✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 डिसेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚜️ *_राष्ट्रीय किसान दिन_* ⚜️••••••••••••••••••••••••••••••••• ⚜️ *_ या वर्षातील ३५८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚜️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚜️•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.**२०००: कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी**१९७०: दी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.**१९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ.मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.**१९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४७: अमेरिकेतील ’बेल रिसर्च लॅब्ज’ या संशोधन संस्थेने ’ट्रॅन्झिस्टर’ या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधे होणार्या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.**१९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.**१९२१: शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.**१९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो (इजिप्त) येथे आगमन.**१८९३: ’हॅन्सेल अॅंड ग्रेटेल’ या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.* ⚜️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚜️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: कुणाल मदन हजेरी -- लेखक* *१९७५: कल्पना मलये -- बाल साहित्य निर्मिती* *१९६४: श्रीपाद कोठे -- लेखक, कवी* *१९५९: संजय व्यंकटेश संगवई -- मराठी लेखक, पत्रकार, संपादक, माध्यमतज्ज्ञ, माध्यम चिकित्सक (मृत्यू: २९ मे २००७ )**१९५९: प्रतिमा जोशी -- महाराष्ट्र टाइम्सच्या माजी पत्रकार, मराठी कथाकार**१९५७: विवेक आपटे -- लेखक, गीतकार**१९५६: उज्ज्वला जोग -- भारतीय मराठी अभिनेत्री**१९५४: नरेंद्र रघुवीर बोडके -- कवी, लेखक, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: ७ जानेवारी २०१२ )**१९४५: आनंद श्रीधर सांडू -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९४५: प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे -- संत साहित्याचे गाढे अभ्यासक(मृत्यू: ८ ऑगस्ट २०२१ )**१९४१: पंडित माधव गुडी -- एकहिंदुस्थानी शास्त्रीय गायक(मृत्यू: २२ एप्रिल २०११ )**१९२५: सुरिंदर कपूर-- भारतीय चित्रपट निर्माते (मृत्यू: २४ सप्टेंबर २०११ )**१९२३: भास्कर आनंद पांढरीपांडे -- कवी, लेखक* *१९०२: चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १९८७ )**१८९७: कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार (मृत्यू: २४ जुलै १९७८ )**१८७४: डॉ. वामन गणेश देसाई -- भारतीय रसशास्त्र , लेखक (मृत्यू: २६ मे १९२८ )**१८५४: हेन्री बी.गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ एप्रिल १९२६ )* ⚜️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚜️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: नाना चुडासामा -- मुंबईचे माजी नगरपाल तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध विषयांवर मर्मभेदी भाष्य करणार व्यतीमत्व (जन्म:१७ जून १९३३)**२०१२: आनंद मोरेश्वर अभ्यंकर -- मराठी चित्रपट, नाटके व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता (जन्म: २ जून १९६३ )**२०१०: के. करुणाकरन – माजी केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक (जन्म: ५ जुलै १९१६ )**२०१०: ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक.(जन्म: २१ मे १९२८ )**२००८: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (जन्म: ३१ जानेवारी १९३१ )**२००४: नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान (जन्म: २८ जून १९२१ )**२०००: ’मलिका-ए-तरन्नुम’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ )**१९९८: रत्नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते,पद्मश्री (१९८५),खासदार (१९५२) भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ )**१९९६: वसंत लाडोबा सावंत -- कवी, समीक्षक(जन्म:११ एप्रिल १९३५)**१९७९: दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार (जन्म: ४ जून १९०८ )**१९६५: गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक,’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (जन्म: २ जुलै १८८० )**१९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक,शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक (जन्म: २ फेब्रुवारी १८५६ )**१८३४: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय किसान दिनानिमित्त**शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .....!*भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र त्याच्याच पदरात धोंडा का पडतो? हे एक न सुटणारे कोडे आहे. ................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवेत मधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना खासगी सचिव आणि स्टाफ नेमता येणार, वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नेमणुका रोखण्यासाठी प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडीताईकडे सरकारचे दुर्लक्ष, तळमळीने काम करूनही मानधन रखडलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह 17 विधेयक मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *Weather Report : पुढील 5 दिवस यलो अलर्ट; थंडी ओसरुन पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा ठोठावला दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, जोस बटलर करणार संघाचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सजीवांची उत्पत्ती* 📙‘सजीवाचा जन्म पृथ्वीवर कसा झाला असेल ?' या प्रश्नाने अनेक वर्षे असंख्य शास्त्रज्ञांची झोप उडवलेली आहे. हे शास्त्रज्ञ विविध क्षेत्रात काम करणारे आहेत, पण या प्रश्नाचे नेमके उत्तर आजही ठामपणे देता येत नाही. मात्र एक गोष्ट आता स्वच्छपणे स्पष्ट होऊ लागली आहे. सजीव म्हणजे काय ? तर स्वतःच प्रतिकृतीप्रमाणे नवीनास जन्म देण्याची शक्ती असलेली ऑर्गेनिक गोष्ट वा सेंद्रिय वस्तू. सर्व सजीव हे मुख्यतः प्राणवायू, हायड्रोजन, नायट्रोजन व कार्बन यांच्या अणूंनी बनलेले असतात, हेही आता कळलेले आहे. जसजसे या सजीवांच्या शरीरातील पेशींबद्दल ज्ञान वाढत जाऊ लागले, तसतसे एका ठाम निष्कर्षाला सर्व शास्त्रज्ञ येऊन पोहोचले. सर्व जगातील डीएनएचा रेणू किंवा डीऑक्सी रायबोन्यूक्लिक अॅसिडचा रेणू हा सजीवांच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे; कारण स्वतःसारखीच तंतोतंत निर्मिती करण्याची क्षमता या डीएनएच्या रेणूतच आहे.डीएनएचा रेणू म्हणजे थायमिन व अॅडेनिन, सायटोसीन व ग्वानिन यांसारख्या रासायनिक जोड्यांनी बनलेली सलग पिळाची मालिकाच असते. एखाद्या शिडीला पीळ दिल्यावर कसे दिसेल, तशी ही मालिका दिसते. यालाच डीएनए हेलिक्स असा शब्द वापरला जातो. रासायनिक प्रथिनांच्या या जोड्या जेव्हा उलगडतात, तेव्हा प्रत्येक जोडीतील एक भाग दुसऱ्या भागाची उपलब्ध द्रव्यातून निर्मिती करतो. यातूनच चक्क दोन प्रतिकृती निर्माण होत जातात. डीएनएच्या उलगड्यातुन नवनिर्मिती होत जाते व ती अगदी तंतोतंत मूळच्या गोष्टीची प्रतिकृतीच असते. जेव्हा हा शोध लागला. तेव्हा सजीवांच्या उत्पत्तीचे कूट सोडवण्याच्या दृष्टीने एक मोठा पल्ला गाठला गेला.पृथ्वीच्या निर्मितीनंतर डीएनए निर्माण होण्यासाठी आवश्यक अशी सर्व सेंद्रिय द्रव्ये उपलब्ध होतीच. जेव्हा अल्ट्रा व्हॉयलेट किरण अशा द्रव्यसमुच्चयातून जातात, तेव्हा किंवा विजेचा प्रवाह या द्रव्यसमुच्चयातून जातो, तेव्हा विविध स्वरूपाची सेंद्रिय वा ऑर्गेनिक संयुगे निर्माण होतात. असेच संयुग म्हणून डीएनए निर्माण झाला असावा, असा सध्याचा कयास आहे. यालाच 'ओपॅरीन व हाल्डेन यांची सजीव उत्पत्तीची थेअरी' म्हणतात. पहिल्या डीएनएची निर्मिती झाल्यानंतरचे काम खूपच सुकर होते. या डीएनएचे पुनरुत्पादनाचे म्हणजेच स्वतःची प्रतिकृती करायचे काम जोराने सुरू झालेले होतेच. यातूनच प्रथम प्राणवायूशिवाय वाढणारे जीवाणू निर्माण झाले असावेत. या ऍनेरोबिक जीवाणूंपासून दोन वेगळ्या प्रकारच्या, प्राणवायू घेऊन वाढणार्या एरोबिक जिवाणूंचा जन्म झाला. एका प्रकारचे जीवाणू सूर्यप्रकाश व प्राणवायू यांचा वापर करून वाढू लागले. या प्रकारचेच पुढे वनस्पतीजीवनातील प्रकाशापासून अन्ननिर्मिती करणाऱ्या क्लोरोप्लास्टमध्ये रूपांतर झाले. दुसऱ्या प्रकारच्या जीवाणूंपासून केंद्रक असलेल्या पेशींची निर्मिती झाली.केंद्रात असलेली पेशी (Nucleated Cell) जेव्हा निर्माण झाली, तेव्हा तिच्यातून वनस्पतीय पेशी व प्राणिज पेशी असे प्रकार जन्माला आले. वनस्पती पेशींना घट्ट अशी बाह्य़ आवरणे असतात, तर प्राणिज पेशींना तसे आवरण नसते. तसेच वनस्पतीय पेशीत क्लोरोप्लास्ट हे द्रव्य असते, तर प्राणिज पेशीत ते नसते. यातूनच नंतर विशिष्ट कामे करणाऱ्या पेशींची निर्मिती होत जाऊन सजीवांचे विविध प्रकार तयार होत गेले.सजीवांची उत्पत्ती कधीची असावी ? किमान साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीचे अवशेष सध्या उपलब्ध आहेत. सजीवाच्या शरीरातील कार्बन आयसोटोप व खडकातील कार्बन आयसोटोप यांच्या निरीक्षणावरून हे निष्कर्ष काढले गेले आहेत. फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे काय ? सध्या दुसरीकडे कुठे सजीव सृष्टी असल्याचा आपल्या हाती तरी पुरावा आलेला नाही‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*IMEI - International Mobile Equipment Identity*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सदासर्वदा, यश कुणालाच येत नाही. जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?२) जगातील ( आशिया खंडातील ) सर्वात मोठा देश कोणता ?३) जगातील ( आशिया खंडातील ) सर्वात उंच पर्वत कोणता ?४) जगात सर्वाधिक लोकसंख्येचा खंड कोणता ?५) संयुक्त राष्ट्राच्या मते, आशिया खंडातील एकूण देश किती ? *उत्तरे :-* १) आशिया २) रशिया ३) माउंट एव्हरेस्ट ( ८,८४८ मी. ) ४) आशिया ५) ४९ देश *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मोहन सुदर्शन बारदवार, धर्माबाद👤 सार्थक सुगंधे, धर्माबाद👤 चिं. श्रीपाद हणमंलू शंकरोड, येवती👤 अभि पाटील धुप्पे👤 गंगा देवके👤 ज्ञानेश्वर ताटीकुंडलवार👤 राजू पाटील कुरुंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काय केलें मागें कोणाचें तूं बरें । शेवटीं वान्नरें संग करी तें ॥१॥ संगें करूनियां हिंडे रानोरान । दशरथा खूण चुकविसी ॥२॥ काय काय तरी सांगों तुज गुण । भिल्लिणीची आण सत्य मनीं ॥३॥ सत्य मानी वाळी वशिष्ठासहित । नामा म्हणे मात ही पुरातन ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैशाने व्यवहार केला जातो. पण, आचार, विचारांची मात्र देवाणघेवाण केली जाते. त्यासाठी पैसे मोजावे लागत नाही तर आपल्याच आपुलकीच्या माणसासोबत आपले सुख,दु:ख मनमोकळेपणाने व्यक्त केले जाते.त्यातून भलेही व्यवहार करण्यासाठी पैसे मिळत नसले तरी आपल्या मनात असलेला ताण,तणाव दूर होत असतो आणि तेच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असते.म्हणून अशाच माणसाची आपण निवड करावे जेणेकरून तो माणूस पैशाला महत्व न देता आपल्या भावनांची कदर करणारा असावा. अशा माणसाला शोधून काढण्यासाठी आपणच प्रयत्न करून बघावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *घुबड आणि टोळ*एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.तात्पर्य - आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसऱ्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment