✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 डिसेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2024/12/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧿 *_अल्पसंख्याक हक्क दिन_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••🧿 *_आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन_* 🧿••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ३५३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••*२००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.**१९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.**१९९२: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि प्रसिद्ध उद्योगपती नवलमल फिरोदिया आणि बिर्ला उद्योग समूहातील उद्योगपती आदित्य बिर्ला यांना फाय फौंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर**१९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७८: डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३५: श्रीलंकेत ’लंका सम समाज पार्टी’ची स्थापना* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: स्वालिया नजरुद्दीन सिखलगार -- पत्रकार, लेखिका* *१९८६: ऋचा चढ्ढा -- भारतीय अभिनेत्री, निर्माती* *१९७६: राजेश काटोले -- वऱ्हाडी स्तंभलेखक, कवी**१९७६: संदीप देशमुख गणोजेकर -- कवी* *१९७५: दादाराव डोल्हारकर -- कवी, लेखक तथा मुख्याधिकारी**१९७२: श्रेया राजवाडे -- लेखिका**१९७१: बरखा दत्त-- भारतीय दूरचित्रवाणी पत्रकार आणि लेखिका* *१९६९: डॉ. चिदानंद आप्पासाहेब फाळके -- कवी, लेखक* *१९६३: ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता**१९६३: प्रा. डॉ. पुष्पा गावित -- लेखिका**१९६२: हेमंत नारायण जोशी -- कवी* *१९६२: संजय नार्वेकर -- भारतीय अभिनेता**१९६१: लालचंद सीताराम राजपूत -- भारतीय क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू* *१९५९: रमेश पांडुरंग पुंडलिक -- लेखक, कवी**१९५९: वंदना भागवत -- लेखिका, अनुवादक**१९५७: संजीवनी जयंत तोफखाने -- कवयित्री, लेखिका* *१९५५: मंगल प्रभात लोढा -- मंत्री तथा प्रसिद्ध व्यावसायिक**१९५४:विजय वसंत तरवडे -- लेखक, संपादक**१९५४: बाबाराव तुराळे -- कवी**१९५१: दिपाली शिरीष राणे -- कवयित्री**१९५१:विकास मंगेश गायतोंडे -- संकल्पनकार व जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ**१९४८: प्रा.प्रवीण हेमचंद्र वैद्य -- प्रसिद्ध लेखक**१९४०: कृष्णा कल्ले -- मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमधील भारतीय पार्श्वगायिका (मृत्यू: १५ मार्च २०१५ )**१९३५: प्रा. वामन सदाशिव पात्रीकर -- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार (मृत्यू: १९ एप्रिल २००३ )**१९३१: सदाशिव शिवराम भावे -- समीक्षक (मृत्यु: ३ ऑक्टोबर १९८६ )**१९३०: रमेश अच्युत तेंडुलकर -- प्रसिद्ध कवी, लेखक आणि समीक्षक (मृत्यू: १९ मे १९९९ )**१९२७: पंडित किसनराव पाडळकर -- लेखक, संपादक (मृत्यू: १६ जुलै १९९८ )* *१९२६: सुरेश हळदणकर --भारतीय शास्त्रीय गायक, अभिनेता (मृत्यू: १८ जानेवारी २००० )**१९२६: प्रा. डॉ. वसंत अनंत शहाणे -- लेखक**१९२३: भास्करराव आनंदराव पांढरीपांडे -- कवी (मृत्यू: ३ मे १९९३ )**१९२२: सदानंद भटकळ -- लेखक, कवी* *१९२०: माधव कृष्ण पारधी -- ज्येष्ठ पत्रकार, कवी, लेखक, संपादक* *१९१८: वासुदेव यशवंत गाडगीळ -- नाट्य चित्र समीक्षक लेखक (मृत्यू: १७ जुलै २००१ )**१८९०:ई.एच.आर्मस्ट्राँग – एफ.एम.रेडिओचे संशोधक (मृत्यू:३१ जानेवारी १९५४)**१८८७: भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर’ (मृत्यू: १० जुलै १९७१ )**१८७८: जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च १९५३ )**१८५६: सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४० )**१६२०: हेन्रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (मृत्यू: २० जून १६६८ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४: विजय हजारे – क्रिकेटपटू (जन्म: ११ मार्च १९१५ )**२०००: मुरलीधर गोपाळ तथा मु.गो.गुळवणी – इतिहास संशोधक,वैदिक संस्कृतीचे अभ्यासक(जन्म: ६ फेब्रुवारी १९२५ )* *१९९५: कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार**१९९३: राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक. सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.* *१९८०: अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (जन्म: २० फेब्रुवारी १९०४ )**१८२९: जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (जन्म: १ ऑगस्ट १७४४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - कुत्र्याचे पिल्लू*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मागील तीन वर्षात भारताचा GDP 8.3 टक्के अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती, बुधवारी अर्ज भरण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, ''माझा कदाचित यात शेवटही होऊ शकतो''*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी नवीन संकेतस्थळाची स्थापना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संकेतस्थळाचे अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गाबा कसोटीत आकाशदीपचा 'तो' चौकार अन् टीम इंडियावरील फॉलोऑनचा धोका टळला, राहुल-जडेजाने वाचवली टीम इंडियाची लाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *पोटात कावळे का ओरडतात ?* 📒 'पोटात कावळे ओरडतात' ही अलंकारिक भाषा झाली. खरोखरच पोटात कोणतेही पक्षी वा प्राणी जाऊन बसत नाहीत. पोटात होणाऱ्या आवाजाला उद्देशून ही भाषा वापरली गेली आहे. भूक लागली म्हणजेच पोटात कावळे ओरडतात किंवा हे आवाज होतात हेही खरं नाही. वास्तविक हे आवाज नेहमीच होत असतात.आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत पसरलेली एक लांबलचक पोकळ नळीच असते. तोंडातल्या घासावर दात आणि लाळ यांचा प्रभाव पडला की त्याचा एक लगदा तयार होतो. हा लगदा मग त्या नळीतून पुढे पुढे सरकू लागतो; पण तसं तो स्वतःच्या जीवावर करू शकत नाही. त्यासाठी त्याला तोंडातून अन्ननलिकेच्या मार्गानं जठरात उतरावं लागतं. तिथं त्याचं पचन होऊन तो आणखी पातळ होतो. तिथून तो मग आतड्यांच्या आणखी अरुंद नळीत उतरतो. या अरुंद नळ्यांमधला त्याचा प्रवास सुकर होतो. कारण त्या नळ्याही त्या प्रवासाला मदत करत असतात. आपल्या पायजम्याच्या नाड्यात एखादी पिन जेव्हा पुढे सरकवायची असते तेव्हा आपण ती पिन जिथे आहे तिथे दाब देऊन तो भाग आकसून घेतो. त्याच्या पुढचा भाग थोडासा पसरत असल्याने ती पुढे सरकते. तशी ती पुढे गेली की आता ती जिथे पोहोचली असेल त्या भागावर दाब देऊन तो आकसून घेतो.पचनसंस्थेच्या नळ्यांमध्येही अशीच हालचाल होत असते. त्यासाठी त्या नळ्यांशी जोडलेले स्नायू आलटून पालटून आकसतात आणि प्रसरण पावतात. स्नायू आकसले की त्या नळीला चिमटा बसतो. तिथे असलेल्या लगद्यावर दाब पडतो. नळीच्या पुढच्या भागाचं त्याचवेळी प्रसरण झालेलं असल्यामुळे सहाजिकच तो लगदा पुढे त्या भागात ढकलला जातो तोवर तो भाग अाकसतो. अशा रीतीने त्या नळीतून एखादी लहर दौडत गेल्यासारखी होते. तो लगदा पुढे पुढे सरकत राहतो.पचनसंस्थेच्या या नळ्यांची ही हालचाल सतत होत असते. हृदयाची जशी सतत होते तशीच. हृदयाच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटी हृदयाची धडधड होते. त्याचा ठोका पडतो. त्या ठोक्याचा आवाज आपण स्टेथोस्कोपमधून ऐकू शकतो. आतड्याच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटीही असाच आवाज होतो. जेव्हा त्या नळ्यांमध्ये अन्नाचा गोळा असतो तेव्हा तो आवाज त्या लगद्यामध्ये जिरतो. तो घुमत नाही; पण जेव्हा त्या नळ्या मोकळ्या असतात तेव्हा तो शोषुन घेणे शक्य होत नाही. उलट तो घुमतो. मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. कदाचित आपल्याला पोषणाची गरज आहे, हे सांगण्यासाठी मेंदू त्या नळ्यांशी जोडलेल्या स्नायूंना अधिकच जोरानं आकुंचन प्रसरण करण्याचा आदेश देत असावा. त्यामुळेही तो आवाज मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरू होते.डॉक्टर बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*EMI - Equated Monthly Installment*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पराभव माणसाला खूप काही शिकवतो. म्हणजे माणूस स्वतःला ओळखू शकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच निधन झालेले झाकीर हुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?२) अणु ऊर्जेवर चालणारी भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय ?३) 'जातीसंस्थेचे उच्चाटन' या ग्रंथाचे लेखक कोण ?४) 'विस्मय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते ? *उत्तरे :-* १) वादन ( तबलावादक ) २) अप्सरा ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ४) आश्चर्य, नवल ५) चंदीगड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रवी येमेवार, धर्माबाद👤 उदय राज कोकरे👤 जनार्दन नेउंगरे👤 महेश जोगदंड👤 नितीन वंजे, लेखक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काखे पान अंगणीं उभें उगें । भोजन मागें रामनाम ॥१॥ आणिक नाहीं मज चाड । रामनाम गोड जेऊं घाला ॥२॥ आनरस सेवितां मंद पडिलों । तुझेंचि नामेंम रुचीस आलों ॥३॥ इच्छा भोजनीं तूं एक दाता । नामा विनवी पंढरीनाथा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाळ लहान असतो तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज सुद्धा वेगळा असतो. तसेच त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या बोलण्यात, विचारात,हसण्यात सुद्धा बदल झालेला बघायला मिळत असतो.कारण दिवसेंदिवस त्याच्यात परिवर्तन होत असते. म्हणून योग्य तो परिवर्तन होत असेल तर त्याचे कौतुक करावे व त्याच्यात वेगळ्या प्रकारचे बदल आढळून आल्यास त्याची मनस्थिती बघून समजावून सांगणे गरजेचे आहे कारण त्या वयापेक्षा आपले अनुभव व मार्गदर्शन महत्वाचे असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रेम ........!*एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, 'अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.' दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं. आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, 'आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?' त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, 'ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?' तो तरुण म्हणाला, 'आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.' यावर आई म्हणाली, 'मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?' वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऐकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.तात्पर्य- स्वतःपालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment