✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BFhRFo73A/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील ३४४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: पोटा कायदा रद्द करण्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता* *१९९५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ**१९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाची निर्मिती**१९००: लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: रागिनी खन्ना -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९८१: दिया मिर्झा-हेंड्रिच -- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री व निर्माती**१९८०: पराग माधव पोतदार -- मुक्त पत्रकार, अनुवादक, संपादक, प्रकाशक**१९७८: किशोर नामदेव कवठे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७५: डॉ. विशाल गोरखनाथ तायडे -- मराठी, हिंदी, इंग्रजी लेखन करणारे लेखक* *१९७४: अंजली अंबेकर -- लेखिका**१९७१: डॉ. जनार्दन पांडुरंग भोसले -- प्रसिद्ध लेखक**१९६८: फराह नाझ हाश्मी -- चित्रपट अभिनेत्री**१९६७: मृणाल घाटे -- कवयित्री**१९६५: अभिजीत टोणगावकर -- लेखक* *१९५७: माधुरी वरुडकर -- कवयित्री, लेखिका**१९५६: मदन मार्तंडराव बोबडे -- कवी, लेखक**१९५२: चंद्रकांत गुंडप्पा गडेकर -- लेखक**१९५०: प्रतीक्षा प्रकाश वखडेकर -- कवयित्री* *१९४८: विद्या वसंत पराडकर -- कवयित्री* *१९४६: सोनिया गांधी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्व अध्यक्षा**१९४५: खुदराम गोविंद पुरामकर -- लेखक (मृत्यू: १९ डिसेंबर २००४ )**१९३९: घन:श्याम धेंडे -- प्रसिद्ध गझलकार (मृत्यू: १४ एप्रिल २०१७ )**१९३८: प्रा.भास्कर कुलकर्णी -- लेखक, कथाकार, समीक्षक* *१९२८: प्रा. विजया प्रभाकरराव कुलकर्णी -- लेखिका* *१९२६: रामचंद्र श्रीपाद गोसावी (राम गोसावी) -- प्रसिद्ध कवी* *१९२५: शकुंतला सातपुते -- लेखिका**१९१३: होमाई व्यारावाला -- भारतातल्या पहिल्या महिला छायाचित्र पत्रकार ( मृत्यू: १५ जानेवारी २०१२ )**१९१२: कानू रॉय -- हिंदी आणि बंगाली चित्रपटांमधील भारतीय अभिनेता आणि संगीतकार(मृत्यू: २० डिसेंबर१९८१ )* *१८७८: अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू: १६ मे १९५० )**१८६८: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: नरेंद्र भिडे -- प्रसिद्ध संगीतकार (जन्म: ३ एप्रिल १९७३ )**२००७: त्रिलोचन शास्त्री -- साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी ( जन्म: २० ऑगस्ट १९१७ )**१९९७: के. शिवराम कारंथ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरणवादी,चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० ऑक्टोबर १९०२)**१९९३: स्नेहप्रभा प्रधान -- चित्रपट अभिनेत्री, लेखिका (जन्म: २० ऑक्टोबर१९१५ )**१९८२: विठ्ठल हरी कुलकर्णी -- मराठी लेखक, समीक्षक व चरित्रकार (जन्म: १४ एप्रिल १९०२ )**१९४२: डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म: १० ऑक्टोबर १९१० )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - शूरवीर सचिन*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *288 पैकी 280 आमदारांचा शपथविधी संपन्न,8 आमदारांचा शपथविधी बाकी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा, छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, मराठवाड्यातील समस्यांवर, कामगारांच्या स्थलांतरावर झाली चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्याला विरोध, महामेळावा दडपण्यासाठी शहरात जमावबंदी, उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवव्यांदा विजेतेपदाचे स्वप्न भंगलं, दुबई येथे झालेल्या U-19 आशिया कप स्पर्धेत बांगलादेशने भारताचा 59 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *भूकंप* 📙 ****************भूकंपाचा अनुभव भारतीयांना नवीन नाही. १९५५ साली आसाममध्ये प्रचंड भूकंप झाला होता. १९६७ साली कोयनेच्या परिसरात झालेल्या भूकंपाने मुंबईपासून कोल्हापूरपर्यंतचा सर्व टापू हादरवून सोडला होता. यानंतरचा १९८८ साली बिहारमध्ये झालेला भूकंप कित्येक खेडोपाडी उद्ध्वस्त करून गेला. १९९२ साली उत्तरकाशी या हिमालयातील भागात झालेल्या भूकंपातून अजून लोक सावरायचे आहेत. भारतातील अत्यंत भीषण भूकंप ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर जिल्ह्यात झाला. किल्लारी व सास्तूर या दोन गावी त्याचा केंद्रबिंदू होता. या भीषण धक्क्यांमुळे मराठवाड्यातील मातीच्या घरांचा पूर्णतः विध्वंस होऊन ढासळलेल्या ढिगार्याखाली अंदाजे अकरा हजार माणसे जिवंत गाडली गेली. रात्रीच्या वेळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा प्रकार घडला. गावेच्या गावे उद्ध्वस्त व निर्मनुष्य करणारा प्रकार महाराष्ट्राच्या आठवणीत कायम राहील. कच्छमधील भूजजवळ त्यानंतरचा मोठा भूकंप होऊन फार मोठी मनुष्यहानी व इमारतींची हानी झाली. अहमदाबादसारख्या शहरातील मोठ्या वास्तूंना त्याची हानी पोहोचली. इतका तो मोठा होता. या भागांत धाब्याची मातीची घरे ही हवामानाला पूरक असल्याने बांधली जात. यानंतर या बांधणीबद्दलच साशंकता निर्माण झाली आहे. भूकंप झाल्यावर संपूर्ण भूपृष्ठाच्या थरथरण्यामुळे विध्वंस होत जातो. ज्या भक्कम समजल्या जाणाऱ्या पायावर आपण इमले उभारतो, तोच पाया डळमळीत होऊन थरथरल्यामुळे वरची इमारत तडे जाऊन कमकुवत बनते, प्रसंगी कोसळते.भूकंपाचा अनुभव अत्यंत चमत्कारिक असतो. सहसा हा अनुभव घेतलेला माणूस असा प्रसंग कधीच विसरणार नाही. अनेकदा घनगंभीर असा आवाज या वेळी आसमंतात भरून राहतो. घरांचे पत्रे, घरांतील फडताळातील वस्तू, मोकळ्या बरण्या, शेल्फवरची पुस्तके थरथरण्याने पडतात वा विस्कळीत होतात. अनेकदा भूकंपानंतर पाऊस पडल्याची नोंद आहे. फार मोठा भूकंप असेल तर झाडे उन्मळून पडणे, रेल्वेचे रूळ वेडेवाकडे पिळवटणे, तलावातील पाणी भूगर्भात नाहीसे होणे. रस्त्याच्या मध्यभागी कित्येक मीटर खोल जाणाऱ्या भेगा पडणे असे दृश्य दिसते.भूकंपाचे क्षेत्र सहसा काहीशे चौरस किलोमीटरचे असते. याची नोंद कित्येक किलोमीटर दूरवर होऊ शकते. भूकंप मोजण्याच्या यंत्राला 'सायास्मोग्राफ' म्हणतात व भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये व्यक्त केली जाते. एक ते दहा रिश्टरमध्ये ती तीव्रता मोजली जाते. शून्य ते पाच या दरम्यान मोजल्या गेलेल्या भूकंपाची जाणीव होते, किरकोळ नुकसान होते. पाच ते सात या दरम्यान इमारतींची हानी, रस्त्याला तडे जाणे, झाडे पडणे हे होऊ शकते. तर सातपेक्षा जास्त रिश्टरचा भूकंप सहसा भयानक हानी करून जातो व त्याचा परिणाम सहज पाच सातशे किलोमीटरपर्यंत जाणवतो. पृथ्वी साडेचार अब्ज वर्षांपूर्वी उत्पन्न झाली पण त्या वेळेपासून आजपर्यंत पृथ्वीच्या बाह्यकवचाच्या खाली २९,००० किलोमीटर खोलीवर असलेल्या तप्त खडकांच्या द्रवस्वरूपामुळे अनेक बदल घडत आले आहेत. बाह्य कवच जेमतेम वीस ते तीस किलोमीटर जाडीचे असून या कवचाच्या सलग अशा टापुंच्या हालचाली सतत चालू असतात. या हालचाली होत असताना एक टापू ज्या वेळी दुसऱ्या टापूशी घासतो, चिकटतो, घासून सरकतो वा आदळतो, तेव्हा भूकंप होतात. या हालचालींमुळे प्रचंड पर्वत, मोठाले खडक, जलाशय यांच्या अस्तित्वावरच सखोल परिणाम घडतात. ज्यावेळी दोन टापू एकमेकांवर घासतात, त्यावेळीच आपल्याला ही भूकंपाची थरथर जाणवते. समुद्राच्या पोटात खोलवर अशा घडामोडी घडतात तेव्हा सुनामी लाटांची निर्मिती होते. विलक्षण विध्वंस करणाऱ्या या लाटा अनेक किनारे उद्ध्वस्त करीत जातात. इंडोनेशियाजवळ झालेल्या भूकंपातील सुनामीचा अनुभव भारतासकट अनेकांनी घेतला आहे. १९८९ साली अमेरिकेत सनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या भयानक भूकंपात प्रचंड असे फ्लायओव्हर पूल एखादा धुण्याचा कपडा पिळावा असे पिळवटून कोलमडले होते. तर १९०६ साली त्याच भागात झालेल्या भूकंपात कित्येक किलोमीटर लांबीचे भूकंपाचे टापू एकमेकांवर आदळल्याची खूण आजही दिसू शकते. भूकंपाची कारणे आजही अज्ञात आहेत. मध्य कवचामध्ये उत्पन्न होणाऱ्या अतिदाबामुळे बाह्य कवचाच्या हालचाली होत असाव्यात व हा दाब कित्येक वर्षे हळूहळू निर्माण होत असावा, असे मानले जाते. जगामधील भूकंप होऊ शकणारे पट्टे मात्र ज्ञात आहेत. भूकंपाला तोंड देऊ शकणारी घरे, कारखाने, यंत्रे आपण उभारू शकतो, पण त्यासाठी अफाट खर्च येतो. जपानमध्ये या स्वरूपाची काळजी घेऊन मोठ्या इमारती उभारल्या गेल्या आहेत. दुसरी सोपी काळजी म्हणजे भक्कम लाकडी व लोखंडी सांगाड्यावर घरे उभारणे. मधल्या भिंती हलक्या, तकलादू अशा वस्तूंनी उभ्या केल्या जातात. जपान हे राष्ट्र भूकंपाला तोंड देण्यासाठी सतत सज्ज असते. ११ मार्च २०११ रोजी झालेल्या तीव्र भूकंपाला व त्यानंतर उत्पन्न झालेल्या सुनामीला तोंड देणे उत्तर जपानला कठीण गेले. ८.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का फुकुशिमा या शहराला बसला. त्याचा केंद्रबिंदू शहरापासून ३०० किलोमीटर दूर समुद्राच्या पोटात होता. त्यामुळे प्रथम भूकंपाचे हादरे व त्यानंतर १० मीटर उंचीच्या सुनामी लाटा यामुळे किनाऱ्यावरची कित्येक गावे नामशेष झाली. या तडाख्यात फुकुशिमा येथील अणुविद्युत निर्मितीकेंद्रेही सापडली. सततचे भूकंप व सुनामीला तोंड देण्याची तयारी असलेल्याने या प्रलयंकारी भूकंपानंतरही मनुष्यहानी लाखोंनी न होता हजारांमध्येच थांबली. तीव्र स्वरूपाच्या भूकंपाला तोंड देताना नेहमीच अनेक प्रश्न समोर उभे राहतात. अनेक घरे कोसळून झालेली मनुष्यहानी, निवारा तुटल्याने उघड्यावर आलेली माणसे, निरुपयोगी झालेली दळणवळणाची सर्व साधने (वीज, टेलिफोन, रस्ते, रेल्वे) पिण्याच्या पाण्याचे पाइप फुटल्याने त्याचा तुटवडा या साऱ्याला तोंड देणे कठीण असते. मोठ्या भूकंपाला एखादे राष्ट्रही सहज तोंड देऊ शकत नाही ते यामुळेच. भूकंपाची पूर्वसूचना देणारी एखादी यंत्रणा वा एखादे संशोधन नजीकच्या भविष्यात होईल असेही कोणतेच चिन्ह नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*BCA - Bachelor of Computer Applications*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रयत्नातील सातत्य हेच यशाचे खरे सूत्र होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच कोणत्या अभिनेत्याला 'नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे ?२) झाडाच्या पानांच्या शिरामधून कशाचे वहन होते ?३) दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक मृदा दिवस' म्हणून साजरा केला जातो ?४) 'विलंब' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) देश पातळीवर देण्यात येणाऱ्या 'नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्राम पंचायत पुरस्कार' कोणत्या ग्राम पंचायतला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) अशोक सराफ २) पाणी व अन्न ३) ५ डिसेंबर ४) उशीर ५) मान्याचीवाडी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 खा. श्री रवींद्र वसंतराव चव्हाण, नांदेड👤 शुभदा दीक्षित👤 मिलिंद गड्डमवार, साहित्यिक, चंद्रपूर👤 श्री रंजीत महाराज पाळेकर👤 सुहास रुक्मिणी दाभाडे👤 अक्षय यमलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐसें माझें मना येतें पंढरीनाथा । न सोडी सर्बथा चरण तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी गोपाळा । कां स्नेह लावियेला पूर्वींहुनी ॥२॥ ह्रदयीं चित्तवृत्ति मनेंसि मिळोनी । अवघीं तुझ्या चरणीं सुरवाडिलीं ॥३॥ नामा म्हणे केशवा धरिली तूझी सेवा । सुखा अनुभवा अनुभविलें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण आपले कार्य करत रहावे आणि शांत राहून आपल्या कामाकडे लक्ष द्यावे. आपल्या दृष्टीने किंवा इतरांच्या दृष्टीने हा विचार योग्य वाटत असला तरी कधी, कधी परिस्थिती बघून कार्य करत असताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बरेचदा अशा वागण्याचा दुसरे लोक फायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आजकाल चांगले होताना बघणारे कमी असतात आणि वाईट करणारे पदोपदी टपून बसलेले असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *.... मन ....*आचार्य विनोबांनी 'देव कसा आहे ?' याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'देव हा प्रतिष्ठित पाहुण्यासारखा आहे. एखादा पाहुणा दारात उभा राहतो. दारावर टकटक करतो. पण यजमानाने दार उघडून 'आत या' म्हटल्याशिवाय घरात शिरत नाही. तसेच देव सर्वत्र आहे. केवळ तुमच्याच दारी आहे, असे नव्हे. जशी सूर्याची किरणे सर्वत्र आहेत. केवळ तुमच्याच दारी आहे, असे नव्हे. जशी सूर्याची किरणे सर्वत्र पसरलेली असतात. पण बंद दारातून आत येऊ शकत नाहीत. मात्र दाराला किंचितही का होईना फट असेल, दार थोडे किलकिले केले असेल तरी प्रकाशाचे दूत त्यातून घरात प्रवेश करतात. तसेच निष्ठापूर्वक संकल्प करून प्रार्थना करणे म्हणजे मनाचे दार किलकिले करणेच आहे. त्या सर्वशक्तीला आव्हान करून बोलवण्यासारखेच आहे. देव, गुरु, प्रेरणादायी स्फूर्तीस्थान ह्यांत एवढी शक्ती असतेच आणि इतरांना ती शक्ती देण्याचा संकल्प असतोच. पण देव अनाहूत पाहुण्यासारखा दारी उभा असतोच. असे स्वरूप विशद करून विनोबांनी प्रार्थनेचे महत्व विशद केले आहे.* तात्पर्य : सृष्टीतील दिव्य शक्तीसाठी मनाची कवाडे खुली ठेवल्याखेरीज ईश्वरी शक्तीचा अनुभव घेणे कठीण आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment