✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 डिसेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/184dgNUG5N/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛞 *_ या वर्षातील ३६३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛞 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛞•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: अहिंसेच्या मार्गाने जगात शांतता प्रस्थापित करण्याचे असामान्य कार्य केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना सहस्त्रक शांतता पुरस्कार जाहीर**१९०३: मोटार चालविण्यासाठी चालक परवाना इंग्लंडमध्ये आवश्यक ठरविण्यात आला त्यानंतर इतर देशांनी ही पद्धत अवलंबली* *१८९५: ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.**१८८५: मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना**१८४६: आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.**१८३६: स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६१२: गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.* 🛞 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: संजय ज. गावंडे -- कवी**१९८२: कुंदा बच्छाव -शिंदे -- लेखिका* *१९८२: वैभव दिलीप धनावडे -- कवी, लेखक**१९७९: प्रशांत मंगरु भंडारे -- कवी* *१९७५: राजेश लक्ष्मण व-हाडे -- लेखक* *१९६९: लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स -- ख्यातनाम संगणक अभियंते**१९६२: प्रशांत असनारे -- प्रसिद्ध कवी* *१९६०: दयानंद घोटकर -- पाश्वगायक, संगीतकार, लेखक, कवी दिग्दर्शक अभिनेता* *१९६०: प्राचार्य दीपा क्षीरसागर -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, संपादिका* *१९५२: अरुण जेटली – माजी केंद्रीय मंत्री व वकील (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१९ )**१९४८: वि. ग. सातपुते -- भावकवी, व्याख्याते, लेखक* *१९४८: डॉ. चंद्रशेखर चिंगरे -- कथाकार, कादंबरीकार, नाटककार, अनुवादक**१९४६: गोरख शर्मा -- भारतीय गिटार वादक (मृत्यू: २६ जानेवारी २०१८ )**१९४५: वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू: १ जून २००१ )**१९३७: रतन नवल टाटा -- भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष (मृत्यू: ९ ऑक्टोबर २०२४ )**१९३६: प्रा. वामन सदाशिव पात्रीकर -- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार (मृत्यू: १९ एप्रिल २००३ )**१९३४: बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले -- मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक (मृत्यू: ३० जुलै २०१२ )**१९३२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२ )**१९३१: देवीदास तुकाराम बागूल -- लेखक, छायाचित्रकार, कथाकार**१९२६: हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२ )**१९१८: पंडित निखिल ज्योती घोष -- भारतीय संगीतकार, शिक्षक आणि लेखक (मृत्यू: ३ मार्च १९९५ )**१९११: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक (मृत्यू: १६ मे १९९४ )**१९०३: पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर -- ख्यातनाम मराठी शाहीर व महाराष्ट्रातील शाहिरीकलेचा इतिहास लिहिणारे इतिहासकार.(मृत्यू: मार्च १९८८ )**१८९९: उधम सिंग-- भारतीय क्रांतिकारक (मृत्यू: ३१ जुलै १९४० )**१८९९: गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६ )**१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे -- संत वाड्:मयाचे अभ्यासक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४ )**१८५६: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४ )*🛞 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: फ़ारुक शेख़ -- भारतीय अभिनेता (जन्म: २५ मार्च १९४८ )**२००६: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३ )**२००३: चिंतामण गणेश काशीकर -- वेदशास्त्र अभ्यासक, लेखक (जन्म: १७ ऑगस्ट १९१० )**२०००: मेघश्याम पुंडलिक तथा मे.पुं.रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१९८१: हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: १९०९)**१९७७: सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९०० )**१९३१: आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: १८६० )**१६६३: फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चुलीच्या धुराड्यातून मुक्ती अशी उज्वला योजना*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील 100 दिवसाचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे सर्व मंत्र्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर मध्ये कमांडो फोर्सची बोगस भरती, तरुणांची फसवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपूर स्मार्ट सिटीच्या उपाययोजनानंतर गुन्हेगारी दरात 14 टक्के घट, आयआयएम बंगलोरने सादर केला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सीए परीक्षेत हेरंब माहेश्वरी आणि ऋषभ ओस्तवाल यांनी केले देशात टॉप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानासह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली, आज शासकीय इतमामात होणार अंतीमसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये २०० ते ३०० रुपयांची वाढ होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त भार सहन करावा लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 474 धावा तर भारताचे 5 गडी बाद 164 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मिलिपीड* 📙****************** श्रावणाच्या सुमारास थोडेसे ऊन पडले की, लाल तपकिरी रंगाचे असंख्य पायांचे किडे बागेत, मोकळ्यावर एकगठ्ठा वळवळताना दिसतात. वर्षभर त्यांचा तसा पत्ता नसतो. पण थोडी पावसाची उघडीप, थोडे ऊन असा श्रावण मात्र त्यांना वाढीला पोषक ठरतो व हे हवा खाण्यासाठी मोकळ्यावर येतात. अन्यथा उरलेले दिवस त्यांचा मुक्काम जमिनीखाली असतोच. जमिनीतील नको असलेल्या गोष्टी, नाशवंत गोष्टी म्हणजे सडकी, कुजकी पाने, साली, फुले, फळे नष्ट करणे व जमीन भुसभुशीत ठेवणे हेच त्यांचे काम. गांडुळे हे काम फक्त जमिनीखालीच करतात; पण मिलिपीड्स जमिनीलगतसुद्धा काम करतात.मिलिपीड्सच्या असंख्य जाती जगभर आहेत. महाराष्ट्रात ज्याला आपण पैसाकिडे या नावाने ओळखतो. कारण जरा कोणाचा स्पर्श झाला की हे किडे गोलाकार करून अंग मुडपून स्तब्ध पडून राहतात. या पैशांची लांबी जेमतेम इंचभर असली, तरी पायांच्या जोड्या मात्र मोजता येणार नाहीत, एवढ्या असतात. पुढे दोन लांब नाग्या व मधल्या जबड्यात लहान काटेरी दात असतातच. असंख्य गोलाकार तुकड्यांनी यांचे शरीर बनते व प्रत्येक तुकड्याला पायांच्या दोन जोड्या असतात. सेंटीपीड वेगाने नागमोडी वळणे घेत हालचाल करतात, तर मिलीपीड सावकाश पण सरळ जात राहतात. सेंटीपीडना खायला प्राणिज् व वनस्पतीज दोन्ही पदार्थ चालतात. मिलिपीड शक्यतो वनस्पतीज अन्नावर जगतात. त्यांचा एकूण जीवनकाळही कमी म्हणजे जेमतेम वर्ष दोन वर्षांचाच असतो. पावसाळ्याच्या दिवसांत त्यांचे प्रजनन व पुनरुत्पादन होते. म्हणूनही या काळात त्यांची संख्या वाढल्याने वावर जमिनीवर होत असावा. या काळात अनेकदा हे पैसे जोडीजोडीने एकमेकांना पाठीवर घेऊन हिंडतानाही दिसतात. असंख्य पायांचा उपयोग मुख्यत: जमीन उकरताना, बिले करताना, ती भुसभुशीत करण्यासाठी केला जातो. मिलिपीड हे निरुपद्रवी, पण उपयोगी प्राणी असून संधिपाद या संघात मोडतात. मिलिपीडचा शब्दश: अर्थ हजार पायांचा प्राणी, तर सेंटिपीड म्हणजे शंभर पायांचा. प्रत्यक्षात मात्र या दोहोंना खूपच कमी पाय आढळतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*SP - Superintendent of Police*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःला लपविण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे दुसऱ्यावर टीका करणे हे होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचा खंड कोणता ?२) युरोप खंडातील सर्वात लहान देश कोणता ?३) युरोप खंडातील एकूण देश किती आहेत ?४) युरोप खंडातील सर्वात लांब नदी कोणती ?५) युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत कोणता ? *उत्तरे :-* १) युरोप २) व्हॅटिकन सिटी ३) ५० देश ४) व्होल्गा नदी ( ३,५३१ किमी ) ५) माउंट एल्ब्रस ( ५,६४२ मी. )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 वृषाली वानखडे, साहित्यिक, अमरावती👤 नंदकिशोर सोवनी, साहित्यिक, पुणे👤 साई पाटील, धर्माबाद👤 ओमसाई गंगाधर सितावार👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद👤 योगेश ईबीतवार, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥१॥ वाट पाहतांना भागले लोचन । कठिणच मन केलें तुवां ॥२॥ ऐकिली म्यां कानीं कीर्ति तुझी देवा । उठलासे हेवा त्याचि गुणें ॥३॥ अनाथ अन्यायी काय मी करीन । दयावंत खूण सांगसी तूं ॥४॥ नामा म्हणे आस पूर्ण कीजे देवा । रूपडें दाखवा नेटें पाटें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या माणसाचे जसे विचार असतात त्याच प्रकारचा स्वभाव सुद्धा बरेचदा आढळून येतो. म्हणूनच म्हणतात की, स्वभावाला औषध नसते.त्या स्वभावाला कोणीही बदलवू शकत नाही मात्र ज्या माणसाचे नकारात्मक विचार असतील तर त्या माणसात सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न केल्याने थोडेतरी परिवर्तन येऊ शकते.कारण बरेचदा असे होते की, काही माणसं परिस्थितीमुळे चिंतेत राहून त्या प्रकारे वागत असतात तर काहींच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात म्हणून एकदा तरी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासाला तडा*एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. शामने रामच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा शाम जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्हणाला,"मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का," रामला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्हणाला," अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले." यावर राम शांतपणे शामला म्हणाला," मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे"*तात्पर्य :- गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment