर जगताप, शिक्षक, उमरी👤 मिलिंद चावरे, शिक्षक, नांदेड👤 प्रा. प्रकाश येलमे, धर्माबाद👤 सुरेश सावरगावकर, धर्माबाद👤 मन्सूर शेख, शिक्षक, नांदेड👤 प्रियंका घुमडे, येवती👤 चरणसिंह चौहान👤 विठ्ठल रामलू चिंचलोड👤 अभिजीत वऱ्हाडे👤 लक्ष्मीकांत पोलादे👤 पिराजी चन्नावार👤 भागवत गर्कल👤 बालाजी दुसेवार, न्यागव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अकह कहन में कहिये कैसा ।आदि ब्रह्म जैसा को तैसा ॥8॥अर्थ – अकह मतलब जो कहने में नहीं आ सकते , अकह जो है आदि पुरुष है (सत्यपुरुष ) जिन्होंने सारी सृष्टि बनायीं है , उन्होंने ने ही आदि शक्ति माता को भी बनाया है , और आदि शक्ति माता और निरंजन जी मिलकर  ब्रह्मा ,जी को  (रजो गुण ) से  , विष्णु जी को (सत्तो  गुण ) से  और शिव जी को (तमो गुण ) से बनाये उसके बाद से सारी सृष्टि सुरु हुयी।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यावर परिस्थिती कशीही आली तरी नको त्या ठिकाणी झुकू नये . जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे सदैव आपल्या आठवणीत ठेवावे. संघर्ष हाच मानवी जीवनाचा खरा आधार असतो असे ऐकण्यात आले आहे. म्हणून त्याच संघर्षाच्या आधाराने चालण्याचा प्रयत्न करावे. कारण संघर्षातूनच सर्व काही मिळत असते. व खरे जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे यावर सुद्धा मार्गदर्शक बनून नवी दिशा दाखवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ किंम्मत ❃*       एका राजमहालात एक बाईमोलकरीण म्हणुन काम करत असते. तिचा लहान मुलगा ही तिथच तिच्या बरोबर येत असे. एक दिवस त्याला राजमहालात खेळता खेळता हीरा सापडतो , तो मुलगा तो हीरा घेऊन पळत आई कडे जातो. आई बघ मला हीरा सापडला , मोलकरीण हुशार असते , तीला वाटते हा हीरा घेऊन आपण बाहेर नाही जाऊ शकणार , ती मुलाला म्हणते नाही रे काच आहे तो हीरा नाही . असे म्हणुन हीरा बाहेर फेकुन देते .      काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हीरा सोबत घेऊन जाते. मग ती तो हीरा सोनारा कडे घेऊन जाते. सोनाराला कळत कि हिला हा हीरा सापडला असणार कुठेतरी. हिला काय माहीत हा हीरा च आहे अस म्हणुन; तो तीला म्हणतो हा हीरा नाही ही तर काच आहे.असे म्हणुन तो पण तो हीरा बाहेर फेकुन देतो.      जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हीरा घेऊन येतो व जोहरी कडे घेऊन जातो .जोहरी हीरा पाहतो त्याला कळत हा हीरा अनमोल आहे त्याची नियत खराब होते. तो हीरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो काच आहे अस म्हणतो.जसा हीरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात.हे सगळ एक वाटसरु लांबुन पाहत असतो. तो त्या ही-या जवळ येतो आणि त्याला म्हणतो मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकल तेव्हा तु तुटला नाही ,पण आता का तुटला तु ,हीरा म्हणतो जेव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले ते माझी खरी किंमत जाणत नव्हते. परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता, तरी त्याने मला फेकले हा आघात मी सहन करुच शकलो नाही. म्हणुन मी तुटलो. असेच मनुष्याच्या बाबतीत होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमच मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.*_🌀तात्पर्य_ ::~* कधीही आपल्या लोकांचे जराश्या स्वार्था करता मन तोडु नका... आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणस हि-यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://deshdoot.com/teachers-day-blog-by-nagorao-yevatikar/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟠 *_ या वर्षातील १९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढीत विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकली. त्याबरोबरच सॅम्प्रसने आपल्या कारकिर्दीतील तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.**१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.**१९४९: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना**१८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ’ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.**१८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: गणपत विलास माखणे -- कवी* *१९९७: प्राजक्ता देशपांडे -- कवयित्री, लेखिका**१९८६: ईश्वरचंद्र व्यंकटराव हलगरे -- लेखक**१९८२: संदीप निवृत्ती गवई -- कवी, लेखक**१९७७: प्रा.गजानन रामचंद्र लोहावे -- लेखक**१९७५: डॉ. सर्जनादित्य मनोहर -- लेखक* *१९७३: प्रा. डॉ. कल्पना मेहरे -- लेखिका**१९६९:सागी लक्ष्मी वेंकटपथी राजू , (वेंकटपथी राजू) -- माजी भारतीय क्रिकेटपटू**१९६४: डॉ.अनिल मडके-- आरोग्य विषयक लेखक**१९६०: संगीता बिजलानी -- बॉलीवूड अभिनेत्री आणि १९८० मधील मिस इंडिया विजेती**१९४७: सिद्धार्थ काक-- भारतीय माहितीपट निर्माता,दूरदर्शन निर्माता* *१९४४: अनुराधा शशिकांत वैद्य -- कादंबरीकार, कथाकार, लेखिका (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१६ )**१९४४:तबस्सुम (किरण बाला सचदेव) -- भारतीय कलाकार, ज्येष्ठ अभिनेत्री (मृत्यू: १८ नोव्हेंबर २०२२ )**१९३८: हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५ )**१९३३: पन्नालाल प्रेमराज सुराणा -- लेखक* *१९३०: के बालाचंदर -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि नाटककार(मृत्यू: २३ डिसेंबर २०१४ )**१९२५:वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले. (मृत्यू: १० आक्टोबर १९६४ )**१९२१: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,(मृत्यू: ६ मार्च १९८२ )**१८१९: एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक (मृत्यू: ३ आक्टोबर १८६७ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:कवी कुमार आझाद-- तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये डॉ. हंसराज बलदेवराजी भूमिकेसाठी प्रसिद्ध भारतीय अभिनेता (जन्म : १२ मे १९७२ )**२०१५: बशर नवाज -- उर्दू कवी (जन्म:१८ ऑगस्ट १९३५ )**२०१४: मनोहर काटदरे -- जेष्ठ नाटककार (जन्म: १६ फेब्रुवारी १९३२ )**२०११: साधनाताई आमटे-- मराठी समाजसेविका,लेखिका (जन्म: ५ मे १९२७ )**२००५: डॉ.रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (जन्म:५ एप्रिल १९२० )**१९९३:संगीतकार व वाद्यवृंद संयोजक या सोनिक-ओमी (काका-पुतणे) जोडीतील सोनिक यांचे निधन* *१९६८: ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते (जन्म: २० एप्रिल १८९६ )**१९६७: विष्णू केशव पाळेकर (अप्रबुध्द)-- लेखक, क्रियाशील विचारवंत, चिंतक, प्रज्ञालोक मासिकाचे पहिले संपादक,(जन्म:३१ डिसेंबर १८८७ )* *१९३२: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (जन्म: ५ जानेवारी १८५५ )**१८५६: अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ ऑगस्ट १७७६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोरोना काळात लिहिलेला व दैनिक देशदूत या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला एक चिंतनीय लेख*" पालकच बनले शिक्षक ...."*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई : महाराष्ट्र राज्याला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार जाहीर, येत्या (11 जुलै) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *23 जुलै रोजी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! पक्ष व तुतारी चिन्हाला दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *23 जुलैपर्यंत आरक्षण द्या अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज ताकद दाखवून देईल - नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत मोठा निर्णय, जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंना मिळणार थेट सरकारी नोकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्या यांची निवड, 27 जुलै पासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 एनिमा म्हणजे काय ? 📕शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला साबण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'प्रेमाचे प्रतीक'* म्हणून कोणत्या पक्ष्याकडे पाहिले जाते ?२) जून २०२४ मध्ये झालेल्या सारस गणनेत गोंदिया जिल्ह्यात एकूण किती सारस आढळले ?३) देशात नवे फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले ?४) ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कोण निवडून आले आहेत ?५) वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना विनामूल्य आणि वेळेत रुग्णवाहिका सेवा मिळण्यासाठी कोणता नंबर डायल करावा लागतो ? *उत्तरे :-* १) सारस २) २५ सारस ३) १ जुलै २०२४ ४) कीर स्टॉर्मर ( लेबर पार्टी ) ५) १०८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 महेश जाधव, साहित्यिक, कोपरगाव👤 साईनाथ विश्वब्रह्म👤 पंडीत पवळे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख, नांदेड👤 अनिल उडतेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षीर रूप सतनाम है नीर रूप व्योहार।हंस रूपी कोई साधुजन है जो शब्द का करत छननहार ॥7॥अर्थ – दूध रूपी सत्यनाम है और पानी रूपी संसारी ब्योहार है , कोई कोई बिरला साधु हैं जो इस संसारी मोह माया में से ऊपर उठ कर उस सार रूपी शब्द को अलग करके उसमे लग जाते है।  ओ शब्द , न लिख सकते है और न ही कह सकते है , ओ  अकह है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चर्चा किंवा संवाद हा अभिव्यक्तीचा एक मार्ग आहे.कोणत्याही विषयावर चर्चा व्हायलाच पाहिजे. चर्चा कोणत्याही विषयावर का असेना मागे असो किंवा पुढे पण,वेळात, वेळ काढून केली जाते आणि आजच्या घडिला चर्चा करणे आवश्यक आहे. चर्चेतून प्रश्न सोडविले जातात.चर्चामधून एखाद्याला दिशा मिळू शकते.सोबतच एकमेकात संवाद सुद्धा सुरू राहतो. त्याच संवादातून व चर्चेतून काही क्षणासाठी माणूस तणावापासून दूर राहतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ स्वार व त्याचा घोडा ❃*        *एक स्वार आपल्या घोड्याला खरारा* करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.       *तात्पर्य :- जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे*.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.esakal.com/saptarang/should-we-prefer-primary-school-education-mother-tongue-39069••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील १९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११: रुपयाचे नवीन चिन्ह ( Rs.) असलेली नाणी प्रथमच चलनात आली.**२००६: मुख्य निवडणूक आयुक्त असताना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९७: बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.**१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात ’दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.**१९५४: पंजाब वर राजस्थानला वरदान ठरलेल्या भाकरा नांगल कालव्याचे पंडित नेहरू च्या हस्ते उद्घाटन**१९३०: किंग जॉर्ज (पाचवा) यांच्या हस्ते लंडनमधे ’इंडिया हाऊस’चे उद्‍घाटन**१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.**१८८९: ’द वॉल स्ट्रीट जर्नल’ चा पहिला अंक प्रकाशित झाला.**१८५६: चार्ल्स बर्न याल ’मशिनगन’*चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.**१४९७: वास्को द गामा युरोपातुन भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: अक्षय अंबादास टेमकर -- लेखक**१९८८: जुई गडकरी-- मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री**१९८३: प्रमोद शंकरराव हामंद-- कवी, लेखक* *१९८०: इंद्रजित वीर-- लेखक**१९७८: दत्तात्रय नाथा भापकर-- कवी, लेखक* *१९७८: अमोल अरविंद भावे -- सुप्रसिद्ध मराठी लेखक, निर्माते व दिग्दर्शक**१९७५: प्रा. डॉ. सुनील श्रीराम पवार-- कवी**१९७४: बाळासाहेब राजेसाहेब झोडगे-- कवी**१९७२: सौरव गांगुली –भारताचा माजी क्रिकेट कर्णधार**१९७०: अतुल अग्निहोत्री -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक* *१९६८: भारत केशवराव काळे -- आधुनिक मराठीतील कादंबरीकार, कथाकार व समीक्षक**१९६६: रेवती (जन्मनाव: आशा केळूण्णी कुट्टी) -- भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक**१९६२: डॉ.संजय गोविंदराव पोहरकर-- कवी, लेखक (मृत्यू: २२ एप्रिल २०२१ )**१९५८: नीतू कपूर (सिंग )-- भारतीय अभिनेत्री**१९५८: विजया दिपक एंबडवार -- कवयित्री**१९५४: डॉ. राजेश विश्वनाथराव गायकवाड -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: प्रकाश सुकलाल भांडारकर-- लेखक कवी**१९४९: वाय.एस. राजशेखर रेड्डी – आंध्रप्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री (मृत्यू: २ सप्टेंबर २००९ )**१९४४: उषा तांबे -- जेष्ठ मराठी लेखिका* *१९४१: अनिल मोहिले-- ज्येष्ठ संगीतकार(मृत्यू: १ फेब्रुवारी २०१२ )* *१९३०: मधुसूदन नारायण ऊर्फ म. ना. कुलकर्णी -- ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार (मृत्यू: १५ मे २०१८ )**१९२८: श्रीपाद रामचंद्र काळे -- जवळजवळ १२०० कथा व ५० हून अधिक कादंबऱ्यांचं लेखन केले आहे (मृत्यू: १८ जून १९८८ )* *१९२२: अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (मृत्यू: १९ एप्रिल २००९ )**१९१६: गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व. ’गडसम्राट’, ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रेजैत’ या त्यांच्या कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले. (मृत्यू: १ जून१९९८ )**१९१४: ज्योति बसू – प. बंगालचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: १७ जानेवारी २०१० )**१८३९: जॉन डेव्हिसन रॉकफेलर – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक (मृत्यू: २३ मे १९३७ )**१७८९: ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: सैयद इश्तियाक अहमद जाफरी (सुरमा भोपाली) हास्य अभिनेता (जन्म: २९ मार्च १९३९ )**२०२०: दीनानाथ घारपुरे-- ज्येष्ठ नाट्य,सिने पत्रकार* *२०१०: मधुकरराव चौधरी-- समाजसेवी, गांधीवादी,पूर्व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष (जन्म: १५ जून १९१९ )**२००७: चंद्रशेखर-- भारताचे माजी पंतप्रधान (जन्म: १ जुलै १९२१ )**२००६: प्रा.राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ’न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८). (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८ )**२००३: हरी श्रीधर शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक ( जन्म: २२ जानेवारी १९२० )* *२००१: वसंतराव चांदोरकर-- आग्रा, ग्वाल्हेर, जयपुर घराण्याचे गायक (जन्म: २० जून १९२० )**१९९४: डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व ’गोवा पुराभिलेख’चे संचालक* *१९८४: कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’ – कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )**१९६५: डॉ. कमलाबाई गोपाळराव देशपांडे'-- भारतीय समाजसेविका(जन्म: २२ फेब्रुवारी, १८९८ )**१८३७: विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५ )**१६९५: क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध (जन्म: १४ एप्रिल १६२९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रकाशित झालेला लेख ......*मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा आज शपथविधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हरे कृष्णा, हरे रामाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा सोहळा थाटात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ, ऊर्जामंत्री फडणवीसांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली येथून सुरू झालेली शांतता रॅली आज नांदेडमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात VIP दर्शन बंद करण्याचा मंदिर समितीचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा झिम्बाब्वेवर दणक्यात विजय, अभिषेक-ऋतुराजच्या खेळींमुळे सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* **************************'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच *नॅशनल आयकॉन अवॉर्ड* ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे ४६ वे सत्र कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?३) भारतातील पारशी समाज कोणती कालगणना पद्धती उपयोगात आणत असतो ?४) 'झुंबड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ? *उत्तरे :-* १) अदिती बोधनकर २) भारत ३) शहेनशाही कालगणना ४) गर्दी, रीघ, थवा ५) पाटलीपुत्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अशोक पवार👤 सुरेश तायडे👤 अनिल भेद्रे👤 अहमद काझी👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी👤 मल्लेश भूमन्ना बियानवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षीर रूप सतनाम है नीर रूप व्योहार।हंस रूपी कोई साधुजन है जो शब्द का करत छननहार ॥7॥अर्थ – दूध रूपी सत्यनाम है और पानी रूपी संसारी ब्योहार है , कोई कोई बिरला साधु हैं जो इस संसारी मोह माया में से ऊपर उठ कर उस सार रूपी शब्द को अलग करके उसमे लग जाते है।  ओ शब्द , न लिख सकते है और न ही कह सकते है , ओ  अकह है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन सुर्यास्त होते म्हणून सुर्योदय होत नाही असे नाही. कारण त्या सूर्याला माहीत असते की, या सृष्टीला माझी आवश्यकता आहे. कोणी त्याला विसरून जातात तर कोणी आठवण करतात. तो कोणालाही दोष न देता आपले कर्तव्य पार पाडत असतो. आपण सूर्य तर होऊ शकत नाही पण या भूमातेवर आपल्याला माणसासारखे अनमोल जीवन मिळाले हेच तर खूप काही आहे. याची प्रत्येकांनी जाणीव ठेवावी. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जी माणसं साधी असतात त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची गरज नसते, त्यांचे नाव त्यांच्या कर्तृत्वाने व कामाने सिद्ध होत असते*एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे. खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते. एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला. हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले. मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते. आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले. कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे. ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे. शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल. हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो. मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो. हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे. कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता. शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला. हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते. आणि नंतर ते उडून जातात.*तात्पर्य :- मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/07/which-school-do-you-like.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील १८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६: चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.**१९८२: पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.**१९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना**१८९२: ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.**१८८५: लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.**१७८५: ’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.**१७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: रणवीर सिंग( रणवीर सिंग भवनानी) हिन्दी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता**१९८५: श्वेता त्रिपाठी शर्मा -- भारतीय अभिनेत्री**१९८२: अमोल शिवाजीराव सूर्यवंशी -- लेखक**१९७८: मृदुला निळकंठ रायपुरे-जांगडेकर -- लेखिका* *१९७८: तन्वी अमित -- कवयित्री, लेखिका**१९७६: सरला संजय मोते- देशमाने -- लेखिका, कवयित्री* *१९७२: प्रा. डॉ. विशाखा संजय कांबळे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९७०: संजय गंगाराम ठिकाणे-पाटील -- लेखक**१९७०: प्रा. डॉ. संजय केशवराव लाटेलवार -- लेखक* *१९६९: स्मिता बनकर-जाधव -- कवयित्री* *१९६९: प्रा. डॉ. सुनील आनंदराव राठोड-- लेखक**१९६७: ज्योती वामन बन्सोड (पांगुळ) -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६५: अरुंधती नाग -- भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री**१९६१: अशोक शिंदे -- जेष्ठ मराठी अभिनेते**१९५५: राजीव शांताराम शास्त्री-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५२: रेखा शिवकुमार बैजल – जेष्ठ मराठी व हिंदी लेखिका**१९५०: श्रीकांत इंगळहळ्ळीकर -- पर्यावरण अभ्यासक, लेखक* *१९५०: प्रकाश पायगुडे -- स्तंभलेखक, संपादक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०२३ )**१९४६: जॉर्ज डब्ल्यू. बुश – अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष**१९४३: कालिदास गणपतराव चिंचोळकर -- लेखक* *१९४१: अरविंद नारखेडे -- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९३९: अरविंद प्रभाकर जामखेडकर -- पुरातत्त्वशास्त्रज्ञ व इतिहासकार प्राच्यविद्या पंडित**१९३५: दलाई लामा -- तिबेटी धर्मगुरू* *१९३२: प्राचार्या सिंधूताई मांडवकर -- जेष्ठ लेखिका* *१९३०: मैसूर श्रीनिवास एम.एस. सत्यू -- भारतीय नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी माध्यमांवरील दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, नेपथ्यकार**१९३०: डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)**१९२७: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१ )**१९२०: डॉ.विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५ )**१९०५: लक्ष्मीबाई केळकर – लेखिका, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८ )**१९०१: डॉ.श्यामाप्रसाद मुकर्जी – माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३ )**१८८१: संत गुलाबराव महाराज--महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५ )**१८६२: एल.के.अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७ )**१८३७: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५ )**१७८१: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (मृत्यू: ५ जुलै १८२६ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: पंडितराव दाजी कुलकर्णी -- ज्येष्ठ उद्योजक (जन्म: ४ जुलै १९२८ )**२००२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२ )**१९९९: एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९ )**१९९७: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ३ जानेवारी १९२१ )**१९८६: ’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८ )**१८५४: जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाऊले चालली खाजगी शाळेची वाट*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, प्रत्येक शंकेचे समाधान, अर्थसंकल्पावरील चर्चेअंती अजित पवारांनी मांडली राज्याच्या महसुलाची एकूण एक आकडेवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वाहन फिटनेस सर्टिफिकेट दंड रद्द करून रिक्षा चालकांना दिलासा द्या, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधानसभेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू, मनपा येथे दुचाकी घसरल्याने एकाचा तर बाणेर येथे डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - बालकांच्या सर्वांगीण विकासाला 'बूस्टमायचाईल्ड'ची साथ, कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने शिक्षक-पालकांसाठी विकसित स्टार्टअपला वर्धन ग्रुपची एक कोटीची गुंतवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हुजूर पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पराभव मान्य केला आहे. लेबर म्हणजेच मजूर पार्टी आघाडीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार; कर्णधार रोहित शर्मासह सूर्या, शिवम आणि यशस्वीचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?* 📕जेवल्यानंतरच औषधे घ्यावी, असा एक समज समाजात आढळून येतो. गोळ्या गरम पडतात, उष्ण असतात आणि त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण करून मगच औषध घ्यावे; असेही काही जणांना वाटत असते. औषधे केव्हा घेणे जास्त योग्य ते आता पाहू. एक मात्र नक्की की आजारी पडल्याखेरीज औषधे कधीही घेऊ नयेत! कारण आजकाल काही लोक स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनतात आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहून तापाच्या स्मरणशक्ती वाढवण्याच्या किंवा शक्ती वाढवण्याच्या गोळ्या घेतात. अर्थात याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.काही औषधे उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या तासभर अगोदर घेतली, तर त्याचे रक्तात शोषण चांगले होते आणि त्यांचा परिणामही चांग घडून येतो. अशा औषधांमध्ये पेनिसिलीन, अॅम्पीसिलीन, रिफॅम्पीसीन, टेट्रासायक्लीन या जंतूनाशकांचा समावेश होतो. टेट्रासायक्लीन घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर तासभर तरी दूध पिऊ नये. अॅस्पीरिन, लोहयुक्त गोळ्या-औषधे, जीवनसत्त्वे, एरिथ्रोमायसीन, पॅराअमायनो सॅलीसिलीक अॅसीड आदी औषधे मात्र जेवणानंतर किंवा जेवताना घ्यावीत. औषधांमुळे जठराच्या आवरणावर दाह निर्माण होऊन आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे मळमळ, उलट्या आदी त्रास होण्याची शक्यता असते. जेल्यूसीलसारख्या गोळ्या पोट रिकामे असताना घेतल्यास त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो.औषधांबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक औषध प्रत्येक माणसाप्रमाणेच वेगळे असते. त्यामुळे ते केव्हा, कसे घ्यायचे याची डॉक्टरांकडून माहिती घ्यावी आणि मगच त्यांचा उपयोग करावा. कारण एक लक्षात ठेवा की, औषध आणि विष यांच्यात फक्त देणाऱ्याच्या हेतूचाच फरक असतो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐक्य हेच बळ ते केवळ सुवचन नसून जीवनधर्म आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात पहिले वन सर्वेक्षण केव्हा झाले ?२) विनायक नरहर भावे यांना 'विनोबा' हे नाव कोणी दिले ?३) सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे त्याला काय म्हणतात ?४) 'झाड' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो ? *उत्तरे :-* १) सन १९८७ २) महात्मा गांधी ३) पेशी ४) वृक्ष, तरू, पादप, द्रुम ५) सरडा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अशोक इमनेलू, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 आबासाहेब उस्केलवार, केंद्रप्रमुख, धर्माबाद👤 मोहन भूमकर, विषय शिक्षक, धर्माबाद👤 संतोष मानेलू, शिक्षक, धर्माबाद👤 रेवती गायकवाड👤 अभय कासराळीकर, धर्माबाद👤 श्रीकांत पुलकंठवार, धर्माबाद👤 नारायण वानोळे👤 मधुकर कांबळे👤 शंकर सोनटक्के, मा. शिक्षक धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माला फेरत युग गया फिरा ना मनका फेर।कर का मन डारी दे मन का मनका फेर॥5॥अर्थ – यानि हम दुशरो को दिखाते है के हम माला फेर रहे है , लेकिन वो वास्तव में वो एक ढोंग कर रहे है क्यूंकि , सच्ची माला स्वास का होता है , जो आपे आप फिरता है , जो इस माला को जान लिया और फेरने लगा उसका इस संसार के आवागमन से मुक्ति मिल जाती है इसी जाप को ( अजपा का जाप ) कहा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही निसर्गाने दिलेली विशेष देण आहे. त्याच कलेचा योग्य वापर करून प्रचार केल्याने तिचा सन्मान होतोच सोबतच तिच्यामुळे अनेकांना दिशा सुद्धा मिळत असते. पण,त्याच कलेचा स्वार्थापोटी दुरुपयोग केल्याने तिचा अपमान तर होतेच सोबत व्यापार, आणि व्यवसायात तिची गणना केली जाते असे ऐकण्यात आले आहे. म्हणून आपल्या अंगी असलेल्या कलेची पूजा करावी व समाजासाठी तिच्यातून जेवढे योगदान द्यावा वाटते तेवढे द्यावे. पण,तिची गणना व्यापारात किंवा व्यवसायात करु नये.असं केल्याने कलेवर किंवा त्या कलावंतावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *मुर्खाशी गाठ*एके दिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्‍हणाला, ''बिरबल, एक प्रश्‍न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्‍यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्‍कीच नसणार तेव्‍हा मला त्‍यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे'' बिरबल म्‍हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीतून आपल्‍याला काय निष्‍पन्न होणार आहे तेव्‍हा त्‍यांच्‍या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्‍यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्‍याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्‍यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्‍न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्‍याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्‍यांना दरबारात जाण्‍यापूर्वी चांगला पोशाख घातला आणि त्‍यांना काही कानमंत्र दिला. बिरबल वडीलांना म्‍हणाला,'' बादशहा तुम्‍हाला भेटू इच्छितात, तिथे गेल्‍यावर तो तुम्‍हाला कोणतेही आडवेतिडवे प्रश्‍न विचारेल पण काही केल्‍या तुम्‍ही तोंड उघडू नका. एकही शब्‍द न बोलता गप्‍प बसून रहा. बादशहा चिडेल, संतापेल पण तुम्‍ही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका.'' झाले बिरबलाचे वडील बादशहाच्‍या दरबारात पोहोचले. बादशहा दरबारात येताच वडीलांनी त्‍यांना सलाम केला. बादशहाने त्‍यांना बिरबलाचे वडील म्‍हणून ओळखले पण बोलायला काही तरी सुरुवात करायची म्‍हणून त्‍याने विचारले,'' तुम्‍हीच बिरबलाचे वडील का'' वडील गप्‍पच. त्‍याने पुन्‍हा विचारले,'' तुम्‍ही कुठे राहाता, गावाचे नाव काय, शेती कशी आहे, पाऊसपाणी कसे आहे, गावातील मंडळी कशी आहेत,'' असे अनेक प्रश्‍न विचारले तरी बिरबलाने सांगितल्‍याप्रमाणे वडील गप्‍पच होते. शेवटी बादशहा वैतागला, चिडला आणि संतापाच्‍या भरात बोलून गेला, ''काय बुद्धी झाली आणि या मूर्खाला मी बोलावून घेतले. असल्‍या मूर्खाशी अशीकशी माझी गाठ पडली की जो साध्‍या प्रश्‍नांची सुद्धा उत्तरे देत नाहीये.'' बिरबलाचे वडील मूर्ख शब्‍द ऐकून मनातून संतापले होते पण बिरबलाने सांगितले होते की, काही झाले तरी तोंड उघडायचे नाही. बादशहा कंटाळून निघून गेला व वडीलसुद्धा घरी गेले. त्‍यांनी हा प्रकार बिरबलाच्‍या कानावर घातला. बिरबलाने त्‍यांची समजूत घातली व शांत राहाण्‍यास सांगितले. चार दिवसांनी जेव्‍हा बिरबल पुन्‍हा दरबारात गेला तेव्‍हा बादशहा बिरबलाला म्‍हणाला,'' बिरबल मला तुझ्याशी काही महत्‍वाचे बोलायचे आहे तेव्‍हा तू जवळ ये.'' बिरबल जवळ गेला. बादशहा हळूच त्‍याला म्‍हणाला,'' बिरबल, आपली गाठ जर मूर्खाशी पडली तर काय केले पाहिजे'' बिरबल तात्‍काळ उत्तरला,''महाराज आपण शांत रा‍हिले पाहिजे, गप्प बसले पाहिजे.'' बादशहा म्‍हणाला, '' ते कसे काय'' बिरबल म्‍हणाला,'' माझे वडील नाही का तुमच्‍यासमोर गप्प बसले होते तसेच'' हे ऐकून बादशहाचे तोंड बघण्‍यासारखे झाले.*तात्पर्य :- मुर्खाशी वाद घालू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/oNGVfYuXNUHctWJ9/?mibextid=xfxF2i••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील १८९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢 •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.**१९९७: स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्‍नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.**१९९६: संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर**१९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात**१९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अ‍ॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.**१९७५: ’केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९७५: ’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्‍चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.**१९६२: अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४: आंध्रप्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९५०: इस्रायेलच्या क्‍वेन्सेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.**१९१३: किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना केली.**१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.**१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.**१८११: व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: प्रा. डॉ. आनंद अहिरे -- कवी, लेखक* *१९८५: राहुल गोविंद निकम -- कवी , लेखक**१९७९: आनंद वासुदेव वाडे-- कवी* *१९७८: मारोती माधव काळबांडे -- कवी, लेखक* *१९७८: प्रा. डॉ. कैलास अंभुरे -- प्रसिद्ध लेखक* *१९७७: नवनाथ विष्णू गडेकर -- कवी* *१९७७: प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे-- देश-विदेशात लोककला पोहोचवणारे**१९७६: मंदा धनराज सुगिरे-- लेखिका, कवयित्री* *१९७३: डॉ स्मिता प्रमोद पाटील -- कवयित्री, लेखिका**१९७३: गीता कपूर-- हिंदी चित्रपटांची (बॉलिवूड) कोरियोग्राफर**१९७२: सुरेखा शेषराव बोरकर --- लेखिका**१९६६: प्रा. डॉ. बाबाराव मारोती ठावरी -- लेखक* *१९६३: लक्ष्मण मलगिलवार- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६२: डॉ.साहेब रामराव खंदारे -- कवी, समीक्षक, संपादक* *१९६०: प्रा. डॉ. प्रभावती वाल्मीकराव विहिरे -- कवयित्री, लेखिका**१९५८: अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९५७: अशोक हांडे-- मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार**१९५७: पांडुरंग वसंत कुलकर्णी-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: डॉ.कैलास शंकरराव कमोद -- लेखक, नाशिकचे अभ्यासक* *१९५४: जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९५४: नारायण गजीराम थोरात -- कवी**१९५२: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० )**१९४९: पांडुरंग मोरे -- कथाकार* *१९४६: राम विलास पासवान – माजी केंद्रीय मंत्री,आणि लोक जनशक्ती पक्षाचे माजीअध्यक्ष (मृत्यू: ८ ऑक्टोबर, २०२० )**१९४३: बाळकृष्ण गणपतराव कवठेकर-- जेष्ठ साहित्यिक व समीक्षक**१९३३:सुरेंद्र आत्माराम गावस्कर -- सूचिकार, संपादक (मृत्यू: १३ जानेवारी १९७९ )**१९२९: रोहिणी गवाणकर -- ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक , लेखिका* *१९२५:नवल किशोर शर्मा – माजी केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (मृत्यू: ८ आक्टोबर २०१२ )**१९२०: आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (मृत्यू: ४ एप्रिल १९९६ )**१९१६: के. करुणाकरन – माजी केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २०१० )**१९१२: दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे--- पत्रकार, कथाकार, विनोदकार, अनुवादक(मृत्यू: ६ ऑगस्ट १९८३ )**१८८२: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७ )*🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: तुळशी परब-- कवी (जन्म: ३० सप्टेंबर १९४१ )**२००५: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४ )**१९९६: चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – प्रसिद्ध रहस्यकथाकार(जन्म: ९ जून १९०६ )* *१९४५: विष्णुपंत गोविंद दामले -- भारतीय प्रॉडक्शन डिझायनर, सिनेमॅटोग्राफर, चित्रपट दिग्दर्शक आणि ध्वनी अभियंता (जन्म: १४ ऑक्टोबर१८८२ )**१८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (जन्म: ६ जुलै १७८१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रिया देशांच्या दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जातीय जनगणना झाली तर आरक्षणाचा प्रश्न सुटेल – खासदार अमोल कोल्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यावर घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिव्य दर्शन; सासवड मुक्कामानंतर पालखी पंढरपूरकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - 'दगडूशेठ' गणपती मंदिरात आरोग्यसंपन्न भारताकरिता अतिरुद्र महायाग, वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह 65 ब्रह्मवृंदांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप, CM शिंदे म्हणाले- निवृत्त होणाऱ्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर ! टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या चार खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये देऊन गौरवण्यात येणार, शिंदे सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅**************************रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी माणसं सुंदर विचारांची असतात, ती अंधारातही चमकणाऱ्या काजव्यांसारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या भारतीय बुद्धिबळ पटूने लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा - २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे ?२) कोणत्या संघाने महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विश्वविक्रम केला आहे ?३) कोणता देश पशुधन कार्बन उत्सर्जनावर टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?४) 'ज्येष्ठ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वतः भोवती कडे असणारा ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) विश्वनाथन आनंद, भारत २) भारत ( ६०३ धावा, द. आफ्रिका विरुध्द ) ३) डेन्मार्क ४) मोठा, वरिष्ठ ५) शनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुधाकर चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर कांबळे, आलूर, धर्माबाद👤 सुदर्शन जावळे पाटील👤 डॉ. मनोज तानुरकर, स्वाक्षरी तज्ञ, धर्माबाद👤 मारोती कदम, स्तंभलेखक, नांदेड👤 विजयप्रकाश पाटील गाडीवान👤 नागनाथ भत्ते, मोबाईल टीचर, धर्माबाद👤 चक्रधर ढगे पाटील, बिलोली👤 सुभाष कुलकर्णी👤 गणपत बडूरकर, मा. शिक्षक, धर्माबाद👤 संभाजी कदम👤 अनिल गायकांबळे👤 किशन कवडे👤 संतोष शेळके, साहित्यिक👤 गजानन बुद्रुक, हिंगोली👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद👤 फारुख शेख👤 नरेश शिलारवार, धर्माबाद👤 गिरीश कहाळेकर, नांदेड👤 अजय चव्हाण👤 रमेश अबुलकोड, विमा प्रतिनिधी, धर्माबाद👤 अशोक पाटील👤 राजरेड्डी बोमनवाड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माला फेरत युग गया फिरा ना मनका फेर।कर का मन डारी दे मन का मनका फेर॥5॥अर्थ – यानि हम दुशरो को दिखाते है के हम माला फेर रहे है , लेकिन वो वास्तव में वो एक ढोंग कर रहे है क्यूंकि , सच्ची माला स्वास का होता है , जो आपे आप फिरता है , जो इस माला को जान लिया और फेरने लगा उसका इस संसार के आवागमन से मुक्ति मिल जाती है इसी जाप को ( अजपा का जाप ) कहा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैसा फेको,तमाशा देखो या प्रकारची म्हण समाजात प्रचलीत आहे. कदाचित हे, खरे असावे म्हणूनच आजही अनेकांच्या मुखातून नेहमीच ऐकायला मिळत असते. जीवन जगत असताना आवश्यक ठिकाणी पैशाने व्यवहार सुध्दा करावा लागतो. पण प्रत्येक ठिकाणी किंवा काही मिळविण्यासाठी पैसे देणे, घेणे आवश्यक असते का. .? एकदा हाच प्रश्न आपल्या मनाला विचारून बघावा. अनेकदा याच प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडून योग्य मिळेलच असेही नाही त्यासाठी स्वतः च्या मनाला विचारून बघावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाहय देखावा आणि सौंदर्य*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.*तात्पर्य*-बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/EBUZQqR5irXBijYQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_जागतिक फणस दिन_* 🛑 🛑 *_ या वर्षातील १८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.**१९९७: ’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.**१९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान**१९४७: ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.**१९४६: सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९३६: ’अमरज्योती’ हा ’प्रभात’ चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.**१८२६: अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.**१७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: गोविंद दत्ताराम कवळे -- कवी**१९८०: संजय माणिक राठोड-- कवी, लेखक**१९७६:सुरेश बाब्या राठोड-- चित्रकार, लेखक**१९७३: वृषाली सानप-काळे -- मराठी आणि हिंदी भाषेतून लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७०: शिल्पा देवळेकर -- कवयित्री, लेखिका* *१९६९: प्रतिभा सिन्हा -- भारतीय अभिनेत्री* *१९६८: डॉ. वाल्मीक हिरामण अहिरे -- लेखक, समीक्षक**१९६६: डॉ. प्रभाकर शेळके -- कवी, कथाकार* *१९६५: रमेश पांडुरंग तांबे -- लेखक, कवी* *१९६०: देवेंद्र भुजबळ -- लेखक, संपादक तथा माजी माहिती संचालक* *१९५९: नीना गुप्ता -- हिंदी चित्रपट अभिनेत्री , टीव्ही कलाकार आणि चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता* *१९५६: डॉ.संजीवनी मुळे -- लेखिका, कवयित्री**१९५४: डॉ सुनंदा देशपांडे -- लेखिका* *१९४९: जोगिंदर शेली -- अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, गायक, गीतकार आणि वितरक (मृत्यू: १५ जून २००९ )**१९४८: योगिनी वेंगुर्लेकर -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९४७: गणेश आप्पासाहेब धांडगे -- कादंबरीकार कथाकार* *१९४७: डॉ.आनंद पाटील -- जेष्ठ साहित्यिक**१९४४: पंडित प्रभाकर कारेकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९३३: डॉ.अरविंद वामन कुलकर्णी -- प्रख्यात समीक्षक,लेखक,कवी (मृत्यू: २९ ऑक्टोबर २००३ )**१९२८: जयराम आचार्य -- प्रसिद्ध भारतीय सितार वादक (मृत्यू: ५ एप्रिल २०१७ )**१९२८: पंडितराव कुलकर्णी -- ज्येष्ठ उद्योगपती ( मृत्यू: ६ जुलै २०२०)**१९२६: विनायक आदिनाथ तथा ’वि.आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक (मृत्यू: १७ एप्रिल २०११ )**१९१४: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ –भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(मृत्यू: २१ डिसेंबर १९९७ )**१९१२: पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४ )**१९११: विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख -- हार्मोनिअम वादक, गायक (मृत्यू: ६ एप्रिल १९८१ )**१८९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (मृत्यू: १५ जानेवारी १९९८ )**१८९०: नारायण केशव बेहेरे -- कवी, कादंबरीकार काव्य समीक्षक (मृत्यू: १९ जानेवारी १९५८ )**१८९०: क्षमादेवी राघवेंद्र राव -- संस्कृत भाषातज्ज्ञ (मृत्यू,:२४ एप्रिल:१९५४ )**१८७२: काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जानेवारी १९३३ )**१७९०: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (मृत्यू: १ डिमेंबर १८६६ )*🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ मे १९०९ )**१९८२: भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार (जन्म: ६ जानेवारी १९१८ )**१९८०: रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.(जन्म: २४ एप्रिल १८९६ )**१९६३: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (जन्म:२ ऑगस्ट १८७६ )**१९३४: मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७ )**१९०२: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.(जन्म: १२ जानेवारी १८६३ )**१८३१: जेम्स मोन्‍रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८ )**१८२६: थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (जन्म: १३ एप्रिल १७४३ )**१८२६: जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० आक्टोबर १७३५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• " सरकारी शाळेची कथा "..... पूर्ण लघुकथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अडवणूक, दिरंगाई किंवा पैशाची मागणी केल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांचा तलाठ्यासह अधिकारी व दलालांना इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जनतेने अपप्रचाराला नाकारून विश्वासाच्या राजकारणाला निवडले - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हाथरस दुर्घटनेत बळींची संख्या १२१ वर, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सेन्सेक्सने पार केला ८० हजारचा टप्पा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कापूस पिकाच्या खर्च व उत्पन्नातील तफावातीबाबत धोरण ठरवणार - पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 विश्वकप विजेता टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हरभजन सिंह*आपल्या जादूही फिरकीने भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून देणारा आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडविणारा भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू हरभजनसिह याचा 3 जुलै हा वाढदिवस.अगदी लहान वयात भारतीय संघात दाखल झालेल्या हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात विचित्र झाली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून वादंग झाले आणि तो संघाबाहेर फेकला गेला. इ.स. २००१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉचा संघ आला होता. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने, कप्तान सौरव गांगुली चिंतेत पडला होता. ऑसी फलंदाज ऑफस्पिन गोलंदाजाला बिचकून खेळतात, याचा पक्का अभ्यास सौरवने केला असल्याने, त्याने हरभजनसिंगला संघात घेण्याकरता निवड समितीला साकडे घातले. निवड समितीने केवळ कप्तानाच्या आग्रहाखातर हरभजनला संघात घेतले. भारतीय संघाच्या कामगिरीला निर्णायक कलाटणी देणाऱ्या त्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हरभजनने तब्बल ३२ बळी मिळवून कमाल केली. भारताने मालिका २-१ फरकाने जिंकली आणि हरभजनला मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.इ.स. २००६ ते इ.स. २००८ चा काळ हरभजनकरता निराशेचा ठरला. १३ कसोटी सामन्यांत जेमतेम ३७ बळी या काळात हरभजनला मिळवता आले. या काळात त्याला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर पडावे लागले. इ.स. २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हरभजन नव्हता; पहिल्या टी२० वर्ल्ड कपकरता निवड समितीने हरभजनला संघात परत आणले, तो क्षण मोलाचा ठरला. इ.स. २००८ मध्ये गॉल कसोटीत भारतीय संघाला विजयी करून देताना हरभजनने दोनही डावांत मिळून १० बळी मिळवले. चांगली कामगिरी करून हरभजनवर प्रकाशझोत पडला नाही, कारण सेहवागने त्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.2009 हरभजनला आपल्या फलंदाजीच्या गुणवत्तेची अचानक जाण आली. विंडीज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात संघाला नितांत गरज असताना हरभजनच्या अर्धशतकी खेळीने कमाल साधली. मायदेशातील मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध हरभजनने लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावून संघातील सहकाऱ्यांना चकित केले. इ.स. २०११ वर्ल्ड कपच्या यशात हरभजनसिंगच्या नावासमोर भरपूर बळी नसल्याने, त्याच्यावर टीका केली गेली. प्रत्यक्षात समोरच्या संघातील खेळाडूंनी विचारपूर्वक हरभजनच्या गोलंदाजीचा धोका न पत्करता, नुसते खेळून काढण्याचा निर्णय घेतला होता. हरभजनच्या नावासमोर जास्त बळी नसले तरी त्याने आपल्या १० षटकांत खूप कमी धावा दिल्या आहेत, तसेच पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली आहे. डो मनिका कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंगने ४०० कसोटी बळींचा टप्पा पार केला. असे अचाट काम करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी आणि कपिल देव ४३२ बळी हे दोनच भारतीय गोलंदाज हरभजनच्या पुढे आहेत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आदिमानव ही मानवाची प्रजाती प्रथम कोणत्या खंडात अस्तित्वात आली ?२) *जागतिक प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस* केव्हा साजरा केला जातो ?३) शेअर बाजाराची सुरुवात करणारा जगातील पहिला देश कोणता ?४) 'जीर्ण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्राम्होस क्षेपणास्त्र विकत घेतले आहे ?*उत्तरे :-* १) आफ्रिका खंड २) ३ जुलै ३) नेदरलँड ४) जुने ५) फिलिपाईन्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कवी गोविंद कवळे, उमरी👤 श्रीपाद जोशी येवतीकर👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक👤 कमलाकर जमदाडे, बिलोली👤 राजकुमार बिरादार👤 बंडू आंबटकर, कोल्हापूर👤 गणेश मंडाळे👤 बालाजी मदनलवार👤 परमेश्वर मेहेत्रे👤 अविनाश खोकले👤 श्याम उपरे👤 प्रदीप यादव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माटी कहे कुम्भार से तू क्यों रौदे मोए। एक दिन ऐसा आएगा मै रौंदूंगी तोए॥4॥अर्थ – माटी कुम्भार से कहता है जिस प्रकार तुम मुझे रौद रहे हो एक दिन ऐसा आएगा जिस दिन मई तुम्हे रौंदूंगी ( जब इंसान मरता है तो उसकी शरीर जो मिटटी से ही बनी है वो वापस मिटटी में ही मिल जाती है ) इसी को मिटटी कहता है , के आज इस अभिमान को छोड़ दो क्यूंकि एक दिन तुमको भी मुझ में ही मिल जाना है यानि मिटटी में।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाच्या समाधानासाठी आपण कितीही चांगले काम केले किंवा त्याच प्रकारची वागणूक ठेवून जरी जगून दाखवले तरी समोरच्या व्यक्तीला समाधान होईलच असे नाही. कारण, प्रत्येकांकडेच समाधान या नावाची संपत्ती नसते. म्हणून आपल्याला काय वाटते आपणच ठरवावे. दुसऱ्यांचे समाधान करताना थोडे स्वतः च्या विषयी विचार करावे शेवटी स्वतःलाच जगावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्रची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे**त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून**विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण* *वर्षभर काय केले याची आहे.मी आज काय करतो याची नाही.**तात्पर्यः*   *"कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.**एका दिवसात यश प्राप्त होत नाही. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/7jsB5HcWmR3niU3Z/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_विश्व यूएफओ दिवस_* *_ या वर्षातील १८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.**१९९४:चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड**१९८३:कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.**१९८१:माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य इन्फोसिस या कंपनीची स्थापना**१९७२:भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्‍या केल्या.**१९६२:रॉजर्स,आरकॅन्सास येथे पहिले ’वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.**१८५०:बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला ’गॅस मास्क’चे अनेरिकन पेटंट बहाल**१८६५:’साल्व्हेशन आर्मी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:विशाल देवतळे-- कवी,लेखक* *१९७९:प्रवीण हरिभाऊ चव्हाण-- लेखक**१९७६:प्रा.दिवाकर विश्राम सदांशिव-- लेखक* *१९७३:राजेश रेवले -- कवी* *१९७०:प्रा.डॉ.अनिल शंकरराव काळबांडे-- कवी,लेखक,संपादक* *१९६८:महेंद्र पुंडलिक ताजने-- कवी लेखक**१९६७:किशोर रामराव खेडेकर-- लेखक**१९६५:श्याम ऊर्फ अनंत दत्तात्रय पेठकर-- प्रसिद्ध लेखक,वऱ्हाडी भाषेतील स्तंभ,नाटके, कथा,कवितांचेही सातत्याने लेखन**१९६१:शंकर सीताराम चव्हाण-- लेखक**१९६१:डॉ.गिरीश जखोटिया -- प्रसिद्ध विचारवंत,लेखक**१९६१:प्रदीप निफाडकर-- प्रसिद्ध गझलकार,कवी,लेखक* *१९६०:सतीश सुरवसे--प्रसिद्ध कथाकार**१९५९:विजयालक्ष्मी विजय देवगोजी-- लेखिका* *१९५८:पवन मल्होत्रा-- ​​भारतीय अभिनेता**१९५४:मोहम्मद अझीझ-- भारतीय बहुभाषिक पार्श्वगायक (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१८)**१९५०:अपर्णा आनंद पाटणकर-- लेखिका, कवयित्री**१९५०:काशीराम लक्ष्मण चिंचय --कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर(मृत्यू:१४ जानेवारी २०२२)**१९४४:अरुण गोडबोले-- जेष्ठ कवी,चित्रपट निर्मिती* *१९३३:मधुकर टिल्लू -- मराठी एकपात्री नाट्ये सादर करणारे ज्येष्ठ कलावंत(मृत्यू:१ जून २०००)**१९३०:कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष**१९२५:पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)**१९२३:जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी माजी मंत्री(मृत्यू:२५ नोव्हेंबर १९९७)**१९२२:मोहम्मद फजल-- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल(मृत्यू :४ सप्टेंबर २०१४)*.*१९२२:पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर**१९१६:वामन शिवराम आपटे--कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक(मृत्यू:९ ऑगस्ट १९९२)**१९०४:रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (मृत्यू:१२ आक्टोबर १९९६)**१८६५:कृष्णाजी लक्ष्मण सोमण-- कवी, नाटककार (मृत्यू:२५ मे १९९८)**१८८०:गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक,’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (मृत्यू:२३ डिसेंबर १९६५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:लीलाधर कांबळी-- मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते(जन्म:९ मे १९३७)**२०१७:प्रा.मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल-- मराठी लेखक,अनुवादक, रूपांतरकार,नाट्यलेखक,निर्माता,दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते (जन्म:२४ जुलै १९३२)**२०११:चतुरानन मिश्रा – माजी केंद्रीय कृषी मंत्री,कामगार नेते,कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म:७ एप्रिल १९२५)**२००७:दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (जन्म:८ ऑगस्ट १९४०)**१९९९:मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (जन्म:१५ आक्टोबर १९२०)**१९७२:महेश कौल -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक आणि अभिनेता(जन्म:१० एप्रिल १९११)**१९५०:युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (जन्म:२३ सप्टेंबर १९०३)**१८४३:डॉ.सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म:१० एप्रिल १७५५)**१७७८:रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (जन्म:२८ जून १७१२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचे पत्र हरवले ........!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 30 ते 31 रुपयाची कपात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघातप्रवण क्षेत्रात 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेश बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *‘एक रुपयात पिक विमा योजना’, सेवा केंद्र चालकांनी अधिक रकमेची मागणी केल्यास तक्रार करण्याचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई 'पदवीधर'मधून अनिल परब विजयी : 'शिक्षक'मधून अभ्यंकर; भाजपचे निरंजन डावखरे यांनी कोकणचा गड राखला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *काँग्रेसच्या वतीने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी, विधान परिषदेची उमेदवारी जाहीर; मागील वेळी झाली होती बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दोन वर्षानंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकसंख्या* 📙साऱ्या जगाच्या पाठीवर लोकसंख्यावाढीचे भूत आरूढ झालेले आहे. अनेक भेडसावणारे प्रश्न त्यातून उभे राहिले आहेत व ते वाढतच जाणार आहेत. भल्याभल्यांची मती यामुळे कुंठित झाली आहे. भारताची प्रगती खूप झाली, अन्नधान्य उत्पादन वाढले, कारखानदारी वाढली; पण हे सर्व आज महाप्रचंड लोकसंख्येने कुठेतरी पार गिळुन टाकले आहे.पन्नास वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पट वाढली. दर हजारी मृत्यूचे प्रमाण घटत गेले, साथीचे आजार आटोक्यात आले, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले व बाळंतपणात मृत्यू ओढवून अकाली निधनाचे प्रमाण स्त्रियांत अल्प राहिले. याउलट जन्मप्रमाण मात्र तेवढेच राहिल्याने अत्यंत झपाट्याने लोकसंख्या वाढत गेली आहे. लोकसंख्यावाढीमध्ये आणखी एक घटक महत्त्वाचा ठरतो. प्रजननक्षम जोडप्यांची संख्या वाढते, तसे वाढीचे प्रमाण वाढत जाते.लोकसंख्यावाढीचा प्रमुख सिद्धांत माल्थस यांनी मांडला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढत असते. यामुळेच अनेक शतके स्थायी असलेली लोकसंख्या १७५० साली जगभर वाढू लागली. या वाढीवर आरोग्यादायी सेवांचा अनुकूल परिणाम झाल्याने आज ७०० कोटींचा आकडा जगाने पार केला आहेच. लोकसंख्येच्या बाबतीत जगाचे उत्तर व दक्षिण असे उघडउघड मतभेद झालेले आढळतात. उत्तरेकडचे सर्व देश हे सध्या स्थिर लोकसंख्या असलेले बरेचसे प्रगत व प्रजननक्षम जोडप्यांना 'शिक्षित' करण्यात यशस्वी झालेले आढळतात. अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय असल्याशिवाय घरात मूल जन्माला येऊ न देणे हे त्यांनी पटवून घेतले आहे.याउलट जन्माला येणारे मूल जगेल, मोठे होईल याची दक्षिणेकडील अप्रगत, आर्थिकद्रुष्ट्या मागास देशांना खात्री नसते. श्रमाची किंमतच त्यांना माहित असल्याने अधिक मुले म्हणजे श्रम करण्यासाठी अधिक हात, याच समीकरणाचा गोंधळ त्यांच्या डोक्यातून निघत नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया व मध्य आशिया हा साराच भाग दक्षिणेचा म्हणून मोडतो.लोकसंख्या मोजणे हा एक शास्त्रीय भाग आहे. जनगणना वा सेन्सस दर दहा वर्षांनी केली जाण्याची गेल्या शतकातील पद्धत आहे. शक्यतोवर एकाच दिवशी साऱ्या देशातली पाहणी व मोजणी करून मग त्याची आकडेवारी एकत्र केले जाते. जनगणनेची पद्धत अमेरिकेत प्रथम १७९० साली वापरली गेली; पण जनगणनेचा वापर व उपयोग शास्त्रोक्तदृष्ट्या होतो, अशा नोंदी प्राचीन चिनी उल्लेखातसुद्धा आढळतात.२०१८ च्या जनगणनेनुसार भारताची सध्याची लोकसंख्या अंदाजे १.३५ अब्ज इतकी आहे. दर हजारी पुरुषसंख्येमागे स्त्रियांचे प्रमाण फक्त ९३३ आहे. प्रजननक्षम जोडप्यांचा जननदर म्हणजेच फर्टिलिटी रेट २.७ इतका आहे. तो २.१ पर्यंत खाली आणण्याचे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे लोकसंख्यावाढीवर आपण नियंत्रण आणू शकू. एक वर्षाच्या आत होणारे बालमृत्यू इन्फंट मॉरटॅलिटी या नावाने ओळखले जातात. त्यांचा आकडा दर हजारी ३०.१५ इतका मोठा आहे. गरोदरपणातून व बाळंतपणाच्या संदर्भातील आजारातून होणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाणही एक लाखामागे ४४० आहे. तसेच स्त्रियांमधील साक्षरता आजही बहुतांश राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी आढळते. या साऱ्या आकड्यांना अपवाद फक्त केरळ या राज्याचा. भारतातील वृद्धांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७ टक्के भरते. २० वर्षांखालील व्यक्तींची सध्या संख्या सुमारे ४८ टक्के आहे. यामुळेच सर्वात जास्त तरुण असलेले मोठे राष्ट्र म्हणून आपण २०३० साली मिरवू शकू.लोकसंख्या स्थिर असणे व कमी होणे हा प्रकार जगातील सर्व प्रगत देशात गेली २५ वर्षे घडत आहे. याचे विश्लेषण मात्र अनेक पद्धतीने केले जाते. युरोपमधून अमेरिकेत व जगभर युरोपियन सतत जात राहिले, अन्यथा युरोपमध्ये संख्याविस्फोट झाला असता, असेही काही तज्ज्ञ म्हणतात. यासाठी ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारतातील ब्रिटिश वसाहती यांची एकत्रित आकडेवारी मांडतात. नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड यांची लोकसंख्या कमी होत आहे. एक गोष्ट निश्चित आहे की, भारतातच काय पण जगातही लोकसंख्या सतत वाढत गेली, तर तिला पुरेसे अन्न पुरवणे व गरजा भागवणे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कठीणच आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचे सोने होते. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या पहिल्या महिलेचे नाव काय आहे ?२) महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ?३) भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?४) 'जिन्नस' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ऑक्सीजनच्या सिलेंडरची मदत न घेता एव्हरेस्ट सर करणारे देशातील पहिले डॉक्टर दांपत्य कोण ? *उत्तरे :-* १) सुजाता सौनिक २) वसंतराव नाईक ३) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ४) पदार्थ ५) डॉ. हेमंत लुवा व डॉ. शुबिबेन लुवा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पंडित दगडगावे, शिक्षक, धर्माबाद👤 विक्रांत दलाल, नांदेड👤 शैलेश तराळे👤 सतिश अवधूतवार, बोधन👤 चिमणाजी हिवराळे👤 वसंत घोगरे पाटील, संस्थापक, मानव विकास सेवाभावी संस्था👤 श्रीनिवास पुल्लावार👤 शिवानंद चौगुले, पुणे👤 मारोती जाधव👤 जेजेराव सोनकांबळे👤 गोपाळ पामसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुर्लभ मनुष्य जनम है देह न बारम्बार।तरुवर ज्यों पति झड़े बहुरि न लागे डार ॥1॥अर्थ – मनुष्य का जन्म बहुत ही दुर्लभ है मनुष्य का जन्म पाना बहुत ही भाग्य का बात है।  जिस प्रकार डाल से पत्ता टूट कर गिरने के बाद वापस डाल पर नहीं लगता उसी प्रकार मनुष्य का जन्म भी दुबारा बिना सत्कर्म और भजन बिना नहीं मिलता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे लाल गर्द टोमॅटो भाजीत टाकल्याशिवाय भाजीला रंग येत नाही. तसंच कांदा चिरताना सुद्धा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. त्या दोघात किती ताकद असते त्यांचा उपयोग केल्यावरच त्यांचे महत्व कळत असते. म्हणूनच आपल्या जीवनात सुध्दा येणारे चांगले, वाईट प्रसंग आपली परीक्षाच घेण्यासाठी येत असतात असेही नाही तर ते,खूप काही शिकायला सुद्धा भाग पाडत असतात म्हणून त्यांना कंटाळून न जाता सदैव त्यांचे स्वागत करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ संत बहिणाबाई ❃*       बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या. एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला, "मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले.*तात्पर्य :- शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जून 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/qqqc9SB1TzYuYV87/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००१:ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम.पी.बिर्ला पुरस्कार जाहीर**२००१:पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ’नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर**१९९५:दक्षिण कोरियातील सेऊल येथे ’सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर’ची इमारत कोसळून ५०२ जण ठार तर ९३७ जखमी झाले.**१९७६:सेशेल्सला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८७१:ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्‍यांना व अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:पूनम संजीव सिंगल- सुलाने -- कवयित्री* *१९८३:श्रीकांत धोटे -- कवी तथा संशोधक अधिकारी* *१९८०:सुनील पुंडलिकराव अढाऊकर -- कवी,लेखक,संपादक**१९८०:भूपेश सुभाषराव नेतनराव -- कवी तथा कार्यकारी अभियंता* *१९७५:उपासना सिंग-- भारतीय अभिनेत्री आणि स्टँड-अप कॉमेडियन**१९७५:अभिजित पोहनकर -- भारतीय शास्त्रीय वादक**१९७१:संजीव त्यागी-- भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेता**१९६३:धर्मपाल कांबळे-- मराठी साहित्यिक आणि संशोधक(मृत्यू:९ डिसेंबर, २०१७)**१९५७:अतुलकुमार उपाध्ये-- प्रख्यात व्हायोलिनवादक**१९५३:अरुण गांगल-- प्रसिद्ध लेखक,कवी, संगीतकार,गायक* *१९५२:राम महाजन -- कवी,सामाजिक कार्यकर्ते* *१९४७:डॉ.सुभदा सुरेश खटावकर -- लेखिका, कवयित्री,अनुवादक* *१९४५:चंद्रिका कुमारतुंगा – श्रीलंकेच्या ५ व्या राष्ट्राध्यक्षा**१९४४:जीवनकला दत्तोबा कांबळे -- अभिनेत्री**१९४०:डॉ.प्रमोद कोलवाडकर-- प्रसिद्ध कथालेखक**१९३६:शैल चतुर्वेदी--हिंदी भाषेतील कवी, विडंबनकार,विनोदकार,गीतकारअभिनेता व राजकीय व्यंगचित्रकार (मृत्यू:२९ ऑक्टोबर२००७)**१९३४:कमलाकर सारंग – रंगकर्मी,निर्माते, दिग्दर्शक व लेखक (मृत्यू:२५ सप्टेंबर १९९८)**१९३२:डॉ शंकर किसन महाराज चतुरकर -- संत वाड्:मयाचे अभ्यासक**१९१८:रामचंद्र केशव लेले-- लेखक,पत्रकार ग्रंथालय व्यवस्थापक* *१९०८:प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (मृत्यू:१९ जुलै १९६८)**१८९३:प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक,’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (मृत्यू:२८ जून १९७२)**१८९१:डॉ.परशुराम लक्ष्मण वैद्य – प्राच्यविद्या संशोधक (मृत्यू:२५ फेब्रुवारी १९७८)**१८७१:श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार,वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक (मृत्यू:१ जून १९३४)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:वीणा सहस्त्रबुद्धे -- कानपूर येथील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रमुख भारतीय गायिका आणि संगीतकार(जन्म:१४ सप्टेंबर १९४८)**२०११:अन्वर फर्रुखाबादी-- गझल,गाणी , कविता आणि कव्वालीचे गीतकार(जन्म:१९ जुलै १९२८)**२०१०:प्रा शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म:१५ जुलै १९२७)**२००३:कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म:१२ मे १९०७)**२०००:कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार (जन्म:१८ फेब्रुवारी १९११)**१९९३:विष्णुपंत जोग – ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते* *१९९२:शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते* *१९९२:डॉ.वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे-- प्रसिद्ध लेखक,कवी,समीक्षक आणि भाषाभ्यासक (जन्म:१९ डिसेंबर १९२५)**१९८१:दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी –साहित्यिक(जन्म:२७ नोव्हेंबर १९१५)**१९६६:दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित,गणितज्ञ,विचारवंत व इतिहासकार (जन्म:३१ जुलै १९०७)**१८९५:थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक (जन्म:४ मे १८२५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बदललेल्या सरकारी शाळा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, 47 लाख शेतकऱ्यांची वीज बिले माफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिंगोलीत उभारले जाणार रेल्वेचे कार्गो टर्मिनल:70 कोटींचा खर्च अपेक्षित, शेतीमालाच्या वाहतुकीमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दुधाला 5 रुपये अनुदान देऊन प्रश्न सुटणार नाही:10 रुपये कायमस्वरुपी अनुदान द्या, किसान सभेच्या अजित नवलेंची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंदार माेरोणे, अनंत मुळे यांना पत्रकार देवर्षी नारद पुरस्कार:शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 11 हजार रुपये रोख पुरस्कारांचे स्वरूप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आषाढी वारीला सुरुवात झाली असून, देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ची भारत व द. आफ्रिका यांच्यातील फायनल आज बार्बाडोस येथे होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌫 *हिमालयाचा जन्म केव्हा झाला ?* 🌫 **************************'उत्तरम् यत्समुद्रस्य । हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यंत्र संतत.' भारतवर्षांची - आपल्या देशाची अशी ओळख सांगितली आहे. म्हणजे सागराच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असणारा देश. यावरून आपला देश अस्तित्वात आला तेव्हापासून उत्तरेला हिमालयाचा कोट आपलं संरक्षण करत आला आहे अशी आपली समजूत होईल. पण ती बरोबर नाही. कारण हिमालयाचा जन्म आपली भूमी अस्तित्वात आल्यानंतर कितीतरी शतकांनी झाला आहे. किंबहुना धरतीतलावरच्या एकूण उत्तुंग पर्वतांपैकी हिमालय हा सर्वात कमी वयाचा पर्वत आहे. फार फार पूर्वीचं म्हणजे साधारण पृथ्वीचा धगधगता गोळा थंड झाल्यावरचं पृथ्वीचं भौगोलिक रूप फार वेगळं होतं. तिच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ सारा भाग पाण्यानं व्यापलेला होता. जी काही कमी होती ती आग्नेय कोपऱ्यात म्हणजे आज जिथं साधारणपणे ऑस्ट्रेलिया आहे तिथं एकच एक मुटकुळं करून चुपचाप पडून राहिली होती. तिचं नाव होतं पॅनगाईया. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे समस्त भूमी. त्यानंतरचा कितीतरी काळ अशीच परिस्थिती राहिली. साधारण साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी या भूमीच्या गाठोड्याला जात आली. तिच्यात हालचाल सुरू झाली आणि तिचे दोन प्रचंड तुकडे झाले. पुढच्या अडीच कोटी वर्षांमध्ये हे तुकडे एकमेकांपासून पूर्णपणे अलग झाले. उत्तरेचा लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवनालँड. लाॅॆशियाचं वायव्य दिशेनं भ्रमण सुरू झालं. आजची उत्तर अमेरिका आणि युरोप खंडं त्यात समाविष्ट होते. गोंडवनालँडमध्ये आजची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका वगैरेंचा समावेश होतो. हे दोन्ही भूखंड एकमेकांपासून अलग होत पुढची साडेतेरा कोटी वर्षे दूर दूर जात राहिले. पृथ्वीच्या गाभ्यात तप्त शिलारस असून त्यावरच्या घन कवचाचे हे तुकडे तरंगत असतात. त्यांचं भटकणं अविरत चालूच असतं. यालाच आता वैज्ञानिक भाषेत प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणतात. या भूखंडांच्या भटकण्यातून या दोन प्रचंड भूखंडांचेही तुकडे झाले. त्यातूनच उत्तर अमेरिका आणि युरोपही एकमेकांपासून वेगळे झाले. गोंडवनालँडचे तर तीन चार तुकडे झाले. एकात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका होते. ते पश्चिमेकडे सरकू लागले. दुसऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका होते. त्याचेही दोन तुकडे होऊन अंटार्क्टिका दक्षिण दिशेनं तर ऑस्ट्रेलिया थोडा अाग्नेयाकडे सरकला. एक दुसरा मोठा तुकडा बाजूला होऊन त्याचं एक बेट झालं. ते टेथिस महासागरात तरंगू लागलं. हेच भारतीय उपखंड. कालांतराने तेही वायव्येकडे सरकत राहिलं. आणि साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यानं जाऊन आशिया खंडाला धडक दिली. त्यावेळी भारतीय उपखंडाच्या सरकण्याचा वेगही एका शतकात ९ मीटर एवढा होता. धडकीनंतर तो निम्म्यावर आला. आणि पाच कोटी वर्षांनंतर तो आताच्या एका वर्षांत २-३ सेंटीमीटर एवढा कमी झाला.जमिनीवरून आपण एखादा कागद सरकवत नेला तर तो सरकत राहतो. पण जेव्हा तो भिंतीला भिडतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. तरीही सरकण्याचा रेटा चालूच राहिला तर त्याला घड्या पडून तो तिथंच उंचावतो. भारतीय खंडाच्या आशिया खंडाला भिडलेल्या सीमारेषेवर तसाच प्रकार घडला आणि त्यातूनच हिमालयाचा जन्म झाला. टप्प्याटप्प्यानं त्याची उंची वाढत राहिली. ती अजूनही वाढतेच आहे. सर्वात उत्तुंग शहर एव्हरेस्टची उंची गेल्या शंभर वर्षांमध्ये ८-९ मीटरनी वाढली आहे. या रेट्यापायी तिबेटच्या पठाराचाही जन्म झाला. तो भूभाग पाच हजार मिटरने उंचावला गेला. तेव्हा हिमालयाचा जन्म हा गेल्या पाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारतवर्ष मात्र त्यापूर्वी कितीतरी कोटी वर्षं अस्तित्वात आलं होतं.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे; ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'कथ्थक'* हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे ?२) काशीचे दुसरे नाव काय आहे ?३) 'जागतिक योग दिवस ' कोणत्या वर्षांपासून राबविण्यात येत आहे ?४) 'आकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ? *उत्तरे :-* १) उत्तरप्रदेश २) वाराणसी ३) २०१४ ४) नभ, गगन ५) २२ डिसेंबर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 चैतन्य दलाल, इंजिनिअर, पुणे👤 सदा वडजे, फोटोग्राफर👤 हौसाजी ढेपाळे, शिक्षक, धर्माबाद👤 सुनील मद्दलवार👤 दलित सोनकांबळे👤 सिद्धार्थ डुमणे👤 अनिल भाकरे👤 वर्षा लोखंडे👤 किशनराव भाऊराव पाटील👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐसी वाणी बोलिए मन का आप खोए, औरन को शीतल करेआपहुं शीतल होए (अर्थ- कबीर दास जी कहते हैं व्यक्ति को हमेशा ऐसी बोली बोलनी चाहिए जो सामने वाले को अच्छा लगे और खुद को भी आनंद की अनुभूति हो।)।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चालता, चालता आपण कधी, कधी थकून जातो. व पुढे चालण्याची इच्छा होत नाही अशा वेळी त्या छोट्याशा प्रामाणिक असलेल्या कासवाची आठवण करावी. व त्याकडून प्रेरणा घ्यावे भलेही तो कासव हळूहळू चालत असेल तरी जेथे नेमलेली जागा होती तेथेच तो, पोहोचून आपल्यात असलेली प्रामाणिकपणा व नम्रता दाखवून खूप काही देऊन गेला. आजच्या चालत्या, बोलत्या माणसाला त्या कासव कडून खूप काही शिकण्यासारखे आहे तसेच प्रेरणा घेण्यासारखे आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ म्हातारा आणि त्याचा घोडा*                *एक म्हातारा व त्याचा मुलगा* आपला घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक माणूस त्या म्हातार्‍याला म्हणाला, 'हा लहान मुलगा पायी चालला आहे, त्यापेक्षा तू त्याला घोड्यावर बसव.'       ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावर बसविले व आपण लगाम धरून चालू लागला. पुढे दुसरा माणूस त्या मुलाला म्हणाला, 'आळशी पोरा, तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला घोड्यावर बसून जायची लाज वाटत नाही का?'       ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला खाली उतरवले व आपण घोड्यावर बसून निघाला. थोडे पुढे जाताच दोन स्त्रिया त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, 'म्हातारा पहा, लहान मूल पायी चाललं असता आपण घोड्यावर बसून कसा चालला आहे?'           ते ऐकताच त्याने मुलाला आपल्या मागे घोड्यावर बसवून घेतले. ते आणखी थोडे पुढे जाताच तोच एक माणूस त्यांना विचारतो, 'हा घोडा तुमचाच का?' म्हातारा म्हणाला, 'हो.' माणूस म्हणाला, 'मला काही खरं वाटत नाही, कारण हा जर तुमचा असता तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते. दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात, त्यापेक्षा तुम्हीच त्याला उचलून का घेत नाही?'           ते ऐकताच दोघेही घोड्यावरून खाली उतरले व त्या घोड्याला आडवे करून त्यांनी त्याचे पाय बांधले. मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले.            ते पाहून रस्त्यातील सगळे लोक टाळया पिटून मोठमोठ्याने हसू लागले. तो आवाज ऐकून घोडा बिचकला व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले. दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात तो पडला व बुडून मरण पावला.                          *तात्पर्य**प्रत्येकजन वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात त्या ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणे व प्रत्येकाला खूष करणे हे काम फार कठीण आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जून 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/arsE32NVfrfnZKjc/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.**१९९४:विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.**१९७२:दुसर्‍या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ**१८४६:अ‍ॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.**१८३८:इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९५:अस्मिता प्रदीप यंडे-- स्तंभलेखिका**१९७९:प्रा.डॉ.नवनाथ अंगद शिंदे -- लोकसाहित्य,आदिवासी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक,लेखक* *१९७६:जसपाल राणा-- भारतीय नेमबाज**१९७३:विशाल ददलानी-- गायक,गीतकार, अभिनेता आणि संगीतकार**१९७२:मंगेश देेेेसाई-- मराठी चित्रपट कलाकार* *१९७०:डॉ.माधव शोभणे -- कवी,लेखक* *१९७०:मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९६३:वासवदत्ता अग्निहोत्री -- कवयित्री* *१९६२:डॉ.चंद्रकांत वि.जोशी -- कवी,कथाकार,कादंबरीकार,समीक्षक* *१९५६:अंतोन चांगदेव त्रिभुवन -- लेखक**१९५५:डॉ.गिरीश दाबके -- सुप्रसिद्ध जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९५३:प्रकाश रंगनाथ महामुनी -- कवी,लेखक* *१९५१:डॉ.एस.एम.कानडजे-- प्रसिद्ध समीक्षक* *१९४९:राजीव वर्मा-- भारतीय अभिनेता**१९४४:भगवानदास मूळचंद लुथरिया उर्फ ​​सुधीर-- हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता(मृत्यू:१२ मे २०१४)**१९४०:बालाजी तांबे-- आयुर्वेद,योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ(मृत्यू:१०ऑगस्ट२०२१)**१९४०:मुहम्मद युनूस-- बांगलादेशी सामाजिक उद्योजक,बँकर,अर्थशास्त्रज्ञ आणि नागरी समाजाचे नेते* *१९३७:डॉ.गंगाधर पानतावणे – प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक(मृत्यू:२७ मार्च, २०१८)**१९३४:रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (मृत्यू:१८ जुलै २००१)**१९२८:बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक,महाराष्ट्राचे कलासंचालक (मृत्यू:२३ नोव्हेंबर २०००)**१९२२:भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार,कवी (मृत्यू:२८ जून १९९०)**१९२१:नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान,(मृत्यू:२३ डिसेंबर २००४)**१७१२:रुसो – फ्रेन्च विचारवंत,लेखक व संगीतकार (मृत्यू:२ जुलै १७७८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:चंद्रकांत कामत -- बनारस तबला घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय तबला वादक(जन्म:२६ नोव्हेंबर १९३३)* *२०००:विष्णू महेश्वर ऊर्फ’व्ही.एम’तथा दादासाहेब जोग –उद्योजक(जन्म:६ एप्रिल १९२७)**१९९९:रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार(जन्म:१३ फेब्रुवारी १९१३)**१९९०:भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार, कवी(जन्म:२८ जून १९२२)* *१९८७:पं.गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म:३० जानेवारी १९११)**१९७२:प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक,’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म:२९ जून १८९३)**१८३६:जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१६ मार्च १७५१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वैचारिक लेख*" पालक नव्हे, मित्र बना ! "*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'इस्रो'चे पाऊल पडते पुढे..! नासाच्या पाठोपाठ आता इस्रो अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात पुढील काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वबळावर निवडणुक लढवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिंगोलीत अभूतपूर्व उत्साहात संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण:भाविकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *खासदार बनलेल्या महाराष्ट्रातील 8 आमदारांचे राजीनामे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात नावं वाचून दाखवली !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अहमदनगर आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, ACB च्या कारवाईनंतर आयुक्त पंकज जावळे फरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अरुंधती रॉय यांना ब्रिटनचा 'पेन पिंटर' पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 वर्ल्ड कप मध्ये द. आफ्रिका व भारताचा फायनल मध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 तारुण्य पीटिका (पुळ्या) का येतात ? 📙'तारूण्य पिटीका' या नावावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांचा तारुण्याशी संबंध आहे. १४-१५ वर्षांच्या मुला मुलींना तारुण्यपीटिका येतात. काही जणांना त्या कायम होतच राहतात. तारुण्यपीटिका म्हणजेच त्वचेवर येणारे फोड. ते चेहऱ्यावर वा शरीरावर इतरत्र कुठेही येऊ शकतात. त्वचेत काही तैलग्रंथी असतात. त्यातील स्त्रावामुळे त्वचा स्निग्ध राहते. त्यांची रंध्रे बंद झाल्यास त्यातील स्त्राव गोळा होतो व फोड येतात. नंतर जंतुसंसर्गही होतो. या फोडांना तारुण्यपीटिका असे म्हणतात.तारूण्य पिटीका येण्याची अनेक कारणे आहेत. पौगंडावस्थेमध्ये शरीरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) प्रमाणात होणारे बदल, त्वचेची नीट निगा न राखणे, दीर्घ मुदतीचे आजार, कुपोषण, आहारात मेदयुक्त पदार्थांचा जास्त समावेश, बद्धकोष्ठ, तसेच मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे तारूण्य पिटीका होतात. साहजिकच तारुण्यपीटिका उपचारासाठी वरील कारणांवर आधारित अनंत उपाय उपलब्ध आहेत. पण एक लक्षात ठेवायला हवे ते म्हणजे शारीरिक अनारोग्याचे व एक वरवरचे लक्षण म्हणजे तारूण्य पिटीका. निरोगी, सुदृढ, मानसिक व शारीरिक दृष्ट्या व्यक्तीला त्याचा त्रास होत नाही. चिंता करण्याने तारुण्यपीटिका अधिकच वाढतात. शारीरिक स्वच्छता, समतोल आहार, जेवणाच्या वेळा, विश्रांती, झोपेच्या वेळा यात नियमितपणा व्यायाम आदी आरोग्यपूर्ण सवयीचा अंगीकार केल्यास या त्रासापासून आपली मुक्तता होऊ शकेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) लोकसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे ?२) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघादरम्यान होणार आहे ?३) CCTV चा full form काय आहे ?४) 'छडा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात ? *उत्तरे :-* १) ओम बिर्ला २) भारत व दक्षिण आफ्रिका ३) Closed Circuit Television ४) शोध, तपास ५) १५०० फूट खोल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मार्तंड भुताळे, सेवानिवृत्त, देगलूर👤 सौ. सरिता गणेशराव यमेवार, धर्माबाद👤 अभिषेक लाडे👤 रामदास कदम, शिक्षक👤 रवी जयंते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु गोविंद दोउ खड़ेकाके लागूं पांय। बलिहारी गुरु आपनोगोविन्द दियो बताय।।(अर्थ - कबीर दास जी कहते हैं कि शिक्षक और भगवान अगर साथ में खड़े हैं तो सबसे पहलो गुरु के चरण छूने चाहिए, क्योंकि ईश्वर तक पहुंचने का रास्ता भी गुरु ही दिखाते हैं।) ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रेमाचे दोन शब्द बोलल्याने मनावर असलेला तणाव दूर होते, आपुलकीने विचारपूस केल्याने स्नेह वाढत जातो, अपमास्पद वागणूक दिल्याने मनात आपोआप दु:ख निर्माण होतात तसेच समोर गोड बोलून मागे कटकारस्थान रचल्याचे उघड झाल्यावर माणसावरचा विश्वास उडून जातो. या प्रकारचे वागणे व बोलण्याची पद्धत असली की, कोणासोबत बोलावे हाच प्रश्न पडत असतो. म्हणून कोणासोबत बोलताना आपल्यात तेवढीच माणुसकी ठेवावी जेणेकरून आपुलकी ही कायम राहील व एकमेकांसोबत संवाद वाढत जाईल आजच्या घडिला या प्रकारची आपुलकी व स्नेह असणे काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *..... विनम्रता ......*राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले.               सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली.*तात्पर्य-विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जून 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7309356719080680/?mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर**१९९१:युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.**१९७७:जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता:५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.**१९५०:अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:डेल विलेम स्टेन-- दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू**१९८३:मिलिंद रमाकांत महंगडे -- लेखक**१९८०:केविन पीटर पीटरसन-- इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू* *१९७२:प्रा.डॉ.दीपक रामभाऊ चिदृरवार- कवी लेखक* *१९७१:डॉ.विजयालक्ष्मी रवि वानखेडे -- कवयित्री,कथाकार,कादंबरीकार* *१९६९:अनुपमा रामेश्वर जाधव -- कवयित्री, लेखिका* *१९६८:डॉ.रमाकांत विठ्ठलराव कराड-- लेखक**१९६८:सुजाता मोहपात्रा-- भारतीय ओडिसी नृत्यांगना* *१९६७:राजेश बापूराव चौरपगार (बापुसुमन) -- कवी* *१९६४:अभय भंडारी --लेखक,वक्ते* *१९६३:डॉ.विजयकुमार पंढरीनाथ फड-- संत साहित्याचे अभ्यासक,लेखक तथा सनदी अधिकारी* *१९५५:देविदास बाबुराव महाजन -- व्यसन मुक्ती क्षेत्रातील काम तथा लेखक**१९५५:प्रमोद हरी महाजन -- लेखक* *१९५३:रवींद्र पांढरे -- प्रसिद्ध कवी,कादंबरीकार कथाकार**१९५०:नितीन मुकेश माथूर-- भारतीय पार्श्वगायक* *१९४९:प्रदीप काटेकर -- योग अभ्यासक तथा कवी,लेखक* *१९४७:वसुंधरा पेंडसे नाईक-- मराठी लेखिका आणि पत्रकार(मृत्यू:१५ जुलै २०१६)**१९३९:राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू:४ जानेवारी १९९४)**१९३७:आशा राणे-- लेखिका तथा निवृत्त महिला व बालकल्याण अधिकारी**१९३६:शरदचंद्र प्रभाकर गोगटे-- मराठी प्रकाशक आणि लेखक**१९३५:सुहासिनी मुळगावकर--मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडिता(मृत्यू:१३ जून १९८९)**१९३०:श्रीकांत ठाकरे-- संगीतकार उत्तम व्यंगचित्रकार,लेखक,समीक्षक,पत्रकार(मृत्यू:१० डिसेंबर २००३)**१९२८:राम प्रधान-- माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव,लेखक (मृत्यू:३१ जुलै २०२०)* *१९१७:खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू:११ आक्टोबर १९८४)**१८८०:हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या, समाजसेविका,राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू:१ जून १९६८)**१८७५:दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू:१३ मार्च १८९९)**१८६४:शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते,वक्ते,लेखक,स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू:२७ सप्टेंबर १९२९)**१८३८:बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार,कवी,लेखक आणि पत्रकार. (मृत्यू:८ एप्रिल १८९४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:पंडित सुरेश "भाई" गायतोंडे -- भारतीय तबलावादक(जन्म:६ मे १९३२)**२०१४:माधव नारायण आचार्य-- मराठी लेखक (जन्म:१९३०)* *२००८:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म:३ एप्रिल १९१४)**२०००:दत्तात्रेय नरसिंह गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार(जन्म:२० सप्टेंबर १९२२)**१९९८:होमी जे.एच.तल्यारखान – गांधीवादी नेते,सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म:९ फेब्रुवारी १९१७)**१९९६:अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म:५ एप्रिल १९०९)**१८३९:महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म:१३ नोव्हेंबर १७८०)**१७०८:धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म:१६५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फेसबुकवर खूप लोकप्रिय झालेली दीर्घ कथा..... " ललाटरेषा " ........... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड झालेली. आवाजी मतदानानं त्यांची निवड करण्यात आली. यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेबाबत मोठा निर्णय, 120 एकर जागा BMC देण्यास राज्य सरकारची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल गांधी ग्यानबा तुकारामांचा गजर करणार, आषाढी वारीच्या दौऱ्याचे नियोजन, काँग्रेसच्या बड्या नेत्याची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *75 वर्षावरील जेष्ठांना मोफत प्रवास, महिलांना तिकीट दरात 50% सवलत:या दोन लोकप्रिय सवलतीमुळे एसटीला 3,894 कोटींची प्रतिपूर्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : नेत्र तज्ञांची 'व्हिजन पॅनोरमा 2024' परिषद संपन्न:राज्यभरातून 130 नेत्रतज्ज्ञांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अहमदनगर जिल्ह्यातील 33 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित : जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळेंची माहिती; 50 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीसा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत व इंग्लंड आणि द. आफ्रिका व अफगाणिस्तान यांच्यात सेमिफायनलचा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 काही व्यक्तींना उंचीची भीती का वाटते ? 📕भीती वाटणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. अंधाराची, सापाची, वाघाची, आजारपणाची अशा अनेक प्रकारच्या भीतीने लोक ग्रासलेले असतात. काही लोकांना उंचीची भीती वाटते. डोंगरावर गेल्यानंतर काही व्यक्ती घाबरून जातात. आपल्यापैकी कोणीही १०० मजली इमारतीच्या छतावर जाऊन खाली पाहू लागला, तर त्याला नक्कीच भीती वाटेल; पण पाचव्या मजल्यावर गेल्यावर क्वचितच कोणाला भीती वाटेल. उंचीची भीती वाटणारी व्यक्ती नुसते गिर्यारोहणाचे नाव काढताच घामाघूम होते. अशी भीती वाटणाऱ्या व्यक्तींमध्ये उंचावर गेल्यास झोप न येणे, भूक न लागणे, वाईट स्वप्न पडणे, हातपाय थरथरणे, खूप घाम येणे ही लक्षणे दिसतात. रक्तदाबही वाढतो. वागण्यात चिडचिडेपणा येतो.एखाद्या वस्तूविषयी अवास्तव भीती बाळगणे, यालाच 'फोबिया' असे म्हणतात. तणावग्रस्त मानसिकता असण्याचे हे उदाहरण होय. हा एक प्रकारचा सौम्य असा मनोविकारच आहे. मनाचा निग्रह करून ही भीती काढण्याचा प्रयत्न केल्यास ती कमी होऊ शकते. मनोविकार तज्ज्ञाचा सल्ला घेणे अशा वेळी श्रेयस्कर ठरते, अन्यथा हा मानसिक रोग गंभीर रूप धारण करू शकतो.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक नाते प्रामाणिकपणे जपणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमरनाथ येथील पवित्र गुफेत कोणत्या लिंगाची पूजा केली जाते ?२) *सामाजिक न्याय दिवस* केव्हा साजरा केला जातो ?३) देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी कोणती ?४) 'छंद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगातील कोणत्या देशातील महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे ? *उत्तरे :-* १) शिवलिंग २) २६ जून ३) TCS ४) नाद, आवड ५) भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुशील कापसे, शिक्षक, नांदेड👤 शंकर देशमुख👤 पोषट्टी चिपेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साईं इतना दीजिए, जा मे कुटुम समाय। मैं भी भूखा न रहूं, साधु ना भूखा जाय।।(अर्थ- कबीर दस जी कहते हैं कि परमात्मा तुम मुझे इतना दो कि जिसमें मेरा गुजरा चल जाए, मैं खुद भी अपना पेट पाल सकूं और आने वाले मेहमानों को भी भोजन करा सकूं।) ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हसू येत असेल तर खळखळून हसावे, रडू येत असेल तर थोडं रडूनही घ्यावे. पण, मनात एखादी गोष्ट दडून असेल आणि त्याच गोष्टीपासून वारंवार त्रास होत असेल तर मात्र त्यापासून दूर होण्यासाठी व्यक्त होणे आवश्यक आहे. कारण योग्य वेळी व्यक्त न झाल्याने काहीही घडू शकते. म्हणून योग्य त्या व्यक्तीची निवड करुन त्यासमोर आपल्या मनात काय चालू आहे या विषयावर बिनधास्तपणे बोलून दाखवावे.जेणेकरून त्या व्यक्तीच्या योग्य मार्गदर्शनातून पुन्हा एकदा जगण्यासाठी आधार होईल🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *.... एकीचे बळ ....*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जून 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_25.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_सामाजिक न्याय दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••• *_जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००:पी.बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.**१९९९:पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.**१९९९:महाराष्ट्रातील नवीन तालुक्याची निर्मिती- बोदवड व धरणगाव(जळगाव), दोडामार्ग (सिंधुदुर्ग),तळा (रायगड),त्रिंबकेश्वर व देवळा (नाशिक),फुलंब्री (संभाजीनगर), सोनपेठ व मानवत (परभणी),मुदखेड,माहूर, उमरी,हिमायतनगर,व धर्माबाद(नांदेड),लोहारा, वाशी (धाराशिव),राहाता(अहमदनगर),पलूस (सांगली),अंबरनाथ,(ठाणे) विक्रमगड (पालघर),देवणी,शिरूर-अनंतपाळ व जळकोट (लातूर),लाखनी (भंडारा),पोंभुर्णा व बल्लारपूर(चंद्रपूर)* *१९७४:नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ**१९७४:ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.**१९६८:पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्‍घाटन झाले.**१९६०:मादागास्करला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०:सोमालियाला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१७२३:रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:सुजित शिवाजी कदम -- कवी* *१९८७:प्रणव सखदेव-- मराठी लेखक,कवी, युवासाहित्यिक अनुवादक* *१९८५:अर्जुन कपूर-- भारतीय सिने-अभिनेता**१९७८:डॉ.रावसाहेब मुरलीधर काळे-- वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्‍त्रीय अभ्‍यासक* *१९७६:वर्षा पतके-थोटे-- लेखिका,कवयित्री* *१९७६:डॉ सतीश नारायण कामत-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९६९:धर्मेंद्र प्रधान-- केंद्रीय मंत्री**१९६८:संजय विठ्ठल कळमकर-- विनोदी लेखक,वक्ते आणि कथा कथनकार* *१९६७:मुनी तरुण सागर-- दिगंबर जैन पंथाचे मुनी होते.त्यांची प्रवचने ही कडवे प्रवचन म्हणून प्रसिद्ध(मृत्यू:१ सप्टेंबर २०१८)**१९६५:राजेंद्र बलभीम भोसले-- कवी, कादंबरीकार,कथाकार,समीक्षक,लेखक* *१९५२:अरुणा भट-- मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री (मृत्यू:२७ जानेवारी २०१६)**१९५१:गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९४८:चंद्रशेखर गाडगीळ-- मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय पार्श्वगायक (मृत्यू:२ ऑक्टोबर, २०१५)**१९४२:प्रा.डॉ.मदन पांडुरंग कुलकर्णी- ज्येष्ठ सुप्रसिद्ध लेखक,समीक्षक,पूर्वअध्यक्ष विदर्भ संशोधन मंडळ,नागपूर**१९४१:शरद पिदडी-- कवी**१९३४:इंद्रायणी प्रभाकर सावकार --मराठी लेखिका**१९२५:शांता मधुकर रानडे-- लेखिका, अनुवादक (मृत्यू:५ डिसेंबर २०१८)* *१९२२:शंकर पांडुरंग रामाणी -- प्रसिद्ध गोमंतकीय मराठी कवी.(मृत्यू:२८ नोव्हेंबर २००३)**१९१४:शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान (मृत्यू:६ ऑगस्ट १९९१)**१९०५:कमलाबाई विष्णू टिळक-- कथाकार(मृत्यु:१० जून १९८९)**१८९२:पर्ल एस.बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (मृत्यू:६ मार्च १९७३)**१८८८:नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' – गायक व अभिनेते (मृत्यू:१५ जुलै १९६७)**_१८७४:छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते,कला,नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू:६ मे १९२२)_**१८७३:अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (मृत्यू:१७ जानेवारी १९३०)**१८२४:लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (मृत्यू:१७ डिसेंबर १९०७)**१७३०:चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू:१२ एप्रिल १८१७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००५:एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (जन्म:१८ मार्च १९४८)**२००४:यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (जन्म:६ सप्टेंबर १९२९)**२००१:वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व.पु.काळे – प्रसिद्ध लेखक व कथा कथनकार (जन्म:२५ मार्च १९३२)**२९९८:चमन पुरी-- हिंदी आणि पंजाबी चित्रपटांचा भारतीय अभिनेते (जन्म:२ऑक्टोबर१९१४)**१९४३:कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (जन्म:१४ जून १८६८)*   *_सामाजिक न्याय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराजांचे महाराज - राजर्षी शाहू महाराज*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर FIR दाखल करु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बँकांना इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज होणार मतदान, मुंबई आणि नाशिक शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात चुरस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; तिन्ही पक्ष 96-96-96 जागांवर लढण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, महाराष्ट्रतील बहुसंख्य खासदारांची मराठीत शपथ, तर खा. निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजस्थान, गुजरातसह उत्तर भारतातील पाच राज्ये पेपर फुटीमध्ये आघाडीवर, लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही 'लाडकी बहीण योजना'? महिलांना महिन्याला मिळणार 1500 रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर, अफगाणिस्तानचा बांगलादेशवर थरारक विजय, सेमी फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर, द. आफ्रिकेसोबत होणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 आपण बोलतो कसे ? 📙 लहानपणापासून आपण बोलत असतो, बोललेले ऐकता असतो. हे इतके सवयीचे झालेले असते, की आपण काही विशेष वेगळी क्रिया करत आहोत हे जाणवतही नाही. पण ज्या वेळेस आवाज बसतो त्यावेळेस बोलण्याची क्रिया कशी होत असेल, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल.आवाजाच्या निर्मितीत पोटाचे स्नायू, छाती व पोट यांच्यामधील पडदा, फुफ्फुस, स्वरयंत्र, घसा, नाक, तोंड या अवयवांचा सहभाग असतो. यातही स्वरयंत्राचे काम महत्त्वाचे असते. उत्क्रांतीमध्ये स्वरयंत्राचा विकास होऊन बोलणे हे कार्य मानवात स्वरयंत्र करू लागले. बोलण्याच्या क्रियेत सर्वप्रथम मेंदूतील वाचा केंद्रातून आज्ञा येते. त्यानुसार स्वरयंत्रातील स्वरतंतुची हालचाल होऊन आपण बोलावयास लागतो. फुफ्फुसातील हवेचा वापर यासाठी केला जातो. तसेच वर सांगितल्या प्रमाणे घसा, टाळू, दात, ओठ, नाक, जिभेच्या सहाय्याने वेगवेगळ्या शब्दांची निर्मिती केली जाते.जसे कंठ्य शब्द क,ख, ग, इ; तालव्य शब्द ट, ठ, ड; दंत्त्य शब्द त, थ, द; ओष्ठ्य शब्द प, फ आणि अनुनासिक शब्द ञ वैगरे. अशा प्रकारे आपण बोलतो. वरील पैकी कशात बिघाड झाला म्हणजे वाचा केंद्र आज्ञावहन करणारे चेतातंतू स्वरयंत्रातील स्वरतंतू आणि घसा, जीभ वगैरे अवयव यात बिघाड झाल्यास वा या ठिकाणी व्याधी झाल्यास बोलण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन आवाज पूर्णपणे बंद होणे, अडखळत बोलणे अशी लक्षणे निर्माण होतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोष लपवला की तो मोठा होतोआणि कबूल केला की नाहीसा होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'कौन बनेगा करोडपती'* या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलचा अँकर कोण आहे ?२) जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते ठरले आहे ?३) १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?४) 'Why Bharat Matters' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?५) कोणाच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली ?*उत्तरे :-* १) सुपरस्टार अमिताभ बच्चन २) अबुधाबी शहर ३) डॉ. जब्बार पटेल ४) एस. जयशंकर ५) येशू ख्रिस्त *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रमेश इटलोड, विषय शिक्षक, धर्माबाद👤 नवीन कॅरमकोंडा, नांदेड👤 राजेश उमरेकर, नांदेड👤 गणेश आरटवार, फोटोग्राफर, धर्माबाद👤 संतोष रेड्डी बोमीनवाड👤 नारायण ईबीतवार, जारीकोट👤 अनिल पाटील भुसारे👤 कैलास स्वामी👤 मनीष अग्रवाल👤 सुरेश यादव👤 बालाजी सावंत पाटील👤 कृष्णा भोरे👤 पुरुषोत्तम रेड्डी चाकरोड👤 अंकुश कामगोंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चिंता ऐसी डाकिनीकाट कलेजा खाए। वैद बिचारा क्या करेकहां तक दवा लगाए।।(अर्थ- कबीर दास जी कहते हैं कि चिंता एक ऐसी डायन है जो व्यक्ति का कलेजा काट कर खा जाती है। इसका इलाज वैद्य नहीं कर सकता। वह कितनी दवा लगाएगा। अर्थात चिंता जैसी खतरनाक बीमारी का कोई इलाज नहीं है।)।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इकडे आड, तिकडे विहीर त्याच व्यक्तीच्या जीवनात येते. जी व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक असते तसेच आपला स्वार्थ साधण्यासाठी कधीही धडपड करत नाही किंवा त्या नादी लागत नाही. म्हणून समोरच्या दुसऱ्या व्यक्तीला वाईट होऊन जाते व त्याच्या दृष्टीतून कायमची उतरून जाते. असं अनेकदा बघायला मिळते. म्हणून जीवनात कितीही संकटे किंवा , वाईट प्रसंग आले तरी चालेल पण, कोणाच्या समाधानासाठी चुकीचा मार्ग निवडू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*.... सत्कर्माचे फळ ....*एका वनात एक पारधी राहत होता. त्‍याने खूप वन्‍य प्राण्‍यांची हत्‍या केली होती. त्‍यामुळे तो खूप पापी झाला होता. त्‍याची चाहूल लागली तरी वन्‍यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत. एकेदिवशी तो आपल्‍या शिकारीच्‍या शोधात असताना एका बेलपत्राच्‍या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्‍याच्‍या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्‍या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्‍याचा उद्योग चालू होता. झाडाच्‍या बुंध्‍याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्‍याला माहित नव्‍हते. त्‍या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्‍या पिंडीवर बेलाच्‍या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्‍न झाले व ते पारध्‍याच्‍या समोर प्रकट झाले. त्‍यांना समोर पाहून पारधी आश्‍चर्यचकित झाला व म्‍हणाला,''महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्‍यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्‍याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्‍न झालात?" यावर महादेव म्‍हणाले,''तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस. पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्‍याचे चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्‍कार्य केलेस तर किती फळ मिळेल? पारध्‍याला आपली चूक समजली व त्‍याने आयुष्‍यभर कष्‍ट करून जीवन जगला.तात्पर्य :- एका सत्‍कृत्‍यामुळेदेखील आपले आयुष्‍य बदलून जाऊ शकते•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जून 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - पावसाशी गप्पा https://www.facebook.com/share/p/GTR3ARtFMno3B4cS/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.हा सन्मान मिळवणारे ते पहिले हिन्दी अभिनेता ठरले.**१९९१:सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली**१९८३:विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.**१९७५:राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.**१९७५:मोझांबिकला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९३४:महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले.त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.**१९१८:कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:सई ताम्हनकर – मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री**१९८४:प्रा.दैवत दिनकर सावंत -- लेखक**१९८१:हरिष नवनाथ हातवटे -- कवी* *१९७८:आफताब शिवदासानी-- हिंदी चित्रपट अभिनेता**१९७६:डॉ.पूणम गणेश चव्हाण -- लेखिका* *१९७६:प्रा.डॉ.भास्कर सुभाष पाटील-- लेखक,संपादक* *१९७५पराग बेडेकर--मराठी मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते (मृत्यू:१५ डिसेंबर २०२२)**१९७४:करिश्मा कपूर – हिन्दी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री**१९७१:हिंमतराव रामभाऊ गवई -- लेखक* *१९७१:वीणा आशुतोष राराविकर -- ललित लेखिका* *१९६७:किशोरी अंबिये -- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९६२:श्रीराम पचिंद्रे--ज्येष्ठ कवी,लेखक, संपादक**१९६०:महादेवराव सु.बगाडे -- कवी,लेखक* *१९५९:सतीश दत्तात्रेय मंडलेकर -- कथा, सामाजिक,व कौटुंबिक कांदबरी लेखक* *१९५७:रघुवीर यादव -- अभिनेता* *१९५२:डॉ.सदानंद श्रीधर मोरे (देहूकर)-- प्रसिद्ध लेखक,कवी,नाटककार,समीक्षक, इतिहास संशोधक,प्रवचनकार**१९५१:श्रीरंग माधवराव थोरात-- कवी**१९५१:सतीश शाह-- भारतीय अभिनेते**१९४९:प्रा.डॉ सरिता जांभुळे-- कवयित्री, लेखिका* *१९४३:प्रा.मोरइसहाक सुलेमान शेख-- लेखक**१९४१:रत्नाकर सिताराम बोरसे-- लेखक* *१९३५:रामचंद्र बाळकृष्ण कोलारकर-- संशोधक,संपादक,अनुवादक, कथासमीक्षक,कथासंकलक**१९३४:वीरू देवगण--भारतीय स्टंट आणि अॅक्शन कोरियोग्राफर आणि बॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक(मृत्यू:२७ मे२०१९)* *१९३१:विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे माजी पंतप्रधान,केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे (मृत्यू:२७ नोव्हेंबर २००८)**१९२४:मदनमोहन – प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू:१४ जुलै १९७५)**१९१९:अमरेंद्र गाडगीळ-- लेखक, दैवतकोशकार आणि बालसाहित्यकार(मृत्यू ३ जानेवारी १९९४)* *१९१४:श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे-- दत्तसंप्रदायाचे अध्वर्यू,ज्ञानेश्वरीचे भाष्यकार आणि मराठी लेखक(मृत्यू:२१ मार्च १९९०)**१९०५:सुगंधा शेंडे --समाजसेवी लेखिका (मृत्यू:२ डिसेंबर २००४)**१९०५:यादव मुकुंद पाठक-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी 'शशीमोहन',संपादक (मृत्यू:२२ मार्च १९९१)* *१९०३:एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (मृत्यू:२१ जानेवारी १९५०)**१९००:लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल(मृत्यू:२७ ऑगस्ट १९७९)**१८९९:ना.भा.नायक-- लेखक,इतिहास संशोधक* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:मोहन रानडे-- ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक, पद्मश्री गोवा मुक्ती मोर्चाचे सेनानी (जन्म:२५ डिसेंबर १९३०)**२०१२:डॉ.मुकुंद श्रीनिवास कानडे-- लेखक, समीक्षक,कोशकार व संत साहित्याचे अभ्यासक(जन्म:३ डिसेंबर १९३१)**२००९:बेला मुखर्जी -- गायिका,निर्माती (जन्म:२९ मे १९२२)**२००९:मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक,गीतलेखक,संगीतकार,निर्माता, अभिनेता (जन्म:२९ ऑगस्ट १९५८)**२००६:डॉ.विष्णू गणेश भिडे--- भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ (जन्म:१९२५)**२०००:रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या* *१९७९:अण्णासाहेब मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष* *१९२२:सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी (जन्म: १८८२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पावसाशी मारलेल्या गप्पा*पाऊस, छत्री आणि रेनकोट यांचा अनोखा संबंध आहे. पाऊस आल्याने आनंद ही होतो आणि दुःख ही ............. ललित लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नीट परिक्षे संदर्भात आणखी दोघे जण अटकेत, 5 लाखाची डील*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानपरिषद निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात, उमेदवारी अर्ज 2 जुलै पर्यंत भरता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेंशन योजना पूर्वलक्षी प्रभावाने, साडे आठ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी इंडिया आघाडीच्या खासदारांची एकजूट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयात देखील नाही दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरोगसीद्वारे मातानाही 180 दिवसाची मातृत्व रजा नियमात केली दुरुस्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावाने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌗 *दिवस व रात्र केव्हा सामान होतात ?* 🌗 *********************हा प्रश्न सिंगापुरात कधीच विचारला जाणार नाही. विषववृत्तापासून अतिशय जवळ असल्यामुळे तिथे वर्षभर दिवस व रात्र समान असतात. उत्तर आणि दक्षिण, दोन्ही ध्रुवांजवळ हा प्रश्न विचारला जाणार नाही. कारण तिथं एक तर चोवीस तास रात्र तरी असते किंवा चोवीस तास दिवस. त्यामुळे दिवस आणि रात्र समान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतरत्र मात्र दिवस आणि रात्र यांचे अवधी वर्षभरात सतत बदलत राहतात. कधी दिवस जास्त मोठे होतात तर कधी रात्र. त्यातही उत्तर गोलार्धात जेव्हा दिवस मोठे असतात तेव्हा दक्षिण गोलार्धात रात्री मोठ्या असतात.वास्तविक दिवस आणि रात्र ही एका 'दिवसा'ची कृत्रिम विभागणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच स्वतःभोवतीही गिरकी घेत राहते. त्यामुळे पृथ्वीवरच्या कोणत्याही भागावर दिवसभर सूर्य तळपत नाही राहत नाही. म्हणूनच जोवर सूर्यप्रकाश आहे तोवर दिवस आणि सूर्यप्रकाश मिळणे बंद होऊन अंधाराचं साम्राज्य पसरलं की रात्र अशी विभागणी करण्यात आली आहे.तसंच पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे त्या दोघांमधील अंतर कमी जास्त होत राहतं. कललेल्या अासापायी सूर्याचे किरण पृथ्वीवर सरळ न पडता एका कोनातून पडतात. त्यामुळे गोलाकार पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात सूर्यप्रकाश असण्याच्या वेळात फरक पडला पडत जातो. उत्तरायणाच्या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठे असतात. तर दक्षिण गोलार्धात रात्री. जसजसा सूर्य दक्षिणायनाला प्रारंभ करतो तसतशी ही परिस्थिती उलट होत जाते. या परिस्थिती सतत उलट होण्याच्या प्रक्रियेमुळे दिवस मोठे होत जातात, कमाल पातळी गाठतात, परत लहान होत जातात, किमान पातळी गाठतात. रात्रीचीही हीच परिस्थिती असते. या उलटापालटीत दोन दिवस असे येतात की त्या दिवशी रात्र आणि दिवस यांचा कालावधी सारखाच म्हणजे बारा बारा तासांचा असतो. याला संपात म्हणतात. वसंत ऋतूची सुरुवात करणारा वसंत संपात तर शरद ऋतूची सुरुवात करणारा शरद संपात. हे दोन दिवस २१ मार्च व २३ सप्टेंबर या तारखांना येतात. म्हणजेच या दोन तारखांना दिवस व रात्र समसमान व्हायला हवेत. प्रत्यक्षात मात्र ते या दिवसांच्या आसपास होतात. याचं कारण म्हणजे सूर्य हा काही बिंदुवत नाही. त्याला निश्चित आकारमान आहे. आणि सूर्याची वरची कडा क्षितिजावर आली की दिवस सुरू होतो तर ती क्षितिजाखाली गेली की रात्र. यामुळेच दिवस व रात्र समान होण्याच्या तारखा २१ मार्च व २३ सप्टेंबरच्या आसपास येतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी माणसाच्या ओठावर नेहमी दोन गोष्टी असतात, मौन आणि हास्य*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेसाठी कोणती संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे ?२) भारतात किती ठिकाणी नोटांची छपाई केली जाते ?३) जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल कोण आहेत ?४) 'चौफेर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या माणसाला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) एक पेड मेरी माँ के नाम २) चार - महाराष्ट्रात नाशिक, मध्यप्रदेशात देवास, कर्नाटकात म्हैसूर, पश्चिम बंगालमध्ये सालबोनी ३) मनोज सिन्हा ४) चहूकडे, सर्वत्र, भोवताली ५) ड्रग लॉर्ड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 ओम पालकृतवार, धर्माबाद👤 सुरेश गणपतराव कात्रे, धर्माबाद👤 योगेश गणपतराव कात्रे, धर्माबाद👤 सदाशिव जाधव, लातूर👤 संदेश कोटगिरे, धर्माबाद👤 रुपेश पांचाळ👤 नागेश पाटील👤 राजेश अलगुंडे👤 प्रल्हाद कापावार👤 श्रेयस इंगळे पाटील👤 अशोक तनमुदले, येवती👤 दीपक जायेवाड👤 सौरभ लाखे👤 नंदयप्पा स्वामी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धीरे-धीरे रे मनाधीरे सब कुछ होय। माली सींचे सौ घड़ाऋतु आए फल होय॥ (अर्थ- कबीर दास जी कहते हैं कि धैर्य रखें धीरे-धीरे सब काम पूरे हो जाते हैं, क्योंकि अगर कोई माली किसी पेड़ को सौ घड़े पानी से सींचने लगे तब भी फल तो ऋतु आने पर ही लगेगा।)।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांना त्रास देणारे शेवटपर्यंत टिकून राहत नाही आणि त्रास सहन करुन जगणारे भलेही पुढे जाऊ शकत नसतील तरी दुसऱ्यांना त्रास दिल्याने स्वतःला किती दु:ख होते याचा अनुभव त्रास सहन करणाऱ्यालाच जास्त असतो.म्हणून ती व्यक्ती त्या विकारापासून कोसोदूर राहते. माणसाचे जीवन दुसऱ्यांना त्रास देऊन जगण्यासाठी नसते तर ज्याच्या जीवनात आलेल्या संकटांना बघून, त्यातून कशाप्रकारे बाहेर काढता येईल यासाठीच असते. म्हणून माणुसकीच्या नात्याने तरी कोणालाही त्रास देऊ नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *꧁ बांबूची गोष्ट ꧂*एका माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला. त्याच्या बागेत त्याने अनेक वेगवेगळी बियाणी लावली होती. जसे आंबा, फणस, आणि बरेच काही. तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोंबालाही पाणी घालत होता.दिवसमागून दिवस जात होते. पण या बांबूच्या कोंबा मध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना इतर काही बियांची तर रोपटीही दिसू लागली होती. पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोंबालाही पाणी घालण्याचा रतीब चालू ठेवला. इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहोरही आला. त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती. पण अजूनही त्या कोंबात काही फराक दिसत नव्हता.तो माणूस आता विचार करू लागला होता की, हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना? त्या ऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता. असे म्हणून तो त्या कोंबाकडे गेला, पहातो तर काय, त्या कोंबाला थोडी नवी पालवी फुटू लागलेली होती. तो माणूस आता पुन्हा त्या कोंबाला पाणी घालू लागला.आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता. पुढच्या एक वर्षात तर त्या कोंबाणे अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले.असेच असते. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो. जेंव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला, तेंव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे त्याची जेंव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेंव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले आणि सर्व व्यापून टाकले.तसेच आपणही, आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत. काळ कितीही निघून गेला, आणि कोणीही आपल्या मागून येवून कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कोंबा प्रमाणे करावा. जेंव्हा आपली क्षमता अजमावण्याची वेळ येते तेंव्हा इतर जन कदाचित मागे पडतील, पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही.ही बांबूची गोष्ट वाचून काय तात्पर्य घ्याल ?इतरांशी आपली तुलना अजिबात करू नका. तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या. कारण प्रत्येकाकडे एकमेवा द्वितीय अशा कला व किमया असतात. कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या असतील.. त्या ओळखा, पारखा, त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या. तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही. बौद्धीक आणि शारीरीक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळविणे होय.*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण**संदर्भ : Marathi Motivation*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जून 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/ByWB28X4m1Fztoqc/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००१:’आय.एन.एस.विराट’ ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणा नंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.**१९९८:अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर**१९८२:कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती करण्यात आली.**१९४०:दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.**१९३९:सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:लिओनेल आंद्रेस मेस्सी-- अर्जेंटिनाचा फुटबॉल खेळाडू* *१९७९:प्रा.डॉ.वृंदा देशपांडे-जोशी-- कवयित्री, लेखिका* *१९७४:संदीप गायकवाड-- कवी,लेखक**१९७१:विरेंद्र वामनराव कडू - लेखक* *१९६९:प्रशांत विजय दांडेकर-- लेखक* *१९६८:संजय मारुती परीट -- लेखक**१९६८:डॉ.स्मिता निखिल दातार -- लेखिका**१९६७:योगीनी राऊळ -- कवयित्री,लेखिका**१९६७:डॉ.विनीत मधुकरराव वानखेडे -- लेखक**१९६५:पांडुरंग शंकरराव आडबलवाड -- कवी* *१९६४:नागनाथ विठ्ठलराव कलवले-- कवी, लेखक* *१९६२:गौतम शांतीलाल अदानी-- भारतीय उद्योजक,अदानी समूहाचे अध्यक्ष**१९६१:डॉ.महेंद्र मारोतराव भवरे-- कवी, समीक्षक,संशोधक**१९५५:बाबू गंजेवार-- लेखक आणि व्यंगचित्रकार**१९५४:मधुकर धर्मापुरीकर-- प्रसिद्ध कथाकार**१९४९:विनय हर्डीकर -- पत्रकार,लेखक,संपादक आणि समीक्षक* *१९४८:सुरेश पुरुषोत्तम पंडित-- प्रसिद्ध लेखक**१९३९:दिगंबर विठ्ठल पाध्ये-- समीक्षक (मृत्यु:१९ ऑगस्ट २०१६)* *१९३७:अनिता देसाई-- प्रख्यात लेखिका, जगातील इंग्रजी साहित्यातील एक प्रसिद्ध नाव* *१९२८:मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य(मृत्यू:१७ जुलै २०१२)**१९०८:गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (मृत्यू:९ आक्टोबर १९८७)**१८९९:नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक-- केंद्राने सर्व श्रेष्ठ नट म्हणून गौरविण्यात आले.(मृत्यू:८ एप्रिल १९७४)**१८९७:पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (मृत्यू:२९ डिसेंबर १९६७)**१८९२:श्रीधर बाळकृष्ण रानडे -- मराठी कवी,रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते (मृत्यू:२१ मार्च १९८४)* *१८६९:दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे (मृत्यू:१८ एप्रिल १८९८)**१८६३:विश्वनाथ काशिनाथ राजवाडे-- प्रसिद्ध भारतीय इतिहासकार,विद्वान,लेखक आणि वक्ते,इतिहासाचार्य राजवाडे या नावाने ते अधिक प्रसिद्ध (मृत्यू:३१ डिसेंबर १९२६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:वसंत विठ्ठल गाडे (गाडेगरुजी)-- लेखक,विनोबा विचार केंद्राचे विचारवंत,संघटक (जन्म:२७ जानेवारी १९२७)* *२०१३:एमिलियो कोलंबो--इटलीचे ४०वे पंतप्रधान (जन्म:११ एप्रिल १९२०)**१९९७:संजुक्ता पाणिग्रही-- भारतातील एक नृत्यांगना(जन्म:२४ ऑगस्ट १९४४)**१९८१:सदाशिव कान्होजी पाटील तथा स.का. पाटील-- मुंबईचे महापौर,माजी केंद्रीय मंत्री (जन्म:११ ऑगस्ट १८९८)**१९७१:डॉ माधव गोपाळ देशमुख-- प्रसिद्ध समीक्षक,साहित्यशास्त्रज्ञ( जन्म:१० मार्च १९१३)* *१९१४:वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा,गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)**१९०८:ग्रोव्हर क्लीव्हलँड--अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष(जन्म:१८ मार्च १८३७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेखिका आरती डिंगोरे यांचा लेख *अन्न हे पूर्णब्रह्म*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कडून FIR दाखल; पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संभाजीनगरच्या जि.प. शाळेच्या संरक्षण भिंतीसाठी निधीला मंजुरी दिली : पालकमंत्री भुमरे यांचे प्रतिपादन; कन्नड तालुक्यात शिवसेनेकडून सत्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द : वर्सोवा खाडीजवळील कामात जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटूंबाला 50 लाखांची मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बीडमध्ये परत लाखोंच्या संख्येने मराठे एकवटणार !नियोजन बैठकीत निर्णय; 11 जुलै रोजी मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत शांतता रॅली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंदावलेला मान्सून सोमवार पासून जोर धरणार, जूनची तूट जुलैमध्ये भरून निघणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही : माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अफगाणिस्ताननं टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या लढतीत ऑस्ट्रेलियाला 21 धावाने पराभूत करत रचला इतिहास*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *........ डेलिया ........*अ‍ॅस्टरेसी कुलातील (सूर्यफूल कुल) एका प्रजातीच्या वनस्पतींना डेलिया म्हणतात. डेलिया प्रजातीत सु. ३६ जाती आहेत. सूर्यफूल, डेझी, शेवंती या वनस्पतीही अ‍ॅस्टरेसी कुलातील आहेत. डेलिया वनस्पतीला वेगवेगळ्या रंगांची आकर्षक फुले येतात. त्यामुळे उद्यानांत या फुलांची मोठ्या प्रमाणावर शोभेसाठी लागवड केली जाते. या प्रजातीतील वनस्पती मूळच्या मेक्सिको, दक्षिण अमेरिका आणि कोलंबिया येथील आहेत. डेलिया हे मेक्सिकोचे राष्ट्रीय फूल आहे.डेलिया प्रजातीतील वनस्पती कंदीय, शाखीय, बहुवर्षायू व झुडूप प्रकारच्या आहेत. त्यांचे खोड सर्वसाधारणपणे ३० सेंमी. ते २ मी.पर्यंत उंच वाढते. पाने संयुक्त, पिसासारखी व समोरासमोर असतात. मुळे फुगीर व इन्युलीनयुक्त (एक प्रकारची शर्करा) असतात. फुलांचा आकार ५-३० सेंमी. व्यासाचा असतो. फुले वेगवेगळ्या आकर्षक रंगांची परंतु गंधहीन असतात. शुष्क फळ साधारणपणे आयताकृती किंवा अंडाकृती, एका बाजूस सपाट व टोकाला गोलाकार असते. फळांत एकच बी असते. एकदा फुले येऊन गेली की खोड वाळून जाते. पुढच्या हंगामात याच खोडाच्या वाळविलेल्या कंदापासून लागवड केली जाते.बागेत फुलांसाठी लावण्यात येणाऱ्या डेलिया पिन्नाटा या जातीच्या २००० पेक्षा अधिक प्रकारांची लागवड करण्यात येते. डेलियाच्या फुलांचा रंग लाल, पांढरा, पिवळा किंवा जांभळा असतो. काही फुले दोन रंगी असतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'कुचिपुडी'* हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे ?२) भारतातील पहिला शहरी रोप वे कोणत्या शहरात सुरू होणार आहे ?३) 'योग' हा शब्द कोणत्या भाषेतील कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे ?४) 'चेहरा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता ? *उत्तरे :-* १) आंध्रप्रदेश २) वाराणसी ३) युज ( संस्कृत भाषा ) ४) तोंड, मुख, वदन, आनन ५) २१ जून *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कवी पांडुरंग आडबलवाड, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षक, बिलोली👤 कल्पना डेव्हिड बनसोड, हेल्थ कोच, चंद्रपूर👤 रवी गंगाधर भोरे👤 अनिल रेड्डी, साहित्यिक, लातूर👤 लक्ष्मण सुरकार, शिक्षक, भोकर👤 सचिन रेनगुंटवार, धर्माबाद👤 सदानंद कोदागळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बुरा जो देखन मैं चलाबुरा न मिलिया कोय। जो दिल खोजा आपनामुझसे बुरा न कोय॥( अर्थ- कबीर कहते हैं कि जब मैं इस दुनिया में बुराई खोजने गया, तो मुझे कुछ भी बुरा नहीं मिला और जब मैंने खुद के अंदर झांका तो मुझसे खुद से ज्यादा बुरा कोई इंसान नहीं मिला। )।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गाला ओळखण्यासाठी आधी त्याला वाचावे लागते, खळखळून वाहणाऱ्या नदीची व्यथा व महानता जाणण्यासाठी तिला वाचावे लागते, काट्यांमधून फुले कसे फुलतात व मन मोहून टाकतात त्या फुलांचे संघर्ष जाण्यासाठी त्यांना वाचावे लागते तसंच जी व्यक्ती क्षणासाठी का होईना आनंदीत दिसते त्या व्यक्तीने कशाप्रकारे आनंद घेऊन जगत आहे त्या व्यक्तीचा जीवन प्रवास व क्षण जाणण्यासाठी त्याला वाचावे लागते. या पृथ्वीवर राहणारे असे अनेक जीवजंतू तसेच प्राणी, फुले आहेत त्यांना वाचल्याशिवाय कळत नाही. म्हणून कोणाच्याही विषयी जाणून न घेता उगाचच व्यर्थ शब्दात बोलून स्वतः चे समाधान करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आधी त्यांना वाचण्यासाठी वेळ काढावे सर्व ते, वाचल्यानेच कळत असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*.... कोल्ह्याची फजिती ....*  एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एक दिवस तो शहराकडे आला. शहराच्या जवळ येताच, गावाभोवती असणाऱ्या काही कुत्र्यांनी त्याला पाहिले. कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आता आपल्यावर मोठे संकट आले याची जाणीव कोल्ह्याला झाली व तो जोरात पळू लागला. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला धोब्याचे घर त्याला दिसले. तो धावतच आत गेला. एका बाजूला असणाऱ्या कढईत त्याने उडी घेतली. धोब्याने कढईमध्ये कपड्याला देण्यासाठी वेगवेगळे पातळ रंग तयार केले होते. त्या रंगात कोल्हा पडला व त्याच्या सर्व शरीराला रंग लागला. थोड्या वेळाने आपल्यावरील संकट टळले आहे याची जाणीव होताच तो त्या कढईतून बाहेर आला व परत जंगलाच्या दिशेने पळत सुटला. जाताना एका कुत्र्याने त्याला पाहिले. त्याचा रंग बघून हा नवीन भयानक प्राणी कोण असावा? असा प्रश्न त्याला पडला व भीतीने तो धावत सुटला. कोल्ह्याला हे पाहताच आश्चर्य वाटले. थोड्या वेळात त्याच्या लक्षात आले की रस्त्यातील ज्या ज्या प्राण्यांनी त्याला पाहिले ते सगळे घाबरून पळत होते. आता आपल्याला सर्व ज़ण घाबरत आहेत, याचा अभिमान कोल्ह्याला वाटू लागला. तो अतिशय तोऱ्यात जंगलात परतला. त्या जंगलचा राजा असणाऱ्या सिंहाच्या विश्वासू घोड्याने त्याला पाहिले व अतिशय अदबीने विचारले, ‘आपण कोण आहात?’ यावर कोल्हा म्हणाला, ‘मी आकाशातून आलो आहे आणि या जंगलाच्या राजाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. तू ताबडतोब सर्व प्राण्यांना याची कल्पना दे. मला शरण यायला सांग. नाहीतर या जंगलातील सर्व प्राण्यांचा मी घात करेल.’ घोडा घाबरला. तो धावत सिंहाकडे गेला. त्याने घडलेली घटना सिंहाला सांगितली. सिंहही अतिशय घाबरला. आजपर्यंत कधीही न पाहिलेला एक नवीन राजा या ठिकाणी आलेला आहे. त्याची ताकदही मोठी असावी, असे त्याने सर्वांना सांगितले. सर्व जण मिळून त्या राजाच्या स्वागतासाठी गेले. एका उंच दगडावर कोल्हा अतिशय रुबाबदारपणे बसला होता. सिंह जवळ आला आणि त्याने कोल्ह्याला प्रणाम केला. कोल्ह्यानेही सर्व प्राण्यांचा मुजरा स्वीकारला. ‘आजपासून मी या जंगलाचा राजा झालो आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या आज्ञेत राहावे.’ असा आदेश दिला. त्या दिवसापासून कोल्ह्याचा रुबाब वाढला. त्याचा दरबार भरू लागला. त्याला मुजरा करण्यासाठी सर्व प्राणी येऊ लागले. त्याचे आयुष्य मजेत चालले होते. एके दिवशी असाच तो सिंहासनावर बसलेला असताना दूर जंगलात काही कोल्ह्यांची कोल्हेकुई त्याच्या कानावर पडली. खूप दिवसांनी आपल्या नातलगांचा आवाज कानावर पडल्यामुळे तो खूष झाला आणि आनंदाने त्याने ओरडायला सुरुवात केली. सर्व प्राणी आश्चर्यचकित झाले. सिंहासनावर बसलेला राजा कोल्ह्यासारखा ओरडतोय म्हणजे राजाचे सोंग घेतलेला कोल्हा आहे. कोल्ह्याने रंग बदलल्यामुळे आपण फसलो. हे सर्व प्राण्यांच्या लक्षात आले. सिंह अतिशय रागाने धावतच त्याच्या जवळ गेला आणि त्याने सिंहासनावरून कोल्ह्याला खाली खेचले व अपमानित करून तेथून हाकलून लावले.त्यात कोल्ह्याची फजिती झाली.तात्पर्य – खरे ते खरेच असते. सोंग कधीही लपत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जून 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/J1nmf8c8Wm3GzD4n/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मोटरसायकल दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••*_जागतिक संगीत दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••*_आंतरराष्ट्रीय योग दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे 'निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.**१९९९:विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.**१९९८:फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.**१९९५:पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.**१९९२:विज्ञान,तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या डॉ.रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर**१९९१:भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.**१९६१:अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.**१९४९:राजस्थान उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९४८:पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे**१८९८:अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.**१७८८:न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९३:डॉ.सुजाता बेलखेडे-- लेखिका* *१९८८:शीतल शांताराम पाटील-- कवयित्री* *१९८७:मुक्ती मोहन-- भारतीय हिंदी अभिनेत्री**१९८३:ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान-- भारतीय हवाई दलाचा लढाऊ पायलट आणि अधिकारी**१९८२:मारोती बिराजी आरेवार -- कवी* *१९७८:देवेंद्र घनश्याम चौधरी- मराठी हिंदी व पोवारी बोलीचे प्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक* *१९७४:गौतमी कपूर-गाडगीळ-- भारतीय दुरचित्रवाहिनी तथा चित्रपट अभिनेत्री**१९७४:प्रा.संध्या महाजन -- कवयित्री, लेखिका* *१९७१:मृणाल देव-कुलकर्णी-- ख्यातनाम अभिनेत्री,दिग्दर्शक* *१९७०:संजय धनगव्हाळ-- कवी लेखक व कलावंत* *१९६८:प्रा.वर्षा गगने-- कवयित्री,लेखिका**१९६६:मृण्मयी(मधू) शिरगांवकर- कादंबरी,कथा,विनोदी लेख संग्रह लेखन* *१९६४:बाळासाहेब सौदागर--प्रसिद्ध चित्रपट गीतकार,लेखक,अभिनेते**१९६३:विवेक शौक --भारतीय अभिनेता, विनोदकार,लेखक आणि गायक(मृत्यू:१० जानेवारी २०११)**१९६२:केशव बा.वसेकर -- लेखक**१९६१:स्वाती चांदोरकर -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९५९:रवींद्र इंगळे चावरेकर -- प्रसिद्ध कवी,लेखक,संशोधक* *१९५८:रीमा लागू-- मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री(मृत्यू:१८ मे२०१७)**१९५४:वसंत मार्तंड गायकवाड-- लेखक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५३:बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान (मृत्यू:२७ डिसेंबर २००७)**१९४९:सुरेश विठ्ठलराव जाधव-- लेखक* *१९३३:वामन गणपतराव इंगळे-- कवी, कथाकार**१९३३:वसंत गुलाबराव गिरटकर-- कथाकार, कवी,लेखक**१९३२:निगार सुलताना-- भारतीय अभिनेत्री (मृत्यू:२१ एप्रिल २०००)**१९३१:सुधा दत्तात्रेय सोमण-- कथा लेखिका, ललितगद्य लेखिका**१९२५:श्रीमती यास्मिन शेख-- मराठी लेखन मार्गदर्शिका,मराठी भाषेच्या व्याकरण-तज्ज्ञ**१९२३:सदानंद रेगे – मराठी कवी,कथाकार आणि अनुवादक (मृत्यू:२१ सप्टेंबर १९८२)**१९१६:सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू:२१ जानेवारी १९९८)**१९१२:विष्णू प्रभाकर-- प्रसिद्ध हिंदी लेखक(मृत्यू:११ एप्रिल २००९)**१९११: परशुराम लक्ष्मण वैद्य-- अनुवादक, संशोधक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९७८)**१९०५:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी,तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:१५ एप्रिल १९८०)**१८९६:देविदास लक्ष्मण महाजन- भाषातज्ज्ञ, लेखक,अनुवादक(मृत्यू:३ एप्रिल १९६७)**१८५६:रामचंद्र भिकाजी जोशी-- संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक व लेखक(मृत्यू:७ सप्टेंबर १९२७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:कृष्णाबाई नारायण सुर्वे-- लेखिका (जन्म:१९३०)**२०१२:भालचंद्र दत्तात्रय खेर – प्रसिद्ध लेखक व पत्रकार (जन्म:१२ जून १९१७)**२००३:लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म:३ ऑगस्ट १९२४)**१९८४:मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्‍नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक,गायक आणि हार्मोनियमवादकही होते.(जन्म:४ आक्टोबर १९३५)**१९४०:डॉ.केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म:१ एप्रिल १८८९)**१९२८:द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(जन्म:३ एप्रिल १८८२)* *_ आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक योग दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*सहशालेय उपक्रम आणि योग*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे विमानतळ धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी:केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांचे संरक्षणमंत्र्यांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची राहण्याची सोय करा:नाना पटोलेंची गृहमंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे फोन करुन मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वजातीतील गोरगरीबांना आर्थिक निकषावर आरक्षण मिळायला हवे:भाजप उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे स्पष्ट मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बाजार समित्यांचा गुलाल उधळण्यासाठी आणखी वाट पाहा; सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अरविंद केजरीवालांना एक लाखांच्या बाँडवर जामीन मंजूर, दिल्ली मद्य धोरणात मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधानसभेला 100 जागा दिल्या नाहीत तर सगळ्या जागांवर लढणार; रामदास कदमांचा भाजपला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्ड कप टी 20 मध्ये भारताने अफगाणिस्तानचा 47 धावाने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 भौतिकशास्त्र 📙 विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र.यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले.आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात.उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते.उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात.रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकांतात राहून अंतापर्यंत पोहोचण्यापेक्षा, शांत राहून निवांत राहिलेले कधीही चांगलं..*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक योग दिवस* केव्हा साजरा केला जातो ?२) खोल समुद्रातील सागरी मोहिमांची अंमलबजावणी करणारा भारत हा जगातील कितवा देश बनणार आहे ?३) भारत सासणे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील उत्कृष्ट बाल साहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे ?४) 'गणपती' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताकडे जून २०२४ पर्यंत किती अण्वस्त्रे आहेत ? *उत्तरे :-* १) २१ जून २) ६ वा ३) समशेर आणि भूत बंगला ४) गजानन, लंबोदर, विनायक, एकदंत, गौरीसुत, प्रथमेश, गणनायक, गणराज, अमेय, गजवदन, गौरीनंदन, विघ्नहर्ता ५) १७२ *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 के. के. फटाले, शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेड👤 धाराजी जोगदंड👤 आनंद पाटील जाधव👤 शुभम साखरे👤 राहुल पाटील👤 हणमंत जमदाडे👤 संजयकुमार मांजरमकर👤 माधव धोंडापुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• प्रेमाचे दोन शब्द बोलल्याने मनावर असलेला तणाव दूर होते, आपुलकीने विचारपूस केल्याने स्नेह वाढत जातो, अपमास्पद वागणूक दिल्याने मनात आपोआप दु:ख निर्माण होतात तसेच समोर गोड बोलून मागे कटकारस्थान रचल्याचे उघड झाल्यावर माणसावरचा विश्वास उडून जातो. या प्रकारचे वागणे व बोलण्याची पद्धत असली की, कोणासोबत बोलावे हाच प्रश्न पडत असतो. म्हणून कोणासोबत बोलताना आपल्यात तेवढीच माणुसकी ठेवावी जेणेकरून आपुलकी ही कायम राहील व एकमेकांसोबत संवाद वाढत जाईल आजच्या घडिला या प्रकारची आपुलकी व स्नेह असणे काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करडू, बोकड आणि लांडगा  - अनंत दळवी                एक करडू एका बोकडाबरोबर चरत असता तेथे एका लांडगा आला. करडास बोकडापासून दूर नेऊन मारून खावे, या हेतूने तो त्यास म्हणतो, ‘मुला, तू आपल्या आईस सोडून आलास, हा केवढा मूर्खपणा केलास बरे? तेथे तुला पोटभर दूध प्यावयास मिळाले असते; येथे या रानात तुझे पोट कसे भरणार?तू आपल्या आईकडे जात असलास, तर चल. मी तुझ्या सोबतीस येतो.’करडू म्हणाले, ‘माझ्या जिवास काही अपाय होऊ नये म्हणूनच आईने मला या बोकडाबरोबर पाठविले आहे: आणि तू तर त्याजपासून मला दूर नेऊन मारून खाऊ इच्छितोस, तेव्हा तुम्हा दोघांपैकी मी कोणाचा विश्वास धरावा, हे तूच सांग बरे?’•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जून 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/diqzqupCC2pBqZ23/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक शरणार्थी दिन _*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.**१९६०:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना**१९२१:टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना**१८९९:केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.**१८८७:देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस. टी.) सुरू झाले.**१८६३:वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.**१८३७:व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:सुग्रीव नामदेव राठोड -- लेखक**१९८४:नितू चंद्रा--भारतीय निर्माता आणि थिएटर कलाकार,शास्त्रीय नृत्यांगना**१९८२:विनायक येवले- समकालीन कवी व समीक्षक* *१९७८:शिल्पा प्रसन्न जैन-- कवयित्री,लेखिका* *१९७६:प्रा.अर्चना श्रीपाद कुलकर्णी-जोशी -- कवयित्री* *१९७४:संगीता किसनराव देशमुख-- कवयित्री,लेखिका* *१९७४:जयराम सीताराम पवार-- प्रसिद्ध लेखक तथा उपजिल्हाधिकारी* *१९७२:पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू**१९६९:महेश नागोराव कुडलीकर -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६८:प्रा.शंकर किसनराव येरडे -- समीक्षक, संपादक* *१९६१:वासुदेव महादेवराव खोपडे-- कवी**१९६०:पांडुरंग बलकवडे-- जेष्ठ इतिहास संशोधक,दुर्ग अभ्यासक,शिव चरित्र व्याख्याते**१९५६:डॉ दिलीप माधवराव धोंडगे-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक,संपादक,लेखक**१९५५:प्रा.डॉ.शोभा भगवान नाफडे-- लेखिका* *१९५४:कांचन प्रकाश संगीत-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९५४:अ‍ॅलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू**१९५३:भालचंद्र गंभीरराव वाघ-- प्रसिद्ध लेखक,कादंबरीकार तथा पूर्व सनदी अधिकारी**१९५२:श्रीधर लक्ष्मणराव सरपे -- कवी,लेखक* *१९५१:निंबाजीराव बागुल-- कवी,लेखक* *१९५१:दिलीप नरहर महाजन-- लेखक तथा प्रकाशक* *१९३९:रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष (मृत्यू:२८ एप्रिल १९९८)**१९३६:प्रा.अमृत संभाजीराव देशमुख -- कवी, लेखक* *१९३६:सुरेश सरैया-- क्रिकेट जगतात रेडिओ क्रिकेट समालोचक(मृत्यू:१८ जुलै २०१२)**१९३६:सुषमा सेठ -- भारतीय रंगमंच,चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री* *१९३०:श्रीकृष्ण शंकर(बाळासाहेब) सराफ-- लेखक,संपादक**१९२४:डॉ.प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू:२ आगस्ट २०२१)**१९२०:मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान,कम्युनिस्ट नेते (मृत्यू:२६ एप्रिल १९९९)**१९२०:पंडित वसंतराव चांदोरकर --आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराण्याचे गायक(मृत्यू:८ जुलै २००१)**१९१५:टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)**१८८५:विष्णू महादेव भट-- वैद्यकीय ग्रंथाचे लेखक (मृत्यू:३० एप्रिल १९६१)**१८६९:लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९५६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८:चंद्रकांत गोखले – अभिनेते (जन्म:७ जानेवारी १९२१)**१९९७:वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल’ – मराठीतले पहिले शायर (जन्म:२९ डिसेंबर १९०८)**१९९७:बासू भट्टाचार्य – चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १९३४)**१९८७:डॉ.सलीम अली हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी(जन्म:१२ नोव्हेंबर १८९६)**१८३७:विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म:२१ ऑगस्ट १७६५)**१६६८:हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (जन्म:१८ डिसेंबर १६२०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पितृ देवो भव: ....*वडिलांचे महत्व सांगणारा लेख..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शासनाच्या चुकीच्या धाेरणामुळे राज्यभरातील पीएचडीचे हजाराे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित:शासनाचे विराेधात पुण्यात संशाेधक विद्यार्थी करणार आंदाेलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठ परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक पदासाठी सात स्पर्धक:निवड झालेल्या उमेदवाराचे नाव 21 जून रोजी घोषित होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृषी उन्नती योजना- ग्रामबिजोत्पादन योजनेतून अनुदान : अहमदनगर मधील 26,900 शेतकऱ्यांना अनुदानावर 8 हजार 70 क्विंटल सोयाबिन बियाणे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील राजगीर येथील स्थित नालंदा या विद्यापीठाचे उद्घाटन, १७४९ कोटी रुपये खर्चून उभ्या केलेल्या या वास्तुला भारतातील १६०० वर्षांचा इतिहास लाभला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मी स्वत: निवडणूक लढविणार नाही, विधानसभेसाठी आमचा १२७ जागांवर पहिला सर्व्हे पूर्ण : मनोज जरांगे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळ बीआयटी वसाहतीत प्रवेशद्वार उभारावे:आशिष शेलारांसह भाजप अनुसूचित जाती मोर्चाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करणार- अमिताभ गुप्ता:येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जीवनसत्त्व 'अ' कोणत्या अन्नपदार्थातून मिळवावे ?* 📙 **************************शरीराला अत्यंत अल्प प्रमाणात लागणारे सेंद्रिय पदार्थ म्हणजेच जीवनसत्त्वे होत. जीवनसत्वांपासून आपल्याला ऊर्जा मिळत नाही. जीवनसत्त्वे पेशींच्या कार्यासाठी विशेषत: इतर पोषक द्रव्यांच्या वापरासाठी आवश्यक असतात. जीवनसत्व 'अ' हे मेदपदार्थात विरघळणारे असे जीवनसत्त्व आहे. दृष्टीसाठी तसेच त्वचा निरोगी राहण्यासाठी या जीवनसत्वाचा उपयोग होतो. जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे रातांधळेपणा होतो. डोळ्यांतील आवरण कोरडे होते. नेत्रपटल कोरडे होते व कालांतराने त्यावर व्रण येतो. जंतूसंसर्ग झाल्यास पूर्ण डोळा काढून टाकण्याची वेळ येते. असे हे जीवनसत्त्व कसे मिळवायचे ते आता पाहू. प्राण्यांचे यकृत, अंडी, लोणी, चीज, दूध, मासे, मांस अशा प्राणीज पदार्थातून ते मिळवता येते. हॅलीवटच्या यकृताच्या तेलात दर ग्रॅमला २७,०००० आंतरराष्ट्रीय एकके इतके 'अ' जीवनसत्त्व असते, तर काॅड माशाच्या यकृताच्या तेलात दर ग्रॅमला ५४० इतके असते. गाजर, पालक, हिरव्या भाज्या, पिकलेले आंबे, पपया, संत्री, टोमॅटो तसेच शेवगाच्या शेंगा व पाने या वनस्पतीज पदार्थांमध्येही 'अ' जीवनसत्त्व असते. त्यामुळे जीवनसत्व 'अ'चा अभाव टाळण्यासाठी वरील पदार्थांचा आहारात नेहमी समावेश करावा. लहान मुलांना जीवनसत्त्व 'अ' चा अभाव होऊ नये व त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांना जीवनसत्त्व 'अ' चा मोफत पुरवठा राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत करण्यात येतो. यात ६ महिन्यांपासून ६ वर्षांपर्यंतच्या मुलांना दर सहा महिन्यांनी जीवनसत्व 'अ'चा दोन लाख आंतरराष्ट्रीय एकके इतका डोस दिला जातो. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारे आजार टाळता येतात. बाजारात जीवनसत्त्व 'अ' गोळ्यांच्या स्वरूपात विकतही मिळते. प्रौढांनाही जीवनसत्त्वाचा अभाव असल्यास ते टाळण्यासाठी डॉक्टर या गोळ्या घ्यायला सांगतात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे जी अंधारात दिशा दाखवते. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'सोर्स कोड - माय बिगिनिंग्ज'* हे कोणाचे आत्मचरित्र अलीकडेच प्रकाशित झाले आहे ?२) २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती महिला खासदार निवडल्या आहेत ?३) स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?४) 'गृहिणी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे ? *उत्तरे :-* १) बिल गेट्स २) ७४ खासदार ३) महाराष्ट्र ४) घरधनीण ५) पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रमेश मुनेश्वर, शिक्षक व साहित्यिक, किनवट👤 धनंजय उजनकर, कार्याध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद👤 किरण पाटील बेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 वीरभद्र बसापुरे, शिक्षक नेते,, धर्माबाद👤 गणेश अंगरोड, धर्माबाद👤 भगवान बकवाड, शिक्षक नेते, नांदेड👤 लक्ष्मण तुरेराव, लोकमत धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 नरसिंग नाईक, शिक्षक, नांदेड👤 शंकर उषापोड, शिक्षक, धर्माबाद👤 दौलतराव वारले, शिक्षक, धर्माबाद👤 विनोद गुम्मलवार, नांदेड👤 लक्ष्मण चन्नावार, नायगाव👤 गणेश यमेवार, धर्माबाद👤 शंकर पाटील कदम0प, धर्माबाद👤 निमेश गावित👤 टक्कन साईराम, तेलंगणा👤 राजेंद्र पाटील👤 संभाजी आटोळकर👤 शादूल चौधरी, शिक्षक, बिलोली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे लाल गर्द टोमॅटो भाजीत टाकल्याशिवाय भाजीला रंग येत नाही. तसंच कांदा चिरताना सुद्धा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. त्या दोघात किती ताकद असते त्यांचा उपयोग केल्यावरच त्यांचे महत्व कळत असते. म्हणूनच आपल्या जीवनात सुध्दा येणारे चांगले, वाईट प्रसंग आपली परीक्षाच घेण्यासाठी येत असतात असेही नाही तर ते,खूप काही शिकायला सुद्धा भाग पाडत असतात म्हणून त्यांना कंटाळून न जाता सदैव त्यांचे स्वागत करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शपथ*कोकणातले लोक देवभोळे, श्रद्धावान खऱ्या खोट्याचा निर्णय देवळात लावणारे, देवापुढे शपथ घेऊन कोणी खोटे बोलू शकणार नाही असा विश्वास बाळगणारे त्या विश्वासास जागणारे.कोकणातल्या एका शेतकऱ्याची अवजारे गेली. शेतकऱ्याला वाटत होतं. ती चोरली शेतकामावर येणाऱ्या मजुरांनीच. पण चोरी केल्याचं कोणीच कबूल करीत नव्हतं. शेवटी देवळात देवासमोर शपथेवर तसं प्रत्येकानं सांगावं असं गावकऱ्यांनी ठरविलं. शेजारच्या गावात जागृत देवस्थान होतं. तिथं जाऊन शपथ घेण्याचा निर्णय सगळ्यांना मान्य झाला.प्रमुख गावकऱ्यांसह शेतकरी शेतकामगारांना घेऊन शेजारच्या गावात पोचला. त्यांना दवंडी पिटलेली ऐकू येऊ लागली. जवळ गेल्यावर सगळं स्पष्ट ऐकू आलं.‘ऐकाऽ हो ऐका, आपल्या गावातल्या देवळातील सुप्रसिद्ध घंटा चोरीला गेली आहे. जो कुणी चोर पकडून देईल, चोरी कुणी केली सांगेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल.दवंडी ऐकून शहाणा शेतकरी बरोबरच्या लोकांना म्हणाला, आपण इथूनच परतू. देवासमोरची घंटा चोरीला गेली. तिचा शोध लागत नाही. चोर सापडत नाही. मग माझी अवजारं चोरणाऱ्या चोराचा पत्ता कसा लागणार ?देवावर कितीही श्रद्धा असली तरी आपले प्रश्न सोडविण्यात अंधश्रद्धा उपयोगी पडत नाहीच•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जून 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/9ufgVugbPgcVX1ZV/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.**१९८९:इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८०:ए.आर.अंतुले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली* *१९७७:ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.**१९६६:’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.**१९६१:कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९१२:अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.**१८६२:अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:गणेश बबन नागवडे --कवी,लेखक* *१९७४:किशोरकुमार बन्सोड -- कवी* *१९७०:राहुल गांधी –भारतीय राजकारणी, खासदार**१९६२:आशिष विद्यार्थी-- भारतीय अभिनेता**१९५९:अशोक कुबडे--कवी,लेखक,संपादक* *१९५९:नरहरी सीताराम झिरवळ-- महाराष्ट्रातील राजकारणी,महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष* *१९५७:प्रा.डॉ.रविकिरण वसंतराव पंडित -- लेखक* *१९५७:साधना सिंग-- भारतीय अभिनेत्री* *१९५६:शेख शब्बीर-- नगर जिल्ह्यातील लेखकांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे संकलन* *१९५२:विक्रम सेठ-- भारतीय कादंबरीकार आणि कवी**१९४७:सलमान रश्दी – बहुचर्चित लेखक**१९४१:रमेश गजानन पानसे-- शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत**१९४०:शंकर भीमराव ऊफ समुद्रगुप्त पाटील -- मराठवाड्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक**१९३१:मधुकर रामदास जोशी-- प्रसिद्ध हस्तलिखितशास्त्र तज्ज्ञ, प्राचीन मराठी साहित्य संशोधक,संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक**१८९८:पुरुषोत्तम बाळकृष्ण साठे--कथाकार अनुवादक (मृत्यू:१७ फेब्रुवारी १९७८)**१८७७:डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ* *१६२३:ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू:१९ ऑगस्ट १६६२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:दिवाकर मोहनी-- मुद्रण आणि लिपी ह्या विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून प्रसिद्ध(जन्म:१० नोव्हेंबर १९३१)**२०००:माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील चित्रपट अभिनेत्री (जन्म: ऑगस्ट १९३३)**१९९८:रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार,विनोदी लेखक (जन्म:६ जानेवारी १९२५)**१९९६:कमलाबाई पाध्ये – समाजसेविका (जन्म:८ आक्टोबर १९२०)* *१९९३:विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक (जन्म:१९ सप्टेंबर १९११)**१९५६:थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती,आय.बी.एम.(IBM) चे अध्यक्ष (जन्म:१७ फेब्रुवारी १८७४)**१७४७:नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म:२२ आक्टोबर १६९८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सरकारी शाळेकडे पालकांची पाठ*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कांग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा आमदारकीचा राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पोलीस भरती पारदर्शक व्हावी, दोन जिल्ह्यातील भरतीत अंतर ठेवावे, विजय वडेट्टीवार यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *निर्जला एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी, मंदिराचे पुरातन रूप पाहण्यासाठी भक्तांमध्ये उत्सुकता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शनिवारपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, तरीदेखील धरणात 11 टक्के पाणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागासाठी 12 जुलै रोजी निवडणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; 5 महिला जागीच ठार, 3 गंभीर जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यातील 1065 गो शाळांना अनुदान वितरण करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आयोडीनयुक्त मीठ म्हणजे काय ?* 📙**********************घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर मोठया अक्षरात 'आयोडिनयुक्त मीठ' असे लिहिलेले दिसेल. मिठात आयोडिन का मिसळतात, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ! आयोडिन खूप अल्प प्रमाणात जरी शरीरास आवश्यक असते, परंतु तरी आयोडिन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉईड ग्रंथींमध्ये या आयोडीनपासुन थायरॉक्सिन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते. त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भातील अर्भक व लहान मुलांच्या वाढीवर, बुद्धिमत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो व ती मतीमंद व मूकबधिर होतात. मोठ्या माणसांत लठ्ठपणा येतो. हालचाली मंदावतात. बौद्धिक क्षमता कमी होते. वाढ खुंटते. स्त्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. आयोडिन मुख्यत: समुद्री मासे, मीठ व काॅड माशाच्या यकृताचे तेल इत्यादीपासून मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोड्या प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडिनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात या व्याधीला बळी पडावे लागते. त्यामुळे आयोडिनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ व खाद्यतेल यांचा वापर करता येतो. मिठाचा जेवणात समावेश गरीब श्रीमंत असे सर्वच लोक करत असल्याने मिठात टाकल्याने सर्व देशातील या समस्येचा नायनाट करता येईल. त्यामुळे मिठात आयोडिन १ किलोला १५ ते ३० मिलीग्रॅम या प्रमाणात आयोडिन मिसळले जाते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन शांत असले की, सर्व प्रश्न सहज सुटतात. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उलट्या टोपड्या सारख्या आकाराच्या एस्किमोच्या घराला काय म्हणतात ?२) महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?३) भारतात १९५३ साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला ?४) 'घोडा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात ? *उत्तरे :-* १) इग्लू २) कोयना, सातारा ३) फाजल अली ४) हय, अश्व, तुरग, वारू ५) २०४ चौरस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रताप भिसे, शिक्षक, नांदेड👤 नागेश कोसकेवार👤 शंकर बेल्लूरवाड👤 नारायण शिनगारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चपाती लाटताना एका बाजूने जरी फाटली असेल तरी तव्यावर भाजताना ती फुगण्याचा प्रयत्न करत असते व खाण्यासाठी चविष्ट बनण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला माहीत असते की, मऊ चपाती खायला सर्वांना आवडते. तसेच आपण सुद्धा जीवन जगत असताना एका बाजूने जरी दु:ख असले तरी आपल्यात सहनशीलता ठेवून जगण्याचा प्रयत्न करावे व त्या चपाती कडून शिकण्याचा प्रयत्न करावा कारण चपातीने नुसते पोटच भरत नाही तर तिच्याकडून खूप काही शिकायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोन माकडं एका गावाजवळच्या जंगलातून चालली होती. दोन्ही तहानेली आणि भुकेली होती. वाटेत त्यांना एक फळझाड दिसलं. अत्यंत आकर्षक रंगाच्या, सुमधुर वासाच्या फळांनी ते झाड भरलं होतं. फळभाराने त्याच्या फांद्याही पार जमिनीपर्यंत लवल्या होत्या. ती फळं पाहताच माकडांच्या तोंडाला पाणी सुटलं. पण, एक मित्र दुसऱ्याला म्हणाला, मी पुढे जाऊन पाण्याचा आणि इतर खायला काय मिळतंय याचा शोध घेऊन येतो. तू इथे या झाडाखाली बस. आराम कर. पण, चुकूनही यांच्यातलं एकही फळ तोडू नकोस आणि खाण्याचा तर विचारही मनात आणू नकोस.त्या माकडाने पुढे जाऊन नदी किती दूरवर आहे, ते पाहिलं. वाटेत त्याला काही नेहमीची फळझाडं दिसली. त्यांच्या त्या दुपारच्या भुकेची व्यवस्था आहे, याची खातरजमा करून तो मित्रापाशी परत आला आणि तिथलं दृश्य पाहून भयचकित झाला.त्याचा मित्र त्या झाडाखाली विव्हळत पडला होता, त्याच्या तोंडातून फेस येत होता, डोळे निस्तेज झाले होते. त्याने धावत जाऊन मित्राचं डोकं मांडीवर घेतलं आणि विचारलं, हे रे काय झालं?मित्र म्हणाला, क्षमा कर मला. मी तुझा सल्ला ऐकला नाही. ही रसरशीत फळं खाऊन पाहण्याचा मोह मला आवरला नाही. तू गेल्यावर मी ही फळं चाखून तरी पाहू म्हणून खाल्ली आणि आता माझी ही अवस्था झाली आहे. माझी शुद्ध हरपते आहे. कदाचित माझा मृत्यूही समीप आला असेल. म्हणूनच मला एक सांग. या झाडाची फळं विषारी असतील, असा इतका पक्का अंदाज तुला कशावरून आला होता?मित्र म्हणाला, अरे, इथे शेजारीच एक गाव आहे. तिथे माणसं राहतात. आपण, जिथे आहोत, तिथूनच एक पायवाट गेलेली आहे माणसांनी बनवलेली. म्हणजे इथे किती माणसं ये-जा करत असतील! माणसांचा स्वभाव तुला ठाऊकच आहे. इथली सगळी झाडं त्यांनी फळांसाठी, फुलांसाठी, पानांसाठी, लाकडासाठी, डिंकासाठी, रसासाठी ओरबाडली आहेत. हे झाड मात्र इतक्या आकर्षक फळांच्या भाराने लवलेलं आहे, माणसांच्या हाताशीच नाही, तर पायाशी फळं आली आहेत आणि माणसांनी त्याला तोंडही लावलेलं नाही, हातही लावलेला नाही, याचा अर्थ काय निघतो?हे ऐकल्यावर मांडीवरच्या माकडाचे डोळे विस्फारले आणि क्षणार्धात विझून गेले.ओशो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जून 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2016/05/travels-with-safe_21.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.**१९६२:'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्राचे पहिले अंक प्रसिद्ध* *१९५६:रँग्लर र.पु.परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.**१९४६:डॉ.राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला ’१८ जून रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे.**१९०८:फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.**१९३०:चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.**१८३०:फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.**१८१५:वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:उल्हास सुभाष निकम--लेखक**१९८७:मोहिन हसन अली -- इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू**१९७७:टीना तांबे-- भारतीय शास्त्रीय कथ्थक नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक**१९७५:प्रा.डॉ.किरण प्रभाकर वाघमारे -- लेखक**१९७२:महेश लिमये-- भारतीय सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक**१९७०:अरविंद स्वामी-- भारतीय अभिनेता,निर्देशक**१९६५:उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (मृत्यू:२२ जुलै २००३)**१९६०:प्रा.डॉ.भास्कर भुजंगराव बडे-- कवी, कथाकार,बालकादंबरीकार**१९५७:मंगल ढिल्लो -- भारतीय अभिनेता,लेखक(मृत्यू:११ जून २०२३)**१९५४:नंदकुमार बाबूराव येवले-- लेखक**१९५०:डॉ.श्रीकांत मधुसूदन गोडबोले-- लेखक* *१९४५:प्रा.कमलाकर देविदास हनवंते-- प्रसिद्ध लेखक* *१९४२:पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक,वादक,गीतलेखक**१९५०:उध्दव किसनराव भयवाळ-- प्रसिद्ध कवी,लेखक**१९३७: मुरलीधर गोडे-- शब्दांचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कवी,गीतकार (मृत्यू:१९ मार्च २०२०)**१९३६:प्रा.गोपाळ दत्त कुलकर्णी-- प्रसिद्ध लेखक (मृत्यू:२२ आक्टोबर २०१९)**१९३१:के.एस.सुदर्शन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक(मृत्यू:१५ सप्टेंबर २०१२)**१९३०:श्रीकृष्ण बापूराव जोशी-- मराठी भाषेतील एक बहुश्रुत लेखक* *१९२५:प्रा.विमल राजाराम कुलकर्णी-- लेखिका* *१९११:कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (मृत्यू:८ सप्टेंबर १९९७)**१८९९:शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (मृत्यू:१ डिसेंबर १९८५)**१८९८:विनायक आत्माराम पाठारे-- नाटककार निबंधकार (मृत्यू:२२ एप्रिल १९६२)**१८९४:गंगाधर रामचंद्र साने-- कादंबरीकार, बोधप्रद पुस्तकाचे लेखक (मृत्यू:२६ एप्रिल १९६५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:मिल्खा सिंग-- भारतीय धावपटू(जन्म: २० नोव्हेंबर १९२९)**२००९:उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक,पद्‌मविभूषण (१९६९), (जन्म:१४ एप्रिल १९२२)**२००३:जानकीदास – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते (जन्म:१९१०)**२००३:नसीम बानो-- भारतीय अभिनेत्री (जन्म:४ जुलै १९१६)**१९९९:श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्‍या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक,कथा आणि कादंबरीकार (जन्म:८ जुलै १९२८)**१९७४:सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती,साहित्यिक (जन्म:१६ आक्टोबर १८९६)**१९६२:जे.आर.तथा नानासाहेब घारपुरे – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य,नामवंत विद्वान* *१९५८:डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:२३ आक्टोबर १९००)**१९३६:मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (जन्म:२८ मार्च १८६८)**१९०२:सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (जन्म:४ डिसेंबर १८३५)**१९०१:रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (जन्म:१० एप्रिल १८४३)**१८५८:मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी - इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या (जन्म:१९ नोव्हेंबर १८२८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवघेणा प्रवास* लेख ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय तर 60 जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *1.25 लाख शेतकरी पीक कर्जापासून अद्यापही वंचित:पीक कर्ज वाटप करण्याकडे खासगी बँकांचा कानाडोळा‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जिल्ह्याच्या विकासासाठी गरज पडली तर खा. बळवंत वानखडेंना साथ देऊ:आ. रवी राणा यांची लोकसभा निवडणूक निकालानंतर प्रथमच प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती शहरातील 41 रस्ते दुभाजकांचे सौंदर्य वाढणार: मनपाने मागवले प्रस्ताव, जाहिरात लावल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मृग नक्षत्राचा कापूस लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी साधला मुहूर्त:दमदार पावसाची प्रतीक्षा, खरीप पिकाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 विश्वकप - उद्यापासून सुपर 8 च्या लढतीस प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत होते...त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा (balloon) दिला . प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर आपले नाव टाकून हॉल मध्ये सोडायचा होता. सर्व लोक कामाला लागले.प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीतहोता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला...नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतूनस्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!!इतक्या भरगच्च फुग्यांतूनस्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ उडाली. ५मिनिटेसंपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधूशकला नाही!!... नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एकफुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक फुगा उचलला.वक्त्याने प्रत्येकाला सांगितले की आपल्याकडेज्याच्या नावाचा फुगा आहे त्या माणसाला तो फुगा देऊन टाका.अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर ज्याचेनाव आहे त्याला तो देऊ लागला आणि २ मिनिटांतप्रत्येकाकडे स्वतःच्या नावाचा फुगा आला.!!यावर तो वक्ता बोलू लागला…"आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे.! प्रत्येक जण आनंद,सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंगपछाडतो आहे... परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहेयाची कुणालाही कल्पना नाही...स्वतः चा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदातदडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंदद्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंदआणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरेगमक यातच आहे...." हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्दझाला....नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,तर आयुष्यभर एकटे राहाल..!माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूचयेण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूससुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकतनाही..स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!विश्वास उडाला की आशा संपते!काळजी घेण सोडल की प्रेम संपत!म्हणुन, स्वप्न पाहा,विश्वास ठेवा,आणि काळजी घ्या!आयुष्य खुप सुन्दर आहे.🌠*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विजयी तोच होतो, जो विजयी होण्यासाठी साहस करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी* तिसऱ्यांदा कोणाची नियुक्ती करण्यात आली ?२) जी - ७ समूहात असलेले देश कोणते ?३) कोणाची आठवण म्हणून नोबेल पुरस्कार दिले जाते ?४) 'गंध' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*उत्तरे :-* १) अजित डोवाल २) अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा व जपान ३) आल्फ्रेड नोबेल ४) वास, परिमळ ५) डॉ. पी. के. मिश्रा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 धनंजय गुडसुरकर, शिक्षक व साहित्यिक, उदगीर👤 अनंत उत्तरवार, शिक्षक, माहूर👤 मेहताब शेख👤 गजानन सुरकार 👤 गंगाधर हरने, शिक्षक, वसमत👤 व्यंकटराव वारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाने जरी माणसाकडे बघून डोळे झाकून पाठ फिरवली असेल तरी निसर्ग मात्र कधीच डोळे झाकत नाही. तो सर्वाकडेच बघत असतो व त्याचे डोळे कोणीही झाकू शकत नाही.म्हणून त्याच्या नियमाचे सदैव पालन करावे. जो, कोणी त्याच्या नियमाचे पालन करुन जगतो त्याकडे निसर्गाची कायम लक्ष असते. फरक एवढेच की, तो कोणालाही कळू देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खऱ्या खोट्याची पारख*एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते शिकू लागला.थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."सत्य हे आहे की या जगात, खऱ्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.इंटरनेटवरून साभार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जून 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/FdF4QprQyQrY2NM5/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मल्लखांब दिवस_**_जागतिक पवन दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००८:’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.**२००१:ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.**१९९४:इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१९९३:संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त**१९७०:बा.पां.आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.**१९१९:कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.**१८६९:महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.श्री.पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.**१८४४:चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:बापू सोपान भोंग-- कथा,कादंबरी लेखन करणारे लेखक* *१९८२:पल्लवी कुलकर्णी-- अभिनेत्री* *१९८०:अनिल दादासाहेब साबळे-- कवी, लेखक* *१९७८:संतोष दिगंबर आळंजकर -- कवी* *१९७६:प्रा.प्रमोद मारोती नारायणे-- लेखक, समीक्षक* *१९७५:प्रा.डॉ.सुशिलप्रकाश यादवराव चिमोरे-- कवी,समीक्षक,संपादक* *१९७५:दिवाकर जोशी-- गझलकार**१९७४:डॉ.सोपान माणिकराव सुरवसे-- लेखक,समीक्षक* *१९७४:डॉ.विनोद पांडुरंग सिनकर-- कवी* *१९७४:कादर राजूमिया शेख-- कवी(पंकज)तथा शिक्षणाधिकारी**१९७३:डॉ.संजय लक्ष्मण गायकवाड-- लेखक* *१९७३:गणपत गायकवाड-- कवी,लेखक**१९७२:चेतन हंसराज -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९७२:अर्चना चंद्रशेखर साने-- लेखिका तथा आकाशवाणी निवेदिका**१९७२:रामचंद्र विश्वनाथ काळुंखे-- लेखक**१९७१:सतीश माणिकराव जामोदकर-- कवी,लेखक,संपादक* *१९७०:डॉ.प्रकाश राठोड -- लेखक,समीक्षक, कवी**१९७०:विठ्ठल बापूराव भोसले-- लेखक**१९६६:मनोहर आंधळे-- कवी* *१९६४:मीलन सुरेश येवले- कवयित्री, लेखिका**१९६२:डॉ.माधवी रवींद्र मेहंदळे -- लेखिका**१९६०: श्रीरंग गोडबोले-- मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट लेखक,दिग्दर्शक, अभिनेता आणि गीतकार* *१९५९:राधाकृष्ण विखे पाटील-- मंत्री,महाराष्ट्र शासन* *१९५९:डॉ.सुहास भास्कर जोशी- प्रसिद्ध लेखक**१९५६:हेमंत जगन्नाथ रत्नपारखी-- कवी, लेखक* *१९५५:आनंद वामन उगले-- लेखक,निवृत्त गटशिक्षणाधिकारी**१९४८:प्रकाश एदलाबादकर- प्रसिद्ध स्तंभलेखक**१९४७:प्रेमानंद गज्वी – जेष्ठ नाटककार व प्रसिद्ध लेखक**१९४५:अर्जुन उमाजी डांगळे-- कवी, कथाकार**१९४२:प्रा.भाऊ लोखंडे-- आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,पाली साहित्याचे गाढे अभ्यासक,साहित्यिक (मृत्यू:२२ सप्टेंबर २०२०)**१९३७:रामचंद्र बाळकृष्ण कोलारकर -- संशोधक,संपादक,अनुवादक,कथासमीक्षक, कथासंकलक**१९३७:किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाज परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक**१९३३:सरोजिनी शंकर वैद्य –ललितलेखिका, चरित्रकार,समीक्षक (मृत्यू:३ ऑगस्ट २००७)**१९३३:प्रा.मनोहर सरपटवार -- कवी,लेखक* *१९२९:सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री (मृत्यू:३१ जानेवारी २००४)**१९२८:शंकर विनायक वैद्य –कवी,समीक्षक वक्ते कथाकार (मृत्यू:२३ सप्टेंबर २०१४)**१९२३:केशव जगन्नाथ पुरोहित ऊर्फ ’शांताराम’ – कथाकार,कादंबरीकार,१९८९ साली अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१८)**१९१७:सज्जाद हुसेन – संगीतकार (मृत्यू:२१ जुलै १९९५)**१९११:कटिंगेरी कृष्णा(के.के.) हेब्बर-- भारतीय चित्रकार आणि कलाशिक्षक(मृत्यू:२६ मार्च १९९६)**१९०७:ना.ग.गोरे – स्वातंत्र्यसैनिक,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (मृत्यू:१ मे १९९३)**१९०६:गंगाधर भाऊराव निरंतर- कादंबरीकार,ललित लेखक(मृत्यू:१३ मार्च १९५९)**१८९८:गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू:२९ ऑगस्ट १९८६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:न्या.प्रफुलचंद्र नटवरलाल भगवती-- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे मुख्य न्यायाधीश(जन्म:२१ डिसेंबर १९२१)**१९८३:श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (जन्म:३० एप्रिल१९१०)**१९७९:सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (जन्म:२ एप्रिल १९२६)**१९३१:अच्युत बळवंत कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक,’संदेश’कार (जन्म:१८७९)* *_शुभ शनिवार_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेचा पहिला दिवस*उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर आज 15 जून रोजी विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2024-25 ला प्रारंभ होत आहे, त्यानिमित्त लेख..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर विदर्भ वगळता आजपासून शाळांना प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून, महायुती सरकार विधानसभा निवडणुकीआधी शेवटचा अर्थसंकल्प मांडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा उघड, केंद्रावर न जाता विद्यार्थी बाहेरून देत होते परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा उघड, केंद्रावर न जाता विद्यार्थी बाहेरून देत होते परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारकडे ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे अशी मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निर्देश दिले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान! मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा ओमानवर ऐतिहासिक विजय, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंबाडी* ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -संस्कृत-अन्वष्टाहिंदी-अम्बारी,मोईआबंगाली-माचिकाकानडी-पुंडी, पुंडियानारूगुजराती-अंबाडीमल्याळम-तामीळ-तेलगू-इंग्रजी-लॅटिन-हिबिस्कस सबडेरिफ्फा (Hibiscus sabdariffa) याचे सर्वात जास्त उत्पादन चीनमध्ये होते.ही सुमारे १.५ ते २ मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. हे झाड सरळ वाढते. ह्याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात.त्यास 'हॅश ऑईल' असे म्हणतात.यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल(टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त असते.त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.मानवी शरीरासाठी आवश्यक ते गुणोत्तर नेमके यात असते.उत्पत्तिस्थान-भारतात विदर्भ, खानदेश व पंजाबचा काही भाग.उपयोग-सर्वसाधारण - दोऱ्या,सतरंज्या,कागद करण्यास उपयुक्तआयुर्वेदानुसार - पित्त, जळवात, अजीर्ण इत्यादी रोगांवर गुणकारी*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इमानदार माणसाला आयुष्यात कदाचित पैसा कमी मिळू शकेल पण समाधानाची झोप मात्र भरपूर मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *ओडिशाचे नवे मुख्यमंत्री* म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांची निवड करावी लागते ?३) गावातील प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम करतो ?४) 'गोष्ट' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १८ व्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात कोण सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरले आहेत ? *उत्तरे :-* १) मोहन चरण माझी २) कलम ९३ नुसार ३) पोलीस पाटील ४) कथा, कहाणी ५) जितन राम मांझी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शंकर गोसकेवार, शिक्षक, नांदेड👤 शिलवंत डुमणे👤 चंद्रकांत दुडकावार, शिक्षक, देगलूर👤 किरण अन्नमवार, शिक्षक, देगलूर👤 गणपतराव कात्रे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 कालिदास अंतोजी, पत्रकार, धर्माबाद👤 संजय नोमुलवार, शिक्षक, धर्माबाद👤 आनंद पाटील, शिक्षक, धर्माबाद👤 संजय गैनवार, शिक्षक, धर्माबाद👤 नरसिंग गुर्रम, नांदेड👤 संगीता संगेवार, शिक्षिका, धर्माबाद👤 माधव उरेकर, शिक्षक, धर्माबाद👤 चंद्रकांत जोशी, धर्माबाद👤 अनिल भापकर, लोकमत, औरंगाबाद👤 दिगंबर मरकंटे, शिक्षक, बिलोली👤 हनमंलू शंकरोड, येवती👤 गणेश पाटील जगदंबे, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पंचपक्कवानाने भरलेले ताट जरी असेल तरी कधी,कधी दुसऱ्यांच्या ताटाकडे आपले लक्ष जात असते. कारण, दुसऱ्यांकडे लक्ष देण्याची एक प्रकारची आपल्याला सवय झालेली असते म्हणूनच समोर ताट असताना सुद्धा समाधान होत नाही. त्यामुळेच ती लागलेली सवय मनात घर करुन जाते व अनेक प्रकारच्या विकाराला आधार मिळत असतो म्हणूनच नको, त्या गोष्टी घडून येतात. या प्रकारचे दुसरं काही घडू नये यासाठी जे, काही आपल्याकडे आहे त्यातच समाधान मानावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते . एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत असे तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे . तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील , आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल .तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायच सोडून हा भलतच काय तरी म्हणतोय . तिने वैतागून ठरवलं , याला धडा शिकवलाच पाहिजे . तिने त्या चपातीत विष कालवले . आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले " हे मी काय करतेय?" असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली . नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला " तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. " तो चपाती घेऊन गेला . तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची . खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती . एक दिवस तो अचानक आला.दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं .कपडे फाटलेली होती . त्याला भूक लागली होती . आईला बघताच मुलगा म्हणाला " आई , मी इथं पोहोचलो एका लंगड्या बांबांच्यामुळे , मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली . तो म्हणाला रोच मी हेच खातो , आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे. हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला . तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला. _______________________________🙏 *तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केलेले चांगलं कर्म तुमच्याकडे परत येत.*🌹तात्पर्य :- *चांगल्या कर्माचा परतावा नेहमी चांगलाच मिळतो*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 एप्रिल 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-on-d-gukesh-notable-performance-in-candidates-chess-tournament-amy-95-4340702/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_अंतरराष्ट्रीय जॅझ दिवस_* *_ या वर्षातील १२१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना:१९२५)**२००७:दिलीप कुमार यांना फाळके रत्न पुरस्कार**१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.**१९९५:ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.**१९७७:९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ,समाजवादी पक्ष,संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.**१९३६:वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.**१७८९:जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.**१६५७:शिवाजी महाराजांनीमोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला केले* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:रोहित शर्मा – प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार**१९७०:सुवर्णा व्यंकट मुळजकर -- कवयित्री**१९६७:जयंत कमलाकर झामरे -- लेखक**१९६४:इयान अँड्र्यू हीली-- ऑस्ट्रेलियन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९६१:दिवाकर शेजवळ-- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५८:अरुण शेवते-- मराठी भाषेतील साहित्यिक,संपादक व प्रकाशक**१९५५:प्रदीप सरकार -- बॉलीवूडमध्ये काम करणारे भारतीय लेखक आणि दिग्दर्शक(मृत्यू:२४ मार्च २०२३)**१९५०:डॉ.ह.ना.जगताप -- शिक्षणतज्ज्ञ, लेखक* *१९५०:प्रा.अर्जुन बळीराम जाधव-- प्रसिद्ध लेखक**१९४८:डॉ.श्रीराम वसंत गीत-- संशोधक, लेखक**१९२६:श्रीनिवास खळे – प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू:२ सप्टेंबर २०११)**१९२४:रामचंद्र सोवनी --जीवशास्त्रज्ञ,विज्ञान लेखक (मृत्यू:१ मे २००७)**१९१०:श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (मृत्यू:१५ जून १९८३)**१९०९:माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’(मृत्यू:११ आक्टोबर १९६८)**१८७०:धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक,छायाचित्रकार,दिग्दर्शक,संकलक, वेशभूषाकार,कलादिग्दर्शक(मृत्यू:१६ फेब्रुवारी १९४४)**१८४३:रामचंद्र भिकाजी गुंजीकर--- मराठी ग्रंथकार आणि संपादक(मृत्यू:१८ जून १९०१)**१७७७:कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ(मृत्यू:२३ फेब्रुवारी १८५५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: ऋषी कपूर- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते(जन्म:४ सप्टेंबर १९५२)**२०१२:अचला सचदेव--भारतीय चित्रपट अभिनेत्री(जन्म:३ मे १९२०)**२००३:वसंत पोतदार – मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार (जन्म:२० नोव्हेंबर १९३९)**२००१:श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक,गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (जन्म:२१ ऑगस्ट १९२४)**१९४५:नाझी जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली (जन्म:२० एप्रिल १८८९)**१९१३:मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (जन्म:७ नोव्हेंबर १८६८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक लोकसत्ता अग्रलेख *महाराष्ट्र दीन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक निर्णयाची अंमलबजावणी एक मे पासून होणार लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा 25 मे रोजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गडचिरोली-गोंदिया पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात पटकावला राज्यात प्रथम क्रमांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *२५ मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपूर विमानतळ बॉम्बने उडविणार! प्रशासनाला धमकीचा ई-मेल; सुरक्षेत वाढ, प्रवाशांची कसून तपासणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लोकसभेच्या तोंडावर भाजपला धक्का, सहा टर्म खासदार, केंद्रीय राज्यमंत्रिपदही भूषवलेलं व्ही श्रीनिवास प्रसाद यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - कोलकत्ताने दिल्लीला सात विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌫 *हिमालयाचा जन्म केव्हा झाला ?* 🌫 ************************'उत्तरम् यत्समुद्रस्य । हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यंत्र संतत.' भारतवर्षांची - आपल्या देशाची अशी ओळख सांगितली आहे. म्हणजे सागराच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असणारा देश. यावरून आपला देश अस्तित्वात आला तेव्हापासून उत्तरेला हिमालयाचा कोट आपलं संरक्षण करत आला आहे अशी आपली समजूत होईल. पण ती बरोबर नाही. कारण हिमालयाचा जन्म आपली भूमी अस्तित्वात आल्यानंतर कितीतरी शतकांनी झाला आहे. किंबहुना धरतीतलावरच्या एकूण उत्तुंग पर्वतांपैकी हिमालय हा सर्वात कमी वयाचा पर्वत आहे.फार फार पूर्वीचं म्हणजे साधारण पृथ्वीचा धगधगता गोळा थंड झाल्यावरचं पृथ्वीचं भौगोलिक रूप फार वेगळं होतं. तिच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ सारा भाग पाण्यानं व्यापलेला होता. जी काही कमी होती ती आग्नेय कोपऱ्यात म्हणजे आज जिथं साधारणपणे ऑस्ट्रेलिया आहे तिथं एकच एक मुटकुळं करून चुपचाप पडून राहिली होती. तिचं नाव होतं पॅनगाईया. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे समस्त भूमी. त्यानंतरचा कितीतरी काळ अशीच परिस्थिती राहिली. साधारण साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी या भूमीच्या गाठोड्याला जात आली. तिच्यात हालचाल सुरू झाली आणि तिचे दोन प्रचंड तुकडे झाले. पुढच्या अडीच कोटी वर्षांमध्ये हे तुकडे एकमेकांपासून पूर्णपणे अलग झाले. उत्तरेचा लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवनालँड. लाॅॆशियाचं वायव्य दिशेनं भ्रमण सुरू झालं. आजची उत्तर अमेरिका आणि युरोप खंडं त्यात समाविष्ट होते. गोंडवनालँडमध्ये आजची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका वगैरेंचा समावेश होतो. हे दोन्ही भूखंड एकमेकांपासून अलग होत पुढची साडेतेरा कोटी वर्षे दूर दूर जात राहिले. पृथ्वीच्या गाभ्यात तप्त शिलारस असून त्यावरच्या घन कवचाचे हे तुकडे तरंगत असतात. त्यांचं भटकणं अविरत चालूच असतं. यालाच आता वैज्ञानिक भाषेत प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणतात. या भूखंडांच्या भटकण्यातून या दोन प्रचंड भूखंडांचेही तुकडे झाले. त्यातूनच उत्तर अमेरिका आणि युरोपही एकमेकांपासून वेगळे झाले. गोंडवनालँडचे तर तीन चार तुकडे झाले. एकात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका होते. ते पश्चिमेकडे सरकू लागले. दुसऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका होते. त्याचेही दोन तुकडे होऊन अंटार्क्टिका दक्षिण दिशेनं तर ऑस्ट्रेलिया थोडा अाग्नेयाकडे सरकला. एक दुसरा मोठा तुकडा बाजूला होऊन त्याचं एक बेट झालं. ते टेथिस महासागरात तरंगू लागलं. हेच भारतीय उपखंड. कालांतराने तेही वायव्येकडे सरकत राहिलं. आणि साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यानं जाऊन आशिया खंडाला धडक दिली. त्यावेळी भारतीय उपखंडाच्या सरकण्याचा वेगही एका शतकात ९ मीटर एवढा होता. धडकीनंतर तो निम्म्यावर आला. आणि पाच कोटी वर्षांनंतर तो आताच्या एका वर्षांत २-३ सेंटीमीटर एवढा कमी झाला. जमिनीवरून आपण एखादा कागद सरकवत नेला तर तो सरकत राहतो. पण जेव्हा तो भिंतीला भिडतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. तरीही सरकण्याचा रेटा चालूच राहिला तर त्याला घड्या पडून तो तिथंच उंचावतो. भारतीय खंडाच्या आशिया खंडाला भिडलेल्या सीमारेषेवर तसाच प्रकार घडला आणि त्यातूनच हिमालयाचा जन्म झाला. टप्प्याटप्प्यानं त्याची उंची वाढत राहिली. ती अजूनही वाढतेच आहे. सर्वात उत्तुंग शहर एव्हरेस्टची उंची गेल्या शंभर वर्षांमध्ये ८-९ मीटरनी वाढली आहे. या रेट्यापायी तिबेटच्या पठाराचाही जन्म झाला. तो भूभाग पाच हजार मिटरने उंचावला गेला. तेव्हा हिमालयाचा जन्म हा गेल्या पाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारतवर्ष मात्र त्यापूर्वी कितीतरी कोटी वर्षं अस्तित्वात आलं होतं.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पॅरिस येथे आयोजित ३३ व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील* यांच्या कोणत्या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले ?२) विधवा प्रथा मोडीत काढण्याचा ठराव घेणारी आपल्या राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती ?३) भारतात कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात मोठी आहे ?४) 'उदर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.५) तानसेनचे मूळ नाव काय होते ? *उत्तरे :-* १) फायर विंग्स २) हेरवाड, कोल्हापूर ३) गुजरात ४) पोट ५) रामतनू पांडे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सौ. अर्चना नागोराव येवतीकर👤 गजानन काटेवाडे, पीएसआय, नांदेड👤 शिवाजी भटापूरकर👤 श्रीकांत चिनापूरकर👤 रवीकुमार कमलाकर👤 अभिजित नाईनवाड👤 ओम कांबळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिसणारे हे भले मोठे जग दिवसेंदिवस बदलणार आहे. कोणी म्हणतात की, जगाबरोबर आपण बदलले पाहिजे. पण, एवढेही आपण बदलू नये की, ज्यांनी मायेचा स्पर्श देऊन आलेल्या प्रत्येक परिस्थितीत सदैव सोबतीला राहून साथ दिली. जीवनात तर बरेच माणसे येतात आणि जातात पण,मायेचा स्पर्श व ती मिळालेली आपुलकी प्रत्येक माणसात नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पित्याचे ऋण*“बाई, तुमची लाकडं फोडायची आहेत का? घराची कौलं शाकारायचीत का? मला सांगा काम. चार पैसे मिळून जातील.” शाळेत जाणारा हा तेरा वर्षाचा मुलगा शाळेचा अभ्यास सोडून गावात घरोघरी जाऊन असली काम करायचा. शिकण्यापेक्षा त्याला अंगमेहेनतीची जास्त आवड. दुसऱ्यांची गुरं राखणं शेतात कामं करणं आणि एस. टी. स्टँडवर जाऊन हमाली करणे असले कोणतेही कष्टाचे काम असो ते करायची या मुलांची नेहमीच तयारी असायची. ही कष्टाची कामं करून आपण लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे हे त्या मुलाचे स्वप्र. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य. पोटाला पुरेसे खायला नाही. अंगावर घालायला लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नाही. अशा परिस्थितीत अभ्यासात या मुलाचे मन कसे रमावे ? पण आपल्या मुलाने खूप शिकावे ही त्या मुलाच्या वडीलांची जिद्द.                या मुलाचे वडील म्हणजे रामजीबाबा संकपाळ. माणूस मोठ्या खटपट्या, धीट प्रामाणिक आणि सरळ वृत्तीचा. तरुणपणी लष्करात नोकरी करून अंगच्या गुणांनी नाव मिळवलं. शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेलं, पण वाचनाची विलक्षण आवड. कुणी शिकवलं नाही तरी मोठी खटपट करून संस्कृत भाषेचा अभ्यास केला. मराठी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि गणित हा तर आवडीचा विषय. लष्करात सुभेदार म्हणून त्यांना बढती मिळाली, पण लष्करातील सैनिकांना आणि त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. लष्करातले मुख्याध्यापक म्हणूनच ते ओळखले जात. या पार्श्वभूमीवर मुलाने शाळेतील अभ्यास करायचा सोडून अंगमेहनत करून चार पैसे मिळवावेत हे त्यांना कसे पटावे? मुलाच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी ते सोडवायचे. त्याला शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन द्यायचे. मुंबईच्या जुन्या चाळीत रामजीबाबांचे बिऱ्हाड. स्वयंपाक, जेवण, अभ्यास, विश्रांती सारे काही एकाच खोलीत. खोलीत एकीकडे लाकडे आणि गोवऱ्या, तर दुसरीकडे भांड्यांची उतरंड, दळणाचं जातं, दुधासाठी बकरी हा सारा सरंजाम.अशा या वातावरणात मुलाचा अभ्यास कसा व्हावा? अभ्यासासाठी थोडे निवांत वातावरण मिळायचे ते फक्त पहाटे, पण पहाटे अभ्यासाला मुलाला लवकर उठवायचे, तर घरात गजराचे घड्याळ नाही. मग रामजीबाबा रात्री २ पर्यंत स्वत:ची काही कामं करत जागत बसायचे, आणि मुलाला अभ्यासासाठी उठवून तिथेच कडेला स्वतः झोपायचे. मुलाला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तर त्यांनी विशेष खटपट केली. स्वतःच्या तुटपुंज्या मिळकतीत त्याच्या अभ्यासाची पुस्तके आणि आवडीची इतर पुस्तके हे सारे कसे जमावे? मग रामजीबाबा मुंडासं गुंडाळून थोरल्या मुलीकडे जायचे. तिच्याकडे पैसे नाही मिळाले तर मग धाकटीकडे जायचे. तिच्याकडे रोख पैसे नसले तर तिचा एखादा सोन्याचा दागिना मागून घ्यायचे. तो दागिना गहाण टाकून मारवाड्याकडून कर्ज काढायचे आणि पेन्शनचे पैसे आले की मारवाड्याचे पैसे देऊन दागिना सोडवून आणायचे आणि मुलीला परत करायचे. मुलाच्या शिक्षणासाठी केवढा आटापिटा ! अर्थातच वडील आपल्या शिक्षणासाठी किती धडपड करतात हे लक्षात आल्यावर त्या मुलातही जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. हळूहळू अभ्यासातही गोडी वाटू लागली. हा मुलगा स्वभावाने खूप जिद्दी होता.पित्याचे आपला मुलगा खूप शिकावा हे स्वप्र पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने पुढील आयुष्यात विद्येसाठी कठोर तपश्चर्या केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बडोदा संस्थानाकडून शिष्यवृत्ती मिळवून परदेशात जाऊन शिक्षणाची एकामागून एक सर्वोच्च शिखरे सर केली. पण मुलाचे हे कौतुक पाहण्याचे भाग्य त्या प्रेमळ पित्याला लाभले नाही. अत्युच्य शिक्षण घेऊन सारे आयुष्य स्वतःच्या समाजाच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या या थोर सुपुत्राचे नाव, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.esakal.com/premier/juna-furniture-movie-review-mahesh-manjrekar-film-entertainment-news-pvk21••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_आंतरराष्ट्रीय नृत्य दिन_* *_ या वर्षातील १२० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:मध्यप्रदेशमध्ये मलखांबाला राज्य खेळाचा दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय* *१९९१:बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.**१९४५:दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली**१९३३:’प्रभात’चा ’सिंहगड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:प्रियदर्शन जाधव-- मराठी अभिनेता, दिग्दर्शक,निर्माता आणि पटकथा लेखक* *१९७९:आशिष नेहरा-- भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज तथा प्रशिक्षक**१९७२:तुषार जोशी-- कवी* *१९७१:आनंद भाटे-- किराणा घराण्याचे भारतीय शास्त्रीय गायक**१९७०:आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू**१९६६:फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज**१९६५:हेमंत मधुकर डांगे -- प्रसिद्ध कवी,गझलकार, लेखक* *१९६३:डॉ.सुधीर राजाराम देवरे-- प्रसिद्ध कवी,कथाकार,संपादक,अहिराणी भाषा संशोधक**१९५७:दीपक शिर्के-- भारतीय अभिनेता* *१९५२:माधुरी बळवंत पुरंदरे--भाषांतरकार, चरित्रकार,संपादक,नृत्य,नाटक,लेखन,गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान* *१९५०:अनिलकुमार तुळशीरामपंत काटकर-- लेखक**१९४६:अजित जोगी-- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,छत्तीसगडचे मुख्यमंत्री (मृत्यू:२९ मे २०२०)* *१९४६:रवींद्र गुर्जर-- जेष्ठ साहित्यिक,मराठी अनुवादक-लेखक* *१९४६:पं.प्रदीप नाटेकर -- ज्येष्ठ गायक**१९४३:चंद्रकांत मेहेंदळे-- नव्या रंगकर्मींना मार्गदर्शन करणारे,अनेक नाट्य स्पर्धांसाठी परीक्षण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी(मृत्यू:३० मे २०२०)**१९३६:झुबिन मेहता – भारतीय संगीतकार**१९२४:पुरुषोत्तम रामचंद्र बेहरे --मराठी लेखक,संपादक**१९१५:सीताराम किसन उके-- भक्ती गीते (मृत्यू:६ जून १९५०)**१९११:अनंत हरी लिमये --लेखक(मृत्यू:२३ जानेवारी १९७४)**१९१०:अरविंद गंगाधर मंगरूळकर--- संपादक,संशोधक,समीक्षक(मृत्यू:२७ मे १९८६)**१९०१:मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (मृत्यू:७ जानेवारी १९८९)**१८६७:डॉ.शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन' (मृत्यू:७ एप्रिल १९३५)**१८४८:राजा रविवर्मा – चित्रकार (मृत्यू:२ आक्टोबर १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:इरफान खान-चित्रपट अभिनेता (जन्म:७ जानेवारी १९६७)**२००६:जे.के.गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म:१५ आक्टोबर १९०८)**१९९९:मोहन वसंत गोखले-- मराठी अभिनेते-दिग्दर्शक(जन्म:७ नोव्हेंबर १९५३)**१९८०:श्रीकृष्ण केशव क्षीरसागर – लेखक, विचारवंत,समीक्षक(जन्म:६ नोव्हेंबर १९०१)**१९८०:सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (जन्म:१३ ऑगस्ट १८९९)**१९६०:पं.बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी.हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (जन्म:८ डिसेंबर १८९७)**१९४५:हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (जन्म:७ आक्टोबर १९००)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भावनाप्रधान, हृदयस्पर्शी कथा; 'जुनं फर्निचर' चित्रपट*महेश मांजरेकर आणि त्यांच्या टीमने कौटुंबिक व सामाजिक असा उत्तम चित्रपट दिला आहे. ही कथा आहे निवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या गोविंद राठोड या ज्येष्ठ नागरिकाची. ..... पूर्ण Review वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी केली आरोपीं विरोधात कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणुकीचा विद्यार्थ्यांना फटका; मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर - सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी भाषेच्या शुध्दीकरणाची प्रक्रीया निश्चित व्हावी - ज्येष्ठ मुर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात उन्हाचा प्रकोप, उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद; सर्वाधिक 20 रुग्ण धुळ्यातील, नाशिकचे तापमानही उच्चांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईत रात्रीच्या पोलीस नाकाबंदीत पैशांचं घबाड सापडलं, गाडीचा दरवाजा उघडताच सगळेच चक्रावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आरसीबीच्या विराट विजयात जॅक्स चमकला, गुजरातची धुलाई करत चार षटकं राखून सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रिएन्फोर्समेंट* 📙छपरावर टाकलेला पत्रा पन्हाळीचा का असतो ? स्कूटरच्या पत्र्याला विविध गोलांवर आतून जोड का दिला जातो ? ट्रकचा व मोटारचा पुढचा बंपर इंग्रज सी आकाराचाच का बनवतात ? घराच्या कॉलम व तुळ्यांमध्ये सिमेंट काँक्रिटमध्ये सळ्या का घालतात ? पोलादी गर्डरचा आकार इंग्रजी I प्रमाणे का असतो ?या सर्वाचे उत्तर एकच आहे. ताण सहन करण्यासाठी कमकुवत जागी विशेष आधार म्हणजेच रिएन्फोर्समेंट (reinforcement) द्यायला या गोष्टी केलेल्या असतात. घरावरचा पत्रा सरळ असता, तर त्यावर कोणी पाय दिला तर तो त्या जागी वाकला असता. पन्हाळीच्या आकाराने तो वाकू शकत नाही. तीच गोष्ट स्कूटरच्या पत्र्याची. अन्यथा साधी जोरात बुट्टी मारली, तरी त्याला कोच आला असता. बंपरचा आकार इंग्रजी सीप्रमाणे केल्याने कितीही जोरात धडक बसली तरी तो वाकू शकत नाही. 'आय'चा आकार असलेला पोलादी गर्डर तर कित्येक टनांचे वजन लीलया पेलू शकतो.काँक्रिटच्या बाबतीत जरा वेगळी परिस्थिती आहे. सिमेंट काँक्रीटचा ठोकळा केवळ वरून दाब दिला, तर कित्येक टनांचा दाब सहन करतो. पण समजा, काँक्रिटचा लांबुळका ठोकळा दोन बाजूंनी पकडून ओढायला सुरुवात केली; तर तो तडे जाऊन तुटायला वेळ लागत नाही. याउलट लोखंडाचे आहे. लोखंडावर प्रचंड दाब दिल्यास त्याचा आकार कदाचित बदलेल, पण लोखंड, सळई प्रचंड ताण सहन करू शकते. मग या दोन गोष्टी एकत्र केल्या तर ?नेमके तेच बांधकामशास्त्रात रिइन्फोर्स्ड काँक्रिट बनवून तयार केले आहे. सर्व प्रकारचा दाब काँक्रिट सहन करते, तर सर्व प्रकारचा ताण आतील लोखंडी सळ्या सहन करतात. कितीही उंच बांधकाम असो किंवा कितीही लांब अंतराची काँक्रिटची तुळई असो; रिएन्फोर्सड काँक्रिट वापरले असले की, चिंता करायचे कारणच राहत नाही.निसर्गातसुद्धा हे रिइन्फोर्समेंटचे तत्त्व कित्येक ठिकाणी अंमलात आलेले दिसते. फक्त त्यादृष्टीने बघायची नजर मात्र पाहिजे. शंख बघा किंवा शिंपला; जिथे वक्राकृती आकार येतो, तिथे आतील बाजूने बारीक जाड रेषांनी रिइन्फोर्समेंट दिलेली असते.उंच वाढणारे मोठ्या बुंध्याचे कोणतेही झाड बघा, त्याच्या जमिनीपासून दोन तीन फूट उंचीचा बुंधा हा उलट्यासुलट्या दिशेने पन्हाळीप्रमाणे आकार घेऊन मगच जमिनीत शिरलेला दिसतो. म्हणजेच वाऱ्याचा ताण सहन करण्यासाठी या पन्हाळीमुळे बुंध्याला पूर्ण ताकद मिळत जाते.याच रिएन्फोर्समेंटच्या तत्त्वानुसार भरीव लोखंडी कांबीपेक्षा पोकळ लोखंडी कांब वजनाने हलकी असून जास्त ताकदवान असते, हे तुम्ही अनेकदा वाचले असेलच.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संताप हा अग्नीसारखा माणसाला जाळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तुळस ही वनस्पती कशाचे प्रतीक मानले जाते ?२) तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला काय म्हणतात ?३) वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते तुळस ही वनस्पती दिवसात किती तास ऑक्सिजन हवेत सोडते ?४) तुळशीचे प्रकार कोणते ?५) तुळशीला इंग्रजीत काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) मंगलतेचे, पावित्र्याचे २) मंजिरी ३) २० तास ४) काळी तुळस व हिरवी तुळस ५) Holy Basil ( होली बेसिल )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नीलम गायकवाड, उपक्रमशील शिक्षिका, पुणे👤 राजू गाजरे, अहमदनगर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाटीं ॥धृ॥ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥२॥तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती ज्या परिस्थितीतून जात असते ती व्यक्ती, परिस्थितीला चांगल्याने ओळखत असते व त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात त्या अश्रूंची भाषा समजत असते ती व्यक्ती,कोणाच्याही डोळ्यातील अश्रू बघून आनंदीत होत नाही. कारण, परिस्थितीचे येणे किंवा जाणे कोणाच्याही हातात नसते. म्हणून कोणावर आलेल्या परिस्थितीवर हसू नये व आनंद घेऊ नये. शक्य झाल्यास माणुसकीच्या नात्याने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरुदक्षिणा*फार पूर्वी आश्रमात गुरूजवळ राहून गुरूची आणि गुरू पत्नीची सेवा करून, त्यांचे जीवन जवळून पाहून विद्येसाठी तपश्चर्या करण्याचा तो काळ होता. विद्येचा विक्रय करणं हे त्या काळात पाप समजले जाई. असाच तक्षशिला येथील आयुर्वेदाचार्य आत्रेय गुरुजींचा आश्रम. राजपुत्रांपासून ते सामान्य दासीपुत्र आणि भिल्लकुमारांपर्यंत अनेक प्रकारचे शिष्य त्यांच्याकडे शिकून जात. शिक्षण संपवून आश्रम सोडून जाताना विद्यार्थी स्वेच्छेने काही गुरुदक्षिणा देत. त्या दिवसाची अशीच ती प्रसन्न सकाळ. गुरुजींचा निरोप घेताना विद्यार्थी गुरूदक्षिणा देत आणि गुरुजी त्यांना तोंडभरून आशीर्वाद देत. असे करता करता गुरुजींचे लक्ष एका विद्यार्थ्याकडे गेले. एका कोपऱ्यात तो उदासवाणा होऊन गुरुजींकडे पाहात होता… गुरुजींनी त्याला जवळ घेतले आणि विचारले, “काय रे बाळ, तू असा उदास का? कसल्या एवढ्या विचारात गढून गेलास ?” “गुरुजी सगळ्यांनी काही ना काही तरी गुरुदक्षिणा दिली. पण मी इतका सामान्य आहे. गुरूदक्षिणा देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही.” त्या विद्यार्थ्याच्या बोलण्यात बरेच तथ्य होते. तो होता बिंबिसार राजाला राजगणिकेपासून झालेला मुलगा. लहानपणापासूनच रानावनात सोडून दिलेला. पण राजाच्या एका दासीपुत्राने त्याला आश्रय दिला, त्याला लहानाचा मोठा केला आणि नंतर तो गुरुजींकडे शिक्षणासाठी आला. गुरुजींना हे सारे माहीत होते. विद्यार्थ्याच्या पाठीवरून हात फिरवून ते म्हणाले, “अरे मी तुझी परिस्थिती जाणतो. तू ज्ञानासाठी तपश्चर्या अखंडपणे चालू ठेव. हीच माझी गुरुदक्षिणा.” पण तो विद्यार्थी ऐकेना. काहीतरी गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय मनाचे समाधान होणार नाही असे त्याचे म्हणणे. शेवटी गुरुजींनी आज्ञा केली, “ज्याचा जगाला काहीही उपयोग नाही अशा झाडाची चार पानं मला गुरुदक्षिणा म्हणून आणून दे.”गुरुजींची आज्ञा प्रमाण मानून तो विद्यार्थी गुरुदक्षिणेच्या शोधात निघाला. गावोगावी, रानावनातून, जंगलातून, दऱ्याखोऱ्यातून खूप भटकला. कोणतेही झाड दिसले की या झाडाचा उपयोग काही आहे का? याचा त्याने शोध घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला रोजच्या व्यवहारात आढळणाऱ्या तुळस, बेल, कोरफड, कडुनिंब, दुर्वा, नारळ, आंबा अशा वनस्पती झाल्या. निरनिराळ्या प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे झाली. त्याच्या लक्षात आले की काही वनस्पतींचा औषधासाठी उपयोग होऊ शकतो, काही वनस्पतींचा एकापेक्षा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. हजारो प्रकारच्या झाडांचा त्याने अभ्यास केला. हे काम जवळ जवळ तीन वर्षेपर्यंत चालू होते. या तीन वर्षात जमवलेल्या माहितीचे भले मोठे बाड जमा झाले. थकला बिचारा. पण गुरुजींना हवी तशी वनस्पती मिळाली नाही. निराश मनानं तो गुरुजींकडे आला आणि हताशपणाने झाला प्रकार सांगितला. गुरुजी प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, “अरे जगामध्ये निरुपयोगी असं एकही झाड नाही हे का मला माहीत नव्हतं? माझी आज्ञा तू प्रमाण मानलीस. मला माझी गुरुदक्षिणा मिळाली.” अशी अलौकिक गुरुदक्षिणा देणाऱ्या त्या विद्यार्थ्याचे नाव जीवक. आयुर्वेदातील तो एक तज्ञ मानला जातो. शल्यचिकित्सेतही तो प्रवीण होता. गौतम बुद्धांचा तो निष्ठावान अनुयायी होता.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/GWa1vbjp8h2WrxSP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक जलसंपत्ती दिन'_* *_भारतीय पंचायत राज दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ११५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९३:७३ वी घटना दुरुस्ती महिलांना ३३% आरक्षण* *१९९३:इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली**१९९०:डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.**१९७०:गाम्बिया प्रजासत्ताक बनले.**१९६८:मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.**१९६७:वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.**१९२९:इंग्लंड आणि भारत दरम्यान पहिले विमान उड्डाण* *१९२०:पोलंच्या सैनिकांचे युक्रेनवर आक्रमण**१८००:अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.**१७१७:[वैशाख व. ९, शके १६३९] खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला**१६७४:भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:मेघना सुधीर एरंडे-- भारतीय अभिनेत्री* *१९७८:प्रसाद रामचंद्र नामजोशी -- लेखक, दिग्दर्शक**१९७३:सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न**१९७०:डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९६३:डॉ.सुरुची सुधीर डबीर -- लेखिका* *१९४७:अरुण काकतकर-- दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते व लेखक* *१९५५:दिलीप मुरलीधर देशपांडे-- लेखक, ज्येष्ठ पत्रकार(विविध वृत्तपत्रामधून विविध विषयावर सातत्याने लेखन)**१९४३:पंडित श्रीराम शहापूरकर-- प्रसिद्ध हार्मोनियम वादक(मृत्यू:८ ऑक्टोबर २०१४)**१९४२:बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री,गायिका,चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका**१९३९:मीरा कोसंबी-- प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ(मृत्यू:२६ फेब्रुवारी २०१५)* *१९३८:मॅक मोहन -- हिंदी चित्रपटांमधील अभिनेता(मृत्यू:१० मे २०१०)**१९३६:पद्माकर गोवईकर-- मराठी नाटककार व कादंबरीकार(मृत्यू:२२ जुलै २००१)**१९३५:डॉ.बिंदुमाधव दत्तात्रय पुजारी-- व्यवसायाने डॉक्टर असलेले लेखक**१९३०:बाळ ठाकूर (भालचंद्र श्रीराम ठाकूर)--महाराष्ट्रातील प्रख्यात मुखपृष्ठ चित्रकार (मृत्यू:८ जानेवारी २०२२)* *१९२९:राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (मृत्यू:१२ एप्रिल २००६)**१९२४:प्रल्हाद नरहर जोशी--- संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक,कादंबरीकार(मृत्यू:५ जून २००४)**१९१०:राजा परांजपे –चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (मृत्यू:९ फेब्रुवारी १९७९)**१९०४:केशव नारायण काळे-- मराठीतील कवी,नाटककार,समीक्षक,चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू:२० फेब्रुवारी १९७४)**१८८९:सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (मृत्यू:२१ एप्रिल १९५२)**१८९६:रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.’पाणकळा’,’सराई’,’पड रे पाण्या’,’आई आहे शेतात’,’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या.(मृत्यू:४ जुलै १९८०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (जन्म:२३ नोव्हेंबर १९२६)**२००६:गोविंद मोघाजी गारे-- आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक(जन्म:४ मार्च १९३९)**२००४: इंदुमती गंधे-- विदर्भातील बालसाहित्यिक,अनुवादक(जन्म:२० नोव्हेंबर १९२०)**१९९९:सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक (जन्म:१९२१)**१९९४:शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती,किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ (जन्म:२८ मे १९०३)**१९९२:अनंत महादेव मेहंदळे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(जन्म:७ फेब्रुवारी १९२८)**१९७४:रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (जन्म:२३ सप्टेंबर १९०८)**१९७२:जामिनी रॉय – चित्रकार (जन्म:११ एप्रिल १८८७)**१९६०:लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील,महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक,केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते (जन्म:१८६०)**१९४२:मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म:२९ डिसेंबर १९००)**१९३५:रघुनाथ पांडुरंग करंदीकर-- व्यासंगी कायदेपंडित,स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते,साहित्यिक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी(मृत्यू:२१ ऑगस्ट१८५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सचिन रमेश तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मुकुंद कुलकर्णी यांचा लेख*मास्टर ब्लास्टर भारतरत्न पुत्र*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *Lok Sabha Elections 2024: उष्णतेच्या लाटेमुळे मतदान होणार कमी? निवडणूक आयोगाने नेमली टास्क फोर्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन व्हेरिएंटचे यशस्वी प्रक्षेपण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिठीमुळे शेतीचे मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *खालापूर येथील S.H. केळकर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशातील मतदानाची टक्केवारी कमी होणे चिंताजनक काँग्रेस नेते माणिक ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयाची चोरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईने लखनऊ समोर ठेवले 211 धावाचे लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅथॉलॉजी म्हणजे काय ?* 📙 शरीरांतर्गत अनेक क्रिया प्रक्रिया जन्मल्यापासून चालू असतात. शरीरक्रियाविज्ञानामध्ये त्यांचा वेध घेतला जातो. या कोणत्याही क्रियेमध्ये बिघाड झाला म्हणजे तो बिघाड शोधण्याची प्रक्रिया पॅथालॉजीमध्ये सुरू होते. रक्त, लघवी, थुंकी, रक्ताचे विविध घटक व त्यांचे बदलते प्रमाण या साऱ्यांची तपासणी करून त्यावरून निदान करण्यासाठी या शास्त्राची मदत सारखीच लागत असते. एवढेच नव्हे तर वरवर निरोगी दिसणाऱ्या माणसाच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या केल्यास अनेक गोष्टी उघडकीला येऊ शकतात. उदाहरणार्थ, नुकताच शरीरात प्रवेश केलेला मधुमेह किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर आढळणारा रक्तक्षय हा सहसा तपासणीतून अचानक सामोरा येतो.शरीरातील विविध द्रवांच्या चाचण्या घेण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी अनेक रासायनिक क्रिया करून मगच निष्कर्षाप्रत येता येत असे. या तंत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल उपकरणांमुळे झपाट्याने प्रगती होत गेली. रक्तातील तांबड्या, पांढऱ्या पेशी मोजण्यासाठी आता सेलकाऊंटरसारखे उपकरण उपलब्ध झाल्याने काही मिनिटांत संपूर्ण तपासणी अचूक पद्धतीत पूर्ण होऊ शकते. रक्तातील साखर, अल्बुमिन किंवा अनेक घटक काही सेकंदात मोजू शकणारी उपकरणे आता रुग्ण स्वतःच्या घरीही वापरू शकतो.शरीरातील नलिकाविरहित ग्रंथींचे (एंडोक्राइन ग्लँड) स्रावांचे प्रमाण मोजणे, विविध हार्मोन्सची शरीरातील पातळी मोजणे हे काही वर्षांपूर्वी अत्यंत त्रासाचे व गुंतागुंतीचे होते. ते आता विविध उपकरणे व त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधीच रासायनिक प्रक्रिया केलेल्या पट्ट्या किंवा द्रावांमुळे कोणत्याही शहरातील प्रशिक्षित तंत्रज्ञ करू शकतो. असे तंत्रज्ञ करा तयार करण्याचे (DMLT / BM Tech) अभ्यासक्रम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या गावीही सुरू झाले आहेत. डॉक्टरी पदवी घेतल्यावर ३ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पॅथालॉजी व बॅक्टेरियॉलॉजी या विषयात तज्ज्ञ म्हणून काम सुरू करता येते. अधिक अनुभवानंतर शरिरातील कोणत्याही अवयवाचे सूक्ष्म तुकडे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून त्यांतील दोष निश्चित करता येतात. पेशींच्या रचनेचे बदल होऊन कॅन्सरची सुरुवात असेल असेल तर त्याचेही निदान तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच करतात. शरीरातील द्रवात सापडणारे जंतू कृत्रिमरित्या वाढवून त्यांच्यावरील उपाययोजना सुचवणे हा बॅक्टेरियॉलॉजीचा भाग असतो.अनैसर्गिक मॄत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे आवश्यक असते. अशा वेळी शरीरातील विविध भागांचे निरीक्षण करून मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी तज्ज्ञ पॅथॉलॉजीस्टचीच मदत घेतली जाते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सन्मानाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक वसुंधरा दिवस - २०२४ ची थीम* काय आहे ?२) कांदा कापतांना कोणता वायू बाहेर पडतो ?३) पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहास काय म्हणतात ?४) 'अंगार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?*उत्तरे :-* १) प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक २) अमोनिया ३) दिंडी ४) निखारा ५) तानसा नदी, ठाणे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जगदीश पा. नवले, परभणी👤 भूमाजी मामीडवार👤 सौरभ कोटपल्लीवार👤 कवी विशाल मोरे👤 अझीझ पटेल👤 अनिरुद्ध उत्तरवार👤 महावीर जैन👤 दत्ता फत्तेपुरे, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो.पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अध्यात्म आणि व्यवहार*एकदा आद्यशंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्याबरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही. खट्याळ, तरुण शिष्यही होते. त्यातील एकजण धाडस करून त्यांना म्हणाला, “तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे. मग आपण का पळताहात ?’शंकराचार्य लगेच म्हणाले, “पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे ?” तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली.होतं काय की, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/priya-bhosale-article-on-veteran-actress-lalita-pawar/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ११० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:महाराष्ट्र विधान भवनाचे इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते उद्घाटन* *१९७५:’आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला**१९७१:सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले**१९५६:गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.**१९४८:ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४५:सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१५२६:मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर याने दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा पराभव करुन मोगल राजसत्तेचा पाया घातला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:मारिया शारापोव्हा – रशियन लॉनटेनिस खेळाडू**१९७९:रंजना सतीश खेडकर-- कवयित्री* *१९७३:डॉ.अशोक लिंबेकर -- लेखक, समीक्षक**१९७२:सचिन जगताप-- प्रसिद्ध बासरी वादक**१९६८:रूपक कुलकर्णी-- बासरी वादक,पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य**१९६४:प्रा.डॉ.संदीप पांडुरंग ताटेवार-- लेखक* *१९६२:डॉ.आनंद सदाशिव सहस्त्रबुद्धे-- कथा,कादंबरी लेखन करणारे लेखक* *१९५७:मुकेश अंबानी – प्रसिद्ध उद्योगपती**१९५५:भिकू नारायण बारस्कर -- प्रसिद्ध कथाकार,चरीत्रकार,संपादक**१९४१:माधव सरपटवार-- लेखक,पत्रकार, संपादक**१९३७:भगवान भटकर-- प्रसिद्ध कवी, विचारवंत* *१९३३:डिकी बर्ड – ख्यातनाम क्रिकेट पंच**१९३०:मालती पांडे-बर्वे-- हिंदी आणि मराठी भाषांत गाणाऱ्या मराठी गायिका(मृत्यू:२७ डिसेंबर १९९७)**१९२६:प्रभाकर विष्णू सोवनी-- विज्ञान विषयक लेखन करणारे लेखक,संपादक (मृत्यू:२० नोव्हेंबर २०१५)**१९२५:अनंत रामचंद्र कुलकर्णी-- मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक,संशोधक, इतिहासकार.(मृत्यू:२४ मे २००९)**१९१२:ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२५ फेब्रुवारी १९९९)**१८९५:केशव नारायण वाटवे-- साहित्यविमर्शकार,समीक्षक( मृत्यू:९ मे १९८१)**१८९२:ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले.(मृत्यू:३१ ऑगस्ट १९७३)**१८६८:पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (मृत्यू:२७ जानेवारी १९४७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार (जन्म:७ जून १९१३)**२००९:अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (जन्म:८ जुलै १९२२)**२००८:सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका(जन्म:७ जानेवारी १९२०)**१९९४:मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ – पंजाबचे माजी मंत्री.पाकिस्तानच्या ’पॅटन’ रणगाड्यांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांचा ’ईगल’ (गरूड) म्हणून गौरव केला असता,मी तर केवळ एक ’स्पॅरो’ (चिमणी) आहे,असे त्यांनी सांगितले,आणि तेच त्यांचे टोपणनाव रुढ झाले.**१९९३:डॉ.उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक, पत्री सरकारमधे त्यांचा सहभाग होता**१९७४:आयुब खान – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१४ मे १९०७)**१९५५:जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ,शिकारी व लेखक (जन्म:२५ जुलै १८७५)**१९१०:अनंत कान्हेरे – क्रांतिकारक (जन्म: १८९१)**१९०६:पिअर क्यूरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१५ मे १८५९)**१८८२:चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म:१२ फेब्रुवारी १८०९)**१८८१:बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म:२१ डिसेंबर १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सामनामध्ये प्रकाशित प्रिया भोसले यांचा प्रासंगिक लेख*ललिता पवार - जन्मदिन विशेष*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज पहिल्या टप्प्यातील मतदान :10 हजार 652 मतदान केंद्रांवर 95 लाख 54 हजार मतदार करणार उमेदवारांचा फैसला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने जप्त केली 97 कोटींची मालमत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठी दुर्घटना ! कोयनेच्या शिवसागर जलाशयात स्पीड बोट बुडाली, तिघे करत होते प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ललित साहित्य म्हणजे सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज:इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गीत रामायणातील 56 गीतांचे होणार सादरीकरण:पुण्यात 'हटके' कार्यक्रम; तब्बल 25 हून अधिक कलाकारांचा असेल समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रेडाई देणार भावी अभियंत्यांना प्रशिक्षण:नवअभियंत्यांना 200 तासांचे कौशल्याधारित मार्गदर्शन; क्रेडाई मेट्रो-VIIT मध्ये सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई इंडियन्सने पंजाबला 9 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *उन्हाळी लागणे म्हणजे काय ?* 📕************************बऱ्याचदा उन्हामुळे असा त्रास आपल्याला होत असतो. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे व मूत्रमार्ग दुखणे. लघवीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर मूत्रनलिकेतील आवरणास इजा होते. त्यामुळे लघवी करताना आग होते. मूत्रनलिकेत आवरणाचा दाह होत असल्याने साध्या लघवीमुळे जळजळ होते. मूत्रपिंडामध्ये लघवी तयार होत असते. मूत्र तयार होण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरातील पाणी, क्षार यांचे संतुलन राखणे व शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे हा आहे. साहजिकच पाणी कमी प्यायले, तर मूत्राचे प्रमाण कमी होते; परंतु मूत्रातील क्षारांचे व टाकाऊ पदार्थांचे प्रमाण तेवढेच राहते. साहजिकच त्यामुळे लघवी सौम्य न होता जळजळीत होते. अशावेळेस लघवी गडद पिवळी किंवा लालसर दिसते. यामुळे मूत्रनलिकेच्या आवरणाचा दाह होतो. पाणी कमी पिणे, या कारणाशिवाय जंतूसंसर्गामुळे, मूतखड्यामुळे मूत्रनलिकेला दाह होऊन लघवी करतेवेळी जळजळ होते.यावर उपाय म्हणजे नेहमीच विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे. घामाचे प्रमाण लक्षात घेऊन दिवसभरात एक लिटर लघवी होईल इतके पाणी प्यावे. उन्हाळी लागलेली असल्यास लिंबूपाण्यात खाण्याचा सोडा टाकून प्यावे. १०० मिलीलिटर म्हणजे साधारणतः एक कप पाण्यात २.५ ग्रॅम धने भिजत ठेवून ते पाणी साखर टाकून १२-१२ तासांनी प्यायल्याने उतारा पडतो/ जळजळ कमी होण्यास मदत होते.*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्यावे' हे उद्गार कोणाचे आहेत ?२) राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?३) हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?४) 'आज्ञा' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शाहू महाराज २) राष्ट्रपती ३) सिंधू ४) आदेश, हुकूम ५) सुविधा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हर्षवर्धन घाटे, पत्रकार, बिलोली👤 भक्ती जठार👤 संदीप बोलचेटवार, धर्माबाद👤 संतोष पुरणशेट्टीवार, धर्माबाद👤 मनोज रामोड👤 अझर शेख👤 बालाजी पोरडवार👤 संदीप काटमवाड, बिलोली👤 सचिन कनोजवार👤 कृष्णा राय*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥१॥तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भांड्यावर झाकण असते पण, तोंडावर नाही. लाकडाचा तोंड राहिला असता तर केव्हाचाच फुटला असता. या, प्रकारचे शब्द अनेकांच्या बोलण्यातून ऐकायला मिळत असते. म्हणून ज्यांना ज्या,शब्दात बोलण्याची सवय आहे त्यांना बिनधास्तपणे बोलू द्यावे त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष देऊ नये. ते आपले काम करतात आपण आपले काम करत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शास्त्राचा उपयोग कोणता ?*प्राचीन भारतात नागार्जुननावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती.दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले म्हणा ना – आचार्यांनी दोघात एक पदार्थदिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. तीन दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, ‘कामात काही अडचणी तर आल्या नाहीत?’ पहिला अभिमानाने म्हणाला, “आईला ताप होता वडील पोटदुखींना हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणल आहे.” दुसरा म्हणाला, आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याचे व्यवस्था लावण्यातवेळ गेला. आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी.आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, ‘रसायन शास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे, समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?’ तात्पर्यः ज्ञानाचा/शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 एप्रिल 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/article-by-parth-bawskar-on-shree-ram-ramnavami/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ जागतिक वारसा दिन_* *_ या वर्षातील १०९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_जागतिक वारसा दिन_**_आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी अनेक मंदिरे,गुहा,लेणी,किल्ले,स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्यासंबंधात आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टींचे जतन होण्यासाठी हा दिवस ’जागतिक वारसा दिन’ (World Heritage Day) म्हणून साजरा केला जातो._*••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण**१९९४:वेस्टइंडीजचा फलंदाज ब्रायन लारा यांच्या विक्रमी३७५ धावा**१९८०:झिंबाब्वेचा स्वातंत्र्य दिन**१९७१:एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ’सम्राट अशोक’ शाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.**१९५४:गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.**१९५०:आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली**१९३६:पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.**१९३०:क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.**१९३०:आज काहीही बातमी नाही असे बी. बी.सी.या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले**१९२७:पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन डॉ. निकल मॅक्निकल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भरले**१९२४:सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.**१९१२:’टायटॅनिक’ मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन ’कार्पेथिया’ हे जहाज न्यूयॉर्कला पोचले**१८९८:जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी**१८५३:मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.**१८३१:’यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा’ ची स्थापना झाली.**१७२०:शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्‍हाडनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.**१७०३:औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:शेखर गिरी-- कवी,गझलकार* *१९७६:किरण शिवहर डोंगरदिवे-- प्रसिद्ध कवी,समीक्षक आणि ललित लेखक**१९७५:नेहा बाजपेयी--भारतीय अभिनेत्री आणि निर्माती**१९७१:गणेश विठ्ठलराव कुंभारे-- कवी,लेखक**१९६७:विद्या बनाफर -- कवयित्री,लेखिका* *१९६६:अनिल सूर्या-- कवी,कथाकार**१९६५:प्रा.डॉ.निशा निळकंठ शेंडे -- लेखिका**१९६५:सविता प्रभुणे--- भारतीय अभिनेत्री* *१९५८:माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू:४ नोव्हेंबर १९९९)**१९५६:पूनम धिल्लन – अभिनेत्री**१९५०:अलका चंद्रकांत दराडे-- कवयित्री,लेखिका**१९४७:महेंद्र संधू--भारतीय अभिनेता* *१९२३: मधुसूदन परशुराम पेठे -- संत साहित्याचे अभ्यासक,ग्रंथालयशास्त्र तज्ञ* *१९१७:वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन--कथाकार, कादंबरीकार,नाटककार,प्रवासवर्णनकार (मृत्यू:२ सप्टेंबर २०१०)**१९१६:ललिता पवार – अभिनेत्री (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९९८)**१८५८:महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण,भारतरत्‍न (मृत्यू:९ नोव्हेंबर १९६२)**१८९९:काशीनाथ श्रीधर नायक-- कोंकणी कवी,प्रकाशक व मुद्रक**१७७४:सवाई माधवराव पेशवा-- यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म(मृत्यू:२७ आक्टोबर १७९५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (जन्म:२२ आक्टोबर १९४२)**१९९५:पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक**१९७२:डॉ.पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, (जन्म:७ मे १८८०)**१९६६:जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ,त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली.(जन्म:३० ऑगस्ट १८८३)**१९५५:अल्बर्ट आइनस्टाइन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१४ मार्च १८७९)**१८९८:दामोदर हरी चापेकर यांना फाशी [चार्ल्स रँड याची हत्या करणारे] (जन्म:२४ जून १८६९)**१८८६:बजाबा रामचंद्र प्रधान-- इंग्रजी कवितेचा अनुवाद-अनुकरण करणारे मराठी कवी(जन्म:१८३८)* *१८५९:१८५७ च्या राष्ट्रीय उठावातील सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा ’तात्या’ टोपे यांना फाशी देण्यात आले. (जन्म:१८१४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीराम नवमी निमित्ताने दैनिक सामना मध्ये प्रकाशित श्री पार्थ बावसकर यांचा वाचनीय लेख*भारतीय लोकजीवनाचा आदर्श*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिरीष घाटपांडेंना अ. भा. मराठी प्रकाशक संघाचा जीवनगौरव पुरस्कार:तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार डॉ. तारा भवाळकर यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणूक प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ, प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी स्वामींनी घेतला आढावा; संभाजीनगरातील वाहतूक मार्गात उद्यापासून असणार बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत आरटीई’ अंतर्गत १३८३ पात्र शाळांमध्ये एकूण २९ हजार ०१४ जागा उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वाहतूक कोंडीतून होणार मुंबईकरांची सुटका! शीव-पनवेल महामार्गाला जोडणार नवा पूल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - दिल्ली कॅपिटलने गुजरात टायटनचा केला 6 विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फेफरे किंवा फीट येणे* 📙 एखाद्या शाळेचा वर्ग चालू असतो किंवा मैदानावर खेळाचा तास चाललेला असताना एखादा मुलगा बघता बघता उभ्याचा आडवा पडतो. नुसता तो आडवाच पडतो असे नव्हे तर त्याच्या तोंडातून फेस येतो, तो डोळे फिरवतो, क्वचित दातखीळ बसते व त्याच वेळी त्याचे हातपायपण पिळवटले जातात, ताठ होतात. काही वेळा त्याची बेशुद्धी काही क्षणच टिकते, तर काही वेळा विशेष औषधोपचार करून त्याला शुद्धीवर आणायला लागते. यालाच फेफरे येणे, फिट येणे असे म्हणतात. एपिलेप्टिक सीझर असे या आजाराचे स्वरूप सांगितले जाते; पण वस्तुतः हा आजार नव्हे, तर ही एक शारीरिक स्थिती आहे. मेंदूचे कामकाज चालू असताना तेथे सतत विद्युत संवेदना निर्माण होऊन शरीरभर पाठविल्या जात असतात. या संवेदनांच्या स्वरूपात तीव्र बदल झाल्यास फेफरे येते. फेफरे येण्याच्या काळात मेंदूच्या कामाचा आलेख (Electro-Encephalo Graph) काढला, तर त्यावरून ही स्थिती नीट समजते.एखाद्याला फेफरे येते म्हणून त्याच्या आयुष्यातील अन्य गोष्टींवर काही विपरीत परिणाम झालेला असतोच, असे मात्र नाही. काही वेळा याउलट मात्र असू शकते. मेंदूच्या गंभीर आजाराचे दृश्य स्वरूप म्हणून प्रथम फेफरे येणे ही स्थिती उद्भवलेली आढळून येते. उदाहरणार्थ मेंदूमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरमध्ये, ब्रेनट्युमरमध्ये फेफरे ही पहिली तक्रार असू शकते.फेफरे येते, त्यावेळी अशा माणसाभोवती गर्दी न करता त्याला आहे तेथेच नीट कुशीवर वळवून झोपवावे. मान मागे करावी म्हणजे श्वास घ्यायला अडचण होत नाही. घशात लाळ साचून अडथळा येत नाही. दातखीळ बसत आहे. असे वाटल्यास एखादी लाकडी वस्तू दातात धरायला द्यावी व दोन दातांमध्ये ठेवावी. त्यांचे कपडे, पट्टा सैल करावा. त्याला कधीही पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नये. बहुधा काही मिनिटांतच फेफरे जाते. त्यामुळे तात्काळ धावपळ करून डॉक्टर गाठण्याची गरज पडत नाही.फेफरे येण्यावर अलीकडे चांगली औषधे उपलब्ध असून या स्थितीवर खुपसे नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. सामान्यपणे लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोड्या कमी लोकांत हा प्रकार आढळतो. वाहन चालवणे, विस्तवाजवळ वा धोक्याच्या जागी काम करणे व पोहणे या गोष्टी मात्र फेफरे येणाऱ्यांनी कायम टाळाव्यात; कारण या तिन्हींमध्ये त्यांच्या जीवाला धोका उद्भवतो.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ आहे तर घाम गाळा नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भाजीपाला मिळण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात ?२) देशातील ज्या भागांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण असते, अशा भागांना काय म्हणतात ?३) कोणत्या देशाची टोपण नावे Lion City, Garden City, Red Dot अशी आहेत ?४) 'आस' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) भारतातील पहिला विमानतळ कोणता ? *उत्तरे :-* १) भाजीमंडई २) केंद्रशासित प्रदेश ३) सिंगापूर ४) इच्छा, मनीषा ५) जुहू विमानतळ *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गझलकार शेखर गिरी👤 मनोज खुटे👤 देवराव पाटील कदम👤 योगेश मरकंटी👤 राजू मेकाले👤 चंद्रकांत तालोड👤 चंद्रशेखर अनारे👤 बालाजी गादगे, शिक्षक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काम लहान असो किंवा मोठे शेवटी काम ते कामच असते. असे, अनेकदा ऐकण्यात तसेच वाचण्यात आले आहे. .हाती घेतलेले काम पूर्ण श्रध्देने, निष्ठेने व स्वतः वर विश्वास ठेवून केल्यावर आपल्याला जो, समाधान मिळते तोच समाधान जगावेगळा असते. म्हणून कोणत्याही कामाला कमी लेखू नये व मिळालेल्या यशाला गर्वाच्या भोवऱ्यात अडकवून ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरा शिष्य कोण ?*एकदा दोन तरुण स्वामीविवेकानंदाकडे गेले. त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी स्वामीजींनासांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्त बसले. दुसरे दिवशी तोच प्रकार – कंटाळले– पण एकजन स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष देई, “तुमच्यात माणुसकी नाहीतुम्ही कठोर आहात” वगैरे. पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचेशिष्य होण्यास योग्य आहोत. एक जण रोज पूजा करी दुसरा दोष देई. एक दिवस नदीलापूर आला पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा -स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोषदेणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला. असे तीन दिवस चालले. चौथ्यादिवशी पुर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्याला शिष्य म्हणूनस्वीकारले. ते म्हणाले, “शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो. निष्ठाहवी. तामसी वृत्ती बदलता येईल. पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल.”तात्पर्यः कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 एप्रिल 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/QTphTzLxRqraanB1/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'जागतिक आवाज दिन (World Voice Day)'* *_ या वर्षातील १०७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: चालकरहित ’निशांत’ विमान व जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’त्रिशूल’ क्षेपणास्त्राची ऒरिसातील चंडीपूर येथे चाचणी**१९९५:देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्‍नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांना ’ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान**१९७२:केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून ’अपोलो-१६’ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले**१९४८:राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना**१९२२:मुळशी सत्याग्रह सुरू झाला.**१८५३:भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:सिद्धार्थ शंकर महादेवन-- गायक* *१९८२:स्वप्ना पाटकर --भारतीय लेखिका, गीतकार,आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या एक फिल्म निर्माता* *१९७८:कविता मोरणकर -- कवयित्री, लेखिका* *१९७८:लारा दत्ता – मॉडेल,हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती,मिस युनिव्हर्स (२०००)**१९७८:प्रा.डॉ विनायक पवार-- कवी,चित्रपट कथा लेखक**१९६३:सलीम मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६०:प्रा.डॉ.संपदा सुधीर कुल्लरवार-- कवयित्री,लेखिका**१९५६:सलीम आबालाल शेख -- लेखक**१९५३:ज्योत्स्ना श्रीकांत शिंत्रे -- लेखिका* *१९४८:ज.मो.अभ्यंकर- लेखक,अध्यक्ष,राज्य अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्य,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग**१९४४:सुहासिनी कीर्तीकर-- लेखिका* *१९४०:बनवारीलाल पुरोहित-- पंजाब राज्याचे राज्यपाल**१९३४:रामचंद्र दामोदर तथा राम नाईक – माजी केन्द्रीय पेट्रोलिअम मंत्री,माजी राज्यपाल तथा लेखक**१९२६:श्यामराव कांबळे -- संगीत संयोजक (मृत्यू:१७ आक्टोबर २०१८)**१९२२:नीळकंठ पुरुषोत्तम जोशी -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक(मृत्यू:१५ मार्च २०१६)**१८८९:चार्ली चॅपलिन – अभिनेता,दिग्दर्शक आणि संगीतकार.त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटातील डर्बी हॅट,घट्ट कोट ढगळ पँट,चौकोनी मिशा,बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (मृत्यू:२५ डिसेंबर १९७७)**१८६७:विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (मृत्यू:३० मे १९१२)**१८४८:कंदुकुरी वीरेसालिंगम-- मद्रास प्रेसिडेन्सी,ब्रिटिश भारतातील एक समाजसुधारक आणि लेखक(मृत्यू:२७ मे १९१९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी,लेखक(जन्म:१५ एप्रिल १९३५)**२०१९:गोपाळ मारुतीराव पवार(गो.मा) --महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार (जन्म:१३ मे १९३२)* *२०००:दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार – ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू,शाहू महाराजांचे चरित्रकार (जन्म:१९३०)**१९९५:रमेश टिळेकर – अभिनेते व वकील, ’घाशीराम कोतवाल’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध**१९८२:अच्युत महादेव बर्वे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:३ फेब्रुवारी १९२७)**१९६६:नंदलाल बोस--जगविख्यात चित्रकार (जन्म:३ डिसेंबर १८८२)**१९२८:महादेव मल्हार जोशी-- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक(जन्म:२ जानेवारी १८७३)**१८५०:मेरी तूसाँ –’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका(जन्म:१ डिसेंबर १७६१)**१७५६:जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म:८ फेब्रुवारी १६७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंघोळ किंवा स्नान*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टेक्नोसॅव्ही निवडणूक आयोग, 9 अ‌ॅपद्वारे जाणून घेता येणार उमेदवार ते मतमोजणीचा प्रवास, दाद मागण्याचीही सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमित शाहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप हरला, शाहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राजू शेट्टींचे हातकणंगल्यातून अर्ज दाखल करताना विराट शक्तीप्रदर्शन; म्हणाले, खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मी फक्त अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, सुनेत्रा पवारांबाबतच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, 106 टक्के पाऊस होण्याचा हवामान विभागाचा मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्रसाठी आशादायी परिस्थिती *•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हैद्राबादने बंगळुरू समोर ठेवले 288 धावाचे विशाल लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙 आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते.मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो.या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते.जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात.याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बाळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युरी म्हणून समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे ?२) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?३) 'ग्रीन हाऊस इफेक्ट' कशाशी संबंधित आहे ?४) 'आपत्ती' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या दोन देशांदरम्यानच्या सीमारेषेला कोणते नाव आहे ? *उत्तरे :-* १) बिल्कीस मीर २) ब्राझील ३) वातावरणातील बदल ४) संकट ५) Parallel line*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बाबू जिंकलोड👤 स्वप्नील भंडारे👤 माधव गायकवाड👤 अनिरुद्ध वंगरवार👤 नितीन अंबेकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःसाठी जगताना आनंद तर वेळोवेळी मिळत असतो. पण,पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला समाधान मिळत नाही. कारण समाधान ही संपत्ती कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ती संपत्ती फक्त आपल्यापाशीच असते. जेव्हा, इतरांसाठी आपल्या हातून एखादे नि:स्वार्थ भावनेचे कार्य होत असतात त्यातून जो समाधान मिळतो तेच समाधान जगावेगळे असते म्हणून ती संपत्ती कशाप्रकारे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करून बघावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रसंगाचे भान ठेवावे*एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?”  त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.तात्पर्य - समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/BX8EgxHfZigDuFSk/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक कला दिवस_* *_ या वर्षातील १०६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.**१९९४:भारताची गॅट करारावर स्वाक्षरी**१९५०:आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पंचमपल्ली येथून भूदान चळवळीस प्रारंभ केला**१९४०:दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.**१८९२:जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली**१६७३:मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.**१८६५:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन. अॅडयु जॅक्सन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:हेमंत दिनकर सावळे--लेखक**१९७६:प्रा.डॉ.संजय वाघोजी जगताप -- लेखक* *१९७३:अरुण झगडकर-- कवी,लेखक**१९७२:मंदिरा बेदी-- हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री**१९७१:प्रा.डॉ.मिलिंद भाऊरावजी साठे-- लेखक* *१९६९:दिलीप तुळशिरामजी काळे -- कवी**१९६३:मनोज प्रभाकर-- भारतीय क्रिकेटपटूआणि प्रशिक्षक**१९६३:नरेंद्र प्रभू -- लेखक**१९६०:अशोक भैय्याजी लेकुरवाळे-- लेखक* *१९५९:विष्णु गुराबसिंह सोळंके-- प्रसिद्ध ज्येष्ठ कवी,गझलकार‎,लेखक**१९५५:डॉ.राजा दांडेकर-- लेखक**१९५२:मधुकर आरकडे--ज्येष्ठ कवी-गीतकार (मृत्यू:१५ मार्च २०१५)**१९४४:लक्ष्मीनारायण बोल्ली-- मराठी लेखक, अनुवादक व संशोधक,यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन.(मृत्यू:२३ फेब्रुवारी २०१८)**१९३५:माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी,लेखक(मृत्यू:१६ एप्रिल २०२३)**१९३२:सुरेश भट – लोकप्रिय गझलकार, कवी (मृत्यू:१४ मार्च २००३)**१९२२:हसरत जयपुरी – गीतकार (मृत्यू:१७ सप्टेंबर १९९९)**१९१२:मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (मृत्यू:१३ जानेवारी १९९७)**१८९४:भालचंद्र लक्ष्मण पाटणकर-- संपादक, समीक्षक (मृत्यू:१४ सप्टेंबर १९७३)**१८९३:नरहर रघुनाथ तथा न.र.फाटक – चरित्रकार,टीकाकार,इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (मृत्यू:२१ डिसेंबर १९७९)**१८९२:पांडुरंग जीवाजी सबनीस-- वैचारिक निबंधलेखक,नाटककार (मृत्यू:२३ जून १९६९)**१८७४:त्र्यंबक सीताराम कारखानीस--मराठी नाट्यदिग्दर्शक(मृत्यू:८ जानेवारी १९५६)**१७०७:लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१८ सप्टेंबर १७८३)**१४६९:गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (मृत्यू:२२ सप्टेंबर १५३९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:विलास गोविंद सारंग--कवी, कथाकार,कादंबरीकार,समीक्षक (जन्म:११ जून १९४२)**२०१३:वि.रा.करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक (जन्म:२७ ऑगस्ट १९१९)**१९९५:पंडित लीलाधर जोशी – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री**१९९०:ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म:१८ सप्टेंबर १९०५)**१९८०:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी,तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२१ जून १९०५)**१९१२:एडवर्ड जे. स्मिथ – आर.एम.एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (जन्म:२७ जानेवारी १८५०)**१८६५:अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म:१२ फेब्रुवारी १८०९)**१७९४:मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ ’मोरोपंत’ – पंडीतकवी(जन्म:१७२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीराम नवमी निमित्ताने प्रासंगिक लेख.... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सांगलीत उरूसातील बैलगाडा थेट गर्दीत घुसला, तरुण चाकाखाली अन् अनर्थ, गावात हळहळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मान्सूनपूर्व नियोजन : अमरावती जिल्ह्यात धोकादायक पुलांची पाहणी सुरु, अहवाल मागवला सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खंडणीखोर वैभव देवरेने जमवली कोट्यावधींची 'माया', नाशिकमधील खासगी सावकाराचं पितळ पडलं उघडं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मतदान यंत्रांची (ईव्हीएम) ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, अज्ञातांकडून चार राऊंड फायर, घटनेवेळी 'भाईजान' घरातच*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लखनौ सुपरजायंट्सचा सलग दुसरा पराभव, आठ गडी राखून कोलकाता नाइट रायडर्सचा विजय तर चेन्नईने मुंबईला 20 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पेनिसिलिन म्हणजे काय ? पेनिसिलीनचा शोध कसा लागला ?* 📙अलेक्झांडर फ्लेमिंगना अचानकपणे पेनिसिलीनचा शोध लागला व एक मोठीच क्रांती घडून आली. पेनिसिलियम नोटेटम या प्रकारच्या बुरशीच्या आसपासचे जंतू नष्ट झालेले अपघातानेच त्यांना आढळले, म्हणून त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले व त्यातूनच पेनिसिलिनची निर्मिती झाली.पेनिसिलीननंतर अनेक प्रतिजैविके निर्माण झाली आहेत; पण आजही त्यालाच 'क्वीन ऑफ अँटीबायोटिक्स' असे म्हटले जाते. साठ वर्षांनंतरही या अँटीबायोटिकची उपयुक्तता सर्व डॉक्टरांना मान्य आहे. याचा शोध लागण्याआधी विविध स्वरूपाचे जीवघेणे आजार झाल्यावर रुग्ण वाचला, तर त्याचे नशीब बलवत्तर, असेच समजले जाई. न्युमोनिया, अंगावरील गळवे, मेंदूतील आवरणांचे मेनिंजायटीससारखे गंभीर आजार यांतून रुग्ण निश्चित बरा होईल, अशी खात्री पेनिसिलीनच्या वापरानंतरच वाटू लागली. याचा वापर १९६० सालच्या दशकात प्रचंड प्रमाणात सुरू झाला. पण याच सुमाराला त्याचे काही दुष्परिणामही लक्षात आले.पेनिसिलीन या औषधाला येणारी तीव्र अॅलर्जीची प्रतिक्रिया हीच मुळी जीवघेणी ठरू शकते, हे पूर्वीही ज्ञात होतेच. पण मोठ्या प्रमाणात याचा वापर सुरू झाल्यावर या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले. इंजेक्शन, गोळ्या, लहान मुलांचे औषध यांपैकी कोणत्याही प्रकारात हा त्रास हजारात एखाद्याला जाणवू शकतो. सध्या हे औषध वापरताना पूर्णत: काळजी घेऊनच वापरले जाते. १९७० सालच्या दशकात पेनिसिलीनचे कृत्रिमरीत्या उत्पादन करण्याची पद्धत विकसित होऊ लागली. आज पेनिसिलिन ग्रुप या नावाने यातील अनेक औषधे उपलब्ध आहेत. अँपिसिलिन, अॅमॉक्सिलीन, एरिथ्रोमायसिन अशा नावाच्या औषधांमध्ये त्या मानाने दुष्परिणामांचे स्वरूप खूपच कमी आहे.पेनिसिलीनचा खरा उपयोग आजही दोन प्रकारच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक ठरतो. त्याला आजही फारसा पर्याय उपलब्ध नाही. लहान मुलांना सांधेदुखी व ताप यातून उद्भवणाऱ्या (Rheumatic Fever) आजारातून पुढे मागे हृदयाच्या झडपांवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा मुलांना पेनिसिलीनच्या प्रतिबंधाखाली ठेवले तर मात्र हा उपद्रव होत नाही. कित्येक वेळा १० ते १५ वर्षे हा वापर महिन्यातून एक इंजेक्शन देऊन केला जातो. दुसऱ्या प्रकारचा आजार म्हणजे सिफीलिसचा. गुप्तरोगांपैकी या आजारावरचे आजही सर्वात प्रभावी औषध म्हणून पेनिसिलीनचाच वापर करावा लागतो.किंमत, उपयुक्तता, देण्याची पद्धत व आजारावर होणाऱ्या परिणामांचा कालावधी या सर्वांचा विचार करता पेनिसिलिन नि:संशय 'क्वीन ऑफ अँटीबायोटिक्स'च म्हणावे लागेल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शेणापासून कोणता गॅस मिळतो ?२) महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?३) गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ?४) 'आश्चर्य' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते ?*उत्तरे :-* १) मिथेन २) पुणे ३) प्रयागराज ४) नवल, अचंबा ५) राजकुमारी अमृत कौर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. श्रीराम गव्हाणे, संपादक, नांदेड👤 शिवाजी अंबुलगेकर, साहित्यिक, मुखेड👤 सुधीर गुट्टे, ADEI, नांदेड👤 इमरान शेख👤 चंद्रकांत देवके, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 अंकुश दांडेवाड, उमरी👤 बबन साखरे, नांदेड👤 योगेश बलकेवाड, येवती👤 दत्ताहारी पाटील कदम, धर्माबाद👤 सुनील पलांडे, शिक्षक, पुणे👤 मुकुंद एडके, धर्माबाद👤 संदीप पारणे, धर्माबाद👤 रामकिशोर झंवर, व्यापारी, धर्माबाद👤 सारिका बलचिम, पुणे👤 संतोष लक्ष्मण पाटील, येवती👤 कालिदास बोगेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥मानेल त्या तुम्ही अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गालात हास्य ठेवून नेहमीच आनंदीत दिसणारी व्यक्ती, सुखात असेलच असेही नाही. सुख, आणि दु:ख या दोघांनाही ती पूर्णपणे परिचित असते. फरक एवढेच की,ती आपले दु:ख कोणालाही सांगत नाही कारण, त्या दु:खाशी त्याचे विशेष नाते जुळलेले असते. म्हणून आपणही आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना हसत मुखाने करावे. या प्रकारचे जगणे बघून दु:ख सुद्धा नतमस्तक होतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निरीक्षण*वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि किळस सोसण्याची क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला. विद्यार्थ्यांना म्हणाले, “या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे. तिटकारा दर्शवायचा नाही. सरांनी वाटीत बोट बुडवूनचाखले. पाठोपाठ एका मागून एक विद्यार्थ्यांनी ते गढूळ पाणी काहीशा अनिश्चेनेच चाखले.प्राध्यापक म्हणाले, “किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळेच पास झालात, पण सूक्ष्मनिरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात.”‘मी करतो तसे तुम्ही करायचेहोते. तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही, मी एक बोट वाटीत बुडवले व चाखले दुसरेच.’विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले.  म्हणाले , ‘या पाण्यात अपायकारक काहीच नाही !’ आता विद्यार्थी खुष झाले. तात्पर्यः प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमनपटते व त्यातूनच यशाचा मार्ग खुला होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/article-by-dr-yashawant-suroshe-on-education/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १०३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९८:गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान**१९९७:पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी राजीनामा दिला.**१९९७:पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर**१९६७:कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९६१:रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली**१९४५:अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.**१६०६:ग्रेट ब्रिटनने ’यूनियन जॅक’ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:रेवती राहुल जोशी--पत्रकार,लेखिका, संपादिका* *१९७५:डॉ.सच्चिदानंद शंकर बिचेवार -- लेखक* *१९७५:आसाराम लोमटे -- लेखक* *१९७२:रवी वसंत सोनार-- कवी,लेखक गीतकार**१९६७:प्रा.डॉ.मनोहर नाईक -- कवी,लेखक**१९६४:प्रकाश दिनकर सकुंडे-- कवी* *१९६१:शशिकांत हिंगोणेकर-- सुप्रसिद्ध कवी,निवृत्त शिक्षण उपसंचालक**१९५८:चरणदास वैरागडे -- कवी* *१९५६:रामचंद्र अनंत देखणे--कथाकार, कादंबरीकार,लोककलांचे अभ्यासक(मृत्यू:२६ सप्टेंबर २०२२)**१९५४:विनय नारायणराव मिरासे(अशांत) -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५४:सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार,लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (मृत्यू:२ जानेवारी १९८९)**१९५०:विजयेंद्र घाटगे-- हिंदी चित्रपट आणि भारतीय दूरचित्रवाणी अभिनेते**१९४९:छाया महाजन-- मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक* *१९४९:सुभाष त्र्यंबक अवचट-- चित्रकार, लेखक,कवी**१९४५:डॉ यशवंत शंकर साधू-- संत साहित्यांचे अभ्यासक (मृत्यू:१४ एप्रिल २०२०)**१९४३:सुमित्रा महाजन –भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९४२:सुनीती जयंत आफळे -- कथाकार**१९३८:गुलशन बावरा(मेहरा)-- चित्रपट गीतकार(मृत्यू:७ ऑगस्ट२००९)**१९३२:लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री,मुत्सद्दी,वकील व तामिळ नेते (मृत्यू: १२ ऑगस्ट २००५)**१९२०:शैलजा प्रसन्नकुमार राजे--कथाकार, कादंबरीकार,चरित्रकार(मृत्यू:१६ ऑक्टोबर २००६)**१९१७:विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू:२१ ऑगस्ट १९७८)**१९१४:कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – चित्रपटासाठी कथा,संवाद व गीतलेखन करणारे.(मृत्यू:२८ फेब्रुवारी १९९५)**१९१०:पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (मृत्यू:१३ ऑगस्ट १९८०)**१८७१:वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार,पत्रकार,संपादक,अनुवादक, निबंधकार व कोशकार (मृत्यू:२ फेब्रुवारी १९३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:शरद् पाटील--महाराष्ट्रातील एक विख्यात प्राच्यविद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत.(जन्म:१७ सप्टेंबर १९२५)* *२०११:सचिन भौमिक-- हिंदी चित्रपटांचे पटकथा लेखक(जन्म:१७ जुलै १९३०)* *२००६:राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (जन्म:२४ एप्रिल १९२९)**२००१:देवांग मेहता-- भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीजचे अध्यक्ष(जन्म:१० ऑगस्ट१९६०)**१९७७:भानुदास बळिराम शिरधनकर ऊर्फ भानू शिरधनकर-- मराठी लेखक(जन्म:१६ ऑक्टोबर १९१५)**१९४५:फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:३० जानेवारी १८८२)**१९०६:महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (जन्म:२२ फेब्रुवारी१८३६)**१८१७:चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म:२६ जून १७३०)**१७२०:बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (जन्म:१ जानेवारी १६६२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सामना मधील अग्रलेख*कृत्रिम बुद्धिमता आणि प्राथमिक शिक्षण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आगामी लोकसभा निवडणूक ही विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा देणारी ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ही निवडणूक नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच होईल; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेडमध्ये पुनरुच्चार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील हातकणंगलेतून निवडणूक लढवणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बेरोजगारी, शेतीमालाचा भाव आणि औद्योगिक वाढ या मूलभूत प्रश्नांना गृहीत धरूनच प्रचार - शशिकांत शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काँग्रेसच्या आयटी सेलचे मुख्य असलेले रोहन गुप्ता यांचा भाजपामध्ये प्रवेश.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार! वादळीवार्‍यामुळे ५८० घरांचे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात मुंबईचा सात विकेटने विजय, जसप्रीत बुमराह, ईशान किशन आणि सुर्यकुमार यादव चमकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *डोळे मिटून चालताना तोल का जातो ?* 📕********************काय म्हणता? तुमचा तोल जात नाही? मग करूनच पाहा हा प्रयोग. रूमालाने डोळे बांधा आणि चालायला लागा! काय पडलात का ठेच लागून? डोळे उघडून चालतानाही ठेच लागते, पण ती आपल्या निष्काळजीपणामुळे डोळे मिटल्यानंतर मात्र सर्वांना थोडाफार त्रास होतो. याचे कारण आता पाहू.शरीराचा समतोल राखणे जनावरांना अगदी सोपे असते. कारण त्यांना चार पाय असतात. माणसाला मात्र दोन पायांवर शरीराचा तोल सांभाळावा लागतो. तोल सांभाळता येण्यासाठी लहान मेंदूचे कार्य खूप महत्वाचे असते. सर्कशीत तारेवर चालणारी मुलगी जसा शरीराचा तोल सांभाळत असते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या नकळत शरीराचा तोल सांभाळत चालत असतो किंवा इतर हालचाली करत असतो. त्यामुळेच पार्किन्सन रोग किंवा सेरेबेलार सिन्ड्रोनसारख्या रोगांमध्ये माणूस नीट चालू शकत नाही. डोळे उघडे असूनही त्याचा तोल जातो. लहान मेंदूखेरीज शरीराच्या हात, पाय, मान या अवयवांच्या सुयोग्य हालचाली देखील तोल सांभाळण्यासाठी आवश्यक असतात.तोल सांभाळण्याच्या प्रक्रियेत डोळ्यांचाही काही प्रमाणात सहभाग असतो. दृष्टीमुळे आपल्याला जगाचे ज्ञान होते. आपण त्यामुळेच आत्मविश्वासाने पावले टाकतो. डोळे बंद केल्यानंतर एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. न दिसल्यामुळे अंतराचा, खोलीचाही अंदाज येत नाही. त्यामुळे आपण अडखळत यवकत थवकत चालू लागतो. एक गंमत तुम्ही अनुभवली असलेच.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची प्रगती साधते तीच खरी मैत्री होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील *सितार व तानपुऱ्याला जीआय टॅग* देण्यात आला ?२) जागतिक होमिओपॅथी दिवस - २०२४ ची थीम काय आहे ?३) वाडा ( WADA ) चे full form काय आहे ?४) 'अनर्थ' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? *उत्तरे :-* १) सांगली २) संशोधन मजबूत करणे, कार्यक्षमता वाढविणे ३) World Anti - Doping Agency ४) अरिष्ट, संकट ५) ऑडियोमीटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अरुणा कलेपवार, उपक्रमशील शिक्षिका, नांदेड👤 गंगाधर पेंडपवार👤 आकाश वाघमारे👤 बालाजी चुनुपवार, येवती👤 गजानन कुरेवाड👤 मिनाज सय्यद👤 कलीम शेख👤 आसिफ शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• बोलत्या, चालत्या माणसाच्या मनात जेव्हा स्वार्थ आणि कपटासारखे महाभूत शिरते त्यावेळी मात्र त्या माणसाची जीवन जगण्याची दिशाच बदलून जाते. चांगले काय आणि वाईट काय ओळखण्याची त्याच्यात क्षमता नसते. आणि एकदा ती दिशा बदलली की, नंतर समोरची वाट मिळणे फार कठीण होऊन जाते.म्हणून स्वार्थ आणि कपट यासारख्या भूतांच्या मागे लागून सोन्यासारख्या जीवनाची माती करू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्येची किंमत*एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे.शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले,” त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा आहे.” शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला मनाला,” पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन.” ‘रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले, ‘नावाडी सुद्धा दोन आण्यात पैलतिराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत. नाही तिची किंमत शून्य आहे.तात्पर्यः माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://sahityasevak.blogspot.com/2020/04/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जेष्ठ राजनीतिज्ञ,लेखक आणि विचारवंत डॉ.मोहम्मद हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपती पदी निवड**२००६:उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील व्हिक्टोरिया पार्कमध्ये व्यापार मेळाव्यात भीषण आग ५० मृत्युमुखी**१९९४:सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश श्री एस.आर.पंडियन अध्यक्ष असलेला पाचवा वेतन आयोग स्थापन* *१९५५:योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.**१९१२:इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.**१८७५:महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:प्रियंका बर्वे -- मराठी गायिका**१९८१:अभिजित चव्हाण--हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता**१९७१:वंदना अनिल कुलकर्णी-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका**१९५८:मीनाक्षी मोहरील-- कथा लेखिका* *१९५१:प्रा.जीवन मुळे --- लेखक,वक्ते* *१९५०:डॉ.विक्रम कुवरलाल शाह-- व्यवसायाने डॉक्टर असून,लेखन करणारे लेखक**१९४५:अशोक बेंडखळे-- प्रसिद्ध मराठी लेखक,समीक्षक व संपादक**१९४०:प्रा.डॉ.दिनकर कुलकर्णी-- कवी, लेखक* *१९३७:नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर-- निवृत्त न्यायाधीश,ज्येष्ठ विचारवंत,सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९३३:डॉ.हणमंत विद्याधर सरदेसाई (ह.वि. सरदेसाई)-- मराठी डॉक्टर व लेखक(मृत्यू:१५ मार्च २०२०)* *१९३१:किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका**१९३१:सुरेश रघुनाथ मथुरे -- कवी,कथाकार,विज्ञानलेखक (मृत्यू:२३ डिसेंबर १९९८)* *१९२७:मनाली कल्लट तथा एम.के.वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ.(मृत्यू:१० ऑगस्ट १९८२)**१९०७:मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू:१ फेब्रुवारी १९९५)**१९०१: श्रीपाद रामचंद्र पारसनीस -- चरित्रकार,अनुवादक (मृत्यू:२२ जानेवारी १९८०)* *१९०१:डॉ.धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ,भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते,सहकारी चळवळीचे खंदे समर्थक,पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (मृत्यू:३ मे १९७१)**१८९४:घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (मृत्यू:११ जून १९८३)**१८८८:पारुजी नारायण मिसाळ-- ‘बालसन्मित्र’कार सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू केला.(मृत्यू:२७ मे१९५५)**१८८०:सर सी.वाय.चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार,(मृत्यू:१ जुलै १९४१)**१८७६:वामन गोविंद काळे-- सुविख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ व अनेक व्यापारी संस्थांचे प्रवर्तक(मृत्यू:२७ जानेवारी १९४६)**१८४७:जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन- अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, (मृत्यू:२९ आक्टोबर १९११)**१८४३:रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (मृत्यू:१८ जून १९०१)**१७५५:डॉ.सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (मृत्यू:२ जुलै १८४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:डॉ.श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (जन्म:३१ जुलै १९१८)**१९९५:मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान,स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’ (जन्म:२९ फेब्रुवारी १८९६)**_१९६५:डॉ.पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री,विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(जन्म:२७ डिसेंबर १८९८)_**१९४९:बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (जन्म:१४ नोव्हेंबर १८९१ )**१९३७:डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार (जन्म:२ फेब्रुवारी १८८४)**१९३१:खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी,लेखक व कलाकार (जन्म:६ जानेवारी १८८३)**१८१३:जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (जन्म:२५ जानेवारी १७३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसात दिसला देव*याविषयावर अनेक साहित्यिकांचे लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *"वाटाघाटी नको पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी", राज ठाकरेंनी स्पष्ट केली राजकीय भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जल्लोष नववर्षाचा.! राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह; ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कुठला दिलासा मिळू शकला नाही, त्यामुळे जाणार सर्वोच्च न्यायालयात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 मतदान केंद्राची वाढ, गैरसोय टाळण्यासाठी निर्णय !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *युनिकॉर्न स्टार्टअप्सच्या जागतिक यादीत भारत अमेरिका व चीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुसऱ्या टप्यातील निवडणुकीसाठी २०४ उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाबला 2 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *प्रथिने म्हणजे काय ?* 📙 प्रथिनांची आवश्यकता आपण अनेक वेळा ऐकलेली असते. पेशींची रचना प्रथिनांशिवाय होत नाही, हे ज्ञात असते. पण प्रथिने म्हणजे काय, याचे नेमके उत्तर मात्र अनेकदा माहीत नसते. अॅमिनो अॅसिड या प्रकारची वीस द्रव्ये प्रथिने बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचे अजूनही प्रकार आहेत, पण ते सजीव पेशी तयार होण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.या वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या रेणूंची साखळी बनत जाते व विविध स्वरूपांची प्रथिने निर्माण होऊ लागतात. प्रथिनाच्या रचनेप्रमाणे त्याचे काम ठरते, कार्यकक्षा आखली जाते, उपयुक्तताही ठरते. स्नायूंच्या रचनेसाठी तीन लागतात, त्यावेळी त्यांच्यामुळे पेशी बनतात. याउलट शरीरात काम करणारी असंख्य प्रकारची वितंचके (Enzymes) ही सुद्धा प्रथिने असतात. तोंडातील लाळ, पोटातील पाचक रसातील पदार्थ, रक्तातील काही द्रव्ये, मज्जासंस्थेतील संदेशवहनास उपयोगी पडणारी रसायने हे सर्व प्रथिनांचेच प्रकार आहेत.वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या विविध पद्धतींनी जुळणाऱ्या जोड्यांतून असंख्य प्रथिने होतात. पण यांतील सर्वच अमिनो अॅसिड्स शरीरात तयार होतातच, असे मात्र नाही. ती अन्नातून मिसळावी लागतात. मग त्यांचे दोन प्रकार केले जातात - आवश्यक व अनावश्यक. यांतील आवश्यक प्रकार योग्य प्रमाणात मिळाले नाहीत, तर वाढीवर परिणाम होऊ लागतो, आजार निर्माण होऊ शकतात.आवश्यक प्रकारची अमिनो अॅसिड्स सर्व प्रकारच्या अन्नांत एकत्रित असतातच, असे नाही. कसलीतरी कमतरता असतेच. यासाठीच एकच एक पदार्थ खाऊन कोणीही प्राणी राहू शकत नाही. फक्त मांसावर जगणाऱ्या प्राण्यांना मात्र सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात. याउलट शाकाहारी माणसाला जरी तांदळात, गव्हात, ज्वारी बाजरी प्रथिने मिळत असली, तरीही त्याबरोबर द्विदलांचा म्हणजे डाळींचा आसरा घ्यावाच लागतो. त्यातूनच आहारपद्धती ठरत गेल्या आहेत.रोजच्या पदार्थातील सर्वात जास्त प्रथिने सोयाबीनमध्ये आढळतात. त्याची टक्केवारी चाळीसपर्यंत असू शकते. यामुळेच शाकाहारी आहारात सोयाबीनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेवढेच काय, पण पाश्चात्य देशांत मांसाची कमतरता भरून काढण्यासाठीही सोयाचा वापर केला जातो. शेंगदाने, चीज यांचा क्रमांक त्यानंतरचा व त्यांतील प्रथिनांची टक्केवारी पंचवीस असते. मांसात २३ टक्के, तर अंड्यांमध्ये १२ टक्के प्रथिने असतात. गहू वा तांदळात ६ ते ८ टक्केच प्रथिने आढळतात. प्रथिनांबद्दल बोलताना अनेकदा प्रथम दर्जाची व दुय्यम दर्जाची अशी वर्गवारी केली जाते. याचा अर्थ ज्यात सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स आढळतात, ती प्रथम दर्जाची व अन्य सर्व दुय्यम समजली जातात. थोडक्यात प्राणिज प्रथिने प्रथम दर्जाची असतात. लहान मुले, गर्भावस्था, आजारपण यांमध्ये पेशींची झीज भरून काढणे व वाढीसाठी आवश्यक म्हणून प्रथिनांची गरज असते. मुळात ही गरज या काळात जास्तच असल्याने प्रमाण २० टक्के इतके वाढलेले असते. केवळ प्रथिनयुक्त अन्नाची चव मात्र काहीशी उग्र वासाची असते. थोडीशी कडवटही असते. क्वचित काहींना ती आवडतही नाही. यासाठीच प्रथिनयुक्त अन्न पिष्टमय वा वनस्पतिज पदार्थांबरोबर खाण्याची पद्धत पडली आहे. 'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते -प्रेम, ज्ञान व शक्ती.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑक्टोपसला किती मेंदू असतात ?२) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे ?३) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे ?४) 'आकाश' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) १८ व्या लोकसभेत देशातील सर्वात लहान मतदारसंघ कोणता ?*उत्तरे :-* १) नऊ २) मॅग्नस कार्लसन ३) आयुष्यमान खुराणा ४) गगन, नभ, अंबर, व्योम, खग, आभाळ ५) लक्षद्वीप ( ४७,९७२ मतदार )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. शेख Mwh, मुख्याध्यापक तथा शिक्षक नेते, नांदेड👤 टी. अशोक साईनाथ, तेलंगणा👤 शिवराज सीताराम वडजे, शिक्षक, नांदेड👤 तुळशीराम सिरमलवार, शिक्षक, धर्माबाद👤 भाऊसाहेब आबा अहिरे,नाशिक👤 सचिन पवळे, धर्माबाद👤 नागेश तांबोळी, धर्माबाद👤 श्यामानंद लिंगमपल्ले, धर्माबाद👤 सुभाष बोडके👤 रामदास डुमणे, नांदेड👤 मारोती कोटगले, धर्माबाद👤 प्रकाश बंडेवार, धर्माबाद👤 विलास बोंबले, परभणी👤 बालाजी भाऊ पूर्णेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचारात किंवा करत असलेल्या कृतीत जर प्रामाणिकपणा ,नि:स्वार्थ भावना किंवा सत्यता असेल तर कुठेही फिरण्याची आवश्यकता पडत नाही. आणि आपल्या खिशातील पैसे सुद्धा खर्च करावे लागत नाही. कारण त्यात फक्त सत्कर्म असते. आणि तेच सत्कर्म करणे हेच आपले खरे कर्तव्य आहेत. बाकी दिखावूपणा करून नको त्या प्रकारचे जीवन जगण्याला कर्तव्य नाही तर स्वार्थ आणि प्रसिद्धी मिळवणे असे म्हणतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कष्टाची कमाईच श्रेष्ठ*एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो.हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करूनचोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://sahityasevak.blogspot.com/2020/04/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जेष्ठ राजनीतिज्ञ,लेखक आणि विचारवंत डॉ.मोहम्मद हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपती पदी निवड**२००६:उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील व्हिक्टोरिया पार्कमध्ये व्यापार मेळाव्यात भीषण आग ५० मृत्युमुखी**१९९४:सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश श्री एस.आर.पंडियन अध्यक्ष असलेला पाचवा वेतन आयोग स्थापन* *१९५५:योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.**१९१२:इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.**१८७५:महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:प्रियंका बर्वे -- मराठी गायिका**१९८१:अभिजित चव्हाण--हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता**१९७१:वंदना अनिल कुलकर्णी-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका**१९५८:मीनाक्षी मोहरील-- कथा लेखिका* *१९५१:प्रा.जीवन मुळे --- लेखक,वक्ते* *१९५०:डॉ.विक्रम कुवरलाल शाह-- व्यवसायाने डॉक्टर असून,लेखन करणारे लेखक**१९४५:अशोक बेंडखळे-- प्रसिद्ध मराठी लेखक,समीक्षक व संपादक**१९४०:प्रा.डॉ.दिनकर कुलकर्णी-- कवी, लेखक* *१९३७:नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर-- निवृत्त न्यायाधीश,ज्येष्ठ विचारवंत,सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९३३:डॉ.हणमंत विद्याधर सरदेसाई (ह.वि. सरदेसाई)-- मराठी डॉक्टर व लेखक(मृत्यू:१५ मार्च २०२०)* *१९३१:किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका**१९३१:सुरेश रघुनाथ मथुरे -- कवी,कथाकार,विज्ञानलेखक (मृत्यू:२३ डिसेंबर १९९८)* *१९२७:मनाली कल्लट तथा एम.के.वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ.(मृत्यू:१० ऑगस्ट १९८२)**१९०७:मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू:१ फेब्रुवारी १९९५)**१९०१: श्रीपाद रामचंद्र पारसनीस -- चरित्रकार,अनुवादक (मृत्यू:२२ जानेवारी १९८०)* *१९०१:डॉ.धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ,भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते,सहकारी चळवळीचे खंदे समर्थक,पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (मृत्यू:३ मे १९७१)**१८९४:घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (मृत्यू:११ जून १९८३)**१८८८:पारुजी नारायण मिसाळ-- ‘बालसन्मित्र’कार सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू केला.(मृत्यू:२७ मे१९५५)**१८८०:सर सी.वाय.चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार,(मृत्यू:१ जुलै १९४१)**१८७६:वामन गोविंद काळे-- सुविख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ व अनेक व्यापारी संस्थांचे प्रवर्तक(मृत्यू:२७ जानेवारी १९४६)**१८४७:जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन- अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, (मृत्यू:२९ आक्टोबर १९११)**१८४३:रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (मृत्यू:१८ जून १९०१)**१७५५:डॉ.सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (मृत्यू:२ जुलै १८४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:डॉ.श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (जन्म:३१ जुलै १९१८)**१९९५:मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान,स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’ (जन्म:२९ फेब्रुवारी १८९६)**_१९६५:डॉ.पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री,विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(जन्म:२७ डिसेंबर १८९८)_**१९४९:बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (जन्म:१४ नोव्हेंबर १८९१ )**१९३७:डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार (जन्म:२ फेब्रुवारी १८८४)**१९३१:खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी,लेखक व कलाकार (जन्म:६ जानेवारी १८८३)**१८१३:जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (जन्म:२५ जानेवारी १७३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसात दिसला देव*याविषयावर अनेक साहित्यिकांचे लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *"वाटाघाटी नको पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी", राज ठाकरेंनी स्पष्ट केली राजकीय भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जल्लोष नववर्षाचा.! राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह; ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कुठला दिलासा मिळू शकला नाही, त्यामुळे जाणार सर्वोच्च न्यायालयात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 मतदान केंद्राची वाढ, गैरसोय टाळण्यासाठी निर्णय !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *युनिकॉर्न स्टार्टअप्सच्या जागतिक यादीत भारत अमेरिका व चीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुसऱ्या टप्यातील निवडणुकीसाठी २०४ उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाबला 2 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *प्रथिने म्हणजे काय ?* 📙 प्रथिनांची आवश्यकता आपण अनेक वेळा ऐकलेली असते. पेशींची रचना प्रथिनांशिवाय होत नाही, हे ज्ञात असते. पण प्रथिने म्हणजे काय, याचे नेमके उत्तर मात्र अनेकदा माहीत नसते. अॅमिनो अॅसिड या प्रकारची वीस द्रव्ये प्रथिने बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचे अजूनही प्रकार आहेत, पण ते सजीव पेशी तयार होण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.या वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या रेणूंची साखळी बनत जाते व विविध स्वरूपांची प्रथिने निर्माण होऊ लागतात. प्रथिनाच्या रचनेप्रमाणे त्याचे काम ठरते, कार्यकक्षा आखली जाते, उपयुक्तताही ठरते. स्नायूंच्या रचनेसाठी तीन लागतात, त्यावेळी त्यांच्यामुळे पेशी बनतात. याउलट शरीरात काम करणारी असंख्य प्रकारची वितंचके (Enzymes) ही सुद्धा प्रथिने असतात. तोंडातील लाळ, पोटातील पाचक रसातील पदार्थ, रक्तातील काही द्रव्ये, मज्जासंस्थेतील संदेशवहनास उपयोगी पडणारी रसायने हे सर्व प्रथिनांचेच प्रकार आहेत.वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या विविध पद्धतींनी जुळणाऱ्या जोड्यांतून असंख्य प्रथिने होतात. पण यांतील सर्वच अमिनो अॅसिड्स शरीरात तयार होतातच, असे मात्र नाही. ती अन्नातून मिसळावी लागतात. मग त्यांचे दोन प्रकार केले जातात - आवश्यक व अनावश्यक. यांतील आवश्यक प्रकार योग्य प्रमाणात मिळाले नाहीत, तर वाढीवर परिणाम होऊ लागतो, आजार निर्माण होऊ शकतात.आवश्यक प्रकारची अमिनो अॅसिड्स सर्व प्रकारच्या अन्नांत एकत्रित असतातच, असे नाही. कसलीतरी कमतरता असतेच. यासाठीच एकच एक पदार्थ खाऊन कोणीही प्राणी राहू शकत नाही. फक्त मांसावर जगणाऱ्या प्राण्यांना मात्र सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात. याउलट शाकाहारी माणसाला जरी तांदळात, गव्हात, ज्वारी बाजरी प्रथिने मिळत असली, तरीही त्याबरोबर द्विदलांचा म्हणजे डाळींचा आसरा घ्यावाच लागतो. त्यातूनच आहारपद्धती ठरत गेल्या आहेत.रोजच्या पदार्थातील सर्वात जास्त प्रथिने सोयाबीनमध्ये आढळतात. त्याची टक्केवारी चाळीसपर्यंत असू शकते. यामुळेच शाकाहारी आहारात सोयाबीनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेवढेच काय, पण पाश्चात्य देशांत मांसाची कमतरता भरून काढण्यासाठीही सोयाचा वापर केला जातो. शेंगदाने, चीज यांचा क्रमांक त्यानंतरचा व त्यांतील प्रथिनांची टक्केवारी पंचवीस असते. मांसात २३ टक्के, तर अंड्यांमध्ये १२ टक्के प्रथिने असतात. गहू वा तांदळात ६ ते ८ टक्केच प्रथिने आढळतात. प्रथिनांबद्दल बोलताना अनेकदा प्रथम दर्जाची व दुय्यम दर्जाची अशी वर्गवारी केली जाते. याचा अर्थ ज्यात सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स आढळतात, ती प्रथम दर्जाची व अन्य सर्व दुय्यम समजली जातात. थोडक्यात प्राणिज प्रथिने प्रथम दर्जाची असतात. लहान मुले, गर्भावस्था, आजारपण यांमध्ये पेशींची झीज भरून काढणे व वाढीसाठी आवश्यक म्हणून प्रथिनांची गरज असते. मुळात ही गरज या काळात जास्तच असल्याने प्रमाण २० टक्के इतके वाढलेले असते. केवळ प्रथिनयुक्त अन्नाची चव मात्र काहीशी उग्र वासाची असते. थोडीशी कडवटही असते. क्वचित काहींना ती आवडतही नाही. यासाठीच प्रथिनयुक्त अन्न पिष्टमय वा वनस्पतिज पदार्थांबरोबर खाण्याची पद्धत पडली आहे. 'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते -प्रेम, ज्ञान व शक्ती.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑक्टोपसला किती मेंदू असतात ?२) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे ?३) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे ?४) 'आकाश' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) १८ व्या लोकसभेत देशातील सर्वात लहान मतदारसंघ कोणता ?*उत्तरे :-* १) नऊ २) मॅग्नस कार्लसन ३) आयुष्यमान खुराणा ४) गगन, नभ, अंबर, व्योम, खग, आभाळ ५) लक्षद्वीप ( ४७,९७२ मतदार )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. शेख Mwh, मुख्याध्यापक तथा शिक्षक नेते, नांदेड👤 टी. अशोक साईनाथ, तेलंगणा👤 शिवराज सीताराम वडजे, शिक्षक, नांदेड👤 तुळशीराम सिरमलवार, शिक्षक, धर्माबाद👤 भाऊसाहेब आबा अहिरे,नाशिक👤 सचिन पवळे, धर्माबाद👤 नागेश तांबोळी, धर्माबाद👤 श्यामानंद लिंगमपल्ले, धर्माबाद👤 सुभाष बोडके👤 रामदास डुमणे, नांदेड👤 मारोती कोटगले, धर्माबाद👤 प्रकाश बंडेवार, धर्माबाद👤 विलास बोंबले, परभणी👤 बालाजी भाऊ पूर्णेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचारात किंवा करत असलेल्या कृतीत जर प्रामाणिकपणा ,नि:स्वार्थ भावना किंवा सत्यता असेल तर कुठेही फिरण्याची आवश्यकता पडत नाही. आणि आपल्या खिशातील पैसे सुद्धा खर्च करावे लागत नाही. कारण त्यात फक्त सत्कर्म असते. आणि तेच सत्कर्म करणे हेच आपले खरे कर्तव्य आहेत. बाकी दिखावूपणा करून नको त्या प्रकारचे जीवन जगण्याला कर्तव्य नाही तर स्वार्थ आणि प्रसिद्धी मिळवणे असे म्हणतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कष्टाची कमाईच श्रेष्ठ*एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो.हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करूनचोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 एप्रिल 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_6.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:’मीर’ या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले ’सोयूझ’ हे अंतराळयान ’मीर’ला भेटले.**१९९८:भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.**१९६६:भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.इंग्लिश खाडीसह जगातील अनेक खाड्या त्यांनी पार केल्या होत्या.**१९६५:व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला ’अर्ली बर्ड’ हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला.या उपग्रहामुळे माहिती व करमणुकीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली**१९३०:प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.**१९१७:पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८९६:आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.**१६५६:शिवाजीमहाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:प्रा.अशोक बाळू पाटील-- लेखक**१९७८:संजय मुकुंदराव निकम-- कवी* *१९७४:आशुतोष अडोणी -- लेखक,संपादक, वक्ते* *१९५९:दिप्ती कोदंड कुलकर्णी -- कवयित्री लेखिका* *१९५९:प्रा.प्रवीण दवणे-- सुप्रसिद्ध मराठी लेखक,गीतकार,पटकथालेखक**१९५६:दिलीप वेंगसरकर – क्रिकेटपटू**१९५३:भारतकुमार राऊत-- राज्यसभेचे माजी खासदार प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४९:साहेबराव ठाणगे-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४०:शैला द्वारकादास लोहिया-- मराठी साहित्यातील कथाकार,कादंबरीकार आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक.(मृत्यू:२४ जूलै २०१३)**१९३४:नीळकंठ खाडिलकर:ज्येष्ठ पत्रकार दैनिक नवा काळचे संपादक(मृत्यू:२२ नोव्हेंबर २०१९)* *१९३१:गंगाधर गणेश पाटील--समीक्षक, संपादक**१९३१:रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री(मृत्यू:१७ जानेवारी २०१४ )**१९२८:जेम्स वॉटसन – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक (१९६२) विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ**१९२७:विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही.एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (मृत्यू:२८ जून २०००)**१९१७:रघुनाथ विष्णू पंडित –कोकणी भाषेतील त्यांच्या काव्यात्मक निर्मितीसाठी ते प्रसिद्ध,कोंकणी कवी**१९१७:’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (मृत्यू:१८ नोव्हेंबर २००६)**१९०९:जी.एन.जोशी – भावगीतगायक व संगीतकार.एच.एम.व्ही.या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या.(मृत्यू:२२ सप्टॆंबर १९९४)**१८९०:अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर (मृत्यू:९ सप्टेंबर १९६०)**१८८७:पांडुरंग श्रीधर आपटे--- मराठी साहित्यिक,भारतातली पहिली राष्ट्रीय शाळा आपटे गुरुजींनी येवला येथे काढली होती.(मृत्यू:१९ डिसेंबर१९५६)**१८६४:सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२३ जानेवारी १९३४)**१७७३:जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू:२३ जून १८३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:आशा पोतदार -- मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतीलअभिनेत्री(जन्म:२१ ऑगस्ट१९३९)** २००१:देवीलाल-- भारताचे माजी उपपंतप्रधान व हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री(जन्म:१६ सप्टेंबर १९१४)**१९९२:आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (जन्म: २ जानेवारी १९२०)**१९८९:पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार.(जन्म:७ मे १९१२)**१९८३:जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत,पद्‌मविभूषण (जन्म:१० जून १९०८)**१९५५:विनायक महाराजा मसूरकर – धर्मभास्कर**१९४८:साधुदास(गोपाळ गोविंद मुजुदार. पाटणकर) --मराठी कवी,कादंबरीकार व चरित्रकार(जन्म:१८८३)* *११९९:रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म:८ सप्टेंबर ११५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रासंगिक लेख*... आरोग्यम धनसंपदा ....*मनुष्य पृथ्वी तलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. इंग्रजीत एक म्हण आहे Sound in Body is Sound In Mind अर्थात शरीर मजबूत तर मन मजबूत.  मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *30 लाख नोकऱ्या, आरक्षणाची मर्यादा वाढवणार, गरीब महिलांना 1 लाख, काँग्रेसने जाहीर केला जाहीरनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट 'जैसे थे', कर्जधारकांना दिलासा!*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठ्या प्रमाणात रस्ते बांधले जातात पण महिलांसाठी स्वच्छतागृह नाही:पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह बंधनकारक करावी-डॉ. निलम गोऱ्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली जिल्ह्यात 114 जण हद्दपार:98 जणांवर कारवाई सुरू, निवडणुकीपूर्वी पोलिस ॲक्शन मोडवर; 39 जण कारागृहात स्थानबद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेत मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे केले आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यूपीत मदरशातील शिक्षण सुरूच राहणार अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - 2024 - *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌞 *सौर वारा म्हणजे काय ?* 🌞 *************************हलत्या हवेला वारा म्हणतात. आपण शाळेतच हे शिकतो. पण सूर्यावर तर हवाच नाही हेही आपण शिकतो. मग तिथून वारा कसा काय वाहू लागेल ? हे खरं आहे. पण सौरवारा याचा शब्दश: अर्थ न घेता त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. सूर्याच्या अंतरंगात अणुमिलनाच्या अणुभट्ट्या सतत धडधडत असतात. तिथलं तापमानही त्यामुळे कोट्यवधी अंशांइतकं वाढलेलं असतं. त्यापायी मग या ताऱ्याभोवती असलेलं वायूचं वातावरणही तापतं. या बाहेरच्या प्रभावळीतल्या वायूंचं प्लाझ्मा रूपात अवस्थांतर होतं. म्हणजेच त्या वायूच्या रेणूंचे घटक असलेले विद्युतभारधारी मूलकण स्वतंत्र होतात. त्यांच्याठायी असलेल्या प्रकार ऊर्जेमुळे वेगवानही होतात. सूर्यापासून दूरवर जाऊ पाहतात. जेव्हा पोटातल्या आगीपायी खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्या वेळी त्यातून राख, राळ आणि लाव्हा दूरदूरवर फेकला जातो. त्याचप्रकारे सूर्याच्या प्रभावळीतील प्लाझ्मा दूरदूरवर, संपूर्ण सौरमालिकेवर फेकला जातो. *या वेगवान मूलकणांच्या बहुतांश प्रोटॉनच्या, झोतालाच सौरवारा असं म्हणतात.* तसा हा सतत वाहतच असतो. पण अधूनमधून सूर्यावर काही वादळी घटना घडतात. सोलर फ्लेअर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तुफानांच्या वेळेस सौरवाराही वेगांनं वाहतो. त्याचा वेग सेकंदाला ९०० किलोमीटरपर्यंतही वाढतो.या झोताचा मारा संपूर्ण सौरमालिकेवर होत असतो. कोणताही ग्रह किंवा उपग्रह त्याच्या तावडीतून सुटत नाही. तरीही सूर्याला जवळ असणाऱ्या ग्रहांना त्याचा अधिक फटका बसू शकतो. वेगानं जाणाऱ्या प्रोटॉनच्या अंगी चुंबकीय बलही असतं. त्यामुळे त्या झोताचा प्रसार झालेल्या सर्वच प्रदेशावर चुंबकीय क्षेत्रही फैलावतं. सूर्य स्वतःभोवती गिरकी मारत असल्यामुळे या चुंबकीय क्षेत्राचा आकार एखाद्या स्प्रिंगसारखा किंवा गोलगोल जिन्यासारखा होतो. त्या क्षेत्राचा एक बुडबुडा तयार होऊन तो साऱ्या सौरमालिकेला गवसणी घालतो.ज्या ग्रहांना स्वतःचं चुंबकीय क्षेत्र नसतं त्यांना मग या चुंबकीय क्षेत्राच्या हमल्याच्या परिणामांना तोंड द्यावं लागतं. पृथ्वीचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे त्यावर आदळून हे मूलकण इतरत्र विखुरले जातात. पृथ्वीचा बचाव होतो. धरतीचं चुंबकीय क्षेत्र आणि सौरवारा यांच्यामध्ये होणाऱ्या या अभिक्रियेपोटीच धरतीच्या अतिउत्तरेच्या आणि अतिदक्षिणेच्या आकाशात नयनरम्य रंगांची उधळण करणाऱ्या आॅरोरांचा आविष्कार बघावयास मिळतो. आज आपण अवकाशात अनेक उपग्रह स्थापित केलेले आहेत. त्यांना चुंबकीय संरक्षक आवरण नसतं. त्यामुळे सौरवाऱ्याच्या झोतात सापडून त्यांच्या कामात बाधा येऊ शकते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत, म्हणून ते मनात येताच कृती करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पहिला राष्ट्रीय सागरी दिवस* केव्हा साजरा केला गेला ?२) कनिष्ठ न्यायालयात किती व कोणत्या न्यायालयांचा समावेश होतो ?३) 'ब' जीवनसत्त्व एकूण बारा प्रकारची आहेत त्यांना काय म्हणतात ?४) 'आई' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) २०२४ ला होणारी लोकसभेची कितवी निवडणूक आहे ? *उत्तरे :-* १) ५ एप्रिल १९६४ २) तीन - जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय व महसूल न्यायालय ३) बी - कॉम्प्लेक्स ४) माता, जननी, माउली, माय, मातोश्री, जन्मदात्री ५) १८ वी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 लक्ष्मण दशरथ सावंत, कवी व शिक्षक, औरंगाबाद👤 गौरी हर्षल कुलकर्णी, समुपदेशक👤 अभिनंदन पांचाळ, धर्माबाद👤 साजिद सय्यद, शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 व्यंकट चन्नावार, नायगाव👤 पोषट्टी सिरमलवार👤 दत्ताहरी पा. कदम👤 मारोती कदम👤 राजेश सुरकूटवार👤 रफिक सय्यद, सिंदखेडराजा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजों आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. पण,त्याच त्रासामधून कधीकधी आपल्याला नवी दिशा सुद्धा मिळत असते.पण, काही त्रास आपण स्वतः हून करवून घेतो. विनाकारण इतरांच्याकडे लक्ष देऊन आपली वेळ वाया घालविण्यात आणि आनंद शोधण्यात आपण.स्वतःला. धन्य समजून घेत असतो.त्यामुळे त्याचा कुठेतरी त्रास होत असतो. म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला,"आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल."त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - समुहात add होण्यासाठी https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय सागरी दिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.**१९५७:कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस.नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.**१९५५:प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला**१९४९:भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली**१९३०:२४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.**१६७९:राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व.१०]**१६६३:दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:मुग्धा वैशंपायन-- झी मराठी वाहिनी वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका**१९९३:प्रा.केशरचंद नारायण राठोड -- लेखक,कवी* *१९८५:आरती सिंग-- अभिनेत्री* *१९८०:नरेंद्र पाटील--- कवी**१९७९:प्रज्ञाधर ढवळे-- कवी**१९७७:रुपाली गांगुली-- भारतीय अभिनेत्री**१९७५:प्रा.डॉ.विनोद देवचंद राठोड-- लेखक, कवी**१९७१:संदीप नारायण राक्षे-- कवी,लेखक, चित्रपट निर्माता**१९६९:महेश रामराव मोरे- कवी, कादंबरीकार* *१९६३:उषा नाईक-- भारतीय अभिनेत्री, मराठी चित्रपटांमध्ये काम* *१९६१:प्रशांत पुरुषोत्तम दामले-- प्रसिद्ध मराठी अभिनेता**१९६०:महावीर शाह-- हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता (मृत्यू:३१ऑगस्ट २०००)* *१९५३:अनुराधा कौतिकराव पाटील-- सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका व विविध पुरस्काराने सन्मानित**१९४९:डॉ.राम पंडित-- प्रसिद्ध मराठी गझलकार**१९४७:प्रकाश देशपांडे-- इतिहास-साहित्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक* *१९४७:शाहीर विजय रामचंद्र जगताप-- प्रसिद्ध शाहीर,लेखक,संपादक**१९४६:आनंद बाबू हांडे-- प्रसिद्ध लेखक**१९४२:मधुकर सीताराम जोशी (मधू जामकर) -- प्रतिभावंत कवी व उत्तम समीक्षक**१९४०:वासंती अरुण मुझुमदार-- ललितलेखिका,कवयित्री(मृत्यू:७ नोव्हेंबर २००३)**१९३६:वसंत कोकजे--लेखक,कवी**१९३०:राम विठ्ठल नगरकर-- विनोदी नट, रामनगरी प्रसिद्ध आत्मचरित्र (मृत्यू:८:जून १९९५)**१९२३:शांता मुकुंद किर्लोस्कर-- कथाकार,कादंबरीकार,संपादक(मृत्यू:१५ सप्टेंबर २००७)**१९२०:डॉ.रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (मृत्यू:९ जुलै २००५)**१९२०:आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (मृत्यू:२४ नोव्हेंबर २००४)**१९०९:अल्बर्ट आर.ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (मृत्यू:२७ जून १९९६)**१९०८:बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (मृत्यू:६ जुलै १९८६)**१८९०:आनंदराव कृष्णाजी टेकाडे-- कवी, गीतकार (मृत्यू:१६ फेब्रुवारी १९६४)**१८७७: माधवराव विनायक किबे (सरदार)-- संशोधक,लेखक (मृत्यू:१२ आक्टोबर १९६३)**१८५६:बुकर टी.वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक,वक्ते व शिक्षणतज्ञ (मृत्यू:१४ नोव्हेंबर १९१५)**१८२७:सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू:१० फेब्रुवारी १९१२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:अनिस चिस्ती-- इस्लाम धर्माचे व तत्त्वज्ञानाचे,तसेच उर्दू भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक**२०१३:राम उगावकर-- कवी,शाहीर,गीतकार (जन्म:५ मार्च१९२९)**२००२:मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित भारतीय उद्योगपती,जम्बो ग्रुपचे संचालक (जन्म:१९४६)**१९९८:रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री**१९९६:भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक**१९९३:दिव्या भारती – हिन्दी,तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म:२५ फेब्रुवारी १९७४)**१९९२:सॅम वॉल्टन-- वॉलमार्टचे संस्थापक(जन्म:२९ मार्च १९१८)**१९६४:गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार**१९४०:चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी,महात्मा गांधींचे जवळचे मित्र,समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म:१२ फेब्रुवारी १८७१)**१९२२:पंडिता रमाबाई – विधवा,परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका,संस्कृत पंडित (जन्म:२३ एप्रिल १८५८)**१९१७:शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर* *_शुभ शुक्रवार _* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *फोर्ब्सनुसार 37 वर्षीय निखिल कामथ हा भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेड - उमेद स्वयंसहाय्यता समूहातल्या दोन लाख महिलांनी घेतली शंभर टक्के मतदान करण्याची शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे 28 दिवसात 23 जणांचा उष्माघाताने मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारत पुढील तीन वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने परभणीतील उमेदवार अचानक बदलला; हवामान अभ्यासक पंजाबराव डख रिंगणात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंजाबने गुजरातला हरविले, मोठी धावसंख्या केली चेस*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फंगस / बुरशी* 📙एखादा अन्नपदार्थ उघडा राहिला, तर त्यावर बुरशी धरू लागते. एखादे लाकूड पावसात भिजत राहिले, तर त्यावर सुद्धा झपाट्याने बुरशी धरते. या बुरशीमुळे अनेक गोष्टींचा वापर करणे अशक्य होऊन बसते. एवढेच नव्हे तर या बुरशीमुळे मानवांत, प्राण्यांत, वनस्पतीत कित्येक आजारांचाही उद्भव झालेला दिसतो.पिकांवर पडणारे बुरशीजन्य रोग बघताबघता सर्व पीक नष्ट करतात. ज्वारी - बाजरीवर पडणारा काळा बुरा, आंब्याच्या मोहरावर धरणारा चिकटा, मक्यावर पडणारी कोळशी ही बुरशीजन्य रोगांची काही उदाहरणे. पावसाळ्याच्या दिवसांत कातडीचे होणारे विकार, पायाला होणाऱ्या चिखल्या, डोक्यातील कोंडा, प्राण्यांचे झडणारे केस हेही आजार बुरशीजन्य. म्हणजे बुरशी ही वाईटच असते, असे मानायची गरज मात्र नाही. खरे सांगायचे म्हणजे बुरशीकडे निसर्गाने एक फार मोठे काम सोपवलेले आहे. नको असलेली प्रत्येक गोष्ट नष्ट करायला, पुन्हा जमीन समृद्ध करायला सर्व प्रकारची बुरशी मदत करत असते.फंगस ही वेगळी जीवसृष्टी आहे. आता सजीवांच्या सहा सृष्टी मानल्या जातात. अशा या वनस्पतीला स्वतःच्या पोषणासाठी कोणत्यातरी जिवंत वा मृत सजीवावर अवलंबून राहावे लागते. तिचे अस्तित्व त्यामुळेच फक्त सजीव वा त्यांचे अवशेष यांच्याशी संबंधित राहते. बुरशी एकपेशीय असेल व बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे आपल्या माहितीचे यिस्ट वा किण्व. बहुपेशीय बुरशीचे उदाहरण कुत्र्यांच्या छत्र्या किंवा मशरूम. यालाच अळंबी पण म्हणतात. अळंबी खायला चविष्ट लागतात. म्हणून त्यांची लागवडही केली जाते. मोठाल्या तंतुरूप पेशींनी अळंबी वाढतात. एखाद्या मेलेल्या झाडाच्या खोडावर पावसाळ्यात बघता बघता अळंबी वाढलेली दिसतात. पण याआधी त्या खोडाच्या आतील चहूबाजूंनी बुरशीचे प्रवेश करून ते खोड पोखरलेले असते.बुरशीच्या असंख्य जाती निसर्गात आढळतात. मोजदाद अशक्य व्हावी एवढ्या जाती आज ज्ञात आहेत; पण नवीन जातींचा पत्ता ज्या वेगाने लागतो, तो लक्षात घेतला तर किमान 'तीन एक लाख प्रकारच्या जाती' पृथ्वीवर असाव्यात. बुरशीचे सर्व पुनरुत्पादन साध्या द्विभाजन पद्धतीने होत जाते. जेव्हा प्रतिकूल हवामान असेल तेव्हा स्पोअर जमिनीवर विखुरली जातात. बुरशीचा सलग पसरत गेलेला थर कित्येक मीटरपर्यंत जमिनीवर आढळतो. तसेच काही मीटर खोलवर ही बुरशी आढळते. बुरशीचा एखादा तंतू किंवा एखादे स्पोअर अनुकूल हवामानात इतक्या प्रचंड वेगाने तंतूनिर्मिती करते की या वेगापुढे अन्य कशाचीही पुनरुत्पादनाची गती कमीच पडावी. एखाद्या बुरशीच्या कणापासून जेमतेम चोवीस तासांत एक किलोमीटर लांबीची पुनर्निर्मिती होऊ शकते. बुरशीसाठी कवक हाही शब्द वापरला जातो.अळंबी खाण्यासाठी, यीस्ट पदार्थ फसफसण्यासाठी, चीजला चव आणण्यासाठी, सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी बुरशी वापरली जाते. उपयुक्त बुरशीचे वापर आठवले म्हणजे बुरशीबद्दलची किळस जरा कमी होईल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातूनl*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना *'राष्ट्रसंत'* हा किताब कोणी दिला ?२) IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?३) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?४) 'अहंकार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) २०२३ या वर्षाचा 'सरस्वती सन्मान पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) डॉ. राजेंद्र प्रसाद, १९५५ २) शॉन टेट, राजस्थान रॉयल्स, २०११, १५७.७१ किमी प्रतितास ३) कुशाण ४) गर्व, घमेंड ५) प्रभा राव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 संग्राम निलपत्रेवार, नांदेड👤 हणमंत पवार👤 काझी मुजाहिद सय्यद👤 मोहमंद अफजल शेख👤 गोविंद दळवी👤 लोकेश शिंदे👤 गोविंद सोनपीर👤 गणेश सावंत, शिक्षक, भोकर👤 ईश्वर वाडीकर, शिक्षक, देगलूर👤 सुरेश घाळे👤 अनिल ईबीतदार👤 राजश्री संगपवाड👤 निलेश चंदेकर👤 लक्ष्मण सिरमलवार, धर्माबाद👤 नागेश यमेवार👤 संतोष पाटील चंदनकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हसत, खेळत रहाणे जीवन आहे. पण,इतरांचे हसते, खेळते जीवन बघून त्यात संकटे बनून त्यांचे सुखाचे, समाधानाचे दिवस उद्धस्त करणे व आपण स्वतः आनंदी होणे याला जीवन जगणे म्हणत नाही. तर स्वतः पेक्षा इतरांच्या दु:खात आपुलकीने सहभागी होऊन त्यांचे दुःख आपले दुःख हीच भावना मनात ठेवल्याने जीवन जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. म्हणून कोणाच्याही जीवनात संकटे बनून राहण्यापेक्षा त्यांच्या जीवनातील संकटे कशाप्रकारे दूर करता येईल यासाठी माणुसकीच्या नात्याने एकदा तरी प्रत्येकांनी प्रयत्न करायला पाहिजे कारण, कोणत्याही संकटांना येण्यासाठी आमंत्रण द्यावे लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले " बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!माझी चार लोकात खिल्लीउडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!मुलगा म्हणालाराजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहेमी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातीलसारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातातसोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोरधरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळेमोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडतेमुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतोचांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाहीन राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेलाकपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्यानाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेलतर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही. मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 एप्रिल 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/sLZfHuz1NoyP6od8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९८४ भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश शर्मा यांचे सोविएत अवकाशायन सोयुझ टी- ११ द्वारे उडान**१९६८:मेम्फिस,टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली**१९६८:’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले**१९४९:पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.**१९४४:दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:विजय गंगाप्रसाद देवडे-- लेखक* *१९८०:शेख पीरपाशा ईसाक -- कवी* *१९७२:अजय देशपांडे -- लेखक,कवी, गझलकार,समीक्षक* *१९७१:हेरंब कुलकर्णी-- मराठी वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करणारे लेखक**१९६९:पल्लवी जोशी-- भारतीय अभिनेत्री,लेखिका आणि चित्रपट निर्माती* *१९६८:बबन मारोतराव आव्हाड -- लेखक, कवी* *१९६१:डॉ.सुधीर अनंत काटे -- कवी,लेखक* *१९६०:राजेंद्र विश्राम देसले-- चरित्रकार,कथा लेखक* *१९५९:नामदेव राठोड-- कवी**१९५८:नारायण वामनराव जोशी-- लेखक,धडपड मंच संयोजक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५६:प्रकाश (अप्पा) जाधव -- लेखक* *१९५५:प्रेमा नारायण-- अभिनेत्री-नर्तिका**१९५४:परवीन बाबी-- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल(मृत्यू:२० जानेवारी २००५)**१९५३:सुरेश माणिकराव कुलकर्णी-- मुक्त पत्रकार,लेखक**१९५२:चंद्रशेखर नार्वेकर(एन.चंद्रा)-- भारतीय निर्माता,लेखक आणि दिग्दर्शक* *१९४९:नंदकुमार जयराम मुरडे-- कवी,लेखक**१९४८:महावीर रामचंद्र जोंधळे-- प्रसिद्ध कवी, कथाकार,बालसाहित्यकार,पत्रकार**१९४७:मच्छिंद्र कांबळी -- मालवणी नटसम्राट मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते,प्रसिद्ध नाट्यनिर्माते(मृत्यू:३० सप्टेंबर २००७)**१९४६:प्रभाकर लक्ष्मण मयेकर--मराठी नाटककार, कथाकार (मृत्यू:१८ आगस्ट २०१५)**१९३८:किशोर दिपचंद हिवाळे-- लेखक* *१९३८:प्रा.डॉ.अजीज नदाफ-- मराठी साहित्यिक,मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते* *१९३३:रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू:१७ जानेवारी २०२०)**१९२६:प्रा.बाळ केशव सावंगीकर--लेखक**१९२१:हरि कृष्ण लाल भगत-- माझी केंद्रीय मंत्री (मृत्यू:२९ ऑक्टोबर २००५)**१९१९:भालचंद्र महाराज कहाळेकर-- व्यासंगी अध्यापक,कुशल संघटक,प्रभावी भाषोपासक(मृत्यू:२८ मे १९७५)**१९०२:पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू:१ एप्रिल १९८४)**१८४२:एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू:३ आक्टोबर १८९१)**१८२३:सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता,(मृत्यू:१९ नोव्हेंबर १८८३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:गोविंद मल्हार कुलकर्णी-- समीक्षक( जन्म:२१ डिसेंबर १९१४)**२०००:नरेश कवडी--भाषातज्ञ,कथाकार, मर्मज्ञ समीक्षक,ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक.(जन्म:५ ऑगस्ट १९२२)* *१९९६:आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म:५ जुलै १९२०)**१९८७:सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (जन्म:७ मार्च १९११)**१९७९:पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म:५ जानेवारी १९२८)**१९६८:मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म:१५ जानेवारी १९२९)**१९२३:जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)**१६१७:जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म:१५५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मतदार राजा जागा हो ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत ३ हजार १९६ कोटी रूपयांचा मालमत्ता कर संकलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सलग पाच टर्म यवतमाळ वाशीम लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेल्या भावना गवळी यांच्या ऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात यावर्षी तीव्र उष्णतेचा हवामान विभागाने दिला इशारा, त्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी घेतली बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एकनाथ शिंदेंवर हिंगोलीची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की, बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलकत्ताने दिल्लीला 106 धावानी हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पेसमेकर काय करतो ?* 📙 **************************खरं तर हा प्रश्न कृत्रिम किंवा यांत्रिक पेसमेकर काय करतो ? असा विचारायला हवा. कारण आपल्या शरीरात एक नैसर्गिक पेसमेकरही असतो. तो हृदयाचा ताल नियंत्रित ठेवतो. हृदयाचा हा तब्बलजी सायनो अॅंट्रियल नोड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशींच्या एका गुच्छात असतो. जेव्हा हृदयाचा ठोका पडतो तेव्हा या पेशी एक विद्युतस्पंद म्हणजेच विजेचा लोळ हृदयाच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकाकडे पाठवतात. जसजसा हा विद्युतस्पंद हृदयाच्या निरनिराळ्या भागांवरून प्रवास करतो तसतसा तो त्या भागाचं आकुंचन आणि प्रसरण नियंत्रित करतो. प्रथम हृदयाचे दोन्ही वरचे कप्पे आकुंचन पावतात. ते जेव्हा प्रसरण पावतात त्या वेळी त्या कप्प्यांमधील रक्त खालच्या कप्प्यांमध्ये उतरतं आणि जेव्हा ते खालचे कप्पे प्रसरण पावतात तेव्हा ते रक्त शरीरभर जोरानं पाठवलं जातं. परत एकदा हृदयाच्या वरच्या भागात विद्युतस्पंद उभा राहतो आणि हे चक्र अविरत चालू राहतं. हृदय नियमित वेगानं आणि इमानेइतबारे आकुंचन प्रसरण पावत रक्त शुद्ध करून घेत ते शरीरभर खेळवत राहील अशी योजना राबवत राहतं.पण काही जणांच्या हृदयाचा हा ताल बिघडतो. ते हृदय एकदम जलद गतीने तरी धडधडू लागतं. या अवस्थेला टॅकीकार्डिया म्हणतात. किंवा उलट ते मंदगतीने दुडक्या चालीने चालत राहतं. या स्थितीला ब्रॅडीकार्डिया म्हणतात. किंवा अशा कोणत्याही नियमांनं न चालता ते अनियमितरित्या धडधडतं. अशावेळी नैसर्गिक पेसमेकरच्या मदतीला किंवा त्याचं काम करण्यासाठी बदली म्हणून पेसमेकर नावाचं यंत्र पोटाच्या किंवा छातीच्या पोकळीत बसवलं जातं. या यंत्रात विद्युतस्पंद तयार करणारा एक जनरेटर असतो; आणि हा जनरेटर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारा असतात. या तारा निलेमधून नेऊन थेट हृदयाच्या कप्प्यात सोडलेल्या असतात. साधारण अधेलीच्या आकाराचा हा पेसमेकर टायटॅनियम या धातूचा बनवलेला असतो. त्याच्यावर शरीरातील द्रवांचा कोणताही परिणाम होत नाही. तीच बाब तो पेसमेकर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारांची. पेसमेकरमधला जनरेटर चालविण्यासाठी दीर्घकाळ चालू राहणाऱ्या आण्विक बॅटरी वापरतात. त्यामुळे वरचेवर बॅटरी बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागत नाही. हा पेसमेकर विवक्षित तालावर विद्युतस्पंदानं हृदयाला टोचणी देत त्याला आपला ताल नियमित राखायला मदत करतो. त्यामुळं मग त्या रुग्णाला सर्वसामान्य निरोगी जीवनशैली अंगीकारणे सोपं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान व गोळ्या दातांनी चावता येत नाहीत.त्या सरळ पोटात गिळणेच चांगले.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *EVM* चा फुल फॉर्म काय आहे ?२) जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश कोणता ?३) EVM मध्ये सर्वाधिक किती मते नोंदली जाऊ शकतात ?४) भारतात EVM प्रथम कुठे वापरली गेली ?५) EVM कशावर चालते ? *उत्तरे :-* १) Electronic Voting Machine २) भारत ३) ३,८४० मते ४) परुर विधानसभा मतदारसंघ, केरळ ( १९८२ ) ५) अल्कलाईन बॅटरी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्री हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ञ👤 अंकुश शिंगाडे, साहित्यिक, नागपूर👤 शंकर भोजराज, जारीकोट👤 प्रताप रायघोळ👤 रमेश येलमे मंगनाळीकर👤 चंद्रकांत अमलापुरे, शिक्षक, नायगाव👤 बापूराव वाघमारे👤 राजेंद्र देसले👤 श्याम पांचाळ👤 गणेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 शिलवंत डुमणे👤 शिवाजी भोसले👤 श्याम लोलापोड👤 राम गंगाधर नाईनवाड👤 प्रवीण पाटील👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीचा सामना करत त्या अनुभवातून पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करत असते‌ ती व्यक्ती, दुसऱ्यांच्या विषयी नको, त्या गोष्टी करण्यासाठी आपली वेळ वाया घालवत नाही. कारण परिस्थिती कशी असते याची पूर्णपणे तिला जाणीव असते.म्हणून ती व्यक्ती , त्याच परिस्थितीला आपला गुरू मानून इतरांसाठी काही करता येईल का यासाठी धडपडत असते. आपणही ज्या, परिस्थितीवर मात करून जगण्याचा प्रयत्न केले असाल त्या परिस्थितीला कधीही विसरू नये. कारण, परिस्थिती माणसाला नवी दिशा दाखवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wgv78RucPVxLfzas/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:आय.एन.एस.आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.**१९७५:बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.**१९७३:मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ.जोएल अँगेल याला केला**१९४८:ओरिसा उच्‍च न्यायालयाची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:निरंजन मुडे -- कवी* *१९७७:डॉ.रमेश तुळशीराम रावळकर-- कवी,लेखक,संपादक* *१९७१:माधुरी मगर-काकडे-- कवयित्री, लेखिका* *१९७१:रवींद्र सूर्यभान साळवे-- कवी,लेखक**१९७०:विनोद पितळे-- पत्रकार,लेखक**१९६७:सुधीर फाकटकर-- विज्ञान तंत्रज्ञान प्रचारक तथा लेखक* *१९६५:नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (मृत्यू:१३ ऑगस्ट २०००)**१९६५:लीलाधर सदाशिव महाजन-- कवी, लेखक* *१९६२:जयाप्रदा – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९६१:डॉ.शंकर किसन बोराडे-- स्तंभलेखक, समीक्षक(मृत्यू:२६ नोव्हेंबर २०२३)**१९५९:संदीप वासलेकर-- मराठी तत्त्वज्ञ आहेत. हे संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात**१९५५:हरिहरन अनंत सुब्रमणी-- भारतीय पार्श्वगायक,भजन आणि गझल गायक* *१९५१:रवीप्रकाश कुलकर्णी-- चरित्र लेखक, पत्रकार* *१९५१:डॉ.किशोर रघुनाथ पवार-- प्रसिद्ध विज्ञान लेखक,व्याख्याते* *१९५१:अलका शशांक कुलकर्णी -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९४१:दत्ता बाळ--तत्त्वचिंतक,ग्रंथकार (मृत्यू:३ सप्टेंबर १९८२)**१९४१:कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे--मराठी लेखक संपादक**१९३४:जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ**१९१४:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (मृत्यू:२७ जून २००८)**१९०४:रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (मृत्यू:५ आक्टोबर १९९१)**१९०३:कमलादेवी चट्टोपाध्याय– मॅगसेसे पुरस्कार विजेत्या(१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू:२९ आक्टोबर१९८८)**१८९५:कृष्णराव भाऊराव बाबर-- प्रसिद्ध लेखक ( मृत्यू:९ जून १९७४)**१८८२:द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(मृत्यू:२१ जून १९२८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:किशोरी आमोणकर--- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका(जन्म:१० एप्रिल १९३१)* *१९९८:हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार,’चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक**१९९८:मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (जन्म:१७ डिसेंबर १९००)**१९९२:उद्धव जयकृष्ण शेळके-- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार(जन्म:८ ऑक्टोबर १९३१)**१९८८:डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर--एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ,संशोधक, शैलचित्रे अभ्यासक (जन्म:४ मे १९१९)* *१९८५:डॉ.वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय,संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म:१३ मार्च १८९३)**१८९१:एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म:४ एप्रिल १८४२)**_१६८०:छत्रपती शिवाजी राजे भोसले (जन्म:१९ फेब्रुवारी १६३०)_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आईच्या हातचे जेवण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदेंच्या शिवसेना उमेदवारासाठी नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा:10 एप्रिल रोजी रामटेक तर 14 एप्रिल रोजी चंद्रपूर मध्ये दुसरी सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपचे आमदार अजय निषाद यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *खासदार संजय सिंह यांना आज सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील धरणांनी तळ गाठला, मराठवाड्यात अवघं 19.36 टक्के पाणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवी दिल्लीत आयोजित ५६ व्या राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेचा किताब महाराष्ट्रानं पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 फायबर ऑप्टिक ग्लास 📙 साधी काच कडक असते. पण काचेचाच एक प्रकारचा अतिशय शुद्ध स्वरूपातील विशिष्ट प्रक्रिया केलेला तंतू बनवला, तर त्यातून प्रकाशाचे वहन होऊ शकते. शिवाय हा तंतू पाहिजे तसा वाकवता, वळवता येऊ शकतो. त्याची जाडी अशी जवळपास नसतेच. या प्रकारालाच 'फायबर ऑप्टिक ग्लास' असे म्हणतात.१९५५ साली प्रथम फायबर ऑप्टिक ग्लास प्रायोगिकरित्या वापरली तयार केली गेली. पण व्यावहारिक उपयोग सुरू होण्यासाठी त्यानंतर जवळजवळ एक दशक जावे लागले. प्रथम अनेक वैद्यकीय उपकरणांत या तंतूंचा वापर केला गेला. त्यानंतर या तंतूंचा उपयोग दळणवळणासाठी म्हणजे टीव्ही सिग्नल्स, टेलिफोन यांसाठीही करता येऊ शकेल, असा विचार पुढे आला. आज घटकेला फायबर ऑप्टिक्सने जगच व्यापायला सुरुवात केली आहे.जेमतेम एक दशांश मिलिमीटर जाडीचा हा काचेचा तंतू नुसत्या डोळ्यांनी जेमतेम दिसू शकतो. अशी अडीचशे तंतूंची जुडी बांधली, तर ती जेमतेम इंचभराच्या जाडीची होते. पण यातील प्रत्येक तंत्रातून स्वतंत्र दळणवळण शक्य असते व त्याची गुणवत्ताही अन्य कशापेक्षाही उत्तम असते. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे तत्त्व आपल्याला माहिती आहेच. तारेच्या एका टोकातून प्रकाश लहरी आत शिरल्या की, त्या थेट दुसऱ्या टोकापर्यंत टोटल इंटर्नल रिफ्लेक्शनमुळे पोहोचतात. कितीही वळणे वा तिढे असले तरीही तंतूंच्या आतील कडांवर आपटून त्या तशाच पुढे सरकत राहतात, त्यांना कसलाही अडथळा येत नाही. या प्रकारामध्ये होणाऱ्या वहनात 'अंगभूत विरोध' (Resistance or loss) होत नसल्याने दळणवळणाची गुणवत्ता सर्वोत्तम राहते, हे महत्त्वाचे.फायबर ऑप्टिक उपकरणांचा वापर मानवी शरीरांतर्गत तपासण्या करण्यासाठी खूपच मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. कितीही वेळा कशीही वाकवता येणारी नळी मानवी शरीरात घालून तिच्यातून प्रकाशझोत शरीरात पाठवला जातो. प्रकाशझोताचा उगम शरीराबाहेर असल्याने त्याची उष्णता तर शरीराला जाणवत नाही, पण तीव्रता भरपूर असल्याने स्वच्छ उजेडात आतील बाजू या फायबर ऑप्टिक नळीने न्याहाळता येते. आत झालेला बिघाड म्हणजे जठरातील, आतड्यातील व्रण, मोठ्या आतड्याचे कर्करोग, गुडघ्यासारख्या मोठ्या सांध्यातील आतील भाग हा सहज न्याहाळुन त्याचे निदान व गरजेप्रमाणे इलाजही करता येतो. मूत्रमार्गातील व अन्नमार्गातील कित्येक रोगांचे निदान व उपचार यात सुलभता आली आहे, याचे कारण फायबर ऑप्टिकचा वापर. फायबर ऑप्टिक धाग्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांची लांबी. ही पाहिजे तेवढी असू शकते. येत्या दशकात या तंतूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊन सर्व दळणवळण अधिक स्पष्ट, स्वच्छ, सुकर होईल असे अनेकांना वाटते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचा क्लास हा आर्थिक परिस्थितीवर नाही तर तुमच्या कर्तृत्वावर ठरत असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तुर्कीमध्ये सारस पक्ष्याला काय म्हटले जाते ?२) २०२४ ची ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन ग्रां पी कोणी जिंकली ?३) NIA च्या महासंचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?४) 'अरण्य' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण ? *उत्तरे :-* १) यारेन २) कार्लोस सेंझ, फेरारी संघ ३) सदानंद दाते ४) रान, वन, कानन, विपिन, जंगल ५) सर बी. एन. राव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भागवत जेठेवाड, केंद्रप्रमुख👤 चक्रधर शिंदे👤 माधव धुप्पे👤 प्रकाश साखरे, धर्माबाद👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबलगोंडे👤 माधव शिराळे👤 रंगराव वाकोडे👤 संभाजीराव गुनाळे👤 नागभूषणम भुसा👤 कामाजी सरोदे👤 गंगाधर सुगावकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण कोणाचे किती चांगले करतो, किंवा वाईट करतो किंवा कोणाची मदत करतो या विषयी आपल्याला माहित असते त्या सोबतच ज्यांना आपण कधीही वाचत नाही त्याला जरा या विषयी जास्त माहित असते. म्हणून स्वतःचे समाधान करण्यासाठी कोणाचे वाईट करण्याचा प्रयत्न करू नये.. शक्य ते चांगले करता येईल तेवढे करण्याचा नक्कीच प्रयत्न करावे कारण, चांगले करणाऱ्याकडेही बघणारे काही लोक या समाजात आजही आहेत. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्‍या विद्वत्तेच्‍या जोरावर त्‍याने समाजात अत्‍युच्‍च स्‍थान निर्माण केले होते, ज्‍या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्‍याचे नाव होते क्‍झेनथस, इसाप आपल्‍या आचरणातून क्‍झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्‍या काळी रोममध्‍ये सार्वजनिक स्‍नानगृहे असत, सज्‍जन लोक सार्वजनिक स्‍नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्‍झेनथसने इसापला स्‍नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्‍यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्‍याचे लक्ष स्‍नानगृहाच्‍या दारासमोर पडलेल्‍या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्‍या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्‍त्‍यात कसा म्‍हणून शिव्‍या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्‍या दगडाला अडखळून पडला, त्‍यानेही शिवी हासडली पण तो दगड त्‍याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्‍नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्‍नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्‍या पूर्ण तयारीनिशी क्‍झेनथस स्‍नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्‍झेनथसने इसापला विचारले तू तर म्‍हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्‍त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्‍येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्‍या देत होता पण दगड उचलून टाकण्‍याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्‍यामुळे फक्त एकच माणूस असल्‍याचे मी आपणास सांगितले.'' क्‍झेनथस निरूत्तर झाला.तात्‍पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्‍हाला स्‍वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्‍या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्‍हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 एप्रिल 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dmDpjpYGtDVvmEc2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय**१९९८:कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला**१९९०:स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना**१९८४:सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता**१९८२:फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.**१८७०:गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५:सचिन शिवाजीराव बेंडभर पाटील-- प्रसिद्ध कवी,कादंबरीकार,कथाकार, बालसाहित्यिक* *१९८१:मायकेल जॉन क्लार्क-- ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू* *१९७९:गणेश भारतराव रासने-- लेखक* *१९७६:अनधा जोशी मुधोळकर -- लेखिका* *१९७३:श्याम श्रीराम ठक-- प्रसिद्ध वऱ्हाडी कवी**१९७१:बबन शिंदे -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९६९:अजय वीरु देवगण – प्रसिद्ध अभिनेता**१९५९:भीमराव संपतराव सरवदे -- लेखक* *१९५७:प्रा.अविनाश राजाराम कोल्हे-- प्रसिद्ध लेखक**१९५३:रवींद्र दामोदर लाखे-- कवी आणि नाट्यदिग्दर्शक**१९५२:दीपक पराशर--भारतीय अभिनेता**१९५२:भारती बाबुराव हेरकर-- कवयित्री,लेखिका**१९५२:प्रा.अशोक नारायणराव आहेर-- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार* *१९५१:डॉ.अलका सर्वोत्तम चिडगोपकर -- प्रसिद्ध लेखिका,समीक्षक* *१९५०:मोहन गणुजी नाईक ( भीमणीपुत्र)-- प्रसिद्ध लेखक,गोरबोली(बंजारा)अभ्यासक**१९४२:किरण नगरकर--भारतीय इंग्रजी कादंबरीकार,नाटककार आणि पत्रकार.(मृत्यू:५ सप्टेंबर २०१९)* *१९२६:सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (मृत्यू:१५ जून १९७९)**१९२०:नानासाहेब शिरगोपीकर-- ट्रीकसीन्ससह भक्तिप्रधान नाटकं सादर करणारे कलाकार (मृत्यू:१४ ऑक्टोबर १९९४)**१९१०:शंकर दत्तात्रय भोसले-- कवी,लेखक(मृत्यू:१६ जून १९७२)**१९०७:गजानन जहागीरदार ---मराठी व हिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक(मृत्यू: १३ऑगस्ट १९८८)**१९०२:बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या’याद पियाकी आये’,’का करु सजनी’ इ. ठुमर्‍या लोकप्रिय आहेत.(मृत्यू:२५ एप्रिल १९६८)**१८९८:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – भारतीय इंग्रजी कवी,नाटककार,संगीतकार हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(मृत्यू:२३ जून १९९०)**१८८४:विनायक सीताराम सरवटे-- स्वातंत्र्यसैनिक,राजकीय नेते आणि लेखक(मृत्यू:२६ जानेवारी १९७२)**१८७५:वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (मृत्यू:१८ ऑगस्ट १९४०)**१८०५:हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (मृत्यू:४ ऑगस्ट १८७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७:अजय झनकर-- प्रख्यात लेखक आणि चित्रपट निर्माते(जन्म:१ सप्टेंबर १९५९)**२००९:गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (जन्म:८ जून १९१७)**२००५:पोप जॉन पॉल (दुसरा) (जन्म:१८ मे १९२०)**१९९२:आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते**१९८८:मनू गंगाधर नातू--समीक्षक, निबंधकार,संपादक (जन्म:११ नोव्हेंबर १९१९)**१९३३:के.एस.रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा,यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(जन्म:१० सप्टेंबर १८७२)**१८७२:सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म:२७ एप्रिल १७९१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसहभागातून शाळेची प्रगती*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अशोकराव चव्हाण यांची गाडी अडवल्या प्रकरणी 25 ते 30 मराठा आंदोलकावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार 6 एप्रिलला 2 हजार विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जीएसटी महसूल दरवर्षी वाढत आहे, मार्च 2024 मध्ये, जीएसटीमध्ये 11.5 टक्के वाढीसह 1.78 लाख कोटी रुपये झाले जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना मोठा दिलासा; 14 वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर आता 30.50 रुपयांनी स्वस्त, नवीन आर्थिक वर्षात पहिल्याच दिवशी मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - वानखेडे स्टेडियम मध्ये खेळलेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा 6 विकेटने केला पराभव, मुंबईचा सलग तिसरा पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *केंद्रशासित प्रदेश*केंद्राच्या शासनव्यवस्थेखाली असलेला प्रदेश. भारतीय संविधानाच्या ३६६ अनुच्छेदान्वये पहिल्या परिशिष्टात केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्देशिलेले भारतीय भूभाग आणि सदर परिशिष्टात न उल्लेखिलेले परंतु भारतभूमीत समाविष्ट असलेले इतर प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश होत.भारतीय संविधानात सुरुवातीस राज्याचे चार वर्ग पाडण्यात आले होते. ब्रिटिश अमदानीत चीफ कमिशनर प्रमुख अधिकारी असलेल्या अजमीर, कूर्ग व दिल्ली ह्या प्रांतांना ‘क’ राज्याचा दर्जा देण्यात आला. भारतात विलीन झालेल्या संस्थानांपैकी रेवा, बुंदेलखंड व बधेलखंड ही मध्य प्रदेशातील व पंजाबच्या उत्तर सीमेजवळील संस्थाने अतिशय मागासलेली असल्यामुळे आणि शेजारच्या प्रांतात त्यांना विलीन करण्यासंबंधी एकमत नसल्यामुळे त्यांचे अनुक्रमे विंध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश असे दोन प्रांत करण्यात आले. कच्छ, मणिपूर, त्रिपुरा ही संस्थाने पाकिस्तानच्या सीमेलगत असल्याने ती केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असणे आवश्यक वाटले. भोपाळमध्ये मुसलमानांची संख्या जास्त असल्यामुळे आणि विलासपूर येथे भाक्रानानगल हे प्रचंड धरण बांधले जात असल्यामुळे त्यांनाही वेगळ्या ‘क’ राज्याचा दर्जा मिळाला. अंदमान आणि निकोबार बेटांना ‘ड’ राज्य संबोधण्यात आले.या अकरा केंद्रशासित प्रदेशांपैकी भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात अनेकांना शेजारच्या राज्यांत विलीनीकरण झाले. १९५६ मध्ये अंदमान बेटे, लक्षद्वीप बेटे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आणि दिल्ली एवढेच केंद्रशासित प्रदेश उरले. दाद्रा व नगरहवेली (१९६१), गोवा, दीव, दमण (१९६२), पाँडिचेरी (१९६२) ही राज्ये भारतात सामील झाल्यावर त्यांची भर वरील राज्यांत पडली. पंजाब राज्यातून हरयाणा राज्य वेगळे झाल्यावर (१९७०) त्यांची संयुक्त राजधानी म्हणून चंडीगढ शहर केंद्रशासित बनले. तसेच आसाममधील मिझो जिल्हा आणि अरुणाचल प्रदेश यांस हा दर्जा १९७२ मध्ये देण्यात आला. याउलट १९७० मध्ये हिमाचल प्रदेश, १९७२ मध्ये मणिपूर, त्रिपुरा यांना संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. अशा रीतीने १९७४ मध्ये ९ केंद्रशासित प्रदेश राहिले, ते असे: अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंडीगढ, दाद्रा व नगरहवेली, दिल्ली, गोवा, दीव, दमण, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि पाँडिचेरी.या प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या २३९ ते २४१ अनुच्छेदांन्वये चालविण्यात येते. राष्ट्रपती हाच या प्रदेशाचा कार्यकारी प्रमुख असतो. यांतील काही प्रांतांत, उदा., गोवा, पाँडिचेरी व मिझोराम यांत, विधानसभा व मंत्रिमंडळे स्थापन करण्यात आली असली, तरीही या सर्व राज्यांच्या संबंधी कायदे करण्याचा अंतिम अधिकार संसदेला आहे.(स्रोत : मराठी विश्वकोश)*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *महाराष्ट्र भूषण पुरस्कार - २०२४* कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?२) भारतातील पहिला कृतिम बुद्धिमत्तेवर आधारित चित्रपट कोणता ठरला आहे ?३) खानदेशामध्ये भिल्लांचे नेतृत्व कोणी केले ?४) 'अविरत' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) नर्नाळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?*उत्तरे :-* १) डॉ प्रदीप महाजन २) इराह ३) कजारसिंग ४) सतत, अखंड ५) अकोला*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 दादाराव शिरसाठ, SSA, नांदेड👤 राघवेंद्र कट्टी, फोटोग्राफर, नांदेड👤 जीवनसिंग खासावत, साहित्यिक, भंडारा 👤 कृष्णा येरावार, शिक्षक, धर्माबाद👤 बबन शिंदे, साहित्यिक, नांदेड👤 दिलीप नागोराव जाधव👤 मारोती होरके👤 रितेश चव्हाण👤 रविंद्र भागडे👤 वैजनाथ जाधव👤 सूर्यकांत भोगेवार👤 नामदेव जाधव👤 दिलीप भद्रे👤 कवी प्रशांत गवई👤 राजेश्वर माळगे, धर्माबाद👤 शेख समीर👤 प्रभाकर पवार👤 विलास थोरमोठे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणूनच म्हणतात ना की, स्वभावाला औषध नसते. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणून विचार जुळत नाही. पण, ज्यांच्या विचारातून किंवा स्वभावातून आपल्याला थोडेतरी शिकायला मिळत असेल तर आपण त्यांच्याकडून शिकून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावे. भलेही आपण कितीही हुशार किंवा अनुभवी असले तरी एखाद्या वेळी, आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता पडत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोल्हा आणि कोंबडी*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/DNBeSW9VzgvdCbcM/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:’गूगल’ने gmail ही सेवा सुरू केली**१९९०:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्‍न’**१९७३:कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली.**१९५७:भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.मैल,फर्लांग,फूट,पाऊंड,शेर,आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली.६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.**१९५५:गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.**१९३६:ओरिसा राज्याची स्थापना झाली**१९३५:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली**१९३३:भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण**१९२८:पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असेही म्ह्टले जात असे.**१९१२:भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली झाली* *१८८७:मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली**१६६९:उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:महादेव माने -- लेखक* *१९७४:रामेश्वर परशराम घोलप -- लेखक**१९७१:रतन मोतीराम आडे-- प्रसिद्ध कवी* *१९६८:प्रा.डॉ.प्रेमाला रमेश मुखेडकर-- लेखिका* *१९६७:अयुब पठाण लोहगावकर-- प्रसिद्ध कवी,लेखक**१९६५:उमेश मोहिते-- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९६३:शोभा वेले-- कवयित्री,लेखिका* *१९६०:किशोर रामदास मेढे -- प्रसिद्ध कवी, अनुवादक* *१९५७:डेव्हिड इव्हॉन गोवर-- इंग्लिश क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू* *१९५६:डॉ.जयमाला चंद्रशेखर डुंबरे -- लेखिका* *१९५४:प्रा.विश्वनाथ श्रीधर बापट(विसूभाऊ)- प्रसिद्ध एकपात्री कलाकार,कवी,लेखक**१९५१:सुभाष वामन अहिरे-- कवी* *१९४३:प्रा.जोगेंद्र लक्ष्मण कवाडे-- माजी खासदार,आमदार,सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ज्ञ,पत्रकार* *१९४२:जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ.पाटील-- ज्येष्ठ अर्थतज्ञ,समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष,लेखक (मृत्यू:७ डिसेंबर २०२२)* *१९४१:अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट संघाचे माजी कप्तान**१९३९:डॉ.तारा भवाळकर-- वैचारिक लेखन करणाऱ्या जेष्ठ,प्रसिद्ध मराठी लेखिका**१९३८:वामन गोविंद होवाळ--कथाकार**१९३७:मोहम्मद हमीद अन्सारी-- भारताचे माजी उपराष्ट्रपती**१९३६:तरुण गोगोई – आसामचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२३ नोव्हेंबर २०२०)**१९१९:शांता भास्कर मोडक-- मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका(मृत्यू:२८ एप्रिल२०१५)**१९००:न्या.सुरेश वसंत नाईक-- लेखक,कवी**१८८९:डॉ.केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (मृत्यू:२१ जून १९४०)**१८१५:ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (मृत्यू:३० जुलै १८९८)**१६२१:गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.(मृत्यू:२४ नोव्हेंबर १६७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५:कैलाश वाजपेयी-- प्रतिभावान हिंदी कवी(जन्म:११ नोव्हेंबर १९३६)**२०१२:एन.के.पी.साळवे – भारतीय राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे माजी अध्यक्ष (जन्म:१८ मार्च १९२१)**२०१२:प्रा.द.सा.बोरकर-- झाडीबोली साहित्यांचे अभ्यासक कादंबरीकार,कवी (जन्म:२८ जुलै १९३९)**२००८:प्राचार्य राम डोके--जेष्ठ विनोदी साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ(जन्म:१६ फेब्रुवारी १९२७)**२००६:राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार चरित्रकार (जन्म:११ डिसेंबर १९२५)**२०००:संजीवनी मराठे – कवयित्री (जन्म:१४ फेब्रुवारी १९१६)**१९९९:श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक (जन्म: १९१५)**१९८९:रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर--भाषातज्ज्ञ, संशोधक,संस्कृत पंडित(जन्म:१ जानेवारी १९००)**१९८९:श्रीधर महादेव तथा एस.एम.जोशी – समाजवादी,कामगार नेते,पत्रकार(जन्म:१२ नोव्हेंबर १९०४)**१९८४:दत्ता भट-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक(जन्म:२४ डिसेंबर १९२४)**१९८४:पं.नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म:४ एप्रिल १९०२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रोजच होतंय एप्रिल फुल*एक एप्रिल रोजी लोकांना एप्रिल फुल करण्याची एक प्रथा आहे. एप्रिल फुल म्हणजे मूर्ख बनविणे. फक्त आजच्या दिवशी लोकांना मूर्ख बनविले तर माफ असते कारण शेवटी कळते की एप्रिल फुल केलंय. पण कधी कधी याचा खूप राग येतो. एका हिंदी गाण्यात हे म्हटलं आहे, " एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्सा आया ।" मित्रांनो, हे ही खरंय, मित्रांना खूप राग येईल अशा प्रकारचा कोणतेही कृत्य करू नये............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशाचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिंगोली लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज ता. ३ एप्रील रोजी दाखल करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाथषष्ठी सोहळा, 7 लाख भाविकांची मांदियाळी : भानुदास एकनाथांच्या गजराने दुमदुमली पैठण नगरी, टाळ-मृदगांच्या तालावर वारकऱ्यांना धरला ठेका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छगन भुजबळ पुन्हा अडचणीत ? अंजली दमानियांच्या प्रयत्नांना यश, सरन्यायधीशांच्या आदेशानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्याची आज सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आता पुन्हा सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईत राजभवनमध्ये राज्यपालांच्या हस्ते 61 व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - गुजरातचा हैद्राबादवर सात विकेटनी विजय तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीने चेन्नईला 30 धावाने हरवले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *फुफुसे* 📙 डावे व उजवे अशी दोन फुप्फुसे छातीच्या पोकळीत असतात. हृदयापूरती जागा सोडून अन्य सारी छातीची पोकळी त्यांनीच व्यापलेली असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी पातळ पिशवीसारखे आवरण असते. त्यालाच 'प्लुरा' असे म्हटले जाते. या आवरणाच्या आत दोन पदरांमध्ये बुळबुळीत पदार्थ असतो. त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही. मात्र या दोन पदरांमध्ये निर्वात पोकळी अस्तित्वात असते. वातावरणातील हवा आपण फुप्फुसांत ओढून घेतो, त्याला त्याची मदत होते.नाकाने आत घेतलेली हवा प्रथम श्वसननलिकेद्वारे व त्यानंतर तिच्या झालेल्या असंख्य शाखांतून फुप्फुसांत पोहोचते. फुप्फुसांचा रंग भुरा करडा असतो. असंख्य वायूकोशांनी फुप्फुस बनते. प्रत्येक वायूकोशाला वेढणारी एक रक्तवाहिनी असते. प्रत्येक वायूकोशापर्यंत श्वासनलिकेची एक अत्यंत सूक्ष्म शाखा पोहोचलेली असते. वायूकोशाभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. त्यातील रक्तातील लाल पेशी प्राणवायू शोषून घेतात. कार्बन डायॉक्साइड किंवा कर्बद्विप्राणिल वायू व पाण्याची वाफ वायुकोशात सोडले जातात व उच्छवासाद्वारे ते बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासातून वाफ बाहेर पडताना जाणवते, त्याचे हेच मूळ होय.वायूकोशांमधील स्थितीस्थापक तंतूंमुळे ते श्वास आत घेताना सहज फुगतात व पूर्वस्थितीला येताना उच्छ्वास बाहेर टाकतात. यामध्ये होणाऱ्या क्रियेलाच आपण प्राणवायू प्रदान असे म्हणतो. श्वास घेतला, तर सुमारे ५०० घन सेंटीमीटर हवा आपण आत ओढतो. त्यातील फक्त ३५० घन सेंटीमीटर हवाच वायूकोशात पोहोचते. अन्य हवा घसा, श्वासनलिका येथेच राहते. श्वास सोडल्यावरसुद्धा ३०० घनसेंटीमीटर हवा फुप्फुसांतच शिल्लक असते. दीर्घ श्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांच्या अभ्यासात या साचून असलेल्या हवेला आपण मुद्दाम बाहेर फेकतो. तसेच फुप्फुसांची स्थितीस्थापक क्षमताही या क्रियेत वाढते. म्हणून श्वसनाच्या आजारात त्यांचा उपयोग होऊ शकतो. निरोगी माणसाची श्वसनाची क्षमता वाढते. पाणबुडे, ऍथलेट, खेळाडू यांनी ही क्षमता कमावलेली असते.फुप्फुसांमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यास रुग्ण गंभीररित्या आजारी होतो. कारण फुप्फुस व फुप्फुसावरण दाहामध्ये शरीराचा प्राणवायू पुरवठा खंडित होऊ लागतो. अशा वेळी कृत्रिमरीत्या प्राणवायू देऊन किंवा तीव्र आजारात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्राचा (व्हेंटिलेटर) वापर करून रुग्णाला मदत करणे आवश्यक ठरते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठा माणूस तोच जो आपल्या सोबत्याना कधीही छोटा समजत नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा - २०२४* मध्ये कोणता खेळाडू *भारताचा ध्वजवाहक* असणार आहे ?२) जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे ?३) भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?४) 'अवर्षण' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) कोणता देश पहिल्यांदाच मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होत आहे ? *उत्तरे :-* १) शरथ कमल २) २.४२ टक्के ३) बेंगळुरू ४) दुष्काळ, पाऊस न पडणे ५) सौदी अरेबिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सोमेश पाटील सूर्यवंशी👤 साईनाथ कंदेवाड👤 विनायक भाई राजयोगी👤 दत्ता वंजे, साहित्यिक, नांदेड👤 सदाशिव मोकमवार, धर्माबाद👤 हरिहर पाठक👤 शीतल संखे, शिक्षिका, पालघर👤 गिरीष पांपटवार, धर्माबाद👤 प्रकाश नांगरे, शिक्षक, नांदेड👤 प्रा. सतीश गर्दसवार, धर्माबाद👤 अनिल पाटील, साहित्यिक, जळगाव👤 रवी कोटूरवार, धर्माबाद👤 संध्या जीरोनेकर👤 कुणाल सोनकांबळे👤 दिगंबर जगदंबे👤 मनीषा जोशी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोड फळाला लवकर कीड लागत असते तसंच कडू असलेल्या फळाला सुद्धा कीड लागत असते.फरक एवढेच की, कीड गोडाला पूर्ण संपवून टाकते पण, कडू फळाला मात्र पूर्णपणे संपवू शकत नाही कारण त्याचा अर्कच एवढे कडू असते की, उशीरा का होईना त्या किडीवर भारी पडत असतो. आपण सुद्धा त्या कडू असलेल्या अर्क कडून शिकण्याचा प्रयत्न करावे कारण तोच अर्क त्या फळाला किटका पासून वाचवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*तात्पर्य :- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. तेव्हा आपली माणसे जपा त्यांना कधी दुखवु नका, आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर करा !!!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JdKrJqvPkP3Js49M/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४४:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९२९:भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.**१८५६:पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले**१८४२:अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.**१७२९:थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.**१६६५:पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९६७:नागेश कुकुनूर--भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता,पटकथा लेखक**१९६५:फ़िरोज़ ए.नाडियाडवाला-- भारतीय फिल्म निर्माता**१९६०:राजन लाखे -- प्रसिद्ध लेखक व कवी* *१९५१:पं.भीमराव पांचाळे-- सुप्रसिद्ध मराठी गजलगायक मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळांचे आयोजन**१९४७:प्रा.दिलीप परदेशी--नाटककार व साहित्यिक(मृत्यू:४ नोव्हेंबर २०११)**१९४६:ए.के.शेख -- प्रसिद्ध गझलकार,कवी संपादक**१९४२:वसंत आबाजी डहाके – प्रसिद्ध भाषातज्‍ज्ञ,कोशकार,सुप्रसिद्ध लेखक आणि कवी,फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष**१९४१:अशोक परांजपे--महाराष्ट्रातील लोककला संशोधक,गीतकार,नाटककार.(मृत्यू:९ एप्रिल २००९)**१९४०:अशोक महादेव जोशी-- कृषिलेखक, बालसाहित्यिक (मृत्यु:मार्च २०१४)**१९३०:ॲड.एकनाथ पांडुरंग साळवे-- चंद्रपूरचे माजी आमदार,‘एन्काऊंटर’कार, ज्येष्ठ समाजसेवक (मृत्यू:१४ मार्च २०२१)**१९३०:मधुकर श्रीपाद माटे-- पुरातत्त्व, इतिहास,वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प ह्या विषयांचे अभ्यासक(मृत्यू:२३ एप्रिल २०१९)**१९२८:डॉ.दत्ता वाळवेकर-- भारतीय मराठी गायक आणि संगीत दिग्दर्शक,लेखक (मृत्यू:१६ मार्च २०१०)**१९०८:देविका राणी – अभिनेत्री (मृत्यू:९ मार्च १९९४)**१९०६:जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के.एस.थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती,पद्मभूषण (मृत्यू:१७ डिसेंबर १९६५)**१८९९:शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (मृत्यू:२२ सप्टेंबर १९७०)**१८९८:काशिनाथ रघुनाथ वैशंपायन--शिक्षक, लेखक (मृत्यू:८ नोव्हेंबर १९८५)**१८९५:निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:मनोहर श्याम जोशी-- हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक(जन्म:९ ऑगस्ट,१९३३)* *२००२:आनंद बक्षी – सुप्रसिद्ध गीतकार (जन्म:२१ जुलै १९२०)**१९९३:साबानंद मोनप्पा अर्थात एस.एम.पंडित -- चित्रकार (जन्म:२५ मार्च१९१६)**१९८९:गजानन वासुदेव तथा ’ग.वा.’बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक,संपादक व साहित्यिक (जन्म:२४ सप्टेंबर १९२२)**१९७६:रघुवीर मूळगावकर – चित्रकार (जन्म:१४ नोव्हेंबर १९१८)**१९६९:वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (जन्म:२६ जुलै १८९४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज डॉक्टर डे त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *डॉक्टर : देव की दानव*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार,  शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत; साताऱ्याचा उमेदवार दोन ते तीन दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, घातपाताचा संशय; उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा  40 ते 42 डिग्री से. राहण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MHT CET 2024 - लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत केली मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - KKR ने RCB ला 7 विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 फिजिओथेरपी 📙एकविसाव्या शतकात 'फिजिओ'ला म्हणजे फिजिओ-थेरेपिस्टला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सचिन तेंडुलकरचे लंगडणे असो, शोएब अख्तरचा खांदा दुखावणे असो किंवा बेकहॅमची पाठ दुखावणे, तात्काळ थेट ग्राऊंडवर येऊन खेळाडूला काही पाच मिनिटात खेळता येणारा हा थेरपिस्ट आपण थेट दूरचित्रवाणीवरही पाहतो. वेळेची प्रचंड निकड असलेल्या घाईगर्दीच्या जमान्यात आजारपणानंतरची विश्रांती, हाडांच्या वा स्नायूंच्या दुखापतीनंतरचा आराम हा प्रकारच नाहीसा होत चालला आहे. डॉक्टरी इलाज चालू असताना किंवा ते संपल्यावर शरीरातील विविध सांधे, स्नायू वा आवश्यक हालचाली संतुलितरित्या करवून घेणे व त्यामुळे कमजोर झालेल्या स्नायूंना बळकटी आणून पूर्ववत बनवणे हे फिजिओथेरपिस्टचे काम असते. शास्त्रशाखेतील बायोलॉजी घेऊन बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण चार वर्षांचे शिक्षण घेऊन फिजिओथेरपिस्ट बनता येते. शरीररचना, शरीरक्रिया, स्नायू हाडे, मज्जासंस्था व मेंदू या संदर्भातील बारकावे समजून घेतल्यावर मग फिजिओथेरपीचे प्रशिक्षण प्रत्यक्ष सुरू होते. विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल वाचणे व त्यांचा अर्थ लावणे हाही भाग त्यात येतोच.एखादे हाड मोडल्यानंतर त्यावरचे उपचार जरी अस्थिरोगतज्ज्ञ करत असले, तरी त्या दरम्यान व त्यानंतर या रुग्णास स्वतःचे व्यवहार आधाराने, वॉकरच्या साहाय्याने, कुबडी व काठीच्या सहाय्याने करायला शिकवणे शरीरातील स्नायूंची कमजोरी सुरू होण्याच्या आतच तिला प्रतिबंध करणे महत्त्वाचे असते. हे काम फिजिओ करीत असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे आपल्या खांद्याचे महत्त्वाचे स्नायू म्हणजे डेल्टॉइड याचा वापर जेमतेम पाच ते सहा दिवस न झाल्यास त्याचा आकार व गोलाई कमी होऊन तो रोडावू लागतो. यालाच 'मसल वेस्टिंग' असे म्हणतात. असाच प्रकार पायाच्या गुडघ्यावरील चतुरस्क स्नायूच्या बाबतीतही तिव्रतेने होतो. त्यामुळे हात मोडला म्हणून गळ्यात अडकवला वा पायाच्या इजेमुळे गुडघ्यांच्या हालचाली थांबल्या तर हे वाळत गेलेले स्नायू पूर्ववत व्हायला काही आठवडे लागतात. प्लॅस्टर असतानाही किंवा काढल्यावर यासाठी व्यायाम फिजिओ करवून घेतो.न्यूमोनियाच्या रुग्णाला छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त करण्याचे व्यायाम, मेंदूच्या आजारामुळे विविध स्नायूंवरील गेलेले नियंत्रण परत मिळवणे अर्धांगवायू झालेल्याला स्वतःच्या हालचाली करायला शिकवणे इत्यादी गोष्टी या अभ्यासक्रमात येतात. प्रगत अभ्यासक्रमात ऑक्युपेशनल म्हणजेच विविध व्यवसायांशी संबंधित आजाराच्या संदर्भातील उपचार, विविध खेळासंदर्भातील दुखापतींवर उपचार, बालकांच्या अनियंत्रित हालचालींवर उपचार अशा निरनिराळ्या उपशाखांत विशेष प्रशिक्षण मिळते.सध्या फिजिओ अनेक प्रकारच्या यंत्रांचाही वापर करीत असतो. पूर्वापार चालत आलेली शरीरातील विविध स्नायूंकडुन हालचाली करून घेणारी, ताण देणारी यंत्रे वा उपकरणे आता कमी वजनाची, सहज घरीही हाताळता येणारी अशी झाली आहेत. पण त्याचबरोबर प्रगत अशा अल्ट्रासॉनिक वेव्हज, मसल स्टिम्युलेटर्स, शॉर्टवेव्ह डायाथर्मी, मज्जासंस्थेतील संवेदनाचा वेग व व्याप्ती मोजणारी यंत्रे अशांची मदत घेऊन उपचार केले जातात.आधुनिक उपचारपद्धतीत ज्यावेळी रुग्ण तीनपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात मुक्काम वाढवतो, तेंव्हा फिजिओथेरपिस्ट बहुधा त्याच्या संपर्कात येतो. खाटेवर पडून राहणे, शरीराने नको तितका आराम करणे आधुनिक वैद्यकशास्त्र तब्येतीला घातक समजते, हेच त्यामागचे कारण आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही, ते अभ्यास व कष्ट करूनच मिळवावे लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'निर्मानोंके के पावन युग में'* या हिंदी कवितेचे कवी कोण आहेत ?२) बाघ व वैनगंगा या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?३) जगभरात एकूण किती भाषा बोलल्या जातात ?४) 'अमृत' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) मानवी शरीराच्या बाहेरच्या त्वचा आवरणास इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) अटल बिहारी वाजपेयी २) काटी, गोंदिया ३) ७,१०२ भाषा ४) पीयूष, सुधा, संजीवनी ५) एपिडर्मीस *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 उत्कर्ष देवणीकर, उमरगा👤 अनिल पवार👤 गुरुनाथ तुकाराम यादव, नांदेड👤 लक्ष्मीकांत बेंकट, करखेली👤 वैभव कण्हेरकर, अमरावती👤 रजनीश सिंग👤 दुष्यंत सोनाळे, मा. नगरसेवक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती स्वतः चा विचार न करता सत्याच्या वाटेवर चालत इतरांसाठी जगत असेल तर तिला पूर्णपणे समजून न घेता लावारिस, लोफर, खोटारडा, बिनकाम्या, मूर्ख अशा अनेक शब्दांनी त्याची प्रतारणा करणे हे कितपत योग्य आहे. ? अभिव्यक्तीचा इतका स्वैराचार कोणीही करु नये. विचारांची मर्यादा माणसाने ओलांडू नये.जी, व्यक्ती दुसऱ्याला त्या शब्दात बोलून मोकळी होऊन जाते तेव्हा खऱ्या अर्थाने तीच व्यक्ती स्वतः मधील माणुसकी विसरलेली असते. म्हणून इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन‌ हा नेहमीच सकारात्मक असावा तर सर्वच चांगले दिसून येईल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."*तात्पर्य- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/seeQPxsVALxnWC8G/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९८:’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.**१९९२:उद्योगपती जे.आर.डी.टाटा यांना राष्ट्रपती आर.वेंकटरमण यांच्या हस्ते ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला**१९७९:अमेरिकेतील ’थ्री माईल आयलंड’ या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.**१९४२:रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली**१९३०:तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली**१८५४:क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.**१७३७:बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:भरत बलवल्ली--स्वराधीश,एक युवा दिग्गज शास्त्रीय गायक* *१९८२:प्रा.तात्यासाहेब शिवाजी काटकर -- लेखक**१९७५:अक्षय खन्ना--भारतीय अभिनेता**१९७१:प्रा.डॉ.अजय दिनकरराव कुलकर्णी-- लेखक,संपादक* *१९६८:नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू**१९६६:डॅा.संध्या राजन अणवेकर-- कवयित्री, लेखिका* *१९६३:राजकुमार सुदाम बडोले-- माजी मंत्री तथा लेखक* *१९५४:मून मून सेन-- भारतीय अभिनेत्री**१९४९:प्रा.डॉ.विजय पांढरीपांडे -- जेष्ठ साहित्यिक,विचारवंत,अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित* *१९४४:भारती पांडे-- प्रसिद्ध लेखिका**१९३५:श्रीनिवास हवालदार-- जेष्ठ कवी लेखक* *१९२७:विना मजुमदार-- भारतीय शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या(मृत्यू:३० मे २०१३)**१९२६:पहलान रतनजी " पोली " उमरीगर-- भारतीयक्रिकेट खेळाडू(मृत्यू:७ नोव्हेंबर २००६)**१९२५:राजा गोसावी – अभिनेता (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९९८)**१९०३:बाळकृष्ण मोरेश्वर कानिटकर -- पुराण वांड्:मय,शैक्षणिक व विज्ञानविषयक लेखन(मृत्यू:४ ऑक्टोबर १९७१)**१८६८:मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (मृत्यू:१८ जून १९३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी)--मराठी गायक,कवि,लेखक व कीर्तनकार(जन्म:१९ऑगस्ट, १९२२)* *२०००:शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख**१९९२:आचार्य सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू(जन्म:२४ नोव्हेंबर १८७७)**१९८८:श्री नाथ त्रिपाठी--भारतीय संगीतकार(जन्म:१४ मार्च १९१३)* *१९८४:विष्णू प्रभाकर लिमये--प्राच्यविद्या अभ्यासक,लेखक,संपादक(जन्म:२८ एप्रिल १९००)**१९४१:व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (जन्म:२५ जानेवारी १८८२)**१५५२:गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (जन्म:३१ मार्च १५०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुनी चालीरिती आणि आजची परिस्थिती*कोरोना काळात जुन्या चालीरीती ची पुन्हा एकदा ओळख झाली. त्यावर टाकलेला प्रकाश ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची आठ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात अकोला सर्वाधिक हॉट! आज 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चाळीशीपार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपुरात उमेदवारी अर्ज भरण्याआधी नितीन गडकारींचे जोरदार शक्तिप्रदर्शन, विजयाची हॅटट्रिकचा केला निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात पहिल्यांदाच डॉक्टरांना निवडणुकीच्या कामाला जुंपणार, मुंबईतील  सुमारे 500 डॉक्टरांना लागली इलेक्शन ड्युटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळानिमित्त विविध कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *SRH ने रचला IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम 277 धावसंख्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌪 *एल निनोमुळे काय होतं ?* 🌪 ************************शब्दश: एल निनो म्हणजे तान्हुलं बाळ. बाल ख्रिस्ताला उद्देशून हा शब्दप्रयोग केला जातो. पण नाताळच्या सुमारास होणाऱ्या हवामानातील बदलाला उद्देशून आता तो जगभर वापरला जातो. दक्षिण पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय विभागातील पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं. ही वाढ अर्धा अंश सेल्सियसहून अधिक असते. याच्याच जोडीला त्या भागातील हवेच्या दाबातही वाढ होते. या दोन्हींना मिळून वैज्ञानिक परिभाषेत 'एल निनो सदर्न ऑसिलेशन्स' असं भरभक्कम नाव आहे. पण सामान्यजनांच्या भाषेत या नैसर्गिक आविष्काराला 'एल निनो' असंच म्हटलं जातं. साधारण दर पाच वर्षांनी अशी परिस्थिती उद्भवते; पण काही वेळा ती दोन वर्षांतच परत उत्पन्न झालेलीही दिसून आली आहे, तर काही वेळा तीनं पुनरागमनासाठी तब्बल सात वर्ष घेतल्याचंही दिसून आले आहे. याउलट जेव्हा याच भागातील समुद्राच्या पाण्याचं सरासरी तापमान घटतं आणि त्याच्या जोडीला तिथल्या हवेच्या दाबातही घसरण होते तेव्हा त्याला 'ला निना' असे म्हणतात. एल निनो आणि ला निना यांचं अस्तित्व जरी जगाच्या एका अतिशय आडबाजूच्या कोपऱ्यात जाणवत असलं तरी त्याचे परिणाम मात्र जगभराच्या हवामानावर होत असतात. सगळीकडचं हवामान पार बदलून जातं. सामान्यत: जिथं भरपूर पाऊस पडतो तिथं एल निनोच्या प्रभावापोटी अवर्षण होतं, तर कोरडवाहू प्रदेशात पूर येतात. हवामानाच्या या लहरीपणापासून कोणत्याही खंडाची सुटका होत नाही.आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आणि शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एल निनोचा प्रभाव मान्सूनच्या पावसावरही जाणवेल इतका पडतो. एल निनोच्या प्रतापापोटी मान्सूनच्या व पावसाच्या सरासरीत लक्षणीय घट होते. अलीकडच्या काळातील जवळजवळ प्रत्येक दुष्काळाचं उत्तरदायित्व आपण एल निनोच्या पदरात टाकू शकतो. उलटपक्षी जेव्हा ला निनाची सद्दी असते तेव्हा सरासरीइतका किंवा त्याहूनही अधिक पाऊस पडतो. मात्र ला निनाच्या काळात वादळांचं प्रमाणही वाढतं. उलट एल निनो वादळांना अटकाव करतो. एरवीच्या वादळग्रस्त प्रदेशांमध्ये शांततेचा अंमल सुरू असतो.एल निनोचा प्रभाव सहसा सात ते नऊ महिनेच टिकतो. त्यामुळे साधारणत: एकाच वर्षीच्या मान्सूनवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाची परिस्थिती क्वचितच उद्भवते. पण काही वेळा हा दोन दोन वर्षेही टिकून राहिल्याचे दिसून आले आहे. त्याच्या या अनियमित वागणुकीमुळे त्याच्याविषयी कसलंही भाकीत करणं अशक्य झालं आहे.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्राण्यांना रोख रकमेची गरज नसते, परंतु अशीच तळमळ माणसाला प्राणी बनवते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *न संपणारे ऊर्जा स्त्रोत* कोणते आहे ?२) यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?३) महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ?४) 'अत्याचार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते ?*उत्तरे :-* १) सौर ऊर्जा २) पचनसंस्था ३) आत्मवृत्त ४) अन्याय, जुलूम ५) कन्हेरखेड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जयश्री पाटील, शिक्षिका तथा लेखिका, वसमत👤 स्वानंद बेदरकर, निवेदक, नाशिक👤 अब्राहम खावडिया👤 नामदेव पांचाळ, धर्माबाद👤 श्री पाटील, नांदेड👤 जयवर्धन भोसीकर, रिपोर्टर, नांदेड👤 किरण कदम, धर्माबाद👤 प्रल्हाद धडे, अहमदपूर👤 रमेश राजफोडे, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥२॥तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुलीवर शिजवत ठेवलेले मग ते कोणतेही पदार्थ असोत. शिजत असताना वेळोवेळी त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा वास यायला लागतो. वेळात जर त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले तर ते खमंग पदार्थ खायला मिळतात. जर त्यांच्याकडे आपण वेळात लक्ष नाही दिले तर मात्र जळलेले पदार्थ हाती लागते.माणसाचेही तसंच आहे जर वेळेवर चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिले तर जीवनाचे सार्थक होते. पण त्याच चांगल्या विचाराकडे व सत्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच वाटेला गेल्याने जीवनाची माती होत असते. त्या चुलीवर शिजत असलेल्या पदार्थांकडून आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आनंदाची गोष्ट*लहान मुलाला काजु फार आवडत असल्याने एकदा काजुच्या बरणीत हात घालुन त्याने मुठ भरली. पण बरणीचं तोंड निमुळतं असल्याने हात काही बाहेर निघेना.. त्याने बराच प्रयत्न केला पण तरीही निघेना, त्याची ही धडपड बघणारी आजी त्याला सांगु लागली, *बाळा ती मुठ भरली आहेस ना ती सोड*, काजु बरणीत टाकुन दे, मग आपोआप हात बाहेर निघेल.. त्या लहान मुलाचा आजीवर खूप विश्वास आणि आपली आजी जे सांगेल ते बरोबर ह्या भोळ्या मनाने त्याने ते ऐकले आणि हातातली काजु सोडुन दिले. आणि खरंच आजीने सांगितल्याप्रमाणे त्याचा अडकलेला हात बाहेर निघाला.. आणि त्याचा चेहरा आनंदाने खुलला.. ही गोष्ट मला बरंच काही सुचवून गेली.. *किती गोष्टी धरून ठेवल्यात आपण, दुःख, राग, लोभ , क्रोध, मत्सर.. जुन्या कडु आठवणी* पण आपण धरुन बसलेलो आहोत.. आणि त्या मुला सारखंच स्वतःला अडकवुन बसलोय..तेव्हा लक्षात आलं की जीवनात दुःख असं नाहीच आहे.. *आपण धरुन ठेवलंय सगळ* ... हे तर लक्षातच घेतलं नाही कधी की अरे, फक्त सोडायचा अवकाश.... *आहे तो सगळा आनंदच आनंद..!* 😊😊😊😊😊😊😊😊 *जीवन हे एकदाच आहे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 मार्च 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/indian-scientist.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संगीतोपचार दिन_* *_ या वर्षातील ८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना**२०००:ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.**१९७९:अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या**१९७४:गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात**१९७२:नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली**१९१०:लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला**१९०२:नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.**१५५२:गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:प्रतिभा सुरेश खैरनार -- कवयित्री* *१९८२:डॉ.क्षितिज कुलकर्णी-- नाट्य लेखक**१९८५:प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू**१९६५:प्रकाश राज-- भारतीय अभिनेता, प्रसिद्ध तमिळ तेलुगू खलनायक व सहनायक.राष्ट्रिय पुरस्कार विजेता अभिनेता**१९५७:सुनील शिवाजी माने-- कवी* *१९५७:हृदय बलवंत चक्रधर-- प्रसिद्ध कवी**१९५६:उमेश कदम-- कादंबरीकार**१९५४:अ‍ॅड.विलास विश्वनाथ कुळवेकर -- कवी,लेखक* *१९४३:प्रा.डॉ.यशवंत मनोहर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक आणि साहित्य समीक्षक**१९३९:प्रा.पुष्पा भावे-- स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या,ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार(मृत्यू:३ आक्टोबर २०२०)**१९०९:बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा.द. सातोस्कर – साहित्यिक,संशोधक,’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०००)**१९०७:महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक,शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू:११ सप्टेंबर १९८७)**१८७५:सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ जुलै १९६५)**१८७४:रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (मृत्यू:२९ जानेवारी १९६३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्रा.विमलताई गाडेकर--विदर्भातील ख्यातनाम कवयित्री,लेखिका व समाजसेविका(जन्म:२ फेब्रुवारी १९५१)* *२०१२:माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्ध गीतकार व कवी (जन्म:१० मे १९४०)**२०१०:अनंत पाटील -- ख्यातनाम गीतकार, नाटककार (जन्म:२२ डिसेंबर १९४१)**२००८:बाबुराव बागूल – सुप्रसिद्ध साहित्यिक (जन्म:१७ जुलै १९३०)**२००३:हरेन पंड्या-- गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या* *१९९९:आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (जन्म:११ डिसेंबर १९४२)**१९९७:नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म:९ सप्टेंबर १९१०)**१९९६:के.के.हेब्बर – चित्रकार (जन्म: १९११)**१९९६:डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म:७ सप्टेंबर १९१२)**१८२७:लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचे निधन.मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन, (जन्म:१६ डिसेंबर १७७०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील काही थोर गणितज्ञ व शास्त्रज्ञ यांची थोडक्यात माहिती*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सोलापुरात प्रणिती शिंदे विरोधात भाजपची राम सातपुते यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आयएएस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारकर्ते अ‍ॅड. सतीश रोठे यांना राज्यात आचारसंहिता लागू असेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अजितदादांच ठरलं! 28 तारखेपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार, राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बॉलीवूड क्वीन कंगना रणौतला भारतीय जनता पक्षाने मंडी लोकसभा मतदारसंघातून दिले तिकीट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती, धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक; तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा, मराठवाड्यात टँकर 600 पार! विभागातील 399 गावात पाणी टंचाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 चे उर्वरित वेळापत्रक जाहीर, चेन्नई मध्ये होईल अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रदूषणाचा भस्मासुर रोखा* स्विस संस्था आयक्युएअरने जागतिक प्रदूषणावर एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल भारतासाठी धक्कादायक आहे कारण या अहवालात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश असून बिहारमधील बेगुसराई हे जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगर क्षेत्र तर जगातील १३४ देशांच्या राजधानीच्या शहरांपैकी दिल्ली हे सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालाच्या निर्मितीसाठी वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम - २.५ कणांचे प्रमाण बारकाईने तपासण्यात आले होते. जगातील १३४ देशांमध्ये बसविण्यात आलेल्या ३० हजार ग्राउंड मॉनिटरच्या माध्यमातून ७३०० शहरांची माहिती संकलित करण्यात आली. या अहवालातील निष्कर्ष पाहिल्यानंतर भारतातील प्रदूषणाची समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येईल. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील दिल्ली, मुंबई, बेगुसाराई, गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांचा समावेश आहे. या शहरात वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम - २.५ कणांचे प्रमाण ५३.३ मायक्रोग्राम क्यूबिक मीटर या पातळीवर आले असून ते आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षेच्या पातळीपेक्षा दहापटीने अधिक असल्याचे दिसून आले. स्विस संस्थेचा हा अहवाल देशातील नागरिकांची झोप उडवणारा आहे, कारण आज देशातील सर्वच महत्वाची शहरे प्रदूषणाने गुदमरत आहेत. त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे २१ व्या शतकातील सुखासीन जीवनाचे मनोहरी चित्र उभे केले जात आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात आहे तर दुसरीकडे याच शहरांची फुफ्फुसे प्रदूषणाने निकामी होत आहेत. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांना फुफ्फुसाचे, हृदयाचे, रक्ताभिसरणाचे आजार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. न्यूमोनिया, पक्षघात, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे मोठे आजार प्रदूषित हवेमुळेच होत आहेत. प्रदूषणामुळे दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीची काय अवस्था झाली हे आपण पाहत आहोतच. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा कॉलेजसना सुट्टी देण्याची वेळ प्रशासनावर आली होती. प्रदूषणामुळे दिल्लीत खेळला जाणारा रणजी सामना रद्द करावा लागला होता. चार वर्षांपूर्वी दिल्लीत इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात खेळाडू चक्क मास्क लावून मैदानात उतरले होते. नंतर हा सामना देखील प्रदूषणामुळे रद्द करावा होता त्यामुळे भारताची जगात नाचक्की झाली होती. जे दिल्लीत आहे तेच मुंबईत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत देशाच्या राजधानीची बरोबरी करू लागली आहे. मुंबईचे प्रदूषणही उच्चतम पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे लोकांना शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शुद्ध हवेसाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहे. मुंबई - दिल्लीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात ऑक्सिजन बार सुरू करण्यात आले आहेत. एका तासाला २०० ते ५०० रुपये मोजून नागरिक ऑक्सिजन विकत घेत आहेत. इतके होऊनही आपण त्यातून बोध घेत नाही. या मोठ्या शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरात प्रदूषणाचे प्रमाण खूप असते. धूळ, कारखान्यातून निघणारा धूर, बांधकामातून पसरणारे कण, वृक्षतोड, पृथ्वीचे वाढते तापमान, प्लास्टिकचा भस्मासुर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे. स्विस संस्थेने जाहीर केलेला हा अहवाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच ठोस उपाय करायला हवेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातून प्रदूषणकारी घटक कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. दगड खाणींवर नियंत्रण आणायला हवे. वाहनांची संख्याही कमी करायला हवी. प्रसंगी सम - विषम सारखे कठोर निर्णय घ्यायला हवेत. युरोपीय देशात प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याचा अभ्यास करायला हवा. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. याशिवाय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यायला हवा. वृक्षारोपण करुन ते वृक्ष जगवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच प्रदूषणाचा हा भस्मासुर रोखता येईल. *- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समजून घेणं ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असं नाही - गौतम बुद्ध*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश चीनच्या *'जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेम'* मध्ये झाला आहे ?२) भारताच्या अणु कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?३) ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ?४) नुकताच चर्चेत असणारा सी. ए. ए. कायदा म्हणजे काय ?५) तैनाती फौजेचा अवलंब इंग्रजांनी सर्वात प्रथम कोणावरती केला ? *उत्तरे :-* १) पंकज अडवाणी २) शांततेसाठी अणु ३) ग्रामसेवक ४) Citizen Amendment Act ५) हैदराबादचा निजाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 महेश मुटकुळे👤 श्रेयस पेंडकर, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षभरात अनेक सण,उत्सव येत असतात. ते प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात. त्या शिकवणीतून थोडे तरी आपण शिकण्याचा प्रयत्न करावे. व इतरांनाही त्या विषयी सांगावे. कारण चांगले सांगितल्याने आपले नुकसान होत नाही तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचे समाधान आपल्याला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *काठीची जादू*एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.' शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले. तात्पर्य :- करावे तसे भरावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/jadoochi_pishavi_nasa_yeotikar.pdf••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक हवामान दिन_* *_शहीद स्मृती दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे,ढग,पाऊस,विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करुन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन' म्हणून साजरा होतो._**२०१२:राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते जळगाव विमानतळाचे उदघाटन**१९९९:पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरविेण्यात आले**१९९९:क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना 'पद्मश्री' सन्मान प्रदान करण्यात आला**१९९८:अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर**१९८०:प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.**१९५६:पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.**१९४०:संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत**_१९३१:भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले._* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९:आशिष अशोक निनगुरकर -- प्रसिद्ध कवी, लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७९:प्रा.डॉ.रेखा जगनाळे(मोतेवार)-- प्रसिद्ध लेखिका,संपादिका* *१९७२:संतोष पद्माकर पवार-- कवी,संपादक**१९७२:अरमान कोहली-- भारतीय अभिनेता**१९७०:ज्योती धुतमल-पंडित -- कवयित्री, लेखिका* *१९६८:माईक अ‍ॅथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू**१९५६:पं.विनोद दिग्रजकर- ज्येष्ठ शास्त्रीय गायक**१९५३:किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक**१९५३:प्रकाश विठ्ठलराव खंडागळे -- कवी, लेखक* *१९४९:प्राचार्य सुभाष त्र्यंबक वसेकर -- कलामहर्षी,मराठवाड्यातील बालसाहित्यिक (मृत्यू:३० सप्टेंबर २०२२)**१९४८:वसीम बारी-- माजी पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू* *१९४८:मधुवंती दांडेकर -- मराठी संगीत नाट्यसृष्टीतल्या एक अभिनेत्री* *१९३५:रमेश विठ्ठल रघुवंशी -- लेखक,प्रकाशक* *१९३५:मृणालिनी त्र्यंबक ढवळे-- लेखिका, संपादिका* *१९३३:प्रा.डॉ.सुधाकर गजाननराव देशपांडे -- लेखक* *१९३१:व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू**१९२९:डॉ.गोविंद स्वरूप -- भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक(मृत्यू:७ सप्टेंबर २०२०)**१९२३:सदाशिव आठवले-- मराठीभाषक संशोधक, इतिहासकार आणि लेखक(मृत्यू:८ डिसेंबर २००१)**१९२३:हेमू कलाणी – क्रांतिकारक (मृत्यू:२१ जानेवारी १९४३)**१९१७:शरयू वासुदेव रानडे -- कवयित्री, लेखिका* *१९१६:हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९१०:डॉ.राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते,विख्यात संसदपटू,लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक.(मृत्यू:१२ आक्टोबर १९६७)**१८९८:नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (मृत्यू:२४ डिसेंबर १९७७)**१८९७:गुणवंत हनुमंत देशपांडे -- कवी, लेखक ( मृत्यू:२५ सप्टेंबर १९८५)* *१८८३:मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी,त्यांना कन्‍नड, कोंकणी,इंग्लिश,संस्कृत,तेलुगू,तामिळ,मराठी, कन्‍नड,बंगाली,पर्शियन,पाली, ऊर्दू,ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले. (मृत्यू:६ सप्टेंबर १९६३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९:प्रा.डॉ.यशवंत पाठक--संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक(जन्म:१९४६)* *२०११:एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म:२७ फेब्रुवारी १९३२)**२००७:श्रीपाद नारायण पेंडसे-- प्रसिद्ध कादंबरीकार,नाटककार,आत्मचरित्रकार (जन्म:५ जानेवारी १९१३)**२००८:गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार (जन्म:२०ऑगस्ट १९१८)**१९३१:भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म:२८ सप्टेंबर १९०७)**१९३१:’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (जन्म:१५ मे १९०७)**१९३१:शिवराम हरी ’राजगुरू’ – क्रांतिकारक (जन्म:२४ ऑगस्ट १९०८)**१९२७:सरस्वतीबाई विद्याधर भिडे-- कवयित्री,(जन्म:१८७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक पुस्तक दिनानिमित्त आजपर्यंत प्रकाशित झालेली माझी पुस्तके खालील प्रमाणेमाझी साहित्य संपदा वैचारिक लेखसंग्रह01) पाऊलवाट 02) संवेदना 03) जागृती 04) मी एक शिक्षक05) शाळा आणि शिक्षक06) रोज सोनियाचा दिनू07) हिंदू सणकथासंग्रह08) हरवलेले डोळे आणि 09) कुलदीपक10) जादूची पिशवीकवितासंग्रह11) सारीपाट 12) महापुरुषांची ओळख13) लॉकडाऊन काळातील कवितादीर्घकथा 14) ललाटरेषावरील सर्व पुस्तके वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लीक करा आणि जादूची पिशवी कथासंग्रहासह इतर पुस्तकं डाउनलोड कराधन्यवाद ......!- नासा येवतीकर, धर्माबाद ~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची ६०७ वी बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं बीड जिल्ह्यात उत्साहत स्वागत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुष्पक - आरएलव्ही एलईएक्स- 02 लँडिंगची यशस्वी चाचणी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसचे के सी वेणुगोपाल आणि खासदार डेरीक ओब्रायन यांनी नवी दिल्लीत निवडणुक आयुक्तांची भेट घेतली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सर्वोच्च न्यायालयातून अरविंद केजरीवाल यांनी याचिका घेतली मागे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती : निवडणूक आयोगाने मुंबई मनपा आयुक्त पदावरुन हटवले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 - पहिल्याच सामन्यात CSK ने RCB चा 6 विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बायोगॅस* 📙 अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकाऊ म्हणून आपण फेकून देत असतो. गायीगुरांचे शेण कंपोस्ट खतासाठी अनेक वर्षे वापरले जात होते. पण त्या व्यतिरिक्त त्याचा उपयोग शक्य आहे, याचा विचार मात्र गेली ४० वर्षेच केला गेला. झाडांचा पालापाचोळा, वाया जाणारे अन्नपदार्थ, खरकटे, भाजीची देठे व टरफले या साऱ्यांचा उपयुक्त वापर करण्याची कल्पना सतत मांडली जात आहे. मात्र त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण वापर केले जाणे मात्र आजही घडत नाही. या साऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती सहज शक्य असते. हा गॅस घरातील गॅस शेगडीसाठी जसा वापरता येतो, तसाच मोठ्या प्रमाणावर तयार केल्यास छोट्या हॉटेलला पण पूरक म्हणून उपयोगी पडू शकतो. १९७० च्या दशकात गोबरगॅस या नावाने ओळखला जाणारा हा गॅस मुख्यत: गायीगुरांचे शेण व पालापाचोळा यातून निर्माण केला जात असे. घराजवळच गोठ्यालगत विटांच्या बांधकामातून गोल हौदवजा टाकी बांधून त्यात हा कच्चा माल घातला जाई. त्यावर टोपीप्रमाणे बसणारी पण दट्ट्याप्रमाणे खालीवर होऊ शकणारी यंत्रणा बसवून आतील कच्चा माल कुजून दिला जाई. या कुजण्याला मदत म्हणून स्लरी - विशिष्ट प्रकारचे जंतू असलेले पाणी - त्यात सोडल्यावर सुमारे चाळीस दिवसांनी रोजच्या गॅसचा पुरवठा सुरू होत असे. या कुजण्यातून निर्माण झालेला गाळ व पाणी हे खत म्हणून वापरता येई.या प्रकारची गोबरगॅस संयंत्र संपूर्ण भारतात अनेकांनी बसवली. त्यासाठी ग्रामोद्योग मंडळाने प्रशिक्षण व सहाय्यसुद्धा दिले. काही वर्षांनी त्यांच्या डागडुजीची वेळ आली, तेव्हा कुचराई केल्याने अनेक ठिकाणी ही संयंत्रे बंद पडत गेली. हौदाचा गिलावा उडून होणारी गळती व लोखंडी भाग गंजणे हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. या गॅसमध्ये मुख्यत: मिथेन वायू असतो. ज्वलनासाठी उपयुक्त व प्रदूषणविरहित असे त्याचे स्वरूप आहे. छोट्या गावात, दूरवरच्या वस्तीमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा सिलिंडरद्वारे करणे कठीण असल्यास या पद्धतीचा वापर अत्यंत उपयुक्त होता. चीनमध्ये या स्वरूपाची स्थानिक संयंत्रे बसवून वापरली जात आहेत, पण आपल्याकडे मात्र हा प्रयोग मागे पडला आहे.या गोबरगॅसच्या अवाढव्य जागा व्यापणाऱ्या व शेणाची गरज असलेल्या संयंत्रात बरेच सुटसुटीत बदल करून पुणे येथील 'आरती' (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर आनंद कर्वे यांनी बायोगॅस निर्मितीचे संयंत्र बनवले आहे. प्लास्टिकच्या एकात एक बसणाऱ्या मोठ्या पंपाचा वापर करून हे बनले आहे. गच्चीत, अंगणात कुठेही ठेवून त्याचा वापर शक्य होतो. महत्त्वाची गोष्ट यासाठी खरकटे अन्न व आसपासच्या झाडांचा, बागेचा पालापाचोळा पुरतो. शेणाची गरज लागत नसल्याने हाताळताना नकोसे वाटत नाही. याचा कसलाही वास आसपास पसरत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लरी घातल्यापासून जेमतेम तीन ते चार दिवसांत गॅसनिर्मिती सुरू होते. याचा खर्चही सहज परवडण्याजोगा आहे. कारण स्वस्त प्लॅस्टिकचा वापर त्यात केला आहे. या संयंत्राला 'अॅश्डेन' हे संशोधनाबद्दलचे मानाचे पारितोषिक दिले गेले आहे.उसाची चिपाडे, उसापासून साखर तयार करताना निर्माण होणारी मळी यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर बायोगॅस तयार करावा व त्यापासून वीजनिर्मिती करावी, अशा स्वरूपाचा विचार सध्या मांडला जात आहे. अर्थातच हे प्रकल्प व्यावसायिक तत्वावरचे व प्रचंड पैसा लागणारे आहेत.स्वस्त, स्वच्छ इंधन व कचऱ्याचे प्रदूषण टाळणारे इंधन म्हणून बायोगॅसकडे आपण पाहिले तर त्याची उपयुक्तता मोलाची ठरते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक वस्तूत सौंदर्य असते पण ते प्रत्येकाला दिसतेच असे नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार *जगातील सर्वात आनंदी देश* कोणता ?२) माहिती अधिकार विधेयक लोकसभेत केव्हा सादर करण्यात आले ?३) भारतातील कोणत्या शहराला 'स्कॉटलंड ऑफ द ईस्ट' असे म्हणतात ?४) जगातील राजधानीच्या शहरांपैकी सर्वात प्रदूषित शहर कोणते ?५) जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) फिनलंड ( सातव्यांदा ) २) २२ डिसेंबर २००४ ३) शिलाँग ४) दिल्ली ५) क्षितिज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आचार्य सूर्यकांत, सेवानिवृत्त शिक्षक👤 साईनाथ सुत्रावे, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 संतोष गुंडेटवार, शिक्षक, नांदेड👤 सौ. रंजना सत्यजित टिप्रेसवार, नांदेड👤 नरसिंग यमेवार👤 विनायक नरवाडे👤 अशोक गड्डमवार👤 संजय मनुरे, साहित्यिक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याचे मन दुखावणे खूप सोपे असते. पण एखाद्या वेळी आपले जर कोणी मन दुखावले तर ते दु:ख सहन करणे मात्र खूप कठीण होऊन जाते. म्हणून आपण किती प्रामाणिक आहोत फक्त आपल्यालाच माहीत असते. म्हणून यशाच्या शिखरावर अवश्य पोहोचावे पण,प्रामाणिकपणा कायम असू द्यावे. कारण, इतरांना आपण खूप काही सांगू शकतो पण,स्वतःमध्ये जर प्रामाणिकपणाचे लक्षणे नसतील तर सर्व काही असून सुद्धा कधीच समाधान मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इतिहासातील एक मनोरंजक घटना* स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळएच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.*आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,*तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, *विन्स्टन चर्चिल,*तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ *अलेक्झांडर फ्लेमिंग,* आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, *पेनिसिलीन.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2021/03/23032021.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ जागतिक जल दिवस_* *_जागतिक मुकाभिनय दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• 💧💧💧 *_'जागतिक जल दिन' एक आंतरराष्टीय दिवस प्रत्येक वर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे._* *१९९९:लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’**१९७१:ओरिसात राष्ट्रपती राजवट सुरू**१९७०:हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.**१९५५:ब्रह्मदेश व भारत यांच्यात रेडिओ टेलिफोन दळणवळण सुरू झाले**१९४७:शेवटचे व्हाईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे भारतात आगमन**१९४५:अरब लीगची स्थापना**१७३९:नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:आदित्य सील-- भारतीय अभिनेता**१९८१:रणजीत नारायण पवार-- लेखक* *१९७६:विशाखा सुभेदार-- टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९७२:अश्विनी एकबोटे--प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना(मृत्यू:२२ ऑक्टोबर, २०१६)**१९५९:सुरेश नावडकर-- प्रसिद्ध ललित लेखक* *१९५८:देवका जगन्नाथ देशमुख -- कवयित्री, लेखिका,संपादिका* *१९५१:चारुदत्त लक्ष्मण(सी.एल.) कुलकर्णी-- सुप्रसिद्ध दूरदर्शन मालिका अभिनेते तथा प्रसिद्ध चित्रकार,कवी,लेखक* *१९४९:विलास बाबूराव मुत्तेमवार-- माजी खासदार* *१९४८:लक्ष्मण ढवळू टोपले-- लेखक,कवी* *१९४३:नंदा अनंत सुर्वे- मुक्त पत्रकार तथा प्रसिद्ध लेखिका* *१९२४:मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (मृत्यू:१७ डिसेंबर १९८५)**१९२४:पंडित अमरनाथ-- भारतीय शास्त्रीय गायक आणि चित्रपट संगीतकार(मृत्यू:९ मार्च १९९६)**१९११:देवीसिंह व्यंकटसिंह चौहान-- इतिहास या विषयाचे एक अभ्यासक(मृत्यू:डिसेंबर २००४)**१९०६:भगवंत भिकाजी सामंत-- शिक्षणतज्ञ व सूचिकार* *१८७७:सदाशिव कृष्ण फडके-- लेखक (मृत्यू:१२ ऑक्टोबर १९७१)**१८५७:शंकरशास्त्री रघुनाथशास्त्री गोखले-- लेखक (मृत्यू:२१ आक्टोबर १९०४)* *१७९७:विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (मृत्यू:९ मार्च १८८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७:गोविंद श्रीपाद तळवलकर-- इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक (जन्म:२२ जुलै १९२५)* *२००७:निसार बज्मी-- संगीतकार(जन्म:१ डिसेंबर १९२४)**२००५:रामासामी गणेशन(जेमिनी गणेशन) भारतीय अभिनेते(जन्म:१७ नोव्हेंबर १९२०)**२००४:बॅरिस्टर व्ही.एम.तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित,स्वातंत्र्यसैनिक,मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म:३ जुलै १९०९)**१९९१:कविवर्य यादव मुकुंद पाठक (शशिमोहन)--कवी विदर्भ साहित्य संघाचे पूर्व अध्यक्ष (जन्म:२५ जून १९०५)**१९८४:प्रभाकर आत्माराम पाध्ये --संपादक, साहित्यिक,सौंदर्यमीमांसक,समीक्षक(जन्म:४ जानेवारी १९०९)**१८३२:योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी.गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते. (जन्म:२८ ऑगस्ट १७४९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक जल दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जलसाक्षरता : काळाची गरज*मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ? याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विकसित भारत संदर्भातले संदेश त्वरित थांबविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात; सातारा-मुंबई महामार्गावर कारची कंटेनरला धडक; सर्व प्रवासी सुखरूप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंतप्रधानांचे छायाचित्र असलेले बॅनर काढलेच नाही : हिंगोलीच्या रेल्वे स्टेशन प्रमुखांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भावगंधर्वांनी जागवल्या लतादीदींच्या स्वरमयी आठवणी:विभावरी आपटे-जोशी यांना 'दीदी पुरस्कार' देऊन सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *RBI च्या निर्देशांनुसार 31 मार्च 2024 अर्थात रविवारी देशभरातील सर्व बँका सुरु राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जच्या कप्तानपदी, महेंद्रसिंह धोनीने सोडलं पद*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय ?* ⏰ **************************'आजीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' असा प्रश्न छोट्या केशवकुमारांना पडला होता. आजच्या विज्ञानयुगातला मुलगा मात्र थोडासा वेगळा प्रश्न विचारेल. 'या पेशीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' कारण सर्व सजीवांचा मूळ घटक असलेल्या पेशींच्या अंगीही असलंच एखादं चमत्कारिक घड्याळ असावं, अशीच त्यांची वागणूक असते. नाहीतर फुलं नेहमी दिवसाच्या विशिष्ट वेळेलाच कशी फुलली असती ? फळझाडांना विशिष्ट ऋतूतच कसा मोहर आला असता ? प्राण्यांचा विणीचा हंगाम विशिष्ट दिवसांपुरताच कसा राहिला असता ? एवढंच काय पण आपल्यालाही विशिष्ट वेळेसच झोप कशी आली असती ? आणि त्या झोपेतूनही विशिष्ट वेळेसच जाग कशी आली असती ? याचं कारण आपण सगळे ज्या वातावरणात राहतो त्याचाही एक नैसर्गिक ताल असतो. दिवस रात्रीचं चक्र तर आपल्या ओळखीचं आहेच, पण निरनिराळ्या ऋतुंचंही चक्र पर्यावरणात नांदत असतं. या चक्राशी जुळवून घेण्यानंच आपलं जगणं अधिक सुसह्य होतं, हे सजीव फार पूर्वीच शिकले आहेत. उत्क्रांतीच्या ओघात ही जुळवून घेण्याची प्रक्रिया अंगी रुजली आहे. त्यामुळं आपल्या अनेक शरीरक्रियाही अशाच प्रकारे चक्राकार होत असतात. झोप, भुक यासारख्या शरीरक्रियांमधील ताल तर आपल्या माहितीचाच आहे. पण शरीराचं तापमान, रक्तदाब, संप्रेरकांचा पाझर हाही या तालानुसार होत असतो. वैज्ञानिकांनी यालाच सर्केडियन र्‍हीदम असं नाव दिलं आहे. दैनिक ताल. म्हणजेच एक दिवसाचं चक्र. याव्यतिरिक्त एका दिवसाहून कमी कालावधीचंही चक्र असतं. तसंच एका दिवसाहून अधिक कालावधीचंही चक्र असतं. स्त्रियांची मासिक पाळी हे या दुसर्‍या प्रकारच्या चक्राचं उत्तम उदाहरण आहे. हे चक्र किंवा हा ताल वातावरणातल्या काही सूचक घटकांना दाद देत असतो. दिवसचक्र हे सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं. त्यामुळं दिवस आणि रात्र यावेळच्या शरीरक्रिया वेगवेगळ्या होत असतात. माणूस गुहांमध्ये राहत होता तेव्हापासून दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यांच्याशी जुळवून घेत त्याच्या शरीरक्रियांचा ताल सुरू झाला. त्यानंतर माणसांनं दिव्याचा शोध लावून दिवस आणि रात्र यांच्यातला फरक कमी केला असला तरी हा मुळ ताल तसाच राहिला आहे. अंधारकोठडीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना बाहेर दिवस आहे की रात्र आहे याचा पत्ताच लागत नाही. तरीही त्यांच्या झोपेच्या आणि जाग येण्याच्या वेळांमध्ये फारसा फरक पडत नसल्याचंच दिसून आलं आहे.आपल्या मेंदूमधील सुप्राकायॅस्मिक न्युक्लियस या भागाकडून या अंगभूत घड्याळाचं नियंत्रण होतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातुन* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विचार हे भांडवल आहे, उद्योग हा मार्ग आहे आणि मेहनत हाच उपाय आहे.* *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचव्यांदा कोण निवडून आले आहेत ?२) सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?३) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते ?४) शरीराच्या तापमानावर नियंत्रण राखण्याचे कार्य कोणती ग्रंथी करते ?५) भारताचे 'INDIA' हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे ? *उत्तरे :-* १) ब्लादिमिर पुतीन २) विस्तार अधिकारी ( पंचायत ) ३) चंद्रभागा ४) थायरॉईड ग्रंथी ५) INDUS*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सनीदेवल जाधव👤 रमेश कतुरवार, धर्माबाद👤 गणेश मैद👤 शंकर वर्ताळे👤 श्रीमंत ढवळे👤 अमित बडगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती अपमान सहन करून सुद्धा, इतरांना मान, सन्मान, आदर देऊन प्रामाणिकपणे जगत असते त्या व्यक्तीला दुसऱ्याला मानसन्मान मागण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून आपण सुद्धा आपला स्वाभिमान कायम ठेवून जगण्याचा प्रयत्न करावे. कारण स्वाभिमान, प्रामाणिकपणा ठेवून सत्याच्या वाटेवर चालण्याची एकदा का सवय झाली की, इतर व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडण्याची वेळ आपल्यावर येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 *बोधकथा - संगत* 🚩आईनस्टाईन के ड्राइवर ने एक बार आइंस्टीन से कहा- "सर, मैंने हर बैठक में आपके द्वारा दिए गए हर भाषण को याद किया है।"आईनस्टाईन हैरान!उन्होंने कहा- "ठीक है, अगले आयोजक मुझे नहीं जानते। आप मेरे स्थान पर वहां बोलिए और मैं ड्राइवर बनूंगा।ऐसा ही हुआ, बैठक में अगले दिन ड्राइवर मंच पर चढ़ गया। और भाषण देने लगा...उपस्थित विद्वानों ने जोर-शोर से तालियां बजाईं।उस समय एक प्रोफेसर ने ड्राइवर से पूछा - "सर, क्या आप उस सापेक्षता की परिभाषा को फिर से समझा सकते हैं?"असली आईनस्टाईन ने देखा बड़ा खतरा!!इस बार वाहन चालक पकड़ा जाएगा। लेकिन ड्राइवर का जवाब सुनकर वे हैरान रह गए...ड्राइवर ने जवाब दिया - "क्या यह आसान बात आपके दिमाग में नहीं आई ? मेरे ड्राइवर से पूछिए, वह आपको समझाएगा।"शिक्षा :यदि आप बुद्धिमान लोगों के साथ चलते हैं, तो आप भी बुद्धिमान बनेंगे और मूर्खों के साथ ही सदा उठेंगे-बैठेंगे तो आपका मानसिक तथा बुद्धिमता का स्तर और सोच भी उन्हीं की भांति हो जाएगी!!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/EMQKpdbbxWmoFLTc/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक वन दिवस_**_जागतिक काव्य दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_२१ डिसेंबर २०१२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेद्वारे एक ठराव मंजूर करून दरवर्षी २१ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वन दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली._**२००३:जळगाव महानगरपालिका अस्तित्वात आली**२०००:फ्रेंच गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५' या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला**१९९०:नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.**१९८०:अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.**१९७७:भारतातील आणीबाणी संपुष्टात आली**१९३५:शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.**१८७१:ऑटो व्हॉन बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर बनला.**१८५८:इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिला.**१६८०:शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: हेमंत ढोमे -- अभिनेता,दिग्दर्शक* *१९७८:राणी मुखर्जी – अभिनेत्री**१९७६:प्रा.डॉ.नोमेश मेश्राम -- कवी* *१९७१:प्रदीप नारायण विघ्ने-- कवी,लेखक* *१९६७:हेमंत दिवटे -- प्रसिद्ध कवी,अनुवादक* *१९६०:राजेश महाकुलकर -- कवी,लेखक* *१९४६:ॲड.राम हरपाळे -- लेखक, व्याख्याते* *१९३४:बुटासिंग-- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:२ जानेवारी २०२१)**१९२९:श्रीपाद गंगाधर कावळे-- कवी (मृत्यू:२००१)**१९२८:राम पटवर्धन-- मराठी अनुवादक आणि संपादक(मृत्यू:३ जून २०१४)**१९२१:चंद्रकांत कल्याणदास काकोडकर-- कादंबरीकार(मृत्यू:२३ नोव्हेंबर १९८८)**१९१६:उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ-- भारतातील प्रख्यात शहनाई वादक,भारत रत्न (मृत्यू:२१ ऑगस्ट २००६)**१९१३:मनोहर महादेव केळकर-- लेखक* *१९१२:ख्वाजा खुर्शीद अन्वर-- पाकिस्तानी चित्रपट निर्माता,लेखक,दिग्दर्शक आणि संगीतकार(मृत्यू:३० ऑक्टोबर १९८४)**१८८७:मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (मृत्यू:२६ जानेवारी १९५४)**१८४७:बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार,शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे,विज्ञानप्रसारक,लेखक (मृत्यू:२ डिसेंबर १९०६)**१७६८:जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१६ मे १८३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:वंदन राम नगरकर--प्रसिद्ध एकपात्री कलाकार,लेखक,व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ (जन्म:२४ मार्च१९६१)**२०१०:पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (जन्म:२९ मार्च १९२६)**२००५:दिनकर द.पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (जन्म:६ नोव्हेंबर १९१५)**१९९२:मोरेश्वर रामचंद्र वाळंबे-- शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार(जन्म:३० जून १९१२)**१९८५:सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (जन्म:२० मार्च १९०८)**१९७४:श्रीधर बाळकृष्ण रानडे --मराठी कवी,रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक.(जन्म:२४ जून १८९२)**१९७३:यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं.ग.कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला. (जन्म:१७ एप्रिल १८९१)**१९७३:शंकर घाणेकर--’आतुन कीर्तन वरुन तमाशा’ या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.(जन्म:१० फेब्रुवारी १९२६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक काव्य दिनानिमित्त मनस्वी शुभेच्छा..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत 72 लाखांची रोकड जप्त, निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी अधिसूचना, १९ एप्रिल रोजी होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पण मी कोणाकडेही उमेदवारी मागणार नाही, मी स्वबळावर लढणार - राजू शेट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 मधून DRS आऊट, नवीन SRS सिस्टीम, उद्यापासून IPL 2024 चा थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बाळाची गर्भावस्था व पोषण* 📙 मानव 'मॅमल' या गटात मोडतात. म्हणजेच सस्तन प्राणिमात्र असल्याने एकपेशीय सुरुवातीपासून जन्म होईपर्यंत आईच्या पोटात त्यांची पूर्ण वाढ होते जाते. माणसाची गर्भावस्था ही अडतीस आठवड्यांची असते. हाच काळ छत्तीस ते चाळीस आठवडे येथपर्यंत मागे पुढे होऊ शकतो. या काळातील अवस्थेलाच 'गर्भावस्था' म्हणतात व आईच्या गर्भाशयात ही सर्व वाढ होते.गर्भाशयाला आतील बाजूने तळहाताएवढय़ा पसरट भागात जोडलेल्या अस्तराला 'प्लासेंटा' असे म्हणतात. याचे दुसरे टोक गर्भाच्या नाभीतून गर्भाला पोषणद्रव्ये रक्ताद्वारे पूरवत असते. पुरवठा करणाऱ्या रक्तनलिकांच्या या समुच्चयास 'नाळ' असे म्हणतात. बाळाची नाळ आईच्या गर्भाशयाशी आतील बाजूस जोडलेली असल्याने आईच्या रक्तातील पोषणद्रव्ये जशीच्या तशी बाळाला मिळत राहतात.दहाव्या आठवडय़ाच्या सुमारास बाळाचे अवयव स्पष्ट होऊ लागतात, बाविसाव्या आठवड्यात त्याच्या हृदयाच्या स्पंदनांचे ठोकेही ऐकू येऊ शकतात, तर बत्तीसाव्या आठवड्यात बाळ गर्भाशयात पूर्णपणे स्थिर स्थिती घेऊ शकते व या सर्व गोष्टी हल्ली अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे नीट दिसूही शकतात.गर्भावस्थेतील काही दोष असल्यास वरील तपासण्यांचा हल्ली उपयोग केला जातो. त्यावरून बाळाची वाढ, आकारमान यांचा नक्की पत्ता लागू शकतो. पूर्ण वाढ झाल्यावर अडतिसाव्या आठवड्यात एके दिवशी गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते व गर्भावस्थेतील बाळ योनीमार्गे आईच्या पोटातून जगात जन्म घेते. बाळाचा जन्म झाल्यावर लगेच त्याची नाळ बांधून कापून टाकतात. याच जागी बाळाची बेंबी व नाभी काही दिवसांनी तयार होते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे, जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*७२४६)* जगात प्रदूषणात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?*७२४७)* १८७०साली पुणे येथे पहिली शिवजयंती कोणी साजरी केली ?*७२४८)* ओरिसाच्या किनारी भागास काय म्हणतात ?*७२४९)* महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पाण्याची बँक स्थापन करण्यात आली आहे ?*७२५०)* भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणते ? *उत्तरे :-* *७२४६)* तिसरा *७२४७)* महात्मा फुले *७२४८)* उत्कल *७२४९)* सोलापूर *७२५०)* अरवली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साहेबराव कदम, बाभळी, धर्माबाद👤 शिवा जी. गुडेवार👤 पी. अनिल, तेलंगणा👤 स्नेहलता कुलथे, साहित्यिक👤 प्रवीण बडेराव👤 हर्षल जाधव👤 संतोष खोसे, उस्मानाबाद👤 गणेश धुप्पे👤 विलास सोनकांबळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधी देणारे कमी होते पण,घेणारे मात्र जास्त होते.आज त्याही पेक्षा घेणाऱ्यांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. म्हणून कधी घेणाऱ्यांना पुजले जाते का. ..? या विषयी विचार करण्याची गरज आहे. कारण, देणाऱ्यांनाच दाता म्हणतात घेणाऱ्याला नाही. घेण्यासाठी तर आपल्याकडे संपूर्ण आयुष्य पडले आहे. माणसाचा जन्म मिळाला हेच सर्वांत श्रेष्ठ समजून देण्यासाठी वेळ, आपले हात,नि:स्वार्थ भावना व मन स्वच्छ, असणे आवश्यक आहे. घेण्यासाठी कुठेही वणवण भटकावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान* एकदा काही कोळिणींना बाजारातून गावी परतण्यास वेळ झाला. अंधार पडला म्हणून वाटेत एका फुलबागेकच्या शेजारी झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. माळी म्हणाला, "बायांनो ! रात्र खूप झाली आहे, या गरीबाच्या झोपडीत रात्र काढा आणि पहाटेस निघा." कोळिणींना ते पटले, त्या सार्याजणी त्या वृद्ध माळीबाबांच्या झोपडीत मुक्कामास राहिल्या. पण त्यांना त्या झोपडीत जराही झोप लागली नाही. त्या रात्रभर इकडून तिकडे, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिल्या. त्या खोलीतील एका कोपऱ्यात चमेलीच्या फुलांनी भरलेली करंडी होती. त्या फुलांचा सुगंध असह्य झाल्यानेच कोळिणींना झोप येत नव्हती. काही वेळाने एक कोळीण उठली. म्हणाली, "हा दुर्गंध काही जात नाही. वाढतोच आहे." असे म्हणून तिने आपल्या मासळीच्या टोपलीवर थोडे पाणी टाकले. ती टोपली उशाशी घेताच तिला गाढ झोप लागली. *तात्पर्य :* कोणाला कशाने समाधान लाभेल, हे ज्याच्या त्याच्या सवयीवर अवलंबून असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक चिमणी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९५६:ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले**१९१७:महाडचा ’चवदार तळे’ सत्याग्रह**१९१६:अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.**१८५४:रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ’ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.**१८५८:झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजाविरुद्ध लढा पुकारताच सेनापती सर ह्य रोज यांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला.**१६०२:डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:पुष्पलता युवराज मिसाळ -- कवयित्री* *१९७२:संजय दयाराम तिजारे-- कवी* *१९६६:प्रवीण दशरथ बांदेकर-- मराठी साहित्यिक**१९६६:अलका याज्ञिक – प्रसिद्ध भारतीय गायिका**१९५८:अशोक लोटणकर-- ललित कथाकार, कवी,समीक्षक**१९५५:दया मित्रगोत्री-- कवयित्री**१९५२:आनंद अमृतराज-- भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा टेनिस खेळाडू**१९५१:मदनलाल उधौराम शर्मा-- माजी क्रिकेटपटू**१९५०:डॉ.भारती जयंत सुदामे -- प्रसिद्ध लेखिका,मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन व अनुवाद* *१९४७:प्रा.वसंत केशव पाटील-- ललित लेखक,कथाकार,कवी,गझलकार आणि राष्ट्रीय स्तरावरील भाषांतरकार साहित्यक* *१९३९:सुधीर दळवी -- भारतीय अभिनेता, मनोज कुमारच्या शिर्डी के साई बाबा या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात साईबाबाची भूमिका साकारली**१९२४: राम नारायण गबाले -- मराठी चित्रपट दिग्दर्शक,निर्माते,पटकथालेखक, संवादलेखक(मृत्यू:९ जानेवारी २००९)**१९२४:ईश्‍वर बगाजी देशमुख-- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:६ फेब्रुवारी २००६)**१९२१:पी.सी.अलेक्झांडर-- भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी,महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (मृत्यू:१० ऑगस्ट२०११)**१९२०:वसंत कानेटकर – नाटककार (मृत्यू:३१ जानेवारी २०००)**१९११:माधव मनोहर --समीक्षक,नाटककार, लेखक(मृत्यू:१६ मे,१९९४)**१९०८:सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (मृत्यू:२१ मार्च १९८५)**१८२८:हेन्‍रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार,दिग्दर्शक आणि कवी (मृत्यू:२३ मे १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे-- मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध(जन्म:३ सप्टेंबर, १९२३)**१९५६:बा.सी.मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (जन्म:१ डिसेंबर १९०९)**१९२५:लॉर्ड कर्झन–ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय(जन्म:११ जानेवारी १८५९)**१७२७:सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (जन्म:२५ डिसेंबर १६४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••।। जागतिक चिमणी दिवस ।।आमच्या लहानपणी दिसणाराकुठे गेला लहानसा चिमणाचिवचिव आवाज झाला गायबकोणी खाईना अंगणातला दाणाबाळाला खाऊ घालतांनाआई बोलावित असे चिऊलाबाळ ही मिटकावून खात असेबघत बघत लहानश्या चिऊला- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई उच्च न्यायालयाची माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करेल - आशिष शेलार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या ७ लोकसभा मतदारसंघांसाठी दिला पाठिंबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बंगळुरू मधल्या नागरथ भागात १४४ कलम लागू.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चीनच्या प्रवक्त्यानं अरुणाचलप्रदेशाबद्दल केलेल्या विधानाचा प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी घेतला समाचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने WPL मध्ये पहिले विजेतेपद पटकावले:दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव, श्रेयंका पाटीलने घेतल्या 4 विकेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बायोमास* 📙 झाडेझुडपे, पालापाचोळा, काटक्या, कोळसा, शेण्या, गोवऱ्या, कुजलेले शेवाळे हे सर्व बायोमास या प्रकारात मोडतात. सूर्याची ऊर्जा मिळून त्यांची निर्मिती झालेली असते. या बायोमासचे ज्वलन करून तीच ऊर्जा पुन्हा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. ग्रामीण जीवनात या बायोमासला फार महत्त्व आहे.रोजची चूल पेटण्याचा संबंध प्रथम कोरडे जळण मिळवण्यापासून सुरू होतो. झाडे तोडून लाकडे मिळवण्याचे दिवस कमी होत चालले आहेत. काट्याकुटक्या, झाडोर्‍याच्या फांद्या झपाट्याने नाहीशा होत चालल्या आहेत. पालापाचोळा शेकोटीला वा पाणी तापवायला उपयोगी पडतो; पण भाकऱ्या भाजणे व स्वयंपाक करणे यासाठी त्याचा उपयोग होत नाही. पुर्वापारची पद्धत म्हणजे शेणाच्या गोवऱ्या थापणे. जनावरांचे म्हणजे गायीगुरांचे शेण, त्यात थोडीशी कोळशाची पावडर घालून मळायचे. त्याचा गोल गोवऱ्या थापायच्या व भिंतीला लावून वाळवत ठेवायच्या. ग्रामीण जीवनाचे हे एक अविभाज्य अंग आहे.याच गोवर्‍या वाळल्या की मग पावसाळ्याच्या दिवसांतील जळणाची पंचाईत कमी होते. काहीजण या गोवऱ्या तयार करताना वाळका कडबासुद्धा बारीक चुरून वापरतात. दोन चार गोवर्‍या व एखादे मोठे लाकूड यांवर एक वेळचा स्वयंपाक कसाबसा पार पाडता येतो. चुलीची आचही चांगली राहते. धुर कमी होतो.या पद्धतीचे जळण वापरायची प्रथा जिथे गुरे हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे तिथे कायम आहे. भारतातील सर्व ग्रामीण भागात कुठेही गेलात तरी गोवऱ्यांची चळत वळचणीला लावून रचलेली दिसेल व परसदारी भिंतीला गोवर्‍या थापून वाळवत लावलेल्या दिसतीलच. एवढेच नव्हे तर रानात गुरे चरायला जातात त्या वेळी त्यांच्यामागे जाणारी लहान मुले एखादी पाटी घेऊन शेण गोळा करायला कधीही विसरत नाहीत. जमेल तेवढे पाटीभर शेण घरी आणले की जळणाची सोय होते, हे त्यांना जणू बाळकडूच मिळालेले असते. गोवऱ्यांचा आणखी एक उपयोग आहे. घरातील वृद्ध म्हातारे माणूस रागाने म्हणताना कधी ऐकले आहे ? 'गेल्या आहेत माझ्या गौवऱ्या मसणात,' म्हणून ! अगदी बरोबर. अंत्यसंस्कार करताना अनेक ठिकाणी अजूनही भरपूर गोवऱ्या वापरतात. बहुमूल्य अशा लाकडाची ही त्यात बचत होते. हेही महत्त्वाचे नाही काय ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साधेपणाने कर्तव्य करताना भीतीचे कारण नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?२) रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे ?३) घटक राज्यांमधील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आणीबाणी लागू केले जाते ?४) कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?५) भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची आहे ? *उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) रॉसकॉसमॉस ३) राष्ट्रपती राजवट ४) तामिळनाडू ५) पाचव्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नागेश चिंतावार, शिक्षक, नांदेड👤 योगेश राजापूरकर, शिक्षक, उमरी👤 गणेश गुरुपवार, नांदेड👤 रमेश कोंडेकर👤 सर्जेराव ढगे👤 मनोहर किशनराव राखेवार, नांदेड👤 रामदयाल राऊत*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोन शब्द आपल्यासोबत कोणी हसून बोलत असतील तर आपल्याला आनंद होत असतो .पण आपल्याला कोणी कठोर शब्दात बोलले तर मात्र त्या शब्दांचा राग येत असतो. या दोन्ही मध्ये खूप फरक आहे. पण,थोडे विचार करून बघावे कधी,कधी हसून बोललेल्या शब्दात जे काही दडलेले असते त्याबद्दल आपल्याला पुरेपूर माहिती नसते व जे कोणी कठोर शब्दात बोलून मोकळे होतात. कधीकाळी ते आपल्या भल्यासाठीही असू असते म्हणून त्या दोन्ही मधील फरक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.*📝 संकलन* 📝•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सरोदवादक अमजद अली खान यांना ’गंधर्व पुरस्कार’ तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना ’अप्सरा पुरस्कार’ जाहीर**१९४४:नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला**१९४०:अमळनेर येथे साने गुरुजींनी सुरू केलेल्या 'काँग्रेस'या साप्ताहिकाचा शेवटचा अंक निघाला**१९२२:महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास**१८५०:हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:प्रा.डॉ.उद्धव भाले-- लेखक**१९७०:देवेंद्र गावंडे--निवासी संपादक लोकसत्ता विदर्भ आवृत्ती तथा प्रसिद्ध लेखक* *१९६८:प्रा.डॉ.शंतनू रामचंद्र कुळकर्णी -- प्रसिद्ध कवी* *१९५९:मंगला मधुकर रोकडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका,संपादिका* *१९५७:रत्ना पाठक शाह-- भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका* *१९५६:वासंती वर्तक--दूरदर्शनच्या प्रतिभावंत वृत्तनिवेदिका व लेखिका* *१९५५:संजय श्रीकृष्ण पाठक-- प्रसिद्ध विज्ञान लेखक* *१९५५:अरुण बुधाजी सोनवणे-- गझलकार* *१९४८:एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (मृत्यू:२६ जून २००५)**१९४६:नवीन निश्चल-- भारतीय अभिनेता(मृत्यू:१९ मार्च २०११)**१९४३: विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे-- भारतीय वायुसेनेचे अधिकारी ऐतिहासिक अशा कारगिलसह तीन प्रमुख युद्धांमध्ये सहभाग (मृत्यू:२५ डिसेंबर २०२०)**१९३८:बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ’शशी कपूर’ – अभिनेता(मृत्यू:४ डिसेंबर २०१७)**१९३४:दशरथ तोंडवळकर-- कलावैभव'चे सर्वेसर्वा,ज्येष्ठ नाट्यनिर्माते (मृत्यू:७ आगस्ट २०१०)**१९३२:तुळशीराम माधवराव काजे-- प्रतिभावंत कवी(मृत्यू:१४ सप्टेंबर २०१८)* *१९२६:अक्कितम अच्युथन नंबूथिरी-- भारतातील मल्याळम भाषेतील कवी, 'अक्कितम' या नावाने प्रसिद्ध,त्यांनी रचलेल्या बालीदर्शनम या काव्यसंग्रहासाठी १९७३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित(मृत्यू:१५ ऑक्टोबर, २०२०)**१९२१:एन.के.पी. साळवे – भारतीय राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे अध्यक्ष (मृत्यू:१ एप्रिल २०१२)**१९१९:इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू:२० फेब्रुवारी २००१)**१९०५:मालती बेडेकर ऊर्फ ’विभावरी शिरुरकर’ – लेखिका (मृत्यू:७ मे २००१)**१९०४:लक्ष्मणराव सरदेसाई-- कोंकणी व मराठी भाषेतील लेखक(मृत्यू:४ फेब्रुवारी१९८६)**१९०१:कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार,अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक* *१८८१:वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार,’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक,लेखक व नाटककार (मृत्यू:३ जून १९५६)**१८६९:नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:९ नोव्हेंबर १९४०)**१८६७:महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट(मृत्यू:१ जून १९४४)**१८५८:रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (मृत्यू:२९ सप्टेंबर १९१३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:अशोक शेवडे --प्रख्यात मुलाखतकार , लेखक (जन्म:२४ जानेवारी १९४४)* *२०१६:आशा अनंत जोगळेकर-- प्रसिद्ध नृत्यांगना (जन्म:१० सप्टेंबर १९३६)**२०११:दिनकर निलकंठराव देशपांडे-- मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक(जन्म:१७ जुलै १९३३)**२००४:वसंत केशव दावतर- समीक्षक (जन्म:२७ ऑगस्ट १९२५)**२००१:विश्वनाथ नागेशकर – चित्रकार (जन्म: १९१०)**१९७५:हरी रामचंद्र दिवेकर--स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते,संस्कृत लेखक(जन्म:५ नोव्हेंबर १८८५)**१९०८:सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते. (जन्म:२५ मे १८३१)**१८९४:रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित-- वेदाभ्यासक,उत्तम प्रशासक(जन्म:१ जानेवारी १८४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एका वोट ची किंमत*ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *19 व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, महाराष्ट्रात पाच टप्यात होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप, या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'जय जय महाराष्ट्र माझा...' हे राज्यगीत आता शाळांमध्ये गायले आणि वाजविले जाणार असल्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज:संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमृतवाहिनीच्या डॉ. विजय गडाख यांना भारत सरकारचे पेटंट:कुरडया बनवण्याची नवीन मशीन, एका मिनिटात पाच कुरडया तयार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात दोन दिवसीय काव्य महोत्सव संपन्न:साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित संमेलनात दिग्गज कवीयत्रींनी उलगडला 'वारसा साहित्यीकांचा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 World Cup 2024 : विराट कोहलीचं स्थान निश्चित, रोहित शर्माची मध्यस्थी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ? 📒साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात वेगवेगळ्या कारणांनी इंटरनेट बंद करण्यात अव्वल देश कोणता ?२) जगात शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?३) निवडणूक आयोगाकडून मतदारांना ई - ओळखपत्र देण्यास सुरूवात कोणत्या वर्षी झाली ?४) देशात फुलपाखरांच्या एकूण किती प्रजातींची नोंद आहे ?५) जगातील घनदाट जंगल कोणते ? *उत्तरे :-* १) भारत २) भारत ३) सन २०२१ ४) १४०० प्रजाती ५) अमेझोन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी आगोड👤 इरफान शेख, धर्माबाद👤 लक्ष्मण नरवाडे👤 सुहास भंडारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली वाट जर सत्याची असेल आणि त्या वाटेत आपल्याला अपमान, बदनाम करून स्वतः चे समाधान करून घेणारे मिळत असतील तर ते, आपले सर्वात मोठे भाग्य समजावे. व तो, आपल्याला मिळालेला मौल्यवान सन्मान समजावा. कारण, ते सर्व सहन करण्याची व त्या वाटेवर चालण्याची प्रत्येकात ताकद नसते.म्हणून जीवनात कितीही प्रसंग आले तरी आपण निवडलेल्या योग्य त्या वाटेवर चालत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे ?कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का?ते म्हणाले, हो एकच आहे.बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे"योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले.मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय"१९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात."मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!"मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?"बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.*आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत असायला हवी*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JNN4WNgxUoQAENsi/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट मध्ये शतकांचे शतक* *२००१:नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान**२०००:हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के.बिर्ला पुरस्कार’ जाहीर**१९९२:ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर अवार्ड प्रधान**१९७६:इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.**१९६६:अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.**१९४३:’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१५२८:फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:राजपाल यादव-- हिंदी चित्रपटांमधील विनोदी अभिनेता**१९६८:अनन्या खरे-- भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९६२:बाळू विठोबा श्रीराम-- कवी,लेखक* *१९६२:हरि सखाराम गोखले-- मराठी कवी आणि पुस्तक प्रकाशक**१९६१:किरण वसंत पुरंदरे-- पक्षितज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक व लेखक* *१९५८:जनरल बिपीन रावत-- भारतीय लष्करातील 'फोर स्टार रँक' धारक जनरल,भारतीय लष्कराचे २६ वे लष्कर प्रमुखदेखील होते.२०२२ साली त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला(मृत्यू:८ डिसेंबर २०२१)**१९४६:मुकुंद धाराशिवकर --ज्येष्ठ लेखक विज्ञान प्रचारक(मृत्यू:१४ फेब्रुवारी २०१६)**१९३९:वामनराव तेलंग-- तरूण भारतचे माजी ज्येष्ठ संपादक,लेखक (मृत्यू:११ जून २०२०)**१९३६:प्रभाकर बर्वे -- आधुनिक भारतीय चित्रकलेचे प्रणेते(मृत्यू:६ डिसेंबर १९९५)* *१९३६:भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू:२६ जुलै २००९)**१९३५:प्राचार्य बजरंग शामराव सरोदे -- प्रसिद्ध लेखक* *१९३५:शशिकांत यशवंत गुप्ते -- लेखक* *१९२१:फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९१४:भानुदास श्रीधर परांजपे-- कवी नाटककार(मृत्यू:१९ जानेवारी १९८५)**१९१३:पंढरीनाथ गंगाधर नागेशकर-- हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम तबलावादक(मृत्यू:२६ मार्च २००८)**१९०१:प्र.बा.गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू:१२ जून १९८१)**१८७२:काशीनाथ हरी मोडक( माधवानुज)-- केशवसुत संप्रदायातील मराठी कवी(मृत्यू: २ मार्च१९१६)* *१७८९:जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:६ जुलै १८५४)**१७५१:जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२८ जून १८३६)**१७५०:कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ(मृत्यू:९ जानेवारी १८४८)**१६९३:मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक,मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू:२० मे १७६६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ॲड.ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी-- नामवंत वकील,इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेखक (जन्म:१३ जून १९३०)* *२०१०:डॉ.दत्ता वाळवेकर-- भारतीय मराठी गायक आणि संगीत दिग्दर्शक(जन्म:३० मार्च१९२८)**२००७:मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म:४ मे १९८४)* *१९९९:कुमुदिनी पेडणेकर – प्रसिद्ध गायिका* *१९९०:वि.स.पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते,संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती,रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म:२१ जुलै १९१०)**१९८५:वसंत श्यामराव वरखेडकर-- कादंबरीकार,नाटककार(जन्म:१० सप्टेंबर १९१८)**१९४६:’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म:१० ऑगस्ट १८५५)**१९४५:गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म:१३ जून १८७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंधश्रद्धा कशी नष्ट होईल ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील सर्व शिक्षकांना आता ड्रेसकोड अनिवार्य, शिक्षणमंत्री केसरकर यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सर्वोच्च न्यायालयाने सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर येत्या शुक्रवारी १९ मार्च रोजी होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची दोन मोठी टेंडर केली रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा राज्य शासनाने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुंधती खंडकर यांचे निधन : वयाच्या 92 व्या वर्षी सिंगापुरात घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *'बारावी फेल' सर्वोत्कृष्ट चित्रपट तर विक्रांत सर्वोत्कृष्ट अभिनेता ; क्रिटिक्स चॉईस पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्टीफन हॉकिंग यांच्या 10 प्रेरणादायी विचारातुन दिवसाची मस्त सुरूवात करूया...स्टीफन हॉकिंग हे जगभरातील अभ्यासकांचे प्रेरणास्ञोत होते. हॉकिंग बोलणारे एक-एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदवल गेल.1) गमती नसतील आयुष्य एक शोकांतिका ठरेल.2) जरी मी हालचाल करू शकत नसलो, मला बोलण्यासाठी काॅम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातुन मुक्त आहे. 3) नेहमी आकाशातील तार्यांकडे पहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा, कुतूहल जागरूक ठेवा.4) आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करू शकताच तुम्ही यशस्वी व्हाल. 5) आपल्याला जे-जे करता येईल ते सर्व करायला हवं. माञ जे आपल्या हातात नाहीच त्याबाबत पश्चाताप करू नये.6) दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमच अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्या आड येणार नाही. लक्षात ठेवा आत्मा आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका. 7) आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे, आक्रमकता सभ्यतेचा नाश करते. 8) कधीही करू शकत नाही, अस काहीही नाही.9) जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात.10) ब्रम्हांडापेक्षा मोठं आणि जुन काहीच नाही..!!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहित जीवनात कशाची गरज पडेल ?*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) थर्मामीटरमध्ये चमकणारा पदार्थ कोणता ?२) भारतात पहिल्यांदा मतदारांना ओळखपत्रावर छायाचित्र प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या वर्षी छापण्यात आले ?३) वारकरी संप्रदायाचे दुसरे नाव काय ?४) केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा CAA देशभरात लागू केलेल्या कायद्याला संसदेने कोणत्या वर्षी मंजुरी दिली होती ?५) आपल्या तोंडातील लाळेत किती टक्के क्षार असतात ? *उत्तरे :-* १) पारा २) मे १९६० ( कोलकाता दक्षिण पश्चिम मतदारसंघ पोटनिवडणूक ) ३) विठ्ठल संप्रदाय ४) सन २०१९ ५) एक ते दीड टक्के क्षार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 डॉ. प्रा. सुरेश तेलंग, यशवंत महाविद्यालय, नांदेड👤 अनिल कांबळे, नांदेड👤 शिवराज भुसेवार, नांदेड👤 शिवम भंडारे, येवती👤 अनिलकुमार जैस्वाल, येताळा👤 कैलास राखेवार, नांदेड👤 साईनाथ बोधनपोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठे कपडे धुताना जास्त वेळ लागत नाही त्यापेक्षा लहान असलेले कपडे धुवायला जरा जास्त वेळ लागत असतो. तरीही त्यांना आपण स्वच्छ धुण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आपल्यात सुद्धा काही क्षुद्र विचार असतील तर त्यांनाही धुवून काढण्याचा प्रयत्न करून बघावे. असे केल्याने आपले मनही स्वच्छ राहील व आपली वेळही वाया जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎯🏆 *मोटिव्हेशनल सदर* 🏆🎯 एका गावात एक ज्ञानी विद्वान पंडीत होते. देशातील अनेक हुशार व व्‍यासंगी पंडीतांमध्‍ये त्‍यांच्‍या ज्ञानाची चर्चा होत असे. शास्‍त्रार्थामध्‍ये हुशार असणारे हे पंडीत महाशय एके दिवशी आपल्‍या घराजवळ राहणा-या लहान मुलांसमवेत खेळत होते. हे पाहून तेथून जाणा-या एका सदगृहस्‍थाने त्‍यांना थांबवून विचारले,’’ अहो देशात ज्‍यांच्‍या ज्ञानाची चर्चा होते असे तुम्‍ही पंडीत असूनसुद्धा तुम्‍ही चक्क लहान काय खेळता आहात?’’ गृहस्‍थांचे हे बोलणे ऐकून पंडीतजींनी आपला खेळ बंद केला व गृहस्‍थांना घेऊन ते जवळच्‍याच एका घरात गेले. त्‍या घरात एका खुंटीला एक धनुष्‍य अडकविले होते. त्‍या धनुष्‍याकडे बोट दाखवून पंडीतजी म्‍हणाले, "महोदय, त्‍या धनुष्‍याच्‍या प्रत्‍यंचेची दोरी सध्‍या का सोडून ठेवली आहे, याचे कारण तुम्‍हाला माहित आहे काय? कामाव्‍यतिरिक्तच्‍या वेळेसही जर धनुष्‍याच्‍या कांबीची दोन्‍ही टोके जर वाकवून त्‍या दोरीला बांधून ठेवली तर काही दिवसांनी ती कांबी मोडेल आणि धनुष्‍याची दोरी खेचायची बंद होईल. परिणामी ते धनुष्‍य निकामी होईल. त्‍याचप्रमाणे अखंड लेखन, वाचन व चिंतन करत राहिल्‍याने बुद्धीवरही प्रचंड ताण येऊन लवकरच बुद्धि थकून ती काम देईनाशी होते. ती तशी होऊ नये म्‍हणून अधूनमधून मला लहान मुलांमध्‍ये माझे वय, हुद्दा, बुद्धी विसरून खेळावे लागते."गृहस्‍थांचे या उत्‍तराने समाधान झाले. *तात्‍पर्य :- बुद्धीवर येणा-या प्रचंड ताणापासून सुटका करून घेण्‍यासाठी थोडावेळ तरी आपल्‍या छंदाला किंवा परिवाराला वेळ द्यावा ज्‍याने आपल्‍या मेंदूला थोडी विश्रांती मिळेल व पुन्‍हा परिश्रम करण्‍यास मेंदू तयार होईल.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~लेखाची Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक ग्राहक दिन_**_ या वर्षातील ७५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.**१९८५:symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.**१९६१:ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.**१९५९:महिला गृहउद्योग संस्था (लिज्जत पापड) या संस्थेची मुंबईत गिरगाव येथे स्थापना**१९३९:दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.**१९१९:हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्‍घाटन**१९०६:रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.**१८७७:इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.**१८३१:मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.**१८२७:टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली**१८२०:मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले**१५६४:मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:विक्रम मालन अप्पासो शिंदे -- कवी, लेखक,संपादक* *१९९३:आलिया भट्ट -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९८३:धर्मवीर भूपाल पाटील -- कवी, पत्रकार* *१९८३:हनी सिंग-- गायक,गीतकार आणि अभिनेता**१९८२:ऋतुजा देशमुख-- अभिनेत्री* *१९८१:स्वाती गणेश पाटील -- कवयित्री* *१९८०:प्रा.डॉ सारीपुत्र तुपेरे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७९:डॉ.पोर्णिमा शिरिष कोल्हे-- लेखिका* *१९७९:प्रा.प्रज्ञा मनिष पंडित--लेखिका, कवयित्री,समुपदेशक**१९७८:बबलू विनायकराव कराळे -- कवी, कथाकार* *१९६५:डॉ.अंजुषा अनिल पाटील-- लेखिका* *१९६५:पोपटराव काळे-- प्रसिद्ध काजवाकार, निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९६१:गोविंद हरीभाऊ सालपे -- कवी* *१९६०:दशरथपंत नारायणराव अतकरी-- कवी* *१९५४:ईला अरुण-- अभिनेत्री,टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानी लोकसंगीत आणि लोकसंगीत-पॉप गायिका**१९५०:डॉ.अशोक चौसाळकर -- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४४:पुंडलिक भाऊराव गवांदे-- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९३५:लक्ष्मण त्र्य.जोशी -- प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार,लेखक* *१९३४:कांशीराम -- भारतीय राजकारणी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक (मृत्यू:९ ऑक्टोबर२००६)**१९३४:गजमल माळी-- लेखक,कवी व नाटककार(मृत्यू:२८ फेब्रुवारी २०१७)**१९२३:मीरा देव बर्मन -- भारतीय वित्त गीतकार आणि संगीतकार(मृत्यू:१५ ऑक्टोबर २००७)**१९१५:त्र्यंबक गोविंद माईणकर--भाषातज्ज्ञ, लेखक(मृत्यू:१७ सप्टेंबर १९८१)**१९१५:ह.वि.पळणीटकर-- विदर्भातील एक नाटककार,कवी व लघुकथालेखक (मृत्यू:२८ जानेवारी १९९४)**१९०१:विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक (मृत्यू:२४ मे १९९९)**१८६८:हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर-- ज्यांना सेव्ह दादा म्हणूनही ओळखले जाते,ते भारतात चित्रपट बनवणारे पहिले भारतीय होते(मृत्यू:२० फेब्रुवारी १९५८)**१८६०:डॉ.वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू:२६ आक्टोबर १९३०)**१७६७:अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:८ जून १८४५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:इम्तियाज खान-- भारतीय अभिनेता(जन्म:१५ ऑक्टोबर १९४२)**२०१९:श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर-- संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक,जेष्ठ संगीततज्ञ (जन्म:२७ मार्च)* *२०१६:नीळकंठ पुरुषोत्तम जोशी-- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक(जन्म:१६ एप्रिल १९२२)**२०१६:शंकर भाऊ साठे--कादंबरीकार आणि शाहीर( जन्म:१६ आक्टोबर १९२५)**२०१५:नारायणभाई महादेवभाई देसाई-- गांधी कथाकार (जन्म:१९२४)**२०१५:मधुकर अरकडे -- ज्येष्ठ कवी-गीतकार(जन्म:१५ एप्रिल १९५२)**२०१४:सुधीर मोघे -- मराठी कवी,गीतकार व संगीतकार (जन्म:८ फेब्रुवारी १९३९)**२०१३कल्लम अंजी रेड्डी_ फार्मास्युटिकल उद्योगातील एक भारतीय उद्योजक (जन्म:१ फेब्रुवारी १९३९)**१९९२:डॉ.राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी,गीतकार व शायर (जन्म:१९२५)**१९३७:व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (जन्म:१० डिसेंबर १८९२)**१८६५:गोविंद नारायण माडगांवकर--- मराठी लेखक(जन्म:१८१५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू .............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम स्वनिधी योजनेच्या एक लाख विक्रेत्यांना कर्ज वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना मोठी आश्वासनं; राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली MSPकायद्यासह ५ गॅरंटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फुलंब्री इथं विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला निलेश लंके उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क इथं रेल्वे टर्मिनल सेवांच्या संचालन परीक्षणाचा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात, 42 व्या जेतेपदावर नाव कोरलं!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 बिग बँग / महास्फोट📙 जॉर्ज एडवर्ड लेमेत्रे या बेल्जियन अॅस्ट्रोफिजिसिस्टकडे बिग बँग वा महास्फोटाची कल्पना मांडण्याचे पहिले श्रेय त्यांच्याकडे जाते. १८९४ साली जन्मलेल्या या शास्त्रज्ञांनी १९२७ मध्ये ही कल्पना मांडली. या कल्पनेबद्दल विविध विचार त्यांनंतर तब्बल १० वर्षे मांडले जात होते.'साऱ्या विश्वाची उत्पत्ती एका महास्फोटामध्ये अंदाजे वीस अब्ज वर्षांपूर्वी झाली असून सर्व विश्वात सध्या विखुरलेले मूलकण एका अंडाकृती आकारात होते. त्यांचा अचानक महाप्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे एकत्र असलेले मूलकण विलक्षण वेगाने, विलक्षण तप्तावस्थेत चहूकडे भिरकावले गेले. जसजसा यानंतरचा काळ लोटत गेला, तसतसे हे मूलकण हळूहळू गार होत गेले. त्यातूनच प्रथम विविध तारकासमूह निर्माण होत गेले. आपली आकाशगंगा ही या अनेकांतील एक. त्यानंतर आजही विश्व पसरतच असून ही क्रिया अव्याहत चालू राहणार आहे. महास्फोटाची कल्पना थोडक्यात अशी मांडली गेली.ही कल्पना मांडली गेल्यानंतर त्यावर विविध मते मांडली जाणे ओघानेच आले. काहींना ही कल्पनाच पूर्णत: विसंगत वाटत होती, तर काहींच्या मते ठरावीक कालांतराने विश्व आकुंचन पावून पुन्हा एकदा महास्फोट होण्याची प्रक्रिया सतत चालू राहणार होती. याशिवाय विश्व हे उत्पत्तीनंतर पसरत नसून एका 'कायमस्थिती'त असल्याचीही एक उपपत्ती जोरदारपणे मांडली जात होती. निरीक्षणे व सिद्धांत या दोन्हींच्या आधारावर ही चर्चा तब्बल तीस वर्षे चालू होती.यानंतरच्या अवकाश निरीक्षण व रेडिओलहरींच्या ग्रहणानंतर विश्व अफाटपणे पसरत आहे, हे लक्षात येत आहे. डॉपलर इफेक्ट म्हणजे दृश्य प्रकाशाच्या वर्णपटातल्या रेषा लाल / निळ्या टोकाकडे सरकलेल्या दिसतात. याचाही पडताळा आता मिळत आहे. अनेक आकाशगंगा लालसर रंगाचा प्रकाशलहरींचे तरंग पाठवत असल्याने विश्व पसरतच आहे, याची खात्री पटत आहे.संपूर्ण विश्वात पसरलेल्या अणूंची एका घनमीटरमध्ये असलेली संख्या हाही एक अभ्यासाचा व निष्कर्षांचा भाग मानला गेला आहे. अलीकडेच झालेल्या एका निरीक्षणात ही घनता जेमतेम एक अणू एका घनमीटरमध्ये एवढीच आहे; पण याहून जास्त अदृश्य पदार्थ अस्तित्वात असावेत.महास्फोटानंतरच्या पहिल्या काही मिनिटांतच विश्वात पसरलेल्या मूलकणांतून हेलियमचे अणू निर्माण झाले होते, हे गणित प्रथम १९४६ साली जॉर्ज गॅमी यांनी मांडले. आज विश्वात व आपल्या आकाशगंगेतील ग्रहांभोवती असलेल्या हेलियमचे प्रमाण २३ टक्के व अन्य मुलकणांचे ७७ टक्के (यात बव्हंशी हायड्रोजन) आढळते. यावरूनही महास्फोटाची कल्पना ग्राह्य मानावी लागते.महास्फोटानंतरच्या क्षणात प्रचंड प्रमाणात (रेडिएशन) होते व त्याचे तापमान अब्जाहून जास्त होते. प्रसरणामुळे थंडावत जाऊन आज त्याची ऊर्जा कमी झाली व तापमानही पुष्कळ कमी झाले असणारच, असा तर्क राल्फ अाल्फर व रॉबर्ट हर्मन या गॅमाँच्या सहकाऱ्यांनी १९४८ मध्ये मांडला होता. त्याची पुष्टी १९६५ मध्ये आर्नो पेंझियस व रॉबर्ट विल्सन या शास्त्रज्ञांना सापडलेल्या सूक्ष्म तरंगांच्या पार्श्वभूमीतून झाली, असा महास्फोट सिद्धांताच्या समर्थकांचा दावा आहे. या तरंगांचे तापमान शून्याखाली २७० अंश सेंटीग्रेड इतके कमी आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वप्रथम ओळखपत्रावर मतदारांचे छायाचित्र छापण्याचा प्रस्ताव कोणत्या साली पुढे आला ?२) सरकारी दस्तऐवजामध्ये वडीलाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ?३) DRDO ने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?४) पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे कोणते नाव ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली ?५) ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये 'ओपेनहायमर' या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत ?*उत्तरे :-* १) सन १९५८ २) महाराष्ट्र ३) अग्नि ५ ४) राजगड ५) सात*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विलास फुटाणे, प्रकाशक, औरंगाबाद👤 राजेंद्र महाजन, सहशिक्षक, औरंगाबाद👤 गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 बालाजी मामीलवाड👤 लक्ष्मीकांत धुप्पे👤 अंबादास पवार👤 लक्ष्मण चिंतावार, धर्माबाद👤 शुभम सांगळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असलेल्या कलागुणांनामुळे उशीरा का होईना आपली ओळख होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण,त्याच कलेचा दुरूपयोग करून नको ती वाट निवडल्याने मात्र त्या असणाऱ्या कलेचा कुठेतरी अपमान होत असतो. त्याविषयी सहसा आपल्याला कळत नाही. म्हणून असं होण्याआधीच त्या सर्वांना आधी वाचणे गरजेचे आहे. अशी व्यर्थ चूक आपल्या हातून होणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा सून आणि मुलगा बेडरूम मध्ये बोलत असताना आईच लक्ष जातं, मुलगा - "आपल्या job मुळेआईकडे लक्ष देता नाही येणार गं,तिचं आजारपण आणि देखभालकोण करेल......?" त्यामुळे आपण वृद्धाश्रमात ठेवलं तर तिच्याकडे लक्ष सुद्धा देतील ते "त्यावर त्याच्या बायकोचे उत्तर ऎकून आईच्या डोळ्यात पाणी आले.........सून - "पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे ऒ, पण आईंची माया किती कमवली तरी कमी आहे, त्यांना पैश्यापेक्षा आपल्यासहवासाची गरज आहे, मी जर job नाही केला तरी जास्त नुकसान होणार नाही.मी आईंजवळ थांबेन. घरी tution घेईन, त्यामुळे आईं जवळही राहता येईल. विचार करा लहानपणी बाबा नसूनही घरकाम करून तुम्हाला आईने वाढवलंय. त्यांनी तेंह्वा कधी शेजारच्या बाईकडे सुद्धा तुम्हाला ठेवल नाही, कारण तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देणार नाहीत म्हणून, आणि तूम्ही आज हे असंबोलताय...? तूम्ही कितीही म्हणा पण आई आपल्या जवळच राहतील, अगदी शेवटपर्यंत " सुनेने दिलेल्या उत्तरामुळे आई खूप रडते आणि बाहेरच्या खोलीत येउन देवा जवळ उभी राहते . . .आई देवाऱ्यापुढे उभी राहून त्याचे आभार मानते आणि म्हणते," देवा मला मुलगी नव्हती म्हणूनखूप भांडली रे मी तुझ्याशी, पण ही भाग्यलक्ष्मी दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी.....?" खरच देवा सार्थक केलस माझ आयुष्य अशी सुन देऊन.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/9cWGZ4rVLAhzgEBu/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ.एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते 'लोकसंस्कृती'चे उपासक आणि संशोधक डॉ.रा.चिं.ढेरे यांना 'पुण्यभूषण पुरस्कार' पुण्यात देण्यात आला.**२००१:चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली**२००१:व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने ईडन गार्डन या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.**२०००:कलकत्ता येथील ’टेक्‍निशियन आय’ हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.**१९९५:महाराष्ट्राचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून भाजपा सेना युतीचे मनोहर जोशी यांचा शपथविधी**१९९०:आकाश या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण* *१९५४:दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.**१९३१:’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:रोहित शेट्टी-- यशस्वी भारतीय चित्रपट दिग्दर्शक* *१९७२:प्रा.डॉ.संगिता गणपतराव घुगे-- लेखिका**१९६५:आमिर खान _ भारतीय प्रसिद्ध अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक**१९६३:पंडित रघुनंदन पणशीकर-- जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक* *१९५८:संध्या रमेश पुजारी -- कवयित्री* *१९५४:पांडुरंग डोमाजी कांबळे -- लेखक,कवी* *१९५३:अरुण कृष्णाजी कांबळे-- मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक(मृत्यू:२० डिसेंबर २००९)**१९५१:सुनील चिंचोळकर --समर्थ रामदास स्वामी यांचे विचार लेखणी आणि प्रवचनांद्वारे जनमानसांपर्यंत पोहोचवणारे(मृत्यू:२२ एप्रिल २०१८)**१९४८:प्रा.अरुणकुमार भागवत पाटील-- कवी,लेखक* *१९४६:माधव मुरलीधर देशपांडे--संस्कृत व प्राकृत भाषातज्ज्ञ**१९४२:अरुण निगवेकर-- भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू,विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष(मृत्यू:२३ एप्रिल २०२१)**१९४०:चंद्रशेखर अर्जुन टिळेकर-- लेखक**१९३६:प्रभाकर गोविंद विद्यासागर-- लेखक* *१९३४:मीना सुधाकर देशपांडे-- आचार्य प्र.के.अत्रे यांच्या कन्या.प्रसिद्ध लेखिका(मृत्यू:६ सप्टेंबर २०२०)**१९३१:प्रभाकर पणशीकर –मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (मृत्यू:१३ जानेवारी २०११)**१९१५: रामचंद्र शेवडे-- बालसाहित्यिक (मृत्यू:२ डिसेंबर २००१)**१९१३:श्रीनाथ त्रिपाठी-- भारतीय संगीतकार(मृत्यू:२८ मार्च१९८८)**१९०८:गणपत खंडेराव पवार -- कादंबरीकार,पत्रकार* *१८७९:अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:१८ एप्रिल १९५५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:स्टीफन विल्यम हॉकिंग-- सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ(जन्म:८ जानेवारी १९४२)**२०१०:गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – सुप्रसिद्ध लेखक,कवी,लघुनिबंधकार व टीकाकार.देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्‍च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.(जन्म:२३ ऑगस्ट १९१८)**२००३:सुरेश भट-- सुप्रसिद्ध कवी,गझल सम्राट' (जन्म:१५ एप्रिल १९३२)**१९९८:दादा कोंडके – प्रसिद्ध अभिनेते,निर्माते,दिग्दर्शक,संवादलेखक (जन्म:८ ऑगस्ट १९३२)**१९९६:इंदुमती रामकृष्ण शेवडे--कथाकार, कादंबरीकार,प्रवासवर्णनकार,संशोधक, समीक्षक(जन्म:१६ ऑक्टोबर १९१७)**१९३२:जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (जन्म:१२ जुलै १८५४)**१८८३:कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (जन्म:५ मे १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन गाणे - आनंदी तराणे*चित्रपटातील गाणे असो वा इतर कोणतेही गाणे कुणाला आवडत नाहीत. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणे खूप आवडतात. मुळात मनुष्य लहानाचा मोठा होता ते गाणे ऐकतच. गाण्याचा आणि माणसाच्या आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. बाळाला छान झोप लागावी म्हणून आई छानशी अंगाई गीत गात असते जसे की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भाजपची दुसरी यादी जाहीर:महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश; बीडमधून पंकजा मुंडे, नागपूरमधून गडकरी तर नांदेडमधून चिखलीकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे भूमीपूजन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *येवल्यातील शेतकऱ्यांना दिलासा, 63 हजार शेतकऱ्यांना 63 कोटींची दुष्काळी मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत १८७ इंटरसेप्टरचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची सभा नागपूरमध्ये येत्या 15 ते 17 मार्च दरम्यान होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हरमित सिंग ठरला 'महाराष्ट्र श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी तर उमेश गुप्ता ठरला उपविजेता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उष्माघात म्हणजे काय ?* ☀ भारतामध्ये काही भागात तापमान ४९ सेल्सियस इतके जास्त असू शकते. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी अनेक लोक उष्माघाताने वा या उच्च तापमानामुळे मरण पावतात. राजस्थान, ओरिसा तसेच महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातही उष्माघाताने मृत्यू होतात. उष्माघात याचा सोपा अर्थ उष्णतेचा आघात वा त्रास असा होतो. यात खूप ताप येणे, घाम न येणे, चक्कर येणे, लघवी न होणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात. प्रसंगी मृत्यूही होतो. अति उष्णतेने शरीरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतात व पेशीमधील जीवनप्रक्रिया थांबते. शरीरातील सर्व पेशींमध्ये असेच होते व बहुतेक वेळा मेंदू सूज होऊन व्यक्ती मरते. आधी रुग्णास चक्कर येते, झटके येतात व दम लागतो. कधी कधी हृदयविकाराचा झटकाही येतो.उष्माघातावर तात्काळ उपचार करणे आवश्यक ठरते. रुग्णाला सावलीत नेऊन त्याच्या अंगावर ओली चादर टाकावी व त्याला वारा घालावा. थंडगार पाण्यात त्याला उभे केले तर फारच चांगले. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्याचे हातपाय चोळावेत. त्याला क्षार व पाणी द्यावे. (लिंबू सरबत वैगरे पदार्थ) असे उपचार लवकर सुरू झाल्यास व्यक्ती बचावते. अन्यथा मृत्यू येण्याची शक्यता खूप जास्त असते. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जास्त वेळ फिरू नये, फिरायचे असल्यास डोक्यावर टोपी घालावी व पांढरे फडके बांधावे, थंडगार पाणी वारंवार प्यावे, वारंवार तोंड गार पाण्याने धुवावे. असे केल्याने उष्माघाताची शक्यता कमी करता येईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिरा मिळतात... फक्त आपल्यात सहनशीलता पाहिजे.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये *'कल्चरल अम्बेसिडर ऑफ दि अवॉर्ड'* कोणाला मिळाला आहे ?२) ऑस्कर २०२४ च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?३) मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे ?४) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?५) तापी नदीचा उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ? *उत्तरे :-* १) मैथिली ठाकूर २) ओपेनहायमर ३) दुसऱ्या ४) बुध व शुक्र ५) मुलताई, बैतूल जिल्हा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संजय भोसले, नांदेड👤 डॉ. प्रशांत मुदकोंडवार, नांदेड👤 किरण सोनटक्के👤 उत्तम सोनकांबळे👤 पार्थ पवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून हिंमतीने जगत असते तिला कशाचीही भीती वाटत नाही व कोणासमोरही न घाबरता परखडपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते. कारण त्या परिस्थितीत असताना सुद्धा तिला जे, अनुभव आलेले असतात तेच अनुभव आधार बनून मार्गदर्शन करत असतात म्हणूनच म्हणतात ना की, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आपणही त्या गुरूचे सदैव स्मरण करावे व पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करावे कारण जीवन हे अनमोल आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निश्चय*एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.त्याने राजाला असा सल्ला दिला, ”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….!🚀•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/ng6uEjq2Rr24Kx52/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.**१९९९:जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्‍या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन**१९९७:मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ’मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.**१९६३:असामान्य क्रीडा नैपुण्यासाठी अर्जुन अवार्ड देणे सुरू* *१९४०:अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.**१९३०:क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.**१९१०:पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.**१७८१:विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:अनुषा रिझवी-- चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७४:नितीन राजेंद्र देशमुख-- प्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक**१९६८:श्रीकांत पांडुरंग चौगुले-- प्रसिद्ध लेखक**१९५८:अश्विनी अनिल कुलकर्णी-- लेखिका* *१९५७:ऋतुजा चैतन्य माने -- कवयित्री, लेखिका* *१९५६:लोकनाथ यशवंत-- मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी, व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले लेखक**१९५१:यशोधरा पोतदार-साठे-- मराठी कवयित्री* *१९४६:जनार्दन कृष्णाजी पाटील (मगर)-- लेखक,समाजकार्य**१९४६:शकुंतला गंगाधर सोनार -- कवयित्री, लेखिका* *१९४६:अभिलाष-- सुप्रसिद्ध गीतकार 'इतनी शक्ति हमें देना दाता' (मृत्यू:२७ सप्टेंबर २०२०)**१९४६:श्रीराम विनायक साठे--ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक(मृत्यू:२५ सप्टेंबर २०२३)**१९४३:प्रा.वामन सुदामा निंबाळकर--कवी विचारवंत व लेखक (मृत्यू:३ डिसेंबर २०१०)**१९४०:प्रा.डॉ.हेमा साने -- लेखिका* *१९३६:डॉ.वनमाला पानसे -- कवयित्री, लेखिका* *१९३३:सुलोचना चव्हाण --- मराठी गायिका, लेखिका (मृत्यू:१० डिसेंबर २०२२)**१९२६:रविन्द्र पिंगे –ललित लेखक (मृत्यू:१७ आक्टोबर २००८)**१९२६:लीला भालचंद्र गोळे-- संतांवर परिचयात्मक पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका**१९०१:केशव बाबूराव लेले -- मूर्तिकार,हलत्या चित्रांचे प्रदर्शनकार व कलाप्रसार.(मृत्यू:५ जानेवारी १९४५)**१८९३:डॉ.वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय,संस्कृत विद्वान,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू:३ एप्रिल १९८५)**१८८१:दत्तात्रय विष्णू आपटे--इतिहास संशोधक,संपादक(मृत्यू:२७ ऑक्टोबर १९४३)**१७३३:जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (मृत्यू:६ फेब्रुवारी १८०४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:प्रा.मालतीबाई किर्लोस्कर-- प्रसिद्ध लेखिका (जन्म:१९२३)**२००४:उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (जन्म:२८ ऑगस्ट १९२८)**१९९६:शफी इनामदार –अभिनेते व नाट्यनिर्माते (जन्म:२३ आक्टोबर १९४५)**१९९३:डॉ.मधुकर(मधू) शंकर आपटे--ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपट अभिनेते (जन्म:१ मार्च १९१९)**१९९४:श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व 'सिटू' या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते**१९६७:सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू (जन्म:१ऑगस्ट १९२४)**१९५९:गंगाधर भाऊराव निरंतर-- कादंबरीकार,ललित लेखक(जन्म:१५ जून १९०६)**१९५५:वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (जन्म:२३ जून १९०६)**१९०१:बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२० ऑगस्ट १८३३)**१८९९:दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’--अर्वाचीन मराठी कवी(जन्म:२७ जून १८७५)**१८००:बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' (जन्म:१२ फेब्रुवारी १७४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••* जिल्हा परिषद शाळा कात टाकतंय ...... *जिल्‍हा परिषदेच्‍या सरकारी शाळा म्‍हटले की, प्रत्‍येकांच्‍या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्‍या चित्रात त्‍या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्‍याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्‍येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्‍हणून यास गरिबांची शाळा असे सुध्‍दा संबोधले जाते............ ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंढरपुरातील विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन दीड महिन्यांसाठी बंद, गाभाऱ्याच्या कामासाठी विठुरायाची मूर्ती अनब्रेकेबल पेटीत ठेवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत राहुल गांधींची गर्जना, सत्तेत आल्यास जातीय जनगणनेची हमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा, भाजप-जननायक जनता पार्टी युती तुटली, भाजपचे नायब सिंग सैनी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीत शिंदेंची मोठी डील; मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपच्या पारड्यात पडल्याची चर्चा, सेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरांचा पत्ता कट होण्याची चिन्हं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *करीरोडचं नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोडचं डोंगरी, कॉटन ग्रीनचं काळाचौकी; मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रणजी फायनलवर मुंबईची पकड घट्ट, मुशीरचं शतक, रहाणे-अय्यरची अर्धशतकं, विदर्भापुढे 538 धावांचे आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उन्हात काम करणारा माणूस का काळवंडतो ?* ☀उन्हात काम करणारा माणूस, तसेच भारतासारख्या उष्ण कटिबंधातील व्यक्ती सामान्यतः सावळी वा काळी असते. मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य आपल्या त्वचेत असते आणि ते व्यक्तीस सावळा, काळा, गोरा इत्यादी रंग देते. या रंगद्रव्याचे प्रमाण कमी असल्यास व्यक्ती गोरी असते. हे प्रमाण अधिक असल्यास व्यक्ती सावळी वा काळी होते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेस हानिकारक असतात. त्यामुळे या किरणांपासून संरक्षण त्वचेतील रंगद्रव्य करत असते.उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी मेलॅनिन हे रंगद्रव्य वाढावयास लागते. वाढलेल्या या मेलॅनिनमुळे ती व्यक्ती पूर्वीपेक्षा काळवंडलेली दिसते आणि उन्हात वावरणे कमी झाल्यावर रंग पूर्ववत होतो.युरोप, ऑस्ट्रेलियासारख्या शीत कटिबंधातील व्यक्तींमध्ये मेलॅनिन रंगद्रव्य अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यांच्यामध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. अतिनील किरणांचा प्रभाव टाळण्यासाठी म्हणूनच क्रिकेटपटू उन्हात खेळताना चेहऱ्याला संरक्षक मलम लावतात. भारत, श्रीलंका अशा उष्ण कटिबंधातील देशांमध्ये खेळायला येणारे गोरे खेळाडू अशी मलमे लावून (तोंडावर रंगरंगोटी करून !) खेळताना तुम्ही दूरदर्शनवर नक्कीच बघितले असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तरम्हणजे शांत राहणे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *"मेरा जीवन ही मेरा संदेश है"* असे कोणी म्हटले होते ?२) गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो ?३) भारताचे दुसरे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?४) वाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते ?५) पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे ? *उत्तरे :-* १) महात्मा गांधी २) तलाठी ३) अजय खानविलकर ४) गतिज ऊर्जा ५) केरळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भगवान कांबळे, नांदेडभूषण पत्रकार👤 डॉ. बालाजी खानापुरे, नांदेड👤 शेख रुस्तम, जि. प. नांदेड👤 सुरेश बोईनवाड👤 कामाजी धुतुरे👤 लक्ष्मण वडजे👤 साईनाथ बोमले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्‍ती लिन झाली ॥१॥लीन झाली वृत्‍ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥लवण जैसे पुन्‍हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्‍यातुनिया ॥३॥त्‍या सारिखे तुम्‍ही जाणा साधुवृत्‍ती । पुन्‍हा न मिळती मायाजाळी ॥४॥मायाजाळ त्‍यांना पुन्‍हा रे बाधेना । सत्‍य सत्‍य जाणा तुका म्हणे ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मी म्हणजेच सर्वकाही, मला सर्व येते, मला सर्वच काही जमते, माझ्याकडे कशाचीही कमी नाही, मी कोणाच्यामागे धावणार नाही, मी सर्वात श्रेष्ठ व गुणवान आहे, हा अहंभाव जेव्हा, आपल्या अंगी शिरते त्यावेळी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप, आपल्याला मिळतील. कुठेही शोधाशोध करण्यासाठी जावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिंपले* एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे. तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे. तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते. हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.इतक्यात तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "काका, किती किंमत आहे या बाहुलीची?" दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने विचारतो "बोल तू काय देशील?" मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले,जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?" दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत. ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो. मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता. त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?" दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, "आपल्यासाठी हे केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हे शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.हीगोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल." *तात्पर्य* -- " पेरावे तसे उगवते." म्हणून केवळ पैशांच्या मागे न लागता, असे काहीतरी चांगले काम करा, जे पुढच्या पिढयांना चांगले काम करण्याची प्रेरणा देईल, सकारात्मक दृष्टीकोन देईल.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 मार्च 20234💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला**१९९९:सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला**१९९९:चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.**१९९३:मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी**१९९२:स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.**१९८६:केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शंकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली**१९६८:मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला**१९५४:साहित्य अकादमीची स्थापना**१९३०:ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली**१९१८:रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.**१९१२:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:श्रेया घोषाल-- हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिका**१९८२:मनोज कुलकर्णी -- लेखक* *१९८१:अनधा विनय तांबोळी-- कवयित्री, लेखिका**१९७३:राम पांडुरंग गायकवाड-- कवी* *१९६९:प्रा.कल्याण पांडुरंग राऊत-- कवी* *१९६९:फाल्गुनी पाठक--भारतीय गायिका आणि संगीतकार**१९६१:डॉ.मालिनी अनिल अंबाडेकर -- कवयित्री* *१९५६:चंदन दास-- लोकप्रिय भारतीय गझल गायक**१९४३:डॉ.अविनाश बिनीवाले-- भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक* *१९४१:प्रा.जवाहर प्रेमराज मुथा-- ज्येष्ठ कवी,प्रसिद्ध लेखक,संपादक**१९४०:डॉ.श्रीकांत वामन चोरघडे -- बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ, लेखक,संपादक**१९३३:कविता विश्वनाथ नरवणे-- जेष्ठ मराठी लेखिका (मृत्यू २८ आगस्त २०२०)*१९२६:सुमन पुरुषोत्तम बेहरे-- लेखिका**१९२३:गजानन रामचंद्र कामत-- मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक (मृत्यु:६ऑक्टोबर २०१५)**१९१५:डॉ.अ.ना.देशपांडे(अच्चुत नारायण देशपांडे)-- मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सिद्धहस्त लेखक वाङ्मयेतिहासकार(मृत्यू:१४ आक्टोबर १९९०)**१९१३:यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान,संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू:२५ नोव्हेंबर १९८४)**१९११:दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती (जन्म:१२ ऑगस्ट १९७३)**१९०४:जगन्नाथ जनार्दन पुरोहित-- महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत व नामवंत यशस्वी गायक व संगीताचार्य.(मृत्यू:२० ऑक्टोबर१९६८)* *१८९१:’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (मृत्यू:२३ नोव्हेंबर १९५९)**१८२४:गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१७ आक्टोबर १८८७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:प्रा.मधुकर शंकर वाबगावकर (म.श.)-- लेखक,समीक्षक (जन्म:३ नोव्हेंबर १९३३)**२००१:रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म:२५ मे १९२७)**१९९९:यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म:२२ एप्रिल १९१६)**१९६०:विठ्ठल वामन हडप-- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार(जन्म:१८ नोव्हेंबर १८९९)**१९५९:जनार्दन सखाराम करंदीकर--संपादक (जन्म:१५ फेब्रुवारी १८७५)**१९४२:रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म:२३ सप्टेंबर १८६१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानतून आलेल्या  हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील नागरिकांना भारताचं नागरीत्व मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक, मुंबईत थीम पार्क उभारणार ; महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेटमध्ये 19 धडाकेबाज निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला दणका, निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे आदेश, निवडणूक आयोगालाही डेडलाईन, येत्या 15 मार्चला लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश:17 तारखेला शिवाजी पार्कवर लोकसभा प्रचाराचा नारळ फोडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऑस्कर 2024 :- सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटीलच्या हाती मशाल, 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, सांगली लोकसभेतून उमेदवारी जवळपास निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियानं इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👨‍👩‍👦‍👦 *मुले जुळी का होतात ?* 👨‍👩‍👧‍👧 ***************************राम-श्याम, सीता और गीता असे बरेच जुळ्यांवरचे सिनेमे आपण बघतो. त्यात उडणारा गोंधळ प्रत्यक्षातही आपण अनुभवला असेल. जुळ्या बहिणी, भावांमधील फरक आपल्याला ओळखू आला नसेल किंवा असेही झाले असेल की जुळे तर आहेत, पण दिसायला एकदम वेगळे आहेत किंवा जुळ्यातील एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ही अशी जुळी का बरे होत असतील. एरवी एकच मूल जन्माला येत असते.जुळ्यांचे आपण वर जे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याची भिन्नभिन्न कारणे आहेत. स्त्रीबीजाचे शुक्राणूकडून फलन झाल्यानंतर त्याचे दोन भाग, दोनाचे चार असे वाढून पेशींचा गोळा तयार होऊन एक गर्भ तयार होतो; परंतु काही वेळेस प्रथम फलन झाल्यावर स्त्रीबीजाचे जे दोन भाग होतात, ते वेगळे वेगळेच वाढायला लागून दोन गर्भ तयार होतात. असे जे जुळे असते ते दिसावयास अगदी सारखे असते आणि त्यांचे लिंगही एकच असते. म्हणजे दोन्ही मुली किंवा दोन्ही मुले. दुसऱ्या प्रकारात दोन वेगळे स्त्रीबीज दोन वेगवेगळ्या शुक्राणू फलित होऊन दोन गर्भ तयार होतात. हे जुळे मग समान लिंगाचे असू शकते किंवा भिन्न लिंगाचे. एक मुलगा व एक मुलगी अशा जोड्या तयार होतात. अशी जुळी दोन वेगळ्या स्त्रीबीजाकडून तयार झाल्याने दिसावयास सारखी नसतात. असे हे जुळ्यांचे दुखणे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही, ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *घूमर लोकनृत्य* कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?२) भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत ?३) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते ?४) देशातील पाण्याखाली सर्वात खोल बांधलेले मेट्रो स्टेशन कोणते ?५) जगामध्ये सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये कुटुंब न्यायालय अस्तित्वात आले ? *उत्तरे :-* १) राजस्थान २) ८० रामसर स्थळे ३) लोकसंख्या ४) हावडा मेट्रो रेल्वे स्टेशन ५) अमेरिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मधुकर काठेवाडे, शिक्षक, नायगाव👤 शिवराम पेंडकर, येवती👤 माधव पाटील दिग्रसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गेली त्‍याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्‍याचि स्थिती सांगतो मी ॥२॥सांगतो मी तुम्‍हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥जगात पिशाश्‍च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्‍न तो ॥४॥निमग्‍न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥वेगळाले भेद किर्ती त्‍या असती । ह्र्यदगत त्‍याची गति न कळे कवणाला ॥६॥न कळे कवणाला त्‍याचे हेचि वर्म । योगी जाणे वर्म खुण त्‍याची ॥७॥खुण त्‍याची जाणे जे तैसे असती । तुका म्‍हणे भ्रांती दुजीयाला ॥८॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्यात खरी माणुसकी व, विरता असते ती व्यक्ती, कधीही कोणाशी वैरता करत नाही आणि वैरता निर्माण करण्यासाठी मुळात कोणालाही साथ देत नाही. कारण, वैरताची आपल्यात भावना ठेवल्याने व साथ देल्याने त्याचे होणारे परिणाम कसे असतात त्याविषयी त्याला भक्कम अनुभव असतो. म्हणून आपणही अशाच प्रामाणिक, नि:स्वार्थी व माणुसकी असलेल्या व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असत्य जेव्हा पुनःपुन्हा कानी पडते, तेव्हा ते सत्य भासू लागते.=====================एका गावात 'मित्रशर्मा' नावाचा एक अग्निहोत्री ब्राह्मण राहात होता. एकदा यज्ञात 'बळी' देण्यासाठी त्याने बाहेरगावच्या एका ओळखीच्या माणसाकडून एक गलेलठ्ठ बोकड तसाच मिळविला व त्याला खांद्यावर घेऊन तो आपल्या गावाच्या रस्त्याला लागला.तो बोकड तीन भामट्यांच्या दृष्टीस पडला व त्यांनी त्या ब्राह्मणाला फसवून, त्या बोकडाला पळवून नेण्याचा आपपसांत बेत आखला. त्याप्रमाणे ते तिघे तो ब्राह्मण जाणार असलेल्या वाटेवर - त्याला दाद लागून न देता - थोडथोड्या अंतरावर उभे राहिले.खांद्यावर बोकड घेतलेला ब्राह्मण जरा पुढे जाताच वाटेत भेटलेला पहिला भामटा त्याला म्हणाला, 'काय भटजीबुवा, कुत्रा खांद्यावर घेऊन कुठे चाललात? अहो, याला असेच घेऊन गेलात तर तुमचे गावकरी तुम्हाला वेड्यात काढतील.''हा कुत्रा नसून बोकड आहे,' असे उत्तर त्या ब्राह्मणाने देताच तो भामटा त्याला म्हणाला, 'भटजी, कुणाला चांगलं सांगण्याची सोय नाही हेच खरं. तुम्हाला तो कुत्रा बोकड वाटतोय ना? मग वाटल्यास त्याला घरी नेऊन यज्ञात बळी द्या. मग तर झालं? माझं काय जातंय? तुमचं पाप तुम्हाला.'त्या भामट्याच्या या बोलण्याचा विचार करीत तो ब्राह्मण जरा पुढे जातो न जातो तोच, वाटेत भेटलेला दुसरा भामटा म्हणाला, 'काय हो शास्त्रीबुवा, तुम्हाला वेडबीड तर नाही ना लागलं? गायीचं मेलेलं वासरू खांद्यावर घेऊन कुठे चाललात? टाकून द्या त्याला इथंच आणि घरी जाताच गोमूत्र मिसळलेल्या पाण्यानं स्नान करून शुद्ध व्हा.'तो ब्राह्मण भांबावलेल्या मनःस्थितीत आणखी जरा पुढे जाताच तिसऱ्या भामट्याने विचारले, 'एका गाढवाच्या पोराला खांद्यावर घेऊन जाणे पंडितजी तुम्हाला शोभते का?'हे शब्द ऐकून मात्र तो ब्राह्मण मनी चरकून स्वतःशीच म्हणाला, 'ज्या अर्थी वाटेत भेटलेल्या एकाला हा माझा बोकड कुत्रा दिसला, दुसऱ्याला गाईचे मेलेले वासरू दिसले तर तिसऱ्याला गाढवाचे पिलू भासले, त्या अर्थी हा बोकड म्हणजे क्षणोक्षणी रूपे बदलणारा मायावी राक्षस असावा. तेव्हा याला घरी नेण्यात काय अर्थ? मनात असे म्हणून, त्याने त्या बोकडाला तिथेच सोडून दिले आणि तो आपल्या गावी परत गेला.तो ब्राह्मण जरा दूर जाताच त्या तीन भामट्यांनी त्या बोकडाला पळवून नेले.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://googlyan.blogspot.com/2018/08/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.**२००१:बॅडमिंटनपटू पी.गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.**२००१:कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला.त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली**१९९३:उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते 'सरस्वती सन्मान' पुरस्कार प्रदान.**१८८९:पंडिता रमाबाईंनी मुंबईत "शारदा सदन" ही विधवांसाठी व कुमारीकांसाठी शाळा सुरू केली**१८८६:अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठातून डॉक्टर होणारी पहिली भारतीय महिला आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना पदवी प्रदान**१८१८:इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:शुभांगी सदावर्ते-- अभिनेत्री* *१९८५:अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज**१९८१:भावना कुलकर्णी-भालेराव-- बालकथाकार,कवियित्री**१९७७:वृषाली हरीश कुलकर्णी -- कवयित्री,कथालेखिका* *१९६६:मोहित चौहान--भारतीय गायक**१९६०:रमेश चिल्ले -- कवी,लेखक* *१९५८:पुरुषोत्तम गं.निकते -- कवी* *१९५४:विनोद दुआ-- भारतातील हिंदी टेलिव्हिजन पत्रकार आणि कार्यक्रम संचालक(मृत्यू:४ डिसेंबर २०२१)**१९५२:प्रा.डॉ.विश्वास किसन पाटील-- लेखक**१९४९:डॉ.लिना विलास मोहाडीकर -- लेखिका* *१९४५:डॉ अनधा केसकर-- कादंबरीकार,कथाकार**१९४०:दया डोंगरे-- ज्येष्ठ अभिनेत्री* *१९३८:प्रा.डॉ सुनंदा देशपांडे--लेखिका, समीक्षक* *१९२९:मालती मोरेश्वर निमखेडकर-- कवयित्री,कथाकार (मृत्यू:२०१६)**१९२२:सरोज अहंकारी-- बालसाहित्यिक कवयित्री लेखिका**१९१७:धोंडो विठ्ठल देशपांडे-- लेखक, समीक्षक (मृत्यू:१९ जुलै १९९३)* *१९१६:हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:२४ मे १९९५)**१९१५:विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू:१८ डिसेंबर २००४)**१९१२:शंकर गोविंद साठे-- मराठीतले कवी, कथालेखक आणि नाटककार(मृत्यू:२४ डिसेंबर २०००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ब्रिज मोहन व्यास-- बॉलीवूडचा एक भारतीय अभिनेता(जन्म:२२ ऑक्टोबर, १९२०)**२००६:स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म:२०ऑगस्ट १९४१)**१९९३:शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते(जन्म:२५ एप्रिल १९१८)**१९८०:अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे--सर्वोदयी नेते व विचारवंत(जन्म:७ ऑक्टोबर १८९७)**१९७९:यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर-- नवाकाळचे दुसरे संपादक(जन्म:१५ जानेवारी १९०५)**१९७०:अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म:१७ जुलै १८८९)**१९६५:गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (जन्म:१२ डिसेंबर १८९२)**१९५५:अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म:६ ऑगस्ट १८८१)**१९४३:ॲड.यादव माधव उपाख्य अण्णासाहेब काळे-- विदर्भाच्या इतिहासाचाआद्याचार्य (जन्म:१८ फेब्रुवारी १८८२)**१६८९:छत्रपती संभाजी महाराज (जन्म:१४ मे १६५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुज आहे तुजपाशी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे:PM मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न; धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न- अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आचारसंहिता लागण्यापूर्वी जीआरचा धडाका! दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा; आगामी लोकसभा निवडणुकांची धुरा आता एकट्या राजीव कुमार यांच्या खांद्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट; बंगालसाठी ममतादीदींच्या तृणमूलची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंकडूनही उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय धनगर समाज अधिवेशनात एकमताने ठराव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीसीसीआयने टेस्ट क्रिकेटर्सची सॅलरी वाढवली; 75 टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी मिळतील सुमारे 45 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे असच कां म्हणतात?*अहो मग भिडू कशा साठी आहे? आम्ही सांगायलाच बसलोय.गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीच प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेच साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीच वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं होतं.हे दुध जवळच मोठ शहर म्हणून सातारला पाठवून दिल जायचं.काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीच आपल्या सातारकरांनी कंदी केलं.साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखल जाऊ लागल.कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.त्यांनी सत्तरवर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो.म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूरराम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखल जात.महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथल्या पेढ्यांमधेय सातारच्या माणसांचा स्वॅग मिक्स झालाय.या सगळ्या मुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिथे एकमेकांची प्रगती साधली जाते तीच खरी मैत्री असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?२) रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे ?३) घटक राज्यांमधील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आणीबाणी लागू केले जाते ?४) कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?५) भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची आहे ? *उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) रॉसकॉसमॉस ३) राष्ट्रपती राजवट ४) तामिळनाडू ५) पाचव्या *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भाऊसाहेब उमाटे, इतिहास संशोधक, लातूर👤श्री प्रलोभ माधवराव कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जि. प. हा. वाघी जि. नांदेड.👤 विजय नागलवार, अभियंता, पुणे👤 सूर्यकांत सोनकांबळे👤 रमेश कवडेकर👤 संदीप दुगाडे👤 संतोष देवणीकर, शिक्षक, देगलूर👤 Tr. जब्बार मुलानी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्‍यास साक्षात्‍कार ॥३॥साक्षात्‍कार झालिया सहज समाधि । तुका म्‍हणे उपाधी गेली त्‍याची ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेक माणसं भेटत असतात. त्यातील सर्वजण एक सारखे विचाराचे असतील असेही नाही. सोबत ते आपल्याला समजून घेतीलच असेही नाही. त्यातील काही माणसं मार्गदर्शक, दिशादर्शक असतात तर काहीजण व्यावसायिक,‌ चालाख व अति स्वार्थी व्यापारी असतात म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः  'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/nRt3vVh2JcfZL3rQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९२:कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के.के.बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला 'सरस्वती पुरस्कार'उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला**१९९१:युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने**१९५९:’बार्बी’या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.**१९५२:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते पुण्यातील पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन**१९४५:अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:दर्शील सफारी--- भारतीय अभिनेता, "तारे जमीन पर" मधील भूमिकेमुळे लोकप्रिय* *१९८८:अश्विनी रोशन दुरगकर-- लेखिका**१९८५:पार्थिव अजय पटेल-- माजी भारतीय क्रिकेटपटू यष्टिरक्षक-फलंदाज**१९८१:डॉ.अदिती टपळे-काळमेख -- कवयित्री* *१९७८:कमलेश विनायक गोसावी -- कवी, लेखक* *१९६२:प्रा.शिवाजी तुकाराम वाठोरे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६०:प्रा.रमेश गंगारामजी वाघमारे-- कवी, लेखक**१९५६:शशी थरूर – माजी केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ**१९५१:उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक**१९५०:विजय रघुवीर उर्फ जादूगार रघुवीर ज्युनियर-- ज्येष्ठ जादूगार**१९४५:गणपती रामदास वडपल्लीवार-- नाट्यलेखक* *१९४३:रॉबर्ट जेम्स ऊर्फ ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (मृत्यू:१७ जानेवारी २००८)**१९४३:अ.शि.रंगारी-- कादंबरीकार* *१९३५:डॉ.पांडुरंग हरी कुलकर्णी-- संशोधक,लेखक* *१९३४:युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (मृत्यू:२७ मार्च १९६८)**१९३३:भिका शिवा शिंदे उर्फ आबा-- प्रसिद्ध नाटककार,साहित्यिक(मृत्यू:१० सप्टेंबर २००९)**१९३१:डॉ.करणसिंग-- माजी केंद्रीय मंत्री**१९३१:सदाशिव बाळकृष्ण क-हाडे-- समीक्षक,कादंबरीकार**१९३०:डॉ.युसुफखान महंमदखान(यू.म.) पठाण-- मराठी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार* *१८९९:’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर (मृत्यू:२६ नोव्हेंबर १९८५)**१८९४:शंकर पुरुषोत्तम जोशी-- मराठी इतिहास संशोधक(मृत्यू:२० सप्टेंबर १९४३)**१८६३:लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (मृत्यू:१३ फेब्रुवारी १९०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:पतंगराव कदम-- माजी मंत्री, राजकारणी,भारती विद्यापीठाची स्थापना १९६८(जन्म:८जानेवारी १९४४)**२०१७:वि.भा.देशपांडे, अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे--पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी, नाट्यसमीक्षक (जन्म:३१ मे १९३८)**२०१२:जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)**२०००:उषा मराठे - खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (जन्म: २२ एप्रिल १९२९)**१९९६:अख्तर उल इमान-- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात उर्दू कवी आणि पटकथा लेखक(जन्म:१२ नोव्हेंबर १९१५)* *१९९४:देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित (जन्म:३० मार्च १९०८)**१९९२:मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१६ ऑगस्ट १९१३)**१९७१:के.असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक (जन्म:१४ जून १९२२)**१९६९:सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ’होमी’ मोदी – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू (जन्म:२३ सप्टेंबर १८८१)**१८८८:विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (जन्म:२२ मार्च १७९७)**१८५१:हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१४ ऑगस्ट १७७७)**१६५०:संत तुकाराम यांचा वैकुंठवास (जन्म: १५७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लघुकथा - टास्कशाळेतील मुलांना काही आव्हान दिल्यावर ते कशा पद्धतीने पूर्ण करतात. दिलेले आव्हान पूर्ण करतांना त्यांच्या मनाची तयारी व संस्कार कसे होतात ही सांगणारी लघुकथा ..... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रोहित पवारांच्या बारामती अँग्रोनं खरेदी केलेला कन्नड साखर कारखाना ईडीकडून जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची मोठी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून  इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान मोदींची ट्वीट करुन माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात आता थंडी हळूहळू गायब होत चालली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येणाऱ्या दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा, असे निर्देश दिले आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भाजप नेतृत्त्वाकडून राज्यातील भाजप खासदारांच्या कामांचा सर्व्हे, स्ट्राईक रेट समाधानकारक नसलेल्या डझनभर खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी, शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईने सजली होती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरोधातील पाचव्या कसोटीत टीम इंडिया भक्कम स्थितीत, रोहित- गिलचा शतकी तडाखा, देवदत्त पडिक्कल पर्दापणात चमकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विद्याधर गंगाधर पुंडलिक*मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचा शेवट सुख आणि समाधानाच्या मार्गाने जातो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *स्टॅच्यू ऑफ नॉलेज* हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे ?२) देशातील पहिल्या एआय ( AI ) शिक्षिकेचे नाव काय आहे ?३) नविन शैक्षणिक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?४) कोणता देश हा भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे ?५) जगातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) लातूर २) इरीस ( तिरुवनंतपुरम येथील शाळेत ) ३) हिमाचल प्रदेश ४) मॉरिशस ५) नोबेल पुरस्कार *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शिवा वसमतकर, वसमत👤 शिवाजी साखरे👤 अरविंद फुलसिंग आडे👤 सतीश उशलवार👤 गजानन शिंदे पाटील👤 योगेश कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भूती जीन व्‍हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥शांती करा तुम्‍ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥असो हे साधन ज्‍यांचे चित्‍ती वसे । मायाजाळ नासे तुका म्‍हणे ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाढ चिखलात असताना सुद्धा अफाट संघर्ष करून जे वरती येऊन फुलत असतात त्यांचा सुंगध जिकडे, तिकडे कायमस्वरूपी दरवळत असतो. व जे, दुसऱ्यांना चिखलात ढकलून, फुलत यशस्वी होतात त्यांचा सुंगध मात्र स्वतः पुरते मर्यादित असते. सुंगध नाव एकसारखे आहे मात्र त्यात खूप फरक आहे. म्हणून खऱ्या अर्थाने फुलायचे असेल तर इतरांना आधार देऊन फुलावे दुसऱ्यांना चिखलात गाडून फुलल्याने, त्या नाजूक फुलांचा अपमान होतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हे क्षण ही निघून जातील*एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट  प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,"This too shall pass "म्हणजे"हाही क्षण निघून जाईल"केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.  विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले," महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."This too shall pass !हे क्षणही निघून जातील.ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/world-womens-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक गणित दिवस_**_ या वर्षातील ६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.**२००६:लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.**२००५:महिलांना मताधिकार मिळावा म्हणून कुवेत मध्ये संसदेसमोर प्रदर्शन* *१९४७:जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस कार्यकरणीचा राजीनामा दिला**१९३६:दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले**१८७६:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:रोहन बेनोडेकर -- लेखक* *१९८८:आदर्श आनंद शिंदे-- मराठी गायक, भीमगीतांसाठी प्रसिद्ध* *१९८४:नितीन अरुण थोरात-- प्रसिद्ध कादंबरीकार,बालसाहित्यिक,स्तंभलेखक,पत्रकार,उपसंपादक,कथालेखक* *१९७६:गणेश शिवाजी मरकड -- प्रसिद्ध कवी,लेखक तथा उपजिल्हाधिकारी* *१९६९:साधना सरगम किंवा साधना घाणेकर-- भारतीय प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९६४:छाया भालचंद्र उंब्रजकर-- कवयित्री,लेखिका* *१९५८:अनिल शर्मा-- प्रसिद्ध दिग्दर्शक**१९५५:अनुपम खेर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९५५:ज्योत्स्ना आफळे --कवयित्री,लेखिका* *१९५२:सर विवियन रिचर्ड्‌स–वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४९:गुलाम नबी आझाद-- राजकारणी माजी केंद्रीय मंत्री* *१९४२:वसंत काशिनाथ गोडबोले -- संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक,हस्ताक्षरतज्ञ* *१९४०:प्रा.वसंत सुदाम वाघमारे-- कवी* *१९३८:मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे-- दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (मृत्यू:६ आगस्ट २०२०)* *१९३४:नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक**१९३३:आत्माराम कृष्णाजी सावंत-- मराठीतले लेखक,नट,नाटककार,दिग्दर्शक, पत्रकार(मृत्यू:४ मार्च१९९६)* *१९३१:प्राचार्य डॉ.मधुकर सुदाम पाटील-- समीक्षक* *१९२८:डॉ.केशव रामराव जोशी-- संस्कृत पंडित,तत्त्वचिंतक (मृत्यू:१२ जून २०१३)**१९२५:रवींद्र केळेकर-- कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक,२००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(मृत्यू:२७ ऑगस्ट, २०१०)**१९१८:स्नेहलता दसनूरकर-- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू:३ जुलै २००३)**१९१३:डॉ.सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे-- व्यवसायाने डॉक्टर असतानाही,मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या लेखिका(मृत्यू:८ ऑगस्ट १९९८)**१९११:सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू:४ एप्रिल १९८७)**१९०३:रामचंद्रशास्त्री दत्तात्रेय किंजवडेकर-- संस्कृत पंडित (मृत्यू:२० एप्रिल १९४१)**१९०२:शंकर भास्कर जोंधळेकर-- लेखक* *१८९६:यशवंत गंगाधर लेले-- नाटककार, नाट्यसमीक्षक**१८७०:नारायण कृष्ण गद्रे-- मराठी लेखक आणि चरित्रकार ह्यांनी नाटक,कविता, कादंबरी,चरित्र,इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे(मृत्यू:१४ जुलै १९३३)**१८४९:ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू:११ एप्रिल १९२६)**१७९२:सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू:११ मे १८७१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म:३ मार्च १९२६)**२०००:प्रभाकर तामणे– साहित्यिक व पटकथालेखक (जन्म:२९ आक्टोबर १९३१)**१९९६:नीळकंठ जनार्दन कीर्तने-- मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य टीकाकार,चिकित्सक आणि साक्षेपी संशोधक(जन्म:१जानेवारी १८४४)**१९९३:इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म:२६ आक्टोबर १९००)**१९६१:गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारताचे पहाडी पुरूष,भारतरत्‍न (१९५७)(जन्म:१० सप्टेंबर १८८७)**१९२२:गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते,शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म:१५ ऑगस्ट १८६७)**१६४७:दादोजी कोंडदेव-- शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक(जन्म:१५७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिनानिमित्त* कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथाभारतातील पहिल्या महिला न्यायाधीश - फातिमा बीबी तसेचभारतातील दुसरी महिला राष्ट्रपती - महामहिम द्रौपदी मुर्मु ..... यासह विविध लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 56 कोटी 80 लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय खेळी ; महायुतीकडून मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई : महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा फोटोबायोग्राफी पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संविधानाचे रक्षण हाच आमचा जाहीरनामा:पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; इंडिया आघाडी व समविचारी संघटनांची साताऱ्यात बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी, गुरुवारी मध्यरात्री होणार महापूजा, शुक्रवारी पहाटे दोन वाजल्या पासून मंदिर होणार खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रकाश आंबेडकरांनी काही जागांची अदलाबदली करावी, पवार-ठाकरेंची भूमिका; वंचितच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचा 9 मार्च रोजी निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *धर्मशालेत आजपासून भारत व इंग्लंड यांच्यातील शेवटचा पाचवा कसोटी सामना, बुमराहचे कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••2. नाश्ता करणं टाळणे -रात्रभर न जेवल्यानंतर दिवसभर काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातून मिळते. पण आपल्यापैकी बरेच जण सकाळी घाई करतात आणि नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडून देतात. असं केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. दिवसेंदिवस न्याहारी न केल्याने मेंदूचे नुकसान होते, पेशींची कार्यक्षमता कमी होते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मेंदूला सामान्य क्रियाकलाप करणं कठीण जातं. म्हणून नाश्ता करणे मेंदूसाठी चांगली गोष्ट आहे. या लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे. क्रमशः *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचे शिखर पार करणारे, जास्त वेळ विश्रांती घेत नाहीत. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा पहिला *वनभूषण* पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) गोंदिया जिल्ह्यातील 'पुस्तकांचे गाव' म्हणून कोणत्या गावाची निवड झाली आहे ?३) पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली ?४) तापी नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) "महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे," अशा शब्दात महाराष्ट्राचा गौरव कोणी केला ? *उत्तरे :-* १) चैत्राम पवार, बारीपाडा, जिल्हा - धुळे २) नवेगावबांध, ता. अर्जूनी मोरगाव ३) शाहबाझ शरीफ ४) गिरणा, पूर्णा ५) कवयित्री महादेवी वर्मा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गोवर्धन शिंदे👤 विश्वनाथ स्वामी👤 मारोती लोणेकर👤 मनोज घोगरे👤 अविनाश मोटकोलू*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ओळखारे वस्‍तु सांडारे कल्‍पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्‍मसुख घ्‍यावे वेळोवेळा ॥३॥घ्‍यावे आत्‍मसुख स्‍वरुपी मिळावे । भूती लीन व्‍हावे तुका म्‍हणे ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेल्या नि:स्वार्थ कार्याविषयी व परखडपणे मत व्यक्त करताना आपल्या मागे, पुढे निंदा, चुगली,टिंगल, टवाळी होत असेल किंवा आपल्यावर मोठ्याने हसत असतील तर तो, आपल्यासाठी आशीर्वाद समजावा. कारण ते, सर्व कार्य करण्याची तसेच ह्या फालतू गोष्टी कडे लक्ष न देण्याची आपल्याला योग्य ती कला जमलेली असते. आणि एका अर्थाने बघितले तर..ते काम पाहिजे तेवढे सोपे नाही. आणि ती कला प्रत्येकाला जमेलच असेही नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः  'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/12/astronomy.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवस_**_ या वर्षातील ६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब**१९९९:जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते उदघाटन**१९९८:विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९७:स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड**१९९२:’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.**१९७५:इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.**१९७५:मराठीतील पहिला राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता चित्रपट "श्यामची आई" मुंबईत प्रदर्शित**१९५३:जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.**१९४०:रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली**१९०५:शांतिनिकेतन येथे महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर यांची पहिली भेट**१८४०:बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.**१७७५:सुरत येथे राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे आणि इंग्रज यांच्या तह झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:जान्हवी कपूर-- हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९८१:सौरभ गोखले-- मराठी अभिनेता**१९६८:लक्ष्मण महादेव घागस-- लेखक,कवी* *१९६६:मकरंद देशपांडे-- रंगभूमीवरचा तसेच रुपेरी पडद्यावरचा नावाजलेला कलाकार,लेखक,दिग्दर्शक**१९६५:देवकी पंडीत – शास्त्रीय गायिका**१९५९:लेविन शाहुराव भोसले -- लेखक* *१९५३:माधुरी तळवलकर-- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९५२:पंडित राजाराम उर्फ ​​राजा काळे-- भारतीय गायक,संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय,आणि भक्ती संगीताचे अभ्यासक* *१९४८:राज एन.सिप्पी(राज सिप्पी)-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९४१:डॉ.हेमंत लक्ष्मण विंझे-- व्यवसायाने डॉक्टर असलेले,कवी,लेखक* *१९३७:वासुदेव नरहर सरदेसाई-- मराठी गझलकार* *१९३६:माणिकलाल कोंडबाजी बारसागडे-- कवी,लेखक* *१९३४:डॉ.शशिकला जयंत कर्डिले-- प्रसिद्ध लेखिका,अनुवादक* *१९३४:मुरलीधर कापडी-- प्रसिद्ध दिग्दर्शक (मृत्यू:१२ऑक्टोबर २००६ )* *१९२५:नयनतारा देसाई-- लेखिका* *१९१६: वसंत अंबादासराव तुळजापूरकर-- कवी* *१९०१:डॉ.श्रीनिवास नारायण बनहट्टी (श्री.ना. बनहट्टी)-- संशोधक,समीक्षक,संपादक (मृत्यू:२२ एप्रिल १९७५)**१८९९:शिवराम लक्ष्मण करंदीकर-- चरित्र लेखक**१४७५:मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू:१८ फेब्रुवारी १५६४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:श्रीकांत मोघे-- भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता (जन्म:६ नोव्हेंबर १९२९)* *२०१८:वसंत नरहर फेणे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ एप्रिल १९२८)* *१९९९:सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते**१९९२:रणजित देसाई – सुप्रसिद्ध नामवंत मराठी साहित्यिक,’स्वामी’कार (जन्म:८ एप्रिल १९२८)**१९८६:माधवराव खंडेराव बागल-- महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक,विचारवंत,लेखक आणि चित्रकार(जन्म:२८ मे १८९५)* *१९८२:रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस (जन्म:९ जुलै १९२१)**१९८२:अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका(जन्म:२ फेब्रुवारी १९०५)**१९८१:गो.रा.परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक,नामवंत शास्त्रज्ञ,’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य**१९७३:पर्ल एस.बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (जन्म:२६ जून १८९२)**१९६७:स.गो.बर्वे – कर्तबगार प्रशासक (जन्म:२७ एप्रिल १९१४)* *१९५७:अमिया चक्रवर्ती -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता(जन्म:३० नोव्हेंबर १९१२)**१९०५:गोविंद शंकरशास्त्री बापट-- भाषांतरकार संस्कृतचे व्यासंगी पंडित (जन्म:८ फेब्रुवारी१८४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सूर्यमाला आणि ग्रह*सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण). प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जातो...... चित्रासह पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यात मतदान होऊ शकतं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय मंत्री अमित शाह  हे जळगाव दौऱ्यावर युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी साधला संवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा, ठाण्यात धडकणार भारत जोडो न्याय यात्रा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र:नाशिक शहरातील भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; जागतिक हवामानावर एल निनोचा प्रभाव कायम, WMO ची मोठी भविष्यवाणी !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत-पाक सामन्याचे तिकीट 1.86 कोटींवर पोहोचले : 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार सामना, दोन्ही संघांचे सर्व सामने अमेरिकेत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) अपुरी झोप - अमेरिकेच्या न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते, आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळं होतं.प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे दिवसातील 24 तासांपैकी 7 ते 8 तासांची झोप. रात्री सलग झोप घेणं अधिक प्रभावी राहातं, असं तज्ज्ञ सांगतात.झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते. याशिवय झोपेच्यावेळेस मेंदू नवीन पेशी तयार करतो. परंतु जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोपला तर नवीन पेशी तयार होत नाहीत.परिणामी, तुम्हाला काहीही आठवत नाही. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. चिडचिड होते. निर्णय घेण्यास त्रास होतो. झोपेच्या कमतरतेमुळे डिमेंशिया अल्झायमरचा धोकाही वाढतो.जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल, तर एकच उपाय आहे. रोज रात्री किमान सात तासांची झोप घेणं. आठ तास झोप घेतली तर आणखी उत्तम.त्यासाठी तुम्ही झोपी जाण्याआधी किमान एक तासआधी बेडवर जायला हवं. या काळात कोणतंही गॅझेट वापरू नका.झोपेचं वातावरण तयार करण्यासाठी बेडरूम अगोदर स्वच्छ करा. खोलीतील प्रकाश कमी करा. तुमचा बेड, कपडे, खोलीचं तापमान सर्वकाही आरामदायक करा.दुसरी गोष्ट - कधीही तोंडावर पांघरुण घेऊन झोपू नका. कारण त्यामुळे आपण नाकातून ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो. या सततच्या प्रक्रियेमुळे तुमच्या चेहऱ्याभोवती CO2 जमा होतो. परिणामी तुम्हाला रात्रीतून ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.क्रमशःवरील लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्या कडून काही आशा नसतात तेच लोक अनेकदा चमत्कार करतात !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सातारा जिल्ह्यातील *'फुलपाखराचे गाव'* कोणते ?२) राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य कोणते ?३) फुलपाखराचे आयुष्य किती दिवसाचे असते ?४) भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू कोणते ?५) फुलपाखरे कशाचे प्रतीक आहेत ? *उत्तरे :-* १) महादरे २) महाराष्ट्र ३) १४ दिवस ४) ऑरेंज ओकलिफ ५) परिवर्तन, पुनरुत्थान, सहनशक्ती, आशा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्री अशोक दगडे, पत्रकार, बिलोली👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर👤 महेश होकर्णे, प्रेस फोटोग्राफर, नांदेड👤 मीनल आलेवार👤 श्रीकांत संतोष येवतीकर👤 अविनाश गायकवाड👤 कैलास वाघमारे👤 राजकुमार कांबळे👤 माधव गोतमवाड👤 सुरेश कटकमवार👤 राज शंकरोड, धर्माबाद👤 मनोहर कोकुलवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोष हे जातील अनंत जन्‍मीचे । पाय त्‍या देवाचे न सोडावे ॥१॥न सोडावे पाय निश्‍चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्‍या ॥३॥न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्‍द करा ॥४॥शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तुती ओळखावें तुका म्‍हणे ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांनी तसेच अडथळा निर्माण करणाऱ्यांनी स्वतः किती फुलासमान कोमल हदयाचे आहेत ते, ओळखण्यासाठी स्वतः चे एकदा तरी वेळात, वेळ काढून आत्मपरीक्षण करण्याचा अवश्य प्रयत्न करून बघावे. पुढे असे कोणतेही व्यर्थ कार्य करण्याची मुळात सवय लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात - केलेलं पाप लपत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 मार्च 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~काटकसर लेख वाचण्यासाठी Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/katakasar.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*२०००:पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण**१९९९:’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्‍या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड**१९९८:नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्‍या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन**१९९७:ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन* *१९६६:मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत**१९३३:भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.**१९३१:दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.**१८५१:’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना**१६६६:शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.**१५५८:फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:चंद्रकांत थावरु राठोड -- कवी, लेखक* *१९७४:हितेन तेजवानी-- दूरचित्रवाहिनी माध्यमातील भारतीय अभिनेता**१९७३:श्रीमंत सखाराम ढवळे -- कवी* *१९७२:प्रा.शर्मिला सुनील गोसावी-- कवयित्री लेखिका* *१९७०:डॉ.मिलिंद विनायक बागुल -- कवी, लेखक,संपादक* *१९६७:अंजली सत्यपाल श्रीवास्तव -- कथा लेखिका* *१९६७:प्रा.डॉ.रामनाथ गंगाधर वाढे -- लेखक,संशोधक* *१९६५:गजानन माधवराव माधसवार-- कवी, लेखक* *१९६३:सौरभ शुक्ला--भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता,दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९५९:शिवराजसिंह चौहान-- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५७:संगीता बापट -- कवयित्री,गायिका, संगीततज्ञ* *१९५६:डॉ.मधुसूदन दत्तात्रेय गादेवार -- कवी, लेखक* *१९४५:गोविंद गोडबोले -- प्रसिद्ध बालसाहित्यिक* *१९२९:संतोष आनंद-- सुप्रसिद्ध भारतीय गीतकार**१९२९:राम उगावकर -- कवी,शाहीर, गीतकार (मृत्यू:५ एप्रिल २०१३)* *१९२८:अॅलिक पदमसी-- भारतीय थिएटर व्यक्तिमत्व आणि जाहिरात चित्रपट निर्माता(मृत्यू:१७ नोव्हेंबर २०१८)**१९२५:वसंत पुरुषोत्तम साठे-- पूर्व कॅबिनेट मंत्री(मृत्यू:२३ सप्टेंबर २०११)* *१९१७:आनंदीबाई विजापुरे--आत्मचरित्रकार, कथाकार,कादंबरीकार(मृत्यू:२० ऑक्टोबर १९९९)**१९१६:बिजू पटनायक – ओरिसाचे माजी मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू:१७ एप्रिल १९९७)**१९१३:गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू:२१ जुलै २००९)**१९११:सुब्रोतो मुखर्जी-- भारतीय वायुसेनेचे पहिले वायुसेना प्रमुख(मृत्यू:८ नोव्हेंबर, १९६०)**१९१०:श्रीपाद वामन काळे-- निंबंधकार. संपादक**१९०८:सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू:२ जून १९९०)**१९०६:सुमंत मूळगावकर -- भारतीय उद्योगपती,टाटा मोटर्सचे आर्किटेक्ट(मृत्यू:१९८९)**१९०५:हरिहर वामन देशपांडे-- लेखक (मृत्यू:२० एप्रिल १९६५)**१८९८:चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:८ जानेवारी १९७६)**१८७३:लक्ष्मण नारायण जोशी--मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार(मृत्यू:१जुलै १९४७)**१८५६:राव बहाद्दुर पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी-- मुंबई इलाख्याची दर्शनिका (गॅझेटियर) तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ,इतिहासाचे अभ्यासक व कवी(मृत्यू:२६ मार्च, १९२९)**१५१२:गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू:२ डिसेंबर १५९४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२८ जुलै १९५४)**१९९५:जलाल आगा – चरित्र अभिनेता (जन्म:११ जुलै १९४५)**१९८९:बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक,गदर पार्टीचे एक संस्थापक* *१९८५:पु.ग.सहस्रबुद्धे –’महाराष्ट्र संस्कृती’कार* *१९६८:नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार (जन्म:१८६९)**१९६६:शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष**१९५३:जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१८ डिसेंबर १८७८)**१८२७:अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१८ फेब्रुवारी १७४५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काटकसर म्हणजे बचत*काटकसर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे पैश्याची बचत किंवा काटकसर. फक्त पैश्याचीच बचत किंवा काटकसर करता येते अन्य दुसऱ्या कोणत्याही वस्तूची आपणांस बचत वा काटकसर करता येत नाही का ? यावर देखील विचार करायलाच हवं. आपण पावलोपावली पैश्याची बचत कशी करावी ? याविषयी इतरांना सांगतो किंवा इतरांकडून ऐकतो. म्हणूनच त्या गोष्टीवर............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गुगलने आपले चॅटबॉट जेमिनी मधील आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या गोंधळाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उद्धव ठाकरेंनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग : मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे तर रायगड मधून अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जालना- मुंबई जनशताब्दीचा हिंगोली पर्यंत विस्तार, पहाटे 5 वाजता निघून दुपारी 2 वाजता मुंबईत पोहोचणार; खा. हेमंत पाटलांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखेर निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या भूमिपूजनाला मुहूर्त; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी होणार भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑक्टोबर १९८१ मधील गिरणी कामगारांना गृहयोजनेत सामावून घ्यावे, गिरणी कामगार कल्याणकारी संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अष्टपैलू शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये तामिळनाडूवर एक डाव आणि ७० धावांनी मिळवला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 कावीळ म्हणजे काय ? 📙 कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं अस्तित्व आपल्या कामावर अवलंबून असते, कोणाच्या दृष्टिकोनावर नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या धातूला *'व्हाईट गोल्ड'* म्हटले जाते ?२) "महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ", अशा शब्दात महाराष्ट्राची प्रशंसा कोणी केली होती ?३) महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या ?४) कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली ? *उत्तरे :-* १) लिथियम २) महात्मा गांधी ३) वारली, गोंड, कातकरी ४) कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, वेरुळा ५) गोपाळ हरी देशमुख*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गंगाधर मदनुरकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 भास्कर रेड्डी ऐंगोड, येताळा👤 गंगाधर नुकूलवार, सहशिक्षक, देगलूर👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक👤 अशोक कहाळेकर, सहशिक्षक, नायगाव👤 रमेश मेरलवार, करखेली👤 प्रकाश पडकूटलावार👤 पोषट्टी सिरमलवार👤 रावसाहेब वाघमारे👤 उमाकांत पा. विभूते चोंडीकर👤 दिनेश चव्हाण👤 गौस पाशा शेख, सहशिक्षक, पालघर👤 गीता ढगे, सहशिक्षिका, बिलोली👤 बालाजी हेंबाडे👤 बालाजी तिप्रेसवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्‍याची त्‍याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्‍मसूख ॥१॥आत्‍मसूख घ्‍यारे उघडा ज्ञानदृष्‍टी । याविण चावटी करु नका ॥२॥करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥उगवेल प्रारब्‍ध संतसंगे करुनी । प्रत्‍यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात केवळ आपणच दुःखी आहोत असं नाही. या पृथ्वीतलावर अनेकजण दुःखी आहेत. प्रत्येकांचे जीवन सुखा,दु:खाने भरलेले आहे. आपणच दुःखी आहोत म्हणून त्याच विवंचनेत न राहता आपण जरा आजुबाजूचा देखील विचार करायला पाहिजे. कदाचित त्यांच्यापेक्षा आपले दु:ख कमी असू शकतात. म्हणून त्यांचे दुःख आपुलकीने समजून घेण्याचा प्रयत्न केले पाहिजे व फुल नाही तर फुलाची पाकळी देऊन त्यांची मदत केली पाहिजे हा एक प्रकारचा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्‍कारीत मुलेच यशस्‍वीनैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती.तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय सुरक्षा दिन_**_ या वर्षातील ६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण**१९९६:चित्रकार रवी परांजपे यांना ’कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर**१९८०:प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.**१९६१:१९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ’आय.एन.एस.विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.**१९५१:नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्‍घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.**१९३८:सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले**१८६१:अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.**१७९१:व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:रोहन बोपन्ना_ भारतीय टेनिस खेळाडू**१९७७:निता प्रफुल्ल अलेल्वार -- कवयित्री, लेखिका**१९७३:प्रा.डॉ.केशव पाटील-- लेखक,संपादक* *१९७२:रवींद्र केदा देवरे -- कवी* *१९७१:वैशाली गावंडे-कोल्हे -- कवयित्री,लेखिका* *१९६७:डॉ.निर्मला पी.भामोदे-- चरित्रकार, वक्त्या* *१९५९:बबन ओंकार महामुने-- कवी , कथाकार* *१९४९:प्रा.डॉ.वामनराव जगताप -- कवी, लेखक**१९४४:शरद पुराणिक-- विज्ञान लेखक**१९३९:गोविंद मोघाजी गारे--आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक,(मृत्यू:२४ एप्रिल २००६)**१९३५:गणपती साबाजी सेलोकर- कवी* *१९३५:प्रभा राव-- राजस्थान व हिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल (मृत्यू:२६ एप्रिल २०१०)* *१९२९:प्रल्हाद बापूराव वडेर--कथाकार, समीक्षक**१९२२:दीना पाठक – अभिनेत्री (मृत्यू:११ आक्टोबर २००२)**१९२१:फणीश्वर नाथ 'रेणु'-- हिन्दी भाषेचे साहित्यकार(मृत्यू:११ अप्रैल १९७७)**१९०९:दामोदर अच्युत कारे-- गोमंतकीय मराठी कवी.हे बा.भ.बोरकरांचे समकालीन होते(मृत्यू:२३ सप्टेंबर १९८५)**१९०६:फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू:२६ फेब्रुवारी १९९४)**१८९५:दत्तात्रय केशव केळकर -- समीक्षक, लेखक (मृत्यू:८ आगस्ट १९६९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:जगन्नाथ केशव कुंटे-- लेखक (जन्म: १५ मे १९४३)* *२०१६:पूर्ण ऐजिटक संगमा(पी.ए. संगमा)-- पूर्व लोकसभा अध्यक्ष (जन्म:१ सप्टेंबर १९४७)**२०११:अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री,३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म:५ नोव्हेंबर १९३०)**२००९:बापू वाटवे-- चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक(जन्म:१९२४)**२०००:गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (जन्म:८ जानेवारी १९२४)**१९९६:आत्माराम सावंत – नाटककार व पत्रकार(जन्म:७मार्च १९३३)**१९९५:इफ्तिखार – चरित्र अभिनेता (जन्म:२२ फेब्रुवारी १९२०)**१९९२:शांताबाई परुळेकर – ’सकाळ’च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा.लि.च्या संचालिका**१९८५:पुरूषोत्तम गणेश सहस्रबुद्धे--मराठी गंथकार आणि विचारवंत.(जन्म:१० जून १९०४)**१९७६:वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२३ जुलै १८८६)**१९५२:सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (जन्म:२७ नोव्हेंबर १८५७)**१९२५:ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक,नाटककार,संगीतकार,चित्रकार व संपादक,रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (जन्म:४ मे १८४९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची संध्याकाळ .....*प्रत्येक माणसाचं एक वैशिष्ट्य असते की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणावर त्याला खूप काही चांगले विचार डोक्यात येत असतात. पण त्यावेळी त्याच्या हातात ना वेळ असते ना काम करण्याची क्षमता. म्हणून जीवन जगताना आपणाला जे शक्य आहे ते काम त्याचवेळी करत राहावे. आता वेळ नाही, नंतर करतो किंवा आताच काही गरज नाही याची हे काम नंतर करतो. असे म्हणून काम पुढे ढकलू नये. गेलेली वेळ परत कधीच येत नाही म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय हेच यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. वेळेवर जो विजय मिळवितो तो सर्वच गोष्टीवर विजय मिळवितो. घड्याळ्यातील तीन काटे नेहमी पळत राहतात पण काही ठराविक कालावधीनंतर एकमेकांना भेटत राहतात. तसे आपण कुटुंबात व परिवारात राहणारे आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी कामाच्या निमित्ताने किंवा इतर कारणांनी दिवसभर फिरत राहतो पण त्या घड्याळ्यातील काट्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर एकत्र येणे विसरून गेलोत. त्यामुळे आपले जीवन नीरस बनत चालले आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. एका घरात विविध नात्यातील माणसं एकत्र राहत होती, त्यांच्यात प्रेम व श्रद्धा होती. विविध सण, समारंभ वा उत्सवाच्या निमित्ताने घराचं गोकुळ होत होते. पण कालांतराने कुटुंब पद्धत बदलत गेली. आज आम्ही दोघे राजा-राणी व दोन लेकरं, एवढाच विश्व झाल्याने माणूस एकलकोंडा होत चाललाय. सुखी जीवनाची व्याख्या बदलून गेली पण समाधान मात्र मिळालं नाही. म्हणून अंथरुणावर पडल्यावर माणसाला हे सारं आठवतं की, उभ्या आयुष्यात माझं काय काय चुकलं. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. म्हणून आयुष्यात सुखी व समाधानी राहायचं असेल तर रोज सर्वाना भेटत राहावे, सर्वांशी प्रेमाने बोलत राहावे, सर्वांची खुशाली विचारत राहावं, यातच जीवनाचे खरा सार लपलेला आहे. - नासा येवतीकर, स्तंभलेखक~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपची पहिली यादी जाहीर, १९५ उमेदवारांची घोषणा; महाराष्ट्रातून एकही उमेदवाराची घोषणा नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा मुस्लिम लीग ( एन ) चे जेष्ठ नेते शेहबाज शरीफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस मला मारू पाहतायत, असं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरागे म्हणाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : MBA CET परीक्षा एक दिवस पुढे ढकलली, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दि. ९ व १० मार्च रोजी घेतली जाणारी एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आता दि. ९ ते ११ मार्च या कालावधीत घेतली जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *छ. संभाजीनगर : पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चाकूरजवळ झालेल्या कार अपघातात नांदेडचे चार तरुण ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन नियम *1. प्रकृतिचा पहिला नियम:*सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती तृण व घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून व बुद्धीत *सकारात्मक* विचार भरले नाही तर *नकारात्मक* विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत.. *2. प्रकृतिचा दूसरा नियम:**ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.* सुखी *सुख* वाटतो, दुःखी *दुःख* वाटतो, ज्ञानी *ज्ञान* वाटतो,भ्रमित करणारा *भ्रम* वाटतो.घाबरणारा *भय* वाटतो, *3. प्रकृतिचा तिसरा नियम:*आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण*भोजन* जर पचले नाही तर *रोग* वाढतात,*पैसा* पचला नाही तर *देखावा* वाढतो,*बातचित* पचली नाही तर *चुगली* वाढते,*प्रशंसा* पचली नाही तर *अंहकार* वाढतो,*टिका* पचली नाही तर *दुश्मनी* वाढते,b *गोपनीयता* टिकली नाहीतर *खतरा* वाढतो,*दुःख* पचले नाही तर *निराशा* वाढते,आणि *सुख* पचले नाही तर *ऊन्मत्तपणा वाढतो...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जपानचे राष्ट्रीय फूल कोणते ?२) भारतात अत्तराची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?४) All India Radio चे घोषवाक्य काय आहे ?५) हवेमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती असते ? *उत्तरे :-* १) सकुरा २) कन्नोज, उत्तरप्रदेश ३) लोकसभेचा सभापती ४) बहुजन हिताय, बहुजन सुखाय ५) ०.०३%*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤श्री गोवर्धन कोळेकर, ACP, औरंगाबाद👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक, जि. प. हा. धर्माबाद👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर👤 गोविंद उपासे, सहशिक्षक👤 गोविंद कोंपलवार, सहशिक्षक👤 शिवाजी पाटील ढगे👤 शेख इस्माईल शेख लतीफ👤 लक्ष्मण बोधनकर, सहशिक्षक👤 लक्ष्मण कुमरवाड👤 सचिन पा. हंबर्डे धनंजकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जैसी गंगा वाहें जैसे त्‍याचे मन । भगवंत जाण तया जवळी ॥१॥त्‍याचे जवळी देव भक्ति भावे उभा । स्‍वानंदाचा गाभा तया दिसे ॥तया दिसे रुप अंगुष्‍ठ प्रमाण । अनुभवी खुण जाणति हे ॥३॥जाणती हे खूण स्‍वात्‍मानुभवी । तुका म्‍हणे म्‍हणे पदवी ज्‍याची त्‍याला ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मी म्हणजेच सर्वकाही,मला सर्व येते, मला सर्वच काही जमते,माझ्याकडे कशाचीही कमी नाही,मी कोणाच्यामागे धावणार नाही, मी सर्वात श्रेष्ठ व गुणवान आहे, हा अहंभाव जेव्हा,आपल्या अंगी शिरते त्यावेळी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप, आपल्याला मिळतील. कुठेही शोधाशोध करण्यासाठी जावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ परोपकार ❃*       ••◆•◆•◆★◆•◆•◆••   "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात.        *_🌀तात्पर्य_ ::~*  जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "**प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६९:फ्रेन्च बनावटीच्या ’कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या) विमानाचे यशस्वी उड्डाण**१९७८:स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.**१९७०:ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.**१९५६:मोरोक्‍कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले**१९५२:पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्‍घाटन**१९४९:न्यू मिलफोर्ड,कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.**१९४६:हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.**१९३०:काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे करण्यात आला.**१९०३:’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.**१८५७:जे.जे.स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले**१८५५:अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:टायगर श्रॉफ--भारतीय सिने-अभिनेता**१९८०:मधुराणी गोखले प्रभुलकर-- मराठी अभिनेत्री,गायिका आणि संगीतकार**१९७७:अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू**१९७६:प्रा.डॉ.आनंद शामराव बल्लाळ -- लेखक, कवी**१९७५:आत्माराम गोविंदराव हारे-- कवी**१९७४:डॉ.संजीवनी तडेगावकर-- कवयित्री लेखिका,संपादिका* *१९६६:प्रा.डॉ श्याम मु.जाधव -- लेखक* *१९५९:डॉ.उमेश शामकांत करंबेळकर-- लेखक**१९५४:हेमा सुभाष लेले-- कवयित्री, बालसाहित्यकार आणि मराठी लेखिका**१९५२:प्राचार्य बाबुराव धोंडुजी देसाई -- प्रसिद्ध मराठी,हिंदी,अहिराणी लेखक तथा अहिराणी बोली भाषेचे अभ्यासक* *१९४७:प्रा.मृणालिनी वसंत चिंचाळकर-- लेखिका,कवयित्री**१९४६:डॉ.भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर-- भारतीय अर्थशास्त्रज्ञ,शिक्षणतज्ज्ञ,समाज सेवक* *१९४४:रमेश डी चव्हाण -- पत्रकार,कवी गझलकार**१९४१:डॉ.भगवान नारायण काटे -- कवी* *१९४०:हनुमंत मोरेश्वर मराठे-- मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक(मृत्यू:२ ऑक्टोबर २०१७)**१९३६:राम हरिश्चंद्र देशमुख -- लेखक* *१९३३:आनंदजी वीरजी शाह--भारतीय संगीत दिग्दर्शक**१९३१:प्राचार्य राम शेवाळकर – उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते प्रतिभावंत सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू:३ मे २००९)**१९३१:मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते**१९२५:शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (मृत्यू:१२ सप्टेंबर १९८०)**१९२४:गुलशन राय -- भारतीय चित्रपट निर्माता आणि वितरक (मृत्यू:११ऑक्टोबर२००४)**१९१७:पुरुषोत्तम नागेश ओक-- विद्वान इतिहासकार,इतिहास संशोधक आणि लेखक(मृत्यू:४ डिसेंबर २००७)**१९०२:लक्ष्मण गोविंद विंझे-- मराठी लेखक आणि कवी(मृत्यू:१ऑक्टोबर १९७२)**१७४२:विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (मृत्यू:१४ जानेवारी १७६१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्रा.डॉ.किसन महादू पाटील-- प्रसिद्ध कवी,लेखक (जन्म:१२ जून १९५३)**२०१३:सुहास भालेकर-- अभिनेते, दिग्दर्शक(जन्म:११ ऑक्टोबर१९३१)**१९८६:डॉ.काशीनाथ घाणेकर-- मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते(जन्म:१४ सप्टेंबर, १९३२)**१९८२:केश्तो मुखर्जी-- भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार(जन्म:७ ऑगस्ट १९२५)* *१९७२:नासिर रझा काझमी-- उर्दू कवी(जन्म:८ डिसेंबर १९२५)**१९४९:सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी,रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा,खिलाफत चळवळ,साबरमती करार,असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (जन्म:१३ फेब्रुवारी १८७९)**१९३०:डी.एच.लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार,कवी,नाटककार,टीकाकार आणि चित्रकार (जन्म:११ सप्टेंबर १८८५)**१७००:मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन (जन्म:२४ फेब्रुवारी १६७०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन म्हणजे क्रिकेट*लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थकला तो संपला असे म्हटले आहे, ते जर खोलात जाऊन विचार केलं तर नक्की वाटते की माणसाचे जीवन म्हणजे एक क्रिकेटच आहे.........आई - बाबा म्हणजे जीवनातील पंच आहेत, जे की आपल्या जीवनाला दिशा देतात, चुकत असल्यास लगेच इशारा देतात.पती - पत्नी म्हणजे पीचवर प्रत्येक चेंडूचा सामना करणारे फलंदाज. त्या पीचवर दोन खेळाडू मध्ये रनिंग बिटविन द विकेट चांगली राहणे गरजेचे असते. दोघांची एकमेकाला चांगली साथ असेल तरच धावसंख्या उभारू शकते अगदी तसेच संसारात पती - पत्नी एकमेकांना समजून घेणारे असतील तरच त्यांचे आयुष्य सुखी समाधानाचं असू शकते. जीवनातील संकटाला दोघांना देखील तोंड द्यावे लागते हे ही सत्यच आहे. मुलगा, मुलगी, जवळचे नातलग - म्हणजे मैदानावर असलेले अकरा खेळाडू. काही जण खुप जवळ असतात जसे किपर, सिली पॉईंट, गलीमधील खेळाडू म्हणजे अगदी जवळचे नातलग तर मिड ऑन किंवा मिड ऑफ म्हणजे दूरचे नातलग असे समजू या. गोलंदाजी करणारे खेळाडू म्हणजे मुलगा मुलगी. जे की आपल्या आई - बाबांना खूप कामाला लावतात. ते देखील आपल्या लेकारांसाठी प्रत्येक चेंडूचा म्हणजे संकटाचा सामना करत असतात. दूरचे नातलग देखील यांच्यावर निगराणी ठेवतात, प्रसंगी कामाला लावतात. प्रेक्षक :- म्हणजे संपूर्ण समाज जे की या परिवाराच्या बारीक बारीक गोष्टीवर आनंद आणि दुःख साजरा करतात. आपणाला जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात.आहे की नाही आपलं जीवन म्हणजे क्रिकेट. शब्दांकन :- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शेगावच्या गजानन महाराजांचा ०३ मार्च रोजी १४६वा प्रकटदिन, भक्तांसाठी दोन दिवस मंदिर खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात ७ मार्चला सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात एक लाख कोटी पेक्षा अधिक थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर - देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *झारखंडमध्ये ३५ हजार ७०० कोटीच्या बहुविध विकास प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रत्येक गावातून १० जण रिंगणात,नांदेड लोकसभेला एक हजार उमेदवार, मराठा आंदोलकांची सगेसोयरेसाठी नवी रणनीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *2027 ची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप बीजिंगमध्ये : ग्लासगो येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स कौन्सिलच्या बैठकीत घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राम शेवाळकर*कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले.राम शेवाळकरांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी महाराष्ट्रातील  अमरावती जिल्ह्यामध्ये  अचलपूर  गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून  संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृती विषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याला सावली देणाऱ्या झाडाला मात्र उन्हात उभं राहावं लागतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा *'राज्यपशू / राज्य प्राणी'* कोणता ?२) 'कवितांचे गाव' हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्तावित असलेले मंगेश पाडगावकरांचे गाव कोणते ?३) आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक कोणी ठोकले ?४) गगनयान मोहिमेसाठी भारताने किती अंतराळवीर निवडले आहे ?५) काळाराम मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशाची चळवळ कधी झाली ? *उत्तरे :-* १) शेखरू २) उभा दांडा, वेंगुर्ला ३) जॉन निकोल लॉफ्टी एटन, नामिबिया ( ३३ चेंडूत ) ४) चार ५) ३ मार्च १९३० *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गणेश पाटील हतनुरे, लोकपत्र धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 मीनाक्षी रहाणे, पुणे👤 बालाजी धारजने👤 शेख जुनेद👤 सुरेश मिरझापुरे👤 संतोष कदम👤 चक्रधर ढगे👤 संभाजी सोनकांबळे👤 आकाश पाटील ढगे👤 अरुण भुरोड👤 सुभाष नाटकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हेचि थोर भक्ति आवडते देवा l संकल्पावी माया संसाराची ll १ llठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll २ llवाहिल्या उद्वेग दुखःची केवळ l भोगणे ते मूळ संचिताचे ll ३ llतुका म्हणे घालू तयावरी भार l वाहू हा संसार देवापाशी ll ४ ll।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः ची पाठ स्वतःच थोपाटून समाधान मानून घेण्यात जरी आनंद मिळत असले तरी एखाद्याच्या अंगात असलेल्या खऱ्या गुणांचा विजय होताना पाहून त्याची आपुलकीने पाठ थोपटण्याचा जो,खरा आनंद मिळतो त्यासारखं दुसरं काही मोठे नसते. ज्यावेळी त्या व्यक्तीची आपल्याकडून पाठ थोपाटली जाते त्यावेळी त्या व्यक्तीला पुढे नवीन कार्य करण्याची इच्छा निर्माण होत असते.चांगल्या कार्याची प्रशंसा व स्तुती करायलाच पाहिजे.प्रशंसा व स्तुती केल्याने नवं कार्य करायला प्रेरणा मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मदत*शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्‍याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्‍या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले*तात्पर्य -आपण दुसर्‍याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक नागरी संरक्षण दिन_**_ या वर्षातील ६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.**१९९२:बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.* *१९४८:गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९४७:आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.**१९४६:’बँक ऑफ इंग्लंड’चे राष्ट्रीयीकरण झाले**१९३६:अमेरिकेतील महाकाय ’हूव्हर धरण’ बांधून पूर्ण झाले.**१९२७:रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.**१९०७:’टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ची स्थापना**१८७२:’यलो स्टोन नॅशनल पार्क’ या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली**१८०३:ओहायो हे अमेरिकेचे १७ वे राज्य बनले**१५६५:रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:संदीप लहू राठोड -- कवी**१९८४:विशाल भा.मोहोड -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९८३:मंगते चुंगनेजंग मेरी कोम-- सुप्रसिद्ध भारतीय बॉक्सिंगपटू* *१९८२:नंदिता पाटकर-- अभिनेत्री* *१९८०:विक्रम सोनबा अडसूळ -- राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,लेखक**१९८०:शाहिद अफ्रिदी – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७५:मनिषा टीकारामसिंग पाटील -- कवयित्री,लेखिका* *१९६८:चित्रा क्षीरसागर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६३:यशोधन बाळ-- मराठी अभिनेते* *१९५६:डॉ.सुरेश काशिनाथ हावरे -- प्रसिद्ध लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९५१:अमित खन्ना-- भारतीय चित्रपट निर्माता,दिग्दर्शक,लेखक आणि पत्रकार* *१९५१:नितिशकुमार-- मुख्यमंत्री बिहार**१९५०:डॉ छाया प्रकाश कावळे-- प्रसिद्ध कथाकार**१९४७:शांताराम राजाराम हिवराळे -- प्रसिद्ध कवी,समीक्षक* *१९४७:बशीर मोमीन कवठेकर--- साहित्यिक ज्यांनी मराठी भाषेत लावणी,नाटक,धार्मिक भक्तिगीते,देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली (मृत्यू:१२ नोव्हेंबर २०२१)**१९४६:इलाही जमादार--- सुप्रसिद्ध गझलकार (मृत्यू: ३१ जानेवारी २०२१)**१९४५:शोभा फडणवीस-- माजी मंत्री तथा लेखिका* *१९४३:प्रा.डॉ.गजकुमार बाबुलाल शहा-- इतिहासतज्ज्ञ,संशोधक,साहित्यिक**१९४२:इंद्राणी मुखर्जी-- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९३९:प्रा.विलास वाघ--मराठी लेखक, संपादक,प्रकाशक तसेच सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:२५ मार्च २०२१)* *१९३०:राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (मृत्यू:१४ एप्रिल २०१३)**१९२३:शांताबाई कृष्णाजी कांबळे-- लेखिका (मृत्यू:२५ जानेवारी २०२३)**१९२२:यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान,संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:४ नोव्हेंबर १९९५)**१९१४:भानुदास श्रीधर परांजपे- कवी आणि नाटककार**१९१९:मधुकर(मधू) शंकर आपटे-- अभिनेता(मृत्यू:१३ मार्च १९९३)**१९११:जयशंकर दानवे-- नटश्रेष्ठ आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध(मृत्यू:३ सप्टेंबर १९८६)**१९०१:बालाजी देवराव पाटील बोरकर-- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू:३० ऑगस्ट १९८०)**१८९६:श्रीधर बळवंत टिळक -- श्रीधरपंत म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक(मृत्यू:२५ मे १९२८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:तारक मेहता-- गुजराती विनोदी लेखक,नाटककार व सदरलेखक(जन्म: डिसेंबर १९२९)* *२०१४:प्रफुल्ला दिलीप डहाणूकर-- मराठी चित्रकार(जन्म:१ जानेवारी १९३४)**२००३:गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (जन्म:११ फेब्रुवारी १९४२)**१९९९:दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक,वेदांती पंडित (जन्म:१३ फेब्रुवारी १९१०)**१९९४:मनमोहन देसाई--निर्माते,दिग्दर्शक (जन्म:२६ फेब्रुवारी १९३७)**१९९३:मनोहर शंकर ओक--कवी, कादंबरीकार (जन्म:२७ मे १९३३)**१९८९:वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री,सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (जन्म:१३ नोव्हेंबर १९१७)**१९५५:नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (जन्म:८ डिसेंबर १८७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंतराव बंडूजी पाटील*(१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्ष झाली. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट (अधिपत्र) काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूत गिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या.वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते. यांशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. दादा १९७१ मध्ये अमेरिका येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांची पाटबंधारे मंत्री म्हणून नेमणूक केली. ते १९७२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. शंकरराव चव्हाणांच्या कारकीर्दीत वर्षभर पाटबंधारे मंत्री होते. पुढे त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस राजकारणातून संन्यास घेतला.महाराष्ट्रात मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी वीसच काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (१७ जुलै १९७८).श्रीमती शालिनीबाई या त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले असून या प्रतिष्ठानाद्वारे महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.*संकलन : नासा येवतीकर*~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या 7 ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी घरांना मिळणार मोफत वीज, खर्च होणार 75 हजार कोटी, सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अर्थव्यवस्था सुस्साट; तिसऱ्या तिमाहीत GDP ८.४ टक्के, विकासाचा दर सर्वांच्या अंदाजापेक्षा अधिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रिलायन्स अन् डिस्ने एकत्र येणार, देशातील सर्वात मोठ्या मनोरंजन कंपनीची कमान नीता अंबानींच्या हाती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आजपासून शालांत परीक्षेला प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सायकलस्वारी करताना ट्रॅक्सीची धडक, Intel कंपनीचे माजी अधिकारी अवतार सैनी यांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *07 मार्च रोजी धर्मशाळा येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गझल सम्राट ; पंकज उधास आपल्या मलमली आवाजाने गझल गायकीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे संगीत रसिकांचे आवडते गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वातील आणखी एक तारा निखळून पडला. पंकज उधास हे भारतातीलच नाही तर जगातील एक प्रमुख गझल गायक म्हणून ओळखले जात होते. १९८६ साली आलेल्या नाम चित्रपटातील त्यांनी गायलेल्या चिठ्ठी आई है.... आई है...या गाण्याने ते घराघरात पोहचले. हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. नाम चित्रपट यशस्वी होण्यात या गाण्याचा खूप मोठा वाटा होता. या गाण्यांनंतर त्यांनी हिंदी चित्रपटात अनेक गाणी गायली. घायल, साजन, ये दिल्लगी, फिर तेरी कहाणी याद आई, मोहरा यासारख्या चित्रपटातून त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेले ना कजरे की धार, आज फिर तुमपे प्यार आता है, जिये तो जीये कैसे, और आहिस्ता अशी कितीतरी गाणी लोकप्रिय झाली.व ही सर्व गाणी गाजली ती त्या गाण्यातील अर्थपूर्ण शब्दांनी आणि पंकज उधास यांच्या मधुर आवाजाने. चित्रपटातील त्यांनी गायलेले गाणी लोकप्रिय झाली तरी त्यांची ओळख ही गझल गायक म्हणूनच राहिली. त्यांचे मोठे बंधू मनहर उधास हे देखील प्रख्यात गझल गायक आहेत त्यांनीच पंकज उधास यांना पहिल्यांदा स्टेजवर गझल गाण्याची संधी दिली. १९७१ साली त्यांनी कर्मा या चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायन केले मात्र त्यांची दखल कोणी घेतली नाही त्यामुळे ते कॅनडाला निघून गेले. तिथे त्यांनी छोट्या मोठ्या समारंभात गाण्यास सुरुवात केली. तिथे ते स्टेज शो देखील करू लागले. त्यांचे स्टेज शो ही लोकप्रिय होऊ लागले. भारतात परतल्यावर त्यांनी अनेक स्टेज शो केले मात्र चित्रपटात त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नव्हती कारण तो जमाना मोहंमद रफी आणि किशोर कुमार यांचा होता. १९७९ साली त्यांना जवाब या चित्रपटातील मितवा रे मितवा... हे गाणे गाण्याची संधी मिळाली या संधीचे त्यांनी सोने केले. हे गाणे लोकप्रिय झाल्यावर त्यांनी गझल क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी अनेक गझल गायली. पंकज उधास यांनी एक से बढकर एक गझल गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. १९८० साली त्यांच्या गाण्याचा पहिला अल्बम आला. त्यानंतर त्यांच्या गाण्यांचा धडाका सुरू झाला. १९८१ साली मुकर्रर, १९८२ साली तरनुम, १९८३ साली महाफिल, १९८५ साली नायाब हे त्यांचे अल्बम आले. या अल्बम मधील सर्व गाणी रसिकांना आवडली. त्यांच्या गझला इतक्या लोकप्रिय झाल्या की रसिकांनी त्यांना गझल सम्राट ही पदवी दिली. सारं काही विसरायला लावणाऱ्या त्यांच्या गझला आजही रसिक गुणगुणताना दिसतात. त्यांनी आपल्या आवाजाने गझल क्षेत्राला आणि गझल गायकीला ऊर्जितावस्था मिळवून दिली. गझल गायकी लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गझल गायन आणि संगीत क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या याच योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या निधनाने संगीत आणि गायन क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. गझल सम्राट पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'वाघाची मावशी'* असे कोणत्या प्राण्याला म्हणतात ?२) नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे ?३) सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आढळत असल्यामुळे कोणत्या देशाला 'मधुमेहाची राजधानी' असे म्हटले जाते ?४) एकही वृक्ष नसलेला देश कोणता ?५) भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या ? *उत्तरे :-* १) मांजर ( 🐈 ) २) मूलभूत कर्तव्ये ३) भारत ४) कतार ५) मुळा, मुठा, घोड, निरा, सिना, इंद्रायणी, कुकडी, कऱ्हा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आशा तेलंगे, मुंबई👤 साहेबराव बोने, देगलुर👤 अमोल अलगुडे, उमरगा👤 राहुल मॅडमवार👤 साहेबराव गुंजाळ👤 नरेश सुरकूटलावार👤 संजय रामराव पाटील कदम, धर्माबाद👤 संतोष चिद्रावार👤 प्रभाकर गोरे👤 सौ. मीनल भाऊसाहेब चासकर👤 रुद्र व्यंकटेश पुलकंठवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उध्‍दरीले कुळ आपण तरला । तोचि एक झाला त्रेलोक्‍यात ॥१॥त्रेलोक्‍यत झाले द्वेतचि निमाले । ऐसे साधियले साधन बरवें ॥२॥बरवें साधन सुखशांती मना । क्रोध नाही जाणा तिळभरी ॥३॥तिळभरी नाही चित्तासि तो मळ । तुका म्‍हणे जळ गंगेचे ते ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाची ओळख जरी धनसंपत्ती व इतर गोष्टींमुळे होत असेल तरी खरी ओळख त्याच्यात असलेल्या माणुसकी मुळे,सहनशीलतेमुळे आणि खास करून दुसऱ्यांच्या विषयी आपुलकीने विचार करून संकट काळात धावून जाण्याने होत असते. अशा प्रकारची ओळख निर्माण करण्यासाठी पैसे मोजावे लागत नाही तर माणसात माणुसकी असावी लागते. म्हणून व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडून पश्चाताप करण्यापेक्षा ज्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान मिळतो तेच कार्य आपण करण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी  किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले  ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल  त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य - तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/01-26.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_२९ फेब्रुवारी लीप दिवस (लीप वर्ष)_* *_ या वर्षातील ६० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_पृथ्वीला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे३६५ दिवस लागतात. खगोलशास्त्रीय आकडेवारीनुसार नेमका कालावधी३६५.२४२ दिवस इतका असतो. दरवर्षी०.२४२दिवसाचा वाढीव कालावधी शिल्लक राहतो. चार वर्षांमधील हा वाढीव कालावधी एकत्रित करुन त्याचा एक दिवस पूर्ण केला जातो.फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असल्यामुळे त्याला जोडून ‘लीप दिवस’ साजरा केला जातो._**२०१२:६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.**२००८:अर्थसंकल्पात चार कोटी शेतकऱ्यांसाठी साठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी**२०००:शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.**१९९६:क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.**१७७६:इंग्रज आणि मराठे यांच्यात प्रसिद्ध पुरंदरचा तह* *_जन्मदिवस/ वाढदिवस/जयंती:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:अॅडम सिंक्लेअर-- हॉकी खेळाडू**१९७६:सुधाकर तेलंग -- प्रसिद्ध कवी तथा शिक्षण उपसंचालक* *१९५६:महमूद कादिर याकुब रखांडी -- लेखक**१९५२:सुहास पटवर्धन-- लेखक**१९३०:प्रा.डॉ.वसंत दामोदर कुलकर्णी -- लेखक* *१९४०:शरदचंद्र कोपर्डेकर - लेखक संपादक* *१९३६:विष्णू जयंत बोरकर -- कादंबरीकार, कथाकार* *१९०४:वत्सलाबाई आंबेगावकर -- बालसाहित्यिक,लेखिका* *१९०४:रुक्मिणीदेवी अरुंडेल --भरतनाट्यम नर्तिका (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९८६)**१८९६:मोरारजी देसाई -- भारतरत्न,भारताचे ४ थे पंतप्रधान(मृत्यू:१० एप्रिल १९९५)**१८२८:नारायण दाजी लाड: रसायनशास्त्र सचित्र व औषधविद्या हे ग्रंथ विलक्षण गाजले* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••*१९५६:एल्पिडियो क्विरिनो-- फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१६ नोव्हेंबर १८९०)**१९४०:एडवर्ड फ्रेडरिक-- इंग्लिश लेखक (जन्म:२४ फेब्रुवारी १९४७)**१९२०:नारायण तथा बापूराव बाळकृष्ण लेले -- ज्येष्ठ पत्रकार* *१५९२:अलेस्सांद्रो स्ट्रिजियो-- इटालियन संगीतकार*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालपणीचे संस्कार*एकूण 27 भाग वाचण्यासाठी..... वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या अडीच लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निलेश राणेंच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेची कारवाई, पावणे चार कोटींची थकबाकी असल्याने कारवाईचा बडगा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तलाठी भरती प्रक्रियेबाबत केलेल्या खोट्या आरोपानंतर रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु; महसूलमंत्री विखेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बारावीची परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित, फक्त धरणे आंदोलन सुरू राहणार, मनोज जरांगेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जहांगीर आर्ट गॅलरीत २८ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत प्रदर्शन, राज्यपालांच्या हस्ते ४७ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अशोक सराफ आणि रुतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जैस्वालची गगनभरारी ! ICC Ranking मध्ये घेतली हनुमान उडी, विराटच्या जवळ पोहचला !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गरम पाण्याचे झरे* 📙हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्‍यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्‍यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे.पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'मेटा'चे संस्थापक कोण आहेत ?२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' ही उपाधी कोठे प्रदान करण्यात आली ?३) अमेरिकेच्या पहिल्या व्यावसायिक अवकाश यानाचे नाव काय आहे ?४) एकही नदी नसलेला देश कोणता ?५) आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानंतर अनेक तरुण - तरुणींना सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रातील पहिले आश्रयस्थळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) मार्क झुकरबर्ग २) काठमांडू, नेपाळ ३) ओडिसिस ४) सऊदी अरब ५) वाई*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आनंद बालाजी आनेमवाड, तंत्रस्नेही शिक्षक👤 सुरज आहेर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहर्निश सदा परमार्थ करावा । पाय न ठेवावा आडमार्गी ॥१॥आडमार्गी कोणी जन ते जातील । त्‍यातुनि काढील तोचि ज्ञानी ॥२॥तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयासी । वेळोवेळा त्‍यासी शरण जावे ॥३॥आपण तरेल नव्‍हे ते नवल । कुळे उध्‍दरील सर्वांची तो ॥४॥शरण गेलियाने काय होते फळ । तुका म्‍हणे कुळ उध्‍दरीले ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा आपली परिस्थिती चांगल्याने सुधारते त्यावेळी लाखो रूपयाच्या घरात जुन्या सामानाची आपल्याला अडचण होत असते. वेळ आल्यावर त्याला बाहेर सुद्धा ठेवल्या जाते.तसंच परखडपणे बोलणाऱ्या किंवा विचार मांडणाऱ्याला बाजूला सारण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जाते. जेव्हा, गुलामगिरी पत्करली जाते व बुध्दी गहाण ठेवली जाते त्यावेळपासून जीवनाची दिशाच बदलून जाते. भलेही जुने सामान फेकल्याने आपली अडचण दूर होत असेल पण, स्पष्ट व सत्य बोलणाऱ्याला कितीही दूर सारण्याचा प्रयत्न जरी केले तरी काहीच फायदा होत नाही कारण तो, स्वयंप्रकाशित असतो. म्हणून सत्य नेमकं काय असते जाणून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे,असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने जीवनाचे सार्थक होण्यास मदत होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.*तात्पर्य - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=3514819611978121&id=100003503492582&mibextid=Nif5oz/2018/02/03.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय विज्ञान दिन_**_ या वर्षातील ५९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान सुरू* *१९३५:वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.**_१९२८:डॉ.सी.व्ही.रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला.त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो_**१९२२:इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८४९:अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस.एस.कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रा.डॉ.दिपक सुभाषराव सूर्यवंशी -- लेखक* *१९७५:डॉ.बलवंत जेऊरकर-- साहित्य अकॅडेमी पुरस्कारप्राप्त अनुवादक,वक्ते, लेखक**१९७५:रत्ना यशवंत मनवरे-- कवयित्री* *१९६९:निर्मला सोनी -- कवयित्री* *१९६८:वर्षा उसगांवकर-- मराठी,हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९६५:सिद्धार्थ कुलकर्णी-- कवी,लेखक* *१९६४:डॉ.अशोक गोविंदराव काळे -- प्रसिद्ध लेखक* *१९६२:अशोक सदाशिव चोपडे-- लेखक, संपादक**१९६०:प्रमोद जोशी -- कवी,लेखक* *१९५१:करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू**१९४८:विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका**१९४७:दिग्विजय सिंग--- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९४४:रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार(मृत्यू:९ ऑक्टोबर, २०१५)**१९४४:प्रा.सुरेश द्वादशीवार-- मराठी पत्रकार आणि प्रसिद्ध कादंबरीकार**१९४२:प्रा.डॉ.कुमुद दिनकर गोसावी-- प्रसिद्ध लेखिका* *१९४२:ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक,गिटार,हार्मोनिका आणि पियानो वादक (मृत्यू:३ जुलै १९६९)**१९३६:कुसुम रामचंद्र अभ्यंकर-- कादंबरीकार(मृत्यू:५ एप्रिल १९८४)**१९३४:जेनिफर केंडल-- इंग्लिश अभिनेत्री आणि पृथ्वी थिएटरची संस्थापक(मृत्यू:७ सप्टेंबर १९८४)**१९२७:कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू:२७ जुलै २००२)**१९२४:वसंत वैकुंठ कामत --- नाटककार (मृत्यू:३ जुलै १९९४)**१९१४:त्रिंबक कृष्णराव टोपे -- चरित्रकार, लेखक (मृत्यू:२० फेब्रुवारी १९९४)* *१९१३:पंडित नरेंद्र शर्मा-- हिंदी भाषेतील भारतीय लेखक,कवी आणि गीतकार(मृत्यू:१२ फेब्रुवारी १९८९)**१९०९:जयंत देसाई (जयंतीलाल झिनाभाई देसाई)-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू:१९ एप्रिल १९७६)**१९०२:त्र्यंबक विष्णू पर्वते -- चरित्रकार,कवी, पत्रकार* *१९०१:लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते,नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता] (मृत्यू:१९ ऑगस्ट १९९४)**१९००:मोरेश्वर दिनकर जोशी--शिक्षक, संस्थापक,संपादक(मृत्यू:३फेब्रुवारी १९७९)**१८९७:डॉ.शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (मृत्यू:२३ ऑगस्ट १९७४)**१८९६:केशव वामन साठे -- नाट्यसमीक्षक (मृत्यू:८आगस्ट १९७५)* *१८७३:सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (मृत्यू:११ जानेवारी १९५४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव –’सासरमाहेर’,’भाऊबीज’,’चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा,संवाद व गीतलेखन केले होते.(जन्म:१२ एप्रिल १९१४)**१९८६:स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या (जन्म:३० जानेवारी १९२७)**१९६६:उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार,एकांकिकाकार,कवी आणि कादंबरीकार.(जन्म:३ ऑगस्ट १८९८)**१९६३:डॉ.राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (जन्म:३ डिसेंबर १८८४)**१९३६:कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी (जन्म:१ ऑगस्ट १८९९)**१९२६:स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले,त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही.कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (जन्म:९ फेब्रुवारी १८७४)* *_राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रासंगिक लेख*दुर्लक्षित विज्ञान विषय*..... डॉक्टर वा इंजिनिअर व्हायचे असेल तर विज्ञान शाखा निवडावी लागते त्याशिवाय डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. तसं पाहिलं तर सर्वानाच विज्ञान या विषयाची आवड असतेच अशातला ही भाग नाही मात्र आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे या हेतूने अनेक विद्यार्थी दहावीनंतर अकरावी-बारावीसाठी विज्ञान निवड करतात. त्यातल्या त्यात या विज्ञान शाखेची शिकवण्याची भाषा ही इंग्रजी असल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलांना अडचणी ला तोंड द्यावे लागत आहे, हे ही विशेष नोंद घेण्यासारखी आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा:सातारा जिल्ह्यातील कोयना येथे MTDC तून जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही:कायद्यात रुपांतर, राजपत्रही जारी; 26 फेब्रुवारीपासून आता 10% आरक्षण झाले लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होणार:तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणामुळे औंढा नागनाथच्या विकासाला चालना मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार ! केंद्रशासनाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नामिबियाच्या जॉन निकोलने लॉफ्टी ईटन टी-२० क्रिकेट स्पर्धेत फक्त ३३ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह सर्वात वेगवान शतकाचा केला विक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👨🏼‍⚕ *स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना काय समजते ?* 👨🏼‍⚕ **************************स्टेथोस्कोप नसलेल्या डॉक्टरची कल्पनाही आपण करू शकत नाही. किंबहुना एखाद्या डॉक्टराने रुग्णाची तपासणी करताना स्टेथोस्कोप वापरला नाही तर रुग्णाच्या कपाळावर नक्कीच आठ्या पडतात व "काहीच तर तपासले नाही" असे उद्गारही तो काढतो. याचाच गंमतशीर प्रकार खेड्यात बघायला मिळतो. गुडघा दुखला तर गुडघ्यालाही स्टेथोस्कोप लावण्याची बिकट अवस्था डॉक्टरवर येऊ शकते वा क्वचित व्यवसायाच्या दृष्टीनेही तो तसे मुद्दाम करतो. या स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना नेमके काय कळते, असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना खूप काही कळते, हे जरी खरे असले तरी सगळेच काही कळते असे नाही.स्टेथोस्कोपचा छातीला लावण्याचा भाग, नळ्या व कानात ठेवायचे प्लग्ज असे तीन भाग पाडता येतील. छातीला लावण्याच्या भागास धातूची एक उघडी चपटी डबी व त्यावर एक पातळसा पडदा बसवलेला असतो. हा पातळ पडदा आवाजाची तीव्रता अनेक पटींनी वाढतो व त्यामुळे शरीरात निर्माण होणारे आवाज डॉक्टरांना ऐकू येतात. हृदय आकुंचन प्रसरण पावत असताना येणारे हृदयाचे ठोके, श्वास घेताना व सोडताना येणाऱ्या श्वसनाचे आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ऐकता येतात. त्यांच्याच झालेल्या बदलामुळे हृदयाच्या झडपांचे आजार, फुप्फुसाचा न्युमोनिया, क्षयरोग, दमा अशा आजारांचे निदान करता येते. याखेरीज पोटाला स्टेथोस्कोप लावल्यास आतड्यांच्या आकुंचन प्रसरणामुळे येणारे आवाज ऐकता येतात. या आवाजामुळे आतडय़ांत अडथळा (obstruction) निर्माण झाला असल्यास त्याचे निदान होऊ शकते. गर्भवती स्त्रीच्या पोटावर स्टेथोस्कोप ठेवून तिच्या गर्भाशयातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मोजता येतात. मूल जिवंत आहे वा नाही, त्याला पुरेसा रक्तपुरवठा होतोय वा नाही हेही स्टेथोस्कोप ने कळू शकते. यावरून लक्षात येईल की स्टेथोस्कोपने अनेक रोगांचे निदान करता येते; पण डोके दुखण्यास डोक्याला, गुडघा दुखल्यास गुडघ्याला वा मान लचकल्यास मानेला स्टेथोस्कोप लावून काहीच उपयोग होणार नाही !*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता ही मनुष्याच्या जीवनाची एक अटळ अशी अवस्था असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *चिपको आंदोलन* कशाशी संबंधित आहे ?२) भारताबाहेरील किती व्यक्तींना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?३) पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक ३२ मीटरला किती अंश सेल्सिअसने वाढते ?४) मराठा समाजाला किती आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले ?५) महाबलीपुरमची स्थापना कोणी केली ? *उत्तरे :-* १) वृक्षतोड २) दोन - खान अब्दुल गफार खान - १९८७, नेल्सन मंडेला - १९९० ३) १° से. ४) १० टक्के ५) पल्लव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 इंजि. साईनाथ सुरेश येवतीकर       विजय नगर, नांदेड👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद👤 आनंद आनेमवाड, लोकमत पुरस्कार प्राप्त शिक्षक👤 मारुती पाटील👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर👤 शंकर गर्दसवार👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्‍माचें ते मूळ पाहिले शोधून । दु:खासी कारण जन्‍म घ्‍यावा ॥१॥पापपुण्‍य करुनि जन्‍मा येतो प्राणी । नरदेहा येवूनी हानि केली ॥२॥रजतमसत्‍व आहे ज्‍याचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥३॥तम म्‍हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥४॥तुका म्‍हणे येथे सत्‍वाचे सामर्थ्‍य । करावा परमार्थ अहर्निशी ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, तिरस्कार, अभिमान, स्वार्थ आणि अशा बऱ्याच व्यर्थ भूतांच्या आधीन होऊन जगत असतो. जसं तोडांला आलं तसंच बोलून मोकळा होऊन जातो. एकाद्या व्यक्तीविषयी कितीही कपटकारस्थान रचण्याचा प्रयत्न केला तरी ते फक्त जिवंत असेपर्यंतच मर्यादित असते.बाकी एकदा ती,व्यक्ती निघून गेली की, मात्र त्या सर्व व्यर्थ भूतांना काहीही अर्थ नसतो. शेवटी वैऱ्याच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येत असतात. म्हणून माणसासारखेच जगण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/02/marathi-bhashaa-din.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_मराठी भाषा गौरव दिवस_**_ या वर्षातील ५८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी**१९९९:पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक**१९५१:अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.**१९४५:सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवडे येथे साने गुरुजी वाचनालय सुरू* *१९००:ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना**१८४४:डॉमिनिकन रिपब्लिकला (हैतीपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:संदीप सिंग-- प्रसिद्ध हॉकी खेळाडू* *१९८०:प्रा.डॉ.महेश बापुरावजी जोगी -- लेखक* *१९६७:प्रा.शुभांगी विकास रथकंठीवार -- कवयित्री,लेखिका* *१९६४:डॉ.सुभाष हरिभाऊ कटकदौंड-- प्रसिद्ध कवी,गझलकार,लेखक* *१९६१:रुजारिओ पास्कल पिंटो -- कवी, लेखक* *१९५७:नारायण जाधव -- लेखक,दिग्दर्शक, ज्येष्ठ रंगकर्मी* *१९५६:शिवाजी तांबे -- लेखक,विचारवंत तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५२:प्रकाश झा-- भारतीय चित्रपट निर्माता, अभिनेता,दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९४६:मारोती तुकाराम खिरटकर -- लेखक* *१९४३:बुकनाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा-- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री* *१९४१:डॉ.ऊषा अरविंद गडकरी-- कवयित्री, लेखिका* *१९४१:श्याम मनोहर आफळे-- मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार**१९३४:सुरेश दामोदर जोशी-- क्यूरेटर, लेखक(मृत्यू:१६ ऑक्टोबर २०१२)**१९३४:चंद्रशेखर व-हाडपांडे-- संतकवी,लोकशिक्षक,नाट्यलेखक (मृत्यू:२०१५)**१९३२:एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू:२३ मार्च २०११)**१९२६:ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका (मृत्यू:१७ जानेवारी २०१३)**१९२१:आचार्य पार्वती कुमार(पार्वतीकुमार)-- भारतीय नृत्य दिग्दर्शक,नृत्य गुरु (मृत्यू:२९ नोव्हेंबर २०१२)**_१९१२:विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ’कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक,कवी व नाटककार (मृत्यू: १० मार्च १९९९)_**१८९६:मधुकर गंगाधर पेडणेकर(पी.मधुकर) -- हार्मोनिअम वादक,संगीतकार(मृत्यू:२० जुलै १९६७)**१८९४:कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:१३ जून १८२२)**१८६०:वैजनाथ काशीनाथ राजवाडे-- वाग्वैद्य, निरुक्त अभ्यासक,व्युत्पत्तिशास्त्रज्ञ(मृत्यु:१७ डिसेंबर १९४४)**१८०७:एच.डब्ल्यू.लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी (मृत्यू: २४ मार्च १८८२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार (जन्म:१९२४)**१९९१:प्रा.डॉ.रुपराव पांडुरंग पाजणकर-- लेखक,संपादक,समीक्षक (जन्म:१९ जुलै १९३०)**१९५६:गणेश वासुदेव मावळणकर-- लोकसभेचे पहिले अध्यक्ष(जन्म:१५ मे १९५२)**१९३६:इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) (जन्म:२६ सप्टेंबर १८४९)**१९३१:क्रांतिकारक चंदशेखर आझाद-- काकोरी कट व लाहोर कट यातील पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू (जन्म:२३ जुलै १९०६)**१९८७:अदि मर्झबान – अभिनेते,दिग्दर्शक, नाटककार व संपादक* *१८९४:कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:१३ जून १८२२)**१७१२:बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट (जन्म:१४ आक्टोबर १६४३)* 💐💐 *_ मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी राजभाषा गौरव दिन*त्यानिमित्ताने एकंदरीत इंग्रजी आणि मातृभाषा याचा विचार केल्यास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी कोणत्या भाषेतुन शिक्षण घ्यावे ? हा मोठा प्रश्न आहे. अनेक विचारवंत आणि तज्ञ मंडळी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, मुलांना आपल्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे. कारण समजणाऱ्या भाषेत घेतलेले ज्ञान लवकर लक्षात येते आणि त्याचे आकलन ही होते. याउलट दुसऱ्या भाषेत शिक्षण घेतांना अनेक शब्द ओळखीचे नसतात त्यामुळे भाषा समजणे अवघड जाते तर संवाद करताना देखील अनंत अडचणी येतात.......संपूर्ण लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्राने दिल्या सर्व राज्यांना सूचना, इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान 6 वर्षे असावे वय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारच्या अमृत भारत योजने अंतर्गत 554 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *100% अनुदानाची मागणी:अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयातील 63 हजार शिक्षकांचा 10, 12 वीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार, पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *10 व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप:पं. रघुनंदन पणशीकरांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत; 'गानतपस्विनी' पुरस्कार पं. विश्व मोहन भट्ट यांना प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ख्यातनाम गायक पंकज उधास यांचं प्रदीर्घ आजारानं निधन, वयाच्या 72व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, पाच विकेट्स राखून इंग्लंडवर मात, पाच सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 अमीबा म्हणजे काय ? 📙 साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे.पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मराठी भाषेचे शिवाजी'* म्हणून कोणास ओळखले जाते ?२) बार्डोली सत्याग्रहाचे नेता कोण होते ?३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण किल्ले किती ?४) भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे ?५) अमेरिकेतील निग्रो चळवळीला अर्पण केलेला महात्मा फुले यांचा ग्रंथ कोणता ? *उत्तरे :-* १) विष्णुशास्त्री चिपळूणकर २) सरदार वल्लभभाई पटेल ३) ३७० किल्ले ४) इंग्लंड ५) गुलामगिरी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गंगाधर मुटे, वर्धा👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ👤 कु. श्रावणी भुसेवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा माणुसकी धर्म आहे. पण, तेथेच एकाद्या व्यक्तीविषयी नको त्या शब्दात बोलून स्वतः समाधान करून घेणे किंवा व्यर्थ बडबड करणे हा माणुसकी धर्म नाही तर आपलीच अनमोल वेळ वाया घालवणे होय.सोबतच आपल्यात असलेल्या गुणांकडे दुर्लक्ष करून वेळ वाया घालवणे होय. म्हणून असे कोणतेही व्यर्थ काम आपल्या कडून होणार नाही याची काळजी घ्यावी व जर चांगले करता येत असेल तर मात्र वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदीर कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 फेब्रुवारी 2024💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1914047385388693&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ५७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:समुद्राखाली मारा करणा-या पहिल्या के-५ क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली.* *१९९९:आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा.जी.पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड**१९९९:आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील ’अभिरुची हॉटेल’ आगीत भस्मसात झाले.**१९९८:परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.**१९९५:बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.**१९८४:‘इन्सॅट-१-इ‘ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित**१९७६:वि.स.खांडेकर यांना (ययाती कादंबरीसाठी) मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:चैतन्य सरदेशपांडे-- नाटककार* *१९७६:अशोक जाधव -- प्रसिद्ध चित्रकार, काष्ठ शिल्पकार* *१९६८:राजेश ओं.राजोरे -- लेखक,संपादक दै.देशोन्नती बुलडाणा आवृत्ती**१९६५:संजय ठिगळे-- लेखक* *१९६४:ऋता मिलिंद गोखले -- लेखिका* *१९६४:डॉ.मिलिंद दिगंबर पाटील-- लेखक* *१९५९:उषा दिनेश भालेराव -- कवयित्री, लेखिका* *१९५०:जयंत राळेरासकर--- ध्वनिमुद्रिका संग्राहक,लेखक**१९३७:मनमोहन देसाई – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (मृत्यू:१ मार्च १९९४)**१९२८:गणाधीश वासुदेव खांडेपारकर-- चरित्रकार,संपादक**१९२८:शोभना लक्ष्मण गोखले--महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञा आणि नाणकशास्त्रज्ञा.(मृत्यू:२२ जून २०१३)**१९२२:मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता (मृत्यू:३ नोव्हेंबर १९९०)**१९०४: त्रिंबक गोविंद ढवळे-- लेखक, खगोलशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू:१० जानेवारी १९६०)* *१८७४:सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ ’कलापि’ – प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी, त्यांचा ’कलापिनो केकारव’ हा काव्यसंग्रह खूप गाजला (मृत्यू:१९००)**१८६६:हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती (मृत्यू:१५ आक्टोबर १९३०)**१८२९:लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९०२)**१८०२:व्हिक्टर ह्यूगो – जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबरीकार,कवी आणि लेखक (मृत्यू:२२ मे १८८५)**१६३०:गुरू हर राय – शिखांचे ७ वे गुरू (मृत्यू:६ आक्टोबर १६६१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: इसाक मुजावर--हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचा माहितीकोश समजले जाणारे,मराठी लेखक(जन्म:१९३४)**२०१०:चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य,डी.लिट. (पुणे विद्यापीठ -१९९७), पद्मविभूषण. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली.(जन्म:११आक्टोबर १९१६)**२००४:शंकरराव चव्हाण –माजी केंद्रीय अर्थमंत्री,गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (जन्म:१४ जुलै १९२०)**२००३:राम वाईरकर – प्रख्यात व्यंगचित्रकार,(जन्म १९३६)* *२०००:बा.म.तथा ’रावसाहेब’ गोगटे – बेळगाव येथील उद्योगपती(जन्म:१६ सप्टेंबर१९१६)**१९६६:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर-- महान क्रांतिकारक,प्रतिभासंपन्न कवी,नाटककार,प्रभावी वक्ते व लेखक (जन्म:२८ मे १८८३)**१९३७:एल.के.अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज्ञ (जन्म:६ जुलै १८६२)**१८८६:नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (जन्म:२४ ऑगस्ट १८३३)**१८७७:मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (जन्म:१३ डिसेंबर १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिक्षेपेक्षा जीवन महत्वाचे आहे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *युवकांनी विक्रमी संख्येने देशासाठी मतदान करावे - शेवटच्या मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे 3 नवीन कायदे एक जुलैपासून लागू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राम मंदिराला एका महिन्यात 25 कोटी रुपयांची देणगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बदलू नये; आमदार बच्चू कडू यांचा जरांगे पाटील यांना सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गाईला राष्ट्रमातेचा दर्जा द्या:अमरावतीच्या गौकुंभात संत-महंतांची मागणी, अन्यथा मुंबई मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *30 लाखांच्या दंडाच्या नोटिसा:हिंगोली उपविभागात अवैध गौण खनिज वाहतूक करणारी बारा तासात पकडली 16 वाहने*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळला, अश्विन आणि कुलदीपच्या फिरकीने टीम इंडियाने बाजी पलटली; भारताला विजयासाठी 152 धावांची गरज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 चक्रीवादळे का येतात ? 📙 उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्‍यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो.चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते.धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिति गरीब असली तरी चालेल,पण विचार ‘भिकारी’ नसावेत…*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाला निवडणूक आयोगाने कोणते नवीन चिन्ह बहाल केले आहे ?२) युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचे नामांकन कोणत्या दोन श्रेणीत केले जाते ?३) छत्रपती शिवाजी महाराजांनी 'सर्वात अभेद्य किल्ला' असे वर्णन कोणत्या किल्ल्याचे केले होते ?४) महाराष्ट्रातील एकूण आरक्षण आता किती टक्क्यांवर पोहोचले आहे ?५) आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात आहे ? *उत्तरे :-* १) तुतारी २) सांस्कृतिक व नैसर्गिक श्रेणी ३) जिंजी, तामिळनाडू ४) ७२ टक्के ५) दक्षिण अमेरिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सौ. प्रिया पारसेवार जि. प. प्रा. शाळा देवणेवाडी ता. लोहा जि. नांदेड👤 राजेश सब्बनवार, कुंडलवाडी👤 मुकेश पद्मपल्ले👤 ऊत्तम गवळे👤 गंगाधर मुटे, सामाजिक कार्यकर्ते👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ👤 राजेश्वर भंडारे👤 मुरलीधर राजूरकर, शिक्षक, मुखेड👤 निर्मला सोनी, साहित्यिका, अमरावती👤 प्रशांत चिखलीकर, शिक्षक, लातूर👤 मारोती पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनाची शते ऐकता दोष जाती। मतीमंद ते साधना योग्य होती॥ चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी। म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी॥२०५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदाचे क्षण तर कधी चांगले वाईट प्रसंग जीवनात येत असतात. ते, खूप काही शिकवण देऊन जातात. फरक एवढाच की, त्यांना ओळखण्याची आपण संधी गमावून बसतो त्यामुळे ते सहसा कळत नाही. म्हणून आलेल्या प्रत्येक चांगले, वाईट, प्रसंगाला ओळखावे व त्यांना गुरू मानून त्यांचा सन्मान करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....*       •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1435523189907784&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मुद्रण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.**१९६१:मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.**१९५२:कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.**१९४२:’व्हॉइस ऑफ अमेरिका’ या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.**१९३८:ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.**१९२०:नाझी पार्टीची स्थापना झाली.**१९१८:इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२२:जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले*१८१२:पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग लागली**१६७०:राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:आकाश ठोसर-- मराठी चित्रपट अभिनेता**१९८७:धनंजय वसंत पोटे-- लेखक* *१९८१: रामकृष्ण मारखंडी रोगे -- कवी* *१९७४:डॉ.सुवर्णा सुखदेव गुंड-- कवयित्री, लेखिका* *१९७४:रवींद्र विष्णू गोळे-- पत्रकार,संपादक लेखक*१९७०:अरविंद भैय्यालाल कटरे -- लेखक* *१९६८:प्रा.विकास जनार्दन पिल्लेवान -- लेखक* *१९६६:उदयनराजे भोसले-- राज्यसभेचे खासदार**१९६३:संजय लीला भन्साळी--- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता व लेखक* *१९५९:ॲड.विठ्ठल काष्टे -- कवी* *१९५८:समीर अंजान-- भारतीय गीतकार**१९५६:डी.व्ही.कुलकणी-- सुप्रसिद्ध साहित्यिक* *१९५५:स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (मृत्यू:५ आक्टोबर २०११)**१९४८:जे.जयललिता – माजी मुख्यमंत्री आणि दक्षिणेतील अभिनेत्री(मृत्यू:५ डिसेंबर, २०१६)**१९४०:सुरेश भार्गव मुळे-- लेखक* *१९३९:शशिकांत दशरथ मालपेकर -- लेखक**१९३९:जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (मृत्यू:९ मार्च २०१२)**१९२४:तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता,गझलचे बादशहा (मृत्यू:९ मे १९९८)**१९१४:विनायक चिंतामण देवरुखकर-- लेखक* *१९०६:प्राचार्य प्र.रा.दामले -- लेखक* *१६७०:राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती,शिवाजी महाराजांचे चिरंजीव (मृत्यू:२ मार्च १७००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:सरदूल सिकंदर-- पंजाबी भाषेतील लोक आणि पॉप संगीताशी संबंधित भारतीय गायक(जन्म:१५ जानेवारी १९६१)* *२०१८:श्रीदेवी-- भारतीय चित्रपट अभिनेत्री(जन्म:१३ऑगस्ट१९६३)**२०११:अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (जन्म:१७ सप्टेंबर १९२९)**१९९८:ललिता पवार – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या (जन्म:१८ एप्रिल १९१६)**१९९०:बाळकृष्ण रामचंद्र मोडक--लेखक 'मुलांचे मासिक' कार (जन्म:२१ फेब्रुवारी १८९८)**१९८६:रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका (जन्म:२९ फेब्रुवारी १९०४)**१९७५:निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (जन्म:३० मार्च १८९५)**१९३६:लक्ष्मीबाई टिळक –लेखिका, ’स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले (जन्म:१ जून १८६८)**१८१५:रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले.(जन्म:१४ नोव्हेंबर १७६५)**१८१०:हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म:१० आक्टोबर १७३१)**१६७४:कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.या घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ’वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य लिहिले आहे.*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॉपी म्हणजे एक कलंक*कॉपी करणे म्हणजे नकला करणे असा सारासार अर्थ घेतला जातो. परीक्षेचा काळ आला की कॉपी हा शब्द कानावर पडतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी परीक्षेच्या काळात कॉपी करण्याचा विचार करतात. नकला मारण्यासाठी ही मुले नाना प्रकारच्या क्लृप्त्या किंवा योजना तयार करतात. नकला मारणे म्हणजे एक प्रकारे चोरी करण्यासारखेच आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे आदेश, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावरुन हायकोर्टात खडाजंगी, गुणरत्न सदावर्ते आणि जरागेंच्या वकिलांचा टोकाचा युक्तिवाद, कायदा आणि सुव्यवस्थेती स्थिती निर्माण होऊ नये, हायकोर्टाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०२०, २०२१ आणि २०२२ करिताचे विभागनिहाय कृषी पुरस्कार जाहीर केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा, राज्यात लोकसंख्येच्या 4% लोक दिव्यांग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाले उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर चिन्हाचं लॉन्चिग होणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुकणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रुटच्या शतकी खेळीने इंग्लंडचा डाव सावरला, सात बाद 302 पर्यंत मजल, भारताच्या आकाश दीपनं पहिल्याच कसोटीत घाम फोडला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभिनेत्री श्रीदेवी स्मृतिदिन*१९७५ मध्ये फिल्म 'जूली'तून श्रीदेवीने डेब्यू केले. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसली होती. सुरुवातीच्या फिल्म्स मध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीला स्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. श्रीदेवीला दोन मुली असून ते म्हणजे जाह्नवी कपूर व खूशी कपूर. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षाच्या होत्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जो शाळेचे दरवाजे उघडतो तो तुरुंगाचे दरवाजे बंद करतो."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे ?२) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे ?३) भारतात सध्या जागतिक वारसास्थळे किती आहेत ?४) गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ? *उत्तरे :-* १) शिनी शेट्टी २) ज्ञानेश्वर मुळे ३) ४२ ( ३४ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक, १ मिश्र वारसास्थळे ) ४) प्रवरा, दारणा, सिंधफणा, मांजरा, पूर्णा ५) दीनबंधू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नरेश जे. वाघ, बालरक्षक👤 साईप्रसाद वंगल👤 मन देविदास तारु👤 अहमद सुतार👤 संस्कृती मसुरे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना संग हा सर्वसंगास तोडी।मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥ मना संग हा साधना शीघ्र सोडी। मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विरोध करणारे व त्याला अडविणारे हजारो संख्येने जरी जागोजागी साखळी तयार करून उभे राहत असतील तरी समोर नेणारा एकतरी जण जन्माला येत असतो. म्हणून कोणाला अडविण्याचा प्रयत्न करू नये. कारण समोर नेणाऱ्याचेच गुणगान केल्या जाते व अडविणाऱ्याला एकदिवस नको त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष संतोष मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकतेची शक्ती*एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात जॉईन होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर**१९९६:कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ**१९६६:सीरियात लष्करी उठाव झाला.**१९६३:ब्रह्मदेशात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६२:दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरू पदी सी.डी.देशमुख यांची निवड**१९५२:संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.**१९४७:आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना**१९४५:दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई - अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला.**१९४५:दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.**१९४५:दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.**१९४१:डॉ.ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.**१७३९:चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.**१४५५:पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:हर्शेल हरमन गिब्स -- दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट प्रशिक्षक**१९७४:डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे -- लेखिका,कवयित्री,संपादिका* *१९७३:रेखा व्यंकट कटरे -- कवयित्री**१९७१:डॉ.प्रज्ञा शरद देशपांडे-- कवयित्री, मराठी व संस्कृत भाषेतील लेखिका* *१९६९:भाग्यश्री पटवर्धन-- प्रसिद्ध भारतीय सिने-अभिनेत्री* *१९६९:अयुब खान-- अभिनेते**१९६८:कृतिका देसाई-- भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९६५:हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू**१९६५:अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर (मृत्यू:२६ नोव्हेंबर २००८)**१९५७:येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे नेते (मृत्यू:२ नोव्हेंबर २०१२)**१९५२: सुमती साईनाथ लांडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका व प्रकाशक* *१९४८:मीना अनिल किनीकर-- लेखिका, अनुवादक* *१९४५:पुंडलिक चिंतामण गवळी -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९३६:डॉ.प्रल्हाद अमृतकर -- लेखक, अनुवादक* *१९२९:प्राचार्य डॉ.विष्णू बाळकृष्ण कुलकर्णी (मधू कुलकर्णी)-- कथालेखक* *१९१३:प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (मृत्यू:६ जानेवारी १९७१)**१९०२: कृष्णाजी गंगाधर कवचाळे -- कवी,इतिहासलेखक,संपादक (मृत्यू:६ जानेवारी १९६४)* *१८७६:संत गाडगे महाराज(गाडगे बाबा)-- महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक (मृत्यू:२० डिसेंबर १९५६)**१६३३:सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक (मृत्यू:२६ मे १७०३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:प्रा.श्री.मा.कुलकर्णी-- प्रसिद्ध लेखक, संशोधक,संपादक (जन्म:१७ मे १९२७)**२००४:सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री,केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (जन्म:२४ ऑगस्ट १९१८)**२००४:विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म:२२ जानेवारी १९३४)**२०००:वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक* *१९९८:रमण लांबा – क्रिकेटपटू (जन्म:२ जानेवारी १९६०)**१९९०:अमृतलाल नगर-- प्रसिद्ध हिंदी लेखक(जन्म:१७ आगस्ट १९१६)**१९६९:मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री (जन्म:१४ फेब्रुवारी १९३३ )**१९४७:नारायण दासो बनहट्टी--लेखक, संपादक (जन्म:१८६२)**१९४४:लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ(जन्म:१४ नोव्हेंबर १८६३)**१९०४:महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, (जन्म:२ नोव्हेंबर १८३३)**१७९२:सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (जन्म:१६ जुलै १७२३)**१७७७:कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ,आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ,इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ.विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.(जन्म:३० एप्रिल १७७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा*संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत गाडगेबाबा यांचे दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे मृत्यू झाला. *संकलन :- नासा येवतीकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील लोकप्रिय नेत्यांची यादी केली जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्य प्रदेश शालेय शिक्षण विभागाने 1ली ते 12 वी पर्यंतच्या शाळेत आठवड्यातून एक दिवस नो बॅग डे (No bag Day) ठेवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही; निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे केले आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णलयात दाखल, 10 महिन्यांपूर्वी झाला होता ब्रेन हॅमरेजचा त्रास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऊस शेती करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसाचा FRP 8% नी वाढवला (sugarcane at ₹340/quintal)*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर, 22 मार्चला होणार CSK व RCB यांच्यात पहिला सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील अनुभवातून घेतलेले ज्ञान माणूस कधी ही विसरू शकत नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उत्तर प्रदेशातील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) मिस वर्ल्ड २०२४ ही स्पर्धा कोणत्या देशात होत आहे ?३) भारत सध्या कोणत्या नावाचा अफाट ताकदीचा सुपर कॉम्प्युटर तयार करत आहे ?४) 'क्वाड' संघटनेत एकूण किती देश आहेत ?५) महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज २) भारत ३) परम शंख ४) ४ - भारत, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, जपान ५) ३९० किल्ले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 निलेश सितावार, धर्माबाद👤 मारोती बोईनवाड👤 डॉ. सचिन बी. कदम👤 सुनंदा पुलकंठवार, नांदेड👤 एकनाथ बोईनवाड👤 शेषराव विठ्ठल तालीमकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वही संग सोडूनि द्यावा। अती आदरे सज्जनाचा धरावा॥ जयाचेनि संगे महादुःख भंगे। जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं वयाने, गुणाने, संपत्तीने लहानही असतात तसेच मोठे सुद्धा असतात. पण खऱ्या अर्थाने तेच माणसे मोठे असतात जे, रंजल्या, गांजलेल्यांना मान देऊन माणुसकी धर्म निभावून दाखवतात. त्यातच लहान माणसं तेच असतात ज्यांच्यापाशी सर्व काही असून सुद्धा स्वार्थी जीवन जगतात अशा जगण्याला भलेही मार्ग मिळत असले तरी ते, कोणाचेही मार्गदर्शक, प्रेरणास्थान बनू शकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात जॉईन होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर**१९९६:कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ**१९६६:सीरियात लष्करी उठाव झाला.**१९६३:ब्रह्मदेशात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६२:दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरू पदी सी.डी.देशमुख यांची निवड**१९५२:संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.**१९४७:आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना**१९४५:दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई - अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला.**१९४५:दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.**१९४५:दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.**१९४१:डॉ.ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.**१७३९:चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.**१४५५:पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:हर्शेल हरमन गिब्स -- दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट प्रशिक्षक**१९७४:डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे -- लेखिका,कवयित्री,संपादिका* *१९७३:रेखा व्यंकट कटरे -- कवयित्री**१९७१:डॉ.प्रज्ञा शरद देशपांडे-- कवयित्री, मराठी व संस्कृत भाषेतील लेखिका* *१९६९:भाग्यश्री पटवर्धन-- प्रसिद्ध भारतीय सिने-अभिनेत्री* *१९६९:अयुब खान-- अभिनेते**१९६८:कृतिका देसाई-- भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९६५:हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू**१९६५:अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर (मृत्यू:२६ नोव्हेंबर २००८)**१९५७:येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे नेते (मृत्यू:२ नोव्हेंबर २०१२)**१९५२: सुमती साईनाथ लांडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका व प्रकाशक* *१९४८:मीना अनिल किनीकर-- लेखिका, अनुवादक* *१९४५:पुंडलिक चिंतामण गवळी -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९३६:डॉ.प्रल्हाद अमृतकर -- लेखक, अनुवादक* *१९२९:प्राचार्य डॉ.विष्णू बाळकृष्ण कुलकर्णी (मधू कुलकर्णी)-- कथालेखक* *१९१३:प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (मृत्यू:६ जानेवारी १९७१)**१९०२: कृष्णाजी गंगाधर कवचाळे -- कवी,इतिहासलेखक,संपादक (मृत्यू:६ जानेवारी १९६४)* *१८७६:संत गाडगे महाराज(गाडगे बाबा)-- महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक (मृत्यू:२० डिसेंबर १९५६)**१६३३:सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक (मृत्यू:२६ मे १७०३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:प्रा.श्री.मा.कुलकर्णी-- प्रसिद्ध लेखक, संशोधक,संपादक (जन्म:१७ मे १९२७)**२००४:सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री,केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (जन्म:२४ ऑगस्ट १९१८)**२००४:विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म:२२ जानेवारी १९३४)**२०००:वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक* *१९९८:रमण लांबा – क्रिकेटपटू (जन्म:२ जानेवारी १९६०)**१९९०:अमृतलाल नगर-- प्रसिद्ध हिंदी लेखक(जन्म:१७ आगस्ट १९१६)**१९६९:मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री (जन्म:१४ फेब्रुवारी १९३३ )**१९४७:नारायण दासो बनहट्टी--लेखक, संपादक (जन्म:१८६२)**१९४४:लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ(जन्म:१४ नोव्हेंबर १८६३)**१९०४:महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, (जन्म:२ नोव्हेंबर १८३३)**१७९२:सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (जन्म:१६ जुलै १७२३)**१७७७:कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ,आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ,इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ.विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.(जन्म:३० एप्रिल १७७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा*संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत गाडगेबाबा यांचे दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे मृत्यू झाला. *संकलन :- नासा येवतीकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील लोकप्रिय नेत्यांची यादी केली जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्य प्रदेश शालेय शिक्षण विभागाने 1ली ते 12 वी पर्यंतच्या शाळेत आठवड्यातून एक दिवस नो बॅग डे (No bag Day) ठेवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही; निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे केले आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णलयात दाखल, 10 महिन्यांपूर्वी झाला होता ब्रेन हॅमरेजचा त्रास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऊस शेती करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसाचा FRP 8% नी वाढवला (sugarcane at ₹340/quintal)*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर, 22 मार्चला होणार CSK व RCB यांच्यात पहिला सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील अनुभवातून घेतलेले ज्ञान माणूस कधी ही विसरू शकत नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उत्तर प्रदेशातील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) मिस वर्ल्ड २०२४ ही स्पर्धा कोणत्या देशात होत आहे ?३) भारत सध्या कोणत्या नावाचा अफाट ताकदीचा सुपर कॉम्प्युटर तयार करत आहे ?४) 'क्वाड' संघटनेत एकूण किती देश आहेत ?५) महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज २) भारत ३) परम शंख ४) ४ - भारत, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, जपान ५) ३९० किल्ले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 निलेश सितावार, धर्माबाद👤 मारोती बोईनवाड👤 डॉ. सचिन बी. कदम👤 सुनंदा पुलकंठवार, नांदेड👤 एकनाथ बोईनवाड👤 शेषराव विठ्ठल तालीमकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वही संग सोडूनि द्यावा। अती आदरे सज्जनाचा धरावा॥ जयाचेनि संगे महादुःख भंगे। जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं वयाने, गुणाने, संपत्तीने लहानही असतात तसेच मोठे सुद्धा असतात. पण खऱ्या अर्थाने तेच माणसे मोठे असतात जे, रंजल्या, गांजलेल्यांना मान देऊन माणुसकी धर्म निभावून दाखवतात. त्यातच लहान माणसं तेच असतात ज्यांच्यापाशी सर्व काही असून सुद्धा स्वार्थी जीवन जगतात अशा जगण्याला भलेही मार्ग मिळत असले तरी ते, कोणाचेही मार्गदर्शक, प्रेरणास्थान बनू शकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:पुण्याच्या काका पवार यांनी इन्फाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीतील सुवर्णपदक मिळविले* *१९७९:’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले**१९७८:श्री.यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले**१९४८:झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती**१९४२:दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला**१८१९:स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:केतकी माटेगांवकर--- मराठी अभिनेत्री व गायिका**१९८१:इंद्रजित गणपत घुले-- कवी लेखक संपादक अनुवादक**१९७७:नामदेव भोसले-- आदिवासी समाजसेवक तथा साहित्यिक* *१९७४:प्रदीप शंकर सुतार -- लेखक* *१९६५:प्रा.डॉ तीर्थराज कापगते --- कवी, लेखक**१९६५:सूरज आर.बडजात्या-- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता* *१९६०:जयंत पवार--- पत्रकार,मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (मृत्यू:२९ ऑगस्ट २०२१)**१९५५:सुरेन्द्र पाथरकर -- लेखक* *१९५२:परशुराम खुणे-- झाडीपट्टीतील रंगभूमीचे कलाकार,पद्मश्री पुरस्काराने सन्मानित* *१९५०:नयना आपटे-- मराठी नाटक आणि चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री**१९४९:विशाखा अनंत गुप्ते -- लेखक* *१९३६:रघुनाथ कृष्ण जोशी-- सुलेखनकार,डिझायनर, कवी आणि शिक्षक(मृत्यू:२० एप्रिल २००८)**१९३५:प्रा.चंद्रकुमार नलगे-- जेष्ठ साहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९२२:व्ही.जी.जोग – व्हायोलिनवादक (मृत्यू:३१ जानेवारी २००४)**१९२२:सुलोचना भीमराव खेडगीकर-- लेखिका* *१९२०:इफ्तिखार – चरित्र अभिनेता (मृत्यू:४ मार्च १९९५)**१९२०:कमल कपूर-- भारतीय अभिनेता आणि निर्माता(मृत्यू:२ऑगस्ट२०१०)**१९१०:रामचंद्रअनंत काळेले-- कवी,काव्यसमीक्षक(मृत्यू:१२ जून १९८१)**१९०८:न्या.राम केशव रानडे-- लेखक, विचारवंत,प्रवचनकार* *१९०६:पहारी सन्याल-- भारतीय अभिनेता आणि गायक(मृत्यू:१० फेब्रुवारी १९७४)**१९०२:फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:२२ एप्रिल १९८०)**१८९८:कमला गोपाळ देशपांडे-- संस्थापक(मृत्यू:८ जुलै १९६५)**१८९०:नारायण केशव भागवत-- बौद्ध वाड्:मयाचे संशोधक,लेखक (मृत्यू:२०एप्रिल १९६२)**१८५७:हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१ जानेवारी १८९४)**१८५७:लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू:८ जानेवारी १९४१)**१८३६:महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (मृत्यू:१२ एप्रिल १९०६)**१७३२:जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१४ डिसेंबर १७९९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:लक्ष्मण देशपांडे –’वर्‍हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म:५ डिसेंबर १९४३)**२०००:विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (जन्म:११ ऑगस्ट १९२८)**२०००:दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (जन्म:२३ आक्टोबर १९२३)**१९८२:जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (जन्म:५ डिसेंबर १८९४)**१९५८:मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते,भारताचे पहिले शिक्षणमंत्री,भारतरत्‍न (जन्म:११ नोव्हेंबर १८८८)**१९४४:कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन (जन्म:११ एप्रिल १८६९)**१९२५:सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (जन्म:२० जुलै १८३६)**१८२७:चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म:१५ एप्रिल १७४१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••* शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर . . . .  *भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *२००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ‘पेन्शन योजना’ लागू करावी, सत्यजीत तांबे यांनी राज्य सरकारला केली मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये ४ मार्चपासून 'कौशल्य विकास केंद्र' होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन:सेवेत सामावून घेण्यासह पगारात 30% वाढ करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडल्याने अजय महाराज बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष ‘गोल्डमॅन’ पंढरीनाथ फडके यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *NZ vs AUS T20 : अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडवर ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎇 *कृष्णविवर कसं पाहतात ?* 🎇 आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार कृष्णविवराची घनता इतकी प्रचंड असते, की त्यापायी त्याच्या ठायी असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या बलातून कोणाचीही सुटका होत नाही. प्रकाशकिरण त्यात जखडून पडतात. ते तसे बाहेर न पडल्यामुळे अर्थात ते दिसण्याची शक्यता मावळते. मग ते एखाद्या ठिकाणी असल्याचं आपल्याला समजतच कसं ? एखाद्या कोळशाच्या वखारीत लपलेल्या काळ्या मांजराला बघण्याइतकंच हे कठीण आहे अशी मल्लीनाथी स्टीफन हॉकिंगनंच केली आहे.तरीही या विश्वात असलेल्या कितीतरी कृष्णविवरांचा छडा वैज्ञानिकांनी लावला आहे. हे साध्य करण्यासाठी चार निरनिराळी तंत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी एकाचा वापर करून कृष्णविवर बघता येतं.जेव्हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होऊन त्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं, त्यावेळी त्याच्या गुरुत्वाकर्षणात कोणताही बदल होत नाही. ते पूर्वीइतकंच राहतं. त्यामुळे त्या तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांच्या कक्षेतही काहीही बदल होत नाही. ते पूर्वीसारखेच आणि पूर्वीच्या वेगानंच आपली भ्रमंती करत राहतात. त्यामुळे कोणताही तारा नसलेल्या केंद्रकाभोवती असं एखादं ग्रहमंडळ घिरट्या घालत असलेलं दिसलं की तिथं कृष्णविवर असण्याची शक्यता असते.कृष्णविवराच्या तीव्र गुरुत्वाकर्षणाच्या ओढीपायी आसपासचे वायू आणि वायुंचे ढग त्याच्याकडे जोराने खेचले जातात. ही खेच इतकी जोरकस असते की त्या वायूंचं तापमान मोठ्या प्रमाणावर वाढतं. त्यापायी मग त्या वायूंकडुन क्ष किरणांचं उत्सर्जन होतं. त्यांची नोंद घेऊन कृष्णविवराच्या अस्तित्वाचा थांगपत्ता लावता येतो.कृष्णविवराच्या घनतेपायी ते एखाद्या भिंगासारखं काम करतं. जर आपण एखादी वस्तू आणि आपले डोळे यांच्यामध्ये भिंग धरलं तर त्या वस्तूवरून येणार्‍या प्रकाशकिरणांचं त्या भिंगांकडून वक्रीभवन झाल्यानं ती वस्तू आहे त्यापेक्षा मोठी दिसते. तसंच जर एखादं कृष्णविवर एखादा तारा आणि आपण यांच्यामधून गेलं तर त्या ताऱ्याकडून येणार्‍या प्रकाशाचीही तीच गत होते आणि त्या ताऱ्याचं तेज आकस्मात वाढतं. त्यावरूनही कृष्णविवराची माहिती मिळते.कृष्णविवराची घनता प्रचंड असते. त्यामुळे लहानशा क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमानाची दाटीवाटी झालेली असते. त्यामुळे अवकाशातील वस्तुमानाचं मोजमाप करताना एखाद्या जागी जर अशी मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमान असल्याची सूचना मिळाली, तर तिथं कृष्णविवर असल्याची शक्यता बळावते.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभव हा महान शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र फार घेतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याने *'राज्यशस्त्र'* म्हणून कोणते शस्त्र घोषित केले ?२) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत असलेले ५ स्थायी देश कोणते ?३) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?४) भारताचा पूर्व - पश्चिम अंतर किती किमी आहे ?५) भारतातील पहिल्या टेस्टट्यूब बेबीचे नाव काय आहे ? *उत्तरे :-* १) पट्टा किंवा दांडपट्टा २) अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन ३) हर्षवर्धन पाटील ४) २,९३३ किमी ५) कनुप्रिया अग्रवाल ( जगातली दुसरी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शिवलिंग बेंडके, साहित्यिक, वसमत👤 शाहरूख शेख, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना गुज रे तूज हे प्राप्त झाले। परी अंतरी पाहिजे यत्न केले॥ सदा श्रवणे पाविजे निश्चयासी। धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• स्वप्न तर सारेच पाहतात.स्वप्न पाहणेही काही गैर नाही.परंतू स्वप्न सत्यात उतरावयाचे झाल्यास त्यासाठी परिश्रमही करणे तितकेच महत्वाचे आहे. स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शक्य झाल्यास त्याचे नियोजन करावे.अशक्य वाटत असेल तर स्वप्न म्हणूनच त्याला मागे टाकावे.त्याबद्दल त्याचा जास्त विचारही करु नये. कारण जास्त विचार केला तर आपल्या मनावर काही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. जे आहे त्यात बदल होत असेल तर बदल करून जीवनात आनंद आणि समाधान मानावे. विनाकारण स्वप्नांच्या जास्त मागे धावू नये. नाही तर आहे ते ही सुख गमावून बसल्याचा पश्चाताप होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चोर ते चोर अन वर शिरजोर*एका गावात एक पिठाची गिरणी होती. गिरणीचा मालक थोडासा लुच्‍चा इसम होता. तो गि-हाईकाच्‍या दळणातील थोडेसे धान्‍य अथवा पीठ काढून घेत असे. त्‍याची ही चोरी अनेकांच्‍या लक्षात येत असे पण गावात दुसरी गिरणी नसल्‍याने लोक गप्‍प बसत असत. एकेदिवशी धान्‍याच्‍या टोपलीत गिरणीमालकाला एक उंदीर सापडला. त्‍या उंदराला पकडून तो माणूस त्‍याच्‍या मांजराकडे देणार इतक्‍यात तो उंदीर विनवणीच्‍या सुरात त्‍या दळणक-याला म्‍हणाला, अहो मालक, मी चोर नाही. तुमच्‍याकडे येणा-या धान्‍यातील चारदोन दाणे खाऊन मी माझी भूक भागवितो आहे. तेव्‍हा मला कृपया तुम्‍ही सोडून द्यावे अशी माझी तुम्‍हाला विनंती आहे. त्‍याचे हे बोलणे ऐकून तो इसम त्‍याला म्‍हणाला,''अरे उंदरा धान्‍याचे चारदोन दाणे का होईना पण ते तू चोरून खातोसच ना. मग ही चोरीच आहे त्‍याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.उंदीर म्‍हणाला, प्रत्‍येक दळणातले चारदोन दाणे खाणारा मी जरी चोर असलो तरी मी खूपच छोटी चोरी करतो तुम्‍ही तर प्रत्‍येक दळण दळण्‍याचे पैसेही घेता आणि वरून त्‍या दळणातील थोडे धान्‍य आणि थोडे पीठ अशी तिहेरी चोरी करता मग तुम्‍ही तर खूप मोठे चोर आहात. अशा या चोरीबद्दल तुम्‍ही स्‍वत:ला काय शिक्षा करून घेणार आहात. उंदराच्‍या या बोलण्‍याने माणूस खूपच संतापला व म्‍हणाला, चोरी करून ते करून वरून परत मलाच चोर ठरवतोस. काहीही झाले तरी माणूस आहे आणि माणूस हा पृथ्‍वीवरचा सर्वश्रेष्‍ठ प्राणी आहे. तो काय करतो, कुठे चुकतो, कुठे बरोबर असतो हे ठरवण्‍याचा अधिकार प्रत्‍यक्ष परमेश्‍वरालाही नाही. तू लहान का होईना चोरी केलीस आणि आता तू शिक्षेला पात्र आहेस असे म्‍हणून त्‍याने त्‍या उंदराला मांजराच्‍या स्‍वाधीन केले.*तात्‍पर्य - जगात लहान चोरांना शिक्षा मिळते आणि मोठ्या चोरांना प्रतिष्‍ठा मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1431600076966762&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मातृभाषा दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला**१९५१:नेपाळ बंडखोराविरुध्द भारत व नेपाळची संयुक्त लढाई सुरू झाली**१९२५:’द न्यूयॉर्कर’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९१५:लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.**१८७८:न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.**१८४८:कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा ’द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित केला.**१८४२:जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:मुरलीधर ईश्वरदासजी खोटेले-- झाडी बोलीचे प्रसिद्ध कवी* *१९६७:डॉ,मनोज केशवराव फडणीस-- लेखक* *१९६४:प्रा.डॉ.तनुजा नाफडे -- संगीततज्ज्ञ, लेखिका* *१९५९:हर्षा हरिष वाघमारे -- कवयित्री* *१९५१:प्रा.डॉ.शशिकांत लोखंडे--लेखक, समीक्षक**१९५०:विजयराव दामोदर रुम --- लेखक, सामाजिक कार्यकर्ते* *१९५०:मीना वांगीकर-- मराठी-कन्‍नड अनुवाद करणाऱ्या एक लेखिका(मृत्यू:२८ ऑक्टोबर २०१५)**१९४५:अनिरुद्ध अनंत कुलकर्णी -- लेखक* *१९४५:डॉ.मधुकर केशव वर्तक-- लेखक, संपादक* *१९४२:डॉ.भगवान रंगनाथ कोठेकर -- लेखक* *१९४२:जयश्री गडकर – प्रसिद्ध अभिनेत्री (मृत्यू:२९ ऑगस्ट २००८)**१९३७:सुलभा अरविंद देशपांडे--- हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्री(मृत्यू:४ जून २०१६)**१९३३:रा.रा.जांभेकर -- लेखक**१९३१:वसंत दामोदर कुलकर्णी -- मराठी वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक,संपादक* *१९२१:विद्याधर भास्कर उजगरे-- लेखक* *१९११:भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (मृत्यू:११ जानेवारी १९९७)**१८९९:सूर्यकांत त्रिपाठी "निराला"-- प्रसिद्ध भारतीय कवी,कादंबरीकार,निबंधकार आणि कथा-लेखक(मृत्यू:१५ऑक्टोबर१९६१)**१८९८:बाळकृष्ण रामचंद्र मोडक-- लेखक,'मुलांचे मासिक'कार(मृत्यू:२४ फेब्रुवारी १९९०)**१८९४:डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (मृत्यू:१ जानेवारी १९५५)**१८७५:जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू:४ ऑगस्ट १९९७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:श्रीधर माडगूळकर-- ग.दि. माडगूळकर यांचे पूत्र आणि ज्येष्ठ लेखक(जन्म:६ फेब्रुवारी २९४७)**१९९८:ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (जन्म:१९ डिसेंबर १९१९)**१९९१:नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री (जन्म:४ जून १९३६)**१९८४:मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव-- श्रेष्ठ रशियन लेखक,नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२४ मे १९०५)**१९७७:रा.श्री.जोग – साहित्य मीमांसक,कवी व विचारवंत (जन्म:१५ मे १९०३)**१९७५:गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक(जन्म: १८ सप्टेंबर १९१२)**१९६५:’माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते (जन्म:१९ मे १९२५)**१८२९:चन्नम्मा – कित्तूरची राणी (जन्म:२३ आक्टोबर १७७८)~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीम कडून हार्दीक शुभेच्छा .........!.... Motivational Article .....*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के स्वतंत्र आरक्षण, राज्याच्या दोन्ही सभागृहात विधेयक एकमताने मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन:विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आजपासून राज्यात बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांच्यासह सोनिया गांधी व जेपी नड्डांची राज्यसभेवर बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'आप'चे कुलदीप कुमार चंडीगडचे नवे महापौर; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतकरी आंदोलन: शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला, 21 तारखेला दिल्लीकडे करणार कूच*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, एकाचवेळी मनोज तिवारी, सौरभ तिवारी, वरुण अॅरोन, धवल कुलकर्णी आणि फैज फजल या पाच क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंक / DIGIT* संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी. मानवजातीच्या बाल्यावस्थेत प्रत्येक मानवाला मी एक व हा दुसरा एवढे साधे ज्ञान असणार यात वाद नाही. म्हणजे दोन अंक मोजण्याइतपत त्याची प्रगती उपजतच असणार. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची मोजदाद करावयास तो हळूहळू शिकला असेल. प्राथमिक अवस्थेमध्ये हाताची बोटे, गारगोट्या, झाडाची पाने, काठ्या यांचा उपयोग मोजण्यासाठी मानव करीत असे. जगातील बहुतेक जमाती प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्यपणे अशाच तऱ्हेने अंकनिर्देश करीत असत. मानवास लेखनकला अवगत झाल्यावर तो एकेक अक्षराचा अंकासाठी उपयोग करू लागला. अशा तऱ्हेची पद्धती अ‍ॅरेमाइक, हिब्रू, खरोष्ठी, ब्राह्मी आणि ग्रीक लिपींत दिसून येते.मानवाने अंकाचा शोध लावला त्या वेळेस तो अंकांचे उच्चार कसे करीत असणार याविषयी गूढ वाटणे साहजिक आहे. वेदकालापासून सर्व ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस मौखिक पद्धतीने शतकानुशतके दिले गेल्यामुळे भारतात अंकांचे उच्चार कोणते होते हे स्पष्ट होते; ते म्हणजे एक, द्वि, त्रि, चतुर्, पंचन्, षष्, सप्तन्, अष्टन्, नवन् आणि दशन् हे होत. या संस्कृत उच्चारांवरून पुढे मराठीत एक, दोन, तीन वगैरे संज्ञा अपभ्रष्ट स्वरूपात रूढ झाल्या.ईजिप्त : लेखनकलेचे सर्वांत प्रचीन नमुने ईजिप्तमध्ये सापडतात; तसेच अंकलेखनाचे नमुनेही (इ.स.पू.सु. ३४००) तेथेच सापडतात. तेथे एक ते नऊ ह्या अंकांसाठी उभ्या दंडांची योजना केलेली आढळते. ही रीत ⇨हायरोग्लिफिक लिपि-पद्धतीचा एक भाग आहे. दहा, शंभर, हजार ह्या संख्यांसाठी मात्र तेथे वेगळी चिन्हे वापरलेली आढळतात. लाखाकरिता बेडकाचे व दहा लाखाकरिता आश्चर्याचे बाहू पसरलेल्या मानवाचे चित्र काढले जाई. यानंतरच्या काळात ईजिप्तमध्ये हिअरेटिक अंक (इ.स.पू.सु. १२ वे शतक) आणि त्यापासून पुढे डेमॉटिक अंक (इ.स.पू.सु. ७ वे ते ३ रे शतक) उपयोगात आणले गेले. हिअरेटिक आणि डेमॉटिक अंकांतील फरक काटेकोरपणे दाखविणे कठिण असले, तरी हिअरेटिक अंकांपासून डेमॉटिक अंक विकसित झाले असावेत असे दिसते. जलद लेखनासाठी वरील दोन्ही पद्धती मूळ हायरोग्लिफिक पद्धतीपासून निघाल्या असाव्यात. हायरोग्लिफिक पध्दतीपेक्षा हिअरेटिक पद्धतीत अधिक चिन्हे असल्याने तीत लहानमोठ्या संख्या अधिक संक्षिप्तपणे दर्शविणे सोयीचे होते. हिअरेटिक अंकपद्धतीत आधी मोठ्या मूल्यांची चिन्हे आणि त्यानंतरत्यापुढे (उजवीकडे) कमी मूल्यांची चिन्हे लिहिली जात*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची असते. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) IPL स्पर्धेतील *सार्वकालिक महान कर्णधार* म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत एकूण किती देश आहेत ?३) लोकमतच्या वतीने दिला जाणारा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार कोणत्या शिक्षकाला देऊन सन्मानित करण्यात आले ?४) राजा दशरथ यांनी बाणाने श्रवण कुमारला मारले त्या बाणाचे नाव काय होते ?५) २०२३ या वर्षाचा ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे ? *उत्तरे :-* १) महेंद्रसिंग धोनी, भारत २) १५ देश ( ५ स्थायी व १० अस्थायी ) ३) आनंदा आनेम वाड, डहाणू, जि. पालघर ४) शब्दवेधी बाण ५) प्रख्यात उर्दू कवी, गीतकार गुलजार व संस्कृतचे महापंडित जगद्गुरु रामभद्राचार्य*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सचिन मानधनी, धर्माबाद👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक, धर्माबाद👤 संजय कासलोड👤 पियूष मुजळगे, धर्माबाद👤 एकनाथ पांचाळ👤 डॅनियल ग्राहम्बल, शिक्षक, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कदा ओळखीमाजि दूजे दिसेना। मनी मानसी द्वैत काही वसेना॥ बहूता दिसा आपली भेट जाली। विदेहीपणे सर्व काया निवाली॥२०१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो पर्यंत माणूस जिवंत असतो तो पर्यंत एकमेकांना आनंदाने , मिठी मारणे, हाताला , हात मिळवणे, सोबत मिळून, मिसळून खाणे, पिणे होत असते.पण, एकदा का त्या माणसाचा मृत्यू झाला की, लगेच त्यापासून पाच हात दूर रहाताना दिसतात. एवढेच नाही तर...त्या मृत शरिराला स्पर्श केल्यावर विटाळ मानून आंघोळ करून घेतात. तर कोणी साधं स्पर्श सुद्धा करत नाही. भलेही माणसाचे जीवन कितीही सुंदर असले तरी ते क्षणभंगुर आहे. म्हणून अति माजू नये व गर्वाच्या भोवऱ्यात अडकू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लेकीची माया*एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला  ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागलेतेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....आता तो  माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .*आशय* ......मुली आपल्या आईवडिलांनाच आपली खरी दौलत समजतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/07/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक सामाजिक न्याय दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.**१९९९:भारत पाक दरम्यान दिल्ली ते लाहोर बस सेवेस प्रारंभ* *१९८८:महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री कासू ब्रह्मानंद रेड्डी यांनी सूत्रे हाती घेतली* *१९८७:अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य**१९८७:मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले**१९७८:शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.**१९७१:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यांचे अनावरण उपराष्ट्रपती डॉ.गोपाळ स्वरूप पाठक यांच्या शुभहस्ते झाले.**१७९२:जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:प्रणाली शैलेश चव्हाटे-- कवयित्री, लेखिका* *१९७८:रचना-- लेखिका,कवयित्री* *१९७६:रोहन सुनील गावस्कर-- भारतीय क्रिकेटपटू**१९६९:विजय अर्जुन सावंत-- कवी,लेखक**१९६३:नागेश सूर्यकांतराव शेवाळकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२:मीना शेट्टे-संभू-- संपादिका,लेखिका* *१९५७:प्रा.बसवराज कोरे-- जेष्ठ लेखक**१९५६:अन्नू कपूर-- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९५५:लखनसिंह कटरे-- प्रसिद्ध कवी,कथाकार,झाडीबोली साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष* *१९५२:डॉ.रा.गो.चवरे-- कादंबरीकार, कथाकार**१९५१:गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान**१९४१:प्रा.माधव थोरात -- कवी* *१९३७:सुसंगति महादेव गोखले -- बालसाहितिक* *१९२८:आबाजी नारायण पेडणेकर-- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.(मृत्यू:११ ऑगस्ट २००४)**१९०४:अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू:१८ डिसेंबर १९८०)**१८४४:लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:५ सप्टेंबर १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:बेला बोस- भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री(जन्म:१८ एप्रिल १९४१)**२०१५:गोविंद पानसरे-- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते(जन्म:२४ नोव्हेंबर १९३३)**२०१२:डॉ.रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक,साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म:६ आक्टोबर १९४३)**२००७:डॉ.किशोर शांताबाई काळे--- डॉक्टर व प्रसिद्ध लेखक.काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.(जन्म:१ जून १९६८)**२००१:इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९)**१९९७:श्री.ग.माजगावकर–पत्रकार,लेखक ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक(जन्म:०१ अगस्त १९२९)**१९९४:त्र्यं.कृ.टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू* *१९७४:केशव नारायण काळे--- मराठीतील एक कवी,नाटककार,समीक्षक,चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू:२० फेब्रुवारी १९७४)* *१९५८:हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर-- भारतात चित्रपट बनवणारे भारतीय(जन्म:१५ मार्च, १८६८)**१९५०:बॅ.शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार,नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म:६ सप्टेंबर १८८९)**१९१०:ब्युट्रोस घाली– इजिप्तचे पंतप्रधान (जन्म:१८४६)**१९०५:विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: १८४६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कादंबरी - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजाला कथेच्या माध्यमातून सांगावं तसेच लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून दिनांक 01 जुलै 2020 रोजी लक्ष्मी या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. आपल्या लेखन योग्य दिशेने जात आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी काही मित्रांना सोशल मिडियाद्वारे पाठवीत राहिलो. अनेक वाचकांना ही कथा पसंत येऊ लागली. काही वाचकांनी फोन करून लेखनास शुभेच्छा दिल्या. काही जणांनी ही कथा वास्तविक जीवनाशी निगडीत आहे, असे म्हटले. आमच्या जवळच्या एका शिक्षिकेने त्यांच्या जीवनात आलेल्या चढ-उताराची अनेक प्रसंग सांगून मन हलके केले. पुढचा भाग कधी येणार ? हा प्रश्न तर कित्येक वाचकांचा होता. आपल्या सर्वांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनामुळे मी लक्ष्मी कादंबरी पूर्ण करू शकलो. आपले प्रेम असेच कायम लिहिणाऱ्याच्या पाठीवर असू द्यावे म्हणजे साहित्याची नवनिर्मिती होऊ शकेल. पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769..... पूर्ण कादंबरी ( एकूण 10 भाग ) वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणासंबंधी आज राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार, मराठ्यांना किती टक्के आरक्षण मिळणार ? याकडे राज्याचं लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषात किल्ले शिवनेरी दुमदुमली ! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद पवार गटाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय बैठकीत सरकारने धान आणि गहू व्यतिरिक्त मसूर, उडीद, मका आणि कापूस पिकांवर एमएसपी म्हणजेच हमीभाव देण्याचे केले मान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एक लाख उद्योजक घडवण्याचे ध्येय ठेवून काम करणार:अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला अन् मालिकेत 2-1 ने मिळवली आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *हवेचा दाब कसा मोजतात ?* 📙 ***************************आपल्याकडे सभोवती सगळीकडे हवा आहे. वारा वाहतो तेव्हा हवा असल्याचं आपल्याला जाणवतं. एरवी ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तिला काही वजन असेल याची कल्पनाही आपल्याला येत नाही. पण जमिनीपासून थेट आकाशात कितीतरी उंचीपर्यंत हवा असते. त्यामुळे जमिनीवर तिचा सतत दाब पडत असतो. जमिनीच्या एक चौरस मीटरच्या तुकड्यावर हवेचा असा जो स्तंभ उभा असतो, त्याचा जो दाब पडतो त्याला हवेचा दाब म्हणतात. हवामानखातं जेव्हा उद्याच्या किंवा पुढील आठवड्याच्या हवामानाचा अंदाज देतं तेव्हा निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या हवेच्या दाबाची माहितीही दिली जाते. जेव्हा अनपेक्षितरित्या पाऊस येतो तेव्हा कोणत्यातरी ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळीच आपल्याला हवेचाही दाब असतो हे आठवतं. हवेचा हा दाब पास्कल किंवा बार या एककांमध्ये मोजला जातो. पण ते झालं वैज्ञानिक परिमाण. एरवी आपल्याला ओळखीचं असणारं परिमाण म्हणजे पाऱ्याची उंची. जसा रक्तदाब नळीतल्या पाऱ्याच्या उंचीत मोजला जातो तसाच हवेचा दाबही मोजला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला बॅरोमीटर असं म्हणतात. त्यात एका भांड्यात पारा ठेवून त्यात एक उलटी नळी ठेवलेली असते. त्या नळीतील हवा काढून घेतलेली असल्याने तिच्यात निर्वात पोकळी निर्माण झालेली असते. भांड्यातल्या पाण्यावर पडणाऱ्या हवेच्या दाबामुळे पारा त्या नळीत चढतो. नळीतल्या पार्‍याचं वजन आणि त्या भांड्यातल्या नळीच्या तोंडाच्या क्षेत्रफळाएवढ्या जागेवरच्या हवेचं वजन समान असतं. त्यामुळे नळीतल्या पाऱ्याची उंची ही त्या हवेच्या दाबाचं माप असल्याचं धरलं जातं. सामान्यत: समुद्रसपाटीवर पाऱ्याची उंची ७६० मिलिमीटर असते. तोच हवेचा दाब मानला जातो. एका चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळावरच्या हवेचा दाब एक किलोन्यूटन असतो.हे अर्थात अतिशय प्राथमिक स्वरूपाचं बॅरोमीटर झालं. हवेचा दाब मोजावयास सुरुवात झाली तेव्हा अशा यंत्राचा वापर होत असे. आजकाल याच तत्त्वावर आधारित पण अचूक मोजमाप करणारी इलेक्ट्रॉनिक बॅरोमीटर्स उपलब्ध आहेत. जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. सहाजिकच तिथं हवेचा दाब घसरत जातो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली ?२) महिला कसोटी इतिहासात सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम कोणी केला ?३) 'सणांचे शहर' असे कोणत्या शहराचे टोपणनाव आहे ?४) श्रीरामांनी बालीला कोणत्या वृक्षामागे लपून बाण मारला होता ?५) अतिथंड हवामानात पाण्याचे नळ ( पाईप ) का फुटतात ? *उत्तरे :-* १) उल्कापात २) अँनाबेल सदरलॅण्ड, ऑस्ट्रेलिया, २४८ चेंडूत ३) मदुराई ४) साल वृक्ष ५) पाण्याचे बर्फ होतांना ते प्रसरण पावते.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 नागेश सु. शेवाळकर, जेष्ठ बालसाहित्यिक, पुणे👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि.प्रा.शा.शिरूर ता. उमरी जि. नांदेड.👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद👤 विठ्ठल डोनगिरे👤 बालाजी विठ्ठल उगले👤 नागेश काळे, लातूर👤 साहेबराव पाटील कदम👤 उत्तम कानींदे, सहशिक्षक, किनवट👤 संतोष कामगोंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कळे आकळे रुप ते ज्ञान होता।तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे॥२००॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा.....🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट करून मिळालेले समाधान जगावेगळे असते . व इतरांनाच्या विषयी कपट, कारस्थान करून, धोका देऊन मिळविलेला आनंद स्वतःचा तसेच मानव जातीचा अपमान केल्यासारखे होते. दोन्ही मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून कष्ट करून जर आनंद मिळवता येत नसेल तर इतरांचे वाईट करून निसर्गाच्या नियमाचे उलंघन करू नये.कारण निसर्गाचे डोळे झाकले नसतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🌅जीवनाचे सार* *एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त‍ पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हा‍ला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्या्त द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही..'' देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू , तुझ्या म्हणण्या प्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या् पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे् इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हाताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय ओकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येईल पण तसे होत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हालाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हाने मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्ह्णून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्या‍साठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.* *🧠थोडक्यात- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/02/chatrpati-shivaji-maharaj.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.**१९६४:अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.**१९५२:नाना जोग लिखित 'भारती' या नाटकाचा प्रथम प्रयोग नागपूर नाट्य मंडळाने नागपूर येथे केला**१९४४:दुसऱ्या महायुद्धात जपानी जिंकलेली अंदमान निकोबार बेटे आजाद हिंद फौजेच्या स्वाधीन करण्यात आली**१९३३:अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.**१९२७:’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१२:राम गणेश गडकरी यांचे पहिले नाटक "प्रेम संन्यास" रंगभूमीवर आहे.**१८०१:अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:प्रफुल्ल अंदुरकर-- कवी* *१९७५:प्रसाद ओक-- प्रसिद्ध अभिनेता* *१९६८:विनायक नारायण अनिखिंडी -- प्रसिद्ध कवी,लेखक**१९६५:सदानंद कदम-- प्रसिद्ध लेखक, संग्राहक* *१९६३:सुजाता मिलिंद बाबर -- लेखिका, संपादिका,अनुवादक**१९६१:संजीव वसंत वेलणकर -- लेखक,सोशल मीडियावर दैनंदिन लेखन**१९५७:हेमंत श्रीराम देशपांडे-- लेखक**१९५७:प्रफुल्ल मनोहरभाई पटेल-- माजी केंद्रीय मंत्री**१९५४:कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव-- तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री* *१९५०:प्रा.जयंतकुमार गणपतराव बंड-- लेखक,संपादक* *१९५०:प्रा.उद्धव निंबा महाजन-- प्रसिद्ध कवी,लेखक**१९४३:डॉ.रूपचंद निखाडे-- लेखक**१९४२:प्राचार्य अनुराधा कृष्णराव गुरव --प्रसिद्ध लेखिका,कवयित्री,शैक्षणिक विचारवंत(मृत्यू:३०मे२०२०)**१९४०:गजानन जानोजी बागडे-- कवी (मृत्यू:१ सप्टेंबर २०१२)**१९३५:रवी टंडन-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू:११ फेब्रुवारी २०२२)* *१९३२:सुहासिनी इर्लेकर---मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक(मृत्यू:२८ आॅगस्ट २०१०)**१९१८:कृष्ण भालचंद्र फडके -- लेखक* *१९०२:सीताराम गणपतराव मनाठकर-- कवी ( मृत्यू:मे १९४९)**१९०२:प्रभाकर वासुदेव बापट-- समीक्षक (मृत्यू:२६ जुलै १९४४)**१८७४:थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती,आय.बी.एम.(IBM) चे अध्यक्ष (मृत्यू:१९ जून १९५६)**१८५४:फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू:२२ नोव्हेंबर १९०२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:चंद्रकांत मांडरे--- प्रसिद्ध मराठी अभिनेते(जन्म:१३ ऑगस्ट१९१३)**१९९५:प्रा.पां.कृ.सावळापूरकर--जुन्या पिढितील संशोधक,विचारवंत (जन्म:१ जुलै १९०७)* *१९९४:चिमणभाई पटेल -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री(जन्म:३ जून १९२९)**१९९१:कृष्णाबाई हरी मोटे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ जुलै १९०३)**१९८६:जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म:१२ मे १८९५)**१९७८:पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार,नाटककार,कवी आणि समीक्षक (जन्म:२ ऑगस्ट १९१०)**१८८३:वासुदेव बळवंत फडके--राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी,काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म:४ नोव्हेंबर १८४५)**१८८१:लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर,समाजसेवक (जन्म: १८११)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिवजयंती निमित्ताने प्रासंगिक लेख*महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान :- छत्रपती शिवाजी महाराज*महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि रयतेचा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असा एक ही व्यक्ती राज्यात शोधून ही सापडणार नाही. आपल्या राज्यातच नाहीतर देशातील अनेक राज्यात व जगातील काही देशांत शिवाजी महाराजांचे कार्य अनेकांना स्फूर्ती व प्रेरणा देत असते.................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीच, 20 तारखेआधी निर्णय घ्या ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द, विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्दल कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धनगर समाजाला धक्का, ST प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या, ‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच नसल्याचंही नोंदवलं निरीक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याचं दुःख, पण खासदार कॉंग्रेसचाच होणार; नांदेडच्या कार्यकर्त्यांचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दादर मुंबई येथे 22 व 23 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन, सर्वाना विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दयानंद घोटकर यांचा ‌‘प्रेम कवी' पुरस्काराने सन्मान:रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आर. अश्विनने गाठला 500 बळीचा टप्पा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का?*गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते आणि आपण ती अनुभवतोसुद्धा विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे डोक्यालाच हात लावायची पाळी! त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर. ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.गारा घडताना या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठं, अधिक मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात.हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.गारेच्या अंतरंगात डोकावताना प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो. गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते. एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं. ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो. हवामान अभ्यासकांनी केलेली ही कारणमीमांसा. असं हे इवल्याशा गारेचं अनोखं विश्व. हवामान काय किंवा निसर्ग काय, त्याच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!बी.बी.सी मराठी*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'गणित म्हणजे सर्व विज्ञानांची राणी'* हे विधान कोणी केले ?२) गाय व बैल यांचे वय त्यांच्या शरीराच्या कोणत्या भागावरून ओळखतात ?३) गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) अंधारात चमकण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात ?५) 'आशिया' या शब्दाची व्युत्पत्ती हिब्रू भाषेतील कोणत्या शब्दापासून झाली आहे ? *उत्तरे :-* १) कॉर्ल फ्रेडरिक गाउस, जर्मन गणितज्ञ २) दातांवरून ३) अमरावती ४) फॉस्फरसन्स ५) आसू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 अगस्ती भाऊसाहेब चासकर, 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण एडके👤 विकास गायकवाड👤 लक्ष्मण गंगाराम होरके👤 अशोक इंदापुरे, विशेष मागास प्रवर्ग अभ्यासक सोलापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नभासारिखे रुप या राघवाचे।मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥तया पाहता देहबुद्धी उरेना।सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना॥१९७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बढाईखोर माणूस*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या काकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८: प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांना मध्य प्रदेश सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला.* *१९८५:लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना.**१९५९:फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या अध्यक्षपदी**१९२७:भारत आणि नेपाळ यांच्यात रेल्वे वाहतूक सुरू**१९१८:लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.**१९१४:लष्करी वस्तू संग्रहालयाची अहमदनगर येथे स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:साबिना थाॅमस फोस-- कवयित्री* *१९८३:कीर्ती विजय लंगडे-- कवयित्री,लेखिका**१९८१:चिन्मयी ऋषिकेश चिटणीस -- कवयित्री* *१९७८:वासिम जाफर – भारतीय क्रिकेटपटू**१९७५:प्रा.डॉ.वर्षा तोडमल -- कवयित्री लेखिका,संपादिका**१९६९:गजेंद्र विठ्ठल अहिरे-- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक,लेखक आणि कवी**१९६२:जयंत राजाराम पाटील--माजी मंत्री**१९५७:मल्लिका अमर शेख(मल्लिका नामदेव ढसाळ)-- मराठी लेखिका**१९५६:सरोज नंदकिशोर भागवत-- प्रसिद्ध लेखिका**१९५४:प्रा.डॉ.विजय लक्ष्मीकांत धारुरकर -- प्रसिद्ध लेखक* *१९५४:मायकेल होल्डिंग – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू**१९५२:डॉ.सुमन नवलकर-- प्रसिद्ध बाल साहित्यिक* *१९४१:डॉ.वसुधा पांडे-- कवयित्री,लेखिका**१९३२:मनोहर गजानन काटदरे-- ज्येष्ठ नाटककार(मृत्यू:१० जुलै २०१४)* *१९२७:प्राचार्य राम डोके-- जेष्ठ विनोदी साहित्यिक (मृत्यू:१ एप्रिल २००८)**१९२४:उषा हरिश्चंद्र उजगरे -- लेखिका, प्रवासवर्णनकार (मृत्यू:१९ जून २००२)* *१९२०:इंद्र सेन जोहर (आय.एस.जोहर)-- भारतीय अभिनेता,लेखक,निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:१० मार्च १९८४)**१९११:डॉ.भालचंद्र गोपाळ बापट-- वृत्तपत्र संपादक व शिक्षणतज्ञ**१८८४:विनायक सदाशिव वाकसकर-- इतिहास अभ्यासक चरित्रकार**१८७६:रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर,फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू,मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री(मृत्यू:६ मे १९६६)**१८१४:रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर ऊर्फ तात्या टोपे-- सेनापती (मृत्यू:१८ एप्रिल १८५९)**१७४५:माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा,१६ व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेला अत्यंत कर्तबगार पेशवा. पानिपतच्या युध्दानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली.(मृत्यू:१८ नोव्हेंबर १७७२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्राचार्य वामन ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर-- निगडी,पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक(जन्म:१९४२)**२०१५:रावसाहेब रामराव पाटील(आर.आर. पाटील)- माजी उपमुख्यमंत्री (जन्म:१६ऑगस्ट १९५६)**२००१:रंजन साळवी – 'पिंजरा', 'सवाल माझा ऐका', 'केला इशारा जाता जाता' आदी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक* *२०००:बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ,पद्मश्री, ’इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक**१९९६:आर.डी.आगा – उद्योगपती,थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९९४:पं.निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म:४ जुलै १९१२)**१९६८:नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी,पहिले मराठी साखर कारखानदार (जन्म:१७ आक्टोबर १८९२)**१९६४:आनंदराव कृष्णाजी टेकाडे--कवी, गीतकार(जन्म:५ एप्रिल १८९०)**१९५६:मेघनाद साहा – खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य(जन्म:६ आक्टोबर १८९३)**१९४४:धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक,छायाचित्रकार,दिग्दर्शक,संकलक, वेशभूषाकार,कलादिग्दर्शक इ.अनेक जबाबदार्‍या ते सांभाळत असत (जन्म:३० एप्रिल १८७०)**१९२३:रावबहादुर विष्णू मोरेश्वर महाजनी -- मराठीतील समीक्षक,कवी व नाटककार(जन्म:१२ नोव्हेंबर १९५१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकच ध्यास ; वाचन विकास*शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून आहे. यासोबत ते पुढे असे म्हणतात की, आपल्या मुलांचा अभ्यास पक्का करायचा असेल तर तो शाळेतील पुस्तके वाचतो की नाही हे तर बघावेच, याशिवाय अन्य काही अवांतर पुस्तक वाचन करतो की नाही ................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तंत्रस्नेही शिक्षक आनंदा आनेमवाड यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इअर पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *डॉक्टरांना माघारी पाठवलं, मनोज जरांगेंचे पुन्हा उपचार घेण्यास नकार... मुंबई हायकोर्टाने घेतली दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय, पक्षात फूट नसल्यामुळे दोन्हीही गटाचे आमदार पात्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यसभेसाठी सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल ! महायुतीकडून अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी, मिलिंद देवरांसह प्रफुल्ल पटेलांनी मानले दिग्गजांचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इलेक्टोरल बाँड्स घटनात्मक दृष्ट्या अवैध ; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरी सोडतीचा मुहूर्त 24 फेब्रुवारीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोहित शर्मा, रवींद्र जडेजाची शतकं, सरफराजचं पदार्पणात अर्धशतक, इंग्लंडविरोधात तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *हवेचा दाब कसा मोजतात ?* 📙 ***************************आपल्याकडे सभोवती सगळीकडे हवा आहे. वारा वाहतो तेव्हा हवा असल्याचं आपल्याला जाणवतं. एरवी ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तिला काही वजन असेल याची कल्पनाही आपल्याला येत नाही. पण जमिनीपासून थेट आकाशात कितीतरी उंचीपर्यंत हवा असते. त्यामुळे जमिनीवर तिचा सतत दाब पडत असतो. जमिनीच्या एक चौरस मीटरच्या तुकड्यावर हवेचा असा जो स्तंभ उभा असतो, त्याचा जो दाब पडतो त्याला हवेचा दाब म्हणतात. हवामानखातं जेव्हा उद्याच्या किंवा पुढील आठवड्याच्या हवामानाचा अंदाज देतं तेव्हा निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या हवेच्या दाबाची माहितीही दिली जाते. जेव्हा अनपेक्षितरित्या पाऊस येतो तेव्हा कोणत्यातरी ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळीच आपल्याला हवेचाही दाब असतो हे आठवतं. हवेचा हा दाब पास्कल किंवा बार या एककांमध्ये मोजला जातो. पण ते झालं वैज्ञानिक परिमाण. एरवी आपल्याला ओळखीचं असणारं परिमाण म्हणजे पाऱ्याची उंची. जसा रक्तदाब नळीतल्या पाऱ्याच्या उंचीत मोजला जातो तसाच हवेचा दाबही मोजला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला बॅरोमीटर असं म्हणतात. त्यात एका भांड्यात पारा ठेवून त्यात एक उलटी नळी ठेवलेली असते. त्या नळीतील हवा काढून घेतलेली असल्याने तिच्यात निर्वात पोकळी निर्माण झालेली असते. भांड्यातल्या पाण्यावर पडणाऱ्या हवेच्या दाबामुळे पारा त्या नळीत चढतो. नळीतल्या पार्‍याचं वजन आणि त्या भांड्यातल्या नळीच्या तोंडाच्या क्षेत्रफळाएवढ्या जागेवरच्या हवेचं वजन समान असतं. त्यामुळे नळीतल्या पाऱ्याची उंची ही त्या हवेच्या दाबाचं माप असल्याचं धरलं जातं. सामान्यत: समुद्रसपाटीवर पाऱ्याची उंची ७६० मिलिमीटर असते. तोच हवेचा दाब मानला जातो. एका चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळावरच्या हवेचा दाब एक किलोन्यूटन असतो.हे अर्थात अतिशय प्राथमिक स्वरूपाचं बॅरोमीटर झालं. हवेचा दाब मोजावयास सुरुवात झाली तेव्हा अशा यंत्राचा वापर होत असे. आजकाल याच तत्त्वावर आधारित पण अचूक मोजमाप करणारी इलेक्ट्रॉनिक बॅरोमीटर्स उपलब्ध आहेत. जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. सहाजिकच तिथं हवेचा दाब घसरत जातो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा डॉ.मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारतीय हरितक्रांतीचे जनक, भारतरत्न डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचे पूर्ण नाव काय आहे ?३) अबुधाबी येथे sandstone चा वापर करून आखातातील सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?४) नागपूर ते गोवा हा धार्मिक स्थळांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जात आहे ?५) फुटबॉलमध्ये आता रेड आणि यलो कार्डनंतर कोणत्या नविन कार्डचा समावेश करण्यात येणार आहे ? *उत्तरे :-* १) पद्मभूषण डॉ.सायरस पूनावाला २) मोनकोंबू शिवसांबन स्वामीनाथन ३) नरेंद्र मोदी, पंतप्रधान ४) ११ जिल्हे ५) ब्ल्यू कार्ड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 कु. सानिका कुणाल पवारे, कुंडलवाडी👤 बाप्पा महाजन, आदर्श शिक्षक, नाशिक👤 प्रदीप वाघमारे, पुणे👤 सतीश चौहान, चौसाळा👤 प्रमोद हिवराळे, धर्माबाद👤 लता विष्णु वायाळ (स.शिक्षिका) भोकर👤 मारोती गंगाधर जाधव👤 बजरंग येमुल, नांदेड👤 शंकर छपरे👤 बालाजी पाटील जाधव👤 राजू इटलावार👤 महंमद सादिक खान👤 शंकर मासूनवार👤 डॉ. मुखत्यार आतार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नभी वावरे जा अणुरेणु काही।रिता ठाव या राघवेवीण नाही॥तया पाहता पाहता तोचि जाले।तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले॥१९६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या विषयी नको त्या शब्दात बोलून स्वतःचे समाधान व आनंद मानण्यात किती सोपे आहे..? पण, खऱ्या अर्थाने आपल्या बोलण्यात किती तथ्य आहे.? याचा पडताळा आपण कधी तरी घेत असतो काय.? याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे.जर एखाद्याच्या विषयी चांगले बोलणे होत नसेल तर नको त्या शब्दात सांगून आपलीच वेळ वाया घालवू नये. भलेही आज स्वतःचा समाधान मानून घेण्यात जरी आनंद मिळत असेल तरी, ती व्यक्ती नसल्यावर ह्या सर्व गोष्टींना काहीही अर्थ नसतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरी नक्कल*भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/02/kuldipak.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री सुब्रहण्यम यांनी सूत्रे हाती घेतली* *१९६०:परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन* *१९४२:दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती.८०,००० भारतीय,ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.**१९३९:काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.**१९३२:पुण्यात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नौरोसजी वाडिया महाविद्यालय सुरू झाले**१८७९:अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.*  *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर -- कवी**१९८२:सचिन आत्माराम पाटील-होळकर-- कृषितज्ज्ञ,लेखक* *१९७२:किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी-- पत्रकार, लेखक* *१९६७:रमेश परसराम बोपचे-- कवी**१९६७:संजीव शंकरराव अहिरे-- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणारे लेखक,कवी* *१९६४:आशुतोष गोवारीकर-- प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक,अभिनेता,पटकथा लेखक आणि निर्माता* *१९५९:कलानंद जाधव(पुंजाराव दताराव जाधव)-- कवी,बालगीतकार,लेखक* *१९५६:विनायक महादेव गोविलकर -- जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ,व्याख्याते,लेखक* *१९५६:डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू**१९५४:राजेंद्र गजानन साळोखे -- लेखक* *१९५३:दत्तात्रय कडू लोहार-- कवी**१९४९:नामदेव लक्ष्मण ढसाळ – जेष्ठ साहित्यिक (मृत्यू:१५ जानेवारी २०१४)**१९४७:श्रीधर शंकरराव खंडापूरकर-- कवी,लेखक**१९४७:रणधीर राज कपूर-- भारतीय अभिनेता,चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक* *१९४६:महादेवराव नथुजी घाटुर्ले-- विदर्भातील कवी,लेखक**१९२८:शांता हरी मिसाळ-- जेष्ठ संगितसमिक्षक,कथाकार,कादंबरीकार(मृत्यू:७ मे २०१३)**१९१८:वसंत कृष्ण जोशी--संस्थापक संपादक-‘दक्षता’मासिक, लोकप्रिय पोलीस तपास कथाकार(मृत्यू:२० डिसेंबर २००४)**१९१७:गोविंद रामचंद्र आफळे-- मराठीतून कीर्तने करणारे परंपरागत कीर्तनकार(मृत्यू:१ नोव्हेंबर १९८८)**१८९६:रामचंद्र नारायण वेलिंगकर --ज्ञानेश्वरी शब्दकोशाचे कर्ते**१८७५:जनार्दन सखाराम करंदीकर-केसरी या वृत्तपत्राचे संपादक,लेखक (मृत्यू:१२ मार्च १९५९)**१८२४:राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५),भारतीय चित्रकला,शिल्पकला,राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (मृत्यू:२६ जुलै १८९१)**१७१०:लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू:१० मे १७७४)**_१७३९:थोर मानवतावादी संत श्री.सेवालाल महाराज-- जन्म तत्कालीन म्हैसुर प्रांतामध्ये सुवर्णकूप्पा येथे,आजीवन ब्रह्मचारी राहुन दीन दुःखीतांच्या सेवेसाठी व सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले._**१५६४:गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:८ जानेवारी १६४२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:विनायक जोशी-- मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे गायक(जन्म:११ मे १९६१)**२०१८:मनोहर मारोतीराव तल्हार-- प्रसिद्ध मराठी लेखक(जन्म:१४ अाॅक्टोबर१९३२)**२०१०:श्रीराम पांडुरंग कामत-- ज्येष्ठ विश्व चरित्रकोशकार (मृत्यू:१७ मे १९३४)**२००८:मनोरमा-- बॉलीवूडमधील भारतीय अभिनेत्री(जन्म:१६ ऑगस्ट१९२६)**१९८८:रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ११ मे १९१८)* *१९८०:कॉंम्रेड एस.एस.मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष* *१९५३:सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक (जन्म:१९०२)**१९४८:सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (जन्म:१६ ऑगस्ट १९०४)**१८६९:मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म:२७ डिसेंबर १७९७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवनातील नैतिक मूल्ये सांगणारा कथासंग्रह कुलदीपक*या कथासंग्रहातील कथांमधून जीवनातील नैतिक मूल्ये, चारित्र्य, सद्गुण, सकारात्मकता हे संस्कार मोती सहज मिळतात. एकूणच या कथासंग्रहातील एकूण 17 कथा ह्या मुलांसाठी संस्कारक्षम असून सर्वच वयोगटातील वाचकांसाठी वाचनीय असून वाचल्यावर मानसिक समाधान देणारे आहेत............. पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.पुस्तक परिचय - मीना खोंड, हैद्राबाद, 7799564212~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अबुधाबीतील मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, अरब जगतातील पहिल्या हिंदू मंदिराबद्दल प्रचंड उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना दिली उमेदवारी तर एकनाथ शिंदेंकडून मिलिंद देवरांना संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे आक्रमक होताच मंत्रिमंडळाचा निर्णय : मराठा आरक्षणावर चर्चेसाठी 20 फेब्रुवारीला होणार विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आस्तिक कुमार यांची पुण्याला बदली : अ‌ॅड. दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यात; स्वच्छ भारत अभियानाला मिळणार बळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राजकोट येथे आजपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙 घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.‘सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••' जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इतर सर्वांपेक्षा जलद गतीने शिकणं "*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोंदिया जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे ?२) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे ?३) भारताचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे ?४) अंडर १९ क्रिकेट विश्वकप - २०२४ कोणत्या देशाने जिंकला ?५) 'द इनसाइडर' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? *उत्तरे :-* १) ५,४३१ चौकिमी २) ३,०७,७१२ चौकिमी ३) ३२,८७,२६३ चौकिमी ४) ऑस्ट्रेलिया ५) पी. व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अशोक गायकवाड, पदवीधर शिक्षक 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक नेते, बिलोली 👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक, बिलोली👤 किरण गौड, धर्माबाद 👤 घनश्याम नानम, डाक घर, धर्माबाद 👤 रमेश सोनकांबळे 👤 गुलाब जाधव 👤 रमेश पाटील कदम 👤 अविनाश सातपुते 👤 गोविंद टेकुलवार, करखेली👤 प्रल्हाद घोरबांड, कवी व गो सेवक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बसे हृदयी देव तो जाण ऐसा।नभाचेपरी व्यापकू जाण तैसा॥सदा संचला येत ना जात कांही।तयावीण कोठे रिता ठाव नाही॥१९५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाला दूर घालवायचे असेल, दु:खाला दूर करायचे असेल, आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल, इतरांना आपलेसे करावे वाटत असेल, अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने जीवन सुखी व समृद्ध केले आहे. ज्यांनी ज्ञान स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३: सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड**२०००:अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.**१९८९:भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले**१८८१:भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना**१९६३:अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.**१९४६:पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.**१९४६:बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.**१९४५:चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१८९९:अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.**१८७६:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: रेखा वाल्मिक पाटील-- कवयित्री* *१९६८:भाग्यश्री देसाई-- कवयित्री,अभिनेत्री, निर्माती**१९६२:विजय कोपरकर-- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९६१:डॉ.माधुरी हेमंत वाघ-- कवयित्री, लेखिका**१९५९:प्रा.डॉ.सुनील विभुते -- प्रसिद्ध विज्ञान कथाकार* *१९५२:सुषमा स्वराज-- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:६ ऑगस्ट २०१९)**१९५०:कपिल सिबल – सुप्रसिद्ध कायदे तज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री**१९३७: वसंतराव धोत्रे--माजी सहकार राज्य मंत्री,सहकार नेते,शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू:१०ऑगस्ट २०१८)**१९३३:मधुकर रामदास सोनार-- कवी, कथाकार (मृत्यू:१५ सप्टेंबर २००४)**१९३३:मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९६९)**१९३०:वृंदा रघुनाथ लिमये,-- कवयित्री लेखिका* *१९२६:डॉ.वसंत विठ्ठल पारखे -- लेखक संपादक**१९२५:मोहन धारिया –माजी केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:१४ आक्टोबर २०१३)**१९२२:प्रभाकर श्रीधर नेरूरकर-- ललित लेखक(मृत्यू:२९ जून १९९८)**१९१८:डॉ.मधुकर अनंत मेहेंदळे-- संस्कृत भाषा,ऋग्वेद,निरुक्त,महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित(मृत्यू:१९ ऑगस्ट २०२०)**१९१६:संजीवनी मराठे – सुप्रसिद्ध कवयित्री (मृत्यू:१ एप्रिल २०००)**१९१४:जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (मृत्यू:९ ऑगस्ट १९७६)**१४८३:बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू:२६ डिसेंबर १५३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:यशवंत नरसिंह केळकर--कवी, कोशकार, इतिहास संशोधक व इतिहासलेखक(जन्म:१९ जुलै १९०२)**१९७५:पी.जी.वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म:१५ आक्टोबर १८८१)**१९७५:ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म:२२ जून १८८७)**१९७४:श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (जन्म:१ जानेवारी १९००)**१४०५:तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म:८ एप्रिल १३३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख*शतदा प्रेम करावे .....!प्रेम म्हणजे काय असते? एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, माया, ममता आणि लळा म्हणजे प्रेम. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून जे काळजी घेतली जाते तिथे प्रेम अनुभवयास मिळते. जीवनात प्रत्येक जण कुणावर नाही तर कुणावर प्रेम करतच असतो. आईचे मुलांवरील प्रेम असो किंवा बहिणीचे भावावरील प्रेम. काही जण आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर तर प्रेम करतातच त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करतात. या प्रेमापायी ते जनावर देखील त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. आमच्या बाजूला एकाच्या घरी कुत्रा होता. तो खूपच प्रामाणिक होता. त्याचे मालकांवर खूप प्रेम होते. मालकांचे देखील त्याच्यावर खूप प्रेम होते .................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये केला प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय,बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार असा विश्वास पंतप्रधान मोदींनी अबूधाबीमध्ये बोलताना व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुकेश अंबानींनी रचला इतिहास, रिलायन्स बनली देशातील पहिली 20 लाख कोटींची कंपनी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणेश जयंती निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट, दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा मोठा निर्णय ! भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन घेतलं मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL सोडा, आधी रणजी खेळा ; ईशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चाहरला BCCI ची तंबी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुपयोगी खजूर*खजूर हे पूर्ण अन्न आहे. खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. तो पोटात गेल्याबरोबर पचायला सुलभ अशा गुणांचाच असतो. खजूर जशाचा तसा पूर्णपणे आतडय़ांनी ग्रहण केला जातो. पचायला बिलकूल जड नाही. खजूर उष्ण आहे अशी समजूत आहे. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो. म्हातारपणा दूर ठेवतो. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते.खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो.दिवसाची उत्तम सुरूवात करूया ...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील *गिधाडांचे संवर्धन* करण्यासाठी वनविभाग व BNHS ने कोणता प्रकल्प हाती घेतला आहे ?२) पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?३) महाराष्ट्र राज्याचे भाषा विभागाचे मंत्री कोण आहेत ?४) भारतामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी 'नॅक'ची स्थापना कधी झाली ?५) महाराष्ट्र शासनाचा २०२४ चा पं. भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) जटायू संवर्धन २) नरेंद्र मोदी ३) दीपक केसरकर ४) सन १९९४ ५) शशिकांत मुळे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा.डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसे हृदयी देव तो कोण कैसा।पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा॥देहे टाकिता देव कोठे पहातो ।परि मागुता ठाव कोठे रहातो॥१९४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.*  संवाद..९४२१८३९५९०••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती .आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत .एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला.प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असतानातिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.तात्पर्य :- एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने जर साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजणार.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात join होण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक रेडिओ दिन_**_जागतिक सूर्यनमस्कार दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ४४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार,६० जखमी**२००३:चित्रपट निर्माते,दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान**१९८४:युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.**१९८२:भारत आणि फ्रान्स यांच्या संरक्षण करा मिराज विमानाचा समावेश**१७३९:कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.* *१६६८:स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६३०:आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:शरद कपूर-- भारतीय अभिनेता* *१९६४:रामदास ग.खरे-- कवी,लेखक* *१९६०:स्वाती विनय गाणू-- लेखिका**१९५९:डॉ.गिरीश प्रभाकर पिंगळे -- खगोलशास्त्रचे अभ्यासक,लेखक* *१९४९:चंद्रशेखर ठाकूर--ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ* *१९४५:विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू:३० आक्टोबर १९९०)**१९३७:प्रतिभा द्वारकानाथ लेले-- जेष्ठ लेखिका**१९२८:श्रीकृष्ण दामोदर पानवलकर --कथाकार(मृत्यू:१९ ऑगस्ट १९८५)**१९२७:मृणालिनी मधुसूदन जोशी-- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू:२७ आक्टोबर २०२२)* *१९२१:निर्मला भालचंद बापट-- कवयित्री* *१९११:फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू:२० नोव्हेंबर १९८४)**१९१०:दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक,वेदांती पंडित (मृत्यू:१ मार्च १९९९)**१८९४:वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू:१६ जुलै १९८६)**१८७९:सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी,रौलेट कायदा, मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा,खिलाफत चळवळ,साबरमती करार,असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९)**१८३५:मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू:२६ मे १९०८)**१७६६:थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू:२३ डिसेंबर १८३४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:नरेंद्र लांजेवार--ज्येष्ठ साहित्यिक (जन्म:११मे १९६८)**२०१४:दिनकर त्रिंबक धारणकर--मराठी नाट्यकर्मीं,साहित्यिक व ‘सत्य प्रकाश’ या साप्ताहिका’चे माजी संपादक (जन्म:१९३६)**२०१२:अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म:१६ जून १९३६)**२००८:राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म:१९३१)**२००७:वामन केशव लेले--भाषा अभ्यासक, समीक्षक(जन्म:२९ मे १९३३)**१९९४:यशवंत नरसिंह केळकर उर्फ य.न. केळकर-- इतिहासविषयक लेखन करणारे मराठी लेखक(जन्म:१९ जुलै १९०२)**१९७४:’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म:१५ ऑगस्ट १९१२)**१९६८:गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक(जन्म:६ आॅगस्ट १९२०)* *१९५६:धुंडिराज गणेश बापट-- वैदिक वाङ्‌मयाचे भाषांतरकार(जन्म:१५ नोव्हेंबर १८८२)**१९०१:लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म:९ मार्च १८६३)**१८८३:रिचर्ड वॅग्‍नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म:२२ मे १८१३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~  *👬 मैत्री 👬*  ~~~~~मैत्री ही कापड्यातील धाग्यासारखे आहे. एका मित्राने आपले जीवन परिपूर्ण होतच नाही. अनेक धाग्यासारखे जीवनात अनेक मित्र असतात आणि त्याची आवश्यकता देखील पदोपदी जाणवत राहते. बालपणीच्या मित्रांपासून जी मैत्री चालू होते ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत जाऊन पोहोचते. या सर्व कार्यकाळात असलेले मित्र सुख आणि दुःखाच्या प्रसंगी अधुनमधून जीवनात डोकावत असतात. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा मैत्री होते पण ती काही ठिकाणी तात्पुरते बनते तर काही ठिकाणी ही मैत्री गट्ट दिसून येते. संकट काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. त्यासाठी जीवनात संकट यावे लागते हे ही सत्य आहे. आपल्या जीवनात संकटेच आली नाहीत तर खरी मैत्री देखील कळणार नाही.*मैत्री असावी जीवाभावाची**नसाव्यात कोरड्या शपथा**क्षणोक्षणी आठवावे आपुल्या**मैत्रीच्या आठवूणी कथा*लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा आणि आमदारकीचा दिला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार पास, बिहार विधानसभेतून विरोधी आमदारांनी वॉक आऊट केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर,  हरभरा, गहू, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान, नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर:संथ काम करणाऱ्या 168 कंत्राटदारांना नोटीस, अनेक ठिकाणी कामेच बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *13 वर्षांनतर सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु:​​​​​​​हिंगोलीत पहिल्याच दिवशी 500 क्विंटल कापूस खरेदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी के एल राहुलऐवजी आता कर्नाटकच्या देवदत्त पड्डीकलला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India*भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. संकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता फार महत्वाची आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने दिला जाणारा २०२३ या वर्षाचा *'विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार'* कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारत व पाकव्याप्त काश्मीर यांच्या सीमारेषेला काय म्हणतात ?३) २०२४ साली 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?४) लोकशाही विकेंद्रीकरणाचा प्रथम प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला होता ?५) LIC ( लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ) ची स्थापना कधी झाली ? *उत्तरे :-* १) डॉ. रवींद्र शोभणे २) एल. ओ. सी. ३) कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही.नरसिंहराव, चौधरी चरण सिंह, डॉ.एम.एस.स्वामीनाथन ४) राजस्थान ५) १ सप्टेंबर १९५६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद👤 अशोक पाटील, धर्माबाद👤 संगीता ठलाल, लेखिका, गडचिरोली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे जाणता नेणता देवराणा। न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा॥ नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा। श्रुती नेणती नेणती अंत त्याचा॥१९३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण जे, काही कार्य करत आहोत त्या कार्याविषयी आपल्याच माणसांना सहसा कळत नसेल किंवा त्याविषयी त्यांना पुरेपूर अनुभव नसेल तर त्यांच्याकडून विरोध होतच असते किंवा पाहिजे तेवढी त्यांच्याकडून आपल्याला साथ मिळत नाही. त्यावेळी आपण दु:खी होऊ नये. भलेही ते साथ देत नसतील तरी उशीरा का होईना हळूहळू सर्वकाही त्यांनाही कळायला लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃  एकाग्रता  ❃*         एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्‍या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्‍या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्‍यांना ती मुले आवडली होती. ते म्‍हणाले,’’ जे काही तुम्‍ही करत होता त्‍यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्‍य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्‍यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्‍य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्‍य होतात.’’ मुले स्‍वामींजींपुढे नतमस्‍तक झाली.         *_🌀 तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता फार महत्वाची आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 फेब्रुवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७९:वसंत गोपाळ आपटे यांनी किर्लोस्करवाडी येथून "आपले जग" नावाचे साप्ताहिक सुरू केले**१९७६:पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.**१५०२:लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:नवनाथ रणखांबे-- कवी,लेखक* *१९८३:राजीव मासरूळकर-- कवी* *१९८०:भाऊसाहेब मिस्तरी(भाऊसाहेब वाल्मीक गवळे)-- कादंबरीकार,स्तंभ लेखन**१९७६:विजय ढाले-- कवी**१९६०:सुरेखा गावंडे -- प्रसिद्ध बालसाहित्यिक,कवयित्री* *१९५७:डॉ.तात्याराव पुंडलिकराव लहाने-- प्रसिद्ध नेत्रचिकित्सक* *१९५६:गिरीश चौक-- लेखक**१९५२:ई.झेड.खोब्रागडे-- निवृत्त सनदी अधिकारी* *१९५०:भास्कर चिंधूजी नंदनवार-- लेखक**१९४९:गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज**१९४८:डॉ.सुधाकर सोमेश्वर मोगलेवार-- कवी,लेखक**१९४३:सतीश काळसेकर-- मराठी साहित्यातील कवी,संपादक,अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते(मृत्यू:२४ जुलै २०२१)**१९३९:अजितसिंग चौधरी-- भारतीय शेतकरी नेते,राष्ट्रीय लोक दलाचे संस्थापक(मृत्यू:६ मे २०२१)**१९३४:प्रा.डॉ.शरद काशिनाथ कळणावत-- प्रसिद्ध लेखक,कवी,वक्ते* *१९२९:दत्तात्रेय धोंडोपंत रत्नपारखी-- लेखक* *१९२९:प्राचार्य डॉ.गोपाळ श्रीनिवास बनहट्टी-- लेखक,नाटककार* *१९२०:कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू:१२ जुलै २०१३)**१९१४:दत्तात्रय कृष्ण पेठे-- कवी* *१८८१:अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू:२३ जानेवारी १९३१)**१८७६:थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू:१७ डिसेंबर १९३३)**१८७१:चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी,महात्मा गांधींचे जवळचे मित्र,समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू:५ एप्रिल १९४०)**१८२४:मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू:३१ आक्टोबर १८८३)**१८०९:चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू:१९ एप्रिल १८८२)**१८०९:अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१५ एप्रिल १८६५)**१८०४:हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)**१७४२:बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी,पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक (मृत्यू:१३ मार्च १८००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:राहुल बजाज-- बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेरमन,माजी राज्यसभा सदस्य,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित(जन्म:१० जून १९३८)**२०१६:वसंतराव राजूरकर-- ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक(जन्म:२४ एप्रिल १९३२)**२०१२:प्रा.डॉ.रत्‍नाकर बापूराव मंचरकर तथा र.बा.मंचरकर-- मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक(जन्म:६ आक्टोबर १९४३)**२००१:भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म:१० सप्टेंबर १९४८)**२०००:विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते* *१९९८:पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (जन्म:१० जुलै १९१३)**१८०४:एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म:२२ एप्रिल १७२४)**१७९४:पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म:१७३०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महर्षी मार्कंडेय जयंती निमित्ताने प्रासंगिक लेख*महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत*ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मध्यप्रदेश मधल्या झाबुआ इथे पंतप्रधानाच्या हस्ते 7300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचं उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून केंद्र सरकारने आयुष्यमान भारत ही योजना सुरू - उपराष्ट्रपती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक :- राज्यातील पहिल्या वातानुकूलित बसस्थानकाचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेड जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा, हाता तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करून तातडीने मदत करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नमो महारोजगार मेळाव्यासाठी समन्वयाने काम करा : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन ; विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तलाठी संघटनेचे अधिवेशन : तलाठ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक ; महसूल मंत्री विखे पाटील यांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup - ऑस्ट्रेलियाने भारताला 79 धावांनी हरवून विश्वकप जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🍖 *तुटलेली हाडं परत पूर्वीसारखी कशी होतात ?* 🍖 ***********************'उजव्या हाताच्या करंगळीचं फ्रॅक्चर झाल्यामुळे अनिल कुंबळेची कसोटीतून माघार' किंवा 'मनगटाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे बोरिस बेकर विम्बल्डन खेळू शकणार नाही', अश्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमधून वाचतो, त्यावेळी वाटतं की संपलं त्या खेळाडूंची कारकीर्द संपली. एवढंच नाही तर आता आयुष्यभर त्या तुटलेल्या अवयवानिशीच त्याला वावरावे लागणार आहे. पण नाही. दोन कसोटीनंतर अनिल कुंबळे आपल्या फिरकीची जादू घेऊन परत अवतरतो आणि बोरिस बेकर आपल्या झंझावाती सर्व्हिसेसने प्रतिस्पर्धी खेळाडूंना सळो की पळो करून सोडतो. मग साहजिकच प्रश्न पडतो की खरी जादू अनिल कुंबळेंनं नव्हे तर त्याच्या त्या मोडलेल्या हाडावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केली तर केली नाही ?पण नाही जादू कोणी केलीच असेल तर ती निसर्गानं केली आहे. निसर्गानेच तुटलेली हाडं परत सांधण्याची व्यवस्था मुळातच करून ठेवली आहे. हाड टणक असते. त्यामुळे ते नखांसारखे निर्जीव आहे की काय असं वाटतं. पण तसं नाही. इतर कोणत्याही अवयवासारखा हाही चैतन्यानं सळसळणारा अवयव आहे. जेव्हा एखादं हाड तुटतं त्यावेळी त्याच्यातून जाणाऱ्या रक्तवाहिन्याही तुटतात. त्यांच्यामधून रक्त बाहेर सांडू लागतं. पण इतर जखमांप्रमाणेच तेही गोठतं आणि त्या ठिकाणी फ्रॅक्चर हॅमेटोमा तयार होतो. तो हाडाला स्थिर करून त्यांची तुटलेली टोकं परत सांधतील अशा जुळणीच्या स्थितीत आणून ठेवतो. गुठळी झाल्यामुळे त्या टोकांच्या वेड्यावाकड्या झालेल्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ती झिजून जातात आणि परत सांधण्यासाठी गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. त्या भागात नवीन रक्तवाहिन्या प्रस्थापित केल्या जातात. काही दिवसांनंतर तिथल्या पेशी नवीन स्नायूंचे धागे तसंच कुर्चा तयार करतो. त्यामुळे ती तुटलेली टोकं एकमेकांना बांधली जाऊ शकतात. त्या टोकांमध्ये तयार झालेली फट भरून काढण्याच्या दिशेने नवीन पेशी व उती तयार होऊ लागतात. आता आॅस्टीअोब्लास्ट या पेशी कामाला लागतात आणि त्या तिथं तयार झालेल्या उतीचं हाडांच्या पेशींमध्ये रूपांतर करू लागतात. थोडक्यात नवीन हाड तयार व्हायला लागतं. आता आजूबाजूच्या मांसल भागात आपलं स्थान पक्कं करण्याच्या दिशेने हाड कार्यरत होतं. मृत पेशीच आतल्या आत शोषल्या जातात आणि नवीन पेशी टणक होऊन दोन टोकांमधली फट भरून काढतात. हाड नव्यानं सांधलं जातं. कॅल्शियम आणि फॉस्फरसचा नव्यांनं पाझर होऊन त्या नवीन हाडाला पूर्वीचीच ताकद दिली जाते. बोरीस बेकरचे मनगट परत त्याच जोमाने चेंडू टोलवायला तयार होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाण्याशिवाय वर्षभर जीवंत राहू शकणारे प्राणी कोणते ?२) निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा पक्षी कोणता ?३) इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या वर्षी ५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार घोषीत झाले आहे ?४) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे ?५) अंटार्क्टिकावर जाणारी भारतातील पहिली महिला कोण ? *उत्तरे :-* १) विंचू व कासव २) गिधाड ३) वर्ष २०२४ ४) पहिला ५) अदिती पंत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 भागेश्री देशमुख👤 नवनाथ रणखांबे👤 निलेश पाटील👤 नागनाथ चंदे👤 रविंद्र डुबिले👤 हणमंत गुरुपवार👤 विनोदकुमार भोंग👤 विजयकुमार पवारे👤 अशोक शिलेवाड, पो. पा. येवती👤 सुनील कवडे, कुपटी, माहूर👤 जलील अब्दुल👤 सौ. मनिषा जोशी, विषय शिक्षिका, कन्या शाळा धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे। दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥ तया खुण ते हीन दृष्टांत पाहे। तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥१९२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷आजची विचारधारा......*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना माणसाला अन्न,वस्त्र, निवारा, पाणी, पैसे अशा बऱ्याच आवश्यक असलेल्या वस्तूंची गरज भासत असते. पण सर्वात जास्त अन्नाची व पाण्याची गरज असते. अचानक त्यावेळी कोणी आपुलकीने अन्नाचा ताट हातात देत असेल तर चुकीच्या मार्गाने जाऊन त्या अन्नाचा किंवा अन्न देणाऱ्याचा कधीही अपमान करू नये. कारण एकदा का त्या दोघांचा अपमान झाला की, परत पुन्हा त्याच आपुलकीने तो अन्न,किंवा पाणी मिळेलच असे नाही.म्हणून असे चुकूनही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-* जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.* *१९९६:आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.**१९४८:पुणे विद्यापीठाची स्थापना* *१९३३:न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला.या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.**१९२९:जे.आर.डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:प्रा.डॉ.गजानन कोर्तलवार-- लेखक* *१९७८:अल्पना देशमुख-नायक-- लेखिका* *१९७७:उत्पल वनिता बाबुराव-- कवी,लेखक,संपादक* *१९७६:सुरेश प्रभाकरराव फुलारी-- कवी* *१९७५:अ‍ॅड.सोमदत वसंतराव मुंजवाडकर -- कवी,गीतकार,लेखक* *१९७३:प्रमोद बबनराव खराडे-- गझलकार**१९७२:अर्चना हरबुडे-धानोरकर-- कवयित्री**१९५९:डॉ.जिवबा रामचंद्र केळुस्कर-- कवी,लेखक* *१९४९:मोहन शिवराम सोनवणे-- जेष्ठ कवी, लेखक* *१९४६:ओंकारलाल चैत्रराम पटले-- कवी,लेखक* *१९४५:राजेश पायलट –माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:११ जून २०००)**१९३४:चंद्रकांत महामिने--ज्येष्ठ विनोदी साहित्यिक(मृत्यू:२२ आगस्ट २०२१)* *१९३१:नंद रामदास बैरागी(बालकवी बैरागी) -- भारतातील हिंदी कवी,चित्रपट गीतकार (मृत्यू:१३ मे २०१८)**१९२९:प्रा.डॉ.ग.का.रावते-- प्रसिद्ध लेखक* *१९२४:श्रीकांत नारायण आगाशे -- कवी, कुमारसाहित्यकार (मृत्यू:५ नोव्हेंबर १९८६)**१९१०:दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू:७ मे २००२)**१८९४:हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:२९ डिसेंबर १९८६)**१८०३:जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू:३१ जुलै १८६५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म:१५ जुलै १९०४)**१९८२:नरहर कुरुंदकर – विद्वान,टीकाकार आणि लेखक (जन्म:१५ जुलै १९३२)**१९७८:वालचंद रामचंद कोठारी---संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत,प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार(जन्म:१३ सप्टेंबर १८९२)**१९७८:पंडित बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकरशास्त्री --राष्ट्रीय पंडित,तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ(जन्म:१२ सप्टेंबर १८८२)**१९२३:विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२७ मार्च १८४५)**१९१२:सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म:५ एप्रिल १८२७)**१८६५:हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ फेब्रुवारी १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका वोटची किंमत*ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. छोट्या छोट्या आमिषाचा स्विकार करू नये. खाण्या-पिण्याच्या पार्टीला हजेरी लावू नये. बहुतांश वेळा निवडणुकीच्या काळात हे चित्र हमखास बघायला मिळते........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये देशातील एकूण मतदारांची संख्या ९७ कोटी तर यावेळी २.६३ कोटी नवे मतदारांची भर, केंद्रीय निवडणूक आयोगाने माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परभणी परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी १०० कोटींचा निधी, मराठवाड्यात रेल्वेचा वेग वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी!*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वेरूळ-अजिंठाचा होणार कायापालट, केंद्राच्या स्वदेश दर्शन २.० या योजनेत समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ कॉंग्रेस नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक; कोल्हापुरात उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तीन ही फॉरमॅट मध्ये 100 पेक्षा जास्त सामने खेळण्याच्या यादीत डेव्हिड वॉर्नर जगात तिसरा फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वातावरणातील वायूंचे उपयोग* 📙 **************************हवेतील वायू माहिती असतातच. त्यांचे प्रमाण, टक्केवारी, गुणधर्म यांबद्दलची माहिती प्रयोगशाळेत व शैक्षणिक वर्गात नेहमीच घेतली जात असते. पण अनेकदा दैनंदिन वापरात या वायूंची माहिती आपण उपयोगात आणत आहोत, हे मात्र लक्षात येत नाही. हवा बंद बाटलीतील एरिएटेड कोल्ड्रिंक पिताना चुरचुरणारी चव व फसफसणारे पेय हवेहवेसे वाटते. आत विरघळवलेला, दाबाखाली असलेला कार्बन डाय ऑक्साइड हे काम करत असतो. हेच पेय उघडे ठेवले, तर दहा मिनिटांनी त्यातील हा वायू निघून गेल्यावरची चव चांगली असेल; पण जिभेला चुरचुरणारी, गार लागणारी गम्मत निघून गेलेली असेल. सिनेमाचे शूटिंग चालू आहे किंवा स्टेजवर डिस्को रंगात आला आहे, त्याच वेळी धुराचे लोट व धुक्याचा थर सर्वांना वेढून टाकण्याचा अभ्यास निर्माण करायचा आहे, याही वेळा कार्बन डाय ऑक्साइडच उपयोगी पडतो. कोरडा बर्फ या प्रकारातील घन कार्बन डायॉक्साईड जेव्हा वायुरूप होतो, तेव्हा हा आभास निर्माण होतो. टॉन्सिल्सचे ऑपरेशन करायचे झाले, तर याच कोरड्या बर्फाचा वापर करून क्रायोसर्जरी पद्धतीने रक्तहीन ऑपरेशन करण्याची पद्धत जपानी सर्जन वापरतात. आग विझवण्याच्या उपकरणात कार्बन डाय ऑक्साइड वापरला जातोच. त्याचा थर आगीवर पसरवून प्राणवायूचा पुरवठा तोडणे हा त्यातील मुख्य हेतू असतो. नायट्रोजनचा व्यवहारात वापर अनेक ठिकाणी केला जातो. फक्त त्याची जाणीव आपल्याला फार क्वचित होते. ज्वालाग्राही पदार्थ, ज्वालाग्राही तेले, जीवनोपयोगी औषधे, साठवणीची धान्य प्लास्टिकच्या बंद पिशव्यांत भरली जातात वा बंद डब्यात भरतात, तेव्हा मोकळी जागा नायट्रोजनने भरण्याची प्रथा आहे. एवढेच काय निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यातही नायट्रोजन भरला, तर त्यांचे आयुष्य वाढते, अशी विजेच्या दिव्यांचा वापर सुरू झाला, तेव्हाची पद्धत होती. त्यानंतर मात्र अन्य वायूंचा वापर विविध रंग मिळवण्यासाठी सुरू झाला. प्रत्यक्ष नायट्रोजनचा वापर औद्योगिक निर्मितीत फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. उदाहरणार्थ खते, रंग, स्फोटके, इतकेच काय पण भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांतील एक म्हणजे नायट्रस ऑक्साइड हे नायट्रोजन व प्राणवायूचेच संयुग आहे. वातावरणातील मुख्य घटक नायट्रोजन असल्याने त्याची औद्योगिक निर्मिती वा साठवणही सहज शक्य होते. प्रयोगशाळेत व औद्योगिक वापरात याचा एक महत्त्वाचा वापर म्हणजे द्रव स्वरूपातील नायट्रोजन. एखादी गोष्ट अनंत काळपर्यंत टिकवायची असेल, तर याच्या तापमानाला ठेवायची व्यवस्था केल्यास ती नक्की टिकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. उदाहरणार्थ जिवंत पेशी या तापमानाला गोठवून पुन्हा पाहिजे त्या वेळी त्यांना नेहमीच्या तापमानात आणता येईल, या दिशेने सतत प्रयोग चालू असून त्यांना यश येत आहे. प्राणवायूशिवाय सजीव जगू शकत नाही. पण याच प्राणवायूचा अशुद्ध पदार्थ शुद्ध करायला गमतीदार वापर केला जातो. लोखंडापासून पोलाद बनवताना त्याची शुद्धता वाढवायला उकळत्या लोखंडाच्या रसात प्राणवायू सोडला जातो. त्याच्या सान्निध्याने अशुद्ध कण चक्क जळून नष्ट होतात, राहते ते शुद्ध लोखंड. हा सोपा उपाय अन्यही काही धातूंच्या शुद्धीकरणात वापरला जातो. शोभेची दारू व स्फोटके यांना हवेतील प्राणवायूचा पुरवठा कमी पडतो. त्यासाठी त्यातच ऑक्सिडायझर मिसळून त्यातून मोठ्या प्रमाणावर प्राणवायू पुरवण्याची व्यवस्था केली जाते. आजार्‍याला दिला जाणारा प्राणवायू तर सर्वांना माहिती आहेच. त्याचेच सुटसुटीत भावंड पाणबुडे व गिर्यारोहक वापरतात. हायड्रोजनचा वापर तेलापासून वनस्पती तूप व मार्गारीन बनवण्यासाठी केला जातो. तूप म्हणून वापरात असलेले डालडा हे वनस्पतिज तेलावरील हायड्रोजनेशन प्रक्रियेतून तयार होत. बलुन्समध्ये हेलियमचा वापर केला जातो. जखमा धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधासाठी म्हणजे हायड्रोजन पॅराॅक्साइडसाठी हायड्रोजनची गरज असतेच. हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही करता येतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मेंदू कोठे असतो ?२) जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?३) ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात किती भारतीयांना ग्रॅमी अवॉर्ड मिळाले ?४) उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?५) पर्शियन भाषेला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) डोक्याच्या कवटीत २) जिल्हाधिकारी / कलेक्टर ३) पाच ४) पुष्कर सिंह धामी ५) फारसी भाषा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, नांदेड👤 आमिन जी. चौहान, यवतमाळ👤 विजय रच्चावार, संपादक👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, नायगाव👤 राहूल कतूरवार, धर्माबाद👤 सुधाकर अपुलवाड👤 राजू गोडगुलवार👤 म. जावेद, उर्दू हायस्कुल, धर्माबाद👤 प्रशांत येमेवार, पोलीस निरीक्षक👤 डॉ. प्रकाश बोटलावार👤 अशोक श्रीमनवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता। पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥ तया निर्विकल्पासि कल्पित जावे। परि संग सोडुनि सुखे रहावे॥१९०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याला जेव्हा,आपणा कडून मदतीची गरज असते तेव्हा, आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. अन् आपल्याला अडचण पडली की, मात्र त्याच व्यक्तीकडे सहकार्य करण्याची अपेक्षा आपण करत असतो. ज्यावेळी आपणच दुसऱ्याला मदत करत नाही तर दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे. .? म्हणून मदत जरी करता नाही आली तर चालेल पण, त्या प्रसंगी एवढीही पाठ फिरवू नये की, दुसऱ्यांदा मदत मागण्यासाठी जागा नसेल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विश्वासघात*करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्‍या संकटाची सूचना देणार्‍या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्‍या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३:संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.**१९७३:बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.**१९६९:बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.**१९५१:स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू* *१९३३:साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.* *१९००:लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:कांचन अभिजित जाधव (बाबर)-- कथालेखिका**१९८६:राजश्री विजय कुलकर्णी -- कवयित्री* *१९७०:ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज**१९६९:जितेंद्र दत्तात्रय पराडकर-- प्रसिद्ध लेखक* *१९६७:प्रा.गिरीश चत्रु पाटील-- कवी,लेखक**१९६२:किशोर मांदळे-- लेखक* *१९५८:अमृता सिंग-- भारतीय अभिनेत्री**१९५५:वैशाली मुलमुले -- कवयित्री* *१९५०:शोभा अशोक बडवे--मराठी कवयित्री, लेखिका**१९४८:प्रा.शरद देशमुख -- कवी,लेखक* *१९४८:भाऊ तोरसेकर उर्फ गणेश वसंत तोरसेकर-- राजकीय विषयांवर वृत्तपत्रीय आणि दिवाळी अंकातून लिखाण,मराठी लेखक* *१९४५:विश्वजीत दत्तात्रय तुळजापूरकर-- कवी* *१९३३:श्रीकृष्ण गणेश पोंक्षे -- कवी,लेखक* *१९२९:बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले-- माजी केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२ डिसेंबर २०१४)**१९२२:गजानन वासुदेव कवीश्वर-- वांड्:मय संशोधक तथा लेखक**१९२२:जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू:२३ एप्रिल १९८६)**१९१७:होमी जे.एच.तल्यारखान – गांधीवादी नेते,सिक्‍कीमचे पहिले माजी राज्यपाल,मंत्री व आमदार (मृत्यू:२७ जून १९९८)**१९१२: गजानन वासुदेव कवीश्‍वर--मराठी वाङ्मय संशोधक,लेखक**१९०४:दत्तात्रेय दामोदर जोशी-- बाल साहित्यिक**१९००:नारायणशास्त्री आंजलेॅकर जोशी-- लेखक* *१८७४:स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले,त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:राजीव कपूर-- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता,चित्रपट दिग्दर्शक(जन्म:२५ ऑगस्ट १९६२)**१९१२:ओ.पी. दत्ता-- भारतीय चित्रपट निर्माते आणि लेखक(जन्म:१९२२)**२००८:डॉ.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक,लेखक (जन्म:२६ डिसेंबर १९१४)**२००४:वामन बाळकृष्ण भागवत-- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ(जन्म:२४ जानेवारी १९१८)**२०००:शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती (जन्म:१७ डिसेंबर १९१६)**१९८४:तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका (जन्म:१३ मे १९१८)**१९८१:एम.सी.छागला – न्यायाधीश,मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म:३० सप्टेंबर १९००)**१९७९:राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (जन्म:२४ एप्रिल१९१०)**१९६६:दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक.* *१८७१:फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म:११ नोव्हेंबर १८२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्म मृत्यूची नोंदणी*युनिसेफच्या एव्हरी चाईल्ड ब्राईट ईनेकविट्स अँड बर्थ रजिस्ट्रेशन या नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या 161 देशातील आकडेवारी विश्लेषणाचा अहवालानुसार भारतात प्रत्येक तीन मुलामागे एकाच्या जन्माचे कोणतीही नोंद नसते.  पाच वर्षाखालील अशा अनोंदणीकृत मुलांची संख्या तब्बल 71 दशलक्ष असून जागतिक पातळीवर हीच संख्या दोनशे तीस दशलक्ष अशी आहे. यानुसार भारतात जन्म नोंदणीचे प्रमाण 41 टक्के आहे जी की जगात सर्वात कमी आहे. भारतातील हिंदू व मुस्लिम या दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या समुदायात जन्म नोंदणीचे प्रमाण सर्वांत कमी असून याच्या तुलनेत अल्पसंख्यांक जैन व शीख समुदायात प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्री-प्रायमरी ते 4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा :राज्यशासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारचा गुगलबरोबर करार: प्रशासकीय कामात AI चा वापर होईल तर रोजगाराच्या असिमीत संधी येतील; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *​​​​​​​लोकसभा अध्यक्षांनी ​​​​​​​खा. हेमंत पाटील यांचा राजीनामा फेटाळला, मराठा आरक्षणाला पाठींबा देत दिला होता राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावती :- श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा; भाषा संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे, व्याजदरात कोणताही दिलासा नाही, जीडीपी 6.7 टक्क्यावरुन 7.2 टक्के होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यसभेसाठी भाजपकडून तीन जागांसाठी नावं गुलदस्त्यात, नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह नऊ जणांची यादी दिल्लीला पाठवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup च्या दुसऱ्या सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 1 विकेटने केला पराभव, रविवारी भारतासोबत होणार फायनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 टेलिस्कोप म्हणजे काय ? 📙 खगोलदर्शनासाठी टेलिस्कोप वापरतात. अगदी सहज गंमत म्हणून गच्चीवरून तारे बघायचे असोत किंवा खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास करावयाचा असो, यासाठीचे मुख्य माध्यम टेलिस्कोपच आहे. टेलिस्कोपचे दोन महत्त्वाचे प्रकार वापरले जातात. प्रकाश किरणांच्या भिंगातून वक्रीकरण करून बनवलेले टेलिस्कोप हे आकाराने खूपच लहान असतात व ते वापरणे सुटसुटीत असते. अर्थात यालाही अपवाद आहेतच. तब्बल एक मीटर व्यासाची बहिर्गोल भिंग वापरून अमेरिकेतील वेधशाळेतील टेलिस्कोप बनला आहे. मोठ्या भिंगातून एकत्रित केलेल्या किरणांची प्रतिमा प्रमाणबद्ध रीतीने दुसऱ्या डोळ्याजवळच्या भिंगातून बघितली जाते. डोळ्याजवळची भिंगे बदलून, त्यांची क्षमता वाढवून प्रतिमा लहान व मोठीही करता येते.प्रकाशकिरणांचे परावर्तन करणारे अंतर्गोल आरसे वापरणे हे जास्त सोयीचे पडते. आरशात प्रकाशाचे विश्लेषण होत नाही. प्रतिमा स्पष्ट राहते; कारण भिंगाची जाडी, वजन व त्यांना द्यावयाचा आधार यापेक्षा आरशाला आधार देऊन त्यातून परावर्तीत प्रतिमा दुसऱ्या आरशातून पुन्हा बघणे हे सोयीचे वाटते. यासाठी प्रचंड अंतर्गोल आरसे वापरले जातात व त्यातून परावर्तीत प्रतिमा साध्या अारशाद्वारे पुन्हा डोळ्याजवळील भिंगाकडे परावर्तित केली जाते. येथेही गरजेप्रमाणे डोळ्याजवळचे भिंग कमी जास्त ताकदीचे वापरता येते. रशियामध्ये सहा मीटर व्यासाचा आरसा वापरून जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप बसवलेला आहे.मोठाले टेलिस्कोप हे यांत्रिक पद्धतीने हलविण्याची व्यवस्था केली जाते. नेमकी दिशा रोखण्यासाठी पूर्ण यांत्रिक व्यवस्था येथे आवश्यक असते. निरीक्षणासाठी बसणाऱ्या शास्त्रज्ञाला सोयीची बैठक व त्याच्या नजरेला समोरच दिसू शकेल, अशी दृश्य भिंगांची रचना यासाठी गरजेची ठरते. आकाशाकडे बघून निरीक्षण करणे येथे शक्यही नसते व अपेक्षितही नसते.काचेच्या भिंगांचा चष्मा करायचा वापर सुरू झाला, त्यानंतर टेलिस्कोपचा जन्म झाला असावा. नेमका कधी, कसा ते ज्ञात नाही, पण या बाबतीत *हॅन्स लिप्परशे* याचे नाव जनक म्हणून घेतले जाते. *गॅलिलिओ गॅलिली* यांनी व्हेनिसमध्ये १६०९ सालच्या सुमाराला टेलिस्कोप वापरला. यानंतरचा मुख्य शोध होता १६७२ मध्ये सर आयझॅक न्यूटनने परावर्तीत अंतर्गोल आरसा वापरून बनवलेल्या टेलिस्कोपचा.पृथ्वीवरून टेलिस्कोपद्वारे खगोलसंशोधन करताना वातावरणाच्या अडचणी येतात. मग यासाठी अंतराळात जाऊन निरीक्षण करणे जास्त सोयीचे, असे विचार मांडले गेल्याने त्या दिशेने संशोधन पुढे सरकत गेले. याच देशाची एक अवाढव्य निर्मिती म्हणजे हबल टेलिस्कोपची. २.४ मीटर व्यासाचा आरसा असलेला हा टेलिस्कोप १९९० साली अवकाशात पाठवला गेला आहे. पृथ्वीवरील निरीक्षणात दिसणारी अगदी स्पष्ट तारका यातून तब्बल पंचवीस पटींनी स्वच्छ बघता येते. हबमधील दुरुस्त्या करीत, तांत्रिक अडचणींवर मात करीत त्याने पाठवलेल्या असंख्य निरीक्षणांचे विश्लेषण सतत चालू असते. हे काम शास्त्रज्ञांना काही वर्षे पूरुन उरणार आहे.टेलिस्कोपचेच तत्त्व वापरून रेडिओलहरी गोळा करून त्याद्वारे खगोल संशोधन करण्याचाही प्रकार वापरला जातो. रेडिओलहरी, प्रकाशलहरी, क्ष-किरण, इन्फ्रारेड या साऱ्यांची 'जातकुळी' एकच असल्याने हे तत्त्वही सध्या वापरले जाते. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळच्या खोडद येथे या स्वरूपाचा एक मोठा जीएमआरटी प्रकल्प कार्यरत आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" वयाने मान मिळतो पण आदर हा वर्तणुकीमुळे मिळतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सर्वप्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ?२) अंतराळात सर्वाधिक दिवस राहण्याचा जागतिक विक्रम कोणी केला ?३) भारतीय नौदलाने कोणते वर्ष 'नौदल नागरिकांचे वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?४) दरवर्षी भारतातील जागतिक पुस्तक मेळावा कोठे भरवला जातो ?५) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला ? *उत्तरे :-* १) तमिळ ( २००४ ) २) ओलेग कोनोनेंको, रशियन अंतराळवीर ३) वर्ष २०२४ ४) नवी दिल्ली ५) अजित पवार गट *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजेश मनुरे, संपादक, धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 शेख राजू पटेल👤 व्यंकट केक👤 वैभव जाधव👤 मारुती फाळके👤 रमेश कदम👤 दिनेश रेडे👤 श्रीनिवास सैबी, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मही निर्मिली देव तो ओळखावा। जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥ तया निर्गुणालागी गूणी पहावे। परी संग सोडुनि सुखे रहावे॥१८९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तोंडावर सर्वजण गोड बोलून आपली स्तुती करणारे असले तरी त्यातील सर्वजण पोटात गोड असतील असेही नाही. म्हणून अति गोड बोलणाऱ्याच्या नादी लागू नये. भलेही कटू सत्य बोलून मोकळे होणारे एकवेळचे दूर निघून जातात पण, केसाने गळा कापणारे आपल्या जवळ असून सुद्धा दृष्टीत पडत नाही म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शेरास सव्वाशेर*एका शेतकर्‍याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला. तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, 'दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, 'अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?' असे म्हणून त्याने तिला ठार मारले.*तात्पर्य :-* जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.**१९७१:NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.**१९६०:पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.**१९३६:१६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.**१९३१:महादेव विठ्ठल काळे यांनी 'आत्मोद्धार' नावाचे पाक्षिक सुरू केले.**१८९९:रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश  शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडल्या**१७१४:छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:अ‍ॅड.संदीप सुधीर लोखंडे-- लेखक**१९९८:ऋषिकेश मठपती-- कवी* *१९८८:रुचा हसबनीस-जगदाळे-- भारतीय अभिनेत्री* *१९८८:प्रा.गणेश विठ्ठलराव मोताळे-- लेखक* *१९८८:सविता देविदास बांबर्डे-- लेखिका**१९६८:डॉ.ज्योती प्रदीप तुंडूलवार --लेखिका* *१९६३:मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू**१९५४:रेणू वामन देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९४९:ज्योती सुभाष म्हापसेकर-- मराठी साहित्यिक,स्त्री मुक्ती संघटना या संस्थेच्या अध्यक्षा**१९४१:जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू:१० आक्टोबर २०११)**१९३९:सुधीर मोघे-- मराठी कवी,गीतकार व संगीतकार(मृत्यू:१५ मार्च२०१४)**१९३७:प्रा.यशवंत नारायण जोशी-- लेखक**१९३१:यशवंत गोविंद जोशी-- लेखक**१९२५:शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू:२७ सप्टेंबर २००४)**१९२१:कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे-- मराठी कीर्तनकार आणि लेखिका(मृत्यू:११ सप्टेंबर २०१०)**१९११:प्रा.दया पटवर्धन -- लेखिका* *१९०९:प्रा.केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (मृत्यू:३ जानेवारी १९९८)**१८९७:डॉ.झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती,शिक्षणतज्ञ.पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्य आले होते. (मृत्यू:३ मे १९६९)**१८४४:गोविंद शंकरशास्त्री  बापट – भाषांतरकार(मृत्यू:६ मार्च १९०५)**१८३४:दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२ फेब्रुवारी १९०७)**१८२८:ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू:२४ मार्च १९०५)**१७००:डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू:१७ मार्च १७८२)**१६७७:जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू:१६ एप्रिल १७५६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:डॉ.इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म:१४ मे १९२६)**१९९५:भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल. १९६५ च्या भारत - पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: मार्च १९१३)**१९९४:गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म:१९११)**१९९४:यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशाकार,इतिहास संशोधक,इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक,संपादक व प्रकाशक (जन्म:१९ जुलै १९०२)**१९८९:रामचंद्र शंकर वाळिंबे--टीकाकार, समीक्षक (जन्म:९ नोव्हेंबर १९११)**१९७५:सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१३ सप्टेंबर १८८६)**१९७१:डॉ.कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री,हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल,नामवंत साहित्यिक (जन्म:३० डिसेंबर १८८७)**१९२७:बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म:७ सप्टेंबर १८४९)**१७२५:पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म:९ जून १६७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!*प्रेम या अडीच अक्षरी शब्दात जादुई शक्ती आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे अशक्यच नाही तर असंभव आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात कुणावर नाहीतर कुणावर जीवापाड प्रेम करतो. जन्म देणाऱ्या आई-वडिलावर सर्वांचेच प्रेम असते कारण ते जन्मदाते असतात. भाऊ-बहिणींचा एकमेकींवर अतूट प्रेम असते, हे आपण सर्वचजण जाणतो. संसारातल्या विविध नातेसंबंधात आपणाला पदोपदी प्रेम दिसून येते. त्याशिवाय संबंध टिकूच शकत नाही. क्रोधी,  रागीट किंवा तापट स्वभावाचा व्यक्तीला सुद्धा प्रेमाने जिंकता येते शत्रुचे मन प्रेमाने वितळवितात येते. प्रेमात एवढी प्रचंड शक्ती आहे की............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर, UCC लागू करणारे ठरले पहिले राज्य !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील निवासी डॉक्टरांकडून संप माघार, राज्यातील आरोग्य क्षेत्रावरील संकट टळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद पवार गटाचं नाव ठरलं, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार" नवं नाव !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, लोकसभेच्या निवडणुकीआधी मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार, 11 फेब्रुवारीला घोषणा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रत्नागिरीहून मुंबईला येणारी खाजगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली, विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगाला पुढे घेऊन जाऊ शकते. --------------------------------------- पियाँटिक ह्या जनरल मोटर्सच्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. 'माझ्या गाडीला व्हॅनिला आईसक्रीम आवडत नाही' जनरल मोटर्सने साहजिकच ह्यातक्रारीकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. ह्यवेळीजनरल मोटर्सने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तिला त्याची तक्रार व्यवस्थित सांगण्यास सांगितले. व्यक्तीने उत्तरदिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हॅनिला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाडी सुरु होत नाही. जनरल मोटर्सने असे होउच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यांनीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली. काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्तिकडे पाठवला. इंजीनिअरने गाडी चेक केली. सगळे व्यवस्थित असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्ती सोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअरपण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हॅनिला आईसक्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे गाडी सुरुच झाली नाही. इंजीनिअरने परत गाडी चेक केली, पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे. कंपनीने इंजीनियरला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावरकाही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हॅनिला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खूप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यंत गाडीचे इंजिन थोडे गार होते आणि गाडी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ति जेव्हा व्हॅनिला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हॅपरेशन होतेआणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सिडीजने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने १९०१ साली आपल्या मर्सिडीज ३५' साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे. एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगालाकिती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी *मशालवाहक* म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) भारतातील किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा आहे ?३) 'AI' हा शब्द १९५५ मध्ये प्रथम कोणी वापरला ?४) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला ?५) गोंदिया जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? *उत्तरे :-* १) अभिनव बिंद्रा २) सहा - तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओरिया ३) जॉन मॅक्कार्थी, संगणक शास्त्रज्ञ ४) तांबे ५) एम. मुरूगानंथम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुनील ठमके, नांदेड👤 शर्मिष्ठा शिवाजीराव देव्हामुख, वसमत👤 राजेश मनुरे, पत्रकार धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 दिलीप खोब्रागडे👤 मारोती पिकलेकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे। विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे॥ विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे। परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा.....🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपुलकीच्या नात्यातील संवाद एकाकी कधीच बंद होत नाही. पण, कधीकाळी एकाच्या मुखातून निघालेला भयंकर शब्द जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो शब्द सर्वच संपवून टाकते. आणि मग तो चालू असलेला संवाद व ती आपुलकी आपोआप दिसणे बंद होऊन जाते.म्हणून कोणालाही बोलते वेळी दहा वेळा विचार करून योग्य शब्दांचा वापर करूनच बोलावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःचे अस्तित्व जाणणे*एका बागेतील एका  काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली. दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरत्या असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३:क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.**१९९९:युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी**१९७४:ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९७१:स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.* *१९६५:मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.**१९४८:कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.**१९२०:बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.**१९१५:गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील 'आर्यन' हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी**१८५६:ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले.सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६५:बी.एल.खान-- कवी* *१९६४:नितीन आखवे-- मराठी गीतकार(मृत्यू:८ एप्रिल २०१२)**१९६३:डॉ.दिलीप नारायण पांढरपट्टे -- सुप्रसिद्ध गझलकार,सनदी अधिकारी* *१९५८:सुकुमार जयकुमार कोठारी -- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये काव्य करणारे कवी* *१९५५:माधव रा.पवार -- प्रसिद्ध गीतकार, कवी* *१९५१:रवींद्र साठे-- मराठी चित्रपटांमध्ये व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये पार्श्वगायन करीत असलेले पार्श्वगायक**१९४१:निळकंठ तुळशीराम रणदिवे -- लेखक, कवी**१९३८:एस.रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते**१९३५:उषा वामन भट -- लेखिका* *१९३५:अशोक पुरुषोत्तम शहाणे-- लेखक, भाषातज्ज्ञ,संपादक,व प्रकाशक**१९३४:सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू:५ फेब्रुवारी २०१०)**१९३२:माधव भीमराव थोरात -- लेखक* *१९२८:अनंत महादेव मेहंदळे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(मृत्यू:२४ एप्रिल १९९२)**१९२५:उषा वामन भट-- लेखिका* *१९२३:प्रा.डॉ.बापूसाहेब देवेंद्र खोत-- लेखक* *१८९८:रमाबाई भीमराव आंबेडकर ( मृत्यू २७ मे १९३५)**१८१२:चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू:९ जून १८७०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: डॉ.शरद कोलारकर-- विदर्भातील एक ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ,लेखक,विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष (जन्म:१७ आक्टोबर १९३७)**१९९९:हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म:१४ नोव्हेंबर १९३५)**१९९०:वामनराव हरी देशपांडे-- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ,संगीतसमीक्षक व लेखक (जन्म:२७ जुलै १९०७)**१९४७:वासुदेव दामोदर मुंडले-- चरीत्रकार(जन्म:१८८०)**१९३८:हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म:२० डिसेंबर १८६८)**१२७४:श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म:४ सप्टेंबर १२२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हसा आणि हसवा*जीवनात हसण्याचे महत्व सांगणारा लेख ....!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्र सरकारची मोठी घोषणा, 29 रुपये किलोने मिळणार तांदूळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी मिळणार, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता, राज्यातील 95 टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मंत्रिमंडळ बैठकीतील आणखी एक धडाकेबाज निर्णय, हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून राज्यात 6 हजार किमी रस्त्यांची कामे होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य परिवहन महामंडळाच्या ५ हजार डिझेल बसेसचे एलएनजीवर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे; निवडणूक आयोगाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup च्या सेमी फायनलमध्ये भारताचा 2 विकेटने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 ***********************विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्‍या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरवू शकेल. अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत. अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील. एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्वतीय मृदेस कोणती मृदा म्हणतात ?२) १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?४) संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान यांनी कोणता पर्वत उचलून आणला होता ?५) गोंदिया जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी कोण आहेत ?*उत्तरे :-* १) अपरिपक्व मृदा २) डॉ. अरविंद पनगडीया ३) मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया ( १६०.४ किमी प्रतीतास, २०१५ साली ) ४) द्रोणगिरी पर्वत ५) प्रजीत नायर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पवन गट्टूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 विनायक गोविंदराव पारवे👤 खंडू येरकलवाड, बेळकोणी👤 साईनाथ येनगंटीवार👤 कवी बी. एल. खान👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे। परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥ मना भासले सर्व काही पहावे। परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *आजची विचारधारा......*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या कडून एखाद्याला अडीअडचणीच्या वेळी मदत होत असेल आणि त्याची वाईट परिस्थिती आपल्यामुळे चांगली होत असेल किंवा त्याच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर उत्तमच आहे ते,माणुसकीचे लक्षणे आहेत सोबतच तो माणुसकी धर्म आहे. पण,त्या केलेल्या मदतीचा दुरूपयोग जर त्या व्यक्तीकडून होताना आपल्याला बघायला मिळाले असेल तर मात्र, समोर मदत करताना त्या व्यक्तीला खोलवर जाऊन वाचणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंतःकरणातील दुःख*एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'*तात्पर्य :- बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६६:सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.**१९२८:'सायमन गो बॅक' या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.**१९२५:भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.**१८७०:अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.**१७८३:स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:गणेश बाळासाहेब निकम -- लेखक* *१९७८:धिरज पाटील (धनराज) -- कवी**१९७५:हंसिनी अरविंद उचित -- कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७३:प्रा.डॉ.गिरीश खारकर-- सुप्रसिद्ध मराठी गजलकार,प्रतिभावंत लेखक, प्रकाशक,(मृत्यू:१७ आक्टोबर २०१९)**१९६९:महेश रघुनाथ पानसे-- कवी**१९६७:गजानन निमकर्डे-- कवी* *१९६३गंगाधर त्र्यंबक अहिरे -- कवी,लेखक, संपादक* *१९६३:अंजली चितळे -- कवयित्री* *१९६३:रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ**१९६२:प्रा.भाऊ काशिनाथ(भाऊसाहेब) गोसावी -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६२:डॉ.जयराम काळे-- कवी,लेखक* *१९५२:नारायण गणपतराव निखाते -- लेखक* *१९५०:प्रा.डॉ.सुदाम जाधव-- आदिवासी साहित्याचे अभ्यासक तथा लेखक* *१९४५:प्रा.डॉ.रामचंद्र कामाजी क्षीरसागर -- लेखक* *१९४२:अरुण कृष्णराव हेबळेकर-- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार**१९३८:वहिदा रहमान-- प्रसिद्ध अभिनेत्री**१९३५:नारायण बाळकृष्ण ठेंगडी-- पत्रकार, कवी आणि कथाकार (मृत्यू:२५ मार्च १९८८)**१९३१:प्रा.चंद्रकांत भालेराव-- प्रसिद्ध कथाकार* *१९२७: अच्युत महादेव बर्वे--कथाकार, कादंबरीकार(मृत्यू:१६ एप्रिल १९८२)**१९२७:वसंत शंकर सरवटे-- ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यंगचित्रकार तसेच लेखक(मृत्यू:२३ डिसेंबर २०१६)**१९०६:अवधूत महादेव जोशी--कथाकार, चरित्रलेखक,टीकाकार**१९००:तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२७ सप्टेंबर १९७५)**१८२१:डॉ.एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू:३१ मे १९१०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००७:हरी अनंत फडके-- संशोधक, अभ्यासक (जन्म:१३ ऑक्टोबर १९३२)**१९९१:प्रा.कुसुमताई साठे-- लेखिका, कवयित्री,संपादिका (जन्म:१६ डिसेंबर १९२१)**१९७९:मोरेश्वर दिनकर जोशी-- संस्थापक, व्यवस्थापक, संपादक(जन्म:२८ फेब्रुवारी १९००)**१९६९:सी.एन.अण्णादुराई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री (जन्म:१५ सप्टेंबर १९०९)**१९२४:वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२८ डिसेंबर १८५६)**१८३२: उमाजी नाईक --पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.(जन्म:७ सप्टेंबर १७९१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - गुरुदक्षिणा* ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सानेगुरुजी नगरी येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय; मनोज जरांगे यांना आता सरकारी सुरक्षा, 24 तास दोन पोलीस तैनात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; 2024-25 साठी 59 हजार 954 कोटी रुपयांची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं  19 फेब्रुवारीला उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 10 किलोमीटर मार्गाचं लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक: सिन्नरमध्ये अग्नितांडव; मुसळगाव एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग, आगीमुळे कारखान्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पश्चिम उपनगरांसाठी मोठा दिलासा, गोखले पुलाचं 25 एप्रिलला लोकार्पण होणार, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शतकवीर यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरोधात दिवसभर एकटाच लढला; टीम इंडियाचे धुरंदर पुन्हा अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭐ *ताऱ्यांचं अंतर कसं मोजतात ?* ⭐ **************************तारे आपल्यापासून कितीतरी दूर असतात. आपल्याला सर्वात जवळचा असलेला तारा म्हणजे आपला सूर्य. तोच मुळी पंधरा कोटी किलोमीटर दूर आहे. इतर तारे तर त्याच्या कितीतरी पटींनी दूर आहेत. तेव्हा त्यांच्या पर्यंतचं अंतर मोजण्यासाठी तशीच काहीतरी खास युक्ती योजायला हवी. आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा आपले दोन डोळे जरा वेगवेगळ्या कोनांमधुन त्या वस्तूकडे पाहतात. त्यामुळे तिच्या दोन प्रतिमा आपल्या डोळ्यांमध्ये उमटतात आणि त्यांच्यामध्ये काही अंतर असतं. समजा आपण आपला एक डोळा मिटला आणि समोरच्या दाराच्या चौकटीच्या बरोबर समोर येईल अशा तर्‍हेनं एक बोट समोर धरलं. आता तो डोळा उघडून दुसरा मिटला आणि परत पाहिलं तर ते बोट हल्ल्याचं दिसून येईल. कारण त्या दोन डोळ्यांतल्या प्रतिमांमध्ये अंतर असतं. यालाच पॅरॅलॅक्स असं वैज्ञानिक भाषेत म्हणतात. जितकं त्या बोटाचं आपल्या डोळ्यांपासूनचं अंतर कमी तितका पॅरलॅक्स जास्त. उलटपक्षी जितकं बोटाचं अंतर जास्त तितका पॅरलॅक्स कमी. म्हणजेच कोणत्याही वस्तूचं आपल्यापासून असलेलं अंतर आणि तिच्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स यांचं एक नातं असतं. जर पॅरॅलॅक्स मोजला तर गणित करून ते अंतर शोधता येतं. जमिनीचा सर्व्हे करणारे तज्ज्ञ याचाच उपयोग करतात. पण आपल्या दोन डोळ्यांमधलं अंतरच इतकं कमी आहे की दूरवरच्या तार्‍याचा पॅरॅलॅक्स शून्यवतच असतो. दोन डोळ्यांमधलं अंतर तर वाढवता येत नाही. पण दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून जर पाहिलं तर त्या दोन प्रतिमांमध्ये काही पॅरॅलॅक्स तयार होतो. तरीही दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी पृथ्वीवरची दोन टोकंही जरी गाठली तरी ते अंतर अपुरंच पडतं. यासाठी मग पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाचा वापर करण्यात येतो. सूर्याच्या अलीकडून आणि पलीकडून जर आपण पाहू शकलो तर त्या कक्षेच्या व्यासाइतकं अंतर दोन 'डोळ्यांमध्ये' आपण पाडू शकतो. त्यासाठी मग वर्षातल्या दोन वेगवेगळ्या वेळी एकाच ताऱ्याच्या घेतलेल्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स मोजून त्या ताऱ्याचं आपल्यापासून असलेलं अंतर मोजता येतं. अर्थात अशा दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी तसेच तेजस्वी 'डोळे' ही असणे गरजेचं असतं. ही गरज अतिशय शक्तिशाली दुर्बिण वापरून पूर्ण केली जाते.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जेव्हा कमजोरी शक्ती बनते, तेव्हा यश हमखास मिळते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२३ चा *महाराष्ट्र भूषण* पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आले ?२) महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?३) 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'चे स्वरूप काय आहे ?४) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जगात सर्वात वेगवान त्रिशतकवीर कोण ?५) "अहिंसा हे दुर्बलांचे नव्हे तर बलवानाचे शस्त्र आहे", असे कोण म्हणाले होते ? *उत्तरे :-* १) अशोक सराफ, अभिनेता २) महाराष्ट्र भूषण ३) २५ लाख व मानपत्र ४) तन्मय अग्रवाल, भारत ( १४७ चेंडू ) ५) महात्मा गांधी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड  👤 हंसिनी उचित, साहित्यिक👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद👤 ऍड. मल्हार मोरे, भोकर👤 अर्शनपल्ली अजय👤 सुशील कुलकर्णी👤 राजेश पिकले👤 शिवकुमार देवकत्ते👤 विश्वास मापारी👤 ओमकार पाटील चोळाखेकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी। कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥ प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे। तयाचेनि योगे समाधान बाणे॥१८३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा ......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेले कार्य पाहून बाहेरच्या लोकांकडून होणारा विरोध तेवढा भयानक नसतो. कधी शिकायला सुद्धा भाग पाडत असते पण जेव्हा त्याच कार्याला आपल्या जवळचेच माणसं आपुलकीचा ढोंग करून विरोध करतात तेव्हा मात्र त्या विरोधाचे मानसिक तणावात रूपांतर होत असते. म्हणून कोणाला साथ देता येत नसेल तर विरोधही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य : ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_48.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक पाणथळ भूमी दिन_**_ या वर्षातील ३३वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_१९७१:इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर ’जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला._**१९७१:इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.**१९५७:गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.**१९४३:दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात**१९३३:अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.**१८४८:कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रज्ञा हंसराज बागुल --आंबेडकरी साहित्यामध्ये कथा लेखन करणाऱ्या लेखिका**१९८०:डॉ.बाळू दुगडूमवार -- कवी,लेखक* *१९७६:प्रा.अरुण विठ्ठल कांबळे-बनपुरीकर --- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७४:डॉ.श्रीकांत श्रीपती पाटील -- प्रसिद्ध साहित्यिक,सर्व साहित्य प्रकारांमध्ये विपुल लेखन,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९७०:डॉ.देविदास तारु-- कवी,लेखक* *१९६८:प्रा.संतोष काळे-- कवी* *१९६५:छाया पाथरे --लेखिका**१९६२:मिलन मोहनीराज बसमतकर-कामोठे - प्रसिद्ध लेखिका* *१९५७:डॉ.अरुणा रामचंद्र ढेरे-- प्रसिद्ध मराठी भाषेतील लेखिका,कवयित्री**१९५३:डॉ.प्रदीप प्रभाकर गोखले--- कवी, लेखक व तत्त्वज्ञानाचे माजी प्राध्यापक**१९५१:प्रा.विमल गाडेकर-- विदर्भातील ख्यातनाम कवयित्री,लेखिका(मृत्यू:२६ मार्च २०२१)**१९४९:मंगला गोडबोले-- सामाजिक जाणीवेने लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका**१९४८:राधिका भांडारकर -- कथा लेखिका**१९४२:रविकांत धोंडू मिरासी -- लेखक**१९४०:बाळ राणे --आत्मचरित्र,कादंबरी, ऐतिहासिक ग्रंथ,अध्यात्मिक ग्रंथ,समीक्षात्मक लेखन,कथा लेखन असे विपुल लेखन(मृत्यू:१२मे २०१६)* *१९४०:मनासाराम वंजी पाटील -- लेखक* *१९२६:वेणूबाई यशवंतराव चव्हाण-- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी(मृत्यू:१ जून १९८३)**१९२३:ललित नारायण मिश्रा –माजी केंद्रीय रेल्वे मंत्री,पहिल्या,दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार (मृत्यू:३ जानेवारी १९७५)**१९०८:वामन रावजी ढवळे-- कवी,संपादक, चरित्रकार(मृत्यू:३० जून १९८४)**१९०५:अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (मृत्यू:६ मार्च १९८२)**१८८४:डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार.’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय.(मृत्यू:१० एप्रिल १९३७)**१८५६:स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य,गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक (मृत्यू:२३ डिसेंबर १९२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:कासीनाधुनी विश्वनाथ -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक(जन्म:१९ फेब्रुवारी १९३०)**२००९:अजित सोमण-- प्रसिद्ध बासरीवादक,संगीतज्ञ,संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक(जन्म:६ ऑगस्ट १९४७)**२००७:विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (जन्म:२७ डिसेंबर १९४४)**१९८७:अनंत वामन वर्टी--संपादक, लेखक (जन्म:२ डिसेंबर १९११)**१९८७:अ‍ॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म:२१ एप्रिल १९२२)**१९७०:बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (जन्म:१८ मे १८७२)**१९३०:वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार,पत्रकार,संपादक,अनुवादक, निबंधकार व कोशकार.त्यांनी लहान मुलांसाठी ’आनंद’ हे मासिक सुरू केले होते.(जन्म:१२ एप्रिल १८७१)**१९१७:महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला. (जन्म:४ मे १८४७)**१९०७:दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (जन्म:८ फेब्रुवारी १८३४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक वसंता*प्रामाणिकपणा मुळे वसंताचे क्लेक्टरकडून कौतुक आणि पन्नास हजार रूपयाचे पारितोषिक आजच्या सर्वच पेपर मध्ये ही बातमी झळकली. खरोखरच वसंताने कामच असे केले होते म्हणून स्वतः कलेक्टर साहेबांनी त्याचे कौतुक केले. वसंता एक ऑटो ड्रायव्हर. गरीब मात्र प्रामाणिक. त्याने कधी ही पैश्याची हाव केली नाही. ऑटो चालविताना वाहतुकीचे नियम तोडला नाही की कोठे छोटा अपघात देखील केला नाही. प्रवाश्यासोबत नेहमी प्रेमळ वागत असतो. वयोवृध्द व्यक्तिना कमी पैश्यात त्यांच्या इच्छित स्थळी सोडत असे. एक-दोन रूपयासाठी त्याने प्रवाश्यासोबत कधी घासाघीस केली नाही. प्रवाशी हेच आपले दैवत असे तो समजायचा................ पूर्ण लघुकथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 केला सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्राच्या धर्तीवर देशातील महिला उद्योजकांसाठी धोरण राबविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणासाठी दोन कोटी 12 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण, आज सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *क्राफ्ट इन्स्ट्रक्टर परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याची गौरी पाटील-पवार मुलींमध्ये राज्यात प्रथम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा दावा, या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांत एकमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज विशाखापट्टनम येथे सुरू होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 अणू म्हणजे काय ? 📙अणू म्हणजे मूलतत्त्वाचा सर्वात लहान कण. अणुबद्दल अनेक पुस्तकातून, अनेक अभ्यासक्रमांतून, अनेक वेळा आपण शिकत आलो आहोतच. मग येथे वेगळे ते काय वाचायचे ?अणूचे अंतरंग केंद्रकाने बनलेले असते, हे माहित आहेच, पण हे केंद्र किती छोटे असावे ? एखाद्या शाळेच्या हॉलमध्ये मध्यभागी एखाद्या साखरेचा दाणा तरंगत ठेवला तर तो म्हणजे केंद्रक व हॉलचा बाह्यभाग व भिंती म्हणजे इलेक्ट्रॉनचा फिरण्याचा परीघ होय. एवढ्यावरच ही तुलना थांबत नाही. बॉलपेनचा शाईचा एक ठिपका कागदावर उमटवा. या ठिपक्यामध्ये किती अणू मावतील, असे बघितले तर आकडा येतो चार अब्जाचा. म्हणजेच या चार अब्जांतील एकाचे केंद्र किती छोटे असेल ? पण या अणूचे सर्व वजन मात्र या केंद्रकातच सामावलेले असते. इलेक्ट्रॉन प्रचंड गतीने फिरत असतात. या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या आणि केंद्रकाभोवती घिरट्या घालणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्याने विजेने भारलेल्या कणांचा बनलेला असूनही एकूण भार शून्य असल्याने अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. निसर्गात दिसणारी विविधता विविध प्रकारच्या अणूंच्या संयोगाने येते. उण्यापुऱ्या पन्नास मूळ अक्षरांतून सारे साहित्य निर्माण होते, तसेच हे अणू किती गतिमान आहेत, यावर पदार्थाची घन, द्रव, वायू वैगरे अवस्था ठरते.हायड्रोजन सर्वात हलका, युरेनियम खूपच जड; पण या दोघांचे अणूचे आकार मात्र सारखेच असतात. खरे म्हणजे जगातील जी काही शंभरच्या आसपास आढळणारी मुलद्रव्ये आहेत, त्या सर्वांच्या अणूचे आकार सारखेच असतात. फरक असतो तो त्यांच्या केंद्रकात असलेल्या न्यूट्रॉनचा व प्रोटॉनच्या संख्येत. प्रोटॉनच्या संख्येएवढी त्यांच्याभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या असते. पण हे प्रोटॉन व न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनपेक्षा प्रत्येकी जवळजवळ दोन हजार पटींनी जास्त जड असतात. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका, पण त्यात फक्त एक प्रोटॉनच असतो. पण नेमका त्याच आकाराचा युरेनियम घेतला तर त्यात ९२ प्रोटॉन व ९२ न्यूट्रॉन असतात. म्हणून तो विलक्षण जड होतो.मुलद्रव्ये मोजकीच आहेत. पण मग अनेकदा युरेनियमसारख्या मूलद्रव्याच्या संज्ञेपुढे विविध आकडे असलेले वाचायला मिळतात. मूलद्रव्यातील प्रोटाॅनचा आकडा हा त्याचा अणुक्रमांक सांगतो. पण एकाच मूलद्रव्याच्या अणूच्या प्रोटॉनची संख्या तीच राहून न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असलेले प्रवाह असू शकतात. त्यांना 'आयसोटोप' असे म्हटले जाते. प्रोटॉन व न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे आयसोटोप्सचा आकडा येतो. असाच प्रकार रेडियम, क्लोरिन, आयोडिन इत्यादी बहुसंख्य मुलद्रव्यांबाबत आढळतो. सारे जग अशा या अणूंपासूनच बनलेले आहे. अगदी आपले सारे शरीरसुद्धा ! सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दुहेरीत ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे ?२) ७५ व्या प्रजासत्ताक दिनाची मुख्य संकल्पना काय होती ?३) हडप्पा संस्कृतीत कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे ?४) उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?५) बिहार राज्याची विधानसभा सदस्यसंख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) रोहन बोपण्णा, भारत ( ४३ वर्षे ३२९ दिवस ) २) विकसित भारत व भारत: लोकशाहीची जननी ३) कालीबंगण ४) कॅनडा ५) २४३ सदस्य*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रुखमाजी भोगावार, नगरपालिका, धर्माबाद👤 डॉ. देविदास तारू, साहित्यिक, नांदेड👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 बालाजी गोजे, सहशिक्षक👤 विनोद गुंडेवार👤 किरण बासरकर👤 चेतन घाटे, धर्माबाद👤 राजू जगदंबे, धर्माबाद 👤 चक्रधर ढगे, चिरली👤 गजानन वासमकर👤 सुंदर व्ही माने👤 पोतन्ना लखमावाड, पत्रकार, धर्माबाद👤 विनोद गुंडेवार👤 शिवाजी कौटकर, सहशिक्षक, बिलोली👤 राजू जगदंबे, धर्माबाद👤 दत्ता लिंगमपल्ले👤 संजय ढगे, चिरली👤 साहेबराव वानखेडे👤 शंकर गोपतवाड, सहशिक्षक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी। क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥ मुखे बोलिल्यासारिखे चालताहे। मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे॥१८२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷आजची विचारधारा ...🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लहान्याची चूक होते तेव्हा, त्याच्या झालेल्या चुकीविषयी सर्वचजण त्याला बोलत असतात. पण जेव्हा वयाने मोठे असणारे चुकतात त्यांना मात्र कोणीही बोलत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, पिकतात पण शिकत नाही. कधी, कधी वयाने लहान असणारे चुकतात पण, त्यांना त्यांची चूक उशीरा का होईना कळत असते. आणि जेव्हा मोठे माणसे सर्व समजून, उमजून सुद्धा चुका करतात तेव्हा मात्र लहान्यांचे जगणे कठीण होऊन जाते. म्हणून चूक झाली असेल तर त्यावर आपणच विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करून बघावे पण, इतरांच्या सांगण्यावरून चुकीच्या मार्गाने जाऊन दुसऱ्याला त्रास देऊन स्वतः चा समाधान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*॥ कथा 3 मित्रांची॥*   ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते. तिघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकत्र रहात असत. पण एक दिवस.....     त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. अरेरे.....  त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचरले....  "आता आपण परत भेटणार केव्हा?  कुठे? ? ?  ज्ञान :-मी विद्यालयात भेटेन...  धन:-मी तर श्रीमंताकडे भेटेन...   विश्वास मात्र शांत होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते.   "कारे... ? का रडतोस?"  विश्वास हुंदके देत--  *"मी एकदा गेलो तर* ....         *पुन्हा*   *कधी नाही भेटणार*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३२वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:मक्‍का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.**१९९२:भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.**१९८१:ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.**१९७९:१५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.**१९६४:प्र.बा.गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५६:सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४६:नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.**१९४१:डॉ.के.बी.लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.**१८९३:थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.**१८८४:’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.**१८३५:मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:विकी पांडुरंग कांबळे-- कवी**१९८१:प्रमोद अंबडकर-- कवी,गीतकार**१९७५:डॉ.प्रिया प्रवीण मदनकर (धांडे)-- कवयित्री* *१९७४:इंदिरा गोविंदराव चापले-भोयर-- कवयित्री**१९७२:यशवंत गोविंदा निकवाडे -- कवी, लेखक* *१९७२:भगवान मार्तंड पाटील-- कवी**१९७१:अजय जडेजा – प्रसिद्ध क्रिकेटपटू, अभिनेते**१९६०:सुरेश प्रल्हाद साबळे-- लेखक, समीक्षक,व्याख्याते,कवी**१९६०:जॅकी श्रॉफ – प्रसिद्ध अभिनेता**१९५९:रामदास लक्ष्मण राजेगावकर - बालकवी,लेखक,समीक्षक* *१९४५:मधुकर रामदास गजभिये-- कवी**१९४५:प्राचार्य रमेश भारदे-- लेखक* *१९४४:अरुण चिंतामण टिकेकर -- लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक,लेखक अनुवादक (मृत्यू:१९ जानेवारी २०१६)**१९४३:मधुकर पांडुरंग खरे-- लेखक**१९३१:बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू:२३ एप्रिल २००७)**१९३१:पांडुरंग पिलाजी धरत-- लेखक* *१९३१:शशिकांत दत्तात्रय कोनकर-- लेखक**१९२९:जयंत साळगावकर –ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू:२० ऑगस्ट २०१३)**१९२७:मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:२६ जानेवारी २०१५)**१९२७:प्रा.बन्सीलाल लुकडू सोनार-- लेखक* *१९१७:ए.के.हंगल– चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू:२६ ऑगस्ट २०१२)**१९१२:राजा बढे – संपादक,चित्रपट अभिनेते,लेखक,गायक,कवी आणि गीतकार (मृत्यू:७ एप्रिल १९७७)**१९०४:बाबुराव रामचंद्र घोलप --शिक्षणतज्ज्ञ (मृत्यु:२६ मे १९८२)**१९०१:क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू:१६ नोव्हेंबर १९६०)**१८८४:सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू:६ जानेवारी १९८४)**१८६४:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ,शिक्षणतज्ञ,संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू:५ जानेवारी १९४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक* *२००३:कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म:१ जुलै १९६१)**१९९५:मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू:१० एप्रिल १९०७)**१९७६:वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:५ डिसेंबर १९०१)**१९६४:नारायण पैकाजी पंडित(बाबाजी महाराज)-- प्रवचनकार,ग्रंथकार(जन्म:१२ जानेवारी १८८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*मुलांनो, तुम्ही शाळेत कशासाठी जाता ? असा प्रश्न जर कोणी विचारला असता, मुले उत्तर देतात की,  शिकण्यासाठी तर कोणी म्हणतो की ज्ञान मिळवण्यासाठी. मग शिक्षण किंवा ज्ञान आपणाला फक्त शाळेतूनच मिळते काय ? प्रसिद्ध विचारवंत टी. एडवर्ड यांच्या मतानुसार, शिक्षण म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सर्व वातावरणाचा परिणाम, सर्व प्रकारचे शिक्षण, शिस्त आणि संस्कृतीची बेरीज. म्हणूनच आपण आजीवन विद्यार्थी म्हणून जगत असतो. शाळेतून फक्त आपणाला अक्षरज्ञान आणि संख्याज्ञान मिळते, तर समाजात वावरताना जे अनुभवाचे ज्ञान मिळते त्यावर आपण यशस्वी जीवन जगू शकतो. म्हणूनच आचार्य विनोबा भावे म्हणतात की.............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा पहिला मानाचा "शिवसन्मान पुरस्कार" भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित, साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती दिनी गौरवपूर्ण प्रदान करण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपाई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे ‘25 वा भारत रंग महोत्सव’:1 ते 21 फेब्रुवारी दरम्यान होणार पुण्यात; NSDचे संचालक चित्तरंजन त्रिपाठींची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय:राज्यातील 17 IAS अधिकाऱ्यांच्या तर CP, DCP, SPसह 42 पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *खा. सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी:टंचाईचा आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पोलिसांच्या 100 टक्के जागा भरण्यास अर्थ विभागाने दिली मंजुरी, राज्यात तब्बल 17 हजार 471 पोलिसांची भरती होणार, सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सहाव्यांदा संसदेत उभ्या राहून १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंतराळवीर कल्पना चावला*• काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.• 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.• 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.• 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.• अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.• नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.• नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.• त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15 व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.• नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.• शेवटी तो दिवस उजाडला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.• एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.*कल्पना यांचा शेवटचा प्रवास*• नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.• जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेषतज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.• 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळयानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.• त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.• 22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.• तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.।। विनम्र अभिवादन ।।संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" उत्पतीशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुनःउत्पती नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत ?२) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP ) चे मुख्यालय कोठे आहे ?३) 'विक्टर सिटी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) ऑस्ट्रेलियन महिला ओपन टेनिस स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणी पटकावले ?*उत्तरे :-* १) ५३ २) नैरोबी, केनिया ३) सलमान रश्दी ४) २५ जानेवारी ५) आर्यना सबालेंका, बेलारूस *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख👤 नारायण गायकवाड👤 शिवानंद सूर्यवंशी👤 कवी गजानन काळे👤 अतुल भुसारे👤 शिवम पडोळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु। नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥ नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू। जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू॥१८१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *आजचा विचाधारा......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नदीतील पाण्याच्या धारेला कितीही अडवण्याचा प्रयत्न जरी केले तरी त्या,धारेला आधार देण्यासाठी एखादा झरा आपोआप तयार होत असतो. कारण त्याला, त्याची महती कळत असते.तसंच सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याच्या वाटेत टोकदार काटे पेरणारे कितीही असले तरी चालणाऱ्याला साथ देण्यासाठी त्या निर्मळ झऱ्याप्रमाणे एखादी व्यक्तीची साथ मिळत असते. म्हणून कोणालाही अडविण्याचा प्रयत्न करू नये. कारण वेळ एक, एक सेकंदाला बदलत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्‍याच्‍याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्‍याला विचारले,’’तुमच्‍याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्‍ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्‍ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्‍हणाला,’’ राजा, आपण आपल्‍या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्‍यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्‍हणाला,’’ माझ्याकडे असलेल्‍या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्‍ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्‍याला आपण अमूल्‍य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्‍याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्‍यामुळे मी स्‍वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्‍वराने दिल्‍याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्‍पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्‍हणून मी रात्री स्‍वतलाच सांगत असतो नव्‍हे माझ्या आत्‍म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्‍याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्‍थान दिले.*तात्पर्य :- मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/ashok-saraf.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३१वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९५०:राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.**१९५०:अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.**१९४९:बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.**१९४५:युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.* *१९२९:सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.**१९२०:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकाची सुरूवात**१९११:स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली.तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:सतीश जनाराव अहिरे-- कवी, गझलकार* *१९७५:प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका**१९६५:प्रा.डॉ.संजय निळकंठ पाटील-- लेखक**१९५८:प्रा.डॉ.शंकर चव्हाण -- लेखक, संपादक* *१९५२:डॉ.रमेश नारायण वरखेडे -- जेष्ठ समीक्षक,संशोधक संपादक* *१९५२:डॉ.सतीश शास्त्री -- लेखक (मृत्यू:२६ जानेवारी २०२३)**१९५०:लीना मेहेंदळे--भारतीय प्रशासन सेवेतील पूर्व सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध लेखिका**१९४८:राजा सखाराम जाधव-- समीक्षक, दलित साहित्याचे अभ्यासक(मृत्यू:१९ डिसेंबर २००८)**१९३१:गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (मृत्यू:२३ डिसेंबर २००८)**१९२१:प्रा.डॉ.गंगाधर विठ्ठल कुलकर्णी-- कवी,लेखक**१९१५:हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई-- चरित्र लेखक* *१८९६:दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा ’अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी,पद्मश्री (१९६८),त्यांच्या ’नाकु तंती’ या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (मृत्यू:२१ आक्टोबर १९८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:इलाही जमादार-- सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी(जन्म:१ मार्च १९४६)**२००४:व्ही.जी.जोग – व्हायोलिनवादक (जन्म:२२ फेब्रुवारी १९२२)**२००४:सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या – गायिका व अभिनेत्री (जन्म:१५ जून १९२९)**२०००:वसंत कानेटकर – नाटककार (जन्म:२० मार्च १९२०)**२०००:कृष्ण नारायण तथा के.एन.सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म:१ सप्टेंबर १९०८)**१९९५:सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, ’रोखे बाजार नियामक मंडळाचे’ (SEBI) चे अध्यक्ष,पद्मभूषण* *१९९४:वसंत जोगळेकर – मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक**१९९०:प्रा.श्रीनिवास रघुनाथ कावळे-- मराठी लेखक (जन्म:१३ सप्टेंबर,१९३०)**१९८६:विश्वनथ मोरे – संगीतकार* *१९७२:महेन्द्र – नेपाळचे राजे* *१९६९:अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक, मौनव्रती संत (जन्म:२५ फेब्रुवारी १८९४)**१९५४:ई.एच.आर्मस्ट्राँग – एफ.एम. रेडिओचे संशोधक (जन्म:१८ डिसेंबर १८९०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चेहऱ्यावरील हावभावाने विनोद निर्माण करणारा अभिनेता - अशोक सराफ*अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशोक सराफ यांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी व हिंदी चित्रपटातील जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमेरिकेत मराठी शिक्षणाऱ्या मुलांना बालभारती पुरवणार पाठ्यपुस्तकं, शिक्षण विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *यंदाचा 'प्राईड ऑफ बीएमसीसी' पुरस्कार:प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे आणि प्रसिध्द उद्योगपती डॉ. विक्रम मेहता यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रा. जी. रघुराम, डॉ. राजेंद्र सिंह, कौशिकी चक्रवर्ती व डॉ. अशोक गाडगीळ यांना भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एप्रिलनंतर वीज दरवाढीचा शॉक ; घरगुती वीजदर वाढण्याची शक्यता, छोट्या घरगुती ग्राहकांवर मोठा भार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आम्लपित्त*आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. • अनियमित जेवणाची सवय आणि जागरण • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. • हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) • आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.उपचार - • जेवणात नियमितता ठेवावी. • साधा आहार घ्यावा. • तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. • दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.( इंटरनेटवर मिळालेली माहिती )••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वोत्तम प्रयत्न केले की, यशाचा मार्ग मोकळा होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथाची संकल्पना काय होती ?२) आयसीसी - २०२३ चा सर्वोत्कृष्ठ कसोटी क्रिकेटर कोण ठरला आहे ?३) आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?४) घोड्यांना ठेवतात त्या जागेला काय म्हणतात ?५) बेळगावचा वाद हा कोणत्या दोन राज्यात आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज - लोकशाहीचे जनक २) उस्मान ख्वाजा, ऑस्ट्रेलिया ३) रशिया ४) तबेला किंवा पागा ५) महाराष्ट्र व कर्नाटक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर👤 राजेश्वर रामपुरे, धर्माबाद👤 जयेश पुलकंठवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जया मानला देव तो पुजिताहे। परी देव शोधुनि कोणी न पाहे॥ जगी पाहता देव कोट्यानुकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समयसुचकता*एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्‍या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'तात्पर्य :- प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/09/mahatma-gandhi.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_हुतात्मा दिन_**_कुष्ठरोग निवारण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३०वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्‍न’**१९९७:महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.**१९९४:पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.**१९३३:अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.**१६४९:इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६९:प्रदीप मनोहर पाटील-- लेखक,कवी**१९५९:निर्मिती सावंत-- मराठी अभिनेत्री* *१९५३:सुधीर कोर्टीकर-- नाणे संग्रहाक,छायाचित्रकार,कवी,लेखक**१९५१:जयंत गुणे-- लेखक,अनुवादक**१९४९:डॉ.सतीश आळेकर – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते**१९४८:स्मिता राजवाडे--कादंबरी,कथा, ललित,काव्यसंग्रह,अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य,नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू:१८जानेवारी २०२२)**१९४५:सदानंद हरी डबीर -- कवी,गीतकार, गझलकार**१९४३:भगवान माधवराव परसवाळे-- कवी**१९३६:पं.दिनकर पणशीकर जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक(मृत्यू:३ नोव्हेंबर २०२०)**१९३३:शांताराम राजेश्वर पोटदुखे-- पत्रकार,माजी खासदार,माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा लेखक (मृत्यू:२३ सप्टेंबर २०१८)**१९३०:सुनिता भास्कर देवधर-- लेखिका* *१९२९:रमेश देव – हिंदी,मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते,निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू:२ फेब्रुवारी, २०२२)**१९२७:प्राचार्य मोतीचंद्र गुलाबचंद शहा-- लेखक**१९२७:ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९८६)**१९१७:वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू:२७ जुलै २००७)**१९११:पं.गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू:२८ जून १९८७)**१९१०:सी.सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू:७ नोव्हेंबर २०००)**१८९५:शंकरराव दत्तात्रय देव-- विचारवंत, लेखक (मृत्यू:३० डिसेंबर १९७५)**१८९१:गोपाळ रामचंद्र परांजपे-- विज्ञान लेखक (मृत्यू:६ मार्च १९८१)**१८८२:फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१२ एप्रिल १९४५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:नंदू घाणेकर -- ज्येष्ठ संगीतकार व फिल्म मेकर (जन्म:४ नोव्हेंबर १९५८)**२०२०:विद्या बाळ-- मराठी स्त्रीवादी लेखिका/संपादिका (जन्म:१२ जानेवारी १९३७)**२००१:वसंत शंकर कानेटकर --- लोकप्रिय मराठी नाटककार,लेखक,कादंबरीकार आणि विचारवंत.(जन्म:२० मार्च १९२२ )**२०००:आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते* *१९९६:गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक**१९४८:काशीबाई कानिटकर-- मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या.मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला (जन्म:२० जानेवारी १८६१)**_१९४८:मोहनदास करमचंद गांधी- ’महात्मा’गांधी - राष्ट्रपिता (जन्म:२ आक्टोबर १८६९)_**१९४८:ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म:१९ ऑगस्ट १८७१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी*महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर : 27 फेब्रुवारी रोजी होणार मतदान, निवडणूक आयोगाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परीक्षा पे चर्चा - विद्यार्थ्यांच्या समस्या, स्पर्धेची भावना, पालकांच्या चिंता, वेळेचे व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर पंतप्रधान मोदींनी 2 तास चर्चा केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रात गुंतवणुकीचा निप्पॉन स्टील सोबत सामंजस्य करार:40 हजार कोटींची गुंतवणूक; 20 हजार रोजगार निर्मिती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मत्स्यव्यवसायात विदर्भातून 50 हजार कोटींची निर्यात शक्य:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती; तलावाची स्वच्छता करण्याचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठा व खुला प्रवर्ग सर्व्हेक्षणाचा विभागस्तरीय आढावा : 31 जानेवारीपर्यंत सर्व्हेक्षण पूर्ण करा; मागास आयोगाचे सदस्य डॉ. गजाजन खराटे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा : रणबीर कपूरला 'ॲनिमल'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तर 12th फेल सर्वोत्कृष्ट चित्रपट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या टेस्टआधी भारताल दोन धक्के : जडेजा व राहुल दुखापतीमुळे बाहेर, सरफराज आणि सौरभ कुमारला संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✨ *तारे का लुकलुकतात ?* ✨ """""""""""""""""""""""""""""""""""""""""'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार' यासारख्या बालगीतांमधून आपल्याला लहानपणापासूनच तारे लुकलुकतात, हे मनावर बिंबवलं जातं. 'टिमटिम करते तारे' सारख्या गीतांमधून हा समाज बळावतोच. तरीही तारे का लुकलुकतात, या सवालाचं मोहोळ घोंगावतच राहतं. तारे स्वयंप्रकाशित असतात. म्हणजे त्यांच्या अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुभट्ट्यांमधून जी ऊर्जा बाहेर पडते ती प्रकाशलहरींच्या रूपात उत्सर्जित केली जाते. या प्रकाशाचे किरण अनंत अवकाशातून प्रवास करताना बहुतांश निर्वात पोकळीतून जात असतात. ते जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना आपल्या या धरतीच्या सभोवती असलेल्या वातावरणातून प्रवास करावा लागतो. वातावरण ज्यांचं बनलेलं आहे त्या वायूंच्या ढगांमधून त्यांना पार पडावं लागतं. हे वायूचे ढग स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. आकाशात जेव्हा आपण ढग पाहतो तेव्हा ते एका जागी स्थिर तर नसतातच; पण त्यांचे आकारही सतत बदलत असताना आपल्याला दिसतात. याचाच अर्थ वायु स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. हवाही अशीच सतत हलत असते. त्यांच्यामधून जेव्हा ते किरण पार होतात तेव्हा मग ते किरणच स्थिर नसून सतत हलत असल्यासारखं वाटत राहतं. त्यामुळे तारे लुकलुकत असल्यासारखं वाटतं. वास्तविक हलत असते ती हवा.असं जर आहे तर मग मंगळ, शुक्र, गुरू यांसारख्या ग्रहांवरून परावर्तीत होणारा प्रकाशही त्याच वातावरणातून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. त्यापायी मग ते ग्रहही लुकलुकत असलेले दिसावयास हवे; पण तसं होत नाही. एवढंच कशाला पण जो आपल्याला प्रकाश देतो आणि जो आपला जीवनदाता आहे तो सूर्यही एक ताराच आहे; पण त्याचा प्रकाश तर स्थिर असतो. तो लुकलुकताना दिसत नाही. तेव्हा मग तारेच लुकलुकतात आणि ते हलत्या हवेपायी होतं हे कितपत खरं आहे ? वास्तविक कोणताही ग्रह काय किंवा तारा काय हा बिंदूमात्र नसतो. त्याला विशिष्ट आकारमान असतं. व्याप्ती असते. त्यामुळं आपल्या नजरेत ते बिंबासारखे किंवा चकतीसारखे असतात. त्यांच्यापासून निघणारा प्रकाश झोतासारखा असतो, एकमेव किरणासारखा नसतो. त्यामुळे त्याने झोताचे सर्वच किरण हलत्या हवेतून जातांनाही एकसाथ हालत नाहीत. त्यामुळे तो झोत लुकलूकल्यासारखा वाटत नाही. सूर्यापासून निघणारा प्रकाशही असाच झोतस्वरूप असतो. त्यामुळे तो विशाल पसरतो, लुकलुकत नाही; पण तारे आपल्यापासून लक्षावधी, कोट्यवधी प्रकाशवर्ष अंतरावर असतात, त्यामुळे इतक्या दूरवरून य त्यांचं बिंब एखाद्या बिंदूसारखंच दिसतं. त्यांच्यापासून प्रत्यक्षात जरी प्रकाशझोत निघत नसेल असला तरी तो एखाद्या एकमेव किरणासारखाच वाटतो. क्षीणही झालेला असतो. त्यामुळे मग हलत्या हवेतून येताना तोही हलल्यासारखा होतो. तो तारा लुकलुकतो.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" अहिंसा हे बलवानाचे शस्त्र आहे.- महात्मा गांधीजी "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रेल्वेत प्रवास करतांना आईबरोबर बाळालाही सुखद झोप मिळावी यासाठी बनविलेले *'बेबी बर्थ'* कोणत्या शिक्षक दाम्पत्यानी बनविले आहे ?२) आपल्या राष्ट्रध्वजाचा आकार कोणता असतो ?३) आयसीसी - २०२३ चा सर्वोत्कृष्ठ एकदिवसीय क्रिकेटर कोण ठरला आहे ?४) निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात ?५) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ? *उत्तरे :-* १) नितिन देवरे व हर्षाली देवरे २) आयताकृती ३) विराट कोहली, भारत ४) राष्ट्रपती ५) ब्राझील *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. बालाजी कोंपलवार, अध्यक्ष बाभळी बंधारा कृती समिती, धर्माबाद👤 राजेश पटकोटवार, धर्माबाद👤 सचिन रामदिनवार, शिक्षक, मुखेड👤 सौ. सारिका सब्बनवार, शिक्षिका व लेखिका, कुंडलवाडी👤 बालाजी पुलकंठवार, शिक्षक धर्माबाद👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक, देगलूर👤 देवराज बायस👤 सुरज एडके👤 सतीश गणलोड👤 शिवकुमार माचेवार👤 अंकुश निरावार👤 रंजना भिसे, शिक्षिका, पालघर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु पाहता पाहता लक्ष कोटी। बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी॥ मनी कामना चेटके धातमाता। जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥१८०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वैरता निर्माण करण्यासाठी डोंगरावर जावे लागत नाही. जेव्हा आपले बोलणे स्पष्ट असते, परखड विचाराची पेरणी असते, कोणाचे गुलाम बनून त्यांच्या मताप्रमाणे वागणे नसते, समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची आवड असते आणि सत्याची वाट असते तेव्हा पहिली वैरता वेळ प्रसंगी कुटुंबातूनही सुरूवात व्हायला जास्त वेळ लागत नाही व एकदा तिची सुरूवात झाली की, मग त्याचा प्रसार मोठ्या वेगाने होत असतो. शेवटी सर्वच संपून जाते. म्हणून असे अनर्थ टाळण्यासाठी आधी त्या व्यक्तीला वाचणे आवश्यक आहे. भलेही साथ जरी देता नाही आले तरी चालेल पण, वैरताचे भागिदार होऊ नये. कारण जाळतांनी सर्वचजण सोबतीला असतात पण,शेवटी एकट्यालाच जळावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंगीकारलेली माणुसकीची वागणूक*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता. तो चोर सिंहाला म्हणाला, 'अरे सिंहा, या हरणाचं अर्ध मांस तुझ व अर्ध माझं.' हे ऐकून सिंह त्यास म्हणाला, 'अरे, निगरगट्ट माणसा, तुझा इथे काहीही संबंध नसता, एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचं अर्ध मांस तू मागतोस, या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो, नाही तर फुकट मरशील.' हे ऐकून तो चोर भिऊन पळून गेला.इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला टाळण्यासाठी दुसर्‍या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंहाने त्याला आदराने हाक मारली व म्हणाला, 'अरे भल्या माणसा, भिऊ नकोस. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस. ये आणि हा वाटा घेऊन जा.' सिंहाने दोन वाटे केले. एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वतः खाल्ला व अरण्यात निघून गेला.*तात्पर्यः माणसाची एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाचे वागणे पाहून सभ्य व भिडस्त लोकांना इतरजण आपण होऊन मान देतात त्या दिलेल्या  मानाचा मान टिकवून ठेवणे हे आपल्या वागण्यावर असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या फ्रेश मॉर्निंग बुलेटिन विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २७वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७३:पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.**१९६७:महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.**१९४५:दुसरे महायुद्ध – रशियाच्या _’रेड आर्मी’_ने पोलंडमधील _’ऑस्विच’_ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.**१९४४:दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.**१८८८:वॉशिंग्टन डी. सी. येथे _'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'_ची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:अरविंद उन्हाळे-- गझलकार* *१९७६:श्रेयस तळपदे --हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेता,चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९६७:बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार**१९६३:डॉ.उत्तम भगवान अंभोरे-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,लेखक**१९६३:आरती अंकलीकर टिकेकर-- भारतीय शास्त्रीय गायिका* *१९५१:आनंद दिघे--धर्मवीर नावाने प्रसिद्ध हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते(मृत्यू:२६ ऑगस्ट २००१)**१९३४:मुकुंद विष्णू टेकाडे -- बालसाहित्यिक, लेखक* *१९२७:वसंत विठ्ठल गाडे (गाडे गुरुजी)-- संघटक,संस्थापक, [विनोबा विचार केंद्र नागपूर] (मृत्यु:२४ जुलै २०१४)**१९२६:जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू:१० ऑगस्ट १९८६)**१९२२:अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेते (मृत्यू:२२ आक्टोबर १९९८)**१९२०:स्नेहलता यशवंत किनरे-- कवयित्री* *१९०९:डॉ.सविता भीमराव आंबेडकर(माईसाहेब) -- सामाजिक कार्यकर्त्या,लेखिका (मृत्यू:२९ मे २००३)* *१९०९:श्याम नीळकंठ ओक-- चित्रपट समीक्षक,लेखक(मृत्यू:१० मार्च १९८२)**१९०५:राजाराम प्रल्हाद कानिटकर -- लेखक संपादक* *१९०१:लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्‍गाते,विचारवंत,संस्कृत पंडित,मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष,१९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी _’तर्कतीर्थ’_ ही पदवी संपादन केली. (मृत्यू:२७ मे १९९४)**१८५०:एडवर्ड जे. स्मिथ – आर.एम.एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू:१५ एप्रिल १९१२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अनिल अवचट-- सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक (जन्म:२६ आगस्ट १९४४)**२०१६:दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी-- आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललितनिबंधकार (जन्म:२५ जुलै १९३४)**२००९:आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती,केन्द्रीय मंत्री,कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म:४ डिसेंबर १९१०)**२००८:डॉ.सुरेश महादेव डोळके-- धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक व ज्येष्ठ साहित्यिक (जन्म:२१ सप्टेंबर १९२६)* *२००८:सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:८ जून १९२१)**२००७:कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक,पटकथालेखक,दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म:६ डिसेंबर १९३२)**१९८६:निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म:१४ आक्टोबर १९३१)**१९६८:सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म:२६ मे १९०२)**१९४७:पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म:१९ एप्रिल १८६८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कमवा आणि शिका*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचाही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकली उपस्थितांची मनं, महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, मान्य केलेल्या मागण्यांचे जीआर दुपारी 12 पर्यंत देण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महामार्गावर तीन कोटींचा सशस्त्र दरोडा, आंतरराज्य टोळी जेरबंद; संशयितांमध्ये माजी सैनिकांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नितीश कुमार यांचा शपथविधी रविवारी होण्याची शक्यता, भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपदं मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला आणि दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्म विभूषण तर बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरोधात पहिल्या कसोटीचा दुसरा दिवसही भारताच्या नावावर; केएल राहुल-जाडेजाची फटकेबाजी, भारताकडे 175 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी*तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.  वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतइत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *बोन्साय* ची मूळ कल्पना कोणत्या देशातील आहे ?२) महाराष्ट्रातील पहिली महिला रुग्णवाहिका ड्रायव्हर कोण ?३) राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) चीन २) विषया लोणारे, भंडारा ३) सन २०११*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 माधवराव बोमले, चिरली👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटेना फुटेना कदा देवराणा। चळेना ढळेना कदा दैन्यवाणा॥ कळेना कळेना कदा लोचनासी। वसेना दिसेना जगी मीपणासी॥१७७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले असणारे सर्वच नातेवाईक जर शेवटपर्यंत साथ देणारे राहिले असते तर त्यांचा समाजात कायम पर्यंत उदोउदो होताना बघायला मिळाले असते. पण, तसं कधीच होताना दिसत नाही म्हणून होऊन गेलेल्या थोर संतानी म्हटले आहे की, सोयरे, धायरे संपत्तीचे लोक त्यांची वाणी सत्य आहे. सदैव त्यांच्या विचारांचे आपण स्मरण करावे. व ज्यांनी आपल्यासाठी सोन्यासारखे जीवनाचे बलिदान दिले त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत आठवणीत ठेवावे कारण खऱ्या अर्थाने तेच आपले नातेवाईक, प्रेरणास्थान, महात्यागी व मार्गदर्शक होते आणि आजही आहेत त्यांच्यामुळे आपल्याला न्याय, हक्क,शिक्षण,अधिकार सर्वच काही मिळाले आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *जंगलचा राजा !*एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे.माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण...मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण...तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू.जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता...'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण....सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिन🇮🇳_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील २६वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.**१९९८:कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना ’पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान**१९७८:महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू**१९५०:भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.**१९५०:एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४२:दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन**१९२४:रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.**१८७६:मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.**१८३७:मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.**१६६२:लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया**१५६५:विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:भारती संजय तितरे -- कवयित्री**१९८०:संतोष पवार चोरटाकार-- लेखक* *१९८०:अ‍ॅड.मयुर परशुराम जाधव -- लेखक, विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन* *१९७९:संदीप शामरावजी धावडे -- कवी, लेखक**१९७८:डॉ.सुनील अभिमान अवचार-- समकालिन संवेदनशील कवी,चित्रकार* *१९७७:सारिका उबाळे परळकर -- प्रसिद्ध कवयित्री* *१९७४:किरणताई नामदेवराव मोरे (चव्हाण)-- कवयित्री* *१९७०:स्वप्निल श्रीकांत पोरे-- प्रसिद्ध लेखक कवी* *१९६८:वर्षा विद्याधर चौबे-- लेखिका* *१९६२:सुहिता थत्ते-- भारतीय मराठी अभिनेत्री**१९५८:उदय नारायण क्षीरसागर-- कवी* *१९५७:शिवलाल यादव – क्रिकेटपटू**१९५२:सुप्रिया सरवटे -- लेखिका* *१९२६:विनायक गजानन कानिटकर-- मराठी विचारवंत लेखक (मृत्यू:३०ऑगस्ट २०१६)**१९२५:पॉल न्यूमन – अभिनेता,दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (मृत्यू:२६ सप्टेंबर २००८)**१९२१:अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (मृत्यू:३ आक्टोबर १९९९)**१९१९:लक्ष्मण वामनराव सबनीस -- लेखक* *१९११: विष्णू (पंडित) गंगाधर सप्रे-- कवी**१९११:भार्गव महादेव फाटक उर्फ बाबा फाटक-- क्रांतिवीर देशभक्त(मृत्यू:५ सप्टेंबर १९८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:डॉ.सतीश शास्त्री-- कादंबरीकार(जन्म:३१ जानेवारी १९५२)**२०२२: श्यामकांत विष्णू कुलकर्णी -- कवी, लेखक (जन्म:७ जुलै १९३३)**२०१८:गोरख शर्मा-- भारतीय गिटार वादक(जन्म:२८ डिसेंबर १९४६)**२०१५:रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर.के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार,पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (जन्म:२४ आक्टोबर १९२१)**१९६८:लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे--शिक्षणतज्ज्ञ,स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि संस्कृत कवी (जन्म:२९ ऑगस्ट १८८०)**१९६५:प्रल्हादबुवा सीताराम सुबंध-- वारकरी संप्रदाय,कीर्तनकार,प्रवचनकार, लेखक (जन्म:१८९५)**१९५४:मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (जन्म:२१ मार्च १८८७)**१८२३:एडवर्ड जेन्‍नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर (जन्म:१७ मे १७४९)* 🇮🇳🇮🇳🇮🇳 *_भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_* 🇮🇳🇮🇳🇮🇳~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••26 जानेवारी - भारतीय प्रजासत्ताक दिन..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे राहणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारताच्या Aditya-L1 ची आणखी एक मोठी कामगिरी, ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र केले स्थापित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन, कोल्ड स्टोरेजचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आरक्षणासाठी मराठा समाजाला आंदोलनाची गरज नाही:सरकार सकारात्मक, सरकारला सहकार्य करण्याचे CM शिंदेंचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विराट कोहली ठरला 2023 मधील एकदिवसीय फॉरमॅट मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, ICC ची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम (ध्वजसंहिता)*२६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली. म्हणूनच हा दिवस आपला गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या आपल्या तिरंगी ध्वजाचा मान राखणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने १९५१ मध्ये पहिल्यांदा ध्वजासंदर्भात काही नियम जाहीर केले. १९६४ मध्ये यात बदल करण्यात आले. १७ ऑगस्ट १९६८ मध्ये यात आणखी काही बदल करण्यात आले. ध्वजाचा आकार, निमिर्ती, रंग आदी सर्व सर्वच बाबतीत हे नियम लागू करण्यात आले. सूर्यांदयाच्या वेळी ध्वजारोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणे कायद्याने बंधनकारक आहे. काही खास प्रसंगी सार्वजनिक इमारतींवर रात्रीच्या वेळेसही ध्वज फडकावता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा अॅडव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा. मिरवणुकीच्या वेळेसही राष्ट्रध्वज अग्रभागी असायला हवा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंदीय मंत्री आदी महत्त्वाच्या व्यक्तींच्याच गाडीवर राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. अन्य कोणालाही आपल्या गाडीवर ध्वज लावता येत नाही. तसेच राजकीय महत्त्वपूर्ण व्यक्ती परदेशात जात असल्यास त्या विमानावर राष्ट्रध्वज लावता येतो. महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यास ध्वज अर्धवट उतरवण्यात येतो. ध्वज खराब झाल्यास तो जमिनीखाली पुरून किंवा जाळून नामशेष करावा लागतो, पण त्या वेळीसुद्धा त्याचा यथोचित मान राखायला लागतो. एकंदरच निमिर्तीपासून शेवटापर्यंत आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मंत्रालय आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरच सगळ्यात मोठे झेंडे फडकताना दिसतात.*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देशाने तुमच्यासाठी काय केले ? हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ? हे स्वत:ला विचारा…*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) प्रजासत्ताक दिनी झेंडा कोणाच्या हस्ते झेंडा फडकविला जातो ?२) भारताचा राष्ट्रीय ध्वज कुणी तयार केला होता ?३) राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कोणाला दिले जातात ?४) प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास कधीपासून सुरुवात झाली ?५) राज्यघटनेत पंचवार्षिक योजनेची संकल्पना कुठून घेण्यात आली होती ?उत्तरे :- १) राष्ट्रपती २) पिंगली वेंकय्या ३) शूर मुला-मुलींना ४) 26 जानेवारी 1950 ५) सेव्हिएत संघाच्या (USSR) घटनेतून*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुरेश पवार👤 प्रा. रवींद्र मुपडे, धर्माबाद👤 शेख जावेद👤 सतिशकुमार साटले👤 चंद्रकांत लांडगे👤 दिलीप सोनकांबळे👤 ओमसाई कोटूरवार👤 सचिन पुरी👤 मारुती गुंटूरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा। असंख्यात संख्या करी कोण शक्रा॥ जगी देव धुंडाळिता आढळेना। जगी मुख्य तो कोण कैसा कळेना॥१७६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनन व चिंतन सतत चालणारी मानसिक प्रक्रिया आहे. मनातल्या मनात विचार करत राहणे,विचार येणे हा मनोव्यापार आहे. मनात कधी चांगले तर कधी वाईट विचार येतात.आपल्या मनात काय चालले आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असते. आपले मनच जाणत असते.म्हणून जे काही चालले असेल ते चांगल्यासाठी असू द्यावे. कारण चांगल्या कार्याची भलेली उशीरा ओळख होत असेल तरी ती ओळख बघून मनाला एक वेगळ्याच प्रकारचा समाधान मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••२६ जानेवारीलाच संविधान का लागू केले गेले?२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय पर्यटन दिन_* *_राष्ट्रीय मतदार दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील २५वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्‍न’**१९९५:अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्‍यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!**१९९१:मोरारजी देसाई यांना ’भारतरत्‍न’**१९८२:आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्‍न’**१९७१:हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.**१९४१:’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१९१९:पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.**१८८१:थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.**१७५५:मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४ स्वाती बाळासाहेब ठुबे-खोडदे-- कवयित्री* *१९७५:एकता मेनकुदळे--- लेखिका**१९७१:डॉ.मिलिंद चोपकर -- लेखक* *१९५८:कविता कृष्णमूर्ती – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५४:मदन रामसिंह हजेरी -- कादंबरीकार,बालकथाकार**१९५२:प्रकाश नथुभाऊ खरात -- कवी,लेखक (मृत्यू:१९ एप्रिल २०२१)**१९५१:हेमलता प्रदीप गीते-- प्रसिद्ध कवयित्री**१९५१:अर्चना पंडित-- कवयित्री**१९३८:सुरेश विनायक खरे – मराठी नट, लेखक,दिग्दर्शक,जाहिरातपटकार,चित्रपट पटकथालेखक,नाट्यावलोकनकार, संवादक,मुलाखतकार,आणि मराठी नाटककार व समीक्षक**१९३३:दिनेश वामन वाळिंबे -- कवी**१९३१:डॉ.रामचंद्र विश्वनाथ मंत्री-- लेखक**१९१७:श्रीपाद दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक**१९१६:बापूसाहेब गोविंदराव लाखनीकर-- संस्थापक,लेखक (मृत्यू:२६ डिसेंबर २००१)**१९१४:जगन्नाथ शामराव देशपांडे-- प्राचीन मराठी संशोधक,संपादक* *१८८६:पांडुरंग नरसिंह पटवर्धन-- इतिहास संशोधक(मृत्यू:६ जुलै १९२१)**१८८३:आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे -- मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या (मृत्यू:२९ नोव्हेंबर १९५०)* *१८८२:व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू:२८ मार्च १९४१)**१८७४:डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू:१६ डिसेंबर १९६५)**१८६२:रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: १९२४)**१७३६:जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू:१० एप्रिल १८१३)**१६२७:रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:३० डिसेंबर १६९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:१ फेब्रुवारी १९२७)**१९९६:प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते* *१९८०:लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म:१८९०)**१९६४:शंकरराव रामचंद्र कानिटकर-- शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक(जन्म:११ जुलै १८८७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* *मतदार राजा जागा हो....!*इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण विषयी मुंबईकडे कूच केलेल्या मनोज जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयाची नोटीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी देखील दहा मिनिटं जादा वेळ, मंडळाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना आत्ताच अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा दिला सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; महाराष्ट्र तलाठी अंतिम निकाल mahabhumi.gov.in या लिंकवर पाहता येईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना मराठा आरक्षण सर्व्हेचं काम, शिक्षण व्यवस्था सलाईनवर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *युक्रेनजवळ रशियन लष्कराचं विमान कोसळलं, किमान 65 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 🐝डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या ओढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कर्पूरी ठाकूर यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर यांना कोणता पुरस्कार घोषित झाला ?२) बिहारचे जननायक म्हणून कोणाला ओळखले जाते ?३) बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री कोण होते ?४) राज्यात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले मुख्यमंत्री कोण ?५) बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा जन्म केव्हा झाला ? *उत्तरे :-* १) भारतरत्न २) कर्पूरी ठाकूर ३) कर्पूरी ठाकूर ४) कर्पूरी ठाकूर ५) २४ जानेवारी १९२४*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीमती कल्पना दत्ता हेलसकर, जालना👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर👤 राजीव सेवेकर👤 महेबूब पठाण👤 अंबादास कदम👤 राहुल आवळे👤 नरेश दंडवते👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरू जाळितो लोक संहारकाळी। परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले नातेवाईक किंवा संगे, सोयरे सुख,दु:खात आपुलकीने साथ देणारे असतील तर त्यांच्या विषयी कायमच आपल्या मनात आदर राहतो व कोणाची वेळ निघून गेली की, ते विसरूनही जातात.पण, असे व्हायला नको. पण दिलेल्या मदतीची आपण जाणीव ठेवावी जे आपुलकीने मदत करतात त्यांना विसरू नये व जे कोणी मदत करत नाही. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कृती महत्वाची*स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं.सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला.‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली ? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले.तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन_**_राष्ट्रीय बालिका दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील २४वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.**१९७६:’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.**१९७२:गुआममध्ये इ. स.१९४४ पासून लपलेला जपानी सैनिक,शोइची योकोइ सापडला.त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.**१९६६:भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.**१९६६:एअर इंडियाचे 'कांचनगंगा' हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ.होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.**१९४३:पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार**१९४२:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.**१९१६:नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.**१८६२:बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.**१८५७:दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.**१८४८:कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:जयंत देवाजी लेंझे-- कवी* *१९७१:प्रा.डॉ.गणेश नत्थुजी चव्हाण -- प्रसिद्ध भरकाडीकार,लेखक,संपादक* *१९५६:रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर-- कवी, लेखक,संपादक**१९५३:भगवान ठग-- प्रसिद्ध कवी आणि अनुवादक (मृत्यू:२२जानेवारी२००९)**१९४७:जयप्रकाश बाळकृष्ण म्हात्रे -- विज्ञान चळवळीचे कार्यकर्ते,वक्ते,लेखक* *१९४४:रामदास पाध्ये -- बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार* *१९४४:अशोक शेवडे --चित्रपट आणि नाटक विषयांवरील ज्येष्ठ पत्रकार (मृत्यू:१८ मार्च २०२१)**१९४३:सुभाष घई – प्रसिद्ध हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक**१९३९:नामदेव वासुदेव लोटणकर-- कवी* *१९३६:लक्ष्मण बाकू रायमाने-- मराठी व कानडी साहित्याचे गाढे अभ्यासक,लेखक आणि समीक्षक**१९२६:जय ओम प्रकाश-- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:७ ऑगस्ट २०१९)**१९२४:मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक,मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू:२८ डिसेंबर२०००)**१९२३:रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू:२३ ऑगस्ट १९७१)**१९१८:वामन बाळकृष्ण भागवत-- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ(मृत्यू:९ फेब्रुवारी २००४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:आनंद विनायक जातेगावकर--मराठी कथालेखक व कादंबरीकार(जन्म:६ जून १९४५)**२०११:स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक (जन्म:४ फेब्रुवारी १९२२)**२००५:अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्‍या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्‍याव सामाजिक कार्यकर्त्या**२०००:केशव पांडुरंग जोग--राष्ट्रीय संस्कृत व्याख्याता,संशोधक(जन्म:२६ मार्च १९२५)**१९९६:वसंत देव-- भारतीय लेखक,गीतकार आणि पटकथा लेखक(जन्म:१९२९)**१९६६:एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म:३०आक्टोबर १९०९)**१९६५:विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक,वृत्तपत्रकार,थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:३० नोव्हेंबर १८७४)* *_शुभ बुधवार_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन*आपल्या देशात प्रामुख्याने दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरे प्रजासत्ताक दिन होय. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन किंवा गणतंत्र दिवस म्हणून सुद्धा ओळखले जाते. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला होणार या व्हायरल पत्राचे स्पष्टीकरण देत निवडणूक आयोग म्हणाले, ही तारीख फक्त कामकाजाच्या संदर्भासाठी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ, वल्लभभाई लखानींसह बड्या व्यापाऱ्यांचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षण सर्व्हेच्या पहिल्याच दिवशी अडथळे, सर्वर बंद झाल्याने काही वेळासाठी कामकाज रखडलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात 1 लाख 75 हजार मतदार वाढले, तरुण मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सोन्या-चांदीचे दागिने महागणार? केंद्र सरकारने आयातकर वाढवला आणि उपकरही लावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC कडून 2023 वनडे टीमची घोषणा, 6 भारतीयांना स्थान, रोहितकडे नेतृत्व, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केरळमधील एका रेस्टॉरंटमधील घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हे रेस्टॉरंटचं बिल हे मल्याळम भाषेत आहे. ही कहाणी मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्वात महत्वाची मानली जात आहे. केरळमधील मल्लापुरम भागातील रेस्टॉरंटमध्ये एक जण जेवत होता. बाहेर उभ्या असलेल्या लहानशा भाऊ-बहिणीचे डोळे त्या व्यक्तीच्या जेवणाच्या ताटाकडे भूकेच्या नजरेने पाहत होते. त्या व्यक्तीने इशारा केला, चिमुकल्या भाऊ-बहिणींची नाजूक, पण गरीबीच्या खुणा असलेली पावलं, घाबरत-घाबरत रेस्टॉरंटमध्ये पडली. जेवत असलेल्या त्या व्यक्तीने काय खायचंय ? असा इशारा केल्यावर, भावा-बहिणीने त्या व्यक्तीच्या ताटाकडे इशारा केला. चिमुकल्यांसाठीही जेवण मागवण्यात आलं. मुलं लहानशा हातात येईल तेवढं, पटापट खात होते, त्यांचं लक्ष फक्त ताटाकडे होतं. भरपेट जेवा, असं सांगण्याचंही काम त्या व्यक्तीला आलं नाही. छोट्याशा निष्पाप पोटातली, भूकेची भीषण आग विझत असावी. मुलांचं जेवण झालं, रेस्टॉरंटच्या काऊंटरवरून बिल आलं, बिल पाहून व्यक्ती चक्रावला, बिलावरचा आकडा कधीही न विसरता येणारा होता, बिलावर लिहिलं होतं..."आमच्याकडे असं मशीन किंवा आकडा नाहीय, की ज्यात मानवतेची किंमत मोजता येईल, परमेश्वर तुमचं भलं करो..!"🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राहुल तांबे, मुंबई👤 मेघा हिंगमिरे👤 आशिष कोटगिरे👤 सोनू राजेंद्र येरमलवाड👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी👤 रेश्मा कासार, पुणे👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी👤 योगेश फत्तेपुरे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जया चक्षुने लक्षिता लक्षवेना। भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना॥ क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो। दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥१७४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिवसभरात आपल्याला अनेक कल्पना सुचत असतात. काही कल्पना योग्य वाटतात तर काही नको वाटतात. म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करायचे का...?. वेळ, प्रसंगी सांगता येत नाही एकादी कल्पना आपल्यासाठी दिशादर्शक ठरू शकते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट  दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या  प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/super-handwriting.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २३वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण**१९९७:मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.**१९७३:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.**१९६८:शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू.एस.एस.प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.**१९४३:दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.**१९३२:’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.**१८४९:डॉ.एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.**१७०८:छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:देविदास महादेव सौदागर -- कवी लेखक**१९७१:मेघना जोशी -- कवयित्री* *१९६९:अनिल मनोहर कपाटे (अनिल शेवाळकर)-- कवी,कथाकार,कादंबरीकार* *१९६६:भागवत घेवारे -- कवी* *१९६२:मेधा इनामदार -- लेखिका* *१९५५:भगवान कृष्णा हिरे -- लेखक, अभिनेता,दिग्दर्शक,तज्ञ परीक्षक* *१९५३:डॉ.विलास चिंतामण देशपांडे -- प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,संपादक* *१९५२:अशोक बाबुराव लोणकर-- कवी, लेखक,संपादक**१९५०:आसावरी काकडे-- सुप्रसिद्ध मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखिका**१९४७:मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष**१९४७:डॉ.प्रमिला जरग-- लेखिका**१९४६:विजय पांडुरंग शेट्ये-- कवी,लेखक**१९४६:डॉ.सुभाष सावरकर --साहित्यिक, समीक्षक,संपादक (मृत्यू:२३ सप्टेंबर २०१३)**१९३९:अ‍ॅड.जयंत काकडे -- सुप्रसिद्ध साहित्यिक,व्यंगचित्रकार* *१९३५:विलास शंकरराव साळोखे-- लेखक**१९३५:प्रमोद सच्चिनानंद नवलकर --- जेष्ठ साहित्यिक,माजी मंत्री,(मृत्यू:२० नोव्हेंबर २००७)**१९३४:सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:६ एप्रिल १८६४)**१९२६:बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे -- महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक,राजकारणी,संपादक,व्यंगचित्रकार (मृत्यू:१७ नोव्हेंबर २०१२)**१९२०:श्रीपाद रघुनाथ जोशी--- कोल्हापूर येथील मराठी लेखक,शब्दकोशकार व अनुवादक(मृत्यू:२४ सप्टेंबर २००२)* *१९१५:कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव,बजाज आटो,बजाज इलेक्ट्रिकल्स,उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू:१ मे १९७२)**१८९८:पं.शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक,पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू:१७ डिसेंबर १९५६)**१८९७:नेताजी सुभाषचंद्र बोस-- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ )**१८१४:सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू:२८ नोव्हेंबर १८९३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:प्रा.डॉ.अनिल नितनवरे--मराठीचे गाढे अभ्यासक,कवी,प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक(जन्म:१९६५)**२०१०:पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म:२ आक्टोबर १९२७)**१९९२:ह.भ.प.धुंडामहाराज देगलूरकर– भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढेअभ्यासक(जन्म:१५ मे १९०४)**१९८९:साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. (जन्म:११ मे १९०४)**१९८२:मुद्दू बाबू शेट्टी-- हिंदी चित्रपटातील स्टंटमन,अॅक्शन कोरिओग्राफर आणि अभिनेता(जन्म:१ जानेवारी १९३८)**१९५९:विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित**१९३१:अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म:१२ फेब्रुवारी १८८१)**१९१९:राम गणेश गडकरी – नाटककार,ककवी व विनोदी लेखक(जन्म:२६ मे १८८५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक हस्ताक्षर दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*सुंदर हस्ताक्षर : एक दागिना*शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासतांना सुंदर हस्ताक्षरात लिहलेल्या वह्या मनाला आनंदीत करून जातात. खरोखरच वळणदार अक्षराला किती महत्व आहे ! सुंदर हस्ताक्षर पाहुन त्या मुलाचे कौतूक केल्याशिवाय कुणालाच राहवत नाही............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वनवास संपला, प्रभू रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, ते दिव्य मंदिरात राहणार; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अयोध्येच्या राम मंदिरामुळे पर्यटक वाढणार आणि यूपीची तिजोरी भरणार, राज्याच्या महसुलात 25 हजार कोटींच्या वाढीची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने देशभर दुसऱ्यांदा साजरी झाली दिवाळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह त्यांच्या चाळीस आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटिस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न:राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रवी शास्त्री यांना जीवन गौरव तर शुभमन गील यांना BCCI कडून वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *किंग कोहलीची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून माघार; बीसीसीआयची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील सर्वात मोठी पाकोळी पक्ष्याची वीण वसाहत कोठे आहे ?२) लष्करी क्षमतेच्या बाबतीत सर्वात शक्तिशाली देश कोणता ?३) हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?४) २०२३ चा 'फिफा प्लेअर ऑफ द इअर' हा पुरस्कार कोणी जिंकला ?५) मनोज जरांगे - पाटील कोण आहेत ? *उत्तरे :-* १) बर्ड आयलँड, वेंगुर्ला द्वीप समुह २) अमेरिका ३) ८० वा ४) लिओनेल मेस्सी ५) मराठा आंदोलनाचे नेते*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संतोष बोधनकर, नांदेड👤 भालचंद्र गावडे, सोलापूर👤 दिनेश चिंतावाड, नांदेड👤 नम्रता उभाळे👤 यदुराज ढगे, चिरली👤 शंकर नरवाडे👤 श्याम खंडेलोटे👤 सुनील बंडेवार, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वरुपी उदेला अहंकार राहो। तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो॥ दिशा पाहतां ते निशा वाढताहे। विवेके विचारे विवंचुनि पाहे॥१७३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मानवी जीवनात विनोदाला विशेष महत्त्व आहे. जर एखादी व्यक्ती हसत असेल तर असे मानले जाते की व्यक्ती त्याच्या आयुष्यात आनंदी आहे. जर एखाद्याच्या आयुष्यात हास्य आणि उत्साह असेल तर त्याचे जीवन सुंदर मानले जाते.हसणे जीवन आहे, हसवणे ही एक प्रकारची कला आहे व स्वतः आनंदाने हसत राहून दुसऱ्याला रडवणे ही कुटनीती आहे. ह्या तिनही मध्ये खूप फरक आहे. म्हणून नेमकं हास्य काय असते हे कळणे आवश्यक आहे. जेव्हा या विषयी कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने हास्य या नावाचा मान राहील. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चल रे भोपळया टुणुक टुणुक*एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्‍या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ' चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_23.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २०वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.**१९९९:गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९९८:संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर**१९६३:चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.**१९४४:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.**१९३७:फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.**१८४१:ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.**१७८८:इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:डॉ. कोंडबा भगवान हाटकर-- लेखक**१९८०:दिनेशकुमार रामदास अंबादे-- कवी* *१९७७:अॅड.नीता प्रफुल्ल कचवे-- कवयित्री,कादंबरी,कथालेखिका* *१९७२:भुपेश पांड्या --चित्रपट अभिनेते (मृत्यू:२३ सप्टेंबर २०२०)**१९७०:डॉ.मंजुषा सुनील सावरकर -- कथा लेखिका,संपादिका* *१९६८:प्रा.अन्नपूर्णा अजाबराव चौधरी-- कवयित्री,लेखिका**१९६४:साहेबराव आनंदराव नंदन-- समाज प्रबोधन,लेखक**१९६३:अमोल मारुती रेडीज -- लेखक,कवी* *१९६०:स्टीफन एम.परेरा-- कथाकार* *१९६०:आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक**१९५४:विजय शं.माळी- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५१:वसंत सीताराम पाटणकर-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,समीक्षक**१९५०:प्राचार्य डॉ.रमेश अंधारे-- कादंबरीकार,संपादक**१९४७:फुलचंद पत्रुजी खोब्रागडे -- कवी, लेखक* *१९४७:लीला प्रभाकर गाजरे-- कवयित्री**१९४६:डॉ.शोभा अभ्यंकर-- भारतीय संगीतशास्त्रज्ञ आणि मेवाती घराण्याच्या शिक्षिका(मृत्यू:१७ ऑक्टोंबर २०१४)**१९४५:डॉ.माणिक तुकाराम वैद्य-- कवी* *१९३७:प्राचार्य डॉ.दाऊद दळवी-- इतिहासाचे अभ्यासक(मृत्यू:३१ ऑगस्ट २०१६)**१९२४:मनोहर नामदेव वानखडे-- व्यासंगी साहित्यसमीक्षक आणि दलितांच्या वाङ्‌मयीन-सांस्कृतिक चळवळींचे नेते(मृत्यू:१ मे १९७८)**१९२०:विष्णुपंत पुरुषोत्तम भागवत-- लेखक, संपादक (मृत्यू:२३ डिसेंबर १९७५)**१८९८:कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार (मृत्यू:२० आक्टोबर १९७४)**१८७१:सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू:५ सप्टेंबर १९१८)**१८६१:काशीबाई गोविंदराव कानिटकर --आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका(मृत्यू:३० जानेवारी १९४८)**१७७५:आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१० जून १८३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:भगवान ठग -- कवी आणि अनुवादक(जन्म:२४ जानेवारी १९५३)**२००२:रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.(जन्म:१० मे १९१८)**२००९:बाळ गंगाधर सामंत--मराठी लेखक, विनोदकार व चरित्रकार (जन्म:२७ मे १९२४)**१९९३:ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी,’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म:४ मे १९२९)**१९८८:खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तानमधील एक महान राजकारणी,ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला (जन्म:३ जून १८९०)**१९८०:कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण(जन्म:१९ डिसेंबर १८९४)**१९५१:अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म:२९ नोव्हेंबर १८६९)**१९३६:जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म:३ जून १८६५)**१८९१:डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म:१६ नोव्हेंबर १८३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक पुस्तक*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हवामान बदलामुळे गेल्या 10 वर्षांत भारतात मान्सूनमधील पर्जन्यमानामध्ये ५५ टक्‍के वाढ: CEEW चा अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिंगोली - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकावर चाकूने हल्ला:हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी; हल्लेखोरांवर गुन्हा दाखल, चौकशी सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : पर्यटन सदिच्छा दूतपदी माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *20 ते 28 जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल 2024 चं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनोज जरांगेंचं वादळ राजधानीत धडकणार ! आज अंतरवाली सराटी येथून करणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं 'मिशन वर्ल्ड कप' दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्यासाठी सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्ग रुसल्याने नंदनवन ओस काश्मीर म्हणजे साक्षात पृथ्वीवरील नंदनवन. काश्मीर मधील निसर्गाची संपूर्ण जगाला भुरळ पडली आहे विशेषतः हिवाळ्यात काश्मीर मध्ये जाऊन काश्मीरमधील निसर्ग जीवनात एकदातरी अनुभवावा ही प्रत्येकाची इच्छा असते. निसर्गाने काश्मीरला जे दान दिले आहे तसे दान इतर कोणत्याही प्रदेशाला दिले नाही म्हणूनच काही जण काश्मीरला जमिनीवरचा स्वर्ग असेही म्हणतात. झेलम, चिनाब, निडर आदी नद्यांचे खळखळते पाणी, हिरवीगार जंगलसंपदा आणि बर्फाच्छादित पर्वत, धुक्याने पांघरलेली चादर त्यामुळे काश्मीर हे पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे मात्र याच काश्मीरला गेल्या काही वर्षापासून कोणाची तरी नजर लागली. काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद पोसला सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पृथ्वीवरील या नंदनवनात पर्यटक जीव मुठीत धरूनच येत असे मात्र केंद्र सरकारने काश्मीरला लागू असलेले ३७० वे कलम हटवल्याने तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्या त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटक पुन्हा परततील अशी आशा वाटू लागली. झालेही तसेच मागील वर्षी जानेवारीच्या मध्यापर्यंत जवळपास १ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती त्यात परदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय होती. काश्मीरमध्ये पर्यटक परतू लागल्याने स्थानिक काश्मिरी लोकांनाही रोजगार मिळू लागला. काश्मीरचे गेलेले वैभव परत येऊ लागले असे वाटत होते. गेल्या वर्षी पर्यटकांनी काश्मीरला पसंती दिल्याने यावर्षी मागील वर्षापेक्षा अधिक पर्यटक काश्मीरला भेट देतील असे वाटू लागले होते. पर्यटकांनी नंदनवन पुन्हा बहरू लागेल असे वाटत असतानाच काश्मीरला पुन्हा कोणाची तरी नजर लागली. यावर्षी काश्मीरमधील निसर्गाने खप्पा मर्जी केली. निसर्ग रुसल्याने यावर्षी म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. गुलमर्ग हे काश्मीरमधील सर्वांचे आवडते थंड हवेचे ठिकाण. काश्मीरला जाणारा पर्यटक आवर्जून गुलमर्गचा निसर्ग अनुभवायला गुलमर्ग ला भेट देतोच मात्र यावर्षी गुलमर्ग बर्फाविना कोरडे पडले आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात च म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. अगदी तुरळक बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांना बर्फातील स्कियिंग आणि अन्य खेळ खेळता येत नाहीत त्यामुळेच अनेक पर्यटकांनी काश्मीर चे केलेले बुकिंग रद्द केले आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा ५० टक्के पर्यटकही आले नाहीत. पर्यटक नसल्याने हिवाळ्यातील सर्व व्यवसाय थंड पडले आहेत. स्थानिक लोकांचा रोजगार बुडाला. काही चित्रपट निर्मात्यांनी काश्मीरमधील चित्रीकरणही रद्द केले आहे. पर्यटक येत नसल्याचा परिणाम काश्मीरच्या अर्थ्यवस्थेवरही झाला आहे. गेल्या वर्षी पर्यटकांनी बहरलेले हे नंदनवन आज पर्यटकांविना ओस पडले आहे. गेल्या अनेक वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती असे तेथील जाणकार सांगतात. इतका कमी बर्फवृष्टी यापूर्वी कधी अनुभवली नव्हती असेही तेथील काही लोक सांगतात. यावर्षी निसर्गाने काश्मीरवर अवकृपा केल्याने काश्मीरच नाही तर देश चिंतेत आहे. यावर्षी जरी निसर्गाने अवकृपा केली असली तरी पुढील वर्षी तरी निसर्ग काश्मीरवर कृपा करेल पृथ्वीवरील हे नंदनवन पर्यटकांनी पुन्हा बहरेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकच नव्हे संपूर्ण देशातील नागरिक व्यक्त करत आहेत. श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अयोध्या येथील राममंदिरात कोणत्या शिल्पकाराने तयार केलेली मूर्ती विराजमान होणार आहे ?२) आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक शतक कोणी केले ?३) महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?४) सर्वात जास्त विमान अपघात केव्हा होतात ?५) फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार सर्वाधिक अब्जाधीश लोक कोणत्या देशात आहेत ? *उत्तरे :-* १) अरूण योगिराज, म्हैसूर २) रोहित शर्मा, भारत ( ५ शतके ) ३) अहमदनगर ४) विमान लँडिंग होतांना ५) अमेरिका ( ७३५ ), भारत ( १६९ अब्जाधीश )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 किशोर पाटील, युनिक कॉम्प्युटर्स, धर्माबाद👤 शंकर बेल्लूरकर👤 अहमद लड्डा सय्यद, पत्रकार👤 संतोष शेटकार👤 शरयू देसाई👤 माऊली जाजेवार👤 विशु पाटील वानखेडे👤 नागनाथ दिग्रसकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी। विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी॥ तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे। म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे॥१७०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच एकटे यावे लागते आणि एकटेच जावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. पण, या जगात जगत असताना आजुबाजूचाही आपण विचार करावा. कोणी आपुलकीने मदत करतात तर कोणाचे सांगता येत नाही. म्हणून कोणी आपुलकीच्या नात्याने मदत केली असेल त्यांना कधीही विसरू नये. व जे, कोणी तिरस्कार करतात त्यांचा राग धरू नये. कारण चांगले करणारेच अजरामर होऊन जातात व जे काहीच करत नाही त्यांचे जीवन व्यर्थ होऊन जाते भलेही सोबत कोणी काहीच घेऊन जात नसले तरी इतरांना केलेली मदत ही माणुसकीची साथ असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हा आणि नगारा*एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्‍यावर एका झाडाची फांदी वार्‍यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्‍यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्‍याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्‍याचे कातडे कुरतडून फाडले तर... आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या.उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १९वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:उस्ताद अल्लारखा खाँ यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड**१९९६:प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड**१९६८:पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.**१९५६:देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम**१९५४:कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन**१९४९:पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन ’पुणे महानगरपालिका’ स्थापन झाली.**१९४९:क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.**१९०३:अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.**१८३९:ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: लक्ष्मीदेवी रेड्डी-- कवयित्री* *१९६७:स्वाती घाटे -- कवयित्री**१९६५:प्रा.डॉ.हेमंत खडके-- लेखक* *१९५८:संजीव लक्ष्मण साळगावकर -- लेखक**१९५७:गणेश निवृत्ती आवटे-- लेखक**१९५६:एकनाथ(जीजा) दगडू आवाड-- दलित चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष,लेखक (मृत्यू:२५ मे २०१५)**१९५१:नामदेव ज्ञानदेव आबने-- कवी, गझलकार,लेखक* *१९४९:अनंत शंकरराव भूमकर(नाईक)-- प्रसिद्ध कवी* *१९३९:शरद बापूजी मुंजवाडकर -- लेखक* *१९३६:झिया उर रहमान – बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष्य (मृत्यू:३० मे १९८१)**१९२४:वसंत प्रभू-- महाराष्ट्रातील संगीतकार(मृत्यू:१३ ऑक्टोबर १९६८)**१९२०:शिवगौडा बाळाप्पा संकनवाडे -पाटील-- लेखक**१९२०:झेवियर पेरेझ द कुइयार – संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस**१९०६:विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते,दिग्दर्शक व निर्माते.त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.(मृत्यू:१९ ऑगस्ट १९४७)**१८९२:चिं.वि.जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (२१: नोव्हेंबर १९६३)**१८८६:रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य,पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू,दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली.(मृत्यू:१२ सप्टेंबर १९५२)**१८०९:एडगर अ‍ॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (मृत्यू:७ आक्टोबर १८४९)**१७३६:जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता (मृत्यू:२५ ऑगस्ट १८१९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:चारुदत्त सरपोतदार उर्फ चारूकाका--मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीचा चालता-बोलता इतिहास, कलाकारांचे आधारवड, पुण्याचे सार्वजनिक काका (जन्म:१५ मे १९३५)**२००५: भानुदास श्रीधर परांजपे-- कवी,नाटककार (जन्म:१६ मार्च १९१४)**२०००:मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष;उपाध्यक्ष व खजिनदार,तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर (१९५५),चेन्नईतील ’चेपॉक’ स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे.(जन्म:१२ आक्टोबर १९१८)**१९६०:रामचंद्र गोपाळ ऊर्फ ’दादासाहेब तोरणे – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक,मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक (जन्म:१३ एप्रिल १८९०)**१९५८:नारायण केशव बेहरे-- विदर्भातील कवी,कादंबरीकार व इतिहासकार (जन्म:४ जुलै १८९०)**१५९७:महाराणा प्रतापसिंह उदयसिंह_ राजस्थान राज्यातील उत्तर-पश्चिम भारतातील मेवाडचा तेरावा राजा (जन्म:९ मे, १५४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हमें तो लूट लिया*मोबाईलमुळे आज जग बदलल्यासारखे आणि जवळ आल्यासारखे वाटत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोबाईलची क्रांती संपूर्ण इतिहास बदलून टाकली आहे. आजही ते पोस्टातील पत्रव्यवहाराचे दिवस आठवले की " डाकिया डाक लाया " हे गीत आठवण आल्या शिवाय राहत नाही. पोस्टमन गावात आला म्हटले की, लोक उत्साहाने त्याच्याकडे पाहायचे कोणाचे पत्र आले म्हणून...........? ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कर्मचार्‍यांच्या उदंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने 22 जानेवारी 2024 रोजी सर्व केंद्र सरकारची कार्यालयं, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनं राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही, केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अदानी ग्रुप महाराष्ट्रात करणार 50 हजार कोटींची गुंतवणूक, 20 हजार जणांना मिळणार रोजगार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी साठी येत्या 23 जानेवारीपासून सर्वेक्षण होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिंदे समितीला सापडलेल्या 54 लाख नोंदीनुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यवाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमेना, तर अनेकांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना; ASER सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPSC ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 तारामंडळे व आकाशगंगा 📙विश्वाचा विस्तार व त्यातील असंख्य तारामंडळे यांबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत असते. या सर्वांची गणना करणे हे काम जगभरातील ज्योतिर्विद अनेक वर्षे करत आहेत व ते तसेच चालूही राहील.दीर्घिका, सर्पाला व आकारहीन अशा तीन प्रकारांत विश्वातील तारामंडळे विभागली आहेत. लंबगोलाकृती मोठा पसरट गोल व मध्यभागी थोडी फुगठी असलेल्या तारकामंडळांना 'दीर्घिका' म्हणतात, तर वेटोळे आकृती दिसणाऱ्यांना 'सर्पिला' असे संबोधले जाते. ज्यांचा विशिष्ट आकार सांगता येत नाही, त्यांना 'आकारहीना' म्हणतात. आपली आकाशगंगा सर्पिला प्रकारात मोडते.आपली आकाशगंगा एक लाख प्रकाशवर्षे या अंतरात विस्तारली आहे. पण विश्वाच्या पसाऱ्यात ते एक किरकोळ तारामंडळ म्हणावे लागेल. सूर्य व ग्रहमाला हा आपल्या आकाशगंगेचा एक छोटा भाग. अनेक तारे आपल्या आकाशगंगेत असून सर्वांचा प्रकाश एकमेकांत मिसळल्याने पांढुरका पट्टाच आकाशात आपल्याला दिसतो. म्हणूनच आपल्या आकाशगंगेला 'मिल्की वे' असेही म्हटले जाते. त्या पट्ट्यात काही भाग काळेकुट्ट आहेत, जेथे धुळीमुळे ताऱ्यांचा प्रकाश शोषला गेला आहे. आपल्या आकाशगंगेच्या सर्पाकृती वेटोळ्याचे तीन वेगळे भाग केंद्रातून उगम पावताना स्पष्ट करता येतात. त्यांना ओरायन, परसियस व सॅजिटेरियस अशी नावे दिलेली आहे. सूर्यमालिका ओरायन या पट्ट्यामध्ये येते. सर्पिलाकृती वेटोळे स्वतःभोवती फिरण्याचा काळ ओरायन पट्टय़ाच्या बाबतीत दर पंचवीस कोटी व वर्षांनी पूर्ण होतो. आकाशगंगेचे वर्णन गॅलिलियोने प्रथम स्पष्ट केले. नंतर हर्षल यांनी आकाशातील ताऱ्यांच्या गणनेच्या संदर्भात आकाशगंगेचा आकार निश्चित वर्णन केला, तर हबल यांनी आकार व स्वरूप यांबद्दल १९२० साली महत्त्वाचे निष्कर्ष मांडले. रेडिओ अॅस्ट्रोनॉमीला १९४० साली सुरुवात झाल्यानंतर आकाशगंगेतील तीन पट्टे, त्यांना भरून राहणारे हायड्रोजनचे ढग, त्यातील रेडिओकिरण या सर्वांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध होत गेली. यासाठी २.१ सेमी वेव्हलेंथच्या लहरी उपयोगी पडल्या.आज आपली आकाशगंगा व जवळची काही तारामंडळे मिळून 'लोकल ग्रुप' या नावाने ओळखली जातात. यात एकंदर ३२ तारामंडळांची नोंद सध्या झाली आहे. यांतील सर्वात मोठे तारामंडळ अँड्रोमेडा सर्पिल आकाराचे आहे. दुसरा क्रमांक मिल्की वे चा. पृथ्वीवरून साध्या डोळ्यांनी अँन्ड्रोमेडा व मॅगेलान दिसू शकतात.कन्या राशीच्या दिशेने असलेल्या तारामंडळांच्या गटात प्रचंड आकाराची तारामंडळे अस्तित्वात असावीत, असे मार्च १९९३ मध्येच नोंदले गेले आहे. त्यांचा आकार आजवर माहीत असलेल्या अन्य तारामंडळांच्या कित्येकपट मोठा असावा, असेही भाकीत केले गेले आहे. म्हणूनच यांना 'दडलेले राक्षस' असे टोपणनाव दिले गेले आहे. सूर्यमालिका ही आपल्या आकाशगंगेत मुख्य केंद्राच्या एका बाजूला आहे. सूर्य केंद्रापासून किमान तीस हजार प्रकाश वर्षे दूर आहे. आकाशगंगेचा अभ्यास आपल्याला पृथ्वीवरील निरीक्षणातूनच करावा लागणार आहे. रेडिओ अॅस्ट्रोनॉमी प्रगत होत गेल्याने अन्य तारामंडळांत होणाऱ्या घडामोडींचा थोडाफार अंदाज येथे लागत आहे, एवढेच.आपल्या आकाशगंगेत १००-२०० अब्ज तारे असावेत. परंतु गेल्या दोन दशकांतील वेधातून असे दिसून येते की, आपल्या किंवा इतर आकाशगंगेत ताऱ्यांनी व्याप्त भागापलीकडे पुष्कळ लांबवर अदृश्य वस्तुमान भरले आहे. त्या पदार्थांचे गुरुत्वाकर्षण जाणवते, पण ते दिसत मात्र नाहीत! हे पदार्थ कशाचे बनले आहेत ते रहस्यही अद्याप उकललेले नाही.आपल्या किंवा इतर आकाशगंगांत तारे, धूळ, गॅस व अदृश्य पदार्थ याव्यतिरिक्त चुंबकीय क्षेत्रसुद्धा आढळते. विश्वकिरणांतील विद्युतभार असलेल्या कणांचे मार्ग या चुंबकीय क्षेत्राने नियंत्रित केले जातात. ‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंख असूनही उडता न येणाऱ्या पक्ष्याचे नाव काय ?२) मुंबईचा गवळीवाडा कोणत्या शहराला म्हणतात ?३) जागतिक हवामान संस्थेने ( WMO ) कोणत्या वर्षाला 'सर्वाधिक उष्ण वर्ष' म्हणून जाहीर केले ?४) पांडवांच्या वडिलांचे नाव काय होते ?५) इलेक्ट्रिक इस्त्रीमधील तापणारा घटक कोणता ? *उत्तरे :-* १) शहामृग २) नाशिक ३) वर्ष २०२३ ४) पंडू राजा ५) नायक्रोम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अजय कोंडलवाडे, सहशिक्षक, बिलोली👤 अजय परगेवार उमरेकर👤 माधव चपळे👤 शिवशंकर स्वामी👤 सिद्धार्थ कैवारे, चिरली👤 बालाजी सुरजकर👤 चंद्रकांत कुमारे, पांगरी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे अंत आनंत संता पुसावा। अहंकारविस्तार हा नीरसावा॥ गुणेवीण निर्गुण तो आठवावा। देहेबुद्धिचा आठवु नाठवावा॥१६९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमत करून एखाद्याला एकटे पाडून त्याची मोठ्या आनंदाने मज्जा बघत राहणे म्हणजे माणुसकी नव्हे. बरेचदा आपल्या जीवनात वेळ, प्रसंगी बरेच लोक येतात आणि जातात. पण, शेवटपर्यंत कोणीच, कोणाला साथ देत नाही म्हणून ज्या गोष्टीला अर्थ नसते त्याच्या आधीन होऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका गाढवाची गोष्ट*एक धोबी आपल्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाही तर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली.एके रात्री पुनवेचे पिटूर चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले, 'कोल्होबा, या चांदण्यांमुळे मन कसे प्रफुल्लित झाले आहे. मी थोडा वेळ गाऊ का?'कोल्हा म्हणाला, 'मामा, तुम्ही आणि गाणार? म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचा!''का रे, मला गाण्याची माहिती नाही, असे का तुला वाटते?' असा प्रश्न विचारून ते गाढव स्वर किती, सप्तके किती व राग किती वगैरे माहिती देऊन त्या कोल्ह्याला म्हणाले, 'आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना?कोल्हा म्हणाला, 'नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा. त्यातून कुणी, कुठे व कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल, तर खोकला झालेल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नयेत. खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता त्याला खोकला आला, तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल, त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात, तर ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत, तो शेतकरी जागा होईल आणि आपल्या दोघांनाही चोप देईल.'गाढव म्हणाले, 'कोल्होबा, तू अगदीच अरसिक कसा रे? तो स्मशानात राहणारा रुक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला, तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का? उलट तो माझा सन्मानच करील.'हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीसे पाहून तो कोल्होबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवाने टिपेत गायला प्रारंभ केला. त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेदम मार दिला. त्या माराने ते गाढव मूच्र्छा येऊन जमिनीवर कोसळताच त्या राखणदाराने त्याच्या गळय़ात दोरखंडाने एक उखळ बांधले.एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जाताच शुध्दीवर आलेले ते गाढव गळय़ात बांधण्यात आलेल्या उखळासह कसेबसे घराकडे जाऊलागले, तेव्हा दूर उभा राहिलेला कोल्हा त्याला म्हणाला, 'गाढवमामा, तुमचा दिव्य गायनावर बेहद्द खूष होऊन त्या पहारेकर्‍याने तुमच्या सन्मानार्थ हा 'भव्य मणी' तुमच्या गळय़ात बांधला का?' पण लाजेने चूर झालेले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १८वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.**१९९९:नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.**१९९८:मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९७:नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.**१९७४:इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.**१९५६:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार**१९११:युजीन बी.इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.**१७७८:कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:मोनिका बेदी-- भारतीय अभिनेत्री आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता**१९७३:प्रा.डॉ.रंजन दामोदर गर्गे-- विज्ञान लेखक,विविध पुरस्काराने सन्मानित* *१९७२:विनोद कांबळी –भारतीय क्रिकेटपटू**१९७१:महेंद्र भाऊरावजी सुके-- पत्रकार, लेखक**१९६६:अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू**१९५८:भूपेंद्र दामोदर संखे-- कवी,लेखक**१९५८:तुका उत्तमराव मोहतुरे-- लेखक,कवी**१९४७:प्रकाश गोपाळ सावरकर-- लेखक* *१९४५:डॉ.विजया वाड --प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिक,मराठी विश्वकोश मंडळाच्या पूर्व अध्यक्षा**१९४५:माधवी करमळकर -- लेखिका* *१९३७:अरविंद रघुनाथ मयेकर --ख्यातमान सतारवादक आणि संगीतकार(मृत्यू:३० मार्च २०१९)**१९३३:जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (मृत्यू:२२ एप्रिल २०१३)**१९२५:मनोहरराय लक्ष्मणराव सरदेसाय-- कोकणी कवी,निबंधकार व अनुवादक (मृत्यू:२२ जून २००६)**१९२५:गजानन जोहरी-- लेखक* *१९०९:द.ग.देशपांडे (बाबुराव जाफराबादकर)-- लेखक,संगीत,नाटय क्षेत्रात योगदान* *१८९५:वि.द.घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे-- मराठी कवी,लेखक(मृत्यू:३ मे १९७८)**१८८९:शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (मृत्यू:१ आक्टोबर १९३१)**१८८९:देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी.– कन्नड कवी व विचारवंत (मृत्यू:७ आक्टोबर १९७५)**१८४२:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (मृत्यू:१६ जानेवारी १९०९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:आशा पाटील --मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्यक्षेत्रातील अभिनेत्री (जन्म:१९३६)**२०१५:शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ –वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली.(जन्म:१७ नोव्हेंबर १९३२)**२०११:पुरुषोत्तम दास जलोटा-- भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायक(जन्म :९ सप्टेंबर १९२५)**२००३:हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी (जन्म:२७ नोव्हेंबर १९०७)**१९९६:एन.टी.रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक,निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री (जन्म:२८ मे १९२३)**१९८३:आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत,’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक (जन्म:१२ मे १९०५)**१९४७:कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (जन्म:११ एप्रिल १९०४)**१९३६:रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (जन्म:३० डिसेंबर १८६५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका शेतकऱ्याची आत्मकथा*नमस्कार ....!मी एक शेतकरी आपल्याशी संवाद करीत आहे. या भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते आणि येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा मी शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार मी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र ..................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कलश यात्रा राम मंदिरामध्ये पोहोचली, रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेला सुरूवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिंदे गटाच्या याचिकेवर राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाला उच्च न्यायालयाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नारायण राणे ते अनिल देसाई, महाराष्ट्रातील 6 खासदारांसह देशातील 68 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उच्च शिक्षण घेण्याची परवानगी घेतली नसल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाने गुजरातमधील तीन शिक्षकांचं प्रमोशन रोखलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देताना तिन्ही शिक्षकांचं प्रमोशन कायम ठेवलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्कूलबसच्या धडकेत 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू:संतप्त जमावाने बस दिली पेटवून; संभाजीनगर जिल्ह्यातील चितेगाव-पांगरा रोडवरील घटना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेअर बाजार कोलमडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात; 16 महिन्यातील सर्वात मोठी घसरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखेरच्या T20 सामन्यात भारताचा सुपर ओव्हर मध्ये विजय, कर्णधार रोहित शर्माचे पाचवे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेणू* 📙 *************मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. अणूची रचना काहीशी सूर्यमालेसारखी असते. अणूचे बहुतेक सर्व वस्तुमान अणूकेंद्रात असते. धनविद्युतभारित प्रोटॉन आणि तेवढ्याच वस्तुमानाचे पण विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन यांनी अणुकेंद्र बनते. त्याच्याभोवती विविध कक्षांत इलेक्ट्रॉन घिरट्या घालीत असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान म्हणून अणू मात्र विद्युतभाराच्या दृष्टीने किंवा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. चांदी, सोने इत्यादी अशा प्रकारची धातूरूप मुलद्रव्ये वगळता सृष्टीतील बाकी सर्व पदार्थ हे रेणूंनी बनलेले असतात. रेणू म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र गुंफून झालेली रचना. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन ही मुलद्रव्ये त्यांच्या रेणूंची बनलेली असतात. त्यांच्या प्रत्येक रेणूत दोन अणू असतात. पाणी हे संयुग. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आले की, पाण्याचा एक रेणू बनतो. नित्याच्या आढळतील बहुसंख्य पदार्थ संयुग स्वरूपातच असतात. शिवाय अनेक मुलद्रव्येही त्यांच्या रेणूंचीच बनलेली असल्यामुळे आपल्या पर्यावरणातील सारे विश्व रेणूंचे बनले आहे असे म्हणता येईल. रेणूंचे काही गुणधर्म विलक्षण आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन बनणाऱ्या पाण्याचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्माहून किती वेगळे ! साखर तर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांनी बनते. परीक्षानळीत साखर तापवली की खाली काळा साका आणि नळीच्या तोंडाशी पाण्याचे बारीक थेंब मिळतात. कितीतरी प्रकारचे अणू एकत्र येऊन प्रचंड रेणू बनू शकतात. अमिनो आम्ले, प्रथिने, डीएनए हे सर्व गुंतागुंतीच्या रचनांचे रेणूच आहेत. मात्र तरीही रेणू खूप लहान असतो, हे विसरायचे नाही. घोटभर पाण्यात सहावर तेवीस शून्य इतके रेणू असतात ! असे असंख्य रेणू एकत्र येऊन पदार्थ बनतो. हे रेणू एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत, यावर पदार्थाचे भौतिक गुणधर्म ठरतात. गुंफण घट्ट असेल, तर पदार्थ घन असतो. अगदी शिथिल असेल, तर द्रवरूप आणि प्रत्येक रेणू सुटा असेल तर पदार्थ वायुरूप असतो. रेणूची हालचाल तापमानावर अवलंबून असल्याने उष्णता देऊन पदार्थ वितळता येतो आणि द्रवाचे वायूत रूपांतर करता येते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला *'इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क'* म्हणून मान्यता देण्यात आली ?२) महाराष्ट्रात 'पहिला राज्य क्रीडा दिवस' केव्हा साजरा करण्यात आला ?३) वैनगंगा नदी कोणत्या नदीला मिळते ?४) भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?५) 'भूगोल दिन' केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) पेंच व्याघ्र प्रकल्प २) १५ जानेवारी २०२४ ३) वर्धा / गोदावरी ४) रघुराम अय्यर ५) १४ जानेवारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीमती विजया वाड, प्रसिद्ध बालसाहित्यिका👤 पी. आर. कमटलवार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, धर्माबाद👤 रामनाथ खांडरे, करखेली👤 त्र्यंबक आडे, नांदेड👤 महेश गोविंदवार, सहशिक्षक, माहूर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करी वृत्ती जो संत तो संत जाणा। दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥ उपाधी देहेबुद्धीते वाढवीते। परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आलेल्या दु:खाला कंटाळून जाणे म्हणजे जीवन जगणे नव्हे. दु:ख हे दोन दिवसाचे पाहुणे असतात सदैव लक्षात असू द्यावे. भलेही सुख खूप काही देत असेल तरी जे आपल्याला पाहिजे ते कधीच देत नाही म्हणून सुखाच्या मोहात पडू नये आणि दु:खाला कंटाळू नये . खऱ्या अर्थाने दु:खच जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राक्षस, चोर आणि ब्राह्मण*एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारलं. चोर म्हणाला, 'मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?' अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू? राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली. त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला. तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••*_ या वर्षातील १७वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम.जी.ताकवले यांना जाहीर.**२००१:कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर**१९५६:बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा**१९४६:संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.**१९४५:दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६६:अशोक रामचंद्र भालेराव -- कवी, संपादक* *१९६६:मंगेश नारायणराव काळे-- कवी,लेखक**१९६४:सुहास मळेकर-- लेखक**१९५७:प्रा.संतोष मोतीराम मुळावकर -- एकांकिका व कथालेखन* *१९५६:दिलीप वर्धमान कस्तुरे-- कवी**१९५४:विलास रामचंद्र गावडे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५३:शेखर ताम्हाणे-- ज्येष्ठ निर्माता, नाटककार (मृत्यू:२८ एप्रिल २०२१)**१९५२:विजय शिवशंकर दीक्षित -- युरोपियन चित्रकला,कादंबरी लेखन* *१९५०:प्रा.अनिल थत्ते -- लेखक* *१९५०:प्रा.डॉ.विमल जयवंत भालेराव -- लेखिका* *१९५०:हनी इराणी-- भारतीय अभिनेत्री आणि पटकथा लेखिका* *१९४२:मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा.अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.**१९३३:चंद्रकांत प्रल्हाद पांढरीपांडे-- कवी, लेखक**१९३३:कमलाकर दिगंबर सोनटक्के -- कथालेखक,बालकुमार साहित्यकार* *१९३२:मधुकर केचे --प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू:२५ मार्च १९९३)**१९१८:रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,पद्मभूषण (१९८९) (मृत्यू:१६ मे २०१४)**१९१८:वसंत हरी कटककर-- लेखक* *१९१८:सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता,दिग्दर्शक, संवादलेखक,पटकथाकार व कवी (मृत्यू:११ फेब्रुवारी १९९३)**१९१७:एम.जी.रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (मृत्यू:२४ डिसेंबर १९८७)**१९०८:अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल.व्ही.प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू:२२ जून १९९४)**१९०६:शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका (मृत्यू:३ मे २०००)**१९०५:दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ (मृत्यू: १९८६)**१७०६:बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी (मृत्यू:१७ एप्रिल १७९०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:कल्याण वासुदेव काळे-- मराठी लेखक आणि मराठी भाषा,साहित्य विषयाचे अभ्यासक (जन्म:१६ डिसेंबर १९३७)**२०२१:गुलाम मुस्तफा खान-- रामपूर-सहस्वान घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील भारतीय शास्त्रीय संगीतकार(जन्म:३ मार्च १९३१)**२०१४:रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. (जन्म:६ एप्रिल १९३१)**२०१३:ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या (जन्म:२७ फेब्रुवारी १९२६)**२०१०:ज्योति बसू – प. बंगालचे माजी मुख्यमंत्री (जन्म:८ जुलै १९१४)**२००८:रॉबर्ट जेम्स तथा ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (जन्म:९ मार्च १९४३)**२०००:सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते**१९७३:बळीराम हिरामण राठोड (पाटील) बंजारा समाजातील सामाजसुधारक व लेखक (जन्म:१८९८)**१९७१:बॅ.नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (जन्म:२५ सप्टेंबर १९२२)**१९६१:पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (जन्म:२ जुलै १९२५)**१९३०:अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (जन्म:२६ जून १८७३)**१८९३:रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वा राष्ट्राध्यक्ष (जन्म:४ आक्टोबर १८२२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *साहित्यसेवा हेच खरे काम*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मिलिंद देवराच्या शिंदे गटात प्रवेशाचे दिल्लीत पडसाद ; काँग्रेसच्या हालचालींना वेग*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय बासमती तांदूळ 'जगात भारी', जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत अव्वल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता लढाई जनतेच्या न्यायालयात उद्धव ठाकरेचा एल्गार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई आंदोलनावर मनोज जरांगे ठाम, सरकारकडून सग्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात 6 ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दावोसमध्ये 70 हजार कोटीचे करार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज बंगळुरू मध्ये भारत व अफगाणिस्तान यांच्यात तिसरा T20 सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?* 📙एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सलीम अली राष्ट्रीय पक्षी उद्यान कोठे आहे ?२) महाराष्ट्र राज्यात 'भूगोल दिन' साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून कोणी सुरू केली ?३) डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या ?४) मकरसंक्रांतच्या दिवसापासून सूर्याचे कोणते आयण सुरू होते ?५) दोन नद्या एकत्र मिळतात त्या जागेला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) श्रीनगर, जम्मू काश्मीर २) डॉ. सुरेश गरसोळे, पुणे ३) ज्येष्ठ गायिका ४) उत्तरायण ५) संगम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जयप्रकाश भैरवाड, धर्माबाद👤 शेखर घुंगरवार👤 सचिन पाटील पार्डीकर 👤 धम्मपाल कांबळे👤 यश चेलमेल👤 राम घंटे👤 मन्मथ भुरे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरा निश्चयो शाश्वताचा करावा। म्हणे दास संदेह तो वीसरावा॥ घडीने घडी सार्थकाची धरावी। सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वैरता निर्माण करण्यासाठी डोंगरावर जावे लागत नाही. जेव्हा आपले बोलणे स्पष्ट असते, परखड विचाराची पेरणी असते, कोणाचे गुलाम बनून त्यांच्या मताप्रमाणे वागणे नसते, समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची आवड असते आणि सत्याची वाट असते तेव्हा पहिली वैरता वेळ प्रसंगी कुटुंबातूनही सुरूवात व्हायला जास्त वेळ लागत नाही व एकदा तिची सुरूवात झाली की, मग त्याचा प्रसार मोठ्या वेगाने होत असतो. शेवटी सर्वच संपून जाते. म्हणून असे अनर्थ टाळण्यासाठी आधी त्या व्यक्तीला वाचणे आवश्यक आहे. भलेही साथ जरी देता नाही आले तरी चालेल पण, वैरताचे भागिदार होऊ नये. कारण जाळतांनी सर्वचजण सोबतीला असतात पण,शेवटी एकट्यालाच जळावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*घामाचा पैसा*धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १६वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण**१९९८:ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना 'ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर**१९९६:पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड**१९९५:आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.**१९७९:शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.**१९५५:पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न**१९४१:नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण**१९२०:अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.**१९१९:अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.**_१६८१:छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला._**१६६०:रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६२:प्रा.विनय अमृतराव पाटील -- कवी**१९६०:साहेबराव विश्वनाथ कांगुणे-- लेखक, वक्ते**१९५८:श्रीकांत सदाशिव मोरे-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६:नारायण भगवानराव पांडव-- कवी* *१९५१:डॉ.जयप्रकाश रामचंद्र कुलकर्णी -- लेखक**१९५०:मधुकर सदाशिव वाघमारे -- कवी, लेखक* *१९४७: सिद्धार्थ यशवंत वाकणकर-- हस्तलिखितशास्त्र व भाषाशास्त्रज्ञ,संशोधक**१९४६:कबीर बेदी – चित्रपट अभिनेते**१९४३:नलिनी भीमराव खडेकर -- कवयित्री, लेखिका**१९४२:कृष्णा चौधरी --कवी,लेखक**१९२८:बाळासाहेब पित्रे--ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक(मृत्यू:१२ जानेवारी २०१८)**१९२८:रामचंद्र दत्तात्रेय लेले--वैद्यकशास्त्रज्ञ**१९२७:कामिनी कौशल-- भारतीय अभिनेत्री**१९२६:ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर – संगीतकार (मृत्यू:२८ जानेवारी २००७)**१९२०:नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू:११ डिसेंबर २००२)**१९१९:मधुसूदन ऊर्फ लालजी रघुनाथराव गोखले-- ज्येष्ठ तबलासम्राट(मृत्यू:१६ नोव्हेंबर २००२)**१९०९:विनायक रघुनाथ चितळे -- लेखक**१८५३:आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू:४ एप्रिल १९३१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अरुण जाखडे-- मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक(जन्म:७ जानेवारी १९५५)**२०१७:प्रा.पुरुषोत्तम पाटील-- मराठी कवी आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते (जन्म:३ मार्च १९२७)**२०११:प्रभाकर कृष्णराव काळे-- कवी, संपादक (जन्म:१९३८)* *२००५:श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे*  *२००३:रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९९७:कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म:१९३३)**१९८८:डॉ.लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,मुत्सद्दी,कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर,जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म:२२ नोव्हेंबर १९१३)**१९६७:रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म:२० डिसेंबर १९०१)**१९६६:साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म:२५ नोव्हेंबर १८७९)**१९५४:बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,चित्रकार,शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म:३ जून १८९०)**१९३८:शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक,त्यांच्या ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा.कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म:१५ सप्टेंबर १८७६)**१९०९:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म:१८ जानेवारी १८४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभरात पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; सोलापुरात 19 जानेवारीला देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण,  30 हजार कामगारांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल नार्वेकरांनी न्यायालयाचा अवमान केला, आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर आक्षेप घेत ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, तर आम्हीच खरी शिवसेना, ठाकरेंचे 14 आमदार अपात्र करा,  शिंदे गटाची उच्च न्यायालयात याचिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक, आतापर्यंत 19 जणांना बेड्या, सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतीतील दारिद्र्य घटलं! गेल्या नऊ वर्षात सुमारे २५ कोटी भारतीयांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने एक ट्रिलियन आर्थिक उलाढाल अपेक्षित; राम मंदिरामुळे व्यवसायाला चालना!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने मुंबईविरुद्ध खेळताना नाबाद 404 धावा करून वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 #उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग ५ (५/६) - मानवी वाटचालगोरिला आणि चिंपांझी या माकडांच्या शरीरातील रक्तातील प्रथिने, हिमोग्लोबिन आणि डी.एन.ए. यांचे माणसाच्या शरीरातील याच घटकांची मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. यावरूनच गोरिला, चिंपांझी आणि माणूस या तीन्ही शाखा सुमारे चाळीस ते पन्नास लाख वर्षांपूर्वी एकाच पूर्वजापासून जन्मल्या असाव्यात, असा अंदाज केला जातो. उत्खननात सापडणाऱ्या जीवाश्मांच्या मदतीने मानवाच्या उत्क्रांतीतील वाटचालीचा खुणा धुंडाळाव्या लागतात.सर्वात प्राचीन जीवाश्म आहे रामपिथेकसचा. भारत आणि पूर्व आफ्रिकेत आढळून आलेल्या अवशेषांवरून आजच्या माणसाशी साम्य सांगणाऱ्या शारीरिक खुणा रामपिथेकसमध्ये होत्या हे लक्षात येते. त्याचा काळ होता सुमारे एक कोटी वीस लाख वर्षांपूर्वीचा.त्यानंतर भेटतो सुमारे पस्तीस लाख वर्षांपूर्वी वावरणारा ऑस्ट्रेलोपिथेकस अफरेनिस. मागच्या दोन पायांवर उभे राहून ताठ चालणे हे मानवी प्राण्याचे वैशिष्ट्य या पूर्वजात पुर्ण रुजलेले आढळते. मात्र मेंदूचा आकार अद्याप लहानच होता. तर जबडा आणि दातांचा आकार मोठा होता. ऑस्ट्रेलोपिथेकस - आफ्रिकॅन्स ऑस्ट्रेलोपिथेकस - रोबोस्ट्स असे बदल होत सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी 'होमो' या जातीचा जन्म झाला.होमो इरेक्ट्स ही ऑस्ट्रेलोपिथेकस आणि आजच्या मानवाच्या मधली पायरी होती.आजचा मानव म्हणजे होमो सेपियन्स. जीवाश्म स्वरूपात हा होमो सेपियन्स भेटतो साधारण पाच लाख वर्षांपूर्वीच्या काळात.मेंदूच्या आकारात वाढ होत गेली होती.सुरुवातीला होमो सेपियन्स निअँडरथालच्या कवटीची हाडे जाड होती, कपाळ अरुंद होते.हे सगळे शारीरिक बदल होत आजच्या स्वरूपातील माणूस सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमध्ये भेटतो.सजीव सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हे कोडे विचारवंतांना अनेक वर्षे पडलेले आहे. 'देवाने प्रत्येक प्रकारच्या प्राण्याची एकेक जोडी बनवली,' या बायबलमधील मताशी सहमत होणे अनेकांना जड जात होते. अनेकांनी या कोड्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.उपलब्ध पुरावे, सूक्ष्म निरीक्षण आणि साऱ्यांची सांगड घालून मांडलेली तर्कशुद्ध शास्त्रीय उपपत्ती अशा स्वरूपात उत्क्रांतीवाद मांडणारा पहिला शास्त्रज्ञ ‘चार्ल्स डार्विन'क्रमश :- ‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?२) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात 'देशातले सर्वात स्वच्छ शहर' कोणते ?३) कोणत्या प्राण्याला उडणारी खार किंवा भीम खार असेही म्हणतात ?४) बारामती येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?५) नुकतेच कोणत्या देशाने ५१ वर्षानंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रीन हे lander पाठविले आहे ? *उत्तरे :-* १) मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष २) सासवड, पुणे ३) शेकरू ४) स्वाती राजे ५) अमेरिका *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 वैभव तुपे, शिक्षक, नाशिक👤 रमेश सरोदे👤 ज्ञानेश्वर मोकमवार👤 सचिन होरे, धर्माबाद👤 किरण शिंदे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार विस्तारला या देहाचा।स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥सरळ अर्थ :- देहाच्या प्रेमाबरोबरच त्याच्या अहंकाराचा विस्तार होऊन त्याच्याशी संबंधित बायको, मुलं, मित्र, आप्त इत्यादींचा मोह वाढीला लागतो. परंतु हा मोह झटकून टाकून देहादिक प्रेमाचा भ्रम दूर केला पाहिजे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पहावं वाकून या प्रकारची समाजात एक प्रचलित असलेली म्हण नेहमीच ऐकायला, वाचायला मिळत असते. म्हणजेच असे होत असावे म्हणून कदाचित ही म्हण प्रचलित झाली असावी. पण, त्यात एक गोष्ट अवश्य लक्षात असू द्यावे जेव्हा आपण स्वतः चा समाधान करण्यासाठी काळजीपूर्वक दुसऱ्याकडे वाकून बघत असतो त्यावेळी आपल्याकडेही दहा पटीने लोक वाकून बघत असतात. जर बघायचं असेल तर एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू बघावे,कोणाच्या व्यथा जाणावे ,कोणाचे दु:ख बघून त्या दु:खात माणुसकीच्या नात्याने सहभागी व्हावे पापात जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुंदर माझे घर*बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय लष्कर दिन_**_ या वर्षातील १५वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.**१९९९:गायिका ज्योत्स्‍ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६:भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.**१९७३:जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.**१९७०:मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.**१९४९:जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१८८९:द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.**१८६१:एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.**१७६१:पानिपतचे तिसरे युद्ध संपले.**१५५९:राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:नील नितीन मुकेश चंद माथूर-- भारतीय अभिनेता,निर्माता आणि लेखक**१९७२:सुरेखा अशोक बो-हाडे-- कवयित्री, ललित लेखिका* *१९७२:गजानन कमल जानराव सोनोने -- कवी,लेखक* *१९६५:श्रीकांत परशुराम नाकाडे-- लेखक**१९५७:वंदना पंडित-- मराठी अभिनेत्री* *१९५६:जीवन बळवंत आनंदगावकर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक तथा निवृत्त न्यायाधीश**१९५२:संजीव गोविंद लाभे-- लेखक**१९४३:जयराम पोतदार -- हार्मोनियम आणि आॅर्गन वादक व लेखक**१९३९:निलकांत ढोले--ज्येष्ठ गझलकार,कवी व लेखक (मृत्यू:१७ सप्टेंबर २०२२)**१९३१:वासुदेव बेंबळकर -- लेखक* *१९३१:शरच्चंद्र वासुदेव चिरमुले-- कथाकार (मृत्यू:२७ मार्च १९९२ )**१९२९:मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:४ एप्रिल १९६८)**१९२८:राज कमल-- प्रसिद्ध भारतीय संगीतकार(मृत्यू :१ सप्टेंबर २००५)**१९२६:कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू:१४ ऑगस्ट १९८४)**१९२१:बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल:२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (मृत्यू:६ आक्टोबर २००७)**१९२०:डॉ.आर.सी.हिरेमठ – कन्नड साहित्यिक,कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू:३ नोव्हेंबर १९९८)**१९१२:गजानन काशिनाथ रायकर -- लेखक, संपादक (मृत्यू:१६ मे २००२)**१९०५: यशवंत कृष्ण खाडिलकर-- कादंबरीकार,संपादक (मृत्यू:११ मार्च १९७९)* *१७७९:रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल,मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक,मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू:१८३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:नामदेव लक्ष्मण ढसाळ – जेष्ठ साहित्यिक (जन्म:१५ फेब्रुवारी १९४९)**२०१३:डॉ.शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म:२९ सप्टेंबर १९२५)**२०१०:मंदाकिनी कमलाकर गोगटे-- मराठी लेखिका(जन्म:१६ मे१९३६)**२००२:विठाबाई भाऊ नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: १९३५)**१९९८:गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान,स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म:४ जुलै १८९८)**१९९४:हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म:२२ जानेवारी १९१६)**१९७१:दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म:३० मे १९१६)**१९१९:लक्ष्मण श्रीधर वाकणकर--लिपिकार, संशोधक(जन्म:१७ सप्टेंबर १९१२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकर संक्रांती निमित्त लेख**बंधूभावाचा संदेश देणारा सण*मकरसंक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आशियातील सर्वात मोठी महायात्रा; सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात, लाखो भाविकांची उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरूवात, 67 दिवसांत 110 जिल्ह्यांमध्ये प्रवास, महाराष्ट्रमध्ये होणार समारोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्याने बच्चू कडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवयवदानात महाराष्ट्रातील पुणे जिल्हा ठरला अव्वल; वर्षभरात सर्वाधिक नोंदी तर दुसरा नंबर मुंबईचा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात येत्या १९ जानेवारीपासून पारा घसरणार, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानला 6 विकेटने हरवून 2-0 ने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संक्रांतीच्या दिवशी तीळ का खातात ?*नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी तीळगूळाचे सेवन करतात. पण तीळगूळचं का? त्यामागे अनेक कारणे आणि फायदे पण आहेत त्याबद्दल थोडं पाहूया ...👉 तिळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तीळ खाल्ल्याने केस मजबूत होतात. 👉 जिम किंवा व्यायामशाळेत नियमित जाणाऱ्या मुलांनी तिळाचे नियमित सेवन करावे याने शरीरातील मांसधातू उत्तम पद्धतीने वाढतो.👉 थंडीमध्ये बाहेरील तापमान थंड असल्याने शरीराचे तापमान उष्ण राहण्यासाठी तिळाचे सेवन केले जाते.👉 जखम होऊन ती भरून येत नसेल तर तिळाची लगदी तिथे लावून ठेवावी. जखम फार चांगल्या पद्धतीने भरून येते.👉 थंडीमध्ये दररोज थोड्या प्रमाणात तिळाचे सेवन केल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. 👉 तीळासोबत बदाम आणि खडीसाखर खाल्ल्यास पचनशक्ती वाढते. 👉 तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्लं अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.👉 बद्धकोष्ठ, मूळव्याध आदी विकार तिळाच्या सेवनाने कमी होतात. मुळव्याध होऊन सारखे रक्त पडत असेल तर काळे तीळ कुटून त्याची चटणी लोण्यासोबत खावी.👉 दातांच्या हिरड्याचे आयुष्य वाढून, दात मजबूत व्हावेत यासाठी काळे तीळ चावून खावेत. दात हालत असल्यास किंवा हिरड्यातून रक्‍त वा पू येत असल्यास तीळ खावेत.👉 तीळ स्निग्ध असल्यामुळे कोरडी त्वचा असणा-यांनी याचं तेल अंगाला चोळावे. त्यामुळे त्वचा मऊ होते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत किंवा वर्षभरात तिळाचा आहारात समावेश करावा.*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याबद्दल तेवढेच बोला जेवढे स्वतःबद्दल ऐकू शकाल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात *नक्षीदार घरटे* कोणत्या पक्ष्याचे असते ?२) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात 'देशातले सर्वात स्वच्छ शहर' कोणते ?३) कोणत्या प्राण्यांच्या पिलांना जन्मतःच शिंग असतात ?४) भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू कोणता ?५) लाल समुद्राचा लाल रंग कशाच्या अस्तित्वामुळे आहे ? *उत्तरे :-* १) सुगरण २) इंदोर ( सलग सातव्यांदा ) ३) जिराफ ४) अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावासेवा अटल सेतू ५) एकपेशीय वनस्पती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 सागर घडमोडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल ए. रोटे, सोलापूर👤 सतिष बोरखडे, यवतमाळ👤 सुरज लता सोमनाथ, श्रीरामपूर👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहादीक प्रपंच हा चिंतियेला।परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥हरीचिंतने मुक्तिकांता करावी।सदा संगती सज्जनांची धरावी॥१६५॥सरळ अर्थ :- देहाविषयीच्या चिंतेने प्रपंच केला म्हणजे मनात लोभ हा उपजत रहातोच. तो विसरून हरीचे चिंतन करावे. लोभी वृत्तीऐवजी अंतिम मुक्ती हीच आपली प्रियव्यक्ती असल्यासारखी तिच्या भेटीची आस ठेवावी. नेहमी सज्जनांची संगत धरावी.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याच्या जीवनात जेव्हा वाईट परिस्थिती येते त्याप्रसंगी आपण स्वतःचा समाधान करण्यासाठी त्यावर खळखळून हसत असतो एवढेच नाही तर त्या वाईट परिस्थितीची पेरणी करण्यासाठी आपण पूर्ण वेळ देत असतो. पण,सर्वच दिवस त्या प्रकारचे नसतात. ज्यावेळी आपण दुसऱ्यांवर हसतो त्याच वेळी नियती हसणाऱ्यांच्या बाजूने नाही तर ज्याचा खेळ मांडला असते त्याच्या बाजूने उभी असते, त्यात मात्र एक गोष्ट अशी की,ती कोणालाही दिसत नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो म्हणून कोणावर आलेल्या परिस्थितीवर हसू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चतूर न्यायमुर्ती*एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?'जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.' या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?'जुना मालक - होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.न्यायमुर्ती - तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे. जुना मालक - (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !न्यायमुर्ती - ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.'न्यायमुर्ती असे म्हणताच, तो मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link -  http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:के.जी.बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९६:'पुणे - मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.**१९६७:पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री.चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.**१९५७:हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.**१९५३:मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी**१८९९:गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:वैभव भिवरकर-- प्रतिभावंत कवी, लेखक,वक्ते**१९८७:डॉ.कुणाल मुरलीधर पवार -- कवी* *१९८३:इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार**१९८२:कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७८:प्रा.कीरण नामदेवराव पेठे-- कवयित्री**१९७१:संतोष दत्तात्रय जगताप-- कवी,लेखक**१९७०:स्वाती प्रभाकरराव कान्हेगावकर-- लेखिका* *१९७०:सत्यवान सीताराम देवलाटकर -- लेखक**१९६३:मोरेश्वर रामजी मेश्राम-- कवी* *१९५५:सरिता रमेश आवाड -- लेखिका**१९४९:राकेश शर्मा–अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय, आणि जगाचे १३८ वेअंतराळवीर**१९४८:आत्माराम कनिराम राठोड(तांडाकार) -- प्रसिद्ध लेखक,कवी (मृत्यू:२३ मे २००५)**१९४७:प्रा.वसंत मारुतीराव जाधव-- कवी, संपादक* *१९४२:जावेद सिद्दीकी-- भारतातील हिंदी आणि उर्दू पटकथा लेखक,संवाद लेखक आणि नाटककार* *१९३८:पं.शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार**१९२६:शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू:९ एप्रिल २००९)**१९१९:एम.चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, माजी राज्यपाल(मृत्यू:२ डिसेंबर १९९६)**१९१८:प्रा.अच्युत केशवराव भागवत -- लेखक संपादक,अनुवादक* *१९१५:प्रा.दत्तात्रय सखाराम दरेकर-- लेखक, चरित्रकार* *१९०८:रावसाहेब म्हाळसाकांत वाघमारे-- कवी,लेखक (मृत्यू:७ मार्च१९८९)**१८९६:मनोरमा श्रीधर रानडे-- मराठी कवयित्री,रविकिरण मंडळाच्या सदस्या(मृत्यू:१९२६)**१८९१:गोपाळ रामचंद्र परांजपे-- विज्ञान लेखक व संपादक ( मृत्यू:६ मार्च १९८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:अंजली देवी-- भारतीय अभिनेत्री,चित्रपट निर्माती (जन्म:२४ ऑगस्ट १९२७)**२०११:प्रभाकर विष्णू पणशीकर –मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (जन्म:१४ मार्च १९३१)**२००१:श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक.कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे 'शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत.* *१९९८:शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक* *१९९७:मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म:१५ एप्रिल १९१२)**१९८९:श्रीकृष्ण जनार्दन जोशी-- लेखक (जन्म:१ ऑगस्ट १९१५)**१९८५:मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: १९१५)**१९७६:अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: १८९२)**१९६७:हरी दामोदर वेलणकर-- संस्कृत पंडित व ग्रंथकार (जन्म:१८ऑक्टोबर १८९३)**१८३२:थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म:२३ नोव्हेंबर १७५५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तरुण भारत देश*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा, शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचं लोकार्पण, दिघा रेल्वे स्थानक, लेक लाडकी योजनेचा शुभारंभ, नाशिकमध्ये युवा महोत्सवाला हजेरी, काळाराम मंदिरात पूजा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोणतीही नशा करू नका, ड्रग्जपासून लांब राहा, माता बहिणींवरुन शिवीगाळ करु नका, युवा दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं तरुणांना आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, विरोधातील याचिका फेटाळली!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विश्व मराठी संमेलनात मराठी भाषा प्रेमींना सामावून घ्यावे - दीपक केसरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे :- समता परिषदेच्या कार्यकर्त्याचा स्तुत्य उपक्रम, जिल्हा परिषदेच्या १६० विद्यार्थ्यांना दाखवला ‘सत्यशोधक’ चित्रपट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने पूर्वी 11 दिवसांचं विशेष अनुष्ठान करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राकेश शर्मा*हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते.नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा कोण आहेत ?२) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते ?३) पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ?४) हवेला वजन असते हे कोणी सिद्ध केले ?५) उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) उषा तांबे २) महाराष्ट्र ३) जम्मू काश्मीर ४) गॅलिलिओ ५) हायपरटेन्शन ( Hypertension )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कु. मित दर्शन भोईर, रायगड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 विजयकुमार चिकलोड👤 बालाजी देशमाने*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।देहातीत ते हीत सांडीत गेला॥देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दु:ख हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. दिखावूपणाचे दु:ख दाखवून डोळ्यातील अश्रू सांडवून वणवा पेटवणे खूप सोपे असते. पण, आतमधील दु:ख मात्र ओळखणे फार कठीण असते. जे खरे दु:खी असतात व त्या परिस्थितीतून जातात ते कधीच दुसऱ्याला दु:ख देत नाही. तर समजून घेतात म्हणून खरे दु:ख कसे असते हे ओळखल्या शिवाय कोणालाही बोल लावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आरसा*       एका गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली  तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’*तात्‍पर्य : आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_11.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय युवक दिन*💥 ठळक घडामोडी :- १९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी.💥 जन्म :-१५९८ - छत्रपती शिवाजी राजांची आई राजमाता जिजाबाई१८६३ - भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद, १९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न.१९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.१९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.१९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.💥 मृत्यू :- १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.१९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.२००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राजमाता जिजाऊ जयंती विशेष**आई असावी जिजाऊसारखी*जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *01 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार देशाचं बजेट सादर, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारी पासून होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चकाचक महाराष्ट्र, स्वच्छतेमध्ये देशात पहिला नंबर, स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या नंबरवर तर इंदूर पहिल्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं उद्घाटन, तर नवी मुंबईतील शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं अजित पवारांना निमंत्रण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह अयोध्येला जाण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूरकरांची चिंता वाढणार, उजनी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठा; पाण्याची नासाडी केल्यास कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्ली आणि भोवतालच्या परिसराला भूकंपाचा धक्का, जम्मू काश्मीरमध्येही भूकंपाचा धक्का. भूकंपामुळे भारतात जीवितहानी झाल्याची नोंद नाही.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मोहाली येथील पहिल्या टी 20 सामन्यात भारताने अफगाणिस्ताचा 6 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वामी विवेकानंद*स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया, उत्तर कोलकाता) येथे जानेवारी १२, १८६३, सोमवारी सकाळी ६:३३:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.(जानेवारी १२, १८६३ हा दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .) बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील)अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे,  कला,  साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्यानी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच त्यांनी व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यानी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *किर्गिस्तानचे राष्ट्रीय चिन्ह* म्हणून नुकतेच कोणत्या प्राण्याला घोषित करण्यात आले आहे ?२) पावसाळ्यात वीज पडून जिवीत हानी होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून भारत सरकारने कोणते ॲप तयार केले आहे ?३) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई ( १६४६ मी. ) कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या 'सत्यशोधक समाजाच्या स्थापने'ला किती वर्षे पूर्ण झाली ?५) पृथ्वी जेव्हा सूर्याच्या सर्वात जवळ असते, त्या स्थितीस काय म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) हिम बिबट्या २) दामिनी ॲप ३) अहमदनगर ४) १५० वर्षे ५) पेरीहेलिऑन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुधाकर थडके, सहशिक्षक  अध्यक्ष, सहकारी पतपेढी, नांदेड👤 डी. बी. शेख, लोहा👤 कन्हैया भांडारकर, गोंदिया👤 रत्नाकर जोशी, साहित्यिक, जिंतूर👤 सुरेश गभाले👤 भारत राठोड👤 नागनाथ भिडे👤 गणेश पाटील भुतावळे👤 अरशद शेख👤 नरेश परकोटवार👤 अमरदीप वाघमारे👤 राहुल दुबे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंतागुणे नीति सांडी विवेकी।अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥परी अंतरी अर्वही साक्ष येते।प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥१६२॥सरळ अर्थ :- ज्ञानी माणसे आपल्या अहंकारापोटी कधीच नियम-कायदे पाळत नाहीत.नियमांच्या विरुद्ध जबरदस्तीने केलेले काम थोड्या काळासाठी चांगले वाटते पण आतून सत्य न समजल्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते. त्यामुळे सत्य ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच वेळी, सत्याच्या मार्गावर चालणे चांगले आहे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विसर त्यांचा पडायला नको ज्यांनी स्वतः साठी न जगता इतरांसाठी जगून दाखविले. व जे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपला वापर करून धोका देतात त्यांच्या आठवणीत कधीच वेळ वाया घालवू नये,दु:खी होऊ नये.आठवण त्यांची काढावे ज्यांनी जगायला शिकवले कारण खऱ्या अर्थाने तेच मानवी जीवनाचे उद्धारकर्ते होते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बुझणारा घोडा*  एका घोड्याला आपल्याच सावलीत बुझण्याची सवय होती. ही सवय जावी म्हणून त्याच्या स्वाराने बराच प्रयत्‍न केला. शेवटी काटेरी लगाम घालून पाहिला, पण तरीही त्याची सवय जाईना. तेव्हा तो स्वार घोड्याला म्हणाला, 'मूर्खा, सावली म्हणजे तुझीच सावली. तुझ्या शरीरातून प्रकाश आरपार जात नाही म्हणून सावली पडते. सावलीला दात नाहीत; पंजे नाहीत अन् तुझ्यासारख्याच्या आडही ती येऊ शकत नाही, तर मग तू तिला भितोस का?' घोड्याने उत्तर दिले, 'अहो कोणी कितीही मोठा झाला तरी त्याला कशाना कशाची तरी भीती वाटतेच. तुम्ही माणसं स्वप्नात भीता किंवा अंधारात एखाद्या लाकड्याच्या ओंडक्याला पाहून घाबरता ते काय म्हणून ? तिथे तरी तुमच्या कल्पनेशिवाय तुम्हाला घाबरवणारं कोणी असतं काम ?'*तात्पर्य* : - मी हसे लोकांना आणि शेंबूड माझ्या नाकाला•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ११ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:एस.पी.भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००:छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९९९:’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी**१९८०:बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.**१९७२:पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.**१९६६:गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.**१९४२:दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले**१९२२:मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.**१७८७:विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्‍या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:डॉ.मयूर बंडू लहाणे-- लेखक* *१९७९:डॉ.रेणुका शरद बोकारे-- लेखिका, संपादिका* *१९७४:प्रा.डॉ.संभाजी व्यंकटराव पाटील-- लेखक* *१९७३:राहुल द्रविड_भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार,मुख्य प्रशिक्षक,उत्कृष्ट फलंदाज**१९६७:मधुकर गणपतराव कोटनाके-- कवी**१९६६:लक्ष्मण शंकर हेंबाडे-- कवी* *१९६५:धनंजय लक्ष्मीकांतराव चिंचोलीकर-- स्तंभलेखक,कथा,कादंबरी, नाटक या वाड:मय प्रकारात लेखन* *१९६१:राधिका मिलिंद राजंदेकर -- कवयित्री* *१९५५:आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका**१९५४:चद्रकांत भोंजाळ-- प्रसिद्ध मराठी लेखक आणि जेष्ठ अनुवादक**१९५०:अरुण गुलाबराव डावखरे -- लेखक,अनुवादक* *१९४४:शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री**१९४२:प्रा.डॉ.यशवंत देशपांडे-- विज्ञान कथा लेखक**१९३६:डॉ.नरसिंह महादेव जोशी-- प्रसिद्ध मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक**१९२८:पं.अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर-- बासरीवादक,लेखक(मृत्यू:३० मे २०१०)**१९२५:श्री.के.केळकर-- लेखक (मृत्यू:१० जानेवारी १९९६)**१८९८:विष्णू सखाराम खांडेकर -- सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार,ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित(ययाति १९७४ )(मृत्यू:२ सप्टेंबर, १९७६)**१८५९:लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू:२० मार्च १९२५)**१८५८:श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:१३ सप्टेंबर १९२६)**१८१५:जॉन ए.मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू:६ जून १८९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:डाॅ जुल्फी शेख--संत साहित्याच्या अभ्यासिका,संवेदनशील कवयित्री डी.लिट.पदवीने संन्मानीत (नागपूर विद्यापीठ)(जन्म:७ मे १९५४)**२००८:य.दि.फडके – लेखक व इतिहाससंशोधक (जन्म:३ जानेवारी १९३१)**२००८:सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म:२० जुलै १९१९)**१९९७:भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म:२१ फेब्रुवारी १९११)**१९६६:स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.(जन्म:२ आक्टोबर १९०४)**१९६४:शांताराम गोपाळ गुप्ते--कादंबरीकार, नाटककार (जन्म:१९०७)**१९५४:सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या 'सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म:२८ फेब्रुवारी १८७३)**१९२८:थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म:२ जून १८४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षक आनंदी तर मुले आनंदी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदे गट हीच खरी शिवसेना- राहुल नार्वेकरांचा ऐतिहासिक निकाल, ठाकरे गटाला मोठा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सत्यशोधक हा मराठी सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमध्ये परवानगी नाकारली, इंफाळमधूनच सुरुवात करणार, काँग्रेस भूमिकेवर ठाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी होणार नाही, भाजप आणि RSS चा इव्हेंट असल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेची बाजी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहली आज खेळणार नाही असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विष्णू सखाराम खांडेकर*(जन्म : ११ जानेवारी १८९८ - मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.इ.स. १९२० साली खांडेकरांनी  महाराष्ट्रातल्या  सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केलेआपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्यावि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)पद्मभूषण पुरस्कार (१९६८)ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठीकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.सौजन्य : इंटरनेट*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील *पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका* कोण ?२) नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या सेतूचे नाव काय आहे ?३) 'ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स - २०२३' मध्ये प्रथम तीन देश कोणते ?४) सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या वर्षी महिलांसाठी देशातील पहिली शाळा स्थापन केली ?५) ऑक्झिजनशिवाय माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ? *उत्तरे :-* १) फातिमा शेख २) अटल बिहारी वाजपेयी शिवडी - नाव्हासेवा अटल सेतू ३) स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका ४) सन १८४८ ५) पियाली बसाक *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 सिध्देश्वर मोकमपल्ले👤 हणमंत पांडे👤 राहूल ढगे, सहशिक्षक👤 लोकेश येलगंटवार👤 साई यादव, येवती👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंतागुणे सर्वही दुःख होते।मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥सुखी राहता सर्वही सूख आहे।अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥१६१॥सरळ अर्थ - अहंकारामुळे माणसाला सर्वत्र दु:खच मिळते कारण अहंकारी माणूस काय बोलतो याकडेही कोणी लक्ष देत नाही. आनंदी आणि समाधानी वृत्तीने जगल्याने सर्वत्र आनंद आणि आनंद मिळतो. म्हणून मनुष्याने स्वतःचा अहंकारी स्वभाव शोधून तो सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याने केलेला त्याग, समर्पण, संघर्ष, वेदना, दु:ख,तळमळ आणि जिव्हाळा हे सर्व अनमोल संपत्ती आहेत.या अंतर्गत गुणांना ओळखणे खूप कठीण असते.या अंतर्गत गुणांना जो ओळखत असतो. तीच व्यक्ती सामाजिक संबंध वृद्धिंगत करु शकते. त्यासाठी त्याच प्रकारची दृष्टी आपल्यात असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर अशांना समजून घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी आल्यात सुद्धा त्याच प्रकारची संपत्ती असणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वानर व कोल्हा*        एकदा एक 🐒वानर व कोल्हा 🐕यांची अरण्यात🌳☘🌿🌱🍃🍀🌳🌴🍂🍁☘🌿🌱🌴🌳🌳 गाठ पडली तेव्हा वानर🐒 कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देशील तर तो मी लावून वार्‍यापासून माझं रक्षण करीन. तुझे शेपूट तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे वानरा, तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.'तात्पर्य - काही माणसांजवळ बरेच ऐश्वर्य असते पण ते स्वतः त्याचा उपयोग घेण्यास समर्थ नसतात, पण त्यांचा स्वभाव मात्र विलक्षण असतो की, त्या ऐश्वर्याचा ते नाश होऊ देतील पण दुसर्‍याला कधीही देणार नाहीत.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७२:पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.**१९६६:भारत व पाकिस्तान यांच्यात ’ताश्कंद करार’ झाला.**१९२९:जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.**१९२६:स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.**१९२०:पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.**१८७०:बॉम्बे,बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B.B.C.I.Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.**१८६३:चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.**१८०६:केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.**१७३०:पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.**१६६६:सुरत वरून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:कालिदास अंकुश शिंदे -- लेखक* *१९७५:राजेश गंगाराम जाधव-- कवी* *१९७४:प्रा.विजय काकडे-- कथाकार,लेखक, वक्ते* *१९७४:हृतिक रोशन – प्रसिद्ध सिनेकलाकार**१९७३:रेशम टिपणीस-- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९६९:प्रा.डॉ.विठ्ठल लक्ष्मणराव चौथाले -- लेखक* *१९६८:रमेश सूर्यभान डोंगरे -- प्रसिद्ध लेखक**१९६५:प्रा.डॉ.विलास विश्वनाथ तायडे-- लेखक,समीक्षक,संपादक* *१९६४:डॉ.समीरण वाळवेकर-- निवेदक, पत्रकारिता,वृत्त टेलिव्हिजन,शैक्षणिक टेलिव्हिजन,मनोरंजन टेलिव्हिजन,मालिका, चित्रपट,सहायक दिग्दर्शन,कादंबरी लेखन , निवेदन,या सर्व क्षेत्रात भरीव काम**१९५५:डॉ.दिलीप गरुड -- प्रसिद्ध लेखक* *१९५०:नजूबाई गावित-- आदिवासी, भूमिहीन,शेतकरी,धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या**१९४६:निरंजन घाटे-- विज्ञानकथा,कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक* *१९४७:प्राचार्य डॉ.पंडितराव एस.पवार-- लेखक,संशोधक,संपादक* *१९४२:डॉ.अशोक प्रभाकर कामत-- हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्‌मयाचे चिकित्सक अभ्यासक**१९४०:के.जे.येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार**१९१९:प्रा.श्रीपाद रघुनाथ भिडे-- लेखक* *१९०३:शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर,अण्णाबुवा)--समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित,संपादक(मृत्यु:३ऑक्टोबर १९९९)**१९०१:डॉ.गणेश हरी खरे -- इतिहास संशोधक (मृत्यू:५जुन १९८५)**१९००:मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू:२४ नोव्हेंबर १९६३)**१८९६:नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक,लेखक,वक्ते, राजकीय नेते,केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू:१२ जानेवारी १९६६)**१८९६:दिनकर गंगाधर केळकर--कवी, संपादक,संग्रहालयकार (मृत्यु:१७ एप्रिल १९९०)**१७७५:बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू:२८ जानेवारी १८५१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२:पं.चिंतामणी रघुनाथ तथा सी.आर. व्यास – ख्यालगायक,गुरु व बंदिशकार (जन्म:९ नोव्हेंबर १९२४)**१९९९:आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत* *१७७८:कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ,वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले.(जन्म:२३ मे १७०७)**१७६०:दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म:१७२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ठाकरे-शिंदेच्या भवितव्याचा आज होणार ऐतिहासिक फैसला, विधानसभा अध्यक्ष चार वाजता वाचन करणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वेळा अमावस्यानिमित्ताने लातूरच्या बस स्थानकात प्रवाश्याची प्रचंड गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती व जामीन ही मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संगीत क्षेत्रातील तारा निखळला, संगीत सम्राट उस्ताद रशीद खान याचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *डॉक्टरांना आता कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार, 'झिग-झॅग' लिहिणं बंद करा; हायकोर्टाचा आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज मोहम्मद शामीचा सर्वोच्च गौरव, मानाच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त* 💉 **************शरीरात रक्ताचे काम काय असते ? शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते. रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था. रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते. सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते. मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही. जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते. रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय संविधानाच्या मुळ प्रत पुस्तकातील पहिल्या भागाच्या सुरुवातीला कोणत्या संस्कृतीची चित्रशैली आहे ?२) भारतात प्रवेश करणारा पहिला पोर्तुगीज कोण ?३) 'ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२३' मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?४) जैवविविधता रजिस्टर मिळवणारे भारतातील पहिले मेट्रो शहर कोणते ?५) रसायनाचा राजा कोणाला म्हणतात ? *उत्तरे :-* १) सिंधू संस्कृती चित्रशैली २) वास्को - द - गामा ३) ४० व्या ४) कोलकाता ५) सल्फ्युरिक आम्ल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीनिवास रेड्डी, धर्माबाद👤 साईनाथ सोनटक्के👤 राजेश कुंटोलू👤 गणेश वाघमारे👤 शत्रूघन झुरे👤 स्वरूप खांडरे👤 आकाश क्षीरसागर, सालेगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना वाद हा खेदकारी।नको रे मना भेद नानाविकारी॥नको रे मना शीकवूं पूढिलांसी।अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥सरळ अर्थ - हे मना, खेदकारक असा वाद घालू नकोस, त्याच्यामुळे भेदाभेद, भांडण तंटे होतात. ते टाळ. तुझ्या मनात असलेल्या अहंकाराची दीक्षा पुढल्या पिढीला देऊ नकोस.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शरीराने जवळ आणि मनाने दूर असणाऱ्या व्यक्तीला कितीही समजावून सुद्धा काहीच फायदा होत नाही. तरीही माणुसकीच्या नात्याने एकदा तरी समजूत काढण्याचा प्रयत्न करून बघावे. बरेचदा काही गोष्टी उशीरा कळल्यावर फायदा होत असतो तर न ऐकणाऱ्याचे जीवन जगणे अवघड होऊन जाते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरू, परीक्षा, शिष्य*गुरुकुलातून तीन शिष्य  उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल..आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल.आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष  परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार   सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये  काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी  परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी  थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं.दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला..तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी  आपल्याला लवकरात लवकर  मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर..तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू  येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत..ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे.*तात्पर्यः*अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रवासी भारतीय दिवस*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.**२००१:नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.**१९१५:महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन**१८८०:क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा**१७८८:कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:पंडित रामाजी लोंढे-- कवी* *१९७४:फरहान अख्तर-- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता,लेखक,संवाद लेखक,गायक**१९६५:फराह खान -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,लेखिका,चित्रपट निर्माता,अभिनेत्री,नृत्यांगना आणि कोरिओग्राफर**१९६३:डॉ.लीना पांढरे -- लेखिका, अनुवादक**१९६३:सुरेश कृष्णाजी पाटोळे-- सुप्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक**१९६०:डॉ.किशोर रामचंद्र महाबळ--अभ्यासू, लेखक तसेच अनेक वृत्तपत्रांतून लेखन (मृत्यू:५ फेब्रुवारी २०१५)**१९५१:प्रा.अजित मधुकर दळवी-- प्रसिद्ध नाटककार**१९५१:पं.सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य**१९४६:सुभाषकुमार अनंतराव बागी-- कवी, लेखक* *१९३८:चक्रवर्ती रामानुजम – गणितज्ज्ञ (मृत्यू:२७ आक्टोबर १९७४)**१९३४:महेंद्र कपूर –पार्श्वगायक (मृत्यू:२७ सप्टेंबर २००८)**१९२७:राजाराम भालचंद्र पाटणकर-- मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ मे २००४)**१९२६:कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू:२० सप्टेंबर १९९७)**१९२२:हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:९ नोव्हेंबर २०११)**१९१८:प्रभाकर वामन ऊर्ध्वरेषे-- पत्रकार, समीक्षक,मार्क्सवादी विचारवंत(मृत्यु:१० जुलै १९८९)**१९१३:रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२२ एप्रिल १९९४)**१८७७:केशवराव रघुनाथ देशमुख--ज्ञानेश्वरी प्रवचनकार व संतकव्याचे अनुवादक (मृत्यू:२७ एप्रिल १९४२)**१८५४:रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर-- मराठी कवी व भाषांतरकार(मृत्यू:४ जून १९१८)**१८३१:फातिमा शेख-- भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी(मृत्यू:९ ऑक्टोबर १९००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:विश्वास मेहेंदळे-- मराठी लेखक, वृत्तनिवेदक,चरित्रकार आणि अभिनेते (जन्म:१० जुलै १९३९)**२०१३:जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म:३ आक्टोबर १९१९)**२००४:शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म:१९११)**२००३:कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: १९१९)**१९४५:गोविंद रामचंद्र मोघे-- कवी,ग्रंथकार (जन्म:१८६०)**१९२३:सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी(ICS)(जन्म:१ जून १८४२)**१८४८:कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले (जन्म:१६ मार्च १७५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता.............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *PM मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीपचं नशीबच पालटलं, पर्यटनात तब्बल ३४०० टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार, 300 पैकी 200 जागा जिंकल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला, 10 जानेवारीला लागणार निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला अखेर पूर्णविराम; उच्च न्यायालयाच्या आदेशाला 'सर्वोच्च' स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ, पोलिसांनी घेतलं ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेन्रीच क्लासेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 एन्फ्लुएंझा (फ्लू, बर्डफ्लू, स्वाइन फ्लू) म्हणजे काय ? 📙'फ्लू' या नावाने आपण याला ओळखतो. हा अति-संसर्गजन्य असा आजार आहे. जगाच्या पाठीवर अनेकवेळा या आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेली काही दशके प्रतिजैवक औषधे उपलब्ध झाल्याने या आजारातून गंभीर स्वरूप धारण करणाऱ्या अन्य उपद्रवांवर जरासा ताबा आपण मिळवला आहे, एवढेच. मात्र फ्लूवर आजही नेमके औषध उपलब्ध नाही. त्याचा प्रतिबंध करणारी लस शोधण्याचे अनेक प्रयत्न निरुपयोगी ठरलेले आहेत; कारण ज्या विषाणूमुळे हा आजार होतो, त्याच्या असंख्य प्रजाती अस्तित्वात असल्याने व त्यांतही सतत नवीन भर पडत असल्याने प्रतिबंधक लस तयार करून तिचा उपयोग होत नाही.फ्लूची साथ एखाद्या प्रदेशात पसरली की, अक्षरश: घराघरांतून आलटूनपालटून प्रत्येकाचा आजाराशी संबंध येतोच. सारे घर फ्लूने भेटले आहे, अशीही उदाहरणे जुन्या काळात भरपूर आहेत. सर्दी, पडसे, नाक गळणे, खोकला, तीव्र डोकेदुखी, सर्वांग दुखणे, अतिशय थकवा, भूक मंदावणे, ताप ही प्रमुख लक्षणे या आजारात दिसतात. मात्र सर्दी, पडसे जसे पटकन बरे होते तसे न होता आजार गेला तरी थकवा खूप दिवस राहतो.प्रत्यक्ष फ्लू धोकादायक नसून त्या विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर श्वासनलिका, फुप्फुसे, त्यांची आवरणे यांमध्ये आलेल्या दुर्बलतेचा फायदा घेऊन अन्य जंतूंचा प्रवेश होतो. त्यातून न्युमोनिया, ब्राँकायटिस, प्लुरसी यांसारख्या गंभीर आजारात रूपांतर होते. गेल्या शतकात १९१८ साली सुरू झालेल्या फ्लूच्या साथीमध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात १९५७ साली फ्लूची शेवटची मोठी साथ येऊन गेली.फ्लुवरचे उपचार व निदान यांसाठी शक्यतो डॉक्टरी सल्ला घेतलेला बरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथ नसताना फ्लूचे निदान करणे तज्ज्ञ डॉक्टरांचे काम बनते. साथीच्या वेळी रुग्ण पटकन लक्षात येतो. पण अन्यथा किरकोळ लक्षणांमुळे आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकते.विश्रांती, पोषक आहार, वेदनाशामक औषधे, भरपूर पेयद्रव्ये यांचा वापर या आजाराच्या उपचारात आवश्यक ठरतो. नंतरचा थकवा व दौर्बल्यावर शक्तिवर्धक औषधे, प्रथिनांचा पूरक वापर उपयोगी पडतो.सध्या गेली काही वर्षे आपण ऐकत असलेला 'बर्ड फ्लू' हा आजार नामसाधर्म्याने सारखाच असला व तोही विषाणूजन्य असला, तरी त्याचा प्रादुर्भाव मुख्यतः कोंबड्या व पक्षी यांच्यात होतो. क्वचितच माणसांना त्याची लागण होते. त्यावेळी फुप्फुसदाह व तीव्र ताप ही लक्षणे माणसात दिसतात. अर्थात पक्षी हाताळताना वा त्यांची विल्हेवाट लावताना प्रतिबंधक काळजी आवश्यक ठरते. नाक तोंड झाकणारे मास्क व हातमोजे गरजेचे ठरतात. पक्षांमध्ये होणारा हा आजार फार झपाट्याने पसरतो. खुराड्यातील सर्व पक्षी याला पटकन बळी पडू शकतात. मात्र अशी कोंबडी वा पक्षी खाण्यायोग्य राहत नाहीत. त्यामुळे बर्डफ्लुचा प्रादुर्भाव झाल्यास त्या भागातील सर्व पक्षी नष्ट करणे - मुख्यतः खुराड्यातील व पाळीव - हाच एक प्रतिबंधक उपाय ठरतो. त्यांची जाळून वा खोल जमिनीत गाडून विल्हेवाट लावावी लागते. भारतात २००६ साली या रोगाने कुक्कुट- पालनाच्या व्यवसायाला फार मोठा तडाखा दिला आहे. मात्र याच काळात बर्डफ्ल्यूने आजारी झालेल्या माणसांची संख्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे, हेही ध्यानात ठेवायला हरकत नाही.'स्वाईन फ्ल्यू' या नावाने २००९ साली जगभर धुमाकूळ घातलेल्या आजाराची मेक्सिकोमध्ये सुरुवात झाली. साऱ्या जगभर त्याचा विलक्षण वेगाने प्रसार झाला. फ्लुच्या विषाणूतील H1N1 या एका जातीने हा आजार होतो. फ्लूसारखी अन्य लक्षणे असली, तरी सुमारे एक टक्का रुग्णांत जुलाब, उलट्या याही सुरू होतात. एक हजारांत चार रुग्ण दगावत असल्याने ही साथ गंभीर मानली गेली आहे. मात्र टॅमिफ्लू औषधाचा वापर केल्यास स्वाईन फ्लूची तीव्रता खूप कमी होते, असेही लक्षात आले आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या *राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह* काय आहे ?२) मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नुकतेच तीन बघड्यांना जन्म देणाऱ्या मादी चित्ताचे नाव काय ?३) 'वन नेशन, वन इलेक्शन' बाबत कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे ?४) ज्ञानवापी मस्जिद कोणत्या शहरात आहे ?५) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ? *उत्तरे :-* १) शेकरू, महाराष्ट्राचा राज्य प्राणी २) आशा ३) रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती ४) वाराणसी ५) शेकरू *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुहास अनिल देशमुख👤 माधव नरवाडे👤 आमिर अली शेख👤 अजित राठोड👤 राजेश रामगिरवार👤 गजानन सोनटक्के👤 सुप्रिया ठाकूर👤 श्याम कुमारे👤 विष्णुकांत इंगळे👤 शिवकुमार पंतुलवार👤 हमीदसाब शेख👤 लालू अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥अहंभाव ज्या मानसीचा विरेना।तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥१५९॥सरळ अर्थ - तोंडातून आत माशी गेली म्हणजे जसे मळमळते आणि पुढे जेवणात गोडी वाटत नाही तसेच मनात अहंभाव शिरल्याने चांगल्या ज्ञानाची गोडी येत नाही. ते पचत नाही.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीमंत असला तरी तो माणूस असते गरीब असतो तरीही तो माणूसच असतो.म्हणून माणसा, माणसात कसलाही भेदभाव करू नये व कोणावर आलेल्या परिस्थितीकडे बघून त्याची योग्यता ठरवू नये. वेळ, प्रसंगी परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागत नाही. आणि परिस्थिती कधी ,कोणावर कशी येईल कधीही सांगून येत नाही. इतिहासात असे अनेक दाखले सापडतात की जे आधी गरीब होते व त्यांनी आपल्या अफाट कष्टातून, संघर्ष करून उंच भरारी घेतलेली आहे. त्यांचे आपण अवश्य स्मरण करायला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*छोटी-छोटी बातें*     पूर्व काल में घोडे का बहुत महत्व था। घोड़ों के पैरों मे नाल ठोंका करते थे। एक बार एक सवार ने कुछ दुर्लक्ष किया। उसके घोड़े की एक नाल का एक कीला निकल गया था। वह कुछ ही क्षणों का छोटा सा काम था; परन्तु उसने वह नहीं किया। संयोगवश उस दिन उसे एक महत्वपूर्ण संदेशा पहुंचाने का कार्य दिया गया। शत्रु सेना पर एक ही समय दोनों तरफ से आक्रमण करना निश्चित हुआ। किस समय किस ढंग से सेना का दूसरा भाग आक्रमण करेगा, इसकी विस्तृत सूचना लिखकर वह लिफाफा इस सवार को दिया गया। उसे वह दूसरे सेनापति को पहुंचाना था। वह लिफाफा लेकर घोड़े पर सवार हुआ। उसने अपने घोडे को बहुत तेजी से दौड़ाया। आधा अंतर उसने पार कर लिया होगा, तभी एकाएक नाल की और दो कीलें ढीली हो गयीं और नाल सर्र से बाहर निकल आयी। घोड़ा पूर्ण वेग से दौड रहा था। बाहर निकली हुई नाल किसी वृक्ष मूल में अटकी और घोडा अपने सवारी सहित धड़ाम् से गिर पडा। घोड़े के मर्मस्थल पर चोट लगने से वह वहीं मर गया। सवार घायल हुआ। बेहोश भी हुआ। थोडी देर के बाद उसे होश आया। घोडे को मरा पा कर उसे बहुत दुख हुआ। वह उठा और लंगडाते-कराहते भागने लगा। उसे महत्वपूर्ण संदेशा जो पहुंचाना था, उसने बहुत प्रयास किया परन्तु वह निर्धारित स्थान पर ठीक समय पर नहीं पहुंच सका। अतः व्यूह रचना असफल हुई। उसका देश युद्ध में हार गया, एक छोटी सी कील के कारण।   कील न ठुकाई, घोडा मरा।   स्वार न पहुंचा देश हारा॥•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जानेवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.**२०००:लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड**१९६३:लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट,वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.**१९५७:गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.**१९४७:राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.**१९४०:दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.**१८८९:संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.**१८८०:सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय.**१८३५:अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.* *_जन्मदिवस /वाढदिवस/जयंती:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:प्रशांत दत्तात्रय कोतकर -- कवी**१९७४:प्रतिभा रामचंद्र पाटील --कवी**१९७३:गणेश सहदेव सांगोळकर - कवी* *१९७१:संध्या विलासराव बोकारे -- कवयित्री, लेखिका* *१९७१:व्यंकटेश कुलकर्णी -- कवी, गझलकार* *१९५७:प्रा.दिनकर विष्णू पाटील-- लेखक**१९५५:दिलीप दत्तात्रेय कुलकर्णी-- लेखक* *१९५३:विठ्ठल अर्जुनराव साठे--कादंबरीकार* *१९४२:स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक(मृत्यू:१४ मार्च २०१८**१९४५:डॉ.प्रभा गणोरकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री,समीक्षक आणि संशोधिका**१९३९:प्राचार्य प्रभाकर बागले -- कवी, लेखक,संपादक* *१९३६:ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू:३ जानेवारी २००५)**१९३५:पंढरीनाथ धोंडू सावंत-- लेखक संपादक* *१९३५:एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’(मृत्यू:१६ ऑगस्ट १९७७)**१९२९:सईद जाफरी – अभिनेता( मृत्यू:१५ नोव्हेंबर २०१५)**१९२६:केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (मृत्यू:७ एप्रिल २००४)**१९२५:राकेश मोहन – हिन्दी नाटककार (मृत्यू:५ डिसेंबर १९७३)**१९२४:गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (मृत्यू:४ मार्च २०००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६:फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२६ आक्टोबर १९१६)**१९९५:मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (जन्म:१ मे १९२२)**१९७६:चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:५ मार्च १८९८)**१९७३:नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक,प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह,स्वच्छ समाजदृष्टी,उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(जन्म:२० सप्टेंबर १८९८)**१९६७:डॉ.श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ,संस्कृत पंडित.अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.(जन्म:१० डिसेंबर १८८०)**१९६६:बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (जन्म:१२ जुलै १९०९)**१९४१:लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (जन्म:२२ फेब्रुवारी १८५७)**१८८४:केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष,समाजसुधारक आणि लोकसेवक (जन्म:१९ नोव्हेंबर १८३८)**१८२५:एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (जन्म:८ डिसेंबर १७६५)**१६४२:गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१५ फेब्रुवारी १५६४)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकच ध्यास ; वाचन विकास*शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर, १७ व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *PM मोदींवर टिप्पणी केल्याबद्दल मालदीवच्या मंत्री निलंबित, मरियमसह तिघांवर कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; काँग्रेसने राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर दिली मोठी जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तलाठी भरती परीक्षेत घोटाळा, विद्यार्थ्याला मिळाले 200 पैकी 214 गुण; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून चौकशीची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश; हाती शिवबंधन बांधत म्हणाले," शिवसेना सर्वसामान्यांची आहे"*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशभरात थंडीचा कहर, पंजाबने 14 जानेवारीपर्यंत शाळांना सुटी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ना हार्दिक ना सूर्या, रोहित शर्माच असणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा कॅप्टन!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *माणूस कोणकोणते अवयव दुसऱ्याला दान करू शकतो ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""दानाचे महात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. दानशूर कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच; परंतु या सर्व दानापेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना ? पण हे अगदी खरे आहे.हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसऱ्याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शक्य झाले आहे.डोळ्यात फुल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल बसवतात. त्यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्व व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी एका मुत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रुग्णाचे प्राण वाचतात.अपघातांमध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णांचे हृदय नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात. मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमार्टेम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैयक्तिक विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसर्‍या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते.अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. "मरावे परि कीर्तीरुपी उरावे" या उक्तीची प्रचिती या दानामुळे येऊ शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कवी बालाजी पेटेकर👤 आसिफ शेख, धर्माबाद👤 आकाश गाडे, येवती👤 मारोती गोडगे👤 आनंदा कुमारे👤 करण भंडारी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे।स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे॥स्वये शेष मौनावला स्थीर पाहे।मना सर्व जाणीव सांडून राहे॥१५८॥सरळ अर्थ - श्रुती, स्मृती, न्याय, मीमांसा, तर्कशास्त्र, वेद इत्यादी अनेक ग्रंथ आहेत. त्यांमध्ये जे ज्ञान वर्णन केले आहे ते परस्परविरोधी, विचित्र वाटते. त्या सगळ्या ग्रंथांच्या वाचनाने गोंधळ उडतो. हजार डोक्यांचा शेषनाग देखील विचारांच्या गोंधळामुळे  मौन धारण करता झाला आणि सर्व जाणीवा सोडून स्थिरपणे पहात रहाणे त्याने पत्करले.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून.अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात.म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतःमध्ये बदल**कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'**तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_6.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_पत्रकार दिन_**_ या वर्षातील सहावा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४४:दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.**१९२९:गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन**१९२४:राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता**१९१२:न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.**१९०७:मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली.त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.**१८३२:पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले**१६७३:कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्‍न पूर्ण केले.**१६६५:शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:मुरहारी कराड -- कवी,लेखक संपादक* *१९७३:किरण दत्तात्रय दशमुखे-- लेखक, संपादक* *१९७१:श्रीकांत अनंत उमरीकर-- कवी,संपादक* *१९६६:ए.आर.रहमान – संगीतकार**१९६४:विनोद जनार्दन शिंदे-- कवी,लेखक**१९६३:प्रशांत प्रकाशचंद्र पनवेलकर -- प्रसिद्ध कवी**१९५९:कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार समालोचक व प्रशिक्षक**१९५५:रोवान अ‍ॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक**१९३१:डॉ.आर.डी.देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ,’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष**१९२८:विजय धोंडोपंत तेंडुलकर-- प्रसिद्ध मराठी नाटककार,लेखक,पटकथालेखक,तथा राजकीय विश्लेषक(मृत्यू:१९ मे २००८)**१९२७:राम तेलंग-- कवी,लेखक**१९२६:डॉ.पद्मिनी भांडारकर-- लेखिका(मृत्यू:४मार्च २०१३)* *१९२५:रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार,विनोदी लेखक (मृत्यू:१९ जून १९९८)**१८८३:खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू:१० एप्रिल १९३१)**१८६८:गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’,’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(मृत्यू:२५ नोव्हेंबर १९६२)**१८१२:बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह,१८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला.’दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू:१८ मे १८४६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:तुलसीदास हरिश्चंद्र बेहेरे-- लोकसाहित्याचे अभ्यासक,नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या लोकनाट्याचे अभ्यासक आणि संशोधक.(जन्म:१५ मे १९५२)**२०१०:प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म:१६ जुलै १९४३)**१९८४:’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म:१ फेब्रुवारी १८८४)**१९८१:ए.जे.क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म:१९ जुलै १८९६)**१९७१:प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (जन्म:२३ फेब्रुवारी १९१३)**१९१९:थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष,नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२७ आक्टोबर १८५८)**१९१८:जी.कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म:३ मार्च १८४५)**१८८५:भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,१८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.(जन्म:९ सप्टेंबर १८५०)**१८८४:ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म:२० जुलै १८२२)**१८५२:लुई ब्रेल–अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म:४ जानेवारी १८०९)**१८४७:त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म:४ मे १७६७)**१७९६:जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती,मुत्सद्दी* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हिवाळा ऋतूतील खास रानमेवा*खास करून हिवाळा ऋतूमध्ये अनेक फळे खाण्यासाठी उपलब्ध होतात जसे जांभ आणि बोरं. ही दोन्ही फळं खाल्याने सर्दी आणि खोकला होण्याचा धोका असतो म्हणून पालक वर्ग मुलांना हे फळं खान्यापासून मज्जाव करतात. तरी देखील मुलं चोरी चोरी चुपके चुपके खातातच. सायंकाळच्या वेळेला जेंव्हा शिंक येते त्यावेळी आई बरोबर ओळखते आणि बोरं किंवा जांभ खाल्लं का ? म्हणून जोरात बोलते. लहान मुलांना खास करून आवडणारे फळ म्हणजे बोरं. जंगलातील हा रानमेवा................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणुकीआधी PM मोदींचा नाशिक दौरा, तब्बल दीड किलोमीटरपर्यंत करणार रोड शो*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारी योजनाचे लाभ नाकारता येणार; गिव्ह ईट अप योजना लागू करणार महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा अन् ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही; पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र"; राज्यपाल रमेश बैस यांचे नाशकात वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 5 सहकारी बँकांना RBI चा दणका, 50 हजार ते 5 लाखांचा ठोठावला दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थांना एक कोटींपेक्षा जास्त पॅकेज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० वर्ल्ड कप १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही देशांत संयुक्यरित्या खेळवण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कपिलदेव निखंज*कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये 1983 मध्ये पहिला  क्रिकेट  विश्वचषक जिंकला होता. क्रिकेट क्षेत्रातील योगदान - कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्‍यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्‍यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) NHAI तर्फे महाराष्ट्रातील पहिला *'ऑक्झिजन बर्ड पार्क'* कोठे उभारण्यात येत आहे ?२) विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?३) आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ?४) पोलीस दलात महिलांची नेमणूक करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?५) बौद्ध धर्माचे साहित्य कोणत्या भाषेमध्ये आहे ? *उत्तरे :-* १) नागपूर २) वाशी, मुंबई ( २७ ते २९ जानेवारी २०२४ ) ३) जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र ४) महाराष्ट्र ५) पाली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अभिषेक अडकटलवार👤 साईनाथ जगदमवार👤 भगवान चव्हाण 👤 रितेश जोंधळे👤 बजरंग माने👤 सुदर्शन कोंपलवार👤 श्रीनिवास गंगुलवार👤 मोहन घोसले👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।अतर्कासि तर्की असा कोण आहे॥जनीं मीपणे पाहता पाहवेना।तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥सरळ अर्थ - आपल्याला ते परब्रम्ह तत्व समजले आहे असे जो म्हणतो तो मूर्ख आहे. कारण जे अतर्क्य आहे त्याचा तर्कही कोणी करू शकत नसतो. ‘मी पाहिलं, मी जाणलं’ असा अहंकार बाळगून असणाऱ्याला तर ते दिसणार नाही,  कळणार नाही. त्याला पाहणं म्हणजे त्याच्यात सामावून जाणं. एकतत्व होणं. जिथं ‘मी’पणा आहे तिथं ते जमणं केवळ अशक्यच.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून.अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात.म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार गोनू*मिथिला नगरीत राहणार्‍या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, 'महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.'शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, 'गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?'गोनू म्हणाला, 'का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.'आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्‍हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्‍याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते.स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्‍याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला.तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्‍याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा 'आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला.आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला 'तू हा चमत्कार कसा केलास?' अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला 1,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, 'गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला 1,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्‍या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला 500 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.' •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/darpankar-balshastri-janbhekar.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील पाचवा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ’महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.**१९९७:रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.**१९७४:अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद**१९५७:विक्रीकर कायदा सुरू झाला.**१९४९:पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.**१९४८:’रोझ बाऊल फुटबॉल’ स्पर्धेचा जगातील पहिला रंगीत माहितीपट (News Reel) ’वॉर्नर ब्रदर्स’ तर्फे जगांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.**१९३३:सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.**१९१९:द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.**१६७१:मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री**१९८१:विद्या सुर्वे-बोरसे-- लेखिका, समीक्षक**१९८०:अशोक कुबडे --- लेखक* *१९७६:प्रा.प्रवीण मधुकरराव घारपुरे-- लेखक**१९७६:मारुती नथुजी मुरके -- लेखक* *१९६९:प्रशांत विनायक आसलेकर -- लेखक* *१९६५:डॉ.संभाजी खराट-- प्रसिद्ध लेखक तथा निवृत्त उपसंचालक माहिती व जनसंपर्क* *१९६०:पराग घोंगे-- नाटककार,लेखक* *१९५९:ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक -- लेखक तथा प्रर्वतक,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन* *१९५६:माधव डहाळे-- कवी, कादंबरी, आत्मकथनाचे लेखन**१९५५:ममता बॅनर्जी – माजी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री* *१९४८:सरोज निळकंठराव जोशी-- कवयित्री* *१९४८:फैय्याज – अभिनेत्री व गायिका**१९४८:पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (मृत्यू: २० आक्टोबर २०१०)**१९४६:गोविंद कुलकर्णी-- कवी* *१९४१:मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे नबाब (मृत्यू:२२ सप्टेंबर २०११)**१९३६:श्यामला शिरोळकर-- बालसाहित्यिक (मृत्यू:२६ मे २००६)**१९३५:रामदास गणेश भटकळ -- लेखक,प्रकाशक**१९३५:डॉ.अभयकुमार व्यंकटेश सावजी-- लेखक* *१९३४:डॉ मुरली मनोहर जोशी-- भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री**१९२८:झुल्फिकार अली भुट्टो – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान (मृत्यू:४ एप्रिल १९७९)**१९२२:मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (मृत्यू:४ सप्टेंबर २०००)**१९१२:वसंत रामकृष्ण वैद्य--कवी,कथाकार (मृत्यू:१४जानेवारी १९८०)**१९०९:श्रीपाद नारायण पेंडसे – प्रसिद्ध मराठी कथालेखक व कादंबरीकार (मृत्यू:२४ मार्च २००७)**१८९२:कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ (मृत्यू:१२ जून १९६४)**१८८२:महादेव निळकंठ सहस्रबुद्धे -- शाहिरी वाड:मयाचे अभ्यासक (मृत्यू:आक्टोबर १९६३)**१८५७:यशवंत महादेव गद्रे-- कवी (मृत्यू:५ जानेवारी १९६३)**१८५५:किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (मृत्यू:९ जुलै १९३२)**१५९२:शहाजहान – ५ वा मुघल सम्राट (मृत्यू:२२ जानेवारी १६६६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार,कलादिग्दर्शक,वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (जन्म:३ जुलै १९१४)**१९९०:रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक* *१९८२:सी.रामचंद्र – संगीतकार (जन्म:१२ जानेवारी १९१८)**१९६१:नारायण धोंडोपंत ताम्हनकर-- मराठीतील कथा लेखक (जन्म:३१ ऑगस्ट १८९३)**१९४३:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (जन्म:१ फेब्रुवारी १८६४)**१९३३:काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:४ जुलै १८७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दर्पणकार : बाळशास्त्री जांभेकर*घरातील वडीलधारी मंडळी रोज सकाळी वर्तमानपत्राची आतुरतेने वाट पाहतात. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांची सकाळ सुरूच होत नाही. एखाद्या दिवशी वर्तमानपत्र वाचण्यास मिळाले नाही तर दिवसभर काही तरी हरवल्यासारखे वाटते. मग खरोखरच हे वर्तमानपत्र कुणी आणि केव्हा सुरु केले ? याची माहिती जाणून घेण्यात सुध्दा आपण नक्कीच उत्सुक असाल. ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात आता मणिपूर ते मुंबई दरम्यान 6713 किमी यात्रेचं आयोजन, १४ जानेवारीला होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील दुर्गम भागातील 2,395 घरांना मिळाली वीज, आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट महावितरणकडून केवळ बारा दिवसात पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेड-बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीची मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षांना बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मिळविला ऐतिहासिक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 एड्स (AIDS) म्हणजे काय ? 📙 'अॅक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिन्ड्रोम' म्हणजे (AIDS) 'एड्स'. शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होत जाते व त्यामुळे आढळणारा हा लक्षणसमुच्चयरुपी रोग आहे. एका विषाणूंमुळे हा रोग होतो. असे खूप संशोधनानंतर लक्षात आले आहे. या विषाणूला नाव या रोगसदृश दिले गेले. ह्युमन इम्यूनो व्हायरस १- (HIV-1)आपल्या शरीरातील पांढर्‍या रक्तपेशींपैकी काही पेशींकडे सर्व प्रकारच्या रोगजंतूशी प्रतिकार करण्याचे काम सोपवलेले आहे. एड्सचे विषाणू शरीरात प्रवेश केल्यावर या विशिष्ट (टी-४) पेशींवरच हल्ला चढवतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमताच नष्ट होते. अगदी नेहमी आढळणाऱ्या सर्दी, पडसे, जुलाब यांसारख्या साध्या रोगांनीसुद्धा असा रुग्ण हैराण होऊ लागतो; कारण या रोगांना आळा घालण्याची यंत्रणाच नष्ट झालेली असते. वरवर पाहता साध्या दिसणाऱ्या, पण पुन:पुन्हा सतत उद्भवत राहणाऱ्या आजारांनी रुग्णाचा काही महिन्यांतच बळी घेतला जातो. याच कारणामुळे ज्या वेळी एड्सचे रुग्ण प्रथमच आढळले, तेव्हा त्यांचे निदान होऊ शकले नाही. आजार नेहमीचा, औषधे नेहमीची होती. पण रुग्णाचा प्रतिसादच नाही. ही स्थिती भल्याभल्या डॉक्टरांना बुचकळ्यात पाडत होती.वारंवार केल्या गेलेल्या रक्ताच्या तपासण्यांतून मग या व्हायरसचा प्रथम शोध लागला. शास्त्रीय पद्धतीने त्याची वाढ करण्यातही (Culture) यश मिळाले. पण मुख्य अडचण म्हणजे या व्हायरसच्या वाढीला अटकाव करेल वा त्याला नष्ट करेल, असे औषध मिळवण्यात आजवर सतत अपयशच आले आहे. एवढेच नव्हे, तर त्याच्या विरोधी खात्रीशीर व निर्धोक प्रतिबंधक लस तयार करणे अजूनही शक्य झालेले नाही.एड्सचा प्रसार शरीरसंबंधातून होतो. दुसऱ्या प्रकारचा प्रसार रक्तामार्फत होऊ शकतो. एकाचे रक्त दुसऱ्याला दिले असता जर देणाऱ्याचे रक्त या विषाणूने दूषित झाले असेल तर रक्त घेणारा रुग्ण एड्सग्रस्त होऊ शकतो. हाच प्रकार अंमली पदार्थ टोचून घेणाऱ्यांच्या सुयांमार्फतही होऊ शकतो. अर्थातच वरील सर्व प्रकारांत एकाला एड्सची बाधा झालेली असणे आवश्यक असते. एड्सच्या प्रसाराची ही पद्धत पक्की लक्षात ठेवली म्हणजे एड्सची मनातील भीती जायला हरकत नाही.कोणत्याही परिस्थितीत एड्सच्या रुग्णाबरोबर गप्पा मारून, हस्तांदोलन करून, त्याच्या घरात वावरल्याने वा एकच फर्निचर, प्रसाधनगृह, वस्तू ताटवाट्या वापरल्याने एड्सचा प्रसार होत नाही.आज साऱ्या जगाला एड्सने भयग्रस्त केले आहे. मुख्य कारण म्हणजे एड्स झाल्यावर त्यावर कसलाही खात्रीचा इलाज आज उपलब्ध नाही. त्याला प्रतिबंध म्हणजे रुग्णांशी शरीरसंबंध व रक्तसंपर्क न येऊ देणे एवढाच. एड्सची लागण झाल्याचे पहिले लक्षण रक्ततपासणीमध्येच लक्षात येऊ शकते. एलिझा व वेस्टर्न ब्लॉट या रक्ततपासणीनंतर एखाद्याला या रोगाची लागण झाली आहे वा नाही एवढेच कळते. ही रोगाची सुप्तावस्था असते. या अवस्थेत कित्येक वर्षे तशीच जाऊ शकतात. यानंतरची अवस्था म्हणजे विषाणूचे आक्रमण सर्वांगीण होऊन रोग दिसू लागण्याची (Full Blown Aids). एकदा ही अवस्था सुरू झाली की मग रुग्णाचे आयुष्य जेमतेम सहा महिने ते साठ महिने एवढेच राहते.पाश्चात्य देशात सुमारे ३० वर्षे या रोगाने धुमाकूळ घातला आहे. भारतात १९८४ साली या रोगाने पहिला रुग्ण मरण पावला. पण त्यानंतर आज या आजाराचे कित्येक रुग्ण आपल्या इथे नोंदले गेले वा मृत झाले आहेत. हिमनग जसा एक अष्टमांश पाण्यावर दिसतो, तसाच हा रोग आहे म्हणा ना. एक रुग्ण दिसतो वा सापडतो, तेव्हा किमान दहा जण सुप्तावस्थेत लागण झालेले असतात.जागतिक आरोग्य संघटना व सर्व प्रगत देश यांचे सध्याचे सर्व लक्ष या रोगाचा प्रतिबंध करणे व त्यावर औषध शोधणे यांवरच एकवटलेले आहे. एड्स प्रतिबंधासाठी अनेक औषधांचा शोध सतत चालू असून त्यांपैकी एझेडटी या लघुनावाने ओळखले जाणारे औषध सध्या भारतात उपलब्ध आहे. एड्स झालेल्या मातेच्या नवजात अर्भकापासून एड्स झाल्याचे निश्चित झालेल्या कोणत्याही रुग्णासाठी याचा वापर केल्यास आयुर्मान वाढू शकते. मात्र खात्रीलायक प्रतिबंध करणारी प्रतिबंधक लस मात्र उपलब्ध नाही. तसेच एड्स पूर्ण बरा करणारे औषधही सापडलेले नाही.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ब्राझील, रशिया,भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या गटात आणखी किती देश सदस्य झाले ?२) पृथ्वी हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ?३) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?४) गौतम बुद्धाच्या मावशीचे नाव काय होते ?५) टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) पाच - इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती २) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र ३) सत्यमेव जयते ४) गौतमी ५) यवतमाळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 भाऊसाहेब चासकर, उपक्रमशील शिक्षक व लेखक👤 जैपाल ठाकूर, गोंदिया👤 अशोक कुबडे, साहित्यिक, नांदेड👤 व्यंकटी केंद्रे, प्रा. शिक्षक, कंधार👤 गणराज गुरुपवार, नांदेड👤 नितीन उत्तरवार👤 राजकुमार बेरलीकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिसेना जनी तेचि शोधूनि पाहे।बरे पाहता गूज तेथेचि आहे॥करी घेउ जाता कदा आढळेना।जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥सरळ अर्थ - जे सहजासहजी दृष्टीस पडत नाही त्याचा शोध करून पहा. ते आहे तिथेच आहे तरी त्याला उचलून घेऊ म्हटले तर कुठे आहे ते दिसत नाही. ते तत्व, ते गौप्य चराचरात भरून राहिले आहे पण त्याचे आकलन होत नाही.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाथा अशा व्यक्तीची वाचली जाते, ऐकली जाते जी व्यक्ती असंख्य संकटाचा सामना करून स्वतः पेक्षा इतरांच्या विषयी जास्त विचार करून प्रामाणिकपणे जगत असते. पण, काही मुखातून त्याच व्यक्तीची गाथा नको त्या शब्दात निघत असते. पण,काहीही असेल तरी एखाद्या व्यक्तीची गाथा चांगले असो किंवा वाईट पण, वेळात वेळ काढून वाचली जाते, बोलली‌ जाते, व कान लावून ऐकली‌ जाते ही फार मोठी गोष्ट आहे. कारण त्या व्यक्तीचे जीवनच पूर्णपणे समर्पित असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी*नैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती.तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील चौथा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.**१९५९:लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.**१९५८:१९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.**१९५४:मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५२:ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.**१९४८:ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४:१०वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.**१९३२:सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा**१९२६:क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.**१८८१:लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.**१६४१:कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला.या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली.त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:प्रा.डॉ.विजय नरसिंग जाधव-- लेखक संपादक**१९७१:सुनील राम गोसावी-- लेखक,कवी**१९६७:जयश्री अनिल पाटील-- कवयित्री* *१९६७:श्रीमंत माने-- कार्यकारी संपादक लोकमत तथा लेखक* *१९६५:प्रा.गोविंद जाधव-- कवी**१९६४:प्रसाद कुलकर्णी - लोकप्रिय कवी, उत्तम व्याख्याते* *१९६४:मिलिंद शांताराम गांधी-- कवी, गीतकार* *१९६३:प्राचार्य डॉ.जगन्नाथ शामराव पाटील-- प्रसिद्ध लेखक**१९५५:प्राचार्य डॉ.श्रीकांत तिडके-- विदर्भातील प्रसिद्ध लेखक व वक्ते**१९४१:कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार काँग्रेसचे नेते (मृत्यू:६ ऑगस्ट १९९९)**१९४०:श्रीकांत वसंत सिनकर -- कथालेखक**१९३३:मनोहर सप्रे-- प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक* *१९३१:दिगंबर कुलकर्णी-- कथाकार कादंबरीकार* *१९२५:प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू:२७ आक्टोबर २००१)**१९२४:विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९९६)**१९२२:भालचंद्र शंकर भणगे-- लेखक (मृत्यू:२९ मार्च१९८०)**१९१४:इंदिरा संत –साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका (मृत्यू:१३ जुलै २०००)**१९०९:प्रभाकर आत्माराम पाध्ये--संपादक, साहित्यिक,सौंदर्यमीमांसक, समीक्षक(मृत्यु:२२ मार्च १९८४)**१९०५:कृष्णाजी बाबुराव मराठे -- चरित्रकार* *१८१३:सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू:१२ जानेवारी १८९७)**१८०९:लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू:६ जानेवारी १८५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:सिंधूताई सपकाळ-- सामाजिक कार्यकर्त्या,अनाथाची माय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म:१४ नोव्हेंबर १९४८)**१९९४:राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म:२७ जून १९३९)**१९६५:टी.एस.इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२६ सप्टेंबर १८८८)**१९६१:आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ ऑगस्ट १८८७)**१९१७:सखाराम कृष्ण देवधर(बापूसाहेब देवधर)--गायत्री मंत्राचे उपासक,ज्ञानेश्वरीचे अभ्यासक**१९०८:राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, संपादक (जन्म:११ नोव्हेंबर १८५१)**१९०७:गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, 'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म:२० आक्टोबर १८५५)**१७५२:गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म:३१ जुलै १७०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी; पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास देखील मनाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यापुढे सरकारशी चर्चा बंद, 20 जानेवारीला मुंबईकडे निघणारच, मनोज जरांगेंची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकणातील यावर्षीचा प्रवासही खड्ड्यातूनच; मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 31 डिसेंबर 2024 नवी डेडलाईन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका, 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईतील शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर टोलची रक्कम ठरली, तब्बल 500 रुपयांचा टोल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यामध्ये 22 जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे उत्साह साजरा केला जाईल सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केपटाऊनचं मैदान इतिहासाला जागलं, दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजनं भगदाड पाडलं, दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 55 धावांत गुंडाळला, सिराजला 6 विकेट्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 उल्कापात म्हणजे काय ? 📙 रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत.उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे.उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष.उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'कौन बनेगा करोडपती'* या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलचा अँकर कोण आहे ?२) जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते ठरले आहे ?३) १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?४) 'Why Bharat Matters' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?५) कोणाच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली ? *उत्तरे :-* १) सुपरस्टार अमिताभ बच्चन २) अबुधाबी शहर ३) डॉ. जब्बार पटेल ४) एस. जयशंकर ५) येशू ख्रिस्त*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी डिगोळे, सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्रभीम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महावाक्य तत्त्वादिके पंचीकरणे।खुणे पाविजे संतसंगे विवरणे॥द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।तया सांडूनि चंद्रमा भाविजेतो॥१५४॥सरळ अर्थ - महावाक्ये, वेदांमधील तत्वे, पंचमहाभूते या केवळ खुणा आहेत अंतिम सत्य जाणण्याच्या. त्यांचे विवरण संतांकडून करून घेणे, समजून घेणे हे महत्वाचे. द्वितीयेचा चंद्र दाखवण्यासाठी वापरलेला संकेत सोडून प्रत्यक्ष चंद्र बघणे हे महत्वाचे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोण कधी, कुठे आणि कधी भेटतील व अचानकपणे जुळतील हे सांगता येत नाही. हा एक प्रकारचा योगायोगच असतो आणि त्यात जुळलेले सर्वचजण नि:स्वार्थी असतील असेही नाही. पण त्यातील काहीजण चांगले देखील असू शकतात.त्यांनाही जवळून ओळखावे.पण आपण मात्र अशा ठिकाणी जुळून रहावे जेथे सुकल्यानंतर सुध्दा आपल्याला मायेचा आधार मिळेल ..जसे झाडात,वेल्यांमध्ये माया आणि नि:स्वार्थ भावना असते त्याप्रमाणे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतः मध्ये बदल**कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'**तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/12/savitribai-phule.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_बालिका दिन,महिला मुक्तिदिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील तिसरा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.**१९५७:हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.**१९५०:पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.**१९४७:अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.**१९२५:बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.**१४९६:लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:मधुकर बाळासाहेब जाधव-- लेखक, कवी**१९८०:सुनिता झाडे -- लेखिका,संपादिका**१९७५:प्रा.डॉ.विजय फकिरा राठोड-- कवी लेखक,व्याख्याते* *१९७१:सरिता सुवास परसोडकर-- कवयित्री**१९७१:अशोक गणपतराव पाठक-- कवी**१९६५:धनंजय माधवराव मुळे-- लेखक,कवी**१९६२:डॉ.मेघा उज्जैनकर-- लेखिका**१९६१:राजेंद्र खेर - सुप्रसिद्ध कादंबरीकार**१९६०:डॉ.वृषाली किन्हाळकर -- लेखिका* *१९५८:दिगंबर पवार-- कवी**१९५६:शिरीष श्रीकृष्ण गंधे-- कवी,लेखक,चित्रकार,व्याख्याते,अभिनेते**१९५२:श्रीराम वसंतराव ढवळीकर-- लेखक, पत्रकार**१९५१:अशोक निळकंठ सोनवणे-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४७:मनोहर गणपत भारंबे-- लेखक**१९४६:प्रा.डॉ.दीनानाथ सिद्धराम फुलवाडकर-- कवी,कथाकार,संपादक (मृत्यू:१४ नोव्हेंबर २०२१)**१९३७:सिंधू सदाशिव डांगे--संस्कृत संशोधक, लेखिका,संपादक**१९३१:य.दि.फडके – लेखक,विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू:११ जानेवारी २००८)**१९२१:चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू:६ जुलै १९९७)**१८८३:क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:८ आक्टोबर १९६७)**१८५३:कृष्णाजी नारायण आठल्ये--संपादक, चित्रकार,टीकाकार,निबंधकार,कवी(मृत्यु:२९ नोव्हेंबर १९२६)**_१८३१:सावित्रीबाई फुले – भारतीय शिक्षिका,कवयित्री व समाजसुधारक त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.(मृत्यू:१० मार्च १८९७)_* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:डॉ.चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी-- भारतीय न्यायाधीश,लेखक(जन्म:२० नोव्हेंबर १९२७)**२०१५:सरिता मंगेश पदकी--कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार, नाटककार आणि अनुवादिका(जन्म:१३ डिसेंबर १९२८)**२००२:सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म:२५ सप्टेंबर १९२०)**२०००:डॉ.सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म:२६ डिसेंबर १९१४)**१९९८:प्रा.केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म:८ फेब्रुवारी १९०९)**१९९४:अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक(जन्म:२५ जून १९१९)**१९७५:ललितनारायण मिश्रा--बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.(जन्म:२ फेब्रुवारी १९२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मी सावित्री बोलतेय....!*....!*नमस्कार .....मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठकीत हिट अँड रनचा कायदा लागू न करण्याचा झाला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा कारवाई करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा-कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत, मग समितीचा उपयोग काय? जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *1 जानेवारी उलटली तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाबाबत हालचाल नाही, किसान सभेचा आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अंबिका मसाल्याच्या प्रवर्तक कमल परदेशी यांचं 63 व्या वर्षी निधन, शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या उद्योग समूहाच्या चेअरमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अजिंक्य रहाणेला मिळाली रणजी साठी मुंबई कर्णधारपदाची जबाबदारी, नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच मिळालं सर्वात मोठ गिफ्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ओझोन म्हणजे काय ?* 📙 या दशकातला बहुचर्चित वायू म्हणजे ओझोन. प्राणवायूमध्ये ऑक्सिजनच्या दोन अणूंनी रेणू बनतो. तर ओझोनच्या तीन अणूंनी. पण या छोट्याशा फरकाने दोन्हींच्या गुणांत खूपच फरक पडतो. ओझोन हा फिक्कट निळा, तीक्ष्ण वास असलेला वायू आहे. विजेची मोटार चालू करताना व विजेची बटणे सतत उघडझाप केल्यास एक विशिष्ट वास जाणवतो, तो ओझोनचा. ओझोन वातावरणाच्या अगदी वरच्या थरात म्हणजे वीस ते तीस किलोमीटरमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. येथे त्याचे प्रमाण वातावरणातील दर दहा लाख अन्य रेणूंमध्ये दहा रेणू (10 parts per million) इतके आढळते. याचा उपयोग अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचू नयेत म्हणून होतो. याउलट हाच ओझोन जेव्हा वातावरणाच्या खालच्या थरात येतो, तेव्हा तो त्रासदायक बनतो. याच्या सान्निध्याने अनेक कृत्रिम गोष्टी म्हणजे रबर, प्लॅस्टिक, रसायने यांचे उन्हात विघटन होऊ लागते. धूळ, धूर व ओझोन यांच्या मिश्रणाने स्माॅग तयार व्हायला मदत होते. असेही एक मत आहे. ओझोनचा व्यावहारिक उपयोग पाणी शुद्धीकरण व ब्लीचिंगसाठी केला जातो. औद्योगिक वापरासाठी ओझोन तयार करण्याची पद्धत म्हणजे बंदिस्त वातावरणात ठरावीक दाबाचा हवेमध्ये विद्युत ठिणग्या सतत पाडल्या जातात. या हवेत ओझोनचे प्रमाण वाढत जाते व प्राणवायूचे कमी होत जाते. वातावरणात ज्यावेळी प्रचंड विजांचा कडकडाट नैसर्गिकरित्या होतो, तेव्हाही ओझोन तयार होतोच.१९७० सालच्या आसपास ओझोनचा थर अंटार्क्टिकांवरती काही भागांत नष्ट झाला असून तेथे अतिनील किरणांचे प्राबल्य वाढले असल्याचे लक्षात आले. याचा शोध घेताना मानवनिर्मित क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) च्या द्रव्याचा हा परिणाम असल्याचे लक्षात आले. हा एक तर्क आहे. हे सीएससीचे निरुपद्रवी कण जेव्हा हळूहळू ओझोनच्या थरातील ओझोनबरोबर संयोग पावतात, तेव्हा मोठ्या प्रमाणातील विघटनाला सुरुवात होते. यामुळे अतिनील किरणांचा पृथ्वीवर मारा वाढल्यास कातडीचे कर्करोग वाढतील व उष्णता वाढून बर्फ वितळून पाण्याची जागतिक पातळी वाढेल, अशी भीती व्यक्त केली गेली. या सर्वांचा परिणाम म्हणून ओझोन वायू या दशकात चर्चेचा केंद्रबिंदुच बनला आहे. सीएफसीचा वापर सर्व एरोसोलमध्ये व शीतीकरणासाठी केला जातो. याचे उत्पादन बंद करून त्याचे पर्याय सर्वांनी वापरावेत, या स्वरूपाचा सर्व देशांनी एक करार मॉन्ट्रियल येथे केला आहे. टप्प्याटप्प्याने उत्पादन कमी करणे व पर्यायी वापर सुरू करणे हे त्यात अपेक्षित आहे.काही शास्त्रज्ञांच्या मते ओझोनचा थराची थर नष्ट होणे यामध्ये मानव व प्राणिजातीला अणुयुद्धाएवढाच धोका उद्भवतो. काहींचे मत याला प्रतिकूल आहे. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, ती म्हणजे ओझोनचा थर आहे तसाच टिकणे, हे आपल्यालाच काय, पण पृथ्वीवरच्या सर्वच सजीव सृष्टीला आवश्यक आहे.सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"शिक्षक हा विद्यार्थ्याचा दुसरा पालकच असतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या आद्य शिक्षिका कोण ?२) *'बालिका दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?३) 'स्त्री मुक्ती दिन' केव्हा साजरा केला जातो ?४) जालना ते मुंबई दरम्यान धावणारी महाराष्ट्रातील ही कितवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे ?५) उत्तरप्रदेश राज्यात लोकसभा सदस्यसंख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले २) ३ जानेवारी ३) ३ जानेवारी ४) ६ वी ५) ८०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. वृषाली किन्हाळकर, साहित्यिक, नांदेड👤 ज्ञानेश्वर विजागत, शिक्षक👤 वर्षा भोळे, नांदेड👤 शुभांगी परळकर, नांदेड👤 संदीप जाधव वसूरकर👤 माधव पवार👤 योगेश पाटील👤 उत्तम जोंधळे👤 राजेश पिकले👤 डॉ. प्रशांत बोड्डेवाड, येवती👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।समाधान कांही नव्हे तानमाने॥नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥सरळ अर्थ - केवळ भौतिक ज्ञान असण्याने किंवा केवळ अध्यात्मिक ज्ञानाची जाणीव असल्याने आपल्याला समाधान मिळत नाही. संगीत ऐकण्याने, कर्मयोग पालन करण्याने किंवा संन्यस्त राहण्यानेही जे समाधान मिळत नाही ते सज्जनांच्या संगतीत असण्याने मिळते.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैसे असोत किंवा वस्तू कितीही लपवून ठेवण्याचा जरी प्रयत्न केले तरी ते जास्त दिवस लपून राहत नाही. त्यांची एक ना एक दिवस गरज पडत असते. तसंच कोणाविषयी कितीही वाईट बोलले तरी ते बोललेले शब्द फार काळ लपून राहत नाही. भलेही त्यावेळी एखाद्याच्या डोळ्यावर जरी पट्टी बांधण्याचा प्रयत्न केले असेल तरी अनेकांच्या डोळ्यावर बांधून असलेली पट्टी बिना आधाराने ही आपोआप सुटत असते म्हणून कोणाच्याही विषयी नको ते बोलून स्वतःचा समाधान करून घेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्‍वातंत्र्य-पारतंत्र्य*अमेरिकेत एकेकाळी गुलामगिरीची प्रचलित होती. निग्रो लोकांची शेळ्या मेंढ्यांप्रमाणे खरेदीविक्री होत असे. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍यामुळे या प्रथेचा अंत झाला व निग्रो लोकांची गुलामीतून सुटका झाली. मुक्त झाल्‍यानंतर निग्रो लोकांनी रोजगाराचा शोध सुरु केला. एक वृद्ध, अशक्‍त वृद्ध निग्रो माणूस कामाच्‍या शोधात भटकत होता. पण त्‍याला काम काही मिळाले नाही. फिरून फिरून तो थकला व एके जागी बसला. तेथे त्‍याची भेट एका मालक जातीच्‍या ओळखीच्‍या माणसाबरोबर झाली. वृद्ध निग्रोची ती अवस्‍था पाहून तो माणूस म्‍हणाला,''तुझे हे होणारे हाल मला पाहवत नाहीत. तू कशाने इतका त्रस्‍त झाला आहे'' वृद्ध म्‍हणाला,''मला काम मिळत नाही'' तो माणूस म्‍हणाला,''काही दिवसांपूर्वी तर तुझी अवस्‍था चांगली होती.'' निग्रो म्‍हणाला,'' त्‍यावेळी मला बराच आराम होता. माझा मालक खूप दयाळू माणूस होता. मला तो फारसे काम लावत नसे. माझ्यावर अत्‍याचार करत नसे. कठीण कामे करण्‍यास लावित नसे.'' सहानुभूती दाखवून तो माणूस म्‍हणाला,'' अरे मित्रा मग तर ते गुलामीचे दिवसच चांगले म्‍हणायला हवे की, ही मुक्ती काही तुला मानवली नाहीये असेच दिसून येतेय. ती तुझ्या कोणत्‍याच कामी येत नाहीये.'' हे ऐकताच बसलेला तो निग्रो माणूस ताडकन उठून उभा राहिला व उंच स्‍वरात ओरडून बोलला,''मालक, गुलामगिरी स्‍वीकारण्‍यापेक्षा हे मुक्त जीवन हजारपट चांगले आहे. कारण आमच्‍या जीवनावर केवळ आमचाच अधिकार आहे; ते सावरण्‍यासाठी आम्ही स्‍वतंत्र आहोत. मालकाकडून पिंज-यात मिळणा-या पेरूच्‍या फोडी खाण्‍यापेक्षा उंच आकाशात उपाशीपोटी भरारी घेणे पोपटाला खूप आवडते हे लक्षात आहे ना.''*तात्‍पर्य :- मनुष्‍याच्‍या सर्वांगीण विकासासाठी स्‍वातंत्र्य ही पहिली अट आहे, पारतंत्र्य पतनाचे तर मुक्ती प्रगतीचे द्वार आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील दुसरा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.**२०००:पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.**१९९८:डॉ.सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी.लिट.पदवी प्रदान**१९८९:मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या**१९५४:राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली.**१९४५:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.**१९३६:मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९०५:मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.**१८८५:पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.**१८८१:लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.**१७५७:प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:माणिक प्रल्हादबुवा गिरी-- लेखक* *१९८४:डॉ.चंदू हरी पवार -- कवी* *१९८०:गजानन नत्थुजी कावडे-- कवी* *१९७५:डॉ.देवेंद्र शेषराव तातोडे-- कवी लेखक* *१९६४:नंदू सामंत -- कवी* *१९६४:प्रा.राम कदम-- कथाकार**१९६२:प्रा.मधुकर बळीरामजी वडोदे -- लेखक,कवी* *१९६०:रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९९८)**१९५९:किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि माजी खासदार**१९५७:उर्मिला देशपांडे-- कथा कादंबरी नाट्य लेखन* *१९५६:प्रा.डॉ.दीपक गोपाळराव कासराळीकर-- समीक्षक* *१९५०:प्रा.श्याम विद्याधरराव पाठक-- कवी, लेखक* *१९४९:निरंजन कचरुजी पाटील -- लेखक, कवी,संपादक* *१९३२:हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू:२० ऑगस्ट १९८५)**१९३१:दिगंबर तुकारामजी होले -- लेखक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९२०:आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू:६ एप्रिल १९९२)**१९०१:महादेव मल्हार जोशी-- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक(मृत्यू:१९७८)**१८९२:गणेश पांडुरंग परांजपे-- वैद्यकशास्त्र विषयक ग्रंथाचे कर्ते (मृत्यू:२६ फेब्रुवारी १९७३)**१८८६:बाळकृष्ण वामन सावर्डेकर-- लेखक (मृत्यू:१४ जानेवारी १९४६)**१८७६:भा.वा.भट--इतिहास अभ्यासक (मृत्यु:२७ डिसेंबर १९५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्रा.डॉ.भालचंद्र रामचंद्र अंधारे--प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ,संस्थापक संचालक इतिहास संशोधन केंद्र नागपूर,विदर्भ संशोधन महर्षी, जीवन साधना,विदर्भ भूषण पुरस्कारांनी सन्मानित (जन्म:७ सप्टेंबर १९३५)**२०१६:अर्धेन्दु भूषण वर्धन-- भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वतंत्र सेनानी(जन्म:२४ सप्टेंबर १९२४)**२०१३:डाॅ.विनय वाईकर-- गझल या विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे लेखक ,भूलतज्ज्ञ (जन्म:१९४१)**२००२:अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: १९४७)**१९९९:विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या* *१९८९:सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार,लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (जन्म:१२ एप्रिल १९५४)**१९८७:हरे कृष्ण महाताब --भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते,ओडिशाचे माजी मुख्यमंत्री(जन्म:२१ नोव्हेंबर १८९९)**१९४४:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म:२३ एप्रिल १८७३)**१९३५:मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक,टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते,वकील (जन्म:१९ ऑगस्ट १८८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना.............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे 12 जानेवारी रोजी PM मोदींच्या हस्ते उद्घाटन ? राज्य सरकारच्या हालचाली सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने; दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण, AIIMS मध्ये कर्करोग रुग्णांसाठी खास उपचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO च्या XSPECT ची अवकाशात भरारी; मोहिमेद्वारे कृष्णविवरांचं रहस्य उकलण्याचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नव्या वर्षाचे स्वागत सुरु असतानाच जपान शक्तीशाली भूकंपाने हादरला; पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जीएसटीचे विक्रमी संकलन; 9 महिन्यात 15 लाख कोटींचा कर जमा, सरकारकडून आकडेवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आजारानंतर केस का गळतात ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने याद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटिन, मेलानिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, ई, प्रथिने, स्निग्धांश यामुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते ; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्याची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिअोरकाॅर या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे वाढले तरी पटकन उपटले जातात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीन येथे तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ?२) राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत कोणती यात्रा पूर्ण केली ?३) जगातील सर्वात मोठे ध्यानकेंद्र कोठे आहे ?४) भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी -२० शिखर परिषदेत कोणत्या देशाचा समावेश करून जी -२१ असा विस्तार करण्यात आला ?५) देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळगाव कोणते ?*उत्तरे :-* १) कॅप्टन शिवा चौहान, भारत २) भारत जोडो यात्रा ( ७ डिसेंबर २०२३ ते ३० जानेवारी २०२३ ) ३) वाराणसी ( स्वरवेद महामंदिर, २० हजार लोक एकत्र ध्यान करण्याची क्षमता ) ४) दक्षिण आफ्रिका ५) पापळ, अमरावती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद👤 मो. विखार, शिक्षक, धर्माबाद👤 कविता जोशी, शिक्षिका👤 साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती👤 महेंद्रकुमार पद्मावार👤 मोगरे शंकर👤 श्रीकांत काटेलवार👤 आनंदराव धोंड👤 रवी खांडरे👤 अक्षय घाटे👤 सचिन कौटवाड👤 संजय पांचाळ👤 संजय फडसे👤 महेंद्रकुमार पद्मावार👤 प्रदीप ढगे👤 नरसिंग पेंटम👤 शहाजी पालवे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहूतांपरी कुसरी तत्त्वझाडा।परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥मना सार साचार ते वेगळे रे।समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥सरळ अर्थ - किती तरी गोष्टींविषयी अहमहमिकेने, अलंकारिक भाषेमध्ये बोलता येत असले तरी त्यातले सार काय आहे त्याचा आपल्याला मनात निश्चय झालेला असला पाहिजे. असे हे जे निश्चित झालेले सारतत्व असते ते इतर सगळ्या गोष्टींहून आगळेवेगळेच असते.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथून स्वत:च्या ऐवजी इतरांचे भले होत असेल आणि मनाला समाधान मिळत असेल तर असे एखादे चांगले कार्य करण्याचा एकतरी संकल्प करावे. व आपल्यात असलेले वाईट विचार, वाईट सवयी, व्यर्थ गोष्टीचा त्याग करण्याचा प्रयत्न करावे. कारण चांगले कार्य कधीच वाईट नसतात तर उशीरा का होईना शेवटी त्याच्यामुळे सर्व चांगलेच झालेले बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~