✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 डिसेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19QgsGzqpv/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_भारतीय नौदल दिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील ३३९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान**१९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर**१९९१: पॅन अॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.**१९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९७१: भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला.**१९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१९६७: थुंबा येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण**१९२४: मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्घाटन झाले.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: दिव्या अग्रवाल --- भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि नृत्यांगना* *१९७७: अजित भालचंद्र आगरकर -- भारतीय क्रिकेटपटू**१९७२: माधवी दीपक जोशी -- लेखिका**१९७१: सुनील संपतराव हुसे -- कवी* *१९६९: प्रा. डॉ. पुरुषोत्तम माळोदे -- लेखक, संपादक* *१९६८: डॉ. वसुधा वैद्य -- लेखिका* *१९६७: उमेश मोघे -- प्रख्यात तबलावादक, लेखक* *१९६७: मनीष लक्ष्मण पाटील -- लेखक* *१९६४: स्मिता प्रवीण खानझोडे -- कवयित्री* *१९६२: सय्यद जावेद अहमद जाफरी -- भारतीय विनोदी अभिनेता**१९६२: डॉ. सुलभा कोरे -- मराठी व हिंदी भाषेच्या कवयित्री व अनुवादक* *१९५७: प्रसाद सावंत -- लेखक, कवी* *१९५४: पंडित हिंदराज दिवेकर -- रुद्र वीणा आणि सतार वादक (मृत्यू: १९ एप्रिल २०१९ )**१९५१: डॉ.अलका देव मारुलकर -- गायिका आणि संगीतकार**१९५०: पार्थ पोकळे -- लेखक* *१९४९: नारायण दत्तात्रेय कुडलीकर -- लेखक* *१९४७: मुकुंद रामजीवन लाहोटी -- प्रसिद्ध कवी**१९४२: निशिकांत धोंडोपंत मिरजकर -- समीक्षक, तौलनिक साहित्याचे अभ्यासक**१९४२: फादर फ्रान्सिस दिब्रिटो -- ज्येष्ठ साहित्यिक,९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष( मृत्यू: २५ जुलै २०२४ )**१९३९: नामदेवराव दामोदर देसाई -- प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक (मृत्यू: १२ जून २०२३)**१९३५: शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (मृत्यू: २० जुलै १९९५ )**१९३२: कमलाकर धारप -- जेष्ठ साहित्यिक, ‘लोकमत’चे समन्वय संपादक* *१९३१: लीला श्रीवास्तव -- लेखिका* *१९१९: इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१२ )**१९१६: बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार (मृत्यू: २२ एप्रिल २००३ )**१९१०: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती,केन्द्रीय मंत्री,कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: २७ जानेवारी २००९ )**१९१०: मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (मृत्यू: १७ जून १९६५ )**१९०९: रंगनाथ नरहर होनप -- कवी**१८९८: काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशिनाथ चांदुरकर -- मराठी कवी, कादंबरीकार आणि लेखक**१८८५: मुकुंदराव दीनमित्रकार पाटील -- सत्यशोधकी पत्रकारिता करणारे ग्रामीण पत्रकार(मृत्यू:२० डिसेंबर १९६७)**१८३५: सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (मृत्यू: १८ जून १९०२ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: विनोद दुआ -- दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये काम करणारे भारतीय पत्रकार(जन्म: ११ मार्च १९५४ )**२०१८: डॉ. लक्ष्मण रामदास नसिराबादकर -- संत साहित्याचे गाढे अभ्यासक (जन्म: ८ ऑगस्ट १९३५ )**२०१७: शशी कपूर -- हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक (जन्म: १८ मार्च १९३८ )* *२००७: पुरुषोत्तम नागेश ओक -- विद्वान इतिहासकार, इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषांत लेखन केले आहे.(जन्म: २ मार्च १९१७ )**१९७४: शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ (जन्म: २८ आक्टोबर १८९३ )**१९०२: डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१ )* *१८५०: विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म: २२ मे १७८३ )* *११३१: ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ,खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (जन्म: १८ मे १०४८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दृष्टी तशी सृष्टी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बँकिंग सुधारणा विधेयक मांडले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तंबाखू व सिगारेटवरील GST 28 वरून 35 टक्यापर्यंत वाढविण्याची मंत्रीगटाची शिफारस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशाच्या बदलासाठी सर्जनशीलतेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकता, इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका सुधा मूर्ती यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सचिनचा महारेकॉर्ड मोडण्यापासून विराट फक्त एक शतक दूर, दुसऱ्या टेस्टमध्ये रचणार इतिहास ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का ?*जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. या आम्लाचा अन्नपचनासाठी खूप उपयोग असतो. जठरातील पेशीमधून हे अाम्ल स्रवत असते. या आम्लाचे प्रमाण कमी झाले तर अजीर्ण होते. अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. या उलट आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास आम्लपित्ताचा त्रास होतो. तोंडात आंबट पाणी येते. छातीत जळ जळ होते. पोटात जळजळ होते. जठराचा व्रणही होऊ शकतो. किंवा लहान आतडय़ांच्या पहिल्या भागात व्रण होतो. आम्ल पित्त असणाऱ्या लोकांनी तिखट, तेलकट, आंबट पदार्थ खाऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण अशा गोष्टींनी आम्ल जास्त प्रमाणात तयार होते. साहजिकच आम्लपित्ताच्या व्यक्तीला अजूनच त्रास होईल. अशा व्यक्तीने खायचा सोडा घेतल्यास त्याची जळजळ कमी होते. कारण आम्लाचा प्रभाव अल्कली मुळे कमी होतो. जेल्युसील सारख्या गोळ्यांनीही रुग्णाला बरे वाटते. लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहा. लिंबात देखील सौम्य असे एक अाम्लच असते. आम्लपित्त कमी होण्याची दोन स्पष्टीकरणे देता येईल. एक म्हणजे हायड्रोजन आयर्न असतील (H+) तर आम्ल निर्मितीची व स्त्रवणाची जठारातील पेशींची क्रिया मंदावते. दुसरे म्हणजे लिंबू आपण पाण्यात टाकूनच पितो. साहजिकच या पाण्यामुळे जठरातील आम्ल सौम्य होते. या दोन गोष्टींमुळे काही लोकांमध्ये लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होत असावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ISKCON - International Society for Krishna Consciousness*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्ही केलेल्या चुकांकडे डोळेझाक केली तर, सत्य तुमच्याकडे पाठ फिरवेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय नौदल / नौसेना दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) २०२५ मध्ये 'खेलो इंडीया युथ गेम्स' चे यजमानपद कोणते राज्य भूषविणार आहे ?३) १९५० नंतर पहिल्यांदाच कोणत्या ठिकाणी २६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिवस' साजरा करण्यात आला ?४) 'वचक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) इ. स. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले ? *उत्तरे :-* १) ४ डिसेंबर २) बिहार ३) जम्मू काश्मीर ४) धाक, दरारा ५) अवंतिका गोखले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आलीम शेख👤 जीवन पाटील👤 उमाकांत शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥ तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥ धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्त वच्छावरी ठेवूनियां ॥४॥ विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें प्रेम श्रीहरी द्यावें मज ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फुकटात सर्वच काही मिळत नसले तरीही .त्यात मात्र अगदी फुकटात व भरभरून निंदा, चुगली, अपमान आणि चेष्टा न मागताच मिळत असतात.ज्या व्यक्तीला हे फुकटात मिळतात ती व्यक्ती, नक्कीच भाग्यवान असते. निदान त्याच्यात काहीतरी करून दाखविण्याची आवड असते हीच आवड त्यासाठी सर्व काही असते. म्हणून त्याच्यासाठी ह्या, फुकटात मिळणाऱ्या नको त्या गुणांचा सुद्धा ती व्यक्ती मोठ्या मनाने आदर करत असते.कारण जीवनात अशाही काही गोष्टीची आवश्यकता असते.त्यांचाही स्वीकार करता आले पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चांगुलपणा*एकदा एका गावात गुरुनानक गेले. त्या गावातील लोकांनी त्यांना धक्के मारून हाकलून दिले. तरीही नानकजी म्हणाले, "आपल्या गावातील एकता कायम टिकून राहो." पुढच्या गावात नानक गेले. त्या गावातील प्रत्येक व्यक्तीने त्यांची प्रेमाने विचारपूस केली. त्यांचा मुक्काम असेतोवर त्यांची प्रेमाने देखभाल केली.आदरसत्कार केला. त्या गावात नाकजींनी एक पर्वचनही केले. प्रवचनाच्या शेवटी गुरुनानक म्हणाले, "तुमच्या गावाचा नाश होवो. तुमचं वाटोळं होवो. तुमच्यात भांडणं होवोत आणि तुमची फुटाफूट होवो." हे ऐकल्यावर त्यांचे शिष्य म्हणाले, "हा काय आशीर्वाद दिलात?" नानक म्हणाले, "पहिले लोक आणि दुसरे लोक यांतला फरक ध्यानी घ्या. या दुसऱ्या गावातला प्रत्येक माणूस सज्जन आहे. या साऱ्यांचं एकाच गावात काय काम? फुटाफूट झाली, तर हे लोक गावोगाव जातील. त्यामुळे ती सारी गावे सुधारतील. पहिल्या गावातील लोक त्याच गावात जेवढा काळ एकत्र राहतील, ते बरंच आहे ! गटारं एकाच ठिकाणी साठली तरी बरी. गंगा मात्र सगळीकडे पसरायला हवी."*तात्पर्य : चांगल्याचा विस्तार हेच जग सुखी करण्याचे रहस्य.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment