✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 डिसेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15QRYf8jXE/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔴 *_ या वर्षातील ३६६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.**१९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.**१९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.**१९४४: दुसरे महायुद्ध- हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.**१८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.**१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७३: धनाजी शिवराम माळी -- लेखक**१९६८: डॉ. अनिल शंकरराव पावशेकर -- लेखक**१९६५: लक्ष्मण शिवरामकृष्णन --" शिवा " आणि एलएस म्हणून प्रसिद्ध,माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक**१९६१: सुरेश पाटील -- लेखक* *१९५२: प्राचार्य डॉ. केशव मधुकरराव भांडारकर -- लेखक, शिक्षण तज्ज्ञ* *१९४९: देविदास तुळशीराम खडताळे -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४८: डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२ )**१९४३:सर बेन किंग्सले -- महात्मा गांधीजीची भूमिका अजरामर करणारे इंग्लिश अभिनेता**१९४०: मन्साराम वारलुजी दहिवले -- लेखक**१९२३:अरविंद महेश्वर ताटके -- चरित्रलेखक (मृत्यू: २४ जानेवारी २०१० )**१९१६: बालशंकर देवराव देशपांडे -- साहित्यकार, संपादक**१९१६: मनोहर विनायक गोखले -- लेखक* *१९०८: नरहर (बाबूराव) विष्णु जोशी -- महाराष्ट्रातील एक संगीतज्ञ व प्रसिद्ध विधिज्ञ.(मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४ )**१९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पद्मविभूषण (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२ )**१९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर -- संगिततज्ञ,लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४ )**१८९०: पुरुषोत्तम रामचंद्र लेले -- रंगभूमीचे व्यासंगी अभ्यासक,लेखक, स्तंभलेखक (मृत्यू: ३१ मे १९६५ )**१८८७: विष्णू केशव पाळेकर -- मराठी तत्त्वचिंतक आणि विचारवंत लेखक,त्यांचे काही लिखाण ’अप्रबुद्ध’ या टोपणनावाखाली केलेले आहे (मृत्यू: ९ जुलै १९६७ )**१८७१: गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक,बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४ )**१८४५: जनार्दन बाळाजी मोडक --मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक (मृत्यू: १९ मार्च १८९२ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: कादर खान --- हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते (जन्म: १८ डिसेंबर १९३७ )**२०११: वंदना विटणकर -- मराठी कवयित्री, गीतकार,बालसाहित्यकार,नाटककार (जन्म: १९४१ )**२००५: प्रा. दि. य. देशपांडे -- तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, प्रसिद्ध लेखक यांच्या मराठी लेखनापैकी पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानासंबंधी जास्त अचूक माहिती देणारे लेखन (जन्म: २४ जुलै १९१७ )* *१९९७: छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे) -- रंगभूमीवरील नामवंत गायक नट (जन्म: १० मार्च १९१८ )**१९८६: राजनारायण –माजी केंद्रीय आरोग्य मंत्री (जन्म: १९१७ )**१९२६: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••31 डिसेंबर अर्थात वर्षातील शेवटचा दिवस त्यानिमित्ताने सर्वचजण पार्टी करण्याच्या मूड मध्ये असतात. अशीच एक लघुकथा*थर्टी फर्स्ट ची पार्टी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अभिवादन दिनानिमित्त विजयस्तंभ स्थळी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम, विजयस्तंभास फुलांची सजावट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *MHT-CET परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, 15 फेब्रुवारी पर्यंत भरता येणार अर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेतकरी संघटना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार - अंबादास हांडे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *श्याम खामकर यांना भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान, भौगोलिक बंधनात न अडकता कवीने व्यक्त होणे गरजेचे - भारत सासणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाजपकडून अकोला जिल्हा परिषदेतील 11 नेत्यांना थेट घरचा रस्ता, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र पुंडकर यांचेही निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव, रोहितसेना WTC फायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मधमाशी चावल्यावर काय होते ?*📙डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या ओढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BHIM - Bharat Interface for Money*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी माणूस तो म्हणवला जातो जो आपल्यावर इतरांनी फेकलेल्या दगडापासून पायाबांधणी करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते ?३) भारतीय रिझर्व्ह बँकेचे १५ वे गव्हर्नर कोण होते ?४) भारताचे २२ वे केंद्रीय अर्थमंत्री कोण होते ?५) २००४ ते २०१४ या काळात भारताचे १३ वे पंतप्रधान कोण होते ? *उत्तरे :-* १) डॉ. मनमोहन सिंग २) डॉ. मनमोहन सिंग ३) डॉ. मनमोहन सिंग ( १९८२ ते १९८५ ) ४) डॉ. मनमोहन सिंग ( १९९१ ते १९९६ ) ५) डॉ. मनमोहन सिंग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 धनाजी माळी, साहित्यिक👤 शिवाजी बी. खुडे, शिक्षक👤 करण यादव👤 मारोती बोलेवाड👤 रेहान खान👤 निलेश धावडे👤 ताहेर पठाण लतीफ खान👤 किरण अबुलकोड👤 अमोल बुरुंगुळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काया कर पैं फुटों नेदी । टाळ विंडी वाहिन खांदीं ॥१॥ तूं बा माझा तूं बा माझा । तूं बा माझा केशिराजा ॥२॥ आळवणीच तूं बा वाचे । तेणें छंदें पेंधा नाचे ॥३॥ तूं बा माझा मी दास तुझा । विनवितो नामा केशिराजा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी एक सेंकद सुद्धा लागत नाही.मात्र त्याच व्यक्तीचे कार्य, तळमळ, संघर्ष, प्रयत्न आणि आपुलकी जाणून त्याचा सन्मान करण्यासाठी वेळ मात्र कधीच वेळ मिळत नसतो.नको त्याचा सन्मान होतो, जो सन्मानाला पात्रही नसतो अशा व्यक्तीचा मात्र सन्मान होत असते.असे प्रसंग बघायला मिळत असतात. ही आजची वास्तविकता आहे. एखाद्या व्यक्तीचा अपमान करताना भलेही काही वाटत नसेल पण, त्याने जीवनात स्वतः पेक्षा इतरांच्या भल्यासाठी काय केले आहे ते मोलाचे योगदान जाणून घेणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *महापुरुष*आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट अशी की, आपले म्हणणे दुसऱ्याला न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला, महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे. मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसऱ्या दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ? पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय, पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड आहे? आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला, विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ? हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस. दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल. हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा निश्चय केला.*नवीन वर्षात आपण ही खांबाला धरून राहू नका ........*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment